Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

गौरी-गणपतीसाठी खास ‌‘निजामबाद-हैदराबादी’ फुले

0
0
गौरी गणपतीच्या पार्श्वभूमीवर शेवंती, निशिगंधा, झेंडूच्या फुलांना मागणी वाढतच असते. यंदा ‘निजामाबाद-हैदराबाद’ येथून खास फुलांच्या पेट्या मागवल्या जात आहेत. श्रावण संपला की ‌वेध लागतात त्या गौरी-गणपतीचेच. यावेळी या फुलांची आवक अधिक वाढते.

पॅचवर्कची चौकशी थंडबस्त्यात

0
0
पॅचवर्कची चौकशी करणाऱ्या समितीला अभियांत्रिकी विभागाने मेजरमेंट बुक (एमबी) न दिल्यामुळे चौकशी थंडबस्त्यात गेली आहे. काही समिती सदस्यांनी चौकशीकडे पाठ फिरवल्यामुळे चौकशी केव्हा होईल याबद्दल कुणीच काही सांगायला तयार नाही.

घाईगडबडीत उद्घाटन

0
0
औरंगपुरा येथील सामाजिक सभागृहामध्ये उभारण्यात आलेल्या पोलिस चौकीचे उद्घाटन मंगळवारी सकाळी उरकण्यात आले. राज्यसभेच्या खासदार निधीतून सभागृह निर्माण करण्यात आले असून त्याचा लोकार्पण सोहळा आटोपता घेण्यात आला.

स्वाइन फ्लूची दहशत कायम

0
0
दोन वर्षांपूर्वी स्वाइन फ्लूमुळे औरंगाबादकर हैराण झाले होते. गेल्यावर्षी तुलनेत कमी रुग्ण आढळले होते. यंदा मात्र हे प्रमाण हळूहळू वाढत असल्याने स्वाइन फ्लूची दहशत कायम असल्याच चित्र आहे. मंगळवारी घाटीच्या स्वाइन फ्लू वॉर्डात पाच संशयित रुग्ण उपचार घेत आहेत. पैकी एकाची प्रकृति गंभीर आहे.

कचरा का भडकतो ?

0
0
कचऱ्याच्या संदर्भात सुरूवातीपासूनच पालिकेचे नियोजन चुकत आले आहे. रस्ते बांधणी, भूसंपादन, नगररचना या विभागाकडे पालिका प्रशासनाने व काही नगरसेवक-पदाधिकाऱ्यांचे जसे लक्ष असते, तसे लक्ष त्यांनी कचऱ्याचे व्यवस्थापन या विषयावर दिलेले नाही.

इलेक्ट्रॉनिक मीटरही ‘फास्ट’

0
0
जुन्या इलेक्ट्रिकल मीटरमध्ये फेरफार करून, प्रवाशांची लूट थांबविण्यासाठी, अॅटो रिक्षांना इलेक्ट्रॉनिक‌ मीटर बसविण्याची कारवाई करण्यात आली होती. मात्र नवीन इलेक्ट्रॉनिक मीटर बसविणाऱ्या एजन्सीकडूनच ‘वेटिंग फास्ट’ करून प्रवाशांच्या लूट केली जात आहे.

आनंदमयी उत्सवासाठी उस्मानाबाद पोलिसांचे प्रयत्न

0
0
गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सवाच्या काळामध्ये जनजागृती व्हावी व उत्सवामध्ये आखलेल्या आचारसंहितेचे पालन व्हावे, यासाठी उस्मानाबाद जिल्हा पोलिस दलाने विशेष उपक्रम हाती घेतला आहे.

दुस-या दिवशीही हजेरी

0
0
मराठवाड्याच्या काही भागांमध्ये सलग दुसऱ्या दिवशी मंगळवारी पावसाने हजेरी लावली. नांदेड जिल्ह्यामध्ये दिवसभरातील पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या, तर बीड जिल्ह्यामध्ये पावसाच्या मध्यम सरी कोसळल्या.

नांदेडमध्ये जोरदार सरी

0
0
नांदेड शहरामध्ये मंगळवारी दुपारी सुमारे एक तास जोरदार पाऊस झाला. जिल्ह्यात सकाळी आठ वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये १३.३९ मिलिमीटर पावसाची नोंद झाली होती.

सर्व शिक्षातील खोल्यांचे काम तपासणार

0
0
दोन वर्षांत सर्व शिक्षा अभियानांतर्गत करण्यात आलेल्या वर्ग खोल्यांच्या बांधकामाचा दर्जा तपासण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.

मुलाच्या चितेवर पित्याची आत्महत्या

0
0
विष प्राशन करून तरुण मुलाने आत्महत्या केल्यानंतर, त्याचा विरह सहन न झाल्याने पित्याने त्याच्या चितेवर उडी घेत आपली जीवनयात्रा संपवली.

वर्षभरापूर्वीच्या अर्जांचा ठावठिकाणा लागेना!

0
0
नियमानुसार कागदपत्रांची पूर्तता केलेल्या अर्जांचा ठावठिकाणा लागत नसल्याने बोरसर (बुद्रुक) येथील दारिद्र्यरेषेखालील कुटुंबाना रेशनकार्ड मिळत नाही.

औरंगाबाद पालिकेतील भोजनावळीची चर्चा

0
0
औरंगाबाद महापालिकेत सध्या विशिष्ट नगरसेवकांच्या भोजनावळीची चर्चा रंगू लागली आहे. या नगरसेवकांना चक्क एका वरिष्ठ अधिकाऱ्याने जेवण दिले व सहकार्य करण्याची अपेक्षा व्यक्त केली.

सर्व राजकीय पक्षांनी चीनचा अभ्यास करावा

0
0
‘जागतिकीरण स्विकारलेल्या चीनमध्ये लोकांचे जीवनमान सुधारण्यासाठी अनेक प्रयोग सुरू आहेत. त्यामुळे फक्त कम्युनिस्टांनीच नव्हे तर, भारतातील सर्व राजकीय पक्षांनी चीनचा अभ्यास करावा,’ असे आवाहन भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सचिव डॉ. भालचंद्र कानगो यांनी केले.

बीआरजीएफच्या कर्मचा-यांची ‘दिवाळी’

0
0
मागास क्षेत्र अनुदान योजनेत (बीआरजीएफ) काम करणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.

कृषिपंप सुरूच राहणार

0
0
कृषि पंपाच्या थकीत वीजबिलांच्या वसुलीसाठी कृषि पंपाचे वीज कनेक्शन तोडण्याचे आदेश काढण्यात आले होते. मात्र, आता शेतकर्यांना वीजबिल भरण्यासाठी सवलत देण्यात येणार आहे.

शाडू मातीच्या ५१ गणेश मूर्ती

0
0
बन्सीलाल नगरमधील शिंदे कुटुंबियांनी शाडू मातीपासून ५१ प्रकारच्या गणेश मूर्ती तयार केल्या आहेत. यात छोटा भीम गणपती, जास्वंदाच्या फुलात असलेला गणपती असे छोटे छोटे गणपती तयार केले असून, दोन फुटांची शाडू मातीची मोठी मूर्तीही साकारली आहे.

चकाचक औरंगाबादसाठी पालिकेचा पुढाकार

0
0
शहरातील कचरा निर्मुलनासाठी पालिका आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे कामाला लागले आहेत. कचरा डेपो शिफ्ट करण्यासाठी त्यांनी नगरसेवक व नागरिकांना दोन आठवड्यांची डेडलाइन दिली आहे.

मनसेचा सिल्लोडमध्ये ‘रुमणे मोर्चा’

0
0
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे कृषिपंपांचा तोडलेला वीजपुरवठा जोडावा, या मागणीसाठी महावितरण कार्यालयावर मंगळवारी रूमणे मोर्चा काढण्यात आला. माजी आमदार किसनराव काळे यांनी मोर्चाचे नेतृत्व केले.

खतरनाक आरोपी जेरबंद

0
0
बीड जिल्ह्यातील आष्टी येथील पोलिस ठाण्याच्या लॉकअपची भिंत फोडून पसार झालेला आरोपी भीमा लक्ष्मण मस्के यास जेरबंद करण्यात आले आहे. भीमा मस्के असे या आरोपीचे नाव असून, त्याच्यावर ‘मोक्का’ लावण्यात आला होता.
Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images