Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

सख्या भावांनी केले एकाच मुलीचे शोषण

0
0

म. टा. प्रतिनिधी, वैजापूर
लग्नाचे आमीष दाखवून दोन सख्ख्या भावांनी एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना तालुक्यातील चेंडूफळ येथे उघडकीस आली. ही मुलगी गर्भवती असून तिची वैद्यकीय तपासणी करण्यात येणार आहे. याप्रकरणी वीरगाव पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवून दोघांना अटक करण्यात आली आहे.
ज्ञानेश्वर भीमराव पवार (वय २३) व सूरज भीमराव पवार (वय २१) अशी या घटनेतील संशयित आरोपींची नावे आहेत. मजुरी करणाऱ्या कुटुंबातील या मुलीने दहावीनंतर शिक्षण सोडले आहे. ज्ञानेश्वर व सूरज हे दोघेही मजुरी करतात. त्यांची त्या मुलीच्या भावाशी मैत्री असल्याने दोघांचेही तिच्या घरी नेहमी येणे जाणे होते. ज्ञानेश्वर याने मुलीला लग्नाचे आमीष दाखवून संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर सूरज यानेही त्या मुलीला जाळयात ओढून शारीरिक संबंध ठेवले. यातून ती मुलगी गर्भवती राहिली. मुलगी सात महिन्यांची गर्भवती राहिल्याचे कुटुंबीयांना समजल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. त्यावरून ज्ञानेश्वर पवार व सूरज पवार या दोघांवर बलात्कार व लैंगिक अपराधांपासून बालकांचे संरक्षण अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक संतोष घोडके करीत आहेत. वैजापूर न्यायालयाने दोन्ही आरोपींना चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. काही दिवसांपूर्वीच शहरातील खंडोबानगरमध्ये चार वर्षाच्या मुलीवर एका अल्पवयीन मुलाने अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘इंडो-अाफ्रिकन स्टुडंट समीट’ व्हावी

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
आफ्रिकेतील विविध देशातील विद्यार्थ्यांना भारतात विविध ठिकाणी येणाऱ्या अडचणी आणि त्यांचे प्रश्नांबाबत 'इंडो-अाफ्रिकन स्टुडंट समिट' घेण्यात यावी यासाठी विदेशी विद्यार्थी प्रयत्न करत आहेत. बेंगळुरूमध्ये टांझानियन विद्यार्थिनीवर झालेल्या हल्ल्यानंतर विदेशी विद्यार्थ्यांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. यानंतर या विद्यार्थ्यांनी हे पाऊल उचचले आहे. याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठविण्यात येणार आहे.

बेंगळुरू येथे झालेल्या घटनेनंतर विदेशी विद्यार्थ्यांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातही विदेशातील विविध देशांतील विद्यार्थी पदवी, पदव्युत्तर शिक्षण घेत आहेत. त्यात अाफ्रिका खंडातील विद्यार्थ्यांचे प्रमाण जास्त आहे. त्यांना यापूर्वीही विविध शहरांत कटू अनुभव आले आहेत. अनेकदा हॉटेलमध्ये रूमही दिली जात नाही. विमानतळावरही काहीवेळा त्रास झाल्याचे अनुभव आहेत. विविध शहरातील हे अनुभव लक्षात घेत विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी देशपातळीवर प्रयत्न व्हावेत, यासाठी विद्यापीठात जनसंवाद व वृत्तपत्रविद्या विभागात शिक्षण घेत असलेला जोशो बोइट प्रयत्न करीत आहे. त्याने थेट भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहण्याची तयारी केली आहे. या विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडण्यासाठी देशपातळीवर 'इंडो-अाफ्रिकन स्टुडंट समीट' घेण्याची मागणी करण्यात येणार आहे.

देशपातळीवर आमच्या विद्यार्थ्यांचे अनेक प्रश्न आहेत. त्या सोडविण्यासाठी प्रयत्न व्हावेत म्हणून 'इंडो-अाफ्रिकन स्टुडंट समीट' व्हावी, असा माझा प्रयत्न आहे. त्यामुळे आम्हाला आमच्या समस्या, अनुभव मांडण्यासाठी व्यासपीठ मिळेल. याबाबत मी पंतप्रधानांना पत्र पाठविणार आहे.
- जोशो बोइट, विद्यार्थी, जनसंवाद व वृत्तपत्रविद्या विभाग, विद्यापीठ.
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
आफ्रिकेतील विविध देशातील विद्यार्थ्यांना भारतात विविध ठिकाणी येणाऱ्या अडचणी आणि त्यांचे प्रश्नांबाबत 'इंडो-अाफ्रिकन स्टुडंट समिट' घेण्यात यावी यासाठी विदेशी विद्यार्थी प्रयत्न करतायेत. बेंगळुरूमध्ये टांझानियन विद्यार्थिनीवर झालेल्या हल्ल्यानंतर विदेशी विद्यार्थ्यांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. यानंतर या विद्यार्थ्यांनी हे पाऊल उचचले आहे. याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठविण्यात येणार आहे.

बेंगळुरू येथे झालेल्या घटनेनंतर विदेशी विद्यार्थ्यांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातही विदेशातील विविध देशांतील विद्यार्थी पदवी, पदव्युत्तर शिक्षण घेत आहेत. त्यात अाफ्रिका खंडातील विद्यार्थ्यांचे प्रमाण जास्त आहे. त्यांना यापूर्वीही विविध शहरांत कटू अनुभव आले आहेत. अनेकदा हॉटेलमध्ये रूमही दिली जात नाही. विमानतळावरही काहीवेळा त्रास झाल्याचे अनुभव आहेत. विविध शहरातील हे अनुभव लक्षात घेत विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी देशपातळीवर प्रयत्न व्हावेत, यासाठी विद्यापीठात जनसंवाद व वृत्तपत्रविद्या विभागात शिक्षण घेत असलेला जोशो बोइट प्रयत्न करीत आहे. त्याने थेट भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहण्याची तयारी केली आहे. या विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडण्यासाठी देशपातळीवर 'इंडो-अाफ्रिकन स्टुडंट समीट' घेण्याची मागणी करण्यात येणार आहे.

देशपातळीवर आमच्या विद्यार्थ्यांचे अनेक प्रश्न आहेत. त्या सोडविण्यासाठी प्रयत्न व्हावेत म्हणून 'इंडो-अाफ्रिकन स्टुडंट समीट' व्हावी, असा माझा प्रयत्न आहे. त्यामुळे आम्हाला आमच्या समस्या, अनुभव मांडण्यासाठी व्यासपीठ मिळेल. याबाबत मी पंतप्रधानांना पत्र पाठविणार आहे.
- जोशो बोइट, विद्यार्थी, जनसंवाद व वृत्तपत्रविद्या विभाग, विद्यापीठ.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आयोगच पोचणार महिलांपर्यंत

0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
'इतकी वर्षे पीडित महिलांना आयोगापर्यंत पोचावे लागायचे. आता मात्र हे चित्र बदलणार असून राज्य महिला आयोगच महिलांपर्यंत पोचेल,' अशी सकारात्मक प्रतिक्रिया विजया रहाटकर यांनी व्यक्त केली. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी निवड झाल्यावर प्रथमच त्या पत्रकांराशी संवाद साधत होत्या.
'भाजपा राष्ट्रीय मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून तर तुम्ही खूप महत्त्वाचे पद सांभाळले, पण माझ्या राज्यातील सर्वोच्च पद महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचे असून मी तुमची निवड केली आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मला कळवले, तेव्हा आश्चर्य वाटले व खूप अभिमान वाटला. सर्वप्रथम आयोगाची वेबसाइट अद्ययावत करण्यास प्राधान्य देणार आहे.' महिला अत्याचाराच्या वाढत्या घटनांविषयी चिंता व्यक्त करताना त्या म्हणाल्या, 'महिलांना आपल्या अधिकारांची माहिती असणे आवश्यक असून, त्या अनुषंगाने आयोग सर्वप्रथम जनजागृती करेल. आयोगाचे मुख्य कार्यालय मुंबईत आहे. हे अंतर खूप असून, सुनावणी होईपर्यंत तक्रारकर्ती महिला प्रक्रियेतून बाद होते. त्यामुळे जिल्हा स्तरावरच काम करता येईल, याचा अभ्यास करू. अशा घटनांमध्ये नियमांची अंमलबजावणी व गुन्हेगारास शिक्षा होणे महत्त्वाचे आहे. तरच घटनांवर लगाम लावता येईल. अशा प्रकरणांत आता प्रत्येक तपशीलाची नोंद घेतली जाईल व पोलिस यंत्रणा महिलांप्रती किती संवेदनशील आहे, याचाही अभ्यास केला जाईल. योग्य कलमे लावून चार्जशीट लवकरात लवकर दाखल झाल्यास शिक्षा होते, यावर माझा विश्वास आहे. समाजातील विकृतीला पायबंद घालण्यासाठी शिक्षा व्हायलाच हवी व आयोग शेवटपर्यंत हे काम करेल. महिला समुपदेशन सुरळीत करणे, विशाखा समितीच्या कामांचा व आयोगाने आजवर नमूद केलेल्या गोष्टींचा आढावा घेऊन महिलांची आर्थिक साक्षरतेसही दिशा देण्याच्या अनुषंगाने कार्यक्रम घेतले जातील. जेंडर बायस हा मुद्दाही महत्त्वाचा असून, प्रिव्हेंटिव्ह मेजर्स म्हणून आयोग जनजागृती करणार आहे,'असे त्या म्हणाल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

...बरं झालं रोहित तू आत्महत्या केली!

0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
'बरं झालं रोहित
तू आत्महत्या केली,
आम्ही आता ठरवू शकतो
तुला दहशतवादी, नक्षलवादी,
देशद्रोही किंवा सहज
बदनाम करू शकतो
अनैतिक संबंधात'
रामप्रसाद वाव्हळ या कवीने आपल्या 'अस्वस्थ चेहरे' व 'बरं झालं रोहित तू आत्महत्या केली' या कवितेतून उपस्थितांना हेलावून सोडले. वास्तववादी विषयांना आशयपूर्ण कवितातून स्पर्श करीत कवींनी औरंगाबाद ग्रंथोत्सवातील कविसंमेलन गाजवले. या महोत्सवात विभागीय शासकीय ग्रंथालयाच्या प्रांगणात गुरुवारी दुपारी कविसंमेलन घेण्यात आले.
मराठी भाषा विभाग, राज्य साहित्य-संस्कृती मंडळ, ग्रंथालय संचलनालय, जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय आणि जिल्हा ग्रंथालय संघाने 'औरंगाबाद ग्रंथोत्सव' आयोजित केला आहे. ग्रंथोत्सवातील कविसंमेलनात श्रीधर नांदेडकर, रवी कोरडे, सुनील उबाळे, रामप्रसाद वाव्हळ, संजयानंद, अलका राजेभोसले, बंडू गायकवाड, भास्कर निर्मळ, शमा बरडे, नीलेश चव्हाण, ज्ञानेश्वर कुलकर्णी, अॅड. योगेश अक्कर व अय्युब पठाण यांनी सहभाग घेतला. नावीन्यपूर्ण कवितांनी कविसंमेलन लक्षणीय ठरले. वीरा राठोड यांनी 'धर्म नावाची टकटक', 'किती पिढ्या जगल्या भयमुक्त' या कविता सादर केल्या.
'प्रत्येकजण जगत असतो
आपापली आशा घेऊन,
प्रत्येकजण जगत असतो
आपापली भाषा घेऊन'
ही 'स्वप्नांचं गाव' कविता सादर करून नवोदित कवी नीलेश चव्हाण यांनी रसिकांची दाद मिळवली. अलका राजेभोसले यांनी 'मुखवट्याशी संगत नाही, आत एक बाहेर एक अशी पंगत नाही' ही भन्नाट कविता सादर केली. रवी कोरडे यांच्या 'दिव्यावरची काजळी काढताना' या कवितेला रसिकांचा प्रतिसाद मिळाला. यावेळी जिल्हा ग्रंथालय अधिकारी ल. दि. कुमठेकर यांनी कवींचा सत्कार केला. कविता ऐकण्यासाठी रसिकांची मोठी उपस्थिती होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नोकरी सोडून फुलविली शेती

0
0

Makarand.Kulkarni@timesgroup.com

एम.एस्सी केमिस्ट्री आणि बी.एड केल्यानंतर कुठल्याही ज्युनिअर कॉलेजमध्ये किंवा चांगल्या शाळेत शिक्षकाची नोकरी अगदी सहजपणे मिळत होती. दुसऱ्याकडे काम करण्याऐवजी स्वतःच्या शेतात सोने पिकवण्याचा निश्चय करून दीपक चव्हाण घरी सुलतानपूरला (ता. खुलताबाद) परतले आणि शेतीत नावनवे प्रयोग सुरू केले. घरातील सदस्यांनी त्यांना पाठिंबा दिला. ठिबक सिंचन, शेडनेट, पॉलीहाउस, शेततळे अशा आधुनिक पद्धतींचा वापर करून त्यांनी शेतात नंदनवन फुलविले आहे. त्यांचा आल्याचा ब्रँड तर जिल्ह्यात सर्वाधिक प्रसिद्ध झाला आहे.

खुलताबाद फुलंब्री रस्त्यावर सुलतानपूर हे गाव आहे. बहुतांश कुटुंबातील एक तरी सदस्य नोकरी, व्यवसायानिमित्त गावाबाहेर गेलेला आहे. दीपक पांडुरंग चव्हाण हे या गावचे. शिक्षणासाठी पाचवीपासून औरंगाबादला होते. महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केल्यानंतर रसायनशास्त्रात एम.एस्सी केले. त्यानंतर नोकरीचा शोध. गोव्यात सिप्ला कंपनीमध्ये जॉब मिळाला. दोन वर्षे नोकरी केली, पण त्यांचे मन रमले नाही. सुटीत गावाकडे आले की शेती त्यांना खुणावत असे. शेतात गेल्यानंतर शेतकऱ्यांची धावपळ, पांगलेले शेत, पाण्याचा भरवसा नाही, त्यात कसेबसे पीक काढण्याची कसरत पाहून त्यांना वाईट वाटे. चव्हाण यांना दोन भाऊ. एक भाऊ आणि वडील शेती पाहत. शेतीसाठी पाणी आहे. त्याचे योग्य नियोजन केले तर, निश्चितपणे आपणही चांगली शेती करू, असे त्यांना वाटले. २००८मध्ये त्यांनी घरी परतून शेती करण्याचा विचार बोलून दाखविला. उच्चशिक्षित मुलाकडून साहजिकच चांगल्या नोकरीच्या अपेक्षा कुटुंबीयांनी केल्या होत्या. त्यामुळे या निर्णयाला थोडा विरोध झाला, पण दीपक यांचा निर्धार पक्का होता. २०१०मध्ये ते परतले. घरच्यांनी शेतीसोबत बी.एड करण्याचा सल्ला दिला. म्हणजे तालुक्यात कुठेही चांगल्या शाळेत शिक्षकाची नोकरी करण्याचा पर्याय खुला राहील. दीपक यांनी मनाशी निर्णय केला की शेतीच करायची. २०११मध्ये त्यांनी शेतीकडे पूर्ण लक्ष देण्यास सुरुवात केली. पारंपरिक शेती सुरू होतीच. काहीतरी वेगळे करता येईल काय, याची चाचपणी सुरू केली. पाच एकर जमिनीवर ठिबक सिंचन करून अालं (अद्रक) लावले. ५० एकर शेतीत ठिबक सिंचनची यंत्रणा सोयीनुसार हलविली जात होती. त्यातून आलेल्या पैशातून आणखी पाच एकरावर ठिबक सिंचन केले. २०१३मध्ये आल्याच्या २६० क्विंटल खोडवा निघाला. यादरम्यान त्यांनी प्रगतीशील शेतकरी, कृषी अधिकारी, मंडळ अधिकाऱ्यांच्या भेटी घेऊन शेतीतील नवीन प्रयोग; तसेच तंत्रज्ञानाची माहिती करून घेतली. इथे त्यांना केमिस्ट्रीचे शिक्षण कामाला आले. २०११मध्ये पाच एकर, त्यानंतर दोन, मग पाच असे ठिबक सिंचन आणि अाल्याचे क्षेत्र वाढवून त्यांनी आधुनिक शेतीचा प्रयोग यशस्वी करून दाखविला. उत्पादन वाढले तसा भावही मिळू लागला. उत्तम प्रतीचे आल्याचे बेणे लागवडीसाठी तयार केले. तालुक्यासह जिल्ह्यात या बेण्याला मोठी मागणी होती. सरासरी उत्पन्न वाढल्याने त्याचा फायदा झाला. २०१३मध्ये त्यांनी टरबुजाचे पीक घेतले. मल्चिंग करून वर्षभरात तीन वेळा हे पीक घेता येते. प्रत्येक वेळी सरासरी २२ ते २५ टन उत्पन्न निघाले. याच काळात त्यांनी पाण्याचा अभ्यास केला. पाण्याचे गणित मांडताना दीपक चव्हाण यांच्या असे लक्षात आले की, जेवढ्या क्षेत्रावर टरबूज लावले तेवढेच क्षेत्र जर उसासाठी निवडले तर, आपल्याला अधिक उत्पन्न मिळते, असा सर्वसामान्य समज असतो, पण उसाला लागवडीपासून तोडणीपर्यंत सव्वा कोटी लिटर पाणी लागते. तुलनेत टरबूजाला मात्र ३० लाख लिटर पाणी पुरते.

भावाच्या बाबतीतही टरबूज उसापेक्षा उजवे आहे. त्यामुळे उसापेक्षा टरबुजाची शेती फायदेशीर असल्याचे सिद्ध झाले. गहू, ज्वारी, कापूस, मका या पीकासोबत टरबूज, अद्रक; तसेच टोमॅटो, भेंडी ही पिकेही त्यांनी घेतली. तीन एकरावर त्यांनी डाळिंब लावले. २०१४मध्ये पाण्यासाठी दीड एकरचे शेततळे उभारले. अनुदानाशिवाय उभारलेल्या या शेततळ्यात पावणेदोन कोटी लिटर पाण्याची साठवणूक क्षमता आहे. शेतात चार विहिरी आहेत, पण दोन वर्षांपूर्वी पाणीच नव्हते म्हणून शेततळे बांधले. सप्टेंबर २०१५पर्यंत पावसाने दडी मारली होती. गणेशोत्सवाच्या काळात झालेल्या जोरदार पावसात शेततळ्यात मोठ्या प्रमाणावर पाणी साठले. २०१३मध्ये चव्हाण यांनी नाविन्यपूर्ण प्रयोग करण्यासाठी एक एकरवर शेडनेट उभारले. त्यात काकडी, सिमला मिरची, घेवडा ही पिके घेतली.शेतीमध्ये नवीन प्रयोग राबविताना शिक्षणाचा खूप फायदा होत असल्याचे चव्हाण सांगतात. भविष्यात अनेक नवनवीन प्रयोग करण्याचे प्लॅनिंग त्यांनी केले आहे. नियोजन करून पाण्याचा वापर केला तर शेती निश्चितच फायद्याची ठरते. दीपक चव्हाण यांच्या प्रयोगातून हे पुरते सिद्ध झाले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लोकप्रतिनिधी, अधिकाऱ्यांत जुंपली!

0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांत असलेले विळा-भोपळ्याचे नाते शुक्रवारी शहरात आलेल्या विधान परिषद विशेषाधिकार समितीपुढे उघड झाले. 'आम्हाला मंत्र्यांच्या दौऱ्याची माहिती मिळत नाही, अधिकारी निमंत्रणपत्रिकेतून नावे वगळतात,' अशा तक्रारी लोकप्रतिनिधींनी समितीपुढे केल्या. तर अधिकाऱ्यांनी लोकप्रतिनिधी आम्हाला अपमानास्पद बोलतात, असे गाऱ्हाणे मांडले.
विधान परिषद विशेषाधिकार समितीच्या प्रमुख आमदार डॉ. नीलम गोऱ्हे यांच्यासह समितीच्या सदस्यांनी विभागातील अधिकारी, लोकप्रतिनिधींशी चर्चा केली. सुभेदारी विश्रामगृहावर आमदार संजय शिरसाट, सुभाष झांबड यांच्यासह लोकप्रतिनिधींनी नीलम गोऱ्हे यांची भेट घेऊन अधिकाऱ्यांच्या वागणुकीबद्दल तक्रारी केल्या. यावेळी त्यांनी काही सूचना तसेच राजशिष्टाचाराशी संबंधित काही मुद्दे मांडले. 'राजशिष्टाचारात बदल झाले पाहिजेत. शासनाने केलेल्या कामाच्या उद्घाटन कार्यक्रम तसेच शुभारंभ कार्यक्रमाच्या पत्रिकेत आमदाराची नावे वगळली जात आहेत,' अशी तक्रार आमदार शिरसाट यांनी गोऱ्हे यांच्याकडे केली. 'विधानभवनामध्ये अधिकाऱ्यांना मार्गदर्शनपर परिसवांद घ्यावा,' असे शिरसाट म्हणाले.
'जवळपास सर्वच अधिकारी चांगले असतात. मात्र, काही अधिकारी लोकप्रतिनिधींना चांगली वागणूक देत नाहीत. अधिकाऱ्यांना मंत्री, न्यायाधीशांच्या दौऱ्याची माहिती‌ही मिळत नाही, लोकप्रतिनिधींच्या नावाच्याही काही लोक दुरुपयोग करतात. मात्र, अशावेळी त्याच माणसाकडून लोकप्रतिनिधींशी बोलून असे प्रकार थांबवता येऊ शकतात. अधिकाऱ्यांनी खात्री करुन घेतल्यास वाद होणार नाहीत. लोकप्रतिनिधी, अधिकाऱ्यांनी कसे वागावे असा बैठकीत मुद्दा होता,' असे आमदार सुभाष झांबड यांनी सांगितले. सुभेदारी विश्रामगृह येथे झालेल्या बैठकीनंतर डॉ. नीलम गोऱ्हे यांच्याशी पत्रकारांनी संवाद साधला. यावेळी त्या म्हणाल्या, 'गेल्या ३५ वर्षानंतर पहिल्यांदाच ही समिती अधिकारी, लोकप्रतिनिधींशी चर्चा करत आहे. बैठकीसाठी विविध २० विभांगातील अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. राजशिष्टाचार म्हणजे काय, विशेष हक्क का दिले याबाबतची माहिती बैठकीत देण्यात आली. यावेळी अधिकारी फोन घेत नाही, निमंत्रण पत्रिकेत नाव टाकत नसल्याच्या तक्रारी आल्या. मात्र, अधिकाऱ्यांनी लोकप्रतिनिधींना एसएमएसद्वारे कळवले तर विसंवाद होणार नाही. नवीन माध्यमांचा जनहितासाठी वापर करावा. निमंत्रण पत्रिकेत नाव टाकण्याची जबाबदारी ही निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांची असते,' असे गोऱ्हे यांनी सांगितले. यावेळी विधान परिषद सदस्य अॅड. निरंजन डावखरे, आमदार सुभाष झांबड, विधिनमंडळाचे प्रधान सचिव डॉ. अनंत कळसे, उत्तमसिंग चव्हाण, डॉ. संतोष भोगले, डॉ. उमाकांत दांगट, डॉ. निधी पांडेय, ‌अमितेश कुमार, चिरंजीव प्रसाद आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
समन्वय हवा
मराठवाडा महसूल प्रशिक्षण प्रबोधिनी येथे आयोजित विभागस्तरीय बैठकीत डॉ. नीलम गोऱ्हे यांनी मार्गदर्शन केले. 'लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांनी समन्वयाने काम करण्याची आवश्यकता आहे. शासकीय अधिकाऱ्याने विधिमंडळ तसेच लोकप्रतिनिधींचा अवमान होईल असे वर्तन करू नये, लोकप्रतिनिधींना अधिकाऱ्यांनी सहकार्य करावे, त्यांच्याशी नेहमीच सौजन्याने व सहकार्याची भावना ठेवून वागावे. हक्कभंगाची कार्यवाही होईल, असे अधिकाऱ्यांनी वागू नये,' अशी अपेक्षा गोऱ्हे यांनी व्यक्त केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रासायनिक शेतीमुळे आत्महत्या

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
'अवर्षण निसर्गचक्राचा भाग असून अवर्षणाचे दुष्काळात रूपांतर मानवनिर्मित असते. मराठवाड्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या औद्योगिक व रासायनिक शेतीमुळे घडत आहेत. मराठवाड्यातील प्रश्नांचे आपल्याला पुरेसे आकलन नसल्यामुळे प्रश्न सुटत नाही' असे प्रतिपादन प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ प्रा. एच. एम. देसरडा यांनी केले. मराठवाड्यातील अवर्षण, पाणी टंचाई आणि शेतकऱ्यांच्या समस्या या विषयावर ते बोलत होते.
महाराष्ट्र राज्य दुष्काळ निवारण व निर्मूलन मंडळाच्या वतीने 'मराठवाडा शेतकरी संवाद यात्रा' काढण्यात आली. या यात्रेच्या पार्श्वभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील अर्थशास्त्र विभागात शुक्रवारी प्रा. देसरडा यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. यावेळी डॉ. व्ही. बी. भिसे, के. ई. हरिदास, डॉ. एस. टी. सांगळे, प्रा. कृतिका खंदारे, प्रा. धनश्री महाजन व डॉ. अशोक पवार यांची उपस्थिती होती. 'मराठवाड्यातील पाणी टंचाई, शेतीची दुरवस्था आणि बेरोजगारी यावर प्रा. देसरडा यांनी प्रकाश टाकला. 'मराठवाड्यातील ७० टक्के जनता शेतीवर अवलंबून आहे. मानव विकास निर्देशांक घसरला आहे. शेतीच्या एकूण पाण्यापैकी ७० टक्के पाणी उसाला देतात. एक हेक्टरसाठी तीन कोटी लिटर पाणी लागते. स्वतःचे साखर कारखाने असलेले लोक ऊसशेतीचे समर्थन करणे स्वाभाविक आहे; मात्र एक हजार लोकांना वर्षभर तीन कोटी लिटर पाणी पुरते. लोक वाचवायचे की ऊस याचा निर्णय घ्यावा लागेल. टग्या पुढाऱ्यांनी साखर कारखाने, सूतरगिरण्या, बँका बंद पाडल्या आहेत. पंचतारांकित हॉटेलमध्ये पॉवरपॉइंट प्रेझेंटेशन घेऊन दुष्काळाची समस्या संपणार नाही. हिवरेबाजार व कडवंची या गावांचा आदर्श घेऊन पाण्याचा सुनियोजित वापर करण्याची गरज आहे. इस्त्रायलपेक्षा जास्त पाऊस पडूनही मराठवाड्यात दुष्काळी परिस्थिती राहणे दुर्दैवी आहे. शेतीत रसायनांचा अधिक वापर वाढून शेतकरी कंगाल झाले. या कंगालपणातूनच आत्महत्या वाढल्या आहेत' असे प्रा. देसरडा म्हणाले. यावेळी विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना के. ई. हरिदास यांनी उत्तर दिले.

राज्यसभेसाठी खुशामत
काही दिवसांपूर्वी विद्यापीठात झालेल्या कार्यक्रमात जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्रसिंह यांनी 'जलयुक्त शिवार' योजनेचे कौतुक केले होते. 'जलयुक्त शिवार योजना' लघु पाटबंधारे योजना मोडीत काढणारी व अत्यंत छोटी योजना आहे. राज्यसभेवर जाण्याची घाई झालेल्या राजेंद्रसिंह यांनी योजनेचे कौतुक करणे समजू शकतो, अशी टीका प्रा. देसरडा यांनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आजारी वडिलांच्या भेटीसाठी पलायन

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
बाल निरीक्षणगृहात वाढदिवसाचा कार्यक्रम सुरू असताना पलायन केलेल्या एका विधीसंघर्षग्रस्त बालकाला बेगमपुऱ्यात त्याच्या बहिणीच्या घरातून ताब्यात घेण्यात आले. तो आजारी वडिलांना भेटण्यासाठी पळाल्याचे चौकशीअंती स्पष्ट झाले आहे.
बाल निरीक्षणगृहात गुरुवारी वाढदिवसानिमित्त एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यात सर्व विधीसंघर्षग्रस्त बालक व्यस्त असल्याचा लाभ उठवून १७ वर्षाच्या मुलाने पलायन केले. ही बाब लक्षात आल्यानंतर वॉर्डन शेख फय्याज यांनी सिटीचौक पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्याचा शोध घेतल्यानंतर तो बेगमपुरा येथील बहिणीच्या घरी सापडला. आजारी वडिलांना भेटण्यासाठी आल्याचा दावा त्याने केला.
वैजापूर तालुक्यातील शिऊर रस्त्यावर चाकूचा धाक दाखवून दुचाकीस्वाराला लूटणाऱ्या तिघांना गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली. भुऱ्या उर्फ रवींद्र सोमनाथ भोसले, ज्ञानेश्वर रामदास लोणारी (वय २४) आणि सूरज दिलीप बागुल (वय १९, तिघेही रा. गोपाळवाडा, ता. कोपरगाव) अशी त्यांची नावे आहेत. पोलिसांनी त्यांच्याकडून मोबाइल, दुचाकी व रोख रक्कम असा ४१,३५० रुपयांचा ऐवज जप्त केला. जगदीश राजाराम सुलाटे यांना ७ फेब्रुवारी रोजी अडवून मोबाइल आणि रोकड लुटली होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशी ८ फेब्रुवारी रोजी वाहनचालक शिवाजी रामनाथ बचाटे (रा. जेवळी, ता. कन्नड) यांना अडवून चाकूने हल्ला करून रोख पाच हजार रुपये हिसकावले होते. याप्रकरणी शिऊर पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. ग्रामीण गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक डॉ. कांचनकुमार चाटे यांनी घटनास्थळाची पाहणी करून तपास केला. त्यानंतर माहिती मिळवून तिघांना जानेफळ निमगाव शिवारातून पकडले. ही कारवाई उपनिरीक्षक दीपक सरोदे, जमादार गणेश मुळे, नीलेश गायकवाड, अनिल गायकवाड, भुषण देसाई, दीपक जगदाळे, सागर पाटील यांनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


प्रदूषण केल्याने कंपनीविरुद्ध तक्रार

0
0

म. टा. प्रतिनिधी, वाळूज
कारखान्यातील रसायनयूक्त पाणी जलशुद्धीकरण केंद्राऐवजी ड्रेनेजलाइनमध्ये सोडणाऱ्या कंपनीला महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ व ग्रामपंचायतीने नोटीस बजाविली आहे. रांजणगाव शेणपुंजी ग्रामपंचायतीने पोलिसात तक्रार देऊन व्यवस्थापकांवर कारवाईची मागणी केली आहे.
वाळूज औद्योगिक क्षेत्रातील सेक्टर के ८५ मधील त्रिमृर्ती फ्रुट अॅण्ड व्हॅली प्रा. लि. कंपनीने ६ जानेवारी रोजी रस्त्यावर कारखान्यातील रसायनयूक्त पाणी सोडले होते. याबद्दलचे वृत्त 'म.टा'मध्ये ७ जानेवारीच्या अंकात प्रकाशित करण्यात आले. रस्त्यावर प्रदूषित पाण्याचे पाट वाहत असल्याने मोठी दुर्गंधी पसरल्याचे वृत्त प्रकाशित होताच प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी कारखन्याची पाहणी करून नोटीस बजविली. मात्र रस्त्यावर सोडले पाणी एमआयडीसीच्या बंद पडलेल्या ड्रेनेज लाइनचे असल्याचा दावा कंपनी व्यवस्थापकांकडून करण्यात येत आहे. या प्रकरणात रांजणगाव शेणपुंजी ग्रामपंचायतीने लक्ष घातले आहे. ग्रामपंचायतीतर्फे कंपनी व्यवस्थापनावर कारवाई करावी, अशी मागणी पोलिसांकडे करण्यात आली आहे.
वाळूज एमआयडीसीतील रसायनयुक्त पाणी खाम नदीमध्ये सोडण्याचे प्रकरण गेल्या वर्षी गाजले. त्यामुळे ग्रामपंचायतीने या पद्धतीने रात्री तपासणी केल्यास आणखी काही प्रकार उघडकीस येण्याच शक्यता आहे. या कंपनीतील तपासणीनंतर शुक्रवारी दिवसभर संबंधितांनी एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात गाठीभेटी घेतल्या. या प्रकरणात पोलिस काय भूमिका घेणार याकडे लक्ष लागले आहे.

ग्रामपंचायतीने गुरुवारी रात्री १२ वाजता एका पोलिसाच्या उपस्थितीत कंपनीमध्ये पाहणी केली. त्यावेळी दोन कामगार रसायनयूक्त पाणी बाहेर टाकतांना दिसले. हे पोलिसांच्या निदर्शनास आणून दिले आहे. पोलिसांनी संबंधितांवर तत्काळ गुन्हा दाखल करावा.- मोहनीराज धनवटे,
उपसरपंच, रांजणगाव शेणपुंजी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शाळेसाठी इमारत मिळेना

0
0

म. टा. प्रतिनिधी, पडेगाव
महापालिकेने मिटमिटा येथे बांधलेल्या व्यायामशाळेची सुसज्य इमारत बांधण्यात आली. येथे कधीच व्यायामशाळा सुरू झाली नाही मात्र, मागणी करूनही ती शाळेसाठी देण्यात येत नाही. पुरेशा जागेअभावी मनपा शाळेतील विद्यार्थी दाटीवाटीने बसत आहेत.
मनपाच्या विकास निधीमधून मिटमिटा येथे व्यायामशाळा बांधण्यात आली आहे. परंतु, येथे कधीच व्यायामशाळा सुरू झाली नाही. तत्कालीन आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी ही इमारत एका खाजगी सेवाभावी संस्थेला रात्रनिवारा चालवण्यासाठी भाड्याने दिली. त्यावेळी या इमारतीमध्ये बोअर, वृक्षलागवड, टीव्ही संच, गाद्या, पलंग, टेब, खर्च्या, पंखे आदी सर्व सुविधा पुरवण्यात आल्या. ही इमारत सहा महिन्यांपूर्वीपर्यंत सुस्थितीत होती. अवघ्या सहा महिन्यात इमारतीची दुरावस्था झाली आहे. मिटमिटा येथील मनपा केंद्रीय प्राथमिक शाळेत १० वीपर्यंत शाळा असून वर्ग खोल्यांची कमतरता आहे. त्यामुळे येथील मुळे दाटीवाटीने बसतात. मुख्याध्यापक व शालेय व्यवस्थापन समितीने ही इमारत शाळेसाठी द्यावी, अशी मागणी वारंवार केली. परंतु, त्याकेड मनपाने सातत्याने दुर्लक्ष केले आहे. ही इमारत शाळेला दिली तर, ती सुस्थितीत राहील व विद्यार्थ्यांची सोयही होईल. मात्र पालिकेने निर्णय न घेतल्याने इमारतीची दुर्दशा होत असून येथील सर्व साहित्य लंपास झाले आहे. याप्रकरणी मनपा आयुक्त सुनील केंद्रेकर, महापौर त्र्यंतबक तुपे, नगरसेवक रावसाहेब आम्ले यांनी लक्ष घालावे, अशी मागणी शिवराम जाधव, लक्ष्मण बनकर, अजबराव मुळे यांनी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सातारा, देवळाईत जागोजागी कचरा

0
0

म. टा. प्रतिनिधी, सातारा
महानगरपालिकेतर्फे सातारा, देवळाईमध्ये १४ सफाई मजूर व फक्त ५ छोटा हत्ती व १ टिप्परद्वारे कचरा संकलनाचे काम सुरू आहे. पण मोठ्या भागासाठी ही यंत्रणा पुरेशी नसल्याने जागोजागी कचऱ्याचे ढीग दिसत आहेत. अनेक ठिकाणी साचलेला कचरा नागरिकच जाळत आहेत.
महापालिकेने कचरा संकलनासाठी सातारा व देवळाईमध्ये अद्याप घंटागाडी सुरू केलेली नाही. छोटा हत्तीद्वारेच घराघरातून कचरा गोळा केला जातो. या वाहनाची दिवसातून एकदाच फेरी होती. ती निघून गेल्यानंतर नागरिक मोकळ्या जागेवर कचरा टाकतात. त्यामुळे ठिकठिकाणी कचरा साचण्याचे प्रमाण वाढले आहे. बीड बायपासवर समृद्धी पार्क समोरील बाजूस, पेट्रोलपंपाशेजारी, साईनाथनगरकडे जाणाऱ्या रस्त्यावर, चावडा कॉम्पलेक्सशेजारी कचऱ्याचे ढीग दिसत आहेत. शिवाय अनेक रिकाम्या जागा व प्लॉटवर कचरा फेकण्यात आला आहे.
शहराप्रमाणे सातारा व देवळाईमध्येही घंटागाडी सुरू करावी, अशी मागणी येथील नागरिक महेश चौधरी यांनी केली आहे. गेल्या २० दिवसांपासून कचरा घेऊन जाणारे वाहन आले नसल्याने मी स्वत:च कचरा जाळला, अशी माहिती स्वप्नील शिरसाट यांनी दिली. या परिसरासाठी कचरा जमा करण्यासाठी दोन वाहने वाढवण्याचा प्रस्ताव यांत्र‌िकी विभागाला दिल्याचे स्वच्छता निरीक्षक एस.आर. खरात यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सांघिकवृत्तीतूनच अवयवदान शक्य

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
'ब्रेन डेड' रुग्णाच्या नातेवाईकांनी अवयवदानाचा धाडसी निर्णय घेऊन अवयवदानाची प्रत्यक्ष परवानगी देणे जितके महत्वाचे आहे, तितकीच प्रत्येक टप्प्यावर प्रत्येक यंत्रणेची सांघिक कामगिरीही महत्वाची आहे. त्यामुळेच 'कॅडेव्हर ट्रान्स्प्लान्ट' होऊ शकले. या सांघिक कामामुळेच तीन जणांना जीवनदान मिळाले. त्यामुळे आता समाजाने हेतुतः अवयवदानाचे पुण्य काम केले पाहिजे, असे आवाहन पहिल्या अवयवदान (कॅडेव्हर ट्रान्स्प्लान्ट) मोहिमेत अग्रेसर राहिलेल्या युनायटेड सिग्मा हॉस्पिटलचे मुख्य वैद्यकीय संचालक डॉ. उन्मेष टाकळकर यांनी केले.
जिल्हा व सत्र न्यायालयातील जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीने शुक्रवारी (१२ फेब्रुवारी) 'देहदान, शंका आणि समाधान' या विषयावरील कार्यक्रमात ते बोलत होते. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश राजीव देशमुख हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. या वेळी जिव्हा वकील संघाचे अध्यक्ष नितेश ललवाणी, प्राधिकरणाचे श्री. दळवी, न्यायाधीश भूषण क्षीरसागर आदींची उपस्थिती होती. डॉ. टाकळकर म्हणाले, हृदय बंद पडून व मेंदू मृतवत (ब्रेन डेड) होऊन कुठल्याही व्यक्तीचा मृत्यू होतो. मेंदू मृतवत होऊन झालेल्या व्यक्तीचे विविध अवयवदान होऊ शकते. त्यासाठी मुळात नातेवाईकांनी अवयवदानाचा निर्णय घेतला पाहिजे. त्याशिवाय अवयवदान होऊ शकत नाही. मात्र चार जणांचा जीव वाचू शकतो, या भावनेतून अवयवदानाचा निर्णय घेऊन पुण्याचे काम केले पाहिजे. हा निर्णय झाल्यानंतरच 'ब्रेन डेथ' कमिटीकडून सहा-सहा तासांनी संबंधित रुग्ण 'ब्रेन डेड' आहे किंवा नाही, हे शास्त्रीयदृष्ट्या तपासले जाते. दुसऱ्या शास्त्रीय तपासणीमध्ये संबंधित रुग्ण 'ब्रेन डेड' असल्याचे सिद्ध झाल्यानंतरच अवयवांची गरज असलेल्या रुग्णांचा शोध शहर, राज्य, देश पातळीवर घेतला जातो. त्यासाठी संबंधित 'ब्रेन डेड' रुग्णाच्या रक्तगटापासून इतर अनेक बाबी महत्वाच्या ठरत्या. तपासण्या काटेकोररित्या पूर्ण झाल्यानंतरच अवयवदानाचा निर्णय घेतला जातो. तशहर, राज्य, देशपातळीवरून अनेक परवानग्या घ्याव्या लागतात व कायदेशीर बाबींची पूर्तता केल्यानंतर अवयवदान यशस्वी करण्यासाठी प्रत्येक यंत्रणेला शर्थ लढवावी लागते. अवयव काढले जाणाऱ्या आणि अवयव पोहोचवले जाणाऱ्या रुग्णालयांमध्ये कमालीची सुसूत्रता असावी लागते, असेही डॉ. टाकळकर यांनी सांगितले. न्यायाधीश वा. टी. मोरे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
कोमाच्या अवस्थेतून रुग्ण बाहेर येऊ शकतो; परंतु कुठलाही व्यक्ती 'ब्रेन डेड' झाल्यानंतर त्या अवस्थेतून बाहेर येऊ शकत नाही. 'ब्रेन डेड' झालेला व्यक्ती नैसर्गिक श्वास घेऊ शकत नाही, बुबळांची हालचाल करू शकत नाही, हातपायांची हालचाल करू शकत नाही. या व इतर बाबींची खात्री करून आणि इतर चाचण्या सहा-सहा तासांनी करूनच संबंधित रुग्ण 'ब्रेन डेड' झाल्याचे 'ब्रेन डेथ कमिटी'कडून जाहीर झाल्यानंतरच पुढील अवयवदानाची प्रक्रिया सुरू होते, असे 'युनायटेड सिग्मा'चे न्युरोसर्जन डॉ. पांडुरंग वट्टमवार यांनी कार्यक्रमात सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहरात होणार ४० वायफाय झोन

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
भारत संचार निगम लिमिटेडने (बीएसएनएल) शहरातील मुख्य २० भागात २जी व ३ जीचे २० टॉवर उभारून कार्यान्वित केले आहेत. याशिवाय पुढील काळात ४० ठिकाणी वायफाय झोन तयार केले जाणार आहेत, अशी माहिती मुख्य व्यवस्थापक अरविंद वडनेरकर यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.
शहरात गेल्या वर्षापासून सुरू करण्यात आलेल्या 'सुलभ इन्कमिंग विथ आऊटगोइंग प्लॅन' ला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. आता लॅण्डलाइन फोन बंद करणाऱ्यांची संख्या कमी झाली असून लॅण्डलाइन फोनला मागणी वाढल्याचा दावा त्यांनी केला. सध्या मोबाइलचा जमाना ४-जी कडे वळू लागला आहे, परंतु आमच्याकडे राष्ट्रीय पातळीवर त्याला लागणारे स्पेक्ट्रम मिळाले नसल्याने अजून ४-जी सेवा सुरू करण्यात आलेली नाही. त्यामुळे २-जी आणि ३-जी सेवा अधिक सक्षम करण्यासाठी शहरातील भावसिंगपुरा, घाटी, सुरेवाडी, एन-८, संजयनगर, चाणक्यपुरी, सातारा गाव, एन-१ गणेश मंदिर, नाथ सिड्स पैठण रोड, सिल्लोड, समर्थनगर, एकनाथनगर, जटवाडा, प्रतापनगर, उल्कानगरी, वाळूज, वाळूज गाव, पैठण, रेणुकामाता मंदिर, खुलताबाद येथे २० टॉवर उभारल्याचे त्यांनी सांगितले. ग्रामीण भागात ३-जी सेवा अधिक सक्षम करण्यासाठी सोयगाव, बिडकीन, देवगाव रंगारी येथे विशेष टॉवर उभारले आहेत. याशिवाय वाकुळा, जरंडी, शिंगी, लासूर, पिसादेवी येथे २-जीचे टॉवर बसवण्यात आले आहेत, असे त्यांनी सांगितले.
पोस्टपेड आणि प्र‌िपेड मोबाइल ग्राहकांच्या सुविधेसाठी शहरात सध्या ३ हजार ५०० रिटेलर्स आहेत. त्यांच्यामार्फत रिचार्ज, बिलिंग सुविधा दिली जाते. ही संख्या आणखी वाढवणार असल्याचे वडनेरकर यांनी सांगितले. महाकृषी प्लॅन (प्र‌िपेड), महाकृषी प्लॅन (पोस्टपेड), स्टुडंट प्लॅन आणि प्रमोशनल कॉम्बो ऑफर या चार प्लॅनला शहरात मोठी मागणी आहे. त्यामुळे औरंगाबाद सर्कलचा नफा वाढला असल्याचे सांगण्यात आले. येत्या काळात बीएसएनएलचे कर्मचारी सिमकार्ड वाटप करणार असून त्यामुळे खासगी कंपन्यांच्या स्पर्धेत टिकून राहू, अशी अपेक्षा वडनेरकर यांनी व्यक्त केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आधी रस्ता की ड्रेनेज?

0
0

म. टा. प्रतिनिधी, खुलताबाद
सांसद आदर्श ग्राम योजनेत दत्तक घेतलेल्या वेरूळ येथे भूमिगत गटार योजनेसाठी खासदार राजकुमार धूत यांनी ४० लाख रुपयांचा निधी दिला. मात्र मिळालेल्या माहितीनुसार जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाने येथे भूमिगत गटार योजनेआधी रस्ते तयार करण्याची तयारी केली आहे.
खासदार धूत यांनी वेरूळ गावाच्या सर्वांगिण विकासासाठी सव्वादोन कोटी रुपयांचा निधी दिला आहे. पण जिल्हा परिषद बांधकाम विभागाकडून होणाऱ्या या कामांचे समन्वय व नियोजनाच्या अभावामुळे योजनेचे तीनतेरा वाजले आहेत. खासदार धूत यांनी ४० लाख रुपयांचा भूमिगत गटार योजनेसाठी दिलेला निधी जिल्हा परिषदेने परस्पर रस्ते बांधण्यासाठी वळवला होता. येथे भूमिगत गटार योजना शक्य नसल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयास कळवून मोकळे झाले होते. परंतु, जिल्हाधिकारी कार्यालयाने दट्ट्या दिल्यानंतर ड्रेनेज लाइनचे अंदाजपत्रक नुकतेच नियोजन विभागाला पाठवले आहे. वेरूळ हे जगप्रसिद्ध पर्यटन व धार्मिक स्थळ आहे. यामुळे येथे सतत देशी व परदेशी पर्यटकांची वर्दळ असते. गावातील अस्वच्छता, दुर्गंधी यावर कायमस्वरुपी उपाय म्हणून खासदार धूत यांनी भूमिगत गटार योजनेसाठी निधी दिला. गावातील सर्व घाण व सांडपाणी भूमिगत पद्धतीने गावाबाहेर काढले तर, गावात स्वच्छता नांदेल, अशी खासदारांची भूमिका आहे.

निधीची कमतरता
संपूर्ण गावात ६६३३ मीटर ड्रेनेजलाइन टाकण्यासाठी २ कोटी ९८ लाख ६९ हजार रुपयांचा खर्च येणार आहे. पण, ४० लाख रुपये किंमतीचे अंदाजपत्रक सादर करण्याच्या सूचना आहेत. त्यामुळे उपविभागाकडून ९०६ मीटर लांबीच्या ड्रेनेजलाइनचे (मॅनहोलसह) ४० लाख ४७ हजार रुपये किंमतीचे अंदाजपत्रक सादर करण्यात आले आहे. निधीच्या मर्यादेमुळे अंदाजपत्रकात सेप्टिक टँक नसल्यामुळे ते उपयोगात येणार नाही. या कामाचे ३९ लाख ४३ हजार रुपये किंमतीचे अंदाजपत्रक जिल्हाधिकारी कार्यालयाला सादर करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे उपअभियंता ओ. के. हेडाऊ यांनी दिली

भूमिगत गटार योजना पूर्ण झाल्यास वेरूळ गाव दुर्गंधीमुक्त होऊन घाणीचा प्रश्न कायमचा निकाली निघणार आहे. आधी रस्त्याचे काम केल्यानंतर भूमिगत गटार योजनेसाठी रस्ता खोदावे लागू एवढीच आमची अपेक्षा आहे.
- साहेबराव पांडव, सरपंच, वेरूळ

भूमिगत गटार योजनेत त्रुटी असल्यास त्रुटीची पूर्तता करून निधीची कमतरता भासत असेल तर, आम्ही मंत्रालयात पाठपुरावा करू. मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन विशेष बाब म्हणून पुन्हा मंजुरीसाठी खासदार स्वतः प्रयत्नशील आहेत
- संजय सुर्वे, खासदारांचे स्वीय सहायक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिवसेना लातूर शहरात मोफत टँकर सुरू करणार

0
0

म. टा. प्रतिनिधी, लातूर
लातूर जिल्ह्यातील पाणी टंचाईचा सामना करण्यासाठी सामाजिक जबाबदारी म्हणून लातूर शहरात दहा टँकरद्वारे मोफत पाणी पुरवठा करणार असल्याचे सांगून टँकरचे आणि जारच्या पाण्याच्या दरासाठी संबंधिताची १६ फेब्रुवारीला बैठक घेण्यात येणार असल्याचे शिवसेनेचे लातूर जिल्हा संपर्क प्रमुख संजय सावंत यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत सांगितले.
यावेळी सहसंपर्क प्रमुख अॅड. बळवंत जाधव, जिल्हा प्रमुख अॅड. नागेश माने, संतोष सोमवंशी, नगरसेवक रवी सुडे, सुनील बसपुरे, सुनीता चाळक आणि अभय साळुंके उपस्थित होते. संजय सावंत म्हणाले, 'लातूरच्या पाणीटंचाईला कोण जबाबदार आहेत. हे वेगळे सांगण्याची गरज नाही. त्यामुळे आमदार अमित देशमुखांनी रस्त्यावर येण्याची भाषा करण्यापेक्षा योग्यवेळी गाडीतून खाली उतरुन नियोजन केले असते तर अशी वेळ आली नसती. सत्तेत भागीदार आहोत म्हणून गप्प बसणार नाहीत, तर सामाजिक जबाबदारी म्हणून मोफत पाणी वाटप करणार आहोत.'
शहरातील टँकर चालक, मालकांकडून लुट होऊ नये, त्यांनी योग्य तो मोबदला घ्यावा, खासगी पाणी विकणाऱ्यांनी सुद्धा परिस्थितीचा फायदा घेण्याचा प्रयत्न करू नये, असे आवाहन करण्यासाठी आणि आमच्या त्यांच्याकडून काय अपेक्षा आहेत. हे सांगण्यासाठी त्यांची बैठक घेणार असल्याचे सावंत यांनी स्पष्ट केले. उजनीच्या पाण्यासाठी शिवसेना ही सकारात्मक असून धनेगावच्या पाण्यासाठी मनोहर जोशी मुख्यमंत्री असतानाच यशस्वी प्रयत्न झाले असल्याची आठवण करून दिली. आज दिवसभरात सावंत यांनी पदाधिकाऱ्यांसह धनेगाव धरणा, डोंगरगाव बॅरेजसला भेटी दिल्या. डोगंरगावच्या ग्रामस्थानी विरोध करू नये असा प्रयत्न केला असल्याचे त्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


दुष्काळ मदत बँक खात्यात

0
0

म. टा. प्रतिनिधी, सिल्लोड
दुष्काळी मदत अनुदान वाटपाच्या पहिल्या टप्प्यातील ५७ गावातील २५ हजार ५१८ लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर १३ कोटी २५ लाख २० हजार सहाशे रुपये जमा करण्यात आले आहेत. लाभार्थी शेतकरी अनुदानाची रक्कम खात्यातून काढून घेत आहेत.
दुष्काळी परिस्थितीमुळे कापूस वगळता इतर पिकांसाठी कोरडवाहू शेती अनुदान कार्यक्रमानुसार ६८ रुपये गुंठा याप्रमाणे प्रति हेक्टरी ६८०० रुपये दोन हेक्टर मर्यादेपर्यंत अनुदान मंजूर करण्यात आले आहे. पात्र लाभार्थींच्या याद्या महसूल प्रशासनाने तलाठ्यांमार्फत तयार केल्या. मदत वाटप करताना मुळाक्षराच्या क्रमानुसार गावांची यादी तयार करण्यात आली आहे. तालुक्यातील आणखी ७१ गावांचे लाभार्थी या अनुदानापासून वंचित आहेत. या गावातील शेतकऱ्यांना पुढील टप्प्यात मदत दिली जाणार आहे. दरम्यान २०१४च्या खरीप हंगामातील पात्र पण, बँक खाते क्रमांक नसलेल्या लाभार्थी शेतकऱ्यांचे ९३ लाख ९९ हजार ७७० रुपये महसुल प्रशासनाला प्राप्त झाले आहेत. तालुक्यात कापसाचे पीक घेतले जाते, मात्र शासनाने यावेळी मदत अनुदानातून कापसाचे पीक वगळले आहे. त्यामुळे सरकारवर कापूस उत्पादक शेतकरी नाराज आहेत. ज्या कापूस उत्पादकांना आतापर्यंत कोणतीही मदत मिळाली नाही, त्यांना मदत दिली जाईल, असे महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी नुकतेच जाहीर केले आहे. त्यामुळे या घोषणेच्या अंमलबजावणीकडे तालुक्याातील शेतकऱ्यांचे डोळे लागले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पैठणमध्ये रेड्याला मंत्रघोषात अभिषेक

0
0

म. टा. प्रतिनिधी, पैठण
स्वतः व आपल्या भावंडाना पैठण येथील धर्मापीठातून शुद्धीपत्रक मिळावे यासाठी संत ज्ञानेश्वर महाराजांनी पैठण येथील नागघाटावर रेड्यामुखी वेद बोलविले होते. त्याला १२ फेब्रुवारीला म्हणजेच माघ वसंत पौर्णिमेच्या पूर्वसंध्येला ७२९ वर्ष पूर्ण झाले. यानिमित्ताने पैठण येथील नाथ नागघाट परिसरात धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. नागघाट परिसरातील रेड्याच्या दगडी मूर्तीचा सुयश शिवपुरी यांच्या मंत्रघोषात व संस्कृती महिला मंडळ यांच्या हस्ते महाभिषेक करण्यात आला. यावेळी शहरातील गीता मंदिरातील वारकरी शिक्षण संस्थेतील विद्यार्थ्यांनी भजने व भावगीत गायन करून वातावरण पूर्णपणे भक्तिमय बनवले होते. याप्रसंगी जगन्नाथ जमादार, मुरली साबळे, अनिल सराफ, दिनेश पारीख, मिलिंद नाइक, रमेश खांडेकर, सुनील गोसावी, ऋषिकेश भगत, स्वप्नील देवरे, रामसिंग कापसे, ईश्वर म्हस्के, गोविंद शिंदे, कुमार कुलकर्णी, संतोष छादीदार यांनी परिश्रम घेतले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हिंमत असेल तर, कर्जमाफी करा

0
0

म. टा. प्रतिनिधी, पैठण
'विरोधी पक्षात असताना शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्द्यावरून 'देता का जाता' म्हणून राज्यभर आंदोलन करणारी शिवसेना आता सत्तेत असताना या मुद्यावर गप्प का,' असा सवाल विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी उपस्थित केला. शिवसेनेत हिंमत असेल तर, त्यांनी राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी करून दाखवावी, असे आव्हान दिले.
पैठण तालुक्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न, नगर पालिका व विकास प्राधिकरणाच्या कामातील गैरव्यवहाराती चौकशी व आपेगाव व हिरडपुरी बंधाऱ्यात पाणी सोडण्याच्या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने शुक्रवारी धिक्कार मोर्चा काढला. यावेळी ते बोलत होते. माजी मंत्री राजेश टोपे, जिल्हाध्यक्ष आमदार भाऊसाहेब चिकटगावकर, माजी आमदार संजय वाघचौरे यांच्यासह जिल्ह्यातील नेते व कार्यकर्ते मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी झाले होते.
'फडणवीस सरकार मधील पाच मंत्र्यांनी केलेल्या भ्रष्टाचाराचे पुरावे आम्ही विधिमंडळात सादर केले आहे. त्यांच्यावर कारवाई करण्याऐवजी सरकार सुडबुद्धीने आमच्या नेत्यांना फसवण्याचा प्रयत्न करत आहे,' अशी टीका त्यांनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अंबाडी प्रकल्पातील पाणी मृतसाठ्यात

0
0

म. टा. प्रतिनिधी, कन्नड
पाणीटंचाईची दाहकता जाणवत असून तालुक्यातील बहुतांश छोट्या प्रकल्पांनी तळ गाठले आहेत. प्रमुख प्रकल्पातील पाणी वाऱ्यामुळे कमी होत आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या अंबाडी प्रकल्पातील पाणी मृतसाठ्यात पोहोचले आहे. शहरात आठवड्यातून दोन दिवस पाणी दिले जात आहे.
अंबाडी प्रकल्पाच्या पाणलोटक्षेत्रात यावर्षी कमी पाऊस झाल्याने झाला आहे. अंबाडी प्रकल्पात पाणी नसल्याने शहरातील चार प्रभागामधील रहिवाशांना आठवड्यातून दोन दिवस पाणी दिले जात आहे. संभाव्य टंचाई लक्षात घेऊन नगरपालिकेने नियोजन केले आहे. तूर्त उपलब्ध साठ्यातून ऑगस्टपर्यंतच्या पिण्याच्या पाण्याचे नियोजन केल्याची माहिती मुख्यधिकारी संतोष आगळे यांनी दिली.
तालुक्यातील प्रमुख प्रकल्पातील पाणीसाठी पुढीलप्रमाणेः शिवना-टाकळी ७.१ टक्के (२.५ दलघमी), पिशोर व तालुक्यातील मोठ्या गावांना टँकरने पाणी पुरवणाऱ्या अंजना-पळशी ३९ टक्के (५.३५ दलघमी), चिंचोली परिसरातील गावे व सिल्लोड तालुक्यातील गावांना पाणीपुरवठा करणारा पूर्णा-नेवपूर ४१ टक्के (३.७४ दलघमी). पाणीसाठा कमी होत असल्याने तालुक्यातील सर्व लहान-मोठे तलाव, लघु प्रकल्प, मध्यम प्रकल्पातील पाणी पिण्यासाठी राखीव ठेवण्यात आले आहे. सध्या तालुक्यातील आठ गावांना सहा टँकरद्व्रारे पाणीपुरवठा करण्यात येत असून ३२ विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

टँकरमधून येते गोदावरी

0
0

चंदन लक्कडहार, पैठण
दक्षिण गंगा अशी ओळख असलेली गोदावरी नदी पैठण तालुक्यातून वाहते. त्यामुळे पैठण तालुक्यात पाण्याचा सुकाळ असावा, असे वाटते. परंतु, दोन वर्षांपासून पावसाने पाठ फिरवल्याने या सुपिक तालुक्यालाही दुष्काळाला तोंड द्यावे लागत आहे. नदीकाठापासून दूर असलेल्या गावात पाणीटंचाई तीव्र असणे समजू शकता येईल मात्र, यावेळी नदीकाठच्या गावांमध्येही पिण्यासाठी पाणी मिळत नाही. याला गोदाकाठावरील मायगाव सुद्धा अपवाद नाही.
पैठण-शहागड रस्त्यावर आपेगावपासून साधारणतः दोन किलोमीटर अंतरावर आपेगाव आहे. पैठणपासून अवघ्या १०-११ किलोमीटर अंतरावरील हे गोदावरी नदीकाठचे गाव यावर्षी दुष्काळाच्या गर्तेत सापडले आहे. यापूर्वी पाऊस कमी पडला तरी गोदावरी नदीकाठच्या गावात पाणीटंचाई भासली नाही. पण यंदा पहिल्यांदाच मायगावच्या ग्रामस्थांना पाणीटंचाईचा सामना करावा लागला. आपेगाव व हिरडपुरी बंधाऱ्यात पाणी नसल्याने एक महिन्यापासून टंचाई तीव्र झाली आहे. मायगाव हे साधारणतः १५०० लोकवस्तीचे छोटसे गाव आहे. नदी असल्याने ऊसाची शेती व गोदावरीतील वाळू ठेक्यावर मजुरी हा येथील नागरिकांचा व्यवसाय. पण नदीच कोरडी पडल्याने दोन्ही व्यवसायावर गदा आली. पाणी नसल्याने अनेक शेतकऱ्यांनी ऊस काढून टाकला. आता तोडल्या उसाचे वाढे जनावरांना खावू घातले जात आहेत. त्यामुळे चाऱ्याचा प्रश्न सध्यातरी सतावत नाही. पण एक महिन्यानंतर चाऱ्याचा प्रश्न तीव्र होईल, असे अशोक गिर्गे यांनी सांगितले. उसाला जास्त पाणी लागते, शिवाय बंधारा कोरडा पडल्याने पाणी कोठून देणार, यातून तो तोडणेच हाच उपाय शेतकऱ्यांनी स्वीकारला. येथे ऊस, कापूस व गहू ही पिके शेतकरी घेतात. ऊस तोडला, कापूस उगवला नाही व गहू पेरलाच नाही, अशी स्थिती आहे. ज्यांनी हिंमत करून गहू पेरला त्यांना मोठे नुकसान सहन करावे लागत आहे, असे कानिफनाथ दसपुते यांनी सांगितले.
पैठण तालुक्यातील सुमारे १०० गावांना दोन वर्षांपासून टँकरने पाणी पुरवले जात आहे. मात्र, त्याला मायगाव अपवाद होते. यावर्षी येथेही टँकर सुरू करण्यात आला आहे. गावात नदीशिवाय पिण्याच्या पाण्याचा दुसरा स्त्रोत नाही. दोन हापसे आहेत, पण त्याला खारे पाणी असल्याने ते पित नाहीत. हे पाणी जनावरांना पाजले जाते. या दोन हापशांमुळे जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सध्यातरी नाही. पण हे हापसे आटले तर माणसांबरोबर जनावरांनाही पिण्याचे पाणी मिळणार नाही.
बंधाऱ्यात पाणी नसल्याने मायगावच्या नागरिकांनी एक महिन्यापासून टँकरने पाणी पुरवले जात आहे. पैठण येथे टँकर भरून दिवसातून एक टँकर गावात येतो. गावच्या अंगणात खळाळत वाहणारी गोदावरी आता टँकरमधून येत असल्याची दुखरी भावना गावकऱ्यांच्या बोलण्यात जाणवते. टँकर येताच गावचे सर्वजण धावतात. शहरांप्रमाणेच प्रत्येक घरासमोर प्लास्टिकचे ड्रम आले आहे. बरे टँकर येण्याची वेळ निश्चित नाही. त्यामुळे पाणी मिळवण्यासाठी कोणाला तरी घरी थांबावेच लागते. तसेही शेतात काम नसल्याने गावच्या पारावर गप्पा मारत बसण्याशिवाय दुसरे काम नाही. त्यामुळे टँकर येतात पाइप घेऊन महिला, लहान मुले व पुरूष धावतात. टँकरमध्ये पाइप सोडून ड्रममध्ये गंगा साठवण्यासाठी सगळ्यांची एकच झुंबड उडते.

तरुणांचे स्थलांतर
शेती किंवा वाळूपट्ट्यावर मजुरी हे दोनच रोजगाराचे मार्ग गावात आहेत. परंतु, येथील वाळू संपल्यामुळे आता ठेका सुरू नाही. परिणामी रोजगार नाही. शेतीतही काहीच काम नाही. रोजगार हमीची कामे सुरू नाहीत. यामुळे गावातील लोक वेळ घालवण्यासाठी पैठणमध्ये दिवसभर भटकतात. युवराज गायकवाड, राजेंद्र गायकवाड व इतर तरुणांनी कामाच्या शोधात गाव सोडला आहे. आणखी काही तरूण गाव सोडून जाणार असल्याचे किशोर दसपुते या तरुणाने सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images