Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

साक्ष देण्यासाठी अडीच लाखांची मागणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
साक्ष देण्यासाठी महिलेला अडीच लाख रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी दोन भावांविरुद्ध बेगमपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार शनिवारी दुपारी आरेफ कॉलनीमध्ये घडला.
आरेफ कॉलनी येथील २६ वर्षाच्या महिलेचा रफिक नावाच्या व्यक्तीसोबत कोर्टात वाद सुरू आहे. शनिवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास या महिलेच्या घरी जावेदन खान जाकेर खान व आसिफ खान जाकेर खान हे भाऊ आले. रफिकच्या प्रकरणात म‌ला व रफिकला अडीच लाख रुपये दे, अन्यथा मी तुझ्या विरुद्ध कोर्टात खोटी साक्ष देईल, अशी धमकी जाकेर खानने दिली. या महिलेने नकार दिल्यानंतर तिच्या घरातील वस्तूंची तोडफोड केली. अश्लील शिवीगाळ करीत महिलेला मारहाण केली. आसेफ खान याने आमच्या नादी लागू नको नाहीतर, तुझ्या लहान मुलाला गाडीने उडवून देऊ, अशी धमकी दिली. या महिलेच्या तक्रारीवरून दोघांविरुद्ध खंडणी व मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘रिक्षा परमिटसाठी भाषेची अट कशाला?’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
कमी शिक्षण किंवा अशिक्षित असल्याने रिक्षा चालवण्याची वेळ येते, त्यामुळे रिक्षा परमिट देताना मराठी भाषेची अट व ती सुद्धा परमीट मंजूर झाल्यानंतर कशासाठी?, असा प्रश्न आमदार इम्तियाज जलिल यांनी उपस्थित केला आहे. हिंदी भाषेचे ज्ञान असलेल्यांनाही परमिट द्यावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.
शहरात १३०० रिक्षा परमिटचे वाटप केले जाणार असून त्यासाठी मराठी भाषेची मौखिक चाचणी घेण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. या परिक्षेसाठी परमिटच्या यादीत नाव असलेल्या रिक्षाचालकांना बोलविण्यात आले आहे. यामुळे आमदार जलिल यांनी प्रादेशिक परिवहन अधिकारी यांना निवेदन दिले. सर्व रिक्षाचालकांचे शिक्षण कमी असून त्यामुळेच उदरनिर्वाहासाठी ते रिक्षा चालवतात.
सर्वांना मराठी भाषा शंभर टक्के येणार नाही, शहरात परराज्यातूनही प्रवासी येतात. त्यांना हिंदी समजते. त्यांच्यासोबत रिक्षाचालकांचा संपर्क येतो, याचा विचार करून हिंदी भाषा जाणणाऱ्या चालकांना परमिट द्यावे, अशी मागणी त्यांनी निवेदनात केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

काथार समाजातर्फे सामूहिक विवाह सोहळा

$
0
0

औरंगाबाद : काथार समाज ज्येष्ठ नागरिक सेवाभावी संस्थेतर्फे काथार, काथार-वाणी समाजाचा सामूहिक विवाह सोहळा अक्षयतृतीयेला आयोजित करण्यात आला आहे. मराठवाडा दुष्काळाच्या संकटाचा सामना करीत आहे. जनावरांना चारा छावणीत पाठवावे लागत आहे. जनावरांची विक्री करावी लागत आहे. ही परिस्थिती पाहता काथार समाज ज्येष्ठ नागरिक सेवाभावी संस्थेने हा सोहळा आयोजित करण्याचे ठरवले. ज्या मुला-मुलींना आई-वडिल नाहीत, त्यांना प्राधान्य दिले जाणार आहे. इच्छुक वधू-वरांनी काथार समाज ज्येष्ठ नागरिक सेवाभावी संस्था, सिडको जी-१७, टाऊन सेंटर, एमजीएम रोड येथे संपर्क साधावा. सामूहिक विवाह समितीचे प्रमुख विश्वनाथ चौधरी, विनायक पाराशर, संजय बरंजाळेकर, कैलास काथार, सुनील सूर्यवंशी, सुरेश मुखेडकर, भास्कर काथार, रवींद्र टाकळकर, नरेंद्र वाणी, रमेश फुलंब्रीकर हे या उपक्रमाचे काम पाहात असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष सी. ओ. चौधरी यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शेतकरी कुटुंबातील १०१ वधू-वरांचा सामूहिक विवाह

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
सततच्या दुष्काळामुळे अडचणीत सापडलेल्या शेतकरी बांधवामध्ये खर्चिक विवाह पद्धतीमुळेही निराशा आहे. त्यामुळे शेतकरी कुटुंबाना आधार देण्यासाठी राजेंद्र पवार मित्र परिवाराने १०१ सामूहिक विवाह सोहळा करण्याचा संकल्प केला आहे.
या सोहळ्यात आत्महत्याग्रस्त व शेतकरी कुटुंबातील वधू-वरांचे विवाह लावण्यात येणार आहेत. यासाठी संवेदना रथयात्रा काढून पथनाट्य, पोस्टर, व्हिडिओच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येणार आहे, अशी माहिती राजेंद्र पवार यांनी दिली. खर्चिक विवाह पद्धत व हुंडा यावर पर्याय म्हणजे सामूहिक विवाह सोहळा आहे. यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती व जगतगुरू श्री संत जर्नादन स्वामी मौनगीरी महाराज यांच्या १०१ जयंतीचे औचित्यसाधून २४ एप्रिल रोजी १०१ वधू-वरांचा सामूहिक विवाह सोहळा होणार आहे.
सामूहिक विवाह सोहळ्याबाबत सर्वसमान्यांमध्ये जनजागृती करण्यासाठी संवेदना रथयात्रा गावागावात जाणार आहे. राजू सोनवणे व त्यांचे सहकारी यांचे पथनाट्य यासह पोस्टर, व्हिडिओ, ऑडिओ चित्रफितींच्या माध्यमातून जनजागृती केली जाणार आहे. या संवेदना रथयात्रेचा लोकार्पण सोहळा ज्येष्ठ स्वातंत्रसैनिक लाला लक्ष्मीनारायण जैस्वाल यांच्याहस्ते रविवारी (२८ फेब्रुवारी) रेणुकामाता मंदिर येथे पार पडला. वधू-वरांना आयोजकातर्फे पाच ग्रॅम मणी मंगळसूत्र, जोडवे, पैंजण, लग्नाची साडी यासह संसार उपयोगी भेट वस्तूही देण्यात येणार आहेत. २४ एप्रिल रोजी दुपारी १२.३१ वाजता शहरातील राजीव गांधी मैदानावर हा सामूहिक विवाह सोहळा होणार आहे.
यावेळी भाजपचे शहराध्यक्ष किशनचंद तनवाणी, मनपा स्थायी समिती सभापती दिलीप थोरात, नगरसेवक राजगौरव वानखेडे, नितीन चित्ते, राजेंद्र पवार, झुंबरशेठ मोडके, दिनकर पाटील मोहिते, अॅड. विलास झोरडे पाटील, डॉ. पंडित कळसकर, प्रा. राजेश सरकटे, अॅड. विशाल कदम यांची प्रमुख उपस्थिती होती. विवाह सोहळ्याबाबतची संकल्पना पवार यांनी मांडली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जालना पीपल्स बँकेला पावणेदोन कोटीचा गंडा

$
0
0

सुरेश कुलकर्णी, जालना
जालना पिपल्स कॉपरेटिव्ह बँकेच्या बदनापूर शाखेत बनावट सोने गहाण ठेवून पावणेदोन कोटी रुपयांचा गंडा घातला आहे. हा घोटाळा सुमारे वर्षभरापूर्वीच उघडकीस आल्यानंतरही बँकेच्या संचालक मंडळाने कोणत्याही वेगवान हालचाली केल्या नाहीत. फसवणुकीची माहिती असूनही बँकेने ठकसेनासोबत केवळ चर्चा करण्यात वेळ घालवला. त्याचे सर्व पुरावे आता पोलिस तपासात उघड होत असल्याने काही मंडळींचे धाबे दणाणले आहेत.

सोने तारण कर्ज योजनेत बनावट सोने गहाण ठेवून जालना पिपल्स कॉपरेटिव्ह बँकेला पावनेदोन कोटी रुपयांचा गंडा घालणाऱ्या टोळीच्या सर्व कारनाम्यांची माहिती असताना संचालक मंडळाचे पदाधिकारी या घोटाळ्याचा सूत्रधार गौरव राजकुमार मंत्री आणि विनायक अनिल विसपुते याच्याशी चर्चा करत बसले. याच काळात संचालक मंडळाच्या हातावर तुरी देऊन मंत्री आणि सातपुते पसार झाले. रिझर्व्ह बँकेकडे या प्रकरणाची माहीत जाताच रिझर्व्ह बँकेने कठोर कारवाईचा बडगा उगारला आणि त्यानंतर संचालक मंडळातील हितसंबंधीयांचे धाबे दणाणले. बँकेला फसविणाऱ्या ठकसेनांविरोधात आता बदनापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बँकेचे अधिकारी आणि संचालक मंडळातील काही जण या प्रकारात सामिल असल्याची माहिती आता उजेडात येत आहे. संचालक मंडळातील काही हस्तक आणि बँकेचे अधिकारी यांच्या सहमती शिवाय कोणीही एवढे मोठे धाडस करू शकत नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पर्यटन जिल्ह्याची दैना सरता सरेना

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
औरंगाबाद जिल्ह्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 'पर्यटन जिल्हा' घोषित करून अकरा महिने उलटले. त्याअंतर्गत हॉटेल्स, उद्योग, टूर व्यावसायिक आणि पर्यटन उद्योगांना विशेष सवलती अपेक्षित होत्या. अजिंठा-वेरूळ लेणी विकासासाठी जपानची वित्तीय संस्था ९२० कोटी रुपये देणार होती; मात्र, राज्य सरकारच्या इतर घोषणांप्रमाणे या घोषणाही फुसका बार ठरल्या आहेत.

राज्य सरकारच्या धोरणानुसार सिंधुदुर्ग जिल्ह्याला 'पर्यटन जिल्हा' घोषित करून पर्यटनाला गती देण्यात आली. या माध्यमातून स्थानिकांना रोजगार मिळाला आहे. वेरूळ-अजिंठा लेणी, बीबी का मकबरा, पाणचक्की, देवगिरी किल्ला, अभयारण्य असा पर्यटन वारसा लाभलेल्या औरंगाबाद जिल्ह्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २७ मार्च २०१५ रोजी 'पर्यटन जिल्हा' घोषित केले. या घोषणेनंतर वर्षभरात विकासकामांसाठी निधीच मिळाला नाही. जागतिक वारसास्थळामुळे औरंगाबादला पर्यटन राजधानीचा दर्जा पूर्वीच मिळाला आहे. 'पर्यटन जिल्हा' झाल्यामुळे पर्यटनाला जास्त वाव मिळेल,' असे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक पराग जैन नैनुटिया यांनी सांगितले, मात्र जैन यांचा दावाही सपशेल फोल ठरला. पर्यटकांच्या सोयीसाठी पायाभूत सुविधांचा विकास करण्यात आला नाही; तसेच पर्यटनपूरक उद्योग आणि सेवा क्षेत्रालाही सवलती नाहीत. हॉटेल्स, उद्योग, टूर-ट्रॅव्हल्स व्यवसाय, टूर ऑपरेटर आणि पर्यटन उद्योगांना कर सवलत देण्याचे नियोजन होते; तसेच वाहतूक सेवा आणि पायाभूत सुविधांसाठीही विशेष निधी दिला जाणार होता. प्रत्यक्षात एकही विकासकाम झाले नाही. मुख्यमंत्र्यांनी पर्यटन जिल्ह्याला केवळ घोषणांच्या जंजाळात गुरफटून टाकले आहे. दरम्यान, याबाबत 'एमटीडीसी'च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी 'नो कॉमेंट्स' म्हणत प्रतिक्रिया देणे टाळले.

केवळ अध्यादेश
'२००६मधील 'पर्यटन जिल्हा' धोरणानुसार औरंगाबाद जिल्ह्यात उद्योग-व्यवसायांना पुरेशा सवलती मिळतील आणि सेवा-उद्योग क्षेत्राला विशेष फायदा होईल. याबाबत लवकर अध्यादेश जारी करू' असे 'एमटीडीसी'चे सहव्यवस्थापकीय संचालक सतीश सोनी यांनी सांगितले होते. १७ एप्रिल २०१५ रोजी 'पर्यटन जिल्ह्या'चा जीआर निघाला, मात्र सेवा व उद्योग क्षेत्राबाबतचा जीआर निघालाच नाही.

निधी कुठे अडला?
वेरूळ-अजिंठा लेणी विकासासाठी जपानची वित्तीय संस्था ९२० कोटी रुपये निधी देईल अशी माहिती पर्यटन मंत्रालयातून देण्यात आली होती. पर्यटन जिल्ह्यात सवलती देऊन उद्योगांना गुंतवणुकीसाठी आमंत्रित केले जाणार होते. स्थानिकांना रोजगार उपलब्ध करण्यासाठी सरकार प्रयत्न करणार होते. मात्र, या घोषणा केवळ 'बोलाची कढी, बोलाचाच भात' ठरल्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पश्चिम औरंगाबादची नाकेबंदी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
औरगाबादच्या पश्चिमेकडे असलेल्या छावणी, बेगमपुरा, भावसिंगपुरा, नंदनवन कॉलनी, विघापीठ, कर्णपुरा व अन्य परिसरात सध्या अनधिकृत नाकेबंदीच झाली आहे. रस्त्यांची झालेली चाळणी, वाहतुकीची होणारी कोंडी, मोडकळीस आलेले ऐतिहासिक पूल यांमुळे छावणी, नागसेनवन परिसर, ‌डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात कसे जावे, असा या भागांतील नागरिकांना पडला आहे. बारापुल्ला गेट, मकई दरवाजा, मेहमूद दरवाजा येथील पुलांच्या दुरुस्तीचे वारंवार आश्वासन दिले जाते, पण सार्वजनिक बांधकाम आणि महापालिका यांच्यात समन्वय नसल्याने हे काम गेल्या अनेक वर्षांपासून रखडले आहे.

मकई दरवाज्याशेजारी बॅरिगेट लावण्यात आले आहेत. दरवाज्यातून जाणारी अरूंद वाट, आजुबाजुला झालेली अतिक्रमणे, त्यामुळे होणारी वाहतूक कोंडी होते. रोज सकाळी आणि संध्याकाळी या कोंडीची तीव्रता जास्त असते. बारापुल्ला गेटमधून विद्यापीठ आणि नागसेनवन परिसरात जाताना नेहमीच वाहतुकीची कोंडी होते. मेहमूद दरवाज्याच्या आजुबाजुने कठडे नसल्याने तेथून ये-जा करताना नेहमीच जीव मुठीत घेऊनच चालवे लागत आहे. या तीन ऐतिहासिक दरवाजांना पर्याय म्हणून कर्णपुरा चौकातून जाणाऱ्या रस्त्याकडे पाहिले जाते. या चौकात उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. त्यामुळे तेथे वाहनांची कायम गर्दी असते. त्यामुळे हा रस्ताही पश्चिम औरंगाबादेत जाण्यासाठी सोयीचा राहिलेला नाही.

रेल्वे स्टेशनकडून महापौर बंगल्यासमोरून येणाऱ्या रस्त्यावर पंचवटी चौकापर्यंत वाहनांची गर्दी असते. यामुळे या रस्त्यावर वाहतूक पोलिस आणि उड्डाणपुलाच्या कामानिमित्त तैनात असलेले खासगी सुरक्षा कर्मचारी दिसून येतात, पण वाहतूक कोंडीतून मार्ग काढणे त्यांना शक्य होत नाही. त्यामुळे या रस्त्यावर सिग्नल बसविण्यात आले, मात्र वाहतूक सुरळित झालेली नाही. बारापुल्ला, मेहमूद आणि मकई गेटमधून जाण्यास अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली असली तरी, तेथे अवजड वाहने येतच आहे. याशिवाय आजुबाजुला असलेली घरे, दुकाने यांचासमोर कायम वाहने उभी असतात. त्यामुळे वाहतूक कोंडीत भर पडते.

अतिक्रमण कळीचा मुद्दा
हातगाड्यांचे अतिक्रमण हा या रस्त्यांवरील कळीचा मुद्दा आहे. ३ वर्षांपूर्वी महापालिकेचे तत्कालीन आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी रस्ता रुंदीकरणाची मोहीम राबवली. त्यामुळे वाहतूक सुटसुटीत होईल, कोंडीचा प्रश्न भेडसावणार नाही, अशी अपेक्षा नागरिक करीत होते, पण ती पूर्ण झाली नाही.

कामाच्या वर्गीकरणाचा प्रश्न
या दरवाज्यांजवळील रस्त्यांची कामे महापालिकेऐवजी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग करण्यात आली, परंतु बांधकाम विभागाला या पुलांच्या कामासाठी कुठलेही आदेश व अनुदान देण्यात आले नाहीत. महापालिकेचे प्रभारी आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी या पुलांच्या कामासाठी पाठपुरावा केला होता. शहरातील पाणचक्की येथील पुलाला वक्फ बोर्डाकडून १० कोटी रुपयांचा निधी देण्याचे महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी काही दिवसांपूर्वी जाहीर केले होते, पण अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पुलांच्या दुरुस्तीची जबाबदारी ही महापालिकेची असून, हे काम महापालिकेने करावे, असे सांगितले होते. या वादात हे काम रखडत गेले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘वन टू वन’: यावर्षीही मराठवाड्यात पाऊस ‌कमी

$
0
0

Tushar.Bodkhe@timesgroup.com
'सुपर अल निनो'च्या प्रभावामुळे मराठवाड्यात पावसाची स्थिती चिंताजनक राहील. एप्रिलपर्यंत 'निनो'चा प्रभाव कायम राहिल्यास यंदा मराठवाड्यासह विदर्भ व तेलंगणात सरासरीपेक्षा कमी मान्सून होईल,' असे मत नांदेड येथील एमजीएम स्वयंचलित हवामान केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ. श्रीनिवास औंधकर यांनी व्यक्त केले. बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी उपाय सुचवले आहेत.

- हवामान बदलाचा एकूण पर्यावरणावर काय परिणाम दिसत आहे ?
 यावर्षी हवामान बदलाचे साधे उदाहरण दिसत आहे. रात्री थंडी आणि दुपारी प्रचंड ऊन असते. थंडीची लाट मार्च महिन्यापर्यंत कायम राहील या निष्कर्षावर ठाम होतो. या निष्कर्षाची प्रचिती आली. इंग्लंड, अमेरिका या देशात हिमवृष्टी सुरू आहे. उत्तर भारतातील हवामानातही प्रचंड बदल झाला आहे. जागतिक हवामान बदलाचे स्थानिक पातळीवर कमी-अधिक प्रमाणात परिणाम जाणवतात. यंदा पूर्वमोसमी पाऊस कमी पडण्याची शक्यता आहे. पण, एप्रिल, मे व जून महिन्यात 'सुपर अल निनो'च्या प्रभावावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतील. दरवर्षीच्या तुलनेत निश्चित वेळेपूर्वी पक्ष्यांचे आगमन, डिसेंबरपूर्वी झालेली बर्फवृष्टी हे वातावरण बदलातील महत्त्वाचे संकेत आहेत.

- मराठवाड्यात सातत्याने तीन वर्षांपासून कमी पाऊस पडत आहे. यावर्षी कशी स्थिती असेल?
 मराठवाड्यातील पर्जन्यमानाबाबत चिंताजनक स्थिती आहे. 'सुपर अल निनो'चा प्रभाव अजूनही कायम आहे. एप्रिलपर्यंत स्थिती कायम राहिल्यास मराठवाड्यासह विदर्भ व तेलंगणातही सरासरीपेक्षा कमी मान्सून होईल. कमी पर्जन्यमानामुळे दुष्काळाची स्थिती कायम राहण्याची भीती अधिक आहे. राज्याच्या इतर भागातही कमी -अधिक प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता आहे. शास्त्रज्ञ 'सुपर अल निनो'च्या हालचालीवर लक्ष ठेवून आहेत. काही सकारात्मक बदल होण्याची अपेक्षा आहे.

- वृक्षतोड आणि प्रदूषण यांचा पर्जन्यमानावर किती प्रभाव असतो?
 संपू्र्ण जगाच्या क्षेत्राचा विचार केल्यास वृक्षतोडीचा परिणाम जाणवत नाही; मात्र स्थानिक वातावरणात निश्चित फरक पडतो. ढग निर्मिती आणि पर्जन्यमानासाठी वनक्षेत्र आवश्यक असले तरी जागतिक पातळीवर त्याचा थेट प्रभाव नसतो. आपण प्रक्रियेशिवाय नदीत केमिकलयुक्त पाणी सोडले. ज्या कंपन्यांच्या केमिकलने पाणी प्रदूषित झाले, त्याच कंपनीचे पाणी शुद्धीकरण यंत्र घरात घेऊन येतो. आपले नुकसान असले तरी कंपन्यांचे फावले आहे. प्लास्टिक कॅरिबॅगचा वापर सर्रास सुरू आहे. पृथ्वी प्रदूषणुक्त ठेवण्यासाठी नियम पाहिजे. शेतीत खतं आणि रसायनांच्या अतिरिक्त वापराने मातीची संरचना विस्कळीत झाली आहे. या परिस्थितीचा विचार करणे आवश्यक आहे.

- बदलत्या हवामानानुसार शेतीत काय बदल अपेक्षित आहेत?
 मागील काही वर्षात हवामान बदलामुळे शेतीत झपाट्याने बदल दिसत आहेत. अर्थात, प्रत्येक शेतकरी नवीन बदल लक्षात घेऊन शेती करीत नाही. नाशिक, अहमदनगर जिल्ह्यात निघणारे बेदाणे, कांदा, डाळिंब उत्पादन आता दक्षिण सोलापूर, सांगली जिल्ह्यात निघत आहे. उत्तर भागातील गहू, मका पीक महाराष्ट्रात वाढले आहे. शेतकऱ्यांना हवामान बदलानुसार पिकांचे नियोजन करावे लागेल. फ्लोरीकल्चर, सेरीकल्चर शेतीकडे वळावे लागेल.

- 'ग्लोबल वॉर्मिंग'ची अधिक चर्चा सुरू आहे...
 सूर्याकडून कमी प्रमाणात ऊर्जा स्त्रोत मिळत असल्याने पृथ्वीवरील सरासरी तापमानात घट झाली आहे. मागील काही वर्षात तापमान वाढ झाली नाही. शंभर वर्षात फक्त ०.७४ टक्के तापमान वाढले. म्हणजे अवघा एक टक्के तापमानही वाढले नाही. अमेरिकेतील समस्यांचा जागतिक स्तरावर बोलबाला केला जात आहे. 'ग्लोबल वॉर्मिंग' त्याचे ठळक उदाहरण आहे. ओझोनच्या आवरणाला छिद्र पडले असून, पृथ्वीवर अनिष्ट परिणाम होतील अशी चर्चा होती, पण ओझोनची रिकव्हरी सुरू असताना चर्चा थांबली आहे. जगाला हिमयुगाचा जास्त धोका असून त्यावर चर्चा आणि उपाययोजना अपेक्षित आहे.

- वातावरणाचा बदल टिपण्यासाठी मराठवाड्यात हवामान केंद्राची गरज आहे का?
 पाऊस, विजा चमकणे, गारपीट, हवामान बदलाच्या नोंदीसाठी मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यात अत्याधुनिक हवामान केंद्राची गरज आहे. नांदेडला 'एमजीएम'मध्ये स्वयंचलित हवामान केंद्र आहे. मागील अनेक वर्षांच्या नोंदी आहेत. यावर्षी नांदेडला घसरलेल्या तापमानाच्या नोंदीत फरक दिसला. भारतीय हवामान विभागाच्या नोंदीत ४.३ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. आमच्या संस्थेत ७.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. जुन्या पद्धतीने 'आयएमडी'ने नोंदी घेतल्यामुळे फरक जाणवला. हा विसंवाद दूर करण्यासाठी मराठवाड्यात हवामान केंद्रांची आवश्यकता आहे. जालना जिल्ह्यातील खरपुडीत खासगी केंद्र सुरू झाले आहे. औरंगाबादला 'एमजीएम' संस्थेच्या परिसरात हवामान केंद्र सुरू करण्याचा प्रयत्न आहे.

- विभागीय आयुक्तालयाच्या इमारतीवरील रडार हलवण्यात आले...
 कृत्रिम पावसासाठी राज्य सरकारने २७ कोटी रुपयांचा करार केलेला असताना रडार हलवण्याची गरज नव्हती. कोट्यवधी रुपये खर्च करूनही सरकारी यंत्रणा पुरेशा नोंदी घेण्यात अपयशी ठरत आहे. गोव्याला चांगले रडार असताना चिनी बनावटीचे रडार बसवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे अनेक वर्षांपासून कार्यरत असलेली जुनी यंत्रणा काढण्यात आली. चिनी बनावटीच्या रडारमुळे आपल्या नोंदी चीनला कळतील असे वाटल्याने ऐनवेळी चिनी रडार कार्यान्वित करण्याचा निर्णय रद्द झाला. जुनी रडार यंत्रणा अजूनही बसवली नसल्यामुळे हवामानाच्या नोंदी घेण्याचे महत्त्वाचे केंद्र बंद पडले. मराठवाड्यातील हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर रडार आवश्यक होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कॉपीमुक्तीसाठी साकडे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
बारावी परीक्षेत अनेक केंद्रावर सर्रास कॉपीयुक्त परीक्षा सुरू आहेत. त्यावर शिक्षण मंडळाला वचक ठेवता येत नसल्याने मंडळाने थेट जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठवून बैठी पथके नेमण्याची मागणी केली. जिल्हाधिकाऱ्यांनी दखल घेत मुख्य कार्यकारी अधिकारी, तहसीलदारांना त्याबाबत निर्देश दिले.

बारावी परीक्षांना १८ फेब्रुवारीपासून सुरुवात झाली. पहिल्या इंग्रजीच्या पेपरपासूनच अनेक परीक्षा केंद्रावर कॉपी करण्याचे प्रकार सर्रास होत आहेत. अनेक केंद्रांवर पुरेशा सोयीसुविधा नाहीत. अनेक परीक्षा केंद्रावर बैठे पथकही नाही. विविध केंद्रावरील वास्तव 'महाराष्ट्र टाइम्स'ने मांडले. कॉपी प्रकरणांची संख्या औरंगाबाद आणि बीड जिल्ह्यात अधिक असल्याने विभागीय शिक्षण मंडळाने औरंगाबाद आणि बीड जिल्हाधिकाऱ्यांना परीक्षेत लक्ष देण्याची विनंतीवजा पत्र लिहिले आहे. काही प्रमुख पेपरला बैठे पथके नेमण्यात यावीत, असे पत्रात म्हटले आहे. फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी आणि मॅथ्स अशा पेपरला लक्ष द्यावे, अशी विनंती करण्यात आले. त्यात बारावीचे फिजिक्स, मॅथसचे विषयाचे पेपर संपले आहेत.

औरंगाबाद जिल्हाधिकाऱ्यांनी पत्राची दखल घेत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, तहसीलदार यांना पत्र देऊन बैठ्या पथकांचा आढावा घ्यावा आमि ही पथके तात्काळ नेमण्याच्या सूचना दिल्याचे सूत्रांनी सांगितले. दहावीची परीक्षा १ मार्चपासून सुरू होत आहे. त्यामुळे दहावीच्या परीक्षांमध्ये याचा कितीपत परिणाम होतो हे समोर येईल.

भरारी पथकांचे अहवाल गुलदस्त्यात
शिक्षण मंडळाने दहावी, बारावी परीक्षेसाठी औरंगाबाद, बीड, परभणी, हिंगोली आणि जालना जिल्ह्यांसाठी ३५५ भरारी पथके नेमली. यापैकी सर्वाधिक कारवाया एकाच पथकाकडून झाल्या आहेत. उर्वरित पथकांकडून अहवालही वेळेवर येत नसल्याचे मंडळातील सूत्रांनी दिले. अशा पथकांना वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून पाठीशी घातले जात असल्याचे बोलले जाते.

१५० विद्यार्थ्यांवर कारवाई
बारावीच्या परीक्षेत आतापर्यंत भरारी पथकांनी १५० विद्यार्थ्यांवर कारवाई केली आहे. त्यात सर्वाधिक विद्यार्थी औरंगाबाद आणि बीड जिल्ह्यांतील आहेत. एकाच पथकाने तब्बल १०१ विद्यार्थ्यांवर कारवाई केली आहे. त्यामुळे उर्वरित पथके काय करीत आहेत, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोलिस पाटील परीक्षेत २७४ उमेदवार उत्तीर्ण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
तालुक्यातील ८८ पोलिस पाटील पदाच्या भरतीसाठी महसूल प्रशासनाने रविवारी घेतलेल्या लेखी परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या ४६८ उमदेवारांपैकी ४५१ उमेदवारांनी हजेरी लावली होती. दरम्यान, सायंकाळी या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला असून, २७४ उमेदवार उत्तीर्ण झाले असल्याचे उपविभागीय अधिकारी शशिकांत हदगल यांनी सांगितले. दुपारी बारा ते दीड या वेळेत सरस्वती भुवन विद्यालयात घेण्यात आली. या परीक्षेत २७४ उमेदवार उत्तीर्ण झाले.

औरंगाबाद तालुक्यात पोलिस पाटीलांची पदे रिक्त असल्यामुळे गावात शांतता व सुव्यवस्थेबाबत माहिती मिळण्यात पोलिस, महसूल प्रशासनाला मिळण्यास अडचण येत होती. त्यामुळे तालुक्यात पोलिस पाटलांची ८८ पदे भरण्यासाठी आरक्षण काढण्यात आले. महिलांसाठी ३० टक्के आरक्षण ठवेण्यात येऊन पहिल्यांदाच या भरतीसाठी लेखी परीक्षा घेण्याचे ठरवले. पात्र ४६८ उमेदवारांची रविवारी परीक्षा घेण्यात आली. प्रश्नपत्रिकेत ८० प्रश्न विचारण्यात आले होते. त्यासाठी दीड तासाचा कालावधी देण्यात आला होता. उपविभागीय अधिकारी हदगल, निवासी उपजिल्हाधिकारी विश्वंभर गावंडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही परीक्षा घेण्यात आली.

लवकरच मुलाखती
परीक्षेनंतर आठवड्याभरात समितीची बैठक घेण्यात येणार असून, उत्तीर्ण झालेल्या २७४ उमदेवारांच्या मुलाखतीची तारीख ठरणार आहे. मुलाखतीमध्ये उमदेवारांच्या कागदपत्रांची छाननी करण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गणित शिक्षकांसमोरही विद्यार्थीसंख्येचे आव्हान

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
गणिताबद्दल निर्माण केली गेलेली भीती, राज्यशासनाचे दुर्लक्ष यामुळे भविष्यात या विषयाचे विद्यार्थी टिकविणे हेच आव्हान असणार आहे. हे आव्हान पेलण्यासाठी गणित शिक्षकांनी पुढे यावे, असा सूर गणित परिषदेत व्यक्त झाला.

महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालय गणित परिषदतर्फे गणित शिक्षकांची परिषद घेण्यात आली. देवगिरी कॉलेजच्या सभागृहात झालेल्या या परिषदेचे उद्घाटन उपप्राचार्य डॉ. अशोक तेजनकर यांनी केले. यावेळी गणित परिषदेचे राज्याध्यक्ष प्रा. दीपक कडू, मराठवाडा अध्यक्ष चंद्रकांत गायकवाड, प्रा. भगवान इंगळे, प्रा. ईनायत अली, प्रा. बाळासाहेब पवळ, प्रा. नवनाथ काळे, प्रा. अशोक कराड, प्रा. कल्पना भागवत, डॉ. पी. आर. थोटे, श्रीनिवास बडे, प्रा. बाळासाहेब शिंदे यांची उपस्थिती होती.

गणित विषयाबद्दल पालक, विद्यार्थ्यांमध्ये वाढती भीती, विषयातील शिक्षकांचे प्रश्न, विषयाकडे शासनाचे दुर्लक्ष आदी विषयांवर चिंता व्यक्त करण्यात आली.

डॉ. अशोक तेजनकर म्हणाले, या विषयाच्या शिक्षकांनी संघटित होऊन शासनाकडे पाठपुरावा करावा. त्यातून गणित विषयाला अधिक चांगले दिवस येतील. अध्यक्ष प्रा. कडू आपल्या मार्गदर्शनात म्हणाले, गणित विषय कठीण असल्याचा बाऊ केल्यामुळे त्याकडे विद्यार्थी वळत नाहीत. गणित विषयाला स्वाध्याय पुस्तिका नसल्याने पूर्णवेळ शिक्षक मिळणे अवघड आहे. प्रात्यक्षिकही बंद करण्याच्या हालचाली झाल्या. त्यामुळे विषयाला प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी शिक्षकांनी प्रयत्न करण्याची गरज आहे. प्रा. इंगळे म्हणाले , ही परिस्थिती राहिली तर, हा विषय टिकविण्याचे आपल्यासमोर आव्हान असेल. प्रा. गायकवाड यांनी शालेय स्तरावर इतर विषयांचे शिक्षक गणित शिकवित असल्याबद्दल खंत व्यक्त केली. हा प्रकार गणित विषया मारक आहे.

राष्ट्रीय अभ्यासक्रम आरखड्याची अंमलबजावणी होत नसल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. यावेळी प्रा. भागवत, प्रा. काळे यांची भाषणे झाली. सूत्रसंचालन प्रा. रमेश शिंदे यांनी केले तर, आभार प्राताप काशीद यांनी मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फिजिक्स विभागाला पेटंट

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या फिजिक्स विभागाने 'फेरो इलेक्ट्रिक कम्पाउंड' (लेड-बेरियम-स्ट्राँशिअम-टिटानेट) बनविण्याची सोपी पद्धत शोधून काढली आहे. याला भारतीय पेटंट विभागाने नुकतीच मंजूरी दिली. हे संशोधनकार्य अवकाश संशोधन, डेटा स्टोरेज यासह मेमरी कार्ड, चिपची साठवण क्षमतावाढ यासाठी उपयुक्त ठरणार आहे.

विभागाचे सेवानिवृत्त डॉ. जी. के. बिचिले व सध्या कार्यरत असलेले डॉ. के. एम. जाधव, संशोधक विद्यार्थी डॉ. पी. पी. बर्दापूरकर, डॉ. एस. एस. देसाई यांच्या रिसर्च टिमने लेड-बेरियम-स्ट्राँशिअम-टिटानेट (पीबीएसटी) यांच्या मिश्रणातून 'फेरो इलेक्ट्रिक कम्पाउंड' तयार करण्याची पद्धत विकसीत केली. या सोप्या आणि सुटसुटीत पद्धतीला आस्ट्रेलिया व भारत सरकारनेही पेंटट देऊन गौरविले आहे. २०१०पासून यावर संशोधन सुरू आहे. या पेटेंटला डिसेंबरअखेर केंद्रशासनाने मंजूरी दिली, त्याचे पत्र विभागाला नुकतेच प्राप्त झाले. या कम्पाउंडला भारतीय पेंटट विभागाने मंजुरी दिल्याने विद्यापीठाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.

संशोधनाचा उपयोग
या संशोधनामुळे मेमरी कार्ड, डीव्हीडी, चिप, ट्रान्सफार्मर अशा डेटा स्टोअरेज डिव्हायसेसच्या साठवण क्षमतेत वाढ करणे शक्य होणार आहे. वीजपुरवठा अचानक खंडित झाला तर, या कम्पाउंडमुळे साठवलेली माहिती नाहिशी होत नाही. अवकाश संशोधनात क्षेत्रातही या संशोधनाचा फायदा होणार आहे. उर्जा निमिर्तीच्या साधने ट्रान्सफॉर्मर यांच्या निर्मितीत अचुकता व दर्जा राखणे शक्य असल्याचे संशोधक टीमधील डॉ. जाधव यांनी 'म.टा.'शी बोलताना सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निवृत्तीनंतरही शिक्षणासाठीच कार्यरत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
सेवेच्या कार्यकाळात मी माझ्या कर्तव्याशी प्रामाणिक राहिलो. सामाजिक न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता हे माझ्या कामाचा भाग आहेत. सर्व समाजघटकांतील विद्यार्थ्यांना सोबत घेऊन काम करता आले याचा मला आनंद आहे. सेवानिवृत्तीनंतरही आपण विद्यार्थ्यांसाठीच कार्यरत राहणार आहोत, असे प्रतिपादन डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ जनसंवाद व वृत्तपत्र विद्या विभागाचे प्रमुख डॉ. वि. ल. धारूरकर यांनी रविवारी येथे केले.

प्रो. वि. ल. धारूरकर संशोधक विद्यार्थी समितीतर्फे त्यांच्या सेवा गौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी खासदार संजय राऊत, कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे, ज्येष्ठ पत्रकार चक्रधर दळवी, प्राचार्य प्रताप बोराडे, डॉ. प्रविण सूर्यवंशी, प्राचार्य डॉ. रेखा शेळके यांची उपस्थिती होती. डॉ. धारूरकर म्हणाले,'डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा नंदादीप मी माझ्यात नेहमीच तेवत ठेवला. कर्तव्याशी प्रामाणिक राहिल्याने विद्यार्थ्यांचे एवढे प्रेम मिळते. मी भावुक होत नाही. माझे कर्म हेच कर्तव्य आहे. पुढील वाटचालीसाठी तुम्हा सर्वांच्या स्नेहामुळे सामर्थ्य मिळाले आहे. भविष्यात शिक्षणासाठीच आपण काम करत राहू. शिक्षणाच्या परिवर्तनासाठी ग्रामीण महाविद्यालये आणि विद्यापीठेसोबत येतील तेव्हाच शिक्षण क्षेत्रात परिवर्तन होईल.'

यावेळी खासदार संजय राऊत म्हणाले,'पत्रकारिता करणे सोपे झाले, परंतु पत्रकार घडविणे अवघड काम आहे. जवळपास सर्वच वृत्तपत्राचे मालक संसदेत आहेत. सरकारकडून जमिनी मिळाव्यात, कोळसाच्या खाणी मिळाव्यात म्हणून वृत्तपत्र चालविणे हे पत्रकारीता नव्हे. सचोटीने पत्रकारिता करणाऱ्यांनी सामान्यांना न्याय देण्यासाठी प्रयत्न करावेत. राजकारण्यांचा केंद्रबिंदू सामान्य माणूस असला पाहिजे, तसा पत्रकारितेचा केंद्रबिंदू सामान्य माणूसच असायला हवा. देशातील १२५ कोटी लोक राहतात, त्यातील दहा, पंधरा कोटी लोकच सुखाने राहतायेत. उर्वरित शंभर कोटी लोकांसाठी आपण आहोत असे काम पत्रकारांनी करावे.' कुलगुरू डॉ. चोपडे यांनी आपल्या भाषणात डॉ. धारूरकर यांच्या कार्याचा गौरव केला. ज्येष्ठ पत्रकार चक्रधर दळवी यांचेही यावेळी भाषण झाले. डॉ. धारूरकर यांचा यावेळी सपत्निक गौरव करण्यात आला. ज्येष्ठ पत्रकार डॉ. अनिल फळे यांनी सन्मानपत्राचे वाचन केले. अश्विनी दाशरथे यांनी सूत्रसंचालन केले. संजय शिंदे यांनी आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुलांवरून तापले राजकारण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी औरंगाबाद
मकई गेट, मेहमूद दरवाजा आणि बारापुल्ला दरवाजा या ऐति‌‌हासिक दरवाजांशेजारी खाम नदीवरील पुलांच्या दुरुस्तीवरून राजकारणही तापले आहे. तत्कालिन उपमुख्यमंत्री अजित पवार, सध्याचे महसूलमंत्री एकनाथ खडसे, पालकमंत्री रामदास कदम यांनी या पुलांच्या दुरुस्तीसाठी निधीची घोषणा केली, मात्र अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पुलांची जबाबदारी महापालिकेची असल्याचे सांगत निधी देण्याच्या घोषणांना खो दिला.

नेहमीच तिजोरीत ठणठाणाट असलेल्या महापालिकेला पुलाचे काम करणे तसे अवघडच. त्यात अर्थमंत्र्यांनी केलेल्या विधानानंतर या पुलांना पैसे मिळणार कुठून, असा प्रश्न आहे.

झपाट्याने विकसित होत असलेल्या पश्चिम औरंगाबादला जोडण्यासाठी ऐतिहासिक दरवाजांशेजारी असलेले तीन पूल अत्यंत महत्त्वाचे आहेत, मात्र यांच्या दुरुस्तीसाठी आजी-माजी मंत्री राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करत आहेत. सत्तेत असताना राजकारणासाठी निधीची घोषणा करायची आणि नंतर राजकारण करून प्रकरण 'जैसे थे' ठेवायचे असा प्रकार औरंगाबाद शहराबाबत घडत आहे.

पुलाच्या कामासाठी तत्कालिन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चार वर्षांपूर्वी विधीमंडळामध्ये ११ कोटी रुपये देण्याची घोषणा केली होती. दरम्यानच्या काळात काम महापालिकेऐवजी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग करण्यात आले, परंतु या पुलांच्या कामासाठी कुठलेही आदेश व अनुदान देण्यात आले नाही. शहरातील पाणचक्की येथील पुलाला वक्फ बोर्डाकडून १० कोटी रुपयांचा निधी देण्याचे महसूलमंत्री खडसे यांनी काही दिवसांपूर्वी जाहीर केले होते. यानंतर १७ जानेवारी रोजी झालेल्या डीपीसी बैठकीमध्ये या पुलांसंदर्भात आपण सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अतिरिक्त सचिवांसोबत चर्चा केली असून, लवकरच २७ कोटी रुपये देण्यात येतील, अशी घोषणा पालकमंत्री कदम यांनी केली. त्यानंतर वार्षिक योजना आढावा बैठकीत अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी, पुलांच्या दुरुस्तीची जबाबदारी पालिकेची असून, त्यासाठी सरकारकडून पैसे देताच येणार नाही, असे सांगत पवार यांना खोटे ठरवले व पालकमंत्र्यांच्या घोषणेला खो दिला.

केवळ घोषणांचा पाऊस
तत्कालिन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चार वर्षांपूर्वी ११ कोटी रुपयांची घोषणा केली, यानंतर महसूलमंत्री पानचक्की येथील पुलाच्या दुरुस्तीसाठी वक्फकडून १० कोटी रुपयांचा निधी देण्याची घोषणा केली, त्यानंतर पालकमंत्री कदम यांनी २१ कोटी रुपयांची घोषणा केली. प्रत्यक्षात ऐतिहासिक पुलांच्या दुरुस्तीसाठी केवळ घोषणांचा पाऊस पाडला आहे.

पोलिसांचे जादा पॉइंट आवश्यक
बारापुल्ला दरवाजा, महमूद दरवाजा व मकई गेट हे छावणी, बेगमपुऱ्याकडे जाणारे तीन मार्ग आहेत. वाहनांची वाढती संख्या व या अरूंद पुलावर होणारी कोंडी वाहतुकीसाठी अडसर ठरत आहे. या ठिकाणी आता वाहतूक शाखेला जादा पॉइंट लावणे गरजेचे झाले आहे.

वाहतूक शाखेकडून शहरातील विविध चौकांत पोलिसांचे पॉइंट नेमून वाहतूक नियोजन केले जाते. पूर्वी ५२ गेटच्या तटबंदीमध्ये असलेले शहर वेगाने वाढले. मकई गेटच्या दुसऱ्या बाजूस बेगमपुरा, जयसिंगपुरा, पहाडसिंगपुरा या वसाहती निर्माण झाल्या. महमूद दरवाजा व बारापुल्ला गेटच्या दुसऱ्या बाजूला देखील नागरी वसाहतींसोबतच शैक्षणिक संस्थाचा विस्तार झाला. भावसिंगपुरा, नंदनवन कॉलनी या प‌रिसरात देखील वसाहती वाढल्या. पूर्वी वाहतूक कमी असल्याने जुन्या, अरूंद पुलांवरून वाहतुकीला अडचण येत नव्हती, मात्र वसाहती वाढल्याने वाहतुकीवर परिणाम झाला. अरूंद पुलांमुळे दोन्ही बाजूची वाहने एकाच वेळी जाऊ शकत नाहीत. ही नेहमीची कोंडी सोडवण्यासाठी वाहतूक शाखेला प्रयत्न करावे लागत आहे. या ठिकाणी आता स्वतंत्र पोलिस कर्मचारी नेमून कोंडी होणार नाही याची दक्षता घेण्यात येत आहे. पोलिस कर्मचारी येथून थोड्या वेळासाठी जरी येथून बाजूला गेले तर, काही मिनिटांत या तिन्ही पुलांवर वाहतूकी कोंडी होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मराठवाड्यात पाऊस अन् गारा...

$
0
0


टीम मटा
औरंगाबाद : महाराष्ट्रात रविवारी सायंकाळी अनेक ठिकाणी हलक्या ते जोरदार पावसाने हजेरी लावली. काही ठिकाणी गारांचा वर्षावही झाला. मराठवाड्यात औरंगाबादसह लातूर, बीड, उस्मानाबाद या जिल्ह्यांत अवकाळी पावसाने हजेरी लावली. औरंगाबाद जिल्ह्यात रात्री साडेदहानंतर हलक्या स्वरुपात पाऊस झाला.

कन्नड तालुक्यातील आलापूर, टापरगाव व हतनूर शिवारातील काही भागात रविवारी (२८ फेब्रुवारी) सायंकाळी हलक्या सरी कोसळल्या. त्यामुळे दिवसभर असलेला उकाडा सुसह्य झाला. सद्यस्थितील वातावरणामुळे ज्वारी, गहू सोंगणीची वेळ असल्याने मोठे नुकसान होण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंता बळावली आहे. या परिसरात कांदा बिजवाई लागवड मोठ्या प्रमाणात असल्याने ढगाळ वातावरणाने शेतकऱ्यांची चिंता वाढवली आहे. दरम्यान, खुलताबाद परिसरात रात्री सव्वाआठ वाजता बेमोसमी पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. विजेच्या कडकडाटासह अचानक पाऊस आल्याने सायंकाळच्या लग्नातील वऱ्हाडींची फजिती झाली.

बीड जिल्ह्यात रविवारी सलग दुसऱ्या दिवशी पावसाने हजेरी लावली. त्यासोबतच उस्मानाबाद ‌जिल्ह्यातील काही भागात अवकाळी सरी कोसळल्या. वादळी वाऱ्यासह विजेच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली.

बीड जिल्ह्यातील बीड, आष्टी, केज, गेवराई, पाटोदा, शिरूर तालुक्यांत कमी-अधिक प्रमाणात पाऊस पडला. आष्टी तालुक्यात सहाच्या सुमारास पावसाच्या सरी कोसळल्या. बीड शहरात संध्याकाळी सातच्या सुमारास जोरदार वारे, विजांच्या कडकडाटासह अर्धा तास पाऊस पडला. त्यामुळे अनेक ठिकाणी पाणी साचले होते. वीजपुरवठा रात्री उशिरापर्यंत खंडित झाला होता. उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा तालुक्यातील मुरुम परिसरात सातच्या सुमारास वादळी वाऱ्यासह पाऊस पडला. भूम तालुक्यातील कोंड व पाथरुड परिसरात पाऊस झाला. काही भागात गाराही पडल्याचे वृत आहे. लातूर शहरात जोरदार पावसाने हजेरी लावली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पाहणीला विरोध म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, जालना
राज्य मंत्रीमंडळाच्या दुष्काळ पाहणी दौऱ्याला राष्ट्रवादीचा विरोध म्हणजे चोरांच्या उलट्या बोंबा आहेत, या शब्दात भाजपचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार रावसाहेब दानवे यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांची सोमवारी जालन्यात खिल्ली उडवली.
जालना येथे आयोजीत करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. मराठवाडा आणि विदर्भात दुष्काळाची तीव्रता सर्वाधिक आहे. राज्य सरकार दुष्काळासारख्या विषयाची गंभीर दखल घेऊन काम करीत असताना जनतेला दिलासा मिळेल असे वागण्याऐवजी राष्ट्रवादीचे हे सगळे असे उद्योग म्हणजे सरकारच्या पायात पाय घालण्याचे धंदे आहेत, असेही ते म्हणाले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अतिशय संवेदनशील व्यक्ती आहेत. राज्य शासन खूपच चांगले काम करत आहे. फडणवीस यांनी स्पष्टपणे सर्व मंत्र्यांना येत्या मार्च महिन्याच्या अधिवेशनापूर्वी संपूर्ण दुष्काळाची परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी करून येण्याचे आदेश दिले आहेत. पिण्याचे पाणी, जनावरांना चारा, विद्यार्थी शुल्क माफी, कर्जाचे पुर्नगठण आणि रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून कामे हा आमचा दुष्काळात काम करण्याचा एकमेव कार्यक्रम आहे. राज्य मंत्रीमंडळातील सर्व मंत्री या निर्देशित कार्यक्रमाची सर्वत्र प्रभावी अंमलबजावणी होते की नाही याची प्रत्यक्ष पाहणी करतील राष्ट्रवादीने नेमकी याचीच धास्ती घेतली आहे , असे खासदार दानवे म्हणाले.
भाजपच्यावतीने गाव पातळीवर दुष्काळ विमोचन समिती स्थापन करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. पक्षाचे सर्व आमदार आणि खासदार सर्व तालुक्यात सर्कलपर्यंत जाणार आहेत. या संदर्भात प्रदेश पातळीवर एक नियंत्रण कक्ष सुरू करण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले.
जालना येथे येत्या १७ एप्रिल रोजी सामुहिक एक हजार विवाह सोहळा आयोजित करण्यात आला आहे आमदार नरेंद्र पवार हे या सामुहिक विवाह सोहळ्याचे प्रमुख आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्रीमंडळातील सर्व मंत्री या विवाह सोहळ्यात सहभागी होणार आहेत असे ते म्हणाले.
शिवाजी महाराज स्मारक समितीच्यावतीने जवखेडा येथे एक अनोखा शिक्षण ते रोजगार असा प्रकल्प सुरू करण्यात येणार आहे. यामध्ये पाचशे विद्यार्थी सहभागी करून घेतले जाणार आहेत. या विद्यार्थ्यांचा संपूर्ण खर्च समितीच्यावतीने करण्यात येणार आहे.
भाजपच्यावतीने जालना आणि औरंगाबाद जिल्ह्यात नदी खोलीकरण कामे करण्यात येणार आहेत. या कामाची सुरुवात सोमवारी सिल्लोड तालुक्यात निल्लोड या गावातील नदी खोलीकरण कामापासून सुरू झाली आहे. या कामासाठी ४८ पोकलॅन मशिन काम करणार आहेत, असे ते म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रेल्वेच्या पाण्यावर फुकट्यांचा डल्ला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
रेल्वे स्टेशनची सुरक्षा व स्वच्छतेवर दरवर्षी मोठा खर्च करूनही स्टेशनवर अक्षरशः धोबीघाट तयार झाला आहे. रेल्वे डब्यात पाणी भरण्यासाठीच्या पाइपजवळ आसपासच्या वस्त्यांतील नागरिक निर्धास्त होऊन कपडे धुतात. काही जणांसाठी हे 'बाथरूम' ही आहे. त्यामुळे स्मार्ट सिटीतील मॉडेल रेल्वे स्टेशनची लक्तरे टांगली जात आहेत.
रेल्वे विभागाने प्रत्येक स्टेशन स्वच्छ व टापटीप ठेवावे, असे सक्त आदेश देण्यात आले आहेत. स्वच्छता अभियानाच्या माध्यमातून प्रवाशांमध्ये जागृती करण्यासाठी मोठा खर्च केला जाता आहे. स्टेशनची नवीन व जुनी दोन्ही इमारती, फलाट स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र, हा दर्शनी भाग सोडल्यास इतरत्र अवस्था वाईट आहे. जालन्याकडे जाणाऱ्या दिशेला फलाट संपल्यानंतर अनेक कुटुंब रेल्वेच्या पाण्यावर डल्ला मारत आहेत. येथे रेल्वे डब्यांमध्ये पाणी भरण्यासाठी रुळाच्या दोन्ही बाजुला पाइपलाइन करण्यात आली आली. या पाइपचा व्हॉल्व उघडून काही भटकी कुटुंबे, भिकारी, आसपासच्या वस्त्यांमधील काही नागरिक आंघोळीपासून कपडे धुण्यापर्यंतची सर्व कामे करतात. कपडे धुवून तेथेच वाळत घातले जातात.
यामुळे या भागाला अक्षरशः धोबीघाटाचे स्वरूप आले आहे. येथे सुमारे शंभरपेक्षा जास्त माणसे आंघोळ करून कपडे धुत असतात.फलाट क्रमांक एक व दोन वर रेल्वेची प्रतीक्षा करणाऱ्या प्रवाशांना हे ओंगळवाणे चित्र नेहमी पाहावे लागते.
औरंगाबाद वॉटर युटिलिटी कंपनीने स्टेशनवर पाणी मिटर लावले आहे. रेल्वे विभागाला त्याचे दरमहा सुमारे दीड लाख रुपयांचे बिल भरावे लागते. मात्र, या विकतच्या पाण्यावर डल्ला मारला जात आहे. आंघोळ व कपडे धुतल्यानंतर अनेकवेळा व्हॉल्व बंद केला जात नाही, त्यामुळे पाणी वाहून जाते. त्याचा भुर्दंड रेल्वेला बसतो. त्याबद्दल वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आरपीएफ व स्टेशन मास्तरला अनेक वेळा कळवले. मात्र, त्यांच्या सूचनांकडे दुर्लक्ष केले जात असल्याची माहिती मिळाली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

टॉक टाइमः कला महाविद्यालय स्वायत्त करू

$
0
0

Ashish.Choudhari

@timesgroup.com
कला महाविद्यालयांकडील दुर्लक्षबद्दल काय सांगाल ?

बदलत्या काळानुसार विद्यार्थ्यांना अत्याधुनिक शैक्षणिक सोयीसुविधा उपलब्ध करून देणे, शिक्षकांची भरती हे मुख्य आव्हान आहे. शैक्षणिक वर्तुळात अनेक प्रश्न आहेत, अनेक कामे रखडलेली आहेत. विशेषतः वर्ग-३, वर्ग-४ची रिक्त पदे, शिक्षकांची रिक्तपदे भरण्याला प्राधान्य दिले आहे. लवकरच एमपीएससीच्या माध्यमातून काही पदे भरली जाणार आहेत. समस्या दूर करण्याचा प्रयत्न आहे. कला क्षेत्रात नवीन संधी निर्माण करीत आहोत. काही गोष्टी नियमित वेळेत झाल्या नसल्याने नवीन प्रश्न निर्माण झाले. या प्रश्नांची सोडवणूक करण्यावर भर दिला आहे. राज्य सरकारने दोन दिवसांपूर्वीच कला संचालनालयाला दहा कोटी रूपये निधी मंजूर केला आहे. कला संचालनालयाकडे पाहण्याचा शासनाचा दृष्टीकोनही बदलत आहे.

कला संचालनालयाचे संचालकपद स्वीकारल्यानंतर कामाचे कसे नियोजन केले आहे ?
आमच्यापुढे कॉलेजांच्या स्वायत्ततेचा विचार आहे. बदलत्या काळानुसार कला क्षेत्रातील अभ्यासक्रम बदलणे, नवीन अभ्यासक्रम समाविष्ट करणे महत्त्वाचे आहे. आम्हाला विद्यापीठांवर अवलंबून रहावे लागते. या अवलंबित्वामुळे स्वायत्तेचा पर्याय निवडत आहोत. औरंगाबाद आणि नागपूर येथील शासकीय कला महाविद्यालय स्वायत्त करण्याचा विचार आहे. संलग्नीकरण, अभ्यासक्रम असो की परीक्षांचे वेळापत्रक, प्रश्नपत्रिकेचे स्वरूप याबाबत विद्यापीठावर अवलंबून राहण्याची गरज नसेल. तांत्रिक प्रक्रियेच्या किचकट आणि दीर्घ प्रक्रियेत अडकण्याची गरज नाही. स्वायत्तता मिळाल्यास ही प्रक्रिया कॉलेज स्तरावरच होईल. स्वायत्ततेला विभागाकडून मंजूरी मिळाली असून मंत्रिमंडळाच्या बैठकीत अंतिम निर्णय होईल. पुढील प्रक्रिया लवकरच होण्याची शक्यता आहे. या बदलामुळे कॉलेजच्या शैक्षणिक प्रगतीसाठी बदल उपयुक्त ठरतील.

कला महाविद्यालयांमधी शिक्षकांच्या कमी संख्येचा प्रश्नही चिंताजनक आहे...
कलाकार शिक्षक आणि चांगले शिक्षक यात खूप फरक असतो. अध्ययन कौशल्य आत्मसात असलेले शिक्षक मिळणे कठीण झाले आहे. कारण शिकवणे पूर्णतः वेगळा प्रकार असतो. कला, वाणिज्य, विज्ञान कॉलेजात बीएड झाल्यानंतर शिक्षक होता येते. कला महाविद्यालयात बीएफए, एमएफए झाले तरी शिकवणे शक्य असते. त्यामुळे प्रत्येकजण शिकवण्यात पारंगत असतोच असे नाही. प्रत्येक कॉलेजात व्हीडिओ कॉन्फरसिंगची सुविधा उपलब्ध करणार आहोत. मुंबईला जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्समध्ये शिक्षक शिकवत असताना व्हीडिओ कॉन्फरसिंगद्वारे औरंगाबादच्या विद्यार्थ्यालाही शिकता येईल.

नवीन चित्रकार-शिल्पकारांसाठी आर्ट गॅलरी नसल्याने गैरसोय वाढली आहे...
नवीन कलाकारांना कलाकृती प्रदर्शनासाठी विविध शहरात नवीन आर्ट गॅलरी तयार करण्याचे प्रयत्न आहेत. प्रत्येकाला संधी देण्यासाठी प्रयत्नशील आहोत. जहांगीर आर्ट गॅलरीत प्रदर्शन भरवण्यासाठी तीन-तीन वर्षे वाट पहावी लागते. त्यामुळे आम्ही मुंबईत कॉलेजच्या अप्लाइड आर्टच्या इमारतीत आर्ट गॅलरी तयार केली आहे. शिक्षणमंत्री विनोद तावडे लवकरच त्याचे उदघाटन करतील.

पर्यटननगरीतील शासकीय कला महाविद्यालयाच्या विस्ताराबाबत विचार करीत आहात का ?
औरंगाबाद पर्यटननगरी असून जगभरातील कलाकार, विद्यार्थी व अभ्यासक इथे येत असतात. कला शाखेच्या विद्यार्थ्यांना शहरासाठी काय योगदान देता येईल याचा विचार करीत आहोत. कॉलेजला जागा अपुरी पडत असल्याचा मुद्दा शासन दरबारी मांडला आहे. महसूल विभागाने २५ एकर जागा लवकर उपलब्ध केल्यास अत्याधुनिक इमारत उभी केली जाईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दुःखी जिवांचा हॅप्पी म्युझिक शो

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
'झेप तरूणाईची' आणि 'जाणिवा जपताना' यांच्या संयुक्त ‌िवद्यमाने रविवारी संत एकनाथ रंगमंदिरात 'हॅप्पी म्युझिक शो' हा आगळावेगळा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. एचआयव्हीबाबत औरंगाबादकरांच्या मनात जाणिवा रूजविणारा हा कार्यक्रम सकारात्मक संदेश देऊन गेला.
हसेगाव (जि.लातूर) येथे प्रा. रवी बापटले अनेक वर्षांपासून 'सेवालय' ही संस्था चालवितात. एचआयव्हीग्रस्त बालकांची निवासव्यवस्था आणि सामाजिक बांधिलकी जपत अनेक विधायक उपक्रम 'सेवालया'च्या माध्यमातून सुरू असतात. सरकारी मदतीविना सुरू असलेल्या उपक्रमासाठी समाजातील दानशूर व्यक्ती, संस्थांकडून आर्थिक मदत घेतली जाते. याविषयीची माहिती औरंगाबादकरांना देण्यासाठी हा कार्यक्रम घेण्यात आला. 'सेवालय'ची माहिती देणारी चित्रफित दाखवून कार्यक्रमाला सुरुवात झाली. 'जाणिवा जपतानाचे' सारंग टाकळकर यांनी प्रा. बापटले व नृत्य दिग्दर्शक स्नेहा शिंदे यांची प्रकट मुलाखत घेतली. त्यातून सेवालय आणि म्युझिक शोचे स्वरुप उलगडले. 'सेवालय'सारखी संस्था आपल्या समाजाची गरज आहे, भूषण नाही. मुलांना कुटुंबासारखे प्रेम कोणीच देऊ शकत नाही, तुम्ही एवढच करा..' अशी विनंती प्रा. बापटले यांनी करून प्रेक्षकांच्या अंतःकरणात मायेची साद घातली. पुण्याच्या बालगंधर्व रंगमंदिरात या कार्यक्रमाचा पहिला प्रयोग झाला, औरंगाबादमधील हा प्रयोग सतरावा असल्याचे सांगताच प्रेक्षकांनी टाळ्यांचा कडकडाट केला. 'गणपती नमन', लावणी, गोंधळ, डोंबारी नृत्य, खंडोबाचा जागर, गवळण, पंढरपूर वारी, असे एकाहून एक सरस लोककला प्रकार सादर झाले. या मुलांमधील उत्साह व प्रेरणा पाहून प्रेक्षकांनीही उस्फूर्त दाद दिली. दररोज औषध खाऊन मृत्यूला पुढे ढकलणारी ही मुलं प्रेक्षकांना जन्म मरणाच्या फेऱ्यापलीकडे घेऊन गेली.
'सेवालया'तील लॉ शिकणाऱ्या सोनूने 'आम्हाला फक्त प्रेम हवे. आम्हाला आपले म्हणा,' असं आवाहन करताच सभागृहात शांतता पसरली. लातूरच्या महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या बालाजी सूळ याने सूत्रसंचालन केले. नकला कलाप्रकारात राष्ट्रीय पातळीवर सुवर्णपदक मिळविलेल्या बालाजीने झलक सादर करून जोरदार वाहवा मिळविली.

वेगळा प्रयोग
हासेगाव (जि. लातूर) येथे 'आम्ही सेवक' या संस्थेद्वारे प्रा. रवी बापटले यांनी २००७ मध्ये 'सेवालय' सुरू केले. ६३ मुलांचे आईबाप बनून ते संगोपन करत आहेत. संघर्ष त्यांच्या जीवनाचा अविभाज्य घटक आहे. पण ही चिमुकली लवकरच १८ वर्ष पार करणार आहेत, त्यांचे पुढे काय ? असा प्रश्न आहे. या विचारातून अस्वस्थ झालेल्या बापटले यांच्या चिंतनातून 'हॅप्पी इंडियन व्हिलेज'चा (एचआयव्ही) जन्म झाला. सज्ञान मुलांच्या पुनर्वसनाचा हा देशातील एकमेव प्रकल्प असावा. आर्थिक पायाबांधणीला हीच मुले पुढे सरसावली. चूक कोणाची याचा शोध घेण्यापेक्षा मायेचा पदर आणि बापटले यांच्या आश्वासक खांद्यांचा आधार घेऊन हे बाळगोपाळ वाटचाल करत आहेत. 'हॅप्पी म्युझिक शो' मधून एक नवीन जग साकारले गेले हे मात्र निश्चित.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बेगमपुरा पोलिस ठाण्यासाठी जागेचा शोध

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
भाड्याच्या व अपुऱ्या जागेत असलेल्या पोलिस ठाण्यांना पुरेशी व हक्काची जागा मिळावी, यासाठी पोलिस आयुक्तालयाने जागांचा शोध सुरू केला आहे. येत्या मार्चपर्यंत प्राधान्याने बेगमपुरा पोलिस ठाणे नवीन जागेत स्थलांतरित व्हावे, यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. 'म.टा.'च्या वृत्तमालिकेत या ठाण्याला जागा अपुरी पडत असल्याकडे लक्ष वेधण्यात आले होते.
म.टा.'ने गैरसोयीचे पोलिस ठाणे या वृत्तमालिकेतून पोलिसांच्या समस्यांचा पाढा वाचला होता. यात जुनाट वाहने, किरायाचे इमारत तसेच अपुरी जागा, पार्किंगचा प्रश्न, कर्मचाऱ्यांची अपुरी संख्या, बंद टेलिफोन, आदी समस्यावर प्रकाश टाकण्यात आला. त्यांची दखल घेऊन त्या सोडविण्यासाठी कार्यवाही सुरू केली आहे. बेगमपुरा स्टेशनसाठी नवीन जागेचा शोध घेण्यात येत आहे. हिमायत बाग परिसरात जागा शोधली जात आहे. जवाहरनगर पोलिस स्टेशनच्या नवीन इमारतीबाबत चर्चा आणि जागेचा शोध सुरू झाला आहे. शहराच्या नवीन विकास आराखड्यातही पोलिस ठाण्यांकरिता जागा राखीव ठेवावी, अशी मागणी पालिकेकडे करण्यात आल्याची माहिती मिळाली. व्हॉटस्अॅपवर तक्रारी नोंदवण्याचे आवाहन पोलिसांकडून केले जात असताना हर्सूल व दौलताबाद पोलिस ठाण्याचे टेलिफोन बंद असल्याकडे लक्ष वेधण्यात आले होते. पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी यांची गंभीर दखल घेतली. अत्यंत किरकोळ तांत्रिक बाबीमुळे बंद असलेला हर्सूल पोलिस ठाण्यातील फोन सुरू झाला आहे. सर्व ठाण्याच्या आवारात गुन्ह्यात ठेवलेल्या वाहनांच्या मालकांचा शोध घेण्यात येत आहे. मालक न सापडलेली वाहने, मुद्देमालाची दीड महिन्यात विल्हेवाट लावली जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images