Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

आयुक्तांच्या आदेशाने‘समांतर’ संशयकल्लोळ

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
'समांतर जलवाहनी योजनेअंतर्गत पैठण ते नक्षत्रवाडीपर्यंत मुख्य जलवाहिनी टाकण्याचे काम गतीने पूर्ण करा,' असे निर्देश महापालिका आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी दिल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे समांतर जलवाहिनीच्या कंपनीला दिलेल्या नोटीसचे काय होणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
समांतर जलवाहनीच्या कामाचा आढावा घेण्यासाठी सुनील केंद्रेकर यांच्या उपस्थितीत बुधवारी बैठक झाली. बैठकीला महापालिकेचे अधिकारी, औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटीचे अधिकारी उपस्थित होते. दरमहिन्याच्या दुसऱ्या बुधवारी समांतर जलवाहिनीच्या कामाचा आढावा घेण्यासाठी बैठक होत असते, त्याचाच एक भाग म्हणून ही बैठक झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. जायकवाडी ते नक्षत्रवाडी दरम्यान २००० मिलिमीटर व्यासाचे पाइप टाकण्याचे काम सुरू असल्याची माहिती यावेळी केंद्रेकर यांना देण्यात आली. जलवाहिनी टाकण्याचे काम वेगाने पूर्ण करण्याचे निर्देश केंद्रेकर यांनी पालिका व कंपनीच्या अधिकाऱ्यांना दिले. अन्यही बाबींचा आढावा यावेळी घेण्यात आला. पालिका आयुक्तांनीच जलवाहिनी टाकण्याच्या कामाला गती देण्याचे निर्देश दिल्यामुळे औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटी कंपनीला बजावण्यात आलेल्या नोटीसचे काय होणार, असा प्रश्न आता निर्माण झाला आहे. पालिका आयुक्तांनी कंपनीला अभय दिले का, की राजकीय दबावाखाली आयुक्तांना हे निर्देश द्यावे लागले, अशी चर्चा पालिकेच्या वर्तुळात सुरू झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पायाभूत चाचणीला बगल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
पहिल्याच पायाभूत चाचणी परीक्षेत गोंधळात पडलेल्या शिक्षण विभागाने दुसऱ्या चाचणीला बगल देत थेट तिसरी चाचणी परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे. दिवाळीनंतर दुसरी चाचणी परीक्षा घेतली जाईल, असे सांगण्यात आले होते, परंतु हे शक्य न झाल्याने आता बदल करण्यात आला आहे. तिसरी पायाभूत चाचणी परीक्षा एप्रिलमध्ये घेण्याचे निश्चित करण्यात आली आहे.

शालेय विद्यार्थ्यांची गुणवत्ता तपासणीसाठी शाळांमध्ये पायाभूत चाचणी परीक्षा घेण्याचे शासनाने जाहीर केले. वर्षभरात राज्यातील विविध शाळांमध्ये दुसरी ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या तीन पायाभूत चाचणी घेण्यात येणार होत्या. सुरुवातीपासून वेळापत्रक आणि गोंधळात अडकलेल्या या प्रक्रियेतील पहिली चाचणी परीक्षेचा गोंधळ नोव्हेंबर अखेरपर्यंत चालला. पहिली चाचणीनंतर दुसरी दिवाळीनंतर घेतली जाईल आणि तिसरी शैक्षणिक वर्ष संपताना घेतली जाईल असे वेळापत्रक शासनाने ठरविले होते, परंतु पहिल्याच परीक्षेचे नियोजन हुकल्याने आता थेट दुसऱ्या चाचणीला बगल देत थेट तिसरी पायाभूत चाचणी परीक्षा घेतली जाणार आहे. शिक्षण विभागातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार; दुसरी चाचणी परीक्षा शाळांनीच घ्याव्यात अशा सूचना दिल्या आहेत, मात्र त्याचेही नियोजन किंवा वेळापत्रक तयार करण्यात आलेले नाही.

मार्च-एप्रिल संभ्रमच
तिसरी पायाभूत चाचणी एप्रिलमध्ये घेण्याच्या हालचाली शिक्षण विभागात सुरू आहेत. दहावी-बारावीच्या परीक्षा विचारात घेऊन चाचणीचे नियोजन करण्यात येणार आहे. ही चाचणी मार्चमध्ये होणार की एप्रिलमध्ये असा संभ्रम शाळांमध्ये आहे. शासनाने निश्चित वेळापत्रक जाहीर केलेले नसल्याने शाळा आणि विद्यार्थ्यांच्या अडचणीत भर पडणार आहे.

निकालही कागदावर
पायाभूत चाचणी परीक्षेचा चाचणीनिहाय निकाल शिक्षण विभाग जाहीर करणार होता. पहिल्या चाचणी परीक्षेनंतर हा निकाल अपे‌क्षित होता, परंतु नवीन वर्ष उजाडले तरी निकाल जाहीर करण्यात विभागाला यश आलेले नाही. निकालाची सरासरी काढून विषयनिहाय, शाळा, तालुका, जिल्हानिहाय निकाल जाहीर करण्यात येणार होता. राज्यातील अनेक शाळांच्या नोंदीच नसल्याचे ‌अधिकारी सूत्रांनी सांगितले. शिक्षण विभागाच्या गलथान कारभारामुळे पायाभूत चाचणी परीक्षा अडचणीत सापडली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आयुक्तांनी उगारली खर्च कपातीची छडी!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
महापालिकेची दिवसेंदिवस आटणारी गंगाजळी, वाढणारा खर्च यांचा ताळमेळ बसविण्यासाठी आयुक्त सुनील केंद्रेकर सरसावले आहेत. त्यांनी
पालिकेच्या प्रशासकीय खर्चात कपात करण्याचे ठरविले आहे. त्यानुसार नवीन गाडी खरेदीसह विविध प्रकारच्या खर्चावर निर्बंध लावण्यात आले आहेत.
कर वसलीचे काम प्रभावीपणे होत नसल्यामुळे पालिकेच्या तिजोरीची स्थिती बिकट झाली आहे. त्याचा परिणाम शहरातील विकास कामांवर होऊ लागला आहे. असे असले तरी प्रशासकीय खर्च मात्र मुक्तपणे केला जात होता. महागड्या गाड्याची अधिकाऱ्यांची हौस कायमच आहे. विविध प्रशिक्षण आणि बैठकांच्या निमित्याने अधिकाऱ्यांचा हवाई प्रवास सुरू होता. या खर्चाला आता केंद्रेकरांनी कात्री लावली आहे. एका वरिष्ठ अधिकाऱ्यासाठी 'एसयूव्ही' ही महागडी गाडी खरेदी करण्याचा प्रस्ताव होता. केंद्रेकरांनी हा प्रस्ताव रद्द केला. नवीन गाडी खरेदी करण्याची गरज नाही. पालिकेच्या आयुक्तांची गाडी रिकामीच आहे, ज्या कोण्या अधिकाऱ्याला गाडीची फारच गरज आहे, त्याने ती वापरावी असे त्यांनी सुनावले आहे. बैठका, प्रशिक्षणाच्या नावाखाली अनेक वरिष्ठ अधिकारी हवाई सफर करीत होते. दर महिन्यात या सफरींचा खर्च लाखोंच्या घरात जात होता. केंद्रेकरांनी या सफरींना देखील लगाम लावला आहे. अत्यावश्यक काम असेल तरच प्रवासाला मान्यता देऊ, असे बजावले आहे. प्राणिसंग्रहालयात वाघ, सिंह, हत्ती आदी प्राण्यांचे चित्र असलेले फ्लेक्स लावण्याचा प्रस्ताव केंद्रेकर यांच्याकडे देण्यात आला होता. त्यासाठी किमान तीन लाख रुपयांचा खर्च अपेक्षित होता. हा खर्च वाचवण्यासाठी केंद्रेकर यांनी मार्ग काढला. फ्लेक्स लावण्याची गरज नाही. शाळांमधील चित्रकला शिक्षकांची मदत घ्या, त्यांच्याकडून वन्य प्राण्यांची चित्रे काढून घ्या व ती प्राणिसंग्रहालयात लावा, अशी सूचना त्यांनी केली.
अन् ७ कोटी वाचले
सिडको - हडको भागात खासगीकरणातून औषधींची फवारणी केली जात होती. त्यासाठी वर्षाला सात कोटी रुपये खर्च केले जात होते. खासगीकरणातून केली जाणारी फवारणी केंद्रेकरांनी बंद केली. पालिकेतील मलेरिया विभागातील कर्मचाऱ्यांकडून फवारणीचे काम करा, असे आदेश दिले. त्यामुळे सात कोटी रुपये वाचणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘विज्ञानवादी बना; तटस्थ पत्रकारिता करा’

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
'आपण जातीवादी, धर्मवादी, लिंगवादी आणि दैववादी आहोत. आपण विज्ञान केवळ अंगावर बाळगतो, पण मेंदूने नाही. त्यामुळे आपण विज्ञानवादी बनावे. सगळे वाद विसरून तटस्थ पत्रकारिता करावी,' असे आवाहन ख्यातनाम लेखक राजन खान यांनी केले. ते बुधवारी दर्पण दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील जनसंवाद व वृत्तपत्रविद्या विभाग व एमजीएम कॉलेज ऑफ जर्नलिजम यांच्या संयुक्त विद्यमाने एमजीएममधील आइनस्टाइन हॉलमध्ये हा कार्यक्रम झाला. आपण माणूस होऊन शिकणे आणि दुसऱ्याचे ऐकून घेणे ही आयुष्याची तपश्चर्या आहे. दर्पण नको प्रतिबिंब हवे, असा संदेश देऊन कार्यक्रमाला सुरुवात झाली. यावेळी ज्येष्ट पत्रकार सुधीर महाजन, ज्येष्ठ साहित्यिक रा. रं. बोराडे यांची उपस्थिती होती. खान म्हणाले, 'आपली स्पर्धा पोटाशी नाही, मेंदुशी ठेवा. शिका, मोठे व्हा. ढेकळामध्ये काय ठेवले आहे. साहित्य आणि पत्रकारिता ही निर्भिडपणे केली पाहिजे,' असे आवाहन खान यांनी केले. पत्रकारिता आणि साहित्य या विषयावर सुधीर महाजन यांनी विचार मांडले. ते म्हणाले, 'वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या बातम्यांमुळे अनेक पुस्तके, नाटक, चित्रपट यासारख्या साहित्य कृती तयार आहेत. त्यामुळे पत्रकारिता आणि साहित्य यांचा
मोठा संबंध आहे.' प्राचार्य रेखा शेळके यांनी प्रास्ताविक केले. वि. ल. धारूरकर यांनी कार्यक्रमाचा समारोप केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाणी वापर संस्थाध्यक्षांचीउद्यापासून औरंगाबादेत परिषद

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
महाराष्ट्रासह पाच राज्यातील पाणी वापर संस्थांच्या अध्यक्षांची दोन दिवसीय राष्ट्रीय परिषद शुक्रवारपासून औरंगाबादेत होणार आहे. यामध्ये ५०० हून अधिक प्रतिनिधी उपस्थिती राहण्याचा अंदाज आहे.
जल व भूमी व्यवस्थापन संस्थेमध्ये (वाल्मी) शुक्रवारी या परिषदेची सुरुवात होईल. 'सहभागी सिंचन व्यवस्थापन' हा परिषदेचा मुख्य विषय आहे. महाराष्ट्र, गुजरात, मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि गोवा या राज्यातून ५०० हून अधिक प्रतिनिधी या परिषदेसाठी येणार आहेत. दोन दिवसांत विविध सत्रांमधून तज्ज्ञांचे मार्गदर्शन या प्रतिनिधींना होणार आहे. देशपातळीवरील ही दुसरी परिषद आहे. पंजाबमध्ये पहिली परिषद झाली होती. त्यावेळी उत्तरेकडील राज्ये सहभागी झाले होते. औरंगाबादेतील वाल्मीमध्ये होणाऱ्या परिषदेच्या समारोपासाठी केंद्रीय जलसंपदामंत्री उमा भारती या उपस्थित राहणार आहेत. उमा भारती शनिवारी सकाळी औरंगाबादेत दाखल होणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पूर्णत्व प्रमाणपत्रासाठी बिल्डरांना अल्टिमेटम

$
0
0


औरंगाबाद : 'पूर्णत्वाचे प्रमाणपत्र दोन महिन्यात घ्या, अन्यथा तुमच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल,' असा इशारा महापालिकेचे आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी बिल्डरांना दिला आहे.
बिल्डरांनी विकसित केलेल्या गृहनिर्माण योजनांचे पूर्णत्वाचे प्रमाणपत्र घ्यावे, असे परिपरत्र नगररचना विभागाने तीन महिन्यांपूर्वी काढले होते. त्यासाठी पंधरा दिवसांची मुदत दिली होती. प्रमाणपत्र न घेतल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा दिला होता, पण हा इशारा हवेतच विरला. त्यानंतर दोन दिवसांपूर्वी सुनील केंद्रेकर यांनी बिल्डर संघटनेची बैठक घेऊन त्यांना निर्वाणीचा इशारा दिला. बिल्डरांनी विकसित केलेल्या गृहनिर्माण योजना आणि अपार्टमेंटचे पूर्णत्वाचे प्रमाणपत्र सर्व बिल्डरांनी नगररचना विभागातून येत्या दोन महिन्यात घ्यावे, अशी डेडलाइन केंद्रकर यांनी दिली आहे. बिल्डरांनीच दोन महिन्यांचा वेळ मागून घेतला आहे, असे केंद्रेकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. दोन महिन्यांत जे बिल्डर त्यांच्या योजनांचे पूर्णत्वाचे प्रमाणपत्र महापालिकेतून घेणार नाहीत, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. 'प्रत्येक बिल्डरने त्याने विकसित केलेल्या योजनेत किंवा अपार्टमेंटमध्ये ओला - सुका कचरा वेगवेगळा करण्याचे नियोजन त्यांनी करावे. ओल्या कचऱ्यापासून खत निर्मितीचा प्रकल्प सुरू करावा, हा उपक्रम सुरू केल्याशिवाय पूर्णत्वाचे प्रमाणपत्र मिळणार नाही असे बिल्डरांच्या संघटनेला सांगण्यात आले आहे,' असे केंद्रेकर म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘कचरामुक्ती वॉर्डात महिलांची भूमिका मोलाची’

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
'आपला वॉर्ड स्वच्छ व कचरामुक्त ठेवण्याची जबाबदारी आपलीच आहे. फक्त योग्य प्रकारे घनकचरा व्यवस्थापन केले, तर स्वच्छता कर्मचाऱ्यांना मदत होईल. या कामात महिलाच उत्तम कामगिरी करू शकतात,' असे आवाहन सिव्हिक रिस्पॉन्स टीमच्या स्वाती स्मार्त यांनी केले.
झिरो गार्बेज वॉर्ड अर्थात कचरामुक्त वॉर्डसाठी पालिकेने आवाहन केल्यावर शहरातील ११३ वॉर्डांपैकी ११ वॉर्डांनी या उपक्रमासाठी प्रतिसाद दिला. जास्तीत जास्त घनकचरा हा वॉर्डातच रिचवून खतनिर्मिती व्हावी व केवळ १५ टक्के कचऱ्याच्या विघटनाची जबाबदारी पालिकेकडे असावी, या अनुषंगाने या वॉर्डांमध्ये काम सुरू आहे. या ११ वॉर्डांमध्ये नंदनवन कॉलनी, भावसिंगपुरा, एकतानगर, चेतनानगर, गणेशनगर, एन-८, गुलमोहर कॉलनी, अल्तमश कॉलनी, नेहरुनगर, नागेश्वरवाडी, राजाबाजार, एन ३, एन ४, विठ्ठलनगर, वेदांतनगर, प्रतापनगर यांचा समावेश आहे. या अनुषंगाने आपापल्या वॉर्डातील नागरिकांना घनकचरा व्यवस्थापनाविषयी नगरसेवक नागरिकांमध्ये जनजागृती करत आहेत. नागेश्वरवाडीमध्ये नगरसेविका कीर्ती शिंदे यांनी घनकचरा व्यवस्थापनाविषयी जनजागृती करण्यास सुरुवात केली.
सिव्हिक रिस्पॉन्स टीमच्या सदस्यांसह त्यांनी नागेश्वरवाडी, गवळी वाडा, उदय कॉलनी, पारधीपुरा मिल कॉर्नर परिसरातील महिलांना याची माहिती दिली. वॉर्डात जागोजागी कचरा विभाजनाचे स्टीकर्स लावले. सिव्हिक रिस्पॉन्स टीमच्या स्वाती स्मार्त यांनी कचऱ्याचे विभाजन, कचरा संकलनाच्या योग्य पद्धतीविषयी महिलांना सविस्तर माहिती दिली. प्लॅस्टिकला पर्याय म्हणून कापडी पिशव्यांचा वापर व कंपोस्ट खतनिर्मितीच्या पद्धती सांगून घरोघरी खतनिर्मिती कशी करता येतील याच्या टीप्स दिल्या. यावेळी टीमच्या किरण काळे, मीना झाल्टे यांच्यासह सरस्वती हारकळ यांची उपस्थिती होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महिला व्यापार मेळाव्याचे आयोजन

$
0
0


औरंगाबाद : जागृती महिला बहुउद्देशीय संस्थेच्या जागृती मंच एनजीओने ८ ते १० जानेवारी दरम्यान महिला जागृती व्यापार मेळाव्याचे आयोजन केले आहे. उस्मानपुऱ्यातील कलश मंगल कार्यालयात होणाऱ्या या मेळाव्याचे उद‍्घाटन युवा उद्योजक मेनका देशपांडे करतील.
गृहिणींना व नागरिकांना एकाच व्यासपीठाखाली गृहउद्योगाच्या वस्तू सहज उपलब्ध व्हाव्यात व महिला लघुउद्योजकांनाही व्यासपीठ मिळावे यासाठी हा मेळावा घेण्यात येतो. मेळाव्यात लोणचे, तयार फराळ, चटण्या, मसाले, कपडे, ज्वेलरी, सौंदर्यप्रसाधने आदींचे ७० स्टॉल असणार आहेत. सिल्लोड, परभणी, हिंगोली, घाटनांद्रा, बीड आदी ठिकाणांहून महिला लघुउद्योजिका मेळाव्यात येणार आहेत, अशी माहिती जागृती मंचच्या अध्यक्ष भारती भांडेकर यांनी दिली. याच मेळाव्यात जागृती मंचची माहिती देणारा जागृतीच्या पाऊलखुणा हे प्रदर्शन भरविण्यात येणार आहे. ८ जानेवारीला सकाळी ११ वाजता मेळाव्याचे उदघाटन होईल. मंचच्या नेहा गुंडेवार, अंजली कुलकर्णी व मृणालिनी फुलगीरकर यासाठी काम पाहत आहेत. सकाळी १० ते रात्री १० या वेळेत मेळाव्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन भारती भांडेकर यांनी केले आहे. यावेळी सचिव सविता कुलकर्णी, अॅड. अंजली कुलकर्णी, अर्चना वैद्य, भारती पवार, माधुरी कोरान्ने, संजीवनी आवलगावकर, रंजना तुळशी आदींची उपस्थिती होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


प्रवेश प्रक्रिया ऑनलाइनच हवी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
आगामी शैक्षणिक वर्षापासून पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया ऑनलाइनच होणार आहे. विद्यापीठ व अंतर्गत कॉलेजांमधील पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया ऑनलाइनच हवी. त्यासाठी तात्काळ सुधारणा करा, असे स्पष्ट निर्देश विद्यापीठ अनुदान आयोगाने विद्यापीठांना दिले आहेत.

यूजीसीने पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेबाबत ऑनलाइन प्रक्रियेवर भर देण्याच्या सूचना केल्या आहेत. विद्यापीठांनी अंतर्गत सर्व कॉलेजांमधील प्रवेशाची प्रक्रिया ऑनलाइन करण्याबाबत सुधारणा कराव्यात, तशा प्रकारची व्यवस्था उभी करावी, असे निर्देश देण्यात आले आहे. याबाबतचे पत्र विद्यापीठांना पाठविण्यात आले आहे. ऑनलाइनमुळे प्रवेश प्रक्रियेत पारदर्शकता; तसेच कॉलेजांची क्षमताही समोर येईल, असे पत्रात नमूद केले आहे.

देशपातळीवर याबाबत एकसूत्रता यावी, या हेतूने जानेवारीत देशभरातील सर्व विद्यापीठांसाठी बैठकही घेतली जाणार आहेत. त्यात प्रवेशाची स्थिती, ऑनलाइन प्रवेशासाठी काय पावले उचलावीत याबाबतचा आढावा घेतला जाणार आहे. अनेक विद्यापीठांमध्ये पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी ऑनलाइन प्रवेशाची प्रक्रिया घेण्यात येते, परंतु ग्रामीण भागातील अनेक कॉलेजांकडे तशा प्रकारची यंत्रणा नसल्याने प्रवेशासाठी ऑफलाइन प्रक्रियेशिवाय पर्याय नसतो.

ऑनलाइन, ऑफलाइन
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील विभाग व कॉलेजांमधील प्रवेशाची प्रक्रिया ऑनलाइन केली जाते, परंतु त्यातही मोठी तफावत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार; ४२४ कॉलेजांपैकी केवळ ३१० कॉलेजच ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत सहभागी आहेत.

गैरप्रकारांना आळा
ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेमुळे पारदर्शकता येईल आणि अनेक गैरप्रकारांना आळा बसेल असे बोलले जात आहे. कॉलेजामधील प्रवेश संख्या, अभ्यासक्रम, शिक्षकांची संख्या, सोयीसुविधांची माहितीही विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध होईल. ज्यामुळे विद्यार्थ्यांना प्रवेश घेणे सोपे होणार आहे.

ऑनलाइन पद्धतीमुळे प्रवेश प्रक्रियेत पारदर्शकता येईल. विद्यार्थी, पालकांना कॉलेजांची प्रवेश क्षमता, त्यांच्या पायाभूत सुविधा पाहता येतील व त्यानुसार प्रवेशाबाबत निर्णय घेणे सोपे होणार आहे.
- डॉ. के. व्ही. काळे, बीसीयूडी,
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कॅम्पस इंटरव्ह्यूमध्ये २३ विद्यार्थ्यांची निवड

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
एमआयटी ट्रेनिंग व प्लेसमेंट विभागातर्फे पॉलिटेक्निकच्या मेकॅनिकल इंजिनीअरिंग शाखेतील विद्यार्थ्यांसाठी टाटा मोटर्सतर्फे पूल कॅम्पस इंटरव्ह्यूचे आयोजन करण्यात आले होते. यातून २३ विद्यार्थ्यांची निवड झाली.

पूल कॅम्पस इंटरव्ह्यूमध्ये विभागातील ११ पॉलिटेक्निकच्या एकूण २२३ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. मेकॅनिकल शाखेतील विद्यार्थ्यांसाठी या मुलाखतीचे आयोजन करण्यात आले होते.

सहभागी विद्यार्थ्यांची प्रारंभी लेखी परीक्षा घेण्यात आली. परीक्षेनंतर वैयक्तिक मुलाखतची प्रक्रिया झाली. यातून २३ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. विद्यार्थ्यांना प्राचार्य सुनील देशमुख, उपप्राचार्य मकरंद वैष्णव, ट्रेनिंग व प्लेसमेंट, प्रा. शशिकांत माकणीकर यांनी इंटरव्ह्यूसाठी मार्गदर्शन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चार्ली जवानाच्या सतर्कतेने दुचाकी चोर गजाआड

$
0
0

औरंगाबाद : चार्लीच्या सतर्कतेने दुचाकी चोरणारा आरोपी पोलिसांच्या जाळ्यात सापडला. बुधवारी पहाटे एन-३ भागात हा प्रकार घडला. मुकुंदवाडीचे चार्ली पथकाचे जवान शाम आडे व भालेराव हे बुधवारी पहाटे एन-३ भागातील उपमहापौर प्रमोद राठोड यांच्या बंगल्याजवळ गस्त घालीत होते. यावेळी त्यांना दुचाकीवर एक तरूण संशयास्पद अवस्थेत फिरत असल्याचे आढळले. त्याला पकडून त्याची चौकशी केली असता तो दुचाकीचोर असल्याचे निष्पन्न झाले. चार्ली पथकाने संशयित दुचाकीचोर आरोपी ज्ञानेश्वर रामराव नागरे (वय २३ रा. जिजाऊनगर, रिसोड जि. वाशीम) याला पकडून ठेवत नियंत्रण कक्षाला ही माहिती दिली. नियंत्रण कक्षाने पीसीआर मोबाइल क्रमांक दोनला हा प्रकार कळवित घटनास्थळी जाण्याचे आदेश दिले. पीसीआर मोबाइलचे कर्मचारी वसंत जिवडे, पठाण, रामकर, सत्नासे आदींनी आरोपीला अटक करून मुकुंदवाडी पोलिसांच्या स्वाधीन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

किरकोळ कारणावरून पत्नीला पेटवून ठार मारण्याचा प्रयत्न

$
0
0

औरंगाबाद : हप्ते भरण्यासाठी दागिने गहाण ठेवल्याप्रकरणी विवाहितेच्या पतीने पेट्रोल टाकून पेटवून देत खुनाचा प्रयत्न केला. सोमवारी रात्री अकरा वाजता जुना मोंढा भागात हा प्रकार घडला. या प्रकरणी जिन्सी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्षशिलानगर जुना मोंढा येथे जया सुनील मिसाळ (वय २५) ही विवाहिता पतीसोबत राहते. जयाबाईला बचत गटाचे हप्ते भरायचे होते. या कारणास्तव तिने तिच्या भावजयीकडून कर्णफुले आणून ती सोनाराकडे सहा हजारात रुपयांत गहाण ठेवली होती. सोमवारी रात्री अकरा वाजता तिचा पती सुनील बबन मिसाळ याने या कारणावरून तिच्याशी वाद घातला. 'तू मला का सांगितले नाही', या कारणावरून त्याने तिला शिवीगाळ केली. सोबत आणलेल्या प्लॅस्टिकच्या बाटलीतील पेट्रोल जयाबाईच्या अंगावर टाकून देत त्याने पेटवून देत ठार मारण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी जयाबाई यांनी पोलिसात दिलेल्या तक्रारीवरून आरोपी पती सुनीलविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चार आरोपींचा जामीन कोर्टाने फेटाळला

$
0
0

औरंगाबाद : मिसारवाडी येथील अल्पवयीन विवाहिता अत्याचारप्रकरणी पैशांच्या देवाण-घेवाणीमध्ये सहभाग असलेल्या चौघा आरोपींचा नियमित जामीन विशेष न्यायाधीश यु. एल. तेलगावकर यांनी फेटाळला.

या प्रकरणी अल्पवयीन पीडित विवाहितेने सिडको पोलिस ठाण्यामध्ये फिर्याद दिलेली आहे. त्यानुसार पोलिसांनी तपास करून आरोपी सुवर्णा शकुंतला वंजारे (३५. रा. मुकुंदवाडी), सुरेखा गणेश बावणे (३0, रा. संभाजी कॉलनी), आशा रामेश्वर सोनवणे (४०, रा. रामनगर), छाया रवी जाधव (३५, रा. प्रकाशनगर) यांच्यासह धुराजी सूर्यनारायण, रघुनाथ मानधने यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. यापैकी धुराजी सूर्यनारायण व रघुनाथ मानधने या दोघांना अद्याप अटक करण्यात आलेली नाही. या आरोपींनी पीडितेला ९५ हजारांना विकले होते. त्यामध्ये सुवर्णाने ७५०० रुपये, धुराजीने ५००० रुपये, छायाने ७५०० रुपये, विठ्ठल ४०,००० रुपये, सुरेखा ७५०० रुपये, आशा ७५०० रुपये, मानधणे १५,००० रुपये अशा प्रकारे पैसे वाटून घेतले होते. आरोपींविरूद्ध भादंवि कलम ३७० (४), बालकांचे संरक्षण कायदा, बाल गुन्हे कायदा, बाल विवाह प्रतिबंधक कायदा कलम ९, १०, ११ अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले. या चौघा आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. तपासात अल्पवयीन मुलीची विक्री झाल्याचे, तसेच तिचे लग्न लावून दिल्याचेही सिद्ध झाले आहे. चौघा महिला आरोपींनी नियमित जामीनासाठी अर्ज केला होता. त्यांच्या अर्जावर विशेष न्यायाधीश तेलगावकर यांच्या कोर्टात सुनावणी झाली असता, जिल्हा सरकारी वकील एस. एम. नवले यांनी कोर्टाच्या निदर्शनास आणून दिले की, आरोपींविरूद्ध बाल विवाह प्रतिबंधक कायदा, पोस्को कायद्यान्वये गुन्हे दाखल आहेत. या प्रकरणात आरोपींनी पैशाचा व्यवहार केला आहे. प्रकरणाचा तपास सुरू असल्यामुळे आरोपींना जामीन देऊ नये, अशी विनंती त्यांनी कोर्टात केली. ही विनंती ग्राह्य धरून चौघा आरोपींचा जामीन अर्ज कोर्टाने फेटाळला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तपासणी फक्त आठवडाभरच

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

वर्षभर जिल्ह्यात अवैध मार्गाने गौणखनीज तसेच वाळुच्या प्रचंड उपशाकडे डोळेझाक करत असलेल्या प्रशासनाकडून गुरुवारपासून (७ जानेवारी) गौणखनीज वाहतुकीची तपासणी मोहीम सुरू करण्यात येणार आहे.

महसूल, पोलिस आणि आरटीओ यांच्या संयुक्त माध्यमातून आठवडाभर ही तपासणी मोहीम राबविण्यात येणार आहे. ग्रामीण भगातून होणाऱ्या या चोरट्या वाहतुकीच्या तपासणीसाठी शहरात विविध स्थळे निश्चित करण्यात आली आहेत. रात्रीही ही कारवाई सुरू राहणार आहे. जिल्ह्यात वाळूपट्ट्यांचा लिलाव झाला नसतानाही वाळूमाफिया चोरट्या मार्गाने वाळूची वाहतूक करतात. शहर परिसरात सर्रास वाळुची वाहतूक व विक्री होताना दिसते तसेच शहराच्या विविध ठिकाणी वाळुचे अवैध साठे तयार करून प्रशासनासमोर या वाळुची विक्री करण्यात येते. अनेकदा या साठेबाजांविरुद्ध थातूरमातूर कारवाई करण्यात येते. मात्र, आता या कारवाईसाठी संयुक्तपणे मोहीम राबविण्यात येणार आहे. सायंकाळी ७ ते सकाळी ७ वाजेपर्यंत शहरा बाहेरच्या प्रत्येक नाक्यांवर तपासणी होणार आहे.

या ठिकाणी तपासणी

महानुभाव आश्रम जवळील चौकी, बीड रोडवरील जुना महापालिकेचा नाका, हर्सूल गावाजवळ जुना महापालिकेचा नाका, केंब्रीज शाळेजवळील चौक, नगर नाका तसेच नाशिक रस्त्यावरही एक तपासणी पथक राहणार आहे. वाळूज परिसरातून येणारी वाहतुकीसाठीही एक पथक तैनात करण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अपघातात जखमी तरुणाचा मृत्यू

$
0
0

औरंगाबाद : कारच्या धडकेत गंभीर झालेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. सोमवारी रात्री पावणेअकरा वाजता पडेगाव येथे बगिचा हॉटेलसमोर हा अपघात घडला होता. याप्रकरणी छावणी पोलिस ठाण्यात पसार चालकाविरुद्ध मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पडेगाव येथील आकाश विलास गायकवाड व त्याचा मित्र शेख याकुब अब्दुल सत्तार हे दोघे सोमवारी रात्री बगिचा हॉटेलसमोरून पायी जात होते. यावेळी पाठीमागून वेगाने आलेल्या कारचालकाने दिलेल्या धडकेत याकुब गंभीर जखमी झाला होता. त्याला उपचारासाठी कमलनयन बजाज हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान मंगळवारी सकाळी साडेनऊ वाजता त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिस ठाण्यात पसार कारचालकाविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी आकाशच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पगार कपातीला ‘स्टे’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
पगारवाढीच्या मागणीसाठी संपावर गेलेल्या कामगारांचा आठ दिवसांचा पगार कापण्याच्या एसटीच्या निर्णयाला इंडस्ट्रिअल कोर्टाने स्थगिती दिली आहे. कापलेला पगार एसटी महामंडळाने पंधरा दिवसांत परत द्यावा, असे आदेशही कोर्टाने दिले आहेत.

इंटक संघटनेने एसटी कर्मचाऱ्यांना २५ टक्के पगार वाढ करावी, या मागणीसाठी १७ डिसेंबर आणि १८ डिसेंबर रोजी एसटीचा चक्का जाम आंदोलन केले होते. आंदोलनादरम्यान मराठवाडा आणि विदर्भातील अनेक आगारांतील प्रवाशी वाहतूक बंद होती. आंदोलनामुळे एसटी विभागाला अंदाजे ६० ते ७० लाख रुपयांचे नुकसान सोसावे लागले. औरंगाबाद विभागातील मध्यवर्ती बस स्थानक, सिडको, गंगापूर, कन्नड, सिल्लोड या आगारांतील प्रवासी वाहतूक बंद होती. विनापरवानगी आंदोलन केल्यामुळे एसटी प्रशासनाने आंदोलकांचा आठ दिवसांचा पगार कापण्याचा निर्णय
घेतला होता.

औरंगाबाद विभाग नियंत्रक कार्यालयानेही‌ विभागातील १ हजार ६००हून अधिक कर्मचाऱ्यांचा ७ जानेवारीला होणाऱ्या पगारातून आठ दिवसांचा पगार कापत करण्याचे निश्चित केले. या निर्णयामुळे तीन हजार रुपयांपासून ते १६ हजार रुपयांपर्यंत वेतन कपात केले जाणार आहे. इंटक संघटनेने इंडस्ट्रिअल कोर्टात एसटी प्रशासनाच्या निर्णयाविरोधात रिट याचिका दाखल केली होती. न्यायधिश डी. जे शेगोकर यांच्यासमोर याचिकेवर सुनावणी झाली.

कामगार कायद्यानुसार एसटी विभागाने पगार कपात करण्यापूर्वी कर्मचाऱ्यांना कोणत्याही प्रकारचे नोटीस बजावलेली नाही, असा युक्तिवाद इंटकचे वकील राजाराम मुळे यांनी केला. त्याचबरोबर पगार कपात करण्यासाठी आधार म्हणून घेतलेल्या न्यायालयीन निर्णयावरही आक्षेप घेतला.

वेतन कपातीबाबत कायदेशीर नियमप्रक्रिया राबविण्यात आली नसल्याचा निर्वाळा इंडस्ट्रिअल कोर्टाने दिला. त्याचबरोबर कर्मचाऱ्यांच्या वेतन कपातीला स्थगिती दिली. कपात केलेला पगार १५ दिवसांत कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात जमा करावा, असेही आदेश कोर्टाने दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘संकटमोचक’ आले सेवेत

$
0
0



म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
संकटात सापडलेल्या व्यक्तीला तत्काळ मदत मिळण्यासाठी तयार केलेल्या 'औरंगाबाद ग्रामीण पोलिस' या मोबाइल अॅपचा लोकार्पण सोहळा बुधवारी विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांच्या हस्ते पार पडला. पोलिस स्थापनादिनानिमित्तच्या कार्यक्रमांतर्गत बीड बायपास रोडवरील सूर्या लॉन्स येथे हा कार्यक्रम झाला.
कार्यक्रमाला भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय महिला मोर्चाच्या अध्यक्ष विजया रहाटकर, आमदार अतुल सावे, सुभाष झांबड, इम्तियाज जलील आदी उपस्थित होते. निर्भया प्रकरणानंतर दिल्लीत स्त्रियांच्या संकटकालात मदतीसाठी हिंमत नावाचे अॅप सुरू करण्यात आले. त्या अनुषंगाने संकटकालीन परिस्थितीत जिल्ह्यातील महिला, विद्यार्थिनी, वयोवृद्धांना तत्काळ मदत व्हावी यासाठी ग्रामीण पोलिसांनी 'औरंगाबाद ग्रामीण पोलिस' या अॅपची निर्मिती केली आहे, अशी माहिती नांगरे-पाटील यांनी दिली. जिल्ह्यात अजिंठा, घृष्णेश्वर, पैठण, खुलताबाद, म्हैसमाळ अशी पर्यटनस्थळे आहेत. या ठिकाणी पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांना देखील या अॅपची मदत होईल. यावेळी नांगरे-पाटील यांनी महिला अत्याचारावरील काही घटनांची माहिती पोलिस मित्र आणि उपस्थितांना दिली. पोलिस अधीक्षक नवीनचंद्र रेड्डी यांनी उपस्थितांना पोलिस दलाच्या स्थापनेची माहिती दिली. याप्रसंगी पोलिस अधीक्षक कार्यालयातर्फे महिला सुरक्षेच्या दृष्टिकोनातून तयार केलेल्या जागृती पुस्तिकेचे प्रकाशन मान्यवरांनी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अल्पवयीन मुलीवर बलात्कार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

पाचोड (ता. पैठण) येथील अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेऊन पुण्यामध्ये अनेकदा बलात्कार करण्याची घटना उघड झाली आहे. या प्रकरणी आरोपीविरुद्ध मंगळवारी (५ जानेवारी) मुकुंदवाडी पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला असून, आरोपीला अटक करण्यात आली आहे. संबंधित आरोपीला बुधवारी कोर्टात हजर करण्यात आले असता आरोपीला पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश विशेष न्यायाधीश यु. एल. तेलगावकर यांनी दिले.

या प्रकरणी संबंधित अल्पवयीन मुलीच्या जयभवानी नगरातील मामाने फिर्याद दिलेली आहे. फिर्यादीची १७ वर्षीय भाची १५ दिवसांसाठी तिच्या मामाकडे राहण्यास आली होती. ती ३० नोव्हेंबर २०१५ रोजी अज्ञात व्यक्तीबरोबर निघून गेल्याची शंका आल्यानंतर हरविल्याची तक्रार मुकुंदवाडी पोलिस ठाण्यामध्ये देण्यात आली. त्यावरून गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी राहुल हिरामण अवचर (१९, रा. वडवणी, जि. बीड) याच्या आई-आत्याच्या घरातून संबंधित मुलीला ताब्यात घेण्यात आले. संबंधित अल्पवयीन मुलीने दिलेल्या जबाबानुसार, पर्स हरवल्यामुळे मित्रांकडून पैसे घेऊन ३० नोव्हेंबर रोजी बीडला बसने गेले व परिचित असलेल्या आरोपी राहुल अवचर याला बसस्थानकावर बोलावले होते. त्याच दिवशी रात्री बीडला पोहोचल्यानंतर आरोपीने त्याच्या माजलगाव येथील भावाकडे नेले. तिथून दुसऱ्या दिवशी सकाळी पुण्याला फिरायला जाऊ असे सांगून आरोपी पुण्याला बसने घेऊन गेला. तिथे त्याने पाच ते सहा वेळा बलात्कार केल्याचा जबाब संबंधित मुलीने दिला. त्यावरून आरोपीविरुद्ध मंगळवारी (पाच जानेवारी) कलम ३६३, ३७६ (एन), 'बाललैंगिक अपराध संरक्षण अधिनियम २०१२'च्या कलम ३, ४ अन्वये गुन्हा दाखल झाला. त्यानंतर मंगळवारी आरोपीला अटक करण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हातकडीसह आरोपीचे पलायन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

दरोड्यातील आरोपीने पोलिसांच्या हाताला झटका देत हातकडीसह पोबारा केला. बुधवारी सायंकाळी सिडको बसस्टँडबाहेरील रिक्षास्टँडजवळ हा प्रकार घडला. गेवराई येथून तारखेवरून परतल्यानंतर त्याला हर्सूल कारागृहात नेत असताना हा प्रकार घडला.

सतीश नागो चव्हाण (वय २८ रा. उमापूर ता. गेवराई, बीड) या आरोपीवर दरोड्याचा गुन्हा दाखल आहे. सध्या हा आरोपी हर्सूल कारागृहात आहे. बुधवारी त्याची गेवराई कोर्टात तारीख असल्याने मुख्यालयातील शिंदे व राऊत नावाचे कर्मचारी त्याला गेवराई येथे घेऊन गेले होते. त्याला हातकडी व दोरी बांधण्यात आली होती. सायंकाळी पाच वाजता बसने ते सिडको बसस्टँडमध्ये उतरले. त्याला रिक्षाने हर्सूल कारागृहात नेण्यात येणार होते. बाहेर आल्यानंतर रिक्षास्टँडजवळ त्याने हातकडीसह पोलिसाच्या हाताला झटका देत पलायन केले. जळगाव रोडच्या दिशेने अवघ्या काही क्षणात चव्हाण पसार झाला. हा प्रकार घडताच पोलिसांची धांदल उडाली. त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, यश आले नाही. नियंत्रण कक्षाला हा प्रकार कळविण्यात आला. वायरलेसवर सर्वत्र संदेश पास करण्यात आला. सिडको एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक श्रीपाद परोपकारी यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. आजूबाजूच्या परिसरात त्यांनी पथकासह शोधमोहीम राबविली. रात्री उशीरापर्यंत ही शोध मोहीम सुरू होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दोन लाखासाठी विवाहितेचा छळ

$
0
0

दोन लाखासाठी विवाहितेचा छळ

औरंगाबाद - हॉटेल टाकण्यासाठी माहेरून दोन लाख रुपये आणण्याची मागणी करीत विवाहितेचा छळ करण्यात आल्याचा प्रकार किराडपुरा भागात घडला. याप्रकरणी विवाहितेच्या तक्रारीवरून आरोपी सादिक शहा, जावेद रहमान, आबेद, महेबूब शहा, समीना महेबूब शहा व यास्मिन सादिक शहा (सर्व रा. किराडपुरा, गल्ली क्रमांक ११) यांच्या विरुद्ध जिन्सी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

........

बुलेटच्या धडकेत भाऊ-बहीण जखमी

बुलेट व स्कुटीच्या अपघातात स्कुटीवरील कृष्णकुमार लक्ष्मण राऊतराय (वय २४ रा. स्वामी विवेकानंदनगर, हडको) व त्याची बहीण असे दोघे जखमी झाले. सोमवारी दुपारी अडीच वाजता जयसिंगपुरा भागात हा अपघात घडला. या प्रकरणी बुलेट (क्रमांक एमएच २० डीएल ०००७) च्या चालकाविरुद्ध बेगमपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

......

उस्मानपुऱ्यात चोरीचा प्रयत्न

प्रतापनगर, कासलीवाल रेसिडेंसी येथील ललित भगवान कोलते यांच्या घराचा दरवाजा तोडून चोरीचा प्रयत्न करण्यात आला. सोमवारी दुपारी तीन ते पाच वाजेच्या दरम्यान हा प्रकार घडला. या प्रकरणी अज्ञात आरोपीविरुद्ध उस्मानपुरा पोलिस ठाण्यात चोरीचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

......

दुचाकी, सायकल पळवली

गारखेडा येथील सहानेह चुनेसर गौतम (वय २७) या फर्निचर तयार करणाऱ्या तरुणाची दुचाकी पळवण्यात आली. रविवारी रात्री त्याच्या घरासमोर उभी असलेली दुचाकी चोरट्यानी चोरली. याप्रकरणी मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुसऱ्या घटनेत महमद रफतउल्ला (रा. बेरीबाग) यांची सायकल घराच्या कंपाऊंडमधून पळवण्यात आली. सोमवारी दुपारी हा प्रकार घडला. हर्सुल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

......

रिक्षातून प्रवाशाचा मोबाइल लंपास

रिक्षातून प्रवास करीत असताना लक्ष्मीकांत जगन्नाथ कोऱ्हाळे (वय ३१ रा. सातारा परिसर) यांचा मोबाइल चोरट्यानी लांबवला. मंगळवारी एपीआय कॉर्नर ते चिकलठाणादरम्यान हा प्रकार घडला. या प्रकरणी सिडको एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images