Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

सैन्यातील जवानाला तीस हजारांचा गंडा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
विमा पॉलिसीवर नफा मिळणार असल्याचे आमिष दाखवून एका सैनिकाची तीस हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी हैदराबाद व दिल्ली येथील तिघांविरुद्ध छावणी पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.
जसवंतसिंह दौलतराव यादव (वय ३५, रा. छावणी) हे सैन्यदलात जवान आहेत. त्यांच्या मोबाइलवर २२ मार्च रोजी एका अनोळखी व्यक्तीचा कॉल आला. त्या व्यक्तीने विमा पॉलिसीची माहिती दिली, तसेच त्यावर लाखो रुपयांचा नफा मिळणार असल्याचे आमिष दाखवले. त्यानंतर त्यांच्याशी वारंवार अग्रवाल व रोशनी (रा. दिल्ली) नावाच्या तरुणीने संपर्क केला. त्यांना सुरक्षा अनामत म्हणून एका बँक खात्यावर तीस हजार रुपये भरावयास भाग पाडले. हा प्रकार ४ एप्रिलपर्यंत सुरू होता.
याप्रकरणी फसवणूक होत असल्याचा संशय आल्यानंतर यादव यांनी छावणी पोलिस ठाण्यात संशयीत आरोपी आर. के. वर्मा (रा. हैदराबाद) व अग्रवाल व रोशनी (रा. दिल्ली) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


साडेचार लाखाचा चुना; कोठडीत वाढ

$
0
0

औरंगाबाद : सैन्याच्या निवृत्त अधिकाऱ्याला चार लाख ४५ हजारांचा चुना लावणाऱ्या महिला आरोपीला गुरुवारपर्यंत (२६ मे) वाढीव पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रभारी प्रभारी मुख्य न्यायदंडाधिकारी ए. ए. खान यांनी मंगळवारी दिले.
या प्रकरणी सैन्यातील निवृत्त अधिकारी शिवानंद सत्यन (६८, रा. म्हाडा) यांनी फिर्याद दिली होती. फिर्यादीनुसार, फिर्यादीने स्वतःच्या देखभालीसाठी पत्नी हवी असल्याची वर्तमानपत्रामध्ये जाहिरात दिली होती. ही जाहिरात वाचून आरोपी शोभा उर्फ सुनिता राजू कुलथे (४०, रा. शेणपुंजी, रांजणगाव) ही फिर्यादीला भेटली व फिर्यादीने तिला पत्नी म्हणून स्वीकारले. एका मंदिरात फिर्यादीने आरोपी महिलेशी लग्न केले. त्यानंतर फिर्यादीसोबत आरोपी महिला आठ दिवस होती. दरम्यान, फिर्यादी हा साहित्य खरेदीसाठी सैन्याच्या कॅन्टीनमध्ये गेला असता, आरोपी महिलेने घरातील सोन्याचे दागिने व रोख ३५ हजार रुपये, असा चार लाख ४५ हजार रुपयांचा ऐवज घेऊन पळ काढला. या प्रकरणी फिर्यादीने तक्रार दिल्यानंतर क्रांतीचौक पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला. संबंधित महिला आरोपीला गुरुवारी (१९ मे) अटक करण्यात येऊन तिला शुक्रवारी कोर्टात हजर करण्यात आले असता, कोर्टाच्या आदेशानुसार आरोपीला मंगळवारपर्यंत (२४ मे) पोलिस कोठडीत ठेवण्यात आले होते. आरोपीच्या पूर्णा येथील बहिणीकडून साडेपाच तोळे सोने जप्त करण्यात आले असून, उर्वरित सोने व रोख रक्कम जप्त करणे बाकी आहे. त्यामुळे आरोपीला वाढीव पोलिस कोठडी देण्याची विनंती कोर्टात करण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मद्य उद्योगाची पाणी कपात ६० टक्केच

$
0
0

म. टा. विशेष प्रतिनिधी, औरंगाबाद
औरंगाबाद खंडपीठाच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या १२ जिल्ह्यांत दारू उद्योगाच्या पाण्याची कपात ६० टक्केच राहणार आहे. राज्यातील दारू कंपन्यांच्या शंभर टक्के पाणी कपातीसाठी सुप्रीम कोर्टात करण्यात आलेल्या विशेष याचिकेत हस्तक्षेप करण्यास उन्हाळी सुटीतील न्या. प्रफुल्ल पंत व न्या. धनंजय चंद्रचूड यांनी नकार दिला. त्यानंतर याचिकाकर्ते संजय काळे यांनी ही विशेष याचिका मागे घेतली.
सामाजिक कार्यकर्ते काळे यांनी राज्यातील दारू कंपन्यांच्या शंभर टक्के पाणी कपातीसाठी सुप्रीम कोर्टाचा दरवाजा ठोठावला होता. मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिलेल्या ६० टक्के पाणी कपातीच्या निर्णयाला आव्हान देण्यात आले होते. दारू आणि बियर कंपन्याच्या पाणीपुरवठ्याला कात्री लावण्याचा निकाल औरंगाबाद खंडपीठाने २५ एप्रिल रोजी दिला होता. प्रशासनाने दारू उद्योगाला याचिकेच्या सुनावणीदरम्यान २० टक्के पाणी कपात केली होती. या कपातीसह २७ एप्रिलपासून अधिकची ३० टक्के अशी एकूण ५० टक्के व १० मेनंतर वाढीव १० टक्के पाणी कपात करण्याचे आदेश खंडपीठाने दिले होते. दारू उद्योगासाठी ही पाणी कपात ६० टक्के इतकी झाली होती. हा निर्णय खंडपीठाच्या कार्यक्षेत्रातील दुष्काळग्रस्त १२ जिल्ह्यांपुरता मर्यादित होता. न्या. पंत व न्या. चंद्रचूड यांच्यासमोर मंगळवारी या प्रकरणाची सुनावणी झाली. मराठवाड्यात भीषण दुष्काळ अाहे. केवळ १ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. दारूच्या कंपन्यांना पाणी दिले जात असल्याने पाणी टंचाईत भर पडली आहे. हा राष्ट्रीय व महाराष्ट्र जल धोरणाचा भंग आहे. या धोरणात पिण्याच्या पाण्याला प्राधान्य दिले गेल्याचा युक्तीवाद काळे यांचे वकील अतुल डक व प्रज्ञा तळेकर यांनी केला.
हायकोर्टाच्या अंतरिम आदेशावर सुप्रीम कोर्टात का आला, औरंगाबाद खंडपीठाने ६० टक्के पाणी कपातीला मान्यता दिली आहे. मग आपल्याला काय पाहिजे, असा सवाल कोर्टाने याचिकाकर्त्यास केला. कपातीचा निर्णय हा पूर्णपणे धोरणात्मक आहे. सरकारच्या प्रशासकीय प्रक्रियेत हस्तक्षेप करणे योग्य नव्हे, असे कोर्टाने सांगितले. आजही औरंगाबाद खंडपीठात याचिका प्रलंबित आहे. सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्याऐवजी दुरुस्तीसाठी हायकोर्टात जाण्याची मुभा सुप्रीम कोर्टाने दिली. कोर्ट याचिका फेटाळत आहे, हे लक्षात येताच संजय काळे यांनी याचिका मागे घेतली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाच वर्षांत लावणार पाच हजार झाडे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर उपलब्ध पाण्याचा कार्यक्षम वापर व्हावा, पाण्याची बचत करून वृक्षांचे जतन व संवर्धन करण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या पैठण तालुक्यातील चौंढाळा येथील जय शिवशंकर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेने येत्या पाच वर्षांत पाच हजार झाडे लावण्याचा संकल्प सोडला आहे.
या उपक्रमाची सुरुवात ३ जूनपासून सुरुवात होणार असून, झाडांना विद्यार्थ्यांची नावे देण्यात येणार आहेत. नागरिकांनी झाडे द्यावीत, आह्मी त्यांचे संवर्धन करू, असे आवाहनही संस्थेच्या कार्यकर्त्यांनी केले आहे.
धरण उशाला कोरड घशाला अशीच अवस्था पैठण तालुक्यातील चौंढाळा या गावाची आहे. या गावाची लोकसंख्या सुमारे एक हजाराच्या आसपास आहे. गाव छोटे असेल तरी येथील मुलांना दर्जेदार शिक्षण मिळावे, यासाठी गावातील तरुणांनी एकत्र येत जय शिवशंकर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेची स्थापन केली. प्ले ग्रुप ते पहिलीपर्यंत असलेल्या या शाळेत दीडशे विद्यार्थी शिक्षण घेतात. गेल्या काही वर्षांपासून सातत्याने पडणाऱ्या दुष्काळाचा फटका अन्य गावांप्रमाणे चौंढाळा गावाला बसत आहे. ग्रामस्थांची तहान भागविण्यासाठी सध्या टँकरद्वारे पाणीपुरवठा केला आहे. अशा स्थितीतही ठिंबक सिंचनाच्या मदतीने संस्थेने परिसरात झाडे जगविली आहेत.
आता पुढील पाच वर्षांत पाच हजार झाडे लावण्याचा संकल्प संस्थेने सोडला आहे. पैठण येथील वनीकरण विभागातून रोपे आणण्यात येणार असून, नागरिकांनीही झाड दत्तक घेऊन रोपटे आणून द्यावे, त्याचे जतन व संवर्धन संस्था करेल, असे आवाहनही सोशल मीडियासह विविध माध्यमांतून केले आहे. या झाडांना शाळेतील विद्यार्थ्यांची नावे देण्यात येणार आहे.

शाळा परिसर ते चौंढाळा येथील देवी मंदिर रस्त्यालगत येत्या ३० जूनपासून वृक्षारोपण करण्यात येणार आहे. पिंपळ, वड, लिंब, कन्हेर, गुलमोहर यांसह विविध झाडे लावण्यात येणार आहे. नावापुरते वृक्षारोपण न करता त्यांचे जतन व संवर्धनाची जबाबदारी घेणार.
- प्रशांत नरके, सचिव, जय शिवशंकर बहुउद्देशीय सेवाभावी संस्था

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पडेगावात जलकुंभ ठरले शोभेच्या वास्तू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पडेगाव
महापालिकेत समाविष्ट होऊन सुमारे २३ वर्षे उलटली असली, तरी पडेगावचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागलेला नाही. जलकुंभ २० वर्षांपासून वापराविना पडून आहेत. त्यांच्याकडे शोभेच्या वास्तू म्हणूनच पाहिले जात आहे. पंचवटी ते मिटमिटा अशी जलवाहिनी टाकण्याल्यास पाणी प्रश्न सुटू शकेल, असे नागरिकांना वाटते.

पडेगावाचा १९८८मध्ये महापालिकेत समावेश करण्यात आला. त्यावेळी भावसिंगपुरा, पडेगाव आणि मिटमिटा असा एकच वॉर्ड होता. त्यावेळी लोकसंख्या चार-पाच हजारांच्या आसपास होती. आता एका वॉर्डचे तीन वॉर्ड करण्यात आले. लोकसंख्याही मोठ्या प्रमाणावर वाढली. नव्या वसाहतींच्या उभारणीमुळे नागरी सुविधांचा प्रश्न कळीचा मुद्दा बनलेला आहे. पूर्वी विद्यापीठपासून पडेगावापर्यंत जलवाहिनी टाकण्यात आली होती. ही जलवाहिनी जुनी झाल्याने छिनविच्छिन्न अवस्थेत आहे. अनेकांनी या जलवाहिनीतून थेट कनेक्शन घेतल्याने पाणी अत्यंत कमी दाबाने मिळत आहे. अनधिकृत नळ कनेक्शनची संख्या वाढल्यानेच जलकुंभ शोभेच्या वास्तू ठरले. परिसरात एकूण चार जलकुंभ उभारण्यात आले आहेत. एकाही जलकुंभातून पाणी पुरवठा होऊ शकत नाही. सुमारे २० वर्षांपासून हे जलकुंभ कोरडेठाक पडलेले आहेत. जलकुंभ उभारण्यासाठी करण्यात आलेला खर्चही वाया गेल्याचे चित्र दिसून येत आहे. पडेगाव परिसर हा छावणीलगत असल्याने येथे माजी सैनिकांची मोठी वसाहत आहे. माजी सैनिक कॉलनी असेच या वसाहतीचे नाव आहे. एकेकाळी शत्रूंशी लढाई केलेल्या सैनिकांना आता पाण्यासाठी लढा द्यावा लागत आहे. पडेगाव परिसरात अनेक नव्या वसाहती उभारण्यात आलेल्या आहेत. गुलमोहर कॉलनी, चिनार गार्डन, गणेशनगर, फुलेनगर, फिरदोस गार्डन अशा भागातही पाणी टंचाई तीव्रतेने जाणवत आहे. खासगी टँकरवरच नागरिकांची भिस्त आहे.

पाण्यासाठी स्मशानात
हंडाभर पाणी मिळवण्यासाठी नागरिकांना भटकंती करावी लागत आहे. छावणीनजिक असलेल्या ख्रिस्ती दफनभूमीतून दररोज नागरिक पाणी आणतात. अनेक नागरिक तर छावणी भागातून वाहनांद्वारे पाणी आणून तहान भागवत आहेत. पाणी प्रश्नाचा फायदा खासगी टँकर चालकांना होत आहे. सध्या खासगी टँकर चालकांची चांदी होताना दिसत आहे. पाणी प्रश्नामुळे अनेकांना स्वतःच्या मालकीचे घर असूनही अन्यत्र राहण्याची वेळ आली आहे. नव्यानेच महापालिकेत आलेल्या देवळाई-सातारा भागाकडे विशेष लक्ष दिले जात आहे, मात्र पडेगावातील प्रश्न 'जैसे थे' आहेत, अशी भावना अनेक नागरिकांनी व्यक्त केली.

पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनलेला आहे. जलवाहिनीतून नागरिकांना पाणी मिळतच नाही. टँकरवरच भिस्त आहे. गावातील जुनी पाइप लाइनेचे आयुष्य संपले आहे. आता पंचवटी ते मिटमिटा अशी मुख्य जलवाहिनी टाकण्यात आली तरच पाणी प्रश्न सुटू शकेल.
- सुभाष शेजवळ, नगरसेवक, पडेगाव

पडेगावासाठी स्वतंत्र पाण्याचा स्त्रोत नाही. नागरिकीकरण वाढल्यानंतर विहिरी बुजवण्यात आल्या. बोअरही कोरडेठाक पडलेले आहेत. नवीन जलवाहिनी टाकली तरच पाण्याचा प्रश्न मार्गी लागेल.
- देवेंद्र चव्हाण

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाळूचे ट्रक पळविले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
महसूल पथकाने जप्त केलेले तीन वाळूचे ट्रॅक्टर तहसील कार्यालयात उभे केले होते. वाळू माफियांनी हे तिन्ही ट्रॅक्टर वॉचमनला धाक दाखवून पळवून नेले. शनिवारी पहाटे दोन वाजता हा प्रकार घडला. याप्रकरणी संशयित आरोपींविरुद्ध सिटीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महसूल पथकाने हर्सूल परिसरात वाळूची चोरटी वाहतूक करणारे तीन ट्रॅक्टर पकडले होते. हे ट्रॅक्टर जप्त करीत तहसील कार्यालयाच्या परिसरात उभे करण्यात आले होते. शनिवारी पहाटे पाच ते सहा जण या कार्यालयाच्या आवारात शिरले. त्यानी वॉचमनला धाक दाखवला व तिन्ही ट्रॅक्टर वाळूसह पळवून नेले. दरम्यान, याप्रकरणी सोमवारी महसूल विभागाचे सुनील प्रेमराज गायकवाड (रा. नारळीबाग) यांनी सिटीचौक पोलिस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. या तक्रारीमध्ये संशयित आरोपी विश्वनाथ पठाडे, राजू शहा, अ‌लीम पटेल, परमेश्वर पाटील, अलिमखान लालखान व इतर आरोपींविरुद्ध चोरी व गौण खनिज कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पीएसआय गंभीरराव तपास करीत आहेत.

वाळूचोर पुन्हा शिरजोर
मी पोलिस आहे. ट्रकच्या खाली उतरा, असे म्हणत महसूल पथकाकने जप्त केलेला वाळूचा ट्रक तहसील कार्यालयात घेऊन जात असताना चक्क वाळूमाफियांनी पळवल्याच्या घटनेला दोन महिने उलटले नाही, तोच आता मुजोर वाळूमाफियांनी चक्क जप्त केलेली वाहने तहसील कार्यालयातून चोरून नेली. त्यामुळे महसूल विभागावर वाळूचोर पुन्हा एकदा शिरजोर झाले असल्याचे स्पष्ट झाले. पोलिस, महसूल पथकाच्या हातावर तुरी देऊन जप्त करत असलेले वाहन घेऊन जाण्याची ही ‌तिसरी घटना आहे. आता तर तहसील कार्यालयातून ट्रॅक्टरच पळविले. गेल्या वर्षभरापासून वाळूपट्ट्यांच्या लिलावाला बाजुला ठेऊन चोरी करणाऱ्या वाळूमाफियांच्या महसूल विभागाने मुसक्या आवळण्याचा प्रयत्न केला होता, मात्र आता पुन्हा एकदा एकदा या चोरांनी डोके वर काढले आहे. यापूर्वी ११ जानेवारी रोजी छावणी परिसरातूनच जप्त केलेला वाळूचा ट्रक तस्करांनी लंपास केला होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुक्तिसंग्राम संग्रहालयाला सापत्न वागणूक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या हैदराबाद मुक्तिसंग्राम संग्रहालयाला पालिका प्रशासनाकडून सापत्न वागणूक मिळत असल्याचे चित्र आहे. संग्रहालयाच्या साफसफाईसाठी वर्षभरात प्रशासनाने एकच झाडू आणि खराटा उपलब्ध करून दिला. केवळ तीन कर्मचाऱ्यांच्या भरवशावर संग्रहालयाचा डोलारा उभा आहे. स्वच्छतेसाठी पुरेशी साधने नसल्यामुळे दर्शनी भागातील पुतळ्यांवर धुळीचे थर साचले आहेत.
मराठवाड्याच्या स्वातंत्र्याचा इतिहास मांडणारे भव्यदिव्य संग्रहालय महापालिकेने उभारावे, अशी कल्पना उद्धव ठाकरे यांनी मांडली आणि शिवसेनेचीच सत्ता असलेल्या महापालिकेने संग्रहालयाचे काम सुरू केले. सध्या तळमजल्याचे काम पूर्ण झाले आहे. मुक्तीस्वातंत्र्य संग्रामच्या स्मृतींना उजाळा देणारे अनेक फोटो दालनात लावण्यात आले आहेत. त्याशिवाय स्वातंत्र्य सैनिकांचेही फोटो आहेत. संग्रहालयाच्या दर्शनीभागात काही मूर्ती आणि पुतळे आहेत. शिवाय हिरवळ देखील लावण्यात आली आहे. एवढ्या मोठ्या परिसराच्या देखभालीसाठी मात्र तीनच कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तीनपैकी एखादा सुटीवर असतो. त्यामुळे संपूर्ण संग्रहालयाचा भार दोन कर्मचाऱ्यांवर पडतो. संग्रहालयाचा परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी, पुतळे स्वच्छ करण्यासाठी प्रशासनाने वर्षभरात फक्त एक झाडू आणि एक खराटच प्रशासनाने उपलब्ध करून दिला होता. वारंवार मागणी केल्यावरही प्रतिसाद मिळत नसल्याने कर्मचाऱ्यांनीच स्वखर्चाने झाडू, खराटा आणला.
संग्रहालयाचा परिसरच स्वच्छ करण्यासाठी हे झाडू, खराटे पुरत नाहीत. त्यामुळे पुतळे स्वच्छ करण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही. संग्रहालयाच्या दर्शनी भागात असलेल्या पुतळ्यांवर धूळ साचलेली आहे. संग्रहालयाच्या आवारात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आणि स्वच्छतागृह नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांबरोबरच संग्रहालय पाहण्यासाठी येणाऱ्यांची कुचंबणा होते. प्रवेशद्वारापासून मुख्य दालनापर्यंत मॅट टाकणे अपेक्षित आहे, पण त्याकडे प्रशासनाने लक्षच दिले नाही. सोमवारी पर्यटनक्षेत्रातील तज्ज्ञांची बैठक महापौर, आयुक्तांच्या उपस्थितीत झाली. त्यानिमित्त प्रवेशद्वारापासून मुख्य दालनापर्यंत मॅट टाकण्यात आली. भांडार विभागातून ही मॅट अक्षरशः भांडून घ्यावी लागली, असे सांगितले जाते. संग्रहालयाच्या स्वच्छतेबद्दल व तेथील अन्य सुविधांबद्दल प्रशासन, लोकप्रतिनिधी इतके उदास असतील, तर येत्या काळात संग्रहालयाची व्यवस्था कोलमडेल, अशी भिती व्यक्त केली जात आहे.

मुक्तिसंग्राम संग्रहालयातील कर्मचाऱ्यांच्या भावनेशी मी सहमत आहे. संग्रहालयात स्टाफ वाढवून द्या, असे मी आयुक्तांना सांगितले होते. स्टाफ वाढवून दिला नसेल, तर पुन्हा आयुक्तांशी बोलतो. संग्रहालयासाठी कर्मचारी वाढवून दिले जातील. सफाई कर्मचारीही नियुक्त केले जातील. साफसफाईसाठी आवश्यक असलेले साहित्य उपलब्ध करून दिले जाईल. त्यात मी वैयक्तिक लक्ष घालणार आहे.
- त्र्यंबक तुपे, महापौर.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुलाच्या मृत्युप्रकरणी १ कोटी भरपाई द्या

$
0
0

म. टा. विशेष प्रतिनिधी, औरंगाबाद

मुलाचा जलतरणिकेत बुडून मृत्यू हा शाळेचे जलतरण प्रशिक्षक व शाळेच्या प्रशासनाकडून हलगर्जीपणा व निष्काळजीपणा मुळे झाला आहे. त्यामुळे एक कोटी रुपयांची नुकसानभरपाई मिळावी, अशी विनंती करणारी याचिका मुलाच्या वडिलांनी मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठात केली आहे.

प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या लोणी खुर्द येथील पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे-पाटील सैनिकी स्कूलमधील एका ११ वर्षीय विद्यार्थ्याचा संस्थेतील जलतरण तलावामध्ये पोहत असताना बुडून मृत्यू झाला. ही घटना ९ ऑक्टोबर २०१५ रोजी घडली होती. याप्रकरणी लोणी पोलिसांनी जलतरण प्रशिक्षकाविरोधात गुन्हा दाखल केला होता. दर्शन रवींद्र आहिरे (वय ११, रा. वायगाव, ता. सटाणा, जि. नाशिक) हा पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे-पाटील सैनिकी स्कूलमध्ये शिकत होता. ९ ऑक्टोबर २०१५ रोजी शाळेच्या जलतरण तलावात पोहत असताना त्याचा बुडून मृत्यू झाला होता. त्याच्या मृत्यूस शाळेच्या जलतरण प्रशिक्षकांचा निष्काळजीपणा कारणीभूत असल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी दर्शनचे चुलते नितीन जिजा आहिरे यांनी लोणी पोलिसांकडे केली होती. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक विनोद पाटील यांनी गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणात शाळा व्यवस्थापनाने संबधितांवर कोणतीही कारवाई केली नाही. त्यामुळे दर्शनचे वडील रवींद्र यांनी औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली.

या याचिकेत प्रतिवादी राज्य शासन, शालेय शिक्षण सचिव, अहमदनगरचे पोलिस अधीक्षक, पोलिस उपअधीक्षक, प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे संचालक, शाळेचे प्राचार्य यांना नोटीस बजावण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


वीस रुपयांत ड्रमभर पाणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

पहाडसिंगपुरा परिसरातील रेणुकामातानगर, ताजमहल कॉलनी परिसरातील रहिवाशांची पाण्याअभावी फरफट सुरू आहे. वादग्रस्त असलेल्या परिसरात महापालिकेची जलवाहिनी नसल्याने पाणी विकत घ्यावे लागत आहे. महापालिकेकडून येथील रहिवाशांना ६०० रुपयात ३० ड्रम पाणी देण्यात येत आहे.

भूखंडमाफियाच्या जाळ्यात अडकलेल्या पहाडसिंगपुरा परिसरातील रेणुकामातानगर व ताजमहल कॉलनी परिसरात हजार ते बाराशे नागरिकांचे वास्तव्य आहे. आठ महिन्यांपूर्वी हे रहिवासी बेघर झाले होते, मात्र त्यांनी पुन्हा घराचा ताबा मिळवला आहे.

उन्हाळ्यातच नव्हे तर वर्षभर या रहिवाशांना पाण्यासाठी टँकरवर अवलंबून रहावे लागत आहे. या परिसरात दूध विक्रेत्यांचे गोठे देखील असून, दुभती जनावरे पाळण्यात आलेली आहेत. जनावरांसाठी देखील मोठ्या प्रमाणावर पाणी लागते. पाणी टंचाई कमी करण्यासाठी या भागातील नागरिकांना महापालिका पाणी विकत देते. दर एक दिवसाआड येथे टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येतो. त्यासाठी तीन महिन्यांचे दीड हजार रुपये तर, उन्हाळ्यात एका महिन्यासाठी ६३० रुपये दर आकारण्यात येतो. एका दिवसाआड दोन ड्रम पाणी प्रत्येक कुटुंबाला देण्यात येते. रहिवाशांमध्ये अनेकजण मजुरी करणारे आहेत. परवडत नसले तरी त्याना नाइलाजाने हे पाणी विकत घेणे भाग पडत आहे.

या भागात महापालिकेची जलवाहिनी नसल्याने पाण्याच्या टँकरवर अवलंबून रहावे लागत आहे. एका दिवसाआड पाण्याच्या टँकरमधून दोन ड्रम पाणी देण्यात येते.

- उमेश मेघावाले

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मद्यप्राशन करून झोपणे पडले महाग

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

लग्नात मद्यप्राशन करून उघड्यावर झोपलेल्या तरुणाला अज्ञात आरोपींनी चांगलाच चोप दिला. रविवारी रात्री छावणी परिसरातील मिलिंद कॉलेजच्या मैदानावर हा प्रकार घडला. याप्रकरणी छावणी पोलिस ठाण्यात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महेश भीमराव गजहंस (वय ३०, रा. काबरानगर) हा तरुण रविवारी मिलिंद कॉलेज येथे नातेवाईकाच्या लग्नाच्या कार्यक्रमात गेला होता. यावेळी त्याने मद्यप्राशन केले होते. घरची मंडळी रागावतील म्हणून तो कॉलेजच्या रंगमंचच्या ओट्यावर झोपला होता. रात्री दहा ते साडेअकरादरम्यान अज्ञात आरोपींनी त्याच्या डोक्यावर दगड मारून जखमी केले. त्याला जाग आल्याने तो बचावला. दरम्यान मारहाण करणारे आरोपी पसार झाले. याप्रकरणी त्याने छावणी पोलिस ठाणे गाठून आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

ढाब्यावर मद्यपीने तरुणाला लुबाडले

जेवणासाठी ढाब्यावर गेलेल्या तरूणाला मारहाण करून मद्यपीने साडेतेरा हजार रुपये पळवले. मिसारवाडी येथील सह्याद्री ढाब्यावर रविवारी दुपारी साडेतीन वाजता हा प्रकार घडला. याप्रकरणी अनोळखी आरोपीविरुद्ध सिडको पोलिस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गणेश कडुबा पैठणकर (वय २८, रा. बजाजनगर) हा तरुण रविवारी दुपारी त्याच मित्र विनोद घुसिंगे याच्यासोबत जेवण्यासाठी सह्याद्री ढाब्यावर गेला होता. यावेळी त्याला एका अनोळखी व्यक्तीने ५०० रुपयांची मागणी केली. गणेशने आपण ओळखत नसल्याचे सांगत पैसे देण्यास नकार दिला. यावेळी त्या व्यक्तीने गणेशचे हेल्मेट हिसकावून घेत गणेशच्या डोक्यात मारले; तसेच त्याच्या खिशातील रोख १३ हजार ७०० रुपये हिसकावून ठार मारण्याची धमकी दिली. जखमी झालेल्या गणेशने उपचार घेतल्यानंतर पोलिस ठाणे गाठून आरोपीविरुद्ध जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला.

गर्भवतीला पेटवून मारण्याचा प्रयत्न

गुन्हा दाखल केल्याचा राग मनात ठेवून गर्भवतीवर रॉकेल टाकून तिला पेटविण्याचा प्रयत्न करण्यात आला. नेहरूनगर भागात शुक्रवारी ही घटना घडली. याप्रकरणी चार आरोपींवर जिन्सी पोलिस ठाण्यात खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. आयेशा बेगम मोसीन शेख (वय २०, रा. नेहरूनगर) या विवाहितेने याप्रकरणी सोमवारी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. दुपारी तिला पोलिस ठाण्यात गुन्हा का दाखल केला, या कारणावरून शुक्रवारी मारहाण करण्यात आली. अंगावर रॉकेल टाकण्यात आले. याप्रकरणी आरोपी मोसीन इस्माईल शेख, शकीला बेगम, इस्माईल शेख व आफ्रीन बेगम मोसीन सय्यद व आफ्रीनच्या नणंदेविरुद्ध गुन्हा दाखल झाला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘औट्रम’ची तज्ज्ञांकडून पाहणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

धुळे-सोलापूर या राष्ट्रीय महामार्गाच्या कामासाठी औट्रम घाटातून सहा पदरी रस्ता तयार केला जाणार आहे. घाटात बोगदा तयार करण्यासाठी स्विर्त्झलँडच्या कंपनीच्या प्रतिनिधींसह दिल्लीहून आलेल्या भूगर्भशास्‍त्रज्ञांनी मंगळवारी घाटाची पाहणी केली. औट्रम घाटात तयार करण्यात येणाऱ्या बोगद्याचे तीन नकाशे तयार करून पुढील महिन्यात केंद्रीय दळणवळणमंत्री नितीन गडकरी यांच्यासमवेत होणाऱ्या बैठकीत सादर करण्यात येणार असल्याची माहिती हायवे अॅथॉरिटीच्या सूत्रांनी दिली.

स्विर्त्झलँड येथील कंपनीचे प्रतिनिधी, दिल्लीहून आलेले शास्‍त्रज्ञ, हायवे अॅथॉरिटीचे अधिकारी यांनी अंबाडी भागातील टेकड्यांची पाहणी केली. यावेळी चाळीसगाव येथील औट्रम घाटाची पाहणी करण्यात आली. याशिवाय बंजारा तांड्याच्या आसपासचा परिसर, पानझडी रेल्वे स्टेशनच्या बाजुच्या परिसराचीही पाहणी केली. या पथकाने विविध ‌ठिकाणच्या माती आणि दगडांचे नमुने घेतले.

पथकाने प्रस्तावित रस्‍त्यांमध्ये येणाऱ्या अडथळ्यांचीही पाहणी केली आहे. या महामार्गात सहा पदरी रस्‍त्यासाठी साडेपंधरा मीटर उंच बोगदा तयार केला जाणार आहे. त्याचे तीन आराखडे तयार केले जाणार आहे, अशी माहिती कंपनीच्या प्रतिनिधींनी दिली.

स्विर्त्झंलॅँडच्या अलमाँझो ग्लोबल इन्फ्रा कंपनीचे प्रतिनिधी, कंपनीचे टनेल इंजिनिअर डी. आनंद, भूगर्भ शास्‍त्रज्ञ राधे किसन, बिपीन तिवारी, अनिक कुमार यांच्यासह नॅशनल हायवे अॅथॉरिटीचे प्रकल्प संचालक यू. जी. चामरगोरे, मराठवाडा रेल्वे विकास समितीचे अध्यक्ष ओमप्रकाश वर्मा यांच्यासह अन्य अधिकारी यावेळी उपस्थित होते. या कंपनीने औरंगाबाद-चाळीसगावमार्गे धुळ्याला जाणाऱ्या वाहनांची मोजणी करण्यासाठी नऊ जणाचे पथक नेमले अाहे. बैलगाडीपासून ते जड वाहनांपर्यंत सर्व वाहनांची नोंदणी सुरू आहे. ही प्रक्रिया आठ दिवस चालणार असल्याची माहितीही हायवे अॅथॉरिटीच्या सूत्रांनी दिली.

लोहमार्गाचे काम गुलदस्‍त्यात

'एनएच २११'च्या कामासोबत लोहमार्ग तयार करण्याची मागणी आहे. या मार्गाच्या सर्वेक्षणाला मंजुरी देण्यात आली आहे. त्यानुसार रेल्वेच्या सर्वेक्षणाचे काम सुरू करण्यात आले होते. 'एनएच २११'सोबत लोहमार्गाचे काम सुरू होईल काय, याबाबत अजूनही चित्र स्पष्ट करण्यात आलेले नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

टँकरचा अंदाज चुकला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मराठवाड्यातील सर्वात मोठे जायकवाडी धरण असलेल्या औरंगाबाद जिल्ह्यातील पाणीटंचाईबाबत प्रशासनाचा अंदाज चुकला आहे. जूनअखेरपर्यंत जिल्ह्यात टँकरसाठी १८ कोटी रुपये खर्च करून ४६७ टँकर सुरू होतील, असा अंदाज प्रशासनाला होता, मात्र तीव्र दुष्काळामुळे मार्चमध्येच ५८० टँकर सुरू करण्यात आले. मे महिन्यात टँकरची संख्या ८३२पर्यंत पोचली. हवामान विभागाने यंदा वेळेवर पाऊस येणार असल्याचा अंदाज वर्तवला असला तरी दोन आठवडे जरी पाऊस लांबला तर जिल्ह्यात एक हजारपेक्षा अधिक टँकर सुरू करावे लागतील.

मराठवाड्यात आठवड्याला दीडशे टँकरची वाढ करावी लागत असल्याची स्थिती असून, प्रत्येक आठवाड्यात टँकरमधील फरक वाढत असल्याची स्थिती आहे. प्रशासनाने जून अखेरपर्यंत ४३५७ टँकरचा अंदाज वर्तवून तयारी केली होती. विभगातील इतर जिल्ह्यांच्या अंदाजाबातही काहीशी अशीच अवस्था आहे. जालना व परभणीमध्येही झपाट्याने टँकरवाढ होत असल्यामुळे या दोन जिल्ह्यांमध्येही प्रशासनाने टँकरबाबत बांधलेले अंदाज चुकण्याची शक्यता आहे.

विभागीय प्रशासनाने प्रत्येक जिल्ह्यांकडून पाणीटंचाई निवारणासाठी जून अखेरपर्यंत प्रस्तावित उपाययोजनांबाबतची खर्चासह माहिती मागवली होती. यानुसार प्रत्येक जिल्ह्यांनी उपलब्ध पाण्याचा हिशेब करून टँकरची मागणी आणि खर्चाचा प्रस्ताव विभागीय आयुक्त कार्यालयाकडे पाठवला होता.

२०१२मधील दुष्काळात टँकरचा आकडा अडीच हजारांपर्यंत पोचला होता. यंदा जानेवारी महिन्यात दीड हजार, मार्चमध्ये अडीच हजार, तर मे महिन्यामध्ये हा आकडा ३६००पर्यंत पोचला. सध्या मराठवाड्यातील २७१६ गावे व ९६० वाडयांमधील तब्बल ५८ लाख नागरिकांची तहान टँकरच्या माध्यमातून भागविण्यात येत आहे. एका आठवड्यातच पाणीपुरवठ्याच्या टँकरच्या संखेत मोठी भर पडली असून, गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी ६०० गावे, १८ लाख लोकसंख्या आणि ८०० टँकरची वाढ झाली आहे.

जूनअखेर प्रस्तावित टँकरसंख्या

जिल्हा.........जूनअखेर प्रस्तावित....सध्याची टँकरसंख्या

औरंगाबाद.........४६७......................८३२ जालना.............६६३.......................४८ परभणी............२७४.......................२४१ ह‌िंगोली............०८४.......................४१ नांदेड...............५१९......................३३१ बीड.................१११९.....................९१० लातूर..............५००.......................३०८ उस्मानाबाद.......७३१......................४१५ एकूण...............४३५७....................३६५०

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रवर्तकाने विकली सोसायटीची जमीन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
प्राचार्य, प्राध्यापक व विद्यापीठ सदस्य असलेल्या सभासदांच्या सोसायटीच्या दोन एकर जागेची परस्पर विक्री करण्यात आली आहे. सोसायटीचे मुख्य प्रवर्तक दत्ताभाऊ पाथ्रीकर यांनी ही जागा विकल्याचा आरोप सोसायटी सदस्यांनी पोलिस आयुक्तांना दिलेल्या तक्रारीत केला आहे. दरम्यान, या प्रकरणाची आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी करण्यात येत आहे.
विद्यापीठातील प्राध्यापक, सदस्य व प्राध्यापक अशा सतरा सदस्यांनी सोसायटी स्थापन करण्यासाठी १९९० व १९९१ मध्ये पहाडसिंगपुरा येथील गट क्रमांक ९८ मध्ये दोन एकर जागा खरेदी केली होती. लक्ष्मण गंधारी काळे, विजयकुमार पवार व विठ्ठल गंगाधर सलगरे यांच्याकडून नियोजित निरंजन हाउसिंग सोसायटी व जगदंबा हाउसिंग सोसायटीच्या नावे ही जागा खरेदी करण्यात आली होती. या दोन्ही सोसायटीचे मुख्य प्रवर्तक विद्यापीठाचे तत्कालीन क्रीडा संचालक दत्ताभाऊ पाथ्रीकर होते. त्यांच्यावर विश्वास ठेवून मुख्य प्रवर्तक व सोसायटीच्या नावावर जागा खरेदी करण्यात आली. या जागेचे एनए करून पैसे भरण्यात आले. जमीनमालकांना देखील बँकेमार्फत पैसे देण्यात आले आहे.
दरम्यान, ही जागा २७ एप्रिल २०१६ रोजी दत्ताभाऊ पाथ्रीकर यानी रवी गवळी, मोहम्मद शमशोद्दीन व मोहम्मद निजामोद्दीन यांना विकली असल्याचे सोसायटीच्या सभासदांना समजले. सोसायटीच्या नियमित बैठका होताना दत्ताभाऊ पाथ्रीकर यांनी अंधारात ठेवत फसवणूक केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. याप्रकरणी पाथ्रीकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. सोसायटीचे सभासद प्रा. डॉ. प्रदीप दुबे, अण्णासाहेब खंदारे, भाऊसाहेब राजळे, डॉ पी. ए. गवळी तसेच इतरांनी ही लेखी तक्रार केली आहे. याप्रकरणी आर्थिक गुन्हेशाखेकडे चौकशी सोपवण्यात आली आहे.

सोसायटीची जागा विकल्याची तक्रार आर्थिक गुन्हेशाखेकडे तक्रार आली आहे. पोलिस आयुक्तांच्या आदेशानुसार चौकशी करण्यात येत आहे.
-मधुकर सावंत, पोलिस निरीक्षक

ही जागा मी माझ्या नावावर विकत घेतली होती. सोसायटीची कोणतीही रजिस्ट्री नाही. त्यामुळे माझी जागा मी विक्री केली. ब्लॅकमेलिंग करण्यासाठी हा प्रकार करण्यात येत आहे.
-दत्ताभाऊ पाथ्रीकर, माजी क्रीडा संचालक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

औरंगाबाद विभागात मुली अव्वल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल बुधवार (२५ मे) रोजी जाहीर झाला. उत्तरपत्रिकांचा फेरलेखन रॅकेटमुळे चर्चेतील औरंगाबाद विभागाचा निकाल यंदा ३.९७ टक्क्यांनी घसरला आहे. इतर विभागांच्या तुलनेत औरंगाबाद तिसऱ्या स्थानावर आहे. विभागाचा उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे प्रमाण ८७.८० टक्के आहे. राज्यात औरंगाबाद विभाग तिसऱ्या क्रमांकावर आहे. यंदाही उत्तीर्ण होण्यात मुलांच्या तुलनेत मुलींचे प्रमाण जास्त आहे.
फेब्रुवारी-मार्चमध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल बुधवारी मंडळाच्या वेबसाइटवर दुपारी १ वाजता जाहीर करण्यात आला. निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांनी मोबाइल, इंटरनेट कॅफेचा आधार घेतला. औरंगाबाद विभागातील पाच जिल्ह्यांतून परीक्षेला बसलेल्या १ लाख ३८ हजार १८१पैकी (नियमित) १ लाख २१ हजार ३२९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. निकालाचे प्रमाण ८७.८० टक्के आहे. मागील वर्षी निकाला उच्चांकी गाठणाऱ्या औरंगाबाद विभागाचा निकाल यंदा ३.९७ टक्क्यांनी घसरला आहे. गेल्यावर्षी निकालाचा टक्का ९१.७७ एवढा होता.
बारावी निकालात मुलींनीच बाजी मारली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत हा टक्काही वाढला आहे. औरंगाबाद विभागातून ५० हजार ८९५ विद्यार्थिनींनी परीक्षा दिली. यापैकी ४६ हजार ४४ विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या. उत्तीर्णतचे ही टक्केवारी ९०.४७ एवढी आहे. मुलांच्या निकालाची टक्केवारी ८६.२५ एवढी आहे. मुलांच्या तुलनेत उत्तीर्ण होणाऱ्या मुलींचे प्रमाण ४.२२ टक्क्यांनी जास्त आहे.. मागील वर्षी मुलांच्या तुलनेत मुलींची टक्केवारी ३.३३ टक्क्यांनी अधिक होती. यंदा ही टक्केवारीही मुलींनी मागी टाकली आहे.

'सायन्स' अव्वल
बारावी निकाला सायन्सच्याच विद्यार्थ्यांनीच आपणच अव्वल असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. औरंगाबाद विभागात सायन्स शाखेचा ९३.१३ टक्के निकाल आहे. ६० हजार १७५ परीक्षार्थीपैकी ५६ हजार ६४४ जण उत्तीर्ण झाले आहेत. यानंतर वाणिज्य शाखेचा क्रमांक लागतो. या शाखेतून ११ हजार ९७७पैकी १० हजार ७४१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. निकालाची टक्केवारी ८९.६८ एवढी आहे. एमसीव्हीसीचा ८१.७८ तर कला शाखेचा ८१.६९ टक्के निकाल आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शेतकऱ्यांच्या विजेवरून सत्ताधाऱ्यांतच जुंपली

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
महाराष्ट्र वीज तांत्रिक कामगार संघटनेच्या अधिवेशनात विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी महावितरणाच्या कारभारावर केलेली टीका उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या जिव्हारी लागली. शेतकऱ्यांच्या वीज प्रश्नावरून बागडेंनी बावनकुळे टोला यांना लागवला. बावनकुळे यांनी आपल्या भाषणा 'नानां'च्या प्रश्नांची उत्तरे आपल्या शैलीत देत, महावितरण किती किती तोट्यात गेली आहे, याची हकिकत मांडली. या दोन्ही नेत्यांनी एकमेकांच्या विरोधात भाषणे केल्याने श्रोतेही आवाक् झाले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बागडे आणि उद्‍घाटक उर्जामंत्री बावनकुळे होते. यावेळी उद्‍घाटकांपूर्वी अध्यक्षांचे भाषण झाले. या संधीचा बागडे यांनी पुरेपूर फायदा उचलला.

शेतकऱ्यांना वीज द्या ः बागडे
विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी महावितरणाच्या कारभाराचे वाभाडे काढले. 'यंदा पाऊस चांगला येणार आहे. त्यामुळे विजेची गरज मोठी लागणार आहे. कृषिपंप सुरू होताच विजेचा ताण निर्माण होत असतो. ऑक्टोबर, नोव्हेंबर, जानेवारी महिन्यांतही शेतकऱ्यांना पाण्याची गरज असते. म्हणून शेतकऱ्यांना पाणी ‌मिळविण्यासाठी चांगली वीज पुरवठा करा. महावितरण आपल्या दारी ही योजना २०१२मध्ये सुरू करण्यात आली. या योजनेत २०१२पूर्वीचे अनेक वीज कनेक्‍शन पेडिंग आहेत. काही ठिकाणी खांब उभारले, मात्र तारा ओढलेल्या नाहीत. कोटेशन भरणाऱ्यांनाच कनेक्‍शन दिले जाते. 'महावितरण आपल्या दारी' या योजनेत जवळपास १२ हजार ते १४ हजार वीज कनेक्‍शन पडून आहेत. दुष्काळाच्या परिस्थितीतून सावरण्यासाठी शेतकऱ्यांना वीज द्या,' अशी मागणी त्यांनी केली. त्यानंतर त्यांनी सबस्टेशनकडे मोर्चा वळविला. 'अनेक भागात सबस्टेशन उभारण्याचे काम सुरू आहे. एक सबस्टेशन बांधण्यासाठी तीन ते चार महिन्यांचा अवधी लागतो, मात्र महावितरणामध्ये हेच काम करण्यासाठी सहा महिने ते दीड वर्षाचा कालावधी लागतोच कसा. कंत्राटदार काम करीत नसतील, तर त्यांना ताकीद द्या,' अशी सूचना त्यांनी केली.
मोठे शेतकरी थकबाकीदार ः बावनकुळे
बागडे यांच्या भाषणानंतर उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे भाषण झाले. 'गेल्या अनेक वर्षांपासून वीज कनेक्‍शन पेंडिंगचे प्रमाण वाढलेलं होते, मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सुधीर मुनंगटीवार यांनी केलेल्या अर्थसाह्यामुळे १ लाख ३६ हजार पेंडिंग कनेक्‍शन निकाली काढण्यात आले आहेत. आजही राज्यात १९ लाख कुटुंबांना वीज नाहीत. महावितरणावर ५५ हजार कोटींचे कर्ज आहे. आधुनिक तंत्रज्ञान, पायाभूत सुविधांच्या विकासासाठी २२ हजार कोटी रुपयांचा खर्च लागणार आहे. कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य करण्यासाठी एक लाख कोटी रुपये लागणार आहे. वीज वसुली फारच कमी आहे. सध्या दुष्काळाचा काळ आहे. गरीब शेतकऱ्यांकडून दुष्काळात वीज वसुली करू नका, असे आदेश देण्यात आले आहेत. गरीब शेतकऱ्यांबाबत सक्तीचे धोरण राबवित नाही, मात्र बागयतदार शेतकरी, कृषी मालाची निर्यात करणारे शेतकरी मात्र वीज बिल भरत नाहीत. महावितरण सहा रुपये प्रति युनिट दराने वीज खरेदी करीत आहे. शेतकऱ्यांना किंवा ग्रामीण भागात सव्वा रुपया प्रति युनिट दिली जाते. एवढ्या स्वस्त विजचे पैसेही बागायतदार भरत नाहीत, ही शोकांतिका आहे. सध्या विजेची परिस्थिती गंभीर आहे,' असे त्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


गूढ आवाजाने पैठण पुन्हा हादरले

$
0
0

पैठण : पैठण शहराच्या दक्षिण भागात बुधवारी सकाळी दहा वाजून एक मिनिटाला पुन्हा एकदा मोठा गूढ आवाज ऐकू आला. सतत होणाऱ्या आवाजामुळे शहर व तालुक्यात घबराटीचे वातावरण असून नागरिकांनी चौकशीची मागणी केली आहे. नेहमीच्या आवाजापेक्षा या आवाजाची तीव्रता अधिक होती. तालुक्यातील दक्षिण व पूर्व भागातील पाटेगाव, चनकवाडी, सोनवाडीसह अनेक गावांमध्ये हा आवाज ऐकू आला. या आवाजामुळे घरांचे पत्रे हादरले, भीतिमुळे कुटुंबासह घराबाहेर पळालो, अशी माहिती पॉवर हाउस परिसरातील सिद्धार्थ रोडगे यांनी दिली. दरम्यान, बुधवारी झालेल्या गूढ आवजाची जायकवाडी धरणाच्या भूकंपमापक केंद्रावर नोंद झाली नसल्याची माहिती पाटबंधारे विभागाचे शाखा अभियंता अशोक चव्हाण यांनी दिली. गूढ आवाजाविषयी महसूल विभागकडे चौकशी केली असता, बुधवारी झालेल्या गूढ आवाजाची कोणतीही नोंद नसल्याची माहिती देण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राऊंड टेबल ः नागरिकांना अद्याप ‘अच्छे दिन’ची प्रतीक्षाच

$
0
0

दोन वर्षांपूर्वी केंद्रातील सरकार बदलले. घोषणांचा पाऊस पाडणारे नरेंद्र मोदी यांच्याकडे देशातील मतदारांनी सत्तासूत्रे सोपविली. मोदी सरकार सत्तेत आल्यानंतर फार मोठे बदल होतील, अशी अपेक्षा होती. प्रत्यक्षात नागरिकांना फारसा बदल जाणवत नाही. सरकारने 'अच्छे दिन'ची घोषणा केली होती. त्याची नागरिकांना प्रतिक्षा आहे. दोन वर्षांचा काळ सरकारच्या मूल्यमापनासाठी कमी वाटत असला, तरी सरकारची पावले बदलांच्या दिशेने पडली आहेत. त्यांचा वेग मात्र कमी आहे. सरकार बदलल्याचे सध्यातरी जाणवत नाही, असा सूर 'मटा'ने आयोजित केलेल्या 'राऊंड टेबल'मध्ये विविध क्षेत्रातील मान्यवरांनी व्यक्त केला. 'राऊंड टेबल'मध्ये कृषी व अर्थतज्ज्ञ डॉ. मानवेंद्र काचोळे, प्राचार्य वैशाली प्रधान, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे प्रभारी ‌क्रीडा संचालक प्रा. प्रदीप दुबे, उद्योजक प्रसाद कोकीळ, पेट्रोलिअम प्रोडक्टस् डिलर्स असोसिएशनचे अखिल अब्बास, अॅड. गीता देशपांडे, डॉ. राजेंद्रसिंह परदेशी, व्यापारी महासंघाचे अजय शहा सहभागी झाले होते.

भवितव्य बदलाची मोठी संधी
अनेक सरकारांच्या कारभाराचा अनुभव घेतल्यानंतर लोकांनी नरेंद्र मोदी यांना एक संधी दिली. त्यांच्या सरकारच्या दोन वर्षांच्या कामगिरीचे मूल्यमापन करताना अनेक गोष्टींचा गांभीर्याने विचार करावा लागेल. प्रश्न सोडवण्याकरिता बौद्धिक शास्त्रीय मार्ग अवलंबावे लागतात. ही प्रक्रियाच बंद पडली आहे. या पार्श्वभूमीवर मोदी सरकार आले. सिंचन, शिक्षण, आरोग्य, दुष्काळ अशा आपत्तींसाठी 'रोड मॅप' असावा लागतो. कायदा बदलांकडे गांभीर्याने पाहिले पाहिजे. पूर्व तयारी असायला हवी. बौद्धिक दिवाळखोरी पूर्वीच्या काळाच्या तुलनेत यापूर्वी कधी पाहिली नव्हती. सरकार कोणतेही असो कायदे बनवण्यासाठी मंत्रालयात एक टीम असते. वेगवेगळ्या पॉलिसी ठरवताना कुशल यंत्रणा लागते. मोदींनी सरकार स्थापन केल्यानंतर नीती आयोगाची स्थापना केली. नीती आयोगाच्या माध्यमातून त्यांनी बदलांची प्रक्रिया सुरू केली आहे. बदलांची मानसिकता त्यांनी तयार केली, हे माझ्या दृष्टीने महत्त्वाचे वाटते. नीती आयोगाने शेती धोरणाला महत्त्व दिले आहे, मात्र सरकारकडे समर्थन करणारी; तसेच विरोधकांकडे मुद्देसूद विरोध करणारी यंत्रणाच नाही. दोन वर्षांच्या कालावधीत भरीव काम झालेले नाही. बदल घडवून आणण्याकरिता मोदींना पाठिंब्याची गरज आहे. तसा पाठिंबा त्यांना सध्या मिळत नाही, अशी स्थिती आहे. निवडणूक प्रक्रिया बदलत नाही तोपर्यंत भ्रष्टाचाराला आळा घालणे कठीण आहे. अभिजन वर्ग यात लक्ष घालत नाही, तोपर्यंत बदल होणे अवघड आहे. मोदींकडून सर्वसामान्यांना मोठ्या अपेक्षा आहेत. त्यामुळेच ते मोदींवर विश्वास टाकायला तयार आहेत. त्यासाठी प्रशासकीय व कायद्यात बदल करणे गरजेचे आहे, मात्र सरकारकडे प्रभावी यंत्रणाच उपलब्ध नाही. होमवर्कच तयार नाही. नीती आयोगाने शेती मालाला भाव मिळायला हवा, शेती फायदेशीर होणे गरजेचे आहे, यावर भर दिला आहे. देशाचे भवितव्य बदलाची मोठी संधी आहे. बदलांची चाहूल लागलेली आहे. त्याचा फायदा उठवण्याची गरज आहे.
- डॉ. मानवेंद्र काचोळे, कृषी व अर्थतज्ज्ञ.

केवळ भाषणांतून बदल होणार नाही
निवडणुकीच्या काळात नरेंद्र मोदी यांनी आश्वासनांचा पाऊस पाडला. मोदी सरकारला दोन वर्षे झाली, तरी अद्यापही लोकांचे प्रश्न कायमच आहेत. रोजगार, महागाई, भ्रष्टाचार यात कोणताही फरक पडलेला दिसून येत नाही. शैक्षणिक क्षेत्रातील भ्रष्टाचार अधिक वाढलेला दिसून येत आहे. फॉरेन पॉलिसी चांगली असली, तरी त्याचे सर्वसामान्य जनतेला काही देणे-घेणे नसते. लोकप्रतिनिधींनी गाव दत्तक घेतले, तर गाव सुंदर होईल, अशी योजना राबवली जात आहे. अद्यापही एकही गाव सुंदर झालेले नाही. केंद्राला महाराष्ट्राकडून सर्वाधिक महसूल मिळतो. त्या तुलनेत महाराष्ट्राच्या वाट्याला फार काही हाती आले नाही. निवडणुकीच्या तोंडावर काही बदल केले जातील. निवडणूक समोर ठेवून काम करण्याची पद्धत बदलण्याची गरज आहे. क्रीडा क्षेत्राकडे गांभीर्याने पाहिले जात असल्याचे जाणवत नाही. शिक्षण घडवण्याची प्रक्रिया बंद करण्याकडे कल दिसून येत आहे. 'मन की बात'मधून खेळाबद्दल भरभरून बोलले गेले, मात्र त्याची प्रभावी अंमलबजावणी होईल, अशी यंत्रणाच नाही. खेळाडूंची अवस्था दयनीय आहे. केवळ भाषणे देऊन बदल होणार नाही.
- डॉ. प्रदीप दुबे, प्रभारी क्रीडा संचालक, विद्यापीठ.

शिक्षण क्षेत्राकडे दुर्लक्ष
पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाचा विकास व परिवर्तनाची भाषा करत आहेत. शिक्षणाच्या जोरावरच देशाचा, समाजाचा विकास, परिवर्तन होत असते आणि त्याच शिक्षण क्षेत्राकडे मोदी सरकार अक्षम्य दुर्लक्ष करत आहेत. मागासवर्गीय, दलित यांना मिळणारी शिष्यवृत्ती, फेलोशीप थांबवली जात आहे. त्यातूनच रोहित वेमुला याने जीवनयात्रा संपविली. हे असेच सुरू राहिल्यास सुवर्ण आणि दलित, मागासवर्गीय यांच्यातील दरी वाढले, अशी भीती वाटते. देशाला महासत्ता बनवू पाहण्याच्या गप्पा होत असतानाच महत्त्वाच्या शिक्षण क्षेत्रासाठी भरीव अशी आर्थिक तरतूद होणे आवश्यक आहे, परंतु दुर्दैवाने मोदी सरकारने अर्थसंकल्पात शिक्षण क्षेत्रामध्ये सुमारे २४ टक्के कपात केली. विद्यार्थी संघटनावर बंदी आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. ही लोकशाही असूच शकत नाही. शिक्षण क्षेत्राच्या विकासासाठी असलेले सेमिनार, संशोधन या महत्त्वाच्या बाबी थांबविल्या जात आहे. केवळ आर्कषक घोषणा केल्या जातात. 'नीट'सारख्या प्रश्नावरून विद्यार्थ्यांना वेठीस धरण्याचा प्रकार यंदा झाला. धोरण ठरविताना पुन्हा तसे होऊ नये.
- वैशाली प्रधान, प्राचार्य, मिलिंद महाविद्यालय.

छोट्या व्यापाऱ्यांना प्रोत्साहन आवश्यक
आक्रमक, परिवर्तनशील, हार्डवर्किंग व सकारात्मक विचारांचा आत्मविश्वासाने काम करणारा आणि सहकारी, अधिकारी; तसेच राजकीय पुढाऱ्यांसह जनतेला कामास लावणारे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांचे नाव घेता येईल. स्वच्छता अभियान सारखी योजना सुरू करून त्यांनी वातावरण निर्मिती केली. मुद्रा बँक, सुवर्ण रोखे, यांसह अनेक योजना सुरू केल्या. त्याबद्दल विश्वासार्हता निर्माण करण्यासाठी, चालना मिळावी, यासाठी त्यांनी 'मन की बात'सारख्या कार्यक्रमातूनही प्रयत्न करत जनतेशी थेट संवाद साधण्याचाही प्रयत्न केला, या जमेच्या बाजू आहेत. जनधन योजनेच्या माध्यमातून खातेदारांची संख्या वाढली, पण फायदा किती झाला हे अद्याप स्पष्ट झाले नाही. 'मेक इन इंडिया'मुळे वातावरण निर्मिती झाली, पण फायदा किती झाला, हा प्रश्न अनुत्तरित आहे. स्किल इंडिया योजना राबविताना शिक्षण, उद्योग व व्यापार यांचा समन्वय गरजेचा आहे, पण तसे प्रयत्न होताना दिसत नाहीत. व्यापाराला चालना देण्यासाठी अधिक प्रयत्न गरजेचे आहेत. अंतर्गत व्यापारी धोरण जाहीर झाले पाहिजे. ऑनलाइन व्यापारामध्ये शंभर टक्के परदेशी गुंतवणूक, एफडीएचे जाचक नियम, सोन्यावरील एक्साइज ड्यूटीत झालेली वाढ यांसह अन्य कारणामुळे सर्वसामान्य व्यापाऱ्यासह नागरिकांवर भार पडतो.
- अजय शाह, अध्यक्ष, जिल्हा व्यापारी महासंघ

मोदींच्या टीममध्ये सुधारणा आवश्यक
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भाषण फार चांगले देतात. त्यांचे विचारही चांगले असतात, परंतु त्यांची टीम तेवढीच सक्षम असणे आवश्यक आहे. औरंगाबादेत ऑइल डेपो होण्यासाठी मी अनेक वर्षांपासून पाठपुरावा करीत आहे. खासदारांनीही यासाठी पुढाकार घेतला. मंत्र्यांसह सर्व परिस्थिती अनुकूल असूनही केवळ अधिकाऱ्यांनी खोडा घातल्याने अद्याप ही सुविधा निर्माण होऊ शकली नाही. एकमेकांवर जबाबदारी ढकलून विकास कामे कशी होणार, हा प्रश्न आहे. अधिकाऱ्यांचा असाच रोख राहिला, तर परिवर्तन होणे अवघड आहे. पैसे दिल्याशिवाय काम होत नाहीत, या परिस्थितीत फार फरक पडला, अशी स्थिती नाही. पेट्रोल आणि डिझेल विक्रीवर स्थानिक विकास कर आकारला जातो. प्रत्यक्षात या कराची रक्कम त्या शहरावर खर्चच केली जात नाही. मग औरंगाबादचा विकास कसा होणार. देशात पेट्रोल व डिझेलचा एकच दर असणे आवश्यक आहे. किमान राज्यात तरी एकच दर करणे अशक्य नाही. मोदींनी आपल्या टीममध्ये सुधारणा करणे आवश्यक वाटते.
- अखिल अब्बास, अध्यक्ष, औरंगाबाद जिल्हा पेट्रोलियम डिलर्स असोसिएशन.

प्रादेशिक असमतोल नको
एकवेळ अशी होती की देशाची वाटचाल कोणत्या दिशेने आहे, हे कळत नव्हते, पण गेल्या दोन वर्षांच्या वाटचालीत जागतिक पातळीवर आपल्या देशाचे नाव ठळकपणे दिसू लागले. आजपर्यंत कोणत्या पंतप्रधानांनी सांगितले, की आपली स्वच्छता आपणच करावी? मोदी सरकारने स्वच्छता अभियान राबवून एक चांगला उपक्रम सुरू केला. त्यातील लोकसहभाग वाढत आहे, ही चांगली बाब आहे. परदेशी वस्तू चांगल्या असतात, ही मानसिकता वा समज होता, पण त्याच वस्तू आपल्या देशात निर्माण करण्याची क्षमता आहे, हा विश्वास उद्योजक, तरुणांमध्ये दाखवून देण्याचे काम या सरकारने केले आहे. मोबाइल म्हणजे केवळ डिजिटल इंडिया, यांच भ्रमात आपण होतो, पण आता जनधन योजना, सबसिडी थेट खात्यात जमा होणे, ई-कॉमर्सवर भर देत देण्यात आला आहे. त्याचे फायदे दिसत आहेत. 'स्किल इंडिया' योजना राबविताना उद्योग, व्यापार या क्षेत्राशी समन्वय साधला जावा. विविध क्षेत्रात कोणत्या प्रकाराचे कुशल कामगार हवेत, त्याचा अभ्यास केला पाहिजे. योजना चांगली असली ,तरी त्यात अपग्रेड करण्याची आवश्यकता आहे. सरकारच्या धोरणाचा मोठा फायदा औद्योगिक क्षेत्राला मिळत आहे, अशा भावना निर्माण झाली. औद्योगिक क्षेत्रासाठी 'अच्छे दिन' अजून आले नाहीत, पण सरकारकडून मिळणारा प्रतिसाद निश्चितच १०० टक्के वाढला आहे. अपारंपरिक ऊर्जा क्षेत्रात उल्लेखनीय काम सुरू आहे. सरकारी योजनाचा लाभ हा विभागवार समन्यायी पद्धतीने कसा होईल, याकडे अधिक लक्ष देणे आवश्यक आहे. यात प्रादेशिक असमतोल निर्माण होता कामा नये. त्यासाठी त्रुटी दूर होणे गरजेचे आहे, पण तशी सध्या कोणतेही यंत्रणा नाही. समन्यायी वाटप झाले पाहिजे. मराठवाड्यासह देशभरात अनेक ठिकाणी दुष्काळाची भयावह परिस्थिती आहे, त्यामुळे जल सुरक्षेसाठी केंद्र सरकारने अधिक प्रयत्न करायला हवे.
- प्रसाद कोकिळ, सचिव सीएमआयए

नवा कायदा आरोग्य क्षेत्राला घातक
मोदी सरकारचे दोन वर्षांचे कामकाजात सकारात्मकता दिसून येते. सर्व काही बदल दोन वर्षांत होणार नाहीत. भ्रष्टाचाराला काही प्रमाणात आळा बसला आहे. सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्याच्यादृष्टीने स्वच्छता अभियान चांगले आहे. घराघरात हे अभियान पोचले आहे. सरकारची फॉरेन पॉलिसी प्रभावी आहे. आरोग्य धोरणात काहीच बदल जाणवत नाही. 'क्लिनिकल इस्टस्टॅबलिसमेंट अॅक्ट' तयार करण्यात येत आहे. या कायद्यामुळे छोटे हॉस्पिटल बंद होण्याची शक्यता आहे. कॉर्पोरेट क्षेत्राच्या ताब्यात आरोग्य क्षेत्र जाणार. मोदी सरकारने याकडे वेळीच लक्ष घालण्याची गरज वाटते.
- डॉ. राजेंद्रसिंह परदेशी, ज्येष्ठ स्त्रीरोग तज्ज्ञ.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘त्या’ विद्यार्थ्यांचा निकाल राखीव

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
बारावी उत्तरपत्रिका फेरलेखन रॅकेटमधील पोलिसांच्या ताब्यात असलेल्या आक्षेपार्ह उत्तरपत्रिकांचा निकाल शिक्षण मंडळाने राखीव ठेवला आहे. पोलिसांच्या ताब्यात ४७२ उत्तरपत्रिका आहेत. या उत्तरपत्रिका किती विद्यार्थ्यांच्या अन् कोणत्या विषयाच्या आहेत, याची माहितीच मंडळाला नाही.
राज्यभर खळबळ उडवून देणाऱ्या जालन्यातील उत्तरपत्रिका फेरलेखन रॅकेटचा बारावी निकालावर परिणाम जाणवला. मंडळाने हा निकाल राखीव ठेवत असल्याचे जाहीर केले. संस्कार निवासी वसतिगृहात सुरू असलेले उत्तरपत्रिका फेरलेखन रॅकेट पोलिसांनी १८ मार्च रोजी उघडकीस आणले. त्यात मंडळाच्या सहा लिपिकानांही अटक झाली. त्यामुळे मंडळाच्या कारभारावरही प्रश्नचिन्ह उभे राहिले. पोलिसांनी यावेळी ताब्यात घेतलेल्या उत्तरपत्रिकांपैकी आक्षेपार्ह, बनावट उत्तरपत्रिका वेगळ्या केल्या. या उत्तरपत्रिका वगळता आक्षेपार्ह नसलेल्या २ हजार २४१ उत्तरपत्रिका तपासणीसाठी न्यायालयीन प्रक्रियेनंतर मंडळाच्या ताब्यात देण्यात आल्या. त्या उत्तरपत्रिका शिक्षकांकडून तपासून घेण्यात आल्या. त्यानंतर संबंधित विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर करण्यात आला, तर आक्षेपार्ह असलेल्या उत्तरपत्रिकांचा निकालाचे काय करायचे, असा प्रश्न कायम आहे.

पुनर्परीक्षार्थीचा निकाल ४१ टक्के
औरंगाबाद विभागातून ३ हजार ७१३ फेरपरीक्षार्थींनी परीक्षा दिली. त्यापैकी १ हजार ५३० विद्यार्थी उत्तीर्ण झाले. उत्तीर्णतेचे प्रमाण ४१.२१ टक्के आहे. फेरपरीक्षार्थीमध्येही मुलांच्या तुलनेत मुलींचे प्रमाण अधिक आहे. मुलांच्या तुलनेत ५.२२ टक्के अधिक मुली उत्तीर्ण झाल्या. २ हजार ८१४ मुलांपैकी १ हजार १२४ जण उत्तीर्ण झाले. ८९९ परीक्षा दिलेल्या मुलींपैकी ४०६ मुलीउत्तीर्ण झाल्या.

बीड जिल्हा आघाडीवर
औरंगाबाद विभागातील निकालात यंदाही बीड जिल्ह्याने बाजी मारली आहे. जिल्ह्यातून ३३ हजार ८३३पैकी ३० हजार २४८ परीक्षार्थी उत्तीर्ण झाले. निकालाची टक्केवारी ८९.४० एवढी आहे. औरंगाबाद जिल्ह्याचा निकालाची टक्केवारी ८७.७१ आहे. हिंगोली ८७.४१, जालना ८७.२३ आणि परभणी जिल्ह्याच्या निकालाची टक्केवारी ८६.१३ एवढी आहे.

उत्तरपत्रिका ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू
पोलिसांच्या ताब्यात असलेल्या आक्षेपार्ह उत्तरपत्रिकांची संख्या ४७२ एवढी आहे. या उत्तरपत्रिका किती विद्यार्थ्यांच्या व कोणत्या विषयाच्या आहेत, याबाबत अद्याप मंडळाकडे ठोस माहिती नाही. या उत्तरपत्रिका आपल्या ताब्यात घेण्यासाठी मंडळ न्यायालयीन प्रक्रिया करत आहे. त्यानंतरच या विद्यार्थ्यांवर काय कारवाई करायची याबाबतचा निर्णय घेतला जाईल, असे विभागीय अध्यक्ष शिशिर घोनमोडे यांनी सांगितले.

कॉपीप्रकरणी २९० विद्यार्थ्यांवर कारवाई
बारावी परीक्षेत कॉपीप्रकरणी औरंगाबाद विभागात २९० विद्यार्थ्यांवर कारवाई करण्यात आली. यात सर्वाधिक औरंगाबाद जिल्ह्यातील १३८ विद्यार्थी आहेत. बीड ३२, परभणी १३, जालना ८८ व हिंगोली जिल्ह्यात १ विद्यार्थ्यावर कारवाई करण्यात आली आहे.

फेरलेखन रॅकेटमधील आक्षेपार्ह उत्तरपत्रिका पोलिसांच्याच ताब्यात आहे. त्यांचा निकाल सध्यातरी राखीव स्थितीच म्हणावे लागेल. आता या उत्तरपत्रिका आमच्या ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यानंतर पुढील कार्यवाही होईल.
- शिशिर घोनमोडे, विभागीय अध्यक्ष, शिक्षण मंडळ.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विद्यार्थ्याला मारणारा दारूडा गजाआड

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी आलेल्या ग्र‌ामीण भागातील विद्यार्थ्याला दारूसाठी मारहाण करणारा गुंड मद्यपी गजाआड झाला आहे. दहशतवाद विरोधी कक्षाच्या कर्मचाऱ्यांनी शोध मोहीम घेऊन ही कारवाई केली. भाग्यनगर भागात रविवारी रात्री हा प्रकार घडला होता. याप्रकरणी घाबरलेल्या विद्यार्थ्यांनी पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांची भेट घेत दाद मागितली होती.
योगेश सुभाष आहेर (वय २५, रा. निल्लोड ता. सिल्लोड) हा तरूण स्पर्धा परीक्षेच्या क्लाससाठी शहरात आला आहे. रविवारी रात्री साडेनऊ वाजता क्लासमध्ये अभ्यासाला जात असताना त्याला अनोळखी तरुणाने अडवून दारूसाठी पैसे मागितले होते. योगेशने नकार दिल्याने त्याला फरशीच्या तुकड्याने मारहाण करून गंभीर जखमी करण्यात आले. याप्रकरणी क्रांतिचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकाराने घाबरलेल्या इतर विद्यार्थ्यांनी सोमवारी पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांची भेट घेऊन कैफियत मांडली होती. आयुक्तांनी याप्रकरणी आरोपीचा शोध घेण्याचे आदेश दिले होते. योगेशला केवळ आरोपीचे वर्णन माहिती होते.
याप्रकरणी दहशतवाद विरोधी कक्षाच्या कर्मचाऱ्यांनी शोध मोहीम राबवली. विद्यार्थ्यांनी केलेल्या वर्णनावरून त्याचा त्या परिसरात शोध घेण्यात आला. त्यावेळी या तरुणाचे नाव विशाल म्हस्के (रा. भाग्यनगर) असल्याचे समजले. त्याला संशयावरून ताब्यात घेण्यात आले. यावेळी हाच आरोपी असल्याचे योगेशने ओळखले. त्याला क्रांतिचौक पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. ही कारवाई विशेष शाखेचे पोलिस निरीक्षक भारत काकडे, पीएसआय गरबडे, गौतम गंगावणे, योगेश सावंत, बंडू पगारे प्रशांत जायभाये आदींनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बेलगावच्या ४२ विहिरी बुजवा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, वैजापूर
तालुक्यातील बेलगाव येथील पाझर तलावाच्या संपादित जमिन क्षेत्रात शेतकऱ्यांनी अवैधरित्या खोदलल्या ४२ वैयक्तिक विहिरी आठ दिवसात बुजवण्याचे आदेश उपविभागीय अधिकारी लक्ष्मीकांत साताळकर यांनी जिल्हा परिषद सिंचन उपविभागाला दिले.
नांदूर-मधमेश्वर जलदगती कालव्याच्या लाभक्षेत्रातील बेलगाव शिवारात जिल्हा परिषद सिंचन विभागाने पाझर तलावाची बांधणी केलेली आहे. सिंचन विभागातील तत्कालीन अधिकऱ्यांना अर्थपूर्ण व्यवहार करुन तलावाच्या संपदित क्षेत्रात काही लोकांनी बेकायदशीर विहिरी खोदून तलावाची चाळणी केली. तलावात नांदूर-मधमेश्वर कालवा व पावसाच्या पाणीसाठा होत होता. यामुळे विहिरीतून बेसुमार पाणी उपसा करण्यात येत असल्याने तलावाच्या कार्यक्षेत्रातील सुराळा आदीसह गावांना पाणी टंचाईला सामोरे लागत आहे. बुडित क्षेत्रातील शासनाच्या जमिनीची परस्पर विक्री करून तेथे काही लोकांनी अधिकाऱ्यांच्या संगनमताने विहिरी खोदल्याची तक्रार सुराळा ग्रामपंचायत कार्यालयाने उपविभागीय अधिकारी कार्यालयाकडे केली होती. या तक्रारीची गंभीर दखल उपविभागीय अधिकारी साताळकर यांनी घेऊन आठ दिवसात तलावातील विहिरीचे अतिक्रमण बुजवावे न पाइपलाइन काढून टाकण्याचे आदेश दिले. याकारवाईचा अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

सटाणा प्रकल्पाची कारवाई कागदावर
तालुक्यातील सटाणा लघुप्रकल्पातील गट क्रमांक १६६ व १६७ मधील ६२ अवैध विहिरी बुजवण्याची मागणी जांबरगाव येथील कार्यकर्ते सुभाष साठे यांनी केली होती. याप्रकरणी त्यांनी विभागीय आयुक्त डॉ. उमाकांत दांगट यांच्याकडे तक्रार केली होती. त्यानंतर पाटबंधारे विभागाने सर्व विहिरींना नोटीस चिकटवून संबंधित मालकांना वीज पंप व इतर साहित्य काढून घेण्याचे आवाहन केले होते. पाटबंधारे विभागाने विहिरींचा वीजपुरवठा खंडित करण्याचे नियोजन केले. मात्र, विहीर बुजवण्याच्या आदेशाला केराची टोपली दाखविल्याचा आरोप साठे यांनी केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images