Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

सांडपाण्याने वेढले भूजल

$
0
0


Tushar.Bodkhe
@timesgroup.com
औरंगाबाद : प्रक्रियेशिवाय नदीत सोडले जाणारे सांडपाणी आणि औद्योगिक वसाहतीच्या रसायनयुक्त पाण्याने औरंगाबाद शहर व परिसरातील भूजल साठे कमालीचे दूषित झाले आहेत. गुणवत्तायुक्त जलसाठे घटल्यामुळे ४० टक्के शहरवासीयांना पाणी टंचाईचे आव्हान आहे. जमिनीत मुरणारे दूषित पाणी रोखण्यासाठी शासकीय पातळीवर प्रभावी यंत्रणा नसल्याने जमीन आणि भूजल साठ्यांची अतोनात हानी सुरू आहे.
प्राचीन काळापासून नहर-ए-अंबरी, बारव आणि विहिरींनी औरंगाबाद शहराला पाणी पुरवठा केला. शहर विस्तारीकरणानंतर जायकवाडी प्रकल्पातून पाणी पुरवठा सुरू आहे. मात्र, अजूनही ४० टक्के नागरिक कूपनलिका, विहिरी, तलाव आणि बारव या स्रोतांचा उपयोग करतात. मात्र, शहरीकरणात गुणवत्तायुक्त पाणी प्रचंड दूषित झाले. देवगिरी महाविद्यालयातील भूशास्त्र विभागाच्या शहर सर्वेक्षणात महत्त्वाच्या नोंदी घेण्यात आल्या आहेत. पावसाळ्यापूर्वी आणि पावसाळ्यानंतर अशा दोन टप्प्यात सर्वेक्षण झाले. जुने शहर, औद्योगिक परिसर आणि नवीन शहर परिसरातील भूजल साठे, नाले आणि नदीच्या पाण्यांचे नमुने तपासण्यात आले. 'औद्योगिक परिसरातील गावांमध्ये भीषण स्थिती आहे. कारखान्यातील दूषित घटकांनी पाणी व जमीन धोक्यात आहे. विहिरी व बारवांचे पुनरूज्जीवन नसल्याने त्यांचे रूपांतर कचराकुंडीत झाले आहे. पाण्याची गुणवत्ता कायम ठेवण्यासाठी उपाययोजना नसल्याने प्रदूषणाची तीव्रता वाढत आहे' असे भूशास्त्र विभागप्रमुख व जलतज्ज्ञ डॉ. अशोक तेजनकर यांनी सांगितले. सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी महापालिकेची यंत्रणा नाही. दोन सांडपाणी प्रक्रिया केंद्रात पुरेसे काम नाही. त्यामुळे सांडपाणी नदीत सोडल्यानंतर जमिनीत झिरपण्याचे प्रमाण वाढले आहे. विशेषतः औद्योगिक वसाहतींनी शहर परिसराला विळखा घातला आहे. भूजल साठे दूषित करण्यासोबतच जमिनी नापीक करण्यास रसायनयुक्त पाणी कारणीभूत ठरले आहे. वाळूज भागातील १८ गावांमध्ये क्षारयुक्त पाणी असून पिण्याच्या पाण्याचे स्रोत रहिवासी शोधत आहेत. कारखान्याच्या पाण्यावर प्रक्रिया करण्याचा नियम आहे; मात्र, खर्चात कपात करण्यासाठी कारखान्यांनी नियम धुडकावला. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या दुर्लक्षामुळे प्रदूषणाची पातळी वाढली आहे. त्वचाविकार, हाडांची ठिसूळता, नेत्रविकार या व्याधींनी लोक त्रस्त आहेत. शेतीच्या उत्पादकतेवरही प्रतिकूल परिणाम झाला आहे. जटवाडा ते होलिक्रॉस शाळेपर्यंतच्या नदीत मैलायुक्त सांडपाणी आहे. रांजणगाव शेणपुंजी, सावखेडा व वाळूज परिसरात कंपन्यांचे दूषित पाणी आहे. पाच वर्षात प्रदूषित पाणी पातळीत वाढ झाली असून भूजल साठे कायमचे प्रदूषित होण्याची शक्यता आहे.
-
पाणी टंचाई फक्त अत्यल्प पावसावर अवलंबून नसून पाणी नियोजन व पुनर्भरण या घटकांवरही अवलंबून असते. जलसाक्षरता वाढल्यास पाण्याचा काटकसरीने वापर होऊन पाण्याचा पुनर्वापर वाढेल. लोकसहभाग आणि प्रशासनाच्या प्रयत्नातूनच भूजल साठे सुरक्षित ठेवता येतील.
-डॉ. अशोक तेजनकर, जल अभ्यासक
-
माती, मुरूम व खडकातून सांडपाणी झिरपल्यास वेगवेगळी परिणामकारकता दिसते. फिनॉल, डिटर्जंट अशी रसायने जमिनीत झिरपल्यामुळे पाणी लाल किंवा पिवळे झाल्याचे दिसते. सांडपाणी प्रक्रिया करूनच ओढे किंवा नदीत सोडावे. खर्च वाचवण्यासाठी दुर्लक्ष केल्यामुळे गंभीर निर्माण होतात.
- डॉ. बी. एम. मुळे, पर्यावरण तज्ज्ञ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


प्रकल्प गेले गाळाला; ५ टक्के पाणी तळाला

$
0
0


औरंगाबाद : दुष्काळी मराठवाड्यातले प्रकल्प तळाला गेले आहेत. विभागात असलेल्या लहान मोठ्या प्रकल्पांमधील पाण्याचे वेगाने बाष्पीभवन होत आहे. सध्या विभागातील ८४४ प्रकल्पांमध्ये फक्त ५ टक्के (३८५.०७ दशलक्ष घनमीटर) पाणी शिल्लक आहे.
अत्यल्प पर्जन्यमानामुळे संपूर्ण मराठवाड्यात पुन्हा एकदा दुष्काळाची होरपळ सुरू आहे. सध्या विभागामध्ये असलेल्या पाणीसाठ्यांमध्ये प्रचंड घट होत आहे. सिद्धेश्वर, माजलगाव, मांजरा, निम्न तेरणा, निम्न मनार, सीना-कोळेगाव या मोठ्या प्रकल्पांमधील पाणी जोत्याखाली गेले आहे. मराठवाड्यातील ११ मोठे, ७५ मध्यम, ७२९ लघु प्रकल्प, गोदावरी नदीवरील ११ व मांजरा नदीवरील १८ बंधारे अशा ८४४ प्रकल्पांत सध्या ३८५.०७ द.ल.घ.मी. उपयुक्त पाणीसाठा आहे. हा साठा वेगाने कमी होत असल्याने मराठवाड्यात पाण्याचा प्रश्न गंभीर निर्माण झाला आहे. मराठवाड्यात अत्यल्प पर्जन्यमानामुळे गेल्यावर्षीपेक्षा पाण्याची स्थिती बिकट झाली आहे. २०१५ मध्ये १८ मार्च रोजी मोठ्या प्रकल्पांमध्ये ९४१ दलघमी (१५ टक्के) पाणीसाठा होता. तर मध्यम प्रकल्पांमध्ये ११९.४४ दलघमी (१३ टक्के) तर लघु प्रकल्पांमध्ये १२० दलघमी (८ टक्के) उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध होता. यामुळे यंदा गेल्यावर्षीच्या तुलनेत परिस्थिती गंभीर आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तरुणांनो ध्येय निश्चित करा, शिस्त बाळगा!

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
'देश प्रगती करतो आहे. सरकार कौशल्याधारित स्किलवर भर देत आहे. त्याला अनुसरून युवकांनी सक्षम व्हावे. आपले ध्येय निश्चित करत, शिस्त अंगी बाळगावी,' असे आवाहन उद्योजक वेदांतबाबू बिर्ला यांनी सोमवारी केले. देवगिरी इंजिनीअरिंगच्या गॅदरिंगमधील पारितोषिक वितरण सोहळ्याला त्यांनी हजेरी लावली. त्यावेळी वेदांतबाबू बोलत होते.
कॉलेजच्या मैदानावर आयोजित सोहळ्याला व्यासपीठावर पोलिस अधीक्षक नवीनचंद्र रेड्डी, उद्योजक मुकुंद कुलकर्णी, प्रशांत नरवडे, विवेक भोसले, रमेश शिराढोणकर, प्रदीप चव्हाण, विश्वास येळीकर, अॅड. मोहन सावंत, संचालक डॉ. उल्हास शिऊरकर यांची प्रमख उपस्थिती होती. यावेळी वेदांतबाबू बिर्ला म्हणाले, 'भारत विविध क्षेत्रामध्ये प्रगती करत आहे. मेक इन इंडियासारख्या योजना भारताचे वेगळे स्थान निर्माण करत आहेत. यात तरुणांनी सहभाग घ्यावा. स्वतःचे कौशल्य विकसित करून देशासाठी काय करता येईल असा प्रयत्न करावा. परदेशात विद्यार्थ्यांना आपले क्षेत्र निवडायची संधी सुरुवातीपासून असते. मात्र, आपल्याकडे शालेय स्तरावर अशी व्यवस्था नाही. आपल्याला या स्तरावर विशेष लक्ष देण्याची गरज आहे.
औरंगाबादच्या युवकांना बिर्ला ग्रुप संधी देणार
'आम्ही स्टील उद्योगात आहोत. कंपनीसाठी निवडण्यात येणाऱ्या मनुष्यबळातील २० टक्के निवड कॅम्पस इंटरव्ह्यूमधून करतो. ही संधी औरंगाबादमधील विद्यार्थ्यांना देण्याचा आमचा प्रयत्न असेल. विद्यार्थ्यांनी नवीन तंत्रज्ञान, कौशल्य आत्मसात करण्यावर भर द्यावे,' असे आवाहन वेदांतबाबू यांनी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पलाशच्या मृत्युप्रकरणी प्लेसमेंट एजंटाविरुद्ध गुन्हा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
इराण येथे जहाज अपघातात मृत्युमुखी पडलेल्या पलाश बलसेटवार याच्या पालकांनी दिलेल्या तक्रारीवरून मुंबई येथील सी रँक शिप मॅनेजमेंटच्या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोमवारी बलसेटवार कुटुंबीयांनी पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांची भेट घेतल्यानंतर आर्थिक गुन्हेशाखेत हा गुन्हा नोंदवण्यात आला.

पलाशचे वडील दत्ता बलसेटवार यांनी याप्रकरणी तक्रार दिली. नोव्हेंबर २०१५मध्ये एका स्थानिक वर्तमानपत्रात नाशिक येथील प्लेसमेंट कंपनीची जाह‌ीरात आली होती. नाशिक येथील हेमंत नावाच्या तरुणासोबत त्याचा संपर्क झाल्यानंतर त्याने मुंबई येथील सी रँक शिप मॅनेजमेंट या प्लेसमेंट कंपनीशी संपर्क साधण्याचे सांगितले होते. या कंपनीचे विकास कदम व संजीव नावाच्या एजंटासोबत बलसेटवार यांचे बोलणे झाले होते. यावेळी त्यांनी इराण येथे कॅडेट आॅफिसर म्हणून नोकरी असून, त्यासाठी तीन लाख रुपये लागतील, असे सांगितले. यानंतर बलसेटवार यानी हेमंतच्या खात्यावर पन्नास हजार; तसेच मुंबई येथील सी रँक शिपच्या कार्यालयात विकास कदम व संजीव यांना दीड लाख रुपये दिले यावेळी त्याना लेखी अॅग्रिमेंट देण्यात आले. यानंतर पलाशला इराणला पाठवण्यात आले. उर्वरित एक लाख रुपये हेमंतच्या खात्यावर बलसेटवार यानी जमा केले. यानंतर पलाशला जहाजावर पाठवण्यात आले, असे तक्रारीत म्हटले आहे. पलाश याचे १४ मार्च रोजी कुटुंबीयांसोबत व्हिडिअो कॉलिंगद्वारे शेवटचे बोलणे झाले होते. यानंतर १७ मार्च रोजी त्याचा जहाज बुडाल्याने मृत्यू झाल्याचीच माहिती बलसेटवार कुटुंबीयांना‌ मिळाली. हा प्रकार कळताच बलसेटवार यांनी सी रँक शिपचे विकास कदम यांना फोन लावला असता, त्यांनी संजीव याच्याशी संपर्क साधण्याचे सांगितले. संजीवशी संपर्क साधल्यानंतर, फक्त पलाश मिसिंग आहे. मी माहिती घेत आहे, एवढेच सांगत होता. ही घटना घडल्यानंतर बलसेटवार यांनी माहिती घेतली असता सी रँक शिप कंपनीकडे कोणताही अधिकृत परवाना नसताना त्यांनी वर्तमानपत्रात फसवी जाहीरात दिली. पलाशचा विश्वास संपादन करून तीन लाखांची फसवणूक केली. एजंसीच्या चुकीमुळे पलाशचा मृत्यू झाल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाचव्या अवयवदानासाठी शहर सज्ज

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
चार 'ब्रेन डेड' रुग्णांकडून झालेल्या तब्बल १७ अवयवांच्या दानानंतर पाचव्या अवयवदानासाठी शहर सज्ज झाले आहे. अपघातानंतर ५५ वर्षीय महिलेला एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते आणि सोमवारी (२१ मार्च) सकाळी संबंधित महिला 'ब्रेन डेड' झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केल्यानंतर नातेवाईकांनी अवयवदानाचा निर्णय घेतला. त्यामुळे सोमवारी मध्यरात्री शस्त्रक्रिया होऊन मंगळवारी पहाटे विमानाने यकृत मुंबईला पाठविण्याचे, तर दोन्ही मूत्रपिंड व दोन्ही कॉर्नियांचे प्रत्यारोपण शहरातील रुग्णालयांमध्ये करण्याचे नियोजन सोमवारी रात्रीपर्यंत करण्यात आले होते.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मंदाबाई किसन गाढवे (५५) यांचा १८ मार्च रोजी सिडको एन सहा परिसरात अपघात झाला आणि त्यांना एमजीएम वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरू असताना सोमवारी (२१ मार्च) सकाळी डॉक्टरांनी मंदाबाई यांना 'ब्रेन डेड' जाहीर केले. त्यानंतर नातेवाईकांनी त्यांच्या अवयवदानाचा निर्णय घेतला आणि रुग्णालयातील 'ब्रेन डेथ कमिटी'ने सहा-सहा तासांच्या अंतराने मंदाबाई यांना दोनदा तपासून 'ब्रेन डेड' घोषित केले व अवयवदानाची तयारी सुरू करण्यात आली. दरम्यान, 'झोनल ट्रान्स्प्लान्ट कोऑर्डिनेशन कमिटी'मार्फत (झेडटीसीसी) त्यांच्या रक्तगटाच्या विविध अवयवांचा देशभर शोध घेण्यात आला. त्यानंतर यकृत मुंबईच्या ग्लोबल हॉस्पिटलमध्ये पाठविण्याचा, तर दोन्ही मूत्रपिंड व दोन्ही कॉर्नियांचा (डोळ्यांचा पडदा) शहरातील विविध रुग्णालयांमध्ये प्रत्यारोपणाचा निर्णय घेण्यात आला. अवयव काढण्याच्या शस्त्रक्रियेसाठी ग्लोबल हॉस्पिटलच्या डॉक्टरांची टीम सोमवारी रात्री साडेदहापर्यंत येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. त्याचवेळी एका मूत्रपिंडाचे प्रत्यारोपण कायद्यानुसार एमजीएम रुग्णालयामध्येच, तर दुसऱ्या मूत्रपिंडाचे प्रत्यारोपण शहरातील कमलनयन बजाज हॉस्पिटल किंवा माणिक हॉस्पिटल किंवा सेठ नंदलाल धूत हॉस्पिटलमध्ये होणार आहे. तसेच दोन्ही कॉर्नियांचे प्रत्यारोपणही एमजीएम रुग्णालयामध्ये होणार असल्याचे समजते. मध्यरात्री तीन वाजता अवयव काढण्याची शस्त्रक्रिया सुरू होऊन पहाटे सहाच्या 'जेट एअरवेज'च्या विमानाने मुंबईला यकृत पाठविण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
'ब्लॉक्स'मुळे हृदय प्रत्यारोपण हुकले
चेन्नईच्या फोर्टिस रुग्णालयामध्ये संबंधित 'ब्रेन डेड' महिला रुग्णाच्या रक्तगटाचा रुग्ण होता व या रुग्णावर हृदयाचे प्रत्यारोपण करणे शक्यही होते. मात्र, संबंधित 'ब्रेन डेड' महिला रुग्णाचे वय ५५ पेक्षा जास्त असल्यामुळे प्रोटोकॉलनुसार अँजिओग्राफी करण्याचा निर्णय घेण्यात आला. या अँजिओग्राफीमध्ये संबंधित 'ब्रेन डेड' रुग्णाच्या हृदयामध्ये ब्लॉक्स असल्याचे निदान झाल्यानंतर हृदय प्रत्यारोपणाचा निर्णय रद्द करण्यात आला.
.. तर २ महिन्यांत २२ अवयवांचे रोपण
शहरातील पाचवे 'ब्रेन डेड' रुग्णाचे अवयवदान यशस्वी झाल्यास आणि यकृत, दोन मूत्रपिंड, दोन कॉर्नियाचे प्रत्यारोपण झाले तर केवळ दोन महिन्यांत २२ अवयवांचे रोपण होणार आहे. शहरात १७ जानेवारी रोजी पहिले अवयवदान झाले होते. त्यातच पहिल्या वेळेस महिला रुग्णाकडून अवयवदान होत आहे, हेही विशेष.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हिंदू-मुस्लिम कुटुंबांत किडनीची देवाण-घेवाण

$
0
0

औरंगाबाद : सहिष्णूता, माणुसकी अजूनही जिवंत आहे. माणसासाठी आजही माणसाचा जीव तुटतो. मूत्रपिंड निकामी झालेल्या दोन वेगवेगळ्या रुग्णांना एकमेकांच्या कुटुंबातील महिला दात्यांनी मूत्रपिंड देऊन जीवनदान दिले. हिंदू-मुस्लिम कुटुंबामध्ये झालेले हे माणुसकीचे दान, ९ मार्च रोजी कमलनयन बजाज रुग्णालयात झाले.

परभणी जिल्ह्यातील पाथरी येथील ३४ वर्षीय मोईझ सिद्द‌िकी यांचे दोन्ही मूत्रपिंड अचानक निकामी झाले. गेल्या दहा महिन्यांपासून त्यांच्यावर डायलिसिस सुरू होते. त्यांची पत्नी अर्झा मोईझ सिद्द‌िकी (२८) यांनी त्यांना मूत्रपिंड (किडनी) देण्याचा निर्णय घेतला; परंतु त्यांचा रक्तगट 'ए पॉझिटिव्ह' होता. त्यांचे पती मोईझ यांचा रक्तगट हा 'बी पॉझिटिव्ह' होता. रक्तगट जुळत नसल्यामुळे त्यांना किडनी देता येत नव्हती. त्याचवेळी मोईझ यांना वडील नाहीत, तर आई कर्करोगानेग्रस्त आहे. घरामध्ये दोन-दोन रुग्ण असल्यामुळे सर्वच कुटुंबीय त्रस्त होते. तर, दुसरीकडे वंजारवाडी (ता. बदनापूर, जि. जालना) येथील नर्मदा सुरेश धुमक (३०) यादेखील दोन्ही मूत्रपिंड निकामी झाल्याने तब्बल अडीच वर्षांपासून डायलिसिसवर होत्या. त्यांचे पती सुरेश धुमक यांचा रक्तगट 'बी निगेटिव्ह' व नर्मदा यांची आई कांताबाई नारायण चौधरी (४५) यांचा रक्तगट 'बी पॉझिटिव्ह', तर नर्मदा यांचा रक्तगट 'ए पॉझिटिव्ह' होता. त्यामुळे कुणाचाच रक्तगट जुळत नव्हता आणि म्हणून त्यांचेही प्रत्यारोपण रखडले होते. दरम्यान, दोन्ही कुटुंबातील दात्यांचा व परस्पर दुसऱ्या कुटुंबातील रुग्णांचा रक्तगट सारखाच असल्याचे लक्षात आल्यानंतर या प्रकारच्या प्रत्यारोपणाचा (स्वॅप ट्रान्स्प्लान्ट) निर्णय घेण्यात आला. ठरल्यानुसार मोईझ सिद्दीकी यांना कांताबाई नारायण चौधरी यांनी, तर नर्मदा धुमक यांना अर्झा मोईझ सिद्द‌िकी यांनी किडनी दिली. दोन्ही प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रिया यशस्वी झाल्या आणि त्यांना सोमवारी (२१ मार्च) 'कमलनयन'मधून सुटी देण्यात आली.

शस्त्रक्रिया 'जीवनदायी'त
दोन्ही प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रिया राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेअंतर्गत झाल्याची माहिती उपचार करणारे मूत्रपिंडविकारतज्ज्ञ डॉ. सचिन सोनी यांनी 'मटा'ला दिली. डॉ. सोनी यांच्यासह डॉ. गणेश बर्नेला, डॉ. अजय ओसवाल, डॉ. जगदीश कंदी, डॉ. दिनेश लहिरे यांनी पुढाकार घेतला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गुरुमंत्र ः विज्ञान अध्यापनाची आगळी पद्धत

$
0
0

Ashish.Choudhari@timesgroup.com
विज्ञान विषय शिकविणे सोपे नाही. प्रात्यक्षिके, आकृत्या यांच्या माध्यमातून विषयाच्या विविध संकल्पना शिकवाव्या लागतात. विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोनातून रुजावा, त्यांच्यामध्ये विज्ञानाविषयी गोडी निर्माण व्ह‌ावी, यासाठी शालेय स्तरावर हा विषय चांगल्या पद्धतीने शिकविणे महत्त्वाचे ठरते. हेच विद्यार्थी पुढे शास्त्रज्ञ, संशोधक होतात.
सिडको एन-नऊ भागातील पवननगरमधील 'पायोनिअर्स सेकंडरी स्कूल'च्या रागिणी पाठक-भालेराव यांनी विज्ञान विषय शिकविताना वेगळ्या पद्धतीचा अवलंब केला आहे. वैज्ञानिक संकल्पनांचा दैनंदिन जीवनात वापर केला जातो. ही उदाहरणे देऊन त्या विज्ञान विषय शिकवितात. त्यामुळे वैज्ञानिक संकल्पना विद्यार्थ्यांना चटकन समजतात.

बीएस्सी, बीएड असलेल्या पाठक यांनी जीवनशास्त्रामध्ये पदव्युत्तरचे शिक्षण पूर्ण केले. आठ वर्षांपासून त्या शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. हायस्कूलमध्ये आठवी, नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांना त्या शिकवितात. विज्ञान हा विषय किचकट वाटता कामा नये. त्यासाठी प्रात्य‌क्षिकांमध्ये त्यांच्या विद्यार्थ्यांचा सहभाग अधिक असतो. केवळ पुस्तकातील धडे शिकवून हा विषय विद्यार्थ्यांपर्यंत पूर्णपणे पोहोचत नाही. तो समजावून सांगण्यासाठी दैनंदिन जीवनातील उदाहरणे देण्यावर त्यांचा भर असतो. टाकाऊ वस्तूपासून त्या उपकरणे तयार करण्यासाठी आग्रही असतात. सोलार सिस्टिम मॉडेल तयार करण्याचे त्यांनी विद्यार्थ्यांना शिकविले आहे. बॉल, तार, मोटार, स्ट्रॉ, मणी अशा घरातील अनेक टाकाऊ वस्तू विद्यार्थी आणतात. या वस्तूंच्या मदतीने उपकरणे तयार केले जातात. ही उपकरणे वर्गात मांडून त्यांचे परीक्षण अन्य विद्यार्थी करतात. यामुळे विद्यार्थ्यांसाठी विज्ञान विषय सोपा झाला आहे. कृतीशिल उपक्रमांची आखणी करून विषय शिकविण्याच्या पद्धतीमुळे त्या विद्यार्थीप्रिय शिक्षिका झाल्या आहेत. विद्यार्थ्यांना प्रकाशाचे परावर्तन व अपवर्तन लक्षात रहावे म्हणून त्यांनी वर्गात कॅलिडोस्कोपची निर्मिती केली. आठवीच्या विद्यार्थ्यांकडून रोग, त्यांचे प्रकार व उपाययोजना यांची माहिती असलेले स्क्रॉपबुक तयार करून घेतले आहे. वर्तमानपत्रात आलेली

माहिती संकलित करून एक पुस्तक तयार केले आहे. विद्यार्थ्यांना ही माहिती पाठ झाली आहे. शालेय स्तरावरील विज्ञान हा बेसिक विषय आहे. विद्यार्थ्यांमध्ये जिज्ञासा असते. त्याच्या विचार करून दैनंदिन गोष्टींच्या आधारे विज्ञान विषय शिकविला तर, तो अधिक खोलवर रुजते. आठवी, नववीच्या अभ्यासक्रमात कृतीशील उपक्रमांचा सहभाग वाढतो आहे, असे त्या सांगतात.

प्रत्यक्ष भेटीवर भर, रांगोळीतून आकृत्या : शालेय विद्यार्थ्यांना विज्ञानातील संकल्पना समजाव्यात म्हणून टाकाऊ वस्तूंपासून उपकरणे तयार करण्यावर त्यांचा भर असतो. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना वीज निर्मिती कशी होते, दूधसंकलन केंद्रावर काम कसे चालते हे समजण्यासाठी विद्यार्थ्यांना तेथे नेण्यात येते. जल विद्युत प्रकल्प पाहण्यासाठी पैठण येथील विद्युत निर्मिती केंद्राला भेट दिली. विद्यार्थ्यांना विज्ञानातील आकृत्या काढणे सोपे जावे, त्यांना त्याचा आशय समजावा म्हणून त्या रांगोळी स्पर्धा आयोजित करतात. त्यात विद्यार्थ्यांनी उत्साहात सहभाग नोंदवितात.


ऊर्जा वाहिनीची स्थापना
'नॅशनल एनव्हायर्मेंट अँड एनर्जी डेव्हलपमेंट मिशन'तर्फे घेण्यात आलेल्या प्रशिक्षण वर्गात रागिणी पाठक सहभागी झाल्या होत्या. आजचे विद्यार्थी उद्याचे नागरिक असल्याकारणाने ऊर्जा बचतीची संकल्पना विद्यार्थ्यांच्या मनामध्ये रुजविण्यासाठी तेथे मार्गदर्शन करण्यात आले. यानंतर शाळेत पाठक मॅडम यांनी विद्यार्थ्यांच्या सहभागाने ऊर्जा वाहिनीची स्थापना केली. त्यात २० विद्यार्थ्यांचा सहभाग आहे. त्यातील विद्यार्थ्यांना ऊर्जा रक्षक म्हटले जाते. शाळेमध्ये विजेचा अपव्यय होऊ नये, याची काळजी हा विद्यार्थ्यांचा संघ घेतो. वर्गातील तासिका संपल्यानंतर फॅन, बल्ब आदी विजेची उपकरणे बंद आहेत की नाही, याची पाहणी केली जाते. वर्गशिक्षक विजेचे उपकरण बंद करण्याचे विसरला तर हे विद्यार्थी एक कार्ड त्यांना देतात. त्याची रितसर रजिस्टरमध्ये नोंद होते. महिन्याच्या किंवा वर्षाच्या शेवटी संबंधित कार्डधारक शिक्षा म्हणून एक रोपटे भेट म्हणून देतो.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वॉटरपार्क, स्विमिंग पूल लवकरच होणार बंद

$
0
0


औरंगाबाद : अत्यल्प पर्जन्यमानामुळे भीषण पाणीटंचाई निर्माण झाली असून, पाण्याचा अपव्यव टाळणे व टंचाई परिस्थिती लक्षात घेता वॉटरपार्क व जलतरण तलाव पावसाळा सुरू होईपर्यंत बंद ठेवण्याबाबत निर्णय घ्यावा, असे पत्र जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी जिल्हाप्रशासनाला पाठवले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून हे पत्र महापालिका आणि जिल्हा परिषदेला पाठवण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
शहर परिसरामध्ये अनेक ठिकाणी स्विमिंग पूल असून उन्हाळ्यामध्ये येथे पोहण्यासाठी मोठ्याप्रमाणावर गर्दी होते. या स्विमिंग पूलवर वार्षिक तसेच प्र‌ति महिना शुल्कही आकारण्यात येते. जिल्ह्यातील तीव्र पाणीटंचाईमुळे येत्या काही दिवसातच हे स्विमिंग पूल पावसाळ्यापर्यंत बंद करण्यात येणार आहेत. राज्यात काही वर्षांपासून पावसाचे प्रमाण व वेळा अनिश्चित झाल्याने पाण्याची उपलब्धता कमी होत असून, मराठवाड्यात मात्र दुष्काळाने सर्वसामान्य जनता होरपळुन निघाली आहे. जलसंपदा मंत्र्यांनी प्रशासनाला पाठवलेल्या पत्रामध्ये सध्या राज्यात भीषण पाणीटंचाईची परि‌स्थिती आहे. या परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी राज्यातील जनतेमध्ये पाण्याच्या नियोजनबद्ध वापराबाबत जागृती निर्माण करण्याची आवश्यकता आहे. वारंवार उद्भवणाऱ्या पाणीटंचाईच्या समस्येमुळे पाणी नियोजनाबाबत व्यापक जनजागृती होण्यासाठी शासनातर्फे संपूर्ण राज्यात जलजागृती सप्ताह साजरा करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून पाण्याचा अपव्यव टाळण्यासाठी वॉटरपार्क, जलतरण तलाव पावसाळा सुरू होईपर्यंत बंद ठेवण्यासंदर्भात कारवाई करावी तसेच धुळवडीदरम्यान पाण्याचा अपव्यय होणार नाही याची काळजी घ्यावी असे पत्रात म्हटले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


रेल्वे स्टेशनमधील फलाटावर धावली कार

$
0
0


औरंगाबाद : शनिवारी रात्री रेल्वे फलाटावर होंडा सिटी कार आणणाऱ्या चालकाला आरटीओ कार्यालयात लोहमार्ग पोलिसांनी अटक केली. त्याला जामिनावर सोडण्यात आले. मात्र, कार कोणाच्या मालकीची होती, कारमध्ये लाल दिवा कोणाचा होता याबाबत अद्याप माहिती मिळाली नाही.

रेल्वे स्टेशनच्या फलाट क्रमांक एकच्या दादऱ्यापर्यंत शनिवारी रात्री ९.३० ते ९.४० वाजेच्या दरम्यान होंडा सिटी कार (एम. एच २१ व्ही ७१२१) रिव्हर्स करून आणली होती. या प्रकरणात लोहमार्ग पोलिस ठाण्यासह रेल्वे सुरक्षा दल कार्यालयात गुन्हा नोंदविण्यात आला. लोहमार्ग पोलिसांनी गाडी क्रमांकावरून गाडी मालकाचा शोध घेऊन त्यांना घटनेची माहिती देण्यात आली होती. कारचालकाला आरटीओ कार्यालयात बोलविण्यात आले. त्या ठिकाणी कार चालक कृष्णा ढगे (रा. शिवाजीनगर, रेणुकानगर) याला अटक केली. ढगेला ताब्यात घेतल्यानंतर त्याची चौकशी केली असता, त्यांनी मालकाच्या मामाला आणण्यासाठी आपण स्टेशनला आलो होतो. आपण गाडी फलाटावर आणल्याची कबुली त्याने दिली. त्याला कोर्टात उभे केले असता, कोर्टाने जामीन मंजूर केल्याची माहिती लोहमार्ग पोलिस आनंद बनसोडे यांनी दिली. सूर्यकांत तौर यांच्याकडे ढगे कामाला होता. तौर हे व्यवसायिक असल्याची माहिती जीआरपीएफने दिली. मात्र, त्यांच्या मालकीच्या गाडीला लाल रंगाचा अंबर दिवा कोठून आला, याची माहिती ढगे यांनी दिली नसल्याचे माहिती लोहमार्ग पोलिसांनी सांगितले. स्टेशनच्या जुन्या इमारतीमध्ये चारचाकी गाडी घुसल्याची ही दुसरी वेळ आहे. या घटनेनंतर रेल्वे सुरक्षा दलाने रेल्वे अभियंता विभागाला रेल्वे स्टेशनच्या प्रवेशद्वारात लोखंडी गज लावून कोणतीही गाडी येणार नाही, यासाठी व्यवस्था करण्याचे पत्र देण्यात आले आहे.
-
रेल्वे स्टेशनवर फलाटावर कार घुसल्याची घटना गंभीर आहे. याबाबत संबंधित सुरक्षा विभागाकडून माहिती मागविण्यात आली आहे. दोषींवर कडक कारवाई करण्यात येईल.- ए. के. सिन्हा, विभागीय रेल्वे व्यवस्थापक, नांदेड

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वेगळा मराठवाडा नकोच

$
0
0

राज्याचे महाधिवक्ता श्रीहरी अणे यांनी रविवारी जालन्यात एका कार्यक्रमात वेगळ्या विदर्भाचा मुद्दा मांडताना मराठवाडाही वेगळे राज्य करावे, अशी भूमिका मांडली होती. अणे यांनी वेळोवेळी वेगळ्या विदर्भाचा मुद्दा उपस्थित करून राज्यातील राजकीय, सामाजिक वर्तुळात खळबळ उडवून दिली. मराठवाडा स्वतंत्र राज्य करावे, या त्यांच्या वक्तव्याचा सर्व स्तरातून निषेध करण्यात आला. विविध राजकीय, सामाजिक संस्थांच्या प्रतिनिधींनी महाराष्ट्र एकसंध राहावा, अशी अपेक्षा व्यक्त केली.

फुकटचा सल्ला देण्याची गरज नव्हती
मराठवाडा स्वतंत्र राज्य करा, असा फुकटचा सल्ला श्रीहरी अणे यांनी देण्याची गरज नव्हती. त्यांनी कुणीही तसा सल्ला विचारला नव्हता. शासनाने त्यांच्याकडे जे काम सोपवले आहे, ते काम त्यांनी निमूटपणे करावे. सल्ले देत बसण्याची उठाठेव त्यांनी करू नये. श्रीहरी अणे आणि मराठवाडा यांचा संबंध काय. मराठवाड्याशी त्यांचा काहीही संबंध नसताना त्यांनी त्यांनी स्वतंत्र राज्याची वल्गना का करावी. अशी वक्तव्ये करून अणे नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यांचे त्या विधानाचा निषेध आम्ही विधानसभेतही केला आहे. श्रीहरी अणे यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी करून आम्ही विधानसभेचे सोमवारचे कामकाज बंद पाडले आहे. त्यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर मी स्वतः ठाम आहे.
- संजय शिरसाट,आमदार, शिवसेना.

...तर करार संपुष्टात
विदर्भाची निर्मिती झाली तर नागपूर करार संपुष्टात येणार आहे. या करारात मराठवाडा, महाराष्ट्रात बिनशर्त सामील झाला आहे. मराठवाड्याचे स्वतंत्र अस्तित्व अपरिहार्य आहे. विधिमंडळात स्वतंत्र विदर्भाचा ठराव होईल त्याचवेळी वेगळ्या मराठवाड्याचा ठराव केला पाहिजे, अशी आग्रही मागणी करण्यात येईल. ही जनता विकास परिषदेची भूमिका नसून ती वैयक्तिक आहे. परिषदेत प्रामुख्याने संयुक्त महाराष्ट्राच्या विचारांचे प्राबल्य आहे. गेल्या ५६ वर्षांत उपेक्षाच हाती आली आहे. परिषदेतही स्वतंत्र मराठवाड्याच्या बाजूने मते व्यक्त होत आहे. सापत्न वागणूकच मिळाली आहे. वैधानिक विकास मंडळाचा उपायसुद्धा तकलादू ठरला आहे. वेगळ्या राज्याशिवाय पर्याय नाही. आज मराठवाड्यात त्यासाठी चळवळ नाही, पण ते करण्यासाठी अनेक समूह सक्रिय झाले आहेत. आज मराठवाड्यातील सामान्य जनतेचा पाठिंबा नसला तरी उद्या माझ्या भूमिकेला निश्चितच पाठिंबा मिळेल. कारण गेल्या पाच दशकात मराठवाड्याचा विकास झालाच नाही.
- प्रदीप देशमुख, जेष्ठ वकील

हा शहिदांचा अपमान
अखंड महाराष्ट्रासाठी अनेकांनी बलिदान दिले. स्वातंत्र्यसैनिकांनी मोठा संघर्ष केला. शहिदांच्या बलिदानाचा हा अपमान आहे. विदर्भ, मराठवाडा स्वतंत्र करण्याचे अनेकदा वक्तव्य राज्याचे महाधिवक्ता श्रीहरी अणे यांनी केले आहे. त्यांचा बोलविता धनी कोण हे उघड झाले पाहिजे. त्यांची हकालपट्टी केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. घटनात्मक पदावर असलेल्या व्यक्तीने केलेले हे वक्तव्य निषेधार्ह आहे.
- सतीश चव्हाण, आमदार, राष्ट्रवादी काँग्रेस

विकासासाठी स्वतंत्र राज्य हवे
विदर्भाबरोबर मराठवाडा राज्याचीही निर्मिती व्हावी, असे राज्याचे महाधिवक्ता श्रीहरी अणे यांनी व्यक्त केलेले मत योग्य आहे, असेच म्हणावे लागेल. मराठवाडा संयुक्त महाराष्ट्रात सामील झाला, पण आतापर्यंत पश्चिम महाराष्ट्रासह मुंबई, पुणे, नाशिक आदी भागांचा विकास झाला आहे. त्या तुलनेते मराठवाडा हा विभाग मागासलेलाच राहिला, हे उघड सत्य आहे. मराठवाड्याने चार मुख्यमंत्री दिले, पण अपेक्षित विकास होऊ शकला नाही. शेवटचा पर्याय म्हणून छोट्या राज्याचा पर्याय स्वीकारला पाहिजे, असे मला वाटते.
- अविनाश डोळस, नेते भारिप बहुजन महासंघ

वेगळे होण्याची भाषा अयोग्य
मराठवाड्याला वेगळे करण्याची भाषा योग्य नाही. महाधिवक्ता श्रीहरी अणे यांनी केलेले वक्तव्य चुकीचे आहे. कोणत्याही स्वतंत्र राज्याचा विचार केल्यास, उद्योग, खनिज संपत्ती; तसेच त्या ठिकाणी उद्योगांचा विचार करण्याची गरज आहे, मात्र मराठवाड्याचा विचार केल्यास तशी कोणतीही व्यवस्था नाही. पर्यटन उद्योगावर मराठवाड्याचा निभाव लागू शकत नाही. यामुळे सध्यातरी याबाबतचा विचार करणे योग्य नाही. सध्या विदर्भात सुरू करण्यात आलेले प्रकल्प, विविध योजना कार्यान्वित करून विदर्भ स्वतंत्र्याच्या वाटेवर आहे. आतापर्यंतच्या सर्व सत्ताधाऱ्यांनी मराठवाड्यावर अन्याय केला आहे. हे जरी सत्य असले तरी मराठवाडा हा संयुक्त महाराष्ट्राचा भाग, तो वेगळा कोणीही करण्याची भाषा करू नये क‌िंवा त्याबाबत विचार ही करू नये.
- इम्तियाज जलील, आमदार, एमआयएम

विकासाला बाधक
श्रीहरी अणे यांची मागणी पूर्णपणे राजकीय आहे. भाजप हे लहान-लहान राज्यांचे समर्थन करते. मुख्यमंत्र्यांचा आकडा जास्त दाखवण्याचा हा फंडा असून, यातून विकास साधला जाऊ शकत नाही. स्वतंत्र मराठवाड्याची मागणी हे एक पॉलिटिकल स्टंट आहे.
- बुद्धीनाथ बराळ, कामगार नेते

पॉलिटिकल गेम
‌स्वतंत्र मराठवाडा राज्याची अणे यांची मागणी म्हणजे पॉलिटिकल गेम आहे. अणे हे विदर्भ स्वतंत्र होण्याच्या बाजूने आहेत, त्यामुळे ते मराठवाड्याला सोबत घेऊ पाहत आहेत, मात्र मराठवाड्याला वेगळे व्हायचे नाही. मराठी माणसांसोबत राहून स्वतचा विकास करून घ्यायचा आहे. मराठवाड्याला झुकते माप देण्याचे यशवंतरावांचे आश्वासन होते, ते पूर्ण होताना दिसत नाही. एखाद्या विभागाचा विकास करणे याचा सरकारच्या धोरणांशी संबंध येतो त्यामुळे वेगळे होऊन फार काही मिळणार नाही.
- डॉ. भालचंद्र कानगो, राज्य सचिव, भाकप

भावना तपासणे गरजेचे
वेगळा विदर्भ किंवा वेगळा मराठवाडा अशी भावना लोकांच्या मनात का निर्माण होते हे पाहणेही गरजेचे आहे. विकास झाला नसला की अशा भावना निर्माण होतात. विदर्भ आणि मराठवाड्याचा विकास आजवर साधला गेलेला नाही, अनुशेष दूर झाला नाही. विकास होणे आवश्यक आहे. आमचे सरकार महाराष्ट्राच्या विकासासाठी कटिबद्ध आहे.
- विजया रहाटकर, अध्यक्ष, राज्य महिला आयोग

मराठवाड्याचा विकास होणे आवश्यक
मराठवाडा महाराष्ट्रात सामील होताना काही अपेक्षा बाळगल्या होत्या. दुर्दैवाने त्यात यश आले नाही. सत्ता कोणाचीही असो विकास मात्र पश्चिम महाराष्ट्राचाच झाला. विदर्भाचाही विकास झाला किंबहुना ही आकडेवारी नुकतीच समोर आली. तुलनेत मराठवाडा मात्र मागासलेलाच राहिला. मराठवाडा वेगळा केला तर मुक्ती लढ्यात प्राणाची आहुती देणाऱ्यांवर अन्याय होईल. आम्ही हे कदापीही होऊ देणार नाही. त्याऐवजी मराठवाड्याच्या विकासासाठी सरकारने पुढाकार घेतला पाहिजे. श्रीहरी अणे यांचे वक्तव्य राज्यात दुफळी निर्माण करणारे आहे. गंभीर दुष्काळ पडलेला असताना दुसराच मुद्दा उपस्थित करून लक्ष दुसरीकडे वेधून घेण्याचा प्रयत्न होत आहे, हे दुर्दैवी आहे.
- सुभाष झांबड, आमदार, काँग्रेस

दुष्काळ आमच्यासाठी महत्त्वाचा
सध्या मराठवाडा दुष्काळाचे चटके सहन करीत आहे. सलग तिसऱ्या वर्षी मराठवाड्यात दुष्काळ पडला आहे. त्यावर काय उपाययोजना करता येते, याचा विचार न करता स्वतंत्र मराठवाडा राज्याची मागणी करणे योग्य नाही. मराठवाडा संयुक्त महाराष्ट्रात विनाअट सामील झाला. त्यावेळी मराठवाड्याने कोणतीही अपेक्षा ठेवली नाही. याचा अर्थ सत्ताधाऱ्यांनी मराठवाड्याकडे सतत दुर्लक्ष करावे, असा होत नाही. मराठवाड्याने लोकसभा व विधानसभा निवडणुकीत शिवसेना-भाजप युतीच्या बाजूने झुकते माप दिले आहे. त्यामुळे युतीने मराठवाड्याचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. श्रीहरी अणे यांनी स्वतंत्र मराठवाड्याचा उपस्थित केलेला मुद्दा समयोचित नाही. पूर्वीचे सरकार पश्चिम महाराष्ट्राच्या बाजूने होते. आताचे सरकार विदर्भाच्या बाजूने आहे. मराठवाड्याचा कुणी वालीच नाही का, असा प्रश्न निर्माण होतो.
- समीर राजूरकर, माजी नगरसेवक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाणीपुरवठ्यात दहा मिनिटांची कपात?

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

अकरा वॉर्डांतील एक दिवसआड पाणीपुरवठ्याचा निर्णय रद्द केल्यावर औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटी कंपनी शहरातील पाणीपुरवठ्यात येत्या काही दिवसांत सरसकट दहा मिनिटे कपात करण्याच्या विचारात आहे. जायकवाडी धरणातील झपाट्याने कमी होत असलेली पाणीपातळी आणि उन्हामुळे पाण्याची वाढलेली मागणी विचारात घेऊन किमान दहा मिनिटे पाणी कपात करण्याचा निर्णय होऊ शकतो, अशी माहिती सूत्रांनी दिली.

औरंगाबादला जायकवाडी धरणातून पाणीपुरवठा केला जातो. धरणातील पाण्याची पातळी मृतसाठ्याच्या खाली गेली आहे. त्यामुळे पाण्याच्या उपशावर परिणाम होत आहे. त्यामुळे कंपनीने रविवारपासून एक दिवसआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय रद्द केला. 'जायकवाडीतून उपसल्या जाणाऱ्या पाण्यात दहा ते पंधरा टक्के परिणाम झाला आहे. एवढे पाणी कमी प्रमाणात उपसले जात आहे,' असे कंपनीने प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

हे म्हणणे लक्षात घेतले तर शहराला जायकवाडी धरणातून सुमारे १४० एमएलडी (दशलक्ष लिटर रोज) पाणी मिळते. त्यात दहा ते पंधरा टक्के परिणाम झाल्याचे गृहित धरल्यास किमान १५ ते २० एमएलडी पाणी शहरात येणे कमी झाल्याचे मानले जाते. त्याशिवाय पाणी उपसा पूर्ण क्षमतेने होत नसल्यामुळे जलकुंभात पाण्याची पातळी देखील नियोजित वेळेत गाठली जात नाही. त्यामुळे कमी दाबाने पाणी पुरवठा होत असल्याच्या तक्रारी येऊ लागल्या आहेत. त्यातून मार्ग काढण्यासाठी येत्या काही दिवसात किमान दहा मिनिटे पाणी कपात करण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो, अशी माहिती सूत्रांनी दिली.

दरम्यान, कंपनीचे मुख्य जनसंपर्क अधिकारी अविक विश्वास म्हणाले, 'जायकवाडी धरणातील पाणीसाठी कमी होऊ लागल्यामुळे एक दिवसआड पाणीपुरवठा करण्याचाच निर्णय कंपनीने रद्द केला आहे. त्यापेक्षा जास्त पाणीकपात करण्याचा कंपनीचा सध्यातरी विचार नाही.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वैतरणेच्या पाण्याची शक्यता पडताळणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
भयाण दुष्काळातून वाट काढण्यासाठी मराठवाड्याचे डोळे आता वैतरणेच्या पाण्याकडे लागले आहेत. मराठवाड्यात वैतरणेतून पाणी आणता येईल का, याची शक्यता पडताळण्यात येणार आहे. याबाबत मुंबईत मंगळवारी राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्यासमोर गोदावरी पाटबंधारे विभागासह इतर संस्थांनी चर्चा करून सादरीकरण केले.
दुष्काळी फेऱ्यामध्ये अडकलेल्या मराठवाड्यासाठी वैतरणेच्या सांडव्यावरून वाहून जाणारे पुराचे पाणी वळवण्याविषयी राज्यपालांसमोर सादरीकरण करण्यात येणार आहे, असे वृत्त यापूर्वीच महाराष्ट्र टाइम्सने प्रकाशित केले होते. मराठवाड्याला वैतरणेतून पाणी उपलब्‍ध करून देण्याबाबत विविध समित्यांनी शिफारशी केल्या आहेत. त्या लक्षात घेऊन विभागातील सततच्या पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर हे सादरीकरण करण्यात आले. तब्बल सव्वातास राजभवन येथे झालेल्या सादरीकरणामध्ये विषयाची मुख्य मांडणी विकास मंडळाचे शंकरराव नागरे यांनी केली. यावेळी त्यांनी दुसऱ्या नदीखोऱ्यातून पाणी आणण्यासंदर्भात माहिती दिली.
वैतरणेतून गुरूत्व उतारामुळे पाणी उपलब्‍ध होणे सोयीस्कर ठरू शकते, असे जाणकारांचे मत आहे. मराठवाड्यासाठी आणण्यात येणारे हे पाणी, दुसऱ्या नदीखोऱ्यातून आणावे लागेल. त्यामुळे इतर संस्थांसोबत चर्चा करावी लागणार आहे. यासाठी उच्चस्तरीय बैठक बोलावून अधिक सखोल चर्चा करण्यात येणार असून पाण्यासंदर्भात सविस्तर अहवाल पाठवण्यात येणार आहे.
वैतरणेच्या सांडव्यावरून वाहून जाणारे पुराचे पाणी पूर्वेकडील सॅडल धरणावर सांडवा करून वळवल्यास गोदावरी खोऱ्यात येऊ शकते. तसेच पिंजाळ व दमणगंगा नदीच्या पाणलोट क्षेत्रातील पाणी गोदावरी खोऱ्यात सोडल्यास मुंबईच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम न होता पहिल्या टप्‍प्यात सहा ‌टीएमसी, तर दुसऱ्या टप्‍प्यात ११.६५ टीएमसी पाणी उलपब्‍ध होऊ शकते.
सादरीकरणाच्या वेळी राज्यपालांचे सचिव डॉ. बी. व्ही. गोपाळ रेड्डी, राज्यपालांचे उपसचिव परिचमल सिंह, राज्याच्या पाटबंधारे विभागचे सचिव उपासे, औरंगाबादच्या जिल्हाधिकारी डॉ. निधी पांडेय, विकास मंडळाचे तज्‍ज्ञ सदस्य मुकुंद कुलकर्णी, भैरवनाथ ठोंबरे, डॉ. कृष्‍णा लव्हेकर, डॉ. अशोक बेलखोडे, गोदावरी मराठवडा पाटबंधारे विकास मंडळाचे कार्यकारी संचालक सी. ए. बिराजदार, मंडळाचे सहसंचालक डॉ. महेंद्र हरपाळकर, प्रशासकीय अधिकारी वैभव कुलकर्णी यांची उपस्थिती होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फ्लॅश कंपनीच्या वीज मीटरमध्येही घोळ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
महावितरणतर्फे बसविण्यात येणाऱ्या मीटरमध्ये 'घोळ' असल्याचा प्रकार समोर आला आहे. रोलेक्स कंपनीनंतर फ्लॅश इंटरप्राइजेस इंडिया प्रा. लिमिटेड कंपनीच्या मीटरमध्येही 'घोळ' असल्याची माहिती समोर आली आहे. औरंगाबाद विभागात या कंपन्यांचे १७ हजार वीज ‌मिटर पडून असल्याची माहिती मिळाली आहे.
महावितरणने घरगुती ग्राहकांचा वीज वापर मोजण्यासाठी जुने मीटर बदलून नवीन मीटर बसवण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी खरेदी केलेल्या रोलेक्स कंपनीचे ‌वीज मीटर 'फॉल्टी' असल्याची माहिती उजेडात आली आहे. त्यानंतर फ्लॅश इलेक्ट्रॉनिक्स इंडिया प्रा. लिमिटेड कंपनीचेही वीज मीटर सदोष असल्याचे स्पष्ट झाले आहे. दुय्यम दर्जाचे वीज मीटर खरेदी केल्याचा आरोप विविध वीज संघटनांनी केला होता. त्यानंतरही मीटर खरेदी प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. औरंगाबाद-जालना या दोन जिल्ह्यात नवीन वीज ग्राहकांसाठी रोलेक्स व फ्लॅश या दोन कंपन्यांचे ३३ हजार वीज मीटर मुंबईहून पाठविण्यात आले. त्यापैकी १६ हजार मीटर औरंगाबाद शहर, जालना आणि औरंगाबाद जिल्ह्यात बसवण्यात आले. या सदोष मीटरमुळे महावितरणला आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत असून वीज चोरीच्या घटनांत वाढ झाल्याची माहिती समोर आली आहे. सदोष मीटरचा वापर करू नये, असे आदेश मुंबई कार्यालयाकडून औरंगाबाद कार्यालयास पाठवण्यात आले आहेत. त्यानंतर सदोष मीटर बसविण्याची प्रक्रिया थांबविण्यात आल्याची माहिती महावितरणमधील सूत्रांनी दिली.
फ्लॅश इलेक्ट्रॉनिक्स कंपनीच्या मीटरचा वेग दोन महिन्यानंतर मंद होणे, १०० युनिटवरून ५०० किंवा ७०० युनिटपर्यंत जंप मारणे आदी दोष आढळले आहेत. शिवाय वेग नियंत्रित करण्यासाठी रिमोटचा वापर सहज शक्य असल्याचे आढळले आहे. औरंगाबाद परिमंडळात सिंगल फेज ग्राहकांना दिलेले १६००० मीटर बसविण्यात आले आहेत. ते बदलण्याबद्दल कोणत्याही सूचना प्रकाशगडाहून मिळाल्या नसल्याचे सूत्रांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डीएमआयसीः गायरानाच्या तिढ्यावर तोडगा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉरच्या (डीएमआयसी) भूसंपादनातील गायरान जमिनीचा प्रश्न सोडवण्यासाठी तोडगा काढण्यात आला आहे. यानुसार शासनाची परवानगी न घेता झालेल्या व्यवहारात शासन नियमानुसार बुडालेला महसूल वसूल करण्यासाठी नजराना रक्कम २० टक्के व इतर १० टक्के रक्कम शासनाकडे ठेवण्याचा पर्याय काढण्यात येणार आहे.
डीएमआयसी प्रकल्पासाठी वर्ग १ च्या जमिनींचे भूसंपादन जवळपास पूर्ण झाले आहे. मात्र, सरकारने दिलेल्या गायरान जमिनीचे (वर्ग २) भूसंपादन रखडले आहे. गायरानधारकांनी शासनाची परवानगी न घेता परस्पर खरेदी विक्री व्यवहार केल्याने ३५० हेक्टर जमीन संपादनाचा प्रश्न निर्माण झाला आहे. काही दिवसांपूर्वी डीएमआयसीचे सह मुख्य कार्यकारी अधिकारी विक्रमकुमार यांनी येथे भेट दिली. त्यांनी या विषयावर विभागीय आयुक्त डॉ. उमाकांत दांगट यांच्याशी चर्चा करून तोडगा काढला आहे. त्यानुसार ३० टक्के रक्कम शासनाकडे ठेवावी लागणार आहे.
शासनाने दिलेल्या वर्ग २ प्रकारातील जमिनीचा व्यवहार करण्यापूर्वी जमीन मालकाने शासनाची परवानगी घेणे आवश्यक आहे. पंरतु, शासनाचा महसूल बुडवून व्यवहार झाला आहे. भूसंपादनात हा खोडा निर्माण झाल्याने प्रकल्प खर्चात वाढ होत आहे. यामुळे भूसंपादन करतांना जमिनीच्या मोबदल्यातील २० टक्के रक्कम शासनाला भरावा लागणारा नजराना, तसेच दहा टक्के शासनाकडे ठेवण्यात येणारी रक्कम, अशी एकूण ३० टक्के रक्कम शासनाकडे ठेवावी लागणार आहे.
बिडकीन, बन्नीतांडा, निलजगाव, नांदलगाव व बंगला तांडा या पाच गावांमधून आतापर्यंत १,५२० हेक्टरचा संपूर्ण ताबा प्रशासनाला प्राप्त झाला आहे. बिडकीनमध्ये सर्वाधिक भूसंपादन झाले आहे. बिडकीन येथील ५५ गटांमध्ये सुमारे २५५ हेक्टर जमीन इनामी, गायरान (वर्ग २) स्वरुपाची आहे. उर्वरित जमीन इतर चार गावांमध्ये आहे‌. वर्ग २ प्रकारातील या जमिनीचे खरेदी विक्री व्यवहार करण्यापूर्वी प्रशासनाची परवानगी घेतली नाही. त्यामुळे मूळ मालकाचे किंवा वारसदाराचे सातबारावर नाव आहे. मात्र, त्यानंतर वारसाने किंवा मूळ मालकाने किती लोकांना जमीन विकली याची कुठलीही नोंद नाही. सध्या कसत असलेल्या अनेक ताबेदारांनी आपले नाव सातबारावर लावले नाही. या प्रकरणी प्रशासनाला कागदपत्रांची अत्यंत बारकाईने तपासणी करून मोबदला द्यावा लागणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महापालिकेला नव्या तंत्रज्ञानाचे वावडे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
महापालिकेचे कार्यालय वायफाय करण्याबरोबर नागरिकांच्या सोईसाठी अँड्रॉइड अॅप्लिकेशन (अॅप) विकसित करण्याची घोषणा नव्या पदाधिकाऱ्यांनी निवडून आल्यानंतर केली होती. त्याला आता वर्ष उलटले, मात्र महापालिकेने त्यादिशेने एकही पाऊल उचललेले नाही. त्यामुळे पालिका पदाधिकाऱ्यांनी केलेल्या घोषणा या वाऱ्यावरच्याच गप्पा होत्या काय, असा प्रश्न या निमित्याने निर्माण होत आहे.

महापालिकेची निवडणूक एप्रिल २०१५मध्ये झाली. महापौर, उपमहापौरांची निवड २९ एप्रिल रोजी झाली. शिवसेनेचे त्र्यंबक तुपे महापौरपदी आणि भाजपचे प्रमोद राठोड उपमहापौरपदी निवडून आले. त्यांनी महापौर, उपमहापौरपदाची सूत्रे स्वीकारल्यावर त्यांनी मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पालिकेच्या कामकाजाचा आढावा घेतला. महापालिकेला हायटेक करण्यासाठी त्यांनी पुढाकार घेऊन काही घोषणा केल्या. महापालिकेचे मुख्य कार्यालय वायफाय करण्याच्या घोषणेचा त्यात समावेश होता. त्याचबरोबर महापालिकेचे एक अँड्रॉइड अॅप्लिकेशन (अॅप) तयार करण्याची घोषणाही करण्यात आली होती. या अॅपच्या माध्यमातून महापालिकेसंबंधीची आवश्यक माहिती नागरिकांनी त्यांच्या फोनवर उपलब्ध होणार होती. त्याशिवाय इंटरॅक्टिव्ह व्हाइस रिसपॉन्स सिस्टिम सुरू करण्याचेही जाहीर करण्यात आले होते. या तिन्हीपैकी एकही घोषणा प्रत्यक्षात आली नाही. या घोषणांना दोन महिन्यांनी एक वर्ष पूर्ण होणार आहे.

या घोषणा पूर्ण न होण्यास पालिकेचे प्रशासन कारणीभूत असल्याचे सांगून पदाधिकारी आपल्या अपयशाचे खापर प्रशासनावर फोडत असल्याची पालिकेच्या वर्तुळात चर्चा आहे. तत्कालीन आयुक्त प्रकाश महाजन यांनी प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे घोषणा प्रत्यक्षात आल्या नाहीत, असा युक्तीवाद पदाधिकारी करीत आहेत. महाजन यांच्यानंतर सुनील केंद्रेकर यांनी तीन महिने आयुक्त म्हणून काम केले. एक महिन्यापासून ओमप्रकाश बकोरिया आयुक्त म्हणून काम करीत आहेत. या काळात पदाधिकाऱ्यांना एखादी घोषणा प्रत्यक्षात आणता आली असती, असे बोलले जात आहे.

महापालिकेचे क्षेत्र वायफाय झोन करण्याचे आम्ही जाहीर केले होते, पण प्रकाश महाजन यांनी त्यात खोडा घातला. अँड्रॉइड अॅप्लिकेशन मी स्वतःच्या खर्चाने तयार केले. महापालिकेच्या वेबसाइटमध्ये त्याचे सेटिंग करायची होती. त्यासाठी प्रशासनाने तयारी दाखवली नाही. इंटरॅक्टिव्ह व्हाइस सिस्टिमची योजनाही अधिकाऱ्यांनी हाणून पाडली. अधिकाऱ्यांचे संभाषण ध्वनीमुद्रित केले जाईल, असे कारण सांगण्यात आले. प्रशासनाने आम्ही सुचविलेल्या योजनांचा चुकीचा अर्थ घेतला.
- प्रमोद राठोड, उपमहापौर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


दुष्काळग्रस्तांना ३० लाखांचा निधी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
मागील तीन-चार वर्षांपासून मराठवाडा दुष्काळाने होरपळत आहे. दुष्काळाच्या सर्वाधिक झळा ग्रामीण भागातील नागरिकांना बसत आहेत. मराठवाड्यातील ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना दिलासा मिळावा या उद्देशाने मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाने पुढाकार घेतला असून मुख्यमंत्री सहाय्यता निधीस ३० लाख रुपयांचा धनादेश दिला आहे.

मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाअंतर्गत येणार्या शाळा व महाविद्यालयातील सर्व कर्मचार्यांनी आपला एक दिवसाचा पगार मुख्यमंत्री सहाय्यता निधीस देण्यासाठी मशिप्र मंडळाकडे जमा केला होता. मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रकाश सोळंके, सरचिटणीस आमदार सतीश चव्हाण, सहचिटणीस आमदार अमरसिंह पंडित यांनी मंगळवारी (२२ मार्च) मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन एकूण निधी २९ लाख २९ हजार १८३ रूपयांचा धनादेश दुष्काळ निवारणासाठी मुख्यमंत्र्यांना दिला.

आमदार सतीश चव्हाण म्हणाले, 'मराठवाडा दुष्काळाने होरपळत असून बळीराजा संकटात सापडला आहे. त्यामुळे शेतकर्यांना मदतीचा हात देण्यासाठी आम्ही हा निर्णय घेतला.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘आयसीएम’चा फास्टेस्ट ग्रोइंग पुरस्काराने गौरव

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
नवी दिल्ली येथे झालेल्या एशिया एज्युकेशन समीट सोहळ्यात आयसीएम कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग अँड मॅनेजमेंटचा यंदाच्या 'फास्टेस्ट ग्रोइंग इंजिनीअरिंग अँड मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट इन औरंगाबाद' या पुरस्काराने गौरवण्यात आले.

संस्थेचे संचालक दिलीप गौर व डॉ. सुभाष झंवर यांनी कॉलेजच्यावतीने हा पुरस्कार स्वीकारला. सोहळ्यास केंद्रीय राज्यमंत्री उपेंद्र कुशवाह, एम. एस. बिट्टा, खासदार किरण खेर, अभिनेत्री दिव्या दत्ता यांची प्रमुख उपस्थिती होती. रोबोटिक्स स्पर्धेत आयसीएम इंजिनीअरिंग कॉलेजचे विद्यार्थी हे देशात सातवे तर गो-कार्ट स्पर्धेत दहावे आले. इको-कार्ट स्पर्धेत त्यांचा क्रमांक सहावा लागला. सामाजिक बांधिलकी जपताना आयसीएम कॉलेजने लासूर, डोणगाव सारख्या ग्रामीण भागातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांना दहावी, बारावी परीक्षेच्या शुल्कासाठी मदत केली. कापडी पिशव्यांचे वाटप करून त्यांनी पर्यावरणाविषयी जनजागृती केली. स्वच्छता अभियानही त्यांनी राबवले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उद्योजक व्हा... : कटिंग टुल्स’चा आद्य शिल्पकार

$
0
0

Nikhil.Nirkhee@timesgroup.com
पुण्यातील 'टेल्को'सारखी सुखासीन नोकरी सोडून 'कटिंग टुल्स'च्या क्षेत्रात उडी घेण्याचा धाडसी निर्णय घेतला आणि थेट औरंगाबाद गाठले. 'कटिंग टुल्स'ची निर्मितीसाठी कष्ट केले आणि आत्मविश्वास आल्यानंतर लिजवर जागा घेऊन युनिट सुरू केले. बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या तोडीस तोड प्रोडक्टसची निर्मिती करणारा, 'कटिंग टुल्स'च्या क्षेत्रात राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर नाव कोरणारा, अनेक प्रोडक्टची निर्यात सात ते आठ देशांमध्ये नेणारा उद्योजक म्हणजे गिरीश फडके...

फडके कुटुंबीय हे जळगाव जिल्ह्यातील वडोदा या गावचे. गिरीश यांचे वडील डॉ. मोहन फडके हे बुलडाणा येथे जिल्हा आरोग्य अधिकारी होते. नोकरी सोडून वडोदा या छोट्या गावामध्ये त्यांनी तब्बल ३०-३५ वर्षे रुग्णसेवा केली. त्यामुळे गिरीश यांचे बालपणही या छोट्याशा गावात गेले. बारावीपर्यंतचे शिक्षण खामगावला तर, १९८७मध्ये अभियांत्रिकीचे (यांत्रिकी) शिक्षण अमरावतीच्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात झाले आणि सुरुवातीच्या टप्प्यातच पुण्यातील 'टेल्को'सारख्या नामांकित कंपनीत काम करण्याची संधी मिळाली. सुखासीन नोकरी सुरू होती, पण अवघ्या दोन वर्षांतच गिरीश यांना 'टेल्को'ची नोकरी 'रुटीन' वाटू लागली. स्वतःचा काहीतरी उद्योग-व्यवसाय उभारावा, या इच्छेने सुप्तावस्थेतच जन्म घेतला आणि त्यादृष्टीने विचारचक्रही सुरू झाले. अर्थात, या उद्योजकतेच्या कल्पनेचा जन्म केवळ गिरीश यांच्यापुरताच मर्यादित राहिला नाही तर, त्यांचे बालमित्र विजय आघाव यांच्यापर्यंत या कल्पनेचा विस्तार होत गेला. दोन्ही बालमित्रांचे बारावीपर्यंतचे शिक्षण एकाच ठिकाणी झाले होते. पुढे विजय यांचे अभियांत्रिकीचे शिक्षण औरंगाबादला तर, गिरीश यांचे अमरावतीला झाले होते. शिक्षणामुळे दोघांची फारकत झाली होती, पण मुळात दोघांची नाळ बालपणीच जुळली ती कायमचीच. त्यामुळे उद्योगही दोघांनी मिळून करावा, हेही निश्चित झाले. त्याकाळी 'कटिंग टुल्स'च्या क्षेत्रात केवळ तीन मल्टिनॅशनल कंपन्या होत्या. त्यातील एक स्वीडनची, दुसरी जर्मनीची, तिसरी अमेरिकेची होती. त्याशिवाय 'कटिंग टुल्स'ची निर्मिती करणारी एकही नामांकित कंपनी देश किंवा राज्य पातळीवर नव्हती. त्यामुळे याच क्षेत्रात संधी शोधावी, असा दोघांचा निर्णय झाला. गिरीश यांनी सहा वर्षे म्हणजेच १९९३पर्यंत 'टेल्को'मध्ये नोकरी केली आणि त्यानंतर दोघांनी औरंगाबाद गाठले. गिरीश यांना 'टेल्को'मध्ये समृद्ध अनुभव मिळाला होता, पण 'कटिंग टुल्स'ची निर्मिती प्रत्यक्षात करून स्वतःचे प्रोडक्टस सिद्ध करावेत, अशी दोघांची धारणा झाली. त्यामुळे मशीन वापराचे भाड्याचे पैसे देऊन रात्री दहा ते पहाटे पाच या वेळेत 'कटिंग टुल्स'ची निर्मिती करण्याची कल्पना दोघांनी लढवली आणि प्रत्यक्षात आणली. तब्बल सहा महिने हा प्रयोग यशस्वी केल्यानंतर आणि पूर्ण आत्मविश्वास आल्यानंतर लिजवर जागा घेऊन १९९४मध्ये स्वतःचे युनिट सुरू केले. त्यासाठी दोघांनी आपापल्या घरून दीड-दीड लाख रुपये घेतले व वाळूज येथे 'गौरव इंजिनिअर्स' नावाने छोटेसे युनिट सुरू केले. 'एमएफएससी'कडून कर्ज घेऊन एक मायलिंग मशीन घेतली व 'कटिंग टुल्स'ची निर्मिती सुरू झाली. अर्थात, सुरुवातीची दोन वर्षे खडतर गेली, मात्र काम मिळवण्याचे आव्हान उत्तम दर्जामुळे लवकरच संपुष्टात आले आणि हळुहळु कामही मिळत गेले.

बजाज यांच्या भेटीने वाट मोकळी
१९९४मध्ये शहरातील एका औद्योगिक उत्पादनांच्या प्रदर्शनात 'गौरव'चा एक स्टॉल लावण्यात आला होता. त्यावेळी मधूर बजाज यांनी या प्रदर्शनाला भेट दिली असता, उत्तम 'कटिंग टुल्स'ची निर्मिती शहरामध्ये होत असताना, बहुराष्ट्रीय कंपन्यांकडून हे टुल्स अत्यंत महागड्या दरांत व वेटिंगमध्ये कशामुळे घेता, असा प्रश्न त्यांनी 'बजाज'च्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना विचारला. बजाज यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नामुळे चित्रच पालटले आणि 'बजाज'चे काम मिळत गेले. लगोलग इतर अनेक कंपन्यांची कामेही मिळत गेली. बहुराष्ट्रीय कंपन्या ज्या 'टूल'साठी पाच हजार रुपये आकारात होते, त्यासाठी गिरीश फडके व विजय आघाव हे चक्क नऊशे-हजार रुपये आकारत होते व पुन्हा 'टुल्स'ची डिलिव्हरीही अत्यंत वेगवान. त्यामुळे प्रतिसाद मिळत गेला, वाढत गेला. दरम्यान, १९९८-९९मध्ये मार्केट खूप थंड झाले होते, काम खूप कमी झाले होते. त्यामुळे मोजक्या कंपन्यांना प्रोडक्टस देण्याऐवजी संरक्षण साहित्य निर्मिती उद्योग, विमान निर्मिती उद्योग व इतर अनेक उद्योगांपर्यंत 'कटिंग टुल्स' पोहोचवण्याचा धडाका सुरू केला. त्यामुळे उद्योगाने मोठी भरारी घेतली. याचदरम्यान २०००मध्ये 'वरद सेलिंग मशीन्स' नावाने दोघांनी 'ट्रेडिंग'मध्ये व्यवसायात उडी घेतली. नगर, औरंगाबाद, जळगावपर्यंत विविध कंपन्यांच्या मशीन विक्रीचा व्यवसाय विस्तारत गेला. २००७पासून वाळूजमध्येच 'गौरव इंजिनिअर्स'चे दुसरे युनिटही सुरू झाले. '७ एक्सेस मशीन' हे देशातील एकमेव मशीन घेतल्यानंतर अमेरिका, जपान, सौदी अरेबिया, कुवेत आदी सात-आठ देशांमध्ये निर्यात वाढत गेली. बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या तोडीस तोड 'कटिंग टुल्स'ची निर्मिती करणारी अस्सल भारतीय कंपनी म्हणून देश पातळीवर मोहोर उमटवण्यात भरभरून यश मिळाले. आज उद्योगाची वार्षिक उलाढाल २० कोटींवर गेली आहे. लवकरच 'डीएमआयसी'मध्ये एका बहुराष्ट्रीय कंपनीसोबत 'जॉईंट व्हेंचर' करण्याचा प्रयत्न असून, त्यातून पाच वर्षांत १०० कोटींपर्यंत उलाढाल नेण्याचे टार्गेट ठेवण्यात आल्याचे गिरीश फडके म्हणतात.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘समांतर’च्या कंपनीची गच्छंती

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
समांतर जलवाहिनीचे काम करणाऱ्या औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटी कंपनीचे काउंटडाउन सुरू झाल्याचे सोमवारी मुबंईत झालेल्या बैठकीत सूचित करण्यात आल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. समांतर जलवाहिनीचे काम महापालिकेने स्वतः करायचे की कंपनीकडूनच करून घ्यायचे, हे आता महापालिकेनेच ठरवावे, असे मत या बैठकीत व्यक्त करण्यात आले.

महापालिकेने समांतर जलवाहिनीचे काम पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप (पीपीपी) तत्वावर करून घेण्यासाठी 'एसपीएमएल' कंपनीशी करार केला. कंपनीने औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटी कंपनीची स्पेशल पर्पज व्हेइकल म्हणून नियुक्ती केली. समांतर जलवाहिनी या योजनेची महापालिकेने आखणी केली त्यावेळी योजना 'पीपीपी' तत्वावर घेण्याचा उल्लेख करण्यात आला नव्हता.

या योजनेसंदर्भात कोर्टात चार याचिका दाखल करण्यात आल्या. महापालिकेच्या आयुक्तांना हायकोर्टाने समांतर जलवाहिनीसंदर्भात शपथपत्र सादर करण्याचे आदेश दिले. तत्कालीन आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी शपथपत्र दाखल केले व 'पीपीपी' तत्वावरील ही योजना रद्द करावी, असे मत नोंदवले. योजनेच्या वाढलेल्या किंमतीला शासनाची मान्यता नसल्याचे त्यांनी शपथपत्रात स्पष्ट केले. केंद्रेकरांच्या शपथपत्राच्या आधारेच पालिकेचे विद्यमान आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांनीदेखील हायकोर्टात शपथपत्र दाखल केले. दोन आयुक्तांच्या शपथपत्रांचा अभ्यास करून समांतर जलवाहिनी प्रकल्पाची चौकशी करण्यासाठी शासनाने नियुक्त केलेल्या संतोषकुमार समितीला देखील २८ मार्च रोजी शपथपत्र दाखल करण्याचे आदेश हायकोर्टाने दिले. हायकोर्टाच्या आदेशानुसार शपथपत्र दाखल करण्यासाठी सोमवारी मुंबईत संतोषकुमार यांच्या उपस्थितीत बैठक झाली. बैठकीला महापालिकेचे आयुक्त बकोरिया, शहर अभियंता सखाराम पानझडे उपस्थित होते.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार; केंद्रेकर व बकोरिया यांनी दाखल केलेल्या शपथपत्राशी सुसंगत भूमिका संतोषकुमार यांनी घेतली आहे. तसे शपथपत्र हायकोर्टात सादर केले जाण्याची शक्यता आहे. 'पीपीपी' तत्वावरील समांतर जलवाहिनीची योजना रद्द करण्याचा निर्णय घेण्याची वेळ आली तर महापालिकेची भूमिका महत्त्वाची राहणार आहे. ही योजना ठेवायची की रद्द करायची, याचा निर्णय पालिकेला घ्यावा लागेल, असे स्पष्ट करून संतोषकुमार यांनी समांतर जलवाहिनीच्या निर्णयाचा चेंडू पालिकेच्या कोर्टात टाकला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘ब्रेन डेड’ महिलेकडून तिघांना जीवनदान

$
0
0

औरंगाबाद ः शहरातील अपघातानंतर 'ब्रेन डेड' झालेल्या ५५ वर्षीय महिलेच्या अवयवदानाने तिघांना जीवनदान मिळाले आहे. संबंधित महिलेचे यकृत मंगळवारी (२२ मार्च) सकाळी 'जेट'च्या विमानाने पाठवण्यात आले. दोन्ही मूत्रपिंडांचे शहरातील एमजीएम रुग्णालय व कमलनयन बजाज रुग्णालयात, दोन्ही कॉर्नियांचे प्रत्यारोपण कमलनयन बजाज रुग्णालयात यशस्वी झाले. विशेष म्हणजे केवळ दोन महिन्यांत शहरात पाच ब्रेन डेड रुग्णांकडून तब्बल २२ अवयवांचे दान झाले असून, सर्व अवयवांचे प्रत्यारोपण यशस्वी झाले आहे.

१८ मार्च रोजी सिडको एन सहा परिसरात झालेल्या अपघातामध्ये एक ५५ वर्षीय महिला गंभीर जखमी झाल्यानंतर त्यांना एमजीएम वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान सोमवारी सकाळी त्यांना ब्रेन डेड म्हणून रुग्णालयातील डॉक्टरांकडून जाहीर करण्यात आले. संबंधित महिलेच्या नातेवाईकांनी परवानगी दिल्यानंतर अवयवदानाचा निर्णय झाला. सोमवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास अवयव काढण्याची शस्त्रक्रिया सुरू झाली आणि मंगळवारी पहाटे विमानाने यकृत ग्लोबल हॉस्पिटलला पाठविण्यात आले.

शस्त्रक्रियेसाठी 'एमजीएम'चे अधिष्ठाता डॉ. अजित श्रॉफ, सीईओ डॉ. प्रवीण सूर्यवंशी, डॉ. अपर्णा कक्कड, डॉ. बी. के. सोमाणी, डॉ. सुधीर कुलकर्णी, डॉ. इश्तियाक अन्सारी, डॉ. एस. एच. तालीब, डॉ. सुहास बावीकर डॉ. संहिता कुलकर्णी, डॉ. प्रमोद अपसिंगेकरआदींनी पुढाकार घेतला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images