Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

दिंडीच्या माध्यमातून कुलगुरूंचा निषेध

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
डोक्यावर टोपी, गळ्यात ढोलकी आणि 'जगू द्या, शिकू द्या' अशा घोषणा घेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात निघालेल्या दिंडीने विद्यार्थी, प्रशासनाचे लक्ष वेधले. शुल्कमाफीची मागणी घेऊन गेलेल्या विद्यार्थ्यांशी बोलताना कुलगुरूंनी बेजबाबदार वक्तव्य केल्याचा निषेधार्थ राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसने ही दिंडी काढली.

दुष्काळाची परिस्थिती लक्षात घेत शुल्कमाफी करा, या मागणीसाठी सोमवारी धरणे आंदोलन करण्यात आले. आंदोलकांशी बोलताना कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांनी 'दहा हजाराचा मोबाइल, गाड्या वापरता अन् शुल्कमाफी मागता' असे वक्तव्य केले. त्याचा राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसने मंगळवारी निदर्शने करून निषेध केला. बुधवारी विद्यापीठात निषेध ‌दिंडी काढण्यात आली. ढोलकीच्या तालावर निषेध करण्यात आला. विद्यापीठ गेटपासून निघालेली ही दिंडी विद्यापीठाच्या मुख्य इमारतीसमोर आली. 'शैक्षणिक शुल्कमाफी झालीच पाहिजे', 'कुलगुरू हमको पढने दो, देश को आगे बढने दो', 'राजीनामा द्या, राजीनामा द्या' अशा घोषणाही विद्यार्थ्यांनी दिल्या. मयूर सोनवणे व अमोल दांडगे यांच्या नेतृत्वाखाली ही दिंडी निघाली.

कुलसचिव डॉ. मुरलीधर लोखंडे यांना आंदोलकांनी निवेदन दिले. दिंडीत विविध कॉलेजांचे विद्यार्थी सहभागी झाले होते. यावेळी भगवान पांडव, रवी धोत्रे, तुषार पाटील, सोनल विसपुते, प्रफुल पाटील, विजय वाकदकर, निखिल बुक्कावार, गजानन भवर, प्रदीप मालोदे यांची उपस्थिती होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


जायकवाडीतून १.४१ टीएमसी पाणी सोडणार

0
0

म. टा.प्रतिनिधी, औरंगाबाद

दुष्काळामुळे होरपळत असलेल्या गावांची तहान भागवण्यासाठी येत्या १ मार्चपासून जायकवाडी प्रकल्पातून ४० दशलक्ष घनमीटर (१.४१ टीएमसी) पाणी सोडण्याचा निर्णय बुधवारी (२४ फेब्रुवारी) विभागीय आयुक्त डॉ. उमाकांत दांगट यांनी घेतला.

या निर्णयामुळे औरंगाबाद, जालना, परभणी जिल्ह्यातील गोदावरी नदीकाठच्या ३८६ गावांना आणि पाथरी, मानवत, गंगाखेड पालिकांसमोर असलेला पाणीप्रश्न मार्गी लागणार आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील आपेगाव-हिरडपुरी, जालना जिल्ह्यातील राजाटाकळी-लोणीसावंगी व परभणी जिल्ह्यातील ढालेगाव-मुळी बंधाऱ्यात हे पाणी सोडण्यात येणार आहे. १ मार्च रोजी सकाळी ८ वाजता जायकवाडी धरणाच्या डाव्या कालव्यातून क्रॉस रेग्युलेटरच्या माध्यमातून पाणी सोडण्यास प्रारंभ करण्यात येणार आहे. हे पाणी २०८ किलोमीटर प्रवास करणार आहे, मात्र गेल्या वर्षभरापासून बंधारे आणि कालवे कोरडे असल्यामुळे अनेक ठिकाणी अतिक्रमण झाले आहे. प्रवाह मार्गामध्ये झाडे उगवली आहेत. त्यामुळे १ मार्चपूर्वी जलसंपदा विभागाकडून प्रवाह मार्गाची डागडुजी, गेट तपासणी करण्यात येणार आहे. पहिल्या दिवशी ३०० क्युसेक्स पाणी सोडण्यात येणार असून, हानी टाळण्यासाठी पाणी टप्प्याटप्प्याने पाणी सोडण्याचे प्रमाण वाढवण्यात येणार अाहे. २० ते २५ दिवसांत १.४१ टीएमसी पाणी सोडण्यात येणार आहे.

२५ पथकांकडून निगराणी, वीज बंद
कालव्यातून पाण्याची चोरी होऊ नये म्हणून प्रत्येक ५ किलोमीटरवर एका पथकाची नियुक्ती केली जाईल. त्यासाठी २५ पथकांची स्थापना करण्यात येणार आहे. या पथकामध्ये पोलिस, महसूल, महावितरणचे अधिकारी, कर्मचाऱ्यांचा समावेश असेल. त्याचबरोबर नदीकाठच्या गावांचा आणि प्रवाह मार्गावरील वीज पुरवठा २१ तासांसाठी खंडित करण्यात येणार आहे. केवळ ३ तासांसाठी वीजपुवठा करण्यात येणार असल्याचे लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाचे (कडा) अधीक्षक ‌अभियंता मनोहर पोकळे यांनी सांगितले.

५० टक्के पाणी मुरणार

कालवा अनेक दिवसांपासून कोरडा असल्यामुळे धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्यापैकी ५० टक्के पाणी मुरण्याची शक्यता अाहे. त्यामुळे परिसरातील सर्व विहिरी, बोहर पुन्हा रिचार्ज होतील. उर्वरित ५० टक्के पाणी कालव्यामध्ये राहणार असल्याचे जलसंपदा विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले.

- १ मार्च रोजी सकाळी ८ वाजता सोडणार पाणी
- पाण्याचा प्रवास २०८ किलोमीटरचा
- ३८६ गावे, ३ पालिकांची तहान भागविणार
- पाणीचोरी रोखण्यासाठी २५ पथकांची नियुक्ती

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुलाच्या मृत्यूप्रकरणी टेम्पोचालकास शिक्षा

0
0

खुलताबाद ः टेम्पोच्या पुढच्या टायरच्याखाली भारत सुरेश अधाने या एक वर्षाच्या बालकाला चिरडून त्याच्या मरणास कारणीभूत ठरलेला टेम्पोचालक शेख अफरोज शेख गुलाब (रा. टाकळी राजेराय) याला दिवाणी व फौजदारी न्यायालयाचे न्यायाधीश अभय घुगे यांनी तीन महिने सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. मुलाच्या पालकांना नुकसानभरपाई म्हणून पाच हजार रुपये देण्याचे आदेश दिले. दंड न भरल्यास एक महिन्याची साधी कैदेची शिक्षा सुनावली.
टाकळी राजेराय येथे हा अपघात १५ डिसेंबर २०११ रोजी झाला होता. टेम्पोच्या (एम एच ०४ सी ए ४५६८) पुढील चाकाखाली येऊन भारत सुरेश अधाने (वय एक वर्ष, रा. विरमगाव) याच्या मृत्यूस कारणीभूत झाल्याबद्दल टेम्पोचालक शेख अफरोज याच्यावर खुलताबाद पोलिस ठाण्यात कलम २७९, ३०४ (अ) अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला होता. सहायक फौजदार उत्तम राठोड यांनी तपास करून दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले. याप्रकरणात सहा साक्षीदार तपासण्यात आले. दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेऊन न्यायाधीश अभय घुगे यांनी तीन महिन्यांची शिक्षा सुनावली. सरकारतर्फे विशेष सहायक सरकारी अभियोक्ता पी. आर. कुर्लेकर यांनी बाजू मांडली. त्यांना कोर्टपैरवी सहायक फौजदार एस. डी. सोनवणे यांनी सहाय्य केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुलीच्या लग्नाची चिंता; शेतकऱ्याची आत्महत्या

0
0

खुलताबाद: बारावीची परीक्षा देत असलेल्या मुलीच्या लग्नाच्या चिंतेने तालुक्यातील रेल येथील राजू रंगनाथ साळुंके या ४२ वर्षीय शेतकऱ्याने लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली.

राजू साळुंके यांनी रेल येथील गट क्रमांक ७७ मधील लिंबाच्या झाडाला गळफासाने आत्महत्या केल्याची माहिती पोलिस पाटील पंडित माचवे यांनी पोलिस ठाण्यात दिली. ही घटना गुरुवारी सकाली उघडकीस आली. घटनास्थळी पंचनामा करण्यात आला. साळुंके त्यांच्यावर विविध कार्यकारी सोसायटीचे ४० हजार रुपये तर, देवगिरी बँकेचे दीड लाख रुपये कर्ज होते. कर्जबाजारीपणामुळे इयत्ता बारावीची परीक्षा देत असलेल्या मुलीचे लग्न करण्यासाठी पैसे कोठून आणायचे या चिंतेने ते त्रस्त होते, असे त्यांच्या नातेवाईकांनी सांगितले. खुलताबाद ग्रामीण रुग्णालयात राजू साळुंके यांची उत्तरीय तपासणी करण्यात आली. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगी, दोन मुले, असा परिवार आहे. घटनेची माहिती तलाठी कैलास कुबेर यांनी तहसील कार्यालयात कळवली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उत्तरे देता देता अध‌िकाऱ्यांच्या नाकीनऊ

0
0

म. टा. प्रतिनिधी, फुलंब्री
पूर्ण न झालेल्या कामांचा उल्लेख पूर्ण झाल्या असे केल्यावरून पंचायत समितीची गुरुवारी झालेली आमसभा गोंधळात पार पडली. या गोंधळाला अधिकाऱ्यांना जबाबदार धरण्यात आले आहे. सभेत उपस्थित झालेल्या प्रश्नांना उत्तरे देतांना अधिकाऱ्यांच्या नाकीनऊ आले.
राज्याचे विधानसभा अध्यक्ष व फुलंब्रीचे आमदार हरीभाऊ बागडे यांच्या अध्यक्षतेखाली आमसभेचे आयोजन करण्यात आले होते. आमसभेला तालुक्यातील प्रमुख अधिकारी, स्थानिक स्वराज्य संस्थांचे पदाधिकारी, सदस्य व शासकीय कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती. तालुक्यात काेठेही महाराष्ट्र ग्रामीण राेजगार हमी याेजनेचे काम सुरू नाही. दुष्काळाच्या झळा पाेहाेचत अाहे. यामुळे शेतकरी हा मजूर झाला. त्यास हाताला काम मिळणे गरजेचे अाहे. हमी याेजनेचे काम सुरू करावे, अशी मागणी हाेती. तालुक्यात पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न असून विहिरी अधिग्रहण करून व्यवस्था करावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. रोहयो योजनेत चार अभियंत्यांची अावश्यक असतांना फक्त एक अभियंता अाहे. यामुळे तालुक्याचे काम एक अभियंता करू शकत नाही, याकडे आमसभेत लक्ष वेधण्यात आले. रोहयोतून मंजूर केल्या जाणाऱ्या विहिरींचे प्रस्ताव पूर्ण कागदपत्र नसल्याने नामंजूर हाेतात. प्रस्ताव परत येणार नाही, मंजूर विहिरी पूर्ण झाल्याशिवाय दुसऱ्या विहिरी मंजूर हाेणार नाहीत, असे सांगण्यात आले.
तालुक्यात १७ व १८ सप्टेंबर २०१५ रोजी झालेल्या अतिवृष्टीत अनेक बंधारे वाहून गेले. या घटनेस पाच महिने होऊनही अद्याप एकही बंधारा व रस्त्याची दुरुस्ती झाली नसल्याबद्दल टीका करण्यात आली. बंधाऱ्यांची दुरुस्ती झाली असती तर, तालुक्यात पाणीसाठा दिसला असता, असे लक्षात आणून देण्यात आले. कान्हाेरीचे सरपंच प्रभाकर साेटम यांनी निलंबित झालेले गटविकास अधिकारी शिवाजीराव माने हे कर्तव्यदक्ष व प्रामाणिक असे सांगितले. रोहयो विहिरींच्या प्रस्तावातील कागदपत्रे काढून टाकून ते बनावट असल्याचे दर्शवण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. याला जबाबदार कर्मचाऱ्यांची चाैकशींची मागणी त्यांनी केली. या सभेला तहसीलदार संगिता चव्हाण, प्रशिक्षणार्थी जिल्हाधिकारी तथा गटविकास अधिकारी विपीन इटनकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव साळुंके यांची उपस्थिती होती.
शिवसेना तालुकाप्रमुख राजेंद्र ठाेंबरे व काकासाहेब माेटे यांनी सुरुवातीपासूनच प्रश्नांचा भडीमार करून अधिकाऱ्यांना धारेवर धरले. दाेघांनी माइकचा ताबा घेतल्याने भाजपचे कार्यकर्ते संतापले. शिवसेनेचे प्रश्न पुरे झाले अाता अाम्हाला बाेलू द्या, अशी मागणी त्यांनी केली. शिवसेना-भाजप कार्यकर्ते समाेरासमाेर येऊन अाक्रमक झाल्याने बागडे यांनाच मध्यस्ती करावी लागली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

माजी उपसभापती चव्हाण कोर्टात शरण

0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
औरंगाबाद पंचायत समितीचा माजी उपसभापती व विद्यमान सदस्य सर्जेराव विश्वनाथ चव्हाण याने गुरुवारी (२५ फेब्रुवारी) प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी व्ही. ए. उपध्ये यांच्या कोर्टात शरणागती पत्करली. त्याच्यावर वाहनचालक चंद्रकांत जाधव यांचा खून केल्याचा आरोप आहे.
३१ डिसेंबरला रात्री सर्जेराव चव्हाण याने मुंबई महामार्गावरील करोडी शिवारातील हॉटेल साईराजमाता येथे लावण्यांचा कार्यक्रम ठेवला होता. मात्र, दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांचा वाहनचालक चंद्रकांत जाधव यांचा करोडी शिवारातील रेल्वे पटरीवर मृतदेह आढळून आला. जाधव हे गेल्या दहा वर्षांपासून चव्हाणकडे चालक म्हणून काम करीत होते. पोलिसांनी या घटनेची नोंद आकस्मिक मृत्यू म्हणून केली होती. १६ जानेवारी रोजी चंद्रकांत यांची पत्नी गायत्रीबाई यांनी पोलिसांत तक्रार दिली होती. या तक्रारीवरून पोलिसांनी बिरजू तरैय्यावाले, गुड्डू पठाण यांच्यासह तिघांना अटक करण्यात आली होती. तिघांनी दिलेल्या जबाबानुसार, सर्जेराव याच्या सांगण्यावरून त्यांनी हा खून केला, असे समोर आले होते. तेव्हापासून सर्जेराव याने जिल्हा कोर्ट ते हायकोर्टपर्यंत अटकपूर्व जामीन मिळविण्याचा प्रयत्न केला होता. त्यात यश आले नाही म्हणून सर्जेराव याने प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी व्ही. ए. उपाध्ये यांच्या कोर्टात शरणागती पत्करली. कोर्टाने त्याच्या अर्जाची दखल घेत त्याला दहा मार्चपर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राष्ट्रीय महामार्ग लवाद कार्यालयाचे उद्घाटन

0
0

औरंगाबाद ः मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांतील राष्ट्रीय महामार्गाच्या भूसंपादन प्रकरणात अपील चालविण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण औरंगाबाद विभागीय लवाद कार्यालयाचे विभागीय आयुक्त डॉ. उमाकांत दांगट यांनी उदघाटन केले. हे कार्यालय विभागीय आयुक्त कार्यालय परिसरात सुरू करण्यात आले आहे. यावेळी उपायुक्त जितेंद्र पापळकर, डॉ. विजयकुमार फड, महेंद्र हरपाळकर, पारस बोथरा, उपजिल्हाधिकारी शिवाजी शिंदे यांची उपस्थिती होती. केंद्रीय राष्ट्रीय महामार्ग मंत्रालयाच्या आदेशानुसार अपर आयुक्तांची लवाद म्हणून नियुक्ती झाली आहे. सध्या विभागात राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ९ (सोलापूर ते संगारेड्डी), महामार्ग क्रमांक २११ (येडशी- औरंगाबाद-धुळे), क्रमांक ३६१ (तुळजापूर--लातूर-वारंगा) या महामार्गासाठी भूसंपादन करण्यात येत आहे. भूसंपादन अधिकाऱ्यांच्या निवाड्याविरुद्ध या लवादाकडे अपील दाखल करू शकतात.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शेततळ्यांमुळे सिल्लोड तालुक्यात स्थैर्य

0
0

म. टा. प्रतिनिधी, सिल्लोड
शासनाच्या अनुदानातून तालुक्यात आतापर्यंत पाचशे शेततळी तयार करण्यात आली आहेत. या शेततळ्यांमुळे तालुक्यातील शेतकरी ऐन दुष्काळातही पीक घेत आहेत. शाश्वत पाणीसाठा झाल्याने मिरची, अद्रक, भाजीपाला आदी पिके घेऊन शेतकऱ्यांनी संसार सावरला आहे.
तत्कालीन लोकशाही आघाडी सरकारने शेतकऱ्यांना शेततळे खोदण्यासाठी योजना आणली होती. या योजनेचा तालुक्यातील शेतकऱ्यांनी चांगलाच लाभ घेतला आहे. एका शेततळ्यात पाच लाख लिटर पाणी संरक्षित केले जाते. या शेततळ्यांमध्ये हंगामात सुमारे २५ लाख कोटी लिटर पाणी तालुक्यातील शेतकरी जमा करतात, अशी माहिती तालुका कृषी अधिकारी सुभाष आघाव यांनी दिली.
या शेततळ्यांच्या माध्यमातून तालुक्यातील शेतकऱ्यांनी आर्थिक सुबत्ता निर्माण झाली आहे. पावसाळ्यात भरून ठेवेलले पाणी पावसाने ओढ दिल्यानंतर मका, कापूस, सोयाबीन आदी पिकांना पाणी दिले आहे. या पाण्याच्या बळावर काही शेतकऱ्यांनी मिरची, अद्रक, भाजीपाला ही नगदी पिके घेतली आहेत. विशेषतः तालुक्यात मिरचीचे क्षेत्र वाढण्यात शेततळ्यांचा मोठा वाटा आहे. मान्सून पूर्व व पावसावर तालुक्यात पाच हजार हेक्टरवर मिरचीची लागवड केली जाते. शेततळ्यामुळे विहिरीला पाणी राहण्यास मदत होते, असे आघाव यांनी सांगितले. काही शेतकरी शेततळ्यांतील पाण्यावर अललंबून मान्सून पूर्व कापूस पीक घेतात. मोठ्या प्रमाणावर जमीन गुंतून पडत असतानाही अनेक शेतकऱ्यांनी उत्तम प्रतिच्या जमिनीतही शेततळी तयार केली आहेत. त्यातील पाणी जमिनीत झिरपू नये यासाठी प्लास्टिक अंथरण्यात आले आहे.
गेल्या तीन वर्षांपासून पर्जन्यमान कमी होत असतानाही तालुक्यातील शेतकऱ्यांनी शेततळ्याच्या माध्यमातून नगदी व जास्त पाणी लागणारी पिके घेतली आहेत. यावर्षी पाऊस कमी असताना शेतकऱ्यांचे धाबे दणाणले होते. मात्र, १७ सप्टेंबर २०१५ रोजी झालेल्या अतिवृष्टीत शेततळी भरली, त्याचा मोठा आधार शेतकऱ्यांना झाला आहे.

नवीन योजनेत शेततळी कठीण
तालुक्यातील शेततळे प्रामुख्याने अनुदान योजनेतून खोदण्यात आली आहेत. सध्याच्या भाजप-शिवसेना सरकारने 'मागेल त्याला शेततळे' ही योजना आणली आहे. या योजनेत एका शेततळ्यासाठी शासन फक्त ५० हजार रुपये देणार आहे. एक शेततळे खोदण्यासाठी किमाने दोन ते तीन लाख रुपये खर्च येतो. त्यामुळे उर्वरित रक्कम शेतकऱ्याला टाकावी लागणार आहे. सध्याच्या स्थितीत एवढा मोठा खर्च करण्याची शेतकऱ्यांची हिंमत नाही. त्यामुळे नवीन योनजेला तालुक्यात प्रतिसाद मिळण्याची शक्यता कमी आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


अवैध वाळूउपशाकडे वैजापूरमध्ये दुर्लक्ष

0
0

वैजापूर ः तालुक्यातील गोदावरी नदी पात्रातून सध्या मोठ्या प्रमाणावर वाळूचा उपसा सुरू आहे. रात्रीच्या वेळी ट्रक व हायवासारख्या मोठ्या वाहनांतून वाळूची विनापरवाना वाहतूक होत असूनही प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याने शासनाचा महसूल बुडत आहे. गंगथडी भागातील विरगाव व वैजापूर पोलिस ठाण्यांच्या हद्दीतून वाळूची वाहने रात्रीच्या वेळी सर्रासपणे धावतांना दिसतात. पोलिस व महसूल प्रशासनाकडून कारवाई होत नसल्याने हा धंदा बिनबोभाटपणे सुरू आहे.
तालुक्यात गोदावरी व शिवना नदीच्या पात्रात वाळूचे घाट आहेत. गोदावरी नदीचे जवळपास अठरा घाट असून त्यापैकी बाभूळगावगंगा, पुरणगाव, भालगाव येथील वाळूघाटात मोठ्या प्रमाणावर वाळूचा साठा उपलब्ध असतो. मागील दोन वर्षांपासून ग्रामपंचायतींचा विरोध व वाळू ठेकेदारांचा अल्प प्रतिसाद यामुळे तालुक्यातील एकाही घाटाचा लिलाव झाला नाही. मात्र, येथील वाळूला बांधकामासाठी बाहेरील जिल्ह्यातही मागणी असल्याने वाळूतस्करांनी त्याचा फायदा घेण्याचे धोरण अवलंबले आहे. सध्या तीन ते चार हजार रुपये ब्रास या दराने वाळूची विक्री होत आहे. ट्रक व हायवामधून चार ते सहा ब्रास वाळूची वाहतूक रात्रीच्या वेळी केली जात असल्याचे सांगितले जाते. वाळूघाटातून जेसीबीने उपसा करून ठिकठिकाणी वाळूचे साठे करण्यात आले असून तेथून रात्री वाहनांतून वाळूची वाहतूक होत असल्याची खात्रीलायक माहिती आहे.
याबाबत तहसीलदार वंदना निकुंभ यांना विचारले असता कारवाई सुरू असल्याचे सांगण्यात आले. परंतु, प्रत्यक्षात तहसील कार्यालयाने नियुक्त केलेले तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांची पथकेच सक्रिय नसल्याचा आरोप आहे. पुरणगाव येथील रहिवासी व नगरसेवक उल्हास ठोंबरे यांनीही पुरणगाव येथून अवैध वाळूचा उपसा सुरू असल्याची तक्रार केली आहे. मात्र कुठलीही कारवाई होत नसल्याचे ठोंबरे यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

क्लार्कसारखे का वागता?

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
क्लासवन अधिकारी आहात, क्लासवन अधिकाऱ्यांसारखे वागा, एखाद्या क्लार्कसारखे का वागता, अशा शब्दांत महापालिका आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी अधिकाऱ्यांची खरडपट्टी काढली.
पालिकेच्या आयुक्तपदी पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांची बदली करण्यात आली आहे. त्यामुळे केंद्रेकर पालिकेच्या कामकाजातील लक्ष कमी करतील असे अधिकाऱ्यांना वाटत होते, पण घडले उलटेच. केंद्रेकरांनी महापौरांच्या उपस्थितीत अधिकाऱ्यांची बैठक घेतली आणि अधिकाऱ्यांची चांगलीच खरडपट्टी केली. बैठकीस उपस्थित असलेल्या एका पदाधिकाऱ्याने याबद्दल माहिती दिली. बीओटी प्रकल्पांवर चर्चा झाली तेव्हा बीओटी कक्षप्रमुख सिकंदर अली आवश्यक ती माहिती व्यवस्थीतपणे देऊ शकले नाहीत. त्यामुळे त्यांना उद्देशून केंद्रेकर म्हणाले, असे अर्धवट कशासाठी बोलता, व्यवस्थित माहिती द्या. तुम्ही क्लासवन अधिकारी आहात, तुमचे वय देखील झाले आहे. पण, बैठकीत एखाद्या विषयाची माहिती कशी द्यायची हे देखील तुम्हाला माहिती नाही. एखाद्या क्लार्कसारखे का वागता. सिद्धार्थ उद्यानाच्या प्राणिसंग्रहालयातील पिंजऱ्यांच्या डागडुजीचा विषय निघाला तेव्हा त्यांनी त्याबद्दल शहर अभियंता सखाराम पानझडे यांना जाब विचारला. पानझडे देखील व्यवस्थित उत्तर देऊ शकले नाहीत. त्यामुळे तुम्ही ते काम करता की मी स्वतः तेथे जाऊन काम करून घेऊ, असे केंद्रेकर पानझडे यांना उद्देशून म्हणाले. मोकाट कुत्र्यांबद्दल पदाधिकाऱ्यांनी तक्रारी केल्या तेव्हा डॉ. बी. एस. नाईकवाडे यांना त्याबद्दल खुलासा करण्यास केंद्रेकरांनी सांगितले. डॉ. नाईकवाडे यांनी नेहमीप्रमाणे मनुष्यबळ नसल्याचे कारण पुढे केले. त्यामुळे केंद्रेकर संतापले.
एकच एक कारण किती दिवस सांगणार आहात, तुम्हाला काम करायचे आहे की नाही ते सांगा, असा सवाल केंद्रेकरांनी डॉ. नाईकवाडे यांना केला. अास्थापना विभागाच्या विषयात त्यांनी अास्थापना अधिकारी भालचंद्र पैठणे यांनाही झापले. पैठणे काहीच कामाचे नाहीत, त्यांच्याकडचा अास्थापना अधिकारीपदाचा चार्ज तत्काळ काढून घ्या, असे आदेश त्यांनी अतिरिक्त आयुक्त रमेश पवार यांना दिले. सर्वच अधिकारी केंद्रेकरांच्या रडारवर होते. शहरासाठी चांगले काम करा, उडवाउडवीची उत्तरे देऊ नका, असे त्यांनी या सर्वांना बजावले.
वरिष्ठ अधिकाऱ्यांना समज देताना सुनील केंद्रेकर म्हणाले, मी तुम्हाला खूप पाठिशी घातले. पण नवीन येणारे आयुक्त तसे नाहीत. ते माझ्यापेक्षा कडक आहेत. त्यांना नियमाच्या बाहेर जाऊन काही केलेले चालत नाही. तुमची कार्यपद्धती अशीच राहिली तर, ते तुम्हाला निलंबित करतील. त्यामुळे अधिकाराचे भान ठेवा आणि कामात सुधारणा करा.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वीटभट्टी चालकाची सव्वा लाखांची फसवणूक

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
वीटभट्टी चालकाकडून वीट खरेदी करीत त्याला खात्यात रक्कम नसताना धनादेश देत सव्वा लाखांची फसवणूक करण्यात आली आहे. याप्रकरणी दोन आरोपींविरुद्ध छावणी पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सय्यद साजीद सय्यद पाशा (वय २७, रा. रहेमानिया कॉलनी, आझाद चौक) व त्यांचा भाऊ सोहेल यांची मिटमिटा व ओहर जटवाडा येथे वीटभट्टी आहे. २९ सप्टेंबर २०१५ रोजी सय्यद बंधूकडून संजय बन्सी जाधव (रा. एकतानगर, जटवाडा) व शेख गफार शेख सत्तार (रा. दौलताबाद) यांनी वीट खरेदी केली. जाधव याने ७५ हजारांची तर शेख गफारने ४३ हजारांची वीट खरेदी केली होती. जाधवने महिला नागरी सहकारी बँकेचा धनादेश तर गफारने भारतीय स्टेट बँक, माळीवाडा शाखेचा धनादेश दिला होता. सय्यद बंधूनी हे धनादेश वटवण्यासाठी बँकेत टाकले असता रक्कम नसल्याचे ते बाऊंस झाले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर सय्यद साजीदने पोलिस ठाणे गाठून संजय जाधव व शेख गफार‌विरुद्ध फसवणूक व अपहाराचा गुन्हा दाखल केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्वातंत्र्यसेनानी जैस्वाल यांचा शनिवारी सत्कार

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
आयुष्य देशसेवेसाठी समर्पित करणारे ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी लाला लक्ष्मीनारायण जैस्वाल यांचा सर्वपक्षीय नागरी सत्कार करण्यात येणार आहे. यानिमित्त 'हैदराबाद मुक्तीसंग्राम एक व्रतस्थ योद्धाःलाला लक्ष्मीनारायण जैस्वाल' हा गौरव अंक प्रकाशित करण्यात येणार आहे, अशी माहिती गौरव समितीचे अध्यक्ष मानसिंग पवार यांनी गुरुवारी (२५ फेब्रुवारी) पत्रकारांशी बोलताना दिली.
एमजीएम परिसरातील रुख्मिणी सभागृहात शनिवारी (२७ फेब्रुवारी) दुपारी चार वाजहा हा गौरव सोहळा होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे राहणार आहेत. स्वातंत्र्यसैनिक पद्मभूषण बद्रीनारायण बारवाले यांच्या हस्ते गौरव अंकाचे प्रकाशन होणार आहे, अशी माहिती पवार यांनी दिली. माजी आमदार प्रदीप जैस्वाल, विजय राऊत, प्रा. डॉ. मच्छिंद्र गोर्डे, शिवाजी शिंदे, मनीष जैस्वाल आदी उपस्थित होते. लाला लक्ष्मीनारायण जैस्वाल यांनी वयाच्या ९१ व्या वर्षात पदार्पण केले आहे. त्यांनी मुक्तिसंग्रामासह सामाजिक, शैक्षणिक, आध्यामिक, सांस्कृतिक क्षेत्रात मोलाचे कार्य करत आहेत. त्यांच्या या योगदानाबद्दल आणि भावी पिढीला त्यांच्या कार्याविषयी अधिक माहिती व्हावी, यासाठी सर्वपक्षीय नागरी सत्काराचे आयोजन करण्यात आल्याचे पवार यांनी सांगितले.
गौरव ग्रंथामध्ये जैस्वाल यांच्या कार्यासह एकूण जीवनपट मांडण्यात आला आहे. त्यांच्या जीवनपटावर आधारीत एक फिल्मही यावेळी दाखविण्यात येणार आहे. पालकमंत्री रामदास कदम, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, खासदार चंद्रकांत खैरे, रावसाहेब दानवे, माजीमंत्री रोहिदास पाटील, बाळासाहेब थोरात, राजेंद्र दर्डा, राजेश टोपे आदी उपस्थित राहणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एमआयडीसीकडून गाळ्यांची पाहणी

0
0

म. टा. प्रतिनिधी, वाळूज
छोट्या व्यावसायिकांसाठी एमआयडीसीने बजाजनगर येेथे बांधून दिलेल्या गाळ्याचे करार पंधरा वर्षांपासून रखडले आहेत. या बाबतचे वृत्त 'मटा'ने प्रसिद्ध केले होते. त्यानंतर एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांनी स्थळ पाहणी केली. गाळेधारकांच्या कागदपत्राची शहानिशा करून प्रश्न मार्गी लावण्यात येणार असल्याची माहिती एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी एस. पी. वायाळ यांनी दिली.
वाळूज औद्योगिक परिसरात एमआयडीसीची स्थापना झाल्यानंतर बजाजनगर ही नागरी वसाहत स्थापन करण्यात आली. येथील रहिवाशांना सुविधा मिळण्यासाठी छोट्या व्यावसायिकांसाठी १३ गाळे बांधण्यात आले होते. या गाळ्यांचे वाटप सोडत पद्धतीने करण्यात आली होती. सोडतीची रक्कम अदा केल्यानंतर २००१ मध्ये गाळेवाटप केले. परंतु,गाळेधारकांना एमआयडीसीने अद्याप करार करून दिलेला नाही. त्यामूळे गाळेधारकांना गाळ्यांचा कोणताच उपयोग होत नाही. करार करून घेण्यासाठी एमआयडीसीत खेट्या घालाव्या लागत आहेत. ही व्यथा प्रसिद्ध केल्यानंतर एमआयडीसी प्रशासन खडबडून जागे झाले. त्यांनी गाळ्याची पाहणी करून आहवाल सादर करण्याचे आदेश प्रादेशिक अधिकारी वायाळ यांनी दिले होते. एमआयडीसीचे सर्वेअर जी. पी. राठोड यांनी गाळ्यांची पाहणी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वीजबिल वसुली पथकाला मारहाण

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
वीजबिल वसुली पथकावर हल्ला करून मारहाण केल्याप्रकरणी जिन्सी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना कटकट गेट भागात घडली. वसुली कर्मचाऱ्यांना मारहाण झाल्याची दोन महिन्यांतील ही सातवी घटना आहे.
कटकट गेट परिसरातील मकसूद कॉलनीमध्ये महावितरणचे सहायक अभियंता मनोहर पाटील, शेख गौसोद्दीन, लाइनमन गायकवाड यांचे पथक बुधवारी सकाळी वीज मीटर व बिलांची तपासणी करण्यासाठी गेले होते. बिल्किस आर्केड अपार्टमेंट येथे मीटर तपासणी करताना ईमादे अहमद मकसूद व त्याच्या दोन भावांनी या कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करून लाथा बुक्यांनी मारहाण केली, शर्ट फाडला, नेमप्लेट फेकून दिली, अशी तक्रार आहे. वीज भरणार नाही, असे सांगून बिल्डिंगमध्ये पुन्हा आल्यास जीवे मारण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी चार भावडांविरुद्ध जिन्सी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बिल वसुली पथकावर यापूर्वी चिकलठाणा, बेगमपुरा, ज्युबिली पार्क, जयभवानीनगर, पदमपूरा, घाटी परिसर येथे हल्ले झाले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भूसंपादनाचा ‘हत्ती गेला शेपूट राहिले’

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
वेगाने काम सुरू असलेल्या सोलापूर-औरंगाबाद-धुळे राष्ट्रीय महामार्गामुळे मराठवाड्यातील वाहतुकीचा वेग वाढणार आहे. पहिल्या टप्प्यासाठी मराठवाड्यातील उस्मानाबाद, बीड व जालना जिल्ह्यांच्या तुलनेत औरंगाबाद जिल्ह्यात सर्वाधिक भूसंपादनाचे काम झाले असले तरी, दोन गावांमधील भूसंपादन रखडल्यामुळे जिल्ह्यात हत्ती गेला शेपूट राहिले अशी भुसंपादनाची स्थिती झाली आहे.

मराठवाड्यातील वाहतुकीसाठी सर्वात महत्त्वाचा असलेला राष्ट्रीय महामार्गाच्या येडशी ते औरंगाबाद या पहिल्या टप्प्याचे काम वेगाने सुरू आहे. जालना, बीड, उस्मानाबाद जिल्ह्यांचा भूसंपादनाचे प्रमाण ४० टक्केही नाही, मात्र औरंगाबाद जिल्ह्यातील १९पैकी १७ गावांमध्ये मोबदला वाटपाचे काम पूर्ण झाले आहे. केवळ जिल्ह्यातील चितेगाव आणि चितेपिंपळगाव येथे असलेल्या इमारती व घरांमुळे भूसंपादनाची प्रक्रिया रखडली आहे. पहिल्या टप्प्यासाठी ११४ हेक्टरपैकी ९८.९२ हेक्टर (८७ टक्के) क्षेत्राचा ताबा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला देण्यात आला असून, प्राप्त झालेल्या ७७ कोटी रुपयांपैकी ७१ कोटी रुपयांचे वाटप करण्यात आले आहे. दुसऱ्या टप्प्यासाठी जिल्ह्यातील ४४ गावांमधील ५१३ हेक्टर जमिनींचे भूसंपादन करण्यात येणार असून, सध्या संपूर्ण गावांचा प्रारंभिक प्रसिद्धी तर, २६ गावांची मोजणी करण्यात आली आहे. सुनावणीनंतर यासंदर्भातील अहवाल प्राधिकरणाला पाठवण्यात आला आहे.

औरंगाबाद-कन्नड यादरम्यान होणाऱ्या ८०‌ किलोमीटर महामार्गासाठी ४४ गावांमधील ५१३ हेक्टर जमिनीचे भूसंपादन करायचे आहे. यामध्ये औरंगाबाद तालुक्यातील १२ गावे, गंगापूर ७, खुलताबाद ८, कन्नड ११ गावांचा समावेश आहे. येडशी ते औरंगाबाद या पहिल्या टप्प्यासाठी जिल्ह्यातील १९ तर, औरंगाबाद ते धुळे या दुसऱ्या टप्प्यामध्ये जिल्ह्यातील ४४ गावांचा समावेश आहे. जिल्ह्यात अनेक ठिकाणी जमिनीच्या चुकीच्या नोंदी असल्यामुळे भूसंपादन प्रक्रियेसाठी अडचणी येत आहेत.

अभिप्रायानंतर निवाडा
सध्या दुसऱ्या टप्प्यातील भूसंपादन प्रक्रियेसाठी ४४ गावांची मोजणीनंतर प्रारंभिक प्रसिद्धी करण्यात आली आहे. त्यातील २६ गावांची मोजणी प्रक्रिया पूर्ण झाली आहे. त्यावरील आक्षेप आणि हरकतींवर सुनावणी झाली असून, यासंबंधीचा अहवाल राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला पाठवण्यात आला आहे. या अहवालावर मंजुरी झाल्यानंतर जुलै अखेरपर्यंत निवाडा प्रक्रिया पूर्ण होण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘अजिंठा लेणीच्या ओढीने आलो’

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
'माझ्या पूर्वजांनी भारतात अजिंठा लेणीचा पुनर्शोध लावला ही अभिमानाची गोष्ट आहे. दोन वर्षांपूर्वी माहिती मिळाल्यानंतर लेणीकडे आकर्षित झालो. या लेणीच्या ओढीतूनच भारतात आलो,' असे प्रतिपादन कर्नल मार्टिन स्मिथ यांनी केले. अजिंठा लेणीचा पुनर्शोध लावणारे ब्रिटीश अधिकारी जॉन स्मिथ यांचे पाचवे वंशज मार्टिन यांचे गुरुवारी शहरात आगमन झाले. यानिमित्त झालेल्या सत्कार कार्यक्रमात ते बोलत होते.

२८ एप्रिल १८१९ रोजी ब्रिटिश अधिकारी जॉन स्मिथ यांनी अजिंठा लेणी शोधली. शिकारीसाठी वाघूर नदीच्या परिसरात फिरताना स्मिथ यांना खांब दिसले. अखेर झाडाझुडपात दडलेली लेणी शोधण्यात त्यांना यश आले. या घटनेनंतर हजारो वर्षांचा सांस्कृतिक ठेवा जगासमोर आला. जॉन स्मिथ यांचे यांचे पाचवे वंशज मार्टिन स्मिथ पत्नी मार्गारेट यांच्यासोबत लेणी पाहण्यासाठी आले आहेत. 'टुरिस्ट प्रमोटर्स गिल्ड' व हॉटेल अजंठा अॅम्बेसेडर यांच्या वतीने स्मिथ दाम्पत्याचा सत्कार करण्यात आला. लोककलावंत दिलीप खंडेराय यांच्या चमूने लेझीमच्या तालावर स्मिथ यांचे स्वागत करून महाराष्ट्रीय पद्धतीने औंक्षण केले. सत्कार सोहळ्यात स्मिथ यांनी आठवणींना उजाळा दिला. माझे पूर्वज जॉन स्मिथ यांनी लेणीचा पुनर्शोध लावला ही अभिमानास्पद गोष्ट आहे. वाघाची शिकार करण्याचा त्यांना छंद होता. त्यामुळे कुटुंबीय त्यांना विनोदाने 'टायगर स्मिथ' म्हणत. २७ फेब्रुवारी हा त्यांचा स्मृतीदिन आहे. या दिवशी भारतात असल्याचा आनंद आहे. पणजोबांचा काळ डोळ्यासमोर सरकत आहे,' असे स्मिथ म्हणाले. विशेष म्हणजे अजिंठा लेणीबाबत दोन वर्षांपूर्वी त्यांना माहिती मिळाली.

आयर्लंडचे अभ्यासक अजिंठा लेणीवर पुस्तक लिहित आहेत. या पुस्तकासाठी त्यांनी स्मिथ कुटुंबाचा शोध घेतला. स्मिथ यांच्या मुलाने इंटरनेटवर अजिंठा लेणीची माहिती मिळवली. त्यानंतर भारतात लेणी पाहण्याचा निर्णय स्मिथ दाम्पत्याने घेतला. सत्कार सोहळ्याला 'एमटीडीसी'चे वरिष्ठ व्यवस्थापक चंद्रशेखर जैस्वाल, अण्णासाहेब शिंदे, 'टुरिस्ट प्रमोटर्स गिल्ड'चे जसवंतसिंग राजपूत, रुबिना शेख, लियाकत अली उपस्थित होते. अमोद बसोले यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

क्षमा मागतो
'अजिंठा लेणीचा शोध लावल्यानंतर दहा क्रमांकाच्या लेणीत जॉन स्मिथ यांनी एका शिल्पावर स्वतःचे नाव कोरले; तसेच तारीख कोरली आहे. या दुर्दैवी प्रकाराबद्दल दिलगिरी व्यक्त करतो,' असे मार्टिन म्हणाले. या सुंदर लेणीवर मित्र व कुटुंबाशी वारंवार चर्चा केल्याचेही त्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कडा मैदानावर भरणार ‘शेतकरी बाजार’

0
0

Tushar.Bodkhe@timesgroup.com
औरंगाबाद ः मध्यस्थांची साखळी मोडून शेतकरी-ग्राहकात व्यवहार घडवणारा 'शेतकरी बाजार' प्रकल्प औरंगाबाद शहरात सुरू होणार आहे. गारखेड्यातील कडा मैदानावर बाजार भरणार असून, भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांना त्याचा फायदा मिळणार आहे. बाजाराची जबाबदारी कोनेवाडी येथील निसर्गराजा शेतकी मंडळाकडे सोपवली आहे. पुणे शहरात २२ ठिकाणी शेतकरी बाजार सुरू असून, या धर्तीवर शहरात दोन ठिकाणी बाजार सुरू करण्याचे पणन मंडळाचे नियोजन आहे.

पुणे शहरात 'शेतकरी बाजार' शेतकऱ्यांसाठी भाजीपाला विक्रीचे हक्काचे ठिकाण झाले आहे. पणन मंडळ व कृषी विभागाने तब्बल २२ ठिकाणी हा प्रकल्प राबवला आहे. औरंगाबाद शहरातील भाजीपाल्याची मागणी लक्षात घेऊन दोन ठिकाणी 'शेतकरी बाजार' भरवला जाणार आहे. पहिल्या टप्प्यात गजानन महाराज मंदिर परिसरातील कडा मैदानावर दर रविवारी बाजार भरणार आहे. दुसऱ्या टप्प्यात शहानूरमिया दर्गा येथील श्रीहरी पॅव्हेलियनमध्ये बाजार भरवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. शेतकरी व्यापाऱ्यांना शेतीमाल विकून परततात. हा शेतीमाल ग्राहक तिप्पट किंमतीत खरेदी करतात. या बाजाराची जबाबदारी कोनेवाडी (ता. औरंगाबाद) येथील 'निसर्गराजा शेतकरी गटा'कडे सोपवण्यात आली आहे. या गटाचे पंधरा शेतकरी बाजाराचे पूर्ण नियोजन करणार आहेत. शेतकऱ्यांना शेतीमाल विक्रीसाठी टेबल-खुर्ची देणे, बाजार उठल्यानंतर जागेची साफसफाई करणे, बाजारात दलाल किंवा व्यापाऱ्यांची घुसखोरी रोखणे आणि ग्राहकांसाठी पार्किंगची व्यवस्था देण्याचे काम शेतकरी गट करणार आहे. भाजीपाल्यात विविधता ठेवण्यासाठी गट शेतकऱ्यांच्या संपर्कात राहणार आहे.

'रायतू बाजार'ची प्रेरणा
आंध्र प्रदेशात शेतकऱ्यांसाठी 'रायतू बाजार' (जनतेचा बाजार) संकल्पना राबवण्यात आली. या माध्यमातून शेतकरी व ग्राहकांना विशेष फायदा झाला. ही संकल्पना 'शेतकरी बाजार'मध्ये राबवली जाईल. पुण्यात चांगला प्रतिसाद मिळाल्यामुळे इतर शहरात 'शेतकरी बाजार' भरणार आहे. औरंगाबादेत आणखी जागा असल्यास दररोज भाजीपाला विक्रीची तयारी शेतकऱ्यांनी दाखवली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दहाव्या द्विपक्षीय कराराच्या अंमलबजावणीची मागणी

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
दहाव्या द्विपक्षीय कराराची अंमलबजावणी करण्यात यावी, महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या कर्मचाऱ्यांना सन्मानजनक निवृत्ती देण्यात यावी, असे मत बँक कर्मचारी संघटनेचे देविदास तुळजापूरकर यांनी व्यक्त केले.

महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या कर्मचारी-अधिकाऱ्यांनी सिडको कॅनॉट प्लेसजवळील महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या मुख्यालयासमोर गुरुवारी निदर्शने करण्यात आली. यावेळी रवी धामणगावकर, गोपाल हुलसूरकर, बँकेचे ऑल इंडिया बँक एम्प्लाइज असो‌सिएशन या संघटनेशी निगडित सर्व बँक कर्मचारी अधिकारी उपस्थित होते.

विविध मागण्यांसाठी आम्ही यावर्षी पाच कृती आंदोलन करण्याचे ठरवले असल्याचे तुळजापूरकर यांनी यावेळी सांगितले. ते म्हणाले, 'यापुढे ५ मार्च रोजी बँक ऑफ महाराष्ट्रच्या पुण्यातील मुख्य कार्यालयासमोर, नाबार्ड झोनल ऑफिसकडे मास डेप्युटेशन करण्यात येणार आहे. यानंतर २८ मार्च २०१६ला लाक्षणिक संपही होईल.'

विविध घोषणाबाजीने मुख्यालयाचा परिसर दणाणून सोडला होता. यावेळी २०० कर्मचारी-अधिकारी निदर्शने करताना दिसली, पण बँकेच्या कामकाजावर याचा विपरित परिणाम झाला नाही. महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे कैलास कानडे (सरचिटणीस) शिवशंकर लाईकदार (सरचिटणीस) आदींसह कर्मचारी-अधिकारी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मराठवाड्यासाठी थोडी खुशी, थोडा गम

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
रेल्वे अर्थसंकल्पात मराठवाड्यातील नगर-बीड-परळी या लोहमार्गासाठी २०० कोटी रुपये जाहीर करण्यात आले आहेत. शिवाय औरंगाबादच्या मॉडेल रेल्वे स्टेशनसाठी दीड कोटी रुपये देण्यात आले आहेत. मुदखेड-परभणी मार्गाच्या विकासासाठी मोठी तरतूद करण्यात आली आहे. रोटेगाव-पुणतांबा मार्गाचे सर्वेक्षण घोषित करण्यात आले आहे, मात्र विभागातील रेल्वे

विकासाच्या अन्य प्रलंबित प्रकल्पांसाठी भरीव तरतूद करण्यात आली नाही. नांदेड विभाग मध्य रेल्वेला जोडण्याच्या मागणीलाही रेल्मेमंत्र्यांनी वाटाण्याच्या अक्षता लावल्या आहेत.

यंदाच्या रेल्वे अर्थसंकल्पातून मराठवाड्याला मोठ्या अपेक्षा होत्या. मनमाड-परभणी मार्गाचे दुहेरीकरण व विद्युतीकरणाची मागणी मराठवाड्यातील सर्वच खासदारांनी केली होती. या मार्गासाठी यंदाच्या अर्थसंकल्पात फक्त एक कोटी १० लाखांची तरतूद करण्यात आली आहे. दौलताबाद-रोटेगाव मार्गाचा महत्त्वकांक्षी प्रकल्प सरकारने हाती घेतला होता. या प्रकल्पासाठी फक्त ८ लाख २६ हजाराची तरतूद करण्यात आली आहे. यामुळे या प्रकल्पाला जीवनदान मिळाले आहे. याशिवाय नांदेड रेल्वे स्टेशनचे सौंर्दर्यीकरण करण्यात येणार असल्याचे रेल्वेमंत्र्यांनी जाहीर केले आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून मॉडेल रेल्वे स्टेशनचे काम रखडले होते. सहा महिन्यांपूर्वी या स्टेशनच्या टप्पा क्रमांक दोनचे भूमिपूजन करण्यात आले होते. स्टेशनसाठी अर्थसंकल्पात सुमारे दीड कोटी रुपयाची तरतूद करण्यात आली आहे. औरंगाबाद रेल्वे स्टेशनचा समावेश हा चारशे रेल्वे स्टेशनमध्ये करण्यात आला आहे. यामुळे आगामी काळात आगामी काळात औरंगाबाद, नांदेड आणि इतर रेल्वे स्टेशनांवरील प्रवासी सुविधा वाढविण्यात येणार आहेत.

शिवाजीनगर रेल्वे उड्डाणपुलाला तीन कोटी
औरंगाबाद शहरातील सर्वात जास्त वाहतूक असलेल्या शिवाजीनगर रेल्वे उड्डाणपूल उभारण्यासाठी रेल्वे अर्थसंकल्पात मंजुरी देण्यात आली आहे. शिवाजीनगर (रेल्वे गेट क्रमांक ५४) क्रॉलिंगसाठी तीन कोटीची तरतूद करण्यात आली असल्याची माहिती रेल्वे सूत्रांनी दिली.

नवीन मार्गांचे सर्वेक्षण
- औरंगाबाद ते चाळीसगाव : ९५ किमी
- बोधन -बिलोली - मुखेड - जळकोट ते लातूर रोड : १३० किमी
- वाशीम ते नारखेर : २३२ किमी
- मानवत रोड ते परळी मार्गे सोनपेठ :२७ किमी

मुदखेड-परभणीसाठी १७० कोटी
- रोटेगाव - पुणतांबा - (२७ किमी)
- मुदखेड-परभणी (८१.४३ किमी) - १७० कोटी रुपये
- परभणी-मनमाड - २९१ किमी - दुहेरीकरण - एक कोटी १० लाख
- परभणी-परळी - ६७ किमी - दुहेरीकरण - ०५ लाख
- सोलापूर-तुळजापूर-उस्मानाबाद ः (८० किमी) - १० लाख
- गुलबर्गा - लातूर - नवीन मार्ग (२२ किमी ) - ८ लाख
- औरंगाबाद - चाळीसगाव - (९५ किमी) - ८ लाख २६ हजार
- बेलापूर - बीड - (१६५ किमी) - ७ लाख २६ हजार
- नांदेड-यवतमाळ-वर्धा -१५० कोटी
- अकोला - खांडवा- मऊ - रतलाम रुंदीकारणासाठी २५० कोटी मंजूर
- औरंगाबाद स्थानकाच्या नवीन इमारतीसाठी (दुसरा टप्पा) १ कोटी मंजूर
- औरंगाबाद आणि नांदेड स्थानकांचा पर्यटन स्थानक म्हणून विकास करिता १ कोटी मंजूर
- मनमाड ते मुदखेडदरम्यान रेल्वे पुलांच्या दुरुस्तीसाठी १० लाख मंजूर
- नांदेड येथे नवीन पीट लाइनसाठी ३० लाख मंजूर
- जालना आणि सेलू येथे प्लॅटफॉर्मसाठी तरतूद
- गेल्या वर्षी सुरू असलेले वाशीम-माहूर-आदिलाबाद, नांदेड ते लातूर रोड या लोहमार्ग सर्वेक्षणचे काम या वर्षी सुरूच राहणार
(तरतूद रुपयांत)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अवयवदानासाठी ‘घाटी’ सज्ज

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
अवघ्या दीड महिन्यांत तीन 'ब्रेन डेड' रुग्णांकडून २ हृदय, ३ यकृत, ६ मूत्रपिंड अशा तब्बल ११ अवयवांचे दान झाल्यानंतर गुरुवारी (२५ फेब्रुवारी) दुपारपासून शहरामध्ये चौथ्या 'ब्रेन डेड' रुग्णाच्या अवयवदानाच्या हालचाली सुरू झाल्या. विशेष म्हणजे हे अवयवदान खासगी रुग्णालयात होणार नसून, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातून (घाटी) होणार असल्याचे संकेत आहे. नेमक्या किती अवयवांचे प्रत्यारोपण होणार, हे गुरुवारी रात्रीपर्यंत स्पष्ट झाले नसले तरी यकृत व मूत्रपिंडांचे प्रत्यारोपण होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. त्याचवेळी हृदयाच्या प्रत्यारोपणासाठीही प्रयत्न सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले.

वैजापूर येथील गणेश घोडके (२७) यांचा बुधवारी वैजापूर परिसरात अपघात झाल्यानंतर त्यांना बुधवारी घाटीमध्ये दाखल करण्यात आले. त्यांच्या समोरच्या व बाजूच्या मेंदूला जबर मार लागून रक्तस्त्राव झाला होता. उपचारादरम्यान गणेश हे वैद्यकीयदृष्ट्या मृत (ब्रेन डेड) झाल्याचे डॉक्टरांनी नातेवाईकांना सांगितले. त्यानंतर नातेवाईकांनी गुरुवारी सकाळी अवयवदानाचा धाडसी निर्णय घेतला आणि त्यानंतर अवयवदानाच्या हालचाली सुरू झाल्या. घाटीतील 'ब्रेन डेथ कमिटी'ने दुपारी दोन वाजता व रात्री आठ वाजता गणेश यांना तपासून 'ब्रेन डेड' जाहीर केले. त्यानंतर 'झेडटीसीसी'ला कळविण्यात येऊन राज्य-देशभरात विविध अवयवांचा शोध सुरू झाला. रात्री दहापर्यंत नेमके कुठले अवयव काढल्या जाऊन प्रत्यारोपण होईल, हे निश्चित झाले नव्हते, तरी यकृत, दोन मूत्रपिंडांचे प्रत्यारोपण होईल, असे सूत्रांनी सांगितले.

'ट्रॉमा युनिट'मध्ये जय्यत तयारी
घाटीतील 'ट्रॉमा केअर युनिट'मध्ये गणेश यांना दाखल करण्यात आले असूनु, याच युनिटमध्ये विविध अयवय काढण्याची शस्त्रक्रिया होईल, असेही समजते. त्यासाठी घाटीचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुहास जेवळीकर, भूलतज्ज्ञ डॉ. प्रमोद अपसिंगेकर, मेंदूविकारतज्ज्ञ डॉ. मकरंद कांजाळकर, मेंदूशल्यतिकित्सक डॉ. जीवन राजरपूत, हृदयशल्यचिकित्सक डॉ. उल्हास मिसाळ आदींची टीम सज्ज झाली आहे. पहिल्याच शासकीय रुग्णालयात 'ब्रेन डेड' तरुणाच्या अवयवदानाचा प्रयत्न होत असल्याचे समोर येत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images