Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

१६ वाळू साठ्यांवर छापे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

जिल्ह्यातील वाळूपट्ट्यांचे लिलाव झालेले नसतानाही शहरात वाळूचे बेकायदा साठे करून ठेवले होते. महसूल विभागाच्या पथकाने पोलिसांच्या मदतीने महसूलच्या बुधवारी दिवसभरात १६ ठिकाणी छापे टाकून सुमारे पावणेदोनशे ब्रास वाळू जप्त केली, अशी माहिती तहसीलदार रमेश मुंडलोड यांनी दिली.

महसूल विभागाच्या दोन पथकांनी बुधवारी सकाळी १०पासून कारवाईला सुरुवात केली. पथकांनी शहरासह परिसरातील साठ्यांवरही कारवाई केली. हर्सूल टी पॉइंट, पुंडलिकनगर रोड, शिवाजीनगर, देवळाई चौक, पंचवटी चौक, पडेगाव, एमजीएम, हडको आदी १६ ठिकाणी छापे टाकून वाळूचे साठे जप्त केले. सायंकाळपर्यंत सुरू असलेल्या या कारवाईमध्ये दोन्ही पथकांनी सुमारे पावणेदोनशे ब्रास वाळू जप्त केली असून, या वाळूची बाजारात सुमारे ८ लाख रुपये आहे. जप्त करण्यात आलेली वाळू तहसील कार्यालयाच्या आवारात ठेवण्यात आली आहे. शहर आणि परिसरात मोठ्या प्रमाणावर बांधकामे सुरू आहेत, मात्र दुसरीकडे वाळूपट्ट्यांचा लिलाव करण्यात आलेला नाही. शहरातील जाधववाडी, शिवाजीनगर, सातारा, देवळाई, पडेगाव या भागात अधिक बांधकाम सुरू अाहेत. या परिसरात चोरट्या पद्धतीने वाळू शहरात आणून विक्री करण्यात येत होती.

दरम्यान, जप्त करण्यात आलेल्या वाळू साठ्यांची परवानगी, रॉयल्टी भरल्याच्या पावत्या नसल्याचे आढळले. जिल्हाधिकारी डॉ. निधी पांडेय यांनी रस्त्यावर अवैध वाळू साठविणाऱ्यांवर कारवाई सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानंतर ही कारवाई कारवाई सुरू करण्यात आली.

२ पथकांची कारवाई

तहसीलदार रमेश मुंडलोड, नायब तहसीलदार मीना वराडे यांच्या नेतृत्वाखाली २ पथक तयार करण्यात आली. या पथकांमध्ये ८ तलाठी, ४ मंडळ अधिकारी, ६ पोलिस, जेसीबी आणि ३ ट्रक यांचा समावेश होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मोतेवार यांची प्रकृती बिघडली

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त । उस्मानाबाद

फसवणूक प्रकरणात अटक झालेले 'समृद्ध जीवन'चे महेश मोतेवार यांना उपचारासाठी सोलापुरला घेऊन जाताना त्यांच्या खासगी सुरक्षारक्षकांनी प्रसारमाध्यमांच्या काही कॅमेरामनना धक्काबुक्की केली. पोलिसांसमोर झालेल्या या राड्यानंतर मोतेवार यांच्या एका सुरक्षारक्षकास ताब्यात घेण्यात आले आहे. दरम्यान मोतेवार यांना छातीत दुखू लागल्याने त्यांना बुधवारी रात्री उस्मानाबाद जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर डॉक्टरांनी दिलेल्या अहवालानुसार पुढील उपचारासाठी त्यांना सोलापुर आल्याचे पोलिसांनी सांगितले. जिल्हा पोलिसांनी मोतेवार यांना दोन दिवसांपूर्वी पुण्यातून अटक केली होती.

बुधवारी रात्री मोतेवार यांना छातीत दुखू लागल्याने त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. गुरुवारी सकाळी डॉक्टरांनी सोलापुरला उपचारासाठी पाठवण्याचा सल्ला दिला. विशेष म्हणजे उस्मानाबादमध्ये उपचाराच्या सर्व सुविधा असताना देखील डॉक्टरांनी सोलापुरला नेण्यास सांगितले. उस्मानाबादहून सोलापुरला घेऊन जाताना रुग्णालयाबाहेर प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी मोठी गर्दी केली होती. यावेळी मोतेवार यांच्या खासगी सुरक्षारक्षकांनी प्रसारमाध्यमांच्या काही कॅमेरामनने धक्काबुक्की केली. पोलिसांसमोर झालेल्या प्रकारानंतर एका सुरक्षारक्षकास ताब्यात घेतले.

ओडिशा पोलिसांना देखील हवा ताबा

मोतेवार यांची पोलिस कोठडी आज संपत असून त्यावर आज उमरगा न्यायालयात सुनावणी होणार आहे. दरम्यान मोतेवार यांच्यावर ओडिशामध्ये देखील गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्याप्रकरणी त्यांना अटक करण्यासाठी ओडिशा पोलिस उस्मानाबादमध्ये दाखल झाले आहेत. ओडिशा पोलिसांनी मोतेवार यांना ताब्यात घेण्यासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. यावर देखील आज सुनावणी अपेक्षित आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हरणाच्या पिल्लाचा पाण्याअभावी मृत्यू?

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, जालना वनपर्यटन उद्यानात गुरुवारी सायंकाळी हरणाचे पिल्लू मृतावस्थेत आढळले. या पिल्लाच्या मृत्युविषयी नेमके कारण स्पष्ट झाले नाही. मात्र, उद्यानातील पाणवठे कोरडे पडल्यामुळे त्याचा मृत्यू झाला असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. शहरातील मंठा चौफुली शिवारात वन विभागाच्यावतीने वनपर्यटन उद्यान उभारण्यात आलेले आहे. या परिसरात मोर, हरण, नीलगाय, तरस यासारखे अनेक वन्य प्राणी आहे. या परिसरात गुरुवारी सायंकाळी हरणाचे पिल्लू मृतावस्थेत आढळले. अतुल राठी, गोपाल गवडे, गणेश जाधव यांनी ही बाब निदर्शनास आणली. दरम्यान, वन विभागाने उद्यान परिसरात प्राण्यांसाठी पाणवठे तयार केलेले पाणवठे कोरडे पडलेले आहेत. त्यामुळे पाण्याविना या हरणाच्या पिल्लाचा मृत्यू झाला असण्याची चर्चा परिसरात आहे. मात्र, मुख्य वनसंरक्षण अधिकारी एम. आर. निकुंभ यांनी ही शक्यता फेटाळली आहे. ते म्हणाले, 'हे हरणाचे पिल्लू अवघ्या २०-२२ दिवसांचे होते, त्यामुळे ते आईच्या दुधावरच अवलंबून होते. आईपासून ताटातूट झाल्याने त्याचा मृत्यू झाला असावा.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विराट कोहलीलाही डावलले होते

$
0
0

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीला दिल्लीच्या १४ वर्षांखालील मुलांच्या क्रिकेट संघातून डावलण्यात आले होते, याकडे लक्ष वेधून, गुरुवारी आम आदमी पक्षाने केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्यावर डीडीसीए प्रकरणात पुन्हा तोफ डागली.

दिल्लीच्या १४ वर्षांखालील मुलांच्या क्रिकेट संघात निवड न होऊ शकल्यामुळे आपली घोर निराशा झाली होती. संघात वर्णी लावण्याच्या बदल्यात काही तरी द्यावे लागेल, असा प्रस्ताव डीडीसीएच्या वतीने ठेवण्यात आला होता; पण तो फेटाळून लावला. प्रतिभावान कोहलीलाही संघातून डावलण्याचा प्रयत्न २००१ ते २००३ दरम्यान डीडीसीएचे जेटली अध्यक्ष असताना झाला होता, याकडे लक्ष वेधून 'आप'ने जेटलींवर हल्ला तीव्र केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ट्विटरवर मोदीच ‘बाहुबली’

$
0
0

ईटी वृत्त, नवी दिल्ली

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारापासून सोशल मीडियावर असणारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पकड अजूनही कायम असल्याचे दिसून आले आहे. सरत्या २०१५ या वर्षातील ट्विटरच्या ट्रेंडमध्येही मोदी यांच्याच नावाचा बोलबाला होता. राजकारण, क्रीडा आणि बॉलिवूडमधील अन्य कोणतेही नाव किंवा घटनेपेक्षा मोदी यांच्याच नावाची सर्वाधिक चर्चा झाल्याचे दिसून आले आहे.

'ब्लू ओशिअन मार्केट इंटेलिजन्स' या कंपनीने याविषयी संशोधन केले आहे. कोणतीही घटना तातडीने जगासमोर आणण्यासाठी आणि किमान शब्दांमध्ये मत व्यक्त करण्यासाठी ट्विटर या माध्यमाचा उपयोग होतो. त्यामधील ट्रेंडविषयी हे संशोधन करण्यात आले आहे. मोदी यांच्याविषयीच्या चर्चेमध्ये त्यांच्या योजनांबरोबरच परदेश दौऱ्यांचीही जोरात चर्चा झाली. अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा २६ जानेवारी रोजी भारताच्या दौऱ्यावर आले होते. या भेटीतील चर्चा आणि त्यानंतर जागतिक उद्योगांमधील 'सीईओं'मधील चर्चांमुळे मोदींच्या नावाच्या चर्चेने आणखी जोर पकडला. 'मेक इन इंडिया' आणि उद्योगांना पूरक वातावरण निर्माण करण्याच्या प्रयत्नांचीही चर्चा झाली. 'डिजिटल इंडिया', 'स्वच्छ भारत' या मुद्द्यांवरील चर्चेमध्येही नेटिझन्सना रस होता. विशेष म्हणजे मोदी यांनी या वर्षामध्ये सेशेल्स, मंगोलिया, मॉरिशसपासून अमेरिका, ब्रिटन, संयुक्त अरब अमिराती, चीन या देशांना भेटी दिल्या. या भेटीच्या प्रतिक्रिया आणि त्यावरील टीकेचा ओघ कायम सुरू होता. मोदी यांच्या सरकारकडून जनतेच्या अपेक्षा वाढत आहेत, हे या चर्चांमधून दिसून आले आहे. ऑनलाइन चर्चेतील ९४ टक्के चर्चा ट्विटरवर झाली, तर अन्य चर्चा फेसबुक व अन्य सोशल मीडियावर झाल्याचे दिसून आले आहे.

सलमान खानच्या चर्चेमध्ये त्याला 'हिट अँड रन' प्रकरणात झालेली शिक्षा, हायकोर्टातून निर्दोष मुक्तता, बजरंगी भाईजान आणि प्रेमरतन धन पायो हे चित्रपट या मुद्द्यांवर नेटिझन्सनी जोरदार वाद-प्रतिवाद केला.






भारत-पाक सामन्याचे वातावरण

ऑस्ट्रेलियात वर्षाच्या सुरुवातीला झालेल्या विश्वचषक स्पर्धेमध्ये भारताची सुरुवात पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानबरोबरच्या सामन्याने झाली. विश्वचषकात पाकिस्तानकडून अपराजित राहण्याची परंपरा भारतीय संघाने यंदाही कायम राखली. यावरूनच वर्षाच्या सुरुवातीपासूनच चर्चेने परमोच्च बिंदू गाठला होता. सामना जिंकल्यानंतर 'ऑनलाइन' जल्लोषही होतच राहिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी, सचिन तेंडुलकर, अमिताभ बच्चन यांनी केलेल्या ट्विटच्या रिट्विटची संख्याही प्रचंड होती. 'आयपीएल'ची मुख्य स्पर्धा आणि त्यानंतर बेटिंग प्रकरणाचे वादळ यांवरही वर्षाच्या मध्यात सातत्याने चर्चा होत राहिली. चेन्नई आणि राजस्थानचे संघ निलंबित करणे आणि पुणे, राजकोटचे संघ सहभागी करण्याचे विषयही अशाच पद्धतीने 'चघळण्यात' आले.

३४,१६,०००
मोदींविषयीचे ट्विट

१५,००,०००
'आयपीएल' सामन्यांविषयीचे ट्विट

२७,२९,०००
सलमान खानविषयीचे ट्विट

१७,००,०००
विश्वचषकातील भारत-पाक सामन्याविषयीचे ट्विट



८,००,०००
असहिष्णुतेच्या मुद्द्यावरील ट्विट




चर्चेतील अन्य मुद्दे

� स्नॅपडील � दिल्ली, बिहार निवडणूक

� 'वन रँक, वन पेन्शन'चा वाद

� चेन्नईतील पूर � बाहुबली चित्रपट

� नेपाळचा भूकंप � पॅरिसवरील हल्ला

� मॅगी नूडल्सवरील बंदी

� माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचे निधन

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘बाबू’ म्हणजे भाजपची ‘बी टीम’

$
0
0

अधिकाऱ्यांच्या रजेवरून केजरीवाल भडकले

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

दिल्ली सरकारने दोन सचिवांना निलंबित केल्याच्या निषेधार्थ सुमारे दोनशे अधिकाऱ्यांनी गुरुवारी, वर्षाच्या शेवटच्या दिवशी एका दिवसाचे सामूहिक रजा आंदोलन केले. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी या आंदोलनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जबाबदार धरून त्यांच्यावर आरोप केले. सरकारी अधिकारी म्हणजे भाजपची 'बी टीम' असल्याचा आरोप त्यांनी केला. वाहतुकीची सम-विषम योजना हाणून पाडण्यासाठी सरकारी अधिकारी रजेवर गेल्याचा आरोप आम आदमी पक्षाच्या नेत्यांनी केला आहे. दरम्यान, अधिकाऱ्यांचे निलंबन केंद्र सरकारने अवैध ठरवले आहे.

दिल्लीतील अधिकारी दिल्ली, अंदमान निकोबार बेट नागरी सेवेतील (डॅनिक्स) आहेत. सरकारी वकिलांचा पगार वाढवण्याचा निर्णय दिल्लीच्या सरकारने घेतला आहे. या संदर्भातील मंत्रिमंडळ निर्णयाच्या फाइलवर सही करण्यास यशपाल गर्ग आणि सुभाष चंद्र या विशेष सचिवांनी नकार दिला. त्यावरून केजरीवाल सरकारने त्यांना निलंबित केले. त्याच्या निषेधार्थ या केडरच्या सुमारे २०० अधिकाऱ्यांनी गुरुवारी सामूहिक रजा आंदोलन पुकारले. ७० अधिकाऱ्यांनी केवळ सकाळी नऊ ते दुपारी दोन या वेळेतच काम केले.

यामुळे संतप्त झालेल्या मुख्यमंत्री केजरीवालांनी या अधिकाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्याचे सर्व पर्याय खुले असल्याचे सांगितले. भ्रष्टाचार आणि वरिष्ठांना न जुमानण्याचे वर्तन सरकार सहन करणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. कारभारात नव्या कल्पना आणि चेतना आणणारे प्रोफेशनल्स आणि तज्ज्ञांना घेण्याची वेळ आली असल्याचेही ते म्हणाले. केजरीवाल यांनी या प्रकरणी ट्विटरवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य केले. 'पंतप्रधान मोदी नायब राज्यपाल आणि अधिकाऱ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून 'गोळ्या' चालवत आहेत. डॅनिक्स आणि आयएएस असोसिएशन भाजपची पूर्ण वेळ बी टीम झाली आहे. हे अधिकारी दीर्घकालीन रजेवर गेले तर लोक आनंदी होतील. सरकार त्यांना पगारी रजा देण्यास तयार आहे. त्यामुळे सरकारचा कारभार प्रामाणिकपणे आणि कार्यक्षम होण्यास मदत होईल.'

'दिल्लीचे नायब राज्यपाल स्पीकरफोनच्या माध्यमातून डॅनिक्स असोसिएशनच्या बैठकीस उपस्थित होते. ते पंतप्रधान कार्यालयात नृपेंद्र मिश्रा यांच्याही संपर्कात होते,' असा आरोप केजरीवाल यांनी ट्विटरवरून केला आहे.

दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी अधिकाऱ्यांवर आरोप केले. ते म्हणाले, 'सम-विषम वाहतुकीची योजना एक जानेवारीपासून सुरू होत असताना अधिकाऱ्यांनी ३१ डिसेंबरलाच रजेवर जाण्याचा निर्णय का घेतला. ही योजना अपयशी ठरावी यासाठी केलेला हा कट आहे. अधिकारी बैठक घेत असताना पंतप्रधान कार्यालय आणि उपराज्यपालांचे कार्यालय डॅनिक्स अधिकाऱ्यांच्या थेट संपर्कात होते.'

दरम्यान, अधिकाऱ्यांचे निलंबन केंद्रीय गृहमंत्रालयाने काही वेळात अवैध ठरवले आहे. 'अधिकाऱ्यांच्या निलंबनाबाबत दिल्लीच्या नायब राज्यपालांचे पत्र गृह मंत्रालयाला मिळाले आहे. असे निलंबन होऊ शकत नाही आणि ते दोन्ही अधिकारी ऑन ड्युटी असल्याचे गृह मंत्रालयाने जाहीर केले आहे,' असे केंद्रीय गृहमंत्रालयाच्या प्रवक्त्याने सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नववर्षाचे ‘सम-विषम’ स्वागत

$
0
0

प्रदूषणमुक्तीकडे दिल्लीकरांचे पाऊल, आजपासून १५ दिवसांचा प्रयोग

म. टा. विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली

दिल्लीला प्रदूषणमुक्त करण्यासाठी सम आणि विषम क्रमांकाच्या खासगी वाहनांना सम-विषम तारखांनुसार रस्त्यावर उतरण्यास परवानगी देणाऱ्या क्रांतीकारी महत्त्वाकांक्षी प्रयोगाला आज, शुक्रवारपासून सुरुवात होत आहे. या प्रयोगाच्या पूर्वसंध्येलाच दिल्ली सरकारने दोन सनदी अधिकाऱ्यांना निलंबित केल्याच्या निषेधार्थ अधिकाऱ्यांनी सामूहिक रजेचे हत्यार उपसले आहे.

केंद्रातील मोदी सरकार आणि दिल्लीतील केजरीवाल सरकार यांच्यातील शीतयुद्ध शिगेला पोहोचले असताना वायू प्रदूषणाला आळा घालण्यासाठी दिल्लीच्या रस्त्यांवर सम-विषम क्रमांकांच्या वाहनांचा प्रयोग सुरू होत आहे. नववर्षाच्या सुरुवातीला साऱ्या देशाचे दिल्लीकडे लक्ष लागले आहे. मात्र, या प्रयोगाला अपयशी ठरविण्यासाठी दिल्लीच्या नोकरशाहीने अप्रत्यक्षपणे कंबर कसली आहे. मंत्रिमंडळाचा निर्णय न जुमानणाऱ्या दोन सनदी अधिकाऱ्यांवर दिल्ली सरकारने निलंबनाची कारवाई केल्याच्या निषेधार्थ दिल्ली आणि अंदमानचे दोनशे अधिकारी गुरुवारी सामूहिक रजेवर गेले.

दुसरीकडे केंद्र सरकारने दोन अधिकाऱ्यांच्या निलंबनाची कारवाई रद्दबातल ठरविली. सम-विषम योजना लागू होण्याच्या आदल्या दिवशीच हे का घडले, असा सवाल करून हे मोदी सरकारचे षडयंत्र असल्याचा आरोप दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी केला आहे. सकाळी ९ ते ११ वाजताच्या दरम्यान सम-विषम प्रयोगाची रंगीत तालीम घेण्यात आली; पण अधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या अभावी ही रंगीत तालीम तब्बल दीड तास उशिराने सुरू होऊन अवघ्या दहा मिनिटांतच गुंडाळावी लागली. उपराज्यपालांच्या इशाऱ्यावर सामूहिक रजेवर गेलेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांमुळे रंगीत तालीम अपयशी ठरल्याचा ठपका दिल्ली सरकारने ठेवला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘साई’चे केंद्र अखेर नागपूरलाच

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
भारतीय क्रीडा प्राधिकरणाचे (साई) विभागीय केंद्र अखेर औरंगाबादऐवजी नागपूरला करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्याचे क्रीडा मंत्री विनोद तावडे यांनी विभागीय केंद्र औरंगाबादेतच होईल, अशी घोषणाही केली होती, परंतु मुख्यमंत्र्यांनी या केंद्रासाठी नागपूरलाच पसंती दिली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा मराठवाड्यावर अन्याय झाल्याची भावना क्रीडा क्षेत्रात उमटत आहे.

औरंगाबाद शहरातच 'साई'चे विभागीय केंद्र व्हावे या मागणीसाठी क्रीडा संघटक, खेळाडूंनी आंदोलन केले होते. या आंदोलनाची दखल घेऊन विधान परिषदेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत दोन फेब्रुवारी २०१५ रोजी बैठक झाली होती. त्यावेळी क्रीडामंत्री विनोद तावडे यांनीही क्रीडा संघटकांची भूमिका समजावून घेतली होती. या बैठकीनंतर तावडे यांनी विभागीय केंद्र औरंगाबादेतच होईल, अशी घोषणाही केली होती. औरंगाबादेतील साई क्रीडा प्रशिक्षण केंद्रातील सद्यस्थितीतील सुविधा आंतरराष्ट्रीय दर्जाच्या असून, ६०-७० कोटींमध्ये विभागीय केंद्र होऊ शकते, अशी भूमिका क्रीडा

मंत्र्यांची होती.

महाराष्ट्र, गोवा, राजस्तान व गुजरात अशा राज्यांसाठी साईचे विभागीय केंद्र गांधीनगर येथे आहे. महाराष्ट्रासाठी स्वतंत्र विभागीय केंद्र सुरू करण्यात येणार असल्याने औरंगाबाद शहरात हे केंद्र व्हावे, अशी मागणी होत होती. याविषयी वरिष्ठ पातळीवर बरीच चर्चा झाली. मुंबईत कांदिवलीत साईचे उपकेंद्र असून, तेथे पुरेशी जागा नसल्याने हे केंद्र तेथे होणे शक्य नव्हते. मुख्यमंत्र्यांबरोबरच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी हे केंद्र नागपूरला व्हावे, अशी भूमिका घेतली होती. त्यामुळे हे केंद्र औरंगाबादला नव्हे तर नागपूरलाच होणार, हे स्पष्ट झाले आहे. औरंगाबादकरांची मागणी लक्षात घेऊन येथील केंद्रात विविध क्रीडा सुविधा उपलब्ध करून देण्याबरोबरच औरंगाबादकरांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.


विभागीय केंद्रासाठी आरक्षण बदलले

भारतीय क्रीडा प्राधिकरणाचे विभागीय केंद्र सध्या गुजरातमधील गांधीनगर येथे आहे. हे केंद्र औरंगाबादला व्हावे, अशी मागणी होती, परंतु मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या आठवड्यात औरंगाबादऐवजी नागपूरला पसंती दिली. नागपूर महापालिकेने या केंद्राच्या उभारणीसाठी १४८ एकर जागा दिली आहे. या जागेसाठी आरक्षण बदलण्याच्या प्रस्तावाला मुख्यमंत्र्यांनी मंजुरी दिल्यामुळे हे केंद्र नागपूरलाच होणार हे स्पष्ट झाले आहे. या केंद्राच्या उभारणीसाठी केंद्र सरकारवर मोठा आर्थिक भार पडणार आहे.

'आयआयएम'नंतर 'साई'

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (आयआयएम) संस्था औरंगाबादमध्ये सुरू करण्याची जोरदार मागणी करण्यात आली होती. ही संस्था राज्य सरकारने नागपूर येथे स्थापन करण्याचा निर्णय घेतला. त्यापूर्वी विधी विद्यापीठाची मागणीही करण्यात आली होती. सरकारने नागपूरबरोबर औरंगाबादेतही विधी विद्यापीठ सुरू करण्याचा निर्णय जाहीर केला. घोषणेनंतर पुढे काहीच झाले नाही. स्कूल ऑफ आर्किटेक्चर ही संस्था औरंगाबादेत सुरू करण्याचा निर्णयही घोषणेच्या पुढे सरकलेला नाही. साईच्या विभागीय केंद्रासाठी क्रीडा संघटक, खेळाडूंनी मागणी केली होती. हे केंद्रही नागपूरला नेण्यात आले आहे.


मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


श्रीलंकेचा न्यूझीलंडवर ‘पलटवार’

$
0
0

तिलकरत्ने दिलशान

वृत्तसंस्था, नेल्सन

दोन कसोटी आणि दोन वन-डे सामन्यांतील पराभवानंतर अखेर श्रीलंकेला न्यूझीलंड दौऱ्यात विजय मिळवण्यात यश आले. दानुष्क गुनाथिलाका, तिलकरत्ने दिलशान आणि लाहिरू थिरिमने यांच्या बॅट तळपल्याने श्रीलंकेने मालिकेतील तिसऱ्या वन-डे क्रिकेट सामन्यात न्यूझीलंडवर ८ विकेटनी शानदार विजय मिळवला. न्यूझीलंडने दिलेले २७७ धावांचे लक्ष्य श्रीलंकेने ४६.२ षटकांत २ विकेटच्या मोबदल्यात सहज साध्य केले. सलग बारा विजयानंतर न्यूझीलंडला मायदेशात वन-डेमध्ये पराभव पत्करावा लागला.

सध्या न्यूझीलंड मालिकेत २-१ने आघाडीवर आहे. या विजयाने पाहुण्या श्रीलंकेने वन-डे मालिका गमावण्याचे संकट तूर्तास तरी टाळले आहे. मालिकेतील चौथी वन-डे २ जानेवारीला होणार आहे. दानुष्क, दिलशान आणि थिरिमने या तिघांना मिळून आधीच्या दोन सामन्यांत केवळ ४३ धावा केल्या होत्या. या वेळी मात्र त्यांनी लक्ष्याचा यशस्वी पाठलाग केला आणि सरत्या वर्षाचा शेवट गोड केला.

सॅक्सटन ओव्हल येथे रंगलेल्या तिसऱ्या वन-डे क्रिकेट सामन्यात न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली. दुसऱ्या वन-डेत ३० चेंडूंत नाबाद ९३ धावांची खेळी करणाऱ्या मार्टिन गुप्टीलकडे साऱ्यांच्या नजरा होत्या. त्याने चार चौकार व १ षटकार लगावून आक्रमक सुरुवातही केली. पण, त्याला ३० धावांत रोखण्यात दुष्मंत चामीराला यश आले. यानंतर टॉम लॅथम आणि विल्यमसन यांनी अर्धशतकी भागीदारी केली. जेफ्री वँडरसेने एकाच षटकात लॅथम आणि टेलरला बाद केले. निकोलस बाद झाल्यानंतर विल्यमसनही माघारी परतला. या वेळी न्यूझीलंडच्या ५ बाद १६३ धावा झाल्या होत्या. मिचेल सँटनर आणि डग ब्रेसवेल यांनी न्यूझीलंडला अडीचशे धावांचा टप्पा ओलांडून दिला. अखेरच्या षटकात टीम साउथीने ४ चेंडूंत नाबाद १८ धावांची भर घातल्याने न्यूझीलंडने ८ बाद २७६ धावा फलकावर लावल्या.

लक्ष्याचा पाठलाग करताना दानुष्क आणि दिलशान यांनी १२.४ षटकांत ९८ धावांची सलामी दिली आणि विजयाचा पाया रचला. दानुष्क ४५ चेंडूंत ७ चौकार व ४ षटकारांसह ६५ धावा काढून बाद झाला. यानंतर दिलशान आणि थिरिमने यांनी सावध खेळ केला. या जोडीने दुसऱ्या विकेटसाठी १११ धावांची भागीदारी केली. दिलशानचे शतक मात्र नऊ धावांनी हुकले. तो ९२ चेंडूंत ९ चौकारांसह ९१ धावांवर धावबाद झाला. यानंतर थिरिमनेने दिनेश चंडिमलच्या साथीने तिसऱ्या विकेटसाठी अभेद्य ६८ धावांची भागीदारी रचून श्रीलंकेच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. थिरिमनेने १०३ चेंडूंत नाबाद ८७ धावांची खेळी केली.

संक्षिप्त धावफलक : न्यूझीलंड : ५० षटकांत ८ बाद २७६ (केन विल्यमसन ५९, टॉम लॅथम ४२, सँटनर ३८, डग ब्रेसवेल ३०, मार्टिन गुप्टील ३०, नुवान प्रदीप २-५५, दुष्मंत चामीरा २-३८, वँडरसे २-५५) पराभूत वि. श्रीलंका : ४६.२ षटकांत २ बाद २७७ (तिलकरत्ने दिलशान ९१, लाहिरू थिरिमने नाबाद ८७, दानुष्का गुनाथिलाका ६५, दिनेश चंडिमल नाबाद २७, मॅक्लनघन १-३९).

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कॅरिबॅग विकणाऱ्या १३ जणांविरुद्ध गुन्हे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
बंदी असताना २० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिकच्या पिशव्या व कपांची विक्री करणाऱ्या १३ दुकानदारांविरुद्ध गुरुवारी गुन्हे दाखल करण्यात आले. महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी याप्रकरणी तक्रार दिली. सिटीचौक व क्रांतिचौक पोलिस ठाण्यांतर्गत ही कारवाई करण्यात आली.

सिटीचौक पोलिस ठाण्यात महापालिकेचे स्वच्छता निरीक्षक अशोक नारायण चावरिया यांनी तक्रार दाखल केली होती. त्यावरून छापे टाकण्यात आले. यामध्ये शहागंज येथील न्यू राज प्रोव्हिजन्सचे हरिष गोकुळचंद केसवानी, फेरीवाला ड्रायफ्रूट विक्रेता अन्वर इब्राहिमखान, ओम प्रो​व्हिजन्सचे विजय शामलालजी छाबडा, अपना किराणा स्टोअर्सचे शेख अहेमद शेख अब्दुल रहेमान व साई तेल भांडारचे सुरेश सरवैये यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करून त्यांच्या ताब्यातून पिशव्या व कप आदी जप्त करण्यात आले.

क्रांतिचौक पोलिस ठाण्यात वॉर्ड अधिकारी संपत येडुबा जरारे यांनी तक्रार दिली होती. त्यांच्या तक्रारीवरून समतानगर येथील न्यू जाकेर किराणा होलसेलरचे शेख जाकेर नूर शेख, समीर किराणा स्टोअर्सचे शेख सरवर शेख गनी व मिटकर शॉपीचे चंद्रकांत फकीरचंद मिटकर यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले.

किमान २०० दंड
या विक्रेत्यांवर भारतीय दंड संहितेच्या कलम १८८ ( लोकसेवकाने दिलेल्या आदेशाचे उल्लंघन करणे), क‌लम २६८ सार्वजनिक आरोग्यास अपायकारक वस्तू बाळगणे, कलम २९० सार्वजनिक उपद्रव करणे यासोबतच महापालिका अधिनियमासह कलम ९ कॅरिबॅग उत्पादन व वापर नियम कायदा २००६, मुंबई पोलिस कायदा कलम ११५, ११७, महाराष्ट्र महापालिका अधिनियम १९४९मधील कलम ३७६ (अ)नुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या कलमांनुसार विक्रेत्यांवर किमान २०० रुपये किंवा त्यापेक्षा जास्त रकमेची दंडात्मक कारवाई होऊ शकते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाटेवर नियोजनाचे काटे!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
शहरात सुरू असलेल्या भूमिगत गटार योजनेच्या कामाचे महापालिकेचे नियोजन पूर्णतः चुकले आहे. या कामासाठी एकाच वेळी शहरातील बहुतांश महत्त्वाच्या भागातील रस्ते उखडण्यात आले. त्यामुळे जागोजागी वाहतुकीचा खोळंबा होत आहे. खोल खड्डे, धुळीचे साम्राज्य आणि कोंडीने नागरिक त्रस्त झालेत.
केंद्र सरकारच्या युआयडीएसएसएमटी (अर्बन इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट स्किम फॉर स्मॉल अँड मीडियम टाउन्स) या योजनेअंतर्गत महापालिकेतर्फे शहरात भूमिगत गटार योजनेचे काम केले जात आहे. सुमारे एक वर्षापूर्वी हे काम सुरू झाले. त्यासाठी ६००, ४०० आणि ३०० मिलिमीटर व्यासाचे पाइप वापरले जात आहेत. शहरातून वाहणाऱ्या नाल्यांमधून वाहणारे पाणी भूमिगत गटार योजनेच्या माध्यमातून पाइपांमधून प्रवाहित करण्याची ही योजना असून, भविष्यात उघड्यावरून सांडपाणी वाहताना दिसणार नाही, असा दावा केला जात आहे.
या योजनेच्या कामासाठी महापालिकेने योग्य नियोजन केल्याचे दिसून येत नाही. एकाच वेळी अनेक रस्त्यांवर भूमिगत गटार योजनेअंतर्गत पाइप टाकण्याचे काम सुरू केले आहे. त्यासाठी महत्त्वाचे रस्ते उखडले आहेत. त्यामुळे वाहतुकीस ठिकठिकाणी अडथळा निर्माण झाला आहे. जुन्या शहरात तर रस्त्यांची रुंदी फारच कमी आहे आणि त्यात या कामाने संपूर्ण रस्ताच रहदारीसाठी बंद होत आहे. शहानूरवाडी येथील एकता चौक ते सूतगिरणी चौक या दरम्यान पाइप टाकण्याचे काम तीन महिन्यांपासून सुरू आहे. अद्याप ते पूर्ण झालेले नाही, त्यामुळे या रस्त्याची एक बाजू पूर्णपणे उखडली आहे. जागोजागी वाहतूक कोंडीच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. गारखेडा भागातील रिलायन्स मॉलपासून विजय चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावरही हेच काम सुरू आहे. या रस्त्यावर जागोजागी मातीचे ढिगारे आणि पाइप दिसून येतात. रहदारीसाठी हा रस्ता वापरणे नागरिकांनी जवळपास बंद केले आहे. गजानन महाराज मंदिर चौक ते पुंडलिकनगर या रस्त्यावरही अशीच स्थिती निर्माण झाली आहे. सर्वाधिक रहदारी या रस्त्यावर असल्यामुळे पाइप टाकण्याचे काम युध्दपातळीवर होणे गरजेचे होते, पण ते होताना दिसत नाही. जुन्या शहरातील जाफरगेट भागात काही दिवसांपूर्वी भूमिगत गटार योजनेचे काम करण्यात आले. त्यासाठी रस्ते उखडले. मात्र, काम पूर्ण झाल्यावर या रस्त्याची दुरुस्ती केली नाही. त्यामुळे काही ठिकाणी उंचवटे, तर काही ठिकाणी खड्डे असे चित्र निर्माण झाले आहे. महापालिकेच्या वॉर्ड 'क' कार्यालयाच्या अंतर्गत येणाऱ्या बहुतांश वसाहती भूमिगत गटार योजनेच्या कामामुळे उखडल्या आहेत.
---
भूमिगत गटार योजनेचे काम जुलै २०१७ पर्यंत चालणार आहे. गजानन महाराज मंदिर ते पुंडलिकनगर रस्त्यावरचे काम १५ ते २० दिवसांत पूर्ण होईल, तर एकता चौक ते सूतगिरणी चौक या रस्त्यावरचे काम पूर्ण होण्यासाठी दोन महिने लागतील. कारण सूतगिरणी पासून साहस सोसायटी पर्यंत पाइप टाकण्याचे काम केले जाणार आहे. अन्य भागातही काम सुरू आहे. रस्ते उखडले जात असले तरी ते दुरुस्त करण्याची तरतूद आहे.
- अफसर सिद्दिकी, कार्यकारी अभियंता, महापालिका

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अष्टपैलू रविचंद्रन अश्विन ‘एक नंबरी’

$
0
0

वृत्तसंस्था, दुबई

उपखंड व खासकरून भारतीय खेळपट्ट्यांवर आपल्या भन्नाट गोलंदाजीने प्रतिस्पर्धी फलंदाजांना हादरवणारा ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विनने २०१५च्या मोसमाचा अखेर यशानेच केला आहे. गुरुवारी मोसमाच्या अखेरच्या दिवशी त्याने आयसीसीच्या कसोटीच्या गोलंदाज व अष्टपैलू अशा दोन्ही क्रमवारीत अव्वल क्रमांक पटकावण्याचा पराक्रम केला.

चेन्नईकर अश्विनने वर्षभरातील नऊ कसोटींमध्ये ६२ विकेट्स टिपल्या असून, एकट्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या चार कसोटींच्या मालिकेत अश्विनने ३१ फलंदाजांना माघारी धाडण्याचा पराक्रम केला. वर्षअखेरीस असे क्रमवारीत अव्वल राहण्याचा पराक्रम १९७३मध्ये बिशन बेदी यांनाच जमला होता, आता ४२ वर्षांनंतर अश्विनने त्यांच्या पावलावर पाऊल टाकले आहे. आयसीसीच्या 'हॉल ऑफ फेम'मध्ये येण्याचा मान मिळवणारे बेदी हे भारताचे एकमेव असे गोलंदाज आहेत, जे कसोटी गोलंदाजांच्या क्रमवारीत अव्वल राहिले होते. भागवत चंद्रशेखर, कपिलदेव आणि अनिल कुंबळे यांनी कारकिर्दीत दुसरा क्रमांक पटकावला आहे. मात्र, बेदीनंतर अश्विननेच कसोटी गोलंदाजांमध्ये अव्वल पदावर झेप घेतली.

स्टेनच्या दुखापतीने फायदा

डर्बन कसोटीत दक्षिण आफ्रिकेच्या डेल स्टेनने दुखापतीमुळे इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या डावात फक्त ३.५ षटके गोलंदाजी केली अन् अश्विनचा पहिल्या क्रमांकाचा मार्ग मोकळा झाला. या कसोटीला सुरुवात झाली तेव्हा अव्वल क्रमांकावरील स्टेन व अश्विन यांच्यात चार गुणांचा फरक होता. मात्र, स्टेनला या कसोटीत चमक दाखवता न आल्याने त्याचे गुण वजा झाले अन् अश्विन पुढे गेला. आता त्याच्यात व स्टेनमध्ये चार गुणांचाच फरक आहे; पण या वेळी अश्विन पुढे आहे. स्टेनने जायबंदी होण्याआधी डर्बन कसोटीच्या पहिल्या डावांत चार विकेट्स टिपल्या होत्या; पण ही कामगिरीला त्याचा आव्वल क्रमांक राखण्यासाठी पुरेशी नव्हती. यंदाही स्टेन वर्षअखेरीस क्रमवारीत अव्वल असता, तर २००९नंतर वर्षअखेरीस पहिला क्रमांक पटकावण्याची त्याची ही सहावी वेळ असती.

अश्विनने यंदाच्या मोसमात केलेल्या कामगिरीचे फलित त्याच्या सुधारलेल्या क्रमवारीत दिसून आले आहे. यंदा मोसमाला सुरुवात झाली तेव्हा १५व्या क्रमांकावर होता. मात्र, श्रीलंका दौरा व भारतातील दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेतील दणदणीत कामगिरी अश्विनचे क्रमवारी सुधारण्यासाठी पुरेशी ठरली.

रवींद्र जडेजा सहावा

आपल्या फिरकीने अश्विनसह जडेजानेही द. आफ्रिकेच्या फलंदाजांची भंबेरी उडवली होती. यामुळे रवींद्र जडेजालाही क्रमवारीत फायदा झाला असून, तो सहाव्या क्रमांकावर आला आहे. सध्या अव्वल दहामध्ये जडेजा व अश्विन असे भारताचे दोन गोलंदाज आहेत. फलंदाजीत अजिंक्य

रहाणे फलंदाजांच्या कसोटी क्रमवारीत अकराव्या क्रमांकावर आहे. अव्वल वीसमध्ये तो भारताचा एकमेव फलंदाज आहे.

कसोटी गोलंदाजांची क्रमवारी : आर. अश्विन (भारत), डेल स्टेन (द. आफ्रिका), स्टुअर्ट ब्रॉड (इंग्लंड), यासिर शहा (पाकिस्तान), जेम्स अँडरसन (इंग्लंड), रवींद्र जडेजा (भारत), बोल्ट (न्यूझीलंड), हॅझलवूड (ऑस्ट्रेलिया), व्हेरनॉन फिलँडर (द. आफ्रिका), टीम साउथी (न्यूझीलंड).



मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नवीन तहसीलच्या उद‍्घाटनाचा मार्ग मोकळा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
अखेर औरंगाबाद तहसील विभाजनाला शासनाची मान्यता मिळाली आहे. अपर तहसीलदारांसह अन्य १३ पदांनाही मंजुरी मिळाल्याने रखडलेल्या नवीन तहसीलच्या उद्घाटनाचा आता मार्ग मोकळा झाला आहे.

महसूल व वन विभागाने जिल्ह्यातील अपर तहसीलदार कार्यालय; तसेच पदांना मंजुरीबाबत शासनआदेश काढला आहे. नव्या कार्यालयात अपर तहसीलदार व नायब तहसीलदार, दोन अव्वल कारकुन, ८ लिपिक टंकलेखाक व १ वाहनचालक अशा पदांना मंजुरी मिळाली आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून मागणी असलेल्या औरंगाबाद तहसीलच्या विभाजनाच्या घोषणेनंतर नवीन तहसील प्रादेशिक मत्स्य कार्यालयाच्या जागेत सुरू करण्याचा निर्णय झाला होता. १२ डिसेंबर रोजी उद्घाटनही ठरले होते, मात्र शासन आदेश न निघाल्याने कार्यक्रम स्थगित केला.

औरंगाबाद ग्रामीण
औरंगाबाद तहसीलदार यांच्या कार्यक्षेत्रात चित्तेपिंपळगा, करमाड, लाडसावंगी, चिकलठाणा (देवळाई व गांधेली सजा वगळून), चौका हर्सूल (मंडळातील हर्सूस गाव वगळून, ओहर सजातील जाधववाडी वगळून)

औरंगाबाद शहर
अपर तहसीलदार औरंगाबाद यांच्या कार्यक्षेत्राअंतर्गत ४ मंडळे राहतील यामध्ये औरंगाबाद, भावसिंगपुरा, उस्मानपुरा, कांचनवाडी (चिकलठाणा मंडळातील देवळाई व गांधेली सजा) हर्सूल मंडळातील फक्त हर्सूस गाव व ओहर सजातील जाधववाडी.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डिझेल रिक्षांवरील बंदी कायम

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
डिझेल रिक्षांवरील शहरातील प्रवेश बंदी कायम राहणार आहे. पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी गुरुवारी निर्णय घेतला. शहरातील डिझेल रिक्षा चालकांची बेबंदशाही, नियमांचे उल्लंघन करून होणारी वाहतूक पाहता पोलिस आयुक्तांनी या रिक्षांवर शहरात बंदी आणण्याचा निर्णय २७ ऑक्टोबर रोजी जाहीर केला. त्यानुसार १ नोव्हेंबर ते ३१ डिसेंबर २०१५ पर्यंत डिझेल रिक्षांना शहर हद्दीत प्रवासी वाहतुकीसाठी बंदी लागू केली. डिझेल रिक्षाचालकांची वर्तवणूक सुधारली तर त्यांना शहरात वाहतुकीला परवानगी देऊ, असे आश्वासन पोलिस आयुक्तांनी दिले होते. मात्र, ३१ डिसेंबर रोजी नवीन आदेश काढून ही बंदी कायम ठेवल्याचे कळविण्यात आले आहे.
---
सूचना, हरकती मागविल्या
---
या निर्णयावर नागरिकांकडून ३० दिवसाच्या आत सूचना व हरकती मागविल्या आहेत. त्यासाठी acpraff.abad@mahapolice.gov.in हा मेल आयडी दिला आहे. या सूचना हरकतींचा विचार करून आवश्यकता असल्यास अंतिम निर्णय घेण्यात येईल, असे कळविले आहे. सध्या डिझेल रिक्षांना हर्सूल, नगरनाका, महानुभव आश्रम तसेच चिकलठाणापर्यंतच सकाळी ८ ते रात्री ९ पर्यंत प्रवासी वाहतूक करता येते.
---
प्रदूषण घटल्याचे स्पष्ट नाहीः मंडळ
---
डिझेल रिक्षांना शहरात बंदी घातल्यामुळे प्रदूषणात घट झाल्याचे स्पष्ट झालेले नाही. १५ लाखांच्या शहरामध्ये व लाखो वाहनांच्या संख्येमुळे प्रदूषण घटल्याचे निदान थंडीमुळे तरी स्पष्ट झालेले नाही. शहरातील प्रदूषणाचे म्हणजेच सल्फर व नायट्रोजनच्या गॅसेसचे प्रमाण हे २५ ते ३० मायक्रोग्राम पर मीटर क्यूब असे पूर्वीपासून आहे. यामध्ये फारसा बदल झालेला नाही. उन वाढल्यानंतर कदाचित प्रदूषण घटले असल्यास नेमकेपणाने स्पष्ट होऊ शकेल. अर्थात, ही प्रदूषणाची पातळी मर्यादेमध्येच आहे. नियमानुसार गॅसेसची पातळी ही ८० मायक्रो पर मीटर क्यूबपेक्षा कमी हवी आणि ती निश्चितपणाने कमी आहे, असे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी आनंद काटोले यांनी 'मटा'ला सांगितले.
---
पोलिस आयुक्तांनी डिझेल रिक्षा हद्दपारीबाबत पुन्हा विचार करावा. या निर्णयामुळे अनेकांच्या पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. प्रवाशांनाही फटका बसतो आहे. त्यांना जास्तीचे भाडे द्यावे लागते.
- निसार अहेमद, अध्यक्ष, रिक्षा चालक संयुक्त संघर्ष कृती महासंघ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जपानी पाहुण्यांनी गुरुवारी रात्री पंचतारांकित हॉटेलमध्ये नववर्षाचे जल्लोषात स्वागत केले.

$
0
0

नववर्षाचे जल्लोषात स्वागत कॅनॉट, निरालाबाजार तरुणाईच्या गर्दीने बहरला

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

खाणं-पिणं... डीजेच्या दणक्यावर धरलेला ठेका... अन् फटाक्यांच्या आतिषबाजी करत औरंगाबादकरांनी नव्या वर्षाचे उत्साहात स्वागत केले. गुडबाय २०१५ व वेलकम २०१६ असा म्हणत जल्लोष करण्यात आला.

नवोन्मेषाची झालर पांघरत मंदकुंद वातावरणात गुलाबी थंडीत तरुणाईने रस्त्यावर जल्लोष केला. निराला बाजार, क्रांतिचौक, जालना रोड, कॅनॉट प्लेस, पंचतारांकित हॉटेल्स येथे नववर्षाच्या स्वागतासाठी कार्यक्रमांचे आयोजन केले गेले. सेलिब्रेशन करण्यासाठी नगररोड, नाशिकरोड आणि बीड बायपासवरील सर्व ढाबे रिझर्व्ह करण्यात आले होते. ठिकठिकाणी रोषणाई, विविध खेळ, आयोजित करण्यात आले. संध्याकाळपासूनच वाइन शॉप्स व बार फुल्ल झाले होते. शहरातील विविध हॉटेल, खानावळींवर विद्युत रोषणाईही करण्यात आली होती. ग्रीटिंग्ज कार्ड, गिफ्टची दुकाने, जनरल स्टोअर्समध्ये स्वागताच्या वस्तू खरेदीसाठी गर्दी झाली होती.

'शांताबाई' गाण्याची चलती

शहरातील काही चौकांमध्ये; तसेच शहराबाहेर तरूण-तरूणींनी आपल्या कारमध्ये डेक लावून नवीन वर्षाचे स्वागत केले. एकमेकांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देत सरत्या वर्षाला निरोप देण्यात आला. काही ठिकाणी डेकवर 'शांताबाई'च्या गाण्यावर नाचत होती.

खवय्यांची चंगळ

नववर्षाचे स्वागत करण्यासाठी औरंगाबादकरांनी खवय्यांनी नॉनव्हेज पदार्थ खाण्यास पसंती दिली. मटण आणि मासळी बाजारपेठेत सकाळपासूनच खवय्यांनी गर्दी केली होती. वाढत्या मागणीमुळे मटण आणि मासळीचे भाव तेजीत होते. सुरमई, हलवा, मोठी कोळंबी, मटण आणि चिकनला चांगली मागणी होती. नॉनव्हेज पदार्थांसाठी प्रसिद्ध असणाऱ्या हॉटेलमध्ये खवय्यांनी संध्याकाळी आठनंतर गर्दी केली होती. बऱ्याच ठिकाणची हॉटेल फुल्ल असल्यामुळे पदार्थांची चव घेण्यासाठी अनेकजण वेटिंग करत असल्याचे चित्र अनेक भागांमध्ये दिसले. तरूणाईचा कॉलेजभागात जल्लोष होता.

विदेशी पर्यटकांचा जल्लोष

नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी शहरातल्या प्रमुख रस्ते वगळता अन्य रस्त्यावर गर्दीचे प्रमाण कमी होते. काही भागात रस्तावर गर्दीचा ओघ कमी होता. गेल्यावर्षी याठिकाणी तरुणांची मोठ्या प्रमाणात गर्दी दिसत होती. निराला बाजार, कॅनॉट, जालनारोड वरील पंचतारांकित हॉटेल्स आणि कॅफे गर्दीने भरल्याचे चित्र पाहायला मिळाले. कोरियन, जापानी आणि चिनी पर्यटकांनी या पंचतारांकित हॉटेल्समध्ये गर्दी केली होती. शहरात येणाऱ्या वाहनांवर करडी नजर ठेवण्यासाठी या महामार्गावर पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. रात्री पोलिसांची उशिरापर्यंत पेट्रोलिंग सुरू होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


माझं शिवार : फळशेतीचा गोडवा

$
0
0

Makarand.Kulkarni@timesgroup.com
पारंपरिक शेतकरी कुटुंब. पदवीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर मार्केटिंग व्यवसाय, नंतर स्वतःचे दुकान टाकूनही भाऊसाहेबांचे मन लागत नव्हते. वडिलोपार्जित शेती कमी होती. त्यांनी जवळच शेती विकत घेऊन त्यात प्रयोग केला. तीन विहिरीनंतर पाणी लागले, जिद्द न सोडता जमीन कसली. आज त्या जमिनीत उत्तम दर्जाची सीताफळे, डाळिंब आणि पपई पिकत आहे. सीताफळासारख्या प‌िकाचा प्रयोग यशस्वी केला.
औरंगाबाद - जालना रस्त्यावर जालन्याकडे दहा किलोमीटर अंतरावर असलेले कुंभेफळ. गावातील बहुतांश मंडळींचा मुख्य व्यवसाय शेतीच. काही वर्षांपूर्वी शेंद्रा पंचतारांकित औद्योगिक वसाहत उभी राहिली. त्यासाठी या भागातील अनेक शेतकऱ्यांनी जमीन दिली. त्यापैकी एक शेळके कुटुंब. भाऊसाहेब रंगनाथराव शेळके पाटील यांचीही काही शेती एमआयडीसीत केली. भाऊसाहेबांनी माध्यमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर देवगिरी महाविद्यालयातून बीए पूर्ण केले. तो काळ नोकरी खुणावणारा होता. त्यांनी १९९४ ते १९९७ या काळात दोन प्रकाशन संस्थांमध्ये मार्केटिंग विभागात नोकरी केली. मराठवाडाभर फिरणे व्हायचे. जागोजागी शेती पाहिल्यानंतर आपली घरची शेती करावी असा विचार मनात येत असे, पण नोकरीच्या धावपळीत पाच वर्षे कशी निघून गेली ते कळालेच नाही. नोकरीनंतर सिडको एन - नऊ भागात एक पुस्तकाचे दुकान सुरू केले, पण तिथेही मन रमेना. या काळात प्लॉटिंग व्यवसाय तेजीत होता. औरंगाबाद चौफेर वाढत असल्याने आजूबाजूच्या शेतीला सोन्याचा भाव आला. शेळकेंनी प्लॉटिंग व्यवसाय सुरू केला. या व्यवसायात बऱ्यापैकी यश मिळू लागले, पण वडिलांचा आग्रह होता की जमीन घेऊन शेती करावी. प्लॉटिंग सोडून शेती करणे म्हणजे मोठी रिस्क होती. भाऊसाहेबांनी कुंभेफळ शिवाराला लागून असलेल्या भालगाव शिवारात दहा एकर शेती घेतली. कोरडवाहू जमीन कमी भावात मिळाली. आजुबाजुच्यांनी लगेच भुवया उंचावल्या. कोरडवाहू जमीन घेऊन भाऊसाहेब कोणती शेती करणार? उत्कंठा शिगेला पोचली. जमिनीवर झाडेझुडुपे होती. २० वर्षे पडिक पडलेल्या जमीन कसण्याचे आव्हान होते. इथे भाऊसाहेबांनी सारासार विचार करून शेतीचा विकास करण्याचे पहिले पाऊल टाकले. जेसीबी आणून संपूर्ण जमीन सपाट केली. मातीचा पोत चांगला होता. पारंपरिक शेतीचे ज्ञान असलेल्या भाऊसाहेबांना ते लगेच समजले. संपूर्ण शेतात शेणखत टाकून जमीन तयार केली. कोरडवाहू जमीन असल्याने त्यांनी एक विहीर केली. तिला पाणी लागले नाही. तीन किलोमीटर अंतरावर आणखी एक शेत विक्रीला होते. भाऊसाहेबांनी ते पाण्यासाठी विकत घेतले. तिथे विहिर केली, पण यश मिळाले नाही. वडिलोपार्जित शेती हा तिसरा पर्याय होता. जालना रोडलगत असलेल्या या शेतात तिसरी विहिर केली आणि तिथे पाणी लागले. २००९ ते २०१२ असे तीन वर्षे हा प्रयोग सुरू होता. भालगाव शिवारातील शेतात आणि या शेतात चार किलोमीटरचे अंतर होते. भाऊसाहेबांनी तेवढी पाईपलाइन टाकून शेतात पाणी नेले. नेलेले पाणी साठवायचे कुठे? कारण पावसाळ्यानंतर फार तर दिवाळीपर्यंत जमिनीत पाणी टिकत असे. त्यावर मात करण्यासाठी भाऊसाहेबांनी ३० बाय ३० मीटरचे शेततळे केले. विहिरीतून आणलेले पाणी त्या शेततळ्यात साठवून ठेवले जात असे. दरम्यान, तयार केलेल्या शेतीत २००७ ते २०१२ पर्यंत कापूस, ज्वारी, बाजरी, सोयाबीन ही पीके घेतली. २०१२ मध्ये भगवा डाळिंबाच्या ११०० झाडांची लागवड त्यांनी केली. ज्या जमिनीत २० वर्षे कोणतेही पीक घेतले नव्हते, तिथे डाळिंबाची शेती करणे म्हणजे आव्हानात्मक होते. दुर्दैवाने काही झाडांना रोग लागला. खूप प्रयत्न केले तरी रोग जाईना. शेवटी त्यांनी नाईलाजाने ५५० झाडांचा एक प्लॉट काढून टाकला.

शेतीत नवीन प्रयोग करताना कायम नवनवीन तंत्रज्ञानाचा शोध घेणे आवश्यक असते. आपल्याकडे अनेकजण प्रयोगशील शेती करतात. कमी जागेचा वापर करून चांगले पीक घेण्याचे कौशल्य अनेकांना आत्मसात झाले आहे. भाऊसाहेबांनी शेतीवर लक्ष केंद्रित केल्यानंतर नावीन्यपूर्ण प्रयोगाचा अभ्यास सुरू केला. एरव्ही दऱ्याखोऱ्यांच्या शेतीत यशस्वी होणारा सीताफळाचा प्रयोग भालगाव शिवारातील शेतीत राबविण्याचे त्यांनी ठरविले. काही ठिकाणी भेट घेऊन सीताफळ शेती पाहिली त्याचा अभ्यास केला आणि बालानगर, अनाना जातीची सीताफळाची ६५० झाडे आणून लावली. शेतीशिवाराच्या यशकथा आणि शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी कृष‌िभूषण विजयअण्णा बोराडे, ज्येष्ठ साहित्यिक आणि प्रगतीशील शेतकरी ना. धों. महानोर यांचे व्याख्यान भाऊसाहेबांनी ऐकल्यानंतर त्यांना सीताफळ शेतीची प्रेरणा मिळाली.

कमी पाणी,कमी मजुरीत येणारे पीक म्हणून सीताफळाची ओळख होती. भाऊसाहेबांनी सीताफळाची ६५० झाडे लावताना दोन गल्ल्यांमध्ये १४ फूट अंतर ठेवले. तर दोन झाडांमधील अंतर आठ फूट राखले. त्यामुळे झाडांना बहरण्यास, वाढण्यास मदत झाली. ठिबकसिंचन पद्धतीने पाणी दिले. २०१२ च्या डिसेंबर महिन्यात ही झाडे लावली. २०१३ मध्ये औरंगाबाद परिसरात दुष्काळ पडला होता. अनेक शेतकऱ्यांनी मोसंबीच्या बागा मोडल्या. अशा काळात भाऊसाहेबांना घरच्या शेतातील विहिरीने मोलाची साथ दिली. यंदा या सीताफळाला पहिला बहार लागला. भाऊसाहेबांनी झाडे वाढविताना सेंद्रीय शेतीवर भर दिला. दोन ट्रॅक्टर शेणखत सीताफळांना पुरले, पाणीही कमी आणि कमी मनुष्यबळात झाडे राखणे शक्य होते. हा प्रयोग चांगलाच यशस्वी झाला. अनेक झाडांचे एकेक फळ एक किलो वजनापर्यंत आले. १००० किलोहून अधिक सीताफळे निघाली. सीताफळाला डिसेंबरपर्यंतच पाण्याचे नियोजन करावे लागते. जानेवारी ते जून पाणी दिले नाही तरी या झाडांना काही अडचण येत नाही. पावसाळ्यात तर पाणी असतेच, पण हिवाळ्यात नियोजन केले की सीताफळ शेतीसारखी चांगली शेती नाही, असे भाऊसाहेब सांगतात.सीताफळ, डाळिंबात यशस्वी झाल्यानंतर त्यांनी तैवान ७८६ जातीची पपईची ८५० झाडे लावली आहे. या पपईला तीन महिन्यांत फुले येतात. योग्य काळजी घेतली तर वर्षाच्या आत फळे येणे सुरू होते. ज्या शेतात २० वर्षे साधे पीकही घेतले घेतले गेले नव्हते. तिथे नाविन्यपूर्ण प्रयोग करून भाऊसाहेबांनी नंदनवन फुलविले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘सालारजंग’चे अतिक्रमण काढले

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
गुलशन महलसमोरील सरकारी जागा सालारजंग यांची इस्टेट असल्याचा दावा करत तेथे अतिक्रमण करण्यात आले होते. मात्र, तहसील विभागाच्या पथकाने गुरुवारी हे अतिक्रमण हटविले.
गुलशन महलच्या समोरच्या बाजूला ४ हजार ६७० चौरस मीटर जागा शासकीय मालकीची आहे. मात्र, ही जागा सालारजंग इस्टेटच्या मालकीची असल्याचे सांगत या जागेवर गेल्या काही दिवसांपासून तंबू ठोकण्यात आला होता. गुरुवारी या ठिकाणी पत्रे आणून ठोकण्यात येणार होती. मात्र, त्या पूर्वीच तहसील विभागाच्या पथकाने हे अतिक्रमण हटवले. या जागेचे ११४१४ या क्रमांकाचे पीआर कार्ड असून ही जागा शासनाची आहे. या जागेवर अतिक्रमण झाल्याचा फोन निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांकडे आला व तत्काळ पोलिसांना सोबत घेऊन हे अतिक्रमण काढण्यात आले असल्याचे तहसीलदार रमेश मुंडलोड यांनी सांगितले.
---
...हा कोर्टाचा अवमान
---
सालारजंग इस्टेटचे अॅडमिनिस्ट्रेटर असल्याचे सांगत मोहम्मद नसिरोद्दीन म्हणाले की, 'या जागेवर सालारजंग इस्टेटची मालकी आहे. त्यामुळे ही जागा ताब्यात घेण्यासाठी आलो आहे. या जागेवर आमचा घटनात्मक अधिकार आहे. ही कारवाई म्हणजे न्यायालयाचा अवमान आहे.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

व्यावसयिकाला ३५ लाखांचा गंडा

$
0
0

आरोपींना मुंबईवरून अटक

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मेडिकल दुकानदारांना औषधीचा पुरवठा करणाऱ्या व्यावसयिकाला पुणे येथील महिलेने साथीदाराच्या मदतीने ३५ लाखाचा गंडा घातल्याचा प्रकार उघड झाला आहे. रिझर्व्ह बँकेच्या एनआरआय रिलीज फंडात रक्कम गुंतविल्यास दहा पट रक्कम देण्याचे आमिष त्यांना दाखविण्यात आले होते. याप्रकरणी आर्थिक गुन्हेशाखेने दोन जणांना अटक केली असून मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सिडको एन - ८ येथील अभिजित अरूणराव कुलकर्णी (वय ४२ रा. प्लॉट क्रमांक ३५, विनायक सोसायटी) यांचा मेडिकल दुकानदारांना औषधींचा पुरवठा करण्याचा व्यवसाय आहे. जुलै २०१३ मध्ये त्यांच्या प‌रिचयाचे बाळासाहेब दैठणकर यांनी त्यांची ओळख पुणे येथील विश्वनाथ अवचट यांच्याशी करून दिली. अवचट यांनी पुणे येथे निवेदिता कुलकर्णी यांची मातंगी एन्टरप्रायजेस ही सामाजिक संस्था असल्याची माहिती दिली. ही संस्था अनेक सामाजिक कार्यक्रमात अग्रेसर असल्याचेही त्यांनी सांगितले. निवेदिता कुलकर्णी यांना रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून एनआरआय रिलीज फंड मिळाला आहे. तो फंड रिलीज करण्यासाठी रक्कम गुंतविल्यास दहा पट रक्कम देण्याचे आमिष त्यांना दाखविण्यात आले होते. त्यासाठी ९७ लाख रुपयांची मागणी करण्यात आली होती. त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून कुलकर्णी यांनी ३५ लाख रुपये त्यांच्याकडे गुंतविले होते. मात्र, वेळोवेळी मागणी करूनही इतर आरोपींनी कुलकर्णी यांची निवेदिता कुलकर्णी यांच्याशी भेट घालून दिली नाही. तसेच त्यांनी दिलेल्या पैशांची मागणी केल्यास उडवाउडवीची उत्तरे देण्यात येत होती. अखेर या प्रकरणी कुलकर्णी यांनी आर्थिक गुन्हे शाखा गाठून तक्रार दाखल केली. मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात या प्रकरणी आरोपी निवेदिता कुलकर्णी, विश्वनाथ अवचट, बाळासाहेब दैठणकर, कमलाकर कुलकर्णी, सुरेश चव्हाण व अशोक जंगम यांच्याविरुद्ध अपहार व फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.





मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नववर्षाचे जल्लोषात स्वागत

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
खाणं-पिणं... डीजेच्या दणक्यावर धरलेला ठेका... अन् फटाक्यांच्या आतिषबाजी करत औरंगाबादकरांनी नव्या वर्षाचे उत्साहात स्वागत केले. गुडबाय २०१५ व वेलकम २०१६ असा म्हणत जल्लोष करण्यात आला.

नवोन्मेषाची झालर पांघरत मंदकुंद वातावरणात गुलाबी थंडीत तरुणाईने रस्त्यावर जल्लोष केला. निराला बाजार, क्रांतिचौक, जालना रोड, कॅनॉट प्लेस, पंचतारांकित हॉटेल्स येथे नववर्षाच्या स्वागतासाठी कार्यक्रमांचे आयोजन केले गेले. सेलिब्रेशन करण्यासाठी नगररोड, नाशिकरोड आणि बीड बायपासवरील सर्व ढाबे रिझर्व्ह करण्यात आले होते. ठिकठिकाणी रोषणाई, विविध खेळ, आयोजित करण्यात आले. संध्याकाळपासूनच वाइन शॉप्स व बार फुल्ल झाले होते. शहरातील विविध हॉटेल, खानावळींवर विद्युत रोषणाईही करण्यात आली होती. ग्रीटिंग्ज कार्ड, गिफ्टची दुकाने, जनरल स्टोअर्समध्ये स्वागताच्या वस्तू खरेदीसाठी गर्दी झाली होती.

'शांताबाई' गाण्याची चलती
शहरातील काही चौकांमध्ये; तसेच शहराबाहेर तरूण-तरूणींनी आपल्या कारमध्ये डेक लावून नवीन वर्षाचे स्वागत केले. एकमेकांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देत सरत्या वर्षाला निरोप देण्यात आला. काही ठिकाणी डेकवर 'शांताबाई'च्या गाण्यावर नाचत होती.

खवय्यांची चंगळ
नववर्षाचे स्वागत करण्यासाठी औरंगाबादकरांनी खवय्यांनी नॉनव्हेज पदार्थ खाण्यास पसंती दिली. मटण आणि मासळी बाजारपेठेत सकाळपासूनच खवय्यांनी गर्दी केली होती. वाढत्या मागणीमुळे मटण आणि मासळीचे भाव तेजीत होते. सुरमई, हलवा, मोठी कोळंबी, मटण आणि चिकनला चांगली मागणी होती. नॉनव्हेज पदार्थांसाठी प्रसिद्ध असणाऱ्या हॉटेलमध्ये खवय्यांनी संध्याकाळी आठनंतर गर्दी केली होती. बऱ्याच ठिकाणची हॉटेल फुल्ल असल्यामुळे पदार्थांची चव घेण्यासाठी अनेकजण वेटिंग करत असल्याचे चित्र अनेक भागांमध्ये दिसले. तरूणाईचा कॉलेजभागात जल्लोष होता.

विदेशी पर्यटकांचा जल्लोष
नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी शहरातल्या प्रमुख रस्ते वगळता अन्य रस्त्यावर गर्दीचे प्रमाण कमी होते. काही भागात रस्तावर गर्दीचा ओघ कमी होता. गेल्यावर्षी याठिकाणी तरुणांची मोठ्या प्रमाणात गर्दी दिसत होती. निराला बाजार, कॅनॉट, जालनारोड वरील पंचतारांकित हॉटेल्स आणि कॅफे गर्दीने भरल्याचे चित्र पाहायला मिळाले. कोरियन, जापानी आणि चिनी पर्यटकांनी या पंचतारांकित हॉटेल्समध्ये गर्दी केली होती. शहरात येणाऱ्या वाहनांवर करडी नजर ठेवण्यासाठी या महामार्गावर पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. रात्री पोलिसांची उशिरापर्यंत पेट्रोलिंग सुरू होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नूर कॉलनीत डेंग्यूचा आणखी एक रुग्ण

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
महापालिकेपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या नूर कॉलनीत गुरुवारी आणखी एक डेंग्यूचा रुग्ण आढळला. शेख नौफील शेख इसाक (वय ५ वर्ष) असे त्या रुग्णाचे नाव असून, त्याला उपचारासाठी घाटी रुग्णालयात दाखल केले आहे.
नूर कॉलनीत गेल्या आठवड्यात डेंग्यूमुळे तिघांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे पालिकेचे प्रशासन कामाला लागले आहे. या भागात आरोग्य शिबिरे घेऊन तेथील नागरिकांची तपासणी करण्यात आली आहे. कॉलनीत नाल्याच्या दोन्ही काठावर मिळून दहा घरे अशी आहेत की त्यांच्या मुळे नाल्याचा प्रवाह खंडित होऊन घाण पाणी साचण्याचे प्रकार घडतात. त्यामुळे दुर्गंधीचे साम्राज्य निर्माण होते. शिवाय डासांचा त्रासही सुरू होतो. त्यातून रोगराईचे प्रकार घडतात. येत्या काळात या घटना टाळण्यासाठी नाल्याकाठच्या १० घरांवर बुलडोजर चालवणे पालिकेने सुरू केले. या घरांचा तीन - तीन फुटांचा भाग बाधित होणार असून तो पाडला जाणार आहे. यासाठी दोन जेसीबी मशीन वापरण्यात येत आहेत. प्रशासकीय अधिकारी अजमतखान यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात येत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images