Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

मोफत प्रवेशावर इंग्रजी शाळांचा बहिष्कार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
शिक्षण हक्क कायद्यानुसार २५ टक्के मोफत प्रवेशाची रक्कम शासनाकडून मिळालेली नाही. त्यामुळे प्रवेश प्रक्रियेवरच बहिष्कार टाकण्याचा निर्णय इंग्रजी शाळांनी घेतला आहे. त्यामुळे ही प्रक्रिया पुन्हा अडचणीत सापडली आहे. त्याचबरोबर प्रवेशाची वेबसाइट अद्याप सुरळीत झालेली नाही.

आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या २५ टक्के प्रवेशात सुरुवातीपासून अडचणी निर्माण झाल्या आहेत. वेबसाइट हँग झाल्यामुळे प्रक्रिया अडचणीत आली. त्यात आता इंग्रजी शाळांनी प्रक्रियेवरच बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. मोफत प्रवेश दिलेल्या विद्यार्थ्यांच्या शुल्काचा परतावा शासनाने दिला नसल्याने हा निर्णय घेतल्याचे शाळांचे म्हणणे आहे. महाराष्ट्र इग्लिंश स्कूल ट्रस्टी असोसिएशनने हा निर्णय घेतल्याने प्रवेश प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्णय झाले आहे. शासनाने २०१२-१३मध्ये ६७ टक्के परतावा दिला. तोही सर्व शाळांना मिळालेला नाही. त्यानंतर आजपर्यंत शासनाकडून हा परतावा मिळालेला नसल्याचेही इंग्रजी शाळा व्यवस्थापनांचे म्हणणे आहे.

शासनाकडून दिशाभूल केली जातेय. सांगत असले तरी, प्रत्यक्षात परतावा मिळालेला नाही. शासन दिशाभूल करत असल्याचा आरापे संस्थाचालकांनी केला आहे. शासनाचे अनुदान नसल्याने विद्यार्थ्यांनी भरलेल्या शुल्कावर शाळा चालतात. अशावेळी शासनाकडूनही अनुदान न मिळाल्याने शाळा अडचणीत सापडल्याचे शाळा व्यवस्थापनांचे म्हणणे आहे.


वेबसाइट हँगच
यंदा मोफत प्रवेशाची प्रक्रिया ७ मार्चपासून सुरू झाली खरी, मात्र अद्यापही प्रक्रिया कागदावरच आहे. पहिल्या टप्प्यात शाळांना ऑनलाइन नोंदणी करायची आहे, परंतु वेबसाइट हँग असल्याने ही प्रक्रियाच सुरू नाही. किती शाळांनी नोंद केली, केव्हापर्यंत प्रक्रिया सुरळीत होणार याबाबत अधिकाऱ्यांकडेही उत्तरही नाही. औरंगाबाद जिल्ह्यात ६४४ शाळांमध्ये या प्रक्रियेतून प्रवेश दिले जाणार आहेत.

मोफत प्रवेशाबाबत अनेक अडचणी आहेत. शासन परतावा दिल्याचे सांगते, परंतु प्रत्यक्षात पैसे मिळालेले नाहीत. आधीच अनुदान नाही, त्यात शुल्कही नाही. मोफत प्रवेश योजनेतील विद्यार्थ्यांच्या पालकांना शुल्क मागितल्यास काही जण गोंधळ घालतात. त्यांना शिक्षण विभागाकडून पाठबळ मिळते. त्यामुळे शाळा अडचणीत सापडल्या आहेत. याचा शासनाने विचार करायला हवा.
- प्रल्हाद ‌शिंदे, महाराष्ट्र इग्लिंश स्कूल ट्रस्टी असोसिएशन (मेस्टा)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


१८० उत्तरपत्रिका आक्षेपार्ह

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

बारावी उत्तरपत्रिका पुनर्लेखन घोटाळा प्रकरणात मंगळवारपर्यंत (२२ मार्च) सुमारे दीड हजार उत्तरपत्रिकांचे यूआयडी तपासण्यात आल्या. त्यापैकी १८० उत्तरपत्रिका आक्षेपार्ह असल्याचे दिसून आल्याची माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान, या प्रकरणाशी संबंधित शिक्षकांच्या कनिष्ठ महाविद्यालयांची मान्यता एका ठिकाणची आणि कॉलेज दुसऱ्या ठिकाणी असल्याची चर्चा आहे. अशावेळी मंडळाने या कॉलेजांचे परीक्षांचे अर्जच कसे स्वीकारले, असा आक्षेप घेतला जात आहे. त्यामुळे या प्रकरणात मंडळाचाही दोष असल्याची चर्चा आहे.

जालन्यातील संस्कार निवासी वसतिगृहात बारावीच्या उत्तरपत्रिका आणण्यात आल्या. त्यांचे बेकायदा पुनर्लेखन, तपासणी करून अदलाबदली केली जात होती. हे रॅकेट पोलिसांनी उघड केले. त्यात ज्ञानेश्वर सोनवणे याचा पोलिसांना अद्यापही शोध लागलेला नाही. पोलिसांच्या ताब्यात असलेल्या अडीच हजार उत्तरपित्रकांचे यूआयडी घेण्याचे काम अद्याप अपूर्ण आहे. मंगळवारी सायंकाळपर्यंत सुमारे दीड हजार उत्तरपत्रिकांचे यूआयडी पूर्ण झाल्याचे मंडळातील सूत्रांनी सांगितले. त्यातील आक्षेपार्ह उत्तरपत्रिकांची संख्या १८० आहे. त्या उत्तरपत्रिका बाजारसावंगी सद्गुरू योगीराज दायानंद कनिष्ठ महाविद्यालय, राणी उंचेगाव येथील इंदिरा गांधी कनिष्ठ महाविद्यालय, पिशोर येथील सद्गुरू बालयोगी काशीगिरी महाराज कनिष्ठ महाविद्यालयातीलच असल्याचे स्पष्ट झाले आहे. उर्वरित उत्तरपत्रिकांचे यूआयडी घेण्याचे काम बुधवारपर्यंत (२३ मार्च) पूर्ण होईल आणि आक्षेपार्ह नसलेल्या उत्तरपत्रिका मंडळाच्या ताब्यात दिल्या जाण्याची शक्यता आहे. संबंधित प्रकरणात दोषी शिक्षकांचा शोध घेण्याचे काम अद्याप सुरूच आहे.

आरोपींच्या पोलिस कोठडीत वाढ

दरम्यान, प्रकरणात अटक करण्यात आलेल्या श्रीमंत वाघ आणि प्रा. अंकुश पालवे या दोघांची पोलिस कोठडी संपल्याने आज त्यांना न्यालायात हजर करण्यात आले. उत्तरपत्रिका घोटाळ्यातह मोठे रॅकेट मोठा असून, सखोल तपास आवश्यक असल्याचे सांगून पोलिसांनी पुन्हा पोलिस कोठडीची मागणी केली. न्यायालयाने पोलिसांची मागणी मान्य करीत दोघांची पोलिस कोठडी ३ दिवसांनी वाढवली.

या प्रकरणाचा तपास प्रगतिपथावर आहे. या राॅकेटमधे अनेक प्राध्यापक, संस्थाचालक आणि बड्या अधिकाऱ्यांच्या सहभाग असण्याची शक्यता आहे. काही आरोपींच्या शोधात विशेष पथके रवाना करण्यात आली असून, लवकरच त्यांना अटक केली जाईल.

- दीक्षितकुमार गेडाम, सहाय्यक पोलिस अधीक्षक, जालना

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जावयांची गाढवावरून धिंड निघणार!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, बीड

होळीच्या बहुरंगी उत्सवासाठी सर्वत्र उत्साह असताना, अनोख्या परंपरेसाठी प्रसिद्ध असणाऱ्या बीड जिल्ह्यातील विड्याचे ग्रामस्थही सज्ज झाले आहेत. धुळवडीच्या दिवशी जावयाची गाढवावरून धिंड काढण्याच्या या आठ दशकांची परंपरा यंदाही त्याच उत्साहात कायम ठेवण्यासाठी तयारी पूर्ण झाली आहे.

बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील विडा हे सर्वसामान्य गावसारखे गाव. बारा वाड्या आणि तेरावे विडा अशी विडा गावाची ओळख. देशभरात रंगांची उत्सव होत असताना, यातील विड्याचा रंग जरा हटके आहे. दरवर्षी धुळवडीच्या दिवशी जावयाची गाढवावरून धिंड काढण्याची गेल्या ऐंशी वर्षाहून अधिक वर्षाची परंपरा या गावाने जपलेली आहे. धिंड काढताना जावयाच्या गळ्यामध्ये खेटरांचा हार घालण्यात येतो आणि त्यानंतर त्याच्यावर रंग आणि पाण्याचा मारा करत गावातून फिरवण्यात येते. सकाळी नऊच्या सुमारास जावयाला गाढवावर बसवले जाते. ही जावयाची वरात गावातील गल्लीबोळातून जाते. घराच्या छतावरून पाणी आणि रंग टाकला जातो. गावातील लहान, थोर, जात, धर्म, पंथ बाजूला सारून सारे गावचा सण म्हणून एकत्र येऊन हा वेगळ्या रंगाचा सण साजरा करतात. गाढवावरून धिंड गावातील मुख्य रस्त्यावरून पूर्ण गावभर फिरते. दुपारी एकच्या सुमारास शेवटी मारुतीच्या पारावर जावयाला मानपानाचे कपडे पूर्ण आहेर देऊन सत्कार केला जातो. धिंडीत कुणी काही जास्त त्रास दिला असेल, तर माफी मागितली जाते. जावईही मोठ्या मनाने धिंडीतली थट्टा आणि त्या नंतरचा सत्कार मोठ्या मनाने स्वीकारतो. विड्याच्या या परंपरेचा भाग होण्याची संधी मिळाल्याबदल जावई गावाचे धन्यवाद मानतो. गावची ही परंपरा जपत असताना गावाला एकत्र आणणारा हा होळी आणि रंगपंचमीचा अनोखा रंगच सण गावाच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. यंदाच्या धुलिवंदनावर दुष्काळाचे सावट आहे. विड्यामध्ये २०१२च्या दुष्काळात कोरड्या रंगांनी सण साजरा करण्यात आला होता.

आठ दिवसांपासून जावयाचा शोध

धुळवडीच्या आधी आठ दिवस या परंपरेसाठी जावई शोध सुरू होतो. धुळवड जवळ येता, गावचे जावई सासरवाडीला यायचे टाळतात. आता गावातच जावई असल्याने अडचण होत नाही. गावातील तरुण मंडळी धुळवडीच्या आधीपासून नेटक्या गाढवाचा आणि जावयांचा शोध करत असतात. किमान एका जावयाला तरी या प्रथेसाठी ते राजी करतात. ज्या गावात लग्नादिवशी घोड्यावरून मिरवत नेले जाते, त्याच सासुरवाडीत गाढवावरून बसून धिंड काढली जात असते.

आठ दशकांची परंपरा

ऐंशी वर्षापूर्वी गावचे जहागिरदार आनंदराव ठाकूर देशमुख यांचे जामाद म्हणजे जावई धुळवडीच्या दिवशी सासुरवाडीला आले होते. त्या दिवशी जावयाची थट्टा मस्करी करण्याच विचार त्यांच्या मनात आला आणि जावयाची थट्टा करण्यासाठी त्यांनी जावयाची गाढवावरून धिंड काढली, त्यांना रंग लावला आणि हे सर्व झाल्यानंतर जावयाचा मानपान केला. ही प्रथा गावकऱ्यांनी पुढे गावची परंपरा म्हणून आजही जपली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

टंचाईग्रस्त लातूरमध्ये २,५०० लिटर पाणी कोर्टवर फवारले!

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त । लातूर

अभूतपूर्व पाणी टंचाईचा सामना करणाऱ्या लातूर शहरात व्हॉलिबॉल सामन्यांसाठी मैदान २ हजार ५०० लिटर पाणी वाया घालवण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. २१ मार्च रोजी आमदार अमित देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आयोजित केलेल्या व्हॉलिबॉल स्पर्धेसाठी कोर्टवर इतक्या मोठ्या प्रमाणात पाणी फवारण्यात आले होते.

पाणी फवारण्याचे केले समर्थन....

शहरात पाणी टंचाई असताना पाणी वाया घालवण्याच्या या प्रकाराचे काँग्रेसच्या कार्यकर्त्याने चक्क समर्थन केले आहे. केवळ लातूरच नव्हे, तर देशात देखील पाणी टंचाई आहे. मग आयपीएल स्पर्धा भरवणाऱ्यांना मैदानावर पाणी फवारण्याबद्दल सांगणार का? असा उलट सवाल मोईन शेख यांनी केला. व्हॉलिबॉल कोर्टवर फवारण्यात आलेले पाणी पिण्याचे नव्हेतच असा दावाही त्यांनी केला. शेख यांच्या मते लातूरमध्ये दैनंदिन वापराचे पाणी मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. या मैदानात मुलांना खेळण्यासाठी सुविधा नसल्याने त्यांनी मागणी केल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी हे आदेश दिले असल्याचे शेख म्हणाले. तसेच पाणी टंचाईमुळे आम्ही खेळाडूंचे नुकसान करु शकत नसल्याचे शेख यांनी सांगितले.

लातूरमध्ये कलम १४४ लागू

राज्यातील भीषण दुष्काळाचा सामना करणाऱ्या लातूर शहरात टँकर भरण्याच्या ठिकाणी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यामुळेच शहरातील पाणी भरण्याच्या ठिकाणी फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ कलम १४४ नुसार प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आहेत. इतक नव्हे तर जिल्हाधिकार्यांनी टंचाई तक्रारनिवारणासाठी २४ तास नियंत्रण कक्ष देखील सुरु केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जनावराना पालिकेची कालबाह्य औषधे

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
महापालिकेच्या मध्यवर्ती जकात नाक्याच्या शेजारी असलेल्या पशू चिकित्सालयात मुदत संपलेल्या औषधींचा वापर केला जात असल्याचे पदाधिकाऱ्यांच्या पाहणीत उघडकीस आले. दोन वर्षांपूर्वी मुदत संपलेली औषधी प्राण्यांच्या उपचारासाठी वापरली जात होती. मुदत संपलेली औषधी वापरणाऱ्या अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करून गुन्हा दाखल करा, अशी मागणी पदाधिकाऱ्यांनी केली आहे.
पालिकेच्या पशू चिकित्सालयात विविध प्राण्यांवर उपचार, पकडलेल्या मोकाट कुत्र्यांची नसबंदी, लसीकरण केले जाते. त्यामुळे येथे कायमस्वरुपी औषधींचा साठा ठेवण्याचा प्रयत्न असतो. प्राणिसंग्रहालयातील बिबट्याच्या तीन पिल्लांच्या मृत्यूनंतर प्राणिसंग्रहालय व चिकित्सालय वादात सापडले आहे. महापौर त्र्यंबक तुपे, उपमहापौर प्रमोद राठोड, स्थायी समिती सभापती दिलीप थोरात, सभागृहनेता राजेंद्र जंजाळ यांनी बुधवारी पशू चिकित्सालयास अचानक भेट देऊन औषध साठा तपासला. त्यावेळी बहुतांश औषधी मुदत संपलेली असल्याचे आढळले. या औषधांची २०१३-१४ यावर्षात खरेदी करण्यात आली असून त्यांची मुदत २०१५मध्ये संपल्याचे औषधींवरील तारखांवरून लक्षात आले. ही मुदत संपलेली औषधे प्राण्यांवरील उपचारासाठी वापरण्यात येत होती, असे तपासणीत लक्षात आले.
ही गंभीर बाब उजेडात आल्यानंतर महापौरांनी उपायुक्त अय्युब खान व आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. सुहास जगताप यांना बोलावले. त्यांनी पुन्हा औषधींची तपासणी केली. यावेळी दोन वर्षांपासून औषधींची नव्याने खरेदी करण्यातच आली नसल्याचे लक्षात आले. अय्युब खान व डॉ. जगताप यांनी मुदत संपलेल्या औषधींचा पंचनामा केला. उपमहापौर प्रमोद राठोड यांनी अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना पंचनाम्यासाठी बोलावून घेतले. त्यांनी मुदत संपलेल्या औषधांचा स्वतंत्रपणे पंचनामा केला. महापौरांनी आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांच्याशी संपर्क साधून माहिती देऊन तातडीने चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करा, सूचना केली. प्राणिसंग्रहालयाचे निलंबित संचालक डॉ. बी. एस. नाईकवाडे यांच्या नियंत्रणाखालीच हे पशू चिकित्सालय चालवण्यात येत होते. पशूधन अधिकारी शाहेद शेख यांच्यावर जबाबदारी आहे. फेब्रुवारी महिन्यात ५१७ मोकाट कुत्र्यांना पकडून लसीकरण व नसबंदी करण्यात आल्याचे शाहेद शेख यांनी सांगितले. सभागृह नेते राजेंद्र जंजाळ यांच्या मागणीनुसार याचा तारीखनिहाय तपशील शेख यांच्याकडे नव्हता. तशी नोंद ठेवली नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यावरून खरोखरच ५१७ कुत्रे पकडून उपचार केले का, याबद्दल शंका निर्माण झाली आहे. पालिकेतर्फे एका कुत्र्यासाठी ६५० रुपये खर्च केले जातात. कुत्र्यांना व्हॅक्सिन करण्यासाठी २००५ मध्ये खरेदी केलेले औषध या चिकित्सालयात सापडले. त्याचा वापर आजही केला जातो की काय अशी विचारणा पदाधिकाऱ्यांनी केली. अधिकारी त्याचे उत्तर देऊ शकले नाहीत. ११ वर्षांपूर्वी खरेदी केलेले औषध वापरणे अत्यंत गंभीर असून आयुक्तांनी स्वतः चौकशी करावी, अशी मागणी उपमहापौर प्रमोद राठोड यांनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खासदार खैरेंचा महापालिकेला दम

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
महापालिकेकडे वीज बिलाचे १७ कोटी रुपये थकले असून तत्कालीन आयुक्त केंद्रेकर यांच्यासोबत झालेल्या चर्चेनुसार ३० मार्चपर्यंत साडेतीन कोटी रूपये भरावेत, अन्यथा पालिका कार्यालयाची वीज तोडा, असे आदेश खासदार चंद्रकांत खैरे यांनी जिल्हास्तरीय विद्युतीकरण समितीच्या बैठकीत दिला. कारवाईसाठी पथक गेल्यास मी फोनही करणार नाही, असा शब्द त्यांनी दिला.
महावितरण कार्यालयात बुधवारी खासदार खैरे यांच्या अध्यक्षतेखाली समितीची बैठक घेण्यात आली. या बैठकीत महावितरणच्या कार्यकारी अभियंता ए. पी. पठाण यांनी १७ कोटी १८ लाख रुपये थकबाकी असल्याची माहिती दिली. अधिकाऱ्यांना पालिकेत ताटकळत ठेवले जात असल्याची तक्रार त्यांनी केली. यावर पालिकेचे विशेष अधिकारी पी. आर. बनसोडे यांनी एक कोटी रुपये देत असल्याची माहिती दिली. महावितरणाकडेच एलबीटीची ७ कोटी थकबाकी असल्याचे त्यांनी सांगितले. त्यावर हा विषय कोर्टात असल्याने त्यापर चर्चा नको, असे महावितरणचे अधिकारी प्रभाकर निर्मळे यांनी सांगितले. तत्कालीन आयुक्त केंद्रेकर यांनी साडेतीन कोटी रूपये प्रति महिना देण्याचे मान्य केल्याची माहिती निर्मळे यांनी दिली. पालिका अधिकारी घरोघरी जाऊन मालमत्ता कर वसूल करत असून महावितरणाचे पैसे का थां‌बविता?, अशी विचारणा खासदार खैरे यांनी केली. मुख्य लेखाधिकारी संजय पवार यांच्या केबिनचा वीज पुरवठा खंडित करा असे त्यांनी बजावले.
महापालिकेकडे पूर्वी ३०० कोटींची थकबाकी होती. तत्कालीन उर्जामंत्री अजित पवार यांनी ते ९७ कोटी रुपये घेतले व उर्वरित रक्कम माफ केली. आत्ताचे सरकार तुम्हाला व्याज सुद्धा माफ करणार नाही, असा टोला खासदार खैरे यांनी यावेळी लगावला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पसार वाहन निरीक्षक संख्येला मुंबईत बेड्या

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
प्रादेशिक परिवहन विभागातील पसार मोटार वाहन निरीक्षक संजय संख्येला आर्थिक गुन्हेशाखेच्या पथकाने मंगळवारी मुंबईच्या दहिसर परिसरातून अटक केली.
तपासणी न करता ६९९ वाहनांना संख्येने फिटनेस प्रमाणपत्र दिले होते. याप्रकरणी ‌डिसेंबर २०१५ मध्ये क्रांतिचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. संख्येला कोर्टात हजर करण्यात आले असता २ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली.
मोटार वाहन निरीक्षक दीपक मेहेरकर व दीपक भोंडे यांनी ‌डिसेंबर २०१५मध्ये शेंद्रा एमआयडीसीमध्ये प्रत्यक्ष ६८५ वाहनांची तपासणी केली होती. मात्र, संगणकावरच्या रेकॉर्डमध्ये एकूण १ हजार ३८४ वाहनांची तपासणी करून फिटनेस प्रमाणपत्र दिल्याची नोंद होती. यामध्ये निरीक्षक संजय संख्येने एकट्याने ६९९ प्रमाणपत्रे जारी केल्याचे आढळले. लिपिक चंद्रकांत सोळुंके यांच्या मदतीने त्याने हा प्रकार केला होता. फसवणुकीचा प्रकार समोर आल्यानंतर साहाय्यक प्रादेशिक परिवहन ‌अधिकारी किरण मोरे यांनी पोलिस ठाण्यात संख्ये व चंद्रकांत सोळुंके यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल झाल्यापासून संखे पसार झाला होता. अटकपूर्व जामिनासाठी संख्येने जिल्हा व सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला होता. मात्र, कोर्टाने अर्ज फेटाळला. यानंतर संख्येने जामिनासाठी खंडपीठात धाव घेतली. मात्र, १० मार्च रोजी खंडपीठाने त्याचा अर्ज फेटाळला होता.
दहिसरमध्ये सापडला
पसार असलेला संख्ये दहिसर ये‌थील घरी आला असल्याची माहिती आर्थिक गुन्हेशाखेला मिळाली होती. या माहितीवरून मंगळवारी संजय शांताराम संख्ये याला अटक करण्यात आली. पोलिस निरीक्षक मधुकर सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय सुभाष खंडागळे,जमादार विलास कुलकर्णी, विठ्ठल फरकाडे, प्रकाश काळे व महेश उगले यांनी ही कारवाई केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुंबई पालिकेने मागितला वाघ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
राणीच्या बागेसाठी मुंबई महापालिकेने औरंगाबाद महापालिकेकडे एका वाघाची मागणी केली आहे. मुंबई महापालिकेचे पत्र प्राणिसंग्रहालयास प्राप्त झाले असून त्यानुसार कार्यवाही केली जात आहे. एक पिवळा वाघ लवकरच मुंबईला पाठवला जाणार आहे.
महापालिकेच्या सिद्धार्थ प्राणिसंग्रहालयात पांढरे पाच आणि पिवळे चार, असे नऊ वाघ आहेत. प्राणिसंग्रहालयात वाघांसाठी असलेले पिंजरे लक्षात घेता ही संख्या जास्त आहे. पिंजरे आणि त्याचे क्षेत्रफळ याचे गणित करून एका वेळी एका वाघाला मोठ्या पिंजऱ्यात मोकळे सोडले जाते. क्वचित प्रसंगी एकावेळेस दोन वाघ सोडले जातात. उर्वरित वाघांना कोंडूनच ठेवले जाते. प्राणिसंग्रहलयात वाघांची संख्या जास्त झाल्यामुळे काही वाघ अन्य प्राणिसंग्रहालयासाठी पाठवण्यास महापालिकेने सेंट्रल झू ऑथॅरिटीकडे अनुकूलता दाखवली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मुंबई महापालिकेच्या प्राणिसंग्रहालयासाठी एका वाघाची गरज आहे. या महापालिकेने पत्र पाठवून एक वाघ देण्याची मागणी औरंगाबाद महापालिकेकडे केली आहे. या मागणीला प्रतिसाद देत मुंबईला वाघ पाठवण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


तरुणाचा खून करणाऱ्या पाच आरोपींना कोठडी

$
0
0


औरंगाबाद : भावसिंगपुरा येथील अल्ताफ शेख रहीम या तरुणाचे अपहरण करुन खून करणाऱ्या पाच आरोपींना मंगळवारपर्यंत (२९ मार्च) पोलिस कोठडी ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी बी. बी. गव्हारे यांनी बुधवारी दिले.
भीमनगर-भावसिंगपुरा येथील शेख अल्ताफ शेख रहीम या तरुणाचे परिसरात राहणाऱ्या मनिष लहोटसोबत महापालिका निवडणुकीच्या काळात भांडण झाले होते. याचा राग धरून त्याला २० मार्च रोजी मनिष लाहोट, सनी रणा यांनी बेदम मारहाण केली व स्कॉर्पिओमध्ये कोंबून नेण्यात आले. गाडीत टाकल्यावर लाकडी दांड्याने मारहाण करण्यात आली व त्यात तो गतप्राण झाला. त्यानंतर चंद्रकांत शिर्के, सनी राणा, संतोष नरवडे व विराज सौदागर या चौघांनी अल्ताफ शेखचा मृतदेह औरंगाबाद-जळगाव रस्त्यावरील पहुर-वाकोद दरम्यान बंद पडलेल्या हॉटेलच्या हौदात फेकून दिला. मीनाक्षी रहीम शेख यांच्या तक्रारीवरुन चंद्रकांत शिर्के, संतोष नरवडे, सनी राणा व विराज सौदागर यांच्याविरुद्ध छावणी ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सहाय्यक पोलिस निरीक्षक घेरडेच्या यांनी पाच जणांना अटक केली. त्यांना बुधवारी कोर्टात हजर करण्यात आले. त्यांच्या ताब्यातून स्कॉर्पिओ व अंगावरील कपडे जप्त करणे बाकी आहेत, अन्य साथीदारांचा तपास बाकी आहे. त्यामुळे आरोपींना पोलिस कोठडी देण्याची विनंती करण्यात आली. कोर्टाने आरोपींना मंगळवारपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बलात्कारप्रकरणी शुक्रवारपर्यंत कोठडी

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
गलवाडा (ता. सोयगाव, जि. औरंगाबाद) येथील अल्पवयीन मुलीला पळवून नेऊन बलात्कार केल्याप्रकरणी दोन आरोपींना शुक्रवारपर्यंत (२५ मार्च) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश विशेष न्यायाधीश पी. एस. शिंदे यांनी बुधवारी दिले.
या प्रकरणी पीडित मुलीच्या वडिलांनी फिर्याद दिली होती. फिर्यादीनुसार, १६ मार्च २०१६ रोजी रात्री फिर्यादी आपल्या घरात झोपला होता. मध्यरात्री जाग आली असता, त्याला त्याची साडेसतरा वर्षांची मुलगी दिसून आली नाही. शोध सुरू असतानाच, आरोपी रवींद्र सुपडू देवरे (रा. गलवाडा) व आरोपी शैलेश वना पवार (रा. गलवाडा) हे मुलीला दुचाकीवर बसवून पळवून घेऊन गेल्याची माहिती फिर्यादीच्या बहिणीने फिर्यादीला दिली. त्यानंतर फिर्यादीने दिलेल्या तक्रारीवरून सोयगाव पोलिस ठाण्यामध्ये कलम ३६३ अन्वये गुन्हा दाखल झाला. या प्रकरणी रवींद्र देवरे याला २० मार्च रोजी अटक करण्यात येऊन सोयगाव कोर्टात हजर केले असता, २३ मार्चपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले. तर, आरोपी शैलेश पवार याला २२ मार्च रोजी अटक करण्यात आली. या प्रकरणी, 'मी अल्पवयीन असून, माझ्यावर आरोपी शैलेश याने बलात्कार केला', असा जबाब पीडित मुलीने दिल्यानंतर या प्रकरणामध्ये कलम ३७६, ३६६ अ आणि बाललैंगिक प्रतिबंधक कायद्याचे ४, ८, १०, १२ ही कलमे वाढवण्यात आली. दोन्ही आरोपींना बुधवारी जिल्हा कोर्टात हजर करण्यात आले असता, ज्या दुचाकीवरून संबंधित मुलीला पळवून नेले, ती जप्त करणे आहे, आरोपींची वैद्यकीय तपासणी करणे बाकी आहे, तसेच तपास प्राथमिक स्वरुपातच आहे. त्यामुळे आरोपींना पाच दिवस पोलिस कोठडी देण्याची विनंती सहाय्यक सरकारी वकील मधुकर आहेर यांनी कोर्टात केली. ही विनंती ग्राह्य धरुन कोर्टाने आरोपींना शुक्रवारपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

श्रीहरी अणेंना मराठवाडा बंदी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

अॅड. श्रीहरी अणे यांनी केलेल्या मराठवाडा राज्याच्या मागणीमुळे शिवसेना-भाजपमध्ये चांगलाच संघर्ष उफाळला आहे. खासदार चंद्रकांत खैरे यांनी बुधवारी पत्रकारांशी बोलताना महाराष्ट्राचे तुकडे करू पाहणाऱ्या अणे यांना मराठवाड्यात पाय ठेवू देणार नाही, असा इशारा दिला. महाराष्ट्राचे चार भागात विभाजन करण्याचे वक्तव्य करणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मा. गो. वैद्य यांना म्हातारचळ लागल्याची टीका त्यांनी केली.

जालना येथील एका कार्यक्रमात श्रीहरी अणे यांनी विदर्भासह मराठवाडाही स्वतंत्र राज्य झाले पाहिजे, असे विधान केले आहे. या विधानामुळे राज्याच्या विधानसभा अधिवेशनात गदारोळ झाला, त्याचा परिणाम म्हणून अणे यांना राजीमाना द्यावा लागला. अणेंनी केलेल्या विधानाबद्दल पत्रकारांनी चंद्रकात खैरे यांना प्रतिक्रिया विचारली असता ते म्हणाले, श्रीहरी अणे यांना मराठवाड्यात शिवसेनेचे कार्यकर्ते पाय ठेवू देणार तर नाहीतच, पण अणे हे विदर्भातील आहेत. शिवसेनेचे कार्यकर्ते त्यांना विदर्भातही पाय ठेवू देणार नाहीत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी प्रवक्ते मा. गो. वैद्य यांच्यावरही खैरे यांनी टीका केली. वैद्य यांना म्हातारचळ लागला आहे, असे ते म्हणाले. एकिकडे अखंड भारताचे स्वप्न पहायचे आणि दुसरीकडे महाराष्ट्राचे तुकडे करण्याची भाषा करायची हे योग्य नाही, असे खैरे म्हणाले. शिवसेना अखंड महाराष्ट्रासाठी बांधील आहे. वाघाच्या शेपटीवर पाय दिला तर, काय होते हे नाशिकच्या घटनेवरून लक्षात आलेच असेल, असे सांगताना खैरे यांनी फडणवीस सरकारला इशाराच दिला. ते म्हणाले, शेतकऱ्यांच्या आत्महत्त्येच्या विषयावरून लक्ष विचलीत करण्यासाठी सरकार असे मुद्दे उपस्थित करीत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आरडी एजंट महिलेने ५७ हजार हडपले

$
0
0


औरंगाबाद : पोस्टाच्या आरडी खात्याची रक्कम जमा करण्यासाठी नेमण्यात आलेल्या एजंट महिलेने ५७ हजार हडप केल्याची घटना उघडकीस आली आहे. २०११ ते २०१४ या कालावधीत हा अपहार झाला. या प्रकरणी स्नेहल दीपक केतकरविरुद्ध पोस्ट ऑफिसचे साहाय्यक अधीक्षक सतीश पाठक यांनी दिलेल्या तक्रारीवरून बेगमपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याता आला आहे.
स्नेहल केतकरला आरडी ऐजंट म्हणून नेमण्यात आले होते. बेगमपुरा परिसरातील २५ खातेदारांकडून आवर्ती जमा योजनेची रक्कम गोळा करून ती पोस्टात देण्याचे काम केतकरकडे होते. तीन वर्षांच्या काळात या स्नेहलने खातेदारांकडून एकूण ५७ हजार २०० रुपये गोळा केले होते. मात्र, ही रक्कम पोस्टात जमा करण्याऐवजी स्वतःकडे ठेवली होती. एप्रिल २०१५ मध्ये तपासणीत हा प्रकार उघडकीस आला. यानंतर केतकरने ही रक्कम पोस्टामध्ये जमा केली. केतकरने अपहार केल्याचे सिध्द झाल्याने तिच्याविरुद्ध पाठक यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पीएसआय कुलकर्णी तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पालिकेचा अर्थसंकल्प ८०० कोटी पार करणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
महापालिकेचे अर्थसंकल्प ८०० कोटींचा आकडा पार करणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. प्रशासनाने सादर केलेल्या ७७७ कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पात किमान ५० कोटींची वाढ करून मान्यता देण्यासाठी सोमवारी स्थायी समितीची बैठक बोलावण्यात आली आहे.
महापालिका प्रशासनाने सादर केलेल्या ७७७ कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पावर चर्चा करण्यासाठी सभापती दिलीप थोरात यांनी १६ मार्च स्थायी समितीची बैठक आयोजित केली होती. त्या बैठकीत सर्व सदस्यांनी अर्थसंकल्पावर टीक करून त्यात ठराविक वॉर्डांना झुकते माप देण्यात आल्याचा आरोप केला. काही सदस्यांनी अर्थसंकल्पाचे पुस्तक फाडून भिरकावले. या प्रकारामुळे सभापतींनी बैठक तहकूब केली. ही तहकूब बैठक सोमवारी आयोजित करण्यात आली आहे. दरम्यान, प्रशासनाने सादर केलेल्या अर्थसंकल्पात सुधारणा करण्यात येणार असल्याची माहिती सभापतींसोबत चर्चा केल्यानंतर मिळाली. सादर झालेल्या अर्थसंकल्पात ४० ते ५० कोटींची वाढ करून ते चर्चेसाठी ठेवले जाणार आहे. स्थायी समितीमध्ये अर्थसंकल्प मंजूर करून सर्वसाधारण सभेसमोर ठेवला जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हेरंब ट्रॅव्हल्सला ग्राहक मंचचा दणका

$
0
0

म. टा. विशेष प्रतिनिधी, औरंगाबाद
सिमला-मनाली सहलीमध्ये जेष्ठ नागरिकांची हेळसांड करून फसवणूक केल्याप्रकरणी हेरंब ट्रॅव्हल्सने तक्रारदार जेष्ठ दांपत्याला १५ हजार रुपये नुकसानभरपाई व तक्रार खर्चापोटी अडीच हजार, असे १७ हजार ५०० रुपये देण्याचे आदेश जिल्हा ग्राहक मंचाने दिले आहेत.
यशवंत आहेर व विजया आहेर या दांपत्याने हेरंब ट्रॅव्हल्सच्या १० ते २३ मे २०१५ दरम्यान निघालेल्या सिमला-मनाली सहलीचे बुकिंग केले होते. यासाठी त्यांनी ६३ हजार रुपये जमा केले. सहलीमध्ये बिसलेरी पाणी पुरवण्यात येईल, त्याचप्रमाणे थ्री स्टार हॉटेलमध्ये राहण्याची व्यवस्था, प्रेक्षणीय स्थळे दाखवण्याचे आश्वासन दिले होते. औरंगाबाद ते अंबाला रेल्वे तिकिट १९९० रुपये प्रतिव्यक्ती आहे; म्हणजे १९९० ऐवजी त्यांच्याकडून तीन हजार रुपये घेण्यात आले. परतीच्या प्रवासात मनमाडपर्यंत कन्फर्म तिकिट दिले; मात्र मनमाड ते औरंगाबाद प्रवासासाठी व्यवस्था केली नाही. त्यामुळे आहेर दांपत्यांला टॅक्सी करून औरंगाबादला यावे लागले.
सहलीच्या मुक्कामात हॉटेल व भोजन व्यवस्था निष्कृष्ट होती. रेल्वे प्रवासानंतर १४ सिटर वाहनातून प्रवास होईल, असे सांगितले. प्रत्यक्षात साध्या बसमधून प्रवास केला, त्यामुळे आठ तासांऐवजी १४ तास लागले. सहलीच्या नियोजनात सिमला येथे मुक्काम असताना प्रत्यक्षात सिमला येथून तीस किलोमीटर दूर कुपरी येथे मुक्कामाची व्यवस्था केली. रोहतांगपास येथे नेले नाही. त्यामुळे हा बर्फाच्छादित प्रदेश पहाता आला नाही. एकूणच प्रवासात मनःस्ताप झाल्याने यशवंत आहेर यांनी ग्राहक मंचात तक्रार केली. ग्राहक मंचाने नोटीस बजावूनही हेरंब ट्रॅव्हल्सतर्फे कुणीही हजर झाले नाही, त्यामुळे एकतर्फी सुनावणी घेऊन मंचाने सहलीतील चुकीच्या नियोजनामुळे झालेल्या त्रासापोटी १५ हजार व तक्रारीच्या खर्चापोटी अडीच हजार, असे १७ हजार ५०० रुपये देण्याचे आदेश दिले. तक्रारदाराची बाजू संजय नांदुरे यांनी मांडली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हजार रिक्षांतून हायटेक मनोरंजन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
रिक्षामधून होणारा प्रवास आता रोजच्या सारखा कंटाळवाणा होणार नाही. प्रवाशांच्या मनोरंजनासाठी शहरातील सुमारे एक हजार रिक्षांमध्ये टॅब बसविण्यात येणार आहेत. संबंधित कंपनीने बुधवारी हे प्रात्यक्षिक पोलिस आयुक्तांना दाखवले. या माध्यमातून जनजागृतीपर विशेष संदेशही प्रसारित करण्यात येणार आहेत.
पुणे येथील मुव्हिज मल्टीमीडिया कंपनीच्या सहकार्याने रिक्षांमध्ये टॅब बसविण्यात येत आहेत. रिक्षाचालकाच्या सिटमागे हे टॅब लावण्यात येतील. त्यामध्ये चित्रपट गीत, संगीत, इतर कार्यक्रम प्रवाशांना दाखवले जातील. शिवाय विविध सामाजिक उपक्रमाची जनजागृती करणारी फिल्मही यावरून दाखवली जाईल, असे कंपनीच्या प्रतिनिधीने सांगितले. यामुळे प्रवाशांचे मनोरंजन होणार आहे.
टॅब बसविलेल्या काही रिक्षा बुधवारी पोलिस आयुक्तायात आणण्यात आल्या होत्या. पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी रिक्षातील टॅब व त्यावरील मनोरंजनात्मक व समाज जागृतीपर क्लिप पाहून माहिती घेतली. प्रवाशांच्या मनोरंजनासाठी ही योजना असली तरी प्रवाशांना पोलिस आयुक्तांकडून मंजुरी मिळेपर्यंत वाट पाहावी लागणार आहे.

एक हजार रिक्षांमध्ये टॅब लावण्यात येणार आहेत. त्यासाठी रिक्षांची कागदपत्रे, रिक्षाचालक-मालकांच्या नावाची नोंद करण्यात येईल. याशिवाय टॅबवर दाखविल्या जाणाऱ्या जाहिरातींच्या उत्पन्नातून काही मोबदला रिक्षाचालकाला दिला जाईल.
- रेणूकादास वैद्य, नगरसेवक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


...सुगरणीची ‘अपूर्व’ भरारी!

$
0
0


Ravindra.Taksal
@timesgroup.com
औरंगाबादः नोकरीपेक्षा काही तरी वेगळे करायचे, हा निश्चय करून माधुरी शिरीष बर्दापूरकर यांनी अपूर्व गृहोद्योग उभारला. निर्भेळ, उत्पादित मालाचा उत्तम दर्जा व प्रभावी मार्केटिंगच्या जोरावर आपले वेगळे स्थान निर्माण केले. आपल्यातल्या 'स्व'ची ओळख ही जीवनाची खरी शिदोरी. हाच धागा पकडून त्यांनी यशस्वी वाटचाल सुरू केली.
जुन्या पद्धतीने स्वादिष्ट व रुचकर पदार्थ तयार करण्यात हातखंडा असलेल्या माधुरी बर्दापूरकर मुळच्या औरंगाबादच्या. वडील विद्यापीठात नोकरीला, तर आई गृहीणी. घरात माधुरी यांच्यासह चार मुली. लहानपणापासून त्यांना विविध क्रीडा प्रकार खेळण्याची सवय. त्यातच पाककलेची गोडी लागली. शालेय शिक्षण संपले. महाविद्यालयीन शिक्षण सुरू असताना त्यांनी आपले हे छंद जोपासले. खो-खो, हॉकी आदी क्रीडा प्रकारात अनेक स्पर्धात त्या सहभागी झाल्या. १९८२ साली दहावी झाली. पुढील शिक्षण करता-करता त्यांनी मराठी व इंग्रजी टायपिंग पूर्ण केले. त्या जोरावर बी. कॉमच्या पहिल्या वर्षात शिक्षण सुरू असतानाच एका सहकारी बँकेत त्यांना लिपिक म्हणून काम करण्याची संधी मिळाली. त्यांची धडपड बघून पालकांनी शिक्षण सुरू असतानाच त्यांना जॉबसाठी नेहमी प्रोत्साहन दिले. त्यातून माधुरी यांचा आत्मविश्वास वाढत गेला. शिक्षण, नोकरी व छंद जोपासणे यांची सांगड घालत त्यांनी बी. कॉम पूर्ण केले. शिक्षण पूर्ण झाल्यावर १९८९ साली त्यांचा विवाह औरंगाबादेतच खासगी कंपनीत नोकरीस असलेल्या शिरीष बर्दापूरकर यांच्याशी झाला. गजानननगर भागात त्या राहतात. माहेरप्रमाणेच सासरीही त्यांना स्वतःचे निर्णय पूर्ण स्वातंत्र मिळाले. सासरच्या लोकांनी दिलेल्या प्रोत्साहनामुळे आधीपासून सुरू असलेली बँकेची नोकरी सुरू ठेवली. घरातील सर्व जबाबदारी पार पडून सकाळी साडेआठ वाजता बँकेत जाणे, रात्री घरी येण्यास बहुतेक वेळा रात्रीचे नऊ वाजत. घरासाठी काहीतरी करण्याची जिद्द असल्याने त्यांनी तारेवरची कसरत करत ही सर्व जबाबदारी पेलली. याच दरम्यान त्यांच्या घरात चिमुकल्याचे आगमन झाले. मानसीचा जन्म झाला. तिचे संगोपण, शिक्षण व घरातील जबाबदारी यांची सांगड घालत माधुरी यांनी नोकरीसह आपली पाककलेची आवड, वाचन आदी छंद जोपासले. त्यात कधीही खंड पडला नाही. या दरम्यान बर्दापूरकर दाम्पत्यास दुसरी मुलगी झाली. दोन्ही मुली महाविद्यालयीन शिक्षण घेत आहेत, तर माधुरी ऑक्टोबर २०१५ पर्यंत बँकेतच कार्यरत होत्या. कामातील एकसारखेपणामुळे त्यांना कंटाळा आला होता. त्यांचे मन आता कामात रमत नव्हते. त्यात चाकरी करण्यापेक्षा चाकोरीच्या बाहेर जाऊन काहीतरी वेगळे करूया, स्वतःची ओळख निर्माण करू ही भावना त्यांना शांत बसू देत नव्हती. शेवटी त्यांनी निर्णय घेतला. मनाना कौल दिला होता. त्यांनी बँकेच्या नोकरीचा राजीनामा देण्याचा धाडसी निर्णय घेतला. घरच्या घरी काही उद्योग, व्यवसाय सुरू करता येईल का, त्यातून कुटुंबाला आधार मिळावा आणि आपला रिकामा वेळ सत्कारणी लागावा यासाठी त्यांनी शोध मोहिम सुरू केली. अवगत असलेल्या रेसीपीच्या जोरावर पारंपरिक पद्धतीने स्वादिष्ट व रुचकर पदार्थ तयार करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. त्यासाठी अपूर्व फूड प्रॉडक्टस् नावाने ऑक्टोबर २०१५मध्ये गृहोद्योग उभारला. नातेवाईक, ओळखीच्या लोकांना भेट म्हणून त्यांनी खलबत्यात कुटलेल्या कारळ, जवळ, खोबरे, शेंगादाण्याची चटणी आदी पदार्थ दिले. त्यास मिळालेल्या चांगल्या प्रतिसादामुळे हा उद्योग चांगला चालू शकेल, हा आत्मविश्वास त्यांना मिळाला. मार्केटचा अभ्यास व मागणी लक्षात घेत त्यांनी सुरुवातीला खलबत्यात कुटलेल्या विविध प्रकाराच्या चटण्या, शेंगादाणीची चटणी विक्री सुरू केली. त्यासाठी सुरुवातीला केवळ एक हजार रुपयांची गुंतवणूक करत कच्चा माल खरेदी केला. कमी कालवधीतच अपूर्व फूड प्रॉडक्टच्या चटण्यांना परिसरात चांगलाच प्रतिसाद मिळत गेला. त्यातून परिसरातील महिलांशी जिव्हाळ्याचे नाते निर्माण होते गेले. तसा त्यांचा आत्मविश्वासही वाढत गेला. दर्जेदार व चविष्ट उत्पादनामुळे प्रसिद्धी करण्याची गरज कधीच पडली नाही, असे त्या आवर्जून सांगतात. त्यानंतर टप्प्याटप्प्प्याने त्या एक एक उत्पादन वाढवित गेल्या. उपावसाची भाजणी, खोबरा, जवस, शेंगदाणे, तीळ, कढीपत्ता, दाळव, कारळाची पूड अशा वेगवेगळ्या चटण्यांसह सांबर मसाला, मेतकूट, खारे व गोड शंकरपाळे, मठरी पुरी, धपाटे - चटणी, सुरळी वडी, आदी पदार्थ तयार करण्यासही त्यांनी सुरुवात केली. हे पदार्थ बनविताना स्वच्छता, चव, मालाचा दर्जा उत्तम राखण्याची विशेष काळजी घेतली जाते. परिसरातील नियमित ग्राहकांसह चार ते पाच किराणा दुकानदारांकडूनही पदार्थांना मागणी वाढली आहे. दुकानात मालाची डिलेव्हरी करण्यासाठी त्या स्वतः जातात. त्यातूनच मार्केटिंगची शैलीही अवगत होत गेली. बाजारापेक्षा विश्वासार्ह दर्जाच्या वस्तू, पदार्थ मिळाल्याने ग्राहक समाधानी असतात, असे माधुरी यांनी सांगितले. शहरात आयोजित गृहोउद्योग वस्तूच्या प्रदर्शनात सहभागी होण्याच्या संधीतून त्यांना एक नवे व्यासपीठ मिळाले आणि या प्रदर्शानातून चांगली विक्री झाली. अजून काही नवीन करण्याची उर्मी त्यातून प्राप्त झाली. व त्यातून त्यांनी दिवाळीचे विविध फराळ तयार करण्याचे नियोजन सुरू केले आहे. आपल्या कामातून अन्य काही महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात, असा मानस माधुरी यांचा असून त्या दिशेने त्यांनी वाटचाल सुरू केली. त्यांच्या या कामात पती शिरीष, सासू, दोन्ही मुली यांच्यासह सासरच्या लोकांची मदत झाली. त्यांच्यामुळे व्यवसाय वाढला असे त्या सांगतात. केवळ इच्छेतून एका महिलेने ही भरारी मारली. ती इतरांसाठी नक्कीच प्रेरणादायी आहे.









मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

श्री संस्थान गणपतीच्या होळीचे पूजन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
स्वतंत्र मराठवाड्याची मागणी करून, संयुक्त महाराष्ट्र तोडण्याची भाषा करणाऱ्या तसेच अपप्रवृत्तीच्या नावाने बोंब मारीत बुधवारी सायंकाळी शहराची मानाची राजाबाजार येथील श्री संस्थान गणपती मंदिरासमोर होळी पेटवण्यात आली. यावेळी खासदार चंद्रकांत खैरे, पोलिस आयुक्त अमितेश कुमार, उपायुक्त वसंत परदेशी, शिवसेना जिल्हाप्रमुख अंबादास दानवे, नगरसेवक नंदकुमार घोडेले, पोलिस उपायुक्त संदीप आठवले, सहायक पोलिस आयुक्त खुशालचंद बाहेती, सी. डी. शेवगण, नगरसेविका यशश्री बाखरिया, संस्थान गणपतीचे अनिल चव्हाण, रमेश घोडले, गोपी घोडेले, चिन्मय शहा, नारायण कानकाटे, सुनील चौधरी, राधाकृष्ण गायकवाड, मोहिंदर बाखरिया, बंडू ओक यांच्यासह परिसरातील मान्यवरांची उपस्थिती होती. मानाची होळी पाहण्यासाठी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. खासदारांनी होलिकापूजन केले. नैवेद्य दाखवल्यानंतर होळी पेटविण्यात आले. खासदार चंद्रकांत खैरे यांच्या मछलीखडक येथील कार्यालयासमोरील होळीत अॅड. अणे यांच्या प्रतिमेचे दहन करण्यात आले. शिवसैनिकांनी अणे मुर्दाबादच्या घोषण दिल्या. यावेळी यावेळी खासदार खैरे, शिवसेना जिल्हाप्रमुख अंबादास दानवे, बंडू ओक, सचिन खैरे, नंदकुमार घोडेले, बाळासाहेब थोरात, जयसिंग होलिये, राधाकृष्ण गायकवाड उपस्थ‌ित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जनक्षोभानंतर स्पर्धा रद्द

$
0
0

वृत्तसंस्था, लातूर

दिवंगत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे चिरंजीव, आमदार अमित देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त लातूरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या व्हॉलीबॉल स्पर्धांसाठी मोठ्या प्रमाणात पाणी खर्च होत असल्याबद्दल जनक्षोभ निर्माण झाल्यानंतर या स्पर्धा रद्द करण्यात आल्या आहेत.

भीषण दुष्काळाच्या झळा मराठवाडा सोसत असताना येत्या २८ मार्च रोजी लातूरच्या जिल्हा क्रीडा संकुलाच्या मैदानावर या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. लातुरात सध्या पाण्यावाचून सामान्यांचे कमालीचे हाल होत आहेत. पाण्यावरून हिंसाचार होऊ नये, यासाठी जमावबंदी लागू करण्याची वेळ आली आहे. अशा परिस्थितीत जिल्हा क्रीडा मैदान तयार करण्यासाठी पाण्याचा गैरवापर होत असल्याच्या बातम्या प्रसारित झाल्या. सामान्य लोकांकडूनही त्यावर तीव्र नाराजीचा सूर लावण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर हा क्रीडा महोत्सव रद्द करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती काँग्रेसचे शहराध्यक्ष व क्रीडा संयोजन समितीचे प्रमुख मोईज शेख यांनी दिली. 'प्रसार माध्यमांच्या भूमिकेचा आदर करून व पाणीटंचाईमुळे त्रस्त झालेल्या लातूरकरांच्या भावना लक्षात घेत या स्पर्धा रद्द करण्याचा निर्णय संयोजकानी चर्चा करून घेतला आहे', असे मोईज शेख यांनी सांगितले. मैदानासाठी अडीच हजार लीटर पाणी खर्च केल्याच्या आरोपांत तथ्य नसल्याचा दावा शेख यांनी केला. 'मैदानात केवळ सात-आठ बादल्या पाणी शिंपडण्यात आले', असा दावा करून, 'विरोधकांनी राजकीय लाभासाठी केलेले हे आरोप आहेत', अशी पुस्ती शेख यांनी जोडली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लातूरला उजनीतून रेल्वेने पाणी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सोलापूर

चाळीस दिवसांतून एकदा पाणीपुरवठा होणाऱ्या लातूरकरांची तहान आता सोलापूरचे उजनी धरण भागवणार आहे. उजनी धरणातील पाणी भीमा नदीत सोडून तेथून हे पाणी पंढरपूर रेल्वे स्थानकावरून रेल्वेने लातूरला घेऊन नेण्याचे निश्चित झाले असून, या संदर्भातील प्रस्ताव राज्य सरकारकडून रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्याकडे सादर करण्यात आला आहे. पाणी वाहून नेण्यासाठी आवश्यक यंत्रणेची तयारी सुरू असल्याचे प्रभू यांनी ट्विटरवरून गुरुवारी जाहीर केले.

'उजनी धरणातील राखीव पाणी भीमा नदीत सोडून ते पंढरपूरला आणण्यात येणार आहे. तेथून ते रेल्वेने लातूरला नेण्यात येणार आहे. लातूर शहराजवळील हरंगुळ येथे हे रेल्वे टँकर उतरवून तेथून शहराला पाणीपुरवठा करण्याचे नियोजन करण्याच्या जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्याशी चर्चा केली असून लातूरकरांना पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी रेल्वेने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे लवकरच सोलापूरचे उजनी धरण लातूरकरांची तहान भागवणार आहे,' असे सूत्रांनी स्पष्ट केले.

मराठवाडा भीषण दुष्काळी परिस्थितीचा सामना करीत असून, लातूर शहरात पाण्याचे दुर्भिक्ष्य मोठ्या प्रमाणावर आहे. नदी, तलाव तसेच विहरी कोरड्या ठणठणीत पडल्या आहेत. बोअरलासुद्धा पाणी लागत नाही त्यामुळे महिनाभरानंतर मिळणाऱ्या पाण्यावरच येथील जनता अवलंबून आहे. केवळ लातूरच नव्हे तर बीड आणि उस्मानाबाद जिल्ह्यांतसुद्धा पाणी प्रश्न बिकट बनला आहे.

पाणी वाहून नेण्यासाठी आवश्यक यंत्रणेची आम्ही तयारी करत आहोत. त्यानंतर राज्य सरकारच्या नियोजनानुसार पाणी पुरवठा करण्यात येईल. - सुरेश प्रभू, रेल्वेमंत्री

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दोन्ही वॉर्डांत एमआयएम

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
महापालिकेच्या सातारा-देवळाई वॉर्डाची पोटनिवडणूक मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन अर्थात एमआयएम लढविणार आहे. दोन्ही वॉर्डात उमेदवार उभे करण्याचा एकमुखी निर्णय शुक्रवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला. उमेदवार निवडीचे सर्व अधिकार आमदार इम्तियाज जलील यांना देण्यात आले आहेत.
सुभेदारी विश्रामगृहात एमआयएमचे नगरसेवक आणि पदाधिकारी यांची संयुक्त बैठक घेण्यात आली. या बैठकीत सातारा, देवळाई या दोन्ही वॉर्डातून अनेक इच्छुकांनी नगरसेवकांची भेट घेतली. एमआयएमकडून तिकीट मिळावे, यासाठी अनेकांनी थेट हैदराबादपर्यंत संपर्क केला. त्यामुळे सातारा व देवळाई या दोन्ही वॉर्डातून उमेदवार दयावे, अशी मागणी एमआयएम नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी केली. त्यामुळे या मागणीवर शिक्कामोर्तब झाले. बैठकीला एमआयएमचे गटनेते नासेर सिद्द‌िकी, शहरअध्यक्ष अन्वर कादरी यांच्यासह अन्य मान्यवरांची उपस्थिती होती.
-
सातारा-देवळाई पोट निवडणूक एमआयएम लढविणार आहे. दोन्ही उमेदवारांच्या नावांची घोषणा लवकर करू. प्रचारासाठी दोन्ही आमदार, नगरसेवक यांच्यासह एमआयएमचे प्रमुख ओवेसी यांना आणण्याची तयारी आहे.
- इम्तियाज जलील, आमदार, एमआयएम

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images