Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

निवासी वसतिगृहामुळे स्थलांतर थांबले

0
0

म. टा. प्रतिनिधी, नांदेड

सर्व शिक्षा अभियानातंर्गत शिक्षण विभागामार्फत चालवल्या जाणाऱ्या हंगामी निवासी वसतिगृहामुळे विद्यार्थीनींचे स्थलांतर थांबले, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या सदस्या वर्षा भोसीकर यांनी केले.

कंधार तालुक्यातील फुलवळ येथील हंगामी वसतिगृहाच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. शालेय समिती अध्यक्ष मधुकर डांगे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे सरपंच बालाजी देवकांबळे, केंद्र प्रमुख विठ्ठल आचने, मुख्याध्यापक बेबी हजेरा, हणमंतराव पेठकर, कृष्णा भोसीकर, सदाशिवराव मंगनाळे, भीमराव स्वामी, अमलापुरे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी वर्षा भोसीकर यांच्या हस्ते फीत कापून वसतिगृहाचे उद‍‍‍‍‍्घाटन करण्यात आले. सावित्रीबाई फुले व सरस्वती देवी यांच्या प्रतिमांचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. याप्रसंगी बोलताना भोसीकर म्हणाल्या, 'ग्रामीण भागातील ऊस तोड कामगार तसेच विठभट्टी कामगार हे मोठ्याप्रमाणावर स्थलांतरित होत असतात. त्यांच्या सोबत त्यांची मुले सुद्धा जातात. त्यामुळे वर्षातील तीन ते चार महिने शिक्षणापासून वंचित राहतात. हे थांबवण्यासाठी व विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी सर्व शिक्षा अभियानातर्गत शिक्षण विभागा मार्फत अशा विद्यार्थ्यांसाठी हंगामी वसतिगृह चालवण्यात येतात. या विद्यार्थ्यांची जेवणाची व राहण्याची व्यवस्था मोफत करण्यात येते. त्यामुळे त्यांची शाळा बुडणार नाही, याची दक्षता घेतली जाते.'

कंधार तालुक्यात १९ हंगामी वसतिगृहे चालू करण्यात आली आहेत. ९३३ विद्यार्थी या योजेनेचे लाभ घेत आहेत. फुलवळ येथील वसतिगृहामध्ये ५२ विद्यार्थी आहेत. या सर्व विद्यार्थ्यांची योग्य प्रकारे काळजी घ्यावी अशी सूचना उद्घाटनप्रसंगी भोसीकर यांनी व्यवस्थापन समितीला दिली. प्रास्ताविक केंद्रप्रमुख आचने यांनी केले. सूत्रसंचालन सुभाष राठोड यांनी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पथकांना सापडेनात वाहने

0
0

म. टा. प्रतिनिधी, पैठण

वाळू चोरी रोखण्यासाठी महसूल विभागाने स्थापन केलेली वाळू विरोधी पथके अद्याप कागदावरच आहेत. या पथकाचा वाळूचोरी व अवैध वाळू वाहतुकीवर कोणताच परिणाम झालेला नाही. गेल्या १५ दिवसांत महसूल विभागाने केवळ सहा वाहनांवर कारवाई केली.

पैठण शहर व तालुक्यात गोदावरी नदीतून अवैध वाळू उत्खनन व वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरू आहे. नव्याने रुजू झालेले तहसीलदार किशोर देशमुख यांना वाळू चोरी कशी रोखावी हे सुरुवातीच्या १५ दिवसांत काहीच समजले नाही. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर २८ डिसेंबर रोजी एक भरारी व दोन स्थायी पथकांची स्थापना करण्यात आली. या पथकात प्रत्येकी तीन सदस्य असून, त्यांच्यावर सायंकाळी सहा ते सकाळी सहा या वेळेत होणारी वाळू चोरी रोखण्याची जबाबदारी देण्यात आली आहे.

वाळू विरोधी पथकांची स्थापना झाल्यावर तालुक्यातील वाळू चोरीला काहीअंशी लगाम बसेल, अशी अपेक्षा होती. मात्र, तिन्ही वाळू विरोधी पथकांनी तीन ट्रॅक्टर, दोन हायवा ट्रक व एक टाटा अनन अशा सहा वाहनांवर कारवाई केली. या वाहनांकडून चार लाख १२ हजार ५७५ रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. याबद्दल विचारणा केली असता तहसीलदार किशोर देशमुख यांनी येत्या काही दिवसांत कारवाई तीव्र करणार असल्याची माहिती दिली.

पैठण शहर, वडवळी, नायगाव, वाघाडी, आवडे उंचेगाव, हिरडपुरी, आपेगाव, टाकळी अंबड या गावातील गोदावरी जेसीबी मशिनच्या साह्याने उत्खनन करून वाळू चोरी सुरू आहे. ही वाळू सायंकाळी पाच ते सकाळी नऊपर्यंत वाहतूक करण्यात येत आहे. वाळू चोरी रोखण्याच्या मागणीसाठी वडवळी येथील ग्रामस्थांनी प्रशासनाला निवेदन दिले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तर ५० कोटींचा बोजा!

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

सातारा-देवळाईसाठी झालेल्या सुनावणीत नागरिकांनी नगर पालिकेला पसंती दिली असली तरी राज्य शासनाने यावर शिक्कामोर्तब केल्यानंतरच अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. या भागात नगर पालिका झाली तर इमारत व इतर पायाभूत सुविधांसाठी शासनाला ५० कोटी रुपयांचा खर्च तत्काळ द्यावा लागणार आहे. वेतनापोटी वेगळा खर्च करावा लागणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या सुनावणीचा अहवाल शुक्रवारी (१५ जानेवारी) शासनाकडे पाठवण्यात आला.

सातारा-देवळाई नगर पालिकेचे अस्तित्व रद्द करण्याबाबत हरकती आणि सूचनांवर सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन सभागृहामध्ये सुनावणी घेण्यात आली. प्रत्यक्ष सुनावणीमध्ये ६६९ जणांनी प्रत्यक्ष सहभाग घेतला असला तरी प्रशासनाकडे ४ हजार ३८५ हरकती व सूचना प्राप्त झाल्या होत्या. जिल्हाधिकारी डॉ. निधी पांडेय यांच्या समक्ष झालेल्या या सुनावणीमध्ये नागरिकांनी महापालिकेला डावलत नगरपालिकेला पसंती दिली. हा अहवाल शासनदरबारी पाठवण्यात आला आहे.

सातारा व देवळाई हा भाग महापालिकेत की नगर पालिकेत असा प्रश्न निर्माण झाला होता. शहरालगत असलेल्या महत्त्वाच्या‌ रहिवाशी भागांपैकी एक असलेल्या सातारा आणि देवळाई भागातील ७५ हजार रहिवाशांची अवस्था लोलकासारखी झाली होती. गेल्या काही दिवसांपासून या भागात कोणतेही कामे झालेली नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. सुनावणीनंतर आता शासनाने जर सातारा-देवळाईमध्ये नगर पालिका करण्याचा निर्णय घेतला तर, या ठिकाणी तत्काळ इमारत उभारावी लागणार असून पाणीपुरवठा, स्वच्छतेसाठी कर्मचाऱ्यांची नियुक्ती व वाहनांवरही खर्च करावा लागणार आहे. जर नगर पालिका झाली तर कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी तसेच स्वच्छता कर्मचारी असा एकूण १५० ते १७५ कर्मचाऱ्यांची आवश्यकता राहील. यांच्या पगाराचा अतिरिक्त बोजाही शासनावर पडणार आहे.

सुनावणी अहवाल शासनाकडे

सोमवारी झालेल्या सुनावण्यांचा अहवालावर जिल्हाधिकारी डॉ. निधी पांडेय यांच्या स्वाक्षरीनंतर शुक्रवारी हा अहवाल शासनाकडे पाठवण्यात आला. सातारा देवळाई नगरपालिकेचे अस्तित्व रद्द करण्यासाठी झालेल्या सुनावण्यांसाठी ४ हजार ३८५ हरकती प्राप्त झाल्या असल्या तरी प्रत्यक्षात सुनावणीला ६६९ जणांनी हजेरी लावली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दोन पिवळे वाघ मध्य प्रदेशात नेणार

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
महापालिकेच्या सिद्धार्थ उद्यानातील प्राणिसंग्रहालयामधील नकुल आणि दुर्गा हे दोन पिवळे वाघ 'मुकुंदपूर झू' (सतना) येथे पाठविण्यात येणार आहेत. त्यांना नेण्यासाठी मध्य प्रदेशच्या वनखात्याची टीम शुक्रवारी दाखल झाली. दोन वाघांच्या हस्तांतराची प्रक्रिया शनिवारी सकाळी पूर्ण केली जाणार आहे.

सतना येथील मुकुंदपूर प्राणिसंग्रहालय नव्याने सुरू केले जाणार आहे. तेथे देशातील विविध प्राणिसंग्रहालयातून प्राणी आणले जाणार आहेत. औरंगाबादच्या प्राणिसंग्रहालयातून दोन पिवळे वाघ मिळावेत यासाठी मुकुंदपूर प्राणिसंग्रहालयाच्या संचालकांनी सेंट्रल झू ऑथॅरिटीकडे परवानगी मागितली होती. ऑथॅरिटीने परवानगी दिल्यावर दोन वाघ तेथे पाठवण्याचे निश्चित करण्यात आले. त्यासाठी ७ जानेवारी रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेत पालिकेच्या प्रशासनाने प्रस्तावच ठेवला आणि नकुल व दुर्गा हे दोन वाघ मुकुंदपूरला पाठवण्याची परवानगी घेतली. हे दोन्ही वाघ साधारणपणे दोन वर्षांचे आहेत. त्यांचा जन्म औरंगाबादच्याच प्राणिसंग्रहालयात झाला आहे. नकुल आणि दुर्गाला घेऊन जाण्यासाठी मुकुंदपूर प्राणिसंग्रहालयाची आठ जणांची टीम शुक्रवारी दुपारी दाखल झाली.

या टीमने येतानाच सोबत दोन पिंजरे आणले आहेत. दोन वाघांना दोन पिंजऱ्यात घालून उद्या सकाळी दहाच्या सुमारास मुकुंदपूरकडे रवाना केले जाणार आहे. सिद्धार्थ उद्यानाच्या प्राणिसंग्रहालयात नऊ पिवळे वाघ आहेत. त्यापैकी दोन वाघ आता मुकुंदपूरला दिले जात असल्यामुळे प्राणिसंग्रहालयात सात पिवळे वाघ शिल्लक राहतील.


विरहामुळे वाघांचा अन्यत्याग
सिद्धार्थ उद्यानाच्या प्राणिसंग्रहालयातील रिद्धी ही पिवळी वाघीण आणि कैफ हा पांढरा वाघ मार्च महिन्यात पुणे येथील प्राणिसंग्रहालयासाठी देण्यात आला. हे दोन वाघ पुण्याला पाठवल्यानंतर प्राणिसंग्रहालयातील अन्य वाघांनी तीन - चार दिवस वाघांच्या विरहामुळे अन्न त्याग केला होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

५७२ पक्ष्यांना मिळाली मराठी नावे!

0
0

Tushar.Bodkhe@timesgroup.com

औरंगाबादः एकाच पक्ष्याची महाराष्ट्रात निरनिराळी नावे असल्यामुळे शास्त्रीय अभ्यासात गोंधळ उडतो. प्रत्येक पक्ष्याला शास्त्रशुद्ध मराठी नाव देण्यासाठी बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी व महाराष्ट्र पक्षीमित्र संघटनेने संयुक्त अभ्यास प्रकल्प राबवला. याअंतर्गत तब्बल ५७२ पक्ष्यांचे मराठी नामकरण झाले. या नवीन नावांच्या यादीचे सावंतवाडी येथील पक्षी संमेलनात प्रकाशन करण्यात येणार आहे.

'किंगफिशर' पक्ष्याला मराठीत 'खंड्या', 'बंड्या', 'धिवर', 'ढिवर' अशी नावे आहेत. विदर्भ, कोकण, मराठवाडा या भागात आणखी स्थानिक नावे आढळतात. एकाच पक्ष्याच्या विविध नावांमुळे पक्षी अभ्यासकांचा गोंधळ उडतो. 'ब्ल्यू थ्रोट' या पक्ष्याला काहीजण 'नीलकंठ' म्हणतात. पण, 'इंडियन रोडरनर' पक्ष्याचे नावसुद्धा 'नीलकंठ' आहे. मग 'ब्ल्यू थ्रोट' पक्ष्याला काय म्हणावे, असा प्रश्न अभ्यासकांना पडतो. पक्ष्यांची इंग्रजी नावे आणि प्रदेशानुसार बदलत्या स्थानिक नावाचा गोंधळ कायम होता. हा सावळागोंधळ थांबवून प्रत्येक पक्ष्याची गुणवैशिष्ट्ये पाहून मराठी नाव देण्यासाठी मुंबईच्या बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी व महाराष्ट्र पक्षीमित्र संघटनेने संयुक्त अभ्यास प्रकल्प राबवला. या प्रकल्पाचे समन्वयक व शास्त्रज्ञ डॉ. राजू कसंबे यांनी या कामाची 'महाराष्ट्र टाइम्स'ला सविस्तर माहिती दिली.

'पक्ष्यांचे मराठी नामकरण आव्हानात्मक होते. सोशल साइटवर प्राथमिक यादी प्रकाशित करून लोकांकडून प्रतिक्रिया मागवल्या. लोकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला आणि पक्षीप्रेमींनी नवीन नावे सूचवली. अभ्यासक व शास्त्रज्ञांनी पुन्हा चर्चा करून ५७२ पक्ष्यांची मराठी नावे निश्चित केली' असे डॉ. कसंबे यांनी सांगितले. विशेष म्हणजे नवीन नावे शास्त्रीय अभ्यासासाठी प्रचलित होणार आहेत; मात्र, पक्ष्यांची प्रादेशिक नावे कायम राहतील. कारण, पक्ष्याची बहुविध नावे मराठी भाषेचा समृद्ध ठेवा असल्याचे अभ्यासकांचे एकमत आहे. दरम्यान, या महत्त्वाच्या संशोधनात संस्कृतचा प्रभाव कमी करून प्रचलित मराठी भाषेवर भर दिला आहे. त्यामुळे पक्ष्यांची नावे उच्चारताना अडचण जाणवणार नाही. नवीन यादीनुसार 'ब्ल्यू थ्रोट' पक्ष्याला 'शंकर', 'श्राइक'ला 'खाटीक' नाव मिळाले आहे.

यादी प्रकाशित करणार

पक्ष्यांच्या इंग्रजी नावाला मराठी पर्याय सूचवणारी ५७२ पक्ष्यांची यादी प्रकाशित करण्यात येणार आहे. सावंतवाडी येथे २२ जानेवारीला पक्षी संमेलन होणार आहे. या संमेलनात ही यादी प्रकाशित होईल. त्यानंतर नवीन नावांची पुस्तिका प्रकाशित केली जाणार आहे.

शास्त्रीयदृष्ट्या अभ्यास करण्यासाठी एकच मराठी नाव असावे हा संशोधनाचा उद्देश आहे. पक्ष्याची वैशिष्ट्ये विचारात घेऊन इंग्रजी नावाला मराठी पर्याय दिला आहे. अभ्यासकांना याचा निश्चित फायदा होईल.

- डॉ. राजू कसंबे, शास्त्रज्ञ, बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फ्लेमिंगोची प्रतीक्षा सर्वांनाच!

0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
पाणी पातळीतील बेमोसमी वाढ आणि खाद्याचा अभाव पक्ष्यांची संख्या घटण्यास कारणीभूत ठरला आहे. सध्या जायकवाडी धरणात पाणी असूनही दरवर्षीच्या तुलनेत पक्ष्यांची संख्या कमी आहे. 'फ्लेमिंगो'च्या आगमनाची वाट पक्षीप्रेमी पाहत आहेत. तिसऱ्या पक्षी महोत्सवानिमित्त शनिवारी सकाळी जायकवाडी परिसरात पक्षी निरीक्षणाचा उपक्रम घेण्यात आला. यावेळी पक्षीप्रेमींनी महत्त्वाच्या नोंदी घेतल्या.
एन्व्हॉयरमेन्टल रिसर्च फाउंडेशन अँड एज्युकेशनल अॅकॅडमीने तिसरा पक्षी महोत्सव आयोजित केला आहे. या महोत्सवात शनिवारी सकाळी पक्षी निरीक्षण उपक्रम राबवण्यात आला. या उपक्रमात पक्षीप्रेमी, अभ्यासक व विद्यार्थी सहभागी झाले. सध्या थंडी कमी असून पक्ष्यांसाठी अनुकूल वातावरण नाही. या घटकांचा पक्ष्यांच्या संख्येवर परिणाम झाला आहे. दरवर्षीच्या तुलनेत जायकवाडी अभयारण्यातील पक्षी संख्या तुलनेने कमी आहे. जायकवाडीचे खास आकर्षण असलेल्या फ्लेमिंगो पक्ष्याचे आगमन जानेवारी महिन्याच्या शेवटी होण्याची शक्यता आहे. सध्या तुरळक फ्लेमिंगो आहेत. या उपक्रमात पक्षी पाहण्यासाठी विद्यार्थ्यांनी गर्दी केली. दुर्बिणीद्वारे पक्षी निरखून पाहत त्याची शास्त्रीय माहिती जाणून घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी पक्षी महोत्सवाचे संयोजक डॉ. दिलीप यार्दी यांना गराडा घातला. तर वन्यजीव छायाचित्रकारांनी पक्ष्यांना कॅमेऱ्यात बंदिस्त केले. फ्लेमिंगोची संख्या कमी असून 'स्वॅलो', 'किंगफिशर', 'ग्लॉसी आय', 'ब्ल्यू थ्रोट' अशा ८३ पेक्षा अधिक पक्ष्यांच्या जाती आढळल्या. बदकांची संख्या सर्वाधिक आहे. दरम्यान, पक्षी गणनेसाठी जायकवाडी अभयारण्यात १३ केंद्र आहेत. २० डिसेंबर व १० जानेवारीला पक्षी गणना करण्यात आली. या गणनेचा अंतिम अहवाल आल्यानंतर संख्या जाहीर करण्यात येईल. मात्र, दरवर्षीच्या तुलनेत पक्षी कमी आहेत, अशी माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी मनोज कापुरे यांनी दिली. या उपक्रमासाठी वनपरिक्षेत्र अधिकारी रत्नाकर नागापूरकर, वन्यजीव छायाचित्रकार रंजन देसाई, किरण परदेशी, श्रवण परळीकर, भूषण कुलकर्णी, रितेश पेंडसे आदींनी सहकार्य केले.
अन्नसाखळी विस्कळीत
सध्या जायकवाडी धरणातील खिर्डी बेटावर दोन फ्लेमिंगो आढळले. या पक्ष्याला मराठीत 'अग्निपंख' किंवा 'रोहीत' नावानेही ओळखतात. शेवाळ, छोटे मासे व झिंगे या माशांचे खाद्य आहे. मागील महिन्यात धरणात अतिरिक्त पाणी सोडण्यात आले. या पाण्यामुळे अन्नसाखळी विस्कळीत झाली असून बेमोसमी पाणी पातळी वाढल्याचा फटका पक्ष्यांना बसला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

यकृत प्रत्यारोपणातही हातभार

0
0


म. टा. विशेष प्रतिनिधी, औरंगाबाद
ब्रेनडेड रुग्णाच्या नातेवाइकांनी दिलेल्या होकारानंतर अवयवदानासाठी औरंगाबादेतील वैद्यकीय यंत्रणा ५१ तास सलग काम करत होती. शुक्रवारी पहाटे एक यकृत आणि किडनी मुंबईला प्रत्यारोपणासाठी नेण्यात आली. यकृत प्रत्यारोपणासाठी मुंबईतील यंत्रणा सज्ज होती. शुक्रवारी सकाळी सहा ते सायंकाळी सहा असे बारा तास हे ऑपरेशन चालले. विशेष म्हणजे या प्रक्रियेतही मराठवाड्याचा हातभार लागला. मानवत (जि. परभणी) येथील प्रत्यारोपण सर्जन डॉ. कैलास जवादे यांनी या प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका बजावली.
देऊळगावमही (जि. बुलडाणा) येथील अपघातात गंभीर जखमी झालेल्या रुग्णाला औरंगाबादेत उपचारासाठी आणले होते. त्याचा मेंदू मृत झाला. रुग्णाच्या नातेवाईकांनी अवयवदानाची संमती दिल्यानंतर एमआयटी हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी तत्काळ यंत्रणा कार्यान्वित झाली. युनायटेड सिग्मा हॉस्पिटलमध्ये गुरुवारी रात्री अवयव दान प्रक्रियेचा दुसरा टप्पा पार पडला. २५ तज्ज्ञ डॉक्टरांच्या टीमने तपासणी करून या रुग्णाचे हृदय, यकृत आणि किडनी प्रत्यारोपणासाठी उपयोगात आणण्याचा निर्णय घेतला. मात्र, विमान उपलब्ध न झाल्याने हृदय प्रत्यारोपण करता आले नाही. शुक्रवारी पहाटे एक किडनी आणि यकृत मुंबईला नेण्यात आले. एक किडनीचे सेठ नंदलाल धूत हॉस्पिटलमध्ये यशस्वी प्रत्यारोपण झाले. यकृत प्रत्यारोपण ही सर्वात दुर्मिळ शस्त्रक्रिया. भारतात अनेक ठिकाणी या शस्त्रक्रिया होत असल्या तरी त्यासाठी तज्ज्ञांची नितांत आवश्यकता आहे. मुंबईतील ग्लोबल हॉस्पिटलमधे हे यकृत प्रत्यारोपण झाले. सरकारी यंत्रणेमार्फत मुंबईमध्ये निरोप दिला गेला होता. शुक्रवारी पहाटे सव्वासहा वाजता यकृत विमानाने मुंबईकडे झेपावले आणि तिकडे ग्लोबल हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रियेस सुरुवात झाली. जगप्रसिद्ध ट्रान्सप्लांट तज्ज्ञ डॉ. रवी मोहंका, डॉ. मोहमंद रैला यांच्या मार्गदर्शनाखाली नऊ तज्ज्ञ डॉक्टर उपस्थित होते. त्यामध्ये मानवत (जि. परभणी) येथील डॉ. कैलास जवादे यांचा समावेश होता.
कालच्या शस्त्रक्रियेसंदर्भात महाराष्ट्र टाइम्सने त्यांच्याशी संपर्क साधला. डॉ. जवादे म्हणाले, 'डॉ. रवी मोहंका, डॉ. मोहमंद रैला, डॉ. गुरू, डॉ. सोमनाथ यांच्यासह नऊ तज्ज्ञांची टीम शुक्रवारी पहाटेच हॉस्पिटलमध्ये सज्ज होती. त्याच माझाही समावेश होता. सकाळी सहा वाजता आम्ही पेशंटला ऑपरेशन थिएटरमध्ये घेतले. औरंगाबादतून हॉस्पिटलमध्ये साधारणपणे सकाळी नऊ वाजता यकृत पोचले. तोवर आमची तयारी झाली होती. यकृत प्रत्यारोपणात खराब झालेले यकृत काढून टाकल्यानंतर त्याच्या जागी नवीन यकृत बसविताना अतिशय काळजी घ्यावी लागते. 'बेंच डिसेक्शन' करावे लागते. प्रत्यारोपित करावयाच्या यकृताभोवती असलेल्या अनावश्यक रक्तवाहिन्या, चरबी व अन्य भाग काढून टाकून त्याचे रोपण करावे लागते. त्याला दीड ते दोन तास लागतात. मग पुढे प्रत्यारोपण केले जाते. शुक्रवारी सायंकाळी साडेपाचपर्यंत ऑपरेशन चालले. मी रात्री बारापर्यंत तिथेच बसून होतो. यकृत प्रत्यारोपणातील रुग्णास पुढचे तीन आठवडे रिकव्हरीसाठी अतिदक्षता विभागात ठेवावे लागते. सर्वसाधारणपणे पूर्ण यकृत प्रत्यारोपणात रिकव्हरी चांगल्या प्रकारे होत असल्याचा अनुभव आहे. या प्रक्रियेत मला सहभागी होता आले, याचा आनंद आहे. मराठवाड्यात अवयवदानाची चळवळ प्रभावीपणे राबविणे आवश्यक आहे.,'असे डॉ. जवादे म्हणाले.
औरंगाबादशी संबंध
डॉ. जवादे यांचे एमबीबीएस औरंगाबादच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून तर शल्यचिकित्सा शाखेचे पदव्युत्तर शिक्षण अंबाजोगाई मेडिकल कॉलेजमधून पूर्ण केले. ते सध्या मुंबईतील केइएम रुग्णालयात कार्यरत असून व्हिजिटिंग फॅकल्टी म्हणून ग्लोबल हॉस्पिटलमध्ये सेवा बजावतात.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिद्धार्थ सुने-सुने; दुर्गा, नकुलला निरोप

0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
महापालिकेचे सिद्धार्थ उद्यान शनिवारी सुने-सुने होते. उद्या रविवारी इथे येणाऱ्या बच्चेकंपनीचाही चांगला हिरमोड होईल. कारण त्यांना आवडणारे दुर्गा-नकुलच्या खोड्या, ती लुटुपुटूची भांडणे आणि खूपच राग आला तर थरारून सोडणारी डरकाळी पुन्हा घूमणार नाही. या दोन पिवळ्या वाघांची शनिवारी सकाळी मध्यप्रदेशातील मुकुंदपूर सतना प्राणिसंग्रहालयात रवानगी करण्यात आली.
मुकुंदपूर सतना येथे नव्याने प्राणिसंग्रहालय तयार करण्यात येत आहे. त्यासाठी देशभरातील विविध प्राणिसंग्रहालयातून प्राणी मागवण्यात येत आहेत. औरंगाबादच्या प्राणिसंग्रहालयात पिवळ्या वाघांची संख्या जास्त आहे. त्यामुळे काही वाघ अन्यत्र हलविण्याचे आदेश सेंट्रल झू ऑथॅरिटीने महापालिकेला दिले होते. मुकुंदपूर सतनाच्या प्राणिसंग्रहालयासाठी औरंगाबादच्या प्राणिसंग्रहालयातून दोन पिवळे वाघ देण्यात यावेत, अशी मागणी त्या प्राणिसंग्रहालयाच्या संचालकांनी केली होती. त्याला झू ऑथॅरिटीने मंजुरी दिली. या मंजुरीनुसार दोन पिवळे वाघ घेऊन जाण्यासाठी मध्यप्रदेश सरकारचे एक पथक औरंगाबादेत शुक्रवारी सायंकाळी दाखल झाले. असिस्टंट कन्झर्वेटर ऑफ फॉरेस्ट आर. के. ज्योतिषी, डॉ. अखिलेश शर्मा यांच्या नेतृत्वाखाली आठ कर्मचारी या पथकात होते. शनिवारी सकाळी सहा वाजता दुर्गा आणि नकुलला अद्ययावत गाड्यांमधील पिंजऱ्यांमध्ये बंद करण्यात आले. त्यानंतर दहा वाजेच्या सुमारास गाड्या मुकुंदपूरच्या दिशेने निघाल्या. औरंगाबाद ते मुकुंदपूर हे अंतर १०१४ किलोमीटर असून ३४ तास दहा मिनिटांचा हा प्रवास आहे. वाघांची जोडी मध्यप्रदेशच्या टीमच्या स्वाधीन करताना महापालिकेच्या प्राणिसंग्रहालयाचे संचालक डॉ. बी. एस. नाईकवाडे यांच्यासह संजय नंदन, वाघांचे केअरटेकर मोहम्मद जिया, सोमनाथ मोटे आदी
कर्मचारी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


वाघोबांचा ‘एसी’ थाट

0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
महापालिकेचे सिद्धार्थ उद्यान शनिवारी सुने-सुने होते. उद्या रविवारी इथे येणाऱ्या बच्चेकंपनीचाही चांगला हिरमोड होईल. कारण त्यांना आवडणारे दुर्गा-नकुलच्या खोड्या, ती लुटुपुटूची भांडणे आणि खूपच राग आला तर थरारून सोडणारी डरकाळी पुन्हा घूमणार नाही. या दोन पिवळ्या वाघांची शनिवारी सकाळी मध्यप्रदेशातील मुकुंदपूर सतना प्राणिसंग्रहालयात रवानगी करण्यात आली.
मुकुंदपूर सतना येथे नव्याने प्राणिसंग्रहालय तयार करण्यात येत आहे. त्यासाठी देशभरातील विविध प्राणिसंग्रहालयातून प्राणी मागवण्यात येत आहेत. औरंगाबादच्या प्राणिसंग्रहालयात पिवळ्या वाघांची संख्या जास्त आहे. त्यामुळे काही वाघ अन्यत्र हलविण्याचे आदेश सेंट्रल झू ऑथॅरिटीने महापालिकेला दिले होते. मुकुंदपूर सतनाच्या प्राणिसंग्रहालयासाठी औरंगाबादच्या प्राणिसंग्रहालयातून दोन पिवळे वाघ देण्यात यावेत, अशी मागणी त्या प्राणिसंग्रहालयाच्या संचालकांनी केली होती. त्याला झू ऑथॅरिटीने मंजुरी दिली. या मंजुरीनुसार दोन पिवळे वाघ घेऊन जाण्यासाठी मध्यप्रदेश सरकारचे एक पथक औरंगाबादेत शुक्रवारी सायंकाळी दाखल झाले. असिस्टंट कन्झर्वेटर ऑफ फॉरेस्ट आर. के. ज्योतिषी, डॉ. अखिलेश शर्मा यांच्या नेतृत्वाखाली आठ कर्मचारी या पथकात होते. शनिवारी सकाळी सहा वाजता दुर्गा आणि नकुलला अद्ययावत गाड्यांमधील पिंजऱ्यांमध्ये बंद करण्यात आले. त्यानंतर दहा वाजेच्या सुमारास गाड्या मुकुंदपूरच्या दिशेने निघाल्या. औरंगाबाद ते मुकुंदपूर हे अंतर १०१४ किलोमीटर असून ३४ तास दहा मिनिटांचा हा प्रवास आहे. वाघांची जोडी मध्यप्रदेशच्या टीमच्या स्वाधीन करताना महापालिकेच्या प्राणिसंग्रहालयाचे संचालक डॉ. बी. एस. नाईकवाडे यांच्यासह संजय नंदन, वाघांचे केअरटेकर मोहम्मद जिया, सोमनाथ मोटे आदी कर्मचारी उपस्थित होते.
औरंगाबादच्या कर्मचाऱ्यांची शोकांतिका
औरंगाबाद महापालिकेच्या प्राणिसंग्रहालयातील कर्मचाऱ्यांची मात्र शोकांतिकाच आहे. मध्यप्रदेश सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या तुलनेत तर या कर्मचाऱ्यांना काहीच सोयीसुविधा नाहीत, असे कर्मचाऱ्यांशी चर्चा करताना स्पष्ट झाले. प्राणिसंग्रहालयात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना डेंजर अलाउंस दिला जात नाही. ओव्हरटाइमचे पैसे गेल्या काही वर्षांपासून कर्मचाऱ्यांना मिळाले नाहीत. हक्काची सुट्टी किंवा रजा या कर्मचाऱ्यांना मिळत नाही. या संदर्भात वारंवार प्रशासनाकडे मागणी केल्यावरही त्याची दखल घेतली जात नाही. सुनील केंद्रेकर यांच्याकडे आयुक्तपदाची सूत्रे असल्यामुळे त्यांच्याकडून कर्मचाऱ्यांना मोठ्या अपेक्षा आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लोकनृत्य परंपरा जतन व्हावी

0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
'लोकनृत्य व शास्त्रीय नृत्याने भारतीय कला परंपरा समृद्ध झाली. सद्यस्थितीत शास्त्रीय नृत्यांचे संवर्धन करण्यासाठी गुरू आहेत. मात्र, लोकनृत्य परंपरा जतन करण्याचा विचार आवश्यक आहे,' असे प्रतिपादन प्रसिद्ध संगीत अभ्यासक विद्वान नंदकुमार यांनी केले. शारंगदेव महोत्सवातील व्याख्यानात ते बोलत होते.
शारंगदेव महोत्सवातील 'शारंगदेव प्रसंग' सत्रात शनिवारी सकाळी म्हैसूर येथील विद्वान नंदकुमार यांचे व्याख्यान झाले. 'संगीत रत्नाकर'मधील प्रबंध' या विषयावर त्यांनी अभ्यासपूर्ण विचार मांडले. नादोत्पत्ती, आहत, अनाहत, नाद आणि शिवशक्ती, ब्रह्मा यांचा संबंध त्यांनी उलगडून दाखवला. 'शास्त्र आणि कला जतन करण्याची भारतीय परंपरा आहे. त्यामुळे अनेक शतकांपासून प्राचीन ग्रंथ व परंपरा कायम आहेत. शास्त्रीय नृत्य जतन करण्यासाठी गुरू संरक्षण आहे. मात्र, लोकनृत्य परंपरा जतन करण्याचा विचार करावा' असे नंदकुमार म्हणाले. या व्याख्यानानंतर शर्मिला विश्वास यांचे 'ओडिसी नृत्यामधील परंपरांची उकल' या विषयावर व्याख्यान झाले. 'प्रत्येक प्रांताची प्रादेशिक भाषा असते. नृत्याचीही स्वतंत्र भाषा असते. ओडिसातील लोकनृत्य व लोकसंगीत यांचा ओडिसी नृत्यावर प्रभाव आहे. या प्रभावातून ओडिसी नृत्य अधिक परिपूर्ण व लवचिक झाले आहे. या परंपरा शास्त्रीय नृत्यांचा आधार आहेत,' असे विश्वास म्हणाल्या. यावेळी विश्वास यांच्या शिष्यांनी ओडिसीचे प्रात्यक्षिक सादर केले. लोकनृत्य व ओडिसी नृत्यातील साधर्म्य, नृत्यातील मुद्रा, हस्त, गीते, ताल, लय याची माहिती देण्यात आली. 'लोकनृत्य व नाट्याचा परिपूर्ण अभ्यास आवश्यक आहे. शास्त्रीय नृत्यातून हास्यरस, विनोद लोप पावला आहे. हा रस नृत्याच्या ठायीठायी पाहिजे,' असे आवाहन विश्वास यांनी केले. यावेळी कला क्षेत्रातील अभ्यासक, जाणकार, विद्यार्थिनी व रसिक उपस्थित होते.
आज तीन व्याख्याने
'शारंगदेव प्रसंग' सत्रात महागामी संस्थेच्या सभागृहात सकाळी १० ते १ या वेळेत तीन व्याख्यान होणार आहेत. संगीत विषयावर गायक सफीउद्दीन डागर, नृत्य विषयावर सुचेता चापेकर व पद्मभूषण सी. व्ही. चंद्रशेखर भाष्य करणार आहेत. आपल्या क्षेत्रात या तिन्ही मान्यवरांचे उल्लेखनीय योगदान आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कापूस उत्पादकांसाठी राष्ट्रवादीचे आंदोलन

0
0

म. टा. प्रतिनिधी, बीड,
दुष्काळाने होरपळलेल्या कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मदतीच्या यादीतून वगळल्याने राज्य शासनाला गंभीर परिणामांना तोंड द्यावे लागणार आहे. सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणाच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस आता तालुक्याच्या ठिकाणी रस्त्यावर उतरुन तीव्र आंदोलन करेल. कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मदत जाहीर होईपर्यंत, तसेच गुजरातच्या धर्तीवर क्विंटलला १ हजार रुपये बोनस जाहीर होईपर्यंत हे आंदोलन सुरुच राहील, असा इशारा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी शनिवारी बीडमध्ये दिला.
बीड येथे २५ जानेवारीला, तर ३० तारखेला हिंगोली जिल्ह्यात शेतकऱ्यांचे जोरदार आंदोलन होणार असल्याची माहिती मुंडे यांनी दिली. बीड येथे आयोजित एक पत्रकार परिषदेत मुंडे यांनी राज्य शासनाच्या अकार्यक्षमतेची तसेच शेतकरीविरोधी निर्णयांची जंत्रीच सादर केली.
मुंडे यावेळी म्हणाले, 'केंद्र शासनाला राज्याने पाठवलेल्या प्रस्तावात कापुस उत्पादक शेतकऱ्यांना मदत देण्याचा समावेश नसल्याची जाणीवही आम्ही गेल्या हिवाळी अधिवेशनात शासनाला करून दिली होती. कापुस उत्पादक शेतकरी मदतीतून वंचित राहू नये म्हणून दक्षता घेण्याबाबत शासनाला बजावले होते. तरीही राज्य शासनाच्या अकार्यक्षमतेमुळे कापुस उत्पादक शेतकऱ्याला ण्क रुपयाची देखील मदत न मिळण्याची परिस्थिती आज निर्माण झाली आहे, असे मुंडे यांनी सांगितले.
शासनाच्या सर्व्हेक्षनात दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर केलेल्या १२ हजार गावांना मदत देण्याचे शासनाने नाकारले आहे. कापूस पिकाच्या नुकसानीबद्दल देखील मदत देण्याचे नाकारण्यात आले आहे. ही मदत शेतकऱ्यांना तात्काळ मिळाली पाहिजे, केंद्राकडून मदत मिळत नसल्यास राज्य शासनाच्या निधीतून मदत द्यावी, राज्य सरकारने १७ हजार कोटींच्या पुरवणीमागण्या हिवाळी अधिवेशनात मंजूर करुन घेतल्या. त्यातले अवघे ४ हजार कोटी दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी ठेवले. आता त्या रकमेलाही ५० टक्के कपात लावल्याने शेतकऱ्यांच्या हातात काहीच पडणार नाही, यामुळे आत्महत्या आणखी वाढतील, अशी भीतीही मुंडे यांनी यावेळी व्यक्त केली.
मुंडे म्हणाले, 'रब्बीच्या पीक विम्याची रक्कम देण्यास पाच महिने विलंब केला. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले. कामाची मागणी असतानाही दुष्काळग्रस्त भागात रोजगार हमीची कामे बंद आहेत. शेततळ्यांना मंजुरी नाकारली जात आहे. एकही सौरपंप अजून शेतकऱ्यांपर्यंत पोहचलेला नाही. राज्यात अनेक ठिकाणी पाण्याची स्थिती भीषण आहे. पाण्याबाबत, टंचाईग्रस्त भागातील मदतीबाबत कुठले नियोजन होताना दिसत नाही. अनेक गावांमध्ये गरज असताना टँकर दिले जात नाही. टँकरची संख्या मर्यादित ठेवून दुष्काळ लपवण्याचा प्रयत्न सुरु आहेत. बीड जिल्हा बँकेला जाणीवपूर्वक मदतीपासून वंचित ठेवण्यात येत असल्याचा आरोप त्यांनी केला.
यावेळी पत्रकार परिषदेला राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर, जिल्हा परिषद अध्यक्ष विजयसिंह पंडित, सदस्य नारायण शिंदे, शेख शफीक, अॅड. हेमा पिंपळे आदी मान्यवर उपस्थित उपस्थित होते.


मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आयुर्वेदीय प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आज आयोजन

0
0


औरंगाबाद : महाराष्ट्रातील ख्यातनाम वैद्य बिंदूमाधव कट्टी यांच्या स्मरणार्थ उद्या रविवारी आयुर्वेदीय प्रश्नमंजुषेचे आयोजन करण्यात आले आहे. पैठणरोड, कांचनवाडी येथील आयुर्वेद महाविद्यालयात ही प्रश्नमंजुषा होईल. आयुर्वेदाच्या विद्यार्थ्यांना मूळ संहिता ग्रंथाचा अभ्यास करण्यासाठी प्रोत्साहन मिळावे यासाठी गेल्या १४ वर्षांपासून या स्पर्धेचे आयोजन केले जाते. महाराष्ट्र टाइम्स स्पर्धेचे मीडिया पार्टनर आहे.
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक व छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्थेचे आयुर्वेद महाविद्यालय, औरंगाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेत राज्यभरातील २० महाविद्यालयीन संघ सहभागी होत आहेत. स्पर्धेचे बक्षीस वितरण आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. काशीनाथ गर्कळ यांच्या हस्ते होणार आहे. स्पर्धेसाठी सीसीआयएमचे सदस्य वैद्य जयंत देवपुजारी, एमसीआयएमचे सदस्य राजा ठाकूर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. अध्यक्षस्थानी उद्योजक पद्माकर मुळे असतील. या स्पर्धेसाठी वैद्य संतोष नेवपूरकर, आनंद कट्टी, सोहन पाठक, परेश देशमुख, पंकज मुळे, राहुल इंगोले, अजय थोटे, अजय देशमुख, हेमंत झिळे यांनी विशेष परिश्रम घेतले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पावणे दोन लाख वालकांना देणार पोलिओ डोस

0
0

म. टा. प्रतिनिधी उस्मानाबाद
राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेअंतर्गत १७ जानेवारी रोजी जिल्ह्यातील सुमारे पावणे दोन लाख बालकांना लसीकरण केले जाणार आहे. यासाठी १ हजार २८० केंद्राची निर्मिती करण्यात आली आहे, अशी माहीती अप्पर जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी दिली. जिल्हा राज्य चिकित्सक डॉ. एकनाथ माले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आर. बी. पवार हे यावेळी उपस्थित होते.
या मोहिमेतंर्गत पाच वर्षाच्या आतील जिल्ह्यातील सुमारे १ लाख ७७ हजार ५०० बालकांना त्यांच्या पूर्वीच्या लसीकरण स्थिकीचा विचार न करता पोलिओ लसीची मात्रा देण्यात येईल. पोलिओ मोहिमेसाठी २६१ पर्यवेक्षक, ११७ वैद्यकीय अधिकारी, याशिवाय ४८२ आरोग्य कर्मचारी, १ हजार ८०४ अंगणवाडी कार्यकर्ती, १ हजार ७६५ अंगणवाडी मदतनीस आणि १ हजार १६१ आरोग्य पर्यवेक्षकाची नियुक्ती करण्यात आली आहे.
पोलिओ मोहिमेच्या यशस्वीतेसाठी १ हजार १२४ बुथ ग्रामीण भागात आणि १५६ बुथ शहरी भागात स्थापन करण्यात आलि आहेत. याशिवाय जिल्ह्यातील ४२ प्राथमिक आरोग्य केंद्रात २०६ उपकेंद्र, ६ ग्रामीण रुग्णालये, ३ उपजिल्हा रूग्णालये, स्त्री रुग्णालय, जिल्हा शासकीय रुग्णालय आणि शासकीय आयुर्वेद महाविद्यालयातीही लसीकरणाची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे.
मजूर वसाहती, वीटभट्टी, साखर कारखाने, उसतोडी कामगार वसाहती, फिरस्ते कुटुंब, वाडी-वस्त्या येथील बालकांना मोबाइल टीमद्वारे लसीकरण करण्यात येणार आहे.
या पूर्वी बालकांना पोलिओचे कितीही डोस पाजले असले तरी त्या बालकाला या मोहीमेत लस पाजवावी. पोलिओचा डोस पाजणे अनिवार्य आहे, अशी माहीती यावेळी जिल्हा राज्य चिकित्सक डॉ. एकनाथ माले यांनी दिली.
ज्या बालकांना पल्स पोलिओच्या दिवशी पोलीओ डोस मिळालेला नाही, अशा बालकांना घरी जावून डोस पाजण्यासाठी स्वतंत्र टिमची व्यवस्था करण्यात आली आहे. असेही डॉ. एकनाथ माले यांनी यावेळी स्पष्ट केले. यासाठी या स्पेशल टिम्स २१ जानेवारिपर्यत घरोघर जावून चौकशी करतील व सर्वांनी पोलिओ डोस घ्यावा यासाठी विशेष प्रयत्न करतील.


उस्मानाबाद जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागातील पालकांनी बालकांना पोलिओ डोसचा पाजण्यासाठी पुढाकार घ्यावा. सर्वत्र पोलिओ डोसची व्यवस्था उपलब्ध करण्यात आली आहे.
अविनाश पाठक, अप्पर जिल्हाधिकारी.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डॉ. प्रल्हाद लुलेकर यांना नरहर कुरुंदकर पुरस्कार

0
0



औरंगाबाद ः डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक डॉ. प्रल्हाद लुलेकर यांना नरहर कुरुंदकर स्मृती साहित्य पुरस्कार घोषित करण्यात आला आहे. अंबाजोगाई येथील नरहर कुरुंदकर स्मृती संस्थेच्या वतीने हा पुरस्कार देण्यात येतो. १९८२ मध्ये अंबाजोगाई येथे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन संपन्न झाले होते. या संमेलनातून शिल्लक राहिलेल्या निधीतून हा पुरस्कार देण्यात येतो. आतापर्यंत दिवगंत जेष्ठ कवी नारायण सुर्वे, उत्तम कांबळे, डॉ. दत्ता भगत, भारत सासने यांच्यासह मान्यवरांना या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. १० फेब्रुवारी रोजी डॉ. पांडुरंग पवार, अॅड. श्रीधर डिघोळे, अॅड. रा. स. देशपांडे आदींच्या उपस्थितीत पुरस्कार वितरण करण्यात येणार आहे. डॉ. लुलेकर हे साडेतीन दशकांपासून अध्यापन, प्रशासनात कार्यरत आहेत. त्यांनी २५ पुस्तकांचे लेखनही केले आहे. डॉ. लुलेकर यांना राज्यशासनाचा दलित मित्र पुरस्कार यापूर्वीच मिळालेला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाजपच्या जिल्हाध्यक्षपदासाठी काळे, कुलकर्णीमध्ये चुरस

0
0

म. टा. प्रतिनिधी, उस्मानाबाद

उस्मानाबाद भाजपच्या जिल्हाध्यक्षपदाची निवड रविवारी (१७ जानेवारी) रोजी होत आहे. जिल्हाध्यक्षपदी कोणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. या पदासाठी विद्यमान जिल्हाध्यक्ष नितीन काळे व दत्ता कुलकर्णी यांच्यात चुरस आहे.

या निवडणुकीसाठी पक्षनिरीक्षक म्हणून शंकर वाघमारे (निवडणूक निर्णय अधिकारी), भाजप प्रदेश सरचिटणीस सुजितसिंह ठाकूर, आमदार संभाजी पाटील-निलंगेकर, मराठवाडा सहसंघटनमंत्री भाऊराव देशमुख तसेच अॅड. मिलिंद पाटील काम पाहणार आहेत.

या निवडीसाठी पक्षश्रेष्ठींनी १४ जानेवारी हा दिवस निवडला होता. मात्र, बिन‌विरोध निवडीसाठी एकमत न झाल्याने ही निवडणूक पुढे ढकलण्याची पाळी पक्षश्रेष्ठीवर आली. सध्या राज्यात व केंद्रात भाजपची सत्ता आहे. त्यामुळे सत्तेची चव चाखण्यासाठी जिल्ह्यातील नेतेमंडळीची धडपड सुरू आहे. जिल्हाध्यक्षपदासाठी अनेकजण बाशिंग बांधून तयार आहेत. यामध्ये विद्यमान जिल्हाध्यक्ष नितीन काळे, युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष दत्ता कुलकर्णी, संजय निंबाळकर, संताजी चालूक्य, अॅड. अनिल काळे, डॉ. गोविंद कोकाटे, रामदास कोळगे यांचा प्रामुख्याने समावेश आहे.

सर्वांना विश्वासात घेऊन बिनविरोध निवड व्हावी यासाठी पक्षश्रेष्ठी प्रयत्नशील आहेत. बिनविरोधचा मार्ग अवलंबल्यास जिल्हाध्यक्षपदी दत्ता कुलकर्णी यांची निवड होण्याची शक्यता आहे. अन्यथा पक्षश्रेष्ठींच्या वटहुकामानुसार विद्ममान जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांची फेरनिवड होऊ शक‌ते. या निवडीतील प्रमुख दावेदार असलेले संजय निंबाळकर यांनी यापूर्वी जिल्हाध्यक्षपद उपभोगलेले आहे. शिवाय पक्षाने त्यांना विधानसभेची उमेदवारी बहाल केली आहे. त्यामुळे त्यांच्या अनुभवाचा उपयोग पक्ष राज्यपातळीवर करेल अशीही चर्चा यानिमित्ताने आहे. दत्ता कुलकर्णी हे ग्रामविकासमंत्री पंकजा पालवे-मुंडे यांच्याशिवाय प्रदेश सरचिटणिस सुजीतसिंह ठाकूर यांचे निकटवर्तीय आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


तनवाणी, सावे की बोराळकर?

0
0



म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

इच्छुक दिग्गजांपैकी कुणाची वर्णी लावावी याबाबत एकमत न झाल्याने शुक्रवारी स्थगित करण्यात आलेली भाजप शहराध्यक्षपदाची निवड आज (रविवारी) होणार आहे. जुने विरुद्ध बाहेरून आलेले हा वाद अद्यापही शमलेला नाही. त्यावर पक्षश्रेष्ठी काय निर्णय घेतात, याकडेच साऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत. माजी आमदार किशनचंद तनवाणी यांच्या नावास एका बड्या नेत्याने पसंती दिल्याची चर्चा असून, सर्वसमावेशक म्हणून प्रदेश प्रवक्ते शिरीष बोराळकर किंवा आमदार अतुल सावे यांच्या गळ्यात शहराध्यक्षपदाची माळ पडावी, अशी आग्रही भूमिका जुन्या कार्यकर्त्यांनी मांडली आहे.
केंद्रात, राज्यासह महापालिकेतही सत्ता तसेच मराठवाड्याची राजधानी असल्याने भाजपच्या येथील शहराध्यक्षपदाला मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे हे पद मिळविण्यासाठी 'पार्टी विथ डिफरन्स' असलेल्या भाजपात गटातटाचे राजकारणही सुरू झाले आहे. यात प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या लोकसभा मतदारसंघाचा काही भागही शहरात असल्याने, स्वाभाविकपणे त्यांचेही या घडामोडींकडे विशेष लक्ष आहे.
अतुल सावे, शिरीष बोराळकर, संजय केणेकर या जुन्या कार्यकर्त्यांसह माजी आमदार किशनचंद तनवाणी व अन्य काही इच्छुकांची नावेही स्पर्धेत आली. काही जणांनी मुंबईपासून जालन्यापर्यंत भेटीगाठी घेत आपल्या पारड्यात श्रेष्ठींचे वजन पडावे, यासाठी जोरदार प्रयत्न केले. कुरघोडीचे राजकारण सुरू झालेले असतानाच कोणत्याही एकाच नावावर स्थानिका पदाधिकाऱ्याचे एकमत झालेले नाही. प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांच्या कोर्टात चेंडू गेला, मात्र ही खदखद शांत झाली नाही आणि शुक्रवारी नियोजित निवड कार्यक्रम स्थगित करण्याची नामुष्की भाजपावर आली.
दरम्यान, सकाळी सहा वाजता पक्ष कार्यालयात निवडीसाठी बैठक होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. निवड समितीचे प्रमुख आमदार सुभाष देशमुख यांनीही त्यास दुजोरा दिला आहे. इच्छुक व त्यांचे समर्थक यांच्या बैठकासत्र सुरूच आहे. यात आमदार सावे, बोराळकर आणि तनवाणी हे प्रमुख दावेदार म्हणून पुढे येत असलेतरी श्रेष्ठींची मर्जी कोणावर राहते व ते हा वाद कसा मिटवितात, याकडेच साऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत.

कार्यकर्त्यांच्या अपेक्षा
शिवसेनेला उत्तर देण्याची क्षमता असलेला, चांगला संघटक,पक्षाची प्रतिमा अधिक उंचविणारा, सर्वांना सोबत घेऊन चालणारा शहराध्यक्ष असावा, अशी अपेक्षा पक्षांतील कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे. व्यक्तीपेक्षा त्यांचे कर्तृत्व पाहून निवड व्हावी, यात वाद नको, अशी अपेक्षाही कार्यकर्त्यांनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाभिकांना हवा ‘बीसी’ प्रवर्ग!

0
0




Sudhir.Bhalerao
@timesgroup.com
औरंगाबादः काळानुसार नाभिक समाज बदलत चालला असला तरी समाजातील अंतर्गत प्रश्न सोडवण्यासाठी नाभिक समाज विकास मंडळाची स्थापना करण्यात आली. नाभिक समाजाचा बीसी म्हणजे बॅकवर्ड क्लासमध्ये समाविष्ट करण्यात यावा, ही आमची प्रमुख मागणी आहे. गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही या मागणीसाठी लढतो आहोत. आंध्र प्रदेश, कर्नाटक, राजस्थान या तीन राज्यांमध्ये नाभिक समाजाचा समावेश बॅकवर्ड क्लासमध्ये करण्यात आलेला आहे. मात्र, महाराष्ट्रात समाजाच्या मागणीकडे दुर्लक्ष केले जात आहे. ही मागणी मान्य झाल्यास अनेक सुविधांचा मार्ग सुकर होऊ शकेल असा विश्वास मंडळाचे अध्यक्ष वसंत जाधव यांनी व्यक्त केला.
आर्थिक विकास महामंडळ असावे
वसंतराव नाईक आर्थिक विकास महामंडळाच्या धर्तीवर नाभिक समाजाच्या विकासासाठी आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्यात आले तर समाजाच्या सर्वांगिण विकास होण्यास मदत मिळेल, असे सांगताना वसंत जाधव म्हणाले, 'नाभिक समाजातील युवकांना पारंपरिक व्यवसाय करण्यासाठी आर्थिक सहाय्य मिळाले पाहिजे. त्यासाठी आर्थिक विकास महामंडळाचा उपयोग होऊ शकेल. समाजातील अनेक युवक स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकतील. युवकांना पारंपरिक व्यवसायाचे प्रशिक्षण संघटनेच्या माध्यमातून दिले जाते. प्रसंगी युवकांची गरज लक्षात घेऊन त्यांना मुंबईलाही ट्रेनिंगसाठी पाठवले जाते. एक वर्षाच्या ट्रेनिंगनंतर युवकाला स्वतःचे दुकान टाकावयाचे असल्यास त्याला वेळेवर आर्थिक मदत मिळणे आवश्यक आहे. तसेच बसस्थानक व रेल्वे स्टेशनवर नाभिकांना दुकान थाटण्यासाठी गाळे मिळण्याची गरज आहे आणि हीच आमची प्रमुख मागणी देखिल आहे.'
मुलींचा कल उच्च शिक्षणाकडे
नाभिक समाजात युवकांपेक्षा युवतींचा कल हा उच्च शिक्षणाकडे अधिक दिसून येतो. त्यामुळे विवाह जुळताना शिक्षण हा कळीचा मुद्दा बनतोय. नाभिक समाज विकास मंडळातर्फे येत्या २३ जानेवारी रोजी श्री संत सेना भवनात वधू-वर परिचय मेळावा आयोजित करण्यात आला आहे. मेळाव्याचे यंदाचे नववे वर्ष आहे. आत्तापर्यंत १९१ मुली तर १४९ मुलांनी नोंदणी केली आहे. मेळाव्यात विवाह जुळण्याचे प्रमाण ६०-७० टक्के आहे. मुलांच्या तुलनेत मुली अधिक उच्च शिक्षत असल्याने मुलींना चांगली नोकरी असलेला वर हवा असतो. वरांना सुशिक्षित आणि पदवीधर वधू हवी असते. वधू-वरांचे प्रश्न वेगवेगळे असतात असे वसंत जाधव यांनी आवर्जून सांगितले.
श्री संत सेना भवन
हडको एन-१२ मध्ये नाभिक समाज विकास मंडळातर्फे श्री संत सेना भवनाची उभारणी करण्यात येत आहे. १९९२मध्ये मंडळाला साडेसतरा हजार स्वेअरफूट आकाराचा प्लॉट भवनासाठी मिळाला. प्रारंभी दोन हजार स्वेअरफूटवर काम करण्यात आले. त्यात एका हॉलसह दहा दुकाने बांधण्यात आली आहेत. आगामी कालावधीत तीन मजली भवन उभारण्याचे उद्दिष्ट आहे. तळमजल्यावर शॉपिंग कॉम्प्लेक्स तर त्यानंतरच्या मजल्यावर मंगल कार्यालय उभारण्यात येणार आहे. समाजातील गरीब विद्यार्थ्यांकरिता वसतिगृह बांधण्यात येणार आहे. या भवनाच्या उभारणीसाठी लागणारा खर्च हा समाजातीलच देणगीदारांकडून जमा झालेल्या रक्कमेतून करण्यात येत आहे. भवनाच्या उभारणीनंतर समाजातील अनेक उपक्रमांना चालना मिळेल, असा विश्वास जाधव यांनी व्यक्त केला.
नाभिक समाज विकास मंडळ कार्यकारिणीः अध्यक्ष वसंत जाधव, कार्याध्यक्ष नारायण ढवळे, उपाध्यक्ष प्रकाश संत, गंगाधर वाघ, सचिव अशोक बोरुडे, सहसचिव नवनाथ वखरे, कडूबा बोर्डे, कोषाध्यक्ष सीताराम बोरुडे. सदस्य - बाबासाहेब अपार, भास्कर शिंदे, शिवनाथ लिंगायत, अॅड. मोहनराव निंबाळकर, गणपत कोनाळे, संजीवन सोनटक्के, अनिरुद्ध राऊत, बाळासाहेब औटे, मुकुंद काळे, रामदास पवार, अनिल भुसारे, राजीव दळे, रामदास जिरोणकर, विठ्ठलराव गोरे, ताराबाई वाघमारे, संगीता बिडवे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘टीईटी’ परीक्षेआधी पेपर व्हॉट‍्सअॅपवर

0
0




म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद/बीड

शिक्षक पात्रता परीक्षेचा (टीईटी) पेपर फुटल्याचे शनिवारी उघडकीस आले. पेपर सुरू होण्यापूर्वीच उत्तरे 'व्हॉट‍्सअॅप'वर फिरू लागल्यामुळे खळबळ उडाली. या प्रकरणात बीडमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पेपर पुन्हा द्यावा लागणार का, असा संभ्रम विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झाला आहे.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परीक्षेतर्फे शनिवारी टीईटी परीक्षा घेण्यात आली. प्राथमिक व माध्यमिक अशा दोन स्तरावर ही परीक्षा झाली. सकाळच्या सत्रात १०.३० ते १ या दरम्यान प्राथमिकचा पेपर होता. हा पेपर सुरू होण्यापूर्वीच प्रश्नांची उत्तरे 'व्हॉटस्अॅप'वरून विद्यार्थ्यांकडे आली होती. दीडशे गुणांच्या प्रश्नपत्रिकेतील अनेक प्रश्नांची उत्तरे पेपर सुरू होण्यापूर्वीच 'व्हॉट‍्सअॅप'वर फिरत होती.
बीड जिल्ह्यातील शिक्षण विभागाच्या स्तरावर प्रश्नपत्रिका, त्यातील उत्तरे व सोशल मीडियावर फिरत असलेल्या उत्तरांची पडताळणी केली असता पेपर फुटल्याचे स्पष्ट झाले. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नामदेव ननावरे यांच्या सांगण्यावरून शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणेकर यांना या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यास सांगितले. या प्रकरणी पुढील तपास पोलिस अधिकारी बारवकर करीत आहेत.

पेपरफुटीबाबत माहिती आल्यानंतर चौकशी सुरू झाली आहे. परीक्षेबाबतची आणि घटनाक्रमाची माहिती आम्ही वरिष्ठांसह, शासनाला पाठविलेली आहे.
- राजेश क्षीरसागर, सहआयुक्त, परीक्षा परिषद, पुणे

विद्यार्थ्यांकडील प्रश्न व उत्तरांची व प्रश्नपत्रिकेची पडताळणी केली असता, उत्तरे बरोबर असल्याचे कळले. यानंतर याबाबत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
- शशिकांत हिंगोणेकर, शिक्षणाधिकारी, बीड

औरंगाबादमध्येही उत्तरांची चर्चा
राज्यात पाच वर्षापासून न झालेली शिक्षक भरती, नवीन वर्षातही याबाबतची शाश्वती नाही. तरीही शिक्षक भरतीसाठी 'सीईटी' होईल, या आशेने लाखो विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. ही परीक्षा होत असतानाच, सोशल मीडियावरून औरंगाबादमधील विद्यार्थ्यांकडेही उपलब्ध झाल्याची चर्चा विद्यार्थ्यांमध्ये होती. औरंगाबादमध्ये २७ परीक्षा केंद्राहून पहिला पेपर घेण्यात आला. जिल्ह्यातून नोंदणी केलेल्या ८ हजार ९७४ पैकी ८ हजार २९२ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली.

चौकशीचे आदेश
पेपरफुटीबाबत शासनस्तरावरून चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. शिक्षण विभागाचे सचिव नंदकुमार यांना चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. ४८ तासांत चौकशी करून अहवाल सादर केला जाणार आहे. यात दोषीवर योग्य ती कारवाई केली जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घंटागाडीसाठी निधी देणार

0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
'वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी पोलिस यंत्रणा प्रयत्नशील असते. या माध्यमातून प्रदूषण रोखण्यात पोलिसांचा हातभार लागतो. स्वच्छ शहर, प्रदूषण मुक्त शहरासाठी सरकार प्रयत्नशील आहे. त्याचाच भाग म्हणून घंटागाडीसाठी महापालिकेस जिल्हा नियोजन मंडळाकडून निधी दिला जाईल,' अशी घोषणा पालकमंत्री रामदास कदम यांनी केली. कदम यांच्या हस्ते वाहतूक सुरक्षा सप्ताहाचा पोलिस आयुक्तालयत समारोप झाला. त्याप्रसंगी ते बोलत होते.
कार्यक्रमाला खासदार चंद्रकांत खैरे, आमदार अतुल सावे, सतीश चव्हाण, सुभाष झांबड, इम्तियाज जलील, महापौर त्र्यंबक तुपे, उपमहापौर प्रमोद राठोड आदी उपस्थित होते. पालकमंत्र्यांनी परेडचे निरीक्षण केल्यानंतर सहभागी झालेल्या विविध शाळेच्या आरएसपीच्या प्लाटूनने त्यांना सलामी दिली. कदम म्हणाले, 'फक्त औरंगाबादमध्ये वाहतूक सुरक्षा सप्ताहानिमित्त संचलन झाले. महाराष्ट्रातील तमाम पोलिस दलाने याचा आदर्श घ्यावा. सकाळी महापालिका आयुक्त आणि महापौर यांनी सुभेदारी विश्रामगृहावर भेट घेत शहरातील कचरा प्रश्नावर चर्चा केली. घंटा गाड्यांसाठी मनपाला जिल्हा नियोजन मंडळाकडून निधी दिला जाईल. स्वच्छ शहर, प्रदूषण मुक्त शहर व्हावे. रस्त्यावर कचरा न टाकणे ही सर्वांचीच जबाबदारी आहे. बेशिस्त वाहनधारकांना पोलिसांनी दंड आकारला, पण एक वर्षानंतर दंड लावण्याची आवश्यकता भासली नाही. सर्व वाहनधारकांनी वाहतुकीचे नियम पाळले असे ऐकण्यात जास्त आनंद होईल,' अशी आशा पालकमंत्र्यांनी केली. परेडमधील विद्यार्थ्यांना पालकमंत्र्यांच्या हस्ते बक्षिसांचे वाटप करण्यात आले.
१ फेब्रुवारीपासून
शहरात हेल्मटसक्ती
अमितेशकुमार म्हणाले, 'एक फेब्रुवारीपासून शहरात हेल्मेट सक्ती केली जाणार आहे. शहरातील शिस्तप्रिय नागरिक याची शंभर टक्के अंमलबजावणी करतील. वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी आरएसपीच्या विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. त्यापैकी ५६ विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. त्यांच्या मदतीने वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी प्रयत्न करणार आहे.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तीन मुलांना विष पाजूनमहिलेची आत्महत्या

0
0

बीड ः स्वत:च्या तीन मुलांना विष पाजून महिलेने आत्महत्या केल्याची घटना बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथे घडली. अंबाजोगाई शहर पोलिस स्टेशन मागील परिसरात शनिवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आला. नूरजहाँ शेख असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. आत्महत्येपूर्वी नूरजहाँ यांनी नेहा शेख (वय १२), तोहीब शेख (वय ८), आयुब शेख (वय ५) या मुलांना तिने विष पाजले. आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे. नूरजहाँचा पती माजी सैनिक असून, परळी येथे तो वॉचमनचे काम करतो.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images