Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

खरीप अनुदान वाटपाचे ‘प्लनिंग’ फिस्कटले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद,
मराठवाड्यासाठी पहिल्या टप्प्यात मिळालेल्या ११५६ कोटी ३८ लाख अनुदान वाटपाचे विभागीय प्रशासनाचे प्लानिंग फिस्कटले आहे. १५ फेब्रुवारीपर्यंत अनुदान वाटपाची कालमर्यादा ठरवली असतांना आतापर्यंत केवळ ८७ टक्केच अनुदानाचे वाटप झाले आहे. बहुतांश अनुदान शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आले असले तरी परभणी जिल्ह्यात केवळ ४१ टक्के तर जालना जिल्ह्यात केवळ ६२ टक्के अनुदान वाटप झाले आहे.
मराठवाड्यात भीषण दुष्काळामुळे संपूर्ण खरीप हंगाम वाया गेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बिघडले. शासनाकडून कापूस वगळून इतर कोरडवाहू पिकांसाठी अनुदान देण्याकरिता २ हजार ६९ कोटी २७ लाख रुपयांचा निधीची तरतूद करण्यात आली. यातील पहिल्या टप्प्यातील ११५६ कोटी ३८ लाख रुपयांचा पहिल्या टप्प्यातील निधी उपलब्ध करून देण्यात आला. शासनाने अनुदानाची घोषणा केल्यानंतर काही प्रमाणात आर्थिक दिलासा मिळेल असे शेतकऱ्यांना वाटत होते मात्र ही आशाही जिल्हा प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे धुळीस मिळाली आहे. अनुदान वाटपासंदर्भात विभागीय आयुक्त कार्यालयाने जिल्हाधिकारी कार्यालयाने कालबद्ध कार्यक्रम आखून दिला होता १५ फेब्रुवारीपर्यंत उपविभागीय अधिकाऱ्यांनी मान्यता दिलेल्या गावनिहाय व बँकनिहाय याद्याप्रमाणे रक्कम लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करावयाचे होते, यानुसार अनुदान प्राप्त झाल्यानंतर बहुतांश जिल्ह्यांमध्ये अनुदान वाटप पूर्ण झाले मात्र जालना आणि परभणी जिल्ह्यामध्ये अनुदान वाटपाची प्रक्रीया अत्यंत संथ गतीने आहे. जालना जिल्ह्याला २२१.४७ कोटी रुपयांची आवश्यकता असून पहिल्या टप्प्यात जिल्ह्यासाठी १२३ कोटी ८० लाख रुपये प्राप्त झाले. मात्र, आतापर्यंत केवळ ७७ कोटी (६२ टक्के) रुपयेच वाटप करण्यात आले आहे. परभणी जिल्ह्यातील अनुदान वाटपाची अवस्था बिकट असून प्राप्त झालेल्या १११ कोटी रुपयांपैकी केवळ ४६ कोटी (४५ टक्के) रुपयांचेच वाटप झाले आहे.
विभागीय आयुक्तांनी केली कानउघाडणी
जालना व परभणी जिल्ह्याच्या अनुदानवाटपाच्या पिछाडीमुळे विभागीय आयुक्त डॉ. उमाकांत दांगट यांनी जिल्हा प्रशासनाची कानउघाडणी केली व तत्काळ अनुदान वाटपाच्या सूचना दिल्या असल्याचे सूत्रांनी सांगितले.
उर्वरीत निधीसाठी प्रस्ताव
अनुदानाच्या दुसऱ्या टप्प्यासाठी ९१३ कोटी रुपयाचे अनुदानाची विभागीय आयुक्त कार्यालयाकडून मागणी करण्यात आली आहे. यासाठी शेतकऱ्यांच्या याद्या तयार करण्याचे काम पूर्ण झाले असून ज्या जिल्ह्यांचा पहिल्या टप्प्यातील निधीचे वाटप पूर्ण झाले आहे अशा जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांना तत्काळ अनुदान वाटप करता येणार आहे.



मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


महिलेची ३१ लाखांची फसवणूक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
लग्न जमविण्याच्या बहाण्याने एका ४५ वर्षांच्या महिलेला तब्बल ३० लाख रुपयांचे दागिने व रोख दीड लाख रुपयांना गंडा घालण्यात आला. जून २०१३ ते जानेवारी २०१६ यादरम्यान हा प्रकार घडला. या प्रकरणी पोलिसांनी किनवट येथून एका उच्चशिक्षित तरुणीला अटक केली. कर्णपुरा परिसरात पूजेसाठी दागिने आणयला लावून हे दागिने लंपास करण्यात आले होते.

वेदांतनगर परिसरात एक ४५ वर्षांची अविवाहित महिला वडील व भावासोबत राहते. जून २०१३मध्ये एका वर्तमानपत्रात ज्योतिषीविषयक जाहिरात आली होती. यामध्ये लग्नातील अडचणी सोडविण्यात येतील, असे म्हटले होते. या महिलेने ही जाहिरात पाहिली होती. लग्न जमत नसल्याने तिने जाह‌िरातीमध्ये दिलेल्या क्रमांकावर फोन केला. यावेळी तेजस्विनी उर्फ भावना या तरुणीशी तिचा संवाद झाला. तेजस्विनीने तिच्या अडचणी एेकून त्यावर उपाय करू, असे सांगितले. यानंतरच्या दीड वर्ष या महिलेशी तेजस्विनीने संपर्क साधला नव्हता. जानेवारी २०१५मध्ये या महिलेला अचानक तेजस्विनीचा फोन आला. 'लग्न जमले की नाही,' असे तिने विचारले. त्यावर या महिलेने अद्याप लग्न झाले नसल्याचे सांगितले. त्यावर तेजस्विनीने, 'लग्न जमून जाईल, मात्र पूजेसाठी सोन्याचे दागिने व पैसे लागतील,' असे सांगितले. लग्न होईल, या आशेने महिलेने ‌होकार दिला. तिला सुरुवातीला संगिता विश्वनाथ रायबोले या नावाने हैदराबाद बँकेत असलेल्या खात्यावर २१ हजार रुपये जमा करण्यास सांगितले. नंतर वर्षभरात या खात्यामध्ये महिलेला एक लाख ४७ हजार रुपये भरण्यास भाग पाडले. त्याचबरोबर पूजेसाठी दागिने आणायला सांगून कर्णपुरा परिसरातील मंदिरामध्ये पाचवेळा पूजेचे नाटक केले. तेथून हातचलाखीने ३० लाखांचे दागिने लंपासकरण्यात आले.

पाचव्या वेळी हा प्रकार लक्षात आल्यानंतर महिलेने क्रांतिचौक पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून सोमवारी सकाळी सापळा रचून किनवट येथून आरोपी तरुणी तेजस्विनी उर्फ भावना उर्फ सुजाता उर्फ संगिता विश्वनाथ रायबोले (वय २६, रा. दाभाडी ता. किनवट, जि. नांदेड) हिला अटक केली. पीएसआय सय्यद सिद्दिकी व पथकाने ही कारवाई केली.

आरोपी उच्चशिक्षित
आरोपी तेजस्विनी उर्फ भावना उर्फ सुजाता उर्फ संगिता ही उच्चशिक्षित आहे. कांचनवाडी प‌रिसरातील एका कॉलेजमध्ये तिने बीसीएसपर्यंत शिक्षण घेतले आहे. हिंदी भाषेवर तिचे प्रभुत्व आहे. गोड बोलून तिने या महिलेला जाळ्यात ओढले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्ह्यातील १११ ग्रामपंचायती ‘आयएसओ’

$
0
0

Makarand.Kulkarni@timesgroup.com
औरंगाबाद : ग्रामपंचायतीची अद्ययावत इमारत, उत्कृष्ट बांधकाम, संग्राम केंद्राचे काम, मिनरल वॉटर प्लँट, दलित वस्तीमध्ये सर्व सुविधा, पथदिवे, वृक्षारोपण अशा सुविधा पाहिल्यानंतर क्षणभर आपण खेड्यात आहोत की शहरातील एखाद्या सर्वसोयीनुरुक्त कॉलनीत, असा प्रश्न पडेल. औरंगाबाद जिल्ह्यात अशी १११ गावे तयार झाली आहेत. निकष पूर्ण करणाऱ्या या १११ ग्रामपंचायतींना आयएसओचा दर्जा प्राप्त झाला आहे. या गावांना २७ फेब्रुवारी रोजी मंत्र्यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.

जिल्ह्यात यापूर्वी पाटोदा, रांजणगाव, जोगेश्वरी या तीन ग्रामपंचायतींना आयएसओ मानांकन प्राप्त झाले आहे. एखाद्या ग्रामपंचायतीला आयएसओ दर्जा प्राप्त करून द्यायचा असेल तर, त्याची चार टप्प्यांत तपासणी केली जाते. ग्रामपंचायतीचे सुसज्ज अद्ययावत कार्यालय, गावामध्ये शौचालये, स्वच्छता, घरांवर नावे, दिशादर्शक फलक, कचराकुंडी, सांडपाणी व्यवस्थापन, मोठ्या झाडांना रंग देणे, ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी झाडांना गोल ओटे, क्रीडांगण, बँकेचे पासबुक अद्ययावत असणे, केलेल्या विकाकामांचा माहिती फलक लावणे, दलित वस्तीमध्ये आवश्यक त्या मूलभूत सुविधा पुरविणे, १ ते ३३ अभिलेख्यांचे अद्ययावीकरण, गावाच्या मालमत्तेचे विवरण, रोजकीर्द अपडेट ठेवणे, ग्रामसभेच्या सूचना नागरिकांपर्यंत पोचविणे आणि ग्रामसंसद कार्यालयाने गेल्या तीन वर्षांत केलेली समाजोपयोगी कामे या चार टप्प्यांतील निकष तपासले जातात. औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागाच्या पुढाकाराने गेल्या वर्षी काही गावे निवडली गेली. ही गावे आयएसओ करण्याच्या दृष्टीने प्रशासनाने पावले उचलली. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अभिजित चौधरी, पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंके, पारिजात कन्स्लटंसीचे मुख्य परीक्षक प्रशांत जोशी यांनी निवडलेल्या गावांमध्ये जाऊन सभा घेतल्या. तेथील नागरिकांना आयएसओचे महत्व पटवून दिले. परिणामी अनेक गावकऱ्यांनी पुढाकार घेतला. आपल्या गावाचा कायापालट करावयाचा असेल तर लोकसहभाग अत्यावश्यक असल्याची जाणीव नागरिकांना झाली आणि गावांमध्ये पाहता पाहता बदल झाले. जिल्ह्यातून २४३ गावांची निवड यासाठी केली होती. पहिल्या टप्प्यात १३५ गावांचे परीक्षण झाले त्यातून १११ गावे आयएसओसाठी पात्र ठरली. उर्वरित गावांनाही लवकरच आयएसओ दर्जा प्राप्त होणार आहे. एवढ्या मोठ्या संख्येने आयएसओ होण्याची ही देशात पहिलीच वेळ आहे. गावकऱ्यांनी केलेल्या मेहनतीचे कौतुक करण्यासाठी प्रशासनाच्या वतीने २७ फेब्रुवारी रोजी कौतुक; तसेच प्रमाणपत्र वितरण सोहळा आयोजित केला आहे. पालकमंत्री रामदास कदम, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांची या कार्यक्रमास उपस्थिती असणार आहे.

आयएसओ साठी निवडलेल्या गावांमधील सरपंच, ग्रामसेवक आणि गावकऱ्यांनी खूप उत्कृष्ट काम केले. त्यांच्या मेहनतीतूनच हे साध्य झाले आहे. भविष्यात आणखी ग्रामपंचायती निश्चितपणे आयएसओ होतील.
- वासुदेव सोळंके, उपमुख्य कार्यकारी अधिकारी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अकरा नगरसेवकांना महापालिकेची नोटीस?

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
अतिक्रमण केल्यामुळे कायदेशीर कारवाई करण्यात का येऊ नये, अशा आशयाची नोटीस महापालिकेच्या प्रशासनाने सुमारे अकरा नगरसेवकांना बजावली आहे. या प्रकारामुळे महापालिकेत खळबळ उडाली आहे. एमआयएम आणि शिवसेनेच्या नगरसेवकांची संख्या यात जास्त असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

नगरसेवकांनी अतिक्रमण करणे किंवा अतिक्रमणांना संरक्षण देणे हा कायद्यानुसार गुन्हा समजले जाते. अशा प्रकरणात एखादा नगरसेवक अडकला आहे, असे लक्षात आले तर प्रशासनाला त्याच्यावर कारवाई करण्याचा अधिकार आहे. अशा प्रकरणात नगरसेवकाचे पद रद्द होऊ शकते. त्यामुळे पालिकेच्या प्रशासनाने गेल्यावर्षीपासून नगरसेवकांनी केलेल्या अतिक्रमणांबद्दल अभ्यास सुरू केला. तत्कालीन आयुक्त प्रकाश महाजन यांनी अशा प्रकारच्या कारवाईत विशेष लक्ष घातले होते, परंतु कारवाई पुढे सरकू शकली नव्हती. आता पुन्हा महापालिकेच्या प्रशासनाने नगरसेवकांवर लक्ष केंद्रित केले आहे. अतिक्रमण करून घर बांधले आहे किंवा घराच्या भोवती अतिक्रमण केले आहे अशा नगरसेवकांची यादी तयार करण्यात आली असून, पहिल्या टप्प्यात सुमारे ११ नगरसेवकांना नोटीस बजावण्यात आल्या आहेत. अतिक्रमण केल्यामुळे कायदेशीर कारवाई का करण्यात येऊ नये, असे या नोटीसमध्ये म्हटल्याची माहिती सूत्रांनी दिली. नोटीस बजावण्यात आलेल्या नगरसेवकांमध्ये एमआयएम आणि शिवसेनेच्या नगरसेवकांची संख्या जास्त असल्याचे या सूत्रांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एमआरआय’चे पैसे परत जाणार

$
0
0


Nikhil.Nirkhee
@timesgroup.com
गोरगरिब रुग्णांना १८०० रुपयांऐवजी ७०० रुपयांमध्ये 'एमआरआय'ची तपासणी उपलब्ध व्हावी म्हणून पालकमंत्र्यांनी चार महिन्यांपूर्वी ५० लाखांचा निधी घाटीच्या खात्यात जमा केला. मात्र, आर्थिक वर्ष संपण्यासाठी अवघा दीड महिना शिल्लक असताना 'डीएमईआर'कडून नुकतीच मान्यता आली असून, ३१ मार्चपर्यंत ५० लाखांपैकी ५ ते १० लाखांपेक्षा जास्त निधी खर्च होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळेच उर्वरित ४० ते ४५ लाखांचा निधी वापस जाण्याची शक्यता आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयामध्ये (घाटी) 'एमआरआय'साठी दारिद्र्यरेषेखालील रुग्णांना कुठलीही सूट नसून, विविध प्रकारच्या एमआरआय तपासणीसाठी सर्वांनाच १८०० ते २४०० रुपये शुल्क आहे. हे शुल्क गोरगरिबांच्या आवाक्याबाहेर आहे आणि म्हणूनच त्याचे शुल्क हे पूर्वीप्रमाणे ७०० रुपये करण्यात यावे, अशी सातत्याने मागणी होत होती. जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीमध्येही ही मागणी वारंवार करण्यात आली आणि आमदार इम्तियाज जलील यांच्यासह इतरांनीही ही मागणी लावून धरली. त्यामुळेच पालकमंत्री रामदास कदम यांनी पूर्वीप्रमाणे ७०० रुपयांच्या सवलतीतील 'एमआरआय' तपासणीसाठी ५० लाख रुपयांचा निधी सुमारे चार ते पाच महिन्यांपूर्वी डीपीसीच्या बैठकीत जाहीर केला आणि घाटीच्या खात्यामध्ये वर्ग केला. मात्र, वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाच्या (डीएमईआर) मान्यतेशिवाय सवलतीच्या शुल्कात ही तपासणी केली जाऊ शकत नाही, असे कारण देत घाटी प्रशासनाने तसा प्रस्ताव 'डीएमईआर'ला पाठविला. आश्चर्याची बाब म्हणजे तब्बल चार महिने कुठलीही मान्यता 'डीएमईआर'कडून आली नाही. दरम्यान, शिवसेनेच्या पालकमंत्र्यांवर कुरघोडी करण्यासाठीच भाजपच्या वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांनी खोडा घातल्याची खुली चर्चा चांगलीच रंगली.
एका शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये अशी परवानगी देऊन 'एमआरआय'चे शुल्क ७०० रुपये आकारले गेले, तर इतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांनाही हेच शुल्क आकारावे लागेल, असे कारण 'डीएमईआर'ने दिले असले तरी त्यामागे हेच कुरघोडीचे राजकारण असल्याचे सांगितले जाते. पालकमंत्र्यांसह शिवसेनेचा रोष नको म्हणून आर्थिक वर्ष संपण्यासाठी अवघा दीड महिना शिल्लक असताना ही मान्यता दिल्याचेही समजते.
नाविन्यपूर्ण योजनेचा निधी वर्षासाठी !
'डीपीसी'च्या बैठकीमध्ये हा ५० लाखांचा निधी नाविन्यपूर्ण योजनेसाठी देण्यात आला होता आणि हा निधी विशेष बाब म्हणून केवळ एका वर्षासाठी दिला जातो. याच कारणासाठी दुसऱ्या वर्षी या प्रकारे निधी दिला जाऊ शकत नाही. त्यामुळे न वापरलेला निधी वापस जाणार आहे. त्याचवेळी 'डीएमईआर'कडून २०१५-१६ या वर्षासाठीच मान्यता दिल्याचा स्पष्ट उल्लेख शासन आदेशामध्ये असल्याचेही सूत्रांनी सांगितले.
'डीएमईआर'ला तत्काळ प्रस्ताव गरजेचा
मुळात २०१५-१६ नंतरही 'डीपीसी'चा निधी वापरण्यासाठी मान्यता देणारा शासन आदेश हवा होता. निदान आता तरी 'डीएमईआर'ला तत्काळ प्रस्ताव पाठवून, भविष्यात 'डीपीसी'कडून निधी मिळाल्यास त्याचा २०१६-१७ व त्यानंतरही गरजेनुसार भविष्यात हा निधी वापरण्याची मान्यता मिळवणे आवश्यक आहे. यामध्ये दिरंगाई झाल्यास पुन्हा अनेक महिने बीपीएल रुग्णांना १८०० रुपयांचे शुल्क भरावे लागणार आहे. अर्थात, आता पुन्हा 'डीपीसी'तून यासाठी निधी मिळाल्यानंतरच मार्चनंतर ७०० रुपये शुल्क होऊ शकते; नाहीतर ३१ मार्च पुन्हा १८०० रुपयांचे शुल्क बीपीएल रुग्णांची माथी येणार असल्याचे स्पष्ट संकेत आहेत.
-
घाटीमध्ये सोमवारपासून बीपीएल रुग्णांसाठी ७०० रुपयांमध्ये एमआरआय तपासणी उपलब्ध झाली आहे. विविध प्रकारच्या एमआरआय तपासण्यांचे शुल्क हे १८०० ते २४०० रुपयांपर्यंत आहे व सर्वाधिक २४०० रुपयांच्या तपासणीच्या शुल्कासाठी बीपीएल रुग्णांना १३०० रुयांपर्यंतचे शुल्क लागू शकते.
- डॉ. सुहास जेवळीकर, वैद्यकीय अधीक्षक, घाटी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ऑनलाइन कलचाचणीकडे पाठ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
कलचाचणी घेताना कम्प्युटर शोधण्यासाठी शाळांची धावपळ उडाली. अनेक शाळांत कम्प्युटर असले तरी इंटरनेटचे कनेक्शन नसल्याचे या निमित्ताने समोर आले. राज्यात आतापर्यंत दहावीच्या सुमारे साडेसोळा लाखांपैकी केवळ ४१ हजार ९१६ विद्यार्थ्यांनीच ऑनलाइन कलचाचणी दिली. उरलेल्या आठ दिवसांत सुमारे १६ लाख विद्यार्थ्यांची चाचणी घेण्याचे आव्हान शाळांसमोर आहे. दरम्यान, काही शाळांनी 'ऑफलाइन'चा मार्ग निवडला, मात्र त्याची माहिती शिक्षण मंडळाकडे उपलब्ध नाही. कलचाचणी देण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये उत्साह आहे.

यावर्षी प्रथमच दहावीच्या विद्यार्थ्यांची कलचाचणी घेतली जात आहे. त्यात विद्यार्थ्यांचा कल कोणत्या शाखेकडे आहे, याची चाचपणी करण्यात येत आहे. या चाचणी १५२ गुणांची प्रश्नपत्रिका सोडवून घेतली जाते. ही चाचणी ऑनलाइन की ऑफलाइन या विषयावरून राज्यात गेले काही दिवस चर्चा सुरू होती. या चाचणीसाठी शिक्षण मंडळाने शाळांचे सर्वेक्षण केले. त्यावेळी अनेक शाळांच कम्प्युटर नसल्याचे समोर आले.

राज्यात दहावीच्या विद्यार्थ्यांची संख्या साडेसोळा लाखांच्या घरात आहे. १६ फेब्रुवारीपर्यंत ४१ हजार ९१६ विद्यार्थ्यांचीच ऑनलाइन कलचाचणी घेतल्याचे आकडे समोर आले आहे. शिक्षण मंडळाने ऑफलाइनची परवानगी दिल्याने बहुतांशी शाळा ऑफलाइन परीक्षा घेत असल्याचे मंडळाकडून सांगण्यात येत आहे. ऑनलाइन कलचाचणीत शाळांची उदासिनता असली तरी विद्यार्थ्यांमध्ये उत्साह आहे.

नवनवीन, अडचणीत टाकणारे प्रश्न होते. तुम्हाला इमारतीचा नकाशा काढायला आवडेल का, हा प्रश्न तसा माझ्यासाठी नवीन आहे. अशा प्रश्नामुळे आपण कोणत्या क्षेत्रात प्रगती करू शकतो, याचा अंदाज बांधणे शक्य आहे असे मला वाटते.
- ललित जोनवाल,विद्यार्थी.

माझ्यासाठी कलचाचणी शैक्षणिक, व्यावसायिक आवड व कल मोजणारी ही मानसशास्त्रीय कसोटी होती. चाचणीत १५२ प्रश्न होते. शेवटचा प्रश्न वगळता प्रत्येकासाठी वेगवेगळे प्रश्न होते. दहावीनंतर करिअरसाठी क्षेत्र निवडण्यास निश्चित मदत होईल.
- सुमित मकासरे, विद्यार्थी.

कला, विज्ञान, वाणिज्य, मेडिकलसह छोटे-छोटे प्रश्न होते. ज्यातून चित्रकला, बँक अशा क्षेत्राचाही समावेश होता. आवड-निवडीसाठी कलचाचणी महत्त्वाची ठरेल, असे वाटले. निकालानंतर समोर येईल.
- पौर्णिमा तोटेवाड, विद्यार्थी

कलचाचणीत वस्तुनिष्ठ प्रश्नांचा अधिक समावेश आहे. वेगवेगळ्या फिल्डबाबत यातून माहिती कलचाचणीत प्रश्न होते. अनेक प्रश्न वेगळ्या पद्धतीच्या कौशल्याबाबत होते . त्याची मला फारशी माहिती नव्हती. कलचाचणीमुळे आपले क्षेत्र निवडायला सोपे जाईल, असे मला वाटते.
- पूनम अवसरमोल,विद्यार्थिनी.

प्रत्येकाची क्षमता, आवड वेगवेगळी असते. अशावेळी हव्या असलेल्या क्षेत्रात करिअर करणे सोपे जावे, या हेतूने हे कलचाचणी उपयुक्त ठरते आहे. यातून कल, आवड पाहिली जाते आहे. प्रश्नांची रचनाही उत्तम असल्याने विद्यार्थ्याला गुणांची पारख होते आहे.
- आर. व्ही. दोडके, संगणक शिक्षक

प्रत्येकाची आवड, क्षमता ही वेगवेगळी असते. कलचाचणीमुळे त्यांच्या क्षमतांची त्यांना ओळख होऊन, आवडीनुसार क्षेत्र निवडणे निश्चित सोपे होईल, असे मला वाटते. प्रश्नही विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या क्षेत्राची माहिती देणारे आहेत.
- चंद्रकांत चव्हाण, संगणक शिक्षक.

ऑनलाइन कलचाचणी
जिल्हा......विद्यार्थी संख्या
औरंगाबाद.....४२३७
बीड..............४२३७
परभणी.........७१९
जालना..........६८०
हिंगोली.........८२

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संघ संस्काराने आयुष्य फुललेः भालेराव

$
0
0

संघ संस्काराने आयुष्य फुललेः भालेराव
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
'संघाच्या मुशीत तयार होताना कर्तृत्ववान माणसे भेटली. त्यांचे समर्पण, नैतिकता, दार्तृत्वाने अचंबित होत गेलो. त्यांच्या सारखेच काम करत गेलो. या संस्काराने आयुष्य फुलले,' असे मत उद्योजक अनिल भालेराव यांनी व्यक्त केले. रोटरी क्लब ऑफ औरंगाबादतर्फे भालेराव यांचा 'औरंगाबाद भूषण' पुरस्काराने बुधवारी गौरव करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.
भानुदास चव्हाण सभागृहात हा कार्यक्रम झाला. यावेळी व्यासपीठावर अध्यक्ष अमित वैद्य, सुनील बागुल, अश्विन बालेकर, विजय जैस्वाल, भालेराव यांच्या पत्नी शैलजा भालेराव यांची उपस्थिती होती. भालेराव म्हणाले, 'बालवयातील संघाचे संस्कार मोठेपणी कामी आले. कर्तृत्व, दार्तृत्व आणि समर्पण संघाच्या प्रचारक, विस्तारकांकडून शिकलो. दत्ताजी भाले, प्रल्हादजी अभ्यंकर, रघुवीर ओक यांच्यासारख्या महान संघप्रेमींच्या सहवासात संघ जवळून पाहायला मिळाला. आबासाहेब गरवारे, गरवारे कंपनीचे सर्व संचालक आणि कंपनीतील सर्व कर्मचारी यांच्याकडून बरेच शिकलो. या मंडळींमध्ये जेहूर सारख्या छोट्या गावातून आलेल्या माणसाला वावरता आले हेच मला कृतकृत्य करून जाते. संघ, हेडगेवार रूग्णालय, सामाजिक कार्य आणि औद्योगिक क्षेत्रातील वावर मला माझी ओळख देऊन गेली. माझ्यापेक्षा दहापट अधिक सक्षम नेतृत्व मी सर्व क्षेत्रात पाहिले. त्यां‍च्यासारखे एक टक्का जरी काम केले तरी मी काही केले असे मानतो. हेच माझ्यासाठी आदर्श आहेत. पत्नी शैलजा यांनी दिलेली साथ, आईवडिलांचे संस्कार आयुष्यात कामी आले. माझ्यातील उणीव भरून काढून पुढील आयुष्य जगेन,' अशी ग्वाही देत मनोगत संपवले. दीपक पवार यांनी परिचय करून दिला. डॉ. मंगला वैष्णव यांनी स्वत: लिहिलेले मानपत्र वाचून दाखवले. यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, गरवारे कंपनी, हेडगेवार रूग्णालयातील विविध अधिकारी वर्ग आणि सामाजिक, शैक्षणिक सांस्कृतिक क्षेत्रातील विविध मान्यवरांची उपस्थिती होती.
अजातशत्रू
उद्योगपती उल्हास गवळी, हेडगेवारचे डॉ. अनंत पंढरे, जेहूरचे सरपंच बाळासाहेब पवार, विश्वास वसेकर, ओमप्रकाश मणियार यांनी अनिल भालेराव यांच्याविषयी मनोगत व्यक्त करताना त्यांचा अजातशत्रू भालेराव असा गौरव केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निलंबन कालावधीचे वेतन शिक्षकाला देण्याचे आदेश

$
0
0

म. टा .विशेष प्रतिनिधी,औरंगाबाद
किनवट तालुक्यातील शिक्षकाला निलंबन कालावधीचे वेतन देण्याचे आदेश मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिले आहेत.

मारोती शंकर वाघमारे हे राजीव गांधी माध्यमिक विद्यालय निचपूर (ता. किनवट) येथे शिक्षक म्हणून कार्यरत होते. २९ सप्टेंबर २०१० रोजी त्यांना सेवेतून निलंबित करण्यात आले होते. निलंबन आदेशाला त्यांनी शाळा प्राधिकरणाकडे आव्हान दिले. प्राधिकरणाने वाघमारे यांचे अपील मान्य करून शिक्षण अधिकाऱ्यांनी त्यांना सेवेत सामावून घेण्याचे आदेश दिले. या आदेशाला संस्थाचालकांनी खंडपीठात आव्हान दिले. खंडपीठाने २२ जानेवारी २०१४ रोजी संस्थाचालकाची याचिका फेटाळून निलंबन कालावधीचे वेतन देण्याचे आदेश दिले होते, मात्र शिक्षण अधिकाऱ्यांनी तीन महिन्यात निलंबन कालावधीचे वेतन न दिल्याने वाघमारे यांनी अवमान याचिका दाखल केली होती. मारोती वाघमारे यांच्यातर्फे गौतम कर्णे यांनी बाजू मांडली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


४५ शिक्षक परत पाठवा

$
0
0


म. टा. विशेष प्रतिनिधी, औरंगाबाद
शिक्षक म्हणून पदस्थापना झाल्यानंतर तहसील कार्यालय, निवडणूक विभागात अतिरिक्त कामासाठी प्रतिनियुक्तीवर असलेल्या ४५ शिक्षकांना झेडपीच्या सेवेत परत पाठवा, असे पत्र जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी जिल्हाधिकारी डॉ. निधी पांडेय यांना पाठविले आहे.
शिक्षक नसल्याने अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांची अडचण होत असल्याचे पत्रात नमूद केले आहे. त्यापुढे जात जर हे शिक्षक फेब्रुवारीअखेरपर्यंत मूळ पदस्थापनेच्या ठिकाणी रुजू झाले नाहीत, तर त्यांचे वेतन थांबविण्याची कार्यवाही केली जाण्याची शक्यता आहे. जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात शिक्षक म्हणून रूजू झालेल्या शिक्षकांना सरकारी कामासाठी अनेकवेळा प्रतिनियुक्तीवर जावे लागते. निवडणूक, जनगणना तसेच अन्य कामांसाठी हे शिक्षक जिल्हाधिकारी कार्यालय, तहसील कार्यालय तसेच अन्य ठिकाणी प्रतिनियुक्तीवर असतात. अनेक शिक्षक तब्बल पाच ते दहा वर्षांपासून विविध ठिकाणी प्रतिनियुक्तीवर आहेत. शिक्षणाचा हक्क कायदा २००९ नुसार प्रकरण चार कलम २७ नुसार शिक्षकांना अशैक्षणिक कामासाठी नेमू नये, असे म्हटले आहे. त्याचा आधार घेऊन सीइओ चौधरी यांनी नऊ फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी पांडेय यांना पत्र दिले आहे. त्या म्हटले आहे, की प्रतिनियुक्तीवर असलेल्या ४५ शिक्षकांना लवकरात लवकर रिलिव्ह करून मूळ पदस्थापनच्या
ठिकाणी पाठवावे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हे शिक्षक जर फेब्रुवारीअखेरपर्यंत रुजू झाले नाही तर त्यांचा पगार काढू नये, अशी भूमिका प्रशासनाने घेतली असून यांसदर्भात लवकरच पत्र काढले जाण्याची शक्यता आहे.
अनेकांना चाप
प्रतिनियुक्तीवर मूळ काम सोडून दुसरीकडे कार्यरत असलेल्या अनेक शिक्षकांना या पत्रामुळे चाप बसणार आहे. शिक्षकांव्यतिरिक्त झेडपीच्या सेवेतील ७४ जण अनेक ठिकाणी प्रतिनियुक्तीवर आहेत. त्यांनाही मूळ सेवेत बोलाविण्याच्या हालचाली प्रशासनाने केल्या आहेत. त्यामुळे अनेक कर्मचाऱ्यांची अडचण होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चौकशी समिती सदस्यांचेच नोंदवले जबाब

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
वक्फ बोर्डातील संगणक आणि साहित्य खरेदीत झालेल्या लाखोंच्या घोटाळ्याप्रकरणी बुधवारी चौकशी समितीतील सदस्यांचेच जबाब नोंदविण्यात आले. संबंधित साहित्य खरेदी प्रक्रियेचे कागदपत्रे ताब्यात घेतले आहेत. चौकशी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात येतील, अशी माहिती वक्फ बोर्डाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नसिम बानो पटेल यांनी दिली.
चौकशी समितीच्या अध्यक्षांनी समिती सदस्यांमधील अजीज अहेमद, सय्यद फैज, मौलाना अकिल यांच्यासह साहित्य खरेदीनंतर संबंधित कंपनीला धनादेश देणारे लेखाधिकारी मुज्जफ्फर सिद्दीकी यांचाही जबाब नोंदविला. चौकशी समितीने निलंबित अधिकारी झुलफिकार बेग यांना जबाबासाठी नोटीस पाठविण्यात आली होती. मात्र, बेग उपस्थित न झाल्याने, त्यांचा जबाब नोंदविता आला नाही. वक्फ बोर्डात रात्री उशिरापर्यंत जबाब नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती. या प्रकरणी संबंधित दोषींवर गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत, अशी माहिती नसिम बानो पटेल यांनी दिली.
५ फेब्रुवारीला केली नोंद
वक्फच्या पाच वर्षांपूर्वी खरेदी केलेल्या या साहित्याची नोंद ५ फेब्रुवारी २०१६ रोजी भांडार विभागात करण्यात आली आहे. या नोंदीसाठी काही साहित्य पानचक्की येथे आणले होते. ही माहिती लेखा विभागाच्या अधिकाऱ्याने केलेल्या सहीतून उघड झाली आहे.
तत्कालीन सीईओंवर कारवाईची शक्यता
वक्फ खरेदी घोटाळ्यात तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासह मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचे स्वीय सहाय्यक, लेखा विभागाचे लेखाधिकारी यांच्यासह अन्य काही अधिकारी यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

परीक्षा केंद्रांचे निकष डावलले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
बारावी परीक्षेत नियम धाब्यावर बसवित परीक्षा केंद्रांचे वाटप केल्याचे समोर आले आहे. २५० विद्यार्थ्यांमागे एक परीक्षा केंद्र असा नियम आहे. मंडळाच्या कारभाऱ्यांनी तब्बल ६६ परीक्षा केंद्रांसाठी या निकषाकडे दुर्लक्ष केले आहे. प्रशासनाचा अशा कारभाराबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

बारावीची परीक्षा गुरुवापासून तर, १ मार्चपासून दहावीची परीक्षा सुरू होत आहे. ऐन परीक्षेच्या काळात केंद्र बदलाची परंपरा मंडळाने यंदा नव्याने आणली आहे. मंडळाने यंदा आपलचे निकष गुंडाळून ठेवत बारावीसाठी परीक्षा केंद्र बहाल केले आहेत. परीक्षा केंद्र देण्याचा पहिला निकष विद्यार्थी संख्या असतो. २५० विद्यार्थी संख्येसाठी परीक्षा केंद्र दिले जाते, परंतु विभागात तब्बल ६६ परीक्षा केंद्र देताना हे निकष पाळले नाहीत. यातील अनेक केंद्र परीक्षेच्या तोंडावर देण्यात आले. परीक्षा केंद्र देताना भौतिक सुविधा पाहिल्या जातात. त्यात इमारत, सरंक्षक भिंत, जनरेटर, स्वच्छतागृहाचा समावेश आहे. या सुविधांसह २५० विद्यार्थी असतील तर केंद्राला मंजुरी दिली जाते. त्याची प्रक्रिया ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होते, परंतु निकषांना डावलत केंद्र मंजूर करण्यात आले. बारावीचे परीक्षा केंद्र देतानाचा झालेला हा गोंधळ दहावीच्याबाबतही असल्याचे बोलले जात आहे.

औरंगाबाद जिल्ह्यात २० केंद्र
६६ परीक्षा केंद्रापैकी काही ठिकाणी तर दीडशे विद्यार्थ्यांसाठी देण्यात आले आहे. औरंगाबाद जिल्ह्यात यापैकी २० केंद्र आहेत. सोयीच्या केंद्रासाठी मंडळात अनेक संस्थांचालकांनी हजेरी लावली होती. केंद्र बदलण्यासाठी अनेकांनी प्रयत्न केले. यातून हे बदल झाल्याचे बोलले जात आहे.

विद्यार्थी संख्या न पाहता दिलेले केंद्र
जिल्हा.......संख्या
औरंगाबाद....२०
बीड.............१८
जालना.........९
परभणी........१४
हिंगोली........५

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

८० लाखांचा कर थकल्याने ढोबळेंच्या संस्थेला टाळे

$
0
0


देविदास त्रिंबके, वाळूज
राष्ट्रवादी कॉँग्रेसेचे नेते आणि माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांच्या पंढरपूर येथील शाहू शिक्षण संस्थेला ८० लाखांचा कर थकल्याप्रकरणी सिडकोने बुधवारी टाळे ठोकले. त्यामुळे येथे भरणाऱ्या माता रमाबाई आंबेडकर महिला लॉ कॉलेजचे वर्ग बंद झाले आहेत.
सिडको वाळूज महानगर १ मध्ये लक्ष्मण ढोबळे यांच्या शाहू शिक्षण संस्थेचे रमाबाई आंबेडकर महिला लॉ कॉलेज प्लॉट क्रमांक ५५५ येथे आहे. सिडकोने शिक्षण संस्थेसाठी हा प्लॉट आरक्षित केला असून त्याचे बांधकाम देखील सिडको प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. सिडकोने उभारलेल्या या इमारतीमध्ये ढोबळे यांच्या संस्थेचा कारभार सुरू आहे. मात्र, इमारतीच्या एकूण रकमेपैकी २० लाखांचा कर माफ करावा, अशी मागणी गेल्या काही दिवसांपासून संस्थेच्या वतीने करण्यात येत होती. त्यावर कोणताच निणर्य न झाल्याने सिडको प्रशासनाने २० लाखांच्या व्याजापोटी ८० लाख भरण्याची नोटीस संस्थेला बजावली होती. या नोटीसाला कोणतीच दाद न दिल्याने बुधवारी सिडको प्रशासनाने संस्थेला टाळे ठोकले. इमारतीत मुक्कामी असणाऱ्या वॉचमन बाहेर काढले. त्यामुळे वॉचमनचा संसार उघड्यावर आला आहे.
रक्कम माफीची तरतूदच नाही
'या शिक्षण संस्थेकडे मोठी रक्कम थकित आहे. या संस्थेला अनेकदा नोटीस बजावून पैसे भरण्यास सांगितले. मात्र, त्यावर संस्थेने कोणताच निणर्य घेतला नाही. उलट रक्कम माफी मिळण्याची मागणी केली. तशी कोणतीच तरतूद नसल्याने त्यांची मागणी अमान्य केली होती. तसेच सिडकोच्या वतीने २६ नोव्हेंबर रोजी नोटीस दिली होती. त्यानंतर आज कारवाई पूर्ण केली,' अशी माहिती सिडकोचे प्रशासकीय अधिकारी हनुमंत आरगुंडे यांनी दिली.
-
शाहू शिक्षण संस्थेने अनेकदा प्रशासनाकडे २० लाख रुपयांच्या माफीचा अर्ज केला आहे. मात्र, त्यावर सिडकोने निणर्य घेतला नाही. त्यावर व्याज लावून तब्ब्ल ८० लाख रुपयांचा टॅक्स आकारला आहे. आज मात्र कोणतीही पूर्व सूचना न देता जप्तीची कारवाई केली. कारवाई पूर्वी कळविले असते तर हा प्रश्न हप्ते पाडून सुटला असता. मात्र सरकार त्यांचे आहे.
- लक्ष्मण ढोबळे, माजी मंत्री

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मी कारभारीण : जिद्दीतून स्वावलंबी

$
0
0

Unmesh.Deshpande@timesgroup.com
श्रुती अभ्यंकर या बेगमपुरा येथील विद्युत कॉलनीमध्ये राहतात. अभ्यंकर गृहोद्योग या नावाने सहा महिन्यांपूर्वी त्यांनी आपला छोटासा व्यवसाय सुरू केला आहे. व्यवसाय सुरू करताना एकदम त्यांनी या क्षेत्रात उडी घेतली नाही तर, त्यासाठी त्यांनी प्रशिक्षण घेतले. मार्केटिंगची पॉलिसी काय असते हे शिकून घेतले. कोणता व्यवसाय निवडायचा याबद्दल चिकित्सक होऊन अभ्यास केला. तज्ज्ञांनी चर्चा केली आणि दिवाळी-दसऱ्याच्या सुमारास अभ्यंकर गृहोद्योग सुरू केला.

उद्योग सुरू करण्यामागील प्रेरणा सांगताना त्या म्हणतात, 'नोकरी तर करायची नव्हती, पण घरात रिकामे बसून तरी काय करायचे, असा विचार मनात होता. त्यातून विविध प्रकारचे पीठ आणि कोरड्या चटण्या विकण्याचा व्यवसाय सुरू करण्याचे मनात नक्की केले.'

हा व्यवसाय सुरू करण्यासाठी महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राचा एका महिन्याचा कोर्स त्यांनी पूर्ण केला. व्यवसाय कोणता निवडावा, निवडलेल्या व्यवसायाचे मार्केटिंग कसे करावे, हे त्यांना एका महिन्याच्या अभ्यासक्रमात शिकवण्यात आले. त्यानंतर त्यांनी विविध प्रकारचे पीठ आणि कोरड्या चटण्या विकण्याचे काम सुरू केले. श्रुती अभ्यंकर यांनी हा व्यवसाय सुरू करण्यापूर्वी दोन वर्षे टप्परवेअरच्या एजंट म्हणून काम केले. दुसऱ्यांसाठी काम करण्यापेक्षा स्वतःच काही तरी सुरू करावे असे त्यांना वाटले आणि त्यांनी हा व्यवसाय सुरू केला. थालेपीठ, पौष्टिक पीठ, उपासाची भाजणी, मेतकूट, एसर, सातूचे पीठ अशी तयार करून त्याची विक्रीचा निर्णय त्यांनी घेतला. पिठाबरोबर कोरड्या चटण्याही करण्याची कल्पना त्यांच्या मनाला आली. त्यांनी मनाचा पक्का निश्चय करून या क्षेत्रात उडी घेतली. विविध प्रकारचे पीठ खराब होत नाही. व्यवस्थित पॅक करून ते विकले तर, त्याला मोठी मागणी येऊ शकते, असेही त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांनी पीठ तयार करण्यासाठी घरगुती पद्धतीची छोटीशी गिरणीच खरेदी केली. पिठासाठी लागणारे विविध धान्य त्या मोंढ्यातून खरेदी करतात. धान्य आणल्यावर आपल्या घरच्यांच्या मदतीने त्या ते स्वच्छ केले जाते. त्यानंतर ऑर्डर मिळेल तसे पीठ दळून दिले जाते.

श्रुती अभ्यंकर यांची बेगमपुरा, विद्युत कॉलनीत महिलांशी मोठा संपर्क आहे. विविध उपक्रमाच्या निमित्ताने एकत्र येणाऱ्या महिला त्यांच्या या गृहोद्योगासाठी ग्राहक बनल्या आहेत. श्रुतीताईंनी तयार केलेले पीठ चांगलेच असते, याची खात्री आता या भागातील महिलावर्गाला आहे. त्यामुळे त्यांच्याकडूनच पीठ आणि चटणी खरेदी करण्यासाठी त्या प्राधान्य देऊ लागल्या आहेत. वैयक्तिक संपर्कातील महिला आपल्याकडून पीठ व चटण्या नेतात, यावर समाधान न मानता अभ्यंकर विविध शाळा आणि कार्यालयात पोचल्या. महिलांची संख्या जास्त असलेल्या शाळेत किंवा कार्यालयात जाऊन आपल्या प्रोडक्टची माहिती देणे. त्याची विक्री करणे हे काम त्यांनी सुरू केले. त्याला प्रतिसादही चांगला मिळू लागला. कामात शिस्त आणि विक्रीसाठी उपलब्ध करून द्यायच्या वस्तूंचा चांगला दर्जा यामुळे त्यांच्याशी जोडल्या जाणाऱ्या महिला ग्राहकांची संख्या वाढू लागली आहे. आता विविध दुकानांमध्ये आपले उत्पादन असले पाहिजे, असे त्यांनी ठरविले आहे. त्यानुसार औरंगपुरा भागातील दोन-तीन दुकानात त्यांनी तयार केलेले पीठ आणि चटण्या विक्रीसाठी उपलब्ध आहेत, ही माहिती त्या अभिमानाने सांगतात. जास्तीत जास्त दुकानांमधून आपली उत्पादने विक्रीसाठी उपलब्ध असली पाहिजेत, असे त्यांचे ध्येय आहे. पीठ आणि चटण्या तयार करण्यासाठी रोज तीन तासांचा वेळ द्यावा लागतो. घरातली नित्याची कामे उरकल्यावर त्या पीठ आणि चटण्यांसाठी वेळ देतात. प्रत्येक महिलेने स्वावलंबी बनले पाहिजे, स्वतःच्या पायावर उभे राहिले पाहिजे, असे त्यांना वाटते. आपण प्रामाणिकपणे व्यवसाय केला तर त्याला प्रतिसादही चांगला मिळतो. दोन पैसे जास्त कमावण्याच्या मागे न धावता प्रामाणिकपणे व्यवसाय करण्याचे व्रत अंगीकारले तर, ग्राहकही आपल्यावर विश्वास ठेवतात, असे त्या सांगतात.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहराजवळ असूनही तहानलेले

$
0
0


सुनील पांडव, सातारा
औरंगाबाद शहरापासून फक्त पाच किलोमिटर अंतरावरील निपाणी येथेही पाणीटंचाईचे चटके बसत आहेत. या गावापासून जवळच शेंद्रा एमआयडीसीमध्ये २४ तास पाणी आहे. शेजारच्या औरंगाबादमध्ये दोन दिवसाआड पिण्याचे पाणी मिळते. हे पाहून निपाणीकरांच्या डोळ्यात पाणी येत आहे.
बीड रस्त्यावरील निपाणीमध्ये १२५ कुटुंब राहतात. अठराशे लोकसंख्या व बाराशे मतदार असलेले हे गाव मागील तीन वर्षांपासून पाऊस न पडल्याने दुष्काळाच्या झळा सोसत आहे. गावकऱ्यांना सध्या ग्रामपंचायतीकडून २० दिवसानंतर कसेबसे अर्धा ड्रम पाणी मिळते. मार्चनंतर तेही मिळणे अवघड असल्याचे गावकऱ्यांनी सांगितले. खासगी टँकरचे पाणी घेणे परवडण्यासारखे नसल्यामुळे येथील महिलांना दोन ते तीन किलोमिटर अंतरावरून पाणी आणावे लागते. त्यांचा अर्धा दिवस पाणी भरण्यात जात आहे.
गावात पाच वर्षांपूर्वी राष्ट्रीय पेयजल योजनेतून ६० हजार लिटर क्षमतेची टाकी बांधण्यात आली. शिवाय गावातील दोन विहिरी व तीन हातपंप हे पाण्याचे स्रोत आहेत. परंतु, मागील तीन वर्षांपासून पाऊस झाला नसल्याने जमिनीतही पाणी नाही. तेव्हा विहिरी व हातपंप कोरडे पडले आहेत. गावात कोणत्याही वेळेला फेरी मारली तर, ग्रामसंसदेच्या जवळ असलेल्या जलशुद्धीकरण प्लांटवर फिल्टर झाल्यानंतर राहिलेले वापरासाठीचे पाणी भरण्यासाठी हंड्यांची रांग लागलेली दिसते. मागच्या वर्षी जिल्हा प्रशासनातर्फे टँकरने पाणी पुरवण्यात आले. परंतु, पहिला पाऊस होताच टँकर बंद झाला. यावर्षी महिनाभरापूर्वीच टँकर सुरू करण्यासाठी प्रस्ताव दिला, परंतु अद्याप टँकर येत नसल्याचे उपसरपंच कमलबाई ठोंबरे यांनी सांगितले. त्यामुळे टंचाईची तीव्रता अधिक जाणवत आहे. खासगी टँकरद्वारे ३० रुपयांला एक ड्रम पाणी विकत घेणे गावकऱ्यांच्या आवाक्याबाहेर आहे. येथील महिला तीन किलोमिटर अंतरावरील डोंगरपायथ्यापासून हंडाभर पाणी आणतात. काही जण बैलगाडीत ड्रम टाकून पाणी आणतात. गावातील बोअरला हंडाभर पाणी आल्यावर पुन्हा तीन, चार तास वाट पाहावी लागते. गावकऱ्यांना वीस, वीस दिवस पाणी मिळत नसल्याची तक्रार मंदाबाई खंडागळे यांनी केली. तीन किलोमीटर पायपीट करून पाणी आणणे रोजचेच झाल्याचे सुभद्राबाई भालेकर म्हणाल्या. शेतात पाणी नाही. माणसांना प्यायाला पाणी नाही तशीच स्थ‌िती जनावरांची असल्याचे ध्रुपदाबाई खंडागळे यांनी दिली. पाणीच नसल्यमुळे अशोक भुलेकर यांच्या शेतातील शेकडो मोसंबीची झाडे जळून गेली. येथून जवळच असलेल्या एमआयडीसी भागात २४ तास पाणी मात्र गावकऱ्यांना प्यायाला पाणी नाही, अशी गावची स्थ‌िती असल्याचे पुंजाराम तापकिरे म्हणाले.
गावकऱ्यांना कमी पैशात शुद्ध पाणी मिळावे यासाठी अडीच वर्षांपूर्वी फिल्टर प्लाण्ट उभारण्यात आला. त्यात २ रुपयांचे नाणे टाकल्यावर ८ लिटर शुद्ध पाणी मिळायचे. परंतु, आता हा प्लाण्टही पाण्याअभावी बंद पडण्याच्या स्थितीत असल्याचे ज्योती आनंद भालेकर यांनी सांगितले. या गावाची जलयुक्त शिवार योजनेसाठी निवड झालेली आहे. पण त्याचे काम अद्याप सुरू झालेले नाही.
दूध संकलनात घट
गावाचे उत्पन्नाचे मुख्य साधन शेती आहे. त्याच्या जोडीला गावकरी दुग्धव्यवसाय करतात. एकेकाळी येथून दररोज एक हजार लिटर दूध जिल्हा दूध संघात दिले जात होते, आता हे दूध संकलन फक्त १७५ लिटरवर आले आहे. पाणी व चाराटंचाईमुळे गावकऱ्यांनी अर्ध्यापेक्षा जास्त जनावरे विकली आहेत. परिणामी गावचे दूध संकलन घसरले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पालिकेचे बजेट ६९ कोटींनी वाढले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
महापालिकेच्या २०१५-१६ या आर्थिक वर्षाच्या बजेटला महापौर त्र्यंबक तुपे यांनी अंतिम रूप दिले. स्थायी समितीने केलेल्या बजेटमध्ये ६९ कोटी ५ लाख रुपयांची वाढ करून तब्बल ९५२ कोटी ९१ लाख रुपयाचे बजेट प्रशासनाला दिले. आर्थिक वर्ष संपताना वाढ करून अंतिम करण्यात आलेल्या बजेटची अंमलबजावणी कितपत होईल याबद्दल शंका आहे.

महापालिकेचा २०१५-१६ या वर्षाचा अर्थसंकपल्प अंतिम करण्याचे अधिकार सर्वसाधारण सभेने महापौरांना दिले होते. त्यानुसार सर्व स्तरावर चर्चा करून महापौर तुपे यांनी बुधवारी बजेटला अंतिम रूप दिले. अंमलबजावणीसाठी ते प्रशासनाला सादर केले. स्थायी समितीने सर्वसाधारण सभेला ८८३ कोटी ८६ लाख रुपयांचे बजेट सादर केले होते. त्यात महापौरांनी ६९ कोटी पाच लाखांची भर घालून ९५२ कोटी ९१ लाख रुपयांचे बजेट तयार केले. महापौरांनी तयार केलेले बजेट ९५२ कोटी ८० लाख रुपये खर्चाचे असून, ११ रुपये शिल्लकीचे आहे.

बजेटमध्ये २० ठळक मुद्यांचा समावेश आहे. त्यात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक उभारण्यासाठी एक कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. छत्रपती शिवाजी महाराज पुराणवस्तू संग्रहालयाच्या परिसरात नवीन हॉल बांधून संशोधन केंद्र सुरू करण्यासाठी ५० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. क्रांतिचौकातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याच्या सुशोभीकरणासाठी २५ लाख रुपये, झाशी राणी उद्यानाच्या नुतनीकरणासाठी २५ लाख रुपये, शहरातील जुन्या विहिरी व नहरींचे संवर्धन करणे, साफसफाई करणे यासाठी १ कोटी रुपये, शहरातील सर्व प्रभागात वृक्षारोपण व ट्रीगार्डसाठी प्रतिवॉर्ड एक लाख रुपये या प्रमाणे १ कोटी १५ लाख रुपये, महापालिका शाळांच्या इमारतींची दुरुस्ती, स्वच्छतागृहांचे बांधकाम यासाठी १ कोटी रुपये, ओपन जीमसाठी ५० लाख रुपये अशा विविध उपक्रमांचा त्यात समावेश करण्यात आला आहे.

प्रत्येक वॉर्डासाठी २५ लाख
प्रत्येक वॉर्डातील विकास कामांसाठी २५ लाख रुपयांची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. हैदराबाद मुक्तिसंग्राम संग्रहालयाच्या विस्तारीकरणासाठी तीन कोटी रुपयांची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पालिकेची शाळा आयएसओ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
मयूरबन कॉलनीतील महापालिकेच्या प्रियदर्शनी शाळेला आयएसओ ९००१ ः २००८ हे मानांकन प्राप्त झाले आहे. या शाळेला नुकतेच आयएसओ मानांकन प्रमाणपत्र प्राप्त झाले. आयएसओ मिळविणारी महापालिकेची ही दुसरी शाळा आहे. यापूर्वी मुकुंदवाडीच्या शाळेला आयएसओ मानांकन मिळाले आहे.

महापालिकेच्या काही चांगल्या शाळांमध्ये प्रियदर्शनी शाळेचा समावेश होतो. विविध उपक्रम राबवून शाळेने आपले वेगळे अस्तित्व निर्माण केले आहे. ज्ञानरचनावादातून या शाळेतील विद्यार्थी स्वतः शिक्षण घेतात. त्यांना शिक्षक फक्त मार्गदर्शन करतात. या शाळेचे विद्यार्थी पॉवर लिफ्टिंग आणि कुस्ती या क्रीडा प्रकारांत राज्यस्तरापर्यंत धडक मारली आहे. दहावीच्या परीक्षेत गेल्यावर्षी या शाळेची विद्यार्थिनी महापालिकेच्या शाळेतून सर्वप्रथम आली होती. नवउपक्रमात या शाळेच्या शिक्षिका रश्मी होनमुटे यांच्या उपक्रमाला राज्यस्तरीय पारितोषिक मिळाले. मुख्याध्यापक संजीव सोनार यांच्या पुढाकाराने शाळेत विविध शैक्षणिक उपक्रम राबविले जातात. संपूर्ण शाळेला रंगरंगोटी करण्यात आली आहे, शाळेचे उद्यान विकसित करण्यात आले आहे, प्रत्येक वर्गाच वैशिष्ट्यपूर्ण चित्र काढण्यात आली असून, कंपाउंडवर वारली पेंटिंगच्या माध्यमातून चित्र काढण्यात आली आहेत. क्रीडांगणावर खो खो, कब्बडी या खेळासाठीची आखणी करण्यात आली आहे. यासाठी शाळेला लायन्स क्लबचे सहकार्य लाभले. विविध उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांच्या गैरहजेरीचे प्रमाणही कमी झाले आहे. शाळेला आयएसओ मानांकन मिळाल्याबद्दल महापौर त्र्यंबक तुपे, उपमहापौर प्रमोद राठोड, सभापती दिलीप थोरात, सभागृहनेता राजेंद्र जंजाळ, आयुक्त सुनील केंद्रेकर, शिक्षण सभापती शिवाजी दांडगे, नगरसेविका स्मिता घोगरे यांनी शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षकांचे अभिनंदन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘राज’ वियोगाने आमटे हळहळले!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

डॉ. प्रकाश आमटे यांनी बिबट्यांच्या डोक्यावरून हात फिरवून निरोप दिला. दिल्या घरी सुखी रहा, असेच त्यांना म्हणायचे होते. बिबट्याची जोडी औरंगाबादच्या दिशेने निघाली आणि आमटेज् अॅनिमल अर्क मधील स्वयंसेवकांचे डोळे पाणावले. हेमलकसातील दोन बिबटे महापालिकेच्या प्राणिसंग्रहालयात बुधवारी सकाळी दाखल झाले.

भामरागड, हेमलकसा येथील डॉ. प्रकाश आमटे यांच्या आमटेज् अॅनिमल अर्क मधील बिबट्याची एक जोडी औरंगाबादच्या प्राणिसंग्रहालयासाठी देण्याची परवानगी सेंट्रल झू ऑथॅरिटीने दिली. त्यानुसार प्राणिसंग्रहालयाचे एक पथक रविवारी सकाळी हेमलकसाला रवाना झाले. या पथकाचे नेतृत्व प्राणिसंग्रहालयाचे संचालक डॉ. बी. एस. नाईकवाडे यांनी केले. त्यांच्या बरोबर कार्यालयीन अधीक्षक संजय नंदन, कर्मचारी सोमनाथ मोटे, खलील, जिया, सुनील मधाडे, अब्दुल खमर होते. डॉ. प्रकाश आमटे यांना अनाथ अवस्थेत बिबट्याची दोन पिल्ले सापडली होती. त्यांनी त्या पिल्लांना वाढवले. त्यांची नावे राजा आणि रेणुका अशी ठेवली. राजा आता ७ वर्षांचा असून रेणुका चार वर्षांची आहे. राजा-रेणुकाला पालिका पथकाच्या ताब्यात देताना हेमलकसातील वातावरण अत्यंत भावनिक झाले होते. डॉ. प्रकाश आमटे यांनी राजा आणि रेणुका या दोघांनाही जवळ घेतले. त्यांच्या डोक्यावरून हात फिरवला. त्या तिघांच्या भावनांची देवाणघेवाण झाली. यावेळी तेथील स्वयंसेवकही भावूक झाले. राजा आणि रेणुकाला औरंगाबादला हलवण्यासाठी वेगवेगळ्या पिंजऱ्यात बंदीस्त केले. तेव्हाही प्रकाश आमटे यांनी पिंजऱ्यापर्यंत जाऊन त्यांची पाहणी केली, यावेळी त्यांच्या बरोबर त्यांचा पाच वर्षाचा नातू अर्णव होता. त्यानेही बिबट्याला गोंजारले.

बुधवारी सकाळी आठच्या सुमारास बिबट्याची जोडी घेऊन पालिका पथक परतले. सध्या या दोन्ही बिबट्यांना एका स्वतंत्र पिंजऱ्यात ठेवले आहे. चार - पाच दिवस त्यांना याच पिंजऱ्यात ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर त्यांना खुल्या पिंजऱ्यात सोडले जाणार आहे. महापौर त्र्यंबक तुपे यांनी सायंकाळी प्राणिसंग्रहालयात येऊन राजा आणि रेणुकाची पाहणी केली. त्यांच्या प्रकृतीची आवश्यक ती काळजी घेण्याची सूचना डॉ. नाईकवाडे यांना दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एटीएम कार्ड बदलून ७५ हजारांची फसवणूक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, वैजापूर
तालुक्यातील हनुमंतगाव येथील शेतकऱ्याला एटीएममधून पैसे काढण्यास मदत करण्याच्या बहाण्याने कार्डची अदलाबदल करून एका भामट्याने ७५ हजार रुपये काढल्याची घटना सोमवारी घडली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फसवणूक करणारा हा भामटा एटीएम सेंटरमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
हनुमंतगाव येथील रावसाहेब फाळके हे सोलापूर येथे खाजगी कंपनीत कामाला आहेत. त्यांनी आपले स्टेट बँक ऑफ हैदराबादमधील खात्याचे एटीएम कार्ड गावी आपले काका वेणुनाथ नारायण फाळके यांच्याकडे ठेवले होते. रावसाहेब यांना सोमवारी सायंकाळी खात्यातून ४ वेळा प्रत्येकी १० हजार रुपये काढल्याचा संदेश आल्याने त्यांनी काकांकडे चौकशी केली; त्यावर वेणुनाथ यांनी सोमवारी पैसे काढण्यासाठी एटीएम सेंटरमध्ये गेले होतो. त्यावेळी सेंटरमध्ये लोकांची गर्दी होती. पैसे काढण्याचा प्रयत्न केला मात्र ते मिळाले नाही. त्यावेळी पैसे काढण्यात अडचण येत असल्याचे पाहून मागे उभा असलेला एक तरुण पुढे आला व मला तुमचे कार्ड द्या मी तुम्हाला पैसे काढून देतो, असे म्हटले. वेणुनाथ यांनी त्याच्याकडे आपले कार्ड दिले. त्यानंतर त्यांनी त्या तरुणाने त्यांचे एटीएम कार्ड परत दिल्यावर ते तेथून निघून निघून गेल्याचे सांगितले. दरम्यान, मंगळवारी पुन्हा रावसाहेब यांच्या खात्यावरून ३५ हजार रुपये काढण्यात आल्याचा संदेश त्यांना मोबाइलवर आला. याप्रकरणी रावसाहेब फाळके यांनी दिलेल्या तक्रारीवरून वैजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हेल्मेटधारी दुचाकीस्वाराने पर्स पळवली

$
0
0

हेल्मेटधारी दुचाकीस्वाराने पर्स पळवली
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

पादचारी महिलेची दुचाकीस्वाराने पर्स लंपास केली. बुधवारी दुपारी जय विश्वभारती कॉलनी येथे दुपारी हा प्रकार घडला. या प्रकरणी जवाहरनगर पोलिस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंगळवारी देखील दुचाकीस्वाराने हडको एम २ भागात पादचारी महिलेची पर्स लंपास केल्याची घटना घडली होती.

लीना संदीप डांगे (वय ३४ रा. मोनालिसा, टिळकनगर) ही महिला बुधवारी दुपारी जय विश्वभारती कॉलनीतून ‌घरी पायी जात होती. यावेळी दुचाकीवर आलेल्या व लाल रंगाचे हेल्मेट घातलेल्या दुचाकीस्वाराने त्यांच्या खांद्यावर असलेली पर्स हिसकावत पलायन केले. या पर्समध्ये रोख १५ हजार रुपये व मोबाइल असा साडेसोळा हजारांचा ऐवज होता. लीना डांगे यांनी आरडाओरड करेपर्यंत काही सेकंदातच हा दुचाकीस्वार पसार झाला. या प्रकरणी डांगे यांच्या तक्रारीवरून अज्ञात दुचाकीस्वाराविरुद्ध पोलिस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दोन दिवसातील दुसरी घटना

दुचाकीस्वाराने पादचारी महिलेची पर्स पळवल्याची लागोपाठ दोन दिवसातील ही दुसरी घटना आहे. मंगळवारी प्र‌विणा कुलभूषण अन्नदाते (वय ४० रा. एन ९, एम २ हडको) ही महिला साई कोचिंग क्लासेस समोरून दुपारी दीड वाजता पायी जात होती. यावेळी पाठीमागून आलेला दुचाकीस्वार त्यांच्या हातातील पर्स हिसकावून पसार झाला. या पर्समध्ये रोख रक्कम मोबाइल आदी ऐवज होता. या प्रकरणी सिडको पोलिस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांना आव्हान

दुचाकीस्वार चोरट्याकडून यापूर्वी मंगळसूत्र पळवण्यात येत होते. आता त्यांनी पर्स पळवण्यावर भर दिल्याचे या घटनांतून दिसून येत आहे. हेल्मेटमुळे त्याचा चेहरा देखील दिसत नसल्याने त्याचे वर्णन सांगणे देखील अवघड ठरत आहे. पोलिसांसमोर हेल्मेटधारी चोरांचे आवाहन निर्माण झाले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निधी प्राप्त होऊनही मानधन प्रलंबित

$
0
0

वैजापूर : निवडणुकीच्या कामासाठी नियुक्त करण्यात आलेल्या तालुक्यातील दोन हजार शिक्षकांचे मानधन गेल्या सहा वर्षांपासून प्रलंबित आहे. तहसील कार्यालयाला १५ लाख रुपयांचा निधी प्राप्त होऊनही शिक्षकांना त्याचे वाटप करण्यास टाळाटाळ होत असल्याचा आरोप शिक्षक सेनेचे जिल्हाध्यक्ष शाम राजपूत यांनी केला आहे.
वैजापूर तालुक्यात २०१० मध्ये झालेल्या १०६ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी प्रशासनाने केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी म्हणून १४८३ शिक्षकांची नियुक्ती केली होती. या शिक्षकांना सरासरी ७ लाख ११ हजार ५०० रुपयांचे मानधन मिळणे अपेक्षित आहे. २०१२ मध्ये झालेल्या २९ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी नेमलेल्या ४५० शिक्षक कर्मचाऱ्यांना दोन लाख २५ हजार रुपयांचे मानधन मिळणार आहे. २०१४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत काम केलेल्या १८७ कर्मचाऱ्यांचा आपत्कालिन भत्ताही अद्याप प्रलंबित आहे. ग्रामपंचायत निवडणुकीचा खर्च भागवण्यासाठी जिल्हास्तरावरून तहसील कार्यालयाला १५ लाख रुपयांचा निधी पाठवण्यात आला आहे. परंतु सहा वर्षे होऊनही या निधीचे वाटप केले जात नाही तसेच हा निधी कुठे खर्च करण्यात आला याचाही खुलासा प्रशासनाकडून होत नाही. त्यामुळे लाखो रुपये मानधनाच्या वाटपात सावळागोंधळ निर्माण झाल्याचा आरोप होत आहे. शिक्षक सेनेतर्फे विचारणा होऊनही प्रशासनाकडून दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा दिला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images