Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

पैठण पोलिस ठाण्यात हाणामारी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पैठण
पोलिस निरीक्षक व एका पोलिस कर्मचाऱ्यांत मारामारीची घटना सोमवारी रात्री पैठण पोलिस ठाण्यात घडली. याप्रकरणी पोलिस निरीक्षकाच्या फिर्यादीवरून पोलिस कर्मचाऱ्यांविरुद्ध सरकारी कामात अडथळा केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पंधरा दिवसांपूर्वी महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी पैठण पोलिस ठाण्यात कार्यरत असलेले पोलिस कर्मचारी सचिन बिडकर यांच्याविरोधात पैठण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणानंतर सचिन बिडकर यांची अधीक्षक कार्यालयात बदली करण्यात आली. विनयभंग प्रकरणी सचिन बिडकर सोमवारी रात्री नऊच्या दरम्यान पैठण पोलिस ठाण्यात आले असता त्याची पैठण पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक चत्रभुज काकडे यांच्या सोबत शाब्दिक चकमक झाली. काही वेळानंतर बाचाबाचीचे रूपांतर हाणामारीत झाले. त्यावेळी ठाण्यात उपस्थित पोलिसांनी मध्यस्थी करून दहा मिनिटे सुरू असलेली हाणामारी थांबवली. याप्रकरणानंतर पोलिस निरीक्षक चत्रभुज काकडे यांच्या फिर्यादीवरून पोलिस कर्मचारी सचिन बिडकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


प्रश्न गंभीर होतना राजसरकार निवांत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
खासगीकरण, कंत्राटीकरण, भूमीहिनांचे प्रश्न आदी गंभीर झाले असताना ते सोडवण्यासाठी शासनस्तरावर कोणतेही ठोस प्रयत्न होत नाहीत. सरकार निवांत आहे, असा आरोप भीमशक्ती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे यांनी केला. या न्याय हक्कांच्या प्रश्नांसाठी सर्वांनी एकजूट करून संघर्षासाठी सज्ज राहावे, असे आवाहन त्यांनी केले.
भीमशक्ती संघटनेतर्फे मंगळवारी संत एकनाथ नाट्यगृहात संघर्ष मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याचे उदघाटन हंडोरे यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रदेश उपाध्यक्ष दिनकर ओंकार होते. साहित्यिक प्रा. डॉ. ऋषीकेश कांबळे, माणिक साळवे, प्रदेश संघटक बाबुराव वाकेकर, संपर्कप्रमुख राहूल सावंत, शब्बू लखपती, आनंद गायकवाड, प्रमोद रत्नपारखी, अनिलकुमार सोनकांबळे, संतोष भिंगारे आदी उपस्थित होते.
'स्थानिक स्वराज संस्था व शासकीय कार्यालयात कंत्राटी पद्धतीचा स्वीकार केला जात आहे. हा आरक्षणावर घाला असल्याने कंत्राटी पद्धत त्वरित रद्द करावी,' अशी मागणी त्यांनी केली. काँग्रेस सरकारने शिष्यवृत्तीत वाढ केली. पण सध्याचे सरकार आहे ती शिष्यवृत्तीही विद्यार्थ्यांना वेळेवर देत नसल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. साहित्यिक प्रा. डॉ. कांबळे यांनी त्याग व समर्पणाला शिस्तीची जोड देत कार्यकर्त्यांनी संघटनेच्या कार्यास गती दिली पाहिजे, असे प्रतिपादन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सातारा, देवळाई वॉर्डाच्या यादीवर फक्त ६ आक्षेप

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
सातारा, देवळाई या दोन वॉर्डांसाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रारूप मतदार यादीवर फक्त सहा आक्षेप प्राप्त झाले आहेत. या आक्षेपांची सुनावणी करून अंतिम मतदारयादी ५ मार्च रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे.
सातारा, देवळाई परिसराचा महापालिकेत समावेश केल्यानंतर दोन वॉर्डांसाठी निवडणूक घेण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्यासाठी प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रारूप मतदारयादीवर २७ फेब्रुवारीपर्यंत आक्षेप मागवण्यात आले होते. पालिकेच्या निवडणूक विभागातून मिळालेल्या माहितीनुसार फक्त सहा आक्षेप प्राप्त झाले आहेत. या आक्षेपांची सुनावणी घेऊन ५ मार्च रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. त्यानंतर केव्हाही निवडणूक कार्यक्रम जाहीर केला जाऊ शकतो.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मराठवाड्यात गारपिटीचा इशारा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
मराठवाड्यातील नांदेड, लातूर बीड व उस्मानाबाद जिल्ह्यांना गारपीट, अवकाळी पावसाने झोडपले असून, येत्या २४ तासांत विभागातील काही जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस, गारपिटीचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.

गेल्या काही दिवसांपासून वातावरणात बदल झाला आहे. नांदेड व लातूर जिल्ह्यांना शनिवारी अवकाळी पाऊस व गारपिटीने झोडपले. रविवारीही औरंगाबादसह इतर जिल्ह्यांना अवकाळी पाऊस झाला होता. हवामान खात्याच्या अंदाजानुसार; येत्या २४ तासांत मराठवाड्याच्या काही भागांमध्ये मेघगर्जनेसह गारा; तसेच वावटळीची शक्यता आहे. गेल्या २४ तासांत मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातील काही भागांमध्ये पाऊस पडला. मराठवाड्याच्या काही भागांत किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत वाढ झाली आहे. २७ फेब्रुवारीपासून औरंगाबाद ००.४, जालना ०.४६, परभणी ६.८६, हिंगोली १०.३६, नांदेड ९.०७, बीड ८.११ लातूर १९.१३, उस्मानाबाद १२.१५ मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे. गेल्या तीन दिवसांपासून झालेली गारपीट आणि अवकाळी पावसामुळे लहान मोठ्या २२ जनावरांचा मृत्यू झाला आहे.

औरंगाबादेत मेघगर्जनेसह अवकाळी सरी
औरंगाबाद शहर आणि परिसरात मंगळवारी (१ मार्च) रात्री साडेनऊच्या सुमारास मेघगर्जनेसह पावसाच्या हलक्या सरींनी हजेरी लावली. शहरात गेल्या तीन दिवसांपासून शहरात ढगाळ वातावरण होत आहे. मंगळवारी रात्री साडेनऊच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली. सिडको, हडको, हर्सूल, चिकलठाणा, गजानन नगर, जयभवानीनगर, गारखेडा परिसर, सातारा परिसर, शाहनूरवाडी, पुंडलिकनगर, मुकुंदवाडी, शिवाजीनगरसह जुन्या शहरातील बहुतांश भागामध्ये हलक्या स्वरुपाचा पाऊस बरसला. या पावसामुळे काही भागांतील वीज पुरवठा विस्कळित झाला. जोरदार वाऱ्यामुळे उस्मानपुरा, ज्योतीनगर, सातारा, उल्कानगरी, शिवाजीनगर, सिडकोसह शहराच्या मध्यवर्ती भागांतील वीज पुरवठा खंडित झाला हाेता. वैजापूर शहर व परिसरातही मंगळवारी रात्री अवकाळी पावसाने विजेच्या कडकडाटासह हजेरी लावली. रात्री आठच्या सुमारास आभाळ भरून आले आणि विजेच्या कडकडाटासह रिमझिम पावसाला सुरुवात झाली. अचानक पावसाच्या सरी कोसळल्याने शहरातील जनजीवन विस्कळित झाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘विद्यार्थ्यांची ध्येय निश्चिती आवश्यक’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनामध्ये खऱ्या अर्थाने स्वावलंबी होण्यासाठी स्वतःच आपली ध्येय निश्चिती करावी, असे प्रतिपादन 'महाराष्ट्र टाइम्स'चे निवासी संपादक धनंजय लांबे यांनी केले.
खुलताबाद तालुक्यातील दरेगाव येथील महाराजा सयाजीराव गायकवाड हायस्कूलमध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांना निरोप देण्यात आला. त्याप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. संजय गायकवाड, सहसचिव प्रा. शांता भोसले, 'महाराष्ट्र टाइम्स'चे सहसंपादक प्रमोद माने यांची प्रमुख उपस्थिती होती.
लांबे म्हणाले, 'शहरी व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या पालकांमध्ये दहावीनंतर आपल्या इच्छा विद्यार्थ्यांवर लादण्याची जणू काही स्पर्धाच लागलेली आहे. प्रत्येक पालकाला वाटते की माझा मुलगा, मुलगी डॉक्टर, इंजिनीअर व्हावा, त्यासाठी हट्टाहास करताना दिसतात. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या अंगी असलेली दुसरी चांगली सुप्त शक्ती दाबली जाते. दुसऱ्यांची इच्छा लादलेले विद्यार्थी आपल्या भावी आयुष्यामध्ये दुबळे बनतात. या कारणामुळेच तरुण पिढी खऱ्या अर्थाने स्वावलंबी होऊ शकत नाही. विद्यार्थ्यांनी आपल्या भावी आयुष्यामध्ये बहुआयामी स्वावलंबी होण्याकरिता आपल्या आवडीच्या क्षेत्राची निवड करणे गरजेचे आहे.'
संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. संजय गायकवाड यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले, 'चांगले गुण घेऊन उत्तीर्ण होण्यापेक्षा कॉप्या न करता गुणवत्तेचे शिक्षण घेऊन चांगले नागरिक बनने अतिशय महत्त्वाचे आहे आणि हेच आपल्या संस्थेचे अंतिम ध्येय आहे.' प्रा. शांता भोसले यांनीही मार्गदर्शन केले. मुख्याध्यापक प्रकाश वेताळ यांनी प्रास्ताविक केले. उपमुख्याध्यापक दिवेकर यांनी शाळेच्या प्रगतीचा अहवाल सादर केला. किरण ताकटे यांनी सूत्रसंचालन केले. यशवंत पाटील यांनी आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आमसभेत निर्णयाचा दुष्काळ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, वैजापूर
वाड्या, वस्त्यांवर भेडसावणार पाणीप्रश्न, टँकर मंजुरी, विहीर अधिग्रहणाचे अपूर्ण प्रस्ताव, दुष्काळी परिस्थिती या विषयांवर नुकत्याच झालेल्या आमसभेत चर्चा झाली. तहसीलदारांसह सर्व विभागांच्या अधिकाऱ्यांवर हलगर्जीपणाचा आरोप करण्यात आला. मात्र, अधिकाऱ्यांनी केवळ औपचारिक उत्तरे देऊन वेळ मारून नेल्याने ही बैठक निष्फळ ठरली.
या आमसभेच्या अध्यक्षस्थानी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर हे होते. जिल्हा परिषद उपाध्यक्ष दिनकर पवार, उपविभागीय अधिकारी लक्ष्मीकांत साताळकर, गटविकास अधिकारी डी. एस. आहिरे, नायब तहसीलदार चैताली दराडे, सभापती शिवाजी आधुडे, उपसभापती सुभाष जाधव, एल. एम. पवार, प्रभाकर बारसे यांची प्रमुख उपस्थिती होती. पाथ्री, पेंडेफळ, आलापूरवाडी, झोलेगाव, भोकरगाव, धोंदलगाव, नालेगाव, खंडाळा आदी गावांसह वाड्या, वस्त्यांना टँकरने अपुरा पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे तेथे लोकसंख्येच्या प्रमाणात अतिरिक्त टँकरचे प्रस्ताव पाठवण्याची सूचना पाणीपुरवठा विभागाचे अभियंता के. पी. कड यांनी बैठकीत केली. साकेगाव, कोरडगाव येथील भारत निर्माण योजनेच्या कामात गैरव्यवहार होऊनही समितीवर कारवाई होत नसल्याबद्दल ग्रामस्थांनी आक्षेप घेतला. यावर पाणीपुरवठा विभागाने कामाचे मूल्यांकन करून फरक आढळल्यास संबंधितांवर कारवाई करण्याचे आदेश आमदारांनी दिले. मनसेचे कल्याण पाटील दांगोडे यांनी कृषी विभागाकडून जलयुक्त शिवारची कामे कासवगतीने सुरू असल्याची व अधिकाऱ्यांच्या गैरहजरीबाबत तक्रार मांडली. जलयुक्त शिवार योजनेत तालुक्यातील सर्वच गावे टप्प्याटप्प्याने घेण्यात येणार असून पहिल्या वर्षीच्या ३१ गावांपैकी २० गावांत कामे सुरू आहेत. तसेच यावर्षी निवड झालेल्या गावातही कामे सुरू होणार असल्याचे तालुका कृषी अधिकारी मुनीर शेख यांनी सांगितले. पोलिसाकंडून शहरात न्यालालयाच्या आदेशानुसार
हेल्मेटसक्ती केली जात आहे. तसेच गाड्या पकडण्याची कारवाई होत असल्याबद्दलही ग्रामस्थांनी आमदारांकड गाऱ्हाणे मांडले. परंतु, हा न्यायालयाचा आदेश असल्याने हेल्मेट वापरावे लागणारच, असे पोलिस निरीक्षक अनिरुद्ध नांदेडकर यांनी ठणकावून सांगितले. वैजापूर शहरातील नौगजी बाबा दर्गा परिसरातील जागा हडप करुन त्यावर प्लॉटिंग केल्याची तक्रारही बैठकीत करण्यात आली. बैठकीला नांमकाचे उपअभियंता प्रशांत वनगुजरे, कृषी अधिकारी हणमंत बोयनर आदी अधिकारी उपस्थित होते.
आमसभेला तहसीलदार वंदना निकुंभ, नगरपालिका, सार्वजनिक बांधकाम, महाविरण व राज्य परिवहन महामंडळाचे जबाबदार अधिकारी हजर नव्हते. त्यामुळे अनेक प्रश्न प्रलंबित राहिले. निकुंभ यांची बदली करण्याचा ठराव यावेळी घेण्यात आला. नांदूर-मधमेश्वर जलदगती कालव्यातून पाण्याचे एक आवर्तन सोडावे, शेतकऱ्यांचे कर्ज व एक वर्षाचे वीज बिल माफ करावे, चारा छावणी सुरू करावी व टँकरचे प्रस्ताव त्वरित मंजूर करावे हे ठराव आमसभेत मंजूर झाल्याचे आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर यांनी यावेळी जाहीर केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘जायकवाडी’तून पाणी सोडले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पैठण
जायकवाडी धरणाच्या डाव्या कालव्यातून मंगळवारी दुपारी तीनच्या सुमारास शंभर क्युसेक्स पाणी सोडण्यास सुरुवात करण्यात आली. मराठवाड्याच्या तीन जिल्ह्यांतील सुमारे ३०० गावांना या पाण्याचा फायदा होणार असून, २० ते २५ दिवस प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग सुरू राहणार आहे.

दुष्काळामुळे गोदावरी नदीकाठच्या गावांचा पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. त्यामुळे जायकवाडी प्रकल्पातून पाणी सोडण्याची मागणी करण्यात आली होती. त्यासाठी या भागातील गावकऱ्यांनी आंदोलन केले होते. शासनाने त्याची दखल घेऊन २४ फेब्रुवारीला जायकवाडी धरणातून १.४१ टीएमसी पाणी सोडण्याचा निर्णय घेतला होता.

मंगळवारी दुपारी तीनच्या सुमारास जायकवाडी धरणाच्या डाव्या कालव्यातून शंभर क्युसेक्स पाणी सोडण्यात आले. काही तासांनंतर त्यात टप्प्याटप्प्यांने ३०० क्युसेक्सपर्यंत वाढ करण्यात आल्याची माहिती जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता संजय भर्गोदेव यांनी दिली. पाच दिवस ३०० क्युसेक्स पाण्याचा विसर्ग करण्यात येणार आहे. त्यानंतर प्रतिदिन शंभर क्युसेक्सप्रमाणे तो ९०० क्युसेक्सपर्यंत वाढविण्यात येणार असल्याचे भर्गोदेव यांनी सांगितेल.

आपेगाव हिरडपुरी, जालना जिल्ह्यातील राजाटाकळी-लोणी व परभणी जिल्ह्यातील ढालेगाव-मुळी या बंधाऱ्यांसांठी हे पाणी सोडण्यात आले अाहे. ते जवळपास २०० किलोमीटर प्रवास करणार असून नदी, कालवा व नाल्यांकाठच्या जवळपास ३०० गावांना या पाण्याचा लाभ होणार आहे. या पाण्यामुळे बंधाऱ्यातील पाणीसाठा अपेक्षेप्रमाणे वाढणार नसला तरी, या भागातील गावांत भूगर्भातील पाणी पातळीत वाढ होणार असल्याचीही माहिती त्यांनी दिली. दरम्यान, जायकवाडी धरणाच्या डाव्या कालव्यातून पाणी सोडण्यापूर्वी आमदार संदिपान भुमरे यांच्या हस्ते जलपूजन करण्यात आले. यावेळी नदीकाठच्या गावातील शेतकऱ्यांनी डाव्या कालव्यावर मोठी गर्दी केली होती.

पाण्याचा अपव्यय, चोरीची शक्यता
जायकवाडी धरणाच्या डाव्या कालव्याची लांबी जवळपास २२५ किलोमीटर असून, हा कालवा जागोजागी फुटला आहे. यातून पाण्याचा अपव्यय होण्याची शक्यता आहे. डाव्या कालव्यातून पाण्याचा विसर्ग सुरू असेपर्यंत कालव्यशेजारील गावामधील वीज पुरवठा बंद करण्यात येणार आहे, मात्र जनरेटरच्या सहाय्याने पाणी चोरीची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वडिलांच्याच टँकरखाली चिमुकलीचा मृत्यू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
सोबत येण्याचा हट्ट धरलेल्या तीन वर्षांच्या हिरकणाला वडिलांनी समजूत घालून घरात सोडले. मात्र, वडील घेऊन जातील या आशेने तिने पुन्हा घराबाहेर धाव घेतली. पण तोपर्यंत वडील पाण्याच्या टँकर ट्रॉली सुरू करीत मागे घेत होते, त्याखाली चिरडून तीन वर्षांच्या चिमुकलीचा अंत झाला. ही अत्यंत करूण घटना मंगळवारी सकाळी मुकुंदवाडी-राजनगर भागात घडली.
योगेश पंडित जाधव (रा. जिजाऊ मॉसाहेब नगर राजनगर, मुकुंदवाडी) हे पाण्याच्या खासगी टँकर ट्रॉलीवर चालक आहेत. ते मंगळवारी सकाळी साडेदहा वाजता घरी आले होते, जेवण करताना टँकर ट्रॉली घेऊन या, असा निरोप आला. त्यामुळे ते घराबाहेर पडले. परंतु, त्यांची तीन वर्षांची मुलगी हिरकणा हिने सोबत येण्याचा हट्ट धरला. जाधव यांनी टँकर ट्रॉलीखाली उतरून लाडक्या लेकीची समजूत घालून घरात नेऊन सोडले, घराबाहेर येऊन टँकर सुरू केला. पण, वडिलांसोबत जाण्याचा हट्ट धरलेल्या हिरणाने पुन्हा घराबाहेर धाव घेतली. ती बाहेर आली व त्याचवेळी मागे येत असलेल्या टँकर ट्रॉलीच्या चाकाखाली चिरडली जाऊन किंकाळी फोडली. लेकीच्या किंकाळीचा आवाज ऐकताच जाधव यांनी टँकर थांबवला. रक्तबंबाळ हिरकणाला त्वरित घाटी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले, मात्र तोपर्यंत तिची प्राणज्योत मालवली होती. डॉक्टरांनी तपासून तिला मृत घोषित केले. हिरकणाचे आजोबा पंडित जाधव हे खासगी सुरक्षारक्षक आहेत.
चिमुकली हिरकणा अत्यंत लाघवी, बोलकी व खेळखर असल्याने ती सर्वांच्या लाडाची होती. शेजारच्या सर्वांसोबत नेहमी काका, मामा म्हणून गप्पा मारणाऱ्या हिरकणाच्या अपघाती मृत्यूचा अनेकांना धक्का बसला. तिच्या घराजवळील अनेकांना अश्रु आवरले नाहीत. या घटनेमुळे परिसरावर शोककळा पसरली. जाधव दांपत्याची दुसरी मुलगी एक वर्षाची आहे. लाडक्या लेकीच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याबद्दल योगेश जाधव यांच्यावर मुकुंदवाडी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांततर्फे जमादार एल. बी. बहुरे यांनी तक्रार दाखल केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


आजपासून सराफांचा बंद

$
0
0

औरंगाबाद : केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये दागिन्यांवर एक टक्का उत्पादन शुल्क लागू करण्यात आला आहे. नोंदणी अर्ज सरकारने अपलोड केलेला आहे. सरकारने दोन लाखांवरील विक्रीवर एक टक्का टीसीएस लावला आहे. दागिन्यांवरील इम्पोर्ट ड्युटी वाढवून १५ टक्क्यांवरुन २० टक्के करण्यात आली आहे. या उत्पादन शुल्काविरोधात बुधवार ते शुक्रवारपर्यंत (२ ते ४ मार्च) प्रतिष्ठाने बंद ठेऊन केंद्र सरकारच्या विरोधात निषेध नोंदविण्यात येणार आहे, असे औरंगाबाद सराफ असोसिएशनच्या वतीने कळविण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

३०० कोटींच्या पर्यटननगरीचे स्वप्नरंजन

$
0
0



म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
औरंगाबाद शहरापासून पाच ते सात किलोमीटर अंतरावर ३०० कोटी रुपये खर्च करून पर्यटननगरी उभारण्याची पालकमंत्री रामदास कदम यांनी केलेली घोषणा महापालिका निवडणुकीचा स्टंट असल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्रकल्पाबाबत प्रशासकीयस्तरावर वर्षभरात कोणत्याही हालचाली झाल्या नसल्याचे उघड झाले आहे.

औरंगाबाद महापालिकेची निवडणूक एप्रिल महिन्यात झाली. या निवडणुकीत शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाची युती शेवटच्या क्षणी झाली. युतीच्या आणि प्रामुख्याने शिवसेनेच्या उमेदवारांच्या प्रचाराची धुरा पालकमंत्री या नात्याने रामदास कदम यांच्यावर होती. त्यांनी अक्षरशः सगळे वॉर्ड पिंजून काढले आणि रेकॉर्डब्रेक जाहीर सभा घेतल्या. याच काळात त्यांनी 'मटा'ला २० एप्रिल रोजी विशेष मुलाखत दिली. ही मुलाखत २१ एप्रिल २०१५ च्याअंकात प्रसिद्ध झाली. औरंगाबादेत ३०० कोटी रुपये खर्चून पर्यटननगरी उभारणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. 'हा प्रकल्प २०० एकरांवर साकारला जाणार असून, काही महिन्यांतच त्याचे कामही सुरू होईल,' असे त्यांनी सांगितले होते.

'ही पर्यटन नगरी जगभरातील पर्यटकांचे आकर्षण ठरेल. औरंगाबाद पासून पाच ते सात किलोमीटर अंतरावर या प्रकल्पासाठी २०० एकर जागा निश्चित केली आहे, येत्या पंधरा दिवसांत ही जागा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना दाखवली जाईल. मुंबईतले स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक, संयुक्त महाराष्ट्राचे दालन, औरंगाबादेतील हैदराबाद मुक्तिसंग्राम संग्रहालय या तिन्ही वास्तू उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतून साकारल्या आहेत. पर्यटननगरीबाबतही त्यांच्या काही संकल्पना आहेत. त्यांच्या संकल्पनेनुसार त्या जागेचा विकास केला जाणार आहे. २०० एकरांत केवळ प्राणिसंग्रहालय न करता विविध प्रकल्प विकसित केले जातील. या कामासाठी बजेटमध्ये ३०० कोटी रुपये राखून ठेवण्यात आले आहेत, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी त्यासाठी सहकार्य केले आहे, असे कदम यांनी सांगितले होते. निवडणुकीच्या प्रचार सभांमधूनही त्यांनी हेच आश्वासन नागरिकांना दिले होते.

या आश्वासनाची आता वर्षपूर्ती होत आहे. वर्षभराच्या काळात ३०० कोटींच्या पर्यटननगरीसाठी ठोस काही कार्यवाही करण्यात आली नाही. जागा ताब्यात मिळाली नाही, निधीही मिळाला नाही आणि कामही सुरू झाले नाही. वर्षभरात किमान तीन-चार वेळा उद्धव ठाकरे विविध कार्यक्रमांच्या निमित्तांने औरंगाबादेत येऊन गेले. प्रत्येक दौऱ्यात त्यांच्याबरोबर पालकमंत्री रामदास कदम होते. त्यांनी कधीही ठाकरे यांना पर्यटननगरीची नियोजित जागा दाखवली नाही. त्यामुळे त्यांची '३०० कोटींची पर्यटननगरी' ही घोषणा निवडणुकीचा स्टंट होता का, ही पर्यटननगरी कधी अस्तित्वात येणार, असे प्रश्न आता निर्माण होत आहेत.

पर्यटननगरीसाठी महापालिकेने मिटमिटा येथील मागितलेली शंभर एकर जागा देण्यास काही हरकत नाही. या जागेचा अहवाल मागविला आहे. या जमिनीचा प्रस्ताव शासनाकडे पाठवला असून, यासंदर्भात मार्गदर्शन मागवण्यात येणार आहे. जिल्हा प्रशासन जागा देण्यासाठी सकारात्मक आहे.
- विश्वंभर गावंडे, निवासी उपजिल्हाधिकारी, औरंगाबाद.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मालमत्ता सर्वेक्षणाची निविदा आठ दिवसांत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
शहरातील मालमत्तांचे सर्वेक्षण करण्यासाठी महापालिका येत्या आठ दिवसात निविदा काढणार आहे. निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून ती देशपातळीवर प्रसिद्ध केली जाणार आहे. जीओटेक्नॉलॉजी इन्फरमेशन सिस्टीमच्या (जीआयएस) माध्यमातून मालमत्तांचे सर्वेक्षण केले जाणार आहे.
शहरातील अनेक मालमत्ता महापालिकेच्या रेकॉर्डवर नसल्याने मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान सोसावे लागत आहे. आकारणी झालेल्या बहुतांश मालमत्तांच्या कर आकारणीबद्दल संशय आहे. निवासी मालमत्तांचे अनेकांनी व्यावसायिक मालमत्तेमध्ये रुपांतर केले, पण कर निवासी दरानेच मालमत्ता कर आकारला जात असल्याची अनेक उदाहरणे आहेत. या बाबी लक्षात घेऊन पालिकेचे तत्कालीन आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी मालमत्तांच्या सर्वेक्षणाचे काम खासगीकरणातून करण्याचा निर्णय घेतला. त्यांचा हा निर्णय पालिकेच्या प्रशासनाने पुढे नेण्याचे ठरविले असून येत्या आठ दिवसात या कामाची निविदा काढली जाणार आहे. जीआयएस मॅपिंग प्रणालीनुसार सर्वेक्षण केले जाणार असल्याचे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त रमेश पवार यांनी सांगितले. जीआयएस मॅपिंग प्रणाली बरोबरच प्रत्येक घरोघरी जाऊनही सर्वेक्षण केले जाणार आहे. देशपातळीवरील चांगल्या संस्थांनी सहभाग घ्यावा यासाठी निविदेची प्रसिद्धी देशपातळीवर केली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

समांतर जलवाहिनीचे तीन किमीचे काम पूर्ण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
समांतर जलवाहिनीचे काम करणाऱ्या औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटी कंपनीने दोन हजार मिलीमीटर व्यासाचे तीन किलोमीटरचे पाइप टाकण्याचे काम पूर्ण केले आहे. आणखी नवीन पाइप साइटवर येत असून आजून १.८ किलोमीटर पाइप येत्या काही दिवसांत टाकले जाणार आहेत.
ढोरकीन परिसरात कंपनीने पाइप टाकण्याचे काम हाती घेतले आहे. सध्या २० मिमी जाडीचे एक किलोमीटर लांबीचे पाइप साईटवर आहेत. या पाइपमधून शुद्ध पाण्याचा पाणीपुरवठा होणार आहे, तर अशुद्ध पाण्यासाठी ८०० मीटरचे पाइप साइटवर आहेत, असे कंपनीने कळविले आहे. ढोरकीनजवळच्या साइटवर पाइपचे वेल्डिंग, ट्रेन्चिंग, कोटिंग आणि अलाइनमेंटचे काम केले जात आहे. ढोरकीनला अशुद्ध पाण्यासाठी पाइप टाकण्याचे कामही सुरू आहे. यासाठी बारा फूट खोल आणि १४ फूट रुंद चर खोदला जाणार आहे. जलवाहिनीच्या कामावर सध्या शंभराहून अधिक कामगार व कर्मचारी काम करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आंतरराष्ट्रीय कार्गोला ३१ मार्चची ‘डेडलाइन’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
औरंगाबाद विमानतळावरून आंतरराष्ट्रीय कार्गो सेवा सुरू करण्यासाठी ३१ मार्च ही अंतिम मुदत देण्यात आली आहे. जुन्या इमारतीमध्ये कार्गो टर्मिनलचे काम अंतिम टप्प्यात असून मालाच्या सुरक्षित वाहतुकीसाठी आवश्यक यंत्रणा उभारण्यात येत असल्याची माहिती विमानतळ व्यवस्थापक अलोक वार्ष्णेय यांनी दिली.
कार्गो सेवेचा आढावा घेण्यासाठी मंगळवारी विमानतळ प्राधिकरणाच्या कार्यालयात बैठक घेण्यात आली. या बैठकीला प्राधिकरणाचे सहमहाव्यवस्थापक (कार्गो) आश्विनी शर्मा, विमानतळ व्यवस्थापक अलोक वार्ष्णेय, कस्टम विभागाचे सहायक आयुक्त ए. जी. साबळे, शरद येवले, कार्गो सेवा देणारी एजन्सी, उद्योजकांचे प्रतिनिधी, एअर इंडिया आणि जेट एअरवेजचे प्रतिनिधी यांची उपस्थित होती. उद्योजकांच्या प्रतिनिधींनी कार्गो सुविधेबाबत उपस्थित केलेल्या शंकांचे निरसन करण्यात आले. सुविधा सुरू करण्याचे काम ३१ मार्चपूर्वी पूर्ण करण्यात येणार आहे, असे सांगण्यात आले. कस्टमच्या दृष्टीने सुविधा उभारणीसाठी विमानतळ अधिकाऱ्यांनी माळीवाडा येथे भेट देऊन पाहणी करावी, अशी सूचना कस्टम अधिकाऱ्यांनी केली.
कार्गो सेवा लवकर सुरू झाली तर, अत्रा फार्मास्युटिकलचा माल येथून देशाबाहेर पाठवण्यात येणार असल्याचे कंपनीच्या अधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले. कार्गो टर्मिनलमध्ये ३६० चौरस मिटर जागा उपलब्ध आह. त्यापैकी १६० चौरस मिटर जागा शहरात येणाऱ्या मालासाठी व २०० चौरस मिटर जागा जाणाऱ्या मालासाठी निश्चित केली आहे. ट्रक भरण्यासाठी ५० चौरस मिटरची जागा निश्चित करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धुलाई मशीन बंदमुळे जंतुसंसर्गाचा धोका

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (घाटी) लाँड्री युनिटमधील चारपैकी तीन मशीन तीन ते चार दिवसांपासून बंद पडल्या आहेत. त्यामुळे वॉर्डावॉर्डातील असंख्य बेडशिट, ब्लँकेटसह रुग्णांचे कपडे, डॉक्टरांचे गाऊन व इतर कर्मचाऱ्यांचे विविध प्रकारचे कपडे धुतले गेले नाही. परिणामी, सर्वच ३० वॉर्डातील बहुतांश रुग्णांसह डॉक्टर व इतर कर्मचाऱ्यांची गैरसोय होत आहे.
घाटीमध्ये सर्व प्रकारचे कपडे धुण्यासाठी स्वतंत्र लाँड्री युनिट आहे आणि या विभागामध्ये चार मशीन आहेत. कपडे धुण्याबरोबरच कपड्यांचे निर्जंतुकीकरणही केले जाते. या विभागामध्ये घाटी रुग्णालयातील दररोज सुमारे अडीच ते तीन हजार कपडे धुतले जातात. प्रत्येक वॉर्डामध्ये, विभागामध्ये, शस्त्रक्रियागृहामध्ये कपडे पोहोचवले जातात. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तब्बल चार दिवसांपासून लाँड्री युनिटमधील चारपैकी तीन मशीन बंद पडल्या आहेत. यामुळे कपडे धुण्याचे काम ठप्प झाले असून, लाँड्री युनिटमध्ये कपड्यांचा भलामोठा डोंगर साचला आहे. रोजचे अडीच हजार म्हणजेच चार दिवसांपासूनचे तब्बल दहा हजार कपडे न धुतल्याने रुग्णांसह डॉक्टर व इतर कर्मचाऱ्यांची तारांबळ उडाली आहे. रुग्णालयातील कपड्यांची रोजच्या रोज स्वच्छता न झाल्यास जंतुसंसर्गाचा मोठा धोका असतो. मात्र याबाबीकडे सर्रास दुर्लक्ष केल्याचे समोर येत आहे.
मशीन बंद पडल्याबद्दल घाटीकडून संबंधित इंजिनीअर-तंत्रज्ञांना वारंवार कळविण्यात आले. परंतु, इंजिनीअर-तंत्रज्ञांनी घाटीला कुठलाच प्रतिसाद दिलेला नाही. केवळ टोलवाटोलवी केली जात असल्यामुळे मशीन दुरुस्ती लांबणीवर पडल्याचे सूत्रांनी सांगितले.

लाँड्री युनिटमधील दोन मशीनमध्ये बिघाड झाला आहे. याबाबत संबंधितांना कळविण्यात आले असून त्यांची लवकरच दुरुस्ती होईल.
- डॉ. सुहास जेवळीकर, वैद्यकीय अधीक्षक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घनकचरा प्रकल्पाची आयुक्तांकडून पाहणी

$
0
0

औरंगाबाद : महापालिका आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांनी मंगळवारी विविध वॉर्डांमध्ये जाऊन घनकचरा व्यवस्थापनाच्या कामाची पाहणी केली. वॉर्डातला कचरा वॉर्डातच जिरवण्याचा उपक्रम उत्तम असून तो पुढे नेण्यासाठी आवश्यक ते सहकार्य करण्याची ग्वाही त्यांनी दिली.
पालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन कक्षाने बारा वॉर्डांमध्ये शून्य कचरा मोहिम राबवून तेथील कचरा तेथेच जिरवला जातो. त्यामुळे नारेगाव कचरा डेपोत जाणाऱ्या कचऱ्यात ९० टनांची कपात झाली आहे. बकोरिया यांनी आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर सोमवारी विविध विभागांचा आढावा घेतला. त्यानंतर मंगळवारी त्यांनी शू्न्य कचरा मोहिमेतील काही वॉर्डांची पाहणी केली. नगरसेवक शिवाजी दांडगे यांच्या गुलमोहर कॉलनी वॉर्डात ओल्या कचऱ्यापासून खत निर्मिती केली जाते. ही प्रक्रिया त्यांनी समजवून घेतली. नगरसेवक मनोज गांगवे यांच्या विठ्ठलनगर वॉर्डात भेट देऊन घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाची पाहणी केली. हा उपक्रम संपूर्ण शहरात राबवण्यासाठी प्रयत्न करू; नगरसेवक, अधिकारी, कर्मचाऱ्यांनी पुढाकार घ्यावा, असे मत त्यांनी व्यक्त केले. त्यांच्यासोबत घनकचरा व्यवस्थापन कक्षप्रमुख शिवाजी झनझन होते. घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाबाबत आयुक्तांनी बुधवारी बैठक आयोजित केली आहे. या बैठकाली शहर अभियंता सखाराम पानझडे, शिवाजी झनझन, यांत्रिकी विभागाचे अधिकारी व सिव्हिक रिस्पॉन्स टीमच्या सदस्यांना निमंत्रित करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


वन कर्मचाऱ्यांची घरे पाडणार?

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
रेल्वे स्टेशन परिसरातील वन विभागाच्या कर्मचारी वसाहतीतील जुनी घरे पाडण्यात येणार आहेत. पर्यायी घरे नसताना जुनी घरे पाडली जाणार असल्यामुळे कर्मचारी अस्वस्थ झाले आहेत. दोन दिवसांपूर्वी घरांवर नव्याने टाकलेली पत्रे उपवनसंरक्षकांच्या घरासमोरील शेडसाठी वापरण्यात आली आहेत. सात घरे जमीनदोस्त करण्याचा निर्णय प्रस्तावित असताना नवीन खर्च का केला, असा सवाल कर्मचाऱ्यांनी केला आहे.
वन विभागाच्या कर्मचारी वसाहतीत जवळपास चाळीस कर्मचारी राहतात. चतुर्थ श्रेणीतील कर्मचाऱ्यांची जास्त संख्या असून मोडकळीस आलेल्या घरात कर्मचारी राहतात. वसाहतीची नियमित देखभाल झाली नसल्यामुळे घरांची दूरवस्था आहे. सात घरांच्या दुरूस्तीसाठी वन विभागाने काही दिवसांपूर्वी अंदाजपत्रक तयार केले होते. जुन्या घरांच्या भिंतीचे बांधकाम व जुनी कौले काढून पत्रे टाकण्यासाठी साडेतीन लाख रूपये मंजूर करण्यात आले, असे स्थानिक वन कर्मचाऱ्याने सांगितले. मात्र, दोन दिवसांपूर्वी रिकाम्या घरांवरील नवीन पत्रे काढण्यात आली. या पत्र्यांचा उपयोग उपवनसंरक्षकांच्या घरासमोरील शेडसाठी करण्यात आला आहे. वनमजूर, वाहनचालक व शिपाई वर्गातील कर्मचारी येथे राहणार होते. पण, पत्रे काढल्यामुळे घरे उघडी झाली आहेत. शिवाय शेजारील घरांचीही गैरसोय झाली आहे. चार घरे एकाच भिंतीला लागून आहेत. दोन घरांवरील पत्रे काढल्यामुळे पावसाचे पाणी भिंतीत मुरून घर कोसळण्याची भीती कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली. वन विभागाने नवीन घरांचा पर्याय द्यावा, त्यानंतरच घरे जमीनदोस्त करावी अशी मागणी त्यांनी केली आहे.
'या जागेवर वन विभागाच्या नवीन इमारतीचे काम होणार आहे. त्यामुळे काही जुनी घरे पाडली जाणार आहेत. जुन्या घरांच्या दुरूस्तीसाठी पंधरा-वीस हजार रूपये खर्च करण्यात आला. पत्र्यांचा उपयोग चांगल्या कामासाठी केला' असे वनपरिक्षेत्र अधिकारी आर. ए. नागापूरकर यांनी सांगितले. इतर जुन्या घरांची दुरूस्ती करून सर्व कर्मचाऱ्यांना पर्यायी जागा देण्यात येईल असे त्यांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुलाबरोबर वडीलही दहावीच्या परीक्षेला!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
मुलांच्या परीक्षेचे दिवस जवळ येत जातात तसे अवघे घर परीक्षामय होऊन जाते. 'मुलांबरोबर पालकांचीही परीक्षा आहे,' असे विनोदाने काही जण म्हणतातही. औरंगाबादेत मात्र मुलाबरोबर वडीलही दहावीच्या परीक्षेला बसले आहेत. रिक्षा परमीटसाठी दहावी उत्तीर्ण असावे, अशी अट असल्याने वडिलांनी दहावीची परीक्षा देण्याचा निर्णय घेतला.

बाळकृष्ण नगरमधील रहिवाशी विष्णू नामदेव वाघ हे रिक्षाचालक आहेत. वयाच्या ५६व्या वर्षी ते दहावीची परीक्षा देत आहेत. मिलिंद मल्टिपर्पज हायस्कूल केंद्रावर त्यांचा नंबर आला आहे. मंगळवारी सकाळी ते परीक्षा केंद्रावर पोहचले. त्यांना केंद्रात मुख्यध्यापकांनी अडविले. 'तुमचं इथं काय काम आहे,' अशी विचारणा करीत त्यांना बाहेर जाण्याची सूचनाही करण्यात आली. त्यावर त्यांनी, 'मीही परीक्षार्थी आहे. दहावीच्या परीक्षेला आलो आहे,' असे सांगितले. मग हॉलतिकीट पाहून त्यांना केंद्रात सोडण्यात आले.

वाघ यांना १९८४मध्ये शिक्षण अर्धवट सोडावे लागले. आता त्यांना परीक्षा देऊन दहावी उत्तीर्ण व्हायचे आहे. त्याचे कारणही तसेच आहे. रिक्षा परमीट मिळविण्यासाठी दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. ही अट पाहून त्यांनी दहावीची तयारी केली आणि परीक्षेला अर्ज भरला.

मुलाकडूनही मार्गदर्शन
वाघ यांचा मुलगा आकाश हाही दहावीची परीक्षा देत आहे. तो छत्रपती हायस्कूलचा विद्यार्थी आहे. वडील दहावी पास व्हावेव म्हणून आकाशनेही मेहनत घेतली आहे. स्वतः अभ्यास करतानाच त्याने वडिलांना अभ्यासात मार्गदर्शन केले.

माझा थोडाफार अभ्यास झाला आहे. परीक्षा उत्तीर्ण होण्याचे ध्येय आहे. पहिला पेपर चांगला गेला. काय होते पाहू. माझे रिक्षाचे परमीट हरवले आहे. नवे परमीट काढण्यासाठी दहावी उत्तीर्ण असणे बंधनकारक केले आहे. त्यामुळे मी परीक्षा देत आहे.
- विष्णू वाघ, परीक्षार्थी.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मराठीच्या पेपरला ६८ कॉपीबहाद्दर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
माध्यमिक व उच्चमाध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणारी दहावीची परीक्षा मंगळवार (१ मार्च) रोजीपासून सुरू झाली. पहिल्याच मराठीच्या पेपराला विभागात ६८ विद्यार्थ्यांवर कॉपीप्रकरणी कारवाई करण्यात आली. औरंगाबादपासून जवळ असलेल्या गिरनेरा तांडा परीक्षा केंद्रावर तब्बल ३१ आणि बोकुड जळगाव केंद्रावर २२ विद्यार्थी कॉपी करताना आढळले.

दहावी परीक्षेला आजपासून सुरुवात झाली. पहिला पेपर मराठीचा होता. औरंगाबाद विभागात १ लाख ८१ हजार ५७८ विद्यार्थी परीक्षेला बसले आहेत. ५६२ परीक्षा केंद्रावरून ही परीक्षा घेण्यात येत आहे. पहिल्याच दिवशी मराठीच्या पेपरला मोठ्या प्रमाणात कॉपीची प्रकरणे समोर आली. पहिल्याच दिवशी भरारी पथकांना ६८ विद्यार्थी कॉपी करताना आढळले. एकाच पथकाला तब्बल ५३ विद्यार्थी कॉपी करताना आढळले. शहरापासून जवळ असलेल्या गिरनेरा तांडा येथील परीक्षा केंद्रावर भरारी पथकाने तब्बल ३१ कॉपी बहाद्दरांवर कारवाई केली तर, बोकुड जळगाव केंद्रावर २२ विद्यार्थी कॉपी करताना आढळले. कॉपीप्रकरणी जालना जिल्ह्यात सहा तर, परभणीत तीन विद्यार्थ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. बारावी परीक्षेपाठोपाठ दहावी परीक्षेतही कॉपीचे प्रमाण वाढतेच आहे. मंडळाची भरारी पथके, महसूल विभागाची बैठी पथके असतानाही प्रकरणांची वाढ चिंताजनक आहे.

'मिलिंद' केंद्रावरील विद्यार्थी 'होलिक्रॉस'ला
परीक्षेच्या एकदिवस आधी मिलिंद मल्टिपर्पज हायस्कूल केंद्रावरील काही विद्यार्थ्यांचे केंद्र बदलण्यात आले. विद्यार्थी संख्या जास्त असल्याचे केंद्रप्रमुखांनी लक्षात आणून दिले. त्यानंतर या विद्यार्थ्यांची सोय होलिक्रॉस शाळेत करण्यात आली होती. दोन्ही केंद्रांच्या फलकावर त्याबाबत सूचना लिहण्यात आल्या होत्या. परीक्षेच्या एकदिवस आधी हा बदल झाल्याने त्याची माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोचली नव्हती. केंद्रावर परीक्षार्थी पोहोचल्यानंतर त्यांना होलीक्रॉसला केंद्र असल्याचे सांगण्यात आले. ही माहिती विद्यार्थ्यांना सांगण्यासाठी कर्मचारीही तैनात करण्यात आले होते. बदलण्यात आलेले केंद्र जवळ असल्याने विद्यार्थ्यांची फारशी तारांबळ उडाली नाही, परंतु परीक्षा केंद्रावर पोचून हॉल शोधण्यास विद्यार्थ्यांसह पालकांनाही करावी लागली.

कॉपीची प्रकरणे
औरंगाबाद...............५९
जालना....................६
परभणी...................३

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सलग पेपरला विद्यार्थ्यांचा विरोध

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या मार्च-एप्रिल पदवी, पदव्युत्तर परीक्षेत यावर्षी सलग पेपर घेण्यात येणार आहेत. त्याला विद्यार्थ्यांनी विरोध दर्शविला आहे. याप्रश्नी शासकीय विज्ञान संस्थेतील विद्यार्थांनी विद्यापीठात धाव घेऊन सलग पेपर घेऊ नयेत, अशी मागणी केली.

विद्यापीठाच्या पदवी, पदव्युत्तर परीक्षांना ९ मार्चपासून सुरुवात होत आहेत. विद्यापीठाने परीक्षेत यंदा अनेक अभ्यासक्रमांचे पेपर सलग ठेवले आहेत. पेपरमध्ये एक दिवसाचे अंतरही ठेवले नाही. त्यामुळे विद्यार्थी चिंतेत आहेत. अभ्यासक्रमही पूर्ण झाला नसल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. अभ्यासक्रम पूर्ण झाला नसताना परीक्षेचे वेळापत्रक आलिकडे आले आणि पेपरमध्ये अंतरही नाही. मागील सत्रातील विषय बाकी असलेल्या विद्यार्थ्यांना एकाच दिवशी दोन पेपर द्यावे लागणार आहेत. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांनी वेळापत्रक बदलाची मागणी होत आहे. शासकीय विज्ञान संस्थेतील विद्यार्थ्यांनी याबाबत मंगळवारी (१ मार्च) विद्यापीठात धाव घेतली. त्यांनी कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांना निवेदन दिले. एका सत्रात ९० दिवसांत अभ्यासक्रम पूर्ण होणे आवश्यक असते, मात्र त्यापूर्वीच परीक्षा होत असल्याचाही आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे.

विद्यार्थी संघटनांचेही निवेदन
अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, स्टुंडट्स फेडरेशन ऑफ इंडिया या संघटनांनी याबाबत प्रशासनाला निवेदन सादर केले. पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रथम व द्वितीय सत्र परीक्षांचे वेळापत्रक हे विद्यार्थ्यांसाठी त्रासदाय झाल्याचे सांगत वेळापत्रक बदलण्याची मागणी करण्यात आली आहे. हे वेळापत्रक तात्काळ बदलावे, दोन पेपरमध्ये एक दिवसाचे अंतर ठेवण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. एसएफआयच्या निवेदनावर रमेश जोशी, अभिमान भोसले, विद्या जाधव यांच्या स्वाक्षरी आहेत. अभाविपतर्फे निखील आठवले, मंदार देशपांडे, दीपक टोनपे, गोविंद देशपांडे आदींच्या सह्या आहेत.

विभागांना वेगळा न्याय का?
विद्यापीठामधील विभागांची परीक्षा १६ एप्रिलपासून सुरू होत आहे. त्याचवेळी कॉलेजांची परीक्षा मात्र एक महिना आधी सुरू होत आहे. वेळापत्रकात हा दुजाभाव का? असा प्रश्नही विद्यार्थ्यांनी उपस्थित केला आहे. यावर प्रशासन काय निर्णय घेते याकडे विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पितृछत्र हरपल्यानंतरही तिने दिली दहावीची परीक्षा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
दुपारचे एक वाजून गेलेले. दहावीचा पहिला पेपर सुरू होऊन दोन तास उलटलेले. शिक्षण मंडळाच्या सचिवांचा फोन खणाणतो. 'एक विद्यार्थिनी परीक्षेसाठी आली आहे. तिला दोन तास उशीर झाला आहे. वडिलांना अखेरचा निरोप देऊन तिने परीक्षा केंद्र गाठले आहे. काय करायचे,' अशी विचारणा फोनवरून करण्यात आली. उशिरा येण्याचे कारण समजल्यानंतर बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी या विद्यार्थिनीला परीक्षेस बसण्याची परवानगी दिली.

समर्थनगरमधील प्रौढ महिला विद्यालयाच्या विद्यार्थिनी ताई वाहुळ असे विद्यार्थिनीचे नाव. गेल्यावर्षी पतीचे अपघाती निधन झाले. आयुष्याचा साथीदार सोडून गेल्यानंतर ताई दोन मुलांसह रांजणगाव येथे वडील अंकुश वाहुळ यांच्याकडे राहण्यासाठी आली. शिक्षणाची जिद्द आणि खांद्यावर दोन मुलांची जबाबदारी असल्यामुळे तिने समर्थनगरमधील प्रौढ महिला विद्यालयात प्रवेश घेतला. गेल्या काही दिवसांपासून अंकुश वाहुळ आजारी होते. सोमवारी त्यांचे निधन झाले. त्यांच्यावर आज अंत्यसंस्कार करण्यात आले. आजच ताईचा दहावीचा पहिला पेपर होता. पितृछत्र हरपल्याने दहावीच्या परीक्षेवर प्रश्नचिन्ह होते. अंत्यविधी दुपारी बारापर्यंत चालला. ताई यांच्या वडिलांच्या निधनाची माहिती विद्यालयातील वर्गशिक्षिका व्ही. सी. रंधे यांना समजली. त्यांनी ही माहिती मुख्यध्यापिका जे. एस. खिस्ती यांना सांगितली. त्यानंतर विद्यालयातील शिक्षकांनी ताईला आधार दिला. 'परीक्षा देऊ शकतेस का, याचा विचार करावा,' असे त्यांनी सुचविले. त्यानंतर दुःख बाजुला सारून ताईने परीक्षा देण्याचे ठरविले.

रांजणगाव येथून देवगिरी हायस्कूल येथील परीक्षा केंद्रावर येण्यासाठी तासाभराचा वेळ लागला. तोपर्यंत पेपर सुरू होऊन दोन तास उलटले होते. परीक्षेला उशीर होण्यामागील कारण त्यांनी केंद्रप्रमुख जी. एन. खरात यांना सांगितले. त्यांनी विभागीय शिक्षण मंडळाच्या सचिव वंदना वाहुळ यांच्याकडे परवानगी मागितली. त्यानंतर ताईला परीक्षेला बसता आले. पेपर सोडविताना आश्रू अनावर झाले.

वडिलांचे छत्र हारवल्याचे दुःख आहे. शाळेतील शिक्षिकांनी दिलेल्या आधारामुळेच मला हे शक्य झाले.
- ताई वाव्हुळ.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images