Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

भाजप शहराध्यक्षपदी किशनचंद तनवाणी

$
0
0

औरंगाबाद ः भाजपच्या शहराध्यक्षपदी अपेक्षेप्रमाणे माजी आमदार किशनचंद तनवाणी यांची निवड झाली. या पदासाठी पक्षातून अनेक इच्छुक होते. नावावर एकमत होत नसल्याने निवड प्रक्रिया तब्बल दहा दिवस लांबली होती. तनवाणींच्या निवडीमुळे पक्षातील अनेक गटांना धक्का दिला आहे. पुढील तीन वर्षे तनवाणी कार्यभार सांभाळतील.

पक्षांतर्गत निवडप्रक्रियेतील शेवटचा टप्पा शहराध्यक्ष निवडीचा होता. निरीक्षक आमदार सुभाष देशमुख यांच्यासमोर इच्छुकांच्या मुलाखती होणार होत्या. गुरुवारी निवड अपेक्षित होती, पण दावेदारांची संख्या वाढल्याने श्रेष्ठींची पंचाईत झाली. शनिवारी रात्री उशिरा तनवाणींच्या नावावर शिक्कामोर्तब झाले. रविवारी सकाळी भाजप कार्यालयात देशमुखांसमोर सर्व इच्छुकांनी हजेरी लावली. बंद खोलीतील चर्चेनंतर सर्व नेतेमंडळी कार्यकर्त्यांसमोर जमली आणि देशमुख यांनी तनवाणी यांची निवड झाल्याचे जाहीर केले. त्यापूर्वी माजी शहराध्यक्ष भगवान घडमोडे, माजी महापौर डॉ. भागवत कराड, भाजप कामगार आघाडीचे संजय केणेकर यांची भाषणे झाली.

शहराध्यक्षपदी निवड झाल्यानंतर तनवाणी पत्रकारांशी बोलताना म्हणाले,'पक्षश्रेष्ठींच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. सर्वांना सोबत घेऊन काम करणार आहे. नवीन आणि जुना असा वाद भाजपमध्ये नाही. पक्षवाढीचे आव्हान आहे. त्यामुळे यापुढेही नवीन लोकांना घेऊन पक्ष वाढीवर भर दिला जाईल.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘वन टू वन’: देशांतर्गत, आंतरराष्ट्रीय विमान सेवा वाढणार

$
0
0

AbdulWajed.Shaikh @timesgroup.com
औरंगाबाद विमानतळाच्या विस्तारीकरणाला राज्य शासनाने हिरवा झेंडा दाखविला आहे. सहा महिन्यांत हा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांनी मार्गी लावला. आता धावपट्टीचा विस्तार केला जाणार आहे. त्यानंतर औरंगाबादहून आंतरराष्ट्रीय विमान सेवा सुरू होणार आहेत. त्याबरोबरच देशांतर्गत विमानसेवाही वाढेल, असा विश्वास विमानतळ व्यवस्थापक अलोक वार्ष्णेय यांनी केला आहे.
..
 विमानतळ विस्तारीकरणाचा प्रस्ताव मंजूर झाला आहे. आता पुढील नियोजन काय?
औरंगाबाद विमानतळ विस्तारीकरणाचा प्रस्ताव २०१२पासून अडकलेला होता. खरं तर विस्तारीकरणाला मंजुरी मिळविण्याचे श्रेय विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी; तसेच सीएमआयएचे अध्यक्ष आशिष गर्दे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेल्या प्रयत्नांना द्यावं लागणार आहे. माझ्याकडे विमानतळाची जबाबदारी आली आणि हा प्रस्ताव मंजुरीसाठी पाठविला, हे माझे भाग्य समजतो. विमानतळ विस्तारीकरणाला मंजुरी मिळाल्यानंतर पुढील कार्यवाही पूर्ण करून लवकरात लवकर जमीन ताब्यात घेण्यासाठी विशेष टीम तयार केली जाईल. ही टीम भूसंपादनाचा पाठपुरावा करणार आहे.

 विस्तारीकरणासाठी किती काळ लागेल?
सध्या औरंगाबाद विमानतळाची धावपट्टी ही ९७०० फूट लांब आहे. मोठे विमान उतरविण्यासाठी किती लांबी २७०० फूट केली जाईल. त्यात टॅक्सीवेही तयार केला जाणार आहे. धावपट्टी तयार करण्यासाठी किमान एक ते दीड वर्षाचा कालावधी लागेल. धावपट्टी तयार करताना विशेष काळजी घ्यावी लागते. विमान आकाशातून जमिनीवर येताना एक ते दीड लाख किलोची भार रनवेवर पडते. यामुळे एवढ्या मोठ्या घर्षणाने धावपट्टीचे नुकसान होऊ नये याची काळजी हे काम करताना घ्यावी लागते. त्यासाठी काँक्रिटचे तीन थर अंथरावे लागतात. सध्याच्या परिस्थितीत जमीन भूसंपादनासाठीही वेळ लागेल. ही प्रक्रिया सुरू होताच. धावपट्टीसाठी निविदा प्रक्रिया, अन्य कामांसाठी पूर्वतयारी केली जाईल. तीन ते चार महिन्यांचा वेळ वाचविण्याचा प्रयत्न आहे.

 विस्तारीकरणामुळे काय फायदा आहे?
सध्या औरंगाबाद विमानतळावर ‌देशांर्गत कार्गो सुविधा सुरू करण्यासाठी निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. या सुविधेमुळे देशांतर्गत औद्योगिक, शेतीमालाची वाहतूक होणार आहे. औरंगाबाद विमानतळावर कार्गो सेवेसाठी मोठी विमाने औरंगाबादेत यावीत म्हणून मोठी धावपट्टी आवश्यक आहे. सध्याच्या ९७०० फूट लांबीच्या धावपट्टीचा २७०० फुटांपर्यंत विस्तार केला जाईल. त्यामुळे एअर बस ३३०सारखी आंतरराष्ट्रीय विमाने उतरण्याची सोय होईल. काही दिवसांपूर्वी शारजाह येथे इंड्रस्ट्रिअल समीटमध्ये तेथील एअर अरेबियाच्या व्यवस्थापकांशी चर्चा केली. औरंगाबादहून विमान सेवा सुरू करण्याबाबत विचारले असता त्यांनी, धावपट्टी द्या, आम्ही सेवा सुरू करू, असे सांगितले आहे. याशिवाय देशांतर्गत विमानसेवा वाढविण्याचाही प्रस्ताव आहे.

 देशांतर्गत विमानसेवेबाबत कोणता प्रस्ताव आहे?
औरंगाबादहून इंडिगो एअरलाइन्स कंपनीकडून पोर्टब्लेअर आणि मुंबईसाठी डिसेंबरमध्ये विमान सेवा सुरू करण्यात येणार होती. इंडिगो एअरलाइन्सला विमान न मिळाल्यामुळे ही सेवा सुरू होऊ शकली नाही, मात्र मार्च-एप्रिलमध्ये ही सेवा सुरू होईल, यासाठी माझे प्रयत्न सुरू आहे.

 प्र. कार्गो सेवा सुरू होण्यासाठी किती दिवस लागतील?
देशांतर्गत कार्गो सुविधा देण्यासाठी दिल्ली कार्गो सर्व्हिसेस कंपनीची निविदा अंतिम टप्प्यात आहे. शिवाय जुन्या इमारतीमध्ये कार्गो सर्व्हिसेसच्या सुविधा देण्यासाठी काम सुरू आहे. दिल्ली कार्गो सर्व्हिसेसचे व्यवस्थापकांना औरंगाबादला बोलावून त्यांच्या गरजेनुसार या बाधकामामध्ये बदल करून घेण्यात येणार आहेत. देशांतर्गत कार्गो सुविधेसाठी ३१ मार्च २०१६ ही डेडलाइन ठरविण्यात आली आहे, मात्र ही सेवा फेब्रुवारी अखेरपर्यंत सुरू करण्याचा प्रयत्न आहे. त्या दृष्टीने आमचे प्रयत्न सुरू आहेत.
...
रनवे विस्तारीकरणाचा फायदा
- २७०० फूट रनवेमुळे बोइंग ७७७, बोइंग ३००; तसेच एअरबस ३३० सारखी मोठी विमाने येथे उतरू शकतील.
- युरोप आणि आखाती देशामध्ये जाण्यासाठी औरंगाबादेतून विमान सेवा सुरू करणे शक्य होईल.
- टॅक्सीवे होणार केल्यामुळे विमान उतरल्यानंतर धावपट्टीवरून बाजुला करणे शक्य होईल. त्यामुळे एकापाठोपाठ विमाने उतरविण्याची किंवा उड्डाण करण्याची सोय होईल.

आम्ही ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार
एका तरुणाच्या शरीरातील अवयव चेन्नई आणि मुंबईला नेवे जाणार होते. त्यासाठी विमानतळावर अधिकारी, कर्मचाऱ्यांची स्पेशल ड्यूटी लावली होती. अवयवांचा प्रवास लवकरात लवकर व्हावा म्हणून ही ध्ाडपड सुरू हाेती. त्यासाठी अामच्या कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. मुंबइला अवयव पाठविले, मात्र चेन्नई येथे ह्दय नेता अाले नाही. चेन्नई विमान रद्द झाल्याची माहिती थ्ााेडी आधी समजली असती तर, आम्ही आमच्या स्तरावर विमान आणण्याचा प्रयत्न केला असता. अवयव वेळेत पोचविण्याच्या ऐतिहासिक क्षणांचे आम्ही साक्षीदार ठरलो, हेच आमचे भाग्य.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अभिप्रायात अडकली कागजीपुऱ्याची जमीन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
कागजीपुरा येथील ११२ एकर जागा एसटीच्या नावावर करण्याची प्रक्रिया गेल्या चार महिन्यांपासून सुरू असून, खुलताबाद तहसील कार्यालयातून जागेबाबतचा अभिप्राय दिला नाही. त्यामुळे एसटी महामंडळाचे प्रशिक्षण केंद्र रखडले आहे. या केंद्राच्या उभारणीसाठी २५ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.

महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात आणि आंध्र प्रदेशातील सर्व आरटीओ कार्यालयांत जड वाहने चालविण्यासाठी परवाना काढणाऱ्यांना नॅशनल रोड सेफ्टीच्या (एनआरएस) प्रशिक्षण संस्थेकडून प्रमाणपत्र घ्यावा लागत होता. त्यासाठी केंद्र सरकारने कागजीपुरा येथे प्रशिक्षण केंद्र उभारण्याचा निर्णय घेतला होता. त्यासाठी ९०च्या दशकात ११२ एकर जागा संपादित करण्यात आली होती. ही योजना एसटी महामंडळाच्या माध्यमातून राबविण्यात येणार होती, मात्र केंद्र स्थापन करण्याचा निर्णय रद्द करण्यात आला. या केंद्रासाठी ११ कर्मचाऱ्यांची भरतीही करण्यात आली होती. त्यांना नंतर एसटीच्या सेवेत सामावून घेण्यात आला आहे. त्यानंतर महामंडळाने बीओटी तत्त्वावर संबंधित जागा विकसित करण्याचा विचार केला होता. पुढे यासंदर्भातील प्रस्तावही बारगळला.

आता एसटी महामंडळाच्या चालकांना प्रशिक्षण देण्यासाठी कागजीपुरा येथील जागेवर केंद्र उभारण्याचा निर्णय परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी घेतला आहे. त्यांनी घेतलेल्या या निर्णयावर प्रशिक्षण केंद्र उभारण्याच्या कामाला वेग आला होता. कागजीपुरा येथे केंद्र उभारण्यासाठी पहिला प्रस्ताव १९ कोटी रुपये खर्चाचा होता, मात्र ही जागा 'एनआरएस'च्या नावावर अाहे. त्यामुळे तेथे केंद्र सुरू करावे की नाही, असा प्रश्न निर्माण झाला.

त्यानंतर ही जागा नावावर करून घेण्यासाठी एसटी महामंडळाने चार महिन्यांपूर्वी महसूल विभागाकडे प्रस्ताव दाखल केला आहे. त्यासाठी खुलताबाद तहसीलदाराचा अभिप्राय आवश्यक असतो. त्यावर तहसीलदारांनी अद्याप अभिप्राय दिलेला नाही. त्यामुळे एसटीचे प्रशिक्षण केंद्र उभारण्याचे काम रखडले आहे.

६० ते ७० चालकांना प्रशिक्षण
एसटीच्या अपघातात एखादी व्यक्ती जखमी झाल्यास किंवा एसटी चालकांच्या चुकीमुळे अपघात घडल्याचे निष्पन्न झाल्यास संबंधित चालकांना एसटी विभागाकडून प्रशिक्षण दिले जाते. ते एसटी कार्यशाळेतील प्रशिक्षण केंद्रात दिले जाते. याशिवाय नवीन वाहन चालकांनाही प्रशिक्षण देण्यात येते. दरवर्षी एसटी महामंडळाला ६० ते ७० चालकांना प्रशिक्षण द्यावे लागते. प्रस्तावित केंद्रात राज्यभरातील चालकांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

अशा असतील सुविधा
- संगणकीकृत प्रशिक्षण केंद्र
- तीन टेस्टिग ट्रॅक ः इंग्रजी आठ आकार, एस आकार आणि गाडी रिव्हर्स घेण्यासाठी विशेष ट्रॅक
- सर्व सोयी असलेली अद्यावत इमारत

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

औरंगाबाद-मुंबई बुलेट ट्रेनची मागणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
महाराष्ट्र शासनाने जपान इंटरनॅशनल को-ऑपर्शन एजन्सीच्या (जेआयसीए) सहकार्याने मुंबई-नाशिक मार्गावर 'बुलेट ट्रेन' सुरू करण्याचा निर्णय अलिकडेच घेतला आहे. 'जेआयसीए'च्या सहकार्याने राबविण्यात येणाऱ्या प्रस्तावित 'बुलेट ट्रेन' प्रकल्पात 'औरंगाबाद'चाही समावेश करावा, अशी विनंती चेंबर ऑफ मराठवाडा इंडस्ट्रिज अँड अॅग्रिकल्चरने (सीएमआयए) मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

औरंगाबाद हे उद्योग, व्यापार, पर्यटन, शिक्षण आणि कृषी क्षेत्रांच्या दृष्टीने महत्त्वाचे ठिकाण असून, मुंबई आणि नाशिकशी चांगल्या रेल्वे मार्गाने जोडले गेल्यास या प्रदेशाच्या विकासासाठी मदत होईल. 'डेस्टिनेशन औरंगाबाद'चे महत्त्व ओळखून प्रस्तावित मुंबई-नाशिक 'बुलेट ट्रेन' प्रकल्पात 'औरंगाबाद'चाही समावेश करावा, अशी विनंती सीएमआयएने महाराष्ट्र शासन आणि रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांना केली आहे. औरंगाबाद मुंबईपासून ३७४ किलोमीटर आणि नाशिक पासून १८७ किलोमीटर अंतरावर असल्याने या प्रकल्पाच्या प्रस्तावित रेल्वे सर्वेक्षणामध्ये; तसेच येणाऱ्या अर्थसंकल्पात आर्थिक तरतूद करावी अशीही विनंती 'सीएमआयए'ने केली आहे. 'बुलेट ट्रेन'सारखा कोणताही महत्त्वाचा व विकासाभिमुख प्रकल्प राबविल्याने मराठवाड्यासारख्या मागासलेल्या प्रदेशाला योग्य न्याय दिला जाईल अशा पद्धतीने राज्य शासन आणि केंद्र सरकारने पावले उचलावी, अशी मागणी 'सीएमआयए'ने केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुंबई मॅरेथॉनमध्ये धावले औरंगाबादकर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
देशातील प्रतिष्ठेची मॅरेथॉन म्हणून मुंबई मॅरेथॉनकडे पाहिले जाते. या मॅरेथॉनमध्ये औरंगाबादेतील अनेक डॉक्टर, सरकारी अधिकारी, व्यावसायिक सहभागी झाले होते. ४२ किलोमीटर पू्र्ण मॅरेथॉन आणि २१ किलोमीटरच्या अर्धमॅरेथॉन स्पर्धेत औरंगाबादकरांनी सहभाग घेऊन अंतर यशस्वीपणे पूर्ण केले.

आरोग्य विषयक जागरूकता बाळगून शहराच्या विविध भागात दररोज सकाळी धावणारे अनेक ग्रुप निर्माण झाले आहेत. हे ग्रुप वर्षभर मॅरेथॉनची तयारी करतात. अनेकजण हैदराबाद, मुंबई, पुणे, सातारा येथील मॅरेथॉनमध्ये धावतात.

रविवारच्या मॅरेथॉनमध्ये अनेकांनी यशस्वी सहभाग नोंदविला. त्यापैकी काहींची नावे खालीलप्रमाणे - ४२ किलोमीटर - डॉ. मयुरेश डबरी, डॉ. चारुशीला देशमुख, डॉ. विशाल राठी, डॉ. विकास देशमुख, डॉ. प्रफुल्ल जटाळे.

२१ किलोमीटर - महेश सिद्धेश्वर, भूपेश मिश्रा, प्रताप धोकटे, रवी वट्टमवार , रॉबिन्सन्स साजू, परवेझ विरानी, डॉ. अजित घुले, अशोक देशपांडे, आदित्य देशपांडे, रुपेश शिनगारे, शशिकांत शिनगारे, डीसीपी प्रविण मोरे, उपजिल्हाधिकारी संजीव जाधवर, डॉ. अतुल सोनी, किरण शेट्टी, किशोर शेट्टी, डॉ. नीती सोनी, डॉ. जितेन कुलकर्णी, डॉ. संदीप मुळे, सतीश मसलेकर, डॉ. अभिजित जोशी, हेमंत मुथा, नरेश बोथरा, डॉ. फणिश कौशिक, डॉ. नरेंद्र सोळंकी, डॉ. श्रीकांत सावजी, डॉ. प्रफुल्ल संकलेचा, अक्षय राठी, शेखर सांगवीकर.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बीड जिल्ह्यासाठी पुन्हा ‘टीईटी’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) पेपरफुटीनंतर पेपर पुन्हा नव्याने द्यावा लागणार की काय, याबाबत विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमता कायम आहे. परीक्षा परिषदेने राज्यातील विविध जिल्ह्यांचा आढावा घेत, शासनाला रविवार (१७ जानेवारी) रोजी अहवाल सादर केला. त्यात बीड जिल्ह्या पुरतीच फेरपरीक्षा घेण्यात यावी अशा प्रकारची शिफारस करण्यात आली आहे.

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे शनिवार (१६ जानेवारी) झालेल्या टीईटी परीक्षेत प्राथमिक स्तरावरील (पेपर क्रमांक १) पेपर सुरू होण्यापूर्वीच विद्यार्थ्यांकडे होता. या पेपरफुटीमुळे राज्यभर खळबळ उडाली. बीडमध्ये याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिक्षण सचिव नंदकुमार हे याबाबतची चौकशी करत असून, ४८ तासांत शासनाने अहवाल देण्याच्या सूचना दिल्या आहेत. रविवारी परीक्षा परिषदेने विविध जिल्ह्यातील शिक्षणाधिकारी यांच्याकडून आढावा घेत अहवाल सादर केला. पेपरफुटी प्रकरणी बीडमध्ये दोन व पुण्यात एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पेपरफुटीचा बीड वगळता इतर जिल्ह्यात फारसा परिणाम झाला नसल्याचे अहवालात सांगण्यात आल्याचे परिषदेतील सूत्रांनी सांगितले. शिक्षण सचिवही याबाबत चौकशी करीत असून, परीक्षा पुन्हा घ्यायची की नाही, याबाबत शासनस्तरावर दोन दिवसांत निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. परीक्षा परिषदेने आपल्या अहवालात बीड वगळता इतर जिल्ह्यात पेपरफुटीचा परिणाम झाला नसल्याचे सांगत, बीड जिल्ह्यापुरता पेपर क्रमांक १ची परीक्षा पुन्हा घेण्यात यावी, असे नमूद केले आहे. शासनाने हे मान्य केले तर बीड जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना हा पेपर पुन्हा द्यावा लागणार आहे.

पेपरफुटीबाबत विविध पातळीवर चौकशी सुरू आहे. रविवार असल्याने फारशी चौकशी पुढे जाऊ शकली नाही. सोमवारी ही प्रक्रिया पूर्ण करण्याचा प्रयत्न असेल, यानंतर शासनाला अहवाल सादर केला जाईल.
- नंदकुमार, शिक्षण सचिव.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘प्रश्न कोण सोडवील, ही धारणाच चूक’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
आयुक्त सुनील केंद्रेकर म्हणाले 'असुविधा आणि लहान-सहान बाबींवर जो-तो फक्त टीका करतो. आमचे प्रश्न कोणी सोडवील ही धारणाच मुळात चुकीची आहे,' असे मत प्रभारी महापालिका आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी व्यक्त केले.

सिडकोतील संत तुकाराम नाट्यगृहात झालेल्या या कार्यक्रमात ९ वी वेध व्यवासय प्रबोधन परिषदेत ते बोलत होते. यावेळी केंद्रेकर, अभिनेत्री मृण्मयी देशपांडे, उद्योजक सुनील रायठठ्ठा, शास्त्रज्ञ बाळासाहेब दराडे, पारधी समाजातील मुलांसाठी काम करणारे मतीन भोसले, पर्यावरण संवर्धनासाठी काम करणाऱ्या मानसी करंदीकर, केतकी घाटे यांनी आपला जीवनपट उपस्थितांपर्यंत उलगडला. मानसोपचारतज्ज्ञ डॉ. आनंद नाडकर्णी यांनी विविध सत्रात या प्रगट मुलाखती घेतल्या.

'छोटे-मोठे प्रश्न समाजाचे पर्यायाने आपले आहेत, असे समजून तो सोडविण्याचा प्रयत्न केला जात नाही. हे प्रश्न आपले आहेत, असे समजून प्रत्येकाने पुढे यायला हवे. आमचे प्रश्न कोणी सोडविल ही धारणाच मुळात चुकीची आहे. मी त्वरित निर्णय घेऊन तो अंमलात आणण्याचा नेहमीच प्रयत्न करतो. अनेक कठीण निर्णय घेताना मी कधी कचरलो नाही, कारण समाजाच्या हितासाठी निर्णय घेतोय यावर माझा ठाम विश्वास होता,' असे केंद्रेकर यांनी सांगितले.

अमेरिकेतील करिअर सोडलेले शास्त्रज्ञ बाळासाहेब दराडे म्हणाले, एक शंभर टक्के ध्येयवेडा माणूस समाजात मोठे परिवर्तन घडवून आणू शकतो. त्यामुळे प्रत्येकाने मोठे ध्येय समोर ठेवून काम केले पाहिजे. आपल्या देशासाठी, समाजासाठी काही चांगले काम करायचे असेल तर मोठ्या बुद्धीमत्तेची आवश्यकता नव्हे तर शुद्ध ह्दयाची गरज आहे. पर्यावरण संवर्धनासाठी काम करणाऱ्या केतकी घाटे व मानसी करंदीकर म्हणाल्या, निसर्गाशी जवळीक साधतानाच, विकासासाठी झपाटलेल्या या काळात निसर्गाचे, पर्यावरणाचे संवर्धन करण्याची जबाबदारी आम्ही आपल्या कामाचा, करिअरचा भाग बनविला आणि त्यातून आम्हाला जीवनाचा खरा अर्थ, आनंद प्राप्त झाला. छोट्या छोट्या प्रयोगातून आपण पर्यावरणाचे संवर्धन करू शकतो.

मृण्मयी देशपांडे यांनी आपला अभिनय क्षेत्रातील जीवनप्रवास मांडला. या कार्यक्रमाला शैलजा केंकरे, मुनीष शर्मा, बिजली देशमुख, डॉ. मंगेश पानट, डॉ. वीणा पानट, डॉ. संपत सारडा, डॉ. अर्चना सारडा, देवेंद्र पाटील यांची उपस्थिती होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पत्रकार संघाची वाळूजमध्ये निवड

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, वाळूज
वाळूज महानगर पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी भागिनाथ जाधव यांची फेरनिवड झाली आहे. सचिवपदी देविदास त्रिंबके यांची निवड झाली. वाळूज महानगर पत्रकार संघाची कार्यकारिणी दरवर्षी निवडण्यात येते. कार्यकारिणी निवडीसाठी वैष्णवदेवी उद्यानात नुकत्याच झालेल्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी बबन गायकवाड होते. यावेळी संघाचे संस्थापक अध्यक्ष चंद्रशेखर कुरणे यांची प्रमुख उपस्थिती होती. वर्षभरातील कामकाजाचा आढावा घेतल्यानंतर जाधव यांची फेरनिवड करण्याचा निर्णय घेण्यात आला. ते संतोष बारगळ यांच्यानंतर सलग दुसऱ्यांदा अध्यक्षपद लाभणारे प्रतिनिधी आहेत. यावेळी निवडलेली कार्यकारिणी पुढीलप्रमाणेः उपाध्यक्ष अतीश वानखेडे, सचिव देविदास त्रिंबके, कार्याध्यक्ष संजय मगरे, कोषाध्यक्ष श्यामसुंदर गायकवाड, सहसचिव मनोज जोशी, सहकार्याध्यक्ष पांडूरंग चोथे, विधीसल्लागार अॅड. नामदेव सावंत, सल्लागार बबन गायकवाड, रामराव भराड, भरत गायकवाड, संतोष बारगळ, नाना आल्हाट, सदस्य अशोक कांबळे, संतोष बोटवे, महेंद्र तुपे, भारत थटावले, संजन नेमाने, दीपक जोशी, केशव पवार, नानासाहेब जंजाळ, ओमप्रकाश नेमाने.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


विद्यार्थ्यांना दुप्पट शुल्कवाढीचा चटका

$
0
0

Ashish.Choudhari@timesgroup.com
औरंगाबाद ः दुष्काळामुळे मराठवाड्यातील विद्यार्थ्यांवर शिक्षण सोडण्याची वेळ आलेली असताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने मात्र अभ्यासक्रमांच्या प्रवेश शुल्कात पाच, दहा टक्के नव्हे तर चक्क दुपटीने वाढ केली आहे. हा सगळा पैसा कॉलेजांच्या तिजोरीत जाणार आहे. विद्यापीठ प्रशासनाचा हा खटाटोप दुष्काळामुळे संकटात सापडलेल्या विद्यार्थ्यांनी आर्थिक चटके देणारा आहे.

बीबीए, बीसीएसह, एमएस्सी आदी नऊ अभ्यासक्रमांचे शुल्क आता दुपटीने वाढविण्यात आले आहे. साडेअकरा हजार रुपयांचे शुल्क तब्बल २५ हजार रुपये करण्यात आले आहे. मराठवाड्यात दुष्काळ पडला आहे. सततच्या दुष्काळामुळे ग्रामीण भागातील हजारो विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क भरणेही अडचणीचे झाले आहे. शासनाने फक्त दहावी, बारावी व उच्चशिक्षणाचे परीक्षा शुल्क माफ केले, परंतु विद्यापीठाने व्यावसायिक शुल्क दुपटीने वाढवण्यासाठी दुष्काळाचा मुहूर्त साधला आहे. शैक्षणिक वर्षानुसार शुल्क स्वीकारण्यात येत होते. आता सत्र पद्धतीने शुल्करचना करण्यात आली आहे. त्यामुळे पूर्वी एका वर्षाचे असलेले शुल्क एका सत्रासाठी भरावे लागणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना दुप्पट शुल्क भरावे लागेल. यासंदर्भात प्रशासनाने कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांच्या स्वाक्षरीचे पत्र २५ डिसेंबर रोजी पाठविले आहे. विद्यापीठाच्या या निर्णयाने संस्था चालकांच्या तिजोरीत लाखो रुपये जमा होणार आहेत.

या अभ्यासक्रमांची शुल्कवाढ
बॅचरल ऑफ बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशन (बीबीए), बॅचलर ऑफ कम्प्युटर अॅप्लिकेशन (बीसीए), बॅचलर ऑफ कम्प्युटर मॅनेजमेंट (बीसीएम), डिप्लोमा इन बिझनेस मॅनेजमेंट (डीबीएम), बीएस्सी कम्प्युटर सायन्स, बीएस्सी आयटी, बीजे, एमएस्सी कम्प्युटर सायन्स, मास्टर ऑफ मॅनेजमेंट सायन्स आदी अभ्यासक्रमांचे शुल्क वाढविले आहेत. विद्यार्थ्यांना विविध २६ प्रकारचे शुल्क प्रवेश घेताना भरावे लागते. त्यापैकी ट्युशन फी व प्रयोगशाळा शुल्कच सत्रनिहाय भरावे लागणार आहे.

ट्यूशन फी, प्रयोगशाळा शुल्क
अभ्यासक्रम....२००९ पूर्वी...........२००९............नवे शुल्क
बीबीए................८५००.............११५००..............२३०००
एसएसस्सी..........८०००............१६०००..............३२०००
व्यवस्थापन शास्त्र.०००.............१२०००..............२४०००
बीसीएम..............६०००............७०००................१४०००

३० हजारांवर विद्यार्थ्यांना झ‍ळ
अभ्यासक्रम.......कॉलेज.....विद्यार्थी
बीबीए.................८५...........१५०००
बीसीए.................८५...........८५००
एमएस्सी (सीएस)..३५..........३५००
एमएस्सी (आयटी..३५..........३५००

हा विषय विद्यापीठ व महाविद्यालय विकास मंडळ (बीसीयूडी) यांच्या कार्यक्षेत्रातील आहे. त्यामुळे याबद्दल मला पूर्ण माहिती नाही.
- डॉ. बी. ए. चोपडे,
कुलगुरू, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाघ, हत्तींचे तडाखे; सुरक्षा रामभरोसे!

$
0
0


Unmesh.Deshpande
@timesgroup.com
आैरंगाबाद : दोन दशकांपूर्वी बांधलेले मोडकळीस आलेले पिंजरे, हत्तीने धडक देऊन पाडलेली संरक्षक भिंत. कोणत्या पिंजऱ्यातून केव्हा, कोणता प्राणी निसटेल याचा नेम नाही. किरकोळ दुरूस्तीशिवाय महापालिका काहीही करत नाही. त्यामुळे सिद्धार्थ प्राणिसंग्रहालय, त्यातील प्राणी सध्या धोकादायक झाले आहेत. महापालिकेच्या या दुर्लक्षाचा 'मटा'ने केलेला हा पंचनामा.
प्राणिसंग्रहालयातील पिंजऱ्याच्या वरच्या बाजूस बसविलेली जाळी तोडून रविवारी एक माकड पिंजऱ्याबाहेर पडले. त्याला पकडण्यासाठी कर्मचाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागली. आज पिंजऱ्याची तुटलेली जाळी तारांनी बांधून दुरुस्त केली. सचिन आणि रिटा हे दोन पांढरे वाघ ज्या पिंजऱ्यात ठेवले आहेत त्या पिंजऱ्याचे बेसमेंट खचले आहे. बेसमेंटला जागोजागी मोठा भेगा पडलेल्या दिसून येतात. याच पिंजऱ्याचे छत देखील तकलादू आहे. छताला पडलेल्या भेगा पिंजऱ्याला केव्हा जमीनदोस्त करतील याचा भरवसा नाही. पिवळ्या वाघांच्या पिंजऱ्याची संरक्षक भिंतदेखील पडण्याची शक्यता आहे. पिंजऱ्याच्या मागच्या बाजूला नाल्याच्या काठाने बांधलेली भिंत तडे पडल्यामुळे नाजूक बनली आहे. पिंजऱ्यातील वाघाने दोन - चार वेळा जरी या भिंतीला धडक मारली, तरी ती भिंत पडेल. वाघाने या भिंतीपर्यंत पोहचू नये म्हणून भिंतीला खेटून जाळीचे दार उभारले आहे. लक्ष्मी आणि सरस्वती या दोन हत्तीणीासाठी हत्ती घर तयार केले आहे. हत्ती घरासाठी संरक्षक भिंत बांधण्यात आली असून, काही दिवसांपूर्वी हत्तींनी धडका देत भिंतीचा एक भाग पाडून टाकला. संरक्षक भिंतीलाही तडे पडले आहेत. या हत्ती घरातून हत्ती केव्हा बाहेर पडतील, याचा नेम राहिलेला नाही. अस्वल, माकड या प्राण्यांना ठेवण्यात आलेले पिंजरे देखील धोकादायक बनले आहेत.
दुरुस्ती प्रक्रिया किचकट
मोडकळीस आलेल्या पिंजऱ्यांची फक्त देखभाल दुरुस्ती केली. ही प्रक्रिया देखील फार सोपी नाही. प्राणिसंग्रहालयाच्या व्यवस्थापनाने पिंजऱ्यांच्या देखभाल दुरुस्तीची माहिती संबंध‌ित कार्यकारी अभियंत्याला देणे गरजेचे असते. कार्यकारी अभियंत्यांकडून वेळ मिळेल तेव्हा या कामाची दखल घेतली जाते. शाखा अभियंत्यामार्फत देखभाल दुरुस्तीचे अंदाजपत्रक तयार करून ते उपअभियंता, कार्यकारी अभियंता, शहर अभियंता यांच्या मार्फत मंजुरीसाठी पाठविले जाते. यात काही महिन्यांचा काळ लोटला जातो. प्राणिसंग्रहालयातील पिंजऱ्यांच्या कामासाठी स्वतंत्र अभियंता उपलब्ध नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाघोबांमध्ये खडाजंगी; सचिनचा रीटावर हल्ला

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
महापालिकेच्या सिद्धार्थ उद्यानातील प्राणिसंग्रहालयात असलेल्या पांढऱ्या वाघांमध्ये काही दिवसांपूर्वी तुंबळ भांडण झाले. सचिन या पांढऱ्या वाघाने रीटा या पांढऱ्या वाघिणीवर हल्ला केल्यामुळे रीटाच्या शेपटीला गंभीर इजा झाली. तिच्यावर विशेष कक्षात उपचार केले जात आहेत.
प्राणिसंग्रहालयीतल प्राण्यांमध्ये नेहमीच भांडणे होतात. या भांडणार फार गंभीरपणे प्राणी जखमी झाल्याचे प्रसंग क्वचित घडतात. वाघांमध्ये झालेल्या भांडणात एखादा वाघ गंभीर जखमी झाल्याच्या घटना यापूर्वी घडल्या आहेत. त्याचीच पुनरावृत्ती गेल्या आठवड्यात झाली. खेळता-खेळता सचिन या वाघाने रीटा वाघिणीवर हल्ला केला. या हल्ल्यात रीटाच्या शेपटीला गंभीर इजा झाली. इजा झाल्यामुळे सैरभैर झालेल्या रीटाला स्वतंत्र पिंजऱ्यातून विशेष कक्षात उपचारासाठी हलविण्यात आले. प्राणिसंग्रहालयाच्या संचालकांच्या कार्यालयाशेजारी प्राण्यांसाठीच्या हॉस्पिटसाठी इमारत बांधण्यात आली आहे. या इमारतीमधील कक्षात सध्या रीटावर उपचार केले जात आहेत. संचालक डॉ. बी. एस. नाईकवाडे, कार्यालयीन अधीक्षक संजय नंदन, केअरटेकर मोहम्मद जिया व सोमनाथ मोटे हे सर्वजण रिटाची काळजी घेत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘त्या’ अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करा

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
'जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागातील मागासवर्गीय प्रवर्गासाठी असलेल्या वैयक्तिक लाभाच्या योजनांचा पाच कोटींचा निधी दोन वर्षांपासून अखर्चित आहे. एवढा विलंब कशामुळे लावण्यात आला ? या प्रकरणी जे अधिकारी दोषी असतील त्यांच्यावर तत्काळ कडक कारवाई करा,' असे आदेश पालकमंत्री रामदास कदम यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत दिले.
कदम यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी बैठक झाली. तीत सदस्य सुनील सोनवणे यांनी जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाचा विषय उपस्थित केला. विशेष म्हणजे जून महिन्यात झालेल्या बैठकीतही सोनवणेंनी समाजकल्याण विभागाच्या योजनांविषयी विचारणा केली होती. महाराष्ट्र टाइम्समध्ये गेल्या आठवड्यात जिल्हा परिषदेतील विविध विभागांच्या अव्यवस्था आणि गैरप्रकारांवर 'झेडपीतील कुरण' या शीर्षकाखाली वृत्तमालिका प्रसिद्ध झाली. त्यात समाजकल्याण विभागात दोन वर्षांपासून पाच कोटी ११ कोटी रुपये अखर्चित असल्याचे प्रसिद्ध करण्यात आले होते. त्याचा संदर्भ देऊन सोनवणे यांनी पालकमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले की मागासवर्गीय प्रवर्गातील ग्रामीण नागरिकांच्या कल्याणासाठी या योजना आहेत. मात्र, झेडपी प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे उपकरातून राबविल्या जाणाऱ्या योजनांचे पैसे दोन वर्षांपासून पडून आहेत. त्यावर पालकमंत्री कदम यांनी सीईओ डॉ. अभिजित चौधरी यांच्याकडे विचारणा केली. 'योजना त्या त्या वेळी मार्गी लागल्याच पाहिजेत. या प्रकरणी जे दोषी असतील त्यांच्यावर कडक कारवाई करा,' असे आदेश कदम यांनी दिले. चौधरी यांनी कारवाईचे आश्वासन दिले.

बोगस शाळांवर गुन्हे दाखल करा
शिक्षण विभागाने शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीस बोगस शाळा तपासणी मोहीम हाती घेतली होती. त्यात ५१ बोगस शाळा आढळून आल्या होत्या. त्यांच्यावर काय कारवाई झाली ? अशी विचारणा बैठकीत करण्यात आली. इतके वर्ष बोगस शाळा सुरू आहेत. त्याच्यावर पूर्वीच कारवाई का झाली नाही, असा सवाल सोनवणेंनी उपस्थित केला. काही शाळा बंद करण्यात आल्याची माहिती शिक्षणाधिकाऱ्यांनी दिली. त्यावर पालकमंत्री कदम यांनी बोगस शाळा ही गंभीर बाब आहे. या शाळांवर कडक कारवाई करण्यासाठी तत्काळ गुन्हे दाखल करा, असे आदेश कदम यांनी दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खुनप्रकरणी तिघांना अटक; पं. स. सदस्य पसार

$
0
0


औरंगाबाद : वाहनाचालकाच्या खुनप्रकरणी दौलताबाद पोलिसांनी तिघांना अटक केली. यातला प्रमुख आरोपी माजी पंचायत समिती सभापती व विद्यमान सदस्य सर्जेराव चव्हाण फरार झाला आहे.
मृत वाहनचालक चंद्रकांत विष्णू जाधव यांच्या पत्नीने शुक्रवारी दौलताबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. यामध्ये चंद्रकांत हा सर्जेराव चव्हाण यांच्या वाहनावर गेल्या सहा वर्षांपासून चालक म्हणून काम करीत होता. अडीच महिन्यापूर्वी चंद्रकांतने काम सोडले. तसेच सर्जेरावच्या सर्व व्यवहाराची माहिती चंद्रकांतला होती. काम सोडल्यामुळे तसेच राजकीय विरोधकासोबत चंद्रकांतचे बसणे उठणे वाढल्यामुळे सर्जेरावला त्याचा राग होता. या रागातून हा प्रकार घडला. थर्टीफस्टला ठरला प्लॅन : सर्जेरावचे साई राजमाता नावाचे हॉटेल आहे. या हॉटेलवर ३१ डिसेंबर २०१५ रोजी लावणीचा कार्यक्रम होता. या ठिकाणी त्याला सायंकाळी आरोपी बिरजू तरैय्यावाले याने फोन करून बोलावले. या ठिकाणी त्याला नशेमध्ये मोफीन खान मुबलकखान पठाण, प्रभू नारायण बागुल व बिरजूलाल मिठ्ठूलाल तरैय्यावाले (सर्व रा. आसेगाव) यांनी मारहाण केली. यानंतर त्याला कारमध्ये कोंबून ए. एस. क्लब, नगरनाका, पडेगाव मिटमिटा मार्गे शरणापूर फाट्याकडे आणण्यात आले. महाराष्ट्र पब्लिक स्कूलमागे असलेल्या वंजारवाडी शिवाराजवळील रेल्वे रुळावर बेशुद्धावस्थेत टाकून दिले. त्यानंतर मालवाहू रेल्वेखाली त्याचा अंत झाल्याची कबुली सदरील आरोपींनी दिली आहे. यानंतर हा आत्महत्येचा बनाव असल्याचे आरोपींनी भासविले होते. या आरोपींपैकी बिरजूलाल हा माजी सरपंचाचा मुलगा आहे. तिन्ही आरोपींना अटक करण्यात आली असून गुन्ह्यात वापरलेली वाहने जप्त करण्यात आली आहेत. ही कारवाई पोलिस उपायुक्त वसंत परदेशी, संदीप आटोळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक प्रेमसागर चंद्रमोरे, पीएसआय डी. बी. कोपनर तसेच पथकाने केली.

तीन दिवसांची कोठडी
आरोपींना सोमवारी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी व्ही. जी. उपाध्ये यांच्या कोर्टात हजर करण्यात आले. सहायक सरकारी वकील डी. आर. काठुळे यांनी पोलिसांनी बाजू मांडली. मुख्य सूत्रधार सर्जेराव चव्हाणला अटक करायची असल्यामुळे आरोपींना पोलिस कोठडी देण्याची मागणी त्यांनी केली. कोर्टाने ही मागणी ग्राह्य धरीत आरोपींना तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आमदार निधी खर्चाची कुंडली आता ऑनलाइन

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
कोणत्या आमदाराने किती निधी खर्च केला, कोणत्या विकासकामांसाठी किती पैसा वापरला, काम वेळेत पूर्ण झाले की नाही, हा सारा लेखाजोखा आता ऑनलाइन मिळणार आहे. सध्या आमदारांनी केलेल्या खर्चाची नोंद जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये कर्मचारी कागदोपत्री करतात.
औरंगाबाद जिल्ह्यात ९ विधानसभा तर १ लोकसभा मतदारसंघ आहे. मराठवाड्यात ४६ विधानसभा आणि ८ लोकसभा मतदारसंघ आहेत. शिक्षक, पदवीधर आणि स्थानिक स्वराज्य संस्थेचे मतदारसंघ आहेत. या मतदारसंघात आमदार निधीतून दरवर्षी अनेक कामे होतात. त्या कामांची अंदाजपत्रके, प्रस्ताव करण्याचे काम सध्या ऑफलाइन सुरू आहे. ऑनलाइन सॉफ्टवेअर १ एप्रिल २०१६ पासून सुरू झाल्यानंतर लोकप्रतिनिधीची सर्व कामे व त्यांचे स्टेटस ऑनलाइन दिसेल. कामाला मंजुरी मिळताच त्याचा खर्च, काम पूर्ण होण्याची तारीख, कंत्राटदार ही माहिती ऑनलाइन अपलोड करणे शक्य होणार आहे. मागील वर्षापासून हे सॉफ्टवेअर तयार करण्यात आले असून ते अद्याप पूर्णपणे कार्यान्वित झालेले नाही. त्याची वर्षभर प्रशिक्षण शिबिरे झाली, परंतु आमदार - खासदार निधीतील कामे ऑनलाइन अपडेट झाली नाहीत. दरम्यान सोमवारी मराठवाड्यातील सर्व जिल्हा नियोजन अधिकाऱ्यांचे मराठवाडा विकास मंडळाच्या सभागृहात प्रशिक्षण शिबिर झाले. विभागीय उपायुक्त विजय आहेर यांनी मार्गदर्शन केले. अर्थ व सांख्यिकी विभाग मंत्रालयाचे सहसंचालक के. एन.पाटील यांनी अधिकाऱ्यांना सॉफ्टवेअरबाबत माहिती दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘सुवर्णरोखे’च्या गटांगळ्या

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
मराठवाड्यात सपशेल अपयशी ठरलेल्या सुवर्णरोखे योजेनेसाठी १४ राष्ट्रीयकृत बॅँकाना ६० कोटींचे, तर पोस्टाला उत्तर महाराष्ट्र व मराठवाडा मिळून ८० कोटींचे टार्गेट देण्यात आले आहे. २२ जानेवारीपर्यंत ह टार्गेट पूर्ण करायचे आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोव्हेंबर २०१५ मध्ये ही योजना जाहीर केली. सुवर्णरोखे, सुवर्ण ठेव आणि सोन्याची नाणी या तीन योजनांचा शुभारंभ केला. देशात पडून राहिलेले सोने चलनात आणणे हा या योजनांचा उद्देश होता. प्रत्यक्ष सोने खरेदीला पर्याय म्हणून सुवर्णरोखे (गोल्ड बाँड) योजना आणि देशातील घराघरांमध्ये पडून राहिलेला सोन्याचा साठा चलनात आणण्यासाठी 'सुवर्ण ठेव' योजना सादर करण्यात आली. त्याचबरोबर अशोक चक्राची मुद्रा असलेली सोन्याची नाणी केंद्र सरकारने सादर केली आहेत. ही नाणी लवकरच बाजारात विक्रीसाठी उपलब्ध होणार आहेत. देशात २० हजार टन सोने पडून आहे. या योजनांमुळे हे सोने प्रत्यक्ष चलनात येईल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता.
काय आहे सुवर्णरोखे?
प्रत्यक्ष सोने खरेदीला पर्याय म्हणून केंद्र सरकारने 'सुवर्णरोखे' योजना सुरू केली होती. हे सुवर्णरोखे १७ ते २२ जानेवारी २०१६ दरम्यान प्रती ग्रॅम २ हजार ६८४ रुपये मूल्यावर खरेदीसाठी उपलब्ध करून दिले गेले आहेत. सरकारतर्फे हे रोखे आणले जाणार असून, त्यावर ग्राहकांना २.७५ टक्के व्याज मिळेल. या रोख्यांसाठी आधी ५ नोव्हेंबर ते २० नोव्हेंबर या कालावधीत अर्ज भरून घेण्यात आले. मात्र, अत्यल्प प्रतिसादामुळे २२ जानेवारीपर्यंत हे बाँड खुले केले आहेत. रोख्यांची मुदत आठ वर्षांची असून यातून गुंतवणूकदारांना किमान पाच वर्षांपर्यंत बाहेर पडता येणार नाही. आधीच्या आठवड्यातील सोन्याच्या सरासरी बाजारभावानुसार या रोख्यांची किंमत ठरविली जाणार आहे. या रोख्यांची विक्री करतानाही याच प्रकारे किंमत निश्चित केली जाईल. सुवर्णरोख्यांवरील व्याज करपात्र असणार आहे.
औरंगाबाद विभागासाठी ४ कोटींचे टार्गेट आहे. मराठवाड्यात सर्वच पोस्ट व बँकाना कमी-अधिक प्रमाणात एवढेच टार्गेट दिले आहे. २२ जानेवारीपर्यंत सुवर्णरोखेमध्ये नागरिक गुंतवणूक करू शकतात.
- विजयकुमार कांबळे, विभागीय व्यवस्थापक, महाराष्ट्र बँक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


विद्यापीठात पत्रांचा खेळ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
शासनाची परीक्षा शुल्कमाफीची घोषणा करून मोकळे झाले. त्यानंतर यासंदर्भात डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या दोन स्वतंत्र परिपत्रके जारी करून संभ्रम निर्माण केला आहे. एका पत्रात कॉलेजांनी परीक्षा शुल्क परत करावे, अशा सूचना दिल्या आहेत. दुसऱ्याच दिवशी जारी केलेल्या परिपत्रकात विविध हेडखाली शुल्क आकारणी करण्याचे सांगण्यात आले आहे. प्रशासनाच्या गोंधळात विद्यार्थ्यांची फरफट होत आहे.

मराठवाड्यातील सततच्या दुष्काळामुळे सर्वाधिक परिणाम शिक्षण क्षेत्रावर होत आहे. ही परिस्थिती लक्षात घेत शासनाने परीक्षा शुल्कमाफीची घोषणा केली, परंतु ती केवळ कागदापुरतीच राहिली आहे. सध्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातंर्गत पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या मार्चमध्ये घेण्यात येणाऱ्या परीक्षांचे अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. कॉलेजांनी विद्यार्थ्यांकडे शुल्क भरण्याचा तगादा लावला आहे. सरकार परीक्षा शुल्क माफीची घोषणा करून मोकळे झाले. विद्यापीठाने मात्र यासंदर्भात दोन वेगवेगळी परिपत्रके काढून संभ्रम निर्णाय केला आहे. या दोन्ही पत्रांत एका दिवसाचेच अंतर आहे, हे विशेष. विद्यापीठाने १२ जानेवारी रोजी परिपत्रक काढून विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क परत करण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यानंतर लगेच १३ जानेवारीला परिपत्रक काढून अशा विद्यार्थ्यांची यादी विद्यापीठाला पाठविण्याच्या सूचना केली आहे.

त्यामुळे नेमके काय
विद्यापीठाने पहिल्या परिपत्रकात ५० टक्के पैसेवारी कमी असलेल्या गावांमधील ईबीसीधारक विद्यार्थ्यांचे संपूर्ण शैक्षणिक वर्षाचे परीक्षा शुल्क पूर्णपणे कॉलेज, विभागांनी परत करावे, अशा स्पष्ट सूचना दिल्या आहेत. दुसऱ्या दिवशी दुसरे पाठविलेल्या पत्रात, शुल्क आकारणी करावी, असे सुचविण्यात आले आहे. त्यात गुणपत्रक, सेंट्रल अॅसेसमेंट चार्जेस, प्रोसेसिंग चार्जेस, कम्प्युटर चार्जेस आकारून अर्ज सादर करावे, अशा स्पष्टपणे म्हटले आहे.

उशिरा आली जाग
शासनाने परीक्षा शुल्कमाफीची घोषणा नोव्हेंबरमध्ये केली. विद्यापीठाने सुमारे दोन महिन्यांनंतर, जानेवारीत याबाबतचे परिपत्रक काढले. त्यामुळे विद्यार्थ्यांबाबत विद्यापीठ किती सजग असते, हे पुन्हा एकदा समोर आले आहे. परीक्षा जवळ आल्यानंतर विद्यापीठ प्रशासनाला परीक्षा शुल्काबाबत जाग आली आहे.

८५५५
मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त गावे

३ लाख ८० हजार
दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अतिक्रमण हटावसाठी अधिकारी

$
0
0



म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
भूमिगत गटार योजनेच्या कामात अडथळा ठरणारी अतिक्रमणे हटविण्यासाठी महापालिकेने विशेष अधिकाऱ्याची नियुक्ती केली आहे. या विभागात पहिल्यांदाच पाच अधिकारी देण्यात दिले आहेत.
केंद्र सरकारच्या युआयडीएसएसएमटी (आर्बन इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट स्किम फॉर स्मॉल अँड मीडिअम टाउन्स) या योजनेअंतर्गत भूमिगत गटार योजनेचे काम सुरू करण्यात आले आहे. शहरातून वाहणाऱ्या नाल्यांमधून मुख्य ड्रेनेजलाइन टाकून नाल्यांचे प्रवाह भूमिगत करण्याची ही योजना आहे. बहुतेक नाल्यांवर अतिक्रमण झाले आहे. त्यामुळे ड्रेनेजलाइन टाकण्याच्या कामात अडचणी निर्माण होत आहेत. ही अतिक्रमणे पाडून द्या, अशी मागणी ड्रेनेज विभागाकडून प्रशासकीय विभागाकडे काही महिन्यांपूर्वी करण्यात आली. प्रशासकीय विभागाने नाल्यांवरच्या अतिक्रमणांचे मार्किंग करून द्या, अशी मागणी नगररचना विभागाकडे केली. मागणींच्या फेऱ्यात नाल्यांवरची अतिक्रमणे अडकली आणि त्यामुळे भूमिगत गटार योजनेचे काम खोळंबण्याची शक्यता निर्माण झाली. त्यामुळे पालिका आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्या आदेशाने कार्यकारी अभियंता अफसर सिद्दिकी यांना प्रशासकीय अधिकारीपदाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला. भूमिगत गटार योजनेचे काम अफसर सिद्दिकी यांच्यामार्फतच केले जात आहे. त्यांनाच नाल्यावरची अतिक्रमणे हटविण्याचे काम दिल्यास ते अधिक प्रभावीपणे होईल, असे मानून त्यांना प्रशासकीय अधिकारीही करण्यात आले आहे. त्यांच्या शिवाय अजमत खान, महावीर पाटणी, शिरीष रामटेके, बोईनवाड यांची प्रशासकीय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अप्रगत विद्यार्थ्यांसाठी स.भु.मध्ये स्पेशल क्लास

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
प्रत्येक विद्यार्थ्याची क्षमता सारखी नसते. काही मुले अभ्यासात रमत नाहीत. ती काही विषयात कच्ची असतात. अशा मुलांना हेरून त्यांच्यावर विशेष लक्ष देण्यासाठी सरस्वती भुवन हायस्कूलमधील शिक्षकांनी 'क्लास फॉर स्पेशल स्टुडंटस्'चा उपक्रम सुरू केला आहे. उपक्रमांतंर्गत अशा विद्यार्थ्यांना शोधून त्यांच्यात अभ्यासाची गोडी निर्माण केली जाते. विषय सोप्या पद्धतीने शिकविला जातो.

विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची गोडी निर्माण व्हावी, यासाठी शाळांमध्ये विविध उपक्रम राबविले जातात. त्यात अप्रगत विद्यार्थ्यांसाठीही उपक्रम राबविण्यात येतात. आठवीपर्यंत सरसगट उत्तीर्ण करण्याची शाळांची भूमिका असते. त्यामुळे दहावीला गेल्यानंतर विद्यार्थ्यावर ताण पडतो. इंग्रजी, गणित विषयांची विद्यार्थ्यांना भीती वाटते. त्यामुळे अनुत्तीर्णतेचे प्रमाण वाढते. हे लक्षात घेऊन शाळेतील शिक्षकांनी अप्रगत विद्यार्थ्यांसाठी हा उपक्रम हाती घेतला. त्यात दहावीत थोडे अप्रगत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र वर्ग भरविला जातो. त्यांच्यासाठी जास्तीचे तासिका घेतल्या जातात. गणित, इंग्रजी विषय सोपे करून कृतीशील शिक्षणावर भर शिकविले जातात.

विद्यार्थ्यांची गैरहजर राहू नयेत, यासाठी पालकांना या उपक्रमाबाबत मार्गदर्शन करण्यात आले आहे. या विद्यार्थ्यांची एकाग्रता वाढावी म्हणून त्यांना योगासनांचे प्रशिक्षणही दिले जाते. अशा उपक्रमामुळे विद्यार्थ्यांचा फायदा झाल्याचे निकालातून समोर आल्याचे मुख्याध्यापिका एस. एस. उपाध्ये यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हेल्मेट बाबतचा निर्णय धाब्यावर

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
नवीन दुचाकी वाहन घेताना वाहनासोबत हेल्मेटही द्यावे, असे आदेश राज्य शासनाने कोर्टाच्या आदेशानंतर काढले. मात्र, चार ते पाच वर्षांपूर्वी काढलेल्या या आदेशाची अंमलबजावणी वाहनविक्रेत्यांकडून केली जात नाहीच. सोबतच शासकीय यंत्रणादेखील हा आदेश राबविण्यास उत्सुक नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
औरंगाबाद शहर व सातारा परिसरात विविध कंपन्यांच्या वाहन एजन्सी आहेत. मागील काही वर्षांत वाहनांची विक्री मोठ्या प्रमाणात वाढली आहे. दुचाकी अपघातात वाढत चाललेले मृत्यूचे प्रमाण लक्षात घेऊन तीन ते चार वर्षांपूर्वी शासनाने वाहनविक्रेत्यांना दुचाकी देताना ग्राहकास सुरक्षेसाठी हेल्मेट विकत देण्याचाही आदेश होता. सर्व प्रादेशिक परिवहन कार्यालयांना हा नियम लागू करण्याबाबतचे आदेश होते. काही महिने वाहनविक्रेत्यांनी या नियमाचे पालन केले. मात्र, पुढे हा नियम धाब्यावर बसविण्यात आला.
-
राज्य शासनाने नवीन वाहन खरेदी करताना, हेल्मेट विकत घेण्याबाबत निर्देश दिले होते. राज्य शासनाच्या सूचनांचे पालन विक्रेत्यांनी करावे. आधीपासूनच हा नियम लागू केला असता तर हेल्मेटसक्तीचा निर्णय राबविण्यात कोणतीही अडचण गेली नसती. आरटीओ विभागाकडून हेल्मेट वाहनविक्री करतानाच विकत द्यावी, हा नियम राबविण्याबाबत वाहन विक्रेत्यांशी चर्चा करणार आहे.
- सर्जेराव शेळके, प्रादेशिक परिवहन अधिकारी, औरंगाबाद
-
हेल्मेटबाबत आम्ही हा निर्णय लागू करण्याचा प्रयत्न केला होता. आताही आम्ही गाडी विकताना हेल्मेटबाबतची माहिती ग्राहकांना देत असतोच. मात्र, ग्राहक आमच्याकडे हेल्मेट असल्याचे सांगून नवे हेल्मेट घेत नाही. त्यामुळे हा निर्णय लागू करण्यात अडचणी निर्माण होत आहेत.
- हेमंत ‌खिवंसरा, राज ऑटो, औरंगाबाद

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आंबेडकरी चळवळीतील नेते जगन कांबळे यांचे निधन

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते जगन कांबळे (वय ६४ वर्षे) यांचे सोमवारी दुपारी २ वाजता घाटी रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले. त्यांच्यावर मंगळवारी सकाळी १० वाजता रमानगर येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
पैठणगेट परिसरातील निवाससस्थानापासून सकाळी १० वाजता अंत्ययात्रा निघेल. त्यांच्या मागे आई, पत्नी, २ मुले, एक सून तीन भावंडे असा परिवार आहे. विद्यार्थीदशेपासून रिपब्लिकन स्टुडंट फेडरेशनचे कार्यकर्ते म्हणून त्यांनी आपल्या सामाजिक कार्याला सुरुवात केली. अनेक सामाजिक लढायांमध्ये सहभाग नोंदवला. ते यूथ रिपब्लिकन चळवळीच्या माध्यमाने कार्यरत राहिले. बाळासाहेब आंबेडकर यांच्यासोबत राहून भारिपच्या वतीने पश्चिम विधानसभेची निवडणूकही त्यांनी लढवली. १९८३ पासून आजपर्यंत दलित सेनेच्या माध्यमातून रामविलास पासवान यांच्यासोबत त्यांनी काम पाहिले. शेवटपर्यंत आंबेडकरी चळवळीशी इमान कायम राखत फुले-शाहू-आंबेडकरी विचारधारा त्यांनी जपली होती. ते दलित सेनेचे वरिष्ठ उपाध्यक्ष म्हणून कार्यरत होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images