Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

रस्ते रात्रीच स्वच्छ करा

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
'राज्याची पर्यटन राजधानी असलेल्या ऐतिहासिक औरंगाबादचे रस्ते चकाचक असले पाहिजेत. त्यासाठी मुख्य रस्ते आणि दुभाजकांभोवती साचणारी माती स्विपिंग मशीनच्या सहाय्याने रात्रीच स्वच्छ करा,' असे आदेश महापालिका आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांनी अधिकाऱ्यांना दिले.
आयुक्तांनी घनकचरा व्यवस्थापन कक्ष व तांत्रिक विभागाची बैठक घेतली. बैठकीला शहर अभियंता सखाराम पानझडे, घनकचरा व्यवस्थापन कक्षाचे प्रमुख शिवाजी झनझन, तांत्रिक कक्षाचे प्रमुख एम. बी. काझी उपस्थित होते. स्वच्छतेच्या दृष्टिने शहरातील चार प्रवेश द्वारावर लक्ष देण्याची सूचना बकोरिया यांनी अधिकाऱ्यांना केल्याची माहिती सूत्रांनी दिली. महावीर चौक ते चिकलठाणा विमानतळ, बीड बायपास रस्ता, सिडको बसस्थानक चौक ते हर्सूल टी पॉइंट, व्हीआयपी रस्ता या चार प्रमुख रस्त्यांच्या स्वच्छतेकडे गांभीर्याने लक्ष देण्याचे बकोरिया यांनी अधिकाऱ्यांना सांगितले. या रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर धूळ असते, दुभाजकांच्या भोवती माती साचलेली असते. त्याचा त्रास नागरिकांना होतो. त्यामुळे या चारही रस्त्यांवर रात्रीच्या वेळी स्विपिंग मशीन चालवा, रात्रीतून रस्ते स्वच्छ करा, दुभाजकांभोवती साचलेली माती गोळा करा व पुन्हा माती साचणार नाही याची दक्षता घ्या, असे आदेश बकोरिया यांनी दिले. या आदेशाची तत्काळ अंमलबजावणी केली जाणार आहे. तांत्रिक विभागाच्या अधिकाऱ्यांशीदेखील त्यांनी संवाद साधला व सूचना केल्या.
वॉर्ड 'क' ला भेट
बकोरिया यांनी वॉर्ड 'क' कार्यालयाला भेट दिली. वॉर्डातील साफसफाई व वसुलीबद्दल त्यांनी तेथील अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. काही नागरिक दूषित पाण्याची समस्या घेऊन या कार्यालयात आले होते. बकोरिया यांनी त्यांच्याशी चर्चा केली. ते नागरिक ज्या भागात रहात होते, त्या भागात जाऊनही त्यांनी पाहणी केल्याची माहिती सूत्रांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘मेक इन इंडिया’त उद्योगांचा हातभार मोठा

$
0
0



म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
केंद्र सरकारने जाहीर केलेल्या मेक इन इंडिया उपक्रमात देशातील उद्योग जगताचा हातभार मोठा असल्याचे प्रतिपादन केनामेटल इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक बी. सी. राव यांनी गुरुवारी येथे केले.
चेंबर ऑफ मराठवाडा इंडस्ट्रिज अँड अॅग्रीकल्चर (सीएमआयए), औरंगाबाद इंडस्ट्रिअल सप्लायर्स असोसिएशन (आयसा) व मराठवाडा अॅटोक्लस्टरच्या वतीने आयोजित टूल टेक एक्स्पो २०१६ चे उद्घाटन गुरुवारी झाले. याप्रसंगी ते बोलत होते. राव व बजाज अॅटोचे उपाध्यक्ष एम. डी. नार्वेकर यांच्या हस्ते उद्घाटन झाले. वाल्टर टूल्स इंडियाचे ब्रजेशकुमार, एन. बजाज, सीएमआयएचे अध्यक्ष आशिष गर्दे, आयसाचे अध्यक्ष सतीश लोणीकर, भरत गंगाखेडकर, विजय जैस्वाल आदींची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी लोणीकर, उमेश दाशरथी, राव, गर्दे, नार्वेकर आदींची भाषणे झाली. तीन दिवसीय प्रदर्शनात कटिंग टूल्समधील नव्याने झालेले बदल, अद्ययावत मशीन प्रक्रिया, न्यू टूल कोटिंग टेक्नॉलॉजी, टूल व्यवस्थापन प्रणाली, पर्यावरण पूरक ड्राय कटिंग आदी विषयांवर या क्षेत्रातील तंज्ञाकडून मार्गदर्शन उपलब्ध होणार आहेत. एक्स्पोमध्ये ३२ स्टॉल असून त्यात विडिया, केनामेटल्स, सँडविक, वॉल्टर, मिटिटिओ साऊथ एशिया, रेनेशॉ, फारो, डेगरमास्टर, पुणे कार्बाइडस आदींचा प्रामुख्याने समावेश आहे. पाच मार्चपर्यंत सकाळी दहा ते सायंकाळी सहा या वेळेत हे प्रदर्शन सर्वांसाठी खुले राहील.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कर्मचारी थंड हवेत; प्रवासी घामाघूम

$
0
0



म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
रेल्वे स्टेशनवर रिझर्व्हेशन करायला गेल्यानंतर कर्मचारी फॅनच्या हवेत मस्त आणि प्रवासी घामाघूम अशी स्थिती असते. 'मटा'ने या त्रासाबद्दल वृत्त प्रकाशित केल्यानंतर रेल्वेने एक्झास्ट फॅन लावला. मात्र, अजूनही प्रवाशांना तिकीट काढण्यासाठी उकाड्यातच उभे राहावे लागते.
रेल्वे आरक्षण कार्यालयाच्या इमारतीमध्ये सहा काऊंटरवरून तिकीट विक्री होते. इमारतीमधील एसी काही दिवसांपूर्वी बिघडला. एसी दुरुस्त करण्याची मागणी रेल्वे कर्मचारी व प्रवाशांनी केली. मात्र, रेल्वे प्रशासनाच्या इलेक्ट्रिकल विभागाने पंधरा रिझर्व्हेशन काऊंटर असलेल्या आरक्षण कार्यालयातच एसी सुविधा देण्यात येते, या नियमावर बोट ठेवत एसी दुरुस्त केला नाही. तसेच एसी नादुरुस्त असल्याची नोटीस आरक्षण कार्यालयाच्या नोटीस बोर्डावर लावली. या इमारतीत हवेसाठी एकही खिडकी नाही. त्यामुळे तिकीट काढण्यासाठी आलेल्या प्रवाशांना उकाड्यातच उभे राहावे लागते. प्रवाशांसह रेल्वे कर्मचाऱ्यांनाही याचा ताण सोसावा लागत होता. कर्मचाऱ्यांसाठी टेबल फॅनची तात्पुरती व्यवस्था आहे. उन्हाळ्यात प्रवाशांचे होत असलेले हाल 'मटा'ने छापले. तेव्हा आरक्षण कार्यालयात कर्मचाऱ्यांसाठी चार ते पाच एक्झास्ट फॅन लावण्यात आले. त्यामुळे कर्मचाऱ्यांचा त्रास कमी झाला. मात्र, प्रवाशी अजूनही घामाघूम होत आहेत. प्रवाशांच्या सुविधेसाठी कूलर लावण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतल्याची माहिती रेल्वेच्या सूत्रांनी दिली आहे. मात्र, उकाडा वाढल्यानंतर हे कूलर बसविण्यात येणार असल्याचे समजते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जलयुक्त शिवारला गती द्या

$
0
0


औरंगाबाद ः 'शासनाकडून निधी प्राप्त होऊनही समितीच्या निष्क्रियतेमुळे जिल्ह्यातील जलयुक्त शिवार योजनेची कामे रखडली आहेत. या कामातील अडथळे दूर करून कामांना गती द्यावी आणि दुष्काळावर मात करावी,' अशी मागणी महाराष्ट्र अभियंता सेनेचे अध्यक्ष प्रवीण जाधव यांनी केली आहे.
जाधव यांनी राज्यपाल सी. विद्यासागर राव यांना सविस्तर पत्र दिले आहेत. त्यात म्हटले आहे, की २०१५ -१६ मध्ये औरंगाबाद जिल्ह्याच्या जलयुक्त शिवार अभियानांतर्गत कामे करण्यासाठी मूळ आराखड्यात २२८ गावे जलशिवार फेरी अंती कृषी, जलसंधारण, जिल्हा परिषद, सिंचन, सामाजिक वनीकरण विभाग, वन विभाग, पंचायत समित्या या यंत्रणांमार्फत निवडण्यात आली. मंजूर आराखड्यानुसार निवडलेल्या २२८ गावांमध्ये जलयुक्त शिवार अभियानची कामे ३१ मार्च २०१६ पूर्वी पूर्ण करणे अत्यंत गरजेचे आहे. शासनाकडून निधी प्राप्त होऊनही या निधीचे वेळेच्या आत वितरण झाले नाही. १०१ गावांमधे सिमेंट नाला बंधाऱ्यांची कामे घेण्यात आली. या गावांमध्ये जलसंधारण स्थानिक स्तर विभागाने २७० सिमेंट नाला बंधाऱ्यांच्या निविदा बोलावून ही कामे सुरू केली होती. त्यातून २२० कामे पूर्ण झाली. उर्वरित कामे निधी उपलब्ध होत नसल्याने स्थगित केली आहेत. वारंवार निधीची मागणी करून मिळत नसल्याने कंत्राटदारांनी उर्वरित कामे बंद केली आहेत. याप्रश्नी विशेष लक्ष घालून राज्यपाल महोदयांनी या योजनेतील अडथळे दूर करून कामांना गती देण्यासाठी संबंधितांना सूचना करावी, असे जाधव यांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बाँबने उडविण्याची ‘एमजीएम’ला धमकी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
ठराविक कंत्राटदाराला काम दिल्यास हॉस्पिटल बाँबने उडवून देण्यात येईल, अशी धमकी महात्मा गांधी मिशनला देण्यात आली. याप्रकरणी गुरुवारी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार; एमजीएम संस्थेचे प्रशासकीय अधिकारी यांच्या नावे बुधवारी एक पत्र प्राप्त झाले. त्यात 'आयएस' या दहशतवादी संघटनेच्या नावाने धमकी देण्यात आली आहे. एका विशिष्ट संस्थेला स्वच्छतेचे कंत्राट दिल्यास आम्ही हॉस्पिटल बाँबने उडवून देऊ, असे या पत्रात म्हटले आहे. हे पत्र वहीच्या कागदावर लिहिलेले आहे.

एमजीएम प्रशासनाने यासंदर्भात काल पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांची भेट घेतली. त्यांनी या प्रकरणाचा तपास करण्याच्या सूचना दहशतवाद विरोधी पथकाला दिल्या होत्या. त्यानंतर आज याप्रकरणी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. या प्रकरणाचा तपास एपीआय गंगावणे करीत आहेत.

दरम्यान, आज बाँबशोधक पथक व श्वान पथकाने एमजीएम परिसराची तपासणी केल्याचे पोलिसांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘समांतर’च्या कर्जाची हमी घ्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
समांतर जलवाहिनी योजनेच काम करणाऱ्या औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटी कंपनीला ५०५ कोटी रुपयांचे कर्ज देण्यास बँक तयार आहे, पण त्यासाठी महापालिकेने कंपनीची हमी घ्यावी, अशी अट आयडीबीआय बँकेने घातली आहे. तत्कालीन आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी कंपनीला बजावलेली नोटीस आणि आतापर्यंत कंपनीला बजावण्यात आलेल्या नोटीस परत घ्याव्यात, अशा जाचक अटींचा समावेश हमीपत्राच्या मसुद्यात करण्यात आला आहे. पालिकेचे नुवे आयुक्त ओमप्रकाश बकोरिया या अटी मान्य करणार का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटी कंपनीने आयडीबीआय बँकेकडे समांतर जलवाहिनी योजनेसाठी ५७५ कोटी रुपयांच्या कर्जाची मागणी केली. बँकेने ५०५ कोटी रुपयांचे कर्ज देण्याची तयारी दर्शवली आहे. त्यासाठी महापालिकेने कंपनीची व पर्यायाने कर्जाची हमी घ्यावी. त्याबाबत संमतीपत्र द्यावे, असे बँकेने पत्राद्वारे कळविल्याचे सूत्रांनी सांगितले.

कंपनीने या पत्राचा संदर्भ घेऊन १ फेब्रुवारी रोजी कंपनीने कर्जासाठी हमी देण्याची विनंती आयुक्तांना केली आहे. यासंदर्भात कंपनीचे व्यवस्थापक सोनल खुराणा यांनी आयुक्तांना पत्र दिले.

पालिकेचे तत्कालीन आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी कंपनीच्या कारभाराचा बारकाईने अभ्यास करून कंपनीला नोटीस बजावली. त्याचबरोबर कोर्टातही शपथपत्र दाखल केले. कंपनीने आतापर्यंत अपेक्षित खर्चापेक्षा फारच कमी खर्च केल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर कंपनीने आयडीबीआय बँकेकडे ५७५ कोटी रुपयांच्या कर्जाची मागणी केली. बँकेने ५०५ कोटी रुपयांचे कर्ज देण्याची तयारी दर्शवली, पण त्यासाठी महापालिकेच्या आयुक्तांनी हमीपत्र द्यावे, असे स्पष्ट केले.

हमीपत्राचा मसुदाही बँकेने कंपनीला दिला. खुराणा यांनी पत्राबरोबर हा मसुदाही पालिका आयुक्तांना सादर केला. हमीपत्राच्या अटींमध्ये, महापालिकेने कंपनीला आतापर्यंत दिलेल्या नोटीस परत घ्याव्यात, केंद्रेकर यांनी कंपनीला दिलेली नोटीस परत घ्यावी, कोर्टात सादर करण्यात आलेले शपथपत्र मागे घ्यावे, समांतर जलवाहिनीच्या करारात काही बदल करायचा असेल तर, त्यासाठी बँकेची संमती घ्यावी, आदी मुद्यांचा समावेश आहे. कंपनीला कर्ज मिळवून देण्यासाठी पालिकेचे नवे आयुक्त ओमप्रकाश बकोरिया बँकेने ठरविलेला मसुदा मान्य करणार का, असा प्रश्न आता निर्माण झाला आहे.

'समांतर'वर सुनावणी सुरू
औरंगाबाद शहराच्या समांतर जलवाहिनी पाणीपुरवठ्याच्या विरोधात करण्यात आलेल्या तीन याचिकांवर गुरुवारी सुनावणी सुरू झाली. पाण्याच्या खासगीकरणाविरुद्ध स्थापन झालेल्या नागरी कृती समितीतर्फे प्रा. विजय दिवाण, सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र दाते पाटील, जलाधिकार कृती समितीचे विजय शिरसाट व सचिन भोजने यांनी औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करून योजनेचे स्वरूप, समांतरचा करार आणि त्याची अंमलबजावणी यांच्या वैधतेविषयी आक्षेप घेतला आहे. गुरुवारी दिवाण यांचे वकील उदय बोपशेट्टी यांनी तब्बल दोन तास युक्तिवाद केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मोंढा, फूल मार्केटचे स्थलांतर रखडले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
औरंगाबाद कृषी उत्पन्न बाजार समितीतर्फे कोल्ड स्टोअरेज बांधण्यात येईल आणि फूल मार्केट मोंढ्यात स्थलांतरित करण्यात येईल, माल आणणाऱ्या शेतकऱ्यांचा विमा उतरविला जाईल, अशा घोषणा पाऊस २९ सप्टेंबर व त्यानंतर १७ नोव्हेंबर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संजय औताडे यांनी केल्या, परंतु या घोषणा हवेतच विरल्या आहेत. कृषी उत्पन्न बाजार समितीने त्या दिशेने कोणतेच ठोस पावले उचलले नाहीत.

बाजार समितीचे सभापती संजय औताडे यांनी मोठ्या जोषात नऊ घोषणांचा पाऊस पाडून सप्टेंबर २०१५मध्ये वार्षिक सर्वसाधारण सभा गाजवली होती. जुलै-ऑगस्ट २०१५मध्ये झालेल्या संचालक मंडळाच्या निवडणुकीनंतरची ती पहिलीच सभा होती. बाजार समितीला २०१४-२०१५मध्ये सुमारे ४ कोटींचा फायदा झाला, असे औताडे यांनी यावेळी सांगितले होते. बाजार समितीत मोसंबी आणि डाळिंब या फळांसाठी वेगळे मार्केट, सिटी चौकासह शहरातील फूल मार्केट समितीत आणणार, समितीच्या अंतर्गत रस्त्यांचे काँक्र‌िटीकरण करणार, दोन कोल्ड स्टोअरेजची उभारणी करणार, मक्यासाठी विशेष मार्केट आणि जमीन उपलब्ध करून देणार, भरड धान्यांसाठी स्टोअरेजची व्यवस्था करणार, पिसादेवी आणि करमाड येथे कमर्शिअल कॉम्प्लेक्स उभारणार, मार्केटची जमीन परस्पर विकल्याची चौकशी करणार, वॉटर फिल्टर लावणार आणि व्यापारी वर्गास सोयी-सुविधा पुरवणार आदी घोषणा त्यावेळी औताडे यांनी केल्या होत्या. पाच महिने उलटून गेल्यानंतर वॉटर फिल्टर लावण्यापलिकडे कोणतीही घोषणा पूर्ण झालेली नाही.

उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीतर्फे शेतकऱ्यांचा विमा काढणार असल्याचे घोषित करण्यात आले होते, मात्र समितीने त्याची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवली नाही. परिणामी विम्यासाठी एकही अर्ज आलेला नाही. आता बाजार समिती ही योजना गुंडाळण्याच्या तयारीत आहे. बाजार समितीच्या कार्यक्षेत्रातील शेतमाल विक्रीसाठी आणणाऱ्या शेतकऱ्यांचा अपघात विमा काढण्यात येणार असल्याची घोषणा सभापती संजय औताडे यांनी २९ सप्टेंबर रोजी केली होती.

शहरातील मोंढा जाधववाडीत स्थलांतरित करण्याचा मुद्दा कायम चर्चिला जात आहे. बाजार समितीच्या बैठकीतही वारंवार तो आला. स्थलांतराचा प्रश्न व्यापारीवर्गाच्या याचिकेमुळे होऊ शकत नसल्याचे वारंवार सांगण्यात येते. हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने याबाबत काहीही बोलण्यास बाजार समितीचे सभापती व अधिकारी नकार देतात.

सर्व घोषणांचा अजूनही पाठपुरावा सुरूच आहे. योजनांची अंमलबजावणी होईल. विकास कामे होतील. फुल मार्केटसाठी ई-टेंडरिंग प्रक्रिया सुरू आहे. ही कामे होतील यात काही शंका नाही.
- संजय औताडे, सभापती, बाजार समिती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

'एस्सेल वर्ल्ड'प्रमाणे पर्यटननगरी ः कदम

$
0
0

औरंगाबाद : शहराजवळ २०० एकर जागेवर उभारण्यात येणारी पर्यटनननगरी ही जगभरातील पर्यटकांचे आकर्षण ठरणार असून, ही नगरी एस्सेल वर्ल्डप्रमाणे तयार करता आली तर ते एक मोठे आकर्षण ठरेल, अशी आणखी एक घोषणा पालकमंत्री रामदास कदम यांनी गुरुवारी केली. 'महाराष्ट्र टाइम्स'मध्ये सुरू असलेल्या 'बोलाचाच भात' या मालिकेमध्ये पालकमंत्र्यांनी पर्यटननगरीची केलेली घोषणेनंतर काहीही हालचाली नसल्याबाबत वृत्त प्रकाशित करण्यात आले होते. यासंदर्भात पालकमंत्री कदम म्हणाले की, पर्यटननगरीचा विसर पडलेला नाही. त्यासाठी मी जागा पाहून आलो आहे. सध्या दुष्काळ असल्यामुळे प्रथम दुष्काळाला प्राधान्य द्यावे लागणार आहे. एप्रिलनंतर या जागेवर सपाटीकरणाचे काम सुरू करण्याचा प्रयत्न आहे. औरंगाबाद शहरापासून पाच ते सात किलोमीटर अंतरावर ३०० कोटी रुपये खर्च करून पर्यटननगरी उभारण्याची घोषणा पालकमंत्री कदम यांनी पालिका निवडणुकीच्या तोंडावर केली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


विधी विद्यापीठाची प्रक्रिया सुरू

$
0
0

म. टा. विशेष प्रतिनिधी, औरंगाबाद
औरंगाबादेत नव्याने उभारण्यात येत असलेल्या राष्ट्रीय विधी विद्यापीठाच्या कुलगुरूंच्या निवडीसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. येत्या जून महिन्यापासून या विद्यापीठाचे वर्ग सुरू होऊ शकतील का, अशी विचारणा मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. संभाजी शिंदे व न्या. पुखराज बोरा यांनी राज्य शासनाकडे गुरुवारी केली आहे. हायकोर्टाच्या सक्रियतेमुळे राष्ट्रीय विधी विद्यापीठ औरंगाबाद येथे लवकरच स्थापन होण्याची शक्यता आहे.

कायद्याचा अभ्यास करणाऱ्या १३ विद्यार्थ्यांतर्फे दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर बुधवारी सुनावणी झाली असता शासनातर्फे सरकारी वकील अमरजीत गिरासे यांनी शपथपत्र दाखल केले. त्यात औरंगाबाद येथे राष्ट्रीय विधी विद्यापीठ स्थापण्यासाठी शासनाकडून सर्वतोपरी सहकार्य, उपाययोजना व आवश्यक त्या बाबींची पूर्तता करून लवकरच सुरू होईल, असे या शपथपत्रात म्हटले आहे. राष्ट्रीय विधी विद्यापीठाची स्थापना औरंगाबादला करण्याचा निर्णय राज्य शासनाला घेतला होता. कोर्टात शपथपत्र दाखल करूनही मुंबई व नागपूरला विधी विद्यापीठ स्थापन करून त्याच्या कामाला गती देण्याचे काम शासनाने केले आहे, पण औरंगाबादला खो देण्यात आला आहे.

कुलगुरुपदाची पात्रता व अनुभव ही यूजीसीने निर्देशित केलेल्या पात्रतेपेक्षा कमी असता कामा नये. कुलगुरुपदासाठी उमेदवार नुसता विद्यानिष्ठ व्यक्ती किंवा कॉलेज, विद्यापीठात विधी प्राध्यापक असणे किंवा उमेदवाराकडे दूरदृष्टी, उत्तम नेतृत्व गुण, शैक्षणिक क्षमता पुरेसे नाही. त्यासाठी व्यक्ती विधी प्राध्यापक पदावरील किमान १० वर्षांचा अनुभव असावा व जास्तीत जास्त संशोधन व शोध निबंध प्रसिद्ध झालेले असावेत. कारण अशाच उच्चशिक्षित व प्रज्ञावंत कुलगुरुच्या नावाने विद्यापीठ ओळखले जाते किंवा नावारुपाला येते, असा युक्तिवाद सतीश तळेकर यांनी केला.

राजीव गांधी नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ लॉ (पंजाब) या राष्ट्रीय विधी विद्यापीठातर्फे विद्यार्थ्यांच्या निवडीची प्रक्रिया कॉमन लॉ अॅडमिशन टेस्ट मेमध्ये आयोजित करण्यात आली आहे. अखिल भारतीय प्रवेश प्रक्रिया होणार आहे. भारतातील १७ राष्ट्रीय विधी विद्यालयांसाठी विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेनुसार निवड करण्यात येणार आहे. १७ राष्ट्रीय विधी विद्यापीठाच्या यादीत महाराष्ट्र नॅशनल लॉ स्कूलचा समावेश आहे, परंतु एनएलयू किंवा नागपूरचा समावेश नाही म्हणून औरंगाबाद येथे राष्ट्रीय विधी विद्यापीठ स्थापनेची प्रक्रियेला चालना द्यावी. औरंगाबादेतील राष्ट्रीय विधी विद्यापीठाला येथील विद्यार्थी संलग्न करण्यात यावेत, याचा आग्रह धरण्यात आला. कुठल्याही परिस्थितीत येत्या शैक्षणिक वर्षाासून राष्ट्रीय विधी विद्यापीठ औरंगाबादला सुरू व्हावे अशी, विनंती कोर्टाकडे करण्यता आली. या याचिकेवर ११ मार्चला सुनावणी होणार आहे.

अत्याधुनिक कॉलेज तयार
औरंगाबाद येथे राष्टीय विधी विद्यापीठासाठी ५० एकर जागा २०११मध्ये संपादित केली असून, रेल्वे स्टेशने रोडवरील शासकीय अध्यापक महाविद्यालयाच्या नूतन वास्तूमध्ये दीड कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च करून सर्व सोयी असलेले कॉलेज तयार केले आले आहे, असे याचिकाकर्त्याचे वकील सतीश तळेकर यांनी कोर्टाला सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

औरंगाबादेत दिवसभरात २५.४ मिमी पाऊस

$
0
0

औरंगाबाद : गेल्या दोन दिवसांपासून शहरात अवकाळी पावसाच्या सरी कोसळत असून, गुरुवारी (३ मार्च) रात्री साडेआठपर्यंत शहरात २५.४ मिलीमीटर पाऊस बरसल्याची नोंद चिकलठाणा वेधशाळेत घेण्यात आली आहे.

बुधवारी दुपारी तीनपासून शहरात ढगाळ वातावरण होते चारच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली. शहर व परिसरात तब्बल पाऊण तास पाऊस पडला. संपूर्ण शहर, परिसरात झालेल्या या पावसामुळे वातावरणातील गारवा वाढला होता. या पावसामुळे काही भागांतील वीज पुरवठा विस्कळित झाला होता. औरंगाबादसह मराठवाड्यातील लातूर, बीड, उस्मनाबाद, नांदेड या जिल्ह्यांना अवकाळी पावसाने झोडपले असून, येत्या २४ तासांत विभागातील काही जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस, गारपिटीचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. २७ फेब्रुवारीपासून मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाच्या सरी बरसत आहेत. येत्या २४ तासांत मराठवाड्याच्या काही भागांमध्ये मेघगर्जनेसह गारा; तसेच वावटळीची शक्यता असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. लातूर जिल्ह्यात काही ठिकाणी पाणी साचल्यामुळे या पावसाचा उपयोग झाला आहे तर, विभागातील इतर जिल्ह्यांमध्ये गारपिटीमुळे नुकसान झाले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मोफत प्रवेशाबाबत शाळांची अनास्था

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
फी नियंत्रण कायदा उपस्थित मुख्याध्यापकांपैकी कोणाला माहित आहे का? असा प्रश्न मुख्याध्यापकांच्या गुरुवारी (३ मार्च) झालेल्या बैठकीत विस्तार अधिकाऱ्यांनी प्रश्न विचारला. एकही मुख्याध्यापकाला त्याचे उत्तर देता आले नाही. फी नियंत्रण कायद्याबाबत शाळांची अनास्था पुन्हा समोर आली. २५ टक्के मोफत प्रवेशाबाबत आयोजित बैठकीला ६४४पैकी केवळ २६२ शाळांच्याच प्रतिनिधींनी हजेरी लावली.

आरटीई कायद्यांतंर्गत वंचित व दुर्बल घटकातील बालकांना २५ टक्के जागांवर मोफत प्रवेश दिला जातो. २०१६-१७ या शैक्षणिक वर्षाची प्रक्रिया ७ मार्चपासून सुरू होत आहे. यंदा शहरासह ग्रामीण भागातील प्रक्रिया ही ऑनलाइन पद्धतीने होणार आहे. त्याबाबत आज देवगिरी कॉलेजच्या रवींद्रनाथ टागोर सभागृहात जिल्ह्यातील मुख्याध्यापकांची बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीत विस्तार अधिकारी संगीता साबळे, रमेश ठाकूर, धनराज कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती.

यंदाची प्रक्रिया कशी असेल, याबाबत, शाळांनी ऑनलाइन नोंदणी, शाळांचा सहभाग, प्रक्रियेतील टप्पे, कागदपत्रांची तपासणी, फीची प्रतीपूर्ती याबाबतची माहिती देण्यात आली. प्रक्रियाबाबत पॉवर पॉइंट प्रेझेंटेशनद्वारेही माहिती देण्यात आली. शाळा भरमसाठ शुल्क आकारतात, नियमाने शाळांना असे शुल्क आकारता येत नाही, असे रमेश ठाकूर यांनी सांगितले. यावेळी उपस्थित मुख्याध्यापकांना प्रश्न केला. 'फी नियंत्रण कायदा करण्यात आला आहे. किती मुख्याध्यापकांनी तो वाचला आहे, मंजुरी कधी मिळाली याची तारीख सांगू शकता का,' असा प्रश्न त्यांनी केला, परंतु मुख्याध्यापक, त्यांचे प्रतिनिधी यांना त्याबाबत उत्तर देता आले नाही. एका मुख्याध्यापकांने कायदा झाल्याचे सांगितले, परंतु केव्हा मंजूर झाला याचे उत्तर नव्हते. शाळांनी मनमानीप्रमाणे प्रवेश शुल्क आकारू नये, असे ठाकूर यांनी सांगितले.

शिक्षणाधिकारीही उशिराने
मुख्याध्यापकांची बैठक दुपारी १ वाजता सुरू झाली. पहिल्या सत्रात शहरातील मुख्याध्यापकांना ऑनलाइन प्रक्रियेची माहिती देण्यात आली. त्यानंतर ग्रामीण भागातील मुख्याध्यापकांसाठीचे सेशन ठेवण्यात आले. आरटीई कक्षाचा पदभार संगीता साबळे यांनी नुकताच स्वीकारलेला आहे. त्यांनी कलम, त्यातील तरतूदी वाचून दाखविल्या. शिक्षणाधिकारी आर. एस. मोगल यांनी बैठक संपताना हजेरी लावली. औपचारिकता पाळण्यासाठी ते आल्याची चर्चा होती.

शाळांची उपस्थिती नगण्य
जिल्ह्यात ६४४ शाळा मोफत प्रवेशाच्या प्रक्रियेत येतात. विविध माध्यमांच्या शाळांना बैठकीसाठी बोलावण्यात आले, परंतु शाळांची यासंदर्भातील अनास्था समोर आली आहे. ६४४पैकी फक्त २६२ शाळांचे मुख्याध्यापक किंवा त्यांच्या प्रतिनिधींनी हजेरी लावल्याची नोंद आहे. ३८२ शाळांचे मुख्याध्यापक किंवा त्यांचे प्रतिनिधीही आले नाहीत.

- मोफत प्रवेश प्रक्रियेतील शाळांची संख्या ः ६४४
- शहरातील शाळांची उपस्थिती ः २०२
- ग्रामीण भागातील शाळांची उपस्थिती ः ६०

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अाडूळसाठी आता सीबीएसहून बस

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
अचानक प्रवासी वाढल्याने औरंगपुरा ते अाडूळ अशी सिटीबस सेवा सुरू करण्याच्या निर्णय मागे घेण्यात आला आहे. अाडूळ येथील २३ पासधारक प्रवाशांसाठी आता मध्यवर्ती बस स्टँड ते अाडूळ अशी बस सेवा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती एसटीच्या सूत्रांनी दिली. औरंगपुरा ते अाडूळ अशी बससेवा अचानक सुरू केल्याची बातमी 'मटा'ने प्रसिद्ध केली होती. त्यानंतर एसटीने हा निर्णय मागे घेतला आहे.

एसटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी औरंगपुरा ते अाडूळ ‌ही बससेवा बीड बायपासमार्गे सुरू करण्याचे तोंडी आदेश दिले होते. सिटीबस सेवेच्या माध्यमातून शहराच्या हद्दीपासून १५ किलोमीटरपर्यंत प्रवासी वाहतूक करण्याचा नियम आहे. हा नियम डावलून औरंगपुरा ते अाडूळ सिटीबस सुरू करण्याच्या हालचाली सुरू होत्या.

'मटा'ने याबाबत गुरुवारी वृत्त प्रसिद्ध केले. त्यामुळे सिटीबस सुरू करण्याचा निर्णय मागे घेतला आहे. त्याऐवजी सीबीएस ते अाडूळ अशी बससेवा सुरू करण्यात येणार आहे. अडूळ येण्या-जाण्यासाठी २३ जणांनी नियमित पास काढला आहे. त्यात विद्यार्थी, शिक्षकांचा समावेश आहे. त्यांच्यासाठी सीबीएस, औरंगपुरा, शहानूरमियॉ दर्गा, बीड बायपासमार्गे अाडूळ ही बससेवा सुरू करण्यात येणार असल्याची माहिती एसटीच्या सूत्रांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘विद्युत अश्व’ कार अव्वल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

क्षणाक्षणाला उत्कंठा वाढविणारी स्पर्धा, प्रतीस्पर्धी संघाचे तगडे आव्हान यावर मात करत आपल्या उत्तम कौशल्याने देवगिरी इंजिनीअरिंगच्या विद्यार्थ्यांनी 'ई-बाहा' स्पर्धेवर आपले नाव कोरले. इंदोर येथे झालेल्या अंतिम फेरीत ९० मिनीटांत १६ फेऱ्या पूर्ण करत कॉलेजच्या 'विद्यूत अश्व'ने पुण्याच्या काशीबाई नवले कॉलेज संघाला मागे टाकत स्पर्धा जिंकली. स्पर्धेचा अनुभव रोमहर्षक असल्याचे मत विद्यार्थ्यांनी व्यक्त केले.

सोसायटी ऑफ ऑटोमोबाइल इंजिनीअर्स संस्थेतर्फे ही स्पर्धा घेण्यात येते. पूर्णपणे बॅटरीवर चालणाऱ्या कारची ही स्पर्धा असते. दोन टप्प्यात ही स्पर्धा झाली. प्राथमिक फेरी चंदीगढ येथील चिंकारा विद्यापीठात घेण्यात आली. यात ३२ संघांनी सहभाग नोंदविला होता. त्यातून देशभरातील २२ संघ अंतिम स्पर्धेसाठी पात्र ठरले. यानंतर फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात अंतिम फेरी इंदोरजवळील पीथमपूर येथे पार पडली. २२ पैकी, ११ त्यानंतर आठ संघच प्रत्यक्ष स्पर्धेत राहिले. त्यानंतर सुरू झालेल्या अंतिम फेरीत देवगिरीच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या विद्युत अश्वने काशीबाई नवले महाविद्यालयाच्या संघाला मागे टाकत पारितोषिकावर नाव कोरले. स्पर्धेत यश मिळताच विद्यार्थ्यांनी जल्लोष केला. यशस्वी संघाला संचालक डॉ. उल्हास शिऊरकर यांच्यासह रोहित कोळेकर, आर.एन. पाटील यांनी मार्गदर्शन केले. यशस्वी विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत केले. संघाचा कप्तान कल्पेश काकुलिते तर उपकप्तान म्हणून शंतनू मुदखेडकर यांनी जबाबादारी पेलली. यासह संघात पुनित शुक्ला, कल्पेश ठाकूर, सुजीत कुमार, मकरंद धरमे, समाधान टेळे, गिता पिसोळे, शंतनू कुलकर्णी, अक्षय पवार, रामेश्र्वर गुळे, सुमीत काकरवाल, विवेक साळुंके, रुकसाना मुल्ला, महेश सरकटे, अमोल काळे, नूर-ऊल इस्लाम, भूषण जाधव, विठ्ठल गवारे यांचा समावेश आहे.

विद्युत अश्वबद्दल
कॉलेजच्या संघाने पहिल्यांदाच या स्पर्धेत भाग घेतला, तेव्हा गाडी तयार करण्यापासून विद्यार्थ्यांना सारे काही नवीन होते. आठ महिन्यांपासून याची तयारी सुरू होती. तीन महिने गाडी तयार करायला लागले. त्यात डिझाइन, सप्शेंशन, अॅक्सिलरेशन, ब्रेक्स. यानंतर रेसबाबत चाचण्या अशी आठ महिने विद्यार्थ्यांनी तयारी केली. यानंतर स्पर्धेत उत्कृष्ट नियोजनाच्या बळावर विद्यार्थ्यांनी यश मिळविले.

खरे तर स्पर्धेचा पहिला अनुभव होता. इतर प्रतीस्पर्धीही टस्सल होते, परंतु आम्ही संघभावना आणि जिकण्याच्या इच्छेनेच मैदानात उतरलो होतोत. त्यामुळे यश सोपे झाले.
- शंतनू मुदखेडकर

स्पर्धेतील प्रत्येक संघ हा तयारीनिशी उतरलेला असतो. प्रत्येकाकडून काही ना काही शिकण्यासारखे होते. आपल्या भागातील विद्यार्थ्यांमध्ये नवीन कन्सेप्ट आहेत, त्याला योग्य दिशा, सुविधा मिळाली तर आपण अवल्ल ठरू शकतो हे आम्ही दाखवून दिले.
- सूरज कदम

मराठवाड्यातील विद्यार्थ्यांमध्ये क्षमता आहे, हे आम्ही दाखवून दिले. प्रत्येक टप्पा कठीण होता, परंतु आम्ही घेतलेली मेहनत, संघातील प्रत्येकाने निभावलेली योग्य भूमिका यामुळे यश मिळविणे सोपे झाले.
- कल्पेश काकुलिते

मागील सात ते आठ महिन्यांपासून आम्ही स्पर्धेची तयारी करत होतो, परंतु स्पर्धेच्या दिवशी संघाच्या कामगिरीवर यश अवलंबून असते. इतर प्रतीस्पर्धी संघांनीही उत्तम तयारी केलेली होती, परंतु आम्ही सुरुवातीपासून आघाडीवर राहिल्याने जिंकलो.
- दिशा भवरे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

इथे मोल ना दामाचे, मोती होतील घामाचे

$
0
0

Tushar.Bodkhe@timesgroup.com
'कमी पावसाचा मागास भाग' ही जाफराबाद (जि. जालना) तालुक्याची जुनी ओळख. कमी पावसामुळे शेतकरी पारंपरिक पीक घेतात. या बिकट परिस्थितीत बारा वर्षे अविश्रांत परिश्रम घेऊन नळविहिरा येथील शेतकरी संजय मोरे यांनी फळबागांद्वारे नंदनवन फुलवले. आंबा, आवळा, डाळिंब, सीताफळ फळबागांनी मोरे यांनी यशाचे मोठे शिखर गाठले. सेंद्रीय फळबाग असल्यामुळे फळांना विशेष मागणी असते. स्थानिक बाजारपेठेत प्रभावी मार्केटिंग करतानाच मोरे यांनी विदेशात आंब्याची निर्यात केली. अर्थात, प्रयोगशील शेती सहजसोपी नव्हती. खडकाळ जमिनीत आंब्याची लागवड तर अशक्यप्राय होती. कठीण खडक सुरूंग लावून फोडला आणि खड्ड्यात गाळाची माती, नैसर्गिक कचरा, सुपर फॉस्फेट टाकून रोपे लावली. २००४मध्ये लागवड केलेली फळबाग दरवर्षी फळांनी पूर्णतः झाकोळून जाते. पूर्णवेळ शेती व्यवसाय करावा याकडे मोरे यांचा कल नव्हता. औरंगाबाद शहरात मोरे यांनी डी.फार्मसी, एम.ए. समाजशास्त्र, एम.ए. मराठी पूर्ण केले. सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमातही त्यांचा सहभाग असतो. टेंभुर्णी (ता. जाफराबाद) येथे तब्बल २२ वर्षे औषधीचे दुकान चालवले, मात्र, स्वतःची पडीक शेती त्यांना स्वस्थ बसू देईना. जवळपास १७ एकर शेत पडीक असल्याचे ते लहानपणापासून पाहत होते. या शेताचा उपयोग गुरे चारण्यासाठी करीत असत. शेतीचा मोठा भाग पडीक असल्याची खंत वाटायची; मात्र, आर्थिक विवंचना व कौटुंबिक जबाबदारीमुळे शेती कसण्यात अडचणी आल्या. २००३मध्ये मोरे यांनी केशर आंब्याची ४० आणि चिकूची ४० रोपे लावली. या रोपातील फक्त ७ रोपे जगली. फळबागेचे नियोजन नसल्यामुळे पहिला प्रयोग अपयशी ठरला. पुढील वर्षी गावोगाव फिरून त्यांनी उघड्यावर उगवलेली आंब्याची रोपे गोळा केली. कोयी गोळा करून रोप उगवले. फळबागेसाठी नवीन विहीर खोदली, पण काही दिवसांतच विहीर खचली. पुन्हा विहीर खोदून ठिबक सिंचन केले. २००५मध्ये २४ लोकांचा गट स्थापन करून गटशेतीद्वारे ३२ एकरवर केशर लागवड केली. मोरे यांची स्वतःची पाच एकर केशर फळबाग आहे. चांगल्या फळांची निवड करून त्याच्या कोयी लागवडीसाठी वापरल्या. साधे पाणी, मिठाचे पाणी व बोर्डो मिश्रणात कोयी बुडवल्या. या कोयींपासून चांगली रोपे उगवली, पण कलम फसल्याने पुन्हा निराशा वाट्याला आली. सुदैवाने, कलमाच्या खालील बाजूस पाच कोंब फुटले आणि या कोंबांची जुळवणी करून एकच रोप घेतले. दोन रोपांमधील जागेत डाळिंबाच्या रोपाची लागवड केली. दुसऱ्या फळबागेत सिताफळाची लागवड केली. या आंतरपिकातून मोरे यांना समाधानकारक उत्पन्न मिळत आहे.

'साधारणपणे ऑक्टोबर महिन्यात आंब्याला ताण देतो. सिताफळालाही पाणी मिळत असल्यामुळे दोन वेळेस बहार घेतो. जुलै महिन्यातही सिताफळाचे उत्पादन निघते. हा दुहेरी फायदा आंतरपीक व फळबाग व्यवस्थापन केल्यामुळे झाला' असे मोरे यांनी सांगितले. जमीन खडकाळ व मुरमाड असली तरी ऐन दुष्काळातही फळबाग हिरवी आहे. पाण्याचे नियोजन व सातत्यपूर्ण व्यवस्थापनातून मोरे यांनी आदर्श शेतीचा पायंडा पाडला आहे. सध्या त्यांच्या शेतात वेगवेगळी साडेबारा हजार फळझाडे आहेत. आंब्याचे सर्वाधिक उत्पादन निघत असून, सेंद्रीय आंबा असल्यामुळे बाजारपेठेत चांगली मागणी असते. व्यापाऱ्याला विक्री करण्यापेक्षा स्वतः मार्केटिंग करण्यावर मोरे यांनी भर दिला. आंब्याची तीन प्रकारात वर्गवारी करून दोन किलो आंब्याचा बॉक्स ३००, २५० आणि २०० रुपये दराने विक्री सुरू केली. आंब्याचा स्वतंत्र ब्रँड तयार करण्यासाठी आकर्षक बॉक्स, स्टिकर आणि लोगो तयार केला. भोकरदन, टेंभुर्णी, राजूर, देऊळगावराजा व जालना शहरात विक्री केंद्र सुरू केले. विशिष्ट वेळी आंब्याची गाडी येणार असल्याची ग्राहकांनाही माहिती झाल्यामुळे आंबा विक्रीला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. प्रत्येक आंबा झाडाला पिकून खाली पडल्यानंतरच विक्री करतात. नैसर्गिकरित्या पिकविलेला आंबा विकण्याचा त्यांचा प्रयत्न यशस्वी ठरला आहे. शेकडो झाडांच्या पिकलेल्या आंब्याची वेचणी करण्यासाठी मजूर आहेत. आंबा पिकल्यानंतर ग्रेडिंग करून विक्री केली जात आहे. शेतीतील वैशिष्ट्यपूर्ण प्रयोगासाठी मोरे यांना 'डॉ. पंजाबराव देशमुख कृषीरत्न पुरस्कार', 'राज्यस्तरीय कृषीभूषण पुरस्कार', 'वसंतराव नाईक कृषी गौरव पुरस्कार' अशा बारा पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. गटशेतीतील एकाही शेतकऱ्याच्या शेतात आंब्याचे झाड शिल्लक नाही. सरकारी अनुदान घेण्यासाठी शेतकरी धडपडत असतात. कष्टपूर्वक शेती व्यवसाय करावा, अशी मानसिकता नसल्यामुळे शेती परवडत नसल्याची ओरड दिसते, असे मोरे स्पष्टपणे सांगतात. शेतीला कारखानदारी समजून पूर्णवेळ दिल्यास शेती परवडणारा व्यवसाय होईल, असा सल्ला त्यांनी तरुण शेतकऱ्यांना दिला.

प्रक्रिया उद्योगाला सुरुवात
मागील काही वर्षांपासून संजय मोरे आवळा विक्री करतात; मात्र काही उद्योजकांनी आवळ्याचे पैसे बुडवले. त्यामुळे निराश झालेल्या मोरे यांनी स्वतःचा प्रक्रिया उद्योग सुरू केला. आवळा कँडी निर्मिती आणि विक्रीतून समाधानकारक उलाढाल सुरू झाली आहे. दहा रूपये प्रतिकिलो दरात विकला जाणारा आवळा आता कँडीद्वारे ३२० रुपये प्रतिकिलो दराने विकला जात आहे. प्रक्रिया उद्योगाला व्यापक करण्याचे मोरे यांचे ध्येय आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एकाच केंद्रावर ३६ कॉपीबहाद्दर!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

यंदा दहावी, बारावी परीक्षेत कॉपीमुक्त अभियान कुचकामी ठरल्याचे समोर आले आहे. बारावीच्या कॉपी प्रकरणांनी दोनशचे आकडा पार केला तर, दहावीतही हीच स्थिती आहे. सोयगाव तालुक्यातील एकाच परीक्षा केंद्रावर गुरुवारी (३ मार्च) हिंदीच्या पेपरला तब्बल ३६ कॉपीबहाद्दरांवर कारवाई करण्यात आली. याच तालुक्यातील दुसऱ्या केंद्रावर १२ विद्यार्थी कॉपी करताना आढळले.

दहावी परीक्षेत गुरुवारी हिंदीचा पेपर झाला. भाषा विषयाच्या पेपरला कॉपीचे प्रमाण कमी असेल, असे मानले जाते, परंतु भरारी पथकाच्या आकडेवारीवरून कॉपीचे प्रमाण यंदा वाढल्याचे स्पष्ट झाले आहे. एकाच केंद्रावर भरारी पथकाला तब्बल ३६ विद्यार्थी कॉपी करताना आढळले. जिल्हा परिषद हायस्कूल वैजापूर येथील केंद्रावर ही कारवाई करण्यात आली. हिंदी विषयात एकूण ५२ जणांवर कॉपी प्रकरणी कारवाई करण्यात आली. त्यात औरंगाबाद जिल्ह्यातील ५१ तर, परभणी जिल्ह्यात एका परीक्षार्थीचा समावेश आहे. याच तालुक्यातील सावळदबारा येथील केंद्रावर दुसऱ्या भरारी पथकाने धडक मारली. तेथेही खुलेआम कॉपी सुरू असल्याचे पथकाला आढळले. तेथे १२ विद्यार्थ्यांवर कारवाई करण्यात आली.

दोन दिवसांत शतक

मातृभाषा असलेल्या मराठीच्या पेपरला ५९ विद्यार्थी कॉपी करताना आढळले तर, हिंदीलाही चित्र वेगळे नव्हते. एकूण ५२ जणांवर कारवाई करण्यात आली. दोन पेपरलाच कॉपी प्रकरणांची संख्या १२० वर पोहोचली आहे. विशेषतः ग्रामीण भागातील परीक्षा केंद्रावर किंवा शहरापासून दूर असलेल्या भागातील केंद्रावर कॉपी प्रकरणांना आळा घालणे शिक्षण मंडळाला शक्य झालेले नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


संतप्त नातेवाईकांनी मृतदेह ठाण्यात नेला

$
0
0

संतप्त नातेवाईकांनी मृतदेह ठाण्यात नेला

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

जखमी अवस्थेत आढळलेल्या वृद्धाचा घाटीत मृत्यू झाल्यानंतर त्यांना मारहाण करणाऱ्यांना अटक करण्याची मागणी करण्यासाठी नातेवाईकांनी मृतदेह थेट पोलिस ठाण्यात नेला. या प्रकारामुळे शुक्रवारी जिन्सी पोलिस ठाण्यात बराचवेळ तणाव निर्माण झाला होता. या प्रकरणी कायदेशीर कारवाई केली जाईल, असे सांगत पोलिसांनी नातेवाईकांची समजूत काढल्यानंतर नातेवाईकांनी मृतदेह पोलिस ठाण्यातून हलविला. दरम्यान या प्रकरणी कांताबाई नावाच्या एका महिलेस अटक करण्यात आली असून तिच्यासह अन्य दोन जणांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शेख दराज शेख उस्मान (वय ६८, रा. बायजीपुरा) असे मृताचे नाव आहे.

शेख दराज हे अनेक वर्षांपासून ते जडी-बुटी देण्याचे काम करीत होते. २७ फेब्रुवारीला शेख दराज हे जडी-बुटी देण्यासाठी घराबाहेर पडले. मात्र, दोन दिवस ते घरी परतलेच नाही. २९ फेब्रुवारीच्या रात्री त्यांच्या ओळखीच्या मुश्‍ताक अहेमद यांनी शेख दराज यांच्या घरी येऊन त्यांनी दराज यांचा मुलगा शेख सादिक याला संजयनगरातील एका घरात तुमचे वडील बेशुद्धावस्तेत पडलेले आहेत, असे सांगितले. हे कळताच नातेवाईकांनी तातडीने घटनास्थळ गाठले. त्यांनी तशाच अवस्थेत वडिलांना तक्रार देण्यासाठी जिन्सी पोलिस ठाण्यात नेले. मात्र, प्रकृती नाजूक असल्याने पोलिसांनी वडिलांना प्रथम घाटी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेण्याचा सल्ला दिला.

दरम्यान, उपचारादरम्यान शेख दराज यांचा शुक्रवारी पहाटे सहा वाजेच्या सुमारास घाटीत मृत्यू झाला. याप्रकरणी शेख सादिक यांच्या तक्रारीनुसार कांताबाई कुमार (रा. संजयनगर) यांच्यासह अन्य दोन जणांविरोधात जिन्सी पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. कांताबाईला अटक करण्यात आल्याची माहिती पोलिस निरीक्षक शिवाजी कांबळे यांनी दिली.

मृतदेह आणला ठाण्यात

शेख सादिक व त्यांच्या नातेवाईकांनी शेख दराज यांचा मृतदेह जिन्सी पोलिस ठाण्यात नेला. सबंधितांवर खुनाचा गुन्हा दाखल करून कडक कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली. या प्रकारामुळे परिस्थिती तणावपूर्ण झाल्याने अतिरिक्त कुमक मागविण्यात आली होती. दरम्यान, कायदेशीर कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी सांगितल्यानंतर नातेवाईकांनी माघार घेतली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नवे काही शोधताना

$
0
0

सिटी स्कॅन - सांस्कृतिक

-----------------------------

नवे काही शोधताना

-------------------

सादरीकरण आणि गुणवत्तेचा अपूर्व मेळ साधणारी कामगार कल्याण मंडळाच्या नाट्य स्पर्धेची अंतिम फेरी शहरात पार पडली. रंगभूमीवरील तांत्रिक बदलांची चुणूक दाखवणारी स्पर्धा स्थानिक रंगकर्मींसाठी चांगला अनुभव ठरली. स्पर्धेची पारंपरिक चौकट तोडून नवे वर्तुळ निर्माण करणारे नाट्य प्रयोग रसिकांना विशेष भावले.

---------------

tushar.bodkhe@timesgroup.com

महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या राज्यस्तरीय नाट्य स्पर्धेची पहिली फेरी पाहणे रसिकांसाठी कदाचित खूप कंटाळवाणे ठरत असेल. कारण, दोन-चार नाटकांचा अपवाद वगळल्यास इतर नाटकांची जातकुळी शब्दशः 'हौशी' असते. कामगार अभिनेत्यांना रंगमंच देण्यासाठी नाट्य स्पर्धा सुरू झाली. कामगार कल्याण नाट्य स्पर्धेचे यंदाचे ६३ वे वर्ष होते. औरंगाबाद केंद्रावर प्राथमिक फेरी डिसेंबर महिन्यात झाली. मराठवाड्यातील वेगवेगळ्या कामगार कल्याण केंद्रांनी नाट्य सादरीकरणाची औपचारिकता पूर्ण केली. प्रत्येक नाट्य संघात खरे कामगार किती व इतर कलाकार किती हा वेगळा विषय आहे; मात्र पुरेशी तयारी नसल्यामुळे बहुतेक संघाचे नाट्य प्रयोग अत्यंत सुमार होते. संवादफेक, पार्श्वसंगीत, नेपथ्य, पात्रांची वैशिष्ट्ये, रंगभूषा या नाट्य प्रयोगासाठी आवश्यक घटकांची वानवा होती. पाठांतर हा बहुतेक कलाकारांचा 'वीक पॉइंट' होता. प्रयोग पाहताना प्रॉम्टरला ऐकणे रसिकांसाठी शिक्षा होती. ऐनवेळी संवाद विसरणे, दुसऱ्या कलाकाराच्या संवादात घाईने आपला संवाद घुसडवणे असे अनेक रंजक किस्से प्राथमिक फेरीत घडले. प्रत्येक शहराच्या रंगभूमीला ऊर्जितावस्था देण्यात काही घटक महत्त्वपूर्ण असतात. नियमित नाट्य प्रयोग सादरीकरण, एकांकिका महोत्सव, नाट्य अभिवाचन आणि एकपात्री अभिनय अशा विविध माध्यमातून नाट्य लेखक व कलाकारांना प्रेरणा मिळत असते. इतर विभागातील नाटक पाहूनही स्वतःला 'रिफ्रेश' करण्याची संधी चालून येते. महाराष्ट्रातील नवोदित रंगकर्मी नेमका काय विचार करतात व रंगमंचावर विचार कसे व्यक्त करतात याची रसिकांप्रमाणेच नाट्यकर्मीनाही उत्सुकता असते. नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीतील सरस नाट्य प्रयोगांनी या चांगल्या प्रयोगांची अपेक्षा पूर्ण केली. औरंगाबाद, नागपूर, ठाणे, नाशिक, पुणे, अकोला, मुंबई विभागातील १८ संघांनी नाट्य प्रयोग सादर केले. स्पर्धेतील नाट्य प्रयोगांची निश्चित चौकट असते. चौकटीतच नाट्य प्रयोग सादर होत असल्यामुळे नाटकांना साचेबद्धपणा येतो. अंतिम नाट्य स्पर्धेतील नाटकांची गुणवत्ता तुलनेने सरस होती. अनवट नाट्य संहितांना रंगमंचीय आविष्कारात गुंफताना कलाकारांनी रसिकांनाही कुशलतेने खिळवून ठेवले. 'सापत्नेकराचं मूल' हे मकरंद साठे लिखित नाटक याचे उत्तम उदाहरण ठरावे. निपुत्रिक जोडप्याची कथा 'अॅब्सर्ड' नाट्य शैलीत प्रत्ययकारकरित्या सादर झाली. पार्श्वसंगीत, नेपथ्य व रंगमंचाचा खुबीने वापर करीत कलाकारांनी उत्तम प्रयोग सादर केला. या प्रकारचा प्रयोग अभावानेच पहायला मिळतो. 'अलगद', 'मेन विदाऊट शॅडोज', 'सटवाई अश्व', 'प्रश्न कायद्याचा आहे', 'अस्तित्व अॅट अंश डॉट कॉम', 'मिच्च काळ्या रंगामध्ये बुडवून', 'अपूर्णांक', 'कोण म्हणतं टक्का दिला', 'खुल्या आभाळात', 'कोमल गंधार', 'नकोत नुसत्या भिंती', 'मोरू द सोल्यूशन', 'निखारे', 'या वळणावर' अशा नवीन नाटकांनी रसिक सुखावले. कामगार कल्याण मंडळाच्या नाट्य स्पर्धेची अंतिम फेरी अनेक वर्षानंतर औरंगाबाद शहरात पार पडली. त्यामुळे स्पर्धेच्या अंतिम फेरीची सर्वांनाच उत्सुकता होती. नाट्य संघांनीही रसिकांची निराशा केली नाही. राज्य नाट्य स्पर्धा, कामगार कल्याण नाट्य स्पर्धा अशा स्पर्धेत सरकारी औपचारिकता दिसणे स्वाभाविक असते. नियोजनाचा अभाव आणि समन्वयाचा दुष्काळ अशी सार्वत्रिक ओरड असते. ही स्पर्धा मात्र अपवाद ठरली. स्पर्धेच्या उद्‍घाटन कार्यक्रमाला सभागृहात शहरातील कामगार कल्याण केंद्राचे कर्मचारी सर्वाधिक उपस्थित होते. त्यामुळे इतर दिवशी नाट्य रसिक येतील की नाही अशी शंका होती. प्रत्येक केंद्राने दररोज किमान दहा प्रेक्षक आणावेत असा सुज्ञ सल्ला व्यासपीठावरील पाहुण्यांनी दिला. सुदैवाने, लोकांची रसिकता अजून शिल्लक आहे. जबरदस्तीने प्रेक्षक आणण्याची नामुष्की ओढावली नाही. स्पर्धेची माहिती सर्वदूर पोहचताच रसिकांची गर्दी वाढली. नाटकाचे व नाट्य संघाचे नाव ऐकून रसिक दूरवरून नाटक पाहण्यासाठी येत होते. या स्पर्धेतील नाटकांनी रसिकांना चांगल्या प्रयोगाचा आनंद दिला. कदाचित, नाट्य स्पर्धेची पुरेशी प्रसिद्धी झाली असती तर रसिकांचा प्रतिसाद वाढला असता. नाट्य स्पर्धेची माहिती कळेपर्यंत चार-पाच प्रयोग होऊन गेले होते. शहरातील चार नाट्यशास्त्र विभागांना स्पर्धेत सहभागी करून घेणे गरजेचे होते. याद्वारे दुसऱ्या जिल्ह्यातील नाट्यकर्मीशी स्थानिक नाट्यकर्मींचा परिचय वाढला असता. रंगभूमीवर वेगवेगळे प्रयोग करण्यासाठी सक्रिय नाट्यकर्मींच्या एकत्रित प्रयत्नातूनच मराठी रंगभूमीचा लौकिक टिकणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुलाखालची रिक्षागिरी बंद

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
'बेशिस्त वाहतुकीला लगाम घालण्यासाठी उड्डाणपुलाखांलून रिक्षांची वाहतूक बंद करण्यात येणार आहे. विनापरवानाचालक रिक्षाधारकांविरोधात उद्यापासून कारवाई सुरू करण्यात येईल,' असा इशारा पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना दिला.
उड्डाणपुलांखालची रिक्षा वाहतूक, त्यामुळे होणारी कोंडी हे प्रश्न 'मटा'ने सातत्याने लावून धरले होते. त्याची दखल घेत पोलिस आयुक्तांनी हे आदेश दिले आहेत. अमितेशकुमार म्हणाले, 'बेशिस्त रिक्षाचालकांना सुधारण्यासाठी वारंवार संधी दिली. आता यापुढे बेशिस्तपणा, कायद्याचे उल्लंघन खपवून घेणार नाही. मीटरप्रमाणेच भाडे घ्यावे, उड्डाणपुलांचा वापर करावा, रेल्वे स्टेशन आणि बसस्थानक येथूनच शेअर रिक्षा पॉइंट टू पॉइंट चालवाव्यात, शहरातील वाहतूक व्यवस्था अधिक सुरक्षित व्हावी, कोंडी होऊ नये यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू आहे. वाहतूक नियमांचे सर्वांनीच पालन करणे आवश्यक आहे. रिक्षाचालक - मालक संघटना तसेच आरटीओसह संबंधितांची एक बैठक घेण्यात आली असून नियमांचे पालन करण्यासंदर्भात संघटनेच्या प्रतिनिधींना सांगितले आहे. रिक्षांना मीटरची सक्ती केली आहे. ओव्हर सीट रिक्षा चालविणाऱ्या विरोधात कडक कारवाई करण्यात येणार आहे. शाळेचे विद्यार्थी वाहतूक करणाऱ्यांना केवळ पाच विद्यार्थी बसविता येतील. रिक्षांसाठी नवीन १५६ स्टँण्ड देण्याबाबात नोटिफिकेशन्स असून या स्टँण्डवर महापालिकेतर्फे लवकरच फलक लावले जातील.'
अतिक्रमण हटविणार
'बेशिस्त रिक्षाचालकांविरोधात १५ मार्चपासून धडक मोहीम सुरू होणार आहे. रात्रीच्या वेळी कारवाई होईल, तर विना परवाना रिक्षा चालकांविरोधात शनिवारपासून कारवाई करू. वाहतुकीसंदर्भात महापालिका आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांच्याशी चर्चा झाली आहे. बंद सिग्नल दुरुस्तीचे काम सुरू झाले असून वाहतुकीस अडथळा ठरणारे अतिक्रमण काढण्यासाठी मोहीम सुरू करण्यात येणार आहे,' असे अमितेशकुमार म्हणाले.
तर 'बाबा' जवळ नो रिक्षा झोन
'बाबा पेट्रोलपंप चौकात काही बेशिस्त रिक्षाचालकांमुळे वाहतुकीची मोठी कोंडी होते. या रिक्षाचालकांना सुधारण्यासाठी अनेकदा संधी दिली. आता ही समाजसेवा सुरू राहणार नाही. कायद्याप्रमाणे कडक कारवाई केली जाईल. तरीही सुधारणा झाली नाही, तर हा चौक 'नो रिक्षा झोन' करू,' असे अमितेशकुमार म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अन्यथा सत्तेला सुरूंग लागेल

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
'दुष्काळी दौऱ्याच्या नावाखाली सुरू असलेले पर्यटन मंत्र्यांनी थांबवावे. दुष्काळात होरपळणाऱ्या जनतेला दिलासा देण्यासाठी १५ दिवसांत ठोस कारवाई करावी. अन्यथा ही जनता तुमच्या सत्तेला सुरूंग लावेल. दुष्काळप्रश्नी अधिवेशनात स्थगन प्रस्ताव आणू. सरकारला धारेवर धरू,' असा खणखणीत इशारा हजारो शेतकऱ्यांच्या उपस्थितीत भारतीय शेतकरी कामगार पक्षाचे आमदार जयंत पाटील यांनी शुक्रवारी दिला.
दुष्काळ प्रश्नी मराठवाडा, विदर्भातून आलेल्या हजारो शेतकऱ्यांचा धडक मोर्चा त्यांनी विभागीय आयुक्तालयावर नेला. माजी राज्यमंत्री मीनाक्षीताई पाटील, आमदार सुभाष पाटील, माजी आमदार संपत पवार, लक्ष्मण गोळेगावकर यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हा परिषदेच्या मैदानावरून दुपारी दोन वाजता मोर्चास सुरुवात झाली. दुष्काळाच्या कायमस्वरुपी निर्मूलनसाठी समन्यायी पाणी वाटप करा, दुष्काळग्रस्तांना तातडीने दिलासा द्या, कोरड पडली घशाला, मेक इन इंडिया कशाला? गुरांना चारा द्या अशी घोषणाबाजी करत कार्यकर्त्यांनी परिसर दणाणून सोडला. औरंगपुरा, गुलमंडी, सिटी चौक, शहागंज मार्गे निघालेला मोर्चा विभागीय आयुक्तालयावर धडकला. तेथे मोर्चाचे सभेत रुपांतर झाले. यावेळी पाटील म्हणाले, 'राज्यातील दुष्काळी परिस्थिती भयाण आहे.
मराठवाड्यात पिण्याच्या पाण्यासह गुराढोरांच्या चारा-पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. खरीप, रब्बीची पिके वाया गेली. तीन वर्षांपासून जनता होरपळून गेली आहे. अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. त्यांना दिलासा देण्यासाठी शासनस्तरावरून ठोस प्रयत्न होत नाहीत. टंचाई निवारणासाठी आधीच निधी कमी आला. त्यापैकी ४ कोटी पडून आहेत. रोहयोतून झालेल्या विहिरीच्या कामाचे पैसे तीन वर्षांपासून दिले नाहीत. दुष्काळी दौऱ्याच्या नावाखाली मंत्र्याचे केवळ पर्यटन सुरू आहे. हे थांबले नाही, तर जनता या सत्तेला सुरूंग लावेल. सभागृहात तसेच रस्त्यावर उतरून दुष्काळग्रस्तांना न्याय देण्यासाठी लढा सुरू ठेऊ,' असा खणखणीत इशारा पाटील यांनी सरकारला दिला. प्रा. एस. व्ही. जाधव, उमाकांत राठोड, सुधाकर सोनवणे, अॅड. राजेंद्र कोरडे, जयाजी सूर्यवंशी यांच्यासह हजारो शेतकरी मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्कॅनिया बस सुरू; ११ प्रवाशांसह पुण्यास रवाना

$
0
0


स्कॅनिया बस सुरू; ११ प्रवाशांसह पुण्यास रवाना
औरंगाबाद : गेल्या अनेक दिवसांपासून विविध कारणांमुळे थांबलेल्या स्कॅनियाचे ग्रहण शुक्रवारी सुटले. मध्यवर्ती बसस्थानकाहून ११ प्रवासी घेऊन या गाडीची पहिली फेरी सकाळी साडेअकराच्या सुमारास पुण्यास रवाना झाली.
राज्यात वातानुकूलित बसचा दर्जा वाढवा यासाठी स्कॅनिया बस एसटी महामंडळाने घेतल्या. मात्र, या बसचे वजन मोटार वाहन नियमापेक्षा अधिक असल्यामुळे आरटीओ विभागात नोंद झाली नव्हती. अखेर वजनाची समस्या सुटल्यानंतर स्कॅनियाची सेवा सुरू करण्यात आली. पुणे आगाराला पहिल्या टप्प्यात या बस दिल्या आहेत. सकाळी ७ वाजेच्या सुमारास शिवाजीनगर येथून ही बस औरंगाबादसाठी निघाली. या बसमध्ये पंधरा प्रवासी औरंगाबादला आले. औरंगाबादहून सकाळी ११.३०ला ही बस निघाली. पुण्याला जाण्यासाठी मध्यवर्ती बस स्थानकातून ७ आणि पंढरपूर-वाळूज येथून ४ असे एकूण ११ प्रवासी पुण्याला गेले, अशी माहिती आगार व्यवस्थापक सी. के. सोळसे यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images