Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

‘बकोरियांना लवकर पाठवा’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
औरंगाबाद महापालिकेच्या आयुक्तपदी ओमप्रकाश बकोरिया यांना लवकर पाठवा, अशी विनंती सुनील केंद्रेकर यांनी गुरुवारी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे फोनवरून केली. बकोरिया यांच्याशीही त्यांनी फोनवरून संपर्क साधला.

महापौरांच्या दालनात अधिकारी-पदाधिकाऱ्यांबरोबर सुनील केंद्रेकर यांनी बैठक घेतली. बैठकीनंतर पदाधिकारी व केंद्रेकर सभागृहनेता राजेंद्र जंजाळ यांच्या दालनाच्या अँटीचेंबरमध्ये येऊन बसले. बंद दाराआड सुमारे अर्धातास या सर्वांची चर्चा सुरू होती. त्यानंतर सर्वजण बाहेर पडले. अँटीचेंबरमध्ये झालेल्या चर्चेची माहिती सूत्रांनी दिली. त्यानुसार, 'आयुक्तपदी तुम्हीच कायम राहा,' अशी गळ पदाधिकाऱ्यांनी घातली. 'तुम्ही तशी तयारी दाखवा,' मुख्यमंत्र्यांकडे जाऊन आम्ही बकोरिया यांच्या बदलीची ऑर्डर रद्द करून आणतो,' असे पदाधिकारी म्हणाले. तेव्हा केंद्रेकर यांनी आपल्याकडे सिडकोचे कोणते आणि किती पदभार आहेत याची माहिती दिली. ही कामे पूर्ण करायची असतील तर महापालिकेच्या कामकाजाकडे जास्त लक्ष देता येणार नाही, असे त्यांनी पदाधिकाऱ्यांच्या लक्षात आणून दिले. मी आयुक्त नसलो तरी शहराचा नागरिक म्हणून मी वेळोवेळी सूचना करीत जाईल, महापालिकेत माझी सूचना टाळली जाईल, असे वाटत नाही. नवीन आयुक्तदेखील सक्षम आहेत, तेही चांगले काम करतील, अशी समजूत केंद्रेकरांनी काढली. त्यानंतर त्यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन लावला व बकोरिया यांना पुणे महापालिकेतून कार्यमुक्त करून पालिकेत लवकर पाठवा, अशी विनंती केली.

बकोरिया आज सूत्रे स्वीकारणार
औरंगाबाद महापालिकेचे आयुक्त म्हणून ओमप्रकाश बकोरिया शुक्रवारी बाराच्या सुमारास सूत्रे स्वीकारणार असल्याचे समजते. बकोरिया यांना आज सायंकाळी पुणे महापालिकेतून कार्यमुक्त करण्यात आले. ते उद्या दुपारी बारापर्यंत औरंगाबादेत येऊन आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारतील, असे सूत्रांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


व्यावसायिक अभ्यासक्रमांनाच शुल्कमाफी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या मार्च-एप्रिल पदवी, पदव्युत्तर परीक्षा ९ मार्चपासून सुरू होत आहेत. त्याचे संपूर्ण परीक्षा शुल्क भरल्यानंतर प्रशासनाने शुल्कमाफीचा निर्णय जाहीर केला. त्यातही अव्यावसायिक अभ्यासक्रमांना वगळण्यात आले आहे. शासन आणि विद्यापीठ यांच्यातील परिपत्रकांच्या गुंतागुंतीमुळे दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना हा निर्णयाचा लाभच झाला नाही. विद्यापीठातंर्गत ३ लाख ८० हजार विद्यार्थी परीक्षेला बसले आहेत.

यंदा दुष्काळाचा परिणाम शिक्षणावरही मोठ्या प्रमाणात झाला आहे. शासनाने परीक्षा शुल्कमाफी केली, परंतु प्रत्यक्षाता विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क भरावे लागले. त्यानंतर २४ फेब्रुवारी रोजी विद्यापीठाने परिपत्रक काढून कॉलेजांना परीक्षा शुल्क न स्वीकारण्याचे निर्देश दिले आहेत. परीक्षांचे अर्ज भरण्याची मुदत

संपल्यानंतर प्रशासनाने हे निर्देश दिल्याने त्याचा फायदा संस्थांचालकांनाच होण्याची शक्यता आहे. मार्च-एप्रिलमधील परीक्षांसाठी विद्यापीठाने डिसेंबरपासून परीक्षा शुल्क आकारणे सुरू केले.

जानेवारीतच त्यांची मुदत संपली यानंतर महिनाभरानंतर प्रशासनाने परीक्षा शुल्कमाफीबाबतचे परीपत्रक काढले आहे. त्यामुळे विद्यार्थीही संभ्रमात आहेत. भरलेले परीक्षा शुल्क परत मिळेल का, असा प्रश्न विद्यार्थी करीत आहेत. परीक्षा शुल्कमाफीतून अनुत्तीर्ण, बहिस्थ विद्यार्थ्यांना वगळण्यात आले आहे. परीक्षशुल्कमाफीचा लाभ २ लाख २० हजार विद्यार्थ्यांना मिळणे अपेक्षित आहे.

शासनाचाही भेदभाव
शासनाने १९९३च्या अध्यादेशाचा आधार घेत शुल्कमाफीची घोषणा केली. त्यानुसार केवळ शासकीय, अशासकीय अनुदानित कॉलेजांनाच परीक्षा शुल्कमाफीचा निर्णय लागू होतो. त्यामुळे विनाअनुदानित अव्यावसायिक अभ्यासक्रमांच्या (एम.ए., एमएसस्सी, बीबीए, बीसीए) विद्यार्थ्यांना शुल्कमाफीचा लाभ मिळाला नाही. शासनाच्या अनेक अध्यादेशाला केराची टोपली दाखविणारे विद्यापीठ प्रशासनानेही या परिपत्रकाची अंमलबजावणी मात्र तात्काळ केली. यामुळे अनुदानित कॉलेजपुरताच हा मुद्दा राहिला. अशा कॉलेजांनीही परीक्षाशुल्क आकारले त्यामुळे परीक्षा हा निर्णय केवळ कागदापुरता राहिला.

- पदवीचे अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख : १६ जानेवारी
- पदव्युत्तर परीक्षेच्या अर्जा अंतिम तारीख : ९ फेब्रुवारी
- विद्यापीठाचे परीक्षा शुल्कमाफीचे परीपत्रक : २४ फेब्रुवारी
- एकूण विद्यार्थी : ३,८०,०००
- नियमित विद्यार्थी : २,२०,०००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कॉपीचे शतक, एकाच केंद्रावर ३६ पकडले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
माध्यमिक व उच्चमाध्यमिक शिक्षण मंडळातर्फे सुरू असलेल्या बारावीच्या परीक्षेत अनेक केंद्रावर कॉप्यांचा धुमाकूळ सुरू आहे. भोकरदन तालुक्यातील एकाच परीक्षा केंद्रावर राज्यशास्त्र विषयाला कॉपी करताना तब्बल ३६ विद्यार्थ्यांवर कारवाई करण्यात आली. यंदा कॉपीप्रकरणी आजपर्यंत शंभर जणांवर कारवाई करण्यात आली. त्यात एकाच भरारी पथकाचा आकडा ६० एवढा आहे. विभागात ३५५ भरारी पथके आहेत, एक पथकानेच कारवाई केल्याने इतर पथके गेली कुठे, असा प्रश्न उपस्थित होतो आहे.

बारावी परीक्षा १८ फेब्रुवारीपासून सुरू झाली आहे. विभागातील पाच जिल्ह्यातून १ लाख ४२ हजार ४२६ विद्यार्थी ५३९ परीक्षा केंद्रावरून बारावीची परीक्षा देत आहेत. त्यात पहिल्याच दिवशी इंग्रजीच्या पेपरला परीक्षार्थी खाली बसून परीक्षा देत, सामुहिक कॉपीचे प्रकार 'मटा'ने समोर आणले. यंदा कॉपीमुक्त परीक्षा अभियानातून महसूल विभाग बाजूला गेल्यासारखी स्थिती आहे. मंडळाने भरारी पथकेही नेमली आहेत. अनेक केंद्रावर बैठे पथकेही आहेत.

आजपर्यंत कॉपीप्रकरणी गुरुवारपर्यंत शंभर विद्यार्थ्यांवर कारवाई करण्यात आली. यातील ६० प्रकरणे एकाच पथकाचे आहेत. विभागातील पाच जिल्ह्यांत ३५४ पथकांनी आजपर्यंत ४० विद्यार्थ्यांवर कारवाई केली आहे. बुधवारी दुपारच्या सत्रात असलेल्या राज्यशास्त्राच्या परीक्षेत एकाच केंद्रावर ३६ विद्यार्थ्यांवर कारवाई करण्यात आली आहे.

एकाच दिवशी ४४
व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण विभागाचे अधिकारी संजय ससाने यांच्या पथकाला एकाच दिवशी कॉपी करताना ४४ विद्यार्थी आढळले. यात भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव रेणुकाई येथील रेणुकादेवी कनिष्ठ महाविद्यालयातील केंद्रावर ३६ विद्यार्थ्यावर कारवाई करण्यात आली. यानंतर प्रेसिडेन्सी कनिष्ठ महाविद्या अन्वा व विनय माध्यमिक व उच्चमाध्यमिक जळगाव सपकाळ येथही प्रत्येकी दोन विद्यार्थी कॉपी करताना आढळले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आरटीईनुसार प्रवेश प्रक्रिया सोमवारपासून

$
0
0

औरंगाबाद : शिक्षण हक्क कायद्यानुसार २५ टक्के मोफत प्रवेशाचे वेळापत्रक जवळपास निश्चित करण्यात आले आहे. चालू शैक्षणिक वर्षात एन्ट्री पॉइंटवरून गोंधळ उडाल्याने ही प्रवेश प्रक्रिया चर्चेत आली होती. यावर्षी २९ फेब्रुवारीपासून (सोमवार) ही प्रक्रिया सुरू होणार आहे. सुरुवातीला शाळांची नोंदणी आणि त्यांनतर ११ ते २८ मार्चपर्यंत पालकांना प्रवेशासाठी ऑनलाइन नोंदणी करता येणार आहे. यंदा एन्ट्री पॉइंट प्री-प्रायमरी आणि पहिली असे दोन्ही असतील. ज्या वर्गापासून शाळा भरते, तो प्रवेशाचा स्तर असेल.

शिक्षण हक्क कायद्यानुसार आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना २५ टक्के मोफत प्रवेश प्रक्रियेत २०१५-१६ या शैक्षणिक वर्षात गोंधळ उडाला. प्रवेशाचा स्तर निश्चित करण्यावरून ही प्रक्रिया लांबली होती. पुढील शैक्षणिक वर्षाच्या वेळापत्राबाबत गुरुवारी (२५ फेब्रुवारी) पुण्यात राज्यातील सर्व उपशिक्षणाधिकाऱ्यांची बैठक झाली. त्यात वेळापत्रकाबाबत चर्चा झाली. यंदा २९ फेब्रुवारीपासून प्रक्रिया सुरू होत आहे. ९ मार्चपर्यंत शाळांना ऑनलाइन नोंदणी करायची आहे. शाळांच्या ऑनलाइन नोंदणीनंतर शाळांची यादी जाहीर केली जाईल. ११ ते २८ मार्चदरम्यान विद्यार्थ्यांची नोंदणी करावी लागेल. मार्चमध्ये विद्यार्थ्यांची नोंदणी झाल्यानंतर एप्रिलमध्ये शाळानिहाय याद्या जाहीर करण्यात येतील व मेमध्ये प्रवेशाची प्रक्रिया होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

औरंगाबाद जिल्ह्यात ऑनलाइन
येत्या वर्षात औरंगाबाद जिल्ह्यातील सर्व २५ टक्के मोफत प्रवेशाची प्रक्रिया ऑनलाइन होणार आहेत. पूर्वी औरंगाबादशहरातील शाळांमध्येच ही प्रक्रिया ऑनलाइन घेण्यात आली. यंदा शहरासह सर्वच तालुक्यातील शाळा ऑनलाइनच्या प्रक्रियेत येणार आहेत.

प्रायमरी-पहिली प्रवेशाचे स्तर
प्रवेशाचा स्तर कोणता असावा, यावरील चर्चेतच चालू वर्षी प्रक्रिया अडकली. येत्या वर्षात प्रवेशाचा स्तर दोन्ही असणार आहेत. ज्या शाळेत प्री-प्रायमरीपासून वर्ग सुरू होतात तेथे तोच प्रवेशाचा स्तर असेल आणि जी शाळा पहिलीपासून वर्ग भरविते तेथे पहिलीपासून प्रवेशाचा स्तर असेल.

प्रवेशाचेचे वेळापत्रक
शाळांची नोंदणी ः २९ फेब्रुवारी ते ९ मार्च
विद्यार्थ्यांची नोंदणी ः ११ ते २८ मार्च

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘निघालो घेऊन दत्ताची पालखी’

$
0
0

औरंगाबाद : 'गण गण गणात बोते'चा गजर अन् भक्तिरसात न्हालेले भाविक अशा अपूर्व वातावरणात श्री गजानन महाराज प्रकटदिन महोत्सवाचा समारोप झाला. प्रसिद्ध गायिका साधना सरगम, प्रा. राजेश सरकटे आणि नितीन सरकटे यांनी श्रवणीय भक्तिगीते सादर केली. कडा मैदानावर गुरुवारी सायंकाळी हा महोत्सव रंगला.

गजानन महाराज प्रकटदिन महोत्सवानिमित्त तीन दिवस भक्तिसंगीत महोत्सव आयोजित करण्यात आला होता. या महोत्सवात प्रसिद्ध गायिका साधना सरगम यांचे गायन झाले. या कार्यक्रमाला प्रा. राजेश सरकटे यांनी 'गण गण गणात बोते' या गजराने सुरुवात केली. 'उठा उठा हो बाबा' या गीतातून त्यांनी अवघे वातावरण भक्तिमय केले. नितीन यांनी गायलेल्या 'शोधिशी मानवा राऊळी मंदिरी' गीताला भाविक रसिकांची भरभरून दाद मिळाली. 'माय भवानी तुझे लेकरू', 'निघालो घेऊन दत्ताची पालखी', 'हंबरूनी वासराले', 'खंडेरायाच्या लग्नाला', 'लंगडा गं लंगडा', 'माउली माउली' अशी उत्तमोत्तम गाणी सरकटे बंधूंनी सादर केली. प्रसिद्ध गायिका साधना सरगम यांनी 'सुंदर ते ध्यान उभे विटेवरी' या पहिल्याच अभंगात दाद मिळवली. त्यानंतर श्रवणीय भक्तिगीतांची मालिकाच त्यांनी सादर केली. 'माझी रेणुका माउली', 'सांज ये गोकुळी', 'बाजे रे मुरली बाजे', 'यशोमती मैय्या से बोले नंदलाला', 'ओ पालनहारे', 'सुनो रे प्यारे भाई' या सरगम यांनी गायलेल्या गीतांनी अवघे वातावरण भारावले.

या कार्यक्रमाचे अभ्यासपूर्ण सूत्रसंचालन प्रा. रवींद्र मगर यांनी केले. दरम्यान, अवयवदान क्षेत्रात विशेष कामगिरी केलेले डॉ. उन्मेष टाकळकर यांचा विशेष सत्कार करण्यात आला. या महोत्सवासाठी प्रा. श्रीधर वक्ते, प्रा. प्रवीण वक्ते, संजय सरकटे, विनोद सरकटे यांनी विशेष सहकार्य केले.

प्रतिसाद वाढला
श्री गजानन महाराज महोत्सवाची दरवर्षी लोकप्रियता वाढत आहे. प्रसिद्ध गायकांचे गायन व उत्तम नियोजन असल्यामुळे महोत्सवाच्या लोकप्रियतेत भर पडली आहे. महोत्सवात शेवटच्या दिवशी भाविकांची गर्दी वाढल्यामुळे मंडपाचा बाजूचा भाग काढण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

माझं शिवार : पाणी व्यवस्थापन, पीक नियोजनाचा आदर्श

$
0
0

Makarand.Kulkarni@timesgroup.com
तंत्रशिक्षण घेऊन नोकरीस सुरवात केल्यानंतर म्हणावे तसे समाधान मिळाले नाही. गड्या आपुला गाव बरा म्हणून गणोरीला परतल्यानंतर शेतीत छोटे प्रयोग सुरू केले. शेतीला तीन किलोमीटर लांबून पाणी आणले. अद्रकशेतीतून मिळालेले यश पुढे कायम राहिले. पाण्याचे योग्य व्यवस्थापन आणि पीकनियोजन यांच्या जोरावर कडुबा चंद्रे पाटील यांनी शेतकऱ्यांसमोर आदर्श निर्माण केला आहे.

शहरापासून २० किलोमीटर अंतरावर असलेल्या गणोरी गावातील कडुबा अण्णासाहेब चंद्रे हे रहिवासी. बारावीपर्यंत शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी औरंगाबाद गाठले. शासकीय आयटीआयमध्ये शासकीय अॅडव्हान्स व्होकेशनल ट्रेनिंगमधून टर्नरचा कोर्स पूर्ण केला. त्यानंतर १९९६ ते १९९८ औरंगाबाद इलेक्ट्रिकल्समध्ये नोकरी केली. १९९८मध्ये त्यांचे लग्न झाले. नोकरीतून मिळणारा पैसा आणि संसारासाठी लागणारा पैसा याचे गणित जुळेना. कडुबांनी विचार केल घरी जाऊन शेती करावी. वडील शेती करत होते. दोन भाऊ कडुबांपेक्षा लहान. गावी परतल्यानंतर शेतीत लक्ष देणे सुरू केले. गणोरीच्या पूर्वेकडे त्यांची जमीन. पावसाचा लहरीपणा, जमिनीचा पोत आणि उपलब्ध पाणी अशा त्रिसूत्रीचा त्यांनी अभ्यास केला. थोडे भांडवल उभे केल्यास हमखास पाण्याची सोय होईल, असे लक्षात आल्यानंतर त्यांनी तीन किलोमीटर लांब असलेल्या धरणातून जलवाहिनी टाकली. अर्थात एवढा मोठा खर्च एकट्याला परवडणारा नव्हता. म्हणून त्यांनी पाईपलाइनमध्ये भागिदार घेतला. ११९९-२०००मध्ये पाइप लाइन टाकली. पहिल्या वर्षी जेमतेम पीक निघाले. पारंपरिक पिके घेण्याऐवजी नवे प्रयोग करण्याचे कडुबांनी ठरविले. त्यासाठी कन्नड तालुक्यातील काही शेतकऱ्यांकडे जाऊन चर्चा केली तेथील शेती पाहिली. पहिला पर्याय म्हणून अद्रक (आलं) समोर आले. २००१मध्ये त्यांनी एक एकरच्या प्लॉटवर बेड सिस्टमने अद्रकाचा प्लॉट विकसित केला. योग्य ती निगा राखताना पाणी व्यवस्थापनावर कडूबांनी भर दिला नऊ महिन्यात अद्रकाचे समाधानकारक पीक आले त्यामुळे चंद्रेंचा उत्साह वाढला. दुसऱ्या वर्षी त्यांनी डाळिंबाचा प्रयोग करण्याचे ठरविले. एक एकरमध्ये डाळिंब लागवड केली. पण त्यांचा हा प्रयोग फसला. कारण माती परीक्षण न करताच त्यांनी डाळिंब लागवड केली. जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता आहे की हेच त्यांनी ध्यानात घेतले नव्हते. प्रयोग फसल्याने ते हिरमुसले नाहीत. पाइप लाइनद्वारे पाणी आणले, पण शेतातही पर्याय रहावा म्हणून पूर्वी असलेल्या विहिरीसोबत आणखी एक विहिर खोदली. सरकारी अनुदानाची प्रतीक्षा न करता त्यांनी खिशातून पैसे टाकून हे केले. अद्रक शेतीतून अपेक्षित उत्पन्न मिळत असताना पारंपरिक शेती सुरू होतीच, पण त्यापुढे जात कडुबांनी पपई लागवड करण्याचा निर्णय घेतला आणि तैवान ७८६ या पपईची एक एकरात लागवड केली. पपईला पुढच्या दोन वर्षांचे पाण्याचे नियोजन आवश्यक असते. त्याचा अनुभव कडुबांना पहिल्याच वर्षी आला. थोडे नियोजन चुकले त्यामुळे पीक हातात आल्यानंतर मार्केटला म्हणावा तेवढा भाव मिळाला नाही. दुसऱ्या वर्षी मात्र त्यांनी त्रुटी दूर केल्या. अद्रक, पपई सोबत कापूस, गहू आणि अन्य पिके सुरू होती. नवीन प्रयोगातून मिळणारे यश पाहून त्यांनी आंतरपीक पद्धतीचा अवलंब केला आणि शेवगा लागवड केली. सुरवातीला अद्रकाच्या प्लॉटमध्ये पाच फुटाचा बेड करून ओरिसी जातीचा शेवग्याची लागवड केली. एक एकरात हे आंतरपीक घेतले. जूनमध्ये याची लागवड केली होती. सध्या या झाडांना भरपूर शेंगा लगडल्या असून, आणखी दोन महिने दररोज शेवगा निघणार आहे.

सध्या त्यांच्या शेतात अडीच एकर अद्रक, दीड एकर पपई, अडीच एकर कांदे, एक एकर उस आहे. अगदी नियोजनबद्ध पद्धतीने कुठलीही गडबड न करता हवामान, शेतीचा पोत आणि मार्केटची गरज ओळखून कडुबा चंद्रे यांनी गेल्या आठ-दहा वर्षांत शेतीत नंदनवन फुलविले आहे.

ठिबकसिंचन पद्धतीने शेती केली तर त्याचे फायदे कसे होतात याची माहिती मिळविल्यानंतर कडुबा चंद्रे यांनी १९९९ -२००० मध्ये एक एकर शेतीसाठी ठिबकसिंचन केले. दरवर्षी टप्प्याटप्प्याने ठिबकसिंचनचे जाळे वाढवत गेल्याने शाश्वत शेती संकल्पनेत चंद्रे यांचे शेत आदर्श उदाहरण ठरले आहे.

आंतरपीक यशस्वी
चंद्रे यांनी जून महिन्यात पाच फुटांची सरी पाडून तीन एकर अद्रक लागवड केली. त्यातच आंतरपीक म्हणून दीड एकर शेवगा व दीड एकर पपाई लावण्याचा निर्णय घेतला आणि मालेगावहून शेवगा बियाणे तर सोलापूर येथून पपईचे बियाणे आणले व लागवड केली. आज त्यांच्या शेतात शेवग्याची १५०० तर पपईची १००० झाडे आहेत. त्यात शेतातील विहिरीच्या पाण्याचा थोडाफार उपयोग झाला. आवश्यक त्या वेळी टँकरने पाणी आणून झाडे जगविली. जानेवारीमध्ये पहिला तोड झाल्यानंतर दीड एकर मध्ये तीन क्विंटल शेवगा शेंगा मिळाल्या त्यानंतर दोन फेब्रुवारी ते चौदा फेब्रुवारी यादरम्यान सहा क्विंटल शेंगा निघाल्या. त्यानंतर एक दिवसाआड एक ते दीड क्विंटल शेंगा निघत असून, त्याला चांगला दर मिळत आहे. मार्चमध्ये पपईचे पीक येणे होईल या दोन्ही आंतरपीकांमधून योग्य भाव मिळेल, अशी त्यांना खात्री आहे. कडुबा चंद्रे यांना शेतीमध्ये भाऊ गणेश, विनोद पूर्णवेळ मदत करतात. त्यांच्या पत्नी व दोन मुलांचाही शेतीतील प्रयोग यशस्वी करण्यात मोठा वाटा आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दुष्काळामुळे बारावीच्या परीक्षेकडे दुर्लक्ष

$
0
0

अतुल कुलकर्णी, बीड

दुष्काळाचे दशावतार बीड जिल्ह्यात दिसू लागले आहेत. या दुष्काळाचा फटका अबालवृद्धांसह वेगवेगळ्या घटकांना बसत आहे. शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थीही या दुष्काळाच्या दुष्टचक्रात अडकले आहेत. त्यांनाही उदरनिर्वाहाचा प्रश्न सतावत आहे. त्याचा परिणाम बारावीच्या परीक्षेत दिसून आला. बारावीच्या परीक्षेत बीड जिल्ह्यात विद्यार्थ्यांच्या गैरहजरीचे प्रमाण वाढले आहे. विद्यार्थ्यांनी परीक्षेपेक्षा उसतोडीच्या कामाला प्राधान्य दिले आहे. यापूर्वीच्या परीक्षांच्या तुलनेत यावर्षी गैरहजर विद्यार्थ्यांचे प्रमाण जास्त आहे.

बीड हा उसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. घरातील कर्ती मंडळी उसतोडीला गेल्यावर ज्येष्ठ नागरिक आणि शाळेच जाणारे विद्यार्थी गावात थांबत असत. गावी राहून विद्यार्थी शिक्षण पूर्ण करायचे, मात्र गेला पावसाळा कोरडा गेला. त्यामुळे खरिपाचे पीक हातचे गेले. दुष्काळी स्थिती असल्याने शाळा-कॉलेजांतील विद्यार्थीही कामासाठी आई-वडिलांसोबत उसाच्या फडात तोडणीसाठी गेले आहेत. जगण्याच्या संघर्षात शिक्षणावर पाणी सोडण्याची वेळ बीड जिल्ह्यातील काही विद्यार्थ्यांवर आली आहे.

सध्या बारावीची परीक्षा सुरू आहे. बोर्डाच्या या परीक्षेत एकट्या बीड जिल्ह्यातील तब्बल दीड हजार विद्यार्थी गैरहजर आहेत. यापूर्वी मुले दहावी-बारावीच्या परीक्षेत गैरहजर राहत होती, मात्र हे प्रमाण खूप कमी होते. यावर्षी हे प्रमाण लक्षणीय आहे. गेल्या वर्षी बारावीच्या परीक्षेला जिल्ह्यातील केवळ शंभर मुले गैरहजर होते. दुष्काळामुळे यावर्षी तब्बल साडेतेराशे विद्यार्थ्यांनी परीक्षेकडे पाठ फिरविली आहे.

दुष्काळामुळे संख्या वाढली
यावर्षी दुष्काळाची दाहकता तीव्र आहे. त्यामुळे दहावी-बारावीच्या अनेक विद्यार्थ्यांनी शिक्षणापेक्षा पोटाच्या प्रश्नाला जास्त प्राधान्य दिले. विद्यार्थी मोठ्या प्रमाणात परीक्षेत गैरहजर आहेत, असे शाळाबाह्य मुलांच्या प्रश्नावर काम करणारे दीपक नागरगोजे यांनी सांगितले.
बीड जिल्ह्यातील लाखो उसतोड कामगार हे दर वर्षी आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि पश्चिम महाराष्ट्रात स्थलांतर करतात. उसतोडणीचे काम करतात. गेल्या काही वर्षांपासून सलग दुष्काळ असल्याने उसतोड मजुरांना शाळा, महाविद्यालयातील मुलांना हातात कोयता द्यावा लागला आहे.

परीक्षेला गैरहजेरी
- नावनोंदणी केलेले विद्यार्थी : ३५,०२४
- उपस्थित विद्यार्थी : ३३,६६४
- गैरहजर विद्यार्थी : १,३६०

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘सरकारी नोकरीचे कंत्राटीकरण बंद करा’

$
0
0

औरंगाबाद : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील रिक्तपदे तातडीने भरा व नोकरीतील कंत्राटीकरण रद्द करा, यासह इतर मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य वैद्यकीय महाविद्यालय आणि रुगणालय कर्मचारी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर नुकतीच धरणे देण्यात आली.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय कर्मचाऱ्यांच्या मागण्या गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष पसरला आहे. संघटनेतर्फे सातत्याने मागणी करूनही त्याकडे दुर्लक्ष होत आहे. चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांची १७२ पदे रिक्त आहेत. पदे भरली जात नसल्यामुळे कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त ताण पडत आहेत. दोन हजार पेक्षा जास्त वाढीव पदे नर्सिंग काउंसिलच्या शिफारशीनुसार सर्व शासकीय महाविद्यालयात भरली आहेत. मात्र हेच तत्व चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांसाठी लागू केले नाही, त्यामुळे परिचारिका प्रमाणे इतर कर्मचाऱ्यांची वाढीव पदे मंजूर करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. घाटी तसेच कॅन्सर रुग्णालयात अनेक कर्मचारी ठेकेदारामार्फत कामावर असून त्यांचे शोषण केले जात आहे. या कर्मचाऱ्यांना मासिक चार हजार रुपये पगार दिला जात असून जास्तीच्या पगारावर सह्या घेतल्या जात आहेत. या कर्मचाऱ्यांना सुटी दिली जात नाही. त्यामुळे ही ठेकेदारी पद्धत बंद करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर झालेल्या या आंदोलनात सय्यद अहमद, एम. ए. गफार, विठ्ठल कदम, अशोक जाधव, संजय व्यवहारे, मुकेश भोंगे, रेखा कारके, गोदाबाई खरात, समिंद्राबाई शेजुळ, अनिल बावत, शांताबाई इस्थापे यासह अनेक कर्मचारी सहभागी झाले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


नवे पालिका आयुक्त थांबवणार पैशांची गळती

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
'महापालिकेला आर्थिक शिस्त महत्वाची आहे. त्यासाठी अनावश्यक खर्चाला कात्री लावून शिस्त निर्माण करण्याचा प्रयत्न करू. जनतेचा पैसा योग्य प्रकारे खर्च केला जावा याकडे अधिक लक्ष राहणार असून आर्थिक गळती कमी केली जाईल. प्रशासनात पारदर्शकता आणण्याला प्राधान्य देऊ, असे संकेत महापालिकेचे नवीन आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांनी दिले.
ओमप्रकाश बकोरिया यांनी महापालिकेचे २५ वे आयुक्त म्हणून शुक्रवारी सुनील केंद्रेकर यांच्याकडून सुत्रे स्वीकारली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, आर्थिकदृष्ट्या ज्या ज्या ठिकाणी गळती आहे. ती बंद करण्याला प्राधान्य दिले जाईल. नागरिकांचा पैसा वाया जाऊ नये अशीच आपली धारणा आहे. लोकप्रतिनिधी व प्रशासन या दोन्ही घटकांना सोबत घेऊन काम करू. प्रशासनात पारदर्शकता आणण्याचा प्रयत्न करू, असे त्यांनी स्पष्ट केले. प्रत्येक शहराच्या गरजा वेगळ्या असतात. औरंगाबाद शहराची व या शहरातील नागरिकांची गरज लक्षात घेऊन कामाचे नियोजन केले जाईल, असे बकोरिया यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.
कचरा, वीज, पाणी, रस्ते आणि वाहतूक या समस्या प्रत्येक शहरात कमी जास्त प्रमाणात सारख्याच असतात. औरंगाबादेत या समस्यांचा प्राधान्यक्रम लावून काम केले जाईल, शहरात काम करताना सर्व वॉर्डात सारख्या प्रमाणात काम झाले पाहिजे, कोठेही असमतोल निर्माण होणार नाही याची काळजी घेतली जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
स्मार्ट सिटी योजनेच्या पहिल्या टप्प्यात औरंगाबादचा क्रमांक लागला नाही. आता दुसऱ्या टप्प्यातील चाळीस शहरांमध्ये औरंगाबाद शहराचा क्रमांक लागावा यासाठी प्रयत्न केले जातील, त्यासाठी आवश्यक ते परिश्रम घेण्याची आपली तयारी आहे, असे ओमप्रकाश बकोरिया म्हणाले. प्रत्येक दिवस आव्हानांचा असतो, आव्हान असेल तरच काम करण्यात मजा आहे, असे ते म्हणाले.

केंद्रेकरांचे मार्गदर्शन घेणार
महापालिकेच्या आयुक्तपदाची सूत्रे हाती घेण्यापूर्वी सुनील केंद्रेकर यांच्याशी आपली चर्चा झाली आहे. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली यापुढेही काम करण्याचे आपण ठरवले आहे. महापालिकेच्या बाबतीत केंद्रेकरांनी जे काम हाती घेतले आहे, तेच काम पुढे नेण्याचा प्रयत्न करू, असे ओमप्रकाश बकोरिया म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दुरुस्तीसाठी दिलेली कार ट्रायल घेताना पळवली

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
दुरुस्तीसाठी टाकलेली कार चार लाखाचे बील न देता वर्कशॉपमधून मालकाने ट्रायलच्या बहाण्याने लंपास केली. सोबत असलेल्या कंपनीच्या कर्मचाऱ्याला उतरवून देऊन पोबारा करण्यात आला. ही घटना बुधवारी दुपारी अदालत रोडवर घडली. याप्रकरणी क्रांतिचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राजू आनंदा महाजन (रा. फुलंब्री) याने त्याची इर्टिका कार दुरुस्तासाठी पगारिया अॉटो शोरूमच्या वर्कशॉपमध्ये टाकली होती. बुधवारी ही दुरुस्त झालेली कार घेण्यासाठी राजू महाजन वर्कशॉपमध्ये आले होते. या कार दुरुस्तीचे चार लाख रुपये बिल झाले होते. महाजन यांनी कारची ट्रायल घेऊन येतो, असे सांगितले. यावेळी त्यांच्यासोबत पगारियाचा कर्मचारी देण्यात आला. काही अंतर गेल्यावर महाजन यानी कंपनीच्या कर्मचाऱ्याला धमकी देत उतरून दिले व कार जबरदस्तीने घेऊन निघून गेला. कर्मचाऱ्याने वर्कशॉपमध्ये येऊन ही माहिती दिली. याप्रकरणी पगारिया अॉटोचे शिवाजी लक्ष्मणराव देशमुख यानी दिलेल्या तक्रारीवरून पोलिस ठाण्यात राजू महाजन विरुद्ध अपहार व जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विश्रांतीनगरला मिळाले वीस वर्षांनंतर पाइप

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
वॉर्डांतर्गत पाइपलाइन टाकण्यासाठी समांतर जलवाहिनीचे काम करणाऱ्या औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटी कंपनीने शुक्रवारी पंधरा किलोमिटर पाइपांचे वितरण केले. या वितरणात विश्रांतीनगरला वीस वर्षांनंतर पाइप मिळाले.
ज्या वॉर्डांमध्ये दूषित पाणीपुरवठा होतो व पाइपलाइन टाकण्यात आलेली नाही, अशा वॉर्डांसाठी कंपनीतर्फे पाइप मागवण्यात आले. वीस दिवसांपूर्वी चार किलोमिटर लांबीचे पाइप आणण्यात आले होते. हे पाइप एमआयएमच्या नगरसेवकांच्या वॉर्डात वितरित करण्यात आल्यामुळे पालिकेत संघर्षाचे वातावरण निर्माण झाले होते. शिवसेनेच्या नगरसेवकांनी कंपनीच्या कार्यालयासमोर आंदोलन केले, तर भाजपच्या नगरसेवकांनी कंपनीच्या कार्यालयाला तीन दिवस कुलूप ठोकले. त्यानंतर आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत २५ फेब्रुवारीपर्यंत १५ किलोमीटर लांबीचे पाइप आणण्याचे आश्वासन कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दिले होते. त्यानुसार हे पाइप शुक्रवारी प्राप्त झाले. २१ नगरसेवकांच्या वॉर्डांमध्ये या पाइपांचे वितरण करण्यात आले. विश्रांतीनगरात आतापर्यंत पाइपलाइन टाकण्यातच आली नव्हती. त्यामुळे या भागासाठी पाइप उपलब्ध करून देण्यात आले. वितरीत करण्यात आलेल्या पाइपांमध्ये अब्दुल नाईकवाडी वगळता एमआयएमच्या नगरसेवकांचा समावेश करण्यात आला नाही. भाजप नगरसेवकांना प्राधान्य देण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाच उपविभागीय अधिकाऱ्यांना नोटीस

$
0
0

औरंगाबाद ः जिल्ह्यात महसूल कराची वसुली करण्यात प्रशासनाला अपयश येत आहे. कमी वसुली असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी पाच उपविभागीय अधिकाऱ्यांना कारणेदाखवा नोटीस बजावली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. औरंगाबाद, सिल्लोड, पैठण, कन्नड आणि वैजापूर तालुक्याच्या उपविभागीय अधिकाऱ्यांना नोटीस देण्यात आल्याचे कळते. औरंगाबाद जिल्ह्यात १५ फेब्रुवारीपर्यंत केवळ ५४ टक्के कर वसूल झाला आहे.
जिल्ह्यात महसूल कराच्या वसुलीची धामधूम सुरू असुन मार्चअखेरर्यंत जिल्ह्याला असलेले १०७ कोटींचे दिलेले उद्दीष्ट मार्च अखेरपर्यंत पूर्ण करावयाचे आहे. मात्र यंदा असलेल्या दुष्काळी परिस्थितीमुळे वसुलीला अडचण निर्माण झाली आहे. यंदा पाऊस नसल्यामुळे वाळुसाठ्यांमधून मिळणाऱ्या उत्पन्नालाही फटका बसला आहे. त्यामुळे टार्गेट पूर्ण कसे करावे, असा प्रश्न प्रशासनासमोर आहे. यंदा वसुली शंभर टक्के करण्याचा विश्वास विभागीय आयुक्त डॉ. उमाकांत दांगट यांनी व्यक्त केला होता. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी वसुलीची जबाबदारी उपविभागीय अधिकाऱ्यांकडे सोपवली आहे. बहुतांश तालुक्यांमध्ये वसुलीचे प्रमाण ४० टक्केही नाही. त्यामुळे करवसुलीला फटका बसण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बचत गटांच्या वस्तूंचे आजपासून प्रदर्शन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
ग्रामीण भागातील दारिद्र्य रेषेखालील महिला बचत गटांच्या वस्तूंचे औरंगाबाद विभागीय व जिल्हास्तरीय विक्री प्रदर्शनाचे उदघाटन ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. २७ फेब्रुवारी ते ४ मार्च २०१६ या कालावधीत मराठवाडा सांस्कृतिक मंडळ येथे होणाऱ्या या प्रदर्शनामध्ये ३१० बचतगट सहभागी होत आहेत. या निमित्ताने नागरिकांना ग्रामीण भागातील पारंपारिक वस्तू, खाद्यपदार्थ, आयुर्वेदिक औषधे, हस्तकलेच्या वस्तू खरेदी करण्याची संधी मिळणार आहे.
यावेळी पंकजा मुंडे यांच्या हस्ते २०१४-१५च्या राजमाता जिजाऊ स्वावलंबन पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे. त्याच प्रमाणे बचत गटांना अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्यासाठी सहकार्य केल्याबद्दल बँक अधिकाऱ्यांचा यावेळी गौरव करण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रमेश राऊत पुरस्कार माने यांना प्रदान

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
पहिला रमेश राऊत स्मृती पुरस्कार म. टा. चे वरिष्ठ सहायक संपादक प्रमोद माने यांना समारंभपूर्वक प्रदान करण्यात आला. 'बदलत्या पत्रकारितेत सगळ्या वयातील नागरिकांना आपलेसे वाटणाऱ्या प्रमोद मानेंना पुरस्कार मिळणे म्हणजे एका 'रिसोर्सफुल' पत्रकाराचा सन्मान आहे,' असा सूर यावेळी व्यक्त झाला.
जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या प्रमोद महाजन सभागृहात शुक्रवारी झालेल्या पुरस्कार वितरण समारंभाच्या अध्यक्षसथानी माहिती व जनसंपर्क संचालक राधाकृष्ण मुळी होते. यावेळी मराठवाडा जनता विकास परिषदेचे अध्यक्ष अॅड. प्रदीप देशमुख, म. टा. चे निवासी संपादक धनंजय लांबे, डॉ. सुधीर गव्हाणे, पत्रकार संघाचे अध्यक्ष बालाजी सूर्यवंशी आदींची मंचावर उपस्थिती होती. साहित्यिक व पत्रकार रमेश राऊत यांच्या स्मृतीस या कार्यक्रमात उजाळा देण्यात आला. या पुरस्काराचे स्वरूप स्मृतीचिन्ह, पाच हजार रुपये रोख, शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ आहे. या कार्यक्रमात माने यांचा सपत्निक गौरव करण्यात आला.
'पत्रकारितेत ज्येष्ठ बिरुदावली म्हणजे वृद्धत्वाकडे जाण्यासारखे आहे. परंतु. प्रमोद माने यांना ते बिरूद लावणे कठीण आहे, सगळ्यांचा दोस्त असेच त्यांना म्हणावे लागेल,' असे अॅड. देशमुख म्हणाले. बालाजी सूर्यवंशी यांनी एका मित्राला दुसऱ्या मित्राच्या नावाने पुरस्कार मिळत असल्याबद्दल आनंद व्यक्त केला. त्यांनी राऊत यांच्या आठवणींना उजाळा दिला. डॉ. सुधीर गव्हाणे म्हणाले, पत्रकारितेत सच्चा,निःस्पृह माणूस अशी रमेश राऊत यांची अोळख होती. तेवढ्याच तोलामोलाचे माने यांना पुरस्कार मिळणे हा आगळावेगळा योग आहे.
'खऱ्या 'रिसोर्सफुल' माणसाचा गौरव होत आहे. प्रमोद माने हे सर्व वयोगटातील सर्वांना हवेहवेसे वाटणारे व्यक्तिमत्व आहे,' असे गौरवोद्गार म. टा.चे निवासी संपादक धनंजय लांबे यांनी काढले. 'पत्रकारितेतील स्थित्यंतराचा काळ अनुभवणारे माने हे ज्येष्ठ पत्रकार असून बदलांना कसे सामोरे जावे हे त्यांच्याकडे पाहून शिकले पाहिजे. पत्रकारितेमधील यापुढील काळ अधिक तंत्रज्ञानपुरक असेल,' राधाकृष्ण मुळी यांनी सांगितले. यावेळी माने यांच्या पत्नी सुरेखा माने यांनी मनोगत व्यक्त केले. ज्येष्ठ पत्रकार बाबा गाडे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तालुक्यांच्या ठिकाणी पाण्याचा ठणठणाट

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
सततच्या दुष्काळामुळे केवळ शहरातील नव्हे तर, ग्रामीण भागातील जलस्त्रोतही आटले आहे. मराठवाड्यातील बहुतांश नगरपालिका क्षेत्रात चार दिवस आड पाणीपुरवठा सुरू आहे. काही नगरपालिकांना महिन्यातून दोन दिवस पाणीपुरवठा करत आहेत. येत्या काही दिवसांत शहरांतून पाण्याची गंभीर परिस्थिती निर्माण होण्याची भीती ‌आहे.
गेल्या आठवड्यामध्ये विभागीय आयुक्त डॉ. उमाकांत दांगट यांनी मराठवाड्यातील पाणी परिस्थितीचा आढावा घेऊन पाण्याच्या स्थितीचा अहवाल मागवला होता. दोन दिवसांपूर्वीच बहुतांश नगरपालिकांचा अहवाल विभागीय आयुक्तालयाकडे प्राप्त झाला आहे. मराठवाड्यातील ७४ नगरपालिकांपैकी गंगापूर, कन्नडला आठवड्यातून दोनदा, जालन्याला आठवड्यातून १ वेळा, परतूर, पूर्णा आठवड्यातून दोन वेळा, सोनपेठ नगरपालिका आठवड्याला १ वेळ तर, पाथरी नगरपालिका १२ दिवसांना एक वेळा पाणीपुरवठा करते. हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी नगरपालिका एक दिवसआड तर, नांदेड जिल्ह्यातील लोहा, मुखेड व धर्माबाद नगरपालिका अनुक्रमे चार, पाच व तीन दिवसआड पाणीपुरवठा करत आहेत. उस्मानाबाद जिल्ह्यामधील नगरपालिकात ५ ते ७ दिवसांनी पाणीपुरवठा होतो. कळंब पालिकेला १० दिवसांनी पुरवठा करणे शक्य होते.
नगरपालिकांचा पाण्याचे स्रोत मार्च तसेच एप्रिलपर्यत पुरेल इतकेच आहेत. त्यामुळे आगामी काळात नगरपालिकांना पाणी कुठून आणायचे हा गंभीर प्रश्न आहे. टँकर, बोअर तसेच काही नगरपालिका क्षेत्रांना जायकवाडी धरणाशिवाय पर्याय नाही. गुरुवारी जायकवाडी धरणातून पाणी सोडण्याचा निर्णय झाला असून यामुळे पाथरी, मानवत आणि गंगाखेड या नगरपालिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न काही प्रमाणात सुटणार आहे. या निर्णयामुळे औरंगाबाद, जालना आणि परभणी जिल्ह्यातील ३८६ गावाना फायदा होणार आहे.
बीड जिल्ह्यातील नगरपालिकांची स्थिती बिकट झाली आहे. बीड नगरपालिकेत ७, अंबेजोगाई १५, परळी वैजनाथ २, माजलगाव ८, गेवराई ५, धारूर १०, केज १५ तर, वडवणी, आष्टी, पाटोदा नगरपालिकांना आठवड्यातून एकदाच पाणीपुरवठा करते. लातूर जिल्ह्यातील उदगीर नगरपालिका ४० दिवसातून एकदा पाणीपुरवठा करते तर, अहमदपूर व औसा नगरपालिका १५ दिवसांतून एकदा पाणीपुरवठा करते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘वॉव, फॅन्स्टॅक्टिक, वंडरफूल’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी,औरंगाबाद
'वॉव, फॅन्स्टॅक्टिक, वंडरफूल' असे उद्गार जगप्रसिद्ध अजिंठा लेणी उजेडात आणणाऱ्या मेजर स्मिथ यांचे खापर पणतू कर्नल मार्टिन स्मिथ यांच्या तोंडून बाहेर पडले. ते शुक्रवारी अजिंठा लेणी पाहण्यासाठी आले होते.
व्ह्यू पॉइंट परिसरात वाघाची शिकार करताना मेजर स्मिथ यांना १८१९ मध्ये लेणीचा शोध लागला. स्थिम खापर पणतू मार्टिन स्थिम यांनी पत्नी मार्गारेट यांच्यासह शुक्रवारी सकाळी नऊ वाजता लेणीला भेट दिली. लेण्या पाहिल्यानंतर त्यांची भावना पणजोबांसारखीच होती. हा अदभूत ठावा पाहून ते भाराऊन गेले. त्यांचे आमदार अब्दुल सत्तार, सरपंच रेणुका आगळे यांनी स्वागत केले. त्यांच्यासोबत पर्यटन विभागाचे प्रादेशिक व्यवस्थापक अण्णासाहेब शिंदे, चंद्रशेखर जैस्वाल,, पुरातत्व विभागाचे डी. एस. दानवे हे होते. व स्थानिक अधिकारी होते.
मार्गारेट स्मिथ यांचे बंजारा समाजाचे पारंपरिक नृत्य करून स्वागत करण्यात आले. यावेळी मार्गारेट यांनी नृत्यावर ठेका धरला. त्यांना डोलीमधून लेणीमध्ये नेण्यात आले. मार्टिन यांनी सैनिक असल्याचे सांगत पायऱ्या चढून लेण्यांची पाहणी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्राप्तीकर विभागाचे पैठणमध्ये छापे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी. पैठण
प्राप्तिकर विभागाने शुक्रवारी शहरातील सराफा, कापड, किराणा व्यापाऱ्यांच्या दुकानावर एकाच वेळी धाडी मारल्या. रात्री उशिरापर्यंत कार्यवाही सुरू होती. अचानक पडलेल्या या धाडीमुळे शहरातील व्यापाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
प्राप्तीकर विभागाच्या सुमारे २० अधिकारी व कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी दुपारी बाराच्या सुमारास महाराणा प्रताप चौकातील चार सराफा व्यापारी, पोलिस ठाण्याजवळील एका किराणा व्यापारी, नाका रोडवरील कपड्याचे दुकान व जुन्या कापड मंडईतील एका हॉस्पिटलमध्ये एकाच वेळी धाडी मारल्या. रात्री उशिरापर्यंत कार्यवाही सुरू होती. पण, अधिकाऱ्यांनी बोलण्यास नकार दिला. कारवाई सुरू असल्याने नेमका तपशील अद्याप मिळाला नाही. दरम्यान, प्राप्तीकर विभागाने शहरात विविध ठिकाणी कारवाई केल्याची वार्ता शहरात पसरताच खळबळ उडाली. अनेक व्यापाऱ्यांनी आयकर विभागांच्या कारवाईच्या भीतीने शुक्रवारी दुपारी दुकाने बंद केली.
दरम्यान, या तपासणीबद्दल सकाळी संबंधितांना माहिती देण्यात आली होती. दुपारी चारपासून तपासणी सुरू झाली असून रात्री उशिरापर्यंत तपासणी सुरू असलणार आहे, अशी माहिती प्राप्तीकर प्रधान आयुक्त शिवदयाल श्रीवास्तव यांनी दिल्याचे, औरंगाबाद येथील प्रतिनिधीने कळविले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पतीच्या मित्राकडून महिलेवर बलात्कार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, वैजापूर
घरात घुसून दलित महिलेवर अत्याचार केल्याची घटना रविवारी तालुक्यातील बल्लाळीसागज येथे घडली. याप्रकरणी विजय रंगनाथ शिंदे (रा. एकोडीसागज) याच्याविरुद्ध बलात्कार व अॅट्रॉसिटीचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा पीडित महिलेच्या पतीचा मित्र आहे. २१ फेब्रुवारी रोजी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास ही महिला घरात टीव्ही बघत होती. ती एकटी असल्याची संधी साधून आरोपी विजय शिंदे घरात घुसला व त्याने दरवाजा लावून बलात्कार केला, अशी फिर्याद पिडित महिलेने दिली आहे. त्यावरून विजय शिंदे याच्या विरुद्ध वीरगाव पोलिस ठाण्यात बलात्काराचा गुन्ह दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी हर्ष पोद्दार करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भुयारी गटार योजनेसाठी २० कोटी रुपयांची तरतूद

$
0
0

वैजापूर : नगरपालिकेचा २०१६-१७ या वर्षाचा ४३ कोटी ५२ लाख रुपयांचा शिलकी अर्थसंकल्प शुक्रवारी मंजूर करण्यात आला. यावर्षी भुयारी गटार योजनेसाठी २० कोटी रुपये व वैयक्तिक शौचालयांसाठी सव्वा कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
पालिकेच्या अर्थसंकल्पात दलित वस्तीतील रस्ते, गटारी व इतर सार्वजनिक सोयी व पायाभूत सुविधांसाठी केवळ तीन कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. नवीन वसाहतीमध्ये रस्ते बांधणे व मजबुतीकरण सात कोटी, पाणीपुरवठा योजनेची देखभाल, नवीन पाइपलाइनसाठी एक कोटी रुपये, कर्मचारी व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांसाठी सात कोटी ६५ लाख, शहरातील मोकळ्या जागा व बागबगिचांसाठी ५५ हजार रुपये, स्मशानभूमी व कब्रस्थान विकासासाठी एक कोटी रुपयांची तरतूद आहे. नगराध्यक्षा शिल्पा परदेशी, मुख्याधिकारी भागवत बिघोत, नगरसेवक राजेंद्र साळुंके, वसंत त्रिभुवन, लिमेश वाणी, उल्हास ठोंबरे, सिंधु वाणी, संगीता गायकवाड, नंदाबाई त्रिभुवन, अफरोज बेगम, सुनीता जगताप, लता व्यवहारे, सुरेखा धुमाळ, मजीद कुरेशी, रमेश हाडोळे, जयपालसिंह सिसोदिया, बी. एम. चव्हाण उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पावणेआठ मिनिटांत हृदय घाटीतून एअरपोर्टवर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
शहरातील चौथ्या अवयवदानासाठी सज्ज झालेल्या पोलिस व इतर सर्व यंत्रणांमुळे १७.७ किलोमीटरचे पाऊण तासाचे अंतर अवघ्या पावणेआठ मिनिटांत कापून 'ब्रेन डेड' तरुणाचे हृदय घाटीतून थेट विमानतळावर पोहोचविण्यात आले. विविध यंत्रणांच्या तत्परतेसह घाटीच्या २५हून जास्त डॉक्टरांच्या आणि झेडटीसीसी समितीच्या अथक परीश्रमांमुळेच शुक्रवारी (२६ फेब्रुवारी) २७ वर्षीय तरुणाचे हृदय चेन्नईच्या फोर्टिस हॉस्पिटलमध्ये, यकृत पुण्याच्या रुबी हॉलध्ये प्रत्यारोपणासाठी

पाठविण्यात आले. एका मूत्रपिंडाचे औरंगाबादच्या कमलनयन बजाज रुग्णालयामध्ये तर, दुसऱ्या मूत्रपिंडाचे सेठ नंदलाल धूत हॉस्पिटलमध्ये प्रत्यारोपण झाले आणि दोन्ही डोळ्यांचे (कॉर्निया) प्रत्यारोपण घाटीमध्ये शनिवारी सकाळी केले जाणार आहे.

अवघ्या दीड महिन्यात शहरामध्ये चार ब्रेन डेड' तरुणांकडून ३ हृदय, ४ यकृत, ८ मूत्रपिंड, २ कॉर्निया अशा तब्बल १७ अवयवांचे दान झाले असून, त्यांचे यशस्वी प्रत्यारोपणही झाले आहे. शहरातील चौथे अवयवदान हे महाराष्ट्रातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये पहिल्यांदाच घाटीतून झाले.

वैजापूर येथील गणेश शंकर घोडके (२७) यांना २४ फेब्रुवारी रोजी श्रीरामपूरजवळील न्हाऊरगंगा पुलावर अपघात झाला. ते पुलावरून खाली पडून गंभीर जखमी झाले. त्यांना शिर्डीच्या साई संस्थानच्या हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले. उपचारांना कुठलाच प्रतिसाद न मिळाल्याने त्यांना त्याच दिवशी संध्याकाळी घाटीमध्ये हलविण्यात आले. २५ फेब्रुवारी रोजी ते 'ब्रेन डेड' झाले आणि धीरोदात्त नातेवाईकांनी अवयवदानाचा निर्णय घेतला. त्यानंतर घाटीच्या 'ब्रेन डेथ कमिटी'ने दोनदा तपासणी करून अधिकृतरित्या 'ब्रेन डेड' घोषित केले.

स्थानिक 'झेडटीसीसी'ला कळविण्यात आल्यानंतर समितीने देशभरातून विविध अवयवांचा रात्रभर शोध घेऊन शुक्रवारी (२६ फेब्रुवारी) सकाळी साडेनऊला अवयव काढण्याची शस्त्रक्रिया घाटीमध्ये सुरू झाली. १२ वाजून २५ मिनिटांनी सर्वांत आधी हृदय विमानतळावर पाठविण्यात आले आणि त्यानंतर एकानंतर एक अवयव पाठविण्यात आले. 'जॉय जेट' विमानसेवेने हृदय नेण्यात आले.

ग्रीन कॉरिडॉरसाठी वेगळा मार्ग
हृदय नेण्यासाठी जालना रोडचा उपयोग न करता, पोलिसांनी ग्रीन कॉरिडॉरसाठी वेगळा मार्ग निवडला होता. जालना रोडवरील वाहतूक कोंडीमुळे जास्त वेळ वाया जाऊ शकतो, हे गृहीत धरुन रुग्णवाहिका घाटीतून टाऊन हॉल ब्रिज मार्गे, रंगीन दरवाजा, अण्णाभाऊ साठे चौक, दिल्ली गेट, हर्सुल टी पॉईंट, वोखार्ड कॉर्नर, गरवारे स्टेडियमच्या बाजुने व कलाग्राम समोरुन प्रोझोन कॉर्नरला वळून महाराष्ट्र डिस्टिलजरीज आणि धूत हॉस्पिटलकडून विमानतळाच्या रस्त्याकडे निघाली. ही रुग्णवाहिका ताशी ६० ते ७० किलोमीटरच्या वेगाने विमानतळाकडे धावत होती. दहा मिनिटांत विमानतळ गाठण्याचा उद्देश ठेवण्यात आला होता, मात्र अवघ्या पावणेआठ मिनिटांत ही रुग्णवाहिका विमानतळावर पोहोचली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images