Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

मराठवाड्याला ११५६ कोटी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
अत्यल्प पर्जन्यमानामुळे मराठवाड्यात यंदाही खरीप हंगाम वाया गेला. दुष्काळाच्या खाईत सापडलेल्या मराठवाड्यातील शेतकऱ्यांना शासनाकडून मदतीचा ११५६ कोटी ३८ लाख रुपयांचा पहिला टप्प्यातील निधी प्राप्त झाला असून, ही रक्कम आठवडाभरात शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे.

राज्याच्या विविध भागातील १५ हजार ७४७ गावांमध्ये खरीप हंगामामध्ये अपुऱ्या पावसामुळे सर्व पिकांचे नुकसान झाले. अवर्षणामुळे बाधित शेतकऱ्यांसाठी ३ हजार ५७८ कोटी ४३ लाख रुपयांची गरज आहे. त्यापैकी २ हजार कोटी रुपये सरकारने दिले आहेत. मराठवाड्याती शेतकऱ्यांना भरपाई देण्यासाठी २ हजार ६९ कोटी रुपयांची गरज आहे. त्यापैकी १ हजार १५६ कोटी ३८ लाख रुपये देण्यात आले आहेत. सरकारने दिलेल्या २ हजार कोटी रुपयापैकी सर्वाधि‌क निधी मराठवाड्याला मिळाला आहे.

कापूस, फळबागांसाठी मदत
मराठवाड्यातील सुमारे १५ लाख हेक्टर क्षेत्रावर कापसाची आणि सुमारे १७ लाख हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनची लागवड करण्यात आली होती. राज्य शासनाकडून केंद्राकडे प्रस्ताव सादर झाला त्यावेळी सुधारित पैसेवारी जाहीर करण्यात आली होती. अंतिम पैसेवारी १५ डिसेंबरला जाहीर करण्यात आली. कापसाच्या कापणी प्रयोग अहवाल प्राप्त झाला नसल्याने कापसाला पिकाला अनुदानातून वगळण्यात आले आहे. त्याचबरोबर पावसाअभावी जळालेल्या फळबागांचे पंचनामे करावे लागणार आहेत. त्यामुळे कापूस, फळबागांसाठी स्वतंत्र आदेश काढण्यात येणार आहेत.

वितरित निधी
नाशिक ः ४८५ कोटी ४१ लाख
पुणे ः १५१ कोटी १९ लाख
औरंगाबाद ः ११५६ कोटी ३८ लाख
अमरावती ः १९१ कोटी ७ लाख
नागपूर ः १५ कोटी १५ लाख
(निधी रुपयांमध्ये)

जिल्हा.....आवश्यक निधी.......प्राप्त निधी
औरंगाबाद......१९१.९१...........१०७.२८
जालना........२२१.४७............१२३.८०
बीड............२३५.०७............१३१.४०
लातूर.........३७६.२८.............२१०.००
उस्मानाबाद...३२८.८९............१८३.८५
नांदेड..........३१४.६८............१७५.९१
परभणी........१९१.८.............१११.६९
हिंगोली........२०१.१७............११२.४५
एकूण...........२०६९.२७.........११५६.३८
(रक्कम कोटी रुपयांत)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


आरटीओला मिळाली करोडी, साजापुरात जागा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या जागेचा गेल्या दशकापासून सुरू असलेला शोध अखेर संपला आहे. आरटीओ कार्यालयाला करोडी, साजापूर ये‌‌थे गट नंबर २४मधील ६ हेक्टर (सुमारे ११ एकर) जागा महसूल विभागाकडून ताब्यात देण्याचे आदेश दिले आहेत. येत्या दोन दिवसांत या मोजणी करून जागेचा ताबा आरटीओ कार्यालयाकडे देण्यात येणार आहे.

औरंगाबाद आरटीओ कार्यालयात दहा लाखांवर वाहनांची नोंदणी झाली आहे. आरटीओत लर्निंग आणि पर्मनंट लायसन्स काढण्यासाठी येणाऱ्यांची संख्या वाढत आहे. याशिवाय जुन्या वाहनांची नोंदणी, रिक्षांची फेरनोंदणी आदी कामेही केली जातात. मुंबई हायकोर्टाने जड वाहने आणि वाणिज्यिक वापरासाठी असलेल्या वाहनांची ब्रेक आणि लाइट अलाइनमेंट टेस्ट घेण्यासाठी स्पेशल ट्रॅक तयार करण्याचे आदेश दिले होते. यामुळे शेंद्रा येथे वाणिज्यिक वाहनांचे टेस्ट घेण्यास सुरुवात करण्यात आली. कार्यालयात होणाऱ्या गर्दीमुळे नवीन जागेचा शोध घेण्याचे काम सुरू करण्यात आले.

औरंगाबाद आरटीओ पदाची सूत्रे स्वीकारताच सर्जेराव शेळके यांनी नवीन जागेचा शोध सुरू केला. या कामासाठी मोटार वाहन निरीक्षकाचीही विशेष नियुक्ती केली. आरटीओ कार्यालयास जागा देण्याचा ठराव करोडी ग्रामपंचायतीत मंजूर करण्यात आला होता. त्यानंतर जागेचा प्रस्ताव सादर करण्यात आला. विभागीय आयुक्त उमाकांत दांगट आणि जिल्हाधिकारी निधी पांडेय यांच्या पुढाकाराने ११ एकर जागा मिळाली आहे. येत्या दोन दिवसांत ही जागा आरटीओच्या ताब्यात देण्यात येणार आहे.

पडेगाव, वाळूजमध्ये पाहणी

आरटीओ कार्यालयाला जागा मिळविण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून प्रयत्न सुरू आहेत. तत्कालीन आरटीओ संभाजी सलामे व सहायक परिवहन अधिकारी अनिलकुमार बस्ते यांच्या कार्यकाळात पडेगाव येथे जागा घेण्याचा निर्णय झाला होता. त्यानंतर प्रभारी आरटीओ डॉ. डी. टी. पवार यांनी जागेची पाहणी करून ती जागा योगय नसल्याचा अभिप्राय दिला होता. यानंतर तत्कालीन आरटीओ गोविंद सैंदाणे यांच्या काळात वाळूज आणि कागजीपुरा येथील जागांची पाहणी करण्यात आली होती. तांत्रिक कारणांमुळे या जागांचा प्रस्ताव रद्द करण्यात आला होता.

करोडी येथील जागा ताब्यात घेऊन टेस्टिंग ट्रॅक, इमारत, कंपाउंड वॉल आदींचा प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम विभागाकडून तयार करण्यात येणार आहे. हा प्रस्ताव परिवहन विभागाकडे पाठविण्यात येईल. दोन महिन्यांत प्रायोगिक तत्त्वावर ट्रॅक तयार केला जाणार आहे.
- सर्जेराव शेळके, प्रादेशिक परिवहन अधिकारी

जागेची मागणी : १० वर्षांपासून
मिळालेली जागा : ११ एकर
औरंगाबादपासून अंतर : १२.५ किलोमीटर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिवसेनेकडून पाकच्या राष्ट्रध्वजाची होळी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
पंजाबमधील पठाणकोट येथे भारतीय सैनिक तळावर रविवारी अतिरेक्यांनी हल्ला चढविला. सहा दहशतवाद्यांचा खातमा करण्यात आला. मात्र, या चकमकीत सात जवान शहीद झाले. हे अतिरेकी पाकिस्तानचे असल्याचे पुरावेही सापडले आहेत. या घटनेच्या निषेधार्थ शिवसेनेने सोमवारी आंदोलन केले. शिवसैनिकांनी पाकिस्तानचा ध्वज जाळून निषेध व्यक्त केला.
क्रांतिचौकात शिवसेनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले. 'पाकिस्तान मुर्दाबाद, पाकिस्तान हाय हाय, भारत माता की जय, वंदे मातरम' च्या घोषणा देण्यात आल्या. सुरुवातीला हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली. भारत सरकारने पाकिस्तानशी कोणतीही चर्चा न करता दहशतवाद्यांना गोळीचे उत्तर गोळीनेच दिले पाहिजे, असे आवाहन जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांनी केले. आंदोलनप्रसंग उपजिल्हाप्रमुख जयवंत ओक, शहरप्रमुख संतोष जेजूरकर, बाळासाहेब थोरात, तालुकाप्रमुख बप्पा दळवी, सुनिता आऊलवार, कला ओझा, माधुरी जोशी, सुनिता देव, विजय सूर्यवंशी, मकरंद कुलकर्णी, गजानन मनगटे, मोहन मेघावाले, सुमित्रा हळनोर, सिद्धांत सिरसाट, गोपाल कुलकर्णी आदींसह शिवसेना कार्यकर्ते, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उद्योजक व्हा... : उद्योजकतेची ‘म‌निषा’

$
0
0

Dhananjay.Kulkarni@timesgroup.com
तो काळ १९९६चा. सुखा-सुखी नोकरी करावी आणि संसार करावा अशा पठडीतील सुखवस्तू कुटुंबातील धारणा. या धारणेत न अडकता काहीतरी 'आउट ऑफ बॉक्स' करायचे आणि उद्योजकच व्हायचे, हे लक्ष्य घेऊन मनीष पाडळकर यांनी वाळूज औद्योगिक क्षेत्रात पाऊल ठेवले. वडील शिवकुमार पाडळकर बँकेत अधिकारी. उद्योगाची तशी पार्श्वभूमी वडिलांकडे नाही, परंतु काका जयंत पाडळकर उद्योजक. उद्योजकतेचे खरे बाळकडू मनीष यांना तिथेच मिळाले. 'आस्थापनेत सरळ सरळ काकांसोबत उद्योग करू आणि मालकच होऊ... काकांचीच फॅक्ट्री, ती आपली फॅक्ट्री होईल,' असे म्हणत सहज उद्योजकाच्याच खुर्चीवर बसता आले असते, परंतु मनीष यांनी तसे केले नाही. १९९५मध्ये शिक्षण झाल्यावर १९९६मध्ये काकांनी सरळ एक कामगार म्हणून रुजू होण्याचा आदेश दिला. तो शिरोधार्ह मानत कंपनीत रुजू होऊन मनोज यांनी कामास सुरुवात केली. एक सर्वसामान्य कामगार म्हणून जाताना वाळुजला डुगडुगीत (सिक्स सीटर) घरून डबा घेऊन जाणे सुरू केले. वर्षभरात त्यांनी कामगार, पर्चेस मॅनेजर, अकाउंट, निर्मिती (प्रोडक्शन), पॅकिंग, सेलिंग, मार्केटिंग विभागात पडेल ते काम केले. काका जयंत यांच्या कृपा इलॅस्टोमरमध्ये काम करताना गाठीशी आलेल्या अनुभवाने त्यांना समृद्ध केले. काकांकडेही नोकरी करायची नाही, स्वतःचा व्यवसाय सुरू करावा ही मनातील इच्छा स्वस्थ बसू देत नव्हती. छोटेसे युनिट सुरू करून काकांनाच रॉ-मटेरिअल पुरविण्याचा उद्योग सुरू करावा हे ठरले. त्यानंतर ८ जून १९९७ला मनीष प्र‌िसिजन वर्क्स नावाने कंपनी सुरू केली. एकीकडे काकांची फॅक्ट्री, दुसरीकडे आपले स्वतंत्र युनिट असे काम सुरू झाले. आपला प्रांत निर्मितीचा (मॅन्युफॅक्चरिंग) आहे. त्यात आपल्याला गती आहे, असा आत्मविश्वास दृढ झाला आणि त्यांनी ऑटोमोबाइल प्रेस कम्पोनंट बनविण्याची कंपनी सुरू केली. १९९७मध्ये त्यांना व्हेरॉक कंपनीतून पहिला ब्रेक मिळाला आणि आज ते यशाच्या शिखरावर पोचले आहेत. आतेभाऊ विनय मार्कंडेय याला सोबत घेतले. त्याची साथ मोलाची ठरली. वाळूजमध्ये जमीन घेणे, मशीनरी उभारणे, कामगारांची जुळवाजुळव करणे, भांडवल उभारणे, नुकसानीची तयारी ठेवणे आणि उद्योग सुरू करण्याच्या दृष्टीने असलेल्या वेगवेगळ्या परवानग्या यांचा अभ्यास सुरू केला. गॉडफादर जयंत पाडळकरांचा वरदहस्त होताच, पण त्या कुबड्या ठरू नयेत हेच मनीष पाहत राहिले. सुरुवातीला व्हेरॉक एकच कंपनी मिळाली. पहिल्या वर्षी फक्त ६ लाख रुपये उलाढाल झाली. आज टू व्हीलर, थ्री व्हीलर गाड्यांच्या इंजिनचे प्रेस कम्पोनंट मनीष पाडळकरांचे आहे. व्हेरॉकचे ते व्हेंडर असून, रबर-मेटल शीट्स, व प्र‌िसिजन वर्कस््मध्ये अढळपद निर्माण केले आहे. २०पेक्षा जास्त स्पर्धक कंपन्या आहेत, पण वेगळेपण टिकवून ठेवण्यात मनीष यांची मेहनत आहे. आज १५ जणांना थेट, तर २५ जणांना अप्रत्यक्ष रोजगारही दिला आहे. वाळूजमध्ये जागा घेण्यापासून युनिट सुरू करणे व अठरा वर्षांत २ कोटीहून अधिकचा टर्नओव्हर देणारे मोजके मराठी उद्योजक आहेत, त्यात मनीष पाडळकरांचा समावेश होतो.

सुरुवातीला आर्थिक अडचणी असल्या तरी त्यांनी प्रयत्न सोडले नाहीत. वडील आणि काकांनी सुरुवातीला फक्त २ लाख रुपये देऊन उद्योग सुरू करण्यास सांगितले होते. ते पैसे व्याजासह परत करताना दोन वर्षांत जो आत्मविश्वास आला. तोच आत्मविश्वास ते आपल्या १५ कामगारांनाही देतात. मनीष आपल्या कामगारांचा पगार बँकेत जमा करतात. त्यांनी १५ जणांचा विमाही उतरविला असून, कामगारांना आर्थिक शिस्त लावली आहे. संघर्षाच्या वाटेत यश पादाक्रांत करताना पत्नी रुपाली यांनीही फार मोठी साथ दिली, असे मनीष सांगतात. उद्योजक व्हा, सुरुवातीला आलेल्या नुकसानीला भांडवल करा आणि तेच गुंतवा, असे ते आवर्जून सांगतात. आज २ कोटींचा वार्षिक टर्नओव्हर महिन्याला २ कोटींचा करणे हे मनीष यांचे लक्ष्य आहे. यासाठी आधुनिक मशीनरी, टेक्नॉलॉजीची कास धरणे, कुशल मनुष्यबळ विकसित करणे यावर ते भर देत आहेत. भविष्यात स्वतःच मशिनरी बनवण्याचा त्यांचा मानस आहे.

उद्योजक होताना...
उद्योग क्षेत्रात येण्यापूर्वी सर्वप्रथम स्वत:ला जाणून घ्यावे. आपल्या अंगात कुठले कौशल्य आहे, भांडवल किती आहे, कर्ज किती मिळू शकेल, मोक्याची जागा आहे का, तयार केलेल्या उत्पादनाला बाजारात किती प्रतिसाद मिळेल, कच्च्या मालाचा पुरवठा योग्यरित्या होईल का, तांत्रिक कौशल्य आत्मसात करण्याबरोबरच मार्केटिंगचे तंत्रही आत्मसात करायला लागेल, याचाही विचार करावा, असे ते सांगतात. नोकरी करूच नका, त्याने बंधने येतात आणि स्वप्न अपुरे राहतात, असे ते म्हणाले. एकदा या क्षेत्रात यायचे निश्चित झाले की, सर्वप्रथम नकारात्मक भूमिकेला लाथ मारावी. आपले ध्येय निश्चित करावे. ते गाठण्यासाठी प्रयत्नांची जोड द्यावी. जिद्द, मेहनत व चिकाटीच्या जोरावरच उद्योजकतेत यशस्वी होता येते. सतत काहीतरी नवे करण्याचा ध्यास असावा. मेहनतीची तयारी ठेवावी. कितीही संकटे आली तरी हार मानू नये. केवळ कामगारांशीच नव्हे तर कच्च्या मालाचे पुरवठादार, व्यापारी, वितरक यांच्याशीही सलोख्याचे संबंध ठेवावेत, हेच माझ्या यशाचे गमक आहे, असे मनोज सांगतात.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गुंठेवारीतही देखभाल दुरुस्तीची कामे

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
'गुंठेवारी भागात देखभाल दुरुस्तीची कामे केली जाणार आहेत. ज्या नागरिकांनी यापूर्वी गुंठेवारी भरली आहे त्यांनी पुन्हा गुंठेवारी भरण्याची गरज नाही,' असे म्हणत महापौर त्र्यंबक तुपे यांनी मंगळवारी या भागातील नागरिकांना दिलासा दिला.
शहरातील चाळीस वॉर्ड गुंठेवारीत येतात. विकास कामे, देखभाल दुरुस्तीची कामे या संदर्भात महापौरांच्या दालनात अधिकाऱ्यांची बैठक झाली. बैठकीला आयुक्तांसह अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. केंद्रेकर प्रथमच बैठकीच्या निमित्याने महापौरांच्या दालनात आले. महापौरांनी बैठकीत झालेल्या निर्णयाची माहिती पत्रकारांना दिली. ते म्हणाले, 'गुंठेवारी भागात देखभाल दुरुस्तीची कामे करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. ही कामे करता येतील असे आयुक्तांनी स्पष्ट केल्यामुळे अधिकारी आता ही कामे करतील. २००१ पूर्वीच्या ज्या वसाहती गुंठेवारीत अस्तित्वात आल्या आणि या वसाहतींमधील नागरिकांनी गुंठेवारी भरलेली असेल, तर त्यांना पुन्हा गुंठेवारी भरण्याची गरज नाही. त्यांच्या परिसरात देखभाल दुरुस्तीची कामे केली जातील,' असे तुपे म्हणाले.
जलवाहिनी टाकणे सुरू करा
समांतर जलवाहिनी प्रकल्पांतर्गत वॉर्डांतर्गत पाइप लाइन टाकण्याचे काम सध्या बंद आहे, हे काम सुरू करण्याची सूचना यावेळी प्रशासनला देण्यात आली. आमदार, खासदार व अन्य लोकप्रतिनिधींच्या निधीतून पालिकेला पैसे दिले जाणार आहेत. त्यासाठी पालिकेला पन्नास टक्के रक्कम स्वतःचा हिस्सा म्हणून द्यावी लागेल. पालिकेचा हिस्सा टाकण्याची वेळ येऊ नये यासाठी जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून निर्णय घ्या, असे यावेळी आयुक्तांना सांगण्यात आले. आयुक्तांनी देखील या संदर्भात विभागीय आयुक्तांशी चर्चा करण्याची तयारी दर्शवल्याचे महापौर म्हणाले.
गुंठेवारीतील घरे नियमित करणे सोपे
गुंठेवारी भागातील घरे नियमित करणे आता सोपे झाले आहे. यापूर्वी ही घरे नियमित करण्यासाठी जवळपास दहा महत्त्वाची कागदपत्रे लागायची. आता महापौरांच्या आदेशानुसार फक्त ६ कागदपत्रांत ही घरे नियमित करण्याची कार्यवाही केली जाणार आहे. त्यात मालकी हक्क पुरावा आणि घर मालक त्या भागात कधीपासून राहतो याचा रहिवासी पुरावा सादर करावा लागेल. पुढील आठवड्यापासून शहरात ठिकठिकाणी गुंठेवारी भागातील घरे नियमित करण्यासाठी शिबिरांचे आयोजन केले जाणार आहे. या शिबिरांचा शहरातील नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन महापालिकेतर्फे करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

...तर विभागीय चौकशी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
'टीडीआर घोटाळ्याची चार प्रकरणे आतापर्यंत प्राप्त झाली आहेत. त्या सर्व प्रकरणात तथ्य आढळल्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांना नोटीस बजावली. नोटीसला त्या अधिकाऱ्यांनी दिलेले उत्तर समाधानकारक नसेल, तर त्या सर्वांची विभागीय चौकशी करू,' असे महापालिका आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी सांगितले.

पालिकेतील टीडीआर घोटाळ्याचे प्रकरण 'मटा' ने उघडकीस आणले. नारेगाव येथील बारा मीटरच्या रस्त्यासाठी २४ मीटरचा टीडीआर देण्यात आला. फाजलपुरा, अल्तमश कॉलनी येथील टीडीआर प्रकरणाला देखील वाचा फोडली. या सर्व टीडीआर प्रकरणी नगरसेवक नितीन चित्ते, राज वानखेडे, कैलास गायकवाड यांनी सर्वसाधारण सभा व स्थायी समितीच्या बैठकीत प्रशासनाला जाब विचारला. महापौर त्र्यंबक तुपे यांच्या यांच्या आदेशाने या सर्व टीडीआर प्रकरणांची चौकशी सुरू झाली. अतिरिक्त आयुक्त रमेश पवार यांच्या माध्यमातून चौकशी करून नगररचना विभागाचे सहाय्यक संचालक डी. पी. कुलकर्णी, उपअभियंता शिरीष रामटेके, शाखा अभियंता आर. एम. वाघमारे यांच्यासह निवृत्त कर्मचारी फईम सिद्दिकी, शेख वसील यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली. या सर्वांनी नोटीसचे उत्तर दिले. त्यासंदर्भात पत्रकारांनी केंद्रेकर यांना विचारले असता ते म्हणाले, 'टीडीआर घोटाळ्याची चार प्रकरणे आतापर्यंत समोर आली आहेत. या चारही प्रकरणात तथ्य आढळल्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांना नोटीस बजावण्यात आली. त्यांनी नोटीसचे उत्तर दिले आहे. त्या उत्तरांचा अभ्यास केला जात आहे. अधिकाऱ्यांच्या खुलासे असमाधानकारक आढळले, तर त्यांची विभागीय चौकशी केली जाईल. टीडीआर संदर्भात यापुढे ज्या तक्रारी येतील त्यांची चौकशी केली जाईल,' असे केंद्रेकर म्हणाले.

चार फाइल केल्या परत
नगररचना विभागाकडून टीडीआरच्या संबंधी तीन-चार फाइल आल्या होत्या. त्या आपण परत केल्या. टीडीआरच्या फाइलला तालुका भूमिअभिलेख कार्यालयाकडून प्रमाणित केलेला मोजणी नकाशा असलाच पाहिजे असे नगररचना विभागाच्या अधिकाऱ्यांना सांगितले आहे,' असे सुनील केंद्रेकर यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विद्यार्थ्यांना ‘इंटरव्ह्यू’चे प्रशिक्षण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ व टाटा कन्सल्टंसी सर्व्हिसेस (टीसीएस) यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला असून, त्यानुसार विद्यापीठांतर्गत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना इंटरव्ह्यू तयारीचे मोफत प्रशिक्षण उपलब्ध करून देण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत विवेकानंद कॉलेजच्या ७५ विद्यार्थ्यांना ही संधी मिळाली आहे.

उद्योगांना कुशल मनुष्यबळ मिळत नाही, अशी ओरड नेहमी केली जाते. अनेकदा विद्यार्थ्यांना इंटरव्ह्यूला कसे सामोरे जायचे, याची फारशी कल्पना नसते. त्यामुळे व्यावसायिक कौशल्ये असूनही विद्यार्थ्यांची नोकरीची संधी हुकते. या पार्श्वभूमीवर विद्यापीठाने कार्यक्षेत्रातील कॉलेजांमध्ये पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना मुलाखतीचे तंत्र समजावे, मुलाखतीला सामोरे जाताना त्यांना अडचणी निर्माण होऊ नयेत म्हणून टीसीएस कंपनीसोबत प्रशिक्षणाबाबत करार केला. त्यानुसार कंपनीचे ट्रेनर विद्यार्थ्यांना ट्रेनिंग देत आहेत. त्यात इंग्रजी संभाषण कौशल्य सुधारणे, व्यक्तिमत्व विकास अशा विविध विषयांवर मार्गदर्शन केले जात आहे. विवेकानंद कॉलेजमधील ७५ विद्यार्थ्यांना हे प्रशिक्षण दिले जात आहे. त्यानंतर विविध महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठीही प्रशिक्षण उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

केंद्रीय रस्ते निधीतून ३८ कोटी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
केंद्रीय सार्वजनिक बांधकाम खात्याच्या केंद्रीय रस्ते निधीतून ३८ कोटी रुपये मंजूर झाले आहेत. त्यातून करमाड, लाडसावंगी आणि चौका भागातील रस्ते तयार करण्यात येणार आहेत.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी काही दिवसांपूर्वी औरंगाबाद जिल्ह्यातील रस्त्यांसाठी १५ हजार कोटी रुपयांची घोषणा केली होती. त्यातून अनेक राष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्गांचे मजबुतीकरण, डांबरीकरण, रस्ते रुंदीकरण होणार आहे. पंधरा दिवसांपूर्वी गडकरींनी औरंगाबादेत येऊन औरंगाबाद - जालना महामार्गाच्या कामाचे उदघाटनही केले. जिल्ह्यातील रस्त्यांसाठी जाहीर केलेला निधी कोणत्या रस्त्यांसाठी मिळणार याबाबत चर्चा होती. पहिल्या टप्प्यात भाजप आमदारांच्या मतदारसंघात प्राधान्य देण्यात येईल. त्याची प्रचिती केंद्रीय रस्ते निधीच्या मंजुरीतून आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्रीय रस्ते निधीअंतर्गत औरंगाबाद तालुक्यातील तीन रस्त्यांसाठी ३८ कोटी रुपये मंजूर झाले आहेत. त्यात करमाड - लाडसावंगी हा रस्ता दोन टप्प्यात दहा किलोमीटर तर चौका - लाडसावंगी हा सहा किलोमीटरचा रस्ता घेण्यात आला आहे. या रस्त्यांचे लवकरच सर्वेक्षण करण्यात येईल. त्यानंतर कामाच्या निविदा काढण्यात येऊन कामाला सुरुवात होईल. त्यानंतर कामे सुरू होतील.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘जलयुक्त’च्या नव्या गावांची येत्या दहा दिवसांत निवड

$
0
0

म. टा.प्रतिनिधी, औरंगाबाद
जलयुक्त शिवार अभियानामुळे दुष्काळी भागात काही अंशी दिलासा मिळाला. यावर्षी औरंगाबाद जिल्ह्यातील २२३ गावांमध्ये अभियान राबविण्यात येणार असून, येत्या दहा दिवसांमध्ये गावांची निवड करण्यात येणार आहे.

जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियानांतर्गत गेल्यावर्षी २२८ गावांची निवड करण्यात आली होती. यंदा जिल्ह्यात २२३ गावे निवडण्यात येणार आहेत. निवडण्यात येणाऱ्या गावांचे आराखडे तयार करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून, १५ जानेवारीपर्यंत हे आराखडे तयार करण्यात येणार आहेत. औरंगाबाद जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियानामुळे तयार करण्यात आलेल्या बंधाऱ्यांच्या आसपासच्या एक किलोमीटर परिसरातील विहिरींना पाणी आल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंद आहे. यंदा अभियानात गावाची निवड व्हावी यासाठी प्रशासनातील अधिकाऱ्यांकडे अनेक गावकऱ्यांची मागणी आहे.

या वर्षीपासून जिल्ह्यात असलेल्या जुन्या प्रकल्पांच्या डागडुजीसाठीही ५० टक्के निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. अत्यल्प खर्च केल्यास या प्रकल्पांचा पाणी अडवण्यासाठी उपयोग होऊ शकतो. असे बंधारे, साखळी बंधाऱ्यांची दुरुस्ती करण्यात येणार आहे. गेल्यावर्षी जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियानाची ८ शासकीय यंत्रणा; तसेच ११ स्वयंसेवी संस्थांनी कामे हाती घेतली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आज स्पर्धा; खेळाडूंची तब्येत बिघडली!

$
0
0


औरंगाबाद ः दिल्ली येथील राष्ट्रीय खेळासाठी औरंगाबादहून निघालेल्या महाराष्ट्र संघाच्या खेळाडूंचे दुसऱ्या दिवशीही हाल झाले. जागा न मिळाल्यामुळे अनेकांनी रेल्वेतच रात्र जागून काढली. त्याचा परिणाम त्यांच्या तब्येतीवर झाला आहे. स्पर्धा उद्यावर आली असताना अनेक खेळाडूंची तब्येत बिघडली आहे.
राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करण्यासाठी ८ खेळांचे २२८ खेळाडू औरंगाबादहून सोमवारी सचखंड एक्स्प्रेसने दिल्लीला रवाना झाले. हा संघ दिल्लीला पाठविण्याची जबाबदारी असलेल्या क्रीडा विभागाच्या हालगर्जीपणामुळे या खेळाडूंच्या तिकिटाचे आरक्षण झालेच नाही. त्यामुळे अनेकांना जागा न मिळाल्याने औरंगाबाद ते दिल्ली पर्यंतचा प्रवास उभ्याने, जागा मिळेल तिथे बसून करावा लागला. काही खेळाडूंनी औरंगाबाद ते मनमाडपर्यंतचा प्रवास टॉयलेट, बाथरूम शेजारी बसून केला. या दगदगीने खेळाडूंचे हाल झाले. उद्यापासून (बुधवार) राष्ट्रीय स्पर्धेला सुरुवात होत आहे. मात्र, तत्पूर्वीच खेळाडूंना ताप, डोकेदुखी, चक्कर येणे सुरू झाले आहे. याचा परिणाम स्पर्धेतील कामगिरीवर होऊ शकतो.
सकाळचा नाश्ताही नाही
खेळाडूंना रेल्वेत सकाळचा नाश्ताही मिळाला नाही. काही खेळाडूंनी स्वतःच्या पैशाने नाष्ता केला. पोटात जेवण नाही आणि बसायला जागा नाही. यामुळे खेळाडूंचे हाल झाले.
हलगर्जीपणा यापूर्वीही
खेळाडूंच्या तिकिटांचे रिझर्व्हेशन लवकर न केल्याचे प्रकार अनेक राष्ट्रीय स्पर्धेच्या वेळेसही झाले आहेत. याबाबत संबंधित प्रशिक्षक, अधिकाऱ्यांकडे वारंवार तक्रारी करण्यात आल्या. मात्र, क्रीडा विभागाने त्यांच्यावर काहीही कारवाई केली नाही.
---
क्रीडा विभागाने आम्हाला पूर्वकल्पना देण्याची गरज होती. त्यांनी नांदेडहून तिकिटातली सूट घेतली. मात्र, कन्फर्मेशनसाठी काय केले, हे तपासावे लागेल. आम्ही खेळाडूंच्या व्यवस्थेला नेहमीच प्राधान्य देतो. क्रीडा विभागाने रेल्वे व्यवस्थापकांना माहिती दिली असती तर निश्चित त्यांना जागा मिळाली असती.
- ए. के. सिन्हा, विभागीय रेल्वे व्यवस्थापक, नांदेड

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विकारांवर प्रहार करण्यासाठी भारूड : डॉ. देखणे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
'मानवी विकारांवर प्रहार करण्यासाठी भारूडांचा जन्म झाला. संत एकनाथांनी लिहिलेली साडेतीनशे भारूडे सोप्या भाषेमुळे लोकाभिमुख झाली. भारूडांनी मराठी भाषेवर नवरसाची उधळण केली. रूपकात्मक भारूडांनी प्रतिकात्मक स्वरूपात वेदांताची मांडणी केली' असे प्रतिपादन संत साहित्याचे अभ्यासक डॉ. रामचंद्र देखणे यांनी केले. वरद गणेश मंदिरात मंगळवारी सायंकाळी झालेल्या वरद व्याख्यानमालेत ते बोलत होते.
श्री गणेश सभा, समर्थनगर यांनी वरद व्याख्यानमाला आयोजित केली आहे. या व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प डॉ. रामचंद्र देखणे यांनी गुंफले. 'नाथांच्या गौळणी-एक रूपक' या विषयावर देखणे यांचे व्याख्यान झाले. नाथांचे भारूड व लोकपरंपरेतील अढळ स्थान या विषयावर देखणे यांनी प्रकाश टाकला. 'नाथांचे कीर्तन ऐकण्यासाठी श्रीखंड्या व हिरा नावाची वेश्या उपस्थित असत. दुसऱ्या दिवशी गोदावरी नदीच्या काठावर दोघांमध्ये कीर्तनावर चर्चा चालत असे. हा प्रकार पाहिल्यानंतर नाथ महाराज चकीत झाले. सर्वांच्या तोंडी सहजसोप्या भाषेत रूळेल, अशी वेदांताची मांडणी करण्याचे त्यांनी ठरवले. या निर्णयातूनच भारूडांचा जन्म झाला.
पारंपरिक खेळांचा भारूडावर मोठा प्रभाव आहे. रूपकात्मक भारूडं प्रतिकात्मक स्वरूपात वेदांताची मांडणी करतात. विकारांवर प्रहार करणारे भारूड लोकाभिमुख ठरले. साध्या भाषेतून नाथांनी अविवेकावर प्रहार केले. मराठी भाषा फुलवण्यात भारूडं, गण-गौळणींचा मोठा वाटा आहे. देवाने देवपण आणि भक्ताने भक्तपण विसरावे व एकत्र नाचावे त्याला कीर्तन म्हणतात. कीर्तन व नर्तन कला-संस्कृतीची दोन रूपे असली तरी महत्त्वपूर्ण आहेत' असे देखणे म्हणाले. व्याख्यान ऐकण्यासाठी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाजप जिल्हाध्यक्ष निवडीला गटातटाचे ग्रहण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
केंद्र व राज्यात सत्ताधारी असलेल्या भारतीय जनता पक्षाच्या जिल्हाध्यक्षपदाची निवडणुकीची लगबग सुरू झाली आहे. जिल्हाध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याकडे साऱ्याचे लक्ष लागले आहे. इच्छुकांनी लावलेल्या जोरदार फिल्डिंगमुळे या निवडीला गटातटाच्या राजकारणाचा तडकाही बसू लागला आहे.

सत्ताधारी असलेल्या भारतीय जनता पक्षात सध्या अंतर्गत निवडणुकांची लगीनघाई सुरू झाली आहे. नियोजित वेळापत्रकाप्रमाणे निवडणूक कार्यक्रमास एका महिन्याचा विलब झाला असून, जिल्ह्यात मंडळाध्यक्ष निवडीची प्रक्रिया सुरू झाली अाहे. त्यानंतर जानेवारीच्या अखेरीला किंवा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत नव्या जिल्हाध्यक्षांची निवड करण्यात येणार आहे.

केंद्र व राज्यात सत्ता, मराठवाड्याच्या राजधानीचा जिल्हा, पक्षाचे अनेक मंत्री, नेतेमंडळी नेहमी शहरात येतात. त्यामुळे पक्षात वजनदार असलेले जिल्हाध्यक्षपद मिळविण्यासाठी अनेकांनी जोरदार प्रयत्न सुरू केले आहे. आपल्याच कार्यकर्त्यांच्या गळ्यात ही माळ पडावी, यासाठी पक्षातील काही बडे वजनदार नेतेही कामाला लागल्याने या निवडणुकीत गटतटाचे राजकारणही सुरू झाल्याची जोरदार चर्चा कार्यकर्त्यांमध्ये आहे.

प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचा लोकसभा मतदारसंघात जिल्ह्यातील सिल्लोड, सोयगाव, फुलंब्री, पैठण आदी तालुक्यांचा समावेश आहे. त्यामुळे पैठण तालुक्यातील कार्यकर्त्यांना ते पाठबळ देऊ शकतील, अशी चर्चा आहे. मराठवाड्यातीलच असलेले अन्य काही प्रदेश नेतेही आपल्याच कार्यकर्त्यांना न्याय मिळावा, यासाठी प्रयत्नशील आहेत. गटतटाचे राजकारण चांगलेच रंगले असले तरी त्यावर कोणीही उघडपणे बोलत नाही.

निवडणूक प्रक्रिया गतिमान करण्याचे निर्देश
शहर व जिल्हाध्यक्षपदाची निवडणुका एक महिना उशिरा होत आहे. त्यात वॉर्ड, मंडळ अध्यक्षांची निवडणुकही संथगतीने होत अाहे. निवडणुकीची प्रक्रिया अधिक गतिमान करा, असे निर्देश प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी दिल्याचे सूत्रांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

श्रेयनगरात ७३ हजारांची घरफोडी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

श्रेयनगर परिसरात घरफोडी करुन ७३ हजार रुपयांचा ऐवज लांबविणाऱ्या आरोपीला सोमवारी (चार डिसेंबर) अटक करण्यात आली. त्याला मंगळवारी कोर्टात हजर करण्यात आले असता, शुक्रवारपर्यंत (आठ जानेवारी) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी के. एच. ठोंबरे यांनी दिले आहेत.

या प्रकरणी श्रेयनगर परिसरातील डॉ. संदीप छगनराव कदम यांनी फिर्याद दिलेली आहे. फिर्यादीनुसार, फिर्यादी हा ८ जुलै २०१५ रोजी दुपारी घराला कुलूप लावून बाहेर गेला होता व सायंकाळी साडेपाच वाजता परतला असता, घराचे कुलूप तुटलेले दिसले. घरात जाऊन पाहणी केली असता, सोन्याच्या दोन अंगठ्या, मंगळसूत्र, कानातील रिंग, मोबाइल व रोख रक्कम असा एकूण ७३ हजार रुपयांचा ऐवज चोरीला गेल्याचे स्पष्ट झाले. या प्रकरणी फिर्याद दिल्यानंतर उस्मानपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला व आरोपी विजय सुभाष बिरारे (१८, रा. विष्णूनगर) याला सोमवारी अटक करण्यात आली. आरोपीला मंगळवारी कोर्टात हजर करण्यात आले असता, आरोपीकडून १५०० रुपयांचा मोबाइल जप्त करण्यात आला असला तरी दागिने व इतर मुद्देमाल जप्त करणे बाकी आहे. तसेच आरोपीचा कोणी साथीदार आहे का, आरोपीने मुद्देमाल कुठे विकला, कोणाला विकला आदी बाबींचा तपास करणे बाकी असल्याने त्याला पोलिस कोठडी देण्याची विनंती सहाय्यक सरकारी वकील बी. एम. राठोड यांनी कोर्टात केली. ही विनंती ग्राह्य धरून आरोपीला आठ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश कोर्टाने दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घरात घुसून विनयभंग

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

एकतर्फी प्रेमातून तरुणीचा विविध प्रकारे मानसिक त्रास देत तिचा छळ तसेच घरात घुसून विनयभंग करण्यात आला. तिच्यावर अॅसीड फेकून आरोपीने स्वतः आत्महत्या करण्याची देखील धमकी दिली.
सेव्हन हिल्स परिसरात हा प्रकार घडला असून जिन्सी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सेव्हनहिल परिसरातील गुरू रामदास नगर येथे मनपा शाळेजवळ २२ वर्षांची तरुणी राहते. तिचा या परिसरातील प्रेमकुमार पाटील याच्यासोबत परिचय होता. याचा गैरफायदा घेत पाटील हा नेहमी तिचा पाठलाग करून बोलण्याचा प्रयत्न करीत होता. या तरुणीने बोलणे बंद केल्यानंतर त्याने २९ ‌डिसेंबर २०१५ रोजी जबरदस्तीने तिच्या घरात शिरकाव केला. या तरुणीला, 'मी तुझ्यावर अतिशय प्रेम करतो. तू माझ्यासोबत मैत्री कर नाहीतर तुझ्या आईवडिलांना ठार मारून टाकीन तसेच तुझ्या अंगावर अॅसीड टाकून तुझे जीवन उद‍्ध्वस्त करतो व स्वतः देखील आत्महत्या करतो', अशी धमकी देत शिवीगाळ केली. सातत्याने तिच्या मोबाइलवर फोन करून धमक्या देत त्याने मॅसेजही पाठविले.
या प्रकाराला कंटाळलेल्या तरुणीने सोमवारी पोलिस ठाणे गाठून आरोपी प्रेमकुमार पाटील याच्याविरुद्ध विनयभंग केल्याप्रकरणी तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आरटीओला मिळाली करोडी, साजापुरात जागा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या जागेचा गेल्या दशकापासून सुरू असलेला शोध अखेर संपला आहे. आरटीओ कार्यालयाला करोडी, साजापूर ये‌‌थे गट नंबर २४मधील ६ हेक्टर (सुमारे ११ एकर) जागा महसूल विभागाकडून ताब्यात देण्याचे आदेश दिले आहेत. येत्या दोन दिवसांत या मोजणी करून जागेचा ताबा आरटीओ कार्यालयाकडे देण्यात येणार आहे.

औरंगाबाद आरटीओ कार्यालयात दहा लाखांवर वाहनांची नोंदणी झाली आहे. आरटीओत लर्निंग आणि पर्मनंट लायसन्स काढण्यासाठी येणाऱ्यांची संख्या वाढत आहे. याशिवाय जुन्या वाहनांची नोंदणी, रिक्षांची फेरनोंदणी आदी कामेही केली जातात. मुंबई हायकोर्टाने जड वाहने आणि वाणिज्यिक वापरासाठी असलेल्या वाहनांची ब्रेक आणि लाइट अलाइनमेंट टेस्ट घेण्यासाठी स्पेशल ट्रॅक तयार करण्याचे आदेश दिले होते. यामुळे शेंद्रा येथे वाणिज्यिक वाहनांचे टेस्ट घेण्यास सुरुवात करण्यात आली. कार्यालयात होणाऱ्या गर्दीमुळे नवीन जागेचा शोध घेण्याचे काम सुरू करण्यात आले.

औरंगाबाद आरटीओ पदाची सूत्रे स्वीकारताच सर्जेराव शेळके यांनी नवीन जागेचा शोध सुरू केला. या कामासाठी मोटार वाहन निरीक्षकाचीही विशेष नियुक्ती केली. आरटीओ कार्यालयास जागा देण्याचा ठराव करोडी ग्रामपंचायतीत मंजूर करण्यात आला होता. त्यानंतर जागेचा प्रस्ताव सादर करण्यात आला. विभागीय आयुक्त उमाकांत दांगट आणि जिल्हाधिकारी निधी पांडेय यांच्या पुढाकाराने ११ एकर जागा मिळाली आहे. येत्या दोन दिवसांत ही जागा आरटीओच्या ताब्यात देण्यात येणार आहे.

पडेगाव, वाळूजमध्ये पाहणी

आरटीओ कार्यालयाला जागा मिळविण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून प्रयत्न सुरू आहेत. तत्कालीन आरटीओ संभाजी सलामे व सहायक परिवहन अधिकारी अनिलकुमार बस्ते यांच्या कार्यकाळात पडेगाव येथे जागा घेण्याचा निर्णय झाला होता. त्यानंतर प्रभारी आरटीओ डॉ. डी. टी. पवार यांनी जागेची पाहणी करून ती जागा योगय नसल्याचा अभिप्राय दिला होता. यानंतर तत्कालीन आरटीओ गोविंद सैंदाणे यांच्या काळात वाळूज आणि कागजीपुरा येथील जागांची पाहणी करण्यात आली होती. तांत्रिक कारणांमुळे या जागांचा प्रस्ताव रद्द करण्यात आला होता.

करोडी येथील जागा ताब्यात घेऊन टेस्टिंग ट्रॅक, इमारत, कंपाउंड वॉल आदींचा प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम विभागाकडून तयार करण्यात येणार आहे. हा प्रस्ताव परिवहन विभागाकडे पाठविण्यात येईल. दोन महिन्यांत प्रायोगिक तत्त्वावर ट्रॅक तयार केला जाणार आहे.

- सर्जेराव शेळके, प्रादेशिक परिवहन अधिकारी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शेतकऱ्याची आत्महत्या; वियोगाने पत्नीचे निधन

$
0
0

उस्मानाबाद : दुष्काळ आणि कर्जबाजारीपणामुळे तरुण शेतकऱ्याने आत्महत्या केल्यानंतर, त्या धक्क्यामुळे पत्नीनेही प्राण सोडले. ही घटना मंगळवारी दुपारी कळंब तालुक्यातील कन्हेरवाडी या गावात घडली. बालाजी नारायण मीटकरी (वय २८) असे या शेतकऱ्याचे नाव असून, भाग्यश्री (वय २५) असे त्याच्या पत्नीचे नाव आहे. कर्जामुळे बालाजीने गळफास घेतला. त्याच्या मृत्यूची बातमी कळताच भाग्यश्रीला धक्का बसला आणि तासाभरातच तिचे निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुली आणि आठ महिन्यांचा मुलगा आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

इसिसविरोधात पोलिसांचा शड्डू!

$
0
0

औरंगाबाद ः इसिसच्या विरोधात सुरक्षा यंत्रणा शड्डू ठोकून मैदानात उतरली आहे. 'तरुणांनो इसिसच्या भूलथापांना बळी पडू नका,' असे कळकळीचे आवाहन करत पोलिस व दहशतवाद विरोधी पथकाने जनजागृती मोहीम सुरू केली आहे.
पुसद व नाशिक येथे इसिस या दहशतवादी ‌संघटनेच्या संशयास्पद हालचाली जाणवल्या आहेत. सोशल मीडियाद्वारे इसिस आपले जाळे तरुण वर्गात पसरवत आहेत. पुसद येथे २५ सप्टेंबर रोजी अब्दुल मलिकने पोलिसांवर हल्ला केला होता. त्याच्या चौकशीत ऑनलाइन चॅटिंगमधून जहाला व्हिडिओ दाखवून तरुणांना चिथावण्याचे काम करीत असल्याचे समोर आले आहे. या घटनेनंतर गुप्तचर यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. तरुणांनी कट्टरवादाकडे वळू नये, यासाठी दहशतवाद विरोधी पथकाने जनजागृती मोहीम सुरू केली आहे. मराठवाड्यात दहशतवादी संघटनांचे स्लीपरसेल कार्यरत आहेत. याची अनेक उदाहरणे गेल्या काही वर्षांत ठळकपणे समोर आली. या अनुषंगाने गुप्तचर यंत्रणा, दहशतवाद विरोधी पथक व स्थानिक पोलिस यंत्रणांनी सुरक्षिततेची पावले उचलली आहेत. दहशतवादी संघटनांच्या स्लिपरसेलवर करडी नजर ठेवली आहे, अशी माहिती एटीएसच्या सूत्रांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लॅपटॉप पळविणारे उच्चशिक्षित गजाआड

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मौजमजेसाठी लॅपटॉप पळविणाऱ्या दोन उच्चशिक्षित तरुणांना मुकुंदवाडी पोलिसांनी अटक केली. गारखेडा परिसरातून २५ नोव्हेंबर २०१५ रोजी त्यांनी दुकान फोडून हे लॅपटॉप लंपास केले होते. मुकुंदवाडी पोलिसांना या कामानिमित्त २५ हजारांचे पारितोषिक देण्यात आले.

गारखेडा परिसरातील आदिनाथनगर मिश्री अपार्टमेंट येथील नितीन उमाकांत उदगीरकर यांचे डाटा सेंटर चोरट्यांनी फोडले होते. यामध्ये पाच लॅपटॉप व स्कॅनर चोरट्यांनी पळविले होते. याप्रकरणी मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या चोरीमागे चेतन बाळासाहेब वाघ (वय २२) व रवींद्र चांगदेव डमाळे (वय २५ दोघे रा. धोंदलगाव, ता. वैजापूर) याचा हात असल्याची माहिती खबऱ्याने दिली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी दोघांना अटक केली. त्यांनी या गुन्ह्याची कबुली देत मुद्देमाल पोलिसांच्या स्वाधीन केला. ही कामगिरी पोलिस निरीक्षक नाथा जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय कल्याण शेळके, प्रकाश सोनवणे, विष्णू हागवणे यांनी केली. त्यांच्या या प्रसंशनीय कामगिरीबद्दल पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी २५ हजाराचे बक्षिस जाहीर केले.

उच्चशिक्षित आरोपी

अटक करण्यात आलेले दोन्ही आरोपी उच्च शिक्षित आहेत. चेतन वाघ हा याने संगणक अभियंत्याची पदवी घेतली आहे तर रवींद्र डमाळे याचे एमएस्सी, बी. एड पर्यंत शिक्षण झाले आहे. मौजमजेसाठी त्यांनी या चोऱ्या केल्याची कबुली दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मराठवाड्याला ११५६ कोटी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

अत्यल्प पर्जन्यमानामुळे मराठवाड्यात यंदाही खरीप हंगाम वाया गेला. दुष्काळाच्या खाईत सापडलेल्या मराठवाड्यातील शेतकऱ्यांना शासनाकडून मदतीचा ११५६ कोटी ३८ लाख रुपयांचा पहिला टप्प्यातील निधी प्राप्त झाला असून, ही रक्कम आठवडाभरात शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे.

राज्याच्या विविध भागातील १५ हजार ७४७ गावांमध्ये खरीप हंगामामध्ये अपुऱ्या पावसामुळे सर्व पिकांचे नुकसान झाले. अवर्षणामुळे बाधित शेतकऱ्यांसाठी ३ हजार ५७८ कोटी ४३ लाख रुपयांची गरज आहे. त्यापैकी २ हजार कोटी रुपये सरकारने दिले आहेत. मराठवाड्याती शेतकऱ्यांना भरपाई देण्यासाठी २ हजार ६९ कोटी रुपयांची गरज आहे. त्यापैकी १ हजार १५६ कोटी ३८ लाख रुपये देण्यात आले आहेत. सरकारने दिलेल्या २ हजार कोटी रुपयापैकी सर्वाधि‌क निधी मराठवाड्याला मिळाला आहे.

कापूस, फळबागांसाठी मदत

मराठवाड्यातील सुमारे १५ लाख हेक्टर क्षेत्रावर कापसाची आणि सुमारे १७ लाख हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनची लागवड करण्यात आली होती. राज्य शासनाकडून केंद्राकडे प्रस्ताव सादर झाला त्यावेळी सुधारित पैसेवारी जाहीर करण्यात आली होती. अंतिम पैसेवारी १५ डिसेंबरला जाहीर करण्यात आली. कापसाच्या कापणी प्रयोग अहवाल प्राप्त झाला नसल्याने कापसाला पिकाला अनुदानातून वगळण्यात आले आहे. त्याचबरोबर पावसाअभावी जळालेल्या फळबागांचे पंचनामे करावे लागणार आहेत. त्यामुळे कापूस, फळबागांसाठी स्वतंत्र आदेश काढण्यात येणार आहेत.

मदतवाटप वर्णमालेनुसार

आठही जिल्ह्यांसाठी प्राप्त झालेला ११५६ कोटी ३८ लाखाचा निधी 'ए टू झेड' या क्रमाने वाटप करण्यात येणार आहे. बँक खाते नसलेल्या शेतकऱ्यांचे खाते सुरू करण्यात येणार आहेत. त्यानंतर त्यांच्या खात्यात मदत जमा होईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पित्याची आत्महत्या पुत्राने थांबविली

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, उस्मानाबाद

उस्मानाबाद तालुक्यातील एका शेतकऱ्यासाठी त्याचा सातवीतील मुलगा जीवनदाता म्हणून पुढे आला. या छोट्या मुलाने आपल्या वडिलांचा गळफास सोडविला आणि त्यांचे प्राण वाचविले. ही घटना मोहतरवाडी येथे घडली असून, पोलिसांचा ससेमिरा लागण्याच्या भीतीने १९ डिसेंबर रोजी घडलेल्या या घटनेची वाच्यता करण्यात आली नव्हती. तानाजी किसन भागुडे असे या शेतकऱ्याचे नाव आहे. त्यांच्यावर जिल्हा बँकेचे ५० हजारांचे कर्ज आहे. मुलीच्या लग्नासाठी तानाजी यांनी एक लाख रुपये उसने घेतले होते. कर्जामुळे निराश झालेल्या तानाजी यांनी शेताजवळील लिंबाच्या झाडाला गळफास घेतला. यावेळी त्यांचा मुलगा विशाल सरपण गोळा करण्यासाठी शेतामध्ये गेला होता. गळफास लागल्यानंतर तानाजी मदतीसाठी ओरडले. त्यांचा आवाज ऐकूून विशालने त्यांच्याकडे धाव घेतली. तातडीने झाडावर चढून दोर सोडविला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images