Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

मिलिंद कॉलेजची वास्तू जतन करा

$
0
0

Ashish.Choudhari@timesgroup.com
औरंगाबाद ः भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या मिलिंद कॉलेजच्या वास्तूला 'प्राचीन वारसा' हा दर्जा मिळावा, यासाठी कॉलेज व्यवस्थापनाने प्रयत्न सुरू केले आहेत. या ऐतिहासिक इमारतीच्या संवर्धनासह, बाबासाहेबांच्या स्वप्नातील मध्यवर्ती ग्रंथालयाची उभारणी, कॉलेजसाठी नवीन इमारत आदींसाठी १५१ कोटी रुपयांचा प्रस्ताव कॉलेज प्रशासनाकडे शासनाकडे सादर केला आहे.

मराठवाड्याच्या भूमीत डॉ. आंबेडकर यांनी उच्चशिक्षणाचा पाया रचला. मिलिंद कॉलेजच्या उभारणीत त्यांनी स्वतः लक्ष देऊन भव्य वास्तू उभारली. हा अनमोल ठेवा येणाऱ्या पिढ्यांसाठी मार्गदर्शक ठरणारा आहे. ऐतिहासिक महत्त्व असल्याने या इमारतीला 'प्राचीन वारसा'स्थळाचा दर्जा देण्यात यावा, अशी मागणी कॉलेज प्रशासनाने शासनाला दिलेल्या प्रस्तावात केली आहे. हा ऐतिहासिक ठेवा पुढील पिढ्यांनाही पाहता यावा म्हणून इमारतीचे संवर्धन व सरंक्षण करणे आवश्यक आहे. या ऐतिहासिक इमारतीला 'प्राचीन वारसा'स्थळाचा दर्जा देताना कला आणि विज्ञान कॉलेजसाठी स्वतंत्र दोन इमारती, ग्रंथालय, विद्यार्थी-विद्यार्थिनींची वसतिगृहे, प्रयोगशाळा आदींच्या उभारणीसाठी १५१ कोटी रुपयांची गरज आहे, असे या प्रस्तावात नमूद केले आहे. हा प्रस्ताव सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांच्याकडे कॉलेज प्रशासनाने दिला आहे.

मध्यवर्ती ग्रंथालयासाठी २५ कोटी
मिलिंद कॉलेजची उभारणी करताना डॉ. आंबेडकर यांनी ग्रंथालयाला विशेष महत्त्व दिले. कॉलेजचे ग्रंथालयाने वाचनाभिमुख पंरपरा आजही जपली आहे. प्रशासनाने दिलेल्या प्रस्तावात मध्यवर्ती ग्रंथालय उभारण्याचा मानस व्यक्त केला आहे. राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय दर्जाच्या या ग्रंथालयासाठी २५ कोटी रुपयांची गरज असल्याचे कॉलेज प्रशासनाने प्रस्तावात म्हटले आहे.

कॉलेजच्या या ऐतिहासिक इमारतीला 'प्राचीन वारसा'स्थळाचा दर्जा देण्याची मागणी शासनाकडे केली आहे. इमारतीत वर्दळ लक्षात घेता, तिची भविष्यात झीज होऊ शकते. ही मूळ इमारत जतन व्हावी, धूळ, प्रदूषणापासून तिचे सरंक्षण करावे, तिचे संवर्धन व्हावे, हा आमचा हेतू आहे. कॉलेजच्या नवीन इमारतीसाठी परिसरात जागाही उपलब्ध आहे. इमारत, प्रयोगशाळा आदींच्या उभारणीसाठी १५१ कोटींचा प्रस्ताव सादर केला आहे.
- डॉ. वैशाली प्रधान, प्राचार्य, मिलिंद कॉलेज

- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक : २५ कोटी
- आर्ट, सायन्स कॉलेजांची नवी इमारत : २५ कोटी
- विद्यार्थी, विद्यार्थिनींची वसतिगृहे : १० कोटी
- रंगमंदिर दुरुस्ती : १५ कोटी
- भूगोल, मानसशास्त्र इमारत : १५ कोटी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


राज, उद्धव दौऱ्यांमुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, उस्मानाबाद

शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये उस्मानाबादमध्ये येणार असताना, मनसेचे प्रमुख राज ठाकरेही पुढील आठवड्यामध्ये उस्मानाबादमध्ये येत आहेत. या दोन्ही नेत्यांचा एकाच महिन्यामध्ये दौरा होत असल्यामुळे, जिल्ह्यातील कार्यकर्त्यांमध्ये उत्साह असून, आगामी जिल्हा परिषद निवडणुकांच्या दृष्टीने सूचना मिळण्याचा अंदाज आहे.

राज ठाकरे २० ते २२ एप्रिल दरम्यान उस्मानाबाद दौऱ्यावर आहेत. त्यांना २१ व २२ एप्रिल रोजी उस्मानाबाद जिल्ह्यातील न्यायालयात हजर राहायचे आहे. न्यायालयीन कामकाजबरोबरच दुष्काळग्रस्त भागाची पाहणी तसेच तुळजाभवानी मातेचे दर्शन घेण्याचे त्यांचे नियोजन आहे.

उद्धव ठाकरे आता २७ एप्रिल रोजी उस्मानाबाद दौऱ्यावर येत आहेत. शिवसेनेच्या वतीने आयोजित कन्यादान विवाह सोहळ्यास ते उपस्थित राहणार आहेत. या सोहळ्यामध्ये १०० जोडपी विवाहबद्ध होत आहेत. राज्य सरकारविरोधात उद्धव ठाकरे यांनी जाहीर नाराजी व्यक्त करत, टीका करण्यास सुरुवात केली आहे. तसेच, राज्याच्या कारभारामध्ये शिवसेनेकडून वेगळे स्थान निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे. त्यातूनच, सुरू करण्यात आलेल्या कन्यादान योजनेच्या माध्यमातून कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण करण्याचा त्यांचा प्रयत्न असेल. या दोन्ही नेत्यांना मोठा वर्ग उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये आहे. त्यामुळे त्यांच्या दौऱ्याकडे सर्वांचे लक्ष असून, त्यातून आगामी निवडणुकीची कशा पद्धतीने तयारी करण्यात येते, याचीही चर्चा सुरू झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोडग्या लेटलतिफांना पुन्हा दणका

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
मंगळवारी सलग दुसऱ्या दिवशी सकाळी १० वाजता महापौरांनी पुन्हा एकदा महापालिकेची तपासणी केली. त्यात ४२ कर्मचारी गैरहजर आढळून आले. यावरून तुपेंनी प्रशासनाची चांगलीच खरडपट्टी काढली. कर्मचाऱ्यांना शिस्त लावणे हे प्रशासनाचे काम असून त्याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी सूचना केली.
महापौरांनी आज सकाळी मुख्यालयातील विभागांना अचानक भेट दिली. त्यात ४२ कर्मचारी जागेवर हजर नसल्याचे दिसून आले. सोमवारी झालेल्या तपासणीत १२३ कर्मचारी गैरहजर आढळले होते. उशिराने आलेल्या कर्मचाऱ्यांना बंद गेटचा सामना करावा लागला होता. तुपेंनी नाराजी व्यक्त करून उशिरा आलेल्या कर्मचाऱ्यांचे एक दिवसाचे वेतन कपात करावे, असे प्रशासनास आदेशित केले होते. त्या पार्श्वभूमीवर मंगळवारी कर्मचारी वेळेवर हजर राहतील, अशी अपेक्षा होती. मात्र, ४२ कर्मचारी गैरहजर आढळल्याने महापौरांनी प्रशासनाची खरडपट्टी काढली. कर्मचाऱ्यांना शिस्त लावणे हे काम प्रशासनाचे आहे. याकडे लक्ष देऊन योग्य ती कार्यवाही होण्याची गरज आहे. आज उशिराने आलेल्या कर्मचाऱ्यांवर काय कारवाई करायची याचा निर्णय प्रशासनावर सोपविण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पनामा प्रकरणाची याचिका फेटाळली

$
0
0

म. टा. विशेष प्रतिनिधी, औरंगाबाद
जगाला हादरवून टाकणाऱ्या आजवरच्या सर्वांत मोठ्या 'पनामा पेपर्स' प्रकरणाच्या चौकशीसाठी सुप्रीम कोर्टाच्या सेवानिवृत्त न्यायमूर्तीच्या अध्यक्षतेखाली चौकशी आयोग नेमावा, अशी विनंती करणारी जनहित याचिका मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाने फेटाळली.

निलंगा (जि. लातूर) येथील माजी आमदार माणिकराव जाधव यांनी जनहित याचिका सादर केली. या प्रकरणाच्या चौकशीचा नियमित अहवाल खंडपीठाकडे सादर करावा, सीबीआयने या प्रकरणाची चौकशी करून गुन्हे दाखल करावेत, भारतातील पाचशे जणांच्या नावासह माहिती बंद लिफाफ्यात खंडपीठाला सादर करावे, अशी विनंती याचिकेत करण्यात आली होती. मंगळवारी या याचिकेची सुनावणी न्या. संभाजी शिंदे व न्या. संगीतराव पाटील यांच्यासमोर झाली.

जगभरातील बडे नेते, सेलिब्रिटी, खेळाडू यांची नावे या यादीत असून अब्जावधी रुपये मध्य अमेरिकेतील पनामा देशातील मोझॅक फोन्सेका या विधी कंपनीमध्ये दडवून कोट्यवधींचा कर चुकवल्याचे त्यातून स्पष्ट झाले. यात तब्बल ५०० नामवंत भारतीय आहेत. केंद्र सरकारने मल्टि-एजन्सी तपासगटाची स्थापना केली आहे. इंटरनॅशनल कन्सॉर्शियम ऑफ इन्व्हेस्टिगेटिव्ह जर्नालिस्ट (आयसीआयजे) या गटाने पनामा पेपर्सची ही माहिती उघड केली, असे या याचिकेत म्हटले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शुद्ध पाण्यासाठी ‘वॉटर एटीएम कार्ड’

$
0
0

मोतीचंद बेदमुथा, उस्मानाबाद

अशुद्ध आणि क्षारयुक्त पाण्यामुळे पसरणाऱ्या आजारांना अटकाव करण्यासाठी जिल्ह्यातील कन्हेरवाडी (ता. कळंब) ग्रामपंचायतीने शुद्ध पाण्यासाठी वॉटर एटीएम व रिचार्जची सुविधा सुरू केली आहे. शुद्ध पाणी मिळावे, यासाठी ग्रामपंचायतीने 'आरओ' सुरू केले असून, यात तीस पैशांमध्ये एक लिटर पाणी मिळू शकते.

दुष्काळामुळे मराठवाड्यात सर्वत्रच पाणीटंचाई असून, कळंबपासून १२ किलोमीटर अंतरावर असणाऱ्या कन्हेरवाडीमध्ये तसेच चित्र आहे. जलस्रोत कोरडेठाक पडल्यामुळे भूगर्भात खोलवरून पाणीउपसा करणाऱ्या कुपनलिकांवर अवलंबून राहावे लागते. कुपनलिकेचे पाणी जड व त्यात क्षाराचे प्रमाण अधिक असल्यामुळे अनेक आजार उद्भवत आहेत. त्यातून शुद्ध पाण्यासाठीच्या विक्रीला सुरुवात झाली आहे. गावातील कुटुंबांना शुद्ध पाणी मिळावे, यासाठी ग्रामपंचायतीनेच पुढाकार घेतला आणि त्यातून 'आरओ'ची कल्पना समोर आली. ग्रामपंचायतीने साडेपाच लाख रुपयांचा निधी खर्च करून, 'आरओ' बसविला. या प्रकल्पाची क्षमता आठ हजार लिटरची असून, त्यातून प्रतिलिटर ३० पैसे दराने शुद्ध पाणी उपलब्ध झाले आहे. विशेष म्हणजे

त्यामुळे सध्या शुध्द पाणी विक्रीचा व्यवसाय तेजीत आहे. ग्रामीण भागात शुध्द पाण्याचा प्रकल्प सुरू करावयाचा म्हटले तर सुविधांचा अभाव असतो. ग्रामीण भागातील अनेक नियमित व साथीच्या आजारांचे मूळ कारण हे पाणी आहे. यासाठी नागरिकांना ३५० वॉटर एटीएम कार्डचे वाटप करण्यात आले. यावर मोबाइल सिमप्रमाणे ग्रामपंचायतीमध्ये रिचार्जची सोय करण्यात आली. त्यामुळे शुद्ध पाण्याची सोय होतानाच, पाण्याचा अपव्ययही टळत आहे. या प्रकल्पातून पाणी येताना जे पाणी थोड्या प्रमाणात सांडते, ते पाणी ठिबक सिंचनाच्या माध्यमातून शंभर ते दीडशे झाडांनाही जगविण्याचा प्रयत्न होतो.

या उपक्रमासाठी सरपंच अॅड. वर्षा रामराजे जाधव, उपसरपंच मधुकर मिटकरी, अॅड. रामराजे जाधव यांच्यासह सुधाकर कवडे, अनंत पाटील, काकासाहेब कवडे, संतोष शिंदे, बळीराम कवडे, शरद सावंत यांनी प्रयत्न घेतले आहेत.

पर्यटकांनाही दिलासा

कळंब शहरापासून दहा ते बारा किलोमीटर अंतरावर असलेल्या कन्हेरवाडी गावात लहान मुलांचे जावळ काढण्याची अनेक वर्षांपासूनची प्रथा आहे. येथील सटवाईचे मंदिर प्रसिद्ध असून, ती जागृत असल्याची श्रद्धा भाविकांमध्ये आहे. त्यामुळे या मंदिरामध्ये येणाऱ्या भाविकांनाही शुद्ध पाण्यासाठी या प्रकल्पाचा फायदा होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जलगाडीचा सुखद दिलासा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, लातूर

पाणीटंचाईमुळे राज्याचे लक्ष वेधलेल्या लातूरमध्ये अखेर मंगळवारी पहाटे विशेष रेल्वे पोहोचली. या रेल्वेमुळे लातूरकरांना दिलासा मिळाला आहे.

प्रशासनासाठी युद्धप्रसंग

मिरज येथून पाणी आणण्याचा निर्णय झाल्यानंतर, गेल्या दोन-तीन दिवसांमध्ये लातूरच्या प्रशासनाकडून युद्धपातळीवर प्रयत्न करण्यात आला. यामध्ये जिल्हाधिकारी पांडुरंग पोले, महापालिकेचे आयुक्त सुधाकर तेलंग, उपजिल्हाधिकारी डॉ. अनंत गव्हाणे यांच्यासह २० गॅझेटेड अधिकारी अखंड कार्यरत होते. याशिवाय, ५० कर्मचारी आणि २०० मजूरही या कामामध्ये सहभागी होते. या कामासाठी पाच पोकलेन आणि ३० वाहने तैनात करण्यात आली होती.

पुरवठ्याला गती

विशेष रेल्वेच्या टँकरमधून पाणी रेल्वे स्टेशनजवळील विहिरीमध्ये सोडल्यानंतर, पुढील पुरवठ्याच्या नियोजनासाठी हे पाणी जलशुद्धीकरण केंद्रात नेण्यात येणार आहे. स्टेशन ते जलशुद्धीकरण केंद्राचे अंतर चार किलोमीटर आहे. या विहिरीतून टँकरद्वारे हे पाणी जलशुद्धीकरण केंद्रात नेण्यात येणार आहे. यासाठी विहिरीवर टँकरचे आठ पॉइंट तयार करण्यात आले आहेत. या जलशुद्धीकरण केंद्रातून दररोज ७० टँकर पाणी शहरामध्ये पुरविण्यात येतात. याशिवाय, परिसरातील विहिरींमध्ये दोनशे ते तीनशे खासगी टँकर पाणीही शहरामध्ये पुरविण्यात येत आहेत. रेल्वेतून आलेल्या पाण्यामुळे महापालिकेच्या या नियोजनाला गती येणार आहे.

पुढची फेरीची चर्चा

विशेष रेल्वेची पहिली चाचणी फेरी यशस्वी झाल्यानंतर, पुढील फेरी कधी, अशी चर्चा सुरू झाली आहे. या फेरीचा निर्णय लातूर व सांगलीचे जिल्हाधिकारी आणि रेल्वे प्रशासन यांच्यातील चर्चेनंतरच होणार आहे. त्यामुळे, ही फेरी नक्की केव्हा होणार, याचा निर्णय येत्या काही दिवसांमध्ये होईल. पहिली फेरी १० टँकरची होती, पुढील फेऱ्यांमध्ये ५० टँकर पाणीपुरवठा होणार असल्यामुळे, या रेल्वेच्या पुढील फेऱ्यांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

पहाटे ५.००

विशेष रेल्वे लातूर स्थानकात पोहोचली

३४३ किलोमीटर

मिरज-लातूर अंतर

१८ तास

रेल्वेच्या प्रवासासाठी लागलेला वेळ

५,४०,००० लिटर

विशेष रेल्वेतून आलेले पाणी

३ तास

रेल्वेच्या टँकरमधून स्थानकाशेजारील विहिरीमध्ये पाणी सोडण्यासाठी लागलेला वेळ

७० टँकर

पालिकेच्या जलशुद्धीकरण केंद्रातून दररोज शहरात जाणारे टँकर

लातूरला मंगळवारी दाखल झालेली विशेष रेल्वे ही पाणीपुरवठ्याची चाचणी होती. शहराला पाणीपुरवठा व्हावा, यासाठी आम्ही २४ तास प्रयत्न करत असून, युद्धपातळीवर प्रयत्न केल्यामुळे ही रेल्वे लवकर शहरात दाखल झाली आहे. यापुढेही, लातूर शहराला किमान पाणी मिळेल, यासाठी आमचा प्रयत्न असेल.

- पांडुरंग पोले, जिल्हाधिकारी, लातूर

विशेष रेल्वेच्या मदतीने शहरासाठी पाणी आले, त्याचे मी स्वागत करतो. याच पद्धतीने शहराला कायमस्वरूपी पाणीपुरवठा व्हावा, यासाठी उजनीहून येणाऱ्या पाइपलाइनचाही सरकारने गांभीर्याने विचार करायला हवा.

- अख्तर मिस्त्री, महापौर, लातूर

सामान्य नागरिक

लातूर शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी रेल्वेतून पाणी आणण्यात आले, याबद्दल लातूरमधील सामान्य नागरिकांनी आनंद व्यक्त केला. मात्र, यापुढील काळामध्ये महापालिकेने या पाण्याचे वाटप करताना, ते समन्यायी पद्धतीने करायला हवे. पाणी ही सर्वांचीच गरज असल्यामुळे, सर्वांनाच किमान पाण्याचा पुरवठा व्हावा, अशी अपेक्षा सामान्य नागरिकांमधून व्यक्त करण्यात येत आहे.

भाजपमध्ये उत्साह

लातूर शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी प्रसंगी रेल्वेची मदत घेण्याचे विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले होते. त्यानंतर, महसूलमंत्री एकनाथ खडसे आणि पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी गेल्या आठवड्यात लातूर व मिरजची पाहणी केली होती. पंधरा दिवसांमध्ये लातूरला पाण्याची रेल्वे पोहोचेल, असे आश्वासन खडसे यांनी दिले होते. त्याच्या सहाव्या दिवशीच पाणी आल्यामुळे, शहरातील भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह दिसून येत होता. ही रेल्वे दाखल झाल्यानंतर, भाजपचे बॅनर रेल्वेच्या टँकरवर झळकले. 'मुख्यमंत्र्यांनी आपला शब्द खरा करून दाखविला आहे. आता पाण्याच्या वाटपाची जबाबदारी महापालिकेची आहे,' अशी प्रतिक्रिया भाजपच्या गुरुनाथ मगे, शैलेश लाहोटी यांनी व्यक्त केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तीन जणांची आत्महत्या

$
0
0

तीन जणांची आत्महत्या
वैजापूर - तालुक्यात वेगवेगळ्या घटनेत तीन जणांनी आत्महत्या केल्याचे बुधवारी उघडकीस आले. नापिकी आणि कर्जबाजारीपणास कंटाळून या तिघांनी आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे. त्या अनुषंगाने पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
शहरातील फुलेवाडी रोडवरील लक्ष्मण जगनाथ निखाडे (वय ३५) यांनी राहत्या घरी बुधवारी सकाळी सहा वाजता गळफास घेऊन आत्महत्या केली. दुसऱ्या घटनेत संजरपूरवाडी येथील रहिवासी जयपाल सिंघ सिंघल, (वय २६) हा गावातील शेतात मृत अवस्थेत आढळला. आघूर येथील बाबूलाल रावसाहेब शिंदे (वय ४२) हे सुद्धा गावातील शेतात मृत अवस्थेत सापडले. मात्र, त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. येथील उपजिल्हा रुग्णालयात तिघांचे शवविच्छेदन करण्यात आले. या प्रकरणी वैजापूर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलिस निरीक्षक अनिरुद्ध नांदेडकर याच्या मार्गदर्शनाखाली पोलिस तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘झेडटीसीसी’ झाली नोंदणीकृत

$
0
0


Nikhil.Nirkhee
@timesgroup.com
औरंगाबादः ब्रेन डेड रुग्णाच्या विविध अवयवदान व अवयव प्रत्यारोपणामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका निभावणारी व या संपूर्ण प्रक्रियेवर नियंत्रण ठेवणारी 'झोनल ट्रान्स्प्लान्ट कोऑर्डिनेशन कमिटी' (झेडटीसीसी) ही समिती साडेचार वर्षांच्या प्रतीक्षेनंतर का होईना पहिल्यांदाच नोंदणीकृत संस्था झाली आहे. धर्मादाय आयुक्त कार्यालयात 'झेडटीसीसी'ची अधिकृत नोंदणी झाली असून, 'झेडटीसीसी'चे स्वतंत्र कार्यालय एमजीएम रुग्णालयात सुरू झाले आहे. या कार्यालयात दोन्ही मूत्रपिंड निकामी झालेल्या रुग्णांना मूत्रपिंडाच्या मागणीसाठीची अधिकृत नोंदणी करता येणार आहे व प्राधान्यक्रमानुसार रुग्णांची प्रतीक्षायादी तयार केली जाणार आहे.
तब्बल चार-साडेचार वर्षांपूर्वीच शहराला 'झेडटीसीसी' ही समिती मंजूर झाली होती व समितीच्या तत्कालिन अध्यक्षपदी डॉ. व्ही. जी. काळे यांची शासनाने नियुक्ती केली होती. मात्र, त्यानंतरही समिती कार्यान्वित झालीच नाही. दरम्यान, सुमारे दीड वर्षापूर्वीच्या 'मटा राऊंड टेबल'मध्ये घाटीचे तत्कालिन अधिष्ठाता डॉ. के. एस. भोपळे यांनी शहरातील मूत्रपिंडविकारतज्ज्ञ व इतर डॉक्टरांच्या समक्ष ज्येष्ठ मूत्रपिंडविकारतज्ज्ञ डॉ. सुधीर कुलकर्णी यांची 'झेडटीसीसी'च्या अध्यक्षपदी घोषणा केली व तसा प्रस्ताव 'डीएमईआर'कडे पाठवला. त्यानंतर 'डीएमईआर'चे अतिरिक्त सहसंचालक डॉ. तात्यासाहेब लहाने यांनीही 'मटा'ला दिलेल्या सदिच्छा भेटीत डॉ. कुलकर्णी यांची अध्यक्षपदी घोषणा केली होती. दीर्घ प्रतीक्षेनंतर, १७ जानेवारी २०१६ रोजी शहरामध्ये पहिल्या ब्रेन डेड रुग्णाकडून विविध अवयवांचे दान झाले आणि अवयव काढण्याची शस्त्रक्रिया शहरातील युनायटेड सिग्मा हॉस्पिटलमध्ये झाली. या संपूर्ण प्रक्रियेसाठी 'झेडटीसीसी'चे प्रभारी अध्यक्ष म्हणून काम करण्याची जबाबदारी डॉ. कुलकर्णी यांच्यावर 'डीएमईआर'सह राज्य शासनाकडून सोपवण्यात आली. त्यानंतर केवळ तीन महिन्यांत पाच ब्रेन डेड रुग्णांकडून हृदय, यकृत, मूत्रपिंड, कॉर्निया अशा तब्बल २२ अवयवांचे दान झाले. या संपूर्ण काळात 'डीएमईआर'कडून डॉ. कुलकर्णी यांची समितीच्या प्रभारी अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती, तर दोन आठवड्यांपूर्वीच डॉ. कुलकर्णी यांची 'झेडटीसीसी'च्या अध्यक्षपदी पूर्णवेळ नियुक्ती झाली आहे. त्याचवेळी 'झेडटीसीसी'ची धर्मादाय आयुक्त कार्यालयात नोंदणी झाल्याचे पत्र 'झेडटीसीसी'ला मंगळवारी (१२ एप्रिल) प्राप्त झाले आहे.
समितीकडून होणार यादी अपडेट
सात सदस्यांसह 'झेडटीसीसी'ची नोंदणी झाली आहे. यामध्ये अध्यक्षपदी डॉ. सुधीर कुलकर्णी, सचिवपदी डॉ. चंद्रकांत म्हस्के (घाटीचे अधिष्ठाता), त्यांचे प्रतिनिधी म्हणून डॉ. अजित दामले, तर सदस्यपदी डॉ. प्रवीण सूर्यवंशी, डॉ. विजय बोरगावकर, डॉ. व्यंकट होळसांबरे, डॉ. राजेंद्र प्रधान यांची नोंदणी समितीवर झाली आहे. सद्यस्थितीत 'झेडटीसीसी'चे कार्यालय एमजीएम रुग्णालयातील डॉ. कुलकर्णी यांच्या कार्यालयात सुरू झाले आहे. या कार्यालयामध्ये ज्या रुग्णांचे दोन्ही मूत्रपिंड निकामी झाले आहेत व ज्यांना जवळचे नातेवाईक मूत्रपिंड देऊ शकत नाही, असे रुग्ण मूत्रपिंडासाठी नोंदणी करू शकतात. विविध निकषांच्या आधारे रुग्णांची प्रतीक्षायादी तयार करण्यात येत आहे. तसेच पाच मूत्रपिंडविकारतज्ज्ञांच्या समितीकडून दर महिन्याला प्रतिक्षायादी अद्ययावत करण्यात येणार आहे, असे डॉ. कुलकर्णी यांनी सांगितले.
प्रतीक्षायादीत नोंदणी करण्यासाठी अशी घ्यावी रुग्णांनी काळजी
- तीन महिने हिमो डायलिसिस किंवा पेरिटोनियल डायलिसिस घेतल्यानंतरच नोंदणी करता येते.
- पूर्वी मूत्रपिंडरोपण झाले असेल व ते कार्यरत नसल्यास किडनी मिळण्यासाठी प्राधान्य मिळते.
- पूर्वीचे मूत्रपिंडरोपण कार्यरत नसल्यास त्याची माहिती समितीला देणे आवश्यक.
- १८ पेक्षा कमी वय असल्यास प्रतिक्षायादीत रुग्णाचे नाव ज्येष्ठ क्रमांकावर जाते.
- फिश्चुला-ग्राफ्ट सर्जरी कार्यान्वित होणे शक्य नसल्यास मूत्रपिंडविकारतज्ज्ञाकडून लिहून घ्या.
- रक्तातील अँटीबॉडी टेस्ट आवश्यक असून अँटीबॉडी असल्यास प्रतिक्षायादीत वरचा क्रमांक मिळतो.
- हृदयरोग व इतर गंभीर आजार असल्यास त्याच्या तपासणीचे अहवाल अर्जासोबत जोडणे आवश्यक.
- पूर्वी मूत्रपिंड दान केले असल्यास प्रतिक्षायादीत प्राधान्य दिले जाते.
- वयाच्या पुराव्यासाठी आधार कार्ड व इतर कागदपत्रे आवश्यक आहेत.
- कावीळ-एचआयव्ही यासारख्या संसर्गजन्य रोगांच्या चाचण्या आवश्यक आहेत.
- लवकरात लवकर नोंदणी करा, ज्यामुळे प्रतीक्षायादीत ज्येष्ठता प्राप्त होईल.











मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सहा गावांना पाणी सोडण्याची मागणी

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
जायकवाडी धरणातून गोदावरी पात्रात तहानलेल्या गावांसाठी पिण्यासाठी पाणी सोडण्यात आले. मात्र, तांत्रिक अडचणींमुळे सहा गावे अद्यापही तहानलेलीच आहेत. या गावांना पाणी सोडा या मागणीसाठी महिलांनी माठ घेऊन कडा कार्यालयात ठिय्या मारला. अन्नदाता शेतकरी संघटनेच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले.
आपेगाव, नवगाव, आवडे उंचेगाव, गुंतेगाव, बोरगाव, पाथरवाला या सहा गावांना अद्यापही पाणी मिळाले नाही. जायकवाडीच्या डाव्या कालव्यासाठी पाणी सुरू असतानाच गोपेवाडी सीआर गेटमधून आपेगाव बंधाऱ्यातून हिरडपुरी बंधाऱ्यासाठी पाणी सोडण्यात यावे, अशी अनेकदा शेतकऱ्यांकडून मा‌गणी झाली. मात्र, त्यावर निर्णय झाला नाही. पाण्याच्या मागणीसाठी कडाचे अधीक्षक अभियंता मनोहर पोकळे यांच्या दालनामध्ये शेतकऱ्यांनी मोठी गर्दी केली होती. पाण्यासाठी सर्वाधिक त्रास महिलांना व बालकांना होत असून यामुळे आंदोलनात हक्काच्या पाण्यासाठी महिला माठ घेऊन आल्या होत्या. अन्नदाता शेतकरी सघटनेचे अध्यक्ष जयाजीराव सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनामध्ये संगीता जाधव, छाया जाधव, द्वारका जाधव, पुष्पा तांगडे, संगीता तांगडे, शोभा जाधव, कस्तुरबाई जाधव, पुष्पा जाधव आदी महिलांची उपस्थिती होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाट्यगृहाचे खासगीकरण रद्द करा

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
जगद्गुरू संत तुकाराम नाट्यगृहाचे खासगीकरण रद्द करा अन्यथा आंदोलन करू, असा इशारा औरंगाबाद कलाप्रेमी मंचने दिला आहे. याबाबत महापालिका आयुक्त तसेच महापौरांना बुधवारी मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक चळवळीचे मुख्य केंद्र असलेल्या संत एकनाथ रंगमंदिर व संत तुकाराम नाट्यगृहाची प्रचंड दूरवस्था झाली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून नाट्यगृहांच्या दुरुस्तीचा प्रस्ताव धूळखात पडला आहे. वर्षभर दोन्ही नाट्यगृहात मोठ्या संख्येने कार्यक्रम होतात. मात्र, असे असताना या नाट्यगृहाच्या खासगीकरणाचा घाट घातल्याने रंगकर्मींनी नाराजी व्यक्त केली आहे. नाट्यगृहाचा कारभार सांस्कृतिक विभागाकडे न ठेवता मालमत्ता विभागाकडे देण्यात आल्याने नाट्यगृहाची अवस्था दयनीय झाली आहे. खासगीकरणाचा निर्णय जाचक असून नाट्यरसिकांवर अन्याय करणार आहे, असा आरोप औरंगाबाद कलाप्रेमी मंचचे सदस्य रंगकर्मी भालचंद्र कानगो, कवी प्रा. दासू वैद्य यांनी केला.
दरम्यान, महापौर तसेच आयुक्तांना निवेदन देण्यासाठी मंचाच्या सदस्यांनी दुपारपासून सायंकाळपर्यंत त्यांची प्रतीक्षा केली. मात्र, ते उपलब्ध न झाल्याने त्यांच्या कार्यालयात निवेदन सादर करण्यात आले, अशी माहिती पवन गायकवाड यांनी दिली. नगरसेवक शिवाजी दांडगे, शिल्पा वाडकर, प्रा. मुस्तजिब खान, स्मिता दंडवते, पोपट गायकवाड, राजू परदेशी आदी यावेळी उपस्थित होते.
अनुत्तरित प्रश्न
मनपाचा सांस्कृतिक विभाग बंद करून काय साध्य झाले, खासगीकरणामुळे कलावंताना सहजतेने नाट्यगृहाच्या तारखा मिळतील का, कंत्राटदारांची मक्तेदारी वाढल्यास आम्हाला वाली कोण, नाट्यगृहाचा आर्थिक कारभार मनपाकडे असेल का, खासगीकरणानंतर दर्जा सुधारणार का, भाडे नियंत्रण असेल का, आजपर्यंत राजकीय कार्यक्रमांना सवलत किंवा मोफत नाट्यगृह का दिले जाते, अन्य पालिका ना नफा ना तोटा तत्वावर नाट्यगृह चालवितात मग औरंगाबादेत का नाही, शहरातील सांस्कृतिक परंपरा, वारसा जपण्यासाठी मनपाची जबाबदारी नाही का असे प्रश्न मंचाने उपस्थित केले आहेत.
वेतनावरच खर्च जादा
एप्रिल ते डिसेंबर २०१५ या काळात संत तुकाराम नाट्यगृहाची २४ लाख ९७ हजार भाडे वसुली झाली. तर येथे नियुक्त खासगी तसेच मनपाचे कर्मचाऱ्याचे वेतन, वार्षिक विद्युत देयक यावर एकूण ४३ लाख २२ हजार रुपये खर्च झाले. १ मार्च २०१४ ते ३१ मार्च २०१५ या कालवधीत उत्पन्न ३३ लाख ७५ हजार रुपये, तर खर्च ४३ लाख २२ हजार खर्च झाल्याचे मंचचे सदस्य गायकवाड यांनी सांगितले. खासगी सुरक्षा रक्षक, लाइनमन नियुक्त असताना मनपाचे कर्मचारी का नियुक्त केले, प्रशासकीय खर्च का वाढविला, असा सवालही त्यांनी केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बाबासाहेबांच्या स्वागताचा पहिला मान माळीवाड्याला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १० ऑक्टोबर १९३३ रोजी रोजी औरंगाबादेस पहिली भेट दिली. दादासाहेब गायकवाड, अमृतराव रणखांबे हे त्यांच्यासोबत होते. दौलताबादजवळील माळीवाडा येथे चोखादादा साठे यांनी बाबासाहेबांचे पुष्पहार घालून स्वागत केले होते. मिलिंद महाविद्यालयाची उभारणी केल्यानंतर बाबासाहेबांनी औरंगाबादेत एक आगळेवेगळे नाते निर्माण केले. यांसदर्भातील अनेक आठवणी 'आपले बाबासाहेब' या पुस्तकात संकलित केल्या आहेत, असे पुस्तकाचे लेखक बी. व्ही. जोंधळे यांनी 'महाराष्ट्र टाइम्स'शी बोलताना सांगितले.

'बाबासाहेबांची पहिली औरंगाबाद भेट १९३३मध्ये झाली. त्यांचा पहिला मुक्काम उस्मानपुऱ्यातील मन्सूर ए यार जंगच्या देवडीत होता. बाबासाहेबांना पाहण्यासाठी प्रचंड गर्दी झाली होती. दादाराव काळे, मोहनराव जोगदंड, पोचन्ना मुत्याल यांनी बाबासाहेबांचे स्वागत केले होते. मराठवाड्यात दलित समाज गुलामीचे जीवन जगतो हे बाबासाहेबांना माहित होते. दलितांच्या सामाजिक प्रश्नांवर चर्चा करण्यसाठी बाबासाहेबांनी १७ ऑक्टोबर १९३३ रोजी मन्सूर ए यार जंग देवडीत दलित समाजातील कार्यकर्त्यांची बैठक बोलाविली होती. यास भाऊसाहेब मोरे, दादाराव काळे, संभाजी वाघमारे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते. त्यातील चर्चेनंतर बाबासाहेबांना भाऊसाहेब मोरेंकडून गोविंदराव साबळे या जिगरबाज कार्यकर्त्याची माहिती मिळाली आणि पुढे गोविंदराव बाबासाहेबांचे अनुयायी झाले. भीमपुरा येथेही बैठक झाली होती. त्या जागेवर आज बुद्धविहार आहे. पैठणगेट येथे बाबासाहेबांनी जेवणही घेतले होते. त्यावेळी काशिनाथराव कांबळे, इंगळे, वामनराव कांबळे आदी उपस्थित होते. बाबासाहेबांची पैठण गेट भेट म्हणजे मराठवाड्यातील दलित जनजागरणाची पहाट होती,' असे जोंधळे यांनी सांगितले.

१९३९मध्ये मकरणपूर परिषद आणि १९४०मध्ये तडवळे परिषद महत्त्वपूर्ण ठरल्या. कारण बाबासाहेबांना निजामी राज्यातील मराठवाड्यात कार्यक्रम घेण्यास बंदी होती. त्यावर उपाय म्हणून त्यांनी सीमासभा घेतल्या. या सीमासभांमधूनच भाऊसाहेब मोरे, रावसाहेब, एन. डी. पगारे, बी. टी. बहिरव, सावळाराम त्रिभुवन यांचे नवनेतृत्व उदयास आले.

मराठवाड्याचे मागासलेपण पाहिलेल्या बाबासाहेबांनी शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी २१ जून १९५० रोजी औरंगाबादेत मिलिंद महाविद्यालय सुरू केले. छावणीतील बंगला क्रमांक ६, ७, ८ आणि ९मध्ये महाविद्यालय सुरू झाले. म. भि. चिटणीस हे पहिले प्राचार्य होते. महाविद्यालय उभारणीच्या काळात प्राचार्य चिटणीस, कमलाकांत चित्रे, रुंजाजीमामा भारसाखळे यांनी खूप कष्ट केले. मिलिंद महाविद्यालय सुरू झाले. बाबासाहेब कायम भेट देण्यासाठी औरंगाबादला येत.

औरंगाबाद हे ऐतिहासिक व देशाच्या मध्यभागी असलेले शहर म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना खूप आवडत असे. रोटरी क्लबच्या एका भाषणात त्यांनी म्हटले होते, की औरंगाबादमध्ये स्वतंत्र विद्यापीठ झाले पाहिजे. औरंगाबाद - पुणे रहदारी वाढण्यासाठी कायगाव टोका येथे गोदावरी नदीवर पूल झाला पाहिजे. मनमाड-औरंगाबाद लोहमार्गाचे ब्रॉडगेज व्हावे, कापड गिरणी सुरू करावी, नभोवाणी केंद्र व्हावे आदी मागण्या मांडल्या होत्या. त्यापैकी बहुतांश पूर्ण झाल्या आहेत.
- बी. व्ही. जोंधळे, लेखक.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कालवा निरीक्षक, चौकीदार निलंबित

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पैठण
जायकवाडी धरणाच्या बॅकवॉटर परिसरात बेकायदेशीर कालवा खोदण्याच्या प्रकरणात दोन शेतकऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आल्या आहे. यानंतर पाटबंधारे विभागाने या भागातील कालवा चौकीदार एम. आय. वल्ले व कालवा निरीक्षक बापूराव जाधव यांना निलंबित केले आहे.

जायकवाडी धरणात जेमतेम पाणीसाठा शिल्लक आहे. या परिस्थितीत जायकवाडी धरणाच्या अमरापूर वाघुंडी परिसरातील बॅकवॉटर परिसरात काही शेतकरी धरणातील पाणी उपसा करण्यासाठी जेसीबी व पोकलंड मशिनच्या साह्याने पाचशे फूट लांब, साठ फूट रुंद व अंदाजे पंचवीस फूट खोल कालवा खोदत असल्याची माहिती उजेडात आली. याप्रकरणी कालवा खोदणारे शेतकरी लक्ष्मण दशरथ नेहे व सुभाष मारोती शिसोदे यांच्या विरोधात पाटबंधारे विभागाने एमआयडीसी पोलिस ठाण्यात ११ एप्रिल रोजी गुन्हा दाखल केला आहे.

दरम्यान, पाटबंधारे विभागाने या प्रकरणाची चौकशी केल्यानंतर कालवा चौकीदार एम. आय. वल्ले व कालवा निरीक्षक बापूराव जाधव यांनी गट नंबर ४, ५, १०, ११ व येथे बेकायदेशीर कालवा खोदण्यात येत असल्याची माहिती दिली नसल्याचे स्पष्ट झाले. त्यावरून अधीक्षक अभियंता पोकळे यांनी या दोघांना निलंबित केल्याची माहिती कार्यकारी अभियंता संजय भार्गोदेव यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाण्याच्या फेरवापरातून आर्थिक बचतीचा मार्ग

$
0
0

Abdulwajed.shaikh@timesgroup.com
औरंगाबाद ः मराठवाडा दुष्काळात होरपळत असताना पाण्याचा जपून वापर करण्याचे प्रयोग अनेक ठिकाणी करण्यात येत आहेत. शहरातील जालना रोडवरील राज ऑटो शोरूममधील वॉशिंग सेंटरमध्ये गाडी धुण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या पाण्याचा फेरवापर केला आहे. त्यामुळे पाण्याची बचत तर झालीच, शिवाय वर्षभरात दोन ते अडीच लाख रुपयांची बचतही झाली आहे.

जालना रोडवरील राज ऑटो शोरूममध्ये नवीन गाड्यांची विक्री आणि दुचाकी वाहनांची सर्व्हिसिंग केली जाते. शोरूममध्ये दुचाकी सर्व्हिसिंगसाठी दररोज २०० ते २५० दुचाकी येत असतात. त्यावेळी गाड्या घुतल्या जातात. सुमारे २५० गाड्या धुण्यासाठी दोन दिवसांआड सुमारे पाच हजार लिटर पाणी खरेदी करण्यात येत होते. त्याचबरोबर राज ऑटोने एमआयडीसीकडून पाणी घेतले आहे. त्यासाठी दरमहा २० ते २५ हजार रुपये पाण्याचे बिल भरावे लागत होते.

शोरूमच्या वॉशिंग सेंटरमध्ये दरमहा सुमारे ७५ हजार लिटर पाणी वापरले जात होते. दुचाकी धुतल्यानंतर, ऑइलमिश्रित पाणी थेट ड्रेनेजद्वारे सोडून दिले जात होते. पाण्यावरील खर्च कमी करण्याचा निर्णय राज ऑटोने पाणी बचतीचा निर्णय घेतला. त्यासाठी शोरूमध्ये विशेष ऑइल सेपरेटर आणि सँड फिल्टर बसविण्यात आले. पाण्याचा फेरवापर करण्याचा प्रकल्प उभारण्यासाठी सुमारे दीड लाख रुपये खर्च करण्यात आले. अहमदनगर येथील एका कंपनीने हा प्रकल्प बसविला. याशिवाय पाणी अधिक स्वच्छ राहावे म्हणून विशेष टाक्या तयार करण्यात आल्या आहेत. आता राज ऑटोला एमआयडीसीकडून घेण्यात येणाऱ्या पाणी घट झाली आहे. शिवाय पाण्याचे टँकरही बंद करण्यात आले आहेत, अशी माहिती राज ऑटोचे सर्व्हिस मॅनेजर सुरेश गाडेकर यांनी दिली.

जालना रोड येथील शोरूम आणि सर्व्हिसिंग सेंटर येथे हा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर राज अॉटोच्या शहर आणि जिल्ह्यातील चार शोरूममध्येही वॉशिंग सेंटरमध्येही असे प्रकल्प बसविण्यात आले आहेत, अशी माहिती राज ऑटोचे संचालक हेमंत खिवंसरा यांनी दिली.

असे होते पाणी स्वच्छ
मोटारसायकलची वॉशिंग केल्यानंतर पाणी एक नालीद्वारे २ फूट बाय ३ तीन फूट आकाराच्या भूमिगत टॉकीत जमा केले जाते. या टॉकीत गाळ तळाला बसते. टाकी भरल्यानंतर ओव्हर फ्लो झालेले पाणी त्याच आकाराच्या दुसऱ्या टाकीत पोचते. दोन्ही टाक्यांत गाळ जमा होतो. तेथून पाणी तिसऱ्या टाकीत गोळा केले जाते. या टाकीतून पाणी सुमारे चार फूट खोल असलेल्या चौथ्या टाकीत टाकले जाते. तेथे पाण्यातील गाळाचे प्रमाण कमी असते. या टाकीतून पाणी ऑइल वॉटर सेपरेटर या मशीनमध्ये मोटारीच्या सोडले जाते. तेथे पाण्यातील ऑइल वेगळे केले जाते. तेथून हे पाणी एका टाकीत सोडले जाते. या टाकीत वरच्या बाजुला एका लोखंडी जाळीवर वाळू, खडी आणि कोसळा आदींचा थर टाकलेला असतो. त्यातून पाणी गाळून स्वच्छ होते. या प्रक्रियेद्वारे सुमारे ९९ टक्के पाण्याचा फेरवापर करण्यात येतो.

शहरातील चार शोरूमध्ये पाण्याच्या फेरवापराचा प्रकल्प उभारला आहे. यामुळे पाणी आणि पैशाची बचत होत आहे. ऑइलयुक्त पाण्यामुळे भूजल दूषित होत होते. या प्रकल्पामुळे भूजलाचे प्रदूषण होणार नाही. पाण्याचा फेरवापर करण्याचा संकल्प सर्वांनीच करण्याची गरज आहे.
- हेमंत खिवंसरा, संचालक, राज ऑटो

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्ह्यात पाचशे गावांच्या घशाला कोरड

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
अत्यल्प पर्जन्यमानामुळे यंदाही औरंगाबाद जिल्ह्याला दुष्काळाचा सामना करावा लागत आहे. आटलेले प्रकल्प आणि उन्हाचा वाढलेल्या तडाख्यामुळे ऐन एप्रिल महिन्यातच जिल्ह्यातील ५०१ गावे व १५ वाड्यांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. यामुळे येत्या दीड महिना कसे जगावे, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. तब्बल ६६१ टँकरद्वारे या टंचाईग्रस्त गावांची तहान भागवण्यात येत आहे.

औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण, गंगापूर व वैजापूर तालुक्यांना टंचाईच्या सर्वाधिक झळा बसत आहेत. तालुक्यांत बहुतांश गावामधील पाण्याचे स्त्रोत आटल्यामुळे पाणी आणायचे कुठून, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. सध्या प्रशासनाने जिल्ह्यात ६६१ गावांत टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत असून, तब्बल १० लाख ४९ हजार नागरिकांची तहान टँकरच्या पाण्याद्वारे भागवण्यात येत आहे.

अधुनमधुन अवकाळी पावसाचा फटका जिल्ह्याला बसला तरी त्यामुळे पाणीसाठ्यात भर पडली नाही. जायकवाडी धरण असलेल्या पैठण तालुक्यातील १३५ गावांमध्ये तीव्र पाणीटंचाई असून, तेथे १५८ टँकरद्वारे पाणीपुवठा करण्यात येत आहे. वैजापूर तालुक्यातील १०९ गावांसाठी १५६ तर, गंगापूर तालुक्यात सर्वाधिक १२० गावांसाठी सर्वाधिक १६६ टँकर सुरू आहेत. तीव्र पाणीटंचाईमुळे प्रशासनाकडून साडेचारशे विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. यामध्ये औरंगाबाद तालुक्यात ३४, फुलंब्री ३६, पैठण ३, गंगापूर ८६, वैजापूर १२८, खुलताबाद २३, कन्नड ५९, सिल्लोड ७६, सोयगाव तालुक्यात ७ खाजगी विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. यातील २५८ विंधन विहीरींचे पाणी टँकर भरण्यासाठी वापरण्यात येत आहे.

जिल्ह्यात पाणीटंचाईची परिस्थिती
तालुका........गावे....लोकसंख्या.....टँकर
औरंगाबाद.....४७.....१९०९५६.........७२
फुलंब्री..........१६......३६९५९...........२२
पैठण...........१३५....२१५८९५..........१५८
गंगापूर........१२०.....२५६६७३.........१६६
वैजापूर........१०९.....२०२८७१.........१५६
खुलताबाद.....१३......२२२५५...........१३
कन्नड..........२५......३४५०१...........२४
सिल्लोड.......३५......८०२४७............४८
सोयगाव.......०१......९०००.............२
एकूण..........५०१.....१०४९३५७.......६६१

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गुन्हा नोंदविण्यास पोलिसांचा नकार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, उस्मानाबाद
तुळजापूर तालुक्यातील गुळहळ्ळी ग्रामीण पाणीपुरवठा योजनेतील अनियमीतता प्रकरणी गुन्हा दाखल करून घेणया नळदुर्ग पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी असमर्थता दर्शवली आहे, अशी माहिती उस्मानाबाद ‌जिल्हा परिषदेचे सीईओ आनंद रायते यांनी 'मटा'शी बोलताना दिली.
लेखा परीक्षण झाल्यानंतरच एफआयआर दाखल केला जाईल अशी भूमिका नळदुर्ग पोलिसांनी घेतली आहे. गुळहळ्ळी ग्रामीण पाणीपुरवठा योजनेतील अनियमीतता झाल्याचे व हे काम २००८ सालापासून रखडल्याचे सिद्ध झाले आहे. या योजनेतील भली मोठी रक्कम हडप झाल्याचे शिवाय हे काम २००८ पासून रखडल्याचे सिद्ध झाले आहे. येथील कामाची शासनाच्या गुणवत्ता विभागाकडून पडताळणी करण्यात आली आहे. या कामात अनियमीतता झाली असल्याचा अहवाल प्रशासनाला दिला आहे.
जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा योजनेचे कार्यकारी अभियंता यांनी ही या कामात अनियमीतता झाली असल्याचा व कामे अपूर्ण राहिला असल्याचा अहवाल उस्मानाबाद ‌जिल्हा परिषदेचे सीईओ आंनद रायते यांच्याकडे दिला आहे. भाजप नेते सचिन घोडके यांनी या प्रकरणी ग्रामसेवक बसवराज घोगरे, सरपंच अर्चना बोडके, राम हलकंबे व छाया काळुंके यांना दोषी ठरवून कारवाई करण्याची मागणी लावून धरली. यासाठी त्यांनी शासनाचेही दरवाजे ठोठावले.
यानंतर याप्रकरणी संबधितावर कारवाई करण्याचे आदेश कार्यकारी अभियंता देवकर यांनी गटविकास अधिकारी विकास ‌खिल्लारे यांनी दिले. २००८ पासून गुळहळ्ळी येथील ग्रामीण पाणीपुरवठा योजनेचे काम रखडले आहे. या योजनेचर १७ लाख रुपये खर्च करूनही या योजनेचा लाभ ग्रामस्‍थांना मिळालेला ना‌ही. यामधील काही कामे आदृष्य स्वरूपातच आहेत. परिणामी येथील जनतेला सध्या तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे.


गुळहळ्ळी ग्रामीण पाणीपुरवठा योजनेचे दफ्तर येथील ग्रामपंचायतीने लंपास केले आहे. त्यामुळे या कामाचे लेखापरीक्षण करता येत ना‌ही. सकृतदर्शनी या कामात भ्रष्टाचार झाल्याचे स्पष्टपणे दिसून येते. तरी देखील पोलिसांना लेखा परीक्षणाची गरज आहे. गुन्हा नोंदविण्यास नळदुर्गचे पोलिस अधिकारी दबावापोटी टाळाटाळ करीत आहेत.
आनंद रायते, सीईओ, ‌जिल्हा परिषद, उस्मानाबाद

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


जायकवाडी कालव्यातून आज पाणी बंद करणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पैठण

जायकवाडी धरणाच्या उजव्या कालव्यातून गुरुवारी पाण्याच्या विसर्ग बंद करण्यात येणार आहे. गेल्या १९ दिवसांत प्रकल्पातून सुमारे २३ दशलक्ष घनमीटर पाणी सोडण्यात आले.

औरंगाबाद, परभणी व जालना जिल्ह्यातील गोदावरी नदीवर बांधलेले बंधारे व जायकवाडीच्या कालव्या शेजारील गावांतील पाण्याची टंचाई दूर करण्यासाठी धरणातून कालव्याद्वारे १.४४ अब्ज घनफूट (टीएमसी) पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला होता. एक ते दहा मार्चदरम्यान जायकवाडीच्या डाव्या कालव्यातून पाण्याचा विसर्ग करण्यात आला होता.

शहागड बंधारा व हिरडपुरी बंधाऱ्यात पाणी सोडण्यासाठी २६ मार्चपासून जायकवाडी धरणाच्या उजव्या कालव्यातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला होता. या कालव्यातून जवळपास १९ दिवस ३०० क्युसेक्स पाणी सोडण्यात आले. या कालावधीत सुमारे २३ दशलक्ष घनमीटर (०. ८१ टीएमसी) पाण्याचा विसर्ग करण्यात आल्याची माहिती शाखा अभियंता अशोक चव्हाण यांनी दिली. ठरलेल्या पाण्याचा विसर्ग केल्यावर गुरुवारी जायकवाडी धरणाच्या उजव्या कालव्यातून पाण्याचा विसर्ग बंद करण्यात येणार असल्याचीही माहिती शाखा अभियंता चव्हाण यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मराठवाड्यात खोल खोल पाणी

$
0
0

म. टा. विशेष प्रतिनिधी, औरंगाबाद

गेल्या तीन वर्षांत पावसाने पाठ फिरविल्याने भूगर्भातून पाण्याचा बेसुमार उपसा सुरू अाहे. परिणामी मराठवाड्यातील सर्व तालुक्यांत भूजलाची पातळी घसरली आहेत. विभागात ७६पैकी ५६ तालुक्यांतील पातळीत गेल्या पाच वर्षांच्या तुलनेत दोन मीटरपेक्षा जास्त घसरण झाली आहे. त्यात लातूर, उसामानाबाद व बीड जिल्ह्यांतल सर्व तालुक्यांचा समावेश आहे.

भूजल सर्वेक्षण विभागाने मार्च महिन्यात मराठवाड्यातील ७४८ निरीक्षण विहिरींत भूजल पातळीची तपासणी केली. मराठवाड्यातील सर्वच तालुक्यांत भूजल पातळीत घसरण झाल्याचे समोर आले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत ही स्थिती अत्यंत गंभीर आहे. मार्च २०१५मध्ये केलेल्या पाहणीत विभागातील ६९ तालुक्यांत गेल्या पाच वर्षांच्या सरासरी पातळीच्या तुलनेत भूजल पातळी घटली होती. त्यात ५३ तालुक्यांतील पातळीत दोन मीटरपर्यंत घट झाली होती. १६ तालुक्यांतील भूजल पातळी दोन मीटरपेक्षा जास्त खालावली होती. त्याचबरोबर सात तालुक्यांत पातळीत वाढ झाल्याचे निरीक्षण नोंदविण्यात आले होते.

संपूर्ण मराठवाडा दुष्काळग्रस्त आहे. दुष्काळाची तीव्रता लातूर, बीड व उस्मानाबाद जिल्ह्यांत सर्वाधिक आहे. या जिल्ह्यांतील सर्व, २७ तालुक्यांतील भूजलाची पातळी दोन मीटरपेक्षा जास्त खोल गेली आहे. लातूर जिल्ह्यातील जळकोट तालुक्यातील भूजल पातळीत तब्बल ७.७ मीटरने खोल गेली आहे.

विभागात २५ तालुक्यांतील भूजलाची पातळी तीन मीटरपेक्षा जास्त खोल गेली आहे. त्यात बीड व उस्मानाबाद जिल्ह्यांतील प्रत्येकी सात तालुक्यांचा समावेश आहे. परभणी जिल्ह्यातील तीन, औरंगाबाद जिल्ह्यातील दोन, हिंगोली व नांदेड जिल्ह्यातील प्रत्येकी एका तालुक्यातील भूजल पातळी तीन मीटरपेक्षा जास्त खोल गेली आहे. लातूर जिल्ह्यातील जळकोट पाठोपाठ बीड परभणी जिल्ह्यातील पूर्ण तालुक्यात भूजल पातळीत तब्बल ७.४५ मीटरची घट नोंदविण्यात आली आहे.

औरंगाबाद जिल्ह्यात वैजापूर तालुक्यात भूजलात ४.०५ मीटर घट झाली आहे. त्याचबरोबर सोयगाव तालुक्यात ३.२३ मीटर घट नोंदविली. जालना जिल्ह्यात एकाही तालुक्यातील भूजलाची पातळी तीन मीटरपेक्षा जास्त घट झाली नाही. परभणी जिल्ह्यात परभणी, पूर्णा, सेलू तालुक्यांत, हिंगोली जिल्ह्यातील वसमत, नांदेड जिल्ह्यातील मुखेड, उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर, भूम, लोहारा, वाशी या तालुक्यांत भूजल पातळीत तीन मीटरपेक्षा जास्त घट झाली आहे. लातूर जिल्ह्यात लातूर, उदगीर, देवणी, अहमदपूर, शिरूर, चाकूर तालुक्यांत, बीड जिल्ह्यातील बीड, पाटोदा, शिरूर, आष्टी, वडवणी, केज, परळी या तालुक्यांत भूजल पातळीत तीन मीटरपेक्षा जास्त घट झाली आहे.

तीन तालुके समाधानकारक

यावर्षी मराठवाड्यातील केवळ तीन तालुक्यांत भूजल पातळीत एक मीटरपेक्षा कमी घट झाल्याची नोंद आहे. त्यात औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड (-०.६८ मीटर), जालना जिल्ह्यातील जाफराबाद (०.९९) आणि नांदेड जिल्ह्यातील माहूर (०.७८ मीटर) या तालुक्यांचा समावेश आहे.

गेल्यावर्षीच्या तुलनेत स्थिती गंभीर

मराठवाड्यातील भूजल पातळीची स्थिती गेल्या वर्षीच्या तुलनेत गंभीर आहे. विभागात मार्च २०१५मध्ये ६९ तालुक्यांतील भूजल पातळीत घट झाली होती. त्याचबरोबर सात तालुक्यांत पातळीत वाढ झाली होती. गेल्यावर्षी भूजल पातळीत दोन मीटपर्यंत घट झाली होती. केवळ १६ तालुक्यांत भूजल पातळीत दोन मीटरपेक्षा जास्त घट झाल्याची नोंद होती. गेल्यावर्षी परभणी, नांदेड जिल्ह्यांतील तालुक्यांची स्थिती तुलनेत गंभीर होती. गेल्यावर्षी मराठवाड्यात अवकाळी फेब्रावारी, मार्च महिन्यांत पावसाने हजेरी लावली होती. त्यामुळए भूजलाची स्थिती सुधारली होती. औरंगाबाद जिल्ह्यातील चार आणि बीड जिल्ह्यातील तीन तालुक्यांत भूगर्भातील पाणीतापळीत वाढ झाली होती.

भूजल पातळीत घट झालेले तालुके

पाणीपातळी......मार्च २०१५.....मार्च २०१६ १ मीटरपर्यंत...........२३...............०३ १ ते २ मीटर..........३०...............१७ २ ते ३ मीटर..........०७...............३१ ३ मीटरपेक्षा जास्त..०९...............२५ पातळीत वाढ..........०७.................०० (पाणीपातळीच्या नोंदी गेल्या पाच वर्षांच्या सरासरीच्या तुलनेत)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लातुरात पोहचली तिसरी पाणी एक्स्प्रेस

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त । मुंबई

भीषण दुष्काळ आणि पाणीटंचाईने होरपळलेल्या लातूरमध्ये आज तिसरी पाणी एक्स्प्रेस पोहोचली. यामुळे लातुरकारांना आणखी ५ लाख लिटर पाणी मिळाले आहे.

दुष्काळग्रस्त लातुरकरांची तहान भागवण्यासाठी मंगळवारी आणि बुधवारी प्रत्येकी ५ लाख लिटर पाणी असलेली एक्स्प्रेस पाठवण्यात आली होती. त्यानंतर आज सकाळी १०.४५ वाजता मिरजहून रवाना केलेली तिसरी पाणी एक्स्प्रेस लातूरमध्ये पोहोचली. या एक्स्प्रेसमधून ५ लाख लिटर पाणी लातुरकरांना मिळाले आहे. आतापर्यंत लातूरमध्ये रेल्वेने १५ लाख लिटर पाणी पोहोचवण्यात आले आहे.

सध्या रेल्वेच्या फलाटावर पाणी भरण्यात येत आहे. मिरज स्थानकावर रेल्वेच्या जलशुद्धीकरण केंद्रापासून यार्डापर्यंत नवीन जलवाहिनी टाकण्याचे काम सुरू आहे. ते काम लवकरच पूर्ण होईल. जलवाहिनीचे काम पूर्ण झाल्यानंतर रविवारपासून एक्स्प्रेसला पाण्याचे ५० वॅगन जोडण्यात येणार आहेत, अशी माहिती रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी ट्विटद्वारे दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पूर्णा-नेवपूर धरणाच्या परिसरात वीज तोडली

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कन्नड
करंजखेड, चिंचोली गटातील गावांसाठी सिंचन व पिण्याचे पाणी पुरविणाऱ्या पूर्णा-नेवपूर प्रकल्पातून पाण्याचा बेकायदा उपसा सुरू होता. त्यामुळे करंजखेड रेवूळगाव, पाबळवाडी परिसरातील कृषिपंपाचा वीजपुरवठा तोडण्यात आला आहे. तहसीलदार महेश सुधळकर यांच्या आदेशानंतर जलसंपदा, महावितरणच्या पथकाने सोमवारी व मंगळवारी ही कारवाई केली.

सोमवारी दोन आणि मंगळवारी पाच डीपींवरील वीजपुरवठा तोडला. तेथून सुमारे ४५ कृषिपंपाच्या माध्यमातून अवैध पाणी उपसा होत असल्याची माहिती शाखा अभियंता के. जे. गोरे यांनी दिली. उन्हाळ्याची तीव्रता वाढत आहे. त्याचबरोबर प्रकल्पातील पाणीपातळी कमी होत आहे. त्यामुळे तालुक्यातील सर्वच प्रकल्पांतील पाणी पिण्यासाठी राखीव ठेवण्यात आले आहे.

दरम्यान, ही कारवाई थांबवण्यासाठी काही राजकीय पदाधिकाऱ्यांनी खोडा घातला होता, परंतु तहसीलदार सुधळकर यांनी संबंधित पदाधिकारी व शेतकऱ्यांचे यांना परिस्थितीचेगांभीर्य सांगितले.

शाखा अभियंता गोरे यांच्यासह डी. एम. तायडे, एम. के. जाधव, महावितरणच्या कनिष्ठ अभियंता श्रीमती स्वामी, आबा सपकाळ, रामराव पाटील, बबन देशमुख, अमोल पाचपुळे, अशोक लोखंडे आदींनी पोलिस बंदोबस्तात ही कारवाई केली.

पोलिस बंदोबस्तात ही कारवाई करून सुमारे ५० ते ६० अवैध कृषिपंपाचा वीजपुरवठा खंडित केला आहे. या डीपीवरील बुडित क्षेत्राबाहेरील पंपाचा वीजपुरवठा सर्व्हिस वायरच्या माध्यमातून पूर्ववत ठेवण्यात आला आहे.
- के. जे. गोरे, शाखा अभियंता पूर्णा-नेवपूर प्रकल्प.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जलसंधारणाच्या कामांसाठी संघ सरसवला

$
0
0

फेरभरण, नद्या विस्तारीकरण, तलाव खोलीकरणाची कामे
Dhananjay.Kulkarni@timesgroup.com
औरंगाबाद : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा ग्रामविकास विभाग पाणी टंचाईवर मात करण्यासाठी पुढे सरसावला आहे. औरंगाबाद जिल्ह्यासह जालना, अंबड, घनसावंगी, बदनापूर या तालुक्यांमध्ये नद्यांचे रुंदीकरण, तलावांचे खोलीकरण आणि विहिरी फेरभरणाची तयारी आदी कामे संघाने केली आहेत. ही कामे औरंगाबाद, जालना जिल्ह्यातील २० गावांमध्ये ही कामे करण्यात आली आहेत.

संघाच्या प्रभातग्राम आणि उदयग्राम याअंतर्गत ग्रामविकासाची कामे केली जात आहेत. गावांचा विकास लोकसहभागातून आणि स्वयंस्फूर्तीने करण्यासाठी चालना देण्याचे काम संघाचा ग्रामविकास विभाग करत आहे. सर्व ठिकाणी जलसंधारणाची कामे केली आहेत. औरंगाबाद जिल्ह्यातील जयपूर, कुबेर गेवराई, लोहगड नांद्रा, सोबल गाव, चिमणपूरवाडी, भोकनगाव, मोलखेडा या गावांतही संघाने कामे केली आहेत.

रा. स्व. संघाच्या ग्रामविकास विभागाचे प्रांतसहसंयोजक जोतिबा कानडे व प्रचारक (ग्रामविकास) विनय कानडे मेहनत घेत आहेत. जलसंधारण, पाणलोट, सिंचन, ग्रामगरजेनुसार पाण्याच्या टाक्या देणे, शुद्धजल प्रकल्प उभारणे, तळ्यांतील गाळ काढणे आदी कामांवर भर दिल्याचे विनय कानडे यांनी 'महाराष्ट्र टाइम्स'शी बोलताना सांगितले. सर्व ठिकाणी शिरपूर पॅटर्ननद्वारे नाल्यांचे रुंदीकरण-खोलीकरण करण्यात आले. जलसंधारणाच्या कामांत १३० महिला-पुरुषांकडून १५०० खड्ड्यांची निर्मिती करण्यात आली. सहा महिन्यांपूर्वीच याचे नियोजन करण्यात आले होते, अशीही माहिती त्यांनी दिली.

घनसावंगीत तालुक्यातील दडीगव्हाण येथे शिरपूर पॅटर्नने काम करण्यात आले. काही दिवसांपूर्वी तेथे अवकाळी पावसाने हजेरी लावली. गावात केलेल्या बंधाऱ्यात अवकाळी पावसाचे पाणीही साठले आहे. त्याचा या परिसराला लाभ होणार आहे.

निधींची कमतरता पूर्ण केली कंपन्यांनी
संघाची सर्व कामे लोकसहभाग, ग्रामपंचायत आणि विविध कंपन्यांच्या मदतीने झाली आहेत. कंपन्यांनी काही गावांमध्ये त्यांचा 'सीएसआर अॅक्टिव्हिटी'चा निधी वापरला असल्याचेही विनय कानडे यांनी सांगितले. लाखो रुपये खर्च करून कोट्यावधी लिटर पाण्याचे नियोजन या कामांमुळे होणार आहे. याशिवाय या वीसपैकी काही गावांमध्ये पाण्याच्या टाक्यांचे वाटपही करण्यात आले आहे.

या गावांमध्ये केली कामे
नांदेडा आणि आंबेगाव (औरंगाबाद तालुका), पाडळी, केळीगव्हाण, मासेवाडी, नजिकपगारी (जालना तालुका), थोटे पिंपळगाव, मासेवाडी (बदनापूर तालुका), वाघलखेडा, शेवगा, अंबड शहर (अंबड तालुका), दडीगव्हाण, मांडळा, दुधपुरी, खडका, देवहिवरा, पिंपळखेडा, वडीगव्हाण, घनसावंगी (घनसावंगी तालुका).

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images