Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

सकाळ संध्याकाळ हेल्मेट रिलीफ

0
0

सकाळ संध्याकाळ हेल्मेट रिलीफ

कार्यालयीन वेळेत हेल्मेटचा वापर

म. टा. प्र्रतिनिधी, औरंगाबाद

शहरात हेल्मेटसक्ती सुरू झाल्यानंतर पोलिसांनी हेल्मेट न वापरणाऱ्यांवर कारवाई सुरू केली. मात्र, ही कारवाई केवळ कार्यालयीन वेळेत म्हणजे सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेतच होत असल्याचे दिसते. त्यामुळे दुचाकीचालकही यावेळेव्यतिरिक्त इतर वेळेत सर्रास हेल्मेट न वापरताच फिरताना दिसत आहेत. त्यामुळे सकाळ-संध्याकाळ हेल्मेट रिलीफ आहे की का असा प्रश्न आता सर्वांना पडला आहे.

दुचाकीस्वारांच्या सुरक्षिततेसाठी कोर्टाच्या आदेशाने शहरात हेल्मेट वापरण्याबाबत मोहीम राबवण्यात येत आहे. या मोहिमेला नाकरिकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत नाही. हेल्मेट न वापरणाऱ्या दुचाकीस्वारांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. शहरातील सिग्नल सकाळी नऊपासून सुरू होतात. त्याचवेळी वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांची पॉइंटवर ड्युटी सुरू होते. कर्मचारी व अधिकारी ड्युटीला आल्यानंतर दुचाकीस्वारांवर कारवाईची केली जात आहे. गेल्या चार दिवसांत सकाळी नऊ ते सायंकाळी सहा ते सात वाजेपर्यंत विना हेल्मेट दुचाकी चालवणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई करण्यात आली आहे. ही बाब नागरिकांनी देखील ओळखली आहे. सकाळी नऊ वाजेनंतर शहरातील रस्त्यावर ज्या प्रमाणात हेल्मेटधारी दुचाकीस्वार दिसून येतात. तितके प्रमाण सकाळी सहा ते नऊ व रात्री सायंकाळी सात वाजेनंतर दिसत नसल्याचे चित्र आहे. पोलिसांची कारवाई या काळात होत नसल्याने दुचाकीस्वार देखील या काळात निश्चिंत असल्याचे दिसून येत आहे.

दुकानावर गर्दी कायम

हेल्मेटसक्तीच्या मोहिमेला चार दिवस उलटले आहेत. मात्र, अद्यापही हेल्मेटचा तुटवडा कायम आहे. शहरातील हेल्मेट विक्री करणाऱ्या दुकानात अद्यापही खरेदीसाठी रांगा लागत आहेत. अनेक ठिकाणी दुकाने उघडण्यापूर्वीच ग्राहक हेल्मेट खरेदीसाठी नागरिक दुकानदाराची वाट बघत असल्याचेही दिसून येत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘राधे’चा अन्वयार्थ समजून घेणे आवश्यक’

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
'राधा' कादंबरीतून राधेचा अन्वयार्थ समजून घ्या तो अन्वयार्थ समजून घेतला तर, या राधेविषयी असलेल्या विविध संकल्पना स्पष्ट होतील. यामुळे ही कादंबरी समीक्षेच्या दृष्टीकोनातून वाचावी, असे मत कवी-गीतकार दासू वैद्य यांनी व्यक्त केले.
समर्थनगर येथील वरद गणेश मंदिरात गुरुवारी (४ फेब्रुवारी) वृषाली श्रीकांत यांच्या 'राधा' या कांदबरीचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी दासू वैद्य बोलत होते. यावेळी व्यासपीठावर वृषाली श्रीकांत, प्रकाशक अशोक कुमठेकर, लेखिका रसिका देशमुख यांची उपस्थिती होती. 'राधा' ही व्यक्तिरेषा एका कार्यक्रमात बिभत्सपणे सादर करण्यात येत होती, त्यावेळी खूप दुःख वाटले व या वेदनेतून 'राधा' सहिष्णूपणे मांडली गेली, त्याला अध्यात्माचा आधार दिला तर, बरे होईल, असे वाटले होते. तेच या कादंबरीतून मांडण्याचे काम वृषाली श्रीकांत यांनी केले आहे. राधा-कृष्णाचे नाते आणि एकंदरीत पौराणिक कथांमधून मांडले गेले तिचे व्यक्तिमत्व या पलिकडेही 'राधा' आहे हे ही कादंबरी सांगते,' असे मत दासू वैद्य यांनी व्यक्त केले. यावेळी लेखिका वृषाली श्रीकांत यांनी कादंबरी लिहिण्याची भूमिका स्पष्ट करताना ही अध्यात्मिक कादंबरी नसून 'राधा' व्यक्त करताना तिच्या भाव-भावनांची कथा आहे, असे स्पष्ट केले. यावेळी साहित्य आणि सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाणी थांबले, खड्डा ‘जैसे थे’

0
0

कन्नड : सोलापूर-धुळे महामार्गावरील पाण्याची गळती बंद करण्यात आली आहे. कन्नड शहरानजिकच्या कमलनाला परिसरात महामार्गाखालून शेतीसाठी पाइपलाइन टाकण्यात आली आहे. त्यातून दोन महिन्यांपासून सतत पाणीगळती होत असल्याने महामार्गावर खड्डा पडला होता, शिवाय पाणी वाहत होते. वाहतुकीला धोकादायक असलेल्या या परिस्थितीकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष झाले होते. विठ्ठलपूर शिवारातील या प्रकाराबद्दल 'मटा'च्या २६ जानेवारीच्या अंकात वृत्त प्रकाशित करण्यात आले. त्यानंतर संबंधित विभागाने पाणीगळती थांबवली आहे. मात्र पाणीगळतीमुळे पडलेला महामार्गावरील खड्डा अद्याप बुजवलेला नाही. या खड्ड्यामुळे अपघाताचा धोका आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शेतातील ज्वारीचे पीक पळविले

0
0

शेतातील ज्वारीचे पीक पळविले

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शेतातील शेतकऱ्याचे १५ हजारांचे ज्वारीचे पीक पळविल्याची घटना जांभाळा ‌शिवारात घडली. २७ जानेवारी २०१५ रोजी हा प्रकार घडला. या प्रकरणी दौलताबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जांभाळा शिवारात हुसेनोद्दीन शरीफोद्दीन पटेल (वय ७० रा. छावणी) यांचे शेत आहे. त्यांनी शेतात ज्वारीचे पीक घेतले होते. २७ जानेवारी रोजी त्यांच्या शेतातून चोरट्यांनी १५ हजार रुपये किमतीची ज्वारीची कणसे व ताटे कापून चोरून नेली. या प्रकरणी हुसेनोद्दीन यांनी दिलेल्या तक्रारीवरून संशयित आरोपी शेख युसूबद्दीन, शेख हबीब, शेख आयुब, शेख इस्माईल व शेख रियाज (सर्व रा. जांभाळा शिवार) यांच्याविरुद्ध पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शेतकऱ्यांच्या पाठीशी व्यापारी

0
0

म. टा. प्रतिनिधी, पैठण
जायकवाडी धरणातून आपेगाव व हिरडपुरी बंधाऱ्यात पाणी सोडण्याच्या मागणीसाठी तिसऱ्या दिवशीही शेतकऱ्यांचे उपोषण सुरू आहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी शहरातील व्यापाऱ्यांनी गुरुवारी दुपारपर्यंत बाजारपेठ बंद ठेवली. पाणी सोडण्याच्या मागणीसाठी गोदावरी नदी काठच्या गावातील सुमारे एक हजार शेतकरी आंदोलन करत आहेत. पहिल्या दिवशी औरंगाबादचा पाणीपुरवठा बंद करण्याचा अयशस्वी प्रयत्न केल्यानंतर दुसऱ्या दिवसापासून जयाजीराव सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली तहसील कार्यालयात उपोषणाला सुरुवात केली आहे. दरम्यान, या आंदोलनाला सरकारकडून कसलाही सकारात्मक प्रतिसाद मिळालेला नाही. शासनाने गुरवारी रात्रीपर्यंत दोन्ही बंधाऱ्यात पाणी सोडण्याचा निर्णय न घेतल्यास आंदोलनाची दिशा बदलून ते अधिक तीव्र करणार असल्याचा इशारा सूर्यवंशी यांनी दिला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जेष्ठ नागरीकावर सुरीने हल्ला

0
0

जेष्ठ नागरीकावर सुरीने हल्ला

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

जावयाशी भांडल्याच्या कारणावरून जेष्ठ नागरिकावर सासऱ्याने सुरीने हल्ला केल्याचा प्रकार मंगळवारी मुकुंदवाडी भागात घडला. या प्रकरणी आरोपीविरुद्ध मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लक्ष्मण सखाराम बिरारे (वय ६० रा. मुकुंदनगर) हे जेष्ठ नागरिक मंगळवारी सायंकाळी मुकुंदनगर भागातच चिकन खरेदी करण्यासाठी दुकानावर गेले होते. यावेळी त्या ठिकाणी प्रदीप या तरुणाचा सासरा अप्पासाहेब भालेराव रा. पडेगाव आला. माझ्या जावयासोबत कोण भांडले असे म्हणत त्याने बिरारे याना शिवीगाळ सुरू केली. तसेच तेथील टेबलावर असलेली चिकन कापायाची सुरी घेत बिरारेवर हल्ला केला. या हल्ल्यात दंडावर सुऱ्याचा वार लागल्याने बिरारे यांना १३ टाके पडले. या प्रकरणी अप्पासाहेब भालेराव याच्याविरुद्ध पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पालिकेला वृक्षसंगोपनाचा विसर

0
0

म. टा. प्रतिनिधी, सातारा
सातारा-देवळाई परिसराचा महानगरपालिकेत समावेश झाल्यानंतर येथील डोंगर हिरवागार व्हावा व पर्यटनास चालना मिळावी यासाठी महापौर व उपमहापौरांनी पुढाकार घेऊन वृक्षारोपण केले. मात्र त्यानंतर महापालिकेने दुर्लक्ष केल्यामुळे मोजकी झाडे वगळता इतर झाडे जळून गेली.
साताऱ्याचा डोंगर हिरवा करण्याचे उद्दिष्ट ठेऊन जागतिक वसुंधरा दिनाचे निमित्त साधून ५ जून २०१५ रोजी महानगरपालिकेने येथे विविध जातींच्या झाडांची लागवड केली. या कार्यक्रमाला महापौर त्रिंबक तुपे व उपमहापौर प्रमोद राठोड यांची प्रमुख उपस्थिती होती. गाजावाजा करून वृक्षारोपण झालेल्या डोंगराकडे त्यानंतर दुर्लक्ष झाले आहे. डोंगरपायथ्याला २ फूट रूंद, २ फूट खोल व १० फूट लांबीचे खड्डे करण्यात आले होते. या खड्यांत लिंब, कांचन, काशीद अशी विविध प्रकारची डोंगरावर उगवणारी १२५ झाडे लावली. त्यानंतर वर्षभरात टप्प्याटप्प्याने ५०० पेक्षा जास्त झाडे लावण्याचा प्रशासनाचा निर्धार होता. परंतु हा उत्साह नंतर दिसला नाही. वृक्षारोपणाचा आकडा १२५ वच थांबला. प्रशासनाने आहे त्या झाडांना सुरूवातीला एक दोन वेळेस पाणी दिले. त्यानंतर कुणीच लक्ष न दिले नाही, संगोपन न झाल्याने ही रोपे जळून गेली. कमी पाऊस व पालिकेचे दुर्लक्ष या बिकट स्थितीतही २० झाडे कशीबशी तग धरून आहेत. त्यांना व्यवस्थित पाणी मिळाले तरच ती जगू शकतील, अन्यथा उन्हाळ्यात ही झाडे जळून जाण्याची शक्यता आहे.
महापालिकेने डोंगर हरित करण्याचे स्वप्न दाखवत गाजावाजा केला. वसुंधरा दिनाचा कार्यक्रम, वृक्षारोपण व प्रसिद्धीवर मोठी रक्कम खर्च केली. परंतु, त्यानंतर झाडांना वेळेवर पाणीच टाकले नाही. परिणामीन हा खर्च वाया गेला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाळूज परिसरातून पाच जण बेपत्ता

0
0

म. टा. प्रतिनिधी, वाळूज
वाळूज महानगर परिसरातून गेल्या आठ दिवसात वेगवेळ्या ठिकाणाहून पाच जणबेपत्ता झाले आहेत. यामध्ये दोन तरूण मुली, एक विवाहिता व दोन पुरुषांचा समावेश आहे. यापैकी एक जण कामगार असून दुसरा कामाच्या शोधासाठी कागदपत्राची फाइल घेऊन गायब झाला आहे.
वाळूज येतील कंपनीत कामासाठी जात असल्याचे सांगून बकवालनगर येथील नयना रमेश राठोड (वय १८) ही तरुणी २७ जानेवारी रोजी सकाळी साडेआठ वाजता घराबाहेर पडली. त्यानंतर ती परतली नसल्याने वडील रमेश किसन राठोड यांच्या तक्रारीवरून वाळूज पोलिस ठाण्यात हरवल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे. रांजणगाव शेणपुंजी येथील पवननगरमधील रहिवासी व १२ वीची विद्यार्थिनी प्रीती पद‍्माकर वनवे (वय १७) ही मोहटादेवी मंदिर परिसरातील एका खासगी शिकवणीच्या निमित्ताने सकाळी साडेसहा वाजता घराबाहेर पडते. त्यानंतर कॉलेज करून सायंकाळी पाच वाजता घरी परत येते. पण ही विद्यार्थिनी २८ जानेवारी रोजी सकाळी घराबाहेर जाताना शिकवणीचे प्रमाणपत्र घेऊन येण्यास उशीर होईल, असे सांगून गेली. सायंकाळी परत न आल्याने नातेवाईक व मैत्रिणींकडे चौकशी करूनही शोध लागला नाही. अज्ञात व्यक्तीने तिला पळवून नेल्याची तक्रार आई मंगल वनवे यांनी एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात नोंदवण्यात आली आहे. जोगेश्वरी येथील उज्ज्वला समाधान बनकर (वय २९) या १८ जानेवारी रोजी रात्री साडेनऊ वाजता घरातून काहीही न सांगता निघून गेली. याप्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात हरवल्याची नोंद करण्यात आली आहे. वाळूज औद्योगिक परिसरात हमाली करणारे भगवान भाऊसाहेब नरवडे (वय ४५, रा. मातोश्रीनगर, रांजणगाव शेणपुंजी) हे २० जानेवारी पासून बेपत्ता आहेत. रांजणगाव पवननगर येथील सतीश ज्ञानदेव बिरोरे (वय २१) हा कागदपत्रांची फाइल घेऊन २८ जानेवारी रोजी दुपारी दीड वाजता नोकरी शोधण्यासाठीचे कारण देऊन गायब झाला. या दोन्ही प्रकरणांची नोंद एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


हेमलकसातील बिबटे महापालिका आणणार

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
डॉ. प्रकाश आमटे यांच्या हेमलकसा येथील प्राणिसंग्रहालयातून बिबट्याची जोडी आणण्यासाठी महापालिकेच्या प्राणिसंग्रहालयाचे पथक १३ किंवा १४ फेब्रुवारी रोजी हेमलकसाला रवाना होणार आहे. ही जोडी प्राणिसंग्रहालयात दाखल झाल्यावर गेल्या काही वर्षांपासून एकाकी जीवन जगणाऱ्या मादी बिबट्यालाही जोडीदार मिळेल.
सिद्धार्थ प्राणिसंग्रहालयात बिबट्यांची जोडी होती. मात्र, सुमारे दीड वर्षांपूर्वी नराचा मृत्यू झाल्यानंतर नाजिया नावाची मादी एकटीच पिंजऱ्यात येरझाऱ्या घालत होती. या मादीला जोडीदार मिळावा म्हणून प्राणिसंग्रहालय व्यवस्थापनाकडून बऱ्याच दिवसांपासून प्रयत्न सुरू होते. मात्र, बिबट्यांची जोडी मिळत नव्हती. अखेर हेमलकसा येथून डॉ. प्रकाश आमटे यांच्या प्राणिसंग्रहालयातून बिबट्याची जोडी देण्याची तयारी दर्शवल्यानंतर वनविभागानेही त्याला मंजुरी दिली, परंतु महापालिकेच्या यांत्रिकी विभागाकडून बिबटे आणण्यासाठी लागणारे वाहन मागणी करूनही मिळत नव्हते. त्यामुळे बिबट्याच्या जोडीचे आगमन लांबणीवर पडत होते. शेवटी या वाहनाची सोय झाल्याने महिन्याच्या मध्यापर्यंत बिबट्यांची जोडी प्राणिसंग्रहालयात दाखल होणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.
सफारी पार्कसाठी महापालिकेला मिटमिटा येथील शंभर एकर जागा मिळणार आहे. या जागेवर येत्या पावसाळ्यात वृक्षारोपण करण्याची तयारी पालिकेने सुरू केली आहे. या पार्कसाठी नॅशनल हायवे ऑथॅरिटीकडून आर्थिक मदत मिळावी यासाठी प्रयत्न केले जात आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ज्वारी, बाजारीच्या भावात मोठी घट

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
आवक वाढल्याने ज्वारी आणि बाजारीचे भाव उतरल्याने सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दोन दिवसांपासून ज्वारी १६०० ते १८०० रुपये आणि बाजारी १३०० ते १५०० रुपये प्रतिक्विंटल दराने विकली जात आहे. या धान्यांना चांगला उठाव असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.
यावर्षी बाजार समितीमध्ये औरंगाबादसह जळगाव, नांदेड, हिंगोली या जिल्ह्यातून ज्वारीची आवक झाल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. येथे दोन आठवड्यांपासून रोज किमान १०० क्विंटल बाजरी आणि १५ ते २० क्विंटल ज्वारीची आवक होत आहे. गेल्या आठवड्यापासून शाळू ज्वारीला मागणी वाढली आहे. गेल्या आठवड्यात ज्वारीचे भाव १८०० ते २००० रुपये प्रति क्विंटल होते; त्यात या आठवड्यात २०० ते ४०० रुपयांनी घट झाली. बाजारीला किमान १४०० ते कमाल १६०० रुपयांचा भाव मिळत असून उठाव चांगला असल्याचे बाजार समितीचे सुपरवायझर विक्रम कदम यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बेबंदशाहीवर बडगा कधी?

0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
शहरात हेल्मेटसक्ती वगळता इतर वाहतूक नियम पालनाच्या नावाने शिमगा आहे. रॉँगसाइड वाहन चालविणे, मोबाइलवर बोलणे, सीट बेल्ट न लावणे, फॅन्सी नंबर प्लेट याकडे पोलिसांचे सर्रास दुर्लक्ष सुरू आहे. शहराला शिस्त लावण्याची ही कारवाई पोलिस करणार कधी, असा सवाल हेल्मेटधारक करत आहेत.
सोमवारपासून शहरात हेल्मेट वापरणे बंधनकारक केले. विनाहेल्मेट दुचाकीस्वारांविरुद्ध कडक कारवाई सुरू आहे. मात्र, इतर वाहतुकीचे नियम सर्रासपणे धाब्यावर बसविले जात आहेत. चारचाकी वाहनांच्या काचांना काळी फिल्म लावू नये असे कोर्टाचे आदेश आहेत. या आदेशाचे कुठेही पालन होताना दिसत नाही. मुंबईसारख्या शहरात सीटबेल्ट वापरणे बंधनकारक आहे. औरंगाबादमध्येही हा नियम लागू आहे. मात्र, शहरात वाहनधारकांसोबत पोलिसही या नियमांकडे कानाडोळा करत आहेत.
वाहन चालविताना मोबाइलवर बोलणे नियमबाह्य आहे. मात्र, दुचाकीस्वार सर्रास मोबाइलवर बोलतात.
'काका, दादा' नंबर प्लेटवरच
वाहतूक शाखेच्या वतीने मध्यंतरी फॅन्सी नंबर प्लेटवर कारवाईची मोहीम राबवण्यात आली. ही मोहीम आता थंड बस्त्यात पडली आहे. त्यामुळे आता पुन्हा 'काका, मामा, दादा' नंबरप्लेटवर अवतरले आहेत.
वाहन विक्रीसोबत हेल्मेटची विक्री नाही
राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते बुधवारी औरंगाबादला आले असता, त्यांनी हेल्मेटचा तुटवडा टाळण्यासाठी वाहन वि‌क्रीसोबत हेल्मेटची विक्री करावी असे निर्देश दिले होते. वाहन विक्री करताना हेल्मेटची विक्री करावी, असा आदेशही राज्य शासनाने यापूर्वीच काढलेला आहे. मात्र, शहरातील वाहनधारकांकडून या नियमांचे पालन अजिबात होताना दिसत नाही. सध्या औरंगाबादमध्ये एकाही एजन्सीत वाहनासोबत हेल्मेटची विक्री होत नाही. अथवा तसा निर्णयही कुठल्याही दुचाकीच्या वाहन एजन्सीने घेतलेला नाही.
५६ बनावट हेल्मेटसह ५ विक्रेते गजाआड
एसटी कॉलनी, फाजलपुरा परिसरात बनावट हेल्मेटचा साठा बाळगणाऱ्या ५ जणांना सिटीचौक पोलिसांनी गुरुवारी अटक केली. दोन वेगवेगळ्या घटनांत एकूण ५६ हेल्मेट जप्त केले असून सिटीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फाजलपुरा भागात एका अॅपेरिक्षामध्ये बनावट हेल्मेटचा साठा विक्री केला जाणार असल्याची माहिती सिटीचौक पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक नागनाथ कोडे यांना मिळाली. या माहितीआधारे त्यांनी या भागात छापा टाकला. यावेळी रिक्षामध्ये ४९ निकृष्ट दर्जाचे हेल्मेट पोलिसांना आढळले. पोलिसांनी संशयित आरोपी रशिदखान ताहेरखान, शेख इशान शेख याकूब व फय्याजखान अब्दुल माजेद या तिघांना अटक केली. तपासणीमध्ये हे हेल्मेट बनावट असल्याचे निष्पन्न झाले. तसेच याच भागात दुसरा छापा टाकला. यामध्ये शेख जावेद शेख सलीम व शेख इम्रान शेख चांद याना अटक करून त्यांच्याकडून सात बनावट हेल्मेट जप्त केले. आरोपींविरुद्ध फसवणूक व ट्रेडमार्क कायदा १०३, १०४ नुसार गुन्हा दाखल झाला आहे.
अंतर्गत शहरातही हेल्मेटसक्ती
'गेल्या चार दिवसांपासून शहरातील मुख्य मार्गावर राबविली जाणारी हेल्मेटसक्तीची मोहीम आता अंतर्गत रस्त्यांवर, मध्यवर्ती बाजारपेठ, टीव्ही सेंटर, गारखेडा भागातही कडकपणे राबविण्यात येईल,' अशी माहिती पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी दिली. अमितेशकुमार म्हणाले, 'जालना रोड, अदालत रोड, ‌मिलकॉर्नर ते दिल्लीगेट या प्रमुख मार्गावर हेल्मेटसक्तीची मोहीम कडक राबविण्यात आली. तीन दिवसांत ९ हजार दुचाकीस्वारांवर दंडात्मक कारवाई केली. याचा सकारात्मक परिणाम जाणवला. या मार्गावर हेल्मेट वापरणाऱ्या दुचाकीस्वारांची संख्या वाढली. मात्र, अंतर्गत शहरात हेल्मेट वापरण्याबाबत गांर्भीय नाही. गल्लीबोळातून पोलिसांचा हुलकावणी देत विना हेल्मेट दुचाकीस्वार पळवाटा शोधत होते. आता गुरुवारपासून शहरातील पैठणगेट, गुलमंडी, औरंगपुरा, सिटीचौक, रंगारगल्ली, मछलीखडक, शहागंज, राजाबाजार, निराला बाजार, समर्थनगर, जुना मोंढा, मिलकॉर्नर आदी भागात ही मोहीम राबविण्यात येणार आहे. टीव्ही सेंटर, हडको, सिडको, गारखेडा परिसरात देखील ही मोहीम राबविण्यात येत आहे. फॅन्सी नंबरप्लेट धारकाविरुद्ध देखील मोहीम राबवत आहोत.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मोटार वाहन निरीक्षक संख्ये निलंबित

0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
जबाबदारी नसताना ६९९ वाहनांना फिटनेस सर्टिफिकेट देणाऱ्या मोटार वाहन निरीक्षक संजय संख्येला निलंबित करण्याचे आदेश मुख्य परिवहन आयुक्त श्याम वर्धने यांनी दिले आहेत. या प्रकरणी गुरुवारी रात्री उशिरा क्रांतिचौक पोलिस ठाण्यात संख्येवर गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
आरटीओ कार्यालयात मोटार वाहन निरीक्षकांना विविध कामांची जबाबदारी विभागून दिली आहे. यात काही मोटार वाहन निरीक्षकांना लायसन, फिटनेस तर काही मोटार वाहन निरीक्षकांना फ्लाइंग स्क्वॉडची जबाबदारी दिली आहे. डिसेंबर महिन्यात शेंद्रा येथे दोन मोटार वाहन निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यात संजय संख्येकडे फ्लाइंग स्क्वॉडची जबाबदारी देण्यात आली होती. त्यामुळे संख्येकडे वाहनांना फिटनेस प्रमाणपत्र देण्याचे काम नव्हतेच. तरीही संख्येने आपल्या संगणक पासवर्डचा वापर करून डिसेंबर महिन्यात ७०० ते ८०० वाहनांना फिटनेस सर्टिफिकेटचे वाटप केले, अशी तक्रार सहाय्यक परिवहन परिवहन आयुक्तांकडे आली होती. सहाय्यक परिवहन आयुक्तांनी तत्काळ या प्रकरणाची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश प्रादेशिक परिवहन अधिकारी सर्जेराव शेळके यांना दिले होते. आरटीओ शेळके यांनी या प्रकरणाची चौकशी करून ४ जानेवारी रोजी चौकशी अहवाल मुंबईला पाठविला. त्यात संख्येने आपल्या संगणक पासवर्डचा वापर करून, काही खासगी लोकांना हाताशी धरत ६९९ वाहनांना फिटनेस सर्टिफिकेट दिल्याचे समोर आले. या अहवालानंतर तब्बल एक महिन्यांनतर आज दुपारी मुख्य परिवहन आयुक्त श्याम वर्धने यांनी संख्येला निलंबित केल्याचे आदेश काढले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दुष्काळात विक्रमी साखर उत्पादन

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
मराठवाड्यात दुष्काळाची दाहकता असली तरी भरमसाठ पाणी लागणारे उसाचे क्षेत्रसुद्धा वाढत आहे. औरंगाबाद जिल्ह्यात आतापर्यंत सव्वाआठ लाख क्विंटल साखर उत्पादन झाले आहे. औरंगाबाद, जालना व बीड जिल्ह्यात ३० लाख क्विंटल साखर उत्पादन झाले. यंदा मार्च महिन्यापर्यंत ऊस गाळप होणार असून ऐन दुष्काळात विक्रमी साखर उत्पादन होण्याची शक्यता आहे.
मागील तीन वर्षांपासून कमी पाऊस असून सर्वत्र पाणी टंचाई जाणवत आहे. या परिस्थितीत उसाचे संभाव्य क्षेत्र घटण्याची शक्यता होती. पाणी वापरात समतोल राखण्यासाठी काही भागात ऊस लागवडीवर निर्बंध आणण्याची मागणी करण्यात आली. प्रत्यक्षात संपूर्ण मराठवाड्यात उसाचे क्षेत्र वाढत असून दरवर्षी उसाचे गाळप तुलनेने वाढले आहे. औरंगाबाद जिल्ह्यात सिद्धेश्वर सहकारी साखर कारखाना (सिल्लोड), संत एकनाथ सहकारी साखर कारखाना (पैठण), बारामती अॅग्रो (कन्नड), मुक्तेश्वर शुगर्स (गंगापूर), संभाजीराजे साखर कारखाना आणि शरद सहकारी साखर कारखाना (विहामांडवा) असे सहा साखर कारखाने आहेत. शरद कारखाना बंद असून इतर कारखाने ऊस गाळप करीत आहेत. राजकीय वादातून काही दिवसांपूर्वी संत एकनाथ कारखाना बंद झाला आहे. चार साखर कारखान्यात गाळप सुरू असून बारामती अॅग्रो कारखान्यात विक्रमी साखर उत्पादन झाले. आतापर्यंत तीन लाख ८८ हजार क्विंटल साखर उत्पादन करण्यात आले. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण आठ लाख २६ हजार १८० क्विंटल साखर उत्पादन झाले. जालना आणि बीड जिल्ह्यातही लक्षणीय उत्पादन झाले. बीड जिल्ह्यातील वैद्यनाथ, माजलगाव आणि जय महेश साखर कारखान्यांनी जानेवारी महिन्यात गाळप थांबवले. दरम्यान, यंदा ऊस गाळप मार्च महिन्यापर्यंत सुरू राहणार आहे.
यावर्षी उसाची नवी लागवड होण्याची शक्यता कमी आहे. मागील वर्षी उसाचे क्षेत्र समाधानकारक होते. तर यंदा क्षेत्रात निम्मी घट झाल्यास उत्पादनावरही परिणाम होणार आहे. कमी ऊस राहिल्यास अधिकाधिक भाव देऊन कारखान्यांना ऊस खरेदी करावा लागणार आहे. त्यामुळे 'एफआरपी' दरापेक्षा जास्त दर मिळण्याची चिन्ह आहेत. बहुतेक तालुक्यात तीव्र पाणी टंचाईमुळे बागायती क्षेत्र घटले आहे.

साखर कारखानदारी बंद करून उसाच्या पिकावर बंदी घाला असे म्हणता येणार नाही; मात्र, उसाचे क्षेत्र सिमित करणे शक्य आहे. सध्या मराठवाड्यात हेक्टरी २८ ते ३० टन उत्पादन होते. दर हेक्टरी उत्पादन वाढवले तर क्षेत्र कमी करता येईल. एक किलो साखर उत्पादनासाठी शेवटपर्यंत अडीच हजार लिटर पाणी लागते. हे पाणी वाचवल्यास इतर पिकांना व पिण्यासाठी वापरता येईल.
- डॉ. एस. बी. वराडे, कृषीतज्ज्ञ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

२५ ठिकाणी नवे सिग्नल हवे

0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
शहरातील वाहतूक अधिक सुरक्षित, कोंडीविरहित व्हावी यासाठी २५ ठिकाणी नवे सिग्नल सुरू करा, अशी मागणी शहर वाहतूक शाखेने केली आहे. यासंदर्भात महापालिका प्रशासनाकडे प्रस्ताव सादर केला आहे.
शहरातील बेशिस्त वाहतुकीला शिस्त लागावी यासाठी पोलिस आयुक्त अमितेशकुमार प्रयत्नशील आहेत. वाहतुकीस अडथळा ठरणारे अतिक्रमणे दूर केल्याने अनेक चौकांचा श्वास मोकळा झाला. मात्र, वाहनांची वाढती संख्या व अरुंद रस्त्यामुळे अनेक भागात वाहतूक कोंडी कायम आहे. ही बाब लक्षात घेत वारंवार वाहतूक कोंडी होणाऱ्या ठिकाणांचे सर्वेक्षण करण्यात आले. २५ ठिकाणी नवीन सिग्नल तातडीने बसवावेत, असा प्रस्ताव महापालिका आयुक्त सुनील केंद्रेकर यांना सादर करण्यात आला आहे.
येथे हवे सिग्नल
चंपा चौक, रोपळेकर हॉस्पिटल (सावरकर चौक), गोपाल टी, दर्गा चौक, गोदावरी टी, एमआयटी चौक, उद्धवराव पाटील चौक, बीएसएलएनएल-वाल्मी चौक, बंडू तात्या वैद्य चौक (क्रांतिचौक पोलिस स्टेशन जवळ), काल्डा कॉर्नर, देवळाई चौक, जवाहरनगरनगर पोलिस स्टेशनसमोरील चौक, धूत हॉस्पिटल चौक, आंबेडकर चौक चिकलठाणा, केंब्रिज चौक, विमानतळ टी पॉइंट, मध्यवर्ती जकात नाका, सेव्हन हिल, बीड बायपास, हर्सूल टी पॉइंट, ओखार्ड टी पॉइंट-जळगाव रोड, लिंक रोड टी चौक, पैठण रोड, मिलिंद चौक.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कंपनीचे भले करणारा करार रद्द करा

0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
वैद्यकीय घनकचरा प्रकल्प चालविणाऱ्या कंपनीवर मेहरबान होत महापालिकेने २ एकर जागेला केवळ ८ हजार ४०० रुपये भाडे आकारणारा करार केला. कंपनीची भलाई करणाऱ्या या कराराचा पंचनामा 'मटा'ने गुरुवारच्या अंकात केला. तेव्हा पदाधिकारी आणि नगरसेवक खडबडून जागे झाले. आता करार रद्द करणारा ठराव सर्वसाधारण सभेत घ्या, अशी मागणी होत आहे.
घनकचरा व्यवस्थापनाबरोबरच वैद्यकीय घनकचऱ्याचे व्यवस्थापनही महत्त्वाचे. या प्रकल्पासंदर्भात झालेला चुकीचा करार आणि प्रकल्पात असलेली अनियमितता या संदर्भात प्रशासनाने दखल घेतली पाहिजे अशी अपेक्षा पदाधिकारी, नगरसेवक व्यक्त करत आहेत. वैद्यकीय घनकचरा प्रकल्प उभारण्यासाठी महापालिकेने वॉटर ग्रेस प्रॉडक्टस् कंपनीबरोबर करार केला. करार करताना या प्रकल्पासाठी १ रुपया प्रतिचौरस मीटर दराने दोन एकर जागा महापालिका उपलब्ध करून देईल असे नमूद केले. व्यावसायिकदृष्टीने चालवण्यात येणाऱ्या या प्रकल्पासाठी फक्त एक रुपया चौरस मीटर दर आकारणे म्हणजे ठेकेदाराबद्दल उदारमतवादी भूमिका घेतल्या सारखे आहे, याचा भांडाफोड 'मटा' ने केला. वॉटर ग्रेस प्रॉडक्टस् कंपनीच्या वैद्यकीय घनकचरा प्रकल्पाबद्दल प्रशासनाकडून माहिती मागवलेले शिवसेनेचे नगरसेवक नंदकुमार घोडेले म्हणाले, 'इतक्या कमी दरात त्या कंपनीला जागा उपलब्ध करून देण्याची काहीच गरज नव्हती. शिवाय त्या कंपनीबद्दल खूप तक्रारी आहेत. घनकचरा व्यवस्थापन जसे महत्त्वाचे आहे, तसेच वैद्यकीय घनकचऱ्याचे व्यवस्थापन व त्याची विल्हेवाट हे देखील महत्वाचे आहे. त्यामुळे वॉटर ग्रेस बरोबर केलेला करार रद्द करण्याचा ठराव सर्वसाधारण सभेत घेतला पाहिजे. यासाठी सर्वसाधारण सभेत आवाज उठवू.'
आयुक्तांकडून मागणी मान्य
वैद्यकीय घनकचरा प्रकल्पातील अनियमिततेबद्दल आवाज उठवणारे सभागृहनेते राजेंद्र जंजाळ म्हणाले, 'मुळात या प्रकल्पाचा करारच चुकीच्या पध्दतीने केला आहे. त्यामुळे कंत्राट रद्द करण्याची मागणी आम्ही केली. आयुक्तांनी ती मान्य केली. पर्यायी व्यवस्था लवकरात लवकर करण्याचा प्रयत्न प्रशासन करीत आहे. एक रुपया प्रतिचौरस मीटर दराने त्या प्रकल्पासाठी कंपनीला जागा उपलब्ध करून देणे चुकीचेच आहे. वॉटर ग्रेस कंपनीचे काम देखील समाधानकारक नाही. त्यामुळे करार रद्द करून कंत्राट रद्द करण्याच्या भूमिकेवर आम्ही ठाम आहोत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मराठीची उपयोगिता वाढवणार

0
0



म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
पिंपरी चिंचवड येथील ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष पी. डी. पाटील यांच्या वतीने माजी संमेलनाध्यक्ष डॉ. यु. म. पठाण यांना एक लाख रूपये सुपूर्द करण्यात आले. मराठीच्या संवर्धनासाठी पाटील यांनी सर्व माजी संमेलनाध्यक्षांना एक लाख रूपये दिले. पाटील यांच्या संस्थेतील पदाधिकाऱ्यांनी गुरुवारी डॉ. पठाण यांना निवासस्थानी धनादेश दिला.
पिंपरी चिंचवड येथे नुकत्याच झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात मराठी भाषेच्या संवर्धनासाठी सर्व माजी संमेलनाध्यक्षांना एक लाख रुपये देणार असल्याची घोषणा स्वागताध्यक्ष पी. डी. पाटील यांनी केली होती. त्यानुसार औरंगाबादमधील ज्येष्ठ साहित्यिक व माजी संमेलनाध्यक्ष डॉ. यु. म. पठाण यांना एक लाख रुपये रकमेचा धनादेश देण्यात आला. पुणे येथील डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या पदाधिकाऱ्यांनी धनादेश पठाण यांना सुपूर्द केला. 'या पैशातून मराठी भाषेचे काम करणार आहे. विशेषतः मराठी विषयाची उपयोगिता वाढवण्यावर भर आहे. याबाबत महत्त्वाचे लेख लिहून ग्रंथ काढणार आहे. तसेच महाराष्ट्रातील मराठी विभागांना एकत्र आणून मराठी भाषेसाठी ठोस काम करण्यासाठी प्रयत्न करीन' असे डॉ. पठाण यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उघड्यावरील मांस विक्रीने नाकात जीव

0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
उघड्यावर सुरू असलेल्या मांस विक्रीमुळे शिवाजीनगरच्या रेल्वे क्रॉसिंगवर नागरिकांची कुचंबना सुरू आहे. रेल्वे आली की क्रॉसिंग गेट बंद होते. त्यामुळे किमान दहा मिनिटे वाहनचालकांना मांस विक्रेत्यांच्या दुकानासमोर थांबावे लागते. या वेळी दुर्गंधीमुळे वाहनांवर बसून राहणेही अशक्य होते.
शहरात विविध ठिकाणी केल्या जाणाऱ्या उघड्यावरच्या मांस विक्रीबद्दल अनेक नागरिक वेळोवेळी महापालिकेकडे तक्रारी करतात. नगरसेवकही सर्वसाधारण सभा, स्थायी समितीच्या बैठकीत या बद्दल आवाज उठवतात. मात्र, पुरेसा कर्मचारीवर्ग नसल्याचे कारण पुढे करून उघड्यावर अनधिकृतपणे मांस विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे टाळले जाते. शिवाजीनगर रेल्वे क्रॉसिंगचे गेट ओलांडून बीड बायपासकडे जाणाऱ्या रस्त्याच्या दोन्हीही बाजूंना मांस विक्रेत्यांनी दुकाने थाटली आहेत. शेळ्या, कोंबड्या दुकानाच्या बाहेरच रस्त्यालगत कापल्या जातात. त्यांचे मांस दुकानात उघड्यावर लटकविले जाते. रेल्वे येण्याच्या किंवा जाण्याच्या वेळी क्रॉसिंगचे गेट बंद केले जाते. बंद केलेले गेट किमान दहा मिनिटे तरी उघडले जात नाही. त्यामुळे नागरिकांना आपल्या दुचाकीवर किंवा कारमध्ये बसून रहावे लागते. अशा वेळी या वाहनधारकांसमोरच दुकानदार जनावरांची कत्तल करतात. हा प्रकार किळसवाणा असल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या आहेत. महापालिकेने मांस विक्रेत्यांवर निर्बंध घालावी, अशी मागणी होत आहे. दरम्यान, 'उघड्यार विनापरवानगी मांस विक्री करणाऱ्यांवर कारवाई करणे सुरूच असते. आता शिवाजीनगरच्या रेल्वे क्रॉसिंग जवळच्या दुकानांबद्दल तक्रारी आल्या आहेत. तेथेही कारवाई करण्याचे नियोजन केले जाईल,' असे महापालिकेचे पशूसंवर्धन अधिकारी डॉ. बी. एस. नाईकवाडे यांनी सांगितले.
-
मुख्य रस्त्या लगत मांस विक्रीची दुकाने सुरू करणे योग्य नाही. शिवाजीनगरसह शहराच्या ज्या ज्या भागात विनापरवाना मांस विक्री सुरू आहे, त्या दुकानांच्या मालकांवर किंवा चालकांवर गुन्हे दाखल करा असे आदेश पशूसंवर्धन अधिकाऱ्यांना दिले जातील.
- राजेंद्र जंजाळ, नगरसेवक तथा सभागृहनेता

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खासगीकरणातून पालिकेची सिटीबस सेवा

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
तोट्यात असलेली सिटीबस सेवा बंद करण्याचा एसटी महामंडळाचा विचार आहे तर, दुसऱ्या बाजुला खासगीकरणाच्या माध्यमातून सिटीबस सुरू करण्याचे प्रयत्न महापालिकेने सुरू केले आहेत. यासंदर्भातील प्रस्ताव महापालिकेच्या येत्या सर्वसाधारण सभेत ठेवण्यात आला आहे. सर्वसाधारण सभेच्या मंजुरीनंतर सिटीबस सुरू करण्याची प्रत्यक्ष कार्यवाही सुरू होईल.

महापालिकेने २००६मध्ये अकोला वाहतूक सेवा संस्थेच्या माध्यमातून 'एएमटी' नावाने सिटीबस सेवा सुरू केली होती. ही सेवा अडीच-तीन वर्षे सुरू होती. ही बससेवा बंद पडल्यावर एस.टी. महामंडळाने सिटीबस सेवा सुरू केली. ही सेवा मर्यादित स्वरुपात सुरू करण्यात आली. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत सिटीबस सेवा महत्त्वाची आहे. त्यामुळे महापालिकेसाठी खासगीकरणातून ही सेवा पुन्हा सुरू करण्यासाठी स्थायी समितीचे सभापती दिलीप थोरात यांनी पुढाकार घेतला. गेल्या काही महिन्यांपासून त्यांनी बससेवेतील विविध घटकांशी चर्चा करून महापालिकेवर कमीतकमी बोजा पडून शहरात सिटीबस सेवा कशी सुरू करता येईल, याचे नियोजन केले. आता त्यांनी ही बससेवा सुरू करण्याबद्दलचा ठराव आगामी सर्वसाधारण सभेत ठेवण्याची विनंती करणारे पत्र महापौरांना दिले आहे.

यासंदर्भात दिलीप थोरात यांनी सांगितले की, फेब्रुवारी महिन्यात होणाऱ्या सर्वसाधारण सभेत सिटीबसचा ठराव मांडला जाणार आहे. हा ठराव मंजूर होईल याची खात्री आहे. ठरावाला सर्वसाधारण सभेने मंजुरी दिल्यावर खासगीकरणाच्या माध्यमातून सिटीबस चालवू इच्छिणाऱ्यांकडून प्रस्ताव मागविले जातील. आलेल्या प्रस्तावांची छाननी करून ते मंजुरीसाठी स्थायी समिती समोर ठेवले जातील. स्थायी समितीच्या मंजुरीनंतर सिटीबस चालवू इच्छिणाऱ्या एजन्सीच्या नियुक्तीची प्रक्रिया केली जाऊ शकेल. पुढील दोन-तीन महिन्यांत ही सर्व प्रक्रिया पूर्ण करून प्रत्यक्षात सिटीबस सेवा सुरू करण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे.

किमान ६० कोटींची गुंतवणूक
सिटीबस सेवा सुरू करताना संबंधित एजन्सीने पहिल्या टप्यात किमान शंभर बस सुरू कराव्यात, असे टार्गेट दिले जाणार आहे. सिटीबसच्या एकूणच प्रकल्पावर ६० कोटी रुपयांची गुंतवणूक होऊ शकते. खासगीकरणातून सिटीबस सेवा सुरू करण्याबद्दल आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्याशी प्राथमिक चर्चा झाली आहे, असे सभापती दिलीप थोरात म्हणाले.

- नगर पालिका अस्तित्वात असताना शहरात एसटी महामंडळाकडून सिटीबस सेवा चालविली जात होती.
- २०००पासून सिटीबस सेवेला उतरती कळा लागली. २००४च्या अखेरीस एसटीने सिटीबस बंद केली.
- २६ जानेवारी २००६ रोजी एएमटी ही खासगी सिटीबससेवा महापालिकेने सुरू केली.
- २०१०मध्ये 'एएमटी'सेवा तोटात आल्यामुळे बंद करण्यात आली. त्यानंतर काही महिन्यांत एसटी महामंडळाने सिटीबस सेवा सुरू केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

माझं शिवार : निर्यातक्षम फळ उत्पादनाकडे वाटचाल

0
0

Tushar.Bodkhe@timesgroup.com
जास्तीच्या उत्पन्नासाठी फळबाग लागवड करण्याकडे शेतकऱ्यांचा कल आहे; मात्र शास्त्रशुद्ध पद्धतीचा अभ्यास करून उत्पादन काढले तरच फळबाग फायदेशीर ठरते. फळबागांचे उत्तम व्यवस्थापन करून दुधडचे शेतकरी नारायण चौधरी यांनी विक्रमी उत्पादन काढले. 'शेतीनिष्ठ पुरस्कारा'ने सन्मानित चौधरी यांची शेती व्यवस्थापनाचा आदर्श नमुना आहे.

फळबागांचे उत्तम व्यवस्थापन आणि प्रयोगशीलतेचा घातलेला मेळ अधिक उत्पन्न देणारा ठरला. पारंपरिक पद्धतीला फाटा देऊन नवीन तंत्र स्वीकारल्यामुळे डाळिंब फळबाग बहरली. दुधड (ता. औरंगाबाद) येथील प्रयोगशील शेतकरी नारायण चौधरी यांची ही अफलातून कामगिरी शेतकऱ्यांसाठी दिशादर्शक आहे. सध्या चौधरी यांच्या शेतात डाळिंबाची एक हजार झाडं आहेत. दरवर्षी डाळिंब उत्पादनातून चौधरी यांना लक्षणीय फायदा झाला. करमाड परिसर पूर्वीपासून फळबागांचा, विशेषतः 'मोसंबी पट्टा' म्हणून परिचित आहे. मागील काही वर्षात घटते पर्जन्यमान आणि नैसर्गिक बदलांमुळे शेतकऱ्यांनी मोसंबीऐवजी डाळिंब लागवडीवर भर दिला आहे. मोसंबी फळबागेला पाण्याची अधिक गरज असते. डाळिंब कमी पाण्यात व कमी कालावधीत निघणारे पीक असल्यामुळे हा परिसर डाळिंबाच्या बागांसाठी प्रसिद्ध झाला आहे. चौधरी यांच्या शेतीत अनेक वर्षे मोसंबी फळबाग होती. नऊ वर्षांपूर्वी मोसंबीची फळबाग तोडून डाळिंब लागवड करण्याचा निर्णय घेतला. अर्थात, घरातून विरोध झाला; मात्र भविष्यातील वास्तव व डाळिंब फळबागेचे फायदे त्यांनी कुटुंबीयांना सांगितले. डाळिंब लागवड करून चौधरी स्वस्थ बसले नाहीत तर, अधिकाधिक उत्पादन व दर्जेदार फळ लागवडीसाठी अभ्यास केला. राज्यभरातील डाळिंबासाठी प्रसिद्ध असलेल्या भागात भेटी दिल्या. विविध चर्चासत्रात कृषीतज्ज्ञांची व्याख्याने ऐकली व व्यक्तीगत सल्ला घेतला. कुटुंबीयांचे पाठबळ आणि उत्तम व्यवस्थापनाच्या बळावर डाळिंबाची यशस्वी लागवड केली. सद्यस्थितीत परिसरातील शेतकऱ्यांचे मार्गदर्शक अशी चौधरी यांची ओळख आहे. यावर्षी डाळिंबाच्या 'भगवा' वाणाचे चांगले उत्पादन निघाले. परराज्यातील व्यापारी जागेवरच डाळिंब खरेदी करतात. बहुतेक शेतकरी ग्रेडींग केल्याशिवाय फळ विक्री करतात; मात्र चौधरी यांनी शेतातच ग्रेडिंग हाउस उभे केले आहे. तीन प्रकारात डाळिंबाचे ग्रेडिंग करून विक्री करतात. यावर्षी डाळिंबाला प्रतिकिलो ६६ रुपये, ५५ रुपये आणि ५० रुपये दर मिळाला.

'फळबागेत उत्तम आणि मध्यम दर्जाची फळं असतात. शेतकऱ्यांना त्यांची पारख करता आली पाहिजे. ग्रेडिंग केल्यानंतर जास्तीचा फायदा मिळतो. केवळ ५५ रुपये मिळाल्यास समाधान न मानता फळांच्या गुणवत्तेनुसार बाजारभाव मिळवणे आपली जबाबदारी आहे,' असे चौधरी यांनी सांगितले. निर्यातक्षम डाळिंब उत्पादनासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. सोलापूर जिल्ह्यातील डाळिंब उत्पादनासाठी प्रसिद्ध गावांमध्ये चौधरी व इतर शेतकऱ्यांनी नुकताच दौरा पूर्ण केला. निर्यातीसाठी शेतकरी विशेष परिश्रम घेतात. निर्यातीसाठी प्रत्येत डाळिंबाचे वजन अर्धा किलोपेक्षा अधिक आवश्यक असते. उत्तम रंग, चव व आकाराची जपणूक केल्यास प्रतिकिलो १५० रुपये दर मिळतो. सद्यस्थितीत चौधरी यांच्या शेतातील डाळिंब नेपाळ देशासह चेन्नई, भुवनेश्वर, दिल्ली या शहरात जातात. पुढील वर्षापासून थेट निर्यात करण्यासाठी त्यांची धडपड सुरू आहे. साधारण कुटुंबातील चौधरी यांनी फळबागांच्या उत्पन्नावर शेतात टोलेजंग घर बांधले. आता शेतातच राहत असल्यामुळे फळबागांचे व्यवस्थापन करणे अधिक सोपे झाले आहे. फळबागांची स्वच्छता व नियमित निगा राखली जात आहे. मागील वर्षी करमाड परिसरात 'तेल्या' रोगाचा प्रादुर्भाव वाढला होता. या कठीण परिस्थितीत 'तेल्या' व 'फळकुज' रोगांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी चौधरी यांनी विशेष नियोजन केले होते. तज्ज्ञांचा सल्ला घेऊन निंबोळी खत वापरून फळबाग अधिक सक्षम केली. सातत्याने शेतीत नावीन्यपूर्ण प्रयोग केल्यामुळे कृषी विभागानेही त्यांच्या कामाची दखल घेतली. २०१२-१३ यावर्षीच्या 'वसंतराव नाईक शेतीनिष्ठ पुरस्कारा'ने तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी नारायण चौधरी यांना सन्मानित केले. 'हा पुरस्कार म्हणजे अधिक काम करण्याची प्रेरणा आहे. पारंपरिक पीक पद्धतीत शेतकरी अडकल्यामुळे नुकसान झाले. बदलत्या हवामानाची चाहूल लक्षात घेता आधुनिक पीक पद्धती शेतकऱ्यांना योग्य मार्ग दाखवील,' असा आत्मविश्वास चौधरी यांना आहे.

शेततळ्याचे नियोजन
गेल्या तीन वर्षांपासून कमी पाऊस पडल्यामुळे पाणी पातळी खाली गेली आहे. पाण्याचे काटेकोर नियोजन करताना चौधरी यांनी शेततळे बांधले. शेततळ्यात सध्या ७५ ते ८० लाख लिटर पाणी आहे. या पाण्यावर जून महिन्यापर्यंत फळबाग जगविण्याचे आव्हान आहे. फळबागेत चौधरी ठिबक सिंचनचा वापर करतात. योग्य पाणी पुरवठा केल्यामुळे पाणी बचत होऊन बाग सुस्थितीत आहे. शिवाय आता सेंद्रीय उत्पादनासाठी 'स्लरी टँक' केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘टीईटी’च्या निर्णयाकडे लक्ष

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
शिक्षक पात्रता परीक्षेत पेपर फुटल्याने राज्यभर खळबळ उडाली. परीक्षा होऊन १५ दिवस उलटले मात्र पेपर-१ रद्द होणार का, नवे वेळापत्रक केव्हा येणार, निकालाचे काय, याबाबत संभ्रम कायम आहे. पहिल्या पेपरबाबत शासनस्तरावरून कोणताच निर्णय नसल्याने दुसरा पेपरही तपासण्याची प्रक्रिया रखडली आहे. शासन, प्रशासनाच्या पातळीवरून निर्णय झाला नसल्याने विद्यार्थी मात्र गोंधळात सापडले आहेत.

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे १५ जानेवारी रोजी शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) घेण्यात आली. परीक्षेत पेपर क्रमांक-१ची उत्तरे पेपर सुरू होण्यापूर्वीच 'व्हॉटस् अॅप'वर फिरू लागल्यामुळे खळबळ उडाली. यानंतर बीडमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. प्रधान सचिवांमार्फत चौकशी करून दोन दिवसांत निर्णय जाहीर करू, असे राज्य शासनातर्फे सांगण्यात आले, मात्र १५ दिवस उलटल्यानंतही यासंदर्भातील संभ्रम कायम आहे.

पेपर रद्द केला जाणार की नाही, याबाबत स्पष्टता नाही. त्यामुळे विद्यार्थी वैतागले आहेत. परीक्षा परिषदेकडेही याबाबत विचारणा करण्यात येत असल्याचे परिषदेतील सूत्रांनी सांगितले. शासनस्तरावरून होत असलेल्या विलंबाबत विद्यार्थ्यांमध्ये नाराजी आहे.

'पेपर-२'ची तपासणीही रखडली
या परीक्षेबाबत शासनाने परिषदेला कोणतेही आदेश दिलेले नाहीत. पेपर-१ची फेरपरीक्षा घेण्यात येणार की संपूर्ण परीक्षाच नव्या घेणार, याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. त्यामुळे पेपर-२च्या उत्तरपत्रिका तपासणीचे काम अद्याप सुरू करण्यात आलेले नाही. विद्यार्थ्यांबरोबर परिषदेतही संभ्रमाचे वातावरण आहे.

दोन दिवसांतील निर्णयाचे काय
पेपरफुटी प्रकरणानंतर दोन दिवसात शासन स्तरावरून निर्णय होईल असे सांगण्यात आले. परिषदेने परीक्षेचा आढावा घेऊन अहवालही शासनाकडे सादर केला आहे. यानंतरही प्रकरणाचा निर्णय झालेला नाही. यातच 'सीआयडी'मार्फत चौकशी करण्याचे संकेत शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दिले. पेपरफुटीच्या चारही गुन्ह्यांचा तपास 'सीआयडी'मार्फत केला जाणार आहे. यासह क्रमांक-१ची पेपरही लवकरच घेण्यात येणार असल्याचे तावडे यांनी स्पष्ट केली, परंतु वेळापत्रकाची प्रतिक्षा कायम आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images