Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

पालिका कर्मचाऱ्यांच्या आशिर्वादाने अतिक्रमण

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
मुकुंदवाडी परिसरातील महापालिका शाळेच्या मागील खुल्या भूखंडावर अतिक्रमण झाले आहे. पालिकेच्या गुंठेवारी विभागाने संबंधितांना गुंठेवारी अंतर्गत नियमित करण्याचा दाखला दिला आहे. पालिकेच्या काही अधिकाऱ्यांनी संगमनत करून या जमिनीच्या बाबतीत सरकारची दिशाभूल केली आहे. या प्रकरणी चौकशी करून योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी नगरसेवक कमलाकर जगताप यांनी केली आहे.
मुकुंदवाडी सर्व्हे क्रमांक एकमध्ये महापालिका गुंठेवारी विभागाने पालिकेच्या शाळेमागील खुल्या भूखंडावरील जागेबाबत नियमित करण्याचा दाखला दिलेला आहे. मात्र, हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याचे नमूद केले आहे. अतिक्रमण विभागाच्या वरील संदर्भीय पत्रातील नमूद मुद्दे हे एकाच प्रकरणातील वेगवेगळ्या प्रकारे माहिती देऊन संभ्रम निर्माण करणाऱ्या आहेत. वॉर्ड क्रमांक ८४ मधील सर्व्हे क्रमांक एक हा सातबारा उताऱ्यातील नोंदीवरून गायरान जमिनीचा असल्याचे स्पष्टपणे नमूद केलेल असूनही या जागेचे नियमबाह्य खरेदीखत करण्यात आले. सगळे पुरावे असूनही पालिकेच्या अतिक्रमण विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी संगनमत करून गायरान जमिनीचे गुंठेवारीत नियमितीकरण केले आणि सरकारची दिशाभूल केली. आयुक्तांनी याप्रकरणी लक्ष घालून अतिक्रमित जागा पालिकेच्या ताब्यात घ्यावी, अशी मागणी जगताप यांनी केली आहे. सोबत त्यांनी सातबारा उतारा आणि टोच नकाशा नक्कलही जोडली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


आगडोंबातून १९ प्रवासी बचावले

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
रेल्वे स्टेशनच्या नवीन इमारतीतील स्टोअर रूमला शुक्रवारी पहाटे चार वाजता आग लागली. यातून १९ प्रवासी बालंबाल बचावले, तर सहा लाखांचे साहित्य जळून खाक झाले. रेल्वे कर्मचारी आणि ‌अग्निशमन दलाच्या मदतीने या प्रवाशांना सुखरूप काढण्यात आले. चौकशी समितीच्या सदस्यांनी आग लागण्याची घटना संशयास्पद असल्याचे संकेत दिले आहेत.
स्टेशनच्या नवीन इमारतीत रेल्वे प्रवाशांसाठी ५ वातानुकूलित, ४ विनावातानुकूलित खोल्या, एक एसी आणि एक नॉन एसी रूम आहे. शुक्रवारी पहाटे ४ वाजता रिटायरिंग रूमच्या रांगेत असलेल्या स्टोअर रूम (केअर टेकर रूम) ला आग लागली. यात रूममधील बेडशिट, पिलो कव्हरसह अन्य सामान असल्याने आग वाढत गेली. या रूममध्ये असलेल्या एसीमुळे धूर एसी डॉमेटरी रूम व रिटायरिंग रूममध्ये पसरला. त्यामुळे प्रवाशांना श्वास घेणेही अवघड झाले. ही आग काही क्षणात रूमच्या सिलिंगपर्यंत पोहोचली. प्रवाशांनी रिटाइरिंग रूमच्या खोल्यांचा दरवाजा वाजवून इतर प्रवाशांना बाहेर काढले. रेल्वे कर्मचारी देविदास पाथे यांनी आग लागलेल्या रूमचा दरवाजा बाहेरून बंद केला. त्यायामुळे रेल्वे कर्मचारी संदीपकुमार, दीपककुमार यांनी प्रवाशांकडे धाव घेत त्यांना बाहेर काढले. या आगीतून बाहेर पडताना मंगल अम्मा यांच्या अंगावर जळालेला छताच्या सिलिंगचा काही भाग पडला. यामुळे त्यांच्या उजव्या हातावर आणि पाठीवर जखम झाली. मंगल अम्मा यांना तत्काळ घाटी रुग्णालयात उपचार करण्यात आले. सिलिंग जळत असल्याने, दोन प्रवाशांनी आग लागलेल्या स्टोअर रूम समोरून जाण्यास नकार दिला. यामुळे त्यांना रिटायरिंग रूमच्या मागील बाजूस असलेल्या संकटकालीन खिडकीतून शिडीच्या सहाय्याने उतरविण्यात आले.
आग विझविण्यासाठी रेल्वे सुरक्षा दल, लोहमार्ग पोलिस यांनी प्रयत्न केले. मात्र, आग वाढत गेली. अग्निशामन बंबच्या सहाय्याने अवघ्या पाच ते दहा मिनिटांत आग विझविण्यात आली. मात्र, अर्धातासाच्या अग्नीतांडवामुळे इलेक्ट्रीकल जंक्शन बॉक्स, एसी, बेडसीटचे नुकसान झाले. ही आग विझविण्यासाठी वाणिज्यिक अधिकारी धनंजय सिंह, रेल्वे स्टेशन प्रमुख अशोक निकम, वाहतूक अधिकारी एल. के. जाखडे, आरोग्य व स्वच्छता निरीक्षक आशुतोष गुप्ता, यांच्यासह आरपीएफचे उपनिरीक्षक धमेंद्रकुमार आणि लोहमार्ग पोलिस उपनिरीक्षक शिवाजी कांबळे यांनी परिश्रम घेतले.
तक्रारीकडे दुर्लक्ष भोवले
शुक्रवारी पहाटे पावणे तीनच्या सुमारास एक प्रवाशाने रेल्वे रिटायरिंग रूमची जबाबदारी असलेल्या देविदास पारधे यांना भेटून काही तरी जळत असल्याचा वास येत असल्याची माहिती दिली होती. मात्र, संबंधित कर्मचाऱ्याने मला काही वास येत नाही, असे सांगून टाळाटाळ केली. त्यानंतर एक तासाच्या आतच आगडोंब उसळला.
हस्तांतरापूर्वी आग
रेल्वे रिटायरिंग रूमचा कारभार बुकिंग विभागाकडून वाणिज्यिक विभागाकडे देण्याचे आदेश २ मार्च रोजी दिले होते. त्याप्रमाणे या रूममधील सर्व सामानांच्या यादीच्या माहितीसह कार्यभार वाणिज्यिक विभागाकडे सोपविण्यात येणार होता. त्यापूर्वीच ही आग लागल्याने येथील सर्व रेकॉर्ड जळून खाक झाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोर्टाला बगल, ‘कॅन्सर’ची जलवाहिनी हवेत

$
0
0

Nikhil.Nirkhee
@timesgroup.com
औरंगाबाद ः सहा महिन्यांत स्वतंत्र जलवाहिनीचे काम पूर्ण करा, असे स्पष्ट आदेश मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाने देऊन सव्वा वर्ष लोटले. मात्र, अजूनही शासकीय विभागीय कर्करुग्णालयाच्या जलवाहिनीच्या कामाला मुहूर्त लागलेला नाही. याच कर्करुग्णालयाला केलेल्या अपुऱ्या पाणी पुरवठ्यासाठी पालिकेने तब्बल एक कोटीचे शुल्क आकारले आहे आणि अपुऱ्या पाण्यामुळेच खासगी टँकरद्वारे तब्बल १२ लाख रुपयांचे पाणी घ्यावे लागले आहे. दुर्दैवाने, हे दुष्टचक्र अजूनही थांबलेले नाही.
शासकीय विभागीय कर्करुग्णालयाचे उदघाटन २१ सप्टेंबर २०१२ रोजी झाले. त्याआधीपासूनच कर्करुग्णालयामध्ये महापालिकेचा ८ इंची नळ आहे. मात्र, ८ इंची नळाप्रमाणे कर्करुग्णालयाला कधीच पुरेसे पाणी मिळाले नाही. रुग्णालयाची रोजची गरज एक ते दीड लाख लिटरची असताना, पालिकेच्या नळाद्वारे प्रत्येक तिसऱ्या दिवशी १०-२० हजार लिटरपेक्षा जास्त पाणी कधीही मिळाले नाही. त्यामुळेच पहिल्या दिवसापासून रुग्णालयाला खासगी टँकरवर अवलंबून राहावे लागले आणि पहिल्या दिवसापासून कर्करुग्णालयाला रोजच ५ ते ७ टँकर घ्यावे लागत आहेत. या प्रकाराची दखल घेत मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाने, सहा महिन्यांत ज्युबली पार्कपासून कर्करुग्णालयापर्यंत स्वतंत्र जलवाहिनी तयार करण्याचे आदेश १६ डिसेंबर २०१४ रोजी दिले. त्यासाठी कर्करुग्णालयाने ४५ लाखांचा धनादेश पालिकेला द्यावा, असे आदेशात स्पष्ट केले होते. त्यानुसार रुग्णालयाने ४५ लाखांचा धनादेश पालिकेकडे सुपूर्द केला. त्यालाही जवळजवळ सहा महिने लोटले आहेत. पालिकेनेही जलवाहिनीचे काम करण्याचे शपथपत्र खंडपीठामध्ये सादर केले होते.
दरवर्षी २९ लाखांची पट्टी
कर्करुग्णालयाला ८ इंची नळ असून, त्यासाठी दरवर्षी २९ लाखांचे शुल्क आकारले जाते. मात्र, ८ इंची नळ असूनही कर्करुग्णालयाला त्यातुलनेत पाणी मिळत नाही आणि आजपर्यंत मिळालेही नाही. मात्र, तरीही शुल्कामध्ये कोणतीही कपात करण्यात आलेली नाही. साडेतीन वर्षांचे शुल्क हे एक कोटीच्या पुढे गेले आहे. त्यातील २५ लाखांचे शुल्क हे कर्करुग्णालयाने 'वॉटर युटिलिटी'कडे सुपूर्द केले आहेत. त्याचप्रमाणे आतापर्यंतच्या खासगी टँकरचे शुल्क हे १२ लाखांपर्यंत गेले आहे. एवढा मोठा आर्थिक फटका सहन करुनही जलवाहिनीचा प्रश्न मात्र मार्गी लागलेला नाही.
'जनरल बॉडी'मध्ये मंजूर
पालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये जलवाहिनीच्या कामाला मंजुरी मिळाल्याचे समजते. मात्र, त्यानंतरही जलवाहिनीच्या कामामध्ये कुठलीच प्रगती झालेली नाही.
कर्करुग्णालयामध्ये राज्यभरातील कर्करुग्ण येतात; परंतु त्यांचा कुठलाच विचार करण्यात आलेला नाही. घाटी रुग्णालयाच्या धर्तीवर कर्करुग्णालयाला पाणी मिळावे, एवढीच किमान अपेक्षा कर्करुग्णालयाची आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्हा परिषद सीईओंवर अविश्वास?

$
0
0

Makarand.Kulkarni@timesgroup.com
औरंगाबाद ः जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांच्यावर अविश्वास ठराव दाखल करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. अतिरिक्त सीईओ सुरेश बेदमुथा यांच्याबाबत सभागृहाने मंजूर केलेल्या प्रस्तावावर प्रशासनाकडून होत नसलेली कारवाई; तसेच गेल्या काही महिन्यांपासून पदाधिकारी, सदस्यांच्या प्रस्तावांना लावलेले कडक नियम या पार्श्वभूमीवर सदस्यांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे.

औरंगाबाद जिल्हा परिषदेचे सीईओ म्हणून चौधरी यांनी सव्वा वर्षांपूर्वी पदभार स्वीकारला. अत्यंत शिस्तीचे आणि नियम डावलून कुठलाही निर्णय न घेणारे अधिकारी म्हणून त्यांची ओळख आहे. त्यामुळे सदस्य आणि प्रशासन यांच्यामध्ये एक दुरावा निर्माण झाला होता. थेट हा मुद्दा घेऊन हल्ला करण्याऐवजी सदस्य दुसऱ्या मुद्याच्या शोधात होते. दरम्यान, अतिरिक्त सीईओ सुरेश बेदमुथा यांना सक्तीच्या रजेवर पाठव‌िण्याचा ठराव सर्वसाधारण सभेत मंजूर केला. त्याची अंमलबजावणी होत नसल्याने सदस्य एकत्र आले.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार; शुक्रवारी दुपारी सत्ताधारी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्यासह शिवसेनेच्या काही सदस्यांची बैठक झाली. आयुक्तांच्या निर्णयाची वाट पाहू, तो जर आपल्या निर्णयाविरोधात गेला तर सीईओ अभिजित चौधरी यांच्यावर अविश्वास ठराव आणण्यावर एकमत झाल्याचे सूत्रांनी सांगितले. सहा महिन्यांपूर्वीही झेडपीमध्ये अशाच हालचाली झाल्या होत्या.

पूर्वी दोन ठराव यशस्वी
जिल्हा परिषदेत यापूर्वी अनुपकुमार आणि बाजीराव जाधव यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांविरुद्ध अविश्वास ठराव संमत झाला होता. विजय सिंघल यांच्याविरुद्धही जोरदार मोर्चेबांधणी करण्यात आली होती, पण काही कारणास्तव हा प्रस्ताव रखडला होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रेणू दोन दिवसांपासून उपाशी; गॅस्ट्रोची लागण

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
हेमलकसा येथून सिद्धार्थ उद्यानातील प्राणिसंग्रहालयात आणलेली रेणू या मादी बिबट्याची प्रकृती दोन दिवसांपासून बिघडली आहे. तिला गॅस्ट्रो झाला आहे. उद्यान अधीक्षक डॉ. अशोक नाईकवाडे हे तिच्यावर उपचार करत असून दिल्ली,पुणे येथील तज्ज्ञांशी चर्चा करून औषधी दिली जात आहे. रेणुने गुरुवारपासून काहीच खाल्लेले नाही. त्यामुळे ती काहीशी अशक्त झाली आहे.
हेमलकसा येथून रेणू आणि राजा ही नर मादी बिबट्यांची जोडी काही दिवसांपूर्वी सिद्धार्थ उद्यानात आणली गेली. डॉ. प्रकाश आमटे यांच्या निगराणीखाली ही जोडगोळी होती. औरंगाबादेतील वातावरण, नवीन जागा पाहून दोघांचेही मन रमत नव्हते. रविवार व सोमवारी रेणूच्या मूडमध्ये फरक पडला. म्हणून मंगळवारी प्राणिसंग्रहालयाच्या सुटीदिवशी तिला पिंजऱ्याबाहेर सोडले होते. मोकळ्या वातावरणात ती काही तास खेळली. बुधवारी रात्री तिने काही खाल्ले नाही. म्हणून गुरुवारी तिला अन्न बदलून दिले. खाल्यानंतर काही वेळाने तिने उलटी केली. प्रकृती अस्वस्थामुळे ती चिडचिड करत होती. दिवसभर तिने अन्न घेतले नाही. शुक्रवारी पोटदुखीने त्रस्त असलेल्या रेणुवर उपचार करण्यासाठी नाईकवाडे यांनी दिल्लीच्या नॅशनल झू ऑथॉरिटी, पुण्याच्या झू ऑथॉरिटी, उदगीर येथील तज्ज्ञ तसेच खडकेश्वर येथील पशुवैद्यकीय रुग्णालयातील तज्ज्ञांशी संपर्क साधला. त्यांच्या सूचनेनुसार औषधी दिली. दरम्यान, त्यांनी डॉ. प्रकाश आमटे यांच्याशी संपर्क साधून रेणूच्या प्रकृतीची माहिती दिली. ' रेणूला गॅस्ट्रो झाला असून एक दोन दिवसात उपचारानंतर प्रकृतीत फरक पडेल,'असे नाईकवाडे यांनी सांगितले. दरम्यान, सिद्धार्थ उद्यान व प्राणिसंग्रहालयाचे प्रवेश शुल्क वाढवण्याचा निर्णय पालिकेच्या स्थायी समितीने घेतला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी १ एप्रिलपासून केली जाणार आहे, पण सर्वसामान्य नागरिकांना याची माहिती नाही. प्रवेश शुल्क आतापासूनच वाढले आहेत, असे समजून उद्यानात येणाऱ्यांची संख्या रोडावली आहे.
संख्या घटली
वर्षाला ७ लाख तर महिन्याला ५० ते ६० हजार नागरिक उद्यान व प्राणिसंग्रहालयाला भेट देतात. मात्र, महापालिकेने केलेल्या शुल्क वाढीच्या निर्णयानंतर ही संख्या निम्यावर आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘जीवनदायी’चे निकष शिथील करा

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
दुष्काळाने होरपळलेल्या मराठवाड्यात रुग्णांची संख्या वाढली असून सर्वसामान्य नागरिक आरोग्यसेवेपासून वंचित राहू नयेत यासाठी राजीव गांधी जीवनदायी योजनेचे हॉस्पिटलबद्दलचे निकष शिथील करावेत, असा निर्णय मराठवाडा विकास मंडळाच्या आरोग्य समितीच्या बैठकीत घेण्यात आला. बैठकीतील शिफारशी अंमलबजावणीसाठी मंडळाध्यक्ष विभागीय आयुक्तांकडे पाठवण्यात येणार आहेत.
मराठवाडा विकास मंडळाच्या कार्यालयात शुक्रवारी झालेल्या बैठकीसाठी डॉ. अशोक बेलखोडे, डॉ. व्यंकटेश काब्दे, डॉ. जे. पी. बरिदे, डॉ. शशिकांत अहंकारी, डॉ. मंजू कुलकर्णी, डॉ. खेडगीकर, डॉ. मिलिंद पोतदार, डॉ. जगन्नाथ दीक्षित यांची उपस्थिती होती.'मराठवाड्यात दुष्काळ दिवसेंदिवस तीव्र होत असून पिण्याच्या पाण्यासोबतच आरोग्याचाही प्रश्न निर्माण झाला आहे. दुष्काळात आरोग्याविषयी काय केले पाहिजे, यावर बैठकीत चर्चा करण्यात आली. विभागातील पाणी संपल्यामुळे आजार वाढले आहे. ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरिकांना शहरातील मोठ्या रुग्णालयात येण्यासाठी अनेक अडचणींना समोरे जावे लागते. राजीव गांधी योजनेचा लाभ घेण्यासाठी शहरातील रुग्णालयात जाण्याची अनेकांची ऐपत नाही. त्यामुळे तालुकास्तरावर मोठ्या रुग्णालयात या सुविधा देण्यात याव्या दुष्काळामुळे बाह्यरुग्णांची संख्येमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे,' असे डॉ. अशोक बेलखोडे यांनी सांगितले. शिवाय प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये औषधांचा मुबलक पुरवठा करावा, शाळेला सुट्या लागल्यानंतर आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहारापासून वंचित व्हावे लागेल, यामुळे त्यांना गावात शालेय पोषण आहार सुरू करण्याच्या उपाययोजना कराव्या लागणार आहेत. सध्या पाण्याची मोठी टंचाई असल्यामुळे टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येतो, या टँकरमधील पाणी पिण्यायोग्य आहे की नाही याचीही तपासणी झाली पाहिजे, असेही डॉ. बेलखोडे यांनी सांगितले.
इतर आजारांचा समावेश करावा
ग्रामीण भागातील शासकीय रुग्णालयांची क्षमता वाढवण्याची गरज आहे. जीवनदायी योजनेअंतर्गत केवळ मोठ्या आजारांच्या रुग्णांनाच लाभ मिळतो, त्याऐवजी इतर आजारांचाही या योजनेत समावेश करण्यात यावा अशी शिफारस करण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

समाजोपयोगी काम केल्याचा आनंद

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
शहरात सर्वसामान्य नागरिकांना वेगवेगळ्या समस्यांचा सामना करावा लागतो. या समस्यांची मांडणी करण्यासाठी 'महाराष्ट्र टाइम्स'ने 'मटा सिटीझन रिपोर्टर अॅप' हे प्रभावी माध्यम सुरू केले आहे. नवीन माध्यमामुळे अनेक प्रश्न निकाली निघतील, असा विश्वास 'मटा'चे 'सिटीझन रिपोर्टर' झालेल्या वाचकांनी व्यक्त केल्या.

'महाराष्ट्र टाइम्स'च्या 'मटा सिटीझन रिपोर्टर अॅप' उपक्रमात गेल्या आठवड्यात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या समीर कुलकर्णी, सुबोध कोटक व किशन पाटील यांचा प्रातिनिधिक स्वरुपात सत्कार करण्यात आला. या आठवड्यात कुलकर्णी हे 'बेस्ट सिटीझन रिपोर्टर' ठरले.

'पाणी, वीज, ड्रेनेज, रस्ते अशा नागरी समस्यांना नेहमीच तोंड द्यावे लागते. पंधरा लाख लोकसंख्येच्या शहरात नागरिकांनीच समस्या सोडवून घेण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे. या पार्श्वभूमीवर 'मटा'ने एक पाऊल पुढे टाकले,' असे त्यांनी सांगितले. 'मटा सिटीझन रिपोर्टर'च्या माध्यमातून प्रश्न मांडण्यासाठी व्यासपीठ मिळाले. या माध्यमातून शहरातील समस्या, सर्वसामान्यांची गैरसोय यंत्रणांपर्यंत पोचविणे शक्य होत आहे. या व्यासपीठाचा चांगला उपयोग झाला, अशी प्रतिक्रिया 'सिटीझन रिपोर्टर'नी व्यक्त केली.

समाजोपयोगी काम करण्याची इच्छा होती. शहरासाठी चांगले काम करता आले याचा आनंद वाटतो. आमच्याप्रमाणे इतर नागरिकांनी अॅपच्या माध्यमातून शहरातील समस्या 'मटा'कडे मांडाव्यात. औरंगाबादकरांचे दैनंदिन प्रश्न मार्गी लागण्यास मदत होईल, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.

आपणही बनू शकता सिटीझन रिपोर्टर
वाचकहो, MT Citizen Reporter हे अॅप गुगल प्ले स्टोअरवरून डाऊनलोड करा. या अॅपवरून 'मटा'कडे समस्या, प्रश्न, बातम्या, फोटो पाठवण्यास मोठ्या प्रमाणावर सुरुवात झाली आहे. तुम्हाला भेडसावणाऱ्या समस्या, तुम्हाला 'दिसणाऱ्या' बातम्या, सार्वजनिक हिताची छायाचित्रे मांडू शकता 'महाराष्ट्र टाइम्स'च्या या व्यासपीठावर.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अवकाळीचा गव्हाला तडाखा

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
जिल्ह्यात रब्बी गव्हाच्या पिकाला अवकाळी पावसाचा फटका बसला आहे. पावसाने झोडपलेल्या गव्हाचा रंग उडून प्रत खराब झाली आहे. जिल्ह्यात एकूण १५.२६ मिलिमीटर पाऊस झाला आहे. या पावसाने पिकांचे फार नुकसान झाले नाही; मात्र वादळात काही ठिकाणी मका व गव्हाचे पीक आडवे पडले आहे.
दोन दिवसांपासून पडत असलेल्या अवकाळी पावसाचा फटका रब्बी पिकांना बसला आहे. सध्या रब्बी पिकांची सोंगणी सुरू असून गहू काढणीच्या अवस्थेत आहे. यावर्षी पाणीटंचाई असल्यामुळे गव्हाचे क्षेत्र तुलनेने कमी आहे. पण, सप्टेंबर महिन्यातील परतीच्या पावसाने फुलंब्री व सिल्लोड तालुक्यांतील पाणीटंचाई दूर केली. या दोन तालुक्यांत गव्हाचे सर्वाधिक क्षेत्र आहे. आतापर्यंत गव्हाची काढणी पूर्ण झाली आहे. उशिरा पेरलेला गहू सोंगणीच्या अवस्थेत आहे. या गव्हाला अवकाळी पावसाचा तडाखा बसला आहे. काढणी पूर्ण झालेला व शेतात उभ्या असलेल्या पिकाला पावसाने झोडपले. त्यामुळे गव्हाचा रंग उडून प्रत खराब झाली आहे. या पिकाचा रंग उडाल्यामुळे कमी भाव मिळण्याची शक्यता आहे. हरभरा, ज्वारी, मका या पिकांचे तुलनेने नुकसान झाले नाही. कन्नड व सिल्लोड तालुक्यात वादळामुळे मका आडवी पडली आहे. कन्नड, सोयगाव, सिल्लोड व फुलंब्री तालुक्यात कांदा बिजोत्पादन घेण्यात येते. यावर्षी दहा हजार एकरवर कांदा बियाणे घेतले जाणार आहे. सुदैवाने, अवकाळी पावसात कांदा बियाणे पिकाचे नुकसान झाले नाही. गंगापूर तालुक्यात सर्वाधिक ९.५६ मिलिमीटर पाऊस झाला आहे.
मिटमिटा परिसरात वीटभट्ट्यांचे नुकसान
पडेगाव: मिटमिटा, पडेगाव, दौलताबाद परिसरात शुक्रवारी सकाळी एक तास पाऊस पडला. वादळी वारे व विजेचा कडकडाट व गारांसह आलेल्या पावसाने वीटभट्टीचालकांचे नुकसान केले. पावसाचे पाणी अनेक ठिकाणी पाणी साचले. या पावसामुळे विहीर, बोअरवेलचे पाणी वाढण्यास मदत होणार आहे. वीज पडून हायटेन्शन तारा पडल्यामुळे काही काळ वीजपुरवठा खंडित झाला. महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी दुरुस्ती करून पुरवठा सुरळीत केला. या पावसामूळे सोंगणी करून शेतात ठेवलेला गहू, ज्वारीचे नुकसान झाल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. दरम्यान, पावसामुळे नुकसान झाल्याने वीटभट्टीचालक किरण दुबिले यांनी चिंता व्यक्त केली.
कांदा बियाणांचे कन्नडमध्ये नुकसान
कन्नड:तालुक्याच्या बहुतांश भागात शुक्रवारी पहाटेपासून पावसाने वादळी वाऱ्यासह जोरदार हजेरी लावली. सकाळी सुमारे अर्धा तास धुवांधार व त्यानंतर दोन तास पावसाची रिप-रिप चालू होती. देवगाव, जळगाव घाट, जैतापूर, जेहूर, चापानेर, हतनूर, चिकलठाण, कन्नड शहर परिसरात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडला. यामुळे वीटभट्टी, कांदा व कांदा बिजवाई व रब्बी मका पिकाचे मोठे नुकसान होण्याचा अंदाज आहे.
फळबागांना फटका
खुलताबादः तालुक्याच्या काही भागात शुक्रवारी सकाळी अचानक आलेल्या पावसाने शेती व वीटभट्टीचे मोठे नुकसान झाले. केले. सकाळी सातच्या सुमारास ढगांचा गडगडाट व विजेच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली, साडेदहा वाजेपर्यंत रिमझिम पाऊस पडत होता. खुलताबाद, सुलीभंजन, नंद्राबाद, कागजीपुरा या भागातील वीटभट्टी व्यावसायिकांचे मोठे नुकसान झाले. कच्च्या विटांचा चिखल झाला. शेतातील ज्वारी, हरभरा, मोहरी, करडई पिकांचे आतोनात नुकसान झाले. मोसंबी, डाळिंबाच्या फळबागांनाही फटका बसला. गारा पडल्या नाही, हे आमचे भाग्य अशी प्रतिक्रिया वडोद येथील शेतकरी साहेबराव चव्हाण यांनी व्यक्त केली. शेतात कांदा लागवड केलेली असून गारांचा पाऊस आला असता तर, संपूर्ण कांदा पिकाचे नुकसान झाले असते असे त्यांनी सांगितले.
सिल्लोड तालुक्यात चाऱ्याची चिंता
सिल्लोड : तालुक्यात शुक्रवारी सकाळी हलक्या स्वरूपाचा पाऊस झाला, पण जोराचा वारा सुटला होता. या पावसामुळे रब्बी हंगामातील पिकांचे नुकसान झाले आहे. काही शेतकऱ्यांनी पावसाचा अंदाज घेऊन मळणी केलेल्या गव्हाचे भूस ओले झाले. त्यामुळे जनावारांच्या चाऱ्याचा प्रश्न बिकट
होणार आहे. तालुक्यात सकाळी सातच्या सुमारास अचानक आभाळ भरून आले व पावसाला सुरुवात झाली. निल्लोड मंडळात मोठा पाऊस पडला. या पावसामुळे सोंगणीला आलेला गहू आडवा झाला असून, गहू काळा पडण्याची शक्यता आहे. यावर्षी पाणी असलेल्या शेतकऱ्यांनी कांदा बियाणे पिकाची लागवड मोठ्या प्रमाणात केली आहे, त्यांचे पावसामुळे नुकसान झाले. वाऱ्यामुळे फुले गळाली असून उशिरा लागवड केलेल्या कांदा बियाणे पिकावर फुली रोग पडण्याची शक्यता आहे. पावसामुळे आंब्याचा मोहर गळाला. आभाळ घोंगावत असल्याने हार्वेस्टरने गव्हाची मळणी केलेल्या शेतकऱ्यांचे नुकसान टळले. वैरण म्हणून उपयोगी येणाऱ्या गव्हाच्या भूसाला त्यांनी प्राधान्य दिले नाही, या शेतकऱ्यांना चाराटंचाई सतावेल.
वीज पडून बैलाचा मृत्यू
वैजापूर ः तालुक्यातील सुराळा येथे शुक्रवारी पहाटे वीज पडून बैलाचा मृत्यू झाला. भाऊसाहेब गणपत आहेर यांच्या शेतवस्तीवर बैलाच्या अंगावर वीज पडली. बैलाची किंमत चाळीस हजार रुपये आहे. तलाठी शेख फेरोज व सहायक अशोक शितोळे यांनी पंचनामा केला. वैजापूर, बोरसर व लासूरगाव मंडळात शुक्रवारी पहाटे हलका पाऊस पडला. बोरसर मंडळात १७ मिमी पावसाची नोंद झाली आहे. सकाळी आठवाजेपर्यंत पावसाची रिपरिप सुरू होती. रब्बी हंगामातील बहुतांश गहु, ज्वारी व हरबरा ही पिके शेतकऱ्यांनी काढली आहेत. मात्र उशीरा लागवड केलेला गहू व कांद्याला फटका बसला. दरम्यान, तालुक्यात कुठेही गारपीट झाली नसल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कर्जाची हमी घेऊ नका

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
औरंगाबाद शहराच्या पाणीपुरवठ्याची जबाबदारी घेतलेल्या औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटी कंपनीच्या प्रकल्पासाठी कंपनीने मागितलेल्या ५०५ कोटींच्या कर्जाची हमी महापालिकेने घेऊ नये. यामुळे सर्वसामान्यांवर बोजा पडणार आहे. कंपनीच्या कामासाठी पालिकेची मदत का? त्यामुळे या प्रस्तावाला अजिबात मंजूर करू नये, अशी भूमिका उपमहापौर प्रमोद राठोड, सभागृह नेता राजेंद्र जंजाळ आणि स्थायी समिती सभापती दिलीप थोरात यांनी घेतली आहे. या तिघांनीही शुक्रवारी आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांची भेट घेऊन आपली भूमिका मांडली. प्रशासनही असाच विचार करीत असल्याचे कळते.

औरंगाबाद शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी स्वतंत्र समांतर जलवाहिनी टाकणे, पाणीपुरवठा करणे यासाठीचे कंत्राट औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटी कंपनीने घेतले आहे. करारानुसार आजवर कुठलेही काम झाले नसल्याने प्रशासनाने वारंवार नोटिसा बजावल्या, पण कंपनीचा कारभार सुधारला नाही, हा मुद्दा मांडत उपमहापौर राठोड पत्रकारांशी बोलताना म्हणाले,'कंपनीला आयडीबीआय बँकेकडून ५०५ कोटींचे कर्ज घ्यायचे आहे. त्यासाठी पालिकेचे संमतीपत्र एक फेब्रुवारी रोजी कंपनीने आयुक्तांना सविस्तर पत्र देऊन मागितले आहे. या पत्रात जुन्या सगळ्या आक्षेपांना मागे घ्यावे, अशी अट टाकली आहे. आमचा या अटींना विरोध आहे. मुळात महापालिकेने संमतीपत्र द्यायचे कशासाठी? कंपनीने कंत्राट घेताना पैशाची तरतूद करणे अपेक्षित होते. जर असे असते पालिका समांतर प्रकल्प राबविण्यास सक्षम नाही काय? त्यांची मदत घेण्याची गरजच नाही. तत्कालीन आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी कंपनीला बजावलेली नोटीस आपोआपच संपुष्टात येईल. महापालिकेने सिटीबस प्रकरणात भोगले आहे. त्याची पुनरावृत्ती आता होऊ शकते. त्यामुळे पालिकेने कंपनीला कुठलेही संमतीपत्र देऊ नये, अशी विनंती आम्ही आयुक्तांना केली आहे. १५ लाख नागरिकांशी संबंधित हा विषय असल्याने यासंदर्भात सर्वसाधारण सभेत चर्चा झाली पाहिजे. नगरसेवकांनाही त्यांची मते मांडू द्यावीत,'असे त्यांनी स्पष्ट केले.

दिलीप थोरात म्हणाले, 'निधीची तरतूद करण्याची जबाबदारी कंपनीची आहे. त्यांनी महापालिकेची मदत अजिबात घेऊ नये. उद्या कंपनीने कर्ज घेतले आणि ती पळून गेली तर बँक पालिकेला वेठीस धरेल. हे सर्व टाळण्यासाठी महापालिकेने संमती पत्र देऊ नये. कंपनीने बँकेशी हातमिळवणी केली काय? अशी शंका येते. संमती पत्र दिले तर कंपनीला भविष्यात कुठलीही नोटीस देण्यासाठी बंधने येतील, थोडक्यात पालिकेचे नियंत्रणच राहणार नाही.'

आमचाही विरोध ः जंजाळ
सभागृह नेता राजेंद्र जंजाळ यांनी सायंकाळी आयुक्तांची भेट घेतली. त्याविषयी जंजाळ म्हणाले,'समांतरच्या कर्जाचे संमती पत्र पालिकेने देऊ नये, अशी मागणी मी आयुक्तांकडे केली. कंपनीच्या कारभारात शहरवासीयांना अडचणीत आणण्याचा हा प्रकार आहे. आयुक्तांनीही सकारात्मक निर्णय घेण्याचे संकेत दिले.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘समांतर’चा अहवाल द्या

$
0
0

म. टा. विशेष प्रतिनिधी, औरंगाबाद
राज्य शासनाने समांतर जलवाहिनी योजनेचा अहवाल सिलबंद लिफाफ्यात शपथपत्राद्वारे २८ मार्चपर्यंत सादर करावा, असा आदेश मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. रवींद्र बोर्डे व न्या. ए. आय. एस. चिमा यांनी दिले आहेत. राज्य शासन अहवालांवर अहवाल सादर करणार आहे.

समांतर जलवाहिनी पाणीपुरवठ्याच्या विरोधात तीन याचिका करण्यात आल्या आहेत. शुक्रवारी त्यांची सुनावणी झाली. खासगीकरणाविरुद्ध स्थापन झालेल्या नागरी कृती समिती तर्फे प्रा. विजय दिवाण, सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र दाते पाटील, जलाधिकार कृती समितीचे विजय शिरसाट व सचिन भोजने यांनी औरंगाबाद खंडपीठात दाखल करून योजनेचे स्वरूप, समांतरचा करार आणि त्याची अंमलबजावणी यांच्या वैधतेविषयी आक्षेप घेतला आहे.

राज्य शासनाने समांतरवर स्थापन करण्यात आलेल्या संतोषकुमार समितीचा अहवाल अद्याप प्रलंबित आहे. महापालिकेचे तत्कालिन आयुक्त सुनील केंद्रेकर यांचा अहवाल नुकताच राज्य शासनास प्राप्त झाला आहे. नवीन आयुक्त आेमप्रकाश बकोरिया यांचा अहवाल प्राप्त होणे बाकी आहे, असे सरकारी वकील अमरजितसिंह गिरासे यांनी कोर्टाला सांगितले. यावर काही निर्णय घेतला जाणारा आहे का, असा प्रश्न हायकोर्टाने राज्य शासनास विचारला. समांतरबाबत तीन टप्यांत निर्णय घेण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम कोर्टाला देण्यात आला.

पालिकेचे नवनियुक्त आयुक्त बकोरिया यांनी समांतरच्या सर्व प्रकरणांचा व तत्कालिन प्रभारी आयुक्त केंद्रेकरांच्या अहवालाचा साकल्याने अभ्यास करून त्यासंंबंधीचा अहवाल ११ मार्चपर्यंत राज्य शासनाने नियुक्त केलेल्या संतोषकुमार समितीकडे सादर करावा. केंद्रेकरांच्या अहवालासंबंधी काही वेगळे मत असल्यास ते स्पष्टपणे कारणांसह नमूद करावे, असे कोर्टाने म्हटले आहे.

संतोषकुमार समितीकडे आलेला केंद्रेकर व बकोरिया यांचा अहवाल विचारात घेऊन १८ मार्चपर्यंत राज्यशासनाकडे सादर करण्यात यावा. शासनाने केंद्रेकर, बकोरिया व संतोषकुनमार समितीचा अहवाल विचारात घेऊन त्यावर योग्य तो निर्णय घ्यावा. यासंबंधी आपले शपथपत्र २८ मार्चपर्यंत सिलबंद लिफाफ्यात सादर करण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत .

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नियमबाह्य कामे केल्याचा आरोप

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या परीक्षा विभागाचे उपकुलसचिव विष्णू कऱ्हाळे यांच्या कार्यकाळातील कामकाजाची चौकशी करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी जनशिक्षण संस्थान संचलित विजयेंद्र काबरा समाजकार्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सतीश सुराणा यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केली.

ते म्हणाले की, विद्यापीठाच्या परीक्षा विभागात गुणवाढ प्रकरण, निकाल न लावणे, मर्जीप्रमाणे परीक्षा केंद्राचे वाटप करण्याचे प्रकरण घडले आहेत. अनेक महाविद्यालयात अतिरिक्त प्रवेश असूनही त्यांचे निकाल घोषित केले आहेत, निर्मल या कंपनीस टेंडर देताना केलेल्या आर्थिक व्यवहाराच्या चौकशी करावी.

कऱ्हाळे यांनी ऑक्टोबर २०१५मध्ये परीक्षांमध्ये शहरातील एका महाविद्यालयातील एम.एस्सी. रसायनशास्त्र अभ्यासक्रमाच्या तृतीय सत्राच्या विद्यार्थ्याचे १८ गुण वाढविले तरीही, प्रशासनाने त्यांच्यावर कारवाई केली नाही. विजयेंद्र काबरा समाजकार्य महाविद्यालयातील ३६५ विद्यार्थ्यांचा ऑक्टोबर २०१५ परीक्षेचा निकाल प्रिंट करून घोषित करण्यात आला, मात्र महाविद्यालयास गुणपत्रिका देण्यात आल्या नाहीत. मार्च २०१६मध्ये होणाऱ्या परीक्षांसाठी समाजकार्य महाविद्यालयात उत्तरपत्रिका देण्यात आल्या, मात्र हे केंद्र अचानक रद्द करण्यात आले, असे आरोपही त्यांनी केले.

निर्मल सॉप्टवेअर या कंपनीला कऱ्हाळे पदावर आल्यानंतर टेंडर देताना केलेल्या व्यवहाराचीही चौकशी करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.

सर्व कामे ही नियमांनुसारच पूर्ण करण्यात आली आहेत. माझ्यावर करण्यात आलेले सर्व आरोप बिनबुडाचे आहेत. निकालासंदर्भात अॅफिलेशन पत्र मागवण्यात आले होते, मात्र ते विद्यापीठाला दिले नाही. सर्व आरोप आकसापोटी करण्यात आले आहेत.
- विष्णू कऱ्हाळे, उपकुलसचिव, परिक्षा विभाग.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शेतकऱ्यांची ‘मन की बात’ साहित्यातून उमटतच नाही

$
0
0

औरंगाबाद : जातीच्या प्रश्नावर लाखो लोक एकत्र येऊन व्यवहार बंद पाडतात. सरकारही त्यांच्या मागण्यांची दखल घेते, मात्र शेतीच्या प्रश्नावर सर्व शेतकरी एका झेंड्याखाली कधीही येत नाहीत, हे दुदैवी आहे. दुसरीकडे प्रेमचंद यांच्या गोदान व दहा-पाच कथा-कादंबऱ्यांचा अपवाद वगळता शेतकऱ्यांच्या 'मन की बात' हिंदी साहित्यातून उमटतच नाही, असे प्रतिपादन प्रख्यात साहित्यिक शिवमूर्ती यांनी केले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील हिंदी विभागात 'समय, संघर्ष, साहित्य और किसान' या विषयावरील राष्ट्रीय चर्चासत्राचे उद्घाटन साहित्यिक शिवमूर्ती (लखनौ) यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे अध्यक्षस्थानी होते. यावेळी ज्येष्ठ पत्रकार उत्तम कांबळे, डॉ. नारायण शर्मा, डॉ. माधव सोनटक्के, विभागप्रमुख डॉ. संजय नवले, संयोजक डॉ. भारती गोरे यांची उपस्थिती होती. यावेळी शिवमूर्ती म्हणाले की, आजचा काळ हा बुलेट ट्रेन, जागतिकीकरण, माहिती तंत्रज्ञानाचा आहे तर, दुसऱ्या बाजुला शेती, शेतकरी अजूनही तळालाच अडकलेला आहे. कधी 'पॅकेज' तर कधी 'सेझ'च्या नावाखाली त्याला गंडविले जाते. कोणत्याही पक्षाचे सरकार असो श्रमिकांची पिळवणूक आणि धनिकांनी अधिक श्रीमंत करणारी आहे. हे सगळे वास्तव हिंदी साहित्यात का येत नाही, हा खरा प्रश्न अाहे. 'बळीराजा' या गोंडस नावाखाली इथल्या उत्पादक वर्गाला अर्थात शेतकऱ्याला धर्म व्यवस्थेने अाधुनिकीकरणापासून वंचित ठेवले. कितीही लिहिले, बोलले तरी शेतकऱ्यांच्या दु:खाचा अविरत वाहणारा झरा केव्हा आटणार आहे, असा प्रश्न कांबळे यांनी उपस्थित केला.

आज समारोप
परिषदेचा समारोप शनिवारी (५ मार्च) दुपारी ३ वाजता होणार आहे. याप्रसंगी डॉ. चंद्रदेव कवडे, ज्येष्ठ साहित्यिक रा. रं. बोराडे व त्र्यंबक गायकवाड आदी उपस्थित राहणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहरात अवकाळी सरी

$
0
0

औरंगाबाद : औरंगाबाद शहर आणि परिसरात सकाळी शुक्रवारी (४ मार्च) सकाळी सातच्या सुमारास मेघगर्जनेसह पावसाच्या सरींनी हजेरी लावली. शहरात गेल्या चार दिवसांपासून शहरात ढगाळ वातावरण असून, हलक्या सरी बरसत आहेत.

शुक्रवारी साडेआठ ते साडेपाचदरम्यान शहरात ३.४ मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली. गुरुवारी रात्रीपासून ते शुक्रवारी सकाळी साडेआठपर्यंत ४१ मिलिमीटर पावसाची नोंद चिकलठाणा वेधशाळेत करण्यात आली आहे. शुक्रवारी पहाटेपासून आभाळांची गर्दी झाली होती. सकाळी सातच्या सुमारास ढगांच्या गडगडाटासह पावसाला सुरुवात झाली. तब्बल अर्धा तास हा पाऊस बरसला. संपूर्ण शहर, परिसरात झालेल्या या पावसामुळे वातावरणात गारवा वाढला होता. गेल्या काही दिवसांपासून दररोज औरंगाबादसह मराठवाड्यातील लातूर, बीड, उस्मानाबाद, नांदेड या जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाच्या सरी बरसत अाहेत. येत्या दोन दिवसांत मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फूड कॉर्नर : झणझणीत मिसळ

$
0
0

Shripad.Kulkarni@timesgroup.com
मिसळ-पाव हा सर्वांचाच आवडता पदार्थ, पण अनेक जण मिसळ खाणे टाळतात. अॅसिडिटी, घशात जळजळ होणे आदी कारणे त्यामागे असतात, पण राजा बाजारमधील सस्थान गणपती मंदिरापासून जवळ असलेले श्री गणेश चाट भांडारमधील मिसळ याला अपवाद म्हणावी लागेल. रोज सकाळी साडेसातपासून तेथे खवय्यांची गर्दी असते.

सुमारे २५ वर्षांपूर्वी श्री गणेश चाट भांडार सुरू झाले. मिसळ-पावशिवाय कचोरी, समोसा, भजे, जिलबी, फाफडा आदींसाठीही ते प्रसिद्ध आहे. मिसळची तयारी पहाटेच सुरू होते. यासंदर्भात राहुल भाटी यांनी सांगितले की, पहाटे पाच वाजता आम्ही घरी मिसळची तयारी सुरू करतो. आई व कुटुंबातील अन्य सदस्य या कामात मदत करतात. मटकी स्वच्छ धुतली जाते. त्यानंतर तेलात कांदा परतला जातो. मिसळसाठी रोज ताजा मसाला तयार करतात. कांदा लालसर परतल्यावर मिरची, चटपट, धणे पावडर, हळद, आलं-लसूण पेस्ट, घरी तयार केलेला गरम मसाला आदी टाकले जाते. मसाला चांगला परतून घेतल्यानंतर त्यात मटकी शिजविण्यासाठी टाकली जाते. त्यासाठी गरजेनुसार पाणी टाकले जाते. मिसळसाठी बाहेर तयार केलेला मसाला वापरला जात नाही.

मिसळसाठी वापरण्यात येणारे फरसाणही घरीच तयार करण्यात येते. या फरसाणला मिसळ स्पेशल फरसाण म्हणतात. बाजारात मिळणारे फरसाण मटकीत टाकल्यानंतर विरघळते. त्यामुळे ते वापरले जात नाही. मिसळमध्ये टाकलेले फरसाण कुरकुरीत असते. मिसळ, फरसाण तयार करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या पदार्थांचे प्रमाण ठरलेले आहे. त्यामुळेच त्याची चव, दर्जा टिकून आहे, असे भाटी सांगतात.

घरी तयार केलेले आणि ताजे मसाले वापरल्यामुळे मिसळ खाल्यानंतर कोणालाही अॅसिडिटी, घशात जळजळ होणे, अपचन आदी त्रास होत नाहीत. मिसळ व अन्य पदार्थांचे पार्सल नेणाऱ्यांचीही संख्या मोठी आहे, असेही त्यांनी सांगितले.

मिसळ खाताना त्याची प्रचिती येते. मटकीच्या उसळीमध्ये कुरकुरीत फरसाणची चव वेगळेपणाने जाणवते. घशामध्येही जळजळ होत नाही. मिसळ-पाव सोबत दही ही डीश खाण्यासाठी सकाळपासून गर्दी असते. त्याशिवाय कुरकुरीत कांदा भजे यासाठीही श्री गणेश चाट भांडारची ओळख आहे. ते तयार करण्यासाठी हरभरा डाळीच्या पिठात ओवा, कांदा, आलं-लसूण पेस्ट, सोडा यांचा वापर केला जातो. त्याचेही प्रमाण ठरलेले आहे. त्यात थोडेही कमी-जास्त झाल्यास भजे बिघडतात.

राहुल यांना त्यांचे भाऊ सचिन भाटीही मदत करतात. गेल्या २५ वर्षांत अनेक ग्राहक जोडले गेले आहेत. नियमितपणे येणाऱ्या ग्राहकांचे प्रमाण जास्त आहे. हीच मिसळच्या दर्जा व चवीसाठी पावती आहे, असे भाटी मानतात.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सरकारला हवी साथ

$
0
0

अरुण समुद्रे, निलंगा
दुष्काळ निवारणासाठी सरकारचे प्रयत्न प्रामाणिक आहेत. मात्र, त्याला दुष्काळग्रस्त जनतेने साथ द्यावी, असे भावनिक आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी केले. शेततळे योजना यशस्वी करण्याचे आवाहन त्यांनी लांबोटा (ता. निलंगा) येथील केले.

मराठवाड्याच्या दुष्काळ पाहणी दौऱ्यात मुख्यमंत्र्यांनी लांबोट्यात शेतकऱ्यांशी संवाद साधला. त्यांनी लांबोटा नदीच्या खोलीकरणची पाहणी केली. महसूल मंत्री एकनाथ खडसे, खासदार डॉ. सुनील

गायकवाड, आमदार संभाजीराव पाटील, मुख्य सचिव स्वाधिन क्षत्रिय आदी याप्रसंगी उपस्थित होते.

सध्याचा दुष्काळ भीषण असून तो निसर्ग आणि मानवनिर्मित असल्याचे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, कायमस्वरुपी दुष्काळमुक्तीसाठी आखलेल्या, 'मागेल त्याला शेततळे' योजनेचा सर्वांनी लाभ घ्यावा. या योजनेंतर्गत पाच लाख शेततळ्यांची योजना असून त्यास राज्यातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. अवघ्या तीन दिवसांत २४,००० शेतकऱ्यांनी त्यासाठी अर्ज केले आहेत.

मुख्यमंत्र्यानी निलंगा तालुक्यातील अधिकारी, लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत आढावा बैठक घेतली. आमदार संभाजीराव पाटील यांनी जलसंधारणाच्या कामासाठी वाढीव निधीची मागणी केली. मुख्यमंत्रानी बैठकीत विभागीय आयुक्त उमाकांत दांगट यांना सरकारी योजनेच्या अंमलबजावणीकडे लक्ष देण्याच्या सूचना केल्या. निलंगा नगर परिषदेला, जलवाहिनी दुरूस्त करण्यासाठी निधी मंजूर करण्याची मागणी विजयकुमार पाटील यांनी केली. कीर्तनकार, प्रवचनकारांनी, जलयुक्त शिवार योजनेतून निलंगा तालुक्यात कामे करण्यासाठी मुख्यमंत्र्याकडे देणगी दिली. त्याचप्रमाणे निलंग्यातील डॉक्टरांतर्फे ११ हजार रूपयांची देणगी देण्यात आली.

खडसे म्हणाले की, शेतकऱ्यांना येत्या खरीप हंगामात पेरणीसाठी बियाणे देण्याचा विचार असल्याचे सांगितले.

मुख्यमंत्र्यानी शेतावर शेतकऱ्यांशी चर्चा केली. बँकानी वसुलीसाठी लावलेले तगादे थांबविण्याची मागणी यावेळी शेतकऱ्यांनी केली. गावांतील स्वस्त धान्य दुकाने महिला बचत गटांना चालविण्यास द्यावेत, अशी मागणी महिलांनी केली. याबाबत लवकरच धोरण जाहीर केले जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले.

मुख्यमंत्र्यांची काढली दृष्ट
नातवाच्या आजारासाठी मुख्यमंत्र्यानी केलेल्या मदतीबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना निलंगा तालुक्यातील ज्येष्ठ महिलेने, ग्रामीण भागात काढतात तशी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची साडीच्या पदराने दृष्ट काढली.

लातूरात काँग्रेसचे शिस्तबद्ध आंदोलन

मुख्यमंत्र्यांचे विमानतळावर आगमन झाल्यानंतर शहर काँग्रेसचे अध्यक्ष मोईज शेख, तालुका अध्यक्ष दगडू पडिले यांच्या नेतृत्वाखाली मूक आंदोलन केले. 'लातुराला पाणी द्या, एकच मागणी पिण्याचे पाणी, एकच मागणी उजनीचे पाणी' असे फलक आंदोलकांच्या हातात होते. मुख्यमंत्र्यांनी आंदोलकांची भेट घेऊन निवेदन स्वीकारले.

शेतकऱ्यांसाठी आखलेल्या योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचल्या आहेत की, नाही हे पाहण्यासाठी अगदी तालुकापातळीपर्यंत मंत्री पाठविण्याची राज्यातील ही पहिलीच वेळ आहे. गेल्या काही वर्षांत दुष्काळावर कायमस्वरुपी मात करण्यासाठी काहीही प्रयत्न झालेले नाहीत. आमचे सरकार आता जलयुक्त शिवार आणि शेततळ्यांच्या माध्यमातून हे काम करणार आहे.
-देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सरकारी योजनांना ‘तांत्रिक’ अडथळा

$
0
0

मोतीचंद बेदमुथा, उस्मानाबाद
दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांसाठी राज्य तसेच, केंद्र सरकारने अनेक याजेना आखल्या. मात्र, प्रशासनातील तांत्रिक अडचणींमुळे त्या लाभार्थ्यांपर्यंत वेळेत पोहोचण्यात विलंब होत आहे. परिणामी, ग्रामीण भागातील जनतेच्या रोषाला सरकारला सामोरे जावे लागत आहे, अशी खंत राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी शुक्रवारी येवती (ता. उस्मानाबाद) येथे पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली.

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांची दु:खे व समस्या समजून घेण्यासाठी मंत्रिमंडळातील काही सदस्य गुरुवारी तर, काही शुक्रवारी उस्मानाबाद दौऱ्यावर होते. आठ मंत्री ४ मार्च रोजी उस्मानाबाद जिल्हा दौऱ्यावर येतील असे जाहीर करण्यात आले होते. मात्र, शिवसेनेच्या मंत्र्यांनी आपला स्वतंत्र बाणा जपत त्यांचा दौरा ३ मार्च रोजीच आटोपला. आता शिवसेनेचे मंत्री त्यांचा अहवाल पक्षप्रमुखांना सादर करणार की, मुख्यमंत्र्यांना हे पहावे लागेल.

तावडे यांनी शुक्रवारी उस्मानाबाद तालुक्यातील विविध गावांना भेटी देऊन विविध कामांची पाहणी केली. शेतकऱ्यांशी संवाद साधला. शिक्षणमंत्री असल्यामुळे या दुष्काळ दौऱ्यात ते येडशी येथील जनता विद्यालयाला भेट देण्यास विसरले नाहीत.

बार्शी तालुक्यात मंत्री प्रकाश मेहता यांनी दुष्काळाची पाहणी भाजपच्या पदाधिकाऱ्यांच्या गराड्यात केली. मेहता यांचा ग्रामीण भागाशी फारसा परिचय नसल्यामुळे भाजपचे प्रदेश सरचिटणीस सुजितसिंह ठाकूर व जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी हे त्यांना माहिती देत होते. पिण्याचे पाणी, चारा, रोहयो कामे, पीकविमा यांशिवाय अन्नधान्यवाटप या पाच मुद्यांची जिल्हा दौऱ्यावरील मंत्र्यांनी त्यांना ठरवून दिलेल्या तालुक्यातून पाहणी केली.

तावडे यांनी काही ठिकाणी अधिकाऱ्यांना दुष्काळग्रस्तांस बोलावून त्यांच्या अडचणी सोडविण्याबाबत सूचित केले तर, परांड्याचा पाणीप्रश्न सोडविण्याची ग्वाही सुभाष देसाई यांनी आपल्या दौऱ्यातून दिली.

उस्मानाबाद तालुका दत्तक घेणार
दुष्काळ निवारणासाठी उस्मानाबाद तालुका दत्तक देण्याची विनंती आपण मुख्यमंत्र्यांना करणार असल्याचे तावडे यांनी यावेळी जाहीर केले. याशिवाय उस्मानाबाद तालुक्यातील १२८ गावे ऑनलाइन जोडून त्यांच्या समस्या व उपाय रोजच्या रोज जाणून घेत सोडविणार असल्याचे तावडे यांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दूधबाटली फेकल्याने येडशीत वाद

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, उस्मानाबाद
येडशी (ता. उस्मानाबाद) येथे जनता विद्यालयातून बाहेर पडत असताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या काही पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी तावडे यांना अडविण्याचा प्रयत्न केला. त्यांच्यावर एक दुधाची बाटली व दुधाच्या दोन पिशव्या फेकल्या.

यावेळी भाजपचे कार्यकर्ते व तावडे यांचे सरकारी स्वीय सहायक संतोष सुर्वे यांनी स्वाभिमानी संघटनेच्या काही कार्यकर्त्यांवर हात उगारत मारहाण केल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केला. या घटनेमुळे तेथे काही काळ तणाव निर्माण झाला. पोलिसांच्या मध्यस्थीने वाद लगेचच मिटला.

याप्रकरणी 'स्वाभिमानी'च्या तीन कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यातही घेतले. दरम्यान, सुर्वे यांच्या विरोधात कायदेशीर कारवाईची मागणी करण्यात आली आहे. उस्मानाबाद सर्कीट हाउसवर तावडे यांना युवक काँग्रेसने काळे झेंडे दाखवून दुष्काळाकडे शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.

दुष्काळाबाबतच्या आजाराचे निदान अगोदरच झालेले आहे. त्यांच्यावर तातडीने उपाय योजना करून दुष्काळग्रस्तांना दिलासा देणे गरजेचे असताना विद्यमान सरकारमधील मंत्री हे आता दुष्काळावरील औषध शोधण्यासाठी पर्यटन करीत आहेत. शिवाय लाखो रुपयांची उधळण करीत आहेत. येडशी येथे तावडे यांचे स्वीय सहायक संतोष सुर्वे यांनी संघटनेच्या कार्यकर्त्यांबरोबर केलेला वाद भाजपसाठी शोभनीय नाही. दुष्काळग्रस्त शेतकरी किंवा कार्यकर्ते आपल्या व्यथा मांडण्यासाठी येत असतील तर, त्यांना 'पीए'ने रोखण्याचे व हाणामारी करण्याचे कारण नाही. आम्ही बांगड्या घातलेल्या नाहीत. जशास तसे उत्तर देण्याचे सामर्थ्य आमच्यातही आहे.
- सदाभाऊ खोत, नेते, स्वाभिमानी शेतकरी संघटना

स्वाभिमानी शेतकरी संघटना आमचा मित्र पक्ष आहे. त्यांच्या कार्यकर्त्यांनी दुष्काळाच्या अनुषंगाने रोष प्रदर्शित करीत घातलेला धुडगूस योग्य नाही. निवेदन देऊन किंवा संवादाद्वारे भावना समजून घेतल्या असत्या, परंतु धुडगूस घालण्याचे ठिकाण योग्य नव्हते. या पक्षाच्या कोणत्याही कार्यकर्त्यांवर कारवाई करू नये. या प्रकाराबद्दल आमची कसलीही तक्रार नाही.
- विनोद तावडे, शिक्षणमंत्री

येडशी येथे मंत्री विनोद तावडे यांच्याबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केलेला हा प्रकार सवंग लोकप्रियतेसाठीचा आहे.
- नितीन काळे, माजी जिल्हाध्यक्ष, भाजप

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मंत्र्यांनी बघितला दुष्काळ

$
0
0

अतुल कुलकर्णी, बीड
जिल्ह्यातील दुष्काळाची तीव्रता लक्षात घेऊन शुक्रवारी जिल्ह्यातील सर्व तालुक्यांत मंत्र्यांनी दुष्काळाची पाहणी केली. ठिकठिकाणी दुष्काळग्रस्त शेतकरी, विविध पक्ष संघटनांनी आपल्या मागण्या मंत्र्यांसमोर मांडल्या. केज येथे शेतकरी संघटना आणि बीड येथे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मंत्र्यांच्या दौऱ्यावेळी विरोधी घोषणाबाजी केली.

जिल्ह्यात अकरा मंत्री आले होते. बीड तालुक्यात अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, गेवराईत पंकजा मुंडे, धारूरमध्ये गिरीश बापट, माजलगावात बबनराव लोणीकर, केजमध्ये चंद्रशेखर बावनकुळे, परळीत एकनाथ शिंदे, आष्टीत संजय राठोड, पाटोदा तालुक्यात समाजकल्याण मंत्री दिलीप कांबळे, शिरूर तालुक्यात दादाजी भुसे, वडवणी तालुक्यात दीपक केसरकर यांनी प्रत्यक्षात दुष्काळ अनुभवला.

शिरुर कासार तालुक्यात पाहणीसाठी आलेल्या सहकार राज्यमंत्री दादा भुसे यांना, तालुक्यात टंचाई स्थिती बिकट असल्याचे स्थानिकांनी निदर्शनास आणून दिले. त्यानंतर त्यांनी १३ गावांत दोन दिवसांत टँकरने तत्काळ पाणी पुरवठा सुरू करण्याचे आदेश दिले.

भुसे यांनी शिरापूर धुमाळ, हिवरसिंगा, खोकरमोहा, रायमोहा आदी भागांची पाहणी करून शिरूर कासार (जि. बीड) तहसील कार्यालयातील सभागृहात आढावा बैठक घेतली.

परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी अंबाजोगाई तालुक्यात पाहणी करून, टंचाईस्थितीच्या पार्श्वभूमीवर आगामी कालावधीत ग्रामस्थ व शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी प्रशासनाने तत्परतेने व समन्वयाने काम करणे गरजेचे असल्याचे सांगितले.

बिंदुसरा धरणाची मंत्र्यांनी केली पाहणी
मंत्रालयात बसून दुष्काळी स्थितीचा आढावा घेणे योग्य नसल्याने मुख्यमंत्र्यांसह आम्ही मराठवड्यात पाहणी करण्यासाठी आलो असल्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले. बीड येथील बिंदुसरा धरणाची पाहणी केल्यानंतर ते बोलत होते. बीडला पाणी पुरवठा करणाऱ्या बिंदुसरा धरणास भेट देऊन मुनगंटीवार यांनी दुष्काळाचे गांभीर्य समजून घेतले. ते म्हणाले की, दुष्काळावर कायमची मात करायची असेल तर, वृक्ष लागवड करणे आवश्यक आहे. त्यामुळे आगामी काळात संरक्षण खात्याच्या मदतीने मराठवाडा आणि विदर्भात वृक्ष लागवडीवर भर दिला जाईल. मराठवाडा आणि विदर्भात नेहमी दुष्काळ पडतो. या भागात वनसंपत्ती नसल्यात जमा आहे. त्यामुळे पाऊसच पडत नाही. याबाबत संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांच्याशी माझे बोलणे झाले असून संरक्षण खात्याच्या मदतीने येणाऱ्या काळात या भागात मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड केली जाईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दुष्काळ निवारणासाठी देवस्थान निधी वापरावा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, उस्मानाबाद
मुंबई येथील सिद्धीविनायक मंदिर संस्थान, शिर्डी येथील साईबाबा मंदिर संस्थान जे सामाजिक भान ठेवून विविध समाजोपयोगी कार्यासाठी अर्थसहाय्य करतात. त्याचप्रमाणे तुळजापूर येथील श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानने त्यांच्या निधीचा वापर दुष्काळात नागरिकांना दिलासा देण्यासाठी करावा, असे आवाहन विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी नुकतेच उस्मानाबाद दौऱ्यात केले. तुळजाभवानी देवस्थान समितीचे विश्वस्त तथा आमदार मधुकरराव चव्हाण, आमदार बसवराज पाटील हे या वेळी उपस्थित होते.

देवस्थानचा निधी दुष्काळ निवारण्यासाठी वापरण्यास परवानगी द्यावी, असा प्रस्ताव उस्मानाबादचे जिल्हाधिकारी तथा तुळजाभवानी देवस्थान समितीचे अध्यक्ष डॉ. प्रशांत नारनवरे यांनी सह-धर्मादाय आयुक्तांकडे (लातूर) पाठविलेला आहे. या प्रस्तावाला तत्काळ मंजुरी दिल्यास हा निधी दुष्काळग्रस्तांच्या कामी येईल. शिवाय चारा छावण्या उभारता येतील. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील विविध सामाजिक संस्था, तसेच देवस्थानांकडे असलेल्या निधीचा समाजहितासाठी वापर करणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने शासनाने पावले उचलावीत, अशी आग्रही मागणी राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मंत्रिमंडळ दुष्काळाच्या दारी...

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, लातूर

दुष्काळाने पोळलेल्या मराठवाड्यासाठी शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, टंचाईच्या निकषांत बदल करणार, मनरेगाच्या माध्यमातून मजुरांच्या हाताला काम देणार अशा दुष्काळग्रस्तांना दिलासा देणाऱ्या अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या.

राज्य मंत्रिमंडळाने दुष्काळी भागाचा दौरा करून, स्थितीची पाहणी केली. राज्याचे संपूर्ण मंत्रिमंडळच दुष्काळ दौऱ्याच्या पाहणीसाठी गेल्याची ही पहिलीच घटना होती. राज्यातील दुष्काळी जिल्ह्यातील चारा छावण्यांच्या निधीत ५० कोटी रुपये अधिक देण्यात येणार असून, चारा डेपोही सुरू करण्यात येतील, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे पत्रकार परिषदेत केली. मराठवाड्यात कोकणातून चारा आणला जाणार असुन विभागीय आयुक्तांनी त्याचा आराखडाही तयार केला असल्याची माहिती त्यांनी या वेळी दिली. या वेळी मंत्री एकनाथ खडसे, विनोद तावडे, चंद्रशेखर बावनकुळे, खासदार डॉ. सुनील गायकवाड, आमदार सुधाकर भालेराव, मुख्य सचिव स्वाधिन क्षत्रीय, मिलिंद म्हैसकर उपस्थित होते. शेतकऱ्यांच्या २०१५ च्या कर्जाची फेररचना करण्यात येणार असून, खरिपाच्या पेरणीसाठी बी-बियाणे मोठ्या प्रमाणावर उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी शेततळे योजनेला चांगला प्रतिसाद दिला असल्याचे सांगून, तीन दिवसांत १४ हजार अर्ज आल्याची माहिती फडणवीस यांनी दिली. मनरेगाच्या कामासाठी दिली जाणारी मजुरी ही सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दरापेक्षा कमी असल्यामुळे त्यात वाढ करण्यात येणार आहे, असे ते म्हणाले.

अवकाळी योगायोग

दुष्काळी भागाच्या दौऱ्यावर मुख्यमंत्री आले की अवकाळी पाऊस आणि गारपीट हे जणू समीकरण ठरलेले आहे. २००३मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री (कै.) विलासराव देशमुख मराठवाड्याच्या दुष्काळ पहाणी दौऱ्यावर असताना अवकाळी पाऊस आला होता. २००८मध्ये अशोक चव्हाण यांच्या दौऱ्याच्या आधी गारपीट झाली होती. २०१४मध्ये पृथ्वीराज चव्हाण उस्मानाबादच्या दौऱ्यावर आले असता पाऊस झाला होता. आता देवेंद्र फडणवीस लातूरच्या दौऱ्यावर असतानाही मराठवाड्यात अवकाळी पाऊस आणि गारपीट झाली.

निर्णयांची घोषणा

- मदतीपासून कोणी वंचित राहणार नाही : सीएम
- चारा छावण्यांसाठी ५० कोटी देणार
- दुष्काळग्रस्त गावांत वीज बिल माफ
- दुष्काळ निवारणासाठी उर्वरित ५०० कोटी लवकरच देणार
- शैक्षणिक शुल्क माफ करण्याचा सरकारचा विचार
- डीएसआर रेट वाढवून मनरेगाचे मजुरीदर वाढविणार
- टंचाईच्या निकषांत बदल करणार
- लातूर शहराला टँकरसाठी १५ कोटी रुपये
- उस्मानाबादला आठऐवजी १६ एमएलडी पाणी
- धान्यपुरवठ्यात गैरप्रकार करणाऱ्यांवर कठोर कारवाई

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images