Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

जळालेल्या पतीनंतर पत्नीचा मृत्यू

$
0
0
हदगाव रस्त्यावरील मारोती फाट्याजवळ असलेल्या पंजाबनगर येथिल दाम्पत्यावर जुन्या भांडणाच्या कारणावरून काकणे पेट्रोल टाकून चार जूनच्या मध्यरात्री जाळले होते. त्यात ८५ टक्के जळलेल्या पती पाठोपाठ आता पत्नीनाचा सोमवारी दपचार घेत असतताना मृत्यू झाला.

कर्मचारी निवासस्थाने झालीपाळीव प्राणी केंद्रे

$
0
0
घाटी हॉस्पिटलमधील तृतीय व चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांसाठी असलेली निवासस्थाने आता पाळीवप्राणी केंद्रे बनली आहे. कुक्कुटपालन, शेळीपालनाचे व्यवसाय काही घरांमधून अनधिकृतपणे सुरू असल्याचे सोमवारी वैद्यकीय अधीक्षक डॉ. पी. एल. गट्टाणी यांच्या पाहणी दौऱ्यात दिसून आले.

फसवणूक प्रकरणी पाच वर्षांचा कारावास

$
0
0
मोटार देण्याचे आमिष दाखवून ग्राहकांची लाखो रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी औरंगाबाद जिल्हा तक्रार निवारण मंचाने प्रेमचंद अशोक कांबळे याला विविध प्रकरणांमध्ये प्रत्येकी तीन महिने याप्रमाणे सव्वापाच वर्षे कैद आणि प्रत्येक प्रकरणात पाच हजार रुपये दंड भरण्याचा निकाल दिला.

अनुदानासाठी मल्चिंगची अट रद्द करा

$
0
0
मोसंबी उत्पादकांना मदतीचा दुसरा हप्ता देण्यासाठी मल्चिंगची अट रद्द करावी, जळालेल्या सर्व बागांसाठी दोन लाख रुपयांचे अर्थसाह्य करावे, या व अन्य मागण्यांसाठी महाराष्ट्र मोसंबी उत्पादक शेतकरी संघाने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली.

कारच्या धडकेत ७ वर्षांचे बालक ठार

$
0
0
भरधाव कारच्या धडकेत सात वर्षांचे बालक ठार झाले. खोजेवाडी फाट्यानजीक सोमवारी दुपारी हा अपघात झाला. एमआयडीसी वाळूज पोलिसांनी कारचालकास अटक केली आहे.

नापास विद्यार्थी‌नीची आत्महत्या

$
0
0
दहावीच्या परीक्षेत नापास झालेल्या कोमल बाळू खैरे हिने गळफास लावून आत्महत्या केली. रविवारी दुपारी दोनच्या दरम्यान गंगाखेडजवळ रूमणा गावात ही घटना झाली. दहावीच्या वर्गात कोमल नापास झाली होती.

परभणीत युवकाचा खून

$
0
0
क्षुल्लक, जुन्या कारणावरून शहरात धारदार शस्त्राने युवकाचा खून करण्यात आला. पोलिसांनी दहा जणांविरूद्ध गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे. अंगद विठ्ठलराव जावळे असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे.

'इंजिनिअरिंग' बाबत पालकांची आज बैठक

$
0
0
'डीटीई' इंजिनिअरिंग प्रवेश प्रक्रिया ही बाद फेरीवर अवलंबून आहे. त्यातच यंदा 'आयआयटी'ची प्रवेश प्रक्रिया उशीराने होत आहे. त्यामुळे इंजिनिअरिंग प्रवेश म्हणजे गुणवत्तेपेक्षा 'रिस्क' घेण्यावर ठरणार अशी शक्यता आहे.

शेततळ्यांसाठी १२०० वेटिंगवर

$
0
0
दुष्काळ निवारणावर जिल्ह्यात सुमारे शंभर कोटी रुपये सरकारला खर्च करावे लागले आहेत. गेल्या काही दिवसांतील पावसामुळे जिल्ह्यात जनावरांसाठी सुरू केलेल्या निम्म्या छावण्या बंद करण्यात आल्या आहेत, मात्र भूजलाची पातळी अद्यापही वाढली नसल्याने पाणी पुरवठ्यासाठीचे टँकर अद्यापही सुरू ठेवावे लागत आहेत.

विरोधी पक्षनेतेपदाचा वाद वाढला

$
0
0
पालिकेच्या विरोधीपक्ष नेतेपदी कोण असावे या संदर्भात प्रदेशाध्यक्षांनी दिलेल्या पत्राला न जुमानता काँग्रेसच्या काही नगरसेवकांनी या पदासाठी दुसरेच नाव सुचवल्यामुळे विरोधी पक्षनेतेपदाचा वाद चिघळला आहे. आता हा वाद पुन्हा एकदा प्रदेशाध्यक्षांच्या दरबारात जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दोन मुलासह महिलेची आत्महत्या

$
0
0
दोन मुलासह महिलेने रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना पूर्णा येथे सोमवारी दुपारी १२ वाजण्‍याच्या सुमारास घडली. महिला ही नांदेड जिल्ह्यातील पिंपरी येथील रहिवाशी असल्याचे समजते. या प्रकरणी पूर्णा रेल्वे पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे.

'घाटी'वर आणखी ८ कॅमेऱ्यांची नजर

$
0
0
दैनंदिन कामकाज, गैरप्रकारांवर लक्ष ठेवण्यासाठी घाटी हॉस्पिटलमध्ये सध्या विविध ठिकाणी ५६ सीसीटीव्ही कॅमेरे कार्यरत आहेत. यात आणखी आठ कॅमेऱ्यांची भर पडणार आहे. सर्जिकल बिल्डिंगमध्ये हे नवीन कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. त्यामुळे प्रशासनाचे काम आणखी हलके होणार आहे.

रस्त्यांच्या कामांची 'लक्तरे'

$
0
0
महापालिकेने शहराच्या विविध भागात केलेली रस्त्यांची कामे आता संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहेत. सुमारे शंभर कोटी रुपयांपेक्षा जास्त पैसा खर्च करून तयार करण्यात आलेल्या रस्त्यांच्या 'क्वालिटी'ची लक्तरे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या 'क्वालिटी कंट्रोल' विभागाने वेशीवर टांगली आहेत.

आम आदमी पक्षच मोदींना रोखेल!

$
0
0
येत्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदींना रोखण्याची ताकद फक्त आम आदमी पक्षात असून, मुस्लिमांना हाच एकमेव पर्याय उपलब्ध असल्याचा दावा पक्षाच्या मुस्लिम नागरिक संवाद सभेत करण्यात आला.

खासदार खैरेंना मंत्रीपदाचे वेध

$
0
0
औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात आजघडीला तरी शिवसेनेकडून विद्यमान खासदार चंद्रकांत खैरे यांना पर्याय नाही. खासदार खैरेंना यावेळचीही निवडणूक जिंकण्याचा विश्वास असून त्यांना मंत्रीपदाचे वेध लागले आहेत. पक्षानेही त्यांनाच तयारी सुरू करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

फेरबदलात जगजितसिंहांचा अपेक्षाभंग

$
0
0
भाकरी फिरवण्याचे संकेत देत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाच्या सर्व मंत्र्यांचे राजीनामे घेतले आणि मंत्रिमंडळात फेरबदल घडवून आणला. मात्र, या फेरबदलानंतरही उस्मानाबाद जिल्ह्याचे विधान परिषदेतील आमदार राणा जगजितसिंह पाटील यांची वर्णी लागली नाही.

वाळूंच्या ओव्हरलोड ट्रकवरकायदेशीर कारवाई

$
0
0
औरंगाबाद-पैठण रस्त्यावर ओव्हरलोड वाळूचे ट्रक नियम धाब्यावर बसवून सर्रास धावताना दिसतात. या ट्रकमुळे अनेक अपघात झाल्यानंतरही आरटीओ, पोलिस प्रशासन यांनी कुठलीही कारवाई करण्यात आलेली नाही.

आवश्यक दाखल्यांसाठी विद्यार्थ्यांचे विशेष कॅम्प

$
0
0
उपविभागीय अधिकारी मुकेश भोगे व तहसीलदार अनिता भालेराव यांनी दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी आवश्यक सरकारी दाखले देण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. पहिल्या टप्प्यात शुक्रवारी विशेष कॅम्पचे आयोजन करून ५२८ विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे देण्यात येत आहे.

क्रीडा प्रबोधिनींच्या कामगिरीचे मूल्यांकन होणार

$
0
0
शिवछत्रपती क्रीडापीठ व राज्यातील अकरा क्रीडा प्रबोधिनींच्या कामकाजावर नियंत्रण ठेवण्यासाठी, तसेच त्यांचे मूल्यांकन करण्याकरिता शासनातर्फे उच्चस्तर धोरण अंमलबजावणी समितीची स्थापना करण्यात आली आहे. नवीन क्रीडा प्रबोधिनी स्थापनेविषयीही ही समिती निर्णय घेणार आहे.

सोयाबीन, तुरीला परभणीमध्ये पसंती

$
0
0
पावसाच्या समाधानकारक सुरुवातीनंतर पेरणीची लगबग सुरू झाली आहे. परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांची खरिपासाठी सोयाबीन, तूर पिकाला अधिक पसंती असून, काही भागांत पेरण्या सुरू झाल्या आहेत.
Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images