Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

शिवदीप महोत्सवात क्रांतिचौक उजळला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त गुरुवारी (१८ फेब्रुवारी) संभाजी ब्रिगेडतर्फे क्रांतिचौकात ३८६ दिवे लावून शिवदीप महोत्सव साजरा करण्यात आला. शिवरायांच्या पुतळ्याभोवती लावण्यात आलेल्या दिव्यांमुळे संपूर्ण क्रांतिचौक परिसर उजळून निघाला.

शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर '३८६ राजे' असे पणत्यांनी लिहिण्यात आले होते. त्यामुळे हा परिसर उजळून निघाला. हा सुंदर सोहळा उड्डाणपुलावरून पाहण्यासाठी वाहनधारकांची मोठी गर्दी झाली होती.

यावेळी संभाजी ब्रिगेडचे महानगर अध्यक्ष योगेश डेरे, सचिन मगर, आकाश पाटील, वैभव तांदळे, दिनेश जगदाळे, सुमीत पवार, सुमीत मेलगर, पवन बावस्कर, रुपेश पाटील, भागवत मगरे व अन्य पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


बारावीची कॉपी‘युक्त’ परीक्षा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
शिक्षण मंडळाची कॉपीमुक्त अभियानाची घोषणा फसवी ठरली आहे. शहरातील केंद्रांवर कडेकोट बंदोबस्त असला तरी, ग्रामीण भागात मुक्तपणे कॉपी करण्यात येत होती. त्याचबरोबर औरंगाबादजवळ असलेल्या टाकळी कोलते येथील बाबासाहेब भाऊ आकात केंद्रात तर, चक्क परीक्षार्थी खाली बसून परीक्षा देत आहेत. पाथरीच्या राजर्षी शाहू उच्चमाध्यमिक विद्यालयात एका बाकावर अनेक विद्यार्थ्यांना बसविण्यात आले होते.

माध्यमिक व उच्चमाध्यमिक शिक्षण मंडळातर्फे बारावीची परीक्षा गुरुवारपासून (१८ फेब्रुवारी) सुरू झाली. पहिल्याच पेपरला ग्रामीण भागातील परीक्षा केंद्रावर मंडळाचा कॉपीमुक्तीचा दावा खोटा ठरल्याचे समोर आले. परीक्षा केंद्र देताना भौतिक सुविधाही पाहिल्या जातात, परंतु मंडळाने त्याकडे डोळेझाक करत परीक्षा केंद्र दिल्याचे समोर आले आहे. फुलंब्री ते राजूर रोडवरील कोलते टाकळीयेथील बाबासाहेब भाऊ आकात कनिष्ठ महाविद्यालय केंद्रावर विद्यार्थ्यांना चक्क जमिनीवर बसून परीक्षा द्यावी लागली. शाळेत पुरेसे बाक नाहीत. त्यामुळे केंद्राबाहेर मैदानात बाक ठेवण्यात आले. विद्यार्थी मात्र खालीबसून परीक्षा देत होते. या केंद्रावर ४९७ विद्यार्थी परीक्षा देत आहेत. केंद्रावर अनेकांचा मुक्तपणे वावर होता. सुविधा नसलेली परीक्षा केंद्र दिलीच कशी, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. खामगाव येथील श्री गोरक्ष उच्चमाध्यमिक विद्यालयात केंद्रप्रमुखापेक्षा संस्थाचालकांचाच अधिक वावर होता. येथे काही परीक्षा हॉलमध्ये एका बाकावर दोन विद्यार्थी बसलेले होते. पाथरी येथील राजर्षी शाहू उच्चमाध्यमिक विद्यालयात एका बाकावर दोन विद्यार्थी बसून पेपर देत होते. काही परीक्षा हॉलमध्ये एकत्र बसून परीक्षा देण्याचा प्रकारही सुरू होता.

माध्यमिक व उच्चमाध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या बारावी परीक्षेला गुरुवारपासून सुरुवात झाली. पहिल्या दिवशी विभागात १७ विद्यार्थ्यांवर कॉपी प्रकरणी कारवाई करण्यात आली आहे. त्यात सर्वाधिक १० विद्यार्थी जालना जिल्ह्यातील आहेत.

यावर्षी औरंगाबाद विभागातून १ लाख ४२ हजार ४२६ विद्यार्थी परीक्षेला बसले आहेत. त्यात ९० हजार ४४३ विद्यार्थी आणि ५१ हजार ९८३ विद्यार्थिनी आहेत. पहिल्या दिवशी एकूण १७ विद्यार्थी कॉपी करताना आढळल्याचे मंडळाने स्पष्ट केले आहे. हे विद्यार्थी जालना, बीड आणि औरंगाबाद जिल्ह्यातील आहेत.

केंद्रावर पहारा
ग्रामीण भागातील केंद्राबाहेर संबंधित संस्थेतील एक कर्मचारी किंवा शिपाई पहाऱ्यासाठी उभा असल्याचे आढळले. अनेक केंद्रावर बाहेरून पथक येणार असल्याची माहिती आधीच पोचविली जाते. त्यावेळी केंद्रात सर्व सुरळीत असल्याचे चित्र निर्माण केले जाते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रेल्वेचे डबे सोडून इंजिन एक किमी पुढे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद/वैजापूर

जनशताब्दी एक्स्प्रेसचे डबे सोडून रेल्वे इंजिन एक किलोमीटर पुढे धावल्याची घटना गुरुवारी रात्री रोटेगावजवळ घडली. यामुळे गाडीतील प्रवाशांत प्रचंड गोंधळ माजला होता. मात्र, या घटनेत कसलिही जीवित हानी झाली नाही. दोन तासानंतर औरंगाबाद येथून आलेले दुसरे इंजिन जोडल्यानंतर एक्स्प्रेस गाडी औरंगाबादकडे रवाना झाली.

सीएसटी जालना जनशताब्दीला (क्रमांक१२०७१) रोटेगाव येथे थांबा नाही. रात्री साडेसातच्या सुमारास एक्स्प्रेसने रोटेगावचे होम सिग्नल पार केल्यानंतर अचानक गाडीचे कपलिंग तुटले. त्यामुळे गाडीचे सर्व डबे रोटेगावपासून मनमाडच्या दिशेने एक किमी अंतरावर पुलाजवळ थांबले. जनशताब्दी एक्स्प्रेस रोटेगाव स्टेशनजवळ उभी राहिल्याने काचिगुडा मनमाड (नगरसोल पँसेंजर) या गाडीला करंजगावजवळ थांबवण्यात आले होते. त्यामुळे रोटेगावच्या प्रवाशांना पोहचण्यास तब्बल दोन तास उशीर झाला. रात्री दहा वाजता नगरसोल पँसेंजर रोटेगावला पोहचली. दोन तासानंतर औरंगाबाद येथून आलेले दुसरे इंजिन जोडल्यानंतर जनशताब्दी एक्स्प्रेस गाडी औरंगाबादकडे रवाना झाली. सुदैवाने या घटनेत कुठलीही जीवित हानी झाली नाही. दरम्यान, एक्स्प्रेसचे इंजिन बिघडल्याने कपलिंग तुटून हा प्रकार घडल्याची माहिती स्टेशन अधीक्षक मोहम्मद राजनउद्दिन व उप अधिक्षक संतकुमार यांनी दिली.

चौकशी करणार

'मुंबई येथून निघण्यापूर्वी रेल्वेच्या कपलिंगची योग्य पाहणी करून रेल्वे पाठविणे आवश्यक होते. या प्रकरणात तसे घडलेले दिसत नाही. या घटनेची चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित केली जाईल,' अशी माहिती रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक ए. के. सिन्हा यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लोकप्रतिनिधीचा निधी गावसमितीला द्यावा

$
0
0

अरुण समुद्रे, लातूर
लातूर जिल्ह्यात जलयुक्त शिवारच्या कामांनी वेग घेतला आहे. गेल्या वर्षी ही चांगली कामे झाले होती. यंदाही कामांना वेग आला आहे. खरोसा, रामवाडी येथील कामे वेगाने सुरू आहेत. येत्या काळात कामे पूर्ण होण्यासाठी लोकप्रतिनिधीचा निधी गावसमितीला द्यावा अशी मागणी होत आहे.
औसा तालुक्यातील खरोसा, रामवाडी या गावात राज्यसभेचे सदस्य खासदार संजय काकडे यांच्या खासदार निधीतून नाला सरळीकरण आणि खोलीकरणाची कामे वेगाने सुरू आहेत. खरोसा येथील नाला सरळीकरण कामाची सुरुवात फिनिक्स फाउंडेशनचे संचालक परवेझ पटेल, उपसरपंच भानुदास डोके यांच्या हस्ते झाले.
औसा तालुक्यातील बुधडा गावाचे नाला सरळीकरणाचे काम गेल्या वर्षी लोकसहभाग आणि आमदार बसवराज पाटील यांच्या निधीतून करण्यात आले. बुधडा नाला सरळीकरणाचे काम शिरपूर पॅटर्न प्रमाणे झाले आहे. याकामासाठी गावकऱ्यांनी लोकसमिती निर्माण केली होती. या समितीकडे सहा लाख २० हजार रुपयांचा लोकवाटा जमा झाला होता. या लोकवाट्यातून ३९ हजार ९८७ घनमीटर इतके काम झाले आहे. शासकीय यंत्रसामुग्रीच्या साह्याने सात हजार ७८६ घनमीटर झाले आहे. आमदार निधी पाच लाख ९८ हजार मंजूर झाला होता. त्या निधीतून शासकीय नियमानुसार काम केल्यामुळे अवघे सात हजार २८४ घनमीटर इतके काम झाले आहे. या कामासाठी शासकीय दर हा प्रति घनमीटर ३२ रुपये इतका मान्य आहे. परंतु, लोकसमितीने लोकवाट्यातून हेच काम अवघे साडेपंधरा रुपयांच्या दराने करून घेतले आहे.
या विषयी बोलताना बुधड्याच्या लोकसमितीचे अध्यक्ष प्राध्यापक नागनाथ कनामे म्हणाले, 'जलयुक्त शिवारच्या कामासाठी सरकारने नियम शिथिल करून आमदार, खासदार यांच्या निधीतून करावयाची कामे हे मजूर सोसायट्यामार्फत न करता मंजूर झालेली सर्व रक्कम ही लोकसमितीच्या खात्यावर जमा करावीत. त्यामुळे आम्ही कमी पैशात जास्त कामे करून घेऊ शकतो हे गावो गावी सिद्ध झाले आहे.'
रामेगावच्या शिवारात ही सध्या पाऊन किलो मीटर इतके काम खासदार संजय काकडे यांच्या निधीतून पूर्ण झाले आहे. पुढील कामांसाठी गावकऱ्यांनी पाच लाख रुपये लोकवाटा जमा केला आहे. नियोजित कामासाठी आर्ट ऑफ लिव्हिंग आणि मुंबई मॅरेथॉन ही संस्था मदत करणार असून तब्बल नऊ किलो मीटरचे काम पूर्ण होणार आहे, अशी माहिती रामेगावचे सरपंच राजेंद्र शेळके यांनी दिली.
खरोसा आणि रामेगाव या शिवारातील पाणीसाठ्यात वाढ होणार असल्याचे सांगून खरोशाचे सरपंच भानुदासराव डोके म्हणाले, 'या नाला खोलीकरणातून निघालेली सर्वच माती ही कसदार नसल्यामुळे शेतकरी घेऊन जात नाहीत. ती नाल्याच्या बाजूला सध्या टाकली आहे. त्यामुळे नाल्याला आणि शेतकऱ्यांच्या शेतीला ही तो धोका आहे. त्यामुळे या गेरुचा अधिक भरणा असलेल्या मातीची विल्हेवाट सरकारने तातडीने लावून शेतकऱ्यांना मदत केली पाहिजे.
औसा तालुक्यातील सर्वात मोठे गाव असलेल्या उजनीच्या तेरणा नदीचे गेल्या वर्षी खासदार काकडे, आमदार बसवराज पाटील आणि लोकसहभागातून खोलीकरणाचे काम झाले आहे. सध्या दुष्काळ असतानाही तेरणा नदीच्या या पात्रात पाणी थांबलेले असून त्याचा फायदा गावकऱ्यांना होत आहे. गावातील दोन बोअरला चांगले पाणी असून सारे गाव त्या पाण्याचा वापर करीत आहे, अशी माहिती लोकसमितीचे प्रमुख प्रवीण कोपरकर यांनी दिली. या नदीवरच्या निकामी झालेल्या कोल्हापुरी बंधाऱ्याचाच वापर आता सिमेंटच्या बंधाऱ्यासाठी केला जात असल्याची माहिती देऊन कोपरकर म्हणाले, 'या कामांमुळे आम्हाला किमान आणखी दोन महिने पुरेल एवढा पाणी साठा उपलब्ध झाला आहे.'

सिमेंट बंधारे बांधणार
खरोसा आणि रामेगाव शिवारात नाला सरळीकरण आणि खोलीकरणाचे कामे झाल्यानंतर त्या नाल्यामध्ये जलसंधारण विभागाच्या माध्यमातून साखळी पद्धतीचे सिमेंट बंधारे बांधण्यात येणार असल्याची माहिती उपविभागीय अभियंता जी. बी. काजळे यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाहतूक पोलिसांकडून दंड वसूलीचा अतिरेक

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, उस्मानाबाद
सध्या वाहन चालकाविरुद्ध मोटर वाहन कायद्यानुसार कारवाईला उस्मानाबादेत सुरूवात झाली आहे. वाहतूक पोलिसांच्या या अतिरेकी कारवाईबद्दल नागरिकांसह वाहन चालकांतून तीव्र असंतोष व्यक्त होत आहे.
उस्मानाबाद शहरात सध्या नियमानुसार कारवाई वाहतूक पोलिस करीत आहेत. वाहन चालकांना शिस्त लावण्यासाठी त्यांचा हा खटाटोप आहे. मात्र, शिस्तीच्या नावाखालील करण्यात येणारी दंडात्मक कारवाई ही रझाकारी जुलुमांचा आठवण करून देणारी अशी आहे.
नियमांची अंमलबजावणी करताना वाहन चालकांच्या सोयीच्या गोष्टीचेही पालन होणे गरजेचे आहे. बाजारपेठेत किंवा भरवस्तीत रहदारीच्या ठिकाणी दुचाकी किंवा चार चाकी वाहनांची पार्किंग व्यवस्था करणे गरजेचे आहे. जागोजागी नो पार्किंग फलक लावणे आवश्यक आहे. सिग्नल व्यवस्था नियमित व सुरळीत चालू ठेवणे अपेक्षित आहे. मात्र, या सर्व सोयी-सुविधांकडे दुर्लक्ष करून केवळ नियमाचा धाक दाखवून अवाच्या सव्वा दंड आकाराचा किंवा मिटवामिटवीचे प्रयत्न जारी ठेवायचे असे दृश्य सध्या उस्मानाबादेत पहावयास मिळत आहे. मिटामिटवीसाठी या पोलिस अधिक व कर्मचाऱ्यांचे खास दलाल ही कार्यरत आहेत.
वाहतुकीला शिस्त लागावी यासाठी वाहतुक पोलिसांकडून सुरू असलेले प्रयत्न जनहिताच्या दृष्टीने उपयुक्त असले तरी त्याची अंमलबजावणी करताना करण्यात येणारी दंडात्मक कारवाई, या वेळी त्यांची अरेरावीची भाषा, वाहनचालकांना मिळणारी अपमानास्पद वागणूक या सर्व बाबी जनतेचा रोष ओढावून घेण्यास कारणीभूत ठरत आहेत.
भर चौकात वाहतूक खात्याचे पोलिस अधिकारी चारचाकी वाहन उभा करून कर्मचाऱ्यांच्या टोळक्यासह गप्पा मारत उभे राहून वाहतूक नियमांची पायमल्ली करतात यामुळे जनतेत तीव्र असंतोष आहे.
वाहतूक पोलिसांना वाहनाची कागदपत्रे तपासण्याचा कोणताही कायदेशीर अधिकार नसताना ही मंडळी वाहन चालकांना अडवून त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारतात व स्वतःच नियमावलीचा भंग करतात.
दुचाकी व चारचाकी वाहन चालकांना नियमाचा बडगा दाखविताना प्रवासी वाहतूक करणाऱ्या रिक्षा व जीप्समधून होणाऱ्या अवैध प्रवासी वाहतुकीकडे मात्र ही मंडळी सोयीस्करपणे दुर्लक्ष करतात.
सिंगल जंम्पींग, झेबरा, हेल्मेट न वापरणे, नो एंट्री, परवानाशिवाय वाहन चालविणे, कागदपत्र सोबत न ठेवणे, गतिसंदर्भातील नियमांचा भंग करणे, नो पार्किंगमध्ये वाहन लावणे, फुटपाथवर वाहन उभारणे अशा नियमाचे भंग केल्यास मोटारवाहन कायद्यानुसार (प्रत्येकी) १०० रुपये दंड आकारण्याचे प्रस्तूत आहे. मात्र, करवसुलीचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी उस्मानाबाद वाहतुक पोलिस सध्या यापैकी एकाही नियमाचा भंग केल्यास त्यास विविध कलमे दर्शवित ३०० रुपयांपासून अधिक दंड वसूल करीत आहेत.
दखल घेण्याची गरज
वाहतूक पोलिसांच्या या मनमानी कारभाराची जिल्हा पोलिस अधिक्षकांनी दखल घ्यावी, अशी मागणी वाहनधारक असलेल्या शीला उंबरे (पेंढारकर) यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाण्याची सांगड घालून शेती पिकांचा पॅटर्न राबवा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नांदेड
उपलब्ध पाण्याची सांगड घालून शेतकऱ्यांनी योग्य पिकाची लागवण करावी तरच दुष्काळजन्य परिस्थितीवर मात करणे सहज शक्य होईल, असे प्रतिपादन आंतराष्ट्रीय ख्यातीचे जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्रसिंह राणा यांनी देगलूर येथे केले.
देगलूर येथील विश्वपरिवाराच्यावतीने शहरातील आंबेकर चौकात 'दुष्काळ निवारण' परिषद पार पडली. यावेळी ते बोलत होते. नांदेडचे जिल्हाधिकारी सुरेश काकानी, अप्पर जिल्हाधिकारी बी. एम. कांबळे, जिल्हा कृषी अधिकारी तुकाराम मोटे, आमदार सुभाष साबणे, नगराध्यक्षा उज्वला पदमवार, आमदार सुभाष साबणे यांची उपस्थिती होती.
डॉ. राणा म्हणाले, 'पावसाच्या प्रमाणात पिकाचे पॅटर्न राबविणे कधीही चांगले आहे. मराठवाड्यात याचा ताळमेळ घातला असता तर दुष्काळासारखी वर्तमानस्थिती दिसली नसती. मराठवाडा सुजलम सुफलम करावयाचा असेल तर जे पाणी पाऊसाद्वारे पडत आहे ते पाणी शेतात छोट्या-छोट्या नाल्यात, सम उतारावर जेथे मिळेल तेथे थांबविण्यास सुरूवात करून धरतीच्या पोटात कसे ठेवता येईल याचा प्रयत्न करण्याचा संकल्प यावेळी सर्वांनी केला पाहिजे. तसेच दुष्काळ मुक्तीसाठी तरी सर्व राजकीय पक्षांनी राजकरण बाजूला ठेवून एकमेकांचे पाय ओढण्याचा स्वभाव बदलून तन, मन आणि डोक्याने एकत्र येऊन काम करून दुष्काळ मुक्तीसाठी एकत्र लढा द्यावा.'
मोठे धरणे घेतल्यामुळे खर्च भरमसाठ वाढूनही धरणांमध्ये पाणी दिसत नाही. ही सर्वांसाठी चिंतेची बाब आहे. पाण्याचे बाष्पीभवन ३५ टक्के तर छोटे नाली व नद्यांमधून दहा टक्के होत असल्याचे त्यांनी सांगितले.
सेंद्रीय शेतीकडून रासायनिक शेतीकडे आपण वळल्यामुळे जमिनीची भुक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. ती भुक शमविण्यासाठी जलयुक्त शिवार योजनेची जास्तीत जास्त कामे घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी सुरेश काकानी, यांनी करून पाण्यासाठी सर्वोतपरी मदत देण्याचे आश्वासन यावेळी दिले. सूत्रसंचलन कैलास येसगे यांनी केले तर आभार मुबीन यांनी मानले. व्याख्यानमालेस परिसरातील शेतकरी, महिला, पुरूष मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाजपच्या जनस्वाभीमान अभियानाला सुरुवात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
भारतीय जनता पक्षातर्फे जेएनयुमधील देशद्रोह्यांचे समर्थन करणाऱ्यांचा शुक्रवारी (१९ फेब्रुवारी) निषेध करण्यात आला. पैठणगेट येथे दुपारी २ वाजता जनस्वाभीमान अभियानाची सुरुवात करून स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली. यावेळी देशद्रोह्यांना शिक्षा करण्याची जोरदार मागणी निदर्शने करून करण्यात आली.
जनस्वाभीमान अभियानात 'कश्मीर से कन्याकुमारी भारत माता एक हमारी', 'जेएनयू को बचाओ पढाईपर ध्यान लगाओ', 'इस देश रहेना होगा तो वंदे मातरम् कहना होगा', 'संसद की शहिदों का अपमान, नहीं सहेगा हिन्दुस्तान',' आंतकवादियो का सम्मान, शहिदों का अपमान, अब यही है कांग्रेस की पहचान',' हनुमंथप्पा तेरा बलिदान, याद रखेगा हिंदुस्थान', या घोषणा देण्यात आल्या. अभियानाचे नेतृत्व शहराध्यक्ष किशनचंद तनवाणी यांनी केले.
यावेळी प्रदेश उपाध्यक्ष भागवत कराड, संजय केणेकर, प्रवीण घुगे, प्रमोद राठोड, विजयराव साळवे, राजू तनवाणी, रामेश्वर भादवे, सुरेंद्र कुलकर्णी, बबिता चावरिया, अर्चना निळकंठ, माधुरी आदवंत, सविता कुलकर्णी, दीपक ढाकणे, राजू पाटील, गणेश नांवदर, मनोज मगरे, ललित माळी, जगदीश सिद्ध, बंटी रिडलॉन, राजेश महेता, ज्ञानेश्वर बोरसे, लक्ष्मण कुलकर्णी, बबन नरवडे, प्रमोद नरवडे, सचिन झवेरी, अजय चावरिया यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थिती होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सरकारला सांगावा कसा धाडावा?

$
0
0

शिवाजी गायकवाड, पडेगाव
औरंगाबादच्या पश्चिमेला अवघ्या तेरा किलोमिटर अंतरावरील वंजारवाडी हे गाव आहे. साधारणतः १५०० लोकखंख्या असलेले हे छोटेसे गाव. यंदाच्या दुष्काळात होरपळणाऱ्या या गावात सध्या पिण्याच्या पाण्याची तीव्र समस्या निर्माण झाली आहे. शेतात काही पिकले नाही. पिण्याच्या पाण्याची सोय नाही. त्यातच ग्रामसेवक दोन महिन्यापासून रजेवर असल्याने सरकारपर्यंत सांगावा कसा धाडावा, हे गावकऱ्यांना सूचत नाही.
गावातील नागरिकांची व्यवसाय शेती व त्यावर आधारित व्यवसाय असा आहे. शेती, दुग्धोत्पादन, भाजीपाला पिकवणे, शेतमजुरी यावर गुजराण करणाऱ्या या गावाची यंदा अत्यंत कोंडी झाली आहे. गावची पाण्याची स्थिती आतापर्यंत बरी होती. वंजारवाडीपासून तीन किलोमिटर अंतरावरील करोडीच्या पाझर तलावातून गावला पिण्याचे पाणी पुरवले जात होते. परंतु, पाझर तलावातील पाणी आटण्यास सुरुवात झाली तसे करोडी येथील नागरिकांनाही चिंता सतावत आहे. त्यांनी वंजारवाडीच्या नागरिकांना 'आता तुमचे तुम्ही पाहा' असा निर्वाणीचा इशारा दिला आहे. करोडीच्या पाझर तलावातून जनावरांनाही पाणी मिळणार नाही. गावात साधारणतः ३००० जनावरे आहेत. या जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा मोठा प्रश्न वंजारवाडीच्या गावकऱ्यांसमोर उभा आहे. गावातील सरकारी विहिरीचे पाणीही आटत आले आहे. त्यामुळे माणसं व जनावरं दोघांनाही पाणी नाही. घंटावर हापसा मारल्यानंतर कसेतरी थोडेफार पाणी मिळते, अशी येथील अवस्था आहे.
गावचे ग्रामसेवक एल. एन. रावते हे दोन महिन्यापासून आजारपणाच्या रजेवर आहेत. त्यामुळे अनेक प्रश्न तुंबले आहेत. गावच्या पाणीप्रश्नाबद्दल सरकारसोबत पत्रव्यवहार कोणी करायचा, कोणाकडे दाद मागायची, हे गावकऱ्यांना सूचत नाही. 'गावाला पाणी पुरवण्यासाठी स्वखर्चाने पाइप खरेदी करून विहीर अधिगृहित करण्याचा प्रयत्न आहे. पाइप टाकण्यासाठी चारी खोदण्यासाठी वर्गणी करून मजुरी दिली,' असे उपसरपंच भागीनाथ शंकर सांगळे यांनी सांगितले. ग्रामसेवक रजेवर व पाण्याच्या थेंबालाही मोताद, अशी स्थिती आल्याने गावच्या कारभाऱ्यांवर लोक प्रचंड चिडले आहेत. 'पाणीटंचाईमुळे गावकरी उलट सुलट चर्चा करत आहेत. गावकऱ्यांनी राजकारण बाजुला ठेवून दुष्काळाचा सामना करण्यासाठी मदत केली पाहिजे,' अशी अपेक्षा सरपंच चंद्रकला सांगळे यांनी व्यक्त केली. सध्या गावात चार दिवसातून एकदा पाणी मिळते. त्यावेळी रात्रभर थांबून हंडाभर पाणी मिळते. 'पाणी मिळवण्यासाठी अभ्यास बुडवून जागावे लागते,' असे दहावीची विद्यार्थिनी शीतल सांगळे यांनी सांगितले. गावात पाण्याचा टँकर येत नाही. तातडीने टँकर सुरू करण्याची आवश्यकता गावकऱ्यांनी व्यक्त केली. गावातील एक शेतकरी शंकर सांगळे यांच्या विहिरीला बऱ्यापैकी पाणी आहे. ही विहीर अधिगृहित करण्यासाठी ग्रामपंचायतीने प्रयत्न करावेत, अशी अपेक्षा प्रकाश दौड यांनी व्यक्त केली

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


श्रावणबाळ योजनेचे पैसे परस्पर लाटले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कन्नड
श्रावणबाळ योजनेचे एका वृद्ध महिलेचे मंजूर अनुदान परस्पर लाटल्याचा प्रकार उघड झाला आहे. विशेष म्हणजे या महिलेला त्यांच्या प्रस्ताव मंजूर झाल्याची खबरच नव्हती. याप्रकरणी पोलिसांनी एका महिलेसह तिघांवर गुन्हा दाखल केला आहे.
तालुक्यातील बनशेंद्रा येथील सोजाबाई सुखाजी बोर्डे (वय ७०) यांनी २००५ मध्ये श्रावणबाळ योजनेसाठी तहसील कार्यालयात प्रस्ताव दाखल केला होता. वयामुळे त्यांना प्रस्तावाचा पाठपुरावा करता आला नाही. दरम्यान २०१५ मध्ये झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीनंतर बनशेेंद्रा येथे परीगाबाई लोखंडे या उपसरपंच झाल्या. सोजाबाई बोर्डे यांनी उपसरपंच लोखंडे यांच्याशी संपर्क करून या योजनेसाठी पुन्हा प्रस्ताव पाठवून पाठपुरावा केला. तेव्हा २००९ पासून त्यांचा प्रस्ताव मंजूर असल्याचे उजेडात आहे. त्यांच्या नावावरील अनुदान चापानेर येथील स्टेट बँक ऑफ इंडिया मधील खात्यावर जमा होत असल्याची माहिती त्यांना मिळाली. या वृद्ध महिलेने बँकेत चौकशी केली असता सोरजाबाई सुखा बोरडे या नावे असलेल्या ३२०४५६९५१६३ क्रमांकाच्या खात्यावर शासकीय मदत जमा होत असल्याचे लक्षात आले. पण खात्यावर दुसऱ्याच महिलेचा फोटो चिकटवून अनुदान लाटण्यात येत होते. यावरून सोजाबाई बोर्डे यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली.
सहायक पोलिस निरीक्षक रोहित बेंबरे व पोलिस कॉन्स्टेबल राहुल लहाने यांनी चोकशी केली असता सारजाबाई सुखा बोरडे यांच्या नावाने उघडलेल्या खात्यावर केशरबाई देवरे या महिलेचा फोटो चिकटवल्याचे स्पष्ट झाले. बँकेतून पैसे काढण्याच्या स्लीपवर विजय बोरडे व रतन मगर यांच्या साक्षीदार म्हणून सह्या आहेत. याप्रकरणी केशरबाई देवरे, विजय बोरडे व रतन मगर या तिघांवर कन्नड ग्रामिण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘मागणी’ पूर्ण न झाल्याने आरक्षण

$
0
0

म. टा. विशेष प्रतिनिधी, औरंगाबाद
प्रारूप विकास आराखडा नव्याने तयार करताना अर्थपूर्ण व्यवहार झाल्याचे स्पष्ट झाले आहे. नियोजन करणारे अधिकारी व पालिकेतील पदाधिकारी यांची मागणी पूर्ण न झाल्याने चिकलठाणा येथील शेतकरी गोविंद बाजीराव नवपुते यांची ३१ एकर जमीन ट्रक टर्मिनल्ससाठी आरक्षित करण्यात आली, असा सनसनाटी आरोप त्यांनी मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठात करण्यात आलेल्या याचिकेत करण्यात आला आहे.

आराखड्यात केलेल्या बदलात कोणत्याही स्वरुपाचा विकास करण्यास परवानगी देऊ नये, असा अंतरिम आदेश याचिकाकर्ते गोविंद नवपुते यांनी केलेल्या याचिकेत गुरुवारी करण्यात आला आहे . विकास आराखडा प्रसिद्ध होण्यापूर्वी नगरसेवकांनी संपूर्ण शहरात केंद्र (दुकाने) उघडली होती. जमीन व शेतीवर असलेले आरक्षण उठविण्यासाठी मालमत्ताधारकांना बोलावून घेतले जात होते. प्रशासन व नगरसेवकांनी हातमिळवणी करून अवघ्या ४ दिवसांत नवीन आराखडा तयार करण्यात आल्याचा आरोप याचिकेत करण्यात आला आहे.

नगररचना उपसंचालक हे शासकीय अधिकारी आहेत. त्यांनी कायद्याची अंमलबजावणी करणे क्रमप्राप्त आहे. प्रारूप आराखड्यात बदल करण्यात त्यांनी रस दाखविला. प्रशासन, पदाधिकारी यांच्याशी हातमिळवणी करताना नगररचना उपसंचालकांनी त्यांच्या वरिष्ठांची परवानगी घेतली नाही. मालमत्ता व जमीन धारकांनी मागणी पूर्ण न केल्याने त्यांच्या जागेवर निवासी वापराऐवजी नागरी सुविधेचे आरक्षण टाकण्यात आले. नगररचना उपसंचालक व महापौर यांनी एकत्रित येऊन नवीन आराखडा तयार केल्याचा आरोप याचिकेत करण्यात आला आहे. हे करताना त्यांनी नियोजन मानांकनाची पायमल्ली केली आहे. महापालिकेने फेरबदल करून प्रसिद्ध केलेला आराखडा बेकायदा असून, त्यामुळे शहराचा विकास ठप्प होणार आहे. महापौरांच्या आदेशाने या आराखड्यात मोठे बदल करण्यात आले आहेत.

नकार दिल्यानेच आरक्षण
याचिकाकर्त्याच्या प्रकरणात प्रशासन व पदाधिकारी यांनी संपर्क साधून मागणी केली होती. या मागणीला याचिकाकर्त्याने स्पष्टपणे नकार दिला. ही मागणी पूर्ण न झाल्याने नवपुते यांची जागा आरक्षित करण्यात आली, असा गौप्यस्फोट याचिकेत करण्यात आला आहे. त्यामुळेच नगरविकास विभागाने बेकायदा विकास आराखड्याची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची विनंती याचिकेत करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मर्जीतल्या व्यक्तीला कंत्राटाची खैरात

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
आपल्या मर्जीतल्या कंत्राटदारालाच अधिकारी विद्युत रोषणाई कंत्राटाची खैरात वाटतात, अशी माहिती आता हाती आली आहे. रोषणाई कामाची निविदा काढलीच जात नाही. त्यामुळे केल्या जाणाऱ्या खर्चावरही अंकुश ठेवला जात नसल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.
शिवजयंती, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती या दिवशी पालिकेतर्फे क्रांतिचौक आणि भडकल गेट येथे विद्युत रोषणाई केली जाते. स्वातंत्र्यदिनी आणि प्रजासत्ताकदिनी पालिकेच्या प्रशासकीय इमारतीवर रोषणाई होते. या चारही कामांची निविदा काढली जात नाही. हे काम पालिकेच्या विद्युत विभागातर्फे केले जाते. या विभागातले अधिकारी त्यांच्या मर्जीतल्या कंत्राटदाराला तोंडी आदेश देऊन रोषणाई करून घेतात. पालिकेत तीन हजार रुपयांपासून २५ हजारांपर्यंतचा खर्च फुटकळ कामांवर केला जातो.
ए - वन आणि रेटलिस्ट असे या कामांना संबोधले जाते. पालिका आयुक्तांनी अशा प्रकारची कामे बंद केली असली तरी हे प्रकार सुरूच आहेत. त्यामुळे रोषणाईवर नेमका किती खर्च झाला, कंत्राटदाराला बिल किती रुपयांचे दिले याचा हिशेब ठेवला जात नाही. शिवजयंती, डॉ. आंबेडकर जयंती, स्वातंत्र्यदिन व प्रजासत्ताक दिन या चार दिवशी विद्युत रोषणाई करण्याचे एकत्रित कंत्राट पालिकेने वर्षाच्या सुरुवातीला काढले, तर या कामात सुसूत्रता येईल व कामाची जबाबदारी निश्चित होईल, असे मत व्यक्त केले जात आहे.
उपायुक्तांवर जबाबदारी
साफसफाई करणे, पुतळा स्वच्छ करणे व विद्युत रोषणाई करणे ही कामे तीन विभागांकडून केली जात होती. त्यांच्यात समन्वय नव्हता. या तिन्ही कामांसाठी एकच अधिकारी नियुक्त करा, अशी सूचना महापौर त्र्यंबक तुपे यांनी आयुक्त सुनील केंद्रेकर यांना केली. त्यांनी ही सूचना मान्य करून उपायुक्त रवींद्र निकम यांची या कामासाठी नियुक्ती केल्याची माहिती महापौरांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कार्यकारी अभियंत्यांसह तिघांना कारणे दाखवा

$
0
0


औरंगाबाद ः शिवजयंतीनिमित्त क्रांतिचौकातील शिवरायांच्या पुतळा परिसरात विद्युत रोषणाई न केल्यामुळे कार्यकारी अभियंता हेमंत कोल्हे यांच्यासह उपअभियंता ए. डी. देशमुख, विशेष अधिकारी पी. आर. बनसोडे यांना आयुक्तांच्या आदेशानुसार कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली.
शिवजयंतीनिमित्त दरवर्षी पालिकेतर्फे क्रांतिचौकातील या परिसरात विद्युत रोषणाई केली जाते. यंदा मात्र त्याकडे अधिकाऱ्यांनी लक्षच दिले नाही. त्यामुळे सकाळी क्रांतिचौकात शिवप्रेमींमध्ये तीव्र संतापाची भावना निर्माण झाली होती. या संतापाचा उद्रेक होऊ नये म्हणून आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्या उपस्थित अतिरिक्त आयुक्त रमेश पवार यांनी माफीनामाच लिहून दिला व संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईचे आश्वासन दिले. त्यानंतर पालिकेत महापौर त्र्यंबक तुपे, आयुक्त केंद्रेकर यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत विद्युत रोषणाई का केली नाही, या बद्दल चर्चा करण्यात आली. शिवजयंतीच्या निमित्ताने क्रांतिचौकात साफसफाई करा, शिवरायांचा पुतळा स्वच्छ धुवा, किमान दोन दिवस अगोदर पुतळा परिसरात विद्युत रोषणाई करा, असे आदेश महापौरांनी दिले होते. त्यानुसार उद्यान विभागाने साफसफाई केली. अग्निशमन विभागाने पुतळा धुतला, पण विद्युत विभागाने रोषणाई केली नाही. ही बाब गुरुवारी रात्री अकराच्या सुमारास कार्यकर्त्यांनी महापौरांच्या निदर्शनास आणून दिली. त्यानंतर त्यांनी अधिकाऱ्यांशी संपर्क साधून रात्रीतून विद्युत रोषणाई करून घेतली. ही बाब त्यांनी शुक्रवारी निदर्शनास आणून दिली.




मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

समस्यांच्या प्रभावी मांडणीसाठी ‘सिटीझन्स रिपोर्टर’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
'नागरिकांना स्थानिक समस्या प्रभावीपणे मांडता याव्यात, यासाठी 'महाराष्ट्र टाइम्स'ने सुरू केलेला 'सिटीझन्स रिपोर्टर' हा अत्यंत प्रभावी उपक्रम असून, त्याद्वारे नागरी प्रश्न सोडविण्यास मदतच होणार आहे,' अशा भावना यामध्ये सहभागी झालेल्या नागरिकांनी शुक्रवारी व्यक्त केल्या.

निमित्त होते, सिटीझन्स रिपोर्टर या उपक्रमात गेल्या आठवड्यात सक्रिय आणि प्रभावीरित्या सहभागी असलेल्या नागरिकांच्या प्रातिनिधिक सत्काराचे. सतीश जाधव, अनिल बोडखे पाटील, धनंजय अन्वेकर, रघू व्यवहारे, पवन शिंदे यांचा विशेष सत्कार करण्यात आला. औरंगाबादसारख्या शहराचा विस्तार मोठ्या प्रमाणात होत असताना, स्थानिक प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी 'मटा'ने सिटीझन्स रिपोर्टर उपक्रमाची सुरुवात केली आहे. आपल्या अवतीभवती घडणाऱ्या अनेक गोष्टी, नागरिकांना भेडसावणारे प्रश्न-समस्या, रस्ते-पाणी-वीज यासह ड्रेनेज, स्वच्छता याबाबतच्या तक्रारी व्यवस्थेपर्यंत थेट मांडण्याची संधी 'सिटीझन्स रिपोर्टर'च्या माध्यमातून नागरिकांना उपलब्ध करून देण्यात आली आहे. गेल्या आठवड्यात 'सिटीझन्स रिपोर्टर'च्या माध्यमातून प्रभावीपणे तक्रारी-समस्या मांडणाऱ्या नागरिकांचा प्रातिनिधिक सत्कार शुक्रवारी करण्यात आला. त्यांनी मांडलेल्या समस्यांची दखल घेऊन संबंधित यंत्रणांनी त्यावर तातडीने उपाययोजना केल्या होत्या.

''महाराष्ट्र टाइम्स'तर्फे राबविण्यात येणारा सिटीझन्स रिपोर्टर हा अत्यंत स्तुत्य उपक्रम आहे. वृत्तपत्रातून महत्त्वाचे प्रश्न नेहमीच मांडले जातात, पण लहान-सहान तक्रारी, नागरिकांना दैनंदिन आयुष्यात भेडसावणाऱ्या समस्या या अॅपद्वारे मांडता येणे शक्य झाले आहे. या तक्रारींकडे सरकारी यंत्रणाही तातडीने लक्ष देत आहेत. त्यामुळे, नागरिकांचा फायदा होत असून, भविष्यात हा उपक्रम असाच सुरू राहावा,' अशा अपेक्षा प्रमाणपत्र मिळाल्यानंतर नागरिकांनी व्यक्त केल्या.

तुम्हीही डाउनलोड करा 'मटा सिटीझन अॅप'
तुम्हालाही तुमच्या परिसरातील घटना-घडामोडी, प्रश्न-समस्या मांडायच्या असतील, तर 'गुगल प्ले स्टोअरवरून 'मटा सिटीझन रिपोर्टर अॅप' (MT Citizen Reporter) डाउनलोड करा आणि त्यावरून छायाचित्रे आणि बातम्या पाठविण्यास सुरुवात करा. निकषांमध्ये बसणाऱ्या फोटो आणि बातम्यांना प्रसिद्धी दिले जाते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जागोजागी फलक लावून आंदोलन

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
गेली तीन वर्षे सातत्याने मागणी करूनही महापालिका रस्त्याचे काम करीत नाही. त्यामुळे नागेश्वरवाडी-भोईवाडा वॉर्डच्या संतप्त नगरसेविका कीर्ती शिंदे यांनी शुक्रवारी जागोजागी फलक लावून अभिनव आंदोलन केले. 'आपण आपली काळजी घ्या, रस्त्याचे काम होत नाही तोपर्यंत रस्त्याचा वापर टाळा,' असे आवाहन या फलकातून करण्यात आले.
निरालाबाजार ते नागेश्वरवाडी, औरंगपुरा ते मिलकॉर्नर, समर्थनगर ते औरंगपुरा या संपूर्ण रस्त्याची दुर्दशा झाली आहे. जागोजागी मोठमोठे खड्डे निर्माण झाले आहेत. वाहनचालकांनाच काय, पण पादचाऱ्यांना देखील या रस्त्यांवरून जाणे कठीण होऊन जाते. या रस्त्याच्या मजबूतीकरणाचे व डांबरीकरणाचे काम करा, या मागणीसाठी नगरसेविका दोन-तीन वर्षांपासून महापालिकेच्या प्रशासनाकडे पाठपुरावा करीत आहेत, पण प्रशासनाने अद्याप या रस्त्याचे काम केलेले नाही. त्यामुळे सहनशीलतेचा बांध फुटून शुक्रवारी कीर्ती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली वॉर्डातील नागरिकांनी निदर्शने केली. यावेळी बोलताना शिंदे म्हणाल्या, 'रस्त्याच्या डांबरीकरणाची मागणी आपण दोन - तीन वर्षांपासून करीत आहोत, पण त्याला दाद मिळत नाही. विद्यापीठ, घाटी रुग्णालय व महापालिकेकडे जाणारा हा महत्त्वाचा रस्ता आहे. त्यामुळे या रस्त्याची दुरुस्ती होणे गरजेचे आहे. रस्त्यावर जागोजागी खड्डे असल्यामुळे रोज अपघात होतात. वाहनांचेही नुकसान होते. महावीर चौक ते क्रांतिचौक या रस्त्याचे काम शासनाने दिलेल्या निधीतून केले जाणार होते, पण या रस्त्याचे काम आता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणातर्फे केले जाणार आहे. त्यामुळे या रस्त्याचा वाचलेला जो निधी आहे, त्या निधीतून निरालाबाजार ते नागेश्वरवाडी, औरंगपुरा ते मिलकॉर्नर, समर्थनगर ते औरंगपुरा या रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचे काम करावे. निदर्शनाच्या वेळी शिंदे यांच्यासह सरस्वती हरकाळ, रंजना देवकर, उज्वला पोतदार, अस्मिता निकम, अर्चना काबरा, मुकेश जाधव, योगेश सावंत आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हेल्मेटसक्ती मोहिमेत जमादाराला मारहाण

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
हेल्मेटसक्तीची मोहीम राबवताना विना हेल्मेट ट्रिपलसीट जाणाऱ्या दुचाकीस्वारांनी जमादाराला मारहाण केली. गुरुवारी रात्री सव्वाआठ वाजता महानुभाव आश्रम चौकात हा प्रकार घडला. या प्रकरणी अशोक कोळेकर व गणेश कोळेकर या पितापुत्रांना अटक करण्यात आली असून एक आरोपी पसार झाला आहे.
शहर वाहतूक शाखेचे जमादार किशोर लक्ष्मण बुंदेले हे गुरुवारी रात्री पथकासह महानुभाव चौकात कर्तव्य बजावत होते. यावेळी एका दुचाकीवर विना हेल्मेट ट्रिपल सीट जात असलेल्या तिघांना त्यांनी अडवले. या गोष्टीचा त्यांना राग आला. त्यांनी दुचाकी रस्त्यातच टाकून देत वाहतुकीला अडथळा निर्माण केला. तसेच बुंदेले यांचा गळा धरून त्यांना लाथाबुक्क्याने शिवीगाळ करीत मारहाण केली. ठार मारण्याची धमकी दिली. या तिघांची तपासणी केली असता यांच्याजवळ वाहन परवाना नव्हता. बुंदेले यांच्या सहकाऱ्यांनी त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला. यापैकी एकजण दुचाकी घेऊन पसार झाला, तर अशोक लक्ष्मण कोळेकर व गणेश अशोक कोळेकर हे दोघे पोलिसांच्या हाती सापडले. आरोपींविरुद्ध सातारा पोलिस ठाण्यात शासकीय कामात अडथळा निर्माण करणे, मारहाण करणे, रस्ता अडवणे आदी कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


अपूर्व उत्साहात शिवजन्मोत्सव

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
शाळकरी विद्यार्थ्यांचे शिस्तबद्ध लेझीम पथक, मल्लखांबावरील चित्तथरार प्रात्यक्षिके आणि ढोल-ताशाच्या गजरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शुक्रवारी अपूर्व उत्साहात मिरवणूक काढण्यात आली.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त सायंकाळी सहाच्या सुमारास राजाबाजार परिसरातील संस्थान गणपती मंदिरात आरती करण्यात झाली. यावेळी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर, माजी आमदार डॉ. कल्याण काळे, मनमोहनसिंग ओबेरॉय, पोलिस आयुक्त अमितेश कुमार, औरंगाबाद जिल्हा शिवजयंती महोत्सव समितीचे संस्थापक अध्यक्ष पृथ्वीराज पवार, काशिनाथ कोकाटे, विद्यमान अध्यक्ष संदीप शेळके, अजय चिकटगावकर, विश्वास औताडे, विनोद तांबे, मनोज पाटील आदींची उपस्थिती होती.

संस्थान गणपतीची पारंपरिक पद्धतीने आरती झाल्यानंतर मान्यवरांनी शिवजयंतींविषयी मनोगत व्यक्त केले. यावेळी माजी आमदार डॉ. काळे यांनी महापालिका प्रशासनावर तीव्र नाराजी व्यक्त केली. शहरातील क्रांतिचौक येथील पुतळा परिसरात रोषणाईप्रकरणी महापालिकेला उशिरा जाग आली. छत्रपतींची जयंती दोन वेळेस साजरी करण्यात येते, मात्र एका वेळेस रोषणाई, स्वच्छता केली जात नाही, अशा शब्दांत त्यांनी नाराजी व्यक्त केली. यावेळी मनमहोनसिंग ओबेरॉय, आमदार चिकटगावकर व पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांचीही भाषणे झाली.

मिरवणुकीत ढोल ताशांच्या गजरामध्ये पळशी येथील धारेश्वर हायस्कूल, वरझडी येथील श्रीकृष्ण हायस्कूलच्या चिमुकल्यांच्या पथकाने लेझिमचे सादरीकरण केले. संस्थान गणपतीपासून निघालेली मिरवणूक गांधी पुतळा, सिटी चौक, गुलमंडी, पैठण गेटमार्गे क्रांतिचौकातील शिवाजी महाराज यांच्या पुतळा परिसरात पोचली. तेथे मिरवणुकीची सांगता झाली.

सायंकाळ होताच वाढली गर्दी
सायंकाळी सहानंतर मुख्य मिरवणुकीत सहभागी होणाऱ्या वाहनांच्या संख्येत वाढ होत गेली. ट्रॅक्टरच्या ट्रॉलीवर बसविण्यात आलेल्या मल्लखांब बसवून प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. दुसऱ्या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीत दोरीवरील कसरतीसाठी व्यवस्था करण्यात आली होती. सायंकाळी सातच्या सुमारास शहरातील काही भागांमधून आलेल्या चारचाकी गाड्या मिरवणुकीत सहभागी झाल्या. नई बस्ती येथील हितोपदेश मित्रमंडळाच्या आकर्षक पोशाखातील ढोलपथकाने सर्वांचे लक्ष वेधले. मिरवणूक सिटीचौक येथे आल्यानंतर पोलिसांतर्फे स्वागत करण्यात येत होते.

मल्लखांब खास आकर्षण
शिवजयंती मिरवणुकीमध्ये खामगाव येथील तानाजी व्यायाम शाळेच्या चिमुकल्यांनी सादर केलेली मल्लखांब प्रात्यक्षिके विशेष आकर्षण होते. १० मुले व १० मुलींनी मिरवणुकीत रोप मल्लखांब, पोल मल्लखांब, सांघिक प्रात्यक्षिक केले. मल्लखांबाची प्रात्यक्षिके पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिवजयंतीतून जपली सामाजिक बांधिलकी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
ब्रेनडेड रुग्णांचे अवयवदान करून समाजासमोर आदर्श निर्माण केलेल्या वीरमातांना शिवजयंतीचे औचित्य साधून गौरविण्यात आले. नवीन औरंगाबाद शिवजयंती उत्सव समितीने शुक्रवारी मंदाबाई सुधाकर मगर, द्वारकाबाई माधवराव बुधवंत यांना पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्या हस्ते वीरमाता हिरकणी पुरस्कार प्रदान करण्यात आला.

गारखेडा परिसरातील गजानन महाराज चौकात हा कार्यक्रम झाला. समितीतर्फे शिवजयंतीनिमित्त विविध उपक्रम राबविले; तसेच सायंकाळी मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीच्या उद्घाटनापूर्वी हा कार्यक्रम झाला. पोलिस आयुक्त अमितेश कुमार, आमदार सुभाष झांबड, माजी आमदार डॉ. कल्याण काळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष काशिनाथ कोकाटे, उत्सव समितीचे संस्थापक बबन डिडोरे, उपाध्यक्ष राजेश पवार, अध्यक्ष राहुल चव्हाण, राजाराम मोरे, भिकन म्हात्रे, पंजाबराव वडजे, माणिक शिंदे, उद्धव सावरे, अशोक दामले, श्रीकांत शेळके, उपायुक्त राहुल श्रीरामे, संदीप आटोळे, पांडुरंग तायडे आदींची उपस्थिती होती. आयुक्तांच्या हस्ते मंदाबाई मगर आणि द्वारकाबाई बुधवंत यांना गौरविण्यात आले. या उपक्रमाचे अमितेश कुमार यांनी कौतुक केले. ते म्हणाले, की सामाजिक बांधिलकी जपताना समितीने राबविलेला हा उपक्रम स्तुत्य आहे. अवयवदानामुळे दुसऱ्या माणसाला जीवनदान दिले जाते. या दोन्ही कुटुंबीयांनी एक आदर्श निर्माण केला आहे. कल्याण काळे, सुभाष झांबड यांनी शिवजयंतीच्या शुभेच्छा देताना सामाजिक बांधिलकी जपल्याबद्दल समितीचे कौतुक केले. बबन डिडोरे यांनी कार्यक्रमाची संकल्पना मांडली.

सजीव देखाव्यांचे आकर्षण
समितीच्या वतीने मिरवणूक काढण्यात आली. ब्रिलिएंट्स किड्स शाळेच्या विद्यार्थ्यांचे लेझीम पथक लक्षवेधी ठरले. त्यापाठोपाठ छत्रपती शिवाजी महाराजांचा महिमा वर्णन करणारा सजीव देखावा आकर्षण ठरला. गजानन महाराज मंदिर चौक, पुंडलिक नगर चौक असा मिरवणुकीचा मार्ग होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिवराय स्त्रिया, शेतकऱ्यांबाबत संवेदनशील

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
छत्रपती शिवराय हे स्वराज्यातील शेतकरी आणि स्त्रिया यांच्याबाबत नेहमीच सतर्क आणि संवेदनशील होते. त्यांनी या दोन्ही घटकांचा प्रचंड सन्मान केला. आजच्या राज्यकर्त्यांनी हा वारसा जतन करण्याचेही कार्य करावे असे, प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार अमर हबीब यांनी केले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त त्यांचे शुक्रवारी 'शेतकऱ्यांचे राजे : छत्रपती शिवाजी' या विषयावर व्याख्यान झाले. कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे अध्यक्षस्थानी होते. बीसीयूडी डॉ. के. व्ही. काळे, कुलसचिव डॉ. मुरलीधर लोखंडे, डॉ. किशन धाबे, नलिनी चोपडे, विद्यार्थी कल्याण संचालक डॉ. सुहास मोराळे, अध्यासनाचे संचालक डॉ. पुरुषोत्तम देशमुख, किसानपुत्र आंदोलनाचे नेते अच्युत गंगणे आदी यावेळी उपस्थित होते.

हबीब म्हणाले, 'महाराजांच्या जन्मापूर्वी शेकडो वर्षांपासून भारतांमध्ये राजे राजवड्यांची जुलमी राजवट होती. मोगलाईतील राजांनीही अत्याचार, लूट केली. प्रस्थापित राज्यव्यवस्थेच्या विरोधात संघर्ष करण्याचे सामर्थ्यही तत्कालिन जनतेत नव्हते. शिवरायांनी एका अर्थाने जुलमी राजवटीच्या विरोधात लढण्याऐवजी निपचित पडलेल्या प्रजेच्या मनात स्वराज्याचा अंगार पेटविला. शिवरायांपूर्वी शेतकरी व स्त्रिया यांची काळजी केली जात नव्हती. महाराजांनी शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान होणार नाही, याची काळजी घेतली. शत्रुपक्षातील स्त्रियांचाही सन्मान केला. जातीपातीत वाटल्या गेलेल्या लोकांमधून केवळ गुणवत्तेचा आधारावर मावळे, अधिकारी नेमले. महात्मा फुले यांनी शिवरायांची समाधी शोधून पोवाडा लिहिला कारण ते कुळवाडीभूषण होते म्हणून, हे लक्षात घेतले पाहिजे.'

आजच्या राज्यकर्त्यांनी किमान शेतकरी आणि स्त्रीयांचा सन्मान, गौरव करण्याचे काम केले तर खऱ्या अर्थाने हे राज्य आपले आहे, असे जनतेला वाटेल. शेतकरी आत्महत्येची चर्चा शेती व्यवस्थेकडे घेऊन जाणारी ठरावी, असे मतही त्यांनी व्यक्त केले.

छत्रपती शिवायांच्या प्रेरणादायी इतिहासातून धडा घेतलेला मी ही एक मावळा आहे, असे कुलगुरू डॉ. चोपडे म्हणाले. छत्रपती शहाजी भोसले स्मारक समितीचे कार्य विद्यापीठामार्फत करण्यात येईल. समितीचा या संदर्भातील प्रस्ताव विद्यापीठास प्राप्त झाल्याचेही यावेळी कुलगुरु डॉ. चोपडे यांनी सांगितले. कुलसचिव डॉ. मुरलीधर लोखंडे यांनी प्रास्ताविक केले. संजय शिंदे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. डॉ. पुरुषोत्तम देशमुख यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. सुहास मोराळे यांनी आभार मानले.

मिरवणुक उत्साहात
छत्रपती शिवाजी महाराज प्रतिमेची विद्यापीठ गेट ते नाट्यगृह यादरम्यान सकाळी मिरवणुक काढण्यात आली. कुलगुरू डॉ. चोपडे यांच्या हस्ते मिरवणूक सुरू करण्यात आली. लेझीम, ढोलताशाच्या गजरात मिरवणूक निघाली. विद्यार्थी- विद्यार्थिनी मिरवणुकीत मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. त्याचबरोबर बीसीयूडी डॉ. काळे, कुलसचिव डॉ. लोखंडे, डॉ. लुलेकर, डॉ. धाबे, डॉ. मोराळे, नलिनी चोपडे आदींसह अधिकारी, प्राध्यापक मिरवणुकीत सहभागी झाले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खुसखुशीत साबुदाणा वडा

$
0
0

Shripad.Kulkarni@timesgroup.com
उपवासाच्या दिवशी बाहेर काही खाणे नको, असा बहुतेकांचा दंडक असतो. हॉटेलांत साबुदाणा वडा, साबुदाणा खिचडी, फिंगर चिप्स असे उपवासाचे पदार्थ मिळतात, पण त्यांच्यासाठी कोणते तेल, तूप वापरले जाते, उपवासाचे पदार्थ आणि अन्य पदार्थ एकाच भांड्यात करतात की वेगवेगळ्या, असे अनेक प्रश्न समोर येतात. त्यामुळे हॉटेलमधील उपवासाचे पदार्थ खाणे टाळले जाते, मात्र जिल्हा परिषदेसमोर साबुदाणा वडा, साबुदाणा खिचडी खाण्यासाठी उपवासाच्या दिवशी गर्दी असते. एका रांगेत असलेल्या तीन-चार गाड्यांवर खवय्ये हामखास थांबतात. त्यापैकीच एक रुचिरा साबुदाणा वडा सेंटर. प्रवीण प्रकाशराव जोशी यांच्या वडिलांनी १९७९मध्ये साबुदाणा वडा सेंटर सुरू केले. वडिलांनंतर प्रवीण जोशी हा व्यवसाय सांभाळत आहेत. गेल्या ३७ वर्षांत वडा, खिचडी यांची चव बदललेली नाही, हे वैशिष्ट्य ते आवर्जून सांगतात.

साबुदाणा वडा तयार करण्याची प्रक्रिया रात्रीच सुरू होते. रात्री साबुदाणा भिजायला टाकला जातो. तो सहा ते आठ तास चांगल्या प्रकारे भिजविला जातो. त्यानंतर सकाळी त्यात शेंगादाण्याचा कुट, तिखट, बारीक चिरलेली मिरची, चवीप्रमाणे मीठ आणि साखर आदी टाकले जाते. या मिश्रणात उकडलेले बटाटे बारीक खिसून किंवा कुस्करून टाकले जातात. हे मिश्रण एकजीव केले जाते. तयार झालेल्या मिश्रणाचे गोल, चपटे वडे तयार करून तुपात तळून सर्व्ह केले जातात. वडे चपटे असल्याने खुसखुशीत होतात. साबुदाणा, बटाटे, शेंगदाणे पूड यांसह अन्य पदार्थांचे प्रमाण ठरलेले आहे.

वड्यांबरोबर दह्याची चटणी दिली जाते. दह्यात शेंगदाण्याचा कुट, तिखट, मीट, चिरलेली मिरची, साखर आदी मिसळून चटणी तयार केली जाते. दही, साखर, मिरचीमुळे चटणीला अंबट-गोड-तिखट चव येते. खुसखुशीत वडे आणि चटणी हा बेत खवय्यांच्या पसंतीचा.

वडे, खिचडी, चटणी यांच्यासाठी वापरण्यात येणाऱ्या पदार्थ्यांतच्या दर्जात तडजोड केली जात नाही. वडेही सनफ्लॉवर तुपात तळले जातात. दर्जाची खात्री असल्याने ग्राहक येतात. गेल्या ३७ वर्षांपासून वडे, खिचडी यांची चव, दर्जा कायम आहे. वडिलांकडून मी वडे, खिचडी करण्यास शिकलो, असे जोशी सांगतात. गुरुवार, शुक्रवार आणि शनिवार या उपवासाच्या दिवशी ग्राहकांची गर्दी जास्त असते. त्याशिवाय संकष्टी चतुर्थी, एकादशी या दिवशीही गर्दी असते.

'साबुदाणा वडे, खिचडी खाल्याने काही जणांना त्रास होतो. पोटदुखी, अॅसिडिटी, अजीर्ण होणे आदी त्रास होण्याची शक्यता असते, पण आमच्या वड्यांमुळे कसलाही त्रास होणार नाही, याची मी गॅरंटी देतो,' असा आत्मविश्वास जोशी व्यक्त करतात. वड्यांसाठी तयार करून आणलेले मिश्रण संपल्याशिवाय त्यांचे सेंटर बंद होत नाही. त्यामुळे रोज वड्यांसाठी रोज ताजे, नवे मिश्रण केले जाते, असे ते सांगतात.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘राकाज्’बरोबरचा करार रद्दच

$
0
0


म. टा. विशेष प्रतिनिधी, औरंगाबाद
शलाका इंजिनिअरच्या राकाज लाइफस्टाइल क्लब औरंगाबाद महापालिकेने ताब्यात घेतला. करार रद्द करण्याच्या निर्णयाला महापलिकेच्या कोर्टात राकाज लाइफस्टाइलने आव्हान दिले होते. राकाजचा हा दावा न्यायधीश एस. जे. बियाणी यांनी फेटाळला. तिसऱ्या संस्थेस हा क्लब चालविता येणार नाही. त्यामुळे पालिकाच पूल चालविणार आहे.
करारातील नियमांचा भंग करून अवैधरित्या हुक्का पार्लर, पूल टेबल आणि मसाज सेंटर सुरू केल्याचे आढळून आल्यामुळे मनपा प्रशासनाने शलाका इंजिनिअरच्या राकाज लाइफस्टाइल क्लबबरोबरचा करार २४ जुलै २०१५ रोजी रद्द केला. राकाजने औरंगाबाद खंडपीठ व दिवाणी कोर्टात दाद मागितली, पण त्यांना दिलासा मिळाला नाही. त्यांनी पालिका कोर्टात आव्हान दिले. पालिका कोर्टाने २८ नोव्हेंबर २०१५ रोजी जैसे थे चे आदेश दिले होते. करार संपुष्टात आणण्याचा आदेश रद्द करण्याची विनंती अर्जात करण्यात आली आहे. पालिकेने करारातील ५.६ कलमाचा वापर करून नोटीस दिली. स्विमिंग पूल परिसरात असुविधा आढळल्यावर, गैरसोय असेल तर या कलमाचा उपयोग केला जातो. या नोटीसला राकाजने उत्तर दिले, पण या उत्तरावर निर्णय न देता थेट करार निलंबनाची नोटीस दिली. ती चुकीची असल्याचा दावा राकाजचे वकील एस. आर. नेहरी यांनी केला. हा दावा फेटाळण्यात आला. महापालिकेने बीओटी तत्त्वावर विकसित केलेल्या आणि राकाज् लाइफ स्टाइल क्लबला स्विमिंग पूल चालवण्यासाठी ९९ वर्षांचा करार १६ ऑक्टोबर २००९ रोजी केला. या करारात स्विमिंग पुलाशिवाय जिम सुरू करण्यास परवानगी दिली होती. महापौर, उपमहापौर, महापालिकेचे आयुक्त यांनी या जागेची पाहणी ४ जुलै २०१५ रोजी केली. स्विमिंग पुलाच्या परिसरात पहिल्या मजल्यावर बांधण्यात आलेल्या जेंटस् आणि लेडिज पार्लरच्या नावाखाली खुलेआम मसाज पार्लर अवैधरित्या चालविले जात होते. त्याआधी पोलिसांनी येथे चालू असलेल्या हुक्का पार्लरवर धाड टाकली होती. राकाजविरुद्ध उस्मानपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता, असा युक्तिवाद पालिकेचे वकील अतुल कराड यांनी केला. करारातील ७.१९ नुसार बेकायदेशीर कृती आढळली, तर निलंबनाचा अधिकार पालिकेला वा आयुक्तांना आहे. स्पोर्टस् क्लबचे आरक्षण असताना बेकायदेशीररीत्या हुक्का पार्लर, पूल टेबल, रेस्टॉरन्ट आदीही चालविले जात होते. हे सर्व अटी -शर्तीचे उल्लंघन आहे असा युक्तिवाद कराड यांनी केला. मनपाच्या वतीने अतुल कराड व दीपक पडवळ यांनी काम पाहिले. राकाच्या वतीने एस. आर. नेहरी यांनी बाजू मांडली.
ताबा पालिकेकडेच
राकाज क्लबचा करार रद्दबातल करण्याचा आदेश तरतुदीनुसार घेण्यात आला असून या करारास मनपाच्या सर्वसाधारण सभेची मान्यता घेण्यात आली होती. २५ जुलै २०१५ रोजी राकाजचा रितसर पंचनामा करून त्याचा ताबा घेण्यात आला होता. आजही त्याचा ताबा मनपाकडेच असल्याचे अॅड. कराड यांनी कोर्टाच्या निदर्शनास आणून दिले. मनपाने योग्य कारवाई केली असल्याचे मत कोर्टाने नोंदवून क्लब ताब्यात देण्याचा दावा फेटाळला. त्याच बरोबर राका क्लब स्वत: मनपा चालविणार असल्याचे शपथ पत्र सादर केल्यामुळे दुसऱ्या संस्थेला चालविण्यास देण्याचा प्रश्न नाही असे कोर्टाने स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images