Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

‘कंपनी सेक्रेटरी आता उद्योगांची अनिवार्यता’

$
0
0
उद्योगाच्या आरंभापासून शेवटापर्यंत कंपनी सेक्रेटरीची भूमिका सातत्याची असते. त्याच्या भूमिकेवरच उद्योगांचे भवितव्य अनेकप्रकारे अवलंबून असते. मात्र आता नवीन कंपनी कायदा तयार झाला असून यात कंपनी सेक्रेटरीवर अनेक नव्या जबाबदाऱ्या टाकल्या आहेत.

जीवनाचे बदलते संदर्भ

$
0
0
टॉवर्सच्या कंपाउंडमध्ये असलेले सप्रर्णीचे वृक्ष हल्ली बऱ्यापैकी उंच झालेले आहेत. दुसऱ्या मजल्यावरील आमच्या फ्लॅटच्याही वर गेलेत आता झाडांचे शेंडे. फ्लॅटसमोरच असलेल्या वृक्षाच्या शेंड्यावरच्या बेचक्यात महिन्यापूर्वी एक कुटुंब राहायला आलंय.

जामा मशिदीजवळ सीसीटीव्ही

$
0
0
हज यात्रेसाठीची तयारी आता अंतिम टप्प्यात आली आहे. यंदा हज यात्रेला जाणाऱ्या यात्रेकरूंना जामा मशिदीतूनच विशेष बसमधून थेट विमानतळापर्यंत नेले जाणार आहे आणि औरंगाबाद-जेद्दाह विमान पहाटे असल्यामुळे यात्रेकरूंच्या नातेवाइकांना मशिदीसमोरच सी-ऑफ करावा लागणार आहे.

मालमत्ता कर भरण्यासाठी पालिकेचा बँकांशी करार

$
0
0
नागरिकांकडून मालमत्ता कर भरून घेण्यासाठी महापालिकेने बँकांशी करार करण्याचे ठरवले आहे. त्यानुसार एचडीएफसी बँकेशी करार करून या बँकेच्या पाच शाखांमध्ये मालमत्ता कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. याशिवाय अन्य काही बँकांशीही पालिकेची चर्चा सुरू आहे.

एसटी चालली तोट्यात

$
0
0
डिझेल दरवाढ, महागाई, अन्य प्रवासी वाहनांबरोबरची स्पर्धा यांमुळे एसटीचा तोटा वाढत चालला आहे. गेल्या तीन महिन्यांत २४४ कोटी रुपयांचे नुकसान एसटी महामंडळाला सोसावे लागले.

मंडळांकडून हवे एक पाऊल पुढे

$
0
0
प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही गणेशजी विराजमान झाले आहेत. लोकमान्य टिळकांनी स्वातंत्र्य चळवळीत नागरिकांना संघटीत करण्यासाठी गणेशोत्सवाची सुरुवात केली. सार्वजनिक गणोशात्सवाला हा चळवळीचा इतिहास असल्याने विविध समाजोपयोगी कार्य हे गणेशोत्सवाचा आत्मा राहिलेला आहे.

तक्रार मागे घेण्यावरून मेहुणीचा विनयभंग

$
0
0
पोलिसात दिलेली तक्रार मागे घेण्याच्या कारणावरून तरुणीचा घरात घुसून विनयभंग केल्याचा प्रकार रविवारी सायंकाळी पडेगाव भागात घडला. या प्रकरणी आरोपीविरुद्ध छावणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मेमरी कार्डची क्षमता वाढणार

$
0
0
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या फिजिक्स विभागाने ‘फेरो इलेक्ट्रिक कम्पाउंड’ बनविण्याची नवीन सोपी व सुटसुटीत पद्धत शोधून काढली आहे. या पद्धतीला पेटेंट मिळाले असून, त्यावर ऑस्ट्रेलिया सरकारने यावर मंजुरीची मोहर लावलेली आहे.

रुपयासाठी तेलबियांची मात्रा

$
0
0
तेलबियांबाबत केंद्र सरकारने स्पष्ट भूमिका घेतली पाहिजे आणि तेलबियांच्या निर्यातीला प्रोत्साहन दिले, तर रुपयाची घसरणही थांबू शकते, अशी सूचना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी सोमवारी लातुरात केली.

दुष्काळाच्या सावटावर मात

$
0
0
समस्त भाविकांचे आकर्षण असणाऱ्या गणेशोत्सवाला उस्मानाबादमध्येही सोमवारी उत्साहात सुरुवात झाली. गणरायाचा जयघोष, लेझीम-दांडियाद्वारे उत्साही मिरवणूक आणि फटाक्यांची आतीषबाजी यांच्या साथीने भाविकांचे लाडके बाप्पा मखरामध्ये विराजमान झाले.

वेलकम हो बाप्पा... वेलकम

$
0
0
विद्येची देवता असणाऱ्या गणरायाचे सोमवारी मराठवाड्यामध्ये उत्साहात स्वागत करण्यात आले. गणेशाच्या आगमनावेळीच नांदेड, हिंगोली आणि परभणीच्या परिसरामध्ये पावसाचेही पुनरागमन झाल्यामुळे भाविकांमध्ये चैतन्याचे वातावरण होते.

पावसानेही केले विघ्नहर्त्याचे स्वागत

$
0
0
मराठवाड्याच्या विविध जिल्ह्यामध्ये रविवारी सायंकाळनंतर पावसाने हजेरी लावली. सोमवारी संध्याकाळपर्यंत अधूनमधून पाऊस हजेरी लावत असल्यामुळे चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे. या पावसामुळे खरीपाच्या पिकांना जीवदान मिळाले आहे.

थकबाकी कामगारांच्या माथ्यावर

$
0
0
‘महावितरण’ने कृषी पंपाची थकबाकी वसुलीसाठी तांत्रिक कामगारांना जुंपण्यास सुरुवात केली आहे. थकबाकी वसुली न करणाऱ्यांना आर्थिक दंड व शिस्तभंग कारवाईची भीती घालण्यात आल्याने तांत्रिक कामगार धास्तावले आहेत.

ध्यान-अध्यात्मातूनच स्वविकास शक्य

$
0
0
ध्यान व अध्यात्म याची सांगड घातली, तरच जीवन योग्य प्रकारे जगता येईल. विद्यार्थी दशेत ध्यानाचे प्रकार शिकवले गेले, तर त्यामुळे स्वविकास होण्याला वाव मिळेल, असे प्रतिपादन ज्येष्ठ विधीज्ञ अॅड. पी.एम.शहा यांनी केले.

अन्ननलिकेत अडकली अंगठी

$
0
0
एक महिन्याच्या बालिकेच्या अन्ननलिकेत अडकलेली अंगठी काढण्यात एमजीएम हॉस्पिटलमधील डॉक्टरांना यश आले. यासंदर्भात मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. प्रवीण सूर्यवंशी यांनी सांगितले, ‘पाच सप्टेंबर रोजी आमच्याकडे जालन्यातील एक दाम्पत्य आपल्या एक महिन्याच्या बालिकेला घेऊन आले. तिच्या घशात चांदीची अंगठी अडकली होती.

पाणीप्रश्नावरील आंदोलने हा राष्ट्रवादीचा ‘देखावा’

$
0
0
मराठवाड्याला हक्काचे पाणी देण्यास नगर जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री विरोध करीत आहेत तर, औरंगाबाद जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे नेते पाण्यासाठी निदर्शने करीत आहेत. या विसंगतीतून राष्ट्रवादीचे ‘देखावा’ आंदोलन कळते अशी टीका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केली आहे.

पुण्यातील कॅडेट कॅनॉट प्लेसमधून बेपत्ता

$
0
0
पुण्यातून छावणी येथील आर्मी कॅम्पमध्ये मिडटर्म ब्रेकसाठी आलेला प्रश‌िक्षणार्थी कॅडेट रविवारी कॅनाॅट प्लेस भागातून बेपत्ता झाला आहे. गिरीशकुमार सुनकर असे या जवानाचे नाव असून, या प्रकरणी छावणी पोलिस ठाण्यात बेपत्ता असल्याची नोंद करण्यात आली आहे.

अल्पवयीन मुलीची छेडछाड

$
0
0
ट्युशनवरून घरी परतणाऱ्या मुलीची छेडाछाड करण्याची घटना रविवारी सायंकाळी शांतीपुरा भागात घडली. या आरोपींना जाब विचारण्यास गेलेल्या मुलीच्या आईला शिवीगाळ करण्यात आली.

शहागंजचा बस स्टॉप धूळखात

$
0
0
शहागंज येथे सुमारे एक ते दीड लाख रुपये खर्चून शेड बांधण्यात आले; मात्र या बसस्टँडवरून शहर बससेवा दिली नसल्यामुळे प्रवासी या सुविधेचा कोणताही लाभ घेऊ शकत नाहीत. गेल्या दोन महिन्यांपासून बस स्टॉप अक्षरशः पडून आहे.

गणेशोत्सवात राष्ट्रभक्तीचे धडे

$
0
0
गणेशोत्सवात सवंग फिल्मी गाण्यांचा धांगडधिंगा वाढल्याच्या पार्श्वभूमीवर ‘स्वरविहार’चे प्रसिद्ध गायक प्रा. राजेश सरकटे यांनी सांस्कृतिक प्रदूषण दूर करण्यासाठी पुढाकार घेतला आहे.
Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images