Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

२९५ दिवसांत विकासकामेच नाहीत

$
0
0

Unmesh.Deshpande@timesgroup.com
औरंगाबाद ः औरंगाबाद महापालिकेची निवडणूक होऊन २९५ दिवस उलटले; मात्र, वॉर्डांमध्ये कामांसाठी निधीच मिळत नसल्यामुळे नगरसेवक त्रस्त झाले आहेत. वॉर्डांमध्ये देखभाल-दुरुस्तीचीही कामे केली जात नसल्याची खंत नगरसेवक व्यक्त करीत आहेत. नागरिकांच्या प्रश्नांना तोंड देताना प्रथमच निवडून आलेल्या नगरसेवकांची अवस्था बिकट झाली आहे.

महापालिकेच्या निवडणुकीचा निकाल २३ एप्रिल २०१५ रोजी जाहीर झाला. त्यानंतर आतापर्यंत, तब्बल २९५ दिवसांत नगरसेवकांना कामांसाठी निधीच मिळालेला नाही. निवडणुकीमुळे पालिके प्रशासनाने चार महिन्यांचे लेखानुदान मंजूर करून घेतले होते. प्रशासकीय खर्चासह अत्यावश्यक खर्चासाठीची त्यात तरतूद केली होती. स्थायी समिती स्थापन झाल्यामुळे पालिकेचे नियमित बजेट लगेचच सादर होईल आणि विकासाच्या कामांना सुरुवात होईल, अशी अाशा नगरसेवकांना होती, पण स्थायी समितीचा अर्थसंकल्प लांबत गेला. पालिकेच्या प्रशासनाने ७ ऑगस्ट २०१५ रोजी स्थायी समितीला अर्थसंकल्प सादर केला. त्यानंतर दोन महिन्यांनी स्थायी समितीने सर्वसाधारण सभेला अर्थसंकल्प सादर केला. तो अंतिम करण्याचे अधिकार सर्व नगरसेवकांनी महापौरांना दिले. अर्थसंकल्प अंतिम करण्याचे काम सध्या महापौरांकडून सुरू आहे.

अर्थसंकल्पच तयार नाही. त्यामुळे कामे कशी करणार, असा प्रश्न उपस्थित करून अधिकाऱ्यांनी वॉर्डांतील कामांकडे पाठ फिरवली आहे. वॉर्डात कामेच होत नसल्याची तक्रार करीत नगरसेवकांनी स्थायी समितीच्या बैठकीत व सर्वसाधारण सभेत आवाज उठवला. त्याचा परिणाम म्हणून आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी बैठक घेऊन वसुलीच्या प्रमाणात विकास कामे करण्याची भूमिका घेतली. प्रत्येक नगरसेवकाने १५ लाखांची कामे प्रस्तावित करावीत. पहिल्या टप्प्यात ही कामे करण्यात येतील, असे त्यांनी स्पष्ट केले, मात्र अद्याप ही कामे देखील सुरू झाली नाहीत, अशा तक्रारी आहेत.

वॉर्डात रस्ते तर सोडाच, पण ड्रेनेज, पाणीपुरवठ्याशी संबंधित देखभाल दुरुस्तीची कामेही वॉर्डात झाली नाहीत. अत्यावश्यक कामे झालीच पाहिजेत, पण तिही होत नाहीत. धोरणात्मक निर्णयाच्या नावाखाली कामांमध्ये आडकाठी घातली जाते. नव्याने निवडून आलेल्या नगरसेवकांची कोंडी होत आहे.
- नितीन चित्ते, नगरसेवक, भाजप

वॉर्डात विकासकामे करण्याची आश्वासने देऊन निवडून आलो, पण दहा महिन्यांत एकही काम झाले नाही. कामांबद्दल नागरिक प्रश्न विचारतात. त्यांना उत्तरे देताना नाकीनऊ येतात. बजेट नाही, हे ऐकून कंटाळा आला आहे. गरज लक्षात घेऊन छोटी-मोठी कामे झालीच पाहिजेत.
- संगिता वाघुले, नगरसेवक, एमआयएम

जशी वसुली, तशी विकास कामे, असे धोरण आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत ठरले. आता नगरसेवकांच्या वॉर्डात १५ लाखांची कामे होत आहेत. दुसऱ्या टप्प्यात दहा लाखांची कामे होणार आहेत. कामे करून घेणे हे नगरसेवकावर अवलंबून असते.
- रेणुकादास वैद्य, गटनेते, शिवसेना

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


आता पोलिस करणार रात्रीही हेल्मेट तपासणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
हेल्मेट तपासणीची मोहीम रात्रीही राबविण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला आहे, अशी माहिती पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली. अनेक वाहनधारक रात्री हेल्मेट वापरत नसल्याचे निदर्शनास आल्यामुळे हा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले.

हेल्मेटसक्ती राबविल्यानंतर शहरात सुमारे ८० टक्के वाहनधारक हेल्मेट वापरत आहेत. काही शहरांमध्ये हेल्मेटला विरोध केला जात आहे, त्याचे लोण औरंगाबाद शहरात पसरू नये म्हणून पोलिसांकडून कारवाई सुरूच ठेवण्यात येणार आहे. येत्या सोमवारपासून महिला आणि ज्येष्ठ नागरिकांनाही हेल्मेटसक्ती करण्यात येणार आहे, अशीही माहिती अमीतेश कुमार यांनी दिली. संध्याकाळी, रात्री अनेक भागात वाहनधारक हेल्मेट वापरत नाहीत. त्यांच्यावर कारवाईसाठी विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे, असे ते म्हणाले.

मागच्या व्यक्तीला तूर्त सक्ती नाही
शहरात हेल्मेटसक्ती राबविण्यात आली आहे. शासनाने काढलेल्या परिपत्रकात दुचाकी वाहनांवर मागे बसलेल्या व्यक्तीलाही हेल्मेटसक्ती करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. ही हेल्मेटसक्ती केली जाणार का, असे विचारले असता आयुक्त म्हणाले, मागे बसलेल्या व्यक्तीला हेल्मेटची सक्ती करण्याचा सध्या कोणताही निर्णय घेण्यात आला नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कार्यकारी अभियंत्यांसह ५ जणांवर गुन्हा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, सिल्लोड
बुलढाणा-अजिंठा रस्त्याच्या कामातील गैरव्यवहारप्रकरणी लोकायुक्तांच्या आदेशानुसार कंत्राटदारासह सार्वजनिक बांधकाम विभागाचे चार अधिकाऱ्यांवर अजिंठा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. दोन प्रकरणात शासनाची ५९ लाख १५ हजार ४०४ रुपयांची फसवणूक झाली आहे.

लोकायुक्तांच्या आदेशावरून अजिंठा येथील रेणुका कन्स्ट्रक्शन, शाखा अभियंता बी. बी. नेवारे, उपअभियंता जी. बी. पोहेकर, विभागीय लेखाधिकारी एच. डी. लांजेवार, कार्यकारी अभियंता एम. बी. मोरे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. ही तक्रार प्रभारी उपविभागीय अभियंता पांडुरंग नामदेव मोगल यांनी दिली. या रस्त्याच्या कामाबद्दल पी. बी. कोठारी यांनी लोकायुक्तांकडे तक्रार केली होती. या तक्रारीच्या अनुषंगाने अधीक्षक अभियंता दक्षता व गुणनियंत्रण मंडळ औरंगाबाद यांनी चौकशी केली. उपअभियंत्यांनी मोजमाप पुस्तिकेतील मापे मान्य करून कार्यवाहीसाठी कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग, औरंगाबाद यांच्याकडे सादर केली. या रस्त्याच्या कामाची पाहणी न करतात देयक अदा करण्यात आले. ओव्हरसाइज खडीद्वारे केलेले काम मान्य केल्याने रस्त्याचे नुकसान झाल्याचे तक्रारीत म्हटले आहे. यात २२ लाख ८२ हजार ४०४ रुपयाचे नुकसान झाले. रेणुका कन्सट्रक्शनने बनावट गेटपास तयार करून ३६ लाख ३३ हजार रुपयांची फसवणूक केल्याचे स्पष्ट झाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

...तर माजी सैनिकांनी देश सोडावा का?

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
दूध भुकटी, दूध प्रक्रिया प्रकल्प सुरू करण्यासाठी माजी सैनिक गेल्या अडीच वर्षांपासून सरकारचे उंबरठे झिजवित आहेत. त्यांच्या प्रयत्नांना सरकारने दाद दिली नाही. त्यामुळे माजी सैनिकांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे. आम्ही आता देश सोडून जावे का, पाकिस्तान सैन्यात सामील व्हावे का, दहशतवादी व्हावे का, असे प्रश्न त्यांनी सरकारला विचारले आहेत.

माजी सैनिक, वीरमाता, ‌वीरपत्नी व त्यांच्या कुटुंबीयांना रोजगार मिळावा म्हणून 'जयजवान जय किसान डेअरी प्रोडक्ट को-ऑप सोसायटी'च्या माध्यमातून दूध प्रक्रिया प्रकल्प सुरू करण्याचे नियोजन आहे, परंतु या प्रकल्पाकडे सरकारने दुर्लक्ष केले आहे. राज्य सरकारने या प्रकल्पाची केंद्र सरकारकडे शिफारसच केली नाही. त्यामुळे केंद्राने प्रकल्पाला परवानगी दिली नाही.

यासंदर्भात सोसायटीने हायकोर्टात धाव घेतली. हायकोर्टाने केंद्र-राज्य शासनाला ६ महिन्यांत मंजुरी द्यावी, असे आदेश दिले. त्याकडेही सरकारने दुर्लक्ष केले. वारंवार पाठपुरावा घेऊनही काहीच हाती न लागल्या मुळे आता माजी सैनिकांना हा देश सोडूनच जावे का, असा सवाल या सोसायटीचे चेअरमन राम नागरगोजे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी शुक्रवारी येथे पत्रकार परिषदेत केला.

या नियोजित प्रकल्पातून सुमारे ४ हजार बेरोजगार माजी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबीयांना रोजगार मिळणार आहे, असा दावा नागरगोजे यांनी केला. प्रकल्पाला मंजुरी द्यावी म्हणून पंतप्रधान आणि राष्ट्रपतींकडेही पाठपुरावा करण्यात आला. माजी सैनिकांच्या या प्रकल्पाला मंजुरी देण्याचे पत्रही त्यांनी पाठविले, परंतु आयएएस ऑफिसर या प्रकल्पाला मंजुरी देत नाहीत. प्रकल्पाला लागणारे बॉयलर, यंत्रसामग्री, चिल‌िंग प्लँट, कोल्ड स्टोरेज, जनरेटर ऑपरेटर, स्टोअर्स, लागणारे मनुष्यबळ,जनावरांना सांभाळणारे डॉक्टर अशी सर्व यंत्रणा आमच्याकडे आहे. शासनाचा एक रुपयाही खर्च न करता हा उभारण्यात येत असेल तर, सचिव, डेअरी कमिशनर यांना काय अडचण आहे, असा प्रश्न नागरगोजे यांनी उपस्थित केला. शासनाकडे पैसा नाही. पैसा आल्यावर तुमच्या प्रकल्पाबाबत विचार करू, असे पत्र महानंदाच्या संचालकांकडून आम्हाला देण्यात आले. देशासाठी सर्वस्व अर्पण करणाऱ्या सैनिकांसाठी शासनाकडे पैसा नाही, हे अत्यंत खेदजनक आहे. नद्या स्वच्छता अभियान, नाट्यगृह, क्र‌िकेट, रंगमंदिर बांधण्यासाठी शासन मदत करते पण माजी सैनिकांच्या या प्रकल्पाला परवानगी नाकारली जाते, असे ते म्हणाले.

नागरगोजेंचे सवाल
मेक इन इंडियासारखे प्रकल्प आणून एकीकडे उद्यागाला चालना देताना आमच्या प्रकल्पाला परवानगी का नाही, अफगाणिस्तान व नेपाळला मदत करण्यास शासनाकडे पैसा आहे, मग आमच्यासाठी का नाही, माजी सैनिक नेहमीच एटीएमवर किंवा सोसायटीत रखवालदार म्हणून राहतात, पण प्रकल्पा थाटू इच्छित असतील तर त्यांना परवानगी का नाही, तुटपुंज्या पेन्शनवर त्यांचे घर कसे चालणार, असे सवालही कॅप्टन नागरगोजे यांनी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फूड कॉर्नर : स्वादिष्ट भल्ला, गुजिया

$
0
0

Abdulwajed.Shaikh@timesgroup.com
उत्तर भारतात प्रसिद्ध असलेले भल्ला, गुजिया हे पदार्थ औरंगाबादेत १५ वर्षांपूर्वी उपलब्ध झाले. गुलमंडी भागात तोतला बंधुंनी सुरू केलेल्या भल्ला चाट सेंटरची ओळखच या दोन पदार्थांमुळे आहे. चाट सेंटरमध्ये तयार केल्या जाणाऱ्या खाद्यपदार्थामध्ये लसूण, चिंच आणि गूळ या पदार्थांचा वापर केला जात नाही. लसूण, चिंच, गूळ यांच्याशिवाय तयार होणारे चविष्ट पदार्थ औरंगाबादकरांच्या पसंतीला उतरले आहेत.

भल्ला चाट सेंटर हे औरंगाबाद शहरातील एकमेव आहे. यापूर्वी अनेकांनी औरंगाबादेत भल्ला सेंटर सुरू केले होते, मात्र गुलमंडीच्या भल्ला सेंटरप्रमाणे स्वाद नसल्याने ते खवय्यांच्या पसंतीस उतरले नाहीत. गुलमंडीच्या भल्ला सेंटरमध्ये खाद्यपदार्थ तयार करण्याचे काम पहाटे चारपासून सुरू होते. भल्ला तयार करण्यासाठी विशेष आचारी नेमण्यात आलेले आहेत. ते सुरुवातीला बटाटे, साबुदाणा पावडर मिक्स करतात. त्याच्या जाड पुऱ्या लाटल्या जातात. त्यात काजू कणी, उडीद मसाला यांचे सारण भरले जाते. ही प्रक्रिया कचोरी तयार करण्यासारखी आहे, पण कचोरी लाटली जाते आणि भल्ला लाटला जात नाही. सारण भरून छोट्या आकाराचे गोल वडे तयार केले जातात. त्यानंतर हा भल्ला शुद्ध तुपात तळला जाते. यानंतर भल्लासाठी विशेष खटाई तयार केली जाते. त्यासाठी सुकविलेली कैरी वापरली जाते. सुकविलेली कैरी उकडली जाते. त्यानंतर मिक्सरमध्ये वाटून तिची पेस्ट तयार केली जाते. त्यात विशिष्ट मसाले मिसळले जातात. त्यात काबुली चणे, टरबूज बी, डाळिंबाच्या दाण्यांची पेस्ट, द्राक्षाच्या रस आदी टाकले जाते. पुनिदा चटणी, लिंबासह भल्ला सर्व्ह केला जातो. त्यावर कोथिंबीर टाकून सजविले जाते. अंबट आणि तिखट स्वाद असलेला भल्ला खवय्यांच्या पसंतीला उतरला आहे. त्याचबरोबर काबुली चण्यांमुळेही भल्ला आणखी स्वादिष्ट झाला आहे.

भल्ला सेंटरमधील गुजिया हाही एक प्रसिद्ध पदार्थ. गुजिया ही उडीद डाळीपासून तयार केली जाते. उडीत डाळ आणि अन्य मसाल्यांना मिक्स करून गोळे तयार केले जातात. हे गोळे शुद्ध तुपात तळले जातात. त्यावर दही, हिवरी चटणी, कैरीचा पेस्ट, कोंथबीर, चाट मसाला टाकून गुजिया सर्व्ह केले जाते. दही, हिरवी मिर्ची गुजियाला अंबट, तिखट स्वाद प्राप्त होतो.

भल्ला सेंटरवरील पाणीपुरीलाही मागणी आहे. त्यासाठी बाटलीबंद पाणी वापरले जाते. त्यात पांढरे मीठ, काळे मीठ, शेंधव, जलजिरा आदी टाकले जाते. याशिवाय पाण्यात हिरव्या मिर्ची आणि अन्य मसाले टाकून तिखट पाणी तयार करण्यात येते.

याशिवाय पुरी तयार करण्यासाठी खास रवा तयार करण्यात येतो. यामुळे ही पाणीपुरीची चवही अन्य पाणी पुऱ्यांपेक्षा वेळी लागत असते. भल्ला सेंटरमध्ये भल्लासह गुजिया,

शेवपुरी, दहीपुरी, कुरकुरी आदी पदार्थ प्रसिद्ध आहेत. याशिवाय गाजर का हलवा आणि रबडी खवय्यांच्या पसंतीस

उतरली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पालिकेचा जबर तिकीट बार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
महापालिकेच्या उत्पन्न वाढीचे कारण पुढे करून सिद्धार्थ उद्यान आणि प्राणिसंग्रहालयाच्या प्रवेश शुल्कात जबर वाढ करण्याचा प्रस्ताव महापालिका प्रशासनाने स्थायी समितीच्या बैठकीसमोर ठेवला आहे. हा प्रस्ताव मंजूर झाला, तर उद्यानाच्या प्रवेशासाठी ३० रुपये तर प्राणिसंग्रहालयाच्या प्रवेशासाठी १०० रुपये मोजावे लागणार आहेत.

महापालिकेच्या स्थायी समितीची बैठक मंगळवारी होणार आहे. या बैठकीच्या समोर प्रशासनाने उद्यान आणि प्राणिसंग्रहालयाच्या प्रवेश शुल्कात वाढ करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. प्रस्तावात प्रशासनाने म्हटले आहे की, सिध्दार्थ उद्यान व प्राणिसंग्रहालयाच्या प्रवेश शुल्कात २०११- १२ मध्ये वाढ करण्यात आली होती. प्राणिसंग्रहालयाचा अद्ययावत विकास आराखडा केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाकडून मंजूर करण्यात आला आहे. मंजूर आराखड्यानुसार त्याची अंमलबजावणी करणे गरजेचे आहे. या आराखड्यामध्ये प्राणिसंग्रहालयातील जीर्ण झालेल्या पिंजऱ्यांची दुरुस्ती, प्राण्यांचे नवीन पिंजरे तयार करणे, पशूवैद्यकीय सुविधांमध्ये वाढ करणे, तज्ज्ञ कर्मचाऱ्यांची भरती करणे आदी बाबींचा समावेश करण्यात आला आहे. सध्या प्राणिसंग्रहालयावर सरासरी १ कोटी रुपये वार्षिक खर्च केला जातो. कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी दर महिन्याला ८ लाख १८ हजार रुपये खर्च केले जातात. त्यामुळे महापालिकेच्या आर्थिक उत्पन्नात वाढ करण्यासाठी सिद्धार्थ उद्यान, प्राणिसंग्रहालय, मत्सालय, मिनीट्रेनच्या प्रवेश शुल्कात वाढ करणे गरजेचे आहे. त्यानुसार सिध्दार्थ उद्यानाचे प्रवेश शुल्क प्रौढांसाठी १० रुपयांवरून ३० रुपये, लहान मुलांसाठी ५ रुपयांवरून १५ रुपये, प्राणिसंग्रहालयाचे प्रवेश शुल्क प्रौढांसाठी १० रुपयांवरून १०० रुपये, लहान मुलांसाठी ५ रुपयांवरून ५० रुपये, मत्सालयाचे प्रवेशशुल्क प्रौढांसाठी ५ रुपयांवरून १५ रुपये, लहान मुलांसाठी २ रुपयांवरून १० रुपये, मिनीट्रेनचे शुल्क १० रुपयांवरून २० रुपये करण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. स्थायी समितीने या दरवाढीला मान्यता द्यावी, असे प्रस्तावात नमूद करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गोडबोले, गोजमगुंडे यांना ‘मसाप’चे पुरस्कार

$
0
0

औरंगाबाद : मराठवाडा साहित्य परिषदेचा 'यशवंतराव चव्हाण विशेष वाड्मय पुरस्कार' निवृत्त गृहसचिव माधवराव गोडबोले यांना व 'नटवर्य लोटू पाटील पुरस्कार' अभिनेते श्रीराम गोजमगुंडे यांना जाहीर झाला आहे. येत्या १२ मार्च रोजी यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात ज्येष्ठ समीक्षक डॉ. विलास खोले यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत.

मराठवाडा साहित्य परिषदेच्या महत्त्वाच्या दोन पुरस्कारांची शुक्रवारी घोषणा करण्यात आली. 'जवाहरलाल नेहरूंचे नेतृत्व - एक सिंहावलोकन' या ग्रंथासाठी माधवराव गोडबोले यांना 'यशवंतराव चव्हाण विशेष वाड्मय पुरस्कार' दिला जाणार आहे. इंग्रजी व मराठी भाषेत गोडबोले यांनी १९ पुस्तके लिहिली आहेत. या ग्रंथांना महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या पुस्कारासह ५ पुरस्कार मिळाले आहेत. तसेच चारशेपेक्षा अधिक लेख लिहिले आहेत. लातूर येथील सधन शेतकरी कुटुंबात जन्मलेले श्रीराम गोजमगुंडे यांनी रंगभूमी व चित्रपटसृष्टीत विशेष योगदान दिले. या योगदानासाठी 'नटवर्य लोटू पाटील पुरस्कार' दिला जाणार आहे. मराठवाड्यातील हौशी रंगभूमीला राज्य पातळीवर प्रतिष्ठा मिळवून देण्याचे काम त्यांनी केले. राज्य नाट्य स्पर्धेत मराठवाड्यातील नाटकांना पारितोषिक मिळवून देण्याचा मान गोजमगुंडे यांना जातो. 'वेड्याचं घर उन्हात', 'आमचं नाव बाबूराव', 'अक्षांश रेखांश', 'मीही आहे एक जटायू', 'कथा कुणाची व्यथा कुणाला', 'लग्नाची बेडी', 'पुन्हा मोहंजेदारो' अशा अनेक नाटकात त्यांनी भूमिका केल्या. 'छत्रपती शिवाजी', 'निखारे', 'झटपट करू दे खटपट', 'आपलेच दात आपलेच ओठ' या चित्रपटात प्रमुख भूमिका केल्या आहेत. ११ हजार रुपये रोख व सन्मानचिन्ह, असे दोन्ही पुरस्कारांचे स्वरूप आहे. या पुरस्कारांची घोषणा मसापचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी केली. यावेळी प्रा. किरण सगर, डॉ. दादा गोरे, डॉ. भास्कर बडे आणि डॉ. रामचंद्र काळुंखे उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाचकांच्या गर्दीत ग्रंथोत्सवाचा समारोप

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
वाचनसंस्कृतीवरील व्याख्यान, ग्रंथवाचकांचा गौरव आणि ग्रंथ प्रदर्शनाला झालेल्या गर्दीत औरंगाबाद ग्रंथोत्सवाचा शुक्रवारी समारोप झाला. तीन दिवस साहित्य रसिकांनी ग्रंथोत्सवाला भेट देऊन साहित्य उपक्रमांना प्रतिसाद दिला. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा चांगला प्रतिसाद मिळाल्याचे ग्रंथ विक्रेत्यांनी सांगितले.

मराठी भाषा विभाग, राज्य साहित्य-संस्कृती मंडळ, ग्रंथालय संचालनालय, जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय आणि जिल्हा ग्रंथालय संघाच्या वतीने तीन दिवसांचा औरंगाबाद ग्रंथोत्सव आयोजित करण्यात आला होता. समारोप कार्यक्रमाला कवी प्रा. डॉ. विष्णू सुरासे, सहाय्यक ग्रंथालय संचालक अ. मा. गाडेकर, ग्रंथपाल, स. बा. हजारे, जिल्हा ग्रंथालय संघाचे कार्यवाहक गुलाब मगर, निवृत्त सहाय्यक ग्रंथालय संचालक सु. बा. जैन, ल. दि. कुमठेकर यांची प्रमुख उपस्थिती होती. 'वाचनसंस्कृती कायम टिकवण्यासाठी ग्रंथोत्सवांना पाठबळ देण्याची गरज आहे. वाचकांना कसदार साहित्याची ओळख करून दिल्यास वाचनसंस्कृती अधिक वृद्धींगत होईल' असे प्रतिपादन प्रा. डॉ. विष्णू सुरासे यांनी केले.

'नवीन पिढी चोखंदळ असून दर्जेदार ग्रंथ वाचनाकडे त्यांचा कल आहे. जुने आणि नवे लेखन यांचा मेळ घातल्यास वाचनसंस्कृतीला अधिक प्रतिसाद मिळेल,' असे सुरासे म्हणाले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते ग्रंथवाचक गौरव प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. मराठवाड्यातील वेगवेगळ्या भागातील वाचक व ग्रंथालय पदाधिकारी यांचा सन्मान करण्यात आला.

दरम्यान, ग्रंथोत्सवातील ग्रंथ प्रदर्शनाला वाचकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. यंदा पुस्तकांची दालने दर्शनी भागात होती. 'पुस्तक खरेदी कमी असली तरी ग्रंथ पाहण्यासाठी गर्दी झाली,' असे पुस्तक विक्रेते प्रवीण जाधव यांनी सांगितले. 'तीन दिवसांच्या तुलनेत समाधानकारक ग्रंथ विक्री झाली. ग्रंथोत्सवाचा प्रचार करून अधिकाधिक वाचकांना आणण्याची गरज होती,' असे जाधव यांनी सांगितले. धार्मिक, ललित, कृषी, क्रीडा, आरोग्य, दिवाळी अंक, शासकीय प्रकाशने या विषयावरील पुस्तकांना चांगली मागणी होती.

साहित्य उपक्रमांना प्रतिसाद
औरंगाबाद ग्रंथोत्सवानिमित्त दररोज विविध साहित्य उपक्रम घेण्यात आले. परिसंवादाला कमी प्रतिसाद होता. मात्र, कविसंमेलन व ग्रंथ प्रदर्शनाला चांगली गर्दी झाली. या महोत्सवाला शहरातील मान्यवर साहित्यिकांनी भेट दिली. यावेळी लेखकांशी संवाद साधण्याची संधी वाचकांना मिळाली. या उपक्रमांमुळे ग्रंथोत्सव लक्षणीय ठरला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


हेडलीच्या कबुलीचा भारताला फायदाच : शहा

$
0
0

औरंगाबाद : '२६/११ च्या दहशतवादी हल्ल्याच्या खटल्यात डेव्ह‌िड हेडलीच्या कबुली जबाबाचा भारताला फायदाच होईल,' असा दावा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी शुक्रवारी संपादकांसोबत झालेल्या चर्चेत केला.

शहा यांनी शुक्रवारी रात्री औरंगाबादेत संपादकांसोबत विविध मुद्द्यांवर चर्चा केली. तत्पूर्वी शहरात त्यांच्या स्वागतासाठी भाजपचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. शहा नाशिक जिल्ह्यातील एका कार्यक्रमासाठी जाणार आहे. त्यापूर्वी शनिवारी सकाळी ते परभणी येथे व्ही. सतीश यांना भेटण्यासाठी जाणार आहेत. शुक्रवारी रात्री दिल्लीहून त्यांचे औरंगाबादेत आगमन झाले. चिकलठाणा विमानतळावर शहा यांच्या स्वागतासाठी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर, आमदार अतुल सावे, नारायण कुचे,

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर, शहराध्यक्ष किशनचंद तनवाणी, उपमहापौर प्रमोद राठोड, माजी महापौर डॉ. भागवत कराड यांच्यासह नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. चिकलठाणा विमानतळावरून श्री. शहा प्रदेशाध्यक्ष दानवे यांच्या निवासस्थानी भोजन घेण्यासाठी रवाना झाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भूईगळ यांच्या वाहनावर कारवाई

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

राजकीय कार्यकर्ते अमित भूईगळ यांची विना क्रमांकाची चारचाकी पोलिसांनी जप्त करून आयुक्तालयात उभी केली. जुबलीपार्क भागात काळ्या रंगाची विनाक्रमांकाची चारचाकी उभी असल्याने पोलिसांना संशय आला. माहिती घेतल्यावर हे वाहन अमित भूईगळ यांचे असल्याचे स्पष्ट झाले. वरिष्ठांच्या आदेशाने ही गाडी जप्त करण्यात आल्याचे वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक ए. के. मुदीराज यांनी दिली. वाहनाला काळ्या काचा लावलेल्या असून नंबर प्लेटही नसल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, वाहनाची कागदपत्रे घेऊन येण्यास भुईगळ यांना सांगण्यात आले असून त्यानंतर पुढील कारवाई होईल, अशी माहिती पोलिसांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘डीपी’त माझा शब्द अंतिम

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
'डीपी'ला (विकास आराखडा) अंतिम मंजुरी माझीच असेल. त्यात काही गडबडी झाल्या नाहीत, याची खात्री जोपर्यंत होणार नाही, तोपर्यंत 'डीपी' शासनाकडे पाठवणार नाही,' असा शब्द महापालिका आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी शनिवारी खासदार चंद्रकांत खैरे व आमदार संजय शिरसाट यांना दिला. शहराचा सुधारित विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. या आराखड्यात काही बदल करून सर्वसाधारण सभेने राजपत्रात तो प्रसिध्द केला. आराखड्यात केलेले अनेक बदल आता वादग्रस्त ठरत आहेत. त्यामुळे आज खासदार चंद्रकांत खैरे व आमदार संजय शिरसाट यांनी संयुक्तपणे सुनील केंद्रेकर यांची सिडको कार्यालयात जाऊन भेट घेतली. त्यानंतर या भेटीबद्दल या दोघांनी 'मटा' ला माहिती दिली.
खासदार खैरे म्हणाले, 'शहर विकास आराखड्यासंदर्भात केंद्रेकरांशी विशेष चर्चा झाली. विकास आराखड्यात खूप गडबडी आहेत. गोरगरिबांनी बांधलेल्या घरांवर आरक्षण टाकले आहे. त्यामुळे गरिबांची घरे वाचली पाहिजेत, अशी भूमिका आम्ही केंद्रेकरांच्या समोर मांडली.' आमदार शिरसाट म्हणाले, 'विकास आराखड्याचा विषय केंद्रेकरांच्या समोर आम्ही मांडला. या विषयात लक्ष घालण्याची विनंती त्यांना केली. जो पर्यंत हरकती, सूचना निकाली निघत नाहीत तो पर्यंत काहीच करता येणार नाही. हरकती - सूचना कशा पद्धतीने निकाली निघतात हे पाहून त्यानंतर त्यात लक्ष घालण्याचे केंद्रेकरांनी मान्य केले. सुधारित विकास आराखड्यात गडबडी नाहीत याची खात्री केल्यावरच त्यावर स्वाक्षरी करून तो आराखडा शासनाकडे मंजुरीसाठी पाठवू, असा शब्द केंद्रेकर यांनी दिला आहे.'
विकास आराखड्याबरोबरच समांतर जलवाहिनी, भूमिगत गटार योजना या विषयावर देखील खैरे - शिरसाट यांनी केंद्रेकर यांच्याशी चर्चा केली. गुंठेवारी भागातील घरे नियमित करण्याच्या संदर्भात केंद्रेकरांनी घेतलेली भूमिका योग्य आहे. त्यातून जास्तीत जास्त घरे नियमित होऊ शकतील अशी खात्री या दोन्हीही नेत्यांना पटली. शहर विकासासाठी योग्य प्रकारे काम करणाऱ्या केंद्रेकरांना सहकार्य करण्याची भूमिका या दोन्हीही नेत्यांनी घेतली. केंद्रेकरांनीही नियमात बसणारी कामे सांगा, ती नक्की करू असे आश्वासन दिले.
साताऱ्याकडे लक्ष द्या
चर्चेच्या ओघात खासदार चंद्रकांत खैरे यांनी सुनील केंद्रेकरांना सातारा परिसरात लक्ष देण्याची सूचना केली. 'साताऱ्यासाठी एक विशेष अधिकारी नियुक्त करा, महापालिकेतर्फे या भागात पाण्याचे टँकर द्या, अन्य विकास कामे करण्या संदर्भात नियोजन करा,' असेही केंद्रेकरांना सांगितल्याचे खैरे म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाइप वाटपामुळे समांतरची ‘टाळे’बंदी

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
पाइपांच्या पळवापळवीचे प्रकरण शनिवारीही गाजले. पाइपांच्या उपलब्धतेबद्दल 'समांतर'च्या अधिकाऱ्यांनी समाधानकारक उत्तर न दिल्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकांनी पुन्हा एकदा 'समांतर'च्या कार्यालयाला कुलूप ठोकले. पाइप आणा आणि कुलूप उघडून घ्या, अशी समज नगरसेवकांनी अधिकाऱ्यांना दिली.
समांतर जलवाहिनीचे काम करणाऱ्या औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटी कंपनीच्या कामकाजाबद्दल नगरसेवकांमध्ये रोष निर्माण होत आहे. एमआयएम, शिवसेना आणि त्यानंतर भाजपच्या नगरसेवकांनी कंपनीच्या कार्यालयासमोर आंदोलन केले.
एमआयएमच्या आंदोलनानंतर कंपनीच्या अधिकाऱ्यांनी कंपनीत असलेले सर्व पाइप एमआयएम नगरसेवकांमध्ये वाटून दिले. हे पाइप सर्व नगरसेवकांमध्ये समान पध्दतीने वाटायला हवे होते, ज्या भागात दूषित पाण्याची समस्या गंभीर आहे त्या भागातील पाइप बदलण्यास कंपनीने प्राधान्य दिले पाहिजे, अशी भूमिका भाजप नगरसेवकांनी घेतली. मात्र, कंपनीचे अधिकारी या भूमिकेला प्रतिसाद देत नसल्यामुळे भाजप नगरसेवकांनी शुक्रवारी कंपनीच्या कार्यालयाला टाळे ठोकून किल्ली ताब्यात घेतली. पाइप येत नाहीत तोपर्यंत कुलूप उघडू देणार नाही असा इशारा त्यांनी दिला. मात्र, शनिवारी सकाळी कंपनीचे अधिकारी तारीक खान व अन्य कर्मचारी कंपनीच्या परिसरात आले. त्यांनी कुलूप उघडून कामकाजास सुरुवात केली. ही माहिती मिळताच उपमहापौर प्रमोद राठोड यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे नगरसेवक कंपनीच्या कार्यालयात पोचले. यावेळी स्थायी समितीचे सभापती दिलीप थोरात, राज वानखेडे, शिवाजी दांडगे,माजी नगरसेवक बालाजी मुंडे आदी उपस्थित होते. तारिक खान यांच्यासह सर्व कर्मचाऱ्यांना त्यांनी कार्यालयाच्या बाहेर काढले व कार्यालयाला कुलूप लावले. यावेळी पाइप उपलब्ध करून देण्यासंदर्भात तारीक खान यांनी काहीच आश्वासन दिले नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आमचेही पेमेंट द्या

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
'मोठ्या कंत्राटदारांप्रमाणे आमचेही पेमेंट द्या. पेमेंटसाठी विनाकारण आम्हाला थांबवू नका,' अशी मागणी पालिकेत काम करणाऱ्या छोट्या कंत्राटदारांनी गुत्तेदार संघटनेच्या माध्यमातून शनिवारी पत्रकार परिषदेत केली.
गुत्तेदार संघटनेचे बंडू कांबळे यांनी या बद्दल माहिती दिली. ते म्हणाले, 'छोट्या कंत्राटदारांचे सुमारे ३० कोटी रुपये थकलेले आहेत. वारंवार मागणी करूनही ते मिळत नाहीत. बँकेकडून कर्ज काढून कंत्राटदारांनी कामे केली आहेत. महापालिका त्यांचे पेमेंट देत नाही आणि बँकवाले मात्र कर्ज फेडीसाठी तगादा लावतात. यामुळे छोटे कंत्राटदार संकटात सापडले आहेत. पालिकेकडून पेमेंट केले जात नसल्यामुळे नव्वद टक्के कंत्राटदारांनी महापालिकेत काम करणे बंद केले आहे. छोट्या कंत्राटदारांच्या अडचणी लक्षात घेऊन पालिकेच्या प्रशासनाने त्यांना सहकार्य करावे. आयुक्त सुनील केंद्रेकर महापालिकेला शिस्त लावण्याचे काम करीत आहेत, त्यांना आमचे सहकार्यच आहे,' असे त्यांनी स्पष्ट केले. पत्रकार परिषदेला सुरेश अलकुंटे, फईम सिद्दिकी, राजू होरशीळ, बबन हिवाळे, विजयसिंग परदेशी, शेख सलीम आदी
उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हेल्मेटधारी चोराने लांबवले मंगळसूत्र

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
हेल्मेट घातलेल्या चोराने मंगळसूत्र लांबविल्याचा धक्कादायक प्रकार शनिवारी सकाळी समर्थनगर सारख्या गजबजलेल्या भागात घडला. विशेष म्हणजे १४ तासातील ही दुसरी घटना आहे. महिलेने प्रतिकार करूनही मुजोर चोराने पाठलाग करून मंगळसूत्र हिसकावले.
समर्थनगरमधील रविंद्रनाथ टागोर शाळेत शारदा भाऊसाहेब सोनवणे (रा. मिटमिटा) शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. त्या शनिवारी सकाळी पावणेनऊच्या सुमारास वरद गणेश मंदिराच्या पाठीमागून शाळेकडे पायी जात होत्या. सोनवणे यांनी अॅप्रन घातलेले होते. त्यामध्ये मंगळसूत्र होते. शाळेजवळ समोरून एक हेल्मेटधारक दुचाकीस्वार आला. त्याने सोनवणे यांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावले. सोनवणे यांनी त्याला प्रतिकार करत मंगळसूत्र घट्ट धरून ठेवले. झटापटीत मंगळसूत्र तुटले आणि चोराच्या हातात दोन ग्रॅमचे मणी लागले. मंगळसूत्रामध्ये २३ मणी एक पँडल होते. सोनवणे यांनी शाळेकडे धाव घेत आरडाओरड केली. चोराने त्यांचा पाठलाग केला. आरडाओरड सुरू असल्याने लोक जमतील या भीतीने दुचाकीस्वाराने पळ काढला. नंतर सोनवणे यांनी पतीशी संपर्क साधला. भाऊसाहेब सोनवणे यांनी क्रांतिचौक ठाण्यात तक्रार दिली. सहायक पोलिस निरीक्षक अशोक आव्हाड तपास करत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

'राष्ट्रवादी'चा हुंकार मोर्चा

$
0
0


रंगाबाद : 'मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांतील ७६ तालुक्यांमध्ये यंदा गंभीर दुष्काळ आहे. दुर्दैवाने केंद्र व राज्य सरकारने अद्याप कुठल्याही दुष्काळी उपाययोजना केलेल्या नाहीत. दुष्काळाने खचून गेलेल्या सर्वसामान्य माणसांच्या वेदनांचा हुंकार केंद्र व राज्य सरकारपर्यंत पोचावा, यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेस, मराठवाडा विभागाच्या वतीने सोमवारी विभागीय आयुक्त कार्यालयावर हुंकार मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे,' अशी माहिती प्रदेश उपाध्यक्ष नीलेश राऊत, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष काशिनाथ कोकाटे यांनी शनिवारी पत्रकारांना दिली.
राऊत म्हणाले, 'सोमवारी सकाळी अकरा वाजता औरंगपुरा येथील महात्मा फुले पुतळ्यापासून केंद्र व राज्य सरकारच्या विरोधात आसूड ओढून मोर्चाला सुरुवात होईल. विभागीय आयुक्त कार्यालयात समारोप होईल. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार निरंजन डावखरे यांच्या नेतृत्वाखाली निघणाऱ्या मोर्चात आमदार राजेश टोपे, जिल्हाध्यक्ष आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर, सतीश चव्हाण, राणा जगजितसिंह पाटील, अमरसिंह पंडित, मधुसूदन केंद्रे, भारतभूषण क्षीरसागर आदींची प्रमुख उपस्थिती असेल. हुंकार मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन राऊत, कोकाटे यांनी केले. याप्रसंगी शहर कार्याध्यक्ष ख्वाजा शरफोद्दीन, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष अभिषेक देशमुख, आशिष मेटे, ऋषिकेश देशमुख, गणेश घुले, राहुल तायडे, नीलेश काळे आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


...प्रेम असतो तेवणारा धागा!

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
'प्रेम तिच्या हसण्यावर करावं
प्रेम तिच्या रुसण्यावर करावं
एवढं मात्र खरं प्रत्येकाच्या आयुष्यात
प्रेम असायलाच हवं
कुणाचं जनातल्या जनात
तर कुणाचं मनातल्या मनात'
प्रेमीजनांसाठी संस्मरणीय असलेला 'व्हॅलेंटाइन डे' साजरा करण्यासाठी अवघी तरुणाई सज्ज झाली आहे. सर्वत्र व्हॅलेंटाइनचे रोमँटिक वातावरण असून बाजारपेठेत गुलाबी रंगांच्या भेटवस्तू व गुलाबाच्या फुलांनी जागा व्यापली आहे. हा वीकेंड 'व्हॅलेंटाइन'मय करण्यासाठी अनेकांनी शहराबाहेर जाण्याचे नियोजन केले आहे.
प्रेम व्यक्त करण्यासाठी कोणताही दिवस महत्त्वाचा असला तरी 'व्हॅलेंटाइन डे'चे वेगळे महत्त्व आहे. यावर्षी शहरात 'व्हॅलेंटाइन डे'चा अधिक उत्साह आहे. कोणतीही संघटना व राजकीय पक्षाने 'व्हॅलेंटाइन'ला विरोध केला नसल्याने विरोधाशिवाय सेलिब्रेशन करता येणार आहे. बाजारपेठेत भेटवस्तूंची दुकाने आणि फुल विक्रेत्यांची चलती आहे. भेटवस्तूंवर विक्रेत्यांनी आकर्षक सवलत जाहीर केली आहे. यादिवशी गुलाबाच्या फुलाचे विशेष महत्त्व असते. त्यामुळे शनिवारी जिल्हाभरातून गुलाबाची फुले शहरात विक्रीसाठी आली आहेत. तसेच इतर जिल्ह्यातूनही फुले मागवल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. फुलाचा दर १० ते २० रुपये असून बुके २०० रुपयांना विक्री होत आहे. भेटवस्तू, फूल आणि चॉकलेट देऊन प्रियजनांना आनंदी करण्याचा प्रयत्न प्रेमीजन करीत आहेत. शहरातील हॉटेल्स व रेस्टॉरंटमध्येही आकर्षक सजावट करून 'व्हॅलेंटाइन'चे वातावरण तयार करण्यात आले आहे. तसेच काहीजणांनी शहरापासून दूर पर्यटनस्थळी जाऊन सेलिब्रेशनचे नियोजन केले आहे. राजकीय पक्षांचा विरोध नसल्यामुळे तरूणांमध्ये उत्साह दिसत आहे. लाल रंगाची जादू कायम असून लाल रंगाच्या भेटवस्तू व लाल गुलाब फुलाने बाजारपेठ व्यापली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कॅमेऱ्यापासून बचावाची चोरट्याची आयडिया

$
0
0


औरंगाबाद ः गुन्हे, चोऱ्या रोखण्यासाठी पोलिस सीसीटीव्ही कॅमेरा बसविण्याचे आवाहन करतात. मात्र, या कॅमेऱ्यांपासून बचाव करून चोऱ्या करण्यासाठी चोरट्यांनी नवीन शक्कल लढविली आहे. आपल्या अफलातून आयडियाने एका चोराने ग्लोव्हज आणि मास्क वापरून पोलिसांनाही चक्रावून टाकले.
शारदाश्रम कॉलनीच्या परिसरात असलेल्या गोळेगावकर कॉलनीत ११ फेब्रुवारी रोजी गुरुवारी रात्री चोर शिरला. चोराने सीसीटीव्हीपासून बचाव करण्यासाठी तोंडाला मास्क आणि हँड ग्लोव्हज घातले होते. एम. एस. भारुका अँड कंपनीच्या कार्यालयाचे कुलूप तोडून त्याने चोरीचा प्रयत्न केला. कार्यालयात काहीच हाती लागले नाही. त्यामुळे चोर निघून गेला. त्याच्या हालचाली सीसीटीव्ही कॅमेऱ्यात टिपल्या गेल्या. तोंडाला मास्क आणि ग्लोव्हज घालून हा चोरटा वावरल्याने पोलिसांना त्याचा चेहरा अथवा हाताचे ठसे मिळू शकले नाही. त्यामुळे आता चोराला पकडण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे. कंपनीचे व्यवस्थापक महेंद्रराज सुदाम इंगळे यांच्या तक्रारीवरुन क्रांतिचौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस नाईक घुगरे तपास करत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वक्फ बोर्डाच्या नसीम बानूंच्या नियुक्तीस आव्हान

$
0
0

म . टा . विशेष प्रतिनिधी, औरंगाबाद
महाराष्ट्र वक्फ बोर्डच्या अतिरिक्त कार्यकारी अधिकारी पदासाठी नसीम बानु नजीर पटेल यांची बेकायदा नियुक्ती झाल्याप्रकरणी मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठात आव्हान देण्यात आले आहे. राज्य शासनासह सर्व प्रतिवादींना नोटीस बजावण्याचे आदेश न्या. संभाजी शिंदे व न्या. पी. आर. बोरा यांनी दिले आहेत.
दर्गाह हजरत खाजा मुनताजीबोद्दीन झर-झरी बक्ष दुल्हे राहे, खुलताबाद या संस्थेने ही याचिका केली आहे. वक्फ कायदा १९९५ च्या कलम २३ प्रमाणे मुख्य कार्यकारी अधिकारी यांची नियुक्ती करण्यात येते. मुख्य कार्यकारी अधिकारी वक्फ बोर्डाचा कार्यालयीन कारभार सांभाळतो. १ नोव्हेंबर २०११ पासून अय्याज हुसैन सय्यद हे महाराष्ट्र राज्य वक्फ बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम पाहात होते. त्यांची नियुक्ती मुख्य न्यायदंडाधिकारी म्हणून झाल्यामुळे त्यांना वक्फ बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी या पदावरुन ३१ जुलै २०१५ रोजी कार्यमुक्त व्हावे लागले.
अल्पसंख्याक विकास विभागाचे प्रधान सचिव यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा अतिरिक्त कार्यभार नसीम बानु नजीर पटेल (जिल्हा अधीक्षक, भुमी अभिलेख औरंगाबाद )यांना तात्पुरता स्वरुपात देण्याचे आदेश २ सप्टेंबर २०१५ रोजी दिले.
कायद्यात मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा अतिरिक्त कार्यभार देण्याची तरतुद नसल्यामुळे नसीम बानु यांची नियुक्ती बेकायदा असल्याचा दावा याचिकेत करण्यात आला आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी या पदाचा अतिरिक्त कार्यभार देण्याची तरतुद वक्फ कायदा १९९५ मध्ये करण्यात आलेली नाही. सदर नियुक्ती करताना अटी व शर्तीचे पालन करण्यात आलेले नाही. कलम २३ प्रमाणे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नेमण्यात येणाऱ्या व्यक्तींची नेमणूक वक्फ बोर्डाने शिफारस केलेल्या पात्र व्यक्तीमधूनच करता येते. मुख्य कार्यकारी अधिकारी यांचा दर्जा उपसचिव या पदाच्या समान आहे. परंतु, जिल्हा अधिक्षक, भुमी अभिलेख या पदाचा दर्जा उपसचिव या पदाच्या दर्जापेक्षा कमी आहे. जिल्हा अधीक्षक, भुमी अभिलेख या पदाची श्रेणी वेतनश्रेणी ग्रेडप ५८०० आहे व उपसचिव वेतनश्रेणी ७६०० आहे . श्रीमती नसीम बानु यांची नियुक्ती करताना सरकारी राजपत्रात याबाबत नोंद घेतलेली नाही. वक्फ कायद्याप्रमाणे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना उर्दु भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे. परंतु, श्रीमती नसीम बानु यांना उर्दु भाषेचे ज्ञान अवगत नसल्यामुळे त्या मुख्य कार्यकारी अधिकारी या पदास अपात्र ठरतात असा युक्तिवाद याचिकाकर्त्याचे वकील सतीश तळेकर यांनी केला. नसीम बानु यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा कार्यभार स्वीकारल्यापासून पाठोपाठ बेकायदा आदेश, दमबाजी, नियमबाह्य बदली, नियमबाह्य निलंबन, अधिकारी व कर्मचाऱ्यांना दुय्यम वागणूक देणे असे आक्षेप याचिकाकर्त्यांनी घेतला आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी या पदाचा अतिरिक्त कार्यभार स्वीकारल्यानंतर बेकायदेशीरपणे आदेश केले आहेत. त्यांनी पदाचा गैरवापर करून उर्स कमिटी व दर्गाह कमिटी व याचिकाकर्त्यांच्या खात्यांना सील केले. याकिचाकर्त्यांतर्फे सतीश तळेकर, अजिंक्य काळे व अमोल चालक तर शासनातर्फे पी. जी. बोराडे हे काम पाहत आहेत. पुढील सुनावणी दोन आठवडयानंतर ठेवली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आरोग्यदायी संकल्प करा

$
0
0



म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
'सुदृढ देशांच्या क्रमवारीत स्वित्झर्लंड देश आघाडीवर असून भारताचा ५१ वा क्रमांक लागतो. आगामी काळात आपल्या भारतमातेच्या गौरवासाठी प्रत्येकाने नियमित सूर्यनमस्कार करून आरोग्यदायी जीवनाचा संकल्प करावा,' असे आवाहन क्रीडा भारतीचे अखिल भारतीय महामंत्री राज चौधरी यांनी शनिवारी केले.
हडको येथील ग्रामीण पोलिस मुख्यालयाच्या गोकुळ मैदानावर सूर्यनमस्कार स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी चौधरी बोलत होते. कार्यक्रमाला चाटे ग्रुप ऑफ एज्युकेशनचे संचालक गोपीचंद चाटे, जिल्हा क्रीडा अधिकारी ऊर्मिला मोराळे, औरंगाबाद ग्रामीण विभागाचे पोलिस अधीक्षक नवीनचंद्र रेड्डी , कमलाकर क्षीरसागर, विजय खोचणे (अध्यक्ष), उपक्रमाचे समन्वयक उदय ज. कहाळेकर, जिल्हा क्रीडा अधिकारी गोकुळ तांदळे, जयाजी पवार, राजेश शेटे, विनायक राऊत, प्रल्हाद राहेगावकर यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. सूर्यनमस्काराच्या प्रचार व प्रसारासाठी महाराष्ट्र टाइम्स, क्रीडा भारती, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आणि शिक्षण विभागाच्या संयुक्त विद्यमाने गेल्या वर्षभरापासून शहरातील विविध शाळांमध्ये सूर्यनमस्कार सोहळ्याचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेतील विजेत्या शाळांना मान्यवरांच्या हस्ते आज सन्मानित करण्यात आले. राजा चौधरी म्हणाले, 'आपल्या संस्कृतीत सूर्याला देवता मानले जाते. कारण ही देवता सर्वांसाठी उपलब्ध आहे. सूर्यनमस्काराच्या विविध आसनांच्या माध्यमातून प्रत्येकाने आरोग्यमय जीवनाचा संकल्प करायला हवा. सूर्यनमस्काराचा प्रचार-प्रसार देशातच नव्हे, तर विदेशातही व्हावा यासाठी क्रीडा भारती प्रयत्नशील आहे. अवघ्या साडेआठ मिनिटांत योगाचे विविध प्रकार करून आपण ताजेतवाने होऊ शकतो,' असे चौधरी म्हणाले. ऊर्मिला मोराळे म्हणाल्या, 'जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आणि शिक्षण विभागाच्या वतीने २००५ पासून सूर्यनमस्कार वर्गाचे आयोजन करण्यात येते. सर्व शाळांमध्ये आम्ही मुलांना यासाठी प्रोत्साहित करीत आहोत. आपला पाल्य गुणवत्तेच्या बाबतीत कुठेही कमी पडायला नको, यासाठी पालक खूप धडपड करतात, परंतु त्यांनी मुलांना सकाळी उठल्याबरोबर सूर्यनमस्कार घालण्याची सवय लावल्यास त्याच्या एकाग्रतेत फरक दिसून येईल.' यावेळी गोपीचंद चाटे यांनी उपस्थितांशी संवाद साधला. योग तज्ज्ञ डॉ. वैशाली तौर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचलन केले.
-
सूर्यनमस्कारामुळे शरीरासोबत मन सुदृढ ठेवता येते. मनाची प्रसन्नता कायम राहिल्यास कार्यसिद्धी अधिक सोपी होते. दररोज वेळात वेळ काढून मुलांनी तसेच सर्वांनी सूर्यनमस्कार करावा. स्वतःसह आपल्या मित्रांना सुद्धा त्यासाठी प्रोत्साहित करायला हवे.
- गोपीचंद चाटे, संचालक, चाटे ग्रुप ऑफ एज्युकेशन
-
लहानपणापासून व्यायामाची सवय लागणे आपल्या आरोग्यदायी जीवनासाठी फार महत्वाचे होय. शरीर तंदुरुस्त असेल, तर अभ्यासात व कामात लक्ष लागते. त्यामुळे एकाग्रता देखील वाढते. यशोशिखर गाठण्याचे ध्येय ठेवताना प्रत्येकाने दररोज सूर्यनमस्काराचा संकल्प करावा.
- नवीनचंद्र रेड्डी, पोलिस अधीक्षक, औरंगाबाद ग्रामीण

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पैनगंगा नदी कोरडी, पाणीप्रश्न गंभीर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नांदेड
विदर्भ-मराठवाड्याच्या सीमेवरून वाहणारी पैनगंगा नदी गेल्या तीन महिन्यांपासून कोरडी ठाक पडल्याने नदी काठावरील गावासह जनावरांच्या चाऱ्यासह पाण्याची भीषणता वाढली आहे. ही बाब लक्षात घेत इसापूर धरणातून पाणी सोडण्यात यावे अशी मागणी केली जात आहे.
नदीकाठावर अवलंबून असलेल्या गावकऱ्यांना नोव्हेंबर महिन्यापासूनच पाणी टंचाईचा सामना करावा लागत असून, नदीचे पात्र कोरडेठाक पडले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून नदीकाठावरील गावकऱ्यांना फेब्रुवारी-मार्च महिन्यात पाणी टंचाईचा सामना करावा लागत होता. यंदा खरीप हंगामात पावसाने केलेली अवकृपा यामुळे दिवाळीपासूनच नदी काठावरील २० ते २५ गावातील नागरिकांना भीषण पाणीटंचाई बरोबर जनावरांच्या चाऱ्यांच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. परिणामी या प्रकारामुळे हतबल झाले असून, पाणी नाही चार नाही, म्हणून जनावरे आठवडी बाजारात विक्रीला आणत आहेत. बाजारातही जनावरांना भाव नसल्याने शेतकरी अडचणीत आला असून, शासनाने अद्याप नुकसानीची मदत जाहीर केली नसल्याने शेतकरी द्विधा मनस्थितीत सापडला आहे. खरीपात म्हणावा तसा पाऊस झाला नसल्याने रब्बीची पिके घेण्यासाठी जमिनीची कुवत नसल्याने रब्बीचे क्षेत्र घटले आहे. या परिस्थितीकडे पाहून शासनाने कोरडा दुष्काळ जाहीर करून सरसकट मदत जाहीर करावी आणि शेतकऱ्यांना आर्थिक अडचणीतून सोडवावे अशी मागणी होत आहे.

इसापूर धरणातील पाणी सोडावे
नदी कोरडीठाक पडल्यामुळे नदीकाठावरील नागरिकांना पाणीटंचाई भेडसावत आहे, तर जनावरांना जमा असलेल्या खड्ड्यातील पाणी पिल्याने आजारांना बळी पडावे लागत आहे. या परिस्थितीची जाणीव लक्षात घेता उर्ध्व पैनगंगा प्रकल्प, इसापूर धरणातील पाणीसाठा पैनगंगा नदीत सोडून पाणीटंचाईने त्रस्त झालेल्या नागरिकांना मुक्या जनावरांना दिलासा द्यावा, अशी मागणी नदीकाठावरील नागरिक शेतकरी करीत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live


Latest Images