Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

रेल्वे स्टेशनवर सुरक्षा कर्मचाऱ्यांचीच गर्दी

$
0
0
आसाराम बापूंच्या भक्तांनी आज रेल्वे सुरक्षा रक्षकांना रेल्वे रोकोचा इशारा देत कामाला लावून दिले. बापूंच्या भक्तांनी रेल्वे संपत्तीचे नुकसान करू नये म्हणून रेल्वे स्टेशनवर खडा पहारा देण्यात आला. मात्र, बापूंचे भक्त रेल्वे स्टेशनकडे फिरकलेच नाहीत.

सर्व गॅस एजन्सीमध्ये आधार नोंदणीची सोय

$
0
0
औरंगाबाद जिल्ह्यातील सर्व गॅस एजन्सीवर आधार नोंदणी करण्याची सोय जिल्हा प्रशासनाने उपलब्ध करून दिली आहे. तेथे गॅसधारकांचे आधार कार्ड नोंदणीचे काम करण्यात येणार आहे. येत्या नोव्हेंबर महिन्यापासून जिल्ह्यात आधार कार्ड क्रमांकाच्या मदतीने ग्राहकाच्या बँकेत गॅस सिलिंडरचे अनुदान जमा करण्यात येणार आहे.

‘एन मार्ट’चा शेखावत पोलिसांच्या ताब्यात

$
0
0
एन मार्ट या बहूचर्चित मल्टी लेव्हल मार्केंटिंगचा संचालक गोपाळसिंग शेखावत याला क्रांतीचौक पोलिसांनी अटक केली आहे. आंध्र प्रदेश ये‌थे न्यायालयीन कोठडीत असलेल्या शेखावतला कोर्टाच्या आदेशाने ताब्यात घेण्यात आले.

पुस्तके मिळाली नाहीत तर मला एसएमएस करा

$
0
0
‘शुक्रवारपर्यंत तुम्हाला पाठ्यपुस्तके मिळाली नाहीत तर शनिवारी मला एसएमएस करा, पुस्तके उपलब्ध करून देण्याची व्यवस्था मी करतो,’ असे म्हणत पालिका आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांनी पालिका शाळेतील विद्यार्थ्यांना थेट आपला मोबाईल क्रमांक दिला.

‘थम्ब इम्प्रेशन’शिवाय कोणाचाही पगार नाही

$
0
0
थम्ब इम्प्रेशनचा अहवाल आल्याशिवाय अधिकारी-कर्मचायांचा पगार काढू नका असा फतवा पालिका आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांनी लेखा विभागाच्या नावे काढला आहे. चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांना यातून वगळण्यात आले आहे.

पेट्रोलची दरवाढ एसटीच्या पथ्यावर

$
0
0
पेट्रोलचे वाढलेले दर आणि अॅपे चालकांची मुजोरी यामुळे शहर बस सेवा आवश्यक आहे. ही सेवा चांगली करण्यासाठी सिडको आगार प्रमुखांनी चार ठिकाणी कंट्रोल पाईन्ट उभारल्याने शहर बसमध्ये प्रवाशांची संख्या वाढली असून दररोज पंचवीस हजाराचे उत्पन्न वाढले आहे.

बनावट डॉक्टरांवर कारवाईचे आदेश

$
0
0
औरंगाबाद जिल्ह्यात १२२ बनावट डॉक्टर वैद्यकीय व्यवसाय करीत आहेत. त्यांच्यावर तातडीने फौजदारी कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी विक्रमकुमार यांनी गुरुवारीआरोग्य व पोलीस यंत्रणेच्या अधिकाऱ्यांना दिले.

करमणूक करप्रकरणात कोंडी

$
0
0
शहरात अनेक केबल ग्राहकांकडे असलेले हाथवे-एमसीएनचे सेट टॉप बॉक्स बंद आहेत. त्याचबरोबर ग्राहकांकडून शुल्क वसुलीचे काम केबल ऑपरेटर करीत आहेत, मात्र विक्री करण्यात आलेल्या सर्व सेट टॉप बॉक्सवर करमणूक कर भरावा, असे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.

महागाईच्या छायेत बैलपोळा साजरा

$
0
0
श्रमाचा पुजारी म्हणून संबोधलेल्या बैलांचा पोळा हा सण शेतकऱ्यांच्या दृष्टीने आनंदाचा उत्सव. मात्र, वर्षातून एकदा येणाऱ्या या सणावर यंदा दुष्काळासोबतच महागाईचे सावट होते.

जमिनीसाठी 'दादां'ची मध्यस्थी

$
0
0
दिल्ली मुंबई इंडस्ट्रिअल कॅरिडोर (डीएमआयसी) प्रकल्पांतर्गत बिडकीनसह परिसरातील पाच गावांतील जमिनीच्या संपादनाचा दर ठरविण्यासाठी शेतकऱ्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना साकडे घातले आहे.

गटनेत्यांना डावलले

$
0
0
भूमिगत गटार योजनेचा प्रस्ताव केंद्र सरकारने मंजूर करावा व पालिकेला अनुदान द्यावे, अशी मागणी करण्यासाठी पालिकेचे पदाधिकारी आज गुरूवारी दिल्लीला रवाना झाले. दिल्लीला रवाना होताना मात्र शिवसेना-भाजपच्या गटनेत्यांना डावलण्यात आले.

गणेशोत्सावावर ‘वॉच’

$
0
0
गणेशोत्सव अवघ्या चार दिवसांवर आला आहे. गणेशोत्सवाच्या काळात सुर‌‌क्षिततेच्या दृष्टीने मोठ्या मंडळावर; तसेच गर्दीच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेऱ्याची करडी नजर राहणार आहे.

चर्चा नको कृती हवी

$
0
0
कोणत्याही शहरात गेल्यानंतर रस्ते, दुतर्फा झाडी आणि कचराकुंड्या या तीन गोष्टीं पटकन डोळ्यात भरतात. शहरात वनराई असल्यास चांगले वातावरण तयार होते. तर ज्या शहराचे रस्ते गुळगुळीत व मोठे असतात त्या शहराबद्दल प्रत्येकाला प्रेम वाटते.

‘सीओ’स लाच स्वीकारताना अटक

$
0
0
तुळजापूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी संतोष जिरगे व भांडारपाल प्रताप कदम यांना भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाच्या पथकाने गुरुवारी सकाळी अटक केली. नळजोडणी साहित्याचे पुरवठाधारक योगेश दळवी यांच्याकडून ३० हजार रुपयांची लाच स्वीकारताना ते आढळून आले.

पर्यावरणाला धोका पोचवताय?

$
0
0
स्मार्ट सिटी, डीएमआयसी प्रकल्पांमुळे औद्योगिकीकरण, नागरीकरण वाढणार आहे. अशा परिस्थितीत पर्यावरणास धोका पोचविण्याचा प्रयत्न कोणी करीत असेल तर, सावधान.

मुख्यमंत्र्यांचा निर्णय बँकेला मान्य?

$
0
0
राज्यातील बंद साखर कारखाने यापुढे विकले जाणार नाहीत असा निर्णय मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी घोषीत केला आहे. त्यांनी घेतलेला निर्णय राज्य सहकारी बँकेला मान्य आहे का ? असा सवाल साखर कामगार कृती समितीचे निमंत्रक माजी आमदार माणिक जाधव यांनी पत्रकार परिषदेत केला.

पीडित बालिकेचे पुनर्वसन करणार

$
0
0
जिल्हा परिषदेचे समाजकल्याण सभापती रामनाथ चोरमले यांनी शुक्रवारी तुळजापूर येथे पीडित सहा वर्षीय बालिका व त्याच्या कुटुंबियांची भेट घेत. मुलीचे पुनर्वसन करण्यात येणार आहे, असे त्यांनी सांगितले.

पित्यासह २ मुलांचा बुडून मृत्यू

$
0
0
उदगीर तालुक्यातील हेर येथे बैल पोळ्याच्या निमित्ताने बैल धुवत असताना दोन मुले बुडाली. त्यांना वाचविण्यासाठी गेलेल्या वडिलांचाही तलावात बुडून मृत्यू झाला.

हदगावात २ गटात हाणामारी

$
0
0
कत्तलखान्याकडे गायी नेणारा ट्रक पकडल्याच्या कारणावरुन दोन गटात हदगांव येथे तुंबळ हाणामारी झाली. यामध्ये मध्यस्थी करण्यासाठी गेलेले काही युवकही जखमी झाले.

विवाहितेवर बलात्कार; तिघांना अटक

$
0
0
एका असहाय विवाहित युवतीवर मदतीचे आश्वासन देण्याच्या बहाण्याने दोन नराधमांनी विविध ठिकाणी बलात्कार केल्याची घटना उजेडात आली आहे. आरोपीने १७ ऑगस्ट ते १ सप्टेंबर दरम्यान बलात्कार केला.
Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images