Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

कांद्याची विक्रमी आवक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पैठण
कांद्याचे भाव गडगडल्यावरही पैठणच्या कांदा मार्केटमध्ये कांद्याची मोठ्या प्रमाणात आवक सुरूच असून, रविवारी पैठणच्या कांदा मार्केटमध्ये विक्रमी सात हजार कांदा गोण्याची आवक झाली. कांद्याला १०० रुपयापासून ते ८५० रुपये प्रती क्विंटलपर्यंत भाव मिळाला.

या महिन्याच्या पहिल्या आठवड्यात बाजारात कांद्याची आवक घटल्याने कांद्याच्या भावात तेजी आली होती. कांदाला ५०० ते ११०० रुपये प्रती क्विंटलदरम्यान भाव मिळत होता, मात्र मागच्या काही दिवसांपासून शेतकऱ्यांनी बाजारात मोठ्या प्रमाणात कांदा आणला. त्यामुळे कांद्याचे भाव निम्म्याने कमी झाले होते. परिणामी, संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी चार मे रोजी पैठणचा कांदा बाजार बंद पाडला होता.

कांद्याचे भाव कमी झाल्याने बाजारात आवक कमी होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत होती, मात्र रविवारी पैठणच्या मार्केटमध्ये विक्रमी सात हजार कांदा गोण्याची आवक झाली. जास्त प्रमाणात कांद्याची आवक झाल्याने भाव गडगडणार, अशी भीती शेतकऱ्यांना वाटत होती. त्यामुळे शेतकऱ्यांच्या कांदा योग्य भावात खरेदी करा, असा इशारा पैठण

कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव एन. आर. विखे यांनी व्यापाऱ्यांना दिला. त्यानंतर रविवारी चांगल्या प्रतीच्या कांद्याला ८५० रुपयांचा भाव मिळाला. हलक्या प्रतीच्या कांद्याला कमीत कमी १०० रुपये प्रती क्विंटल या प्रमाणे भाव मिळाला.

कांद्याला कमीतकमी १५ ते २० रुपयाचा भाव मिळावा, अशी माझी अपेक्षा होती, पण दिवसेंदिवस कांद्याचे भाव घसरत अाहेत. कांदा साठवून ठेवण्याची व्यवस्था नसल्याने नाइलाजाने मला आज कांदा विक्रीसाठी आणावा लागला.
- रामेश्वर उगले, शेतकरी, नायगाव

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


बजाजनगरात होणार ४० कोटींची विकासकामे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, वाळूज
बजाजनगर नागरी वसाहतीमध्ये विविध विकास कामासांठी एमआयडीसीकडून तब्बल ४० कोटी ७७ लाख रुपयांचा निधी खर्च करण्यात येणार आहे. या निधीतून भूमिगत गटार, अंतर्गत रस्ते, परिसरातील चौकांचे रुंदीकरण व सुशोभीकरण केले जाणार आहे.

बजाजनगरातील रस्त्यावरील अतिक्रमण हटविण्याची मोहीम हाती घेण्यात आली होती. हे अतिक्रमण हटविल्यानंतर या रस्त्यांच्या कामांना सुरवात करण्यात आली आहे. बजाजनगरातील भूमिगत गटार योजनेचे काम हाती घेण्याची मागणी गेल्या अनेक दिवसांपासून नागरिकांमधून करण्यात येत होती. या मागणीचा विचार करून एमआयडीसीने भूमिगत गटार योजनेच्या विकास कामांना मंजूर दिली आहे. त्यासाठी दोन कोटी १९ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. बजाजनगर येथील रहिवासी क्षेत्रातील अंतर्गत रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरणासाठी चार कोटी ५६ लाख रुपये, पाणी पुरवठ्यासाठी ३५० मिमी व्यासाची जलवाहिनी टाकण्याकरिता दोन कोटी १० लाख रुपये मंजूर करण्यात आले. मुख्य रस्त्याच्या बाजूने अंतर्गत रस्त्याच्या जोडावर मोरे चौक व माहराणा प्रताप चौक येथे रुंदीकरणासाठी ९३ लाख रुपये तर, अंतर्गत रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण करण्यासाठी २९ कोटी रुपयांचा प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. वडगाव कोल्हाटी ते ग्रामपंचायत ते बजाज गेटपर्यंत जलवाहिनी टाकण्याकरित दीड कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिवछत्रपती पुरस्काराचे नियम बदलणार

$
0
0

Sudhir.Bhalerao@timesgroup.com

औरंगाबाद ः शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार नियमावलीत बदल करण्यात येणार आहेत. प्रत्येक खेळनिहाय नियमावली तयार करण्याबाबत गांभीर्याने विचार करण्यात येत आहे.

शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवन गौरव पुरस्कार, क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार, शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (खेळाडू, संघटक, कार्यकर्ता), राज्य क्रीडा साहसी पुरस्कार, एकलव्य राज्य क्रीडा पुरस्कार (अपंग खेळाडू), जिजामाता राज्य क्रीडा पुरस्कार व जिल्हा क्रीडा पुरस्कार या सर्व पुरस्कारांची नवीन नियमावली तयार करण्यात येत आहे.

राज्यातील नामवंत क्रीडापटूंना शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार देण्याची योजना १९६९-७०पासून सुरू करण्यात आली. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाचे नाव उज्ज्वल करणारे खेळाडू घडविणाऱ्या क्रीडा मार्गदर्शकांना उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार देण्याची योजना १९८८-८९ पासून शासनाने अंमलात आणलेली आहे. २००१-०२पासून ज्येष्ठ क्रीडापटू, क्रीडा मार्गदर्शक, संघटक, कार्यकर्ता व क्रीडा क्षेत्राशी संबंधितांना शिवछत्रपती राज्य जीवन गौरव पुरस्कार देण्याची योजना अंमलात आणली आहे.

पुरस्कार नियमावलीत काळानुरूप आणखी काही बदल करणे आवश्यक असल्याने तसे बदल करण्यासाठी क्रीडा संचालनालयाने राज्यातील क्रीडा तज्ज्ञ, शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार प्राप्त खेळाडू, संघटक, मार्गदर्शक यांना निमयावलीत बदल सूचवण्यास सांगितले आहे. राज्य क्रीडा संघटनांना नियमावतील सुधारणा करण्यासाठी माहिती देण्यास सांगण्यात आले होते. या माहितीस विलंब होत असल्याने अद्याप अंतिम नियमावली तयार करण्यास विलंब होत आहे. यासंदर्भात सोमवारी होणाऱ्या बैठकीत नियमावली बदलांवर सविस्तर चर्चा होणार आहे.

खेळ निहाय नियमावली
आतापर्यंत २९ क्रीडा प्रकारांतील खेळाडू, मार्गदर्शक, संघटकांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो. त्यात तिरंदाजी, अॅथलेटिक्स, बॅडमिंटन, बुद्धिबळ, सायकलिंग, तलवारबाजी, गोल्फ, घोडेस्वारी, स्केटिंग, स्क्वॉश, ट्रायथलॉन, बास्केटबॉल, शरीरसौष्ठव, क्रिकेट, कयाकिंग, कॅनोईंग, रोईंग, व्हॉलिबॉल, वुशू, याटिंग या क्रीडा प्रकारांचा समावेश आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अध्ययन चक्रातून इंग्रजीचा प्रवास !

$
0
0


Ramchandra.Vaybhat
@timesgroup.com
कोणत्याही भाषेत पारंगत होण्यासाठी शब्दांवर प्रभूत्व व भाषेची रचना लक्षात येणे आवश्यक असते. विद्यार्थ्यांना शब्द आणि व्याकरणचा योग्य वापर करून इंग्रजी समजावे यासाठी फुलंब्री तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खामगाव येथील शिक्षक प्रकाश वाघमारे यांनी स्वतंत्र वर्ग तयार केला आहे. या वर्गामध्ये 'ब्लेन्डेड लर्निंग अॅक्टिव्हिटि व्हील' हे सूत्र तयार केले असून या माध्यमातून विद्यार्थी भाषा शिक्षणातील बारकावे सहज व सोप्या पद्धतीने समजून घेतात. या अध्ययन चक्रामुळे अवघड वाटणारा इंग्रजी विषय विद्यार्थ्यांना सोपा वाटू लागला आहे. शिवाय लहान वयातच इंग्रजीचे व्याकरण पक्के होत असल्यामुळे अध्ययन चक्रातून मिळालेली ज्ञानाची शिदोरी विद्यार्थ्यांना आयुष्यभर उपयोगी पडणारी ठरत आहे.
ग्रामीण भागात मराठी शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना इंग्रजी विषय तसा कठीणच. मात्र, जिल्हा परिषद खामगाव येथील शिक्षक प्रकाश वाघमारे यांनी इंग्रजी विषय सोपे करण्याचे सूत्रच विद्यार्थ्यांसमोर ठेवल्यामुळे, हा विषय विद्यार्थ्यांना आवडत आहे. या शाळेमध्ये इंग्रजी विषयासाठी स्वतंत्र खोली तयार करण्यात आली असल्यामुळे शिक्षक वर्गात शिकवण्यासाठी जाण्याऐवजी विद्यार्थीच इंग्रजी शिकण्यासाठी वर्गात येतात. अगदी हसत खेळत ‌इंग्रजी शिकता यावे यासाठी वाघमारे सरांनी वर्गामधील फरशीवर 'ब्लेन्डेड अॅक्टिव्हिटि व्हील' हे इंग्रजी शिकण्याचे अध्ययन चक्र रंगविले आहे. या माध्यमातून विद्यार्थ्यांना शब्दाच्या जाती, शब्दलेखन, भाषांतर, वचन, लिंग, उपपद, प्रत्यय, शब्दकुटुंब, यमक, वाक्यांश तसेच विरुद्ध अर्थी - समान अर्थी शब्द यासह इतर गोष्टींची माहिती मिळते. अध्ययनचक्रामध्ये उपयोग तसेच भाषेच्या विकासाच्या अंगांनी सुमारे १५०० कार्ड तयार करण्यात आले असून भाषेचा जो भाग शिकायचा उदा. नाम, उपपद आदी. त्याचे कार्ड विद्यार्थ्यांना देण्यात येतात व तेथून सुरू होतो शब्दसंपत्ती समृद्ध होण्याचा प्रवास. अध्ययनचक्रामुळे मुले वाक्य तयार करू लागली आहेत.
अध्ययन चक्रासोबतच इंग्रजी वाक्यरचना या विषयी चार मुख्य प्रकारच्या वाक्याची सूत्रबद्ध आरेखन वर्गातील कोपऱ्यामध्ये करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना वैयक्तिक, जोडी, गट तसेच संपूर्ण वर्गाला शिकवणे अशा चार पद्धतीमध्ये शिकवण्यात येत असल्यामुळे कोणताही विद्यार्थी कोणत्याही वेळेत येऊन या अध्ययनचक्राच्या माध्यमातून अभ्यास करू शकतो. दररोज होणाऱ्या परिपाठामध्ये आज काय शिकवायचे याबाबत चर्चा करण्यात येते. विद्यार्थ्यांना इंग्रजी अधिक चांगली होण्यासाठी इंग्रजीची वेगवेगळी पुस्तके, गोष्टींची पुस्तके हाताळण्यासाठी शब्दकोश उपलब्ध करून देण्यात आले आहेत. तसेच प्रत्यक्ष वर्णन करण्यासाठी त्या वस्तूचे नाव, आकार, चव, बाजारी किंमत, त्यापासून बनणाऱ्या वस्तूंची माहिती दिली जाते. त्यामुळे मुलांना प्रत्येक परिपाठात २० - २५ शब्दांची ओळख करून देण्यात येते. पहिली ते सातवीपर्यंत असलेल्या शाळेमध्ये पाचवी ते सातवीपर्यंत या अध्ययनचक्राचा उपयोग अधिक प्रभावीपणे करण्यात येतो. सातवीपर्यंतच विद्यार्थ्यांचे व्याकरण पक्के झाल्यामुळे इंग्रजीच्या पुढील प्रवासासाठी विद्यार्थ्यांना कधीही अडचण येत नसल्याचे वाघमारे यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गडकोटाचा ‘खंडोबा’ निविदेच्या फेऱ्यात

$
0
0


सुनील पांडव, सातारा
गडकोटाचा खंडोबा सध्या निविदेच्या फेऱ्यात अडकला आहे. निधी नसल्यामुळे काम रखडल्याची अनेक उदाहरणे आहेत. मात्र, या मंदिराच्या दुरुस्तीसाठी १ कोटी १३ लाख रुपयांचा नि‌धी मंजूर होऊनही फक्त काम करण्यासाठी कुणी पुढाकार घेत नसल्यामुळे पंचयत झाली आहे.
तीनशे वर्षांपूर्वीच्या सातार्यातील हेमाडपंती खंडोबा मंदिरातील दीपमाळेची वाटी मागच्या वर्षी २६ जून रोजी झालेल्या पावसामुळे ढासळली होती. सुदैवाने त्यात कुणी भाविक जखमी झाला नाही. त्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून विश्वस्तांनी मुख्य प्रवेशद्वार बंद केले होते. श्रावण महिन्यात भाविकांची वाढती गर्दी पाहून गैरसोय होऊ नये ते उघडण्यात आले. मंदिर पुरातत्व खात्याच्या अखत्यारित असल्यामुळे इतरांना काम करता येत नाही. मात्र, आता पावसाळा सुरू होण्याआधी काम सुरू न झाल्यास दीपमाळेच्या वाट्या पडण्याची भीती कायम आहे. मंदिराच्या वरच्या बाजूला असलेले वीटकाम संवर्धन, रासायनिक प्रक्रिया करून गाभारा स्वच्छ करणे, दीपमाळेच्या वाट्या बसवणे असा प्रस्ताव पुरातत्व खात्याने राज्य शासनाकडे पाठवला होता. त्याला डिसेंबर महिन्यात मंजुरी मिळाली. १ कोटी १३ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला. त्यानंतर पुरातत्व खात्याने यासंदर्भात दोनदा निविदा काढली. पहिल्या वेळेस गुत्तेदाराने निविदा भरूनही कामाला सुरुवात केली नाही. दुसऱ्या वेळेस मात्र कामासाठी कुणी पुढे न आल्याने मंदिराच्या दुरुस्तीचे काम रखडले आहे. हे काम लवकर सुरू न झाल्यास पावसाळ्यात दीपमाळेच्या आजबाजूला भाविकांनी जाऊ नये यासाठी बांबू लावण्यात येतील, असे विश्वस्त साहेबराव पळसकर यांनी सांगितले. यासंदर्भात जि. प. सदस्या योगिता बाहुले यांनीही पुरातत्व खात्याला पत्र पाठवून काम लवकर सुरू करण्याची मागणी केली आहे.
तिसरी निविदा काढणार
आतापर्यंत दोनदा निविदा प्रक्रिया झालेली आहे. लवकरच तिसर्यांदा निविदा काढण्यात येणार असून, आधी दीपमाळेच्या कामाला प्राधान्य देण्यात येणार आहे, असे पुरातत्व खात्याचे उपआवेक्षक महेंद्र साखरे यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अधिकाऱ्यांसमोर घेतले शेतकऱ्याने विष

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, पैठण
पाटबंधारे व महावितरणचे अधिकारी, कर्मचारी विद्युत पंप काढायला आल्याची शंका आल्याने तालुक्यातील वाहेगाव येथील कृष्णा बोबडे या शेतकऱ्याने या कर्मचाऱ्यांसमोरच आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. घटनेनतर संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी पाटबंधारे व महावितरणच्या कर्मचाऱ्यांना मारहाण केली.
जायकवाडी धरणावरील कृषीपंपाचा वीज पुरवठा पाच दिवसांपूर्वी पाटबंधारे विभागाने खंडित केला होता. यामुळे अनेक अनेक गावातील नागरिकासमोर पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. सोमवारी पाटबंधारे विभागाचे उपशाखा अभियंता बुध्दभूषण दाभाडे, कालवा निरीक्षक सुनील घुसारे, महावितरणचे बन्सी नगराळेसह इतर कर्मचारी डाव्या कालव्यावरील कृषी पंपाच्या वीजपोलकडे जात असल्याचे शेतकरी कृष्णा बोबडे याने बघितले. सर्व कर्मचारी कृषी पंप जप्त करण्याची कारवाई करत असल्याची त्यांना शंका आली. याकारणाने त्यांची कर्मचाऱ्यांसोबत बाचाबांची झाली. त्यानंतर लगेच बोबडे यानी पाटबंधारे व महावितरण च्या कर्मचाऱ्यांसमोर विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. शेतकाऱ्यांमध्ये ही वार्ता पसरताच त्यांनी जायकवाडी येथील १३३ के व्ही पॉइंटवर जात त्या ठिकाणी उपस्थित कर्मचारी बन्सी नगराळे व काही कर्मचाऱ्यांना मारहाण केली. दरम्यान, घटना घडल्यावर पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता संजय भर्गोदेव व महावितरणचे महादेव मोरताळे व शेतकऱ्यांनी एमआयडीसी पोलिस ठाणे गाठून एकमेकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. यामुळे एमआयडीसी पोलिस ठाणे परिसरात तणावाचे वातावरण पसरले होते. सध्या कृष्णा बोबडे यांची प्रकृती स्थिर असून औरंगाबाद येथील एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निम्म्याहून अधिक वाहने धावतात 'इन्श्यूरन्स' विना

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शहरामधील अर्ध्याहून अधिक वाहने इन्शूरन्सशिवायच रस्त्यावर धावत आहेत. त्यामुळे रस्त्यावर एखादी दुर्घटना झाल्यास, अपघात झाल्यास त्यांना त्यांच्या वाहनांच्या नुकसानीची कोणतीही भरपाई मिळू शकत नाही. वास्तविक अपघातात गाडीचे होणाऱ्या नुकसानाची भरपाई मिळावी यासाठीच हा विमा आहे. मात्र, क्षुल्लक दुर्लक्षामुळे किंवा आळसामुळे वाहनचालक आपल्या गाडीचा विमा काढत नाहीत. आरटीओ कार्यालयातील माहितीनुसार शहरात दीड ते दोन लाख वाहनांचा विमाच काढण्यात आलेला नाही.

देशात वाहनांच्या वाढत्या अपघातांच्या संख्येमुळे मोटार वाहन कायदा १९८८ च्या कलम १४६ नुसार प्रत्येक वाहनांचा विमा काढणे आवश्यक करण्यात आले आहे. ज्यामुळे वाहनाची नुकसान भरपाई मिळते. शिवाय थर्ड पार्टी विमा काढलेला असल्यास अपघातात अन्य व्यक्ती किंवा वस्तूचे नुकसान झाल्यास त्याचीही भरपाई मिळू शकते. तथापि, अद्याप हा विमा काढण्याबाबत म्हणावी तेवढी जागृती झालेलीच नाही.

औरंगाबाद शहरात वाढत्या अपघातांची संख्या लक्षात घेत पोलिसांनी जिवित हानी टाळण्याच्या उद्देशाने दुचाकीचालकांना हेल्मेटसक्ती केली. आता बहुतांश औरंगाबादकरांना हेल्मेट घालणे आपल्याच फायद्याचे आहे, हे कळून चुकले आहे व ते हेल्मेट घालतही आहेत. त्यासोबतच वाहनाचा विमा, थर्ड पार्टी विमा देखील आपल्याच फायद्याचा आहे, हे त्यांना पटणे गरजेचे आहे.

नवे वाहन खरेदी केल्यावर त्याची पासिंग करताना वाहनाचा विमा काढणे आवश्यक असते. मात्र, एकदा विमा काढला की, त्यानंतर पुन्हा वाहनचालक तो विमा काढण्याची तसदी घेत नाही, असे दिसून येते. वर्षानुवर्ष त्या वाहनाचा विमा काढला जात नाही. शहरातील रस्त्यांवर अपघाताचे वाढते प्रमाण लक्षात घेऊनही वाहनचालक वाहनांचा विमा काढण्यासाठी पुढाकार घेत नाहीत.

विमा क्लेमला अडचणी जास्त

एकीकडे अनेक वाहने विमा उतरवित नाही. तर दुसरीकडे अनेक वाहनधारकांना विमा कंपन्यांमध्ये क्लेम टाकल्यानंतर अनेक अडचणींना सामारे जावे लागत आहे. कागदपत्रांची जमवाजमव, क्लेम सेटल करण्यासाठी होणारा ताण यामुळे अनेकजण विमा काढण्याच्या भानगडीत पडत नाही.

थर्ड पार्टी व संपूर्ण विम्यातील फरक

वाहनाचा दोन प्रकारचा विमा केला जातो. पहिला "थर्ड पार्टी विमा' व दुसरा "थर्ड पार्टीसह संपूर्ण वाहनाचा विमा' (पॅकेज) उतरविला जातो. थर्ड पार्टी हा विमा कायद्याने आवश्यक असतो, तर कर्ज असलेल्या किंवा स्वतःची जोखीम कमी करण्यासाठी थर्ड पार्टी संरक्षणासह संपूर्ण वाहनाचा विमा केला जातो. थर्ड पार्टी विम्यात वाहन सोडून त्याचा चालक, क्लीनर, प्रवासी किंवा हमाल यांना; तसेच इतर वाहने व मालमत्ता यांच्या नुकसानीची न्यायालयामार्फत भरपाई मिळू शकते. संपूर्ण विम्यात वरील संरक्षणासह स्वतःच्या वाहनाच्या नुकसानीची भरपाई मिळू शकते. सर्वसाधारण विम्यात वाहनमालकाकडून हवी असलेली भरपाई न्यायालयात दावा करून मिळवावी लागते, तर वाहनाची अपघातामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई वाहनमालकास विमा कंपनीकडून दावा करून घ्यावी लागते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कराराचे नूतनीकरण नाहीच

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
औषधीभवनच्या कराराचे नूतनीकरण करणारच नाही, अशी ठाम भूमिका महापालिकेचे आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांनी सोमवारी पुन्हा एकदा घेतली. एका इमारतीमुळे अनेक नागरिकांना त्रास होत असेल, तर ते कसे सहन करणार, असा सवाल त्यांनी केला. नाल्यावर बांधण्यात आलेल्या सर्वच इमारतींचे बांधकाम परवाने व कराराची तपासणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

पावसाळ्यापूर्वी नाला सफाईचा आढावा घेण्यासाठी बकोरिया यांनी ४ मे रोजी औषधी भवनला भेट दिली. या इमारतीखाली साचेलला गाळ पाहून ते अवाक् झाले. हा गाळ काढण्यासाठी कठोर निर्णय घ्यावा लागेल, असे त्यांनी नमूद केले होते. औषधी भवनच्या इमारतीची फाइल सादर करण्याचे आदेश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले, पण फाइल गहाळ झाल्याचे अधिकाऱ्यांनी बकोरियांच्या लक्षात आणून दिले. आयुक्तांच्या आदेशानंतर गहाळ फाइल दोन दिवसांत सापडली. त्यानंतर बकोरिया यांनी औषधी भवनच्या इमारतीच्या कराराचे नूतनीकरण करणार नाही, अशी भूमिका जाहीर केली. त्यामुळे खळबळ उडाली.

सोमवारी औषधी भवन इमारतीसंदर्भात औरंगाबाद जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष रावसाहेब खेडकर यांनी आमदार अतुल सावे यांच्या नेतृत्वाखाली बकोरिया यांची भेट घेऊन आपले म्हणणे मांडले. यावेळी असोसिएशनचे अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

यासंदर्भात पत्रकारांनी बकोरिया यांना विचारले असता ते म्हणाले, 'पदाधिकारी भेटले. त्यांनी त्यांचे म्हणणे मांडले आहे. औषधीभवनच्या करारातील अटी, शर्तींप्रमाणे कारवाई केली जाणार आहे. एखाद्या इमारतीमुळे अनेक लोकांना त्रास होत असेल, तर ते कसे सहन करणार. औषधी भवनच्या इमारतीच्या कराराचे नूतनीकरण करणार नाही. नाल्यावर इमारती बांधण्यासाठी महापालिकेने परवानगी द्यायलाच नको होती. आता नाल्यांवरच्या सर्वच इमारतींचे परवाने तपासण्याचा निर्णय घेतला आहे.'

नूतनीकरणाचा उल्लेख नाही ः खेडकर
औरंगाबाद जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष खेडकर यांनी यासंदर्भात म्हटले आहे की, आम्ही दलालवाडी येथील नाला औषधी भवनसाठी महापालिकेकडून भाडेपट्टा तत्वावर घेतला आहे. त्याचा करारनामा २२ नोव्हेंबर १९८३ रोजी करण्यात आला. भाडेपट्टा ९९ वर्षांसाठी करण्यात आला आहे. करारनाम्याच्या पान क्रमांक ५वर अट क्रमांक ८मधील तरतुदीनुसार उभयतांच्या सहमतीने ३० वर्षांच्या कालावधीनंतर भाडेपट्टा शुल्क वाढवण्यात येईल. करारनाम्याचे ३० वर्षांनंतर नूतनीकरण करावे, असा कुठेही उल्लेख करण्यात आलेला नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मेघगर्जनेसह हलक्या सरी

$
0
0

औरंगाबाद ः शहरात सोमवारी रात्री साडेनऊच्या सुमारास जोरदार वारा आणि मेघगर्जनेसह पावसाच्या हलक्या सरींनी हजेरी लावली. दोन दिवसांपासून शहर परिसरात ढगाळ वातावरण आहे. रविवारी शहरातील काही भागांमध्ये जोरदार पावसाने हजेरी लावली होती. आज रात्री साडेनऊच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली. सिडको, हडको, एन ८, चिकलठाणा, गारखेडा परिसर, सातारा परिसरासह जुन्या शहरातील औरंगपुरा, टिळकपथ भागात हलक्या सरी बरसल्या. त्यामुळे उकाड्यापासून शहरवासियांना तात्पुरता दिलासा मिळाला.

निलंगा परिसरात गारपीट
निलंगा परिसरात सोमवारी दुपारी सुमारे अर्धा तास गारांचा पाऊस झाला. त्यासोबतच वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने हजेरी लावली. यामुळे काही काळ जनजीवन विस्कळीत झाले होते. उकाड्याने त्रस्त झालेल्या नागरिकांना काहीकाळ पावसामुळे दिलासा लाभला. लातूर येथील आपत्ती व्यवस्थापन विभागाने रविवारीच जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह गारा पडणार असल्याचे अंदाज व्यक्त केला होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मराठवाड्यात विक्रमी टँकर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
दुष्काळचक्रात अडकलेला मराठवाड्याला आता केवळ टँकरचा आधार आहे. पर्जन्यमानाची घसरलेली आकडेवारी पाहता यंदा मराठवाड्यात टँकरने साडेतीन हजारांचा टप्पा पार केला आहे. गेल्या सहा वर्षांच्या तुलनेत हा आकडा सर्वाधिक आहे.

दुष्काळाचे चटके सोसणाऱ्या मराठवाड्यातील पाणीटंचाई दिवसेंदिवस तीव्र होत असून, सध्या विभागातील २६२२ गावे व ९५१ वाड्यांमधील ५३ लाख ३० हजार नागरिकांची तहान ३५१६ टँकरद्वारे भागविण्यात येत असल्याचे भीषण वास्तव आहे.

यंदाच्या दुष्काळात पाण्यामुळे लातूर शहराची मोठी चर्चा आहे, मात्र २०१० हे वर्ष वगळता आतापर्यंत लातूर जिल्ह्यातील टँकरसंख्येने दुहेरी आकडाही गाठला नाही. यंदा मात्र ही संख्या तीनशेवर गेला आहे. बीड जिल्ह्याचाही गेल्या सहा वर्षांच्या तुलनेत यंदा टँकरचा आकडा दहापट वाढला आहे. परभणी, हिंगोली जिल्ह्यांना यापूर्वी इतर जिल्ह्यांच्या तुलनेत फारसा पाणीटंचाईचा सामना करावा लागला नाही, मात्र यावर्षी परिस्थिती बिकट झाली आहे. बीड जिल्ह्यानंतर सर्वाधिक टँकर औरंगाबाद जिल्ह्यात सुरू आहेत. जालना, नांदेड, उस्मानाबाद जिल्हांमध्येही टँकरचा आकडा झपाट्याने वाढत अाहे. त्यात येणाऱ्या महिन्याभरात वाढ होण्याची शक्यता आहे.

एकीकडे पाण्याची सोय करत असताना प्रशासनाला कसरत करावी लागत आहे, मात्र दुसरीकडे टँकरच्या फेऱ्यांच्या माध्यमातून पैसे उकळण्याचे प्रकार अनेक ठिकाणी सुरू आहेत. यासंदर्भात प्रशासनाकडे तक्रारीही प्राप्त होत असतात. टँकर हा पाणीटंचाईवरील सर्वात शेवटचा उपाय असला, तरी हा पर्याय सहजतेने वापरण्यात येतो. बीडीओंच्या स्तरावर टँकरच्या फेऱ्यांवर वॉच ठेवण्यात येते. पाणीटंचाईची तीव्रता पाहता बहुतांश टँकरला ग्लोबल पोझिशनिंग सिस्टिमसारख्या (जीपीएस) सुविधा लावण्यात आल्या की नाही, याची बारकाईने चौकशी बहुतांश ठिकाणी होत नसल्याचे चित्र आहे.

मे महिन्यातील वर्षनिहाय टँकर
जिल्हा..........२०१०....२०११....२०१२....२०१३.....२०१४.....२०१५....२०१६
औरंगाबाद......९६.....१९........८३.......६५९......८२.......४५१......८०८
जालना...........४३......०२.......४१........५११.......०२.......२१९......५१५
परभणी..........४९......०१........०४.......२०.........००.......१३.........२३१
हिंगोली..........३३.......०३.......१०........१०.........००.......०६.........३८
नांदेड............३५७....०१.......८९.......१६२.......०३.......१८७.......३३१
बीड..............८२......२७.......१३७.....४९५......७३.......३६१.......८९०
लातूर............१८०.....००........२९......०४.........००.......६२........३०३
उस्मानाबाद...०४.......०१........७३......२१५.......४९.......११३.......४००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राष्ट्रवादीतर्फे सोमवारी दुष्काळी परिषद

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
मराठवाड्यातील दुष्काळप्रश्नी आतापर्यंत कोणतीही ठोस उपाययोजना न करणाऱ्या सरकारला जागे करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे औरंगाबादेत १६ मे रोजी दुष्काळी परिषदेचे आयोजन करण्यात येत असल्याचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी सांगितले.

'दुष्काळ, अतिवृष्टी, गारपीट अशा संकटात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला आहे. यावेळचा दुष्काळाचा प्रश्न गंभीर आहे. संभाव्य दुष्काळाची कल्पना शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांना दिली होती, परंतु सरकारने काहीच ठोस उपाययोजना न आखल्याने मराठवाड्यातील शेतकरी, नागरिकांना पाणी प्रश्नाचा तीव्रतेने सामना करण्याची वेळ आली आहे. सरकारला जागे करण्यासाठीच सोमवारी दुष्काळ परिषद आयोजित करण्यात आली आहे. या परिषदेत दुष्काळाकडे दुर्लक्ष करणाऱ्या सराकारविरुद्धच्या आंदोलनाची दिशा निश्चित केली जाणार आहे,' असे मुंडे यांनी सांगितले.

या परिषदेत राष्ट्रवादी वेलफेअर ट्रस्टतर्फे आत्महत्या केलेल्या १४१ शेतकऱ्यांच्या विधवांना प्रत्येकी १५ हजार रुपयांची मदत केली जाणार आहे. पेरणीची पूर्व तयारी, बी-बियाणे, खते यासाठी ही मदत केली जात आहे. दुष्काळी परिषद प्रत्येक जिल्ह्यात घेण्यात येणार आहे. या परिषदेत शेतकऱ्यांवरील संकटे आणि त्यावर कशी मात करता येईल, याबाबत सविस्तर चर्चा करण्यात येणार आहे. देवगिरी कॉलेजच्या मैदानावर १६ मे रोजी सायंकाळी साडेपाच ते रात्री आठ यावेळेत ही परिषद होईल. या परिषदेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह पक्षाचे सर्व प्रमुख नेत्यांची उपस्थिती राहाणार आहे, असे त्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मद्यउद्योगांची ६० % पाणीकपात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मराठवाड्यासह १२ जिल्ह्यांतील मद्यउद्योगांची मंगळवारपासून आणखी दहा टक्के पाणीकपात केली जाणार आहे. मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या आदेशानुसार दहा मेपासून दुसऱ्या टप्प्यातील पाणीकपातीची अंमलबजावणी होईल. यासह सर्वसाधारण उद्योगांसाठी पाच टक्के म्हणजे एकूण २५ टक्के पाणीकपात होईल.

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर उद्योगांची विशेषतः मद्यउद्योगांची पाणीकपात करावी, या मागणीसाठी कोपरगाव येथील संजय काळे यांनी मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठात विनंती करणारी जनहित याचिका दाखल केली होती. खंडपीठाच्या कार्यक्षेत्रातील ७,६९८ गावांना २५ टक्क्यांपेक्षा कमी पाणी मिळते. औरंगाबाद शहरात अनेक भागात तीन ते चार दिवसानंतर पाणी मिळते. पिण्याच्या पाण्यात ५० ते ९० टक्के कपात करण्यात आली असून, मद्य उद्योगाला पुरवण्यात येणार पाणी बंद करावे, अशी विनंती करण्यात आली होती. जायकवाडी धरणातील पाणीसाठ्यातून ३०.१८ दशलक्ष घनमीटर पाणीपुरवठा केला जात होता. त्यात २६.८७ दशलक्ष घनमीटर सर्वसाधारण उद्योगांना तर बिअर, मद्य व शीतपेय उद्योगांसाठी ३.३१ दशलक्ष घनमीटर पाणीपुरवठा केला जात होता. उद्योगांची गेल्या जुलै महिन्यात १० टक्के पाणीकपात केली होती. एप्रिलमध्ये त्यात दहा टक्के वाढ झाली होती. २५ एप्रिल रोजी खंडपीठाच्या आदेशानुसार ठरविलेल्या वेळापत्रकानुसार मंगळवार दहा मेपासून सर्वसाधारण उद्योगांची पाच टक्के, तर मद्य उद्योगांची दहा टक्के कपात करण्यात येणार आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार; उद्योगांसाठी ४८.०२ दशलक्ष घनमीटर पाणी उचलले जात होते. त्यापैकी २२ दशलक्ष घनमीटर पाणी घरगुती वापरासाठी एमआयडीसीमार्फत पुरविले जाते. मंगळवारपासून उद्योगांना उचलण्यात येणाऱ्या पाण्यात दोन दशलक्ष घनमीटरने कपात करण्यात येईल. नगर जिल्ह्यांतील ११ प्रकल्पांचीही पाणीकपात वेळापत्रकानुसार करण्यात येईल.

शिफ्ट बंद होणार?

मद्यउद्योगांची ६० टक्के पाणीकपात होणार असल्याने अनेक कंपन्यांमधील एक शिफ्ट बंद होण्याची भीती निर्माण झाली आहे. औरंगाबाद औद्योगिक वसाहतींमध्ये मद्य, बिअर निर्मिती करणारे ११ उद्योग आहेत. याठिकाणी ५०००हून अधिक कामगार कार्यरत आहेत. दुष्काळामुळे उद्योगांची पाणीकपात झाल्यामुळे शिफ्ट बंद झाल्यास त्याचा रोजगारावरही परिणामी होण्याची शक्यता सूत्रांनी वर्तविली.

- मराठवाड्यातील मद्य कारखाने १६
- औरंगाबादमधील कारखाने ११

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘जलयुक्त शिवारा’पासून काँग्रेस, राष्ट्रवादी दूर

$
0
0

सातारा : जलयुक्त शिवार या चळवळीत प्रसिद्ध अभिनेते, लेखक, उद्योजक सहभागी होत असताना काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस मात्र दूर असल्याची टीका ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी केली. देवळाईतील बंधाऱ्याच्या कामाची त्यांनी सोमवारी पहाणी केली. त्यावेळी त्या बोलत होत्या.

त्या म्हणाल्या,'अनेक वर्षे सत्तेत राहिलेल्या काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसने या दुष्काळी परिस्थितीत जलसंधारणाच्या कामात कोणतेही योगदान दिले नाही. जलयुक्त शिवार योजनेमुळे अनेक गावे टँकरमुक्त झाली असून, पिण्याच्या पाण्याचीही सोय झाली आहे. यशस्वी योजना म्हणून 'जलयुक्त'ची देशात नोंद होईल. जलयुक्त शिवार ही चळवळ झाली अाहे. त्यात श्रमदानासाठी कलाकार, लेखक, एनजीओ काम करत करीत आहेत. असे असताना काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे मात्र या चळवलीपासून दूर अाहे.'

देवळाईत म्हाडा कॉलनीच्या मागील बाजूस नाला खोलीकरण व रुंदीकरणाचे काम सुरू आहे. यावेळी आमदार अतुल सावे, नारायण कुचे, संतोष दानवे, डॉ. भागवत कराड, एकनाथ जाधव, किशनचंद तनवाणी, उपमहापौर प्रमोद राठोड, दिलीप थोरात, विनायकराव हिवाळे, अप्पासाहेब हिवाळे, सविता कुलकर्णी, सुधीर फुलवाडकर, ज्ञानेश्वर बोरसे, ऋषी भालेराव, स्वप्नील शिरसाट आदींसह पदाधिकारी, कार्यकर्त्यांची उपस्थ‌िती होती.

भूम‌िपूजन झालेच नाही
बंधाऱ्याच्या बांधकामाचे भूम‌िपूजन ग्राम विकासमंत्री पंकजा मुंडे-पालवे यांच्या हस्ते होणार, असे भाजपकडून सांगण्यात आले होते. प्रत्यक्षात त्यांनी बंधाऱ्याच्या कामाची पाहणी केली. त्यामुळे पूजनासाठी आणलेले नारळ, व साहित्य कार्यकर्त्यांना परत न्यावे लागते. यासंदर्भात बोलताना शहराध्यक्ष किशनचंद तनवाणी यांनी, नियोजित कार्यक्रमास काही कारणास्तव उशीर झाला. मंत्री मुंडे यांना अन्य कार्यक्रमासाठी लगेचच जाणे आवश्यक होते.त्यामुळे भूम‌िपूजनाचा कार्यक्रम होऊ शकला नाही, असे सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘सुखना’चे रुंदीकरण, खोलीकरण सुरू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
चिकलठाणा येथील चौधरी कॉलनी आणि आसपासच्या परिसरातील पाण्याची तीव्र टंचाई लक्षात घेऊन सुखना नदीचे पात्र रुंद व खोल करण्यात येत आहे. यंदाच्या पावसाळ्यात पाठीसाठा झाल्यास नागरिकांची पाण्यासाठी भटकंती कमी होईल; तसेच भूजल पाणीपातळी वाढण्यास मदत होणार आहे.

चिकलठाणा गावाजवळ उभारण्यात आलेल्या मिनी घाटी परिसरामागे चौधरी कॉलनीसह अनेक वसाहती उभ्या राहिल्या आहेत. या भागात पाण्याची तीव्र टंचाई भासत आहे. नागरिकांना दररोजच त्रास सहन करावा लागत आहे. टँकरसाठी पैसे मोजूनही वेळेवर पाणी मिळेल याची शाश्वती नाही. पाण्याचे गंभीर संकट लक्षात घेऊन नगरसेविका वैशाली जाधव यांनी सुखना नदी पात्राचे रुंदीकरण व खोलीकरण करण्याचे काम हाती घेतले.

चौधरी कॉलनीपासूनच सुखना नदी वाहते. अनेक ठिकाणी नदीच्या पात्रात गाळ, कचरा साठलेला आहे. त्यामुळे नदीचे पात्र मोठ्या प्रमाणात दूषित पाण्याने व्यापलेले आहे. दुर्गंधीयुक्त पाणी, रासायनिक प्रक्रिया केलेले पाणीही नदी पात्रात सोडण्यात येते. त्यामुळे सुखना नदीच्या पाण्याचा उपयोग परिसराला फारसा होताना दिसत नाही. नदीचे पात्र मोठे केल्यास पाणीसाठा होईल आणि खळाळून वाहणारे नदीचे पाणी किमान वापरासाठी उपयुक्त ठरेल. या हेतूनेच नदी पात्राचे सरळीकरण व खोलीकरण हाती घेण्यात आले आहे. चौधरी कॉलनीपासून दीड-दोन किलोमीटर अंतरापासून नदी पात्राचे खोलीकरण व सरळीकरण करण्यात येत आहे. नदीचे पात्र मोठे करता येते तेथे खोलीकरणाचे काम होत आहे. जेसीबीने हे काम करण्यात येत असल्याने हे काम संथगतीने होत आहे. पोकलेनचा वापर केल्यास हे काम अधिक गतीने होऊ शकेल. नगरसेविकेने या कामासाठी पुढाकार घेतला असला, तरी महापालिकेने अद्याप या कामाचे महत्त्व लक्षात घेतलेले नाही. सुखना नदीचे पात्र रूंद व सरळीकरण केल्यास त्याचा फायदा चिकलठाण परिसरातील अनेक भागांना होऊ शकेल. रासायने आणि वीटभट्ट्यांमुळे सुखनाचे पाणी दूषित झाले आहे. लोकसहभाग आणि पालिकेने या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष दिल्यास शेतीबरोबरच पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही काही अंशी सुटू शकणार आहे.

सुखना नदीचे पाणी उपयोगात आणण्याचा विचार होणे अत्यंत आवश्यक आहे. या प्रश्नाकडे सर्वांचेच दुर्लक्ष झाले आहे. सांडपाणी, रसायनांमुळे नदीचे पामी दूषित झाले आहे. पाच-सहा किलोमीटर अंतराचे सरळीकरण व खोलीकरण झाल्यास या भागातील भूजल पातळी वाढू शकेल. लोकप्रतिनिधींनी या प्रश्नाकडे लक्ष दिल्यास मोठा जलसाठा होण्यास मदत होऊ शकेल.
- वैशाली जाधव, नगरसेविका, चौधरी कॉलनी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘जलयुक्त’साठी ३१ मेची डेडलाइन

$
0
0

औरंगाबाद ः पावसाळा सुरू होण्यास काही दिवस शिल्लक असल्यामुळे जिल्ह्यातील जलयुक्त शिवार योजनेंतर्गत असलेली कामे १५ दिवसांत पूर्ण करण्याचे आदेश अपर जिल्हाधिकारी पी. एल. सोरमारे यांनी दिले आहेत.

शिवारातील पाणी शिवारात जिरवण्यासाठी शासनाच्या अत्यंत महत्त्वाकांक्षी योजनेकडे जिल्ह्यात दुर्लक्ष होत आहे. पावसाळा तोंडावर आला असताना गेल्यावर्षीचे केवळ तीन गावांत शंभर टक्के कामे पूर्ण झाली आहेत. 'जलयुक्त'च्या संथ कारभारामुळे आता जूनपर्यंत कामे पूर्ण करण्याची मुभा शासनाने दिली असली, तरी अप्पर जिल्हाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांना ही कामे १५ दिवसांत पूर्ण करण्याचे सांगितले. जलयुक्त शिवार अभियानामध्ये शंभर टक्के कामे पूर्ण झालेल्या गावांची संख्या अत्यंत कमी आहे. त्यामुळे सोरमारे यांनी तालुक्यातील अधिकाऱ्यांची नुकतीच आढावा बैठक घेतली. कृषी, स्थानिक स्तर, बांधकाम विभागाने रोजगार हमी योजनेची कामे तातडीने हाती घ्यावी, असेही आदेश यावेळी देण्यात आले.

पावसाळा सुरू होण्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक आहेत. दुसरीकडे जिल्ह्यात 'जलयुक्त'च्या कामांची कासवगती कायम आहे. या अभियानासाठी नवीन गावांचीही निवड करण्यात आली आहे. त्यामुळे गेल्यावर्षी अपूर्ण राहिलेल्या कामे पूर्ण करण्यासाठी वेळ कमी असून, ही कामे १५ दिवसात पूर्ण करण्याच्या दृष्टीने नियोजन करावे, अशा सूचना यावेळी देण्यात आल्या. पाणीटंचाई निवारणासाठी गावांमध्ये नियोजन करून पाणीपुरवठा करावा, रोहयोचे कामे तातडीने मजुरांना तातडीने काम उपलब्ध करून द्यावे, यंत्रणेची कामे सुरू नसल्यामुळे मजुरांची संख्या कमी दिसत आहे, कामे सुरू न झाल्यास कठोर कारावाई करण्याचा इशाराही यावेळ सोरमारे यांनी दिला.

जलयुक्त शिवार, पाणीटंचाई, रोहयो कामांसाठी तालुकास्तरीय आढावा बैठकीसाठी उपजिल्हाधिकारी संगीता सानप, उपविभागीय अधिकारी केशव नेटके, शशिकांत हदगल, जिल्हा कृषी अधिक्षक पडवळ आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


त्याने लग्नाचा खर्च दिला गावच्या पाण्यासाठी

$
0
0

अरुण समुद्रे, लातूर

राज्यात नियोजनाचा दुष्काळ आणि पाण्याची टंचाई असली तरी, संवेदनशील मनाची काही कमतरता नाही. याचा प्रत्यय लातूर जिल्ह्यातील जनतेला रोज येत आहे. पंजाबमधील खालसा पंथाच्या नागरिकांनी लातूरात पाण्याचे वाटप करणे असेल किंवा नागपूर, कर्जत येथून रेल्वेने शुद्ध पाण्याच्या बाटल्या, जार पाठवणे हे देशातले झाले. सातासमुद्रापार दुबई येथे असलेल्या हितेंद्र सिंग या युवकाने त्याच्या लग्नाचा खर्च कमी करून तो पैसा औराद शहजनी (ता. निलंगा) येथे सुरू असलेल्या तेरणा नदी पुनरुज्जीवनासाठी दिला आहे.

औराद शहजनी गावाच्या तीन बाजूने तेरणा नदी वाहते. त्यातील गाळ लोकसहभागातून काढण्याचे काम गावकऱ्यांनी हाती घेतले आहे. त्याला 'आर्ट ऑफ लिव्हिंग'ने मोठे पाठबळ दिले आहे. या कामासाठी गावकऱ्यांनी एक समिती तयार केली. समितीचे कार्यकर्ते विकास कुलकर्णी म्हणाले, 'तेरणा नदीत किमान चार किलोमीटर अंतरापर्यंतचा गाळ काढण्याचे निश्चित झाले आहे. त्यासाठी किमान एक कोटी रूपये लागणार आहेत. त्यातील पन्नास टक्के रक्कम 'आर्ट ऑफ लिव्हिंग'च्या माध्यमातून मिळणार आहे. ५० लाख रुपये गावकऱ्यांकडून जमा केले जाणार आहेत. त्यासाठी सध्या २३ लाख रुपये जमा झाले आहेत. आमच्या गावातील काही जण पुण्यात राहतात. त्यासोबतच प्रशांत गिरबने यांच्या मित्राने आम्हाला दुबईहून तीन लाख रुपयांची मदत पाठवली आहे.'

या बाबत गिरबने म्हणाले, 'मी एप्रिलमध्ये फेसबुकवर औराद शहजनी येथे लोकसहभागातुन सुरू असलेल्या तेरणा नदीच्या पुनरुज्जीवनाची माहिती टाकली होती. अहमदाबाद इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (आयआयएम) मधील माझे मित्र व सध्या दुबईत असलेल्या हितेंद्रसिंग यांनी वाचली. त्यानंतर त्यांनी मला फोन करून माझे लग्न नऊ मे रोजी आग्रा येथे आहे. त्या लग्नातील अनावश्यक खर्च कमी करून त्यातील दहा लाख हे देशभरातील पाण्याच्या समस्येसाठी देण्याचे ठरवले आहे. तुझ्या गावकडील कामासाठी मी तीन लाख रुपये देणार आहे. मला त्यांचे बँक डिटेल्स पाठव. त्यानंतर त्यांने समितीच्या नावाने तीन लाखाचा चेक ही पाठवला.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोरड्या गोदेतील वाळूवर दरोडा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पैठण
शेवगाव तालुक्यातील मुंगी वाळूपट्टा घेणाऱ्या कंत्राटदाराने पैठण हद्दीतील नायगाव शिवरातील नदीपात्रात घुसखोरी केली आहे. संबंधित कंत्राटदार नायगाव शिवरातील नदीपात्रातून तीस ते पस्तीस फुट खोल उत्खनन करून वाळू उपसा करीत असल्याने या भागातील भूजल पातळीवर याचा विपरित परिणाम होत असून, या भागातील वाळू उत्खनन रोखण्याची मागणी या भागातील गावकऱ्यांनी केली आहे.

पैठण तालुक्यातील एकही वाळूपट्टा सध्या सुरू नाही. गेल्या काही दिवसांपासून शेजारच्या शेवगाव तालुक्यातील मुंगी वाळूपट्टा एका कंत्राटदाराने घेतला आहे. सुरुवातीला कंत्राटदाराने मुंगी शिवारातील नदीपात्रातून वाळूचे उत्खनन केले. मुंगी हद्दीतील वाळू संपल्याने गेल्या काही दिवसांपासून पैठण हद्दीतील नायगाव येथे गोदापात्रातून वाळूचा उपसा सुरू केला आहे. वाळूचे अवैध उत्खनन करताना संबंधित कंत्राटदार पैठण हद्दीतील नदीपात्रातील अनेक ठिकाणाहून पोकलेन व जेसीबी मशीनच्या सहाय्याने ३० ते ३५ फूट खोल खोदून उत्खनन करत आहे. परिणामी नायगावसह या भागातील गावातील भूजल पातळीवर याचा विपरित परिणाम होत आहे.

नायगाव येथील काही तरुणांनी मुंगी वाळूपट्टा घेणाऱ्या कंत्राटदारला नायगाव शिवारातील नदीपात्रातून वाळू उपसा करण्यापासून रोखले. त्यावेळी त्यांना काही गुंडांनी धमकावल्याचे किशोर दसपुते यांनी सांगितले. सध्या आमच्या गावातील भूजल पातळी खूप खाली गेली अाहे. गावाजवळ नदीपात्रात होत असलेल्या वाळू उत्खननामुळे भूजल पातळीत आणखी घट होणार आहे. त्यामुळे आमच्या गावाला व परिसरातील अनेक गावांना नेहमीच पाण्याचे दुर्भिक्ष जाणवणार असल्याचे दसपुते म्हणाले. पैठण तहसील कार्यालय व जिल्हाधिकारी यांनी या गंभीर विषयाकडे लक्ष देऊन आमच्या भागातील अवैध वाळू उपसा थांबवावा, अशी मागणीही दसपुते, मायगाव येथील संतोष हिरगे, सुरेश उगले यांनी केली.

दरम्यान, सध्या पैठण शहर, वडवाळी, वाघाडी, आवडे उंचेगाव, टाकळी अंबड, हिरडपुरी या ठिकाणी सुरू असलेल्या वाळू चोरीविषयी व मुगी वाळूपट्टा घेणाऱ्या कंत्राटदाराने पैठण हद्दीत सुरू केलेल्या अवैध वाळू उत्खननाविषयी पैठणचे तहसीदार किशोर देशमुख यांच्याकडे विचारणा केली असता, 'सध्या मी जिल्हाधिकारी कार्यालयात असून, याविषयी नंतर सांगतो,' असे त्यांनी सांगितले.

वाळू चोरीविरोधी पथक गायब
पैठणचे तहसीलदार किशोर देशमुख यांनी एक महिन्यापूर्वी वाळू चोरी रोकण्यासाठी फिरते वाळू विरोधी पथक स्थापन केले होते. या पथकाने सुरुवातीला वाळू चोरणाऱ्या वाहनांवर कारवाई केली, मात्र गेल्या काही दिवसांपासून या पथकाचे कामकाज थंडावले आहे. त्यामुळे पैठण शहर व परिसरातील वाळू चोरी जोरात सुरू आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

२३८ शाळांचे होणार काय?

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या २३८ शाळांमध्ये २० पेक्षा कमी पटसंख्या आहे. या शाळा सुरू ठेवायच्या की लगतच्या गावामध्ये समायोजन करायचे, हा निर्णय राज्य सरकार घेणार आहे. हा विषय तूर्तास जरी चर्चिला जात नसला तरी नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वी त्याचा निर्णय होणार आहे.
जिल्हा परिषद शाळांमध्ये कमी होणारी विद्यार्थीसंख्या हा चिंतेचा विषय आहे. पटसंख्येच्या प्रमाणात शिक्षक शाळांमध्ये दिले जातात. मात्र, अलीकडच्या काळात विद्यार्थ्यांची संख्या विशेषः ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळांमधील संख्या झपाट्याने कमी झाल्याने या शाळा बंद कराव्यात की काय ? असा विचार सरकारने केला होता. त्यास शिक्षक संघटनांनी जोरदार विरोध दर्शवित अन्य उपाययोजनांची मागणी केली होती. राज्याच्या शिक्षण विभागाने केलेल्या सर्वेक्षणानुसार औरंगाबाद जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या २,१०६ शाळा आहेत. त्यात दहा पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांची संख्या ७१ असून ११ ते २० पटसंख्येच्या २३८ शाळा आहे.
तालुक्याच्या गावानजीक असलेल्या अनेक गावांमधील शाळांमध्ये दहापेक्षा कमी विद्यार्थी उरले असून दोन शिक्षक याठिकाणी कार्यरत असतात. कन्नड तालुक्यातील एका शाळेत आठ विद्यार्थी असून दोन शिक्षक आहेत. नवीन शैक्षणिक वर्षात ही शाळा बंद पडण्याची भीती आहे. जिल्हा परिषदेतील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या २३८ शाळांची माहिती राज्याच्या शिक्षण विभागाकडे पूर्वीच पाठविण्यात आली आहे. नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वी कमी पटसंख्या असलेल्या शाळांच्या बाबत निर्णय अपेक्षित आहे. सरकारचे ठोस धोरण नसल्यामुळे शिक्षक मंडळी मात्र संभ्रमात सापडली आहेत.
कमी पटसंख्या असलेल्या शाळांबाबत अजून कुठलाच निर्णय झालेला नाही. यासंदर्भात योग्य तो निर्णय वरिष्ठ कार्यालयाकडून होईल. त्यामुळे शिक्षकांनी संभ्रमात राहण्याची गरज नाही.
- आर. एस. मोगल, शिक्षणाधिकारी, प्राथमिक, जिल्हा परिषद

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आर्थिक गणित बिघडले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
सुखना नदी परिसरातून वाहात असली तरी चिकलठाणा वॉर्डातील चौधरी कॉलनीजवळ असलेल्या दत्तनगर, गोरक्षनाथ कॉलनी, पटेलनगर, हिनानगर, नारायणपुष्प या भागात पिण्याच्या पाण्याची गंभीर टंचाई आहे. नळ कनेक्शन नसल्याने टँकरवरच नागरिकांना अवलंबून राहावे लागत आहे. त्यामुळे बहुतांश कुटुंबांचे महिन्याचे आर्थिक गणित बघडले आहे.

पूर्व-पश्चिम चार किलोमीटर, तर उत्तर-दक्षिण तीन किलोमीटर अंतर असा मोठा परिसर या वॉर्डात येतो. सध्या काही भागात पाच दिवसांनी पाणी मिळते. पाणी टंचाईची दाहकता दिवसेंदिवस वाढतच असून, नळ कनेक्शन नसलेल्या भागातील नागरिकांना तर पाण्यासाठी जादा पैसे मोजण्याची वेळ आली आहे. पाण्यावरच पैसा खर्च करण्यामुळे अनेक कुटुंबांचे महिन्याचे आर्थिक गणित बिघडले आहे.

बोअर कोरडेठाक
चौधरी कॉलनीत घरोघरी बोअर घेण्यात आले आहेत, परंतु बहुतांश बोअरचे पाणी आटले आहे. बोअर कोरडेठाक पडल्याने पाणीप्रश्न अधिकच गंभीर बनला आहे. काही बोअरला अत्यल्प पाणी आहे. त्यातून दररोज एक-दोन हंडे पाणी मिळत आहे. परिसरात आठ हापसे आहेत. त्यापैकी तीन हापसे सुरू आहेत. या हापशांवर लोकांची गर्दी होत आहे.

चौधरी कॉलनीपासून जवळच असलेल्या हिनानगर, सावित्रीनगर, गोरक्षनाथ कॉलनी, पटेलनगर, नारायण पुष्प या वसाहतींमध्ये, तर महापालिकेचे नळ कनेक्शनदेखिल नाही. त्यामुळे या भागातील नागरिकांना वर्षानुवर्षे पाण्याच्या टँकरवरच अवलंबून राहावे लागत आहे. विकतच पाणी घ्यावे लागत असल्याने अनेकांचे महिन्याचे आर्थिक गणित बघडून गेले आहे. पगारातील बहुतांश रक्कम ही पाण्यावरच खर्च करावी लागत आहे. एक कुटुंब महिन्याकाठी ३० ड्रम पाण्यासाठी किमान ८०० रुपये मोजत आहे. बराचसा भाग गुंठेवारीत येत असल्याने मुलभूत सुविधांपासून नागरिक वंचित आहेत. मुलभूत सुविधा नसल्याने नागरिकांच्या अडचणीत भरच पडली आहे, असे आकाश खोतकर यांनी सांगितले.

या परिसरात शेतीचेही मोठे क्षेत्र आहे. सुखना नदीचे खोलीकरण व सरळीकरण झाले तर जवळपास पाच-सात किलोमीटर अंतराच्या परिसरातील शेतीला त्याचा फायदा होऊ शकेल. तसेच भुजलातील पाणी पातळी वाढू शकेल. बोअर कोरडेठाक पडणार नाहीत. सुखना नदी पात्रातून स्वच्छ पाणी वाहण्याकरिता लोकसहभागही तेवढाच महत्त्वाचा आहे, असे साईनाथ जाधव यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दररोज एक चारा छावणी सुरू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
एकीकडे मराठवाड्यातील तीन जिल्ह्यांत सुरू असलेल्या चारा छावण्यांमध्ये गैरव्यवहाराच्या तक्रारी येत असताना दुसरीकडे शासनाकडून सर्राच चारा छावण्या सुरू करण्यासाठी मंजुरी देण्यात येत आहे. गेल्या काही दिवसांपासून चारा छावण्या सुरू करण्याचा वेग मंदावला असला तरी एप्रिल महिन्यापासून सरासरी दररोज एक या प्रमाणात चारा छावण्यांमध्ये वाढ झाली आहे.

मराठवाड्यातील लातूर, बीड व उस्मानाबाद जिल्ह्यांत १४ मार्च रोजी २९७ छावण्या सुरू होत्या. १८ एप्रिल रोजी ही संख्या वाढून ३६२ झाली. अवघ्या महिन्याभरात चारा छावण्यांच्या संख्येत ६५ने वाढ झाली. मे ‌महिन्यामध्ये छावण्यांच्या संख्येत घट झाली नसली तरी वेग मंदावला आहे. सध्या ‌मराठवड्यात सुरू असलेल्या छावण्यांची संख्या ३६६पर्यंत पोहोचली आहे.

बीड, उस्मानाबाद व लातूर जिल्ह्यांत गेल्या सहा महिन्यांपासून सुरू असलेल्या चारा छावण्यांसाठी ९७ कोटी रुपयांच्या निधीचे वाटप करण्यात आले आहे. यापूर्वी दोन टप्प्यांमध्ये छावण्यांच्या खर्चापोटी ७३ कोटी रुपयांचे वाटप करण्यात आले. मराठवाड्यात रब्बी हंगामाचा मुबलक चारा उपलब्ध्य असल्याचेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले असतानाही यानंतर मार्च महिन्यापर्यंत दोन टप्प्यांमध्ये चारा छावण्यांसाठी ७३ कोटी ६७ लाख रुपयांचे वाटप करण्यात आले होते.

चारा छावण्यांची स्थिती
जिल्हा........चारा छावण्या......जनावरांची संख्या
बीड...............२७२...............३ लाख ११ हजार
लातूर.............०६................२ हजार ५२१
उस्मानाबाद.....८८................८६ हजार ६९५
एकूण.............३६६...............४ लाख ५५५

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images