Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

फूड कॉर्नर : चविष्ट मसाला मेथी पिठलं

$
0
0

Abdulwajed.Shaikh@timesgroup.com
शहरातील विविध हॉटेलमध्ये काम करणाऱ्या काही तरुणांनी एकत्र येऊन सिडकोत विजय रेसिडेन्सी नावाने हॉटेल सुरू केले. एमजीएम हॉस्पिटलच्या समोर, नुपूर थिएटरच्या मागील बाजूला असलेले हे हॉटेल वैशिष्ट्यपूर्ण आहे. हॉटेलच्या फूड मेन्यूमध्ये कोणते पदार्थ आपल्या शरीराला उपायकारक आहेत, याची माहिती देण्यात आली आहे. हॉटेलमधील प्रत्येक खाद्यपदार्थ तयार करताना ग्राहकांच्या आरोग्याची काळजी घेतली जाते. त्याचबरोबर पदार्थाची चवही जपली जाते. या हॉटेलमध्ये पहिल्यांदा मॅजिक कुकची संकल्पना मांडण्यात आली आहे. मॅजिक कुकच्या माध्यमातून एक्झिकिटिव्ह शेफ अर्जून खरेल यांनी चविष्ट पदार्थ उपलब्ध करूनदिले आहेत.
'विजय रेसिडेन्सी'मधील मसाला मेथी पिठलं हा महाराष्ट्रीयन पदार्थ खूपच प्रसिद्ध झाला आहे. पाण्यात डाळीचे पीठ (बेसन) टाकून त्यात मीठ, लाल मिरची पावडर, जिरे, हाळद टाकली जाते. यानंतर एका पातेल्यात थोडेसे तेल घेतले जाते. त्यात बारीक चिरलेला लसूण, कांदे, टोमॅटो पेस्टे, हिरवी मिरची आदी साहित्य टाकले जाते. ते पदार्थ चांगले भाजून त्यात बारीक चिरलेली मेथी टाकून ‌जाते. त्यानंतर काही काळ हे मिश्रम भाजतात. त्यातनंतर मसाले टाकतात. मिश्रणात मसाले मिसळल्यानंतर त्यात भिजविलेले डाळीचे पीठ टाकून हे मिश्रण शिजविले जाते. पिठल्यावर धणे पावडर, गरम मसाला, बारीक कोथंबीर टाकून ग्राहकांना ही डिश सर्व्ह केली जाते. ही डिश ज्वारी किंवा बाजरीच्या भाकरी सोबत चविष्ट लागते. अनेक ग्राहक पिठल्यासोबत भाकरीला प्राधान्य देतात.
याशिवाय या ठिकाणी व्हेज खाद्यपदार्थांमध्ये कडाई पनीर अदरकी प्रसिद्ध आहे. हा पदार्थ तयार करताना पनीर, लच्चेछार (गोलाकार कापलेले) कांदे, टोमॅटो पेस्ट, धणे पावडर, काजू पेस्ट आदींचा वापर करण्यात येतो. एका पातल्यात तेल टाकले जाते. ते गरम झाल्यावर त्यात मिरची, बारीक केलेले आले, ढोबळी मिरची टाकले जाते. लाल रंग येईपर्यंत हे पदार्थ भादले जातात. त्यानंतर त्यात धणे पावडर, मिरची पावडर, टोमॅटो पेस्ट, काजू पेस्ट टाकले आदी जाते. ही ग्रेव्ही तयार झाल्यानंतर त्यात चौकीनी आकारात कापलेले पनीर टाकून कडाई पनीर अदरकी तयार करण्यात येते. ही डिश सर्व्ह करताना त्यावर कोथिंबीर, लाल तिखट टाकले जाते.
त्याचबरोबर या हॉटेलमध्ये पनीर लबाबदारलाही ग्राहकांची मागणी आहे. याशिवाय हॉटेलमध्ये सिझनप्रमाणे विविध राज्यांतील प्रसिद्ध असलेल्या खाद्यपदार्थ तयार केली जातात. त्यालाही खवय्यांची मागणी असते, असे शेफ अर्जून खरेल यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पालिका-रेल्वे दिलजमाई; दशकानंतर मार्ग मोकळा

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
महापालिका आणि रेल्वे विभागात गेल्या दशभरापासून सुरू असलेल्या जागेच्या वादावर अखेर दिलजमाईने पडदा पडला. स्टेशनसमोरची अर्धा एकर जागा देण्यासाठी रेल्वे प्रशासन राजी झाले असून, महापालिकेने त्यासाठी ३ कोटी ५५ लाख रुपये रेल्वेकडे धनादेशाद्वारे जमाही केले आहेत.
क्रांतिचौक ते रेल्वेस्टेशन हा सुमारे अडीच किलोमीटरचा रस्ता सिमेंट काँक्रिटचा करण्याची योजना महापालिकेने आखली. १२० फूट रुंदीच्या या रस्त्यावर चार लेन सिमेंट काँक्रिटच्या तर दोन लेन डांबरीकरणाच्या करण्यात येणार होत्या. या प्रकारे काही भागात काम करण्यात आले, पण रेल्वेस्टेशनजवळ रस्ता रुंदीकरणाचे काम बंद पडले. त्यासाठी रेल्वेची जागा संपादीत करणे गरजेचे होते, पण जागेची किंमत आणि जागा याबद्दल महापालिका आणि रेल्वे प्रशासन यांच्यात एकवाक्यता होत नव्हती. रेल्वे प्रशासनाने रस्त्यासाठी महापालिकेला जागा द्यावी यासाठी खासदार चंद्रकांत खैरे यांनी संबंधित अधिकाऱ्यांच्या अनेकवेळा बैठका घेतल्या. त्यानंतर गेल्या महिन्यात जागेचा प्रश्न मार्गी लागला. रेल्वे प्रशासन त्यांच्या मालकीची जागा विकत नाही, त्यामुळे या प्रशासनाने रस्त्यासाठीची जागा महापालिकेला ३० वर्षांच्या लीजवर देण्याची तयारी दाखवली. त्यासाठीची ठरलेल्या रकमेचा धनादेश पालिकेने रेल्वेला दिला. त्यामुळे जागा मिळण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे.

चेक देताना घातला घोळ
जागेच्या मोबदल्यापायी ३ कोटी ५५ लाख रुपयांचा चेक रेल्वे प्रशासनाला देताना महापालिकेने घोळ घातला आहे. 'डिव्हिजनल कमर्शियल मॅनेजर'च्या नावे चेक देण्याऐवजी 'डिव्हिजनल रेल्वे मॅनेजर' यांच्या नावे चेक देण्यात आला आहे. त्यामुळे दुरुस्तीसाठी चेक पुन्हा महापालिकेकडे येऊ शकतो. दुरुस्ती करून नव्याने चेक दिल्यावर जागा पालिकेच्या ताब्यात मिळेल. जागा ताब्यात देताना डीएसआर रेटचा प्रश्न निर्माण होईल, असे मानले जात आहे.

मटा भूमिका
---
३० वर्षांची मेख
---
एखादा प्रश्न सोडविण्यास महापालिका किती वेळ लावू शकते, याचे हे जळजळीत उदाहरण. रस्त्यासाठी लागणारी जमीन रेल्वेकडून लोकप्रतिनिधी मिळवून देतील, या आशेवर बसलेल्या पालिकेला अखेर रक्कम द्यावीच लागली. प्रमुख रस्त्यावरच हा अडथळा होता, पण तोदेखील लोकप्रतिनिधींना दहा वर्षे हटविता आला नाही. आताही रेल्वे आपली जमीन विकत नाही, या सबबीवर ३० वर्षांच्या लीजची मेख मारून ठेवण्यात आली आहे. यावरून केंद्रीय मंत्रीदेखील या पालिकेच्या बाबतीत व्यवहार पाहात असल्याचे स्पष्ट होते. लीजवरच द्यायची होती, तर १०० वर्षांसाठी का नाही असा प्रश्न उपस्थित होतो, कारण ही जमीन नफा कमावण्यासाठी द्यायची नाही, याचेही भान रेल्वे प्रशासनाला राहिले नाही. आता पालिकेने तातडीने जमीन ताब्यात घेऊन रस्ता विकसित करावा. हे काम थंड्या बस्त्यात टाकू नये.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

...मातीतून दोन बोटे हलली अन् ‘तो’ वाचला!

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
वीस फूट खोल असणाऱ्या खड्यातील ढिगाऱ्यातून दोन बोटे वर आली. तिथे असलेल्या महिला मजुराने जीव गुदमारणारा हा प्रसंग पाहताच जीवाच्या आकांताने टाहो फोडला. आणि मृत्यूशी चार हात करणाऱ्या भीमराव गायकवाडला बाहेर काढण्यासाठी खोरे, फावडे, मिळेल त्या वस्तूने माती उपसणे सुरू झाले. काळ हारला, भीमा वाचला.
शहानूरमियॉँ दर्गा परिसरातील ही घटना. देशपांडेपूरममध्ये पावसाचे पाणी शिरल्याच्या तक्रारी होत्या. हे पाणी भूमिगत जलवाहिनीतून नाल्यात सोडण्याच्या कामाचे कंत्राट कचरू भिंगारकर यांनी घेतले होते. येथे शुक्रवारी सकाळी काही मजूर काम करत होते. दुपारी साडेबाराच्या सुमारास भीमरावच्या अंगावर मातीचा ढिगारा कोसळला. त्यांची मातीच्या ढिगाऱ्यातून वर आलेली दोन बोटे एका महिला मजुराने पाहिली. तिने किंकाळी फोडल्यानंतर कसलिही पर्वा न करता मजुरांनी तातडीने मदतकार्य सुरू केले. मातीत चिखल जास्त असल्याने काम जिकरीचे होते. काढलेली माती पुन्हा खड्ड्यात पडायची. अखेर भीमरावांना श्वास घेणे शक्य होईल, अशा पद्धतीने माती काढली. दीड तासांच्या प्रयत्नानंतर भीमराव सुखरूप बाहेर निघाले. त्यांच्यावर घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ते ज्या खड्ड्यात पडले होते, तो खड्डा तत्काळ जेसीबीने बुझविण्यात आला. मदत कार्य सुरू असताना काही नागरिकांनी अग्निशमन दल आणि पोलिसांना फोन केला. या घटनेमुळे उड्डाणपुलावर,परिसरात तासभर वाहतूक कोंडी झाली. अग्निशमन दलाची गाडी या कोंडीत अडकली. अखेर वाहूतक शाखेचे अविनाश आघाव यांनी वाहतूक सुरळीत केली.

बघ्या पोलिसांची दंडेली
भीमरावला खड्ड्यातून काढण्याचे काम सुरू असताना बघ्यांनी मोठी गर्दी केली. येथे असलेले पोलिस कर्मचारी राजेंद्र बढे, मनोज सपकाळ यांनी मदतीसाठी धावणाऱ्या लोकांना धक्काबुक्की आणि शिवीगाळ केली. त्यामुळे आक्रमक झालेल्या जमावाने पोलिसांना धारेवर धरले. 'तुम्ही मदत करत नाही. किमान मदत करणाऱ्यांना रोखू तरी नका,' असे उपदेशामृत पाजले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘समांतर’विरोधकांची भेट आयुक्तांनी टाळली

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
'समांतर' जलवाहिनीप्रकरणी वेळ देऊनही आयुक्तांनी भेट टाळली. त्यामुळे समांतर जलवाहिनी पाणीपुरवठा खासगीकरण विरोधी नागरी कृती समितीचे पदाधिकारी महापालिकेतून माघारी फिरले. आयुक्त सन्मानाने बोलावतील तेव्हाच त्यांना भेटायला जाऊ, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
समांतर जलवाहिनीचा पीपीपीतत्वावरचा करार रद्द करण्याचा निर्णय महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत झाला. आता पालिकेने आणखी काय करावे, यावर चर्चा करण्यासाठी कृती समितीचे प्रा. विजय दिवाण यांनी आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांची वेळ घेतली. बकोरिया यांनी त्यांना दुपारी चारची वेळ दिली. त्यानुसार प्रा. दिवाण कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांसह बकोरिया यांना भेटण्यासाठी पालिकेत आले. यावेळी त्यांच्याबरोबर प्रदीप पुरंदरे, कलीम अख्तर, अशोक खरात होते. बकोरिया शुक्रवारी दुपारी तीन ते पाच या वेळात सर्वसामान्य नागरिकांना भेटतात. त्यामुळे त्यांना भेटण्यासाठी सर्वसामान्य नागरिकही मोठ्या संख्येने आले होते. चार वाजता पालिकेत आल्यावर प्रा. दिवाण यांनी बकोरिया यांना चिठ्ठी पाठवली. पाच वाजले तरी बकोरियांकडून बोलावणे आले नाही. त्यामुळे आता कितीवेळ वाट बघायची, असा विचार करून कृती समितीचे पदाधिकारी माघारी फिरले. 'तुम्हाला जेव्हा फुरसत असेल तेव्हा कळवा, आम्ही भेटायला येऊ' असा उल्लेख असलेली चिठ्ठी त्यांनी पालिका सोडताना बकोरिया यांना पाठवली. पीपीपीतत्वावरचा करार रद्द झाल्यामुळे वॉटर बायलॉज रद्द करा, पाणीपट्टी वाढीचा पुनर्विचार करावा अशा विविध मुद्यांवर कृती समितीचे पदाधिकारी आयुक्तांशी चर्चा करण्यासाठी आले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिक्षणमंत्र्यांकडे चोरी करून शहरात लपले

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
मराठवाड्याची राजधानी म्हणून बिरूद मिरवणारे शहर आता दरोडेखोरांच्या लपण्याची सोयीस्कर जागा झाली आहे. मध्यप्रदेशातील शिक्षणमंत्र्यांच्या गॅस एजन्सीवर दरोडा टाकून लाखोंचा ऐवज लुळून शहरात आश्रय घेतलेल्या टोळीला शुक्रवारी पहाटे भोईवाड्यातील शिवशक्ती लॉजवर खंडवा पोलिसांनी बेड्या ठोकल्या.
मध्यप्रदेशचे कॅबिनेट शिक्षण मंत्री विजय शाह यांची खंडवा येथील मालिकुआंमध्ये गॅस एजन्सी आहे. बुधवारी, २० जुलै रोजी काही दरोडेखोरांनी या एजन्सीवर दरोडा टाकून सुमारे ३ लाख ६ हजारांची रोकड घेऊन पळ काढला. मंत्र्यांच्या एजन्सीत चोरी झाल्यामुळे खंडवा पोलिसांसमोर चोरांना पकडण्याचे मोठे आव्हान होते. पोलिसांना दरोडेखोरांच्या मुसक्या आवळण्यासाठी गॅस एजन्सी समोरील हॉटेलच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची मदत मिळाली. या कॅमेऱ्यात एक वृद्ध इसम आणि दोन तरुण दुकानाबाहेर चादर घेऊन उभे असलेले दिसून आले. दरोडेखोरांनी त्यांच्या नातेवाईकांना फोन केल्यानंतर ते औरंगाबादमध्ये लपल्याचे पोलिसांना लोकेशनवरून समजले. खंडवा पोलिसांनी औरंगाबाद पोलिसांशी संपर्क साधून या कारवाईत सहकार्य करण्याची विनंती केली. या प्रकरणात क्रांतिचौक पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक नागनाथ कोडे यांच्यासह गुन्हे शाखेच्या विभागाचे कर्मचाऱ्यांनी दरोडेखोरांचा शोध सुरू केला. हे संशयित भोईवाड्यातील शिवशक्ती लॉजमध्ये लपल्याची माहिती मिळताच पोलिसांनी या लॉजवर छापा टाकला. या छाप्यात गोविंद मिश्रीलाल जैस्वाल (रा. मोतीचारी तहसील, बिहार), नरेंद्रकुमार खोदाई प्रसाद, जितेंद्र तुफानी पासवान, संजय गोरख ठाकूर, सुनीलकुमार शिवशंकर प्रसाद, मनावला मोहमंद हुसैन, धीरजकुमार रामोजी प्रसाद, सुरेंद्र दरगो सहा, सोनीलाल प्रसाद श्यामलाल प्रसाद, दिनेश राजकुमार पासवान अशा दहा जणांना ताब्यात घेण्यात आले. या आरोपींना खंडवा पोलिसांच्या हवाली केले आहे.

अजिंठा पर्यटनाचा बेत
दरोडेखोरांच्या ताब्यातून एक स्क्रू ड्रायव्हर, एक कटर, मोठा पाना व ७० हजारांची रोकड पोलिसांनी जप्त केली. चौकशी केल्यानंतर अंजिठा लेणी फिरण्यासाठी आलो होतो. लेणी बघितल्यावर पुन्हा भुसावळमार्गे मध्यप्रदेशला जाणार होतो, असे दरोडेखोरांनी पोलिसांना सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

८ कंत्राटी जागा; उमेदवार ५००!

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
मराठवाड्यातील दळणवळणाचे चित्र बदलणाऱ्या सोलापूर-धुळे या राष्ट्रीय महामार्गाच्या औरंगाबाद-धुळे या दुसऱ्या टप्प्याचे भूसंपादन आणि चौपदरीकरणासाठी औरंगाबाद उपविभागीय कार्यालयाकडून आठ जागा भरण्यासाठी अर्ज मागवण्यात आले होते. त्यासाठी जवळपास पाचशे अर्ज प्राप्त झाले होते. शुक्रवारी उपजिल्हाधिकारी मंजुषा मुथा यांनी या उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या.
येडशी ते औरंगाबाद या पहिल्या टप्प्यातील काम वेगाने सुरू असून औरंगाबाद-धुळे या राष्ट्रीय महामार्गाच्या कामाला गती देण्यासाठी भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण करावयाची आहे. यासाठी प्रशासनाच्या वतीने कंत्राटी पद्धतीने लेखा विभाग, अव्वल कारकून, डेटा एन्ट्री ऑपरेटर, शिपाई अशा आठ जागांसाठी अर्ज मागवण्यात आले होते. त्यासाठी पाचशे उमेदवारांनी अर्ज केले होते. शुक्रवारी झालेल्या मुलाखतीसाठी उपविभगीय कार्यालयात उमदेवारांची मोठी गर्दी झाली होती. यातील काही उमेदवार गुरुवारीच मुलाखतीसाठी हजर झाले होते. मात्र, त्यांना मुलाखती उद्या असल्याचे सांगण्यात आले. आज २०० उमेदवारांच्या औरंगाबाद आणि गंगापूर तालुक्यांसाठी मुलाखती झाल्या. या जागा भरल्यानंतर या महामार्गासाठी लवकरच भूसंपादनाची प्रक्रिया सुरू होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘वक्फ’ सीईओची नेमणूक कधी?

$
0
0


म. टा. विशेष प्रतिनिधी, औरंगाबाद
वक्फ बोर्डाचा कारभार सध्या प्रभारी अधिकाऱ्यांवर सुरू आहे. याप्रकरणी मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली आहे. या बोर्डावर नियमित मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याची (सीईओ)कधी नेमणूक करणार ? याविषयी दोन आठवड्यात अहवाल सादर करा, असे आदेश आज कोर्टाने दिले.
खुलताबाद येथील दर्गा हजरत खाजा मुन्तजियोद्दीन जर जरी बक्ष यांनी सध्याच्या प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी नसीम बानू नझीर पटेल यांना पदावरून हटविण्यासाठी याचिका दाखल केली आहे. पटेल यांची नेमणूक वक्फ बोर्डाच्या शिफारशीनुसार करण्यात आलेली नाही. त्यांच्याकडे मुख्य कार्यकारी अधिकारी पदासाठी आवश्यक असणारी पात्रता नाही. त्यांना उर्दू भाषेचे ज्ञान नाही. या पदासाठी इतर गुणवत्ताधारक व्यक्ती असतानाही पटेल यांची बेकायदा निवड करण्यात आल्याचा आरोप याचिकेत करण्यात आला आहे. पटेल यांनी वर्षभरात बोर्डाची एकही सभा घेतली नाही. बोर्डाच्या चेअरमन निवडीकरिता बोलविण्यात आलेल्या दोन्ही सभा रद्द करण्यात आल्या. त्यांना पदावरून हटविण्याची विनंती याचिकेत करण्यात आली आहे. सुनावणीअंती नियमित मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची कधी नेमणूक करणार याविषयी दोन आठवड्यात अहवाल सादर करण्याचे आदेश कोर्टाने दिले. याचिकाकर्त्याच्यावतीने सतीश तळेकर यांनी तर सरकारतर्फे अमरजितसिंह गिरासे यांनी बाजू मांडली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धार्मिक स्थळांची यादी प्रसिद्ध करा

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
शहरातील धार्मिक स्थळांची यादी लवकर प्रसिद्ध करा. ज्या धार्मिक स्थळांबद्दल अद्यापही वाद आहेत, त्या स्थळांना पुन्हा भेट देऊन वाद संपुष्टात आणण्याचा प्रयत्न करा, असे आदेश महापालिका आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांनी शुक्रवारी अधिकाऱ्यांना दिले.
धार्मिक स्थळांच्या संदर्भात डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्रात सायंकाळी बैठक झाली. या बैठकीला महापालिकेच्या अधिकाऱ्यांसह पोलिस विभागाचे अधिकारी, सिडको, वक्फ बोर्डचे अधिकारी देखील उपस्थित होते. धार्मिक स्थळांच्या सर्वेक्षणाच्या कामाबद्दल बकोरिया यांनी यावेळी आढावा घेतला. २०१२ नंतरची सर्व धार्मिक स्थळे पाडून टाकण्याचे आदेश शासनाने कोर्टाच्या निर्देशानुसार दिले आहेत. त्यापूर्वीच्या धार्मिक स्थळांचे वर्गीकरण अ, ब, क अशा तीन वर्गात करण्यात आले आहे. वर्गीकरणानुसार धार्मिक स्थळांच्या याद्या तयार करण्याची जबाबदारी महापालिकेवर टाकण्यात आली होती. सुमारे वर्षभरापूर्वी महापालिकेने यादी तयार करून ती प्रसिध्द केली. त्यावरून वाद निर्माण झाले. खासदार चंद्रकांत खैरे यांच्या नेतृत्वाखाली धार्मिक स्थळ बचाव समिती स्थापन झाली. नागरिकांनी देखील धार्मिक स्थळ विरोधी मोहिमेला आक्षेप घेतला. त्यामुळे धार्मिक स्थळांच्या सर्वेक्षणाचे काम नव्याने करण्याचे आदेश महापालिकेच्या सर्वसाधारण सभेने प्रशासनाला दिले. त्यानुसार सर्वेक्षणाचे काम करण्यात आले. सर्वेक्षणानंतर तयार झालेली यादी लवकर प्रसिद्ध करा, असे आदेश बकोरिया यांनी दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


धनादेशामुळे चोर जाळ्यात

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, सातारा
बीड बायपास येथील रेशम लॉन्स येथे स्वागत समारंभ सुरू असताना चोरटयाने वधूच्या आईची पर्स चोरली. त्यात असलेल्या चेकबूकमधून त्याने धनादेश दिला, परंतु तो न वटल्यामुळे तो पोलिसांच्या जाळयात अडकला. सातारा पोलिसांनी अंगद पाडुरंग शिंगटे याला त्याच्या उस्मानाबाद जिल्ह्यातील राहत्या घरून अटक केली.
ज्योती प्रवीण हर्सूलकर (रा. एन ९, रंजनवन हौसिंग सोसायटी प्लॉट क्र. ४६, सिडको) यांच्या मुलीच्या लग्नानिमित्त ५ डिसेंबर रोजी बीड बायपासवरील रेशम लॉन्स् येथे स्वागत समारंभ आयोजित करण्यात आला होता. स्वागत समारंभ सुरू असताना रात्री ७.३० ते ८च्या दरम्यान त्यांनी स्टेजच्या सोफ्यावर ठेवलेली पर्स चोरट्यांनी लांबवली. त्यात सोन्याचे दागिने व मोबाइल व असा ६९ हजार ६०० रुपयांचा ऐवज होता. याशिवाय पर्समध्ये बँकेचे पासबूक व चेकबूक होते.
चोरट्याने चोरी केल्यानंतर आठ दिवसांनंतर लगेचच बनावट स्वाक्षरी करून चेक स्वत:च्या नावे बँकेत टाकला. मात्र, तो वटला नाही. त्यानंतर त्याने शक्कल लढवत उधारी चुकवण्यासाठी एका व्यक्तीला या महिन्यात चेक दिला. तोही धनादेश स्वाक्षरी जुळत नसल्यामुळे वटला नाही. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या पोलिसांनी ज्या व्यक्तीच्या नावे धनादेश दिला होता त्याचा शोध घेतला. त्याने दिलेल्या माहितीच्या आधारे धनादेश देणाऱ्या अंगद पाडुरंग शिंगटे (रा. अंजनसोंडा, ता. भूम, जि उस्मानाबाद) याला त्याच्या राहत्या घरून ताब्यात घेतले. त्याच्या घरून चेकबूक हस्तगत केले असून, चोरीचा ऐवज ताब्यात घेण्यासाठी व इतर काही गुन्हे केले आहेत का, संदर्भात चौकशी सुरू आहे. ही कामगिरी एसीपी मुंढे व निरीक्षक काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली एएसआय सखाराम सानप, राजेंद्र साळुंके, संदीप तायडे, देशराज मोरे यांनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गुप्तधनासाठी मांडूळाची तस्करी

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
गुप्तधन काढण्यासाठी मांडूळ जातीच्या सापाची तस्करी करणाऱ्या चौघांना हर्सूल पोलिसांनी गुरुवारी रात्री दहाच्या सुमारास बसस्थानकातून अटक केली. यात एक मुंबईतील एसटी बसचालकाचीही समावेश आहे.
पोलिस निरीक्षक वसीम हाश्मी यांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रीरंग सखाराम सानप असे बसचालकाचे, तर शेख हारूण शेख छोटू (रा. युसूफ कॉलनी, जुना जालना) असे दलालाचे नाव आहे. तसेच भिका ताराचंद पवार व संतोष ओंकार राठोड अशी अन्य दोघांची नावे आहेत. दोन व्यक्तींनी मांडूळ पकडून ते भिका व संतोष यांच्या हवाली केले होते. तसेच त्यांना जालना येथील शेख हारूण व श्रीरंग सानप यांच्याकडे सुपूर्द करण्याचे सांगितले होते. त्यानुसार, चारचाकी गाडीने संतोष राठोडला घेऊन भिका पवार सिडको बसस्थानकात आला. त्या वेळी शहरात नाकेबंदी होती. हर्सूल ठाण्याचे निरीक्षक वसीम हाश्मी, बनकर, राठोड यांनी संशयावरून दोघांची चौकशी केली. त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे एका पोत्यात ठेवलेले मांडूळ सापडले. प्रकरण गंभीर दिसल्याने त्यांनी दोघांना ताब्यात घेत साप खरेदी करणाऱ्या श्रीरंग सानप व शेख हारूण यांचा शोध सुरू केला. ते बसस्थानक परिसरात येताच, त्यांना सापळा रचून पकडले. गुप्तधन काढण्यासाठी या सापाची मदत होत असल्याचा दावा संशयितांनी केला. त्यांच्यावर गुन्हा नोंदवून अटक करण्यात आल्याचेही निरीक्षक हाश्मी यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

...ये गं ये गं सरी रंगले!

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
'ये रे ये रे पावसा, तुला देतो पैसा, पैसा झाला मोठा, पाऊस आला खोटा'लहान- मोठ्यांना माहित असणारे बडबडगीत २०६० मध्ये अशा पद्धतीने गायले जाईल. एक वेळ अशी येईल की पाणी सुद्धा सोन्याच्या भावात घ्यावे लागेल. ऐकणाऱ्यास विडंबन वाटत असले तरी हेच आपले भविष्य असू शकते, हा गर्भित इशारा ये गं ये गं सरी नाटकाने दिला.
प्रगतीशील ज्येष्ठ नागरिक सेवाभावी संस्था, रोटरी क्लब औरंगाबाद मिडटाऊन व स्फूर्ती महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मेघमल्हार व्याख्यानमालेचे तिसरे व अंतिम पुष्प या नाटकाने गुंफले. रंगकर्मी गिरीधर पांडे लिखित व विश्वनाथ दाशरथे दिग्दर्शित ये गं ये गं सरी नाटकाचे नाट्य अभिवाचन कार्यक्रम शुक्रवारी गीताभवनमध्ये झाला. बी पॉझिटिव्ह फाऊंडेशन व संस्कार भारती शाखेने हे नाटक सादर केले. पाणी आपले जीवन आहे, पण आज सहाशे फुटांवर बोअर खोदून आपणच पाणी खोल खोल नेले. मग पाणी नाही याला आपणच जबाबदार.नाही का? या प्रश्नानेच पांडे यांनी नाटकाची सुरुवात केली. २०६० मध्ये भीषण पाणीटंचाईने आजीचा वाढदिवस कसा मरण सोहळा होतो, त्याकाळी कशी रोज आंघोळीची गोळी घ्यावी लागेल, वाहनेसुद्धा पाण्यावर चालतील.
माणसाचे जीवनमान उंचावेल, पण पाणी मात्र खोल खोल गेले असेल, हे सांगणाऱ्या पात्रांनी हुबेहुब चित्र उभारले. विश्वनाथ दाशरथे, अर्चना देवधर, अथर्व बुद्रुककर, रोशन ठाकूर, अश्विनी दाशरथे, मानसी कुलकर्णी, स्वानंदसरस्वती गोमटे, श्रीविशा दाशरथे व गिरीधर पांडे यांनी उत्कृष्ट अभिनयाने रसिकांना खिळवून ठेवले. यावेळी प्रगतीशीलचे अध्यक्ष आर. पी.दुसे, रोटरी मिडटाऊनच्या अध्यक्षा सीमा काथारवाणी व स्फूर्तीच्या अध्यक्ष अलका अमृतकर उपस्थित होत्या. आरती कुलकणी यांनी सूत्रसंचालन केले. मीना देशपांडे यांनी परिचय, तर स्फूर्तीच्या उपाध्यक्ष डॉ. सीमा दहाड यांनी आभार व्यक्त केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फ्लॅट न देता फसवणूक; दोन बिल्डरांविरुद्ध गुन्हा

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
फ्लॅट न देता बुकिंगची अडीच लाखांची रक्कम हडपणाऱ्या संजय मंझा आणि मंजित पांडे या बिल्डरांविरुद्ध क्रांतिचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. संजय आसाराम मांडवगड (रा. एन. टू सिडको) असे फिर्यादीचे नाव आहे.
वैजापूर रस्त्यावरील मिटमिटा येथील मातोश्री पार्क अपार्टमेंटच्या बांधकामाला २०१२मध्ये सुरुवात झाली. तेरा लाख रुपयांत फ्लॅट मिळत असल्याने या अपार्टमेंटमधील बी इमारतीतील फ्लॅट क्रंमाक चार मांडवगड यांनी बुक केला. त्यासाठी बिल्डर संजय मंझा यांनी २८ नोव्हेंबर २०१२ रोजी बुकिंगसाठी म्हणून ५१ हजार रुपये घेतले. त्यानंतर ७ जानेवारी २०१३ रोजी पुन्हा दोन लाख रुपये घेतले. या दोन्ही रकमा धनादेशाद्वारे देण्यात आल्या. मात्र, आजपर्यंत या इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले नाही. मांडवगड यांनी याप्रकरणी चौकशी केली असता अर्धवट बांधकाम असलेला हा प्रकल्प मंझा यांनी मंजित पांडे यांना परस्पर विकल्याचे समजले. फ्लॅट आणि दिलेले पैसेही मिळत नसल्यामुळे मांडवगड यांनी मंझा व पांडेविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मोजमापाविना रस्ते काम सुरू

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
जालना रोड, बीड बायपास रस्त्याचे मोजमाप देण्यात संबंधित संस्थाकडून होणारा उशीर पाहता अखेर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने स्वतःच्या पातळीवर रस्त्यांचे मोजमाप घेऊन विविध कामांचे अंदाजपत्रक बनविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू केले आहे. या दोन्हीही रस्त्यांच्या टेंडर प्रक्रियेसाठी जुलै महिन्याच्या अखेरीस संपूर्ण तपशील दिल्लीला पाठवायचा आहे.
नगरनाका ते केंब्रिज हा १४ किलोमीटरचा जालना रस्ता आणि महानुभाव आश्रम ते झाल्टा फाटा हा बीड बायपास रस्ता या दोन्हीही रस्त्यांचे काम राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून केले जाणार आहे. यासाठी केंद्र सरकारने ७५० कोटी रुपयांच्या खर्चाला मंजुरी दिली. मात्र, रस्ते बांधणीवेळी नेमकी कोणती कामे करावी लागतील याची माहिती घेण्यासाठी व त्या कामांचे अद्यवायत मोजमाप करून ते राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला उपलब्ध करून देण्यासाठी गेल्या शनिवारी वैधानिक विकास मंडळाच्या कार्यालयात जिल्हाधिकारी डॉ. निधी पांडेय व खासदार चंद्रकांत खैरे यांच्या उपस्थितीत बैठक झाली. दोन्ही रस्त्यांसाठी महापालिका, सिडको, एमआयडीसी, वीज मंडळ, बीएसएनएल, एस.टी. महामंडळ या प्रमुख विभागांचे सहकार्य गृहीत धरून त्यांना त्यांच्या विभागांचे कोणते काम करावे लागेल, याची माहिती आठ दिवसात सादर करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले. प्रामुख्याने रस्त्याच्या खालून जाणाऱ्या जलवाहिन्या, ड्रेनेज लाइन, विविध केबल्स, रस्त्याच्या कामाच अडथळा ठरणारे विजेचे खांब स्थलांतरित करण्याचे मोठे काम राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला करावे लागणार आहे, असे या बैठकीत स्पष्ट झाले होते. या कामासाठीचा पैसा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण खर्च करणार आहे. संबंधित विभागांना फक्त कामांची माहिती व त्याचे मोजमाप द्यायचे आहे, पण आठ दिवसांत पुरेशी माहिती जमा करून देण्यात आली नाही.
दोन्हीही रस्त्यांच्या टेंडरची कागदपत्रे जुलै अखेरीस राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या दिल्ली येथील कार्यालयाला पाठवणे गरजेचे असल्यामुळे स्थलांतराच्या विविध कामांचा आढावा घेऊन त्याचे अंदाजपत्रक तयार करण्याचे काम प्राधिकरणाने सुरू केले आहे. महापालिका, सिडकोसह काही कार्यालयांनी प्राथमिक माहिती उपलब्ध करून दिली असली, तरी ही माहिती पुरेशी नसल्याचे सूत्रांनी सांगितले.

ऑगस्ट महिन्यात आढावा बैठक
जालना रोड आणि बीड बायपास रस्त्याच्या कामाच्या संदर्भात ऑगस्ट महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पुन्हा एक आढावा बैठक घेतली जाणार आहे. या रस्त्यांच्या कामात ज्या-ज्या विभागांचे सहकार्य अपेक्षित आहे, त्या विभागांना सक्रिय करण्याच्या दृष्टीने ही बैठक असेल, अशी माहिती सूत्रांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आठ लाखांची फसवणूक

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
अनाथ मुलांचे बालगृह चालविणारे दिलीप श्रीहरी राऊत यांना एका भामट्याने आठ लाखांना लुबाडल्याची घटना उघड झाली आहे. याप्रकरणी जवाहरनगर पोलिस ठाण्यात दिनेश पाटीलविरुद्ध राऊत यांनी तक्रार दाखल केली आहे.
राऊत यांच्या प्रज्ञाशील शिक्षण संस्थेचे शिवशंकर कॉलनीत जिजामाता बालक आश्रम आहे. तिथे पन्नासहून अधिक बालके आश्रयास आहेत. संस्थेचे गेल्या तीन वर्षांपासून सुमारे वीस लाखांचे शासकीय अनुदान थकित आहे. पैशांअभावी संस्था चालविण्यात अडचणी निर्माण झाल्याने राऊत यांना अशोक मार्तंड पाटील (रा. तळोदे प्रदे जि. जळगाव) हे व्याजाने पैसे देतात अशी माहिती मिळाली. त्याआधारे राऊत यांनी पाटील यांच्याशी संपर्क साधला.
५ लाखांचे एका वर्षात व्याजासह ८ लाख द्यावे लागतील, अशी अट पाटील यांनी घातली. राऊत यांनी ५ लाखांचे कर्ज २०१४मध्ये घेतले. ठरल्याप्रमाणे आयडीबीआय बँकेचा स्वाक्षरी केलेला ८ लाखांचा धनादेश राऊत यांनी पाटील यांना दिला. मात्र, २८ ऑगस्ट २०१५ रोजी पाटील यांचा मुलगा दिनेश राऊत यांना भेटण्यासाठी औरंगाबादला आला. वडिलांची बायपास सर्जरी झाली असून ते चाळीसगाव येथील हॉस्पिटलमध्ये आहेत. पैशांची खूप गरज आहे. त्यांचे बरेबाईट होईल, असे दिनेशने सांगितले. त्यामुळे राऊत यांनी एक प्लॉट विकून दिनेशला कर्ज व त्यावरील व्याजासह ८ लाख दिले. वडिलांची प्रकृती चांगली झाल्यावर तुमचा धनादेश परत करतो असे दिनेशने सांगितले. ८ लाख रुपये मिळाल्याची पोच पावतीही शपथपत्रासह दोन साक्षीदारांसमोर दिल्याचे राऊत यांनी तक्रारीत म्हटले आहे. मात्र, त्यानंतरही पाटील यांनी धनादेश

...अन् लुबाडले
आठ लाखांचा धनादेश मिळत नसल्याने राऊत यांनी पाटील यांना संपर्क केला. तेव्हा त्यांनी पैसे मिळालेच नाहीत, असा दावा केला. मुलासोबत परस्पर केलेल्या व्यवहाराशी काहीही संबंध नाही. तुम्ही पैसे परत करा तेव्हाच धनादेश देईल, असे सांगितले. या प्रकारामुळे फिर्यादी राऊत चक्रावून गेले. त्यांनी दिनेशशी संपर्क साधत त्याच्याकडे ८ लाखांची मागणी केली. तेव्हा त्याने उलट राऊत यांना धमकावत पैसे देण्यास नकार दिला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तीन दुचाकी, चार मोबाइल लंपास

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
शहरात गेल्या दोन दिवसांत विविध ठिकाणांहून तीन दुचाकी वाहने व चार मोबाइल चोरट्यांनी लंपास केले. या प्रकरणी संबंधित पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत.
आविष्कार कॉलनी येथील योगेश काकडे यांची दुचाकी चोरीला गेल्याचा प्रकार शुक्रवारी पहाटे उघडकीस आला. रविवार रात्री त्यांनी घरासमोर दुचाकी उभी केली होती. चोरट्याने हँडल लॉक तोडून त्यांची दुचाकी पळवली. याप्रकरणी अधिक तपास सिडको पोलिस करत आहेत. तर गौतम सोनवणे (रा. जिजाऊनगर) यांची दुचाकी जालना रोडवरील हॉटेल कस्ट्रोल येथून चोरीला गेली. अधिक तपास जवाहरनगर पोलिस करत आहेत.
दुचाकी चोरीची तिसरी घटना वाळूज परिसरातील लांझी (ता. गंगापूर) येथे घडली. शैलेश भवार असे फिर्यादीचे नाव असून त्यांनी घरासमोर उभी केलेली दुचाकी चोरीला गेल्याचे त्यांनी तक्रारीत नमूद केले आहे. अधिक तपास सुरू असल्याचे वाळूज पोलिसांनी सांगितले. रामनाथ वैद्य (रा. मुकुंदवाडी) यांनी घरासमोर पार्क केलेल्या दुचाकीचे चाक चोरट्यांने लंपास केले.

घरात घुसून चोरी
मिलिंद सुनील जाधव (रा. पुंडलिकनगर) हे गुरुवारी मोबाइल चार्जिंगला लावून बाथरुमला गेले होते. ही संधी साधत चोरट्याने मोबाइल लंपास केल्याचे तक्रारीत नमूद आहे. दुसऱ्या घटनेत शिक्षक असलेल्या श्रीकृष्ण साळुंके (रा. ठाकरेनगर, एन-2, सिडको) यांचा मोबाइल मुकुंदवाडी भाजीबाजारात परिसरातून चोरीला गेला. भाजी खरेदी करताना गर्दीचा फायदा घेत चोराने वरच्या खिशातील आठ हजार रुपये किमतीचा मोबाइल लंपास केला. मुकुंदवाडी ठाण्यात तक्रार दाखल आहे.
मोबाइल चोरीची तिसरी घटना समाधान कॉलनी परिसरातील सुयोग अपार्टमेंटमध्ये घडली. घराचा दरवाजा उघडा असल्याची संधी साधत चोरांनी घरात प्रवेश केला व अठरा हजार रुपये किमतीचे दोन मोबाइल लांबविले, अशी तक्रार अॅड. दीपाली देशपांडे यांनी क्रांतिचौक पोलिस ठाण्यात केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


लेखकासाठी निरीक्षण महत्त्वाचेः सुदीप नगरकर

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
'चांगला लेखक होण्यासाठी केवळ वाचन असून चालत नाही, तर तुम्हाला चांगले विश्लेषण करता आले पाहिजे. तुमच्याकडे निरीक्षणदृष्टी असायला हवी. आजच्या तरुणांमध्ये ती क्षमता आहे, त्यामुळे त्यांनी लिहते व्हायला हवे,' असे आवाहन प्रसिद्ध लेखक सुदीप नगरकर यांनी आज तरुणांशी संवाद साधताना केले.
प्रोझोन मॉलमधील 'वर्ड पॉवर'तर्फे सर्वाधिक खपाच्या पुस्तकाचे लेखक म्हणून ओळख असणाऱ्या सुदीप नगरकर यांच्या 'शी स्वाइप राइट इनटू माय हार्ट' या पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी नगरकर म्हणाले, 'सोशल मीडियामुळे आज आपले विचार जगासमोर मांडले जात आहेत. त्यामुळे नवनवे लेखक समोर येत आहेत. लिहणे सोपी गोष्ट नाही. चांगला लेखक होण्यासाठी आपल्या वाचनासह विश्लेषण करता येणे महत्त्वाचे असते. समाजात वावरताना घटनांचे बारकाईने निरीक्षण करणे गरजेचे आहे. आपल्यात चांगले लेखन करण्याची क्षमता असते, परंतु अनेकदा आपण व्यक्त होण्यास कचरतो. आपल्या लिखानाला आई-वडील, मित्रमंडळी दाद देतील का, असा प्रश्न आपल्याला पडतो. याकडे लक्ष न देता आपल्या मनातील ज्या भावना आहेत, जे अनुभव आपल्याला इतरांना सांगावेसे वाटतात ते लिहले पाहिजेत. वारंवार लिहले की आपल्याला आपल्या लिखानातील चुका कळतात आणि पुढे त्या चुका टाळता येऊ शकतात. लेखकांबद्दलची आपल्या समाजातील मानसिकता बदलेणे गरजेचे आहे. आपल्यासमोरील आदर्श आपणच उभे केले पाहिजेत,' असे ते म्हणाले. विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे त्यांनी खुसखुशीतपणे दिली. यावेळी व्यासपीठावर स्वातंत्र्य धोटे, मोहंमद आरशद यांची प्रमुख उपस्थिती होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गुप्तीनंदी महाराजांचा दीक्षादिवस उत्साहात

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
श्री खंडेलवाल दिगंबर जैन पंचायत पार्श्वनाथ मंदिर राजाबाजार येथे आचार्य गुप्तीनंदी महाराज चातुर्मासानिमित्त वास्तव्यास असून त्यांच्या सानिध्यात रोज विविध धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक व समाजोपयोगी कार्यक्रम उत्साहात होत आहेत. शुक्रवारी त्यांच्या २६ व्या दीक्षादिवसानिमित्त व चातुर्मास २०१६ च्या कळस स्थापनेनिमित्त सराफा येथील अग्रसेन भवनात विविध धार्मिक कार्यक्रम करण्यात आले.
राजाबजार जैन मंदिरातून चातुर्मास कळसाची घोडा गाडीतून भव्य मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीत पुरुषांनी पांढरे वस्त्र तर महिला डोक्यावर कलश घेवून केशरी व लाल साडया परिधान केल्या होत्या. किराणा चावडी, पानदरिबा या मार्गाने मिरवणूक अग्रसेन भवन येथे विसर्जित करण्यात आली. मुख्य सोहळयात लालचंद, नितीन, सचिन ठोले परिवाराच्या वतीने मंडपाचे उदघाटन करण्यात आले. पंचायतचे विश्वस्त चांदमल चांदीवाल ,अरुण पाटणी यांनी प्रास्ताविक केले. पंचायत चे सचिव अशोक अजमेरा, न्या. कैलासचंदजी चांदीवाल यांनी विनयांजली सादर केली. चातुर्मास कळस स्थापनेचा मान पंचायतचे विश्वस्त व चातुर्मास समितीचे सहसंयोजक डॉ. रमेश बडजाते व डॉ. उषा बडजाते, पलाश बडजाते परिवारास मिळाला. धर्मतीर्थ कळस स्थापनेचा मान शिखरचंद प्रकाशचंद, नितीन, आकाश, अरिहंत परिवार यांना मिळाला. तीर्थरक्षा कळस स्थापनेचा मान कैलासचंद, राहुलकुमार, निलेशकुमार कासलीवाल परिवार यांना मिळाला. राजेंद्र, रवींद्र, अनिल पाटणी, दिक्षांत हाडा परिवार, चिरंजीलाल बजाज परिवार आदींना विविध मान मिळाले. सीए परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या श्रुतिका विनोद लोहाडे, दीपेश दिलीप सेठी, सौरभ गंगवाल यांचा व अष्टानिका पर्वात आठ उपवास करणाऱ्या ताराबाई पहाडे व हेमा चुडीवाल यांचा आचार्यश्रींच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोपर्डीतील विद्यार्थिनींसाठी चार बस

$
0
0

मोतीचंद बेदमुथा, उस्मानाबाद
नगर जिल्ह्यातील कोपर्डी येथील विद्यार्थिनींना शेजारील कुळधरण या गावातील शाळेत जाण्या-येण्यासाठी सर्वोदय परिवार इंदौरच्यावतीने अद्यावत अशा चार मिनी स्कूल बस देण्यात आल्या. पीडित मुलीची आई व अन्य संबधिताकडे या गाड्याच्या चाव्या सुपूर्द करण्यात आल्या.
भैय्यू महाराज, ज्येष्ठ समाजसेवक अण्‍णा हजारे यांनी शुक्रवारी सांयकाळी कोपर्डी येथील पी‌डित मुलीच्या कुंटुबियाची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. यावेळी भैय्यू महाराज, ज्येष्ठ समाजसेवक अण्‍णा हजारे यांनी सुमारे तासभर पीडित कुटुंबियाशी चर्चा केली. या घटनेतील नराधमांना फाशीचीच शिक्षा व्हावी अशी अपेक्षा त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली. आता अन्य कोणा मुलीवर तर अशास्वरुपाची वेळ येऊ नये, अशा भावना पीडित मुलीच्या आईनी व्यक्त केल्या. यावेळी अण्‍णा हजारे यांच्यासह उपस्थितीत नागरिक निशब्द झाले. आरोपींना फाशीची ‌शिक्षा होईपर्यंत आपण संघर्ष करू, असा निर्धार यावेळी अण्‍णा हजारे यांनी केला.
सर्वोदय परिवाराच्यावतीने विद्यार्थिनीसाठी दिलेल्या चारही स्कुलबसचा सर्व खर्च संस्था करणार आहे. मात्र, या बसेसच्या व्यवस्थापनाची जबाबदारी पीडित मुलीच्या आईच्या अध्यक्षतेखालील स्थानिक समितीकडे सोपविण्यात आली. या समितीत स्थानिक सहा महिलांचा समावेश आहे. या अत्याधुनिक बसमध्ये सीसीटीव्ही, व्हिडिओ रेकॉर्डर, जीपीएस यंत्रणा बसविण्यात आली आहे. या शिवाय गाड्यांच्या चालक व वाहक महिला असणार आहेत. कोपर्डीप्रमाणेच दोन मिनी स्कुल बसेस बीड आणि एक बस उस्मानाबादला देण्यात येणार असल्याची घोषणा भैय्यु महाराज यांनी यावेळी केली.

पॉर्न वेबसाइटवर बंदी आणा
बलात्कार व लै‌गिक अत्याचाराच्या वाढत्या घटना लक्षात घेऊन केंद्र व राज्य सरकारने पॉर्न वेबसाइटवर बंदी आणावी. त्यासोबतच अप्रिय घटनांमध्ये समाविष्ट असणाऱ्याविरूद्ध तातडीने कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी यावेळी भैय्यु महाराज यांनी केली.
...............

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विहिरीत पडून माय, लेकाचा मृत्यू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, खुलताबाद
पळसवाडी परिसरातील शेकापुरी शिवारात आईसह मुलाचा विहिरीत पडून मृत्यू झाला. ही दुर्घटना शनिवारी (२३ जुलै ) दुपारी उघडकीस आली. संगीता मच्छिंद्र ठेंगडे (वय ३३) व रितेश मच्छिंद्र ठेंगडे (वय १३) अशी या मायलेकांची नावे आहेत.
शेकापुरी शिवारातील गट नं २२२ मध्ये असलेल्या विहिरीतून दोघांचे मृतदेह काढण्यात आले. मृत संगीता व रितेश शुक्रवारी दिराचा डबा घेऊन शेतात गेल्याची पळसवाडी गावात चर्चा आहे. दोघेही शेतातून घरी न आल्याने घरच्यांनी शोधाशोध केली. नंतर ते हरवल्याची नोंद खुलताबाद पोलिस स्टेशनला शुक्रवारी रात्री केली.
पळसवाडीच्या पोलिस पाटलांना शनिवारी सकाळी मृतदेहाबाबत समजले. त्यांनी खुलताबाद पोलिस स्टेशनला घटनेची माहिती कळवताच सहाय्यक पोलिस निरीक्षक कल्पना राठोडसह गणेश काथार, पोलिस नाईक एन. बी. देवरे, व्ही. टी. चव्हाण घटनास्थळी दाखल झाले. पोलिस निरीक्षक सुभाष भुजंग यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक कल्पना राठोड तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पालिकेचा तोतया वसुली अधिकारी गजाआड

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

रस्त्यावरील हातगाड्यांची अतिक्रमणे हटविण्याच्या नावाखाली वसुली करणारा तोतया अधिकारी शनिवारी दुपारी एकच्या सुमारास नागरिकांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिला. ईश्वर सातदिवे असे त्याचे नाव आहे.

सातदिवे आपण पालिकेच्या अतिक्रमण हटाव विभागाचे कर्मचारी असल्याचे भासवून शिवाजीनगरात मुख्य रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या हातगाडीवाल्यांना दमदाटी करत होता. हातगाड्या हटविल्या नाहीत तर कारवाई करू. कारवाई टाळायची असेल तर पैसे द्यावे, असे तो उघडपणे हातगाडीवाल्यांना सांगत होता. त्याच्या वागण्यामुळे व्यावसायिकांना संशय आला. त्यांनी पालिकेचे सभागृह नेते राजेंद्र जंजाळ यांना फोन लावला व घटनेची माहिती दिली. जंजाळ यांनी त्याच फोन वरून सातदिवेशी संवाद साधला. तेव्हा तो पालिकेचा कर्मचारी नाही हे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी सातदिवेंना फोन व्यावसायिकांना देण्यास सांगितले. 'सातदिवेंना पकडून ठेवा, मी लगेच येतो,' असा जंजाळ यांनी व्यावसायिकांना निरोप दिला. जंजाळ येईपर्यंत नागरिक व व्यावसायिकांनी सातदिवेस पकडून ठेवले. पाचच मिनिटांत जंजाळ शिवाजीनगरात पोहचले. त्यांनी सातदिवे यास महापालिकेच्या अनुषंगाने विविध प्रश्न विचारले. त्यात तो अडकला. त्यामुळे जंजाळ यांनी उपायुक्त रवींद्र निकम यांना फोनवरून तोतया वसुली अधिकाऱ्याची माहिती दिली. सातदिवे नावाचा कोणताही कर्मचारी पालिकेच्या अतिक्रमण हटाव विभागात नाही, असे निकम यांनी स्पष्ट केल्यावर जंजाळ यांनी सातदिवेला जवाहरनगर पोलिसांच्या ताब्यात दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images