Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

आरक्षणाचा लाभ खेळाडूंना द्या ः कोर्ट

$
0
0



औरंगाबाद : महाराष्ट्र ऑलिंपिक असोसिएशनशी संलग्नित खेळाडूंना आरक्षणाचा लाभ देण्याचा निकाल न्यायालयाने दिला. याचिकाकर्ता सागर भडकेला खेळाडूंसाठी आरक्षित पदावर नेमणुकीबाबत चार आठवड्यात निर्णय घेण्याचा आदेश दिला.
याचिकाकर्त्याने नांदेड येथील राज्यस्तरीय कराटे अजिंक्यपद स्पर्धेत प्रथमस्थान प्राप्त केले होते. अमरावती येथील प्रादेशिक निवड समितीने अनुरेखक पदासाठी जाहिरात प्रसिद्ध झाली. क्रीडा संवर्गातील आरक्षणीत जागेवर भडके यांनी अर्ज केला होता. त्यांनी महाराष्ट्र कराटे असोसिएशनने दिलेले प्रमाणपत्र क्रीडा व युवक सेवा संचालकांकडे पडताळणीसाठी पाठविले होते, पण संचालकांनी सदर संघटनेला इंडियन ऑलिंपिक असोसिएशनची मान्यता नसल्याने भडके यांना आरक्षणाचा लाभ घेता येणार नाही असा निर्णय दिला. त्यांनी अॅड. अमोल सावंत यांच्यामार्फत हायकोर्टात याचिका दाखल केली होती. शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने ३० एप्रिल २००५ रोजी शासन निर्णय दिला. वर्ग तीन व चार पदावर नोकरीसाठी सांघिक राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये प्रथम, द्वितीय व तृतीय स्थान पटकावणाऱ्या खेळाडूंसाठी आरक्षण लाभ देण्याचा निर्णय घेण्यात आला. तर १४ जुलै २००९ च्या शासन निर्णयानुसार जर एखाद्या खेळाची राज्यस्तरीय संघटना त्यांच्या राष्ट्रीय संघटनेशी संलग्न असेल व राष्ट्रीय संघटना इंडियन ऑलिंपिक असोसिएशनशी संलग्न असेल तर अशा राज्य संघटनेच्या स्पर्धेतील राज्यस्तरीय खेळाडूंनाही आरक्षणाचा लाभ देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. महाराष्ट्र कराटे असोसिएशनकडून नांदेड येथे २०१३ मध्ये राज्य कराटे अजिंक्य स्पर्धा आयोजित केली होती, पण सदर संघटनेला इंडियन ऑलिंपिक असोसिएशनची फेब्रुवारी २०११ नंतर मान्यता नसल्याने याचिकाकर्त्याचे प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येऊ शकत नाही, असे शासनाने म्हणणे मांडले. तर संघटनेला महाराष्ट्र ऑलिंपिक असोसिएशनची मान्यता असल्याने त्यांनी नांदेड येथे आयोजित केलेल्या स्पर्धा नियमानुसारच असल्याचा दावा याचिकाकर्त्याच्यावतीने करण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


उस्मानाबाद जिल्ह्यात ०.६८ टक्के पाणीसाठा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, उस्मानाबाद
उस्मानाबाद जिल्ह्यातील २११ प्रकल्पांत सध्या केवळ ४.४५ दलघमी इतका म्हणजेच ०.६८ टक्के इतकाच उपयुक्त जलसाठा असून हा जलसाठा जिल्हावासियांना एप्रिल महिन्याचा अखेरपर्यंत पुरेल किवा नाही याबद्दल साशंकता वर्तविण्यात येत आहे.
शिवाय, उपलब्ध पाणीसाठ्याचे बाष्पीभवन रोखण्याचा तंत्राचा वापर यंदा होणार नसल्याने पाणी टंचाईची समस्या दिवसेंदिवस गंभीर बनत चालली आहे. जिल्ह्यातील एक मोठा प्रकल्प १७ मध्यम आणि १९३ अशा एकूण २११ प्रकल्पात ४.०५ दश लक्ष घनमीटर उपयुक्त जलसाठा ‌शिल्लक आहे. २०१४ मध्ये या दिवसात जिल्ह्यातील सर्व प्रकल्पांत एकूण १४.५२ टक्के इतका जलसाठा होता. तरीही जिल्हावासियांना टंचाईच्या झळा सहन कराव्या लागल्या होत्या. यंदा जलसाठ्याची स्थिती नगण्य अशी असून प्रकल्पात पाणी नसल्याने जिल्हा वासियांच्या घशाला कोरड पडली आहे. प्रकल्पात जलसाठा अज्यल्प असल्याने यंदा बाष्पीभवन रोखण्यासाठी फॅटी असिडची मोहीम जिल्हा प्रशासनाने घेतली नाही.
उस्मानाबाद जिल्ह्यात गेल्या चार वर्षांपासून दुष्काळी स्थिती आहे. त्यामुळे प्रकल्पातील पाणी साठ्यात वाढ झालेली नाही. यावर्षीही पाऊस जेमतेम झाल्याने जिल्ह्यातील प्रकल्पात अपेक्षीत पाणीसाठा झालेला नाही. त्यात आता उन्हाची तीव्रता वाढत चालल्याने प्रकल्पातील पाणी साठ्यात झपाट्याने घट होत आहे. विहिरी कोरड्या पडू लागल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून कुपनलिकेचे पाणी आटले आहे. परिणामी एकूण साठवण क्षमतेच्या ०.६८ टक्के इतकाच जलसाठा उपलब्ध आहे.
जिल्ह्यात ३१४ टँकरने पाणीपुरवठा
जिल्ह्यात सध्या २१३ गावे व नऊ वाड्यांना ३१४ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. यापैकी सर्वाधिक टँकर्स उस्मानाबाद तालुक्यात ६४, कळंब ६२ जर भूम तालुक्यात ५६ टँकर्स सुरू आहेत. टँकर्सद्वारे सुमारे चार लाख ८७ हजार नागरिकांची तहान भागविण्यात येत आहे. याशिवाय १२०१ विंधन विहिरीचे अधिग्रहण करण्यात आले आहे. यापैकी ३०० विंधन विहिरींचा वापर टँकर्स भरण्यासाठी करण्यात येत आहे.


मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मराठवाडा पर्यावरण विनाशाकडे: अतुल देऊळगावकर

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
'भूमीत पाणी नाही. पाऊस पडत नाही, वनसंपदा नष्ट झाली आहे. अशा विचित्र अवस्थेत सापडलेल्या मराठवाड्याची वाटचाल पर्यावरण विनाशाकडे सुरू आहे,' असे प्रतिपादन पर्यावरणतज्ज्ञ, ज्येष्ठ पत्रकार अतुल देऊळगावकर यांनी शनिवारी येथे केले.
अक्षरांगण ग्रुपच्या वतीने जीवन विकास ग्रंथालयाच्या सभागृहात देऊळगावकर लिखित 'विश्वाची आर्त' या पुस्तकावर चर्चा आयोजित केली होती. यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले,'भविष्यात जागतिक पातळीवर उलथापालथ घडवून आणण्याइतके महत्त्व पर्यावरणाला येणार आहे. मागील दशकापासून हा विषय ऐरणीवर आला. कारण जगभरात अनेक संशोधनातून जागतिक तापमानवाढ आणि त्या अनुषंगाने होणारे हवामानबदल याबाबत धक्कादायक निष्कर्ष समोर आले. पर्यावरण संवर्धनाच्या बाबत जबाबदारी घेण्याऐवजी टोलवाटोलवी केली जाते, हे जर्मनीतील परिषदेत दिसले. हवामान बदल किरकोळ नाही. जीवन बदलवून टाकून उलथापालथ करण्याची क्षमता त्यात आहे. त्यात मराठवाडा ही केस स्टडी म्हणून विचारात घेतली पाहिजे. शेतकरी आत्महत्या, पाण्याचा त्रास योग्य पद्धतीने जोवर मांडला जात नाही तोवर त्याकडे गांभीर्याने पाहिले जाणार नाही.'
हवामान या विषयावर जगातील श्रीमंत कंपन्यांनी ताबा मिळविल्याचा आरोप करून ते म्हणाले, 'हवामान परिषदेत वरवरची चर्चा झाली. छोट्या देशांच्या अडचणी, तेथील पर्यावरणाचे प्रश्न कुठेच चर्चिले गेले नाहीत. राजकारणी आणि भांडवलदार यांचे जवळचे संबंध कसे असतात, हे तिथे दिसून आले. भारताची जागतिक पातळीवर केवळ ग्राहक म्हणून किंमत आहे. कारण आपण अर्थसत्ता नाहीत, उद्योगाच्या बाबतीतही कुठे पुढे नाहीत हे जगाने ओळखले आहे. दुर्दैवाने आपली राजकीय मंडळी याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष करतात. पॅरिस परिषदेत मानव जातीला उपयोगी नसणारा करार झाल्याचा दाखला अमेरिकेतील शास्त्रज्ञांनी दिला आहे. जगाचा विचार करताना मराठवाड्याकडे आधी लक्ष केंद्रित केले पाहिजे. फेब्रुवारी २०१२ पासून आपल्याकडे गारपीट होत आहे. त्याकडे संशोधनवृत्तीने अद्याप पाहिलेच गेले नाही. समुद्राचे आम्लीकरण होत असल्याने हे प्रकार घडत आहेत. हवामानबदल होत आहे, पृथ्वीवरची जीवसृष्टी नामशेष होण्याची भीती निर्माण झाली आहे, पण आपण उपाययोजनांसाठी हालचाल करत नाहीत,' अशी खंत देऊळगावकरांनी व्यक्त केली.
'केंद्र सरकारने यंदा शेतीसंशोधनावरील खर्चात ३० टक्के कपात केली. निसर्गाची लूट होत आहे. शेतकरी आत्महत्यांकडे लक्ष नाही, समाजानेही शेतकऱ्यांपासून स्वतःला तोडून टाकले आहे. सरकार म्हणते की आम्ही शेतकऱ्यांनी ४००० कोटींची मदत केली. पण हेक्टरी ६८०० रुपये नुकसान भरपाईने त्या शेतकऱ्याचे पोट भरेल काय ? एवढा साधा विचारही कुणी केला नाही. शेतकऱ्यांपर्यंत विज्ञान पोचविले जात नाही. त्यात मराठवाड्याची तर बिकट अवस्था आहे. आपली श्रमशक्ती, बौद्धिक शक्ती आणि संपत्ती निघून चालली आहे. याला वेळीच आळा घालण्यासाठी जात, धर्माचे राजकारण करण्यापेक्षा पर्यावरण संरक्षणाचे राजकारण करावे लागेल, त्यासाठी एकत्र येऊन चळवळ उभारा,' असे आवाहन देऊळगावकर यांनी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तहानेला टोलचा अडसर

$
0
0

Ravindra.Taksal@timesgroup.com

औरंगाबाद ः जिल्ह्यात गंभीर दुष्काळी परिस्थितीशी मुकाबला करताना प्रशासनाकडून ६२५ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. औरंगाबादलगत असलेल्या गावांना पाणी पुरवणाऱ्या टँकर्सना टोल लावण्याचा अजब फंडा दोन दिवसांपासून राबविला जात आहे. त्यामुळे १३ गावांमधील पाणीपुरवठा दोन दिवसांपासून बंद झाला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाला जिल्हा प्रशासनाने टोलमुक्तीचे पत्र देऊनही टोलवसुली सुरूच आहे.

तालुक्यांतील अनेक गावांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. शेंद्रा येथील एमआयडीसीच्या जल केंद्रातून जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाच्या अखत्यारित पाण्याचे टँकर भरून तहसीलदारांकडे आलेल्या मागणीनुसार संबंधित गावात दिले जातात. शेकटा, पिंप्रीराजा, आडगाव, जडगाव, टोणगाव, हसनाबादवाडी यासह करमाड परिसरातील तेरा गावांमध्ये पाण्याचे टँकर सुरू आहेत. या गावांना जाणाऱ्या टँकरना लाडगाव येथील टोलनाका ओलांडून जावे लागते. सरकारी गाड्यांना टोलमुक्ती आहे. पाण्याचे टँकर सरकारी सेवेसाठीच आहेत, असे असूनही टोलनाक्यावर या टँकरना टोलची मागणी केली जात आहे. गेल्या आठवड्यापर्यंत टोल आकारला जात नव्हता, पण दोन - तीन दिवसांपासून १३ गावांमध्ये पाणी घेऊन जाणाऱ्या टँकर्सना टोल आकारला जात आहे. विशेष म्हणजे जिल्हाधिकाऱ्यांनी जागतिक बँक प्रकल्पाच्या कार्यकारी अभियंत्यांना टंचाई प्राधान्य या हेडखाली १३ जानेवारी २०१६ रोजी एक पत्र देऊन पाण्याच्या टँकरना टोलमधून वगळावे, असे पत्र दिले दिले आहे. ही सूट ३१ जुलै २०१६ पर्यंत द्यावी, असेही म्हटले आहे. तरीही टोलवसुली सुरू असल्याने प्रशासन अडचणीत आले आहे. कारण प्रत्येक खेपेसाठी येऊन-जाऊन ३०० रुपये द्यावे लागतात. दररोज २० टँकर साठी टोलचा निधी आणायचा कुठून ? असा प्रश्न आल्याने पाणीपुरवठा कंत्राटदाराने दोन दिवसांपासून १३ गावांमधील टँकरचा पाणीपुरवठा बंद केला. यामुळे ग्रामस्थांचे हाल होत आहेत. 'दोन दिवसांपासून गावात टँकर आले नाही. संबंधितांनी याकडे लक्ष दिले पाहिजे,' अशी मागणी हसनाबादवाडीचे सरपंच कचरुसिंग गोलवाल यांनी केली. दरम्यान, पाणीपुरवठा सुरळीत व्हावा, यासाठी वरिष्ठ पातळीवरून प्रयत्न केले जात असल्याचे पंचायत समितीच्या पाणीपुरवठा विभागाचे एम. एस. इसलवार यांनी सांगितले.

पत्र देऊनही दुर्लक्ष ?

दुष्काळग्रस्त गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या शासकीय व खासगी टँकरना ३१ जुलै २०१६ पर्यंत टोल वसुलीतून सूट देण्यात यावी, असे पत्र जिल्हाधिकाऱ्यांनी जागतिक बँक प्रकल्पाच्या कार्यकारी अभियंत्यांना दिले आहे. कारण टोलनाक्यांचा विषय या विभागांतर्गत येतो. टोलच्या सुटीबाबत जानेवारीतच पत्र दिले होते. दुष्काळी परिस्थितीत २०१३ पासून पाणीपुरवठा करणाऱ्या वाहनांना लाडगाव टोलनाक्यावर टोल वसुलीतून सूट देण्यात आलेली आहे, असेही या पत्रात नमूद करण्यात आलेले आहे.

मागील दोन दिवसांपासून पिण्याचे पाणीपुरवठा करणारे टँकर गावात आले नाहीत. लोकसंख्येच्या प्रमाणात किमान चार फेऱ्या आवश्यक आहेत, पण पाणीच नसल्याने ग्रामस्थ हवालदिल झाले आहेत. टोलचा प्रश्न निर्माण झाल्याने टँकर येत नसल्याचे सांगण्यात येते. काही कळत नाही.

- गणेश जाधव, सरपंच शेकटा

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘आरंभ ऑटिझम’ला जागा मिळवून देणार

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
'आरंभ ऑटिझम सेंटरचे काम फार महत्त्वाचे आहे. या संस्थेला स्वतःची हक्काची जागा मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्न करू,' असे आश्वासन आमदार अतुल सावे यांनी शनिवारी दिले.
आरंभ ऑटिझम सेंटरतर्फे जागतिक स्वमग्न जनजागृती सप्ताह आयोजित करण्यात आला होता. या सप्ताहाच्या समारोप कार्यक्रमात सावे बोलत होते. व्यासपीठावर महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष दिलीप थोरात, 'आरंभ'चे अध्यक्ष बाळासाहेब टाकळकर, सचिव मिलिंद कंक, पालक प्रतिनिधी अनिता जहागिरदार, महाराष्ट्र टाइम्सच्या औरंगाबाद आवृत्तीचे निवासी संपादक धनंजय लांबे यांची विशेष उपस्थिती होती.
अतुल सावे यांनी 'आरंभ' च्या कार्याचा गौरव केला. 'विशेष मुलांमध्ये एक वेगळे टॅलेंट असते. अशा मुलांच्या पालकांनी त्यांना समाजापासून दूर न ठेवता समाजात न्यावे. त्यांच्यात असलेल्या टॅलेंटला योग्य व्यासपीठ मिळावे. आरंभला स्वतःची जागा असावी, अशी या संस्थेची मागणी आहे. पालिकेच्या खुल्या जागेतून एखादी जागा या संस्थेला देण्याचा प्रयत्न करू. या संस्थेसाठी शासकीय स्तरावरून मदत करू,' असे आश्वासन सावे यांनी दिले. दिलीप थोरात यांनी बाळासाहेब टाकळकर व अंबिका टाकळकर यांनी 'आरंभ'च्या माध्यमातून सुरू असलेल्या कामाची स्तुती केली. 'न्यूनगंड न ठेवता टाकळकर दाम्पत्यांनी विशेष मुलांसाठी काम सुरू केले. त्यांचे काम खूप महत्त्वाचे आहे. पालिकेच्या माध्यमातून त्यांच्या संस्थेला मदत करण्याचा प्रयत्न करू,' असे आश्वासन दिले. बाळासाहेब टाकळकर यांनी अध्यक्षीय समारोप केला. प्रास्ताविक मिलिंद कंक यांनी केले. 'आरंभ' मधील विशेष विद्यार्थ्यांनी यावेळी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला. या कार्यक्रमाला उपस्थितांनी भरभरून दाद दिली.
ओंकार वैद्यची मुलाखत रंगली
बालश्री पुरस्कार विजेता ओंकार वैद्य या विशेष मुलाची प्रकट मुलाखत यावेळी झाली. ओंकारसह त्याची आई अंजली व वडील देवेंद्र यांना वैशाली कुलकर्णी यांनी बोलते केले. ओंकारने पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आहे. 'प्रत्येक टप्प्यावर नवनवीन प्रेरणास्त्रोत मिळत गेले. लहानपणापासूनच चांगल्या गोष्टी ऐकण्याची सवय लागली. त्याचा फायदा झाला,' असे तो म्हणाला. ओंकारच्या आजपर्यंतच्या प्रवासाचे विविध पैलू त्याच्या आई-वडिलांनी उलगडून दाखवले. समाज आणि मित्रांनी दिलेल्या साथीवर आमची वाटचाल सुरू आहे, असा त्याने आवर्जून उल्लेख केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बीड जिल्ह्यात १०५६ गावांना टँकरने पाणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, बीड
बीड जिल्ह्यातील टंचाई परिस्थिती लक्षात घेऊन टँकरद्वारे पाणी पुरवठ्याची उपाययोजना प्रशासनाकडून सुरू आहे. जिल्ह्यातील ५९९ गावे आणि ४५७ वाड्यांमध्ये ७०७ टँकरद्वारे १६११ खेपांमध्ये पाणीपुरवठा केला जात आहे.
या शिवाय नगर पंचायत क्षेत्रातील दोन गावे आणि ५४ वाड्यांमध्ये ६३ टँकरद्वारे १६१ खेपांमध्ये जिल्हा प्रशासनातर्फे पाणीपुरवठा केला जात आहे. बीड जिल्ह्यात यावर्षी दुष्काळ आ वासून उभा आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवते आहे. जिल्ह्यात पाणीटंचाई निवारणासाठी शेकडो टँकर सुरू आहेत. जिल्ह्यात ग्रामीण भागात ७०७ टँकर सुरू आहेत. या ७०७ टँकरच्या तब्बल एक हजार ६११ खेपा करून पाणी पुरवले जात आहे. परळी वैजनाथ तालुक्यातील १४ गावे व चार वाड्यांना २१ टँकरद्वारे ४७ खेपांमध्ये पाणीपुरवठा करण्यात येत आहे. धारुर तालुक्यातील २७ गावे व १५ वाड्यांना २९ टँकरद्वारे ८६ खेपांमध्ये पाणीपुरवठा करण्यात येत आहे. माजलगाव तालुक्यातील २२ गावे व ११ वाड्यांना ४५ टँकरद्वारे ८९ खेपांमध्ये पाणीपुरवठा करण्यात येत आहे.

या शिवाय पाटोदा नगर पंचायत क्षेत्रात १० वाड्यामध्ये तीन टँकरद्वारे ७ खेपामध्ये, केज नगर पंचायत क्षेत्रात एक वाडी २० टँकरद्वारे ६०
खेपामध्ये, आष्टी नगर पंचायत क्षेत्रात दोन गावे व १३ वाड्यांमध्ये १८ टँकरद्वारे ४८ खेपामध्ये, धारुर नगर पंचायत क्षेत्रात ३० वाड्यांमध्ये २० टँकरद्वारे ४० खेपामध्ये, वडवणी नगर पंचायत क्षेत्रात दोन टँकरद्वारे सहा खेपामध्ये पाणीपुरवठा करण्यात येत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जातीनुसार महापुरूष वाटले गेले: नागराज

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'आपण जातीनिहाय महापुरूष वाटून घेतले. आपल्या प्रतिमेला दररोज फुलांचा हार घालावा अशी महापुरुषांची कधीच अपेक्षा नसेल. आपला विचार लोकांनी काळजात जपून वाटचाल करावी असे त्यांना वाटले असेल, पण आंबेडकर व बुद्धांनी नाकारलेली परंपरा आपल्याला गिळंकृत करीत सुटली आहे,' अशी खंत प्रसिध्द चित्रपट दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी शनिवारी व्यक्त केली. पीईएस अभियांत्रिकी महाविद्यालयात आयोजित व्याख्यानमालेत ते बोलत होते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त पीईएस अभियांत्रिकी महाविद्यालयात व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली आहे. व्याख्यनामालेच्या पहिल्या दिवशी दिग्दर्शक नागराज मंजुळे यांचे 'बौद्ध इतर समाज आणि आंबेडकरवाद' या विषयावर व्याख्यान झाले. यावेळी मंचावर प्राचार्य डॉ. अभिजित वाडेकर, मोहन सोनटक्के व डॉ. अनिलकुमार खोब्रागडे उपस्थिती होते. मंजुळे यांनी आंबेडकरी चळवळीवर परखड भाष्य केले. 'तुमच्या माझ्या अस्तित्वाची ओळख आंबेडकर व फुल्यांनी करून दिली. बाबासाहेबांनी नम्रता आणि स्वाभिमान दिला. दुर्दैवाने प्रत्येक जातीने महापुरूष वाटून घेतले. महार वगळता इतर दलित जातींनी आंबेडकर स्वीकारले नाही. कारण, ते दुसऱ्या जातीचे आहेत हेच सांगितले गेले. दलितात अनेक उपजाती असून एकमेकांत लग्नसुद्धा करीत नाहीत. आपण काही जाती उच्च असल्याचे ठरवून टाकले आहे. मात्र, खालच्या प्रत्येक दलित जातीला आपण इतरांपेक्षा उच्च असल्याचे वाटत राहते. हा भलताच चमत्कारिक प्रकार आहे. बाबासाहेबांसारख्या सुसंस्कृत नेत्याच्या जयंतीला अविचाराने बेधुंद होऊन नाचणे दुर्दैवी आहे. त्यामुळे नाचगाणे असलेल्या ठिकाणी मी जात नाही. अमेरिकेत कोलंबिया विद्यापीठात एकमेव बाबासाहेबांचा पुतळा आहे. या पुतळ्याच्या अवतीभवती दिखावूगिरी नाही. उदबत्त्या, अंगारे-धुपारे आपल्यात आणि बाबासाहेबात अंतर वाढवत आहेत. गुंडगिरी करणारे, मुलींची छेड काढणारे, अविचाराने वागणारे कधीच आंबेडकरवादी नसतात. प्रत्येक जातीत चांगली-वाईट माणसे असतात. त्यामुळे जातीनिहाय द्वेषभावना सोडून माणूस म्हणून समता स्थापन करा,' असे मंजुळे म्हणाले. यावेळी 'सैराट' चित्रपटातील कलाकार आकाश ठोसर, रिंकू राजगुरू, तान्हाजी, अरबाज शेख यांचा सत्कार करण्यात आला. व्याख्यानमालेला श्रोते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

उथळ गाण्याचा समाचार

नागराज मुंजळे यांचे भाषण सुरू होण्यापूर्वी इतर नेत्यांना कमी लेखणारे व बाबासाहेब 'एक नंबर' असल्याचे सांगणारे भडक गाणे वाजत होते. आपल्या भाषणात मंजुळे यांनी या गाण्याचा समाचार घेतला. बाबासाहेबांना मोठे दाखण्यासाठी इतरांना छोटे दाखवण्याची गरज नाही. बाबासाहेब मोठेच आहेत. कृपया या प्रकारचे गाणे कधीच वाजवू नका' असे मंजुळे म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मटा इम्पॅक्टः‘तेरा गावांच्या टँकरना टोलमुक्ती

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
औरंगाबाद तालुक्यातील तेरा गावांमध्ये टोलच्या प्रश्नावरून गेल्या तीन दिवसांपासून पाण्याचे टँकर पुरविणे बंद झाले होते. प्रशासनाने पत्र देऊनही टोलवसुली सुरू असल्याचे वृत्त रविवारी 'महाराष्ट्र टाइम्स'मध्ये प्रसिद्ध झाले. त्याची दखल घेऊन प्रशासनाने हालचाली केल्या आणि दुपारपासून या गावांना पाण्याचे टँकर सुरू झाले.
शेंद्रा एमआयडीसीतून पाणी घेऊन परिसरातील तेरा गावांची तहान भागविणाऱ्या टँकर्सना लाडगाव टोलनाक्यावर दोन दिवसांपासून टोलची मागणी सुरू झाली. प्रत्येक ट्रिपला ३०० रुपये द्यायचे कुठून, असा प्रश्न निर्माण झाल्याने ठेकेदाराने टँकर बंद केले. १३ गावांमधील टँकरच्या २० फेऱ्या बंद झाल्याने नागरिकांचे पाण्यावाचून हाल होत होते. जिल्हा प्रशासनाने राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना टोलमुक्तीचे पत्र देऊनही वसुली केली जात असल्याबद्दल शनिवारी 'मटा'ने वृत्त प्रसिद्ध केले होते. त्याची दखल घेऊन रविवारी जिल्हा प्रशासनाने संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून टँकर सुरू करण्याबात निर्णय झाला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दुपारपासून टँकरच्या फेऱ्या टोल न आकारता सुरू झाल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सहकारी संस्थांच्या संचालकांविरुद्ध हायकोर्टात याचिका

$
0
0

म. टा. विशेष प्रतिनिधी ,औरंगाबाद
महाराष्ट्र राज्य सहकारी बँक, राज्यातील सर्व जिल्हा सहकारी बँक, सहकारी सुतगिरणी, सहकारी कारखाने व पेन अर्बन बँकेच्या सर्व संचालकांसह इतर पदाधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यासाठी मुंबई हायकोर्टात दाद मागण्यात आली आहे. याप्रकरणी आता २९ एप्रिलला सुनावणी होणार आहे.
सामाजिक कार्यकर्ता सुरविंदर मोहन अरोरा यांनी ही जनहित याचिका दाखल केली आहे. सहकारी बँकेचे संचालक, अध्यक्ष, मुख्य कार्यकारी अधिकारी व इतर उच्चपदस्थ अधिकारी, सूत गिरणी, साखर कारखाना यांचे पदाधिकारी यांच्याविरोधात राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँकेने (नाबार्ड) तपासणी अहवाल सादर केला आहे. २४ फेब्रुवारी २०११ रोजी सादर झालेल्या या अहवालात दोषी अधिकाऱ्यांवर सीबीआयने गुन्हे दाखल करावेत, भारतीय दंड संहिता, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया कायदा, बँकिंग रेग्युलेशन कायदा व सरफेसी अंतर्गत, महाराष्ट्र सहकारी कायद्यान्वये तपास करण्यात यावा, सीबीआयकडून होणारा तपास मुंबई उच्च न्यायालयाच्या नियंत्रणाखाली व्हावा व संबंधित वित्तीय वर्षाचे ताळमेळ पत्रक न्यायालयात दाखल करण्याचे आदेश देण्यात यावे, अशी विनंती याचिकेत करण्यात आली आहे. तत्कालीन संचालक मंडळाच्या महाराष्ट्र सहकार बँकेच्या व जिल्हा सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या कृतीमुळे बँकेचे आर्थिक नुकसान झालेचे नाबार्ड व सहकार खात्याच्या अहवाल अंती प्रथमदर्शनी दिसून आले.
महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या तत्कालीन संचालक मंडळानी साखर कारखान्याना कर्जे मंजूर करताना नाबार्डच्या मार्गदर्शक सूचनांचे उल्लंघन केले आहे. तोटा व बेकायदा कर्ज पुरवठा करणे यामुळे महाराष्ट्र सहकारी बँकेचे अतोनात आर्थिक नुकसान झाले आहे, असा आक्षेप याचिकेत घेण्यात आला आहे.
यापूर्वीच्या सुनावणीत न्या. व्ही. एम. कानडे व न्या. श्रीमती रेवती डेरे यांनी प्रतिवाद्यांना दोन आठवड्यात उत्तर दाखल करण्याचा आदेश दिला होता. याचिकेत दुरुस्ती अर्ज दाखल करण्यात आला. महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम ८८ व सहकारी संस्था नियम १९६१ चे नियम ७२ (३) अन्वये आरोपपत्र तसेच नियम ७२(४) अन्वये नोटीस कोर्टात दाखल करण्यात आली. कोर्टाने दुरुस्ती अर्ज मान्य केला.

यांना केले प्रतिवादी
राज्य सहकारी बँक, मुख्य सरव्यवस्थापक नाबार्ड, सहकार आयुक्त, सीबीआय, राज्यशासन, महाराष्ट्र राज्याचे मुख्य सहकार सचिव, केंद्र शासन, केंद्र शासनाच्या शेती खात्याचे सचिव, केंद्री वित्त मंत्रालयाचे सचिव यांच्या माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, विजयसिंह मोहिते-पाटील, माजी मंत्री जयंत पाटील, माजीमंत्री दिलीप देशमुख, खासदार रजनी पाटील, खासदार आनंदराव आडसूळ, माजी खासदार यशवंतराव गडाख, आमदार अमरसिंह पंडित, माजी आमदार नितीन पाटील, आमदार राहुल मोटे, माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर, सुरेश देशमुख.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाणीगळतीवर ग्रामसेवकांचे लक्ष

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
ग्रामीण भागात पाणीपुरवठा करणाऱ्या टँकरमधून पाण्याची कमी गळती व्हावी, यासाठी ग्रामसेवकांवर जबाबदारी सोपविण्यात आली आहे. टँकर रिकामे करताना गळतीची तपासणी करून त्याची तत्काळ दुरुस्ती कशी होईल, यासंदर्भात आदेश देण्यात आले आहेत.

जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाच्या माध्यमातून जिल्ह्यातील ४६७ गावांत ६०५ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. टँकरमधून पाण्याची गळती होऊ नये, यासाठी उपाययोजना होणे आवश्यक आहे. विशेषतः ग्रामीण भागात जिथे रस्ते खराब आहेत, अशा ठिकाणी पोचेपर्यंत बारा हजार लिटर पाण्यामधून कित्येक हजार लिटर पाणी हिंदकळून वाया जाते. अनेकवेळा तोट्या गळक्या असतात. दुर्दैवाने याकडे लक्ष दिले जात नाही. त्यामुळे जपून वापरले जाणारे पाणी मोठ्या प्रमाणावर वाया जाते. तालुकास्तरावर गटविकास अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली ही टँकरसेवा कार्यान्वित असते. पाणीगळती रोखण्यासाठी प्रशासनाने सर्व बीडीओंना आदेश दिले आहेत. गाव पातळीवर ग्रामसेवकांच्या देखरेखीखाली टँकरद्वारे पाणीपुरवठा व्हावा, एखाद्या ठिकाणी गळती निदर्शनास आली तर तत्काळ दुरुस्ती करावी, असे आदेश दिले आहेत, असे जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता एस. आर. रबडे यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिवप्रतिष्ठानतर्फे मूक पदयात्रा

$
0
0

म. टा, प्रतिनिधी, औरंगाबाद
धर्मवरी संभाजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या औरंगाबाद स्थानिक शाखेतर्फे संस्थापक संभाजीराव भिडे गुरुजी यांच्या संकल्पनेतून मूक पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते. या पदयात्रेत शेकडो नागरिकांनी सहभाग घेतला.

बळीराम पाटील शाळेसमोरून मूक पदयात्रेची सुरुवात झाली व छत्रपती संभाजी महाराज चौक, टीव्ही सेंटर येथे पदयात्रेचा समारोप करण्यात आला. संभाजी महाराजांना कैद केल्यानंतर १ महिना अमानुष अत्याचार करून फाल्गुन अमावस्येच्या दिवशी औरंगजेबाने त्यांची हत्या केली होती. त्याचे स्मरण म्हणून ३० दिवस 'बलिदान मास' पाळण्यात आला. संभाजी महाराजांची अंत्ययात्रा निघाली नव्हती म्हणून मूक पदयात्रा काढून त्यांना आदरांजली वाहण्यात आली.

या पदयात्रेत अनिल अर्डक, शंकर जाधव, चंद्रकांत इंगळे, जयंवंत (बंडू) ओक, किशोर नागरे, आत्माराम बापू फडके, मोहन मेघावाले, रवींद्र जाधव, निखील चव्हाण, अजय पवार, मनोज गव्हाणे, विष्णू माल्टे, रवी पवार, अर्जून सोळंके, सतीश जाधव, योगेश खोत, हेमंत सिंगलकर आदींसह शेकडो नागरिकांनी सहभाग घेतला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आठ हजार जणांनी दिली राज्यसेवा परीक्षा

$
0
0

औरंगाबाद : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे विविधपदासाठी रविवार (१० एप्रिल) रोजी लेखी परीक्षा घेण्यात आली. शहरातील विविध २८ केंद्रावर दोन सत्रांत परीक्षा घेण्यात आली. ८ हजार २०० विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली.

एमपीएससीतर्फे उपजिल्हाधिकारी, तहसिलदार, नायब तहसिलदार, पोलिस उपअधीक्षक अशा विविध पदांसाठी लेखी परीक्षा घेण्यात आली. सकाळी ११ ते १ आणि दुपारी ३ ते ५ अशा दोन सत्रांत ही परीक्षा शहरातील २८ परीक्षा केंद्रांवर घेण्यात आली. १० हजार १५ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. पहिल्या सत्रात ८ हजार २८४४ उमेदवारांनी परीक्षा दिली तर, १ हजार ७७१ उमेदवार गैरहजर होते. दुपारच्या सत्रात ८ हजार २०५ उमेदवारांनी परीक्षा दिली. १ हजार ८१० विद्यार्थी गैरहजर होते, असे समन्वयक सुधीर जहागिरदार यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वन टू वन : हवामान बदलाचा अभ्यास करणारे मॉडेल हवे

$
0
0

Makarand.Kulkarni@timesgroup.com
मराठवाड्यात सतत चार वर्षे दुष्काळ आहे. जमिनीतील पाणी खोल खोल गेले आहे. पावसाचा लहरीपणा यामुळे शेतकरी हवालदिल आहे. यंदा तर पिण्यासाठीही पाणी मिळत नाही, अशी वाईट परिस्थिती आहे. २०१२पासून झालेल्या हवामान बदलाच्या अभ्यासाकडे सरकारने दुर्लक्ष केले. फेब्रुवारी महिन्यापासून होणारी गारपीट नेमकी का होते? शेती पिकत नाही तर त्याला पर्याय काय, मराठवाड्यात पाणी उपलब्ध होणार का वाळवंट होणार, असे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. पर्यावरणाकडे दुर्लक्ष केल्यामुळे ही परिस्थिती उद्भवली असून, वेळीच जागे होऊन पर्यावरण संवर्धन केले नाही तर आपण विनाशाकडे जाऊ. हे टाळण्यासाठी हवामान बदलाचा अभ्यास करणारे मॉडेल विकसित करावे, अशी भूमिका पर्यावरणतज्ज्ञ, ज्येष्ठ पत्रकार अतुल देऊळगावकर यांनी मांडली.

 प्रश्न ः मराठवाड्यात दुष्काळ आहे. अशा परिस्थितीत सर्वोच्च प्राधान्य कशाला देणे आवश्यक आहे?
 उत्तर ः कुठल्याही आपत्तीला तोंड देण्यासाठी नियोजन आवश्यक आहे. साधारणपणे दुसऱ्या महायुद्धापासून नियोजन हा प्रकार सुरू झाला. त्यावेळी संरक्षण सिद्धता, औद्योगिकीकरण आणि शेती हा त्याचा गाभा होता, पण एकविसाव्या शतकात त्याचा आपल्याला विसर पडला. त्यामुळे हवामान बदलाचे संकट आपल्याला अडचणीत आणत आहे. दुष्काळ, गारपीट, अतिवृष्टी याला तात्पुरती मलमपट्टी केली जाते, पण नियोजनाचा गाभा आपण अजूनही विकसित केलेला नाही. हवामानाचा अंदाज व्यक्त करताना तो अचूक असावा, यासाठी आपल्याकडे अजूनही संख्याशास्त्रावरच अवलंबून राहिले जाते. वास्तविक जग 'डायनामिक्स'कडे वळले आहे. हवामानाचा अचूक अंदाज व्यक्त व्हावा, यासाठी आपल्याकडे गतीमान कम्प्युटर, पावरफुल रडार आणि ढगाचा अचूक वेध घेणारे मेघभौतिकशास्त्रज्ञ हवे आहेत. परदेशात यावर मोठी गुंतवणूक केली गेली. २४ तास हवामानावर नजर ठेवणारी तज्ज्ञ मंडळी नियुक्त केली गेली. त्यामुळे मेघगर्जना, वीज कडाडणे, गारांचा पाऊस याचा दोन ते सहा तास आधी वेध घेता येतो. चीनमध्ये तर गारांचा पाऊस सर्वसामान्य पावसात रुपांतरित करण्याचे तंत्रही विकसित झाले आहे. आपल्या सरकारने त्याला सर्वोच्च प्राधान्य दिले तर मराठवाड्यातील पुढची पिढी सुखाने जगेल. अन्यथा मराठवाड्याची वाटचाल वाळवंटाकडे झाल्याशिवाय राहणार नाही.

 प्रश्न ः दुष्काळात मदत करण्यात सरकार कमी पडत आहे काय?
 उत्तर ः निश्चितच. मराठवाड्यात यंदा खरीपाने हुलकावणी दिली. सरकारने हेक्टरी ६८०० रुपये मदत जाहीर केली. ज्या पीकावर वर्षाची भाकरी अवलंबून असते तिथे एवढी तोकडी रक्कम कशासाठी पुरणार? ही शेतकऱ्यांची क्रूर चेष्टा आहे. काळानुरूप तंत्रज्ञान शेतीसाठी वापरायचे नाही अशी शपथ राजकारण्यांनी घेतली आहे की काय, अशी शंका येते. हवामान बदलाशी मुकाबला करताना आपल्यालाही बदलावे लागणार आहे. पाण्याचा ताण सहन करणारे वाण तयार करणे ही सरकारची जबाबदारी आहे. बीटी कापूस, वांगी, काकडीचे वाण विकसित केले जाते, पण गहू, तांदूळ, ज्वारीमध्ये बीटी का नाही? दक्षिण आफ्रिकेत ८५ टक्के कोरड्या मातीत येणारा मका विकसित केला गेला. बैरूतमध्ये ५३ अंश सेल्सिअसमध्ये टिकेल असा गहू तयार केला. आपल्याकडे असे कधी होणार? व्यापक पातळीवर असे काही केले नाही. फक्त प्रशासकीय पातळीवर खेळ्यांना, दुष्काळ निवारण म्हटले जाते. उद्योगांचे तीन लाख कोटी माफ करतात मग शेतकरीच वंचित कसा? शेतकरी व ग्रामीण नाळ तोडण्याचे काम राजकारण्यांनी केले. त्यामुळे मराठवाड्याचे खूप मोठे नुकसान झाले आहे. 'जय जवान जय किसान'ऐवजी 'जय जवान मर किसान' असे धोरण स्वीकारल्याचे दिसते. शेतीचे उत्पादन नाही. आलेच तर त्याला हमीभाव नाही. शेतीच्या विकासासाठी क्रांतीची गरज आहे. आवश्यकता नसताना धान्य आयात केले जाते. त्याची मोठी किंमत आपल्याला भविष्यात मोजावी लागणार आहे.

 प्रश्न ः सरकारने काय उपाययोजना कराव्यात?
 उत्तर ः पॅरिसमध्ये हवामान बदलावर परिषद झाली. त्यात तंत्रज्ञानातील अनेक महत्वाच्या गोष्टी सांगण्यात आल्या. ते आपल्याकडे राबविणे आवश्यक आहे. एकूण सर्वच नाही तर किमान अवर्षणग्रस्त मराठवाड्याच्या बाबतीत ठोस निर्णय घेणे आवश्यक आहे. वैज्ञानिक संशोधन हा महत्त्वाचा भाग आहे. किमानपक्षी हाच दुष्काळ निवारणाचा गाभा असायला हवा. सॅटेलाइटद्वारे पाहणी करून शेतीची नुकसान भरपाई दिली गेली पाहिजे. राज्यात एवढा मोठा दुष्काळ असताना प्रधान सचिवांनी किती जिल्हाधिकाऱ्यांना दुष्काळ निवारणासाठी ठोस उपाययोजना सांगितल्या हे कोडेच आहे. लोकांच्या व्यथा जाणून घेण्यात यांना इंटरेस्ट नाही. कुठेच रित नाही, वेळापत्रक नाही, यामुळे अनागोंदी माजते आणि मग यंत्रणेतील सर्व घटकांना दुष्काळ आवडतो. यांच्या खेळामध्ये मराठवाड्याचे वाळंवटीकरण होत आहे, याचा सर्वांना विसर पडला आहे. मराठवाड्यात एक टक्का जंगल उरले आहे. आपल्याकडे कुठलेच खनिज नाही. एकही स्वयंपूर्ण नदी नाही. पाण्याचे कुठलेच स्त्रोत नाहीत, १९८०-९०पर्यंत बाहेरून मजूर, कामगार मराठवाड्यात येत होते, पण आता पाणीच नसल्याने आपली शक्ती बाहेर जात आहे. हे थांबविण्यासाठी सरकारने सकारात्मक पावले उचलली तरच मराठवाड्याचे संकट टळेल.

 प्रश्न ः लातूरमध्ये पाणीप्रश्न गंभीर आहे. रेल्वेने पाणी दिले जाणार आहे. हे कितपत योग्य आहे?
 उत्तर ः लातूरची परिस्थिती अतिशय वाईट आहे. १२०० ते १५०० मीटर खोल गेले तरी पाणी लागत नाही. जमिनीतील पाणी आटत चालले आहे, पण त्याची कुणाला फिकिर नाही. एका सर्व्हेनुसार मराठवाड्यात दर महिन्याला किमान दहा हजार बोअर घेतले जातात. अशी परिस्थिती राहिली तर पाणी राहणार कुठून? पूर्वी ५० दिवस १०० तास पाऊस येत होता. आता हवामान बदलाचा फटका बसल्याने जेमेत ३७ दिवसांत ४० ते ५० तास पाऊस येतो. मग जमिनीत पाणी मुरेल कुठून? मृदाशास्त्रज्ञ, भूगर्भशास्त्र यांनी विचारून त्यांच्या सूचनेनुसार पाणी साठविले पाहिजे. त्याशिवाय पाणी साठून राहणार नाही. परंपरेतील चांगले घ्यावे त्याला नवीन जोड द्याव हे आपण विसरलो. लातूरला रेल्वेने पाणी दिले जाणार आहे. लोकांना पाणी देणे आवश्यकच आहे, पण रेल्वेने किती पाणी आणणार? ते पाच लाख लोकांना कसे पुरणार? याचाही विचार होणे आवश्यक आहे. सद्यस्थितीला लोकांची तहान भागविण्यावर प्राधान्य दिले पाहिजे. आपल्याकडे नियमाची अंमलबजावणी होत नाही. सांडपाणी शुद्धीकरण, पुर्नवापर हा सर्वात प्रभावी उपाय आहे. आपल्याला नवीन मिळेल याची शाश्वती नाही. असलेल्या पाण्याचा पुर्नवापर परदेशात प्रभावीपणे केला जातो. ते मॉडेल विकसित करावे लागणार आहे. ऑस्ट्रेलियात नऊ वर्षांपासून तर कॅलिफोर्नियात चार वर्षांपासून दुष्काळ आहे, पण तिथे कुठे टँकरने पाणी दिले जात नाही. आपले पर्यावरण असंस्कृत आहे. ते बदलावे लागणार आहे.

 प्रश्न ः जलयुक्त शिवार योजनेचा फायदा होईल काय?
 उत्तर ः या योजनेला विज्ञानाचा आधार नाही. खोलीकरण, रुंदीकरण करण्याचे तंत्र असणे आवश्यक आहे. वाळूपर्यंत खोलवर जाणे योग्य आहे. वैज्ञानिकांना विचारून ही प्रक्रिया झाली तर योग्य राहील. महत्त्वाचे म्हणजे वाहून जाणारी माती अडविली पाहिजे. आपल्याकडची ४० टक्के माती समुद्रात तर ६० टक्के माती धरण, कालव्यात वाहून जाते. त्याचाही हवामान बदलावर विपरित परिणाम होतो, हे लक्षात घेणे आवश्यक आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

साक्षीदारांचा जबाब ‘इन कॅमेरा’ नोंदविला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
अल्ताफ खुनप्रकरणी गुन्हे शाखेने साक्षीदारांचे जबाब 'इन कॅमेरा' नोंदविले. दरम्यान पडेगाव, रावरसपुरा येथील ज्या जमिनीवर वाद सुरू आहे ती पूर्वीपासूनच वादग्रस्त आहे. गेल्या तीन महिन्यांत या जमिनीवरून तीन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

जमिनीवरील अतिक्रमणाच्या वादातून शेख अल्ताफ याचा अपहरण करून खून करण्यात आला होता. छावणी पोलिसांनी याप्रकरणी आर्थिक गैरव्यवहार केल्याने हा तपास गुन्हे शाखेकडे सोपविला आहे. दरम्यान, या प्रकरणातील महत्त्वाच्या साक्षीदारांचे 'इन कॅमेरा' जबाब घेण्यात येत आहेत.

पडेगाव येथील रावरसपुरा येथील गट क्रमांक ३, १० व गट क्रमांक २३ मधील जमिनीवरून चौघांमध्ये हा वाद सुरू आहे. सध्या ही जमिन नदिमउल्ला नावाच्या व्यक्तीच्या ताब्यात आहे. या जमिनीवर असलेल्या काही भागाचा मुकेश लाहोट याने ताबा घेतला आहे. ही जमीन पिंगरी सोसायटीच्या मालकीची असल्याचा मुकेश लाहोट याचा दावा आहे. त्याचबरोबर फरतउल्लाखान यांची या ठिकाणी दोन एकर दोन गुंठे जमीन आहे. नदिमउल्ला याने २०११मध्ये मूळ मालकाकडून जमीन विकत घेतल्याचे पोलिसांना सांगितले आहे. याप्रकरणी २०११मध्ये कोर्टाच्या आदेशाने मुकेश लाहोट याच्यावर क्रांतिचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. यावेळी पोलिसांनी केलेल्या तपासामध्ये पिंगरी सोसायटी अस्तित्वात नसल्याचे पत्र सहकार निबंधक कार्यालयाने पोलिसांना तपासात दिले होते. गेल्या तीन ‌महिन्यांत नदिमउल्ला याच्यावर जमिनीच्या वादातून तीन गुन्हे दाखल करण्यात आले आहे. त्याचा तपास देखील छावणी पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्यांकडेच होता. सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ठ असून, नदिमउल्ला याची देखील चौकशी करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विविध घटनांत दोन आत्महत्या

$
0
0

औरंगाबाद : शहरातील मुकुंदवाडी व जटवाडा रोड परिसरात दोन जणांनी आत्महत्या करूत जीवन संपवले. रविवारी सकाळी या घटना उघडकीस आल्या.

वंदना संतोष महाले (वय २९, रा. हनुमानगनर, गल्ली क्रमांक ३) या महिलेने शनिवारी रात्री रेल्वेसमोर उडी घेऊन आत्महत्या केली. वंदना यांना विवाहा सहा अपत्ये झाली होती, मात्र प्रसृतीनंतर काही महिन्यानच त्यांचा मृत्यू होत असल्याने वंदना त्रस्त झाली होती. यापूर्वीही त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला होता. शनिवारी रात्री अकरा वाजता त्या घरातून बाहेर पडल्या. रात्रीपासून ती बेपत्ता असल्याने त्यांचा शोध सुरू होता. पुंडलिकनगर पोलिस चौकीत याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

आत्महत्येची दुसरी घटना सारा वैभव, जटवाडा रोड येथे घडली. प्रदीप विश्वानाथ मांडवगड (वय २९) या तरुणाने गळफास घेत आत्महत्या केली. प्रदीप यांचा साखरपुडा झाल्यानंतर लग्न मोडले होते. त्यामुळे ते वैफल्यग्रस्त होते. सोनपेठ येथील शासकीय आयटीआयमध्ये चार महिन्यांपूर्वीच ते लिपिक म्हणून नोकरीला लागले होता. घरातील मंडळी गच्चीवर झोपलेली असताना त्यांनी खालच्या खोलीमध्ये गळफास घेतला. याप्रकरणी बेगमपुरा पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


रविवारची संधी साधत घरोघरी प्रचार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
महापालिकेच्या सातारा देवळाई पोटनिवडणुकीचा प्रचार रविवारी शिगेला पोचला. दोन्ही वॉर्डांतील नागरी वसाहतींची अंतरे पाहून उमेदवार आणि कार्यकर्त्यांनी घरोघरी जाऊन प्रचारावर भर दिला. प्रचंड ऊन असल्याने सकाळच्या आणि सायंकाळच्या टप्प्यात लगबग दिसून आली.

महानगरपालिकेची सातारा देवळाई पोटनिवडणुकीसाठी पुढच्या रविवारी मतदान होणार आहे. विविध राजकीय पक्षाच्या उमेदवार, कार्यकर्त्यांनी रविवारच्या सुटीचा मुहूर्त साधत घरोघरी जाऊन प्रत्यक्ष भेट, कॉर्नर मि‌टिंग, पदयात्रांवर भर दिला. मतदारसंख्येच्या प्रमाणात वसाहतींचे अंतर खूप मोठे आहे. त्यामुळे दोन्ही वॉर्डात मतदारांच्या गाठीभेटी घेण्यासाठी उमेदवारांचा खऱ्या अर्थाने घाम निघत आहे. भाजप, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवार उभे केले आहेत. अंतराच्या तुलनेत भेटीगाठीसाठी येणाऱ्या अडचणी पाहून सर्वच पक्षांनी या दोन्ही वॉर्डात स्वतंत्र ग्रुप तयार करून त्यांना वसाहती वाटून दिल्या. त्यामुळे मुख्य प्रचार कार्यालयात मात्र शुकशुकाट आढळून आला.

पक्ष कार्यकर्त्यांच्या ओळखीपाळखी, नातेवाईकांच्या भेटीगाठीवर भर दिला गेला. रविवारी सकाळी आठ ते दुपारी दोन व सायंकाळी पाच ते रात्री नऊ वाजेपर्यंत मतदारांच्या भेटी घेतल्या. राजकीय पक्षांमध्ये उत्साह दिसत असला तरी मतदार मात्र फारसे उत्सुक दिसले नाहीत. दुपारच्या सत्रात प्रचार कार्यालयात बूथनिहाय मतदारांचा आढावा घेणे सुरू होते. सर्वच पक्षांनी आपापल्या पक्षाच्या विजयाचे दावे केले. शिवसेना-भाजप समोरासमोर आल्याने चुरस निर्माण झाली आहे. दोघांच्या भांडणाचा लाभ करून घेण्यात विरोधी पक्ष यशस्वी ठरणार की नाही ? हे मात्र मतदान झाल्यावरच दिसून येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नागसेनवनाने जपली वाचनाभिमुख परंपरा

$
0
0

Ashsih.Choudhri@timesgroup.com
औरंगाबाद ः शिक्षणाच्या मुख्य प्रवापासून वंचित विद्यार्थ्यांना ज्ञानी करण्याची परंपरा नागसेनवनाने कायम ठेवली आहे. या परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॉलेज, मिलिंद कॉलेज यांनी आपल्या ग्रंथालयात जगभरातील उत्तम ग्रंथांचा ठेवा जतन केला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी वाचलेली एक हजार पुस्तके मिलिंद कॉलेजात आहेत. व्यासंगी होत समाजाचे भले करण्याची प्रेरणा विद्यार्थ्यांना हा ज्ञानसागर देत आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी व्यापक वाचनातून मार्गदर्शन घेत वाटचाल केली. आयुष्यात पुस्तकांनाच गुरू मानले. नागसेनवन परिसरात १९५०मध्ये मिलिंद कॉलेजची स्थापना करताना ग्रंथालय उभारणीस महत्त्व दिले. या कॉलेजमधील प्रत्येक विद्यार्थी मिलिंद आणि शिक्षक नागसेन असावा, हीच त्यांची संकल्पना होती. ती प्रमाण मानून कॉलेजने ग्रंथालयातील विपुल ग्रंथसंपदा जतन केली आहे. मिलिंद विज्ञान कॉलेजच्या ग्रंथालयात २८ हजारांपेक्षा अधिक ग्रंथसंपदा आहे. बाबासाहेबांनी वाचलेली देश-विदेशातील दुर्मिळ पुस्तके या ग्रंथालयाच्या संग्रहात आहे. अर्थशास्त्र, तत्त्वज्ञान, मार्क्सवाद, राजकारण, विज्ञान, सौंदर्यशास्त्र, धर्मशास्त्र, आयुर्वेद, वैदिक संस्कृती अशा नानाविध विषयांवरील बाबासाहेबांची एक हजार पुस्तके आजही विद्यार्थ्यांना प्रेरणा देतात.

या परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॉलेजातही ७९ हजार ६५९ ग्रंथ आहेत. या ग्रंथालयात विषयनिहाय दालने आहेत. ग्रंथालयशास्त्र, मानसशास्त्र, राज्यशास्त्र, इतिहास, समाजशास्त्र, धर्मग्रंथ यांचे वेगळे दालन आहे. मराठी, हिंदी, इंग्रजी भाषेतील प्राचीन बौद्ध साहित्य, मराठी विश्वकोष, मराठी वाङ्मयकोष, हिंदी शब्दसागर, हिंदी साहित्यकोष, भारतीय संस्कृतीकोष ही ग्रंथसंपदा आहे. 'प्रबुद्ध भारत'चे पन्नासच्या दशकातील अंक, नानकचंद रत्तू यांचे डॉ. आंबेडकर चरित्र, आंबेडकरांचे चित्रमय चरित्र, बाबासाहेबांच्या भाषणाचे खंड उपलब्ध आहेत. या दुमजली ग्रंथालयात विद्यार्थी व विद्यार्थिनींसाठी स्वतंत्र वाचन दालन आहे. काही वर्षांपूर्वीपर्यंत या ग्रंथालयाची शहरातील सर्वात मोठे ग्रंथालय अशी ओळख होती असे ग्रंथालय कर्मचारी प्रकाश घोडगे यांनी सांगितले.

दुर्मिळ ठेवा जपला
मिलिंदच्या ग्रंथालयात शंभर वर्षांपूर्वीचे ग्रंथ आहेत. या ग्रंथांची झीज रोखण्यासाठी उत्तम नियोजन केले आहे. बाबासाहेबांची स्वाक्षरी व टिपणं असलेले ग्रंथ कपाटात बंद आहेत. या पुस्तकावंर रासायनिक प्रक्रिया करतात. लवकरच या पुस्तकांचे 'डिजिटायझेशन' करून हा ठेवा कायमस्वरुपी जतन करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

कॉलेजच्या ग्रंथालयात बाबासाहेबांनी वाचलेले अनेक दुर्मिळ ग्रंथ आहेत. या ग्रंथांवर त्यांच्या नोंदी आहेत. जागतिक दर्जाचा ग्रंथांचा ठेवा पुढील पिढ्यांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आहे.
- प्रा. आर. टी. डेंगळे, मिलिंद कॉलेज

कॉलेजमधील ग्रंथालयात दुर्मिळ ग्रंथसंपदा आहे. ग्रंथ जतन करण्यासाठी आमचा प्रयत्न कायम आहे. या कामासाठी नवीन सुविधा उपलब्ध करून देत आहोत.
- डॉ. किशोर साळवे, प्राचार्य, डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॉलेज

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विभागात ५५ मध्यम प्रकल्प कोरडे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद,
सततच्या दुष्काळाला सामोरे जात असलेल्या मराठवाडा विभागात यंदाही प्रकल्पांनी तळ गाठला आहे. एप्रिल महिन्यातच मराठवाड्यातील सर्व प्रकल्पांमध्ये केवळ २५५.४१ दशलक्ष घनमीटर (३ टक्के) पाणीसाठा शिल्लक असून, या उन्हाळ्यात आतापर्यंत ७५पैकी तब्बल ५५ प्रकल्पांतील उपयुक्त पाणीसाठा शून्य टक्क्यावर आला आहे.

अत्यल्प पर्जन्यमानामुळे मराठवाड्याला ऐन एप्रिलमध्ये भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. बहुतांश मध्यम प्रकल्प कोरडे पडल्यामुळे टँकर भरायचे कोठून, असा प्रश्न प्रशासनाला पडला आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील १६ मध्यम प्रकल्पांपैकी सुखना, गिरजा, वाकोद, अंबाडी, शिवना टाकळी, टेंभापुरी, कोल्ही, नारंगी, बोरदहेगाव, जालना जिल्ह्यातील कल्याण, धामना, जिवरेखा, बीड जिल्ह्यातील ‌बिंदूसरा, सिंदफणा, बेलपारा, महासांगवी, बोरणा, बोधेगांव, सरस्वती, वाघेबाभुळगाव, कडा, कडी, रुठी, तलवार, कांबळी प्रकल्पातील उपयुक्त साठा शून्य टक्क्यावर आला आहे. लातूर जिल्ह्यातील तावरजा, व्हटी, तिरू, देवर्जन, साकोळ, घरणी, मसलगा हे प्रकल्प तर उस्मानाबाद जिल्ह्यातील तेरणा, रुई, वाघोली, रायगव्हाण, संगमेश्वर, करनुर, हरणी, खंडाळा, जकापूर, तुरोरी, बेनेतुरा, रामगंगा, खासापूर, चांदणी, खंडेश्वर व साकत, नांदेड जिल्ह्यातील कुंद्राळा, करडखेड, पठवडज, महालिंगी, उर्ध्व मनार, तर परभणी जिल्ह्यातील मासोळी प्रकल्प कोरडाठाक पडला आहे. सध्या विविध मिळेल त्या ठिकाणाहून टँकर भरणे सुरू आहे.

गेल्यावर्षी दुप्पट पाणीसाठा
गेल्यावर्षीच्या तुलनेत मराठवाड्यातील पाण्याची स्थिती बिकट झाली आहे. सध्या मध्यम प्रकल्पामध्ये ४५.३३ दलघमी (५ टक्के) पाणीसाठा शिल्लक असून गेल्यावर्षी ७ एप्रिल रोजी मध्यम प्रकल्पांमध्ये ९९.६३ दलघमी (११ टक्के) पाणीसाठा शिल्लक होता. २०१४मध्ये याच दिवशी मध्यम प्रकल्पांमध्ये ३०८ दलघमी (३३ टक्के) पाणीसाठा शिल्लक होता. मराठवाडयातील ११ मोठ्या प्रकल्पांमध्ये सध्या १६१ दलघमी (३.१३ टक्के) उपयुक्त पाणीसाठा शिल्लक असून, गेल्यावर्षी मोठ्या धरणांमध्ये तब्बल ७३६ दलघमी (१४ टक्के) उपयुक्त पाणीसाठा शिल्लक होता. गेल्यावर्षी यंदा एप्रिल महिन्यातच उपलब्ध पाणीसाठ्याची अशी स्थिती असल्यामुळे येणाऱ्या काळात मराठवाड्याला भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.

गेल्यावर्षी दुप्पट पाणीसाठा
गेल्यावर्षीच्या तुलनेत मराठवाड्यातील पाण्याची स्थिती बिकट झाली आहे. सध्या मध्यम प्रकल्पामध्ये ४५.३३ दलघमी (५ टक्के) पाणीसाठा शिल्लक असून गेल्यावर्षी ७ एप्रिल रोजी मध्यम प्रकल्पांमध्ये ९९.६३ दलघमी (११ टक्के) पाणीसाठा शिल्लक होता. २०१४मध्ये याच दिवशी मध्यम प्रकल्पांमध्ये ३०८ दलघमी (३३ टक्के) पाणीसाठा शिल्लक होता. मराठवाडयातील ११ मोठ्या प्रकल्पांमध्ये सध्या १६१ दलघमी (३.१३ टक्के) उपयुक्त पाणीसाठा शिल्लक असून, गेल्यावर्षी मोठ्या धरणांमध्ये तब्बल ७३६ दलघमी (१४ टक्के) उपयुक्त पाणीसाठा शिल्लक होता. गेल्यावर्षी यंदा एप्रिल महिन्यातच उपलब्ध पाणीसाठ्याची अशी स्थिती असल्यामुळे येणाऱ्या काळात मराठवाड्याला भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.

जिल्हानिहाय मध्यम प्रकल्पांची स्थिती

जिल्हा............मध्यम प्रकल्प...कोरडे प्रकल्प...उपलब्ध साठा
औरंगाबाद..........१६.................०९....................१४.३५७
जालना...............७..................०३.....................६.८३०
बीड..................१६..................१४....................१०.७९३
लातूर................०८..................०७....................०.०४३
उस्मानाबाद........१७.................१६.....................०.०४६
नांदेड................०९.................०५......................८.५५६
परभणी.............०२.................०१......................२.६२५
एकूण...............७५.................५५.......................४५.३३
(पाणीसाठा दलघमी)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एसटीत तिकीट तपासणी बंद

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
एसटी बसमध्ये विनातिकिट प्रवाशांची तपासणी करण्याचे अधिकार विभाग नियंत्रक, आगार प्रमुख, वाहतूक निरीक्षक; तसेच अन्य अधिकाऱ्यांकडून काढून घेण्यात आले आहेत. तपासणीच्या अधिकारपत्रांचा गैरवापर होत असल्याचे कारण दाखवून ही अधिकारपत्रे विभाग नियंत्रक कार्यालयात जमा करण्याचे आदेश मुंबई राज्य परिवहन महामंडळाच्या मुख्यालयाकडून देण्यात आले आहेत.

बसमध्ये विनातिकीट प्रवासी वाहतूक तपासणीसाठी एसटी विभागात विशेष पथक आहे. त्याचबरोबर एसटीच्या सुरक्षा विभागाला विशेष अधिकार देण्यात आले आहेत. विशेष लाइन चेकिंग पथकामधील कर्मचाऱ्यांची संख्या कमी असल्यामुळे विशेष तपासणी करण्यासाठी महत्त्वाच्या अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांकडेही ही जबाबदारी सोपविली आहे. पुणे-मुंबई मार्गावर एका अधिकाऱ्याने बस अडवून गाडीमध्ये अचानक विनातिकीट प्रवासी तपासणी केली. यामुळे प्रवाशांना अडचण झाली होती. या विरोधात एका प्रवाशाने केलेल्या तक्रारीनंतर मार्ग तपासणीचे अधिकार परत घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

एसटी मुख्यालयाकडे नोंदविण्यात आलेल्या आक्षेपानंतर एसटी महामंडळाच्या महाव्यवस्थापक (वाहतूक) यांनी याबाबत आदेश काढले. राज्यातील सर्व विभाग नियंत्रक कार्यालयांना एसटीचा सुरक्षा विभाग आणि लाइन चेकिंगसाठी असलेले विशेष पथक यांना वगळून इतर सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून मार्ग तपासणीसाठी देण्यात आलेली सर्व ‌अधिकारपत्रे जमा करून घेण्याचे आदेश दिले आहेत.

या आदेशामुळे विभाग नियंत्रक, आगार प्रमुख, यंत्र चालन अभियंता, वाहतूक अधिकारी, सहाय्यक वाहतूक अधिकारी यांच्यासह अन्य अधिकाऱ्यांना देण्यात आलेले विशेष मार्ग तपासणीचा अधिकार संपुष्टात येणार आहे.


मोफत पासही जमा करणार
औरंगाबादसह इतर विभाग नियंत्रक कार्यालयात लाइन चेकिंगसाठी एक ते दोन पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. एका मार्गावर एकच पथक कार्यरत असेल. अन्य मार्गावरून विनातिकीट प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढण्याचा धोका या आदेशामुळे निर्माण झालेला आहे. याशिवाय सुरक्षा विभागाकडूनही मनुष्यबळ कमी असल्याने मार्ग तपासणीचे काम मंदावण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गळक्या टँकरमुळे टंचाईत भर

$
0
0

Ramchandra.Vyabhat@timesgroup.com

औरंगाबादः सततच्या दुष्काळामुळे औरंगाबाद जिल्ह्याचे तोंडचे पाणी पळाले आहे. एकीकडे हंडाभर पाण्यासाठी नागरिकांना पायपीट करावी लागत असताना दुसरीकडे मात्र प्रशासनाकडून गावोगावी गळक्या टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. टँकरवर कोट्यवधी रुपये खर्च करण्यात येत आहेत, मात्र पाण्याची गळती थांबविली जात नाही. त्यामुळे पाणीटंचाईत भरच पडत आहे

जिल्ह्यातील पाण्याचे स्त्रोत आटल्यामुळे सुमारे ९ लाख नागरिकांची तहान टँकरद्वारे भागवण्यात येत आहे. हंडाभर पाण्यासाठी महिलांना अनेक किलोमीटर दुरवर पायपीट करावी लागत असल्याचे चित्र जिल्ह्यात असून, प्रशासन मात्र बैठकांमध्ये गर्क झाले आहे. जिल्ह्यात निर्माण झालेल्या तीव्र टंचाईमुळे पाण्याचा प्रत्येक थेंब वाचविण्याचा सल्ला दिला जात आहे, पण प्रत्यक्षात प्रशासनाकडून होणाऱ्या निष्काळजीपणामुळे पाण्याची मोठ्या प्रमाणावर नासाडी होत आहे. दुष्काळी भागाकरिता पिण्याचे पाणी वाहून नेणाऱ्या बहुतांशी टँकरमधून गळती होत असून, दररोज लाखो लिटर पाणी वाया जात आहे. गेल्या चार वर्षांपासून दुष्काळाच्या दृष्टचक्रात अडकलेल्या मराठवाड्याची तहान टँकरवर भागविण्यात येत आहे, टँकरच्या फेऱ्यातून लॉबीचे अर्थचक्र सांभाळल्या जात असतांना दुसरीकडे गळके टँकर भरून पाण्याची मोठी नासाडी करण्यात येत आहे. पाणीटंचाईच्या असलेल्या गावात ग्रामपंचायतीकडून टँकरची मागणी होते.

टँकर हा सर्वात शेवटचा पर्याय मात्र तरीही सर्वात सहजतेने या पर्यायाचा वापर करण्यात येतो. टँकर मंजूर झालेल्या गावांमध्ये एक-दोन दिवसांत टँकर सुरू होते, मात्र गळती होत असल्याने मंजूर झालेल्या क्षमतेपेक्षा कितीतरी कमी पाणी गावाला मिळते. पैठण तालुक्यातील मुधलवाडी ते दाभरुळ तांडा हा ५५ किलोमीटरचा प्रवास टँकरला करावा लागतो, अशीच परिस्थिती इतर तालुक्यांमध्येही आहे. गावचे रस्तेही खराब असल्यामुळे टँकरमधून बरेच पाणी वाया जाते, पाण्याची ओरड कमी होत नसल्यामुळे प्रशासनाकडून गावामध्ये वाढीव खेपा कराव्या लागतात पर्यायाने खर्चात वाढ होते.

तहसीलदार, बीडीओंना सूचना दिल्या : पाणीटंचाई आणि टँकरगळती यांविषयी निवासी उपजिल्हाधिकारी विश्वंभर गावंडे म्हणाले की, काही दिवसांपूर्वी प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या पाणीटंचाईबाबत झालेल्या बैठकीमध्ये सर्व तहसीलदार, बीडीओ यांना पाणीगळती विषयी सूचना दिल्या आहेत.

टँकरवर वॉच नाही

बीडीओ स्तरावर टँकरच्या फेऱ्यांवर वॉच ठेवण्यात येतो, मात्र पाणीटंचाईची तीव्रता पाहता बहुतांश टँकरला ग्लोबल पोजिशनिंग सिस्टिम (जीपीएस) बसविणे, गळके टँकर आदींकडे दुर्लक्ष केले जाते. त्यामुळे टँकरवाल्यांचे फावते. ज्या गावात टँकरने पाणीपुरवठा केला जातो त्या गावातील ग्रामपंचायत सदस्यांनी टँकरच्या फेऱ्यांबाबत; तसेच गळक्या टँकरबाबतची माहिती प्रशासनाकडे देणे अपेक्षित आहे, मात्र आपापसातील 'समन्वया'मुळे हा प्रकार उघडकीस येत नाही.

अशी होते टँकरमधून गळती

विविध ठिकाणांहून टँकरमध्ये पाणी भरताना होणारा निष्काळजीपणा, टँकरची उघडी झाकणे व गळके टँकर. पाणी वाहून नेणाऱ्या मोठ्या टँकरची क्षमता १० हजार व १२ हजार लिटरची असते. टँकर चुकीच्या पद्धतीत भरण्यात येतात. त्यामुळे बरेच पाणी वाया जाते. पाणी भरण्यासाठी हायड्रेन उभारण्यात आले आहेत. तेथेही टँकर भरताना पाणी वाया जाते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images