Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

पोलिस उपअधीक्षकाच्या घरी चोरीचा प्रयत्न श्वानामुळे फसला

$
0
0

औरंगाबाद : चोरट्यांनी चोरी करण्यासाठी थेट पोलिस उपअधीक्षकाचेच घर निवडले. मात्र, त्यांच्यावर पाळीव कुत्रे सोडण्यात आल्याने त्यांना पळता भुई थोडी झाली. रविवारी पहाटे एन-४ परिसरातील पारिजातनगर येथे हा प्रकार घडला असून मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राज्य गुन्हे अन्वेषण शाखेत ( सीआयडी ) उपअधीक्षक पदावर कार्यरत असलेले ब्रम्हदेव गावडे यांचे सिडको एन-४ परिसरातील पारिजातनगर येथे निवासस्थान आहे. रविवारी पहाटे गावडे कुटुंबी झोपलेले असताना अडीच वाजेच्या सुमारास त्यांना त्यांचे पाळीव कुत्रे वारंवार भुंकत असल्याचा आवाज आला. संशय आल्याने गावडे खाली आले. यावेळी कंपाऊंड वॉलमध्ये दोन जण उडी मारून आतमध्ये येताना दिसले. मिनाबाई गावडे यांनी कुत्र्यांना आवाज दिला. कुत्र्यांनी या संशयितांच्या मागे धाव घेतली. कुत्रे पाठीमागे लागल्याने संशयित चोरांनी पलायन केले.

या घटनेत कोणताही ऐवज चोरीला गेला नाही, परंतु चोरीचा प्रयत्न केल्याप्रकरणी मीनाबाई ब्रम्हदेव गावडे यांच्या तक्रारीवरून पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


ऑफिस, कॉलेजमध्ये हेल्मेटसक्ती!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'शहराची वाहतूक व्यवस्था गंभीर झाली आहे. वर्षभरात खुनाच्या ३२ घटना घडल्या, तर रस्ते अपघातात त्याच्या पाचपट म्हणजे २०० बळी गेले. हे कुठेतरी थांबावे यासाठी सरकारी ऑफिस, कॉलेजमध्ये हेल्मेट सक्ती राबविणार आहोत. शहरातही हा उपक्रम राबवू,' असा निर्धार पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी केला. त्यांनी सोमवारी आरटीओ कार्यालयात रस्ता सुरक्षा अभियानाचे उदघाटन केले. यावेळी ते बोलत होते.

कार्यक्रमासाठी एमजीएमचे विश्वस्त प्रतापराव बोराडे, जिल्हा शल्य चिकीत्सक गोवर्धन गायकवाड, विभाग नियंत्रक आर. एन. पाटील, दिलीप उर्किडे, आरटीओ सर्जेराव शेळके, वाहन डिलर्स असोसिएशनचे अध्यक्ष मनिष धूत, ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे फैय्याज खान उपस्थित होते. अमितेशकुमार म्हणाले, 'रस्ते अपघातातील बळी चिंता वाढविणारे आहेत. हे थांबविण्यासाठी उद्याच महाविद्यालयांची बैठक घेणार आहे. हेल्मेट घालून आल्याशिवाय दुचाकीधारक विद्यार्थ्याला कॉलेजमध्ये प्रवेश देऊ नका, अशी सूचना करणार आहे. शासकीय कार्यालयामध्येही असा नियम केला जाईल. शहराची वाहतूक व्यवस्था सुधारणे गरजेचे आहे. त्यासाठीच ट्रक, ट्रॅव्हल्स, डिझेल रिक्षांवर महापालिका हद्दीत बंदी घातली. या नंतरही वाहतूक व्यवस्था सुरळीत झालेली नाही. येत्या वर्षभरात शहराच्या वाहतूक व्यवस्थेला वळण लावण्याचा प्रयत्न असेल. शिस्त मोडणाऱ्यांवर कारवाई करू. त्यांचे प्रबोधन करू. वर्षाच्या शेवटी ९० टक्के वाहतूक सुरळीत असेल. हेल्मेट न घालणारे, ट्रिपल सिट, रॉँसाइड प्रवास, दारू पिऊन गाडी चालविणे या कडक निर्बंध आणू,' असा निर्धार अमितेशकुमार यांनी यावेळी केला. आरटीओ सर्जेराव शेळके म्हणाले, 'वाहनांची संख्या वाढत चालली आहे. सर्वाधिक वाहन असलेल्या राज्यात महाराष्ट्र दुसऱ्या स्थानी आहे. देशात दर तासाला ५६ अपघात होतात. त्यात १६ जण मृत्युमुखी पडतात. बळी पडलेल्यांमध्ये १५ ते ३५ वयोगटातील व्यक्तींचे प्रमाण ५६.८० टक्के आहे. या अपघातांमध्ये ५५ टक्के वाहन अपघात या वेगात गाड्या चालविल्यामुळे होतात.'

रिक्षा संघटनेला कानपिचक्या

पोलिसांनी कारवाई केली की मोठ्या प्रमाणात रिक्षा संघटनेचे प्रतिनिधी आंदोलनासाठी रस्त्यावर उतरतात. आज रस्ता सुरक्षा कार्यक्रमात मात्र बोट्यावर मोजण्याइतके प्रतिनिधी उपस्थित आहेत. शहरात १५ हजार रिक्षा धावतात. या चालकांच्या बेशिस्तीमुळे वाहतूक व्यवस्था विस्कळीत होते. रिक्षा संघटनेचे प्रतिनिधी या नाठाळ रिक्षा चालकांना शिस्त लावण्यासाठी कधीही पुढाकार घेत नाहीत. या पुढे अशा रिक्षा चालकांना वठणीवर आणण्यासाठी विशेष कार्यक्रम घेऊ,' असे संकेत अमितेशकुमार यांनी दिले.

---

- १ तासात ५६ अपघात

- १ तासात १६ बळी

- १५ ते ३५ वयोगटातील ५६.८० टक्के

- ५५ टक्के अपघात वेगामुळे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दारू काचेच्याच बाटल्यांमधून द्या!

$
0
0

म. टा. विशेष प्रतिनिधी, औरंगाबाद
युवक दिनाच्या पूर्वसंध्येला व्यसनमुक्तीविषयी निर्णय अपेक्षित असताना 'मद्य निर्मात्यांनी प्लास्टिकच्या पेट-जारऐवजी फक्त काचेच्या बाटल्यांचाच वापर करावा,' असा आदेश गृह खात्याने काढला आहे. हा आदेश येत्या १ एप्रिलपासून लागू करण्यात येणार आहे.

दारू कोणत्या वेष्टनात विकली जावी, यासंदर्भात गृह खात्याने सोमवारी (११ जानेवारी) दोन-पानी सविस्तर आदेश काढला. राज्यातील काही संघटनांनी पेट बाटल्यांमधून बाजारात आणल्या जाणाऱ्या मद्यावर आक्षेप घेतला, कारण या प्लास्टिकच्या बाटल्यांमुळे पर्यावरणाची हानी होते आणि प्रदूषण वाढते. शिवाय, अल्कोहोलमध्ये प्लास्टिकचे काही अंश मिसळण्याचा व त्यातून मद्य पीणाऱ्याच्या आरोग्याला अपाय होण्याचा धोका असतो, म्हणून अशा आशयाचा निर्णय घेण्यात आल्याचे या आदेशात म्हटले आहे.

दारूची चोरटी वाहतूक प्लास्टिकच्या बाटल्यांमधून सहज होते, तेवढी काचेच्या बाटल्यांची करता येत नाही. काचेच्या बाटल्यांमधून मद्यविक्री झाली तर तस्करीला आळा बसेल आणि शासनाच्या महसुलातही वाढ होईल, असे हा आदेश म्हणतो.

...अशा आहेत सूचना
'फॉर सेल इन महाराष्ट्र स्टेट ओन्ली' असे या काचेच्या बाटल्यांवर इंग्रजीतून कोरावे (एम्बॉस), हा आदेश परराज्यातून येणाऱ्या देशी, विदेशी मद्यालाही लागू राहील, असे गृह खात्याने म्हटले आहे. हा आदेश कॅनमधून विकल्या जाणाऱ्या बिअरला लागू नसेल, काचेच्या बाटल्या, 'महाराष्ट्र देशी मद्य नियमावली १९७३ मधील नियम ६ (२६)' च्या तरतुदीनुसार स्वच्छ धुवूनच वापरल्या जाव्यात, पेट व टेट्रापॅकचा वापर बंद केला जावा, अशा सूचना गृह खात्याच्या सहसचिव पूनम वागदे यांच्या स्वाक्षरीनिशी काढण्यात आलेल्या आदेशात देण्यात आल्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आरोपीला अकरा दिवसांनंतर बेड्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

नववर्षाच्या रात्री १७ वर्षांच्या तरुणाचा खून करून पसार झालेल्या दोघांना सोमवारी क्रांतिचौक पोलिसांनी अटक केली. पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी नातेवाईकांना कारवाईचा इशारा दिल्यानंतर आरोपींची माहिती मिळाली.

नववर्षाच्या मध्यरात्री मध्यवर्ती बसस्टँडसमोरील मिर्झा लॉजसमोर मारहाणीत मेहबूब घौरी या १७ वर्षांच्या तरुणचा मृत्यू झाला होता. मित्रमैत्रिणींसोबत पार्टी केल्यानंतर हा प्रकार घडला होता. मैत्रीण सोबत असताना लॉजमध्ये येण्याच्या वादातून ही मारहाण झाली होती. प्रशांत केशवराव म्हस्के व प्रमोद जयवंतराव निर्मळ यांच्यावर याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल झाला होता. घटना घडल्यापासून आरोपी प्रशांत व प्रमोद पसार झाले होते. क्रांतिचौक पोलिसांनी शोध घेऊन ही आरोपी सापडत नव्हते. दरम्यान, पोलिस आयुक्त अमितेशकुमार चार दिवस पुणे येथे कार्यालयीन कामानिमित्त दौऱ्यावर होते. दौऱ्यावरून परतल्यानंतर त्यांनी या प्रकरणाची माहिती जाणून घेतली. आरोपींच्या सर्व नातेवाईकांना चौकशीसाठी बोलावून घेण्यात आले. आरोपींची माहिती असल्यास ती देण्याचे त्यांना सांगण्यात आले.

अन्यथा गुन्हेगाराला आश्रय देण्याच्या आरोपाखाली कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला. एक दिवसाचा कालावधी नातेवाईकांना देण्यात आला होता. पोलिस आयुक्तांची ही मात्रा

तंतोतंत लागू पडली.

दोघांच्या नातेवाईकांनी आरोपी राहत असलेल्या ठिकाणाची माहिती दिली. प्रशांत म्हस्केला कल्याण येथून तर प्रमोदला शिवूर बंगला येथून सोमवारी पहाटे ताब्यात घेण्यात आले. मंगळवारी या आरोपींना कोर्टात हजर करण्यात येणार आहे.

मध्यरात्री घेतली बैठक

शनिवारी रात्री बारा वाजेच्या सुमारास पोलिस आयुक्त अमितेशकुमार पुण्यावरून औरंगाबादला परतले. दरम्यान, मेहबूब घौरी खून प्रकरणात विविध गंभीर घडामोडी झाल्या होत्या. साक्षीदार महिलेने अनेक आरोप केले होते. रात्री या प्रकरणाशी सबंधित सर्व पोलिस अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. त्यामध्ये तपासाबाबत आयुक्तांनी सूचना केल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाणीबाणीचा ‘मेगा’ मनस्ताप

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

सिडको - हडको भागात सलग सातव्या दिवशी नागरिकांना निर्जळीला सामोरे जावे लागले. जलवाहिनींवरील दुरुस्तीसाठी औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटी कंपनीने घेतलेल्या मेगा शटडाउनमुळे नागरिकांना मेगा मनस्ताप होत आहे. यात नगरसेवकही भरडले जात आहेत.

औरंगाबादहून जायकवाडीला पाणीपुरवठा करणाऱ्या ७०० आणि १४०० मिलिमीटर व्यासाच्या जलवाहिनीवरील दुरुस्ती कामासाठी व जायकवाडी येथील पंपहाउस, फारोळा जलशुध्दीकरण केंद्रातील दुरुस्ती कामासाठी कंपनीने शनिवारी बारा तासांचे मेगा शटडाउन घेतले. यामुळे पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक एक दिवस पुढे ढकलले, पण हे काम फक्त कागदोपत्रीच झाले. सिडको - हडको भागात शटडाउन घेण्याच्या दोन दिवस अगोदरपासून पाणीबाणी निर्माण झाली होती. ती अद्यापही सुरू आहे. पवननगर वॉर्डाचा काही भाग, सिडको एन ११, एन ११ बी सेक्टर, यादवनगर, सुरेवाडी, रोजाबाग, दिल्ली गेट परिसर, ठाकरेनगरचा काही भाग, सिडको एन २ आदी भागात पाणीपुरवठा आज झाला नाही. पुंडलिकनगर भागातही पाणीपुरवठा झाला नाही. त्यामुळे या वॉर्डच्या नगरसेविका मीना गायके यांनी शिष्टमंडळासह कंपनीच्या कार्यालयावर धडक दिली व पाणीपुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली. सिडको एन ५ व एन ७ पाण्याच्या टाकीवर सायंकाळी उशिरा सिडको-हडको भागातील नगरसेवक जमा झाले. उपमहापौर प्रमोद राठोड, नगरसेवक सीताराम सुरे, बन्सीलाल जाधव, नितीन चित्ते, राज वानखेडे, रालूल रोजतरक, किशोर नागरे, अशोक वळसे आदी जलकुंभावर ठाण देऊन बसले होते. पाणीपुरवठ्यातील नेमकी समस्या काय आहे व पाणीपुरवठा केव्हा सुरळीत केला जाणार, याबद्दल त्यांनी विचारणा केली.

मात्र, या ठिकाणी कंपनीचे सक्षम अधिकारी नगरसेवकांच्या प्रश्नांना उत्तर देण्यासाठी उपस्थित नव्हते. नगरसेवकांनी थोडे आक्रमक होताच कंपनीचे अधिकारी सोनल खुराणा, पालिकेचे कार्यकारी अभियंता हेमंत कोल्हे सिडको एन ७ च्या जलकुंभावर आले. त्यानंतर कामाला गती मिळाली. काम गतीने सुरू करण्यात आले तरी उद्या मंगळवारी देखील सिडको - हडको भागाला पाणीपुरवठा होण्याची शक्यता नसल्याचे बोलले जात आहे.

केंद्रेकरांची ताकीद
आयुक्त सुनील केंद्रेकर एन ७ येथील जलकुंभावर रात्री नऊ वाजता भेट दिली व तेथे जमलेल्या नगरसेवक, नागरिकांशी चर्चा केली. त्यानंतर अधिकाऱ्यांना 'पाणीपुरवठ्यासंदर्भात कोणतेही छोटे मोठे काम केले तर त्याची माहिती दोन तासात मला मिळालीच पाहिजे,' अशी सक्त ताकीद दिली. जलकुंभाच्या परिसरात निर्माण झालेल्या व्हॉल्व्हच्या समस्येबद्दल अधिकाऱ्यांना जाब विचारला. 'रात्री कितीही उशीर झाला तरी व्हॉल्व्हच्या दुरुस्तीचे काम झालेच पाहिजे. त्याशिवाय घरी जाऊ नका. सिडको-हडकोच्या कोणत्या भागात किती पाणीपुरवठा केला जातो याची माहिती उद्याच द्या,' असे आदेश दिले.

मेगा शटडाउनमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. पाणीपुरवठा खंडित झाला आहे. सात - सात दिवस पाणीपुरवठा होणार नसेल, तर अशा प्रकारच्या शटडाउनचा काय उपयोग. कंपनीच्या अधिकाऱ्यांनी काळजीपूर्वक काम केले असते, तर नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागला नसता.
- नितीन चित्ते, नगरसेवक
जलकुंभाजवळ व्हॉल्व्ह बसवण्याचे काम कंपनीने योग्य प्रकारे केले नाही. बसवलेला व्हॉल्व्ह तीनवेळा वेल्डिंग करून आणावा लागला. व्हॉल्व्हसाठीचे आवश्यक साहित्य तेथील कामगारांकडे नव्हते. त्यामुळे पाणीपुरवठा वेळेत सुरळीत झाला नाही. परिणामी नागरिकांना पाणी - पाणी करावे लागत आहे.
- किशोर नागरे, माजी नगरसेवक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डीपी’ने उडवली झोप

$
0
0

Unmesh.Deshpande @timesgroup.com
औरंगाबाद शहराचा सुधारित विकास आराखडा सादर झाल्यापासून सर्वसामान्य नागरिकांची झोप उडाली आहे. ज्या ठिकाणी पक्की घरे आहेत त्याच ठिकाणी खुल्या जागांचे आरक्षण टाकण्यात आले. त्यामुळे हे कसे झाले, असा प्रश्न निर्माण झाला आहे. ज्यांनी हे सर्व केले ते नामानिराळे झाले आहेत. आता महापालिकेची सर्वसाधारण सभा काय निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शहराच्या सुधारीत विकास आराखड्याचे काम रखडले होते. २०१२-१३ मध्ये अपेक्षित असलेला हा आराखडा २०१५ या वर्षाच्या शेवटी म्हणजे २८ डिसेंबर रोजी सर्वसाधारण सभेला सादर करण्यात आला. हा आराखडा तयार करण्यासाठी सक्षम अधिकारीच मिळत नव्हता. त्यामुळे सततच्या प्रभारी अधिकाऱ्याच्या नियुक्तीवर आराखड्याचे काम अवलंबून होते. औरंगाबाद शहराचा समावेश स्मार्ट सिटी अभियानात झाल्यावरही विकास आराखड्याच्या कामाला गती आली नाही. विकास आराखडा तयार नसल्यामुळे स्मार्ट सिटी अभियानातील औरंगाबाद शहराचे स्थान हुकते की काय अशी चर्चा सुरू झाली आणि यात विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी पुढाकार घेतला. त्यांनी मुंबईत सर्व संबंधित अधिकारी व महापालिकेचे पदाधिकारी यांची बैठक घेतली. या बैठकीला नगरविकास खात्याचे सचिव देखील उपस्थित होते. या बैठकीनंतर विकास आराखडा तयार करण्याच्या कामाला गती आली आणि सरतेशेवटी हा आराखडा महापालिकेच्या सर्वसाधारण सभेला सादर झाला. आराखडा सादर झाला आणि नागरिकांची झोप उडाली.
आराखडा तयार करणाऱ्यांनी सध्याच्या जमीन वापराचा अभ्यास केला होता का, स्थळ पाहणी करून त्यांनी आराखड्यातील आरक्षणांची आखणी केली का, असे प्रश्न आता निर्माण होऊ लागले आहेत. पक्क्या घरांवर खुल्या जागांचे आरक्षण टाकण्यात आल्याचे स्पष्ट होऊ लागल्यामुळे दाद मागण्यासाठी नागरिकांची रिघ लागणे महापालिकेत सुरू झाले आहे. दहा दिवसात हजारांपेक्षा जास्त तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. वास्तविक पाहता तक्रारी दाखल करण्याचे आवाहन अद्याप करण्यात आले नाही. कारण पालिकेच्या सर्वसाधारण सभेने सुधारित विकास आराखडा मंजूर केला नाही. मंजूर केल्यावर त्यावर सूचना-हरकती मागवण्याची पद्धत आहे, त्यासाठी ६० दिवसांचा अवधी दिला जातो, प्राप्त झालेल्या सूचना-हरकतींचा निपटारा करण्यासाठी स्थायी समितीच्या तीन सदस्यांची एक समिती तयार केली जाते. त्या समितीमध्ये शासनाचे चार अधिकारी देखील असतात. सात जणांची कमिटी सूचना-हरकतींचा निपटारा करते. ही प्रक्रिया सुरू व्हायची आहे, असे असतानाही नागरिक मोठ्या संख्येने आक्षेप घेऊन महापालिकेत येत आहेत यावरून त्यांच्यावर किती अन्याय झाला असेल याची कल्पना येते.
हर्सूल, पिसादेवी रस्ता, मयूरपार्क, पहाडसिंगपुरा, पुंडलिकनगर, नक्षत्रवाडी यासह विविध वसाहतींमधील नागरिक सुधारीत विकास आराखड्यामुळे त्रस्त झाले आहेत. दररोज दोन-पाचशे लोक एकत्र जमून आता आपल्या घरांचे काय, असा प्रश्न एकमेकांना विचारू लागेल आहेत. ज्या वसाहतींवर आरक्षणाची कुऱ्हाड कोसळली आहे, त्या वसाहतीत प्रामुख्याने हातावर पोट असलेले नागरिक राहतात. मोलमजुरी करून किंवा एखाद्या कंपनीत नोकरी करून आपले आणि आपल्या कुटूंबाचे पोट भरण्याच्या उद्देशाने हे नागरिक औरंगाबादेत आले आहेत. पोटाला चिमटा काढत त्यांनी प्लॉट खरेदी केले आणि त्यावर तुटकीमुटकी घरे बांधली. प्लॉटचे आणि घराच्या बांधकामासाठी घेतलेल्या कर्जाचे हप्ते फिटण्याच्या आतच त्यांच्या घरांवर आरक्षणाचे संकट उभे राहीले. त्यांची लहान, लहान मुले, आई आता आपले घर पडणार का, असा प्रश्न करू लागली, त्यांच्या डोळ्यातील अनामिक भितीची आराखडा तयार करणाऱ्या अधिकाऱ्यांनी कधी कल्पना केली होती का, असा प्रश्न आता उभा राहतो. ज्या वसाहतींवर आरक्षणे टाकण्यात आली त्या वसाहतींच्या शेजारी असलेल्या मोकळ्या जाता मात्र 'यलो' झाल्या. हा चमत्कार कसा झाला याचा जाब विचारण्याची वेळ आता आली आहे. हा जाब विचारण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांची शक्ती कमी पडते, त्यामुळे नागरिकांचा आवाज बनण्याचे व त्यांना न्याय मिळवून देण्याचे काम नगरसेवकांना करावे लागणार आहे. नगरसेवकांनीही आराखडा तयार करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या आवाजात आवाज मिसळला तर नागरिकांच्या असंतोषाला त्यांना सामोरे जावे लागेल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिडकोच्या नोटीस रद्द

$
0
0


म. टा. प्रतिनिधी वाळूज
सिडकोने वाळूज महानगर झालर क्षेत्रात प्लॉट व घर खरेदी केलेल्यांना पाठवलेल्या नोटीस रद्द केल्या आहेत. यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे. दरम्यान, विनापरवाना बांधकाम केलेली घरे नियमित करण्याची मागणी वरिष्ठ कार्यालायाकडे पाठवण्याच्या लेखी आश्वासनानंतर उपोषण मागे घेण्यात आले.
झालर क्षेत्रात विनापरवाना बांधलेली पाडण्यात येऊन गुन्हे दाखल केले जातील, या आशयाची नोटीस सिडकोतर्फे बजावण्यात आली आहे. यामुळे धास्तावलेल्या शेतकरी व कामगारांनी सोमवारपासून सिडको कार्यालयासमोर उपोषण सुरू केले होते. या उपोषणाची माहिती मिळाल्यानंतर खासदार चंद्रकांत खैरे यांनी पुढाकार घेऊन उपोषणार्थीचे शिष्टमंडळ व सिडकोचे मुख्य प्रशासक सुनील केंद्रेकर यांची बैठक घडवून आणली. या बैठकीला खासदार खैरे, शिवसेना जिल्हाप्रमुख अंबादास दानवे, शेतकरी-कामगार कृती समितीचे अध्यक्ष योगेश दळवी, दत्तू हिवाळे, सुभाष सोनवणे, संतोष लोहकरे, अंकूश काळवणे, पंचायत समिती सदस्य गणेश नवले, तालुकाप्रमुख बप्पा दळवी, उपतालुका प्रमुख बाळासाहेब राऊत, सुरेश फुलारे, वडगाव कोल्हाटी उपसरपंच सुनील काळे, रिपाइंचे जिल्हाध्यक्ष संजय ठोकळ, जिल्हा सचिव शरद किर्तीकर, सय्यद जावेद, मनोज तरकसे, रमा किर्तीकर, अलका पुरी, सुरेखा खाजेकर यांची उपस्थिती होती. या शिष्टमंडळाने मुख्य प्रशासक केंद्रेकर यांच्या समोर मागण्या मांडल्या. त्यावर दोन तास चर्चा झाली. या चर्चेत चुकीचा अर्थ लावून सरसकट नोटीस दिल्या आहेत. त्यामुळे त्या रद्द करण्यात आल्या आहेत, अशी माहिती केंद्रेकर यांनी दिली. शिवाय या मागण्या शासन व मुख्य कार्यालयाकडे पाठवण्यात येतील, असे सांगून उपोषण मागे घेण्याचा सल्ला दिला. मात्र सिडकोचे झालर क्षेत्र हटविण्याच्या मागणीचा शेतकर्यांनी विचार करावा, असेही आवाहन केंद्रेकर यांनी केले आहे. त्यानंतर प्रशासक हनुमंत आरगुंडे यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले. नोटीस परत घेतल्यामुळे सिडको वाळूज महानगर झालरक्षेत्रातील जोगेश्वरी, रांजणगाव, घाणेगाव, नायगाव, बकलावलनगर, कमळापूर, वडगाव कोल्हाटी, तिसगाव, वळदगाव आदी परिसरातील नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वैजापूरजवळ ट्रक उलटून चालक ठार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, वैजापूर
नागपूर मुंबई महामार्गावर भग्गाव शिवारात लोखंडी पत्रे घेऊन जाणारा ट्रक टायर फुटल्याने उलटल्याने चालकाचा दबून मृत्यू झाला. हा अपघात मंगळवारी पहाटे घडला.
रामसुरेश हरिद्वार पांडे (वय ६०) असे मृताचे नाव आहे. ते मुंबई येथून ट्रकमध्ये लोखंडी पत्रे घेऊन औरंगाबादकडे जात होते. भग्गाव शिवारात टायर फुटल्याने ट्रक उलटला. त्यामुळे केबिनखाली दबल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. जेसीबीने त्यांचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. याप्रकरणी ट्रकमालक वासुदेव सोनी यांच्या माहितीवरून वैजापूर पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पुढील तपास हवालदार नंदकुमार नरोटे व दीपक सुरोसे करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


विशेष व्यक्तींचे साहित्य संमेलन आजपासून

$
0
0


म. टा . विशेष प्रतिनिधी, औरंगाबाद
साहित्य व संस्कृती मंडळ आणि यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान (अपंग हक्क विकास मंच ) यांच्या संयुक्त विद्यमाने सहावे अखिल भारतीय विशेष (अपंग ) व्यक्तींचे साहित्य संमेलन बुधवारपासून दोन दिवस रंगणार आहे.
हे संमेलन बीड बायपासच्या गुरू लॉन्समधील कविवर्य सुरेश भट साहित्य नगरीत संमेलनाध्यक्ष प्रा. अशोक थोरात यांच्या उपस्थितीत होणार आहे. सायंकाळी ५ वाजता या संमेलनाचे उदघाटन विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले, आमदार बच्चू कडू, जेष्ठ साहित्यिक रा. रं. बोराडे, दत्ता बाळसराफ, अभिनंदन थोरात आदी उपस्थित राहणार आहेत. या संमेलनात १५ राज्यातील १५०० अपंग साहित्यिक व साहित्य प्रेमी सहभागी होणार आहेत. यावेळी उषा शास्त्री, देव शर्मा, मनी पानसे व देविदास अधीवार यांच्या पुस्तकाचे प्रकाशन होईल. बुधवारी सायंकाळी साडेसात वाजता नवोदित कवींचे संमेलन होणार आहे. रात्री ९ वाजता सांस्कृतिक कार्यक्रम रंगणार आहे. गुरुवारी कविसंमेलन, प्रकट मुलाखत, कथाकथन, परिसंवाद, बहुभाषिक हास्य कविसंमेलन आदी कार्यक्रम रंगणार आहेत. संमेलनाच्या विशेष सत्राला खासदार सुप्रिया सुळे, आमदार राजेश टोपे यांची उपस्थिती असणार आहे .संमेलनास साहित्य प्रेमींनी उपस्थित राहण्याचे आवाहन स्वागताध्यक्ष सुहास तेंडुलकर, कार्याध्यक्ष विजय कान्हेकर यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पंचायत समिती सभापतींचा राजीनामा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
औरंगाबाद पंचायत समितीचे सभापती सुनील हरणे यांनी मंगळवारी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांच्याकडे राजीनामा दिला. पक्षांतर्गत सदस्यांत झालेल्या करारानुसार सव्वा वर्षांचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर हा राजीनामा दिला. सव्वा वर्षांपूर्वी काँग्रेसचे सुनील हरणे हे राष्ट्रवादी काँग्रेस, महाराष्ट्र नवनिर्माण सेना व दोन अपक्षांच्या मदतीने सभापती झाले होते. पक्षांतर्गत करारानुसार त्यांना सव्वा वर्षांचा कालावधी देण्यात आला होता, तो पूर्ण झाला. त्यामुळे हरणे यांनी मंगळवारी राजीनामा सादर केला. यावेळी माजी आमदार डॉ. कल्याण काळे, माजी सभापती सरसाबाई वाघ, राहुल सावंत, आत्माराम पळसकर, मनोहर शेजूळ, काकासाहेब कोळगे आदी उपस्थित होते. काँग्रेसकडून आता पुढचा सभापती निवडण्यासाठी हालचाली सुरू होणार आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मनोहर शेजूळ यांची सभापतिपदी वर्णी लागू शकते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नामविस्तार दिनानिमित्त गुरुवारी चर्चासत्राचे आयोजन

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान व सरस्वती भुवन शिक्षण संस्थेच्या वतीने नामविस्तार दिनानिमित्त 'भारतीय लोकशाहीपुढील आव्हाने' या विषयावर गुरुवारी (१४ जानेवारी) सकाळी अकरा वाजता औरंगपुऱ्यातील गोविंदभाई श्रॉफ ललित कला अकादमीच्या सभागृहात चर्चासत्र आयोजित करण्यात आले आहे.
चर्चासत्रामध्ये डॉ. भालचंद्र मुणगेकर, खासदार सुप्रिया सुळे, डॉ. गंगाधर पानतावणे, डॉ. जहीर अली हे प्रमुख मार्गदर्शन करणार आहेत. या वेळी आमदार हेमंत टकले, आमदार राजेश टोपे, आमदार सतीश चव्हाण, दत्ता बाळसराफ यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. या प्रसंगी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या वतीने यावर्षीपासून देण्यात येणाऱ्या 'यशवंतराव चव्हाण गौरव पुरस्कार' घोषित झाले असून, या पुरस्कारांचे वितरण मान्यवरांच्या हस्ते होणार आहेत. व्यक्तिगत गटातून दीपक पांडुरंग चव्हाण यांना ११ हजार रुपये रोख, सन्मानपत्र व रोपटे असा पुरस्कार देण्यात येणार आहे, तर संस्था गटातून ग्रामविकास संस्था (औरंगाबाद) व जय जवान जय किसान संस्था (पैठण) यांना विभागून पुरस्कार देण्यात येणार आहे. प्रत्येकी साडेपाच हजार रुपये रोख, सन्मानपत्र व रोख असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. चर्चासत्राला उपस्थित राहण्याचे आवाहन प्रतिष्ठानच्या विभागीय केंद्राचे अध्यक्ष नंदकिशोर कागलीवाल, सचिव मुकुंद भोगले, कोषाध्यक्ष सचिन मुळे, नीलेश राऊत, स. भु. शिक्षण संस्थेचे सहचिटणीस श्रीरंग देशपांडे, सरचिटणीस अॅड. दिनेश वकील यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दोन कारच्या विचित्र अपघातात सहा जखमी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
बाळापूर शिवारात दोन कारच्या विचित्र अपघातात सहा जण जखमी झाले. हा अपघात सोमवारी सायंकाळी ४.३०च्या सुमारास झाला. याप्रकरणी चिखलठाणा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पैठण तालुक्यातील पाचोड येथील रहिवासी आशिष पांडे, त्यांची पत्नी सुनयना पांडे व तीन महिन्याची मुलगी आशिका हे कारने (एमएच २०, डीएन ३४४४) पाचोडकडे जात होते. त्यावेळी बाळापूर शिवाराजवळ कारचालक आबासाहेब चिंतामणी (वय २७) याचे कारवरील नियत्रंण सुटले. त्यामुळे कार दुभाजकला ओलांडून दुसऱ्या बाजूने जाणाऱ्या कारवर (एमएच २०, बी एन ६२०५) धडकली. या अपघातात दुसऱ्या कारमधील चालक हर्षल जाधव (वय २८,रा. बजाजनगर) निलेश जाधव, पांडे कुटुंबातील तिघे व चालक आबासाहेब चिंतामणी जखमी झाले. त्यांच्यावर खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असल्याची माहिती पोलिस कर्मचारी लक्ष्मण साळवे यांनी दिली. अपघाताच्या काही वेळेनंतर विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे या रस्त्यावरून जालन्याकडे जात होते. अपघातग्रस्त वाहने पाहून त्यांनी विचारपूस केली. तोपर्यंत जखमींना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शुक्रवारपासून शारंगदेव महोत्सव

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
१३ व्या शताब्दीतील संगीततज्ज्ञ व ग्रंथकार शारंगदेव यांच्या नावाने मागच्या चार वर्षांपासून घेण्यात येत असलेला शारंगदेव संगीत महोत्सव यंदा १५ ते १८ जानेवारी दरम्यान शहरात होणार आहे. यामध्ये ख्यातनाम कलावंतांची हजेरी असणार असून, 'भरतनाट्यम'चे विख्यात नर्तक व गुरू पद्मभूषण सी. व्ही. चंद्रशेखर यांना शारंगदेव पुरस्काराने सन्मानिक करण्यात येणार आहे.
महागामीच्या वतीने दर वर्षी घेण्यात येणाऱ्या या महोत्सवामध्ये यंदा शुक्रवारी मुंबईतील सतीश कृष्णमूर्ती व सहकाऱ्यांच्या वतीने कर्नाटकी तालवाद्याचा कार्यक्रम सादर होईल व तालवाद्याने महोत्सवाला प्रारंभ होणार आहे. कोलकाता येथील मालबिका मित्रा व समुहाच्या वतीने कथ्थक नृत्य सादर होईल. शनिवारी पार्वती दत्ता व महागामीच्या समूहाच्या वतीने कथ्थक, तर शर्मिला बिश्वास व समुहाच्या (कोलकाता) वतीने ओडिसी नृत्य सादर होईल. महोत्सवात रविवारी डागर घराण्याचे वासिफुद्दीन डागर (दिल्ली) यांचे ध्रुपद गायन होणार आहे. तसेच वेरूळ लेणींच्या शिल्पावर आधारित 'नृत्यांकन' ही ओडिसी नृत्य संरचना महागामी समूहाच्या वतीने सादर होईल. छत्तीसगढच्या प्रख्यात नर्तिका पद्मभूषण तिजन बाई यांच्या पंडवानी नृत्याने महोत्सवाचा समारोप होणार आहे. एमजीएमच्या रुक्मिणी सभागृहात सायंकाळी सात वाजता महोत्सवाचे सादरीकरण होणार आहे. त्याचवेळी 'शारंगदेव प्रसंग' हा संगीत विषयक मार्गदर्शन-चर्चासत्रा विशेष कार्यक्रम १५ ते १८ जानेवारी दरम्यान सकाळी दहा ते दुपारी एक या वेळेत महागामीतील शारंगदेव सदन येथे होणार आहे. गुरू रामहरी दास, गुरू मालबिका मित्रा, विद्वान नंदकुमार, गुरू शर्मिला बिश्वास, उस्ताद वासिफुद्दीन डागर, डॉ. सुचेता चापेकर, पद्मभूषण सी. व्ही. चंद्रशेखर, मंदाकिनी त्रिवेदी, डॉ. आर. गणेश, पद्मभूषण तिजन बाई हे विख्यात कलावंत तसेच गुरू सहभागी होणार आहेत, अशी माहिती महागामीच्या प्रमुख पार्वती दत्ता यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली. या वेळी एमजीएमचे विश्वस्त अंकुशराव कदम, प्राचार्या रेखा शेळके यांची उपस्थिती होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दलालाने उघडले आयुक्तांसमोर तोंड

$
0
0

औरंगाबाद : महेबुब घौरी खून प्रकरणात पोलिस अधिकाऱ्यासाठी 'तोडीपाणीची सेटलमेंट' करणाऱ्या दलालाची पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी स्वतः सोमवारी सायंकाळी चौकशी केली. या चौकशीत मिळालेल्या माहितीवरून क्रांतिचौक पोलिस ठाण्यातील दोषी अधिकाऱ्यांवर कारवाईची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली.
महेबुब घौरी या तरुणाचा नववर्षाच्या रात्री मारहाणीत मृत्यू झाला आहे. मद्याची पार्टी झाल्यानंतर लॉजमध्ये मैत्रिणीसोबत थांबण्यावरून वाद झाल्याने प्रशांत म्हस्के व प्रमोद निर्मल या दोघांनी त्याला मारहाण केली होती. या घटनेच्या दोन तरूणी साक्षीदार होत्या. पोलिस चौकशी दरम्यान क्रांतिचौक पोलिस ठाण्यातील दोन महिला अधिकाऱ्यांनी तसेच एका पीएसआयने त्यांचा अमानुष छळ केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी एका तरुणीच्या आईकडून ३५ हजार रुपये, दोन आरोपींकडून पाच लाख रुपये उकळल्याचा आरोप देखील या ‌महिला साक्षीदाराने केला आहे. दरम्यान आरोप करणाऱ्या या तरुणीची पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी चौकशी केली. त्यामध्ये तिने पैशाच्या व्यवहारामध्ये 'सेटलमेंट' करणाऱ्या दलालाचे नाव सांगितले होते. या दलालाला आपल्यासमोर हजर करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले. त्याची कसून चौकशी केली असता त्याने महत्त्वपूर्ण माहिती दिली असल्याचे सूत्रांनी सांगितले. त्याने दिलेल्या माहितीवरून चौकशीमध्ये काही तथ्य आढळल्यास दोषी पोलिस अधिकाऱ्यांवर कारवाई होण्याची दाट शक्यता या सूत्रांनी वर्तवली.
समतानगरातील महेबुब गुजर घौरी या तरुणाच्या खूनप्रकरणी संशयित आरोपी प्रशांत केशव म्हस्के व प्रमोद जयवंतराव निर्मळ या दोघांना क्रांतिचौक पोलिसांनी सोमवारी (११ जानेवारी) अटक केली. दोघांना मंगळवारी कोर्टात हजर करण्यात आले असता, पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी त्यांच्या दालनात आपल्याला मारहाण केली असल्याची तक्रार दोघांनी केली. मुख्य न्यायदंडाधिकारी ए. एच. सय्यद यांनी त्याची नोंद घेत दोघांना रविवारपर्यंत (१७ जानेवारी) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

१३४ वाहनचालकांना घरपोच दंडाची पावती

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
बेशिस्त वाहनचालकांना शिस्त लागावी, यासाठी विविध जनजागृतीपर कार्यक्रम सुरू असतानाच दुसरीकडे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत नियम तोडणाऱ्यांना थेट घरपोच पावतीही देण्याचे काम पोलिसांनी सुरू केले आहे. नियम तोडताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेल्या १३४ जणांना या आठ दिवसांत घरपोच दंडाची पावती पोहचविण्यात आली आहे.
तुम्ही सिग्नल तोडला. रस्त्यावरून बेशिस्त वाहतूक केली, तर तुम्हाला दंडाची पावती घरपोच मिळेल. या नाठाळांना सीसीटीव्हीत कैद करून वठणीवर आणण्याचे काम शहर पोलिसांनी गेल्या आठ ते दहा दिवसापासून हाती घेतले आहे. शहरातील रस्ते, तेथील वाहतूक व्यवस्था कशी यावरच त्या त्या शहराची प्रतिमा अन्यत्र उमटत असते. पर्यटनाची राजधानी असलेल्या आपल्या शहरात बेशिस्त वाहनचालकांना शिस्त लागावी, यासाठी पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी आयुक्तपदाचा पदभार स्वीकारल्यापासून विशेष प्रयत्न सुरू केले आहेत. गजाजन महाराज मंदिर चौकासह अन्य वर्दळीच्या चौकाचा श्वास मोकळा करणे, विविध भागात वाहतुकीस अडथळा निर्माणे अतिक्रमणे हटविणे, आदी काम शहर पोलिस विभागाने केले.
ट्रॅव्हल्स बससह जड वाहनांना शहरातील प्रवेशाबाबत वेळेचे निर्बंध घालण्यात आले असून ट्रिपल सीट जाणाऱ्या युवकांना पालकासह उपस्थित राहून अपघात कसे होतात, यावर आधारित फिल्मही दाखवून त्यांचे प्रबोधन केले जात आहे. कसोशीने प्रयत्न होत असतानाच सर्वच ठिकाणी वाहतूक पोलिस सदैव उपस्थित असतील असे नाही. त्याचाच गैरफायदा घेत बेशिस्त चालक वाहतुकीच्या नियम सर्रासपणे तोडताना दिसतात. हीच बाब पोलिसांनी गांभीर्याने घेतली व अशा चालकांवर कारवाई करण्यासाठी महावीर चौकासह शहरातील विविध भागात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची मदत घेण्यास सुरुवात केली.
सिग्नल तोडला किंवा वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणारा वाहनचालक कॅमेऱ्यात कैद झाल्यास त्यावर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. यात आतापर्यंत १३४ जणांवर कारवाई करण्यात आली असून त्यांना घरपोच दंडाची पावती देण्यात आली आहे. यात प्रामुख्याने जालना रोडवर नियम तोडणाऱ्यावर अधिक कारवाई झाली आहे. त्यात सिग्नल तोडणे, रॉँग साइड जाणे यांच्यावर अधिक भर दिल्याचे सूत्रांनी सांगितले.

बेशिस्त वाहन चालकांना शिस्त लागावी, यासाठीच घरपोच दंडाची पावती, हा प्रायोगिक उपक्रम हाती घेण्यात आला आहे. रॉँग साइड, सिग्नल तोडणे अशा वाहनचालकांवर प्रामुख्याने कारवाई करण्यात आली आहे.
- खुशालचंद बाहेती, सहायक पोलिस आयुक्त, वाहतूक शाखा

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


विद्यार्थिनीवर शिक्षकांचा बलात्कार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नांदेड

आश्रमशाळेतील ११ वर्षांच्या विद्यार्थिनीवर दोन शिक्षकांनी दोन वेळा बलात्कार केल्याचे उघड आले आहे. या विद्यार्थिनीला नांदेडच्या सरकारी रुग्णालयात तपासणीसाठी आणण्यात आले आहे.

सदानंद डांगे आणि इबिबतार अशी आरोपी शिक्षकांची नावे आहेत. ही बालिका भोकर तालुक्यातील मोखंडीची मूळ असून, अर्धापूर तालुक्यामध्ये सध्या राहते. शिक्षणासाठी तिला चाबरा तांडा (ता. हदगाव) येथील आश्रमशाळेत दाखल करण्यात आले होते. या दोन्ही शिक्षकांनी दिवाळीनंतर दोन वेळा अत्याचार केले होते. या वेळी बालिकेने अन्य शिक्षकांना माहिती दिली होती. मात्र, कोणीही तिची मदत केली नाही. दिवाळीनंतर आई-आजीकडे आल्यानंतर, तिने घडला प्रकार सांगितला. त्यानुसार, मनाठा पोलिसांमध्ये बलात्काराचा गुन्हा दाखल केला असून. सहायक पोलिस निरीक्षक मोहन भोसले या गुन्ह्याचा तपास करीत आहेत. दरम्यान, दोन्ही शिक्षक फरार झाले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘सीएम’ दौरा गाठीभेटींवरच भर

$
0
0

सुरेश कुलकर्णी, जालना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोमवारच्या जालना दौऱ्यामध्ये जिल्ह्यातील सर्वपक्षीय नेत्यांमध्ये सामंजस्याचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे, या दौऱ्यात मुख्यमंत्र्यांनी प्रमुख नेत्यांच्या निवासस्थानी भेटी घेतल्या असल्या, तरी नवोदितांच्या अपेक्षा भंग पावल्या आहेत. मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याची सुरुवात जवखेडा बुद्रुक या भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या गावातून झाली. प्रदेशाध्यक्षांच्या निगराणीखाली राबविण्यात आलेल्या जलयुक्त शिवार कार्यक्रमाची मुख्यमंत्र्यांनी बराच वेळ देऊन पाहणी केली. भोकरदन आणि जाफराबाद तालुक्यातील शेतकरी खूप मोठ्या संख्येने जवखेड्याला जमले होते. त्यातून स्वाभाविकच त्यांना जालन्यात पोहोचण्यास उशीर झाला. पूर्वनियोजित दौऱ्यामध्ये ते थेट कडवंची येथे जाणार होते. तेथे जलयुक्त शिवार आणि कृषीभूषण विजयआण्णा बोराडे यांनी विकसित केलेल्या माती, जलसंधारण कामाला भेट देण्याचे नियोजन होते. मात्र, हा कार्यक्रम रद्द करण्यात आला. ते सव्वा तीन वाजता जालन्यात आले आणि शहरातील स्टील आणि सीड्‌स उद्योजक, व्यापारी यांनी आयोजित केलेल्या 'बिझनेस मीट'मध्ये सहभागी झाले. या पूर्वनियोजित कार्यक्रमातूनच जालना जिल्ह्याला दौऱ्याचा बोनस मिळाला होता. या कार्यक्रमामुळे सीड्‌स आणि स्टील उद्योजकासोबत व्यापारी सुखावले. याच ठिकाणी झालेला शेतकरी मेळाव्याचा कार्यक्रम पूर्वनियोजित वेळेपेक्षा दोन तास अधिक चालला. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी परतीचे हेलिकॉप्टर रद्द करून, जिल्हाधिकारी कार्यालयातील विकास कामांचा आढावा बैठक घेण्यासाठी ते निघाले. तत्पूर्वी पालकमंत्री बबनराव लोणीकर यांच्या निवासस्थानी मुख्यमंत्र्यांनी धावती भेट दिली. राज्य सरकारने गोहत्या बंदी कायदा केला, याचा गौरव म्हणून मुख्यमंत्र्यांचा पालकमंत्री बबनराव लोणीकरांनी एक मोठी प्रतिकात्मक गाय वासरूची मूर्ती देऊन सत्कार केला. जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठक आटोपताच मुख्यमंत्र्यांच्या खासगीत भेटीगाठी प्रारंभ झाल्या. यात ते सर्वप्रथम माजी पालकमंत्री राजेश टोपे यांच्या निवासस्थानी मुख्यमंत्री पोहोचले. टोपे परिवाराने त्यांचे अत्यंत जोरदार स्वागत केले. माजी खासदार अंकुशराव टोपे यांनी मुख्यमंत्र्यांचा विशेष सत्कार केला. भाजपचा जालन्यात पाया रचणारे स्व. वसंतराव सेलगांवकर यांना त्यांच्या घरात जाण्यासही मुख्यमंत्री विसरले नाहीत. यानंतर मुख्यमंत्र्यांनी काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंट्याल यांची भेट घेतली. त्यानंतर ते आमदार अर्जुन खोतकर यांच्या निवासस्थानी गेले. या गडबडीत जालन्यातील सीना नदीच्या पात्रात लोकसहभागातून उभारण्यात आलेल्या शिरपूर बंधाऱ्याचे काम बघण्याचा कार्यक्रमही पूर्णत्वास जाऊ शकला नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नांदेड जिल्ह्याच्या विकासासाठी एकत्र येऊ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नांदेड

माळेगाव यात्रेसह संपूर्ण जिल्‍ह्याचा विकास व्‍हावा, यासाठी राजकीय मतभेद बाजूला सारून सर्वजण एकत्र येऊ आणि नांदेड जिल्हा राज्यात पहिल्या क्रमांकावर नेऊ, असे आवाहन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी मंगळवारी केले. माळेगाव यात्रेतील लावणी महोत्सवाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. लावणी महोत्सवाच्या अध्यक्षस्थानी चव्हाण होते, तर उद्घाटक म्‍हणून शिवसेना आमदार प्र‍ताप पाटील चिखलीकर यांची उपस्थिती होती. या वेळी आमदार डी. पी. सावंत, अमरनाथ राजूरकर, वसंतराव चव्‍हाण, अमिता चव्‍हाण, महापौर शैलजा स्‍वामी, जिल्‍हा परिषद अध्‍यक्षा मंगला गुंडले उपस्थित होते. या वेळी अशोक चव्हाण म्हणाले, 'मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माळेगाव यात्रेसाठी साडेपाच कोटी रुपये निधी दिले आहेत, त्याबद्दल त्‍यांचे आभार व्‍यक्‍त करतो. येथील खंडोबा मंदिराच्या अंतर्गत विकासासाठी डीपीडीसी अंतर्गत निधी उपलब्‍ध करून दिला जाईल. कलावंत आणि यात्रा विकास व्‍हावा, यासाठी माझ्या मुख्‍यमंत्रिपदाच्‍या काळात सांस्‍कृतिक धोरण, विठाबाई नारायणगावकर पुरस्‍कार आदींच्‍या माध्‍यमातून राजमान्‍यता देण्‍याचा प्रयत्‍न केला.' या वेळी त्यांनी जिल्हा परिषदेचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी अभिमन्‍यू काळे यांच्या कामाचे कौतुक केले. लावणी महोत्‍सवात सुरेखा पुणेकर यांच्‍यासह प्रेमकुमार मस्‍के, विद्या काळे, श्‍यामल सुनील लखनगांवकर, वैशाली वायफळेकर, आशा रुपा परभणीकर आदी कलासंचांनी आपल्‍या लावणीचे सादरीकरण केले.

शेतकऱ्यांसाठी ध्‍यानधारणा सततची नापिके, दुष्‍काळ यामुळे राज्‍यातील शेतकरी हैराण झाला असून त्‍याचा ताणतणाव कमी करण्‍यासाठी जिल्‍हा परिषदेच्‍या कृषि प्रदर्शनात शेतकऱ्यांसाठी ध्यानधारणेचे प्रशिक्षण देण्यात आले. सातत्याने ध्यानधारणा केल्यानंतर तणाव कमी होऊ शकतो, याचे प्रात्यक्षिकही दाखविण्यात आले. या ठिकाणी डॉ. बी. जी. पोलावार, प्रा. बालाजी शेट्टी, प्रा. संजय राऊत यांनी प्रात्‍यक्षिकांसह ध्‍यानसाधनाच्‍या पद्धती सांगत आहेत.

मोबाइलवरून शेताला पाणी माळेगाव यात्रेत शेती तंत्रज्ञानाचे नवनवे विकसित यंत्र प्रदर्शनात ठेवण्‍यात आले असून, शेतातील मोटारीवर घरबसल्‍या नियं‍त्रण ठेवण्‍यासाठी मोबाईल ऑटो यंत्र विकसित झाले आहे. या यंत्राव्‍दारे शेतातील मोटार पंप चालू करणे, बंद करणे सुलभ होणार आहे. या यंत्रात मोबाइल सीमकार्ड असून मोटारीत बिघाड झाल्‍यास, दाब कमी झाल्‍यास, पाणी संपल्‍यास, लाइट गेल्‍यास हे यंत्र मेसेज आणि फोनवरून समजते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गंधारेंसह ११ जणांची चौकशी

$
0
0

Ashish.Choudhari@timesgroup.com
औरंगाबाद ः अमरावती येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य व औरंगाबाद शासकीय अभियांत्रिकी कॉलेजचे तत्कालीन प्राचार्य डॉ. वा. झि. गंधारे यांना गैरव्यवहाराचा ठपका ठेवून निलंबित करण्यात आले. आता त्यांच्यासह एकूण ११ प्राध्यापक व कर्मचाऱ्यांच्या भ्रष्टाचाराची सखोल चौकशी करण्याचे आदेश तंत्रशिक्षण संचालनालयाने दिले आहेत. याप्रकरणी वसूलपात्र रकमेचे विवरण सादर करण्याचे आदेश शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्राचार्यांना दिले आहेत.

प्राचार्य डॉ. गंधारे यांच्यावर तंत्रशिक्षण विभागाने तीन महिन्यांपूर्वी निलंबनाची कारवाई केली होती. औरंगाबाद येथे प्राचार्य असताना केलेल्या गैरप्रकारांचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला होता. आता या भ्रष्टाचाराची सखोल चौकशी करण्याचे आदेश तंत्रशिक्षण संचालनालयाने दिले आहेत. यासंदर्भात २३ डिसेंबर २०१५ रोजी संचालनालयाने पत्र पाठविल्यानंतर खळबळ उडाली आहे. डॉ. गंधारे २००४ ते २०१२ दरम्यान येथे प्राचार्य म्हणून कार्यरत होते. त्यावेळी निकष डावलून बांधकाम केल्याचा ठपका ठेवून गैरव्यवहाराची चौकशी करण्याचे या पत्रात म्हटले आहे. सरकारचे नुकसान व त्या संबंधित व्यक्तीनिहाय वसूलपात्र रकमेचे विवरणपत्र सादर करायचे अाहे. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांच्या कालावधीत केलेल्या खरेदीबाबतची माहिती सादर करावी, असे या पत्रात स्पष्ट करण्यात आले आहे.

यांचीही चौकशी
डॉ. गंधारे यांच्यासह कॉलेजचे काही कर्मचारी, प्राध्यापकांनाही दोषी धरण्यात आले आहे. त्यात ए. एच. ए. शेख, एस. डी. जाधव, बी. के. खंदारे, जी. एन. सोळुंके, डॉ. वाय. एम. घुगल, ए. एस. भालचंद्र, डॉ. एम. एस. जोशी, ए. जी. ठोसर, प्रा. वाय. यू. साठे, प्रा. एम. जी. राठी यांची नावे आहेत.

दोषारोपाचे स्वरूप
डॉ. गंधारेंवरील आरोप ः खरेदी करताना वित्तीय मर्यादेचे सर्रास उल्लंघन करणे, विकास निधीमधील पैसे नियमाबाह्यपणे बांधकामासाठी वापरणे, संस्थेतील विकासनिधीची ३ कोटी ८४ लाख ९९ हजार ८२० रक्कम संचालकांच्या मान्यतेशिवाय खर्च करणे, विकास निधीमध्ये २००९-१०अखेर शिल्लक नसताना ५७ लाख १७ हजार ८७१ एवढी जादा रक्कम खर्च करणे, पेव्हर ब्लॉक जास्त दराने खर्च करणे.

प्रशासकीय अधिकारी, अधीक्षक, लेखापालांवरील आरोप ः जमा-खर्च नोंदवही, खातेवही न ठेवणे, केलेल्या खर्चाचे कोणतेही दस्तऐवज लेखा विभागात उपलब्ध नसणे, तपशीलाची खातरजमा न करणे.

प्राध्यापकांवरील आरोप ः दरपत्रक न मागविता खरेदी करणे, अधिकाराचा दुरुपयोग करणे, स्वतःच्या फायद्यासाठी शासकीय रकमेचा दुरुपयोग करणे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कामगार कंत्राटदार हद्दपार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ रोजंदारी कामगारांसाठी एम्पॉयमेंट प्रमोशन प्रोग्राम (ईपीपी) राबविणार आहे. कंत्राटदाराला हद्दपार करून ईपीपीचा स्वीकार करण्याचे आश्वासन प्रशासनानेतर्फे देण्यात आल्याने कामगारांनी सोमवारपासून सुरू केलेले कामबंद आंदोलन मागे घेतले. 'ईपीपी'पद्धतीबाबत मात्र कामगारांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.

विद्यापीठ सेवेत सेवाज्येष्ठतेनुसार सामावून घ्यावे, या मागणीसाठी विद्यापीठातील रोजंदारी कामगारांनी सोमवारपासून कामबंद आंदोलन सुरू केले होते. विद्यापीठाच्या मुख्य इमारतीसमोर ठिय्या आंदोलन करत कामगारांनी कामकाजावर पूणपणे बहिष्कार टाकला होता. यामुळे कामाकाजावर परिणाम झाला होता. मंगळवारीही दुपारपर्यंत आंदोलन सुरूच होते. त्यामुळे विद्यापीठ कामकाजावर दुसऱ्या दिवशीही परिणाम झाला. दुपारी कुलसचिवांनी कामगारांची भेट घेऊन विद्यापीठाची भूमिका मांडली. एम्पॉयमेंट प्रमोशन प्रोग्रामअंतर्गत (ईपीपी) कामगारांना नेमण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी दिले. सध्या हे कामगार कंत्राटदारामार्फत नेमले जातात. यातील अनेक कामगार दहा-बारा वर्षांपासून काम करतात. यापुढे कंत्राटदारामार्फत कामगार न नेमता, कामगारांची रोजगार व स्वयंरोजगार विभागात नोंदणी करून थेट विद्यापीठ त्यांना सामावून घेईल. याअंतर्गत अकुशल कामगारांना ८ हजार, कुशल कामगारांना १० हजार रुपये पगार दिला जाईल, असे आश्वासन कुलसचिवांनी दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images