Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

कामगार कल्याण निधीतून भलत्यांचेच ‘कल्याण’

0
0
महापालिकेच्या कामगार कल्याण निधीतून भलत्यांचेच ‘कल्याण’ होत असल्याची माहिती मिळाली आहे. या निधीतून आर्थिक मदत मिळावी म्हणून गरजवंताना कामगार विभागात चकरा माराव्या लागतात. या निधीचे गेल्या अनेक वर्षांपासून ऑडिट झालेले नाही.

जकात नाक्याजवळ सापडला कोल्हा

0
0
मध्यवर्ती जकात नाक्याजवळील मदनी चौकात काही युवकांना कोल्हा सापडला. त्यांनी तो पकडला. कारच्या डिक्कीत ठेवला आणि थेट प्राणिसंग्रहालयात आणून दिला. संग्रहालयाचे संचालक वन विभागाची परवानगी घेऊन हा कोल्हा कायमस्वरूपी संग्रहालयात ठेवून घेणार आहेत.

शेंद्रा येथे लवकरच चार बहुराष्ट्रीय कंपन्या

0
0
ऐतिहासिक शहर म्हणून ओळखली जाणारी मराठवाड्याची राजधानी गेल्या ३५ वर्षांत औद्योगिकनगरी म्हणून जगाच्या नकाशावर मान्यताप्राप्त झाली आहे. शहरालगतच्या शेंद्रा पंचतारांकित औद्योगिक वसाहतीत लवकरच चार मोठ्या बहुराष्ट्रीय कंपन्या येत आहेत.

‘एमआयडीसी’ची पाणीकपात रद्द

0
0
गेल्या वर्षी पडलेल्या गंभीर दुष्काळाची झळ औरंगाबाद जिल्ह्याला मोठ्या प्रमाणावर बसली होती. मृतसाठ्यातून औरंगाबाद शहराला पाणीपुरवठा करण्यात आला. अधिक त्रास होऊ नये, यासाठी एमआयडीसीने एप्रिल महिन्यात उद्योगांना देणाऱ्या पाण्यात ३३ टक्के कपात केली होती.

कॅरीबॅग मुक्त शहरासाठी लातूरकर सरसावले

0
0
लातूर शहरातील एकूण कचऱ्यापैकी २५ टक्के कचऱ्याचा प्रश्न हा प्लास्टिकच्या कॅरीबॅगमुळे निर्माण झाला आहे. यामुळे गायीच्या आरोग्य ही धोक्यात येत आहे.

कागजीपु-याजवळ अपघातात २ ठार

0
0
खुलताबाद-औरंगाबाद मार्गावर कागजीपुरा गावाजवळ तिहेरी अपघातात दुचाकीवरील दोघे मृत्युमुखी पडले व एक जण गंभीर जखमी झाला.

आमदार वाघचौरे यांचे उपोषण

0
0
पैठण तालुक्यातील कामे सार्वजनिक बांधकाम विभागाने वेगाने पूर्ण करावीत, या मागणीसाठी आमदार संजय वाघचौरे यांनी मंगळवारी पीडब्लूडी कार्यालयासमोर उपोषण केले.

बलात्कार प्रकरणातील आरोपीला कोठडी

0
0
सहावर्षीय मुलीवर बलात्कार करणा-या आरोपीला औरंगाबाद येथील विशेष न्यायालयाने चार दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

आरोपीला फाशीच्या शिक्षेची मागणी

0
0
पैठण तालुक्यातील तुळजापूर येथे अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे.

४० डिझेल इंजिनची सिल्लोडमध्ये रोज विक्री

0
0
पावसाची दांडी व वीज पुरवठा खंडित झाल्याने कोंडीत सापडलेल्या तालुक्यातील शेतकऱ्यांनी डिझेल इंजिन खरेदी करण्यास सुरूवात केली आहे. येथील दुकानांमधून दररोज किमान चाळीस इंजिनांची विक्री होत आहे.

डॉ. विद्यासागर 'स्वारातीम' चे नवे कुलगुरू

0
0
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या कुलगुरूपदी पुणे विद्यापीठातील फिजिक्सचे विभागाचे प्रमुख डॉ. पंडित भालचंद्र विद्यासागर यांची निवड झाली आहे. उद्या ते पदभार स्वीकारणार आहेत.

वेरूळच्या लेण्यांना चोरट्यांची भीती

0
0
जागतिक वारसा स्थळ असलेल्या वेरूळ लेण्यांना चोरट्यापासून भीती निर्माण झाली आहे. वेरूळ लेण्यांच्या परिसरात चोरीची घटना घडल्यामुळे भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागात खळबळ उडाली आहे.

विवाहितेची आत्महत्या; गुन्हा दाखल

0
0
विवाहितेस आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी चोरवाघलगाव (ता. वैजापूर) येथील पाच जणांविरुद्ध पोलिसात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

विलासरावांचे स्मारक उभे करा

0
0
लातूरच्या कृषी महाविद्यालयाच्या परिसरात विलासराव देशमुख यांचे उत्तम स्मारक उभे करावे, असे आवाहन राज्याचे कृषिमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयात भरविली शाळा

0
0
नायगाव तालुक्यातील अंतरगाव येथे शासकीय रस्त्यावर अतिक्रमण करण्यात आल्याने मनुरकडे जाणारा रस्ता बंद झाला आहे. रस्ता बंद झाल्यामुळे मनुर ते बरबडा बससेवा बंद करण्यात आली असून याचा फटका विद्यार्थ्यांना सहन करावा लागत आहे.

प्रत्येकाचा सहभाग आवश्यक

0
0
आंतरराष्ट्रीय बाजारात रुपयाची होणारी घसरण, याचा परिणाम पेट्रोलच्या दरावरही झाला आहे. रुपया सावरण्यासाठी सरकार स्तरावरुन प्रयत्न होत असले, तरी रुपया सावरण्यासाठी पेट्रोलच्या वापरही मर्यादित केला, तर मोठा फरक पडू शकतो असा विश्वास शिक्षक, प्राध्यापकांनी ‘मटा’शी बोलताना व्यक्त केला.

पीडित मुलीच्या न्यायासाठी तरुणाईची धाव

0
0
पैठण तालुक्यात सहा वर्षाच्या बालिकेवर बलात्कार प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाई करावी, या मागणीसाठी एमआयटी व शिवछत्रपती कॉलेजच्या तरुणांनी जिल्हाधिकारी तसेच ग्रामीण पोलिस अधीक्षक कार्यालयावर वाहन रॅली काढून निवेदन सादर केले.

ऐतिहासिक स्थळांवर ‘एक खिडकी योजना’

0
0
ऐतिहासिक स्थळांवर लवकरच एक खिडकी राबवण्याची घोषणा जिल्हाधिकारी विक्रम कुमार यांनी केली. ‘सीआयआय’तर्फे औरंगाबाद पर्यटन विकासावर विशेष बैठक हॉटेल रामा येथे करण्यात आली होती.

महावितरण कार्यालयाला टाळे

0
0
भीषण दुष्काळी परिस्थिती चाहूल असतांना कृषी पंपाचा वीजपुरवठा तोडण्याचा सपाटा महावितरणने लावल्याच्या निषेधार्थ शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी महावितरणच्या कार्यालयाला ‘टाळे ठोको’ आंदोलन केले.

१५ इंजिनीअरिंग कॉलेज रडारवर

0
0
इंजिनीअरिंग अभ्यासक्रमाच्या मोठ्या प्रमाणात जागा रिक्त आहेत. यामागील कारणे शोधून काढण्यासाठी ३५ टक्क्यांपेक्षा अधिक जागा रिक्त असलेल्या कॉलेजांची तपासणी केली जात आहे.
Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images