Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

नहरीच्या संवर्धनासाठी पैसे आणायचे कोठून?

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
ऐतिहासिक नहर-ए-अंबरीच्या संवर्धनासाठी पावणेअकरा कोटी रुपये लागणार आहेत. हा पैसा आणायचा कोठून, असा प्रश्न पालिकेच्या प्रशासनासमोर निर्माण झाला आहे. निधीशिवाय नहर-ए-अंबरीचे संवर्धन करणे शक्यच नाही आणि महापालिका एवढा निधी उपलब्ध करून देऊ शकत नाही, अशी परिस्थिती आहे.

नहर-ए-अंबरीचे पर्यटकांच्या दृष्टीने संवर्धन झाले पाहिजे, यासाठी विभागीय आयुक्त उमाकांत दांगड यांच्या उपस्थितीत वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीला पालिकेचे आयुक्त ओमप्रकाश बकोरिया देखील उपस्थित होते. नहरीच्या संवर्धनाची जबाबदारी महापालिकेवर टाकण्यात आली. त्याचे काय नियोजन आहे, असे पत्रकारांनी बकोरिया यांना विचारले असता ते म्हणाले, 'नहर ही त्या काळातील अभियांत्रिकी आणि स्थापत्यशास्त्राचे उत्तम उदाहरण आहे. आता या नहरींपासून जास्त पाणी मिळणे शक्य नाही, परंतु औरंगाबादेत येणाऱ्या पर्यटकांना नहर म्हणजे काय, नहरींची निर्मिती कशी झाली होती, कोणते तंत्रज्ञान वापरले गेले, याची माहिती व्हावी यासाठी नहरीचे संवर्धन करण्याचे ठरले आहे, पण त्यासाठी १० कोटी ७५ लाख रुपयांचा खर्च होणार आहे. एवढा निधी महापालिका उपलब्ध करून देऊ शकत नाही. हा निधी कोण देणार, असा प्रश्न आहे.'राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या पर्यटन विभागाला या संदर्भात प्रस्ताव पाठवून निधी साठी मागणी करण्याचा पालिकेचा विचार आहे, असेही त्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पत्नी घर सोडून गेल्याने आत्महत्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी वाळूज
भांडणानंतर पत्नी घर सोडून गेल्यामुळे निराश झालेल्या एका तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी दुपारी १२ वाजता उघडकीस आली. दोन दिवसांपासून घराचा दरवाजा बंद असल्याने दुर्गंधी सुटल्याने शेजाऱ्यांनी पोलिसांना माहिती दिल्यानंतर ही घटना उघडकीस आली.
जोगेश्वरी ग्रुपग्रामपंचायत क्षेत्रातील ओम साईनगर वार्ड क्रमांक चारमध्ये बाळासाहेब आव्हाळे यांच्या एका खोलीमध्ये आठ दिवसांपूर्वी सुभाष दत्तू सांगुळे (वय २७, मूळगाव कोडीकारला जि. जालना) हे पत्नी व दीड वर्षाच्या मुलीसह राहण्यासाठी आला होता. या नवरा-बायकोमध्ये शनिवारी कौटुंबिक कारणातून भांडण झाले. त्यामुळे रागावलेली पत्नी मुलीला घेऊन रांजणगाव शेणपुंजी येथील शिवनेरी कॉलनीमध्ये राहणाऱ्या आई-वडिलांकडे गेली. दुसऱ्या दिवशी सुभाष सांगुळे हे पत्नीची समजूत काढून परत आणण्यासाठी सासरी केले. पण, ते एकटेच परतले. याबद्दल त्यांनी मोठा भाऊ विष्णू सांगुळे यांना फोन करून कळवले होते. त्यानंतर सुभाष यांनी घरी परतल्यानंतर पंख्याला नायलॉन दोरी बांधून गळफास घेतला.
सुभाष यांचा मृतदेह दोन दिवसांपासून तो लटकून राहिल्याने घरातून उग्र वास सुटला. त्यामुळे शेजाऱ्यांनी खिडकीतून पाहिले असता हा प्रकार लक्षात आला. याची माहिती तत्काळ एमआयडीसी पोलिस ठाण्याला देण्यात आली. पोलिस हेडकॉन्स्टेबल मिलिंद पठारे, पोलिस नाईक किशोर मुळवंडे, सोनाजी बुट्टे यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. नागरिकांच्या मदतीने दरवाजा तोडून पंख्याला लटकलेला मृतदेह काढून घाटी हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आला. याप्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
सुभाष सांगुळे हे काही दिवसांपूर्वी रांजणगाव शेणपुंजी येथील शिवनेरी कॉलनीत रमेश सोनवणे यांच्या घरात भाडेकरू होते. धुलीवंदनाच्या दिवशी घर मालकांने विनयभंग केल्याची तक्रार सांगुळे यांच्या पत्नीने २५ मार्च रोजी दाखल केली होती. पण, घरमालक व पत्नीचे अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून त्यांनी आठ दिवसापूर्वी घर बदलले होते. याच कारणावरून दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले, त्यातून आलेल्या नैराश्यातून सुभाष याने आत्महत्या केल्याचा आरोप भाऊ विष्णू सांगुळे याने केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जनावरांच्या बाजारात किंमतीचा दुष्काळ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, फुलंब्री

केवळ तालुक्यातच नव्हे तर, जिल्ह्यात प्रसिद्ध असलेल्या वडोदबाजार येथील जनावरांच्या बाजारावर दुष्काळामुळे मंदीचे सावट पसरले आहे. चारा आणि पाणी टंचाईमुळे जनावरांची मातीमोल भावाने विक्री होत असल्याचे विदारक दृश्य दिसून आले आहे.
तालुक्यातील वडोदबाजार येथे दर सोमवारी जनावरांचा बाजार भरतो. वडोदबाजारचा दर सोमवारी भरत असलेला हा आठवडी बाजार पशुधनाच्या खरेदी विक्रीसाठी प्रसिद्ध आहे. फुलंब्री तालुका हा दुष्काळग्रस्त घोषित झालेला असताना दुष्काळाच्या झळा या जनावरांच्या बाजाराला बसलेल्या दिसत आहे. यामुळे संपूर्ण बाजारावर मंदीचे सावट असल्याने शेचकऱ्यांना पशुधनाची मातीमोल किंमतीत विक्री करावी लागत आहे. या ठिकाणी बैल, म्हशी, गाय, शेळ्या आदींची फार मोठ्या प्रमाणावर विक्री होते. या जनावरांच्या खरेदी-विक्रीत दर आठवड्याला लाखोची उलाढाल होत असते. ग्रामीण भागात शेतकरी शेतीसाठी आवश्यक बैलजोडी तसेच पशुपालक गायी, म्हशी, शेळ्या यासारख्या प्राण्यांची खरेदी करतात. यामध्ये विविध प्रकारच्या बैलजोड्या येतात. त्यामध्ये गावरान, पंढरपुरी, माळवी, खिल्लार अशा विविध जातीच्या बैलजोड्या विक्रीसाठी येतात. एका बैलजोडीची किंमत ६० ते ७० हजार रुपयापर्यंत असते. मात्र, आता या बैलजोडीची किंमत ३५ ते ४० हजार रुपयांवर आली आहे. त्यातच यंदा आधीच दुष्काळी परिस्थीती व पाणीटंचाई व यामुळे शेतकऱ्यांना आपल्या जनावरांची मातीमोल किंमतीत विक्री करावी लागत आहे.
तालुक्यातील काही भागात अगोदरच पाण्याची समस्या बिकट झालेली आहे. जलस्त्रोत आटत असल्याने जनावरांच्या बाजारातही पाण्याची समस्या जाणवत होती. तसेच शेतात फारसे काही न पिकल्याने चारा टंचाईची समस्या निर्माण झाली आहे.

मी माझी बैलजोडी मागीलवर्षी ७० हजार रुपयात खरेदी केली होती. परंतु, चारा-पाणी उपलब्ध नसल्यामुळे येथील बाजारात विक्रीसाठी आणली. त्यांना ३५ हजार रुपये किंमत लागली. या किंमतीत विकणे परवडत नसल्याने परत घेऊन जात आहे.
- संतु चंद्रे, शेतकरी

दुष्काळामुळे शेतकरी जनावरे खरेदीसाठी येत नाहीत, तर विक्रीसाठी येत आहेत. माझा व्यवसाय हा खरेदी-विक्री करणे हा आहे. परंतु, विक्री होत नसल्याने बऱ्याचदा तोटा सहन करावा लागतो.
- शेख सादिक शेख हाजी, व्यापारी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

साखर कारखान्यांना बंदी?

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
मराठवाड्यामध्ये चार वर्षांपासून पडणाऱ्या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर, पाच वर्षे नव्या साखर कारखान्यांवर बंदी घालण्याचा विचार राज्य सरकार करत आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील कोअर कमिटीच्या बैठकीमध्ये कारखान्यांच्या बंदीवर चर्चा करण्यात आली. दुष्काळामध्ये मराठवाड्यामध्ये तीव्र पाणीटंचाई असून, लातूरसारख्या शहराला रेल्वेने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. राज्यामध्ये २०२ साखर कारखाने असून, देशातील साखर उत्पादनामध्ये राज्याचा वाटा ३२ टक्के आहे. राज्यातील साखर कारखान्यांपैकी ४० टक्के कारखाने मराठवाड्यामध्ये आहेत. त्यामुळेच, मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांमध्ये नव्या साखर कारखान्यांना बंदी घालण्याची मागणी पुढे येत आहे. ज्येष्ठ जलतज्ज्ञ माधव चितळे यांच्या अध्यक्षतेखालील समितीनेही ऊसाला प्रचंड पाणी लागत असल्याकडे अहवालामध्ये लक्ष वेधले होते. तसेच, ७०० मिलिमीटरपेक्षा कमी पाऊस असणाऱ्या विभागामध्ये उसाला परवानगी देऊ नये, असेही त्यांनी म्हटले होते.

यासंदर्भात आमदार सांदिपान भुमरे म्हणाले, 'सध्या दुष्काळाची परिस्थिती असून, पाणी उपलब्ध नाही. त्यामुळे मराठवाड्यामध्ये नवीन साखर कारखान्यांना परवानगी न देण्याचा निर्णय सरकार घेत आहे, तो योग्य आहे. मराठवाड्यातील सध्याच्या कारखान्यांना राज्य शासनाने मदत केली पाहिजे. सध्या अस्तित्वात असणारे कारखाने टिकावेत, यासाठी सरकारने योजना आखली पाहिजे.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दोन महिलांचा डोहात बुडून मृत्यू

$
0
0

औरंगाबाद ः मगरसावंगी (ता. मानवत, जि. परभणी) येथे मंगळवारी (१९ एप्रिल) नदीपात्रात कपडे धुण्यासाठी गेलेल्या दोन महिलांचा डोहात बुडून मृत्यू झाला. त्या गावात पाहुण्या म्हणून आल्या होत्या. या घटनेने गावात शोककळा पसरली. मगरसावंगी गावातून वाहणाऱ्या दुधना नदीच्या पात्रात गायकवाड कुटुंबातील चार महिला मंगळवारी दुपारी कपडे धुण्यासाठी गेल्या होत्या. सेलू येथील निम्म दुधना प्रकल्पातून त्याचवेळी पाणी सोडण्यात आले होते. पाण्याचा अंदाज न आल्यामुळे चौघी संकटात सापडल्या. पाण्याचा जोर अधिक असल्याने सुरेखा बाबासाहेब गायकवाड (वय १७) आणि सुमित्रा दत्ता गायकवाड (वय २७) यांचा बुडून मृत्यू झाला. नात्याने त्या नणंद-भावजय होत्या. पार्वती गायकवाड व आश्रुबाई गायकवाड यांना वाचवण्यास यश आले. त्यांच्यावर हॉस्पिटल उपचार सुरू असून, त्यांची प्रकृती चांगली आहे. पाहुण्या म्हणून त्या आल्या होत्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘समांतर’च्या कामात अद्याप प्रगती नाही

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
समांतर जलवाहिनीच्या कामात कोणत्याही प्रकारची प्रगती झालेली नाही. कंपनीचे काम मंद गतीनेच सुरू आहे, असे मत महापालिकेचे आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांनी व्यक्त केले. यासंदर्भात कंपनीला नोटीस बजावलेली आहे. नोटीसचे उत्तर अद्याप प्राप्त झालेले नाही. त्यांनी उत्तर दिल्यास ते सर्वसाधारण सभेत ठेवले जाईल, अशी माहितीही त्यांनी दिली.

समांतर जलवाहिनीच्या कामाचा आढावा घेण्यासाठी बकोरिया यांनी महापालिकेचे अधिकारी आणि कंपनीचे अधिकारी यांची दोन दिवसांपूर्वी बैठक घेतली. जलवाहिनीच्या कामात काहीच प्रगती नसल्याबद्दल त्यांनी या बैठकीत नाराजी व्यक्त केली. कामात गती आणण्यासाठी त्यांनी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.

सोमवारी पत्रकारांनी बकोरिया यांना या बैठकीसंदर्भात विचारले असता ते म्हणाले, 'कंपनीकडून करण्यात येत असलेले जलवाहिनीचे काम समाधानकारक नाहीच. कामात प्रगती नाही. नक्षत्रवाडीपर्यंत कंपनीने 'बल्क वॉटर' आणणे अपेक्षित होते, पण हे काम झालेले नाही. शासनाच्या आदेशानुसार महापालिकेने कंपनीला नोटीस बजावली आहे, परंतु कंपनीने अद्याप उत्तर दिले नाही. उत्तर देण्यासाठीची मुदत बुधवारी संपत आहे. कंपनीने उत्तर दिल्यास ते सर्वसाधारण सभेसमोर ठेवले जाणार आहे. सर्वसाधारण सभा त्यावर निर्णय घेईल.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बालिकेचा मृतदेह घेऊन मागत होते भीक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
दिल्लीगेट येथे भर दुपारी तीन वर्षांच्या कुपोषीत चिमुकलीचे कलेवर कडेवर घेत भीक मागणाऱ्या टोळीला पोलिसांनी मंगळवारी ताब्यात घेतले. दामिनी पथकाच्या सतर्कतेने हा प्रकार उघड झाला. घाटी ‌हॉस्पिटलमध्ये या चिमुकलीला मृत घोषित करण्यात आले असून, तिचे पोस्टमार्टम करण्यात आले. तिच्या आई-वडिलासंह चार जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. याप्रकरणी बेगमपुरा पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पोस्टमार्टेमच्या अहवालानंतर पुढील कारवाई करण्यात येणार आहे.

दामिनी पथक मंगळवारी दुपारी दिल्लीगेट भागात गस्त घालीत होते. यावेळी त्यांना भर उन्हात एक महिला चादरीमध्ये मुलीला गुंडाळून भीक मागताना आढळून आली. यावेळी अनेक नागरिक तेथे जमा झाले होते. पथकाला संशय आल्याने त्यांनी महिलेची चौकशी केली. यावेळी त‌िच्या चादरीमधील कुपोषित बालिका बेशुद्धावस्थेत आढळून आली. तिची नाडी तपासली असता कोणतीही हालचाल जाणवत नव्हती. हा प्रकार संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी मृत बालिका आमरी, तिची आई सुरेशी देवी, वडील राजू बागरी (रा. हल्ली मुक्काम ए.एस. क्लबजवळ, पंढरपूर, मूळ रा. सांगोद, जि. कोटा, राजस्थान) यांच्यासह काका राकेश व त्याची पत्नी रुक्मनीसह पाच बालकांना ताब्यात घेतले. या बालिकेला घाटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. यावेळी डॉक्टरांनी तिला तपासून मृत घोषित केले. ही बालिका अत्यंत कुपोषित बालिका होती. यानंतर तिचे पोस्टमार्टेम करण्याचा निर्णय डॉक्टरांनी घेतला.

याप्रकरणी बेगमपुरा पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दामिनी पथकाच्या पीएसआय अरुणा घुले, स्वाती बनसोड, पी. आर. शहाणे, परवीन पठाण यांच्या पथकामुळे हा प्रकार उघड झाला.

रक्ताचे नमुने घेतले; अहवालाची प्रतिक्षा
घाटी ‌हॉस्पिटलमध्ये आमरीच्या मृतदेहाचे पोस्टमार्टम करण्यात आले. त्याच्या अहवालाची प्रतीक्षा पोलिसांना आहे; तसेच मृत आमरीच्या रक्ताचे नमुने डॉक्टरांनी घेतले आहेत. ही मुलगी सुरेशीदेवी व राजू या दाम्पत्याचीच आहे का, याचीही तपासणी पोलिस करणार आहेत. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या बागरी कुटुंबसोबत आणखी तीन बालके होती. बेगमपुरा पोलिसांनी त्यांची रवानगी बाल कल्याण समितीकडे केली आहे.

मृत बालिकेचे शवविच्छेदन करण्यात आले आहे. त्याच्या अहवालाची प्रतिक्षा पोलिसांना आहे. या अहवालात काही संशयास्पद आढळून आल्यास मुलीच्या आई-वडिलांवर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. बालिकेच्या रक्ताचे नमुने देखील घेण्यात आले आहेत.
- मधुकर सावंत, प्रभारी पोलिस निरीक्षक, बेगमपुरा पोलिस ठाणे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आझाद चौकात आगीचे तांडव

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
आझाद चौकात असलेल्या फर्निचर; तसेच लाकडी स्क्रॅपच्या दुकानांना पहाटे दोनच्या सुमारास आग लागून सात दुकाने भस्मसात झाली. या आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाले. अग्निशमन दलाच्या बंबांनी सकाळपर्यंत पाण्याचा मारा करून आग आटोक्यात आणल्यामुळे आसपासच्या वसाहती सुरक्षित राहिल्या.

रात्रीच्या वेळी वाऱ्यामुळे ही आग अधिकच भडकली. या आगीत दुकानांमधील फर्निचर, देवदार आणि सागवानचे लाकूड; अन्य सामान जळून खाक झाले. या आगीत लाखोंचे नुकसान झाल्याची माहिती दुकानादारांनी दिली. सात वर्षांपूर्वी अशीच भीषण आग लागून या भागातील दुकाने भस्मसात झाली होती. कालच्या आगीत दुकानदारांचे सर्वस्व जळून खाक झाले.

मंगळवारी पहाटे दोनच्या सुमारास फर्निचरच्या दुकानांपैकी एकाला आग लागली होती. वाऱ्यामुळे काही वेळेतच आगीने आसपासची दुकाने कवेत घेतली. बघता बघता सर्व दुकाने आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. आग विझविण्यासाठी आसपासच्या लोकांनीही धाव घेतली. दुकानांच्या मागे राहणाऱ्या लोकांनी बादल्यांनी घरातील पाणी आणून ही आग विझविण्याचा प्रयत्न केला, तर काही नागरिकांनी टँकर बोलावून घेतले. स्थानिक लोकांनी अग्निशामक दलाला आगीची माहिती दिली. अग्निशामक बंब तत्काळ घटनास्थळी पोहोचले, परंतु वारंवार वाऱ्याची दिशा बदलत असल्यामुळे आगीचे तांडवही वाढत गेले. आगीने रौद्ररूप धारण केल्याने या दुकानांच्या मालकांना हताशपणे पाहण्याशिवाय मार्ग नव्हता. तरीही आगीतू काही तरी सामान वाचावे यासाठी धडपड चालूच होती. काही जणांनी आपले काही सामान आगीच्या बाहेर काढण्याचाही प्रयत्न केला. मात्र, आग वाढ‌त असल्यामुळे त्यांचे प्रयत्नही अयशस्वी ठरले. कष्टाने जुळवून आणलेला व्यवसाय आपल्या डोळ्यासमोर त्यांना जळताना पाहावा लागला. अनेक दुकानादारांच्या डोळ्यांत अश्रुही तरळले.

ही आग विझविण्यासाठी १५ ते १८ टँकर आणि अग्निशामक बंबांचा उपयोग करण्यात आला. ही आग आटोक्यात येत नसल्याचे पाहून अखेरीस विमानतळाचा अग्निशामक दलाचा बंब बो‌लविण्यात आला. या बंबाच्या साह्याने आगीवर फोमचा मारा करण्यात आला. त्यामुळे आग काही प्रमाणात नियंत्रणात आली. नंतर उर्वरित आगही अग्निशामक दलाच्या गाबंबांनी विझविली. शेवटचा अग्निशामक बंब सव्वा दहा वाजेच्या सुमारास तेथून परतला. आगीत कोणतीही जिवीत हानी झाली नाही.

‌छतावरील टाकीही वितळली
या दुकानांच्या मागील बाजूला घरांच्या गच्चीवर पाण्याच्या टाक्या होत्या. आगीची तीव्रता एवढी होती की एका घरावरील टाकी वितळून गेली. तेथे केवळ पाइप शिल्लक राहिले आहे. एका घराच्या कंपाउंडमध्ये दोन वाहने पार्क केली होती. आग लागलेल्या दुकानांचा काही भाग या गाड्यांवर कोसळला. त्यात गाड्यांचे काच फुटले.

मंडळाधिकाऱ्यांकडून पंचनामा
औरंगाबाद तहसिल कार्यालयाच्या विशेष मंडळाधिकाऱ्यांनी घटनेची पाहणी केली. दुपारी चारच्या सुमारास मंडळ अधिकारी पी. आर. खेडकर यांनी जळालेल्या दुकानांचा पंचनामा केला. हा अहवाल तहसीलदारांमार्फत जिल्हाधिकाऱ्यांना सादर केला जाणार असल्याचीही माहिती खेडकर यांनी दिली.

आमदार जलील यांनी दिली भेट
एमआयएमचे आमदार सैय्यद इम्तियाज जलील यांच्यासह एमआयएमचे नेते डॉ. गफ्फार कादरी यांनी घटनास्थळी भेट दिली. यावेळी त्यांनी या ठिकाणी दुकान मालकांशी चर्चा करून झालेल्या नुकसानीची माहिती घेतली. त्यानंतर त्यांनी तहसीलदार रमेश मुनलोड यांच्याशी फोनवरून चर्चा करून या घटनेचा पंचनामा करावा व दुकानदारांना सरकारकडून लवकरात लवकर मदत द्यावी, अशा सूचना केल्या. महावीर जयंतीनिमित्त सुट्टी आहे, मात्र गरीब दुकानदारांचा प्रश्न असल्याने सुट्टीच्या दिवशी पंचनामा करावा, अशीही सूचना त्यांनी केली.

असा होतो व्यवसाय
आझाद चौकातील या दुकानांमध्ये फर्निचरचे दुकानदार कंपन्या किंवा जुन्या घरांतील लाकूड विकत घेऊन त्याच्या विक्रीचा व्यवसाय करतात. टाकाऊ किंवा वापरलेले लाकूड आपल्या दुकानात आणून नवीन दरवाजे, खिडक्या किंवा अन्य गरजेच्या वस्तू तयार करतात. काही वेळा छोट्या दुकानांदारांना आपला माल पाठविण्यासाठी देवदाराच्या लाकडांची गरज पडते. तेव्हा याच दुकानातून ही लाकडं किंवा अन्य सामानाची विक्री केली जात होती. शिवाय स्क्रॅपच्या दुकानात जमा होणाऱ्या मालाची दुरुस्ती करून किंवा हा माल तोडून त्यातील लोखंड, अल्युमिनिअम हे वेगळे करून, हा सामान ‌पुर्नवापरासाठी संबंधित कंपन्यांला दिला जातो; तसेच फर्निरच्या दुकानातील देवदारच्या लाकडापासून फर्निचर तयार केले जाते. यामुळे नवीन लाकूड घेण्याची गरज आहे.

महापालिकेच्या आयुक्तांनी दिली भेट
महापालिका आयुक्त ओमप्रकाश बखोरिया हे कुटुंबीयांसह एका कार्यक्रमाला जात होते. त्यांनी आझाद चौकात आगीच्या घटनास्थळाला अचानक भेट दिली आणि दुकान मालकांकडून घटनेची माहिती घेतली.

रा. स्व. संघाची तत्परतेने मदत
आजाद चौकातील दुकानांना लागलेल्या भीषण आगीमुळे परिसरातील नागरी वसाहतीला धोका निर्माण झाला. परिसरातील घरे दोन्ही बाजुंनी आगीने घेरली गेली. त्यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सुमारे दहा ते बारा स्वयंसेवक तेथे मदतीला धावून गेले. स्वयंसेवकांनी मशिदीच्या भोंग्यामधून नागरिकांना आवश्यक सूचना दिल्या. घाबरलेल्या महिलांना त्यांनी धीर दिला. जीवाची पर्वा न करता त्यांनी आगीतून अनेक गॅस सिलिंडर बाहेर काढले. पोलिस अधिकारी व अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी संघाच्या स्वयंसेवकांचे आभार मानले.

आगपीडितांची नावे
सैय्यद यासीन सैय्यद उस्मान ः लाकडी फर्निचरचे दुकान
शेख वजीर शेख नजीर ः स्क्रॅपचे दुकान
साजीद शेख ः फर्निचर
मझहर भाई ः नॅशनल फर्निचर
नासेर भाई ः लाकडाची दूकान
मोहम्मद कैफ ः बाँम्बे फर्निचर
शेख शेरू ः सन इन्टरप्राईजेस

आता पुन्हा तीच कहाणी...
आमच्या दुकानांना सात वर्षांपूर्वीही अशीच आग लागली होती. त्यातही आमच्या दुकानाचे प्रचंड नुकसान झाले होते. मंगळवारी पहाटे आग लागल्याची माहिती आम्हाला काही जणांनी घरी येऊन दिली. आम्ही दुकानापर्यंत आलो तोपर्यंत आग वाढली होती. दोन महिन्यांपूर्वीच ११ हजार रुपयांचा नवीन वजनकाटा घेतला होता. तोही आम्हाला वाचविता आला नाही. सोमवारी रात्री माझ्या धाकट्या मुलाने दीड लाखाचा माल उधारीवर आणला होता. तोही भस्मसात झाला. या आगीने पुन्हा आम्हाला उद‍्ध्वस्त केले आहे.
- सैय्यद यासीन सैय्यद उस्मान

कंपनीतून आम्ही भंगार किंवा वापरात नसलेल्या वस्तू घेऊन त्या दुरुस्त करून विकतो. काही दिवसांपूर्वी मी दुकानात माल आणला होता, मात्र आज पहाटे लागलेल्या आगीत माझे पाच ते साडेपाच लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. दोन्ही वेळेस आगीने आम्हाला उद‍्ध्वस्त केले आहे.
- शेख शेरू, सन इन्टरप्राईजेस

माझ्या दुकानात मोठ्या प्रमाणात प्लायवूड व अन्य माल ठेवला होता. या आगीत दुकानातील सर्व सामान भस्मसात झाले. आमचा हा एकमेव व्यवसाय आहे. आगीत सुमारे पाच लाखांचे नुकसान झाले. व्यवसाय नव्याने कसा सुरू करावा, असा प्रश्न आमच्यासमोर आहे.
- मोहम्मद कैफ

मालेगाव व अन्य भागांतून काही दिवसांपूर्वी माल आणला होता. कारगीर मिळत नसल्याने मी आणि माझा भाचा दुकानात काम करतो. सात वर्षांपूर्वीही आमच्या दुकानाला अशीच आग लागली. त्यावेळी दुकान उद‍्ध्वस्त झाले होते. या आगीतही सर्व माल जळून खाक झाला. दुकानासाठी काहीजणांकडून पैसे उसने घेतले होते. त्याची परतफेड कशी करावी, असा प्रश्न आहे. आगीत अंदाजे तीन ते साडेतीन लाखांचा माल जळून खाक झाला आहे.- मझहर भाई सागवान, देवदार लाकूड विकण्याचा धंदा होता. सात वर्षांपूर्वी आगीत माझे सर्व काही जळाले होते. त्यानंतर मी लाकडाचा व्यवसाय सोडून स्क्रॅपचा व्यवसाय सुरू केला होता. यासाठी एक लाखाची मशीनही आणली होती. या आगीत मशीनसह संपूर्ण दुकान खाक झाले. बाजारातून उचललेला मालही जळून खाक झाला आहे.
- साजीद शेख

रात्री दोन वाजून ४० मिनिटांनी काही नागरिकांना मला घरी येऊन आगीची माहिती दिली. मी अग्निशामक दलाला फोन करून गाड्या पाठविण्याची विनंती केली. अग्निशामक दलही वेळेवर पोहोचले होते. याशिवाय आसपासच्या नागरिकांनी पाणी टाकून आग विझविण्याचा प्रयत्न केला. या आगीत व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या दुकानांदारांना सरकारने मदत करावी.
- अय्युब जहागिरदार, नगरसेवक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सात वर्षांनंतर त्यांच्यावर पुन्हा एकदा कर्जाचा डोंगर...

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
लाकडाच्या व्यवसायावर कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या सय्यद यासीन यांना पुन्हा एकदा कर्जाचा फेरा डोळ्यासमोर दिसू लागला. सात वर्षांपूर्वी लागलेल्या आगीत त्यांच्या व्यवसायाचे होत्याचे नव्हते झाले होते. कर्ज काढून त्यांनी जिद्दीने व्यवसाय पुन्हा उभारला होता. मंगळवारी लागलेल्या आगीने पुन्हा एकदा त्यांचे सर्वस्व भस्मसात झाले आहे. आता पुन्हा कर्ज काढण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे.

आझाद चौकातील दुकानांना ५ मे २००९ रोजी सायंकाळी आग लागली. त्या आगीने आठ व्यावसायिकांची दुकाने भस्मसात झाली होती. सय्यद यासीन हेही त्यापैकीच एक. त्यांचा येथे लाकडाचा व्यवसाय आहे. हे लाकूड पॅकिंगसह अन्य कामांसाठी वापरले जाते. त्यांना त्यांची दोन मुले या व्यवसायात मदत करतात. सात वर्षांपूर्वी लागलेल्या आगीत त्यांचे सुमारे पाच ते सहा लांखांचे नुकसान झाले होते. दुकान जळाल्याने सय्यद यासीन यांचे सर्वकाही भस्मसात झाले. पुढे काय करावे, असा यक्षप्रश्न त्यांच्यासमोर होता. त्यांचे दुकान जळाल्याची माहिती त्यांना लाकूड पुरविणाऱ्यांना कळाली होती. त्यांच्यापैकी अनेकांनी त्यांना पैसे परत देण्यासाठी मुदत दिली. त्यावेळी दुकान उभे करण्यासाठी सुमारे पाच लाखांचे कर्ज काढले होते. मोठ्या मेहनतीने त्यांनी चार वर्षांत हे कर्ज फेडले.

कर्ज फेडल्यानंतर एका मोठ्या ओझ्यातून मुक्त झालो, अशी त्यांची भावना होती. आता दुकानाचा विस्तार करता येईल, असेही त्यांना वाटत होते. त्याचे नियोजन त्यांनी सुरू केले होते. मंगळवारी पहाटे लागलेल्या आगीत त्यांचे दुकान भस्मसात झाले. त्याचबरोबर दुकानाच्या विस्ताराचे स्वप्नही खाक झाले आहे. दुकानात सुमारे दहा लाखांचा माल होता. तो सर्व जळाला. आता पुन्हा एकदा कर्ज काढावे लागले, असे त्यांनी सांगितले.

विम्याची आशा
सात वर्षांपूर्वी दुकान जळाले त्यावेळी सय्यद यासीन यांनी दुकानाचा विमा उतरविला नव्हता. चार वर्षांपूर्वी त्यांनी दुकानाचा विमा उतरविला. आता आगीत झालेल्या नुकसानीची भरपाई विमा कंपनीकडून मिळेल, अशी त्यांना आशा आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सात वर्षांपूर्वीच्या आगीच्या आठवणी झाल्या जाग्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
आझाद चौकात लागलेल्या आगीने सात वर्षांपूर्वीच्या अग्नितांडवाच्या आठवणी जाग्या झाल्या. सात वर्षांपूर्वी, ५ मे २००९ रोजी येथील फर्निचर आणि स्क्रॅपची आठ दुकाने आगीत भस्मसात झाली होती. त्यावेळी दुकानदारांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले होते. ती आग सुमारे साडेसात तासांच्या प्रयत्नांनंतर शांत करण्यात यश आले होते.

सात वर्षांपूर्वी लागलेल्या आगीत आठ दुकाने, दोन वखारी आणि एक रिक्षा जळून खाक झाले होते. काही नागरिकांनी सायंकाळी लागलेली आग विझविण्याचा प्रयत्न केला होता. आग विझविण्यासाठी नागरिक आणि अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांनी बरेच परिश्रम घेतले होते.

या आठ दुकानतील सामान तर जळालेच, शिवाय दुकानासमोर उभी असलेली रिक्षा आणि अन्य साहित्यही जळून खाक झाले होते. त्यावेळी लाखो रुपयांचे माल जळून खाक झाला होता. ही आग आटोक्यात आणण्यासाठी रात्री दीडपर्यंत अग्निशामक दलाला प्रयत्न करावे लागले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हर्सूल तलावातील गाळउपसा १५ दिवसांत सुरू करणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
जुन्या औरंगाबाद शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या हर्सूल तलावातील गाळ उपसण्याचे काम येत्या १५ दिवसांत सुरू केले जाणार असल्याचे महापालिकेचे आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांनी सूचित केले. तलावाचे खोलीकरण करून साठवणूक क्षमता वाढवण्याचा पालिकेचा प्रयत्न आहे, असे ते म्हणाले.

हर्सूल तलावातील गाळ काढण्यासाठी राज्य शासनाने महापालिकेला गेल्यावर्षी दोन कोटी रुपयांचा निधी दिला होता. महापालिका प्रशासनाने तलावातील गाळ काढण्याची प्रक्रिया उन्हाळा संपता संपता सुरू करण्याचे नियोजन केले होते, पण त्याबाबत ओरड झाल्यामुळे दोन कोटी रुपयांचा निधी तसाच ठेवून पुढील वर्षी तलावातील गाळ काढण्याचा निर्णय घेण्यात आला. आता हे काम केले जाणार आहे. तलावातील गाळ काढण्यासंदर्भात बकोरिया म्हणाले, 'तलाव थोडा कोरडा होण्याची वाट आम्ही पहात आहोत. १५ दिवसांत तलावातील पाणी बऱ्यापैकी कमी होईल आणि त्यानंतर गाळ काढण्याचे काम सुरू केले जाईल. तलावातील पाणी साठवण्याची क्षमता वाढावी, असे प्रयत्न आहेत. पावसाळा सुरू होण्यापूर्वी जास्तीत जास्त गाळ काढण्याचे उद्दिष्ट पालिकेच्या यंत्रणे समोर आहे.'

हर्सूल तलावातील गाळ उपसण्याच्या कामात गैरव्यवहार होऊ नये, मनमानी पद्धतीने हे काम होऊ नये म्हणून एक सुरक्षा रक्षक तलावावर नियुक्त केला जाणार आहे. त्याशिवाय वरिष्ठ अधिकाऱ्यांची नजरही या कामावर असणार आहे, असे बकोरिया यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मराठवाड्यातील धरणांनी गाठला तळ

$
0
0

म. टा. विशेष प्रतिनिधी, औरंगाबाद

आजवरच्या इतिहासात प्रथमच मराठवाड्यातील धरणांनी शब्दशः तळ गाठला असून दुष्काळाचे तीव्र चटके सहन करणाऱ्या मराठवाड्याबरोबर राज्यातील अन्य धरणांतील साठ्यामध्येही मोठी घट झाली आहे. मराठवाडा विभागात ८१४ प्रकल्पांत केवळ तीन टक्के उपयुक्त साठा शिल्लक असून, येणाऱ्या दोन महिन्यांत स्थिती आणखी गंभीर होण्याची चिन्हे आहेत.

राज्यातील धरणांमध्ये केवळ १९ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. गेल्यावर्षी याचवेळी हे प्रमाण ३२ टक्के होते. सर्वाधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या अमरावती विभागातील धरणांमधील पाणीपातळी गेल्यावर्षीच्या तुलनेत ३१ टक्क्यांवरून १८ टक्क्यांवर आली आहे. मराठवाड्यात ११ मोठे सिंचन प्रकल्प आहेत. या प्रकल्पांतील उपयुक्त जलसाठ्याची क्षमता ५१४२ दशलक्ष घनमीटर आहे. या प्रकल्पांत सध्या केवळ १५१ दशलक्ष घनमीटर (तीन टक्के) उपयुक्त साठा आहे. उर्वरित उन्हाळ्यात मराठवाड्यात पाण्याचा प्रश्न आणखी बिकट होणार आहे. सध्या मराठवाड्यात २१५१ गावे आणि ७७५ वाड्यांमध्ये तीव्र पाणीटंचाई आहे. तेथे २८५६ टँकरच्या माध्यमातून पाणी पुरविण्यात येत आहे.

ही धरणे कोरडी...

मराठवाड्यातील जायकवाडी, येलदरी, सिद्धेश्वर, माजलगाव, मांजरा, निम्न तेरणा, मनार, सीना कोळेगाव या मोठ्या प्रकल्पातील उपयुक्त जलसाठा शून्य टक्क्यांखाली गेला आहे. ऊर्ध्व पेनगंगा प्रलल्पाक १० टक्के, विष्णूपुरीत ७ टक्के, निम्म दुधना प्रकल्पात १८ टक्के पाणी शिल्लक आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

'जलदूत'ने लातूरला दिले ७० लाख लिटर पाणी

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त । लातूर

मिरजहून ५० वॅगन पाणी घेऊन आणखी एक 'जलदूत एक्स्प्रेस' आज लातुरात दाखल झाली असून तहानलेल्या लातूरकरांना आणखी २५ लाख लिटर पाण्याचं दान मिळालं आहे. आतापर्यंत 'जलदूत'च्या नऊ फेऱ्या पूर्ण झाल्या आहेत.

महाराष्ट्रातील सर्वाधिक दुष्काळग्रस्त लातूर जिल्ह्याला रेल्वेने पाणापुरवठा करून केंद्र सरकारने मोठा आधार दिला आहे. लातूरला आतापर्यंत रेल्वेद्वारे ७० लाख लिटर पाणी उपलब्ध झालं आहे. मिरज येथून मंगळवारी रात्री निघालेली 'जलदूत एक्स्प्रेस' आज सकाळी आठ वाजताच्या सुमारास लातूरला पोहोचली. त्यामुळे लातूरकरांना मोठा आधार मिळाला आहे.

या मोहिमेवर काम करत असलेल्या सर्वांचेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कौतुक केले आहे. मुख्यमंत्र्यांनी ट्विट करून लातूरला झालेल्या पाणीपुरवठ्याचा तपशीलही दिला आहे.

दरम्यान, लातूरचे महापौर शेख अख्तर यांनीही या पाणीपुरवठ्याबद्दल आभार मानले आहेत. लोक पाण्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. लोकांसाठी हा मोठा दिलासा ठरला आहे. रेल्वेमंत्री सुरेश प्रभू पुढच्या आठवड्यात लातुरात येणार असून जिल्ह्याला आणखी पाणी मिळण्याची आशा आहे, अशी प्रतिक्रिया अख्तर यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भगतसिंगनगरात विकतचेच पाणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
हर्सूल टी-पॉइंटपासून जवळच असलेल्या भगतसिंगनगर या वसाहतीला जलवाहिनीची पाइप लाइन असूनही नागरिकांना पिण्याचे पाणी विकतच घ्यावे लागत आहे. त्यासाठी सोसायटी दरमहा ५५ हजार रुपये मोजत आहेत.

हर्सूल गावाजवळच भगतसिंगनगर या ओनर्स सहकारी गृहनिर्माण संस्थेची उभारणी २००४मध्ये सुरू झाली. पाच वर्षांत गृहनिर्माण संस्थेची उभारणी करण्यात आली. सद्यस्थितीत या संस्थेत १९६ फ्लॅटधारक राहातात. भगतसिंगनगर या संस्थेसाठी बांधकाम व्यावसायिकाने पिण्याच्या पाण्याकरिता पाइप लाइन करून दिली होती, परंतु अनधिकृत कनेक्शनची संख्या भरपूर असल्याने भगतसिंगनगरातील रहिवाशांना पाइप लाइनचा अद्याप उपयोग झालेला नाही. प्रारंभापासूनच या संस्थेतील रहिवासी पिण्याच्या पाण्याच्या टंचाईचा सामना करीत आहेत.

२००९मध्ये भगतसिंगनगर ओनर्स सहकारी गृहनिर्माण संस्थेची स्थापना करण्यात आली. तेव्हापासून टँकरद्वारे पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली. त्यासाठी सोसायटी २५ हजार लिटर पाण्याकरिता दरमहा ५५ हजार रुपये मोजत आहे. एक दिवसाआड २५ हजार लिटर पाण्याचा पुरवठा महापालिका टँकरद्वारे करीत आहे. आठ वर्षे झाली तरी अद्यापही त्यांना जलवाहिनीच्या पाइप लाइनमधून पाणी मिळालेले नाही. या सोसायटीतील सर्व सभासद दरमहा ६०० रुपये देतात. या रकमेतून पिण्याचे पाणी, पंप हाउस, पार्किंग, साफसफाई, वॉचमन अादी कामांचा खर्च भागवला जातो. भगतसिंगनगरचा पाण्याचा प्रश्न सोडवण्याकरिता मयूरपार्कमधील ऑडिटर सोसायटीत असलेल्या पाण्याच्या टाकीतून पाणीपुरवठा करावा, अशी मागणी सातत्याने केली जाते, परंतु, त्याची दखल महापालिकेने अद्याप गांभीर्याने घेतलेली नाही. त्यामुळे नागरिकांना पाण्याचा त्रास सहन करावाच लागत आहे, असे भगतसिंगनगर गृहनिर्माण संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र ठोंबरे यांनी सांगितले.

भगतसिंगनगरातील सर्व निवासी हे पाण्याचा काटकसरीनेच वापर करतात. परिसरात आठ बोअर आहेत. सर्व फ्लॅटमध्ये पाण्याचे पुनर्भरण करण्याचा प्रयोग करण्यात आलेला आहे. हे पाणी बोअरपर्यंत जाईल, अशी रचना करण्यात आली आहे. त्यामुळे बोअरचे पाणी फेब्रुवारीपर्यंत टिकते, मात्र त्यानंतर किमान तीन महिने हे विकतचेच पाणी घेऊन वापरावे लागते, असे ठोंबरे यांनी स्पष्ट केले.

आठ बोअरमधून पाण्याचे पंपिंग करण्याकरिता एक पंप हाउस तयार करण्यात आलेला आहे. त्यातून प्रत्येक फ्लॅटवर असलेल्या टाकीपर्यंत पाणी पोहचवले जाते. पंप हाउससाठी दरमहा ४०-४५ हजार रुपये खर्च येतो. जवळपास प्रत्येक फ्लॅटवर आठ हजार लीटर क्षमतेच्या टाक्या आहेत. पंप हाउसची सर्व जबाबदारी ही सोसायटीची आहे आणि हा खर्च सोसायटीच्या माध्यमातूनच भागवला जातो, असे ठोंबरे यांनी सांगितले.

भगतसिंगनगरच्या आसपासही मोठ्या संख्येने नागरिक राहात आहेत. त्यांच्यासमोरही पाण्याचा प्रश्न बिकटच आहे. विकतचे पाणी घेण्याशिवाय त्यांच्यासमोर दुसरा पर्यायच नाही. या भागात लोकवसाहत वाढत आहे. त्यामुळे या भागातील पाणी प्रश्न सोडवण्याच्यासाठी महापालिकेने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.

भगतसिंगनगर गृहनिर्माण सोसायटी नियमितपणे महापालिकेचा टॅक्स भरत आहे, मात्र २००८पासून नळाद्वारे पिण्याचे पाणी मिळालेले नाही. ऑडिटर सोसायटीतील पाण्याच्या टाकीतून पुरवठा केला तर आमचा पाण्याचा प्रश्न कायमस्वरुपी सुटू शकतो.
- राजेंद्र ठोंबरे, अध्यक्ष, भगतसिंगनगर गृहनिर्माण संस्था.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मराठवाड्यात टँकर तीन हजारांवर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
दुष्काळाचे चटके सोसणाऱ्या मराठवाड्यातील पाणीटंचाई दिवसेंदिवस तीव्र होत असून, सध्या विभागातील २३०६ गावे आणि ८४५ वाड्यांची तहान ३०३२ टँकरद्वारे भागविण्यात येत आहे. वाढत्या उन्हामुळे टँकरची मागणीही झपाट्याने वाढत असून, मराठवाड्यात अवघ्या दोन आठवड्यांत २८७ टँकर वाढवावे लागले आहेत.

दुष्काळाने होरपळलेल्या मराठवाड्यात यंदा उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याच्या टंचाईत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. प्रशासनाने चार हजार टँकरचे नियोजन केले आहे. मार्च महिन्यातच दोन हजारांवर टँकरने पाणीपुरवठा सुरू करण्यात आला होता. आता २० एप्रिलपर्यंत टँकरची संख्या ३ हजारांवर गेली आहे. यंदाचे अत्यल्प पर्जन्यमान आणि प्रकल्पांमधील शिल्लक पाणीसाठा झपाट्याने तळाला गेल्यामुळे नियोजन करताना प्रशासनाच्या तोंडचे पाणी पळाले आहे. सध्या औरंगाबाद, बीड, नांदेड, उस्मानाबाद व जालना जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. जायकवाडी धरणातून दोन वेळेस सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे नदीकाठच्या अनेक बोअर, विहिरींना पाणी आले होते, मात्र आता या त्यांची पातळीही पातळी घसरत अाहे. काही तलाव कोरडे पडल्यामुळे गावांची तहान भागवण्यासाठी टँकरची संख्या वाढवण्यात येत आहे. पाणीटंचाईमुळे प्रशासनाने विभागातील ६ हजार २५० खासगी विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे.

दोन आठवड्यांत वाढले २८७ टँकर

मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांमध्ये पाण्यासाठी वनवन भटकावे लागत असून, पाण्याच्या टँकरसाठी मागणीतही वाढ झाली आहे. अवघ्या दोन आठवड्यांमध्ये विभागात २८७ टँकरची वाढ झाली आहे. मराठवाड्यात २ एप्रिल रोजी टँकरसंख्या २७४५ अशी होती. ती २० एप्रिल रोजी ३०३२ वर पोचली आहे. टँकरची संख्या वाढत असली, तरी टँकरसाठी पाणी आणायचे कोठून, असा प्रश्नही प्रशासनासमोर आहे. उन्हाचा पारा ४० अंशाच्या पार गेल्याने पाण्याच्या मागणीत वाढ होत आहे.

जिल्हानिहाय टँकरसंख्या
जिल्हा..........गावे......वाड्या.......टँकर
औरंगाबाद.....५१०........१७..........६७५
जालना..........३८०........६३..........४३३
परभणी.........१४९........३७..........१९२
हिंगोली..........२७.........००..........२९
नांदेड.............१८८.......१३८........३०३
बीड...............६२१.......५३४.........७९८
लातूर............१९३........४३..........२५९
उस्मानाबाद....२३८........१३..........३४३
एकूण............२३०६.....८४५..........३०३२

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


ठिबक सिंचनाच्या जोरावर जगविली बाग

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर उपलब्ध पाण्याचा कार्यक्षम वापर व्हावा, त्यांची बचत होऊन वृक्षाचे जतन व संवर्धन व्हावे यासाठी पैठण तालुक्यातील चौढाळा येथील जय शिवशंकर बहुउद्देशिय सेवाभावी संस्थेच्या कार्यकर्त्यांनी ठिबक सिंचनाच्या बळावर माळरान परिसरात बाग फुलवली आहे. वड, पिंपळ, लिंब यासारख्या झाड्यांची त्यांनी यशस्वी लागवड केल्याने परिसर हिरवा झाला आहे. दुष्काळी परिस्थिती पक्षांचा अन्न, पाण्यापासून जीव जाऊ नये यासाठीही संस्थेने विद्यार्थ्यांच्या सहकार्याने खास उपाय योजना केल्या आहेत.

पैठण तालुक्यातील चौढाळा गावाची लोकसंख्या सुमारे एक हजारच्या घरात आहे. शेती हाच येथील ग्रामस्थांचा प्रमुख व्यवसाय, पण गेल्या काही वर्षांपासून सातत्याने पडणाऱ्या दुष्काळाचा फटका अन्य गावाप्रमाणे या गावालाही बसला असून, येथील ग्रामस्थांची तहान भागविण्यासाठी सध्या टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत आहे.

मुलांना चांगले दर्जेदार शिक्षण मिळावे, म्हणून गावातील तरुणांनी जय शिवशंकर बहुउद्देशिय सेवाभावी संस्थेची स्थापन केली. गेल्यावर्षी सुमारे एक एकरावर जगदंबा इंग्लिश स्कूलची सुरुवात केली. प्ले ग्रुप ते पहिलीपर्यंत असलेल्या या शाळेत दिडशे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.

या माळरानावर विद्यार्थ्यांसाठी छान बगीचा असावा, हिरवळ असावी यासाठी संस्थेचे सचिव प्रशांत नरके यांच्यासह नितिन तांबे, दादा काळे, दीपक दळवी, महेश आवारे, राजेन्द्र पन्हाळकर, महेंद्र सकलेचा, लखन नरके पदाधिकारी, हिंतचिंतकांनी प्रयत्न केले. पाण्याचे अन्य कोणतेही स्त्रोत नसल्याने त्यांनी बोअर घेतला. त्याला पाणी लागले. त्यानंतर जास्वंद, पिंपळ, वड, लिंब, कन्हेर, गुलमोहर आदी ११०हून अधिक झाडे लावली, पण यंदा भीषण पाणीटंचाई निर्माण झाली. अशा स्थितीत बागेतील झाडांचे काय होणार, असा प्रश्न त्यांना पडला. टंचाईतून मार्ग काढण्यासाठी ठिबक सिंचनाच्या वापर करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. ठिबक सिंचनामुळे उपलब्ध पाण्याचा कार्यक्षमपणे वापर होऊ लागल्याने पाण्याची बचत झाली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दारू कंपन्यांनी थकविले २२ कोटी

$
0
0

म. टा. विशेष प्रतिनिधी, औरंगाबाद
मद्य उत्पादक कंपन्यांनी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची (एमआयडीसी) २२ कोटी ८८ लाख ३६ हजार ७७५ रुपये पाणीपट्टी थकविली आहे.

एमआयडीसी बिअर व दारू कंपन्यांना पाणी पुरवठा करते. या कंपन्यांनी पाणीपट्टीच भरली नसल्याचे समोर आले आहे. वाळूज आणि चिकलठाणा औद्योगिक परिसरात बिअर व दारू उत्पादन करणाऱ्या अकरा कंपन्या आहेत. त्यापैकी दहा कंपन्यांकडे कोट्यवधी रुपयांची थकबाकी आहे. यामध्ये राज्याचे ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांचे पती अमित ऊर्फ चारुदत्ता पालवे यांच्या रॅडिको कंपनीचाही समावेश आहे.

दुष्काळाची परिस्थिती असताना या कंपन्यांचा पाणी पुरवठा बंद करा, अशी मागणी सर्वच राजकीय पक्षांनी केली आहे. विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांनी या मागणीला जोर लावला आहे. काँग्रेसने तर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर या मद्य उत्पादन करणाऱ्या कंपन्यांचे पाणी पुरवठा बंद करावा यासाठी निदर्शने केली होती. या कंपन्यांना एमआयडीसीने पाणी बंद करावे अशी विनंती करणारी याचिका मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठात केली आहे.

एमआयडीसीने २००५मध्ये पाणीपट्टीचे दर वाढवले. त्यामुळे या मद्य उत्पादक कंपन्यांनी औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली होती. सध्या हे प्रकरण प्रलंबित आहे. २०११मध्ये नव्याने दर सुचविण्यात आला. या दरानुसार सध्या कंपन्या पाणीपट्टी भरत आहेत, मात्र २००५ ते २०११दरम्यान या कंपन्यांनी पाणीपट्टी भरली नाही. त्यामुळे ही पाणीपट्टी थकित आहे. हे प्रकरण कोर्टात आहे. कोर्टाचा निकाल लागल्यानंतरच ही थकबाकी एमआयडीसीला मिळू शकते.

कंपन्यांकडील थकबाकी
बीडीए कंपनी ः ३४ लाख ८८ हजार ५४४
महाराष्ट्र डिस्टिलरीज ः ६ कोटी ४९ लाख ९४ हजार ३०२
रॅडिको डिस्टिलरीज ः २ कोटी ३७ लाख २५ हजार ८६६
स्कोल ब्रुअरीज ः ३ कोटी ३० लाख २० हजार ३५९
औरंगाबाद ब्रुअरीज ः १ कोटी ९२ लाख २ हजार ८७९
मिलेनियम बिअर ः २ कोटी ६९ लाख ३१ हजार ०१८
फोस्टर इंडिया ः २ कोटी ६४ लाख ८३ हजार १३९
लिला सन्स ः १ कोटी ८७ लाख ३७ हजार २२४
कार्ल्स बर्गस् ः ९ लाख ५९ हजार ७८६
इंडो युरोपियन ब्रुअरीज ः १ कोटी १२ लाख हजार ९३७०८
(रक्कम रुपयांत)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गजानन मंदिर चौकातील डीपी जळाली

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
गजानन मंदिर चौकातील डीपीला (रोहित्र) मंगळवारी दुपारी चारच्या सुमारास आग लागली. आग विझविण्यासाठी अग्निशामक विभागाच्या बंबाला पाचारण करण्यात आले होते. या आगीत डीपीसह केबलही जळून खाक झाल्याची माहिती महावितरणाच्या सूत्रांनी दिली.

औरंगाबाद शहरात उन्हाचा पारा वाढला आहे. त्यामुळे एसी आणि कुलर यांचा वापर वाढत चालला आहे. त्याचा वीज वितरण करणाऱ्या डीपीवरही ताण वाढत चालला आहे. त्यामुळे डीपीत बिघाड होण्याचे प्रमाण वाढले आहे. गजानन महाराज मंदिर चौकातील डीपीने मंगळवारी दुपारी पेट घेतला. डीपीतून ऑइलची गळती होत होती. वीज वाहिन्या तापल्या होत्या. त्यामुळे डीपीने पेट घेतल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली.

आग वाढत असल्याचे पाहून काही नागरिकांनी महावितरणच्या कार्यालयाशी संपर्क साधून माहिती दिली. वाहनधारकांचा आगीपासून बचाव करण्यासाठी काही दुकानदारांनी डीपीसमोर मोठे बोर्ड लावले होते. महावितरणाच्या कर्मचाऱ्यांनी डीपीला केला जाणारा वीजपुरवठा खंडित केला. या आगीची माहिती अग्निशामक विभागालाही देण्यात आली. अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांनी आग नियंत्रणात आणली. त्यांना काही नागरिकांनीही मगत केली. महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी आगीच्या घटनेनंतर झालेल्या नुकसानीचा आढावा घेतला. या आगीत विद्युत वाहक केबल जळाली असून, डीपीचेही मोठे नुकसान झाले आहे, अशी माहिती महावितरणाच्या कर्मचाऱ्यांनी दिली. या डीपीवरून गारखेडा, गजानन महाराज मंदिर, कडा ऑफिस आणि लगतच्या परिसरात वीजपुरवठा केला जातो. आगीमुळे गजानन महाराज परिसर, सारंग सोसायटी कडा ऑफिससह अन्य भागांतील वीज पुरवठा खंडित झाला होता.

३९ डीपी जळाल्या
गेल्या तीन महिन्यांत शहरात डीपी जळण्याचे प्रमाण वाढले आहे. तीन महिन्यांत ३९ डीपी जळाल्या आहेत. तापमानात सातत्याने वाढ होत आहे. त्याचबरोबर विजेच्या मागणीत वाढ होत आहे. त्यामुळे डीपीवरील ताण वाढत आहे. त्यातून डीपी पेटण्याचे प्रकार घडत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मोबाइल पळविणारा गजाआड

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
रिक्षामधून सहप्रवाशांचे मोबाइल लंपास करणाऱ्या आरोपीला गुन्हे शाखेने सहा तासांत जेरबंद केले. या आरोपीकडून १७ हजार रुपये किमतीचे दोन मोबाइल जप्त करण्यात आले. मंगळवारी सकाळी मोबाइल लांबवण्याचे प्रकार घडले होते.

वैजापूर येथील सय्यद लियाकत अली सय्यद फेरोज अली हे व्यापारी मंगळवारी सकाळी कामानिमित्त शहरात आले होते. बाबा पेट्रोल पंपाकडून अमरप्रीतचौकाकडे ते सीटर रिक्षामधून जात असताना त्यांचा नऊ हजारांचा मोबाइल लंपास करण्यात आला होता. याप्रकरणी त्यांनी क्रांतिचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. यानंतर दुपारी सव्वाबारा ते साडेबारादरम्यान दत्तात्रय रामभाऊ थोरात (वय ७०, रा. श्रेयनगर) यांचा मोबाइल चोरीस गेला होता. सिडको बसस्टँड ते रोपळेकर चौक यादरम्यान रिक्षामध्ये हा प्रकार घडला होता. याप्रकरणी त्यानी जवाहरनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता.

दरम्यान, रात्री आठ वाजेच्या सुमारास संशयित आरोपी शेख कलीमोद्दिन शेख मोइनोद्दिन (रा. भवानीनगर, जुना मोंढा) हा मध्यवर्ती बसस्थानकाजवळील स्कायवॉक खाली संशयास्पद अवस्थेत फिरत होता. तेथे गस्त घालीत असलेल्या गुन्हे शाखेच्या पथकाच्या निदर्शनास हा प्रकार पडला. यानी कलीमोद्दिनला ताब्यात घेऊन त्याची झडती घेतली. यावेळी त्याच्याजवळ दोन मोबाइल आढळले. हे मोबाइल त्याने रिक्षामधील सहप्रवाशाचे चोरल्याची कबुली दिली. सय्यद लियाकत अली व थोरात यांचे हे मोबाइल होते. आरोपी कलीमोद्दिनला अटक करून क्रांतिचौक पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. ही कारवाई पोलिस निरीक्षक अविनाश आघाव यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक अय्युब पठाण, शिवाजी भोसले, संजय जाधव, बबन इप्पर व रितेश जाधव यानी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महिलेची पर्स लांबवणारा दोन महिन्यांनी जाळ्यात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
महिलेची पर्स लांबवणाऱ्या दुचाकीस्वाराला अटक करण्यात दोन महिन्यानंतर सिडको पोलिसांना यश आले. हडको एम २ येथे १६ फेब्रुवारी रोजी ही पर्स लांबवण्यात आली होती. त्यात ३१ हजार रुपये होते.

प्रविणा कुलभूषण अन्नदाते (वय ४०, रा. ज्ञानेश्वरनगर, एन ९, एम २) या सामाजिक कार्यकर्ता महिलेची पर्स १६ फेब्रुवारी रोजी दुपारी दीड वाजता दुचाकीस्वाराने लांबवली होती. एम २ भागातील साई कोचिंग क्लासेस समोर हा प्रकार घडला होता. याप्रकरणी सिडको पोलिस ठाण्यात जबरीचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यामध्ये गोरखनाथ पुंडलिकराव औताडे या तरुणाचा समावेश असल्याची माहिती सिडका पोलिसांना मिळाली होती. गोरखनाथचा शोध घेऊन त्याला अटक करण्यात आली; तसेच गुन्ह्यात वापरलेली त्याची दुचाकी जप्त करण्यात आली. पोलिस निरीक्षक‌ निर्मला परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय पवार, जमादार दरारे, सुरे, भानुसे व दीक्षित यानी ही कामगिरी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images