Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

सरकारी डाळ ९५ रुपये किलो

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
केंद्र सरकारकडून येणारी तूरडाळ येत्या काही दिवसांमध्ये शहरातील खुल्या बाजारात (मॉलमध्ये) विक्रीसाठी उपलब्ध करण्यात येणार आहे. ही डाळ ९५ रुपये प्रतिकिलो दराने उपलब्ध करण्यात येणार आहे. यासाठी शासनस्तरावर हालचाली सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
गेल्या काही दिवसांमध्ये तूरडाळीचे भाव गगनाला भिडले होते. या कालावधीमध्ये व्यापाऱ्यांनी सर्वसामान्य नागरिकांना १४० ते १६० रुपये प्रतिकिलो डाळीची विक्री केली होती. आता नागरिकांना कमी दरात डाळ उपलब्ध करून देण्यासाठी शासनाने प्रयत्न सुरू केले आहेत. राज्य शासन केंद्र सरकारकडून तूर खरेदी करणार आहे. त्यापासून तयार होणारी डाळ बृहन् मुंबई, पुणे, नागपूर व औरंगाबामधील खुल्या बाजारात विक्री करण्यात येणार आहे. नागरिकांना डाळ विकत घेणे शक्य व्हावे यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. यानुसार औरंगाबाद शहरातील किराणा मर्चंट असोसिएशन, डी मार्ट, सपना सुपर मार्केट, मर्चंट असोसिएशन, बेस्ट प्राइज, स्टार बाजार, मोर या दालनांतून येत्या काही दिवसांमध्ये ९५ रुपये प्रतिकिलो मिळणारी सरकारी डाळ उपलब्ध
होणार आहे. सणासुदीचे दिवस सुरू होत आहेत. तूरडाळ; तसेच इतर डाळींचा व्यापाऱ्यांकडून साठा होऊ नये म्हणून खुल्या बाजारात विक्री करण्यात येणारी सरकारी डाळ ही ऑगस्ट, सप्टेबर व ऑक्टोबर या महिन्यांमध्ये सरकारी दरामध्ये उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

सणासुदीतही आउटलेट सुरू
येत्या काही दिवसांमध्ये श्रावण महिना व त्यानंतर दसरा, दिवाळी हे सणासुदीचे दिवस सुरू होत आहेत. या कालावधीमध्ये तूरडाळ; तसेच इतर डाळींचा व्यापाऱ्यांकडून साठा होऊ नये म्हणून खुल्या बाजारात विक्री करण्यात येणारी सरकारी डाळ ही ऑगस्ट, सप्टेबर व ऑक्टोबर या महिन्यांमध्ये सरकारी दरामध्ये उपलब्‍ध करून देण्यात येणार आहे.

सामाजिक बांधिलकतून १२० रुपये किलोने विक्री सुरू
सामाजिक उपक्रमाचा एक भाग म्हणून शहरातील व्यापाऱ्यांनी १२० रुपये प्रतिकिलो डाळ विक्री करण्यासाठी शहरात तीन केंद्र सुरू केले आहेत. शहरातील जुना मोंढा येथील संजयकुमार अँड कंपनी व जितेंद्रकुमार हिरजी अँड कंपनी; तसेच जुगराज कुंदनलाल मुथा यांनी शासकीय मदतीशिवाय १२० रुपये प्रतिकिलोने डाळ विक्रीला सुरुवात केली आहे. या ठिकाणी नागरिकांसाठी प्रत्येकी १ किलो डाळीचे पॅकेट तयार करण्यात आले आहेत. मंगळवारी अपर जिल्हाधिकारी पी. एल. सोरमारे यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्‍घाटन करण्यात आले.

संपूर्ण जिल्ह्यात आवाहन करणार
औरंगाबाद शहरातील व्यापाऱ्यांनी सुरू केलेल्या या उपक्रमाप्रमाणेच जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात; तसेच मोठ्या गावांमध्ये अशा प्रकारचा उपक्रम व्यापाऱ्यांनी सुरू करण्यासंदर्भात प्रशासनाकडून विचार करण्यात येत अाहे. यासाठी व्यापाऱ्यांसोबत चर्चा करण्यात येणार असल्याचे पुरवठा विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


तक्रारी निवारणसाठी अधिकारी नेमा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
शाळांच्या बाबत असलेल्या तक्रारींचा निपटारा करण्यासाठी तालुका, जिल्हा, राज्य पातळीवरील कार्यालयांकडे मोठ्या प्रमाणावर दाद मागितली जाते. हजारो तक्रारी पडून राहत असल्याने तक्रारकर्त्यांच्या अडचणी दूर होण्यास विलंब लागतो. हे टाळण्यासाठी आता शाळा स्तरावर तक्रार निवारण अधिकारी नेमवा, असे आदेश शिक्षण आयुक्तांनी दिले आहेत. यासंदर्भात तत्काळ कार्यवाही व्हावी, अन्यथा शिक्षणाधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
यासंदर्भात शिक्षण उपसंचालक शरद गोसावी यांनी २६ जुलै रोजी एक परिपत्रक काढले आहे. त्यात शिक्षण आयुक्तांच्या आदेशाचा संदर्भ देण्यात आला आहे. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था; तसेच सर्व माध्यमाच्या अनुदानित, विनाअनुदानित सर्व प्रकारच्या शाळांबाबत अनेक प्रकारच्या तक्रारी जिल्हा, तालुका स्तरावरील विभागीय कार्यालये, शिक्षण संचालनालय, शिक्षण आयुक्त कार्यालयात प्राप्त होतात. या तक्रारींचे निवारण शाळास्तरावर होण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व प्रकारच्या शाळांमध्ये तक्रार निवारण अधिकारी नेमण्यात यावेत. तक्रार निवारण अधिकारी हा त्याच शाळेचा मुख्याध्यापक असल्यास प्राधान्य देण्यात यावे, नेमलेल्या प्रत्येक तक्रार निवारण अधिकाऱ्यांची माहिती शाळेच्या प्रवेशद्वारावर फलकाद्वारे प्रदर्शित करावी, असे आदेशित करण्यात आले आहे. त्यावर शाळेचे नाव व पत्ता, तक्रार निवारण अधिकाऱ्याचे नाव तसेच पदनामाचा उल्लेख असावा. हा फलक निळ्या रंगाचा असणे
बंधनकारक आहे. त्यावरील मजकूर पांढऱ्या अक्षरांनी लिहून शाळेच्या दर्शनी भागात लावावा, फलकावरील मजकूर १०० फुटांवरून वाचता येईल एवढा ठळक असावा. दहा ऑगस्टपर्यंत प्रत्येक शाळेत हा फलक लावणे बंधनकाक आहे. ज्या शाळा फलक लावणार नाहीत, त्या शाळांवर दंडात्मक कारवाई करावी, असे आदेश देण्यात आले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महिलांना मंगळागौरीचे लागले वेध

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
'चला ग मंगळागौरीचा करूया जागर' म्हणत महिलांच्या ग्रुपने मंगळागौरीच्या खेळांची जोरदार तयारी सुरू केली आहे. वर्षानुवर्षे म‌हिलांच्या मनोविश्वावर राज्य करणाऱ्या या श्रावण सणाची परंपरा खेळांच्या माध्यमातून जपण्याचा प्रयत्न शहरातील विविध महिला मंडळ करताना दिसतात. खेळांच्या माध्यमातून शारीरिक व्यायामाची गोडी नव्या पिढीस लागावी याचा प्रयत्न मंडळ करत आहेत.
श्रावण महिन्यातील प्रत्येक मंगळवारी नवविवाहिता मंगळागौरीचे व्रत ठेवतात. लग्नानंतरची सलग पाच वर्षे हे व्रत करावे लागते. पूर्वीच्या एकत्र कुटुंबपद्धतीत मोठ्या खेळीमेळीच्या वातावरणात मंगळागौर साजरी होत असे. व्रतासोबत रात्रभर जागरण व खेळ व्रतातील महत्त्वाचा भाग. विविध प्रकारच्या फुगड्या, उड्या व अशाच शारीरिक व्यायामांना जोड मिळते ती श्रवणीय गाण्यांची. पूर्वी माणसांचा राबता असल्याने व्रत एका घरापुरते मर्यादित राहायचे नाही. आजच्या काळात इतक्या मोठ्या प्रमाणात पूजा करणे शक्य नाही. शिवाय खेळांचाही फारसा सराव राहला नसतो. मंगळागौर महिला मंडळ हीच उणीव भरून काढतात. साधारणतः तासाभराच्या कार्यक्रमातून मनोरंजन तर होतेच, पण परंपरांवर नाक मुरडणाऱ्या नव्या पिढीचाही गैरसमज दूर होतो.
सांगली माहेर मंडळही २००५पासून मंगळागौरीचे खेळ सादर करते. घरगुती कार्यक्रम, स्पर्धा व विविध वाहिन्यांवर मिळून मंडळाचे जवळपास २०० खेळ झाले आहेत. गृहिणी, लघुउद्योजिका व नोकरदार महिलांच्या या ग्रुपमध्ये सर्व सदस्यांचे माहेर सांगली. म्हणूनच मंडळाचे नाव तेच. जूनपासूनच मंडळाने सराव सुरू केला. आपापले काम सांभाळून खेळासाठी दररोज दोन तास वेळ काढून त्या कसून सराव करतात. तसा या खेळांचा क्रम ठरलेला असतो, पण काळानुरूप मंडळही नव्या पिढीचा कल लक्षात घेत बदल करते. 'सुरुवातीला आम्ही कोकणातील पहाट असा देखावा सादर करू,' असे मंडळाच्या सदस्या वैशाली पाटील यांनी 'मटा'ला सांगितले. 'जागतिक योग दिनाचे महत्त्व लक्षात घेता हे खेळ शारीरिक व मानसिकदृष्ट्या किती महत्त्वाचे आहे हे आम्हाला नव्या पिढीला सांगायचे आहे,' असे शैला कुलकर्णी म्हणाल्या.

जोरदार सराव
सोळा प्रकारच्या फुगड्या, नऊ प्रकारच्या झिम्म्यासह कोंबडा, दहीवडा-बटाटेवडा, गाठोड, होडी, घोडा, आगोटा-पागोटा, धुण, साळुंकी-साळंकी, सडू बाई सडू, कारल्याचा वेल, तिखट मीठ मसाला अशा गाण्यांवर मंडळाचा सराव सुरू आहे. इतक्या वर्षांच्या अनुभवाने आत्मविश्वासात काही कमी नाही, पण म्हणून सरावात कसूर नको म्हणत सर्वजणी सगळे काही परफेक्ट कसे होईल, याचीच काळजी घेतात.

सांगली माहेर मंडळाच्या सदस्य
विद्या मायदेव, सुषमा परांजपे, शैला कुलकर्णी, मृणाल पाटील, वैशाली पाटील, स्मिता बेडेकर, श्रद्धा अभ्यंकर, अ‌श्विनी कुलकर्णी, केतकी जोशी, सरिता हरारे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आता आयशर कंपनीची बस

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
एसटीच्या ताफ्यात अशोका लेलँड आणि टाटा कंपनीच्या बस आहेत. आता आयशर कंपनीच्याही एसटी बस रस्त्यावर धावणार आहेत. आयशर कंपनीच्या बसबांधणीसाठी एक चेसीस चिकलठाणा कार्यशाळेत पाठविण्यात आली आहे. या नव्या बसच्या तपासणीनंतर अाणखी चेसीस पाठविण्यात येणार आहेत. आयशरच्या चेसीसवर बस बांधणीचे का लवकरच सुरू केले जाणार असल्याची माहिती कार्यशाळेचे व्यवस्थापक प्रकाश पाटील यांनी दिली.
एसटी महामंडळात नागपूर, पुणे आणि चिकलठाणा येथील कार्यशाळात नवीन बसची निर्मिती करण्यात येते. गेल्या अनेक वर्षांपासून अशोक लेलँड किंवा टाटा कंपनीच्या चेसीसवर बस बांधणी केली जात होती. कोकण, मुंबईसह अन्य ठिकाणी टाटा कंपनीच्या चेसीसवर बांधलेल्या बसचा वापर केला जातो. औरंगाबाद आणि नागपूरच्या काही भागांत अशोका लेलँड कंपनीच्या चेसीसवर बस बांधणी करण्यात येते.
आयशर कंपनीकडून मिळणाऱ्या चेसीसवर बस बांधणीचा प्रयोग पुण्याच्या कार्यशाळेत करण्यात आला. तो यशस्वी झाल्यानंतर आयशर कंपनीची पहिली चेसीस औरंगाबाद कार्यशाळेला पाठविण्यात आली आहे. दोन दिवसांपूर्वी या चेसीस औरंगाबादला पोचली. येत्या दोन दिवसांत या चेसीसवर बस बांधणीचे काम सुरू केले जाणार आहे. अशोका लेलँड कंपनीच्या बसपेक्षा आयशर कंपनीची चेसीसची जमिनीपासून उंची कमी आहे. यामुळे ही या चेसीसवर बांधण्यात येणारी बस ही रस्त्यावर चांगली पकड ठेवून राहणार आहे, अशी प्राथमिक माहिती कार्यशाळेच्या सूत्रांनी दिली.

एसटी कार्यशाळेत नवीन चेसीसचा पुरवठा बंद
चिकलठाणा कार्यशाळेत मागील काही दिवसांपासून नवीन चेसीस पुरवठा करण्यात आला नाही. यामुळे या कार्यशाळेत जुन्या गाड्यांची पुर्नबांधणीचे काम सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे सध्या जुन्या बसच्या पुनर्बंधणीचे काम करण्यात येत असल्याची माहिती कार्यशाळेच्या सूत्रांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

छेड काढल्याच्या संशयावरून खून

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
छेड काढल्याच्या संशयावरून मुलीच्या वडील, भावांसह चौघांनी केलेल्या मारहाणीत एका २२ वर्षाच्या तरुणाचा मुत्यू झाला. ही घटना ७ जून रोजी सकाळी साडेआठ वाजता वरूड काजीजवळ घडली. हा मृत्यू अपघातात झाला असावा, असे मानले जात होते. परंतु, हा खून असल्याची तक्रार मृत तरुणाच्या वडिलाने मंगळवारी चिकलठाणा पोलिस ठाण्यात दिली आहे.
शेख अलीम शेख इब्राहीम (वय २२, रा. वरूड काजी, ता.औरंगाबाद) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. शेख अलीम ७ जून रोजी दुचाकीवरून वरूड काजीपासून ६ किलोमीटरवरील माऊली येथे सासूरवाडीला निघाला होता. त्यावेळी त्याचा मृत्यू झाला. अंगावरील जखमीवरून अज्ञात वाहनाने धडक दिल्याने मृत्यू झाला असावा, असे मानले जात होते.
दरम्यान, हा अपघात नसून खून असल्याची तक्रार अलीम याचे वडील शेख इब्राहीम शेख अब्दुल यांनी मंगळवारी रात्री चिकलठाणा पोलिसांत दिली. एका दहावीच्या विद्यार्थिनीची छेड काढल्याच्या संशयावरून संतप्त झालेल्या नानासाहेब विठ्ठलसाहेब नजन यांनी मुलगा राजेश नानासाहेब नजन, अभय रावसाहेब काळे व इम्रान बेग अजीज बेग (रा. सर्व वरूड काजी) यांनी मुलाचा खून केल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. या तक्रारीवरून चौघांविरुद्ध खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. अप्पर पोलिस अधीक्षक उज्ज्वला वनकर व पथकाने बुधवारी घटनास्थळीची पाहणी केली. अधिक तपास पोलिस निरीक्षक चतुर्भुज काकडे करत आहेत.

असा केला खून
या चौघांनी अलीमला अद्दल घडविण्याची योजना आखून त्यासाठी ७ जूनचा दिवस निवडला. अलीम सासूरवाडीकडे जाणाऱ्या रस्त्यावर नानासाहेब नजनचे शेत आहे. तेथे चौघे अलीमची वाट पाहात होते. तो दुचाकीवरून येताच पाठलाग करून त्याला गाठले व मुलीची छेड काढल्याबद्दल जाब विचारत बेदम मारहाण केली. या मारहाणीत हत्याराचा एक घाव डोक्यात बसल्याने अलीम गंभीर जखमी झाला. त्याला जखमी अवस्थेत सोडून नानासाहेब नजनसह चौघेही पसार असा आरोप शेख इब्राहीम यांनी तक्रारीत केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोलिसाला हेल्मेटने मारहाण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात एका संशयित आरोपीने पोलिस व चालकाला हेल्मेटने मारहाण करीत धुडगूस घातला. त्याच्याविरुद्ध मारहाणीची तक्रार देण्यासाठी त्याची आई आली होती. त्यावेळी तक्रार घेत असताना मुलगा तेथे पोहोचला व त्याने धुडगूस घालून पोलिसावर हल्ला केला.
मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात सोमवारी रात्री साडेदहा वाजता पोलिस कर्मचारी नारायण हरिभाऊ पगारे हे कर्तव्य बजावत असताना गुलशनबी शेख युनूस (रा. इंदिरा मार्केट, मुकुंदवाडी) या मुलगा शेख अय्याज हा मारहाण करत असल्याची तक्रार देण्यासाठी आल्या. त्यांची तक्रार घेत असताना शेख अय्याज पोलिस ठाण्यात आला. तेथे येताच त्याने मोठ्या आवाजात शिवीगाळ सुरू केली. 'पगारे यांना तेरी वर्दी उतार दुंगा, पहचानता नहीं क्या कैसर पटेल का दामाद हुँ,' असे म्हणत हातातील हेल्मेट पगारे यांच्या डोक्यात मारले व पलायन केले. यावेळी अय्याजला पकडण्यासाठी पोलिस शिपाई भवटे, कावटवाड व सपकाळे यांच्यासह चालक कुंडलिक देवराव लहंगे धावले. त्यांनी अय्याजला पकडले. त्याला पकडताना अय्याजने चालक लहंगे यांना डोक्यात देखील हेल्मेट मारून जखमी केले. पोलिसांनी शेख अय्याज शेख युनूस (वय ३० रा. बीड बायपास) याला अटक केली असून त्याच्या विरुद्ध शासकीय कामात अडथळा निर्माण करणे, मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ताब्यात घेतलेली दुचाकी झटापट करून पळवली

$
0
0

औरंगाबाद ः विनाहेल्मेट जाताना पकडले गेल्यामुळे संतापलेल्या दोन दुचाकीस्वारांनी पोलिसांशी झटापट करून दुचाकी पळवली. बुधवारी सकाळी अण्णाभाऊ साठे चौकात हा प्रकार घडला. या प्रकरणी सिटीचौक पोलिस ठाण्यात दोन अनोळखी दुचाकीस्वारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेवरून उद्दाम दुचाकीस्वार पोलिसांनाही जुमानत नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
वाहतूक शाखेचे जमादार एकनाथ बोबडे पथकासह बुधवारी सकाळी अण्णाभाऊ साठे चौकात विनाहेल्मेट दुचाकीस्वारांवर कारवाई करीत होते. यावेळी दुचाकीवर (एमएच १६ अेएल ४१६७) दोन तरुण विनाहेल्मेट येत होते. त्यांना बोबडे यांनी अडवले आणि दंडाची पावती घेण्यास सांगितले. यावेळी दोघांनी बोबडे यांच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली. त्या तरुणांच्या ओळखीचे आणखी काहीजण त्या ठिकाणी जमा झाले. जमाव जमल्याचे पाहून या तरुणांना चांगलाच जोर चढला. पोलिसांशी अरेरावी करत त्यांनी झटापट सुरू केली. बोबडे यांनी पकडलेली दुचाकी त्यांनी झटका मारून सोडवली व जमावातील इतर नागरिक, पोलिसांशी वाद घालत असल्याचे पाहून तेथून पलायन केले. यावेळी त्या ठिकाणी पोलिसांचे अन्य एक वाहन आले होते. मात्र, त्या वाहनातील पोलिसांनी केवळ बघ्यांची भूमिका घेतली. याप्रकरणी बोबडे यांच्या तक्रारीवरून दुचाकीस्वारांविरुद्ध शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

टायर फुटले; खड्ड्यावर तक्रार दाखल करा !

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, वाळूज
ए. एस. क्लब हॉटेल समोरील रस्त्यावरील एका खड्डयात आदळून एका कारचे टायर अचानक फुटले. चालकाने प्रसंगावधान राखून कारवर नियंत्रण मिळवून ती रस्त्याच्या कडेला थांबवल्यामुळे अपघात टळला. मात्र, या घटनेला जबाबदार असलेल्या खड्ड्यावर गुन्हा दाखल करावा, अशी तक्रार आल्यामुळे एमआयडीसी वाळूज पोलिसांना डोके खाजवावे लागत आहे.
औरंगाबाद-नगर महामार्गावर वाळूज एमआयडीसी क्षेत्रात रहदारी वाढली असून अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. पत्नी पीडित पुरुष संघटनेचे अध्यक्ष भारत फुलारे हे बुधवारी दुपारी त्यांच्या कारमधून शहरात येत होते. त्यावेळी ए. एस. क्लबजवळील रस्त्यावरील एका खड्ड्यात त्यांचे चाक आदळले. यामुळे कारचे टायर फुटले व त्यांचे कारवरील नियंत्रण गेले. मात्र, त्यांनी त्वरित कारवर नियंत्रण मिळवून ती रस्त्याच्या कडेला उभी केली. या रस्त्यावर सतत जडवाहनांची वाहतूक असते. त्यामुळे अपघाताची शक्यता होती. त्यामुळे फुलारे यांनी या अपघाताला कारणीभूत ठरू पाहणाऱ्या खड्यावर गुन्हा दाखल करावा, अशी तक्रार एमआयडीसी वाळूज पोलिसांत केली आहे. फुलारे यांनी दिलेल्या तक्रारीची नोंद घेऊन पोलिसांनी तो चौकशीवर ठेवला आहे.

खड्ड्यात कारचे टायर फुटल्यामुळे खड्डयावर गुन्हा दाखल करा, असा तक्रार अर्ज आला आहे. संबंधित तक्रारदारांनी आपले म्हणणे अर्जात मांडले आहे. मात्र त्याबाबत चौकशी करण्यात येईल.
- रामेश्वर थोरात, पोलिस निरीक्षक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


जैन ग्रुपने वाचविले ९० उंटांचे प्राण

$
0
0

औरंगाबाद ः जैन सोशल ग्रुपच्या सहकार्याने ९० उंटांचे प्राण वाचविण्यात यश मिळाले आहे. या सर्व उंटांना हैदराबाद येथील कत्तलखान्यात नेण्यात आले होते. तेथून जैन ग्रुपने त्यांची सुटका करत बुधवारी (२७ जुलै) औरंगाबादला आणले. येथून त्यांना राजस्थान येथे रवाना करण्यात आले.
प्रज्ञायोगी दिगंबर जैनाचार्य गुप्तीनंदी गुरुदेव यांच्या समक्ष कर्णपुरा येथील जैन मंदिरात त्या उंटांना आणण्यात आले होते. गुरुदेवांनी यावेळी अहिंसा संदेश दिला. कत्तलखान्यातून सोडवून आणलेल्या उंटांना राजस्थानमध्ये सोडण्यात येणार आहे. कर्णपुरा येथील मुनिसुव्रतनाथ मंदिरात या उंटांना जैनधर्मानुसार मांगलिक देण्यात आले. यावेळी कमलेशमुनी व संघातील सदस्य उपस्थित होते. या उंटांसाठी खास २० ट्रक मागविण्यात आले होते. त्यांना रात्री राजस्थानला नेण्यात आले. दोन्ही आचार्यांनी यावेळी उपस्थित जैन सोशल ग्रुपच्या सदस्यांना आणि जैन समाजातील नागरिकांना मार्गदर्शन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सभापती-गटनेत्यांच्या भावात बाचाबाची

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
वैद्यकीय घनकचरा संकलन करणाऱ्या गाडीबद्दल जाब विचारण्यावरून शिवसेनेचे नगरसेवक, आरोग्य सभापती आत्माराम पवार आणि भाजप गटनेते भगवान घडमोडे यांचे भाऊ अतुल यांच्यात बुधवारी जोरदार बाचाबाची झाली. त्यानंतर पालिकेत तक्रार घेऊन गेलेल्या पवारांना अधिकाऱ्यांकडून अपमानास्पद वागणूक मिळाली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त बहुतांश पदाधिकारी मुंबईत गेल्यामुळे पवार यांना पाठबळ मिळाले नाही.
बुधवारी दुपारी आत्माराम पवार एका हॉस्पिटलमध्ये एका नातेवाईकाची विचारपूस करण्यासाठी गेले होते. तिथे वैद्यकीय घनकचरा संकलित करणारी गाडी आली. ही गाडी नेहमीची नसल्याचे पवार यांनी 'कचरा आणण्यासाठी साधी गाडी कशी काय आणली ?,' अशी विचारणा केली. गाडीचालक आणि पवार यांच्यात संवाद सुरू असताना तिथे उभ्या असलेल्यांपैकी कुणीतरी भाजप गटनेते भगवान घडमोडे यांचे बंधू अतुल यांना संपर्क साधून माहिती दिली. अतुल घडमोडे काही वेळात तिथे पोचले आणि त्यांनी पवार यांना विचारणा सुरू केली. दोघांनी एकमेकांना 'तुम्ही कोण ? तुमचा काय संबंध?' असे विचारल्यानंतर वाद वाढला. शाब्दिक चकमक उडाली आणि बाचाबाची झाली. वाद चिघळल्यानंतर भगवान घडमोडे यांना कुणीतरी संपर्क साधल्यामुळे ते घटनास्थळी पोचले. त्यांनी मध्यस्थी करून वाद मिटविला. पवार आणि घडमोडे एकमेकांना वॉर्ड अधिकारी समजून वाद घालत असल्याचा दावा करण्यात आला.

डॉ. जगताप म्हणाले, जाऊ द्या
दोघांतील वाद संपल्यानंतर पवार ती गाडी घेऊन महापालिकेत पोहोचले. पालिकेच्या आवारात ती गाडी उभी केली आणि आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. सुहास जगताप यांना संपर्क साधला. जगताप यांनी ' माहिती घेऊन सांगतो,' असे सांगितले. बराच वेळ प्रतिसाद न आल्याने आत्माराम पवार यांनी जगताप यांना पुन्हा संपर्क साधला. तेव्हा जगताप यांनी सांगितले, की आम्हाला आमचे काम करू द्या. वैद्यकीय घनकचरा वाहतूक पाहणे आमचे काम आहे, असे सांगितल्याचे सूत्रांनी सांगितले.

कडक कारवाई म्हणेज काय ?
जगताप यांच्याकडून प्रतिसाद न मिळाल्याने पवार यांनी घनकचरा व्यवस्थापन प्रमुख शिवाजी झनझन यांना संपर्क साधून माहिती दिली आणि गाडीचालकावर कारवाईची मागणी केली. झनझन यांनी कारवाई केली जाईल, असे आश्वासन दिले. त्यावर पवार यांनी कडक कारवाई करा, अशी मागणी केली. झनझन यांनी कडक म्हणजे काय कारवाई करावी ? असा प्रतिसवाल केला. नगरसेवक माधुरी अदवंत तिथे उपस्थित होत्या. हा प्रकार पाहून त्या अधिकाऱ्यांना म्हणाल्या, की आत्माराम पवार आरोग्य सभापती आहेत. त्यांच्या शंकांचे निरसन केले पाहिजे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खासगी क्षेत्राप्रमाणे वेतन देण्याचे आव्हान

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
नोकरी सोडू नये म्हणून एसटी कर्मचाऱ्यांना खासगी क्षेत्राप्रमाणे वेतन देण्याची गरज आहे. तशा शिफारसी करण्याचे आव्हान वेतन सुधार समितीसमोर आहे, असे समितीचे अध्यक्ष डी. आर. परिहार यांनी सांगितले. वेतन सुधार समितीच्या शिफारसी येत्या चार महिन्यांत एसटी महामंडळाला सादर करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
येत्या चार वर्षांचा वेतन करार करण्यापूर्वी यंदा महामंडळाने वेतन सुधार समितीची नियुक्ती केली आहे. बुधवारी चिकलठाणा कार्यशाळेला वेतन सुधार समितीच्या सदस्यांनी भेट दिली. यावेळी समितीचे अध्यक्ष परिहार, रवींद्र धोंगडे, डी. आर. मोरे, शि. म. म्हात्रे, बा. मा. जाधव यांनी कार्यशाळेतील कामाची माहिती घेतली. यावेळी त्यांनी विविध संघटनांचे पदाधिकारी, सर्वसामान्य कर्मचारी यांच्याशी चर्चा केली. समितीने कर्मचाऱ्यांना देण्यात येत असलेल्या सुविधा आणि त्यांच्या वेतनाचीही माहिती घेतली.
चिकलठाणा कार्यशाळेला भेट देण्यापूर्वी पत्रकारांशी बोलताना अध्यक्ष परिहार यांनी सांगितले, की यंदा महामंडळाने वेतन कराराच्या परंपरेत बदल केला आहे. करारापूर्वी वेतन सुधार समितीची स्थापना केली आहे. कामाप्रमाणे वेतन असावे, असा या समितीच्या स्थापनेमागील उद्देश आहे. या समितीच्या पहिल्याच बैठकीत परिवहनमंत्री दिवाकर रावते आणि व्यवस्थापकीय संचालक रणजित सिंह देओल यांनी समितीच्या माध्यमातून कामगारांच्या कामाला न्याय देण्याबाबतच्या सूचना दिल्या आहेत.
सर्व संवर्गातील अधिकारी आणि कर्मचारी यांचे वेतन समान असावे; तसेच अन्य खासगी व्यवसाय किंवा इतर सेवा क्षेत्रामध्ये कामगारांच्या वेतनश्रेणीचा विचार करावा. एसटीतून वेतनाच्या कारणामुळे कोणीही नोकरी सोडू नये, अशी अपेक्षा आहे. त्यामुळे सन्मानजनक वेतनाची शिफारशी करण्याचा विचार असल्याची माहिती ‌परिहार यांनी दिली.

माजी कामगारांची पगार पत्रके दाखविली
चिकलठाणा कार्यशाळेत इंटकचे विभागीय अध्यक्ष साहेबराव निकम यांनी वेतन कराराबाबत समितीला सूचना सादर केल्या. यानंतर कामगारांशी चर्चा करताना, अनेक कामगारांनी पूर्वी एसटी महामंडळात कार्यरत असलेल्या आणि आता अन्य कंपनीत किंवा वेगवेगळ्या ठिकाणी काम करणाऱ्या कामगारांना किती वेतन आहे. कोणते भत्ते त्यांना दिले जातात, याची माहितीही पगारपत्रकांच्या झेरॉक्ससह मांडली.

एसटी देशात नंबर वन
देशात काही वर्षांपूर्वीपर्यंत आंध्र प्रदेशात सार्वजनिक वाहतूक सेवा देणारे सर्वात मोठे महामंडळ होते, मात्र तेलंगाणा राज्य वेगळे झाल्याने आता महाराष्ट्राची एसटी देशात सर्वात मोठी वाहतूक सेवा देणारे महामंडळ झाले आहे. सध्या या महामंडळात १८ हजार गाड्या व १ लाख १० हजार कर्मचारी आहेत, अशी माहिती वेतन सुधार समितीचे अध्यक्ष परिहार यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पैठण रोडवर पाइपलाइन पुन्हा फुटली

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
शहराला पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी तीन दिवसांपूर्वी फुटून लाखो लिटर पाणी वाया गेले होते. त्यापाठोपाठ बुधवारी सकाळी सहाच्या सुमारास महानुभाव चौक पोलिस चौकीजवळ जलवाहिनी फुटली. गळतीतून लाखो लिटर पाणी वाया गेले. दुपारी बारा वाजेपर्यंत पालिका प्रशासनाला याची खबरच नसल्याने कुणी लक्षच दिले नाही. वाया जाणाऱ्या पाण्यात वाहने धुण्यासाठी मात्र गर्दी झाली होती.
जायकवाडीतून शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या दोन जलवाहिन्या आहेत. १२०० मिमी आणि ८०० मिमी व्यासाच्या दोन्ही जलवाहिन्या जीर्ण झाल्याने त्या वारंवार फुटतात. सुदैवाने यंदाच्या उन्हाळ्यात तीव्र पाणीटंचाई असूनही पाइपलाइन फुटण्याचे प्रमाण कमी होते. तीन दिवसांपूर्वीही १२०० मिमी व्यासाची जलवाहिनी पैठण रस्त्यावर फुटून लाखो लिटर पाणी वाया गेले होते.
सध्या जायकवाडीच्या मृतसाठ्यातून पाणीपुरवठा सुरू आहे. पाण्याचा जपून वापर करण्याच्या दृष्टीने प्रशासनाने उपाययोजनाही केल्या होत्या, पण जलवाहिनी फुटून सगळ्या नियोजनावर पाणी फिरले. युद्धपातळीवर या जलवाहिनीची दुरुस्ती केली गेली. तीन दिवस उलटून जात नाही तोच आज भल्या सकाळी सहाच्या सुमारास महानुभाव चौकात असलेल्या पोलिस चौकी शेजारी जलवाहिनी फुटली. या ठिकाणी एक व्हॉल्व्ह आहे. त्यातून २४ तास पाण्याची गळती सुरू असते. ही गळती थांबविण्यासाठी प्रशासनाकडून कधीच प्रयत्न झाले नाहीत. त्याच्या शेजारीच पाइपलाइन फुटल्याने लाखो लिटर पाणी रस्त्यावरून वाहून गेले. पाणी वाया जात असल्याचे पाहून रिक्षाचालक, दुचाकीस्वारांनी आपापली वाहने धुवून घेतली. दुपारी बारा वाजेपर्यंत पाइपलाइन फुटल्याची माहिती पालिकेच्या अधिकाऱ्यांना नव्हती. माहिती मिळाल्यावर यंत्रणा हलली आणि दुरुस्तीचे काम सुरू झाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्वेच्छेने कर भरणाऱ्यांमागेच तगादा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
मालमत्ता कराची थकबाकी वसूल करण्यासाठी सर्वाधिक थकबाकीदार असलेल्या वॉर्ड कार्यालयाकडे न फिरकता महापालिकेने नियमित कर भरण्याऱ्यांचे प्रमाण जास्त असलेल्या वॉर्डांनाच लक्ष्य केल्यामुळे नागरिक चक्रावून गेले आहेत. क्रांतिचौक (ड) आणि उल्कानगरी (फ) या वॉर्ड कार्यालयांमागे पालिकेने तगादा लावला असून, सर्वाधिक थकबाकी असलेला जाफरगेट (क) वॉर्ड मात्र मागे ठेवला आहे. बुधवारी वॉर्ड 'फ' कार्यालयात कर अदालत घेऊन दोन लाख ३३ हजार रुपयांचा कर वसूल करण्यात आला.
मालमत्ता कर लावण्यावरून गेल्या ५ ते १५ वर्षांपासून प्रलंबित असलेल्या वॉर्ड फ कार्यालयातील मालमत्ताधारकांशी संवाद साधण्यासाठी महापालिकेच्या वतीने बुधवारी कर अदालतीचे आयोजन करण्यात आले होते. अदालतीसाठी १०० जणांना बोलाविण्यात आले होते. त्यापैकी २८ जण उपस्थित होते. किरकोळ त्रुटी दूर केल्यानंतर काही मालमत्ताधारकांनी दोन लाख ३३ हजार रुपयांचा करभरणा रोखीने आणि चेकद्वारे केला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्रात झालेल्या कर अदालतीसाठी आयुक्त ओम प्रकाश बकोरिया, अतिरिक्त आयुक्त रमेश पवार, उपमहापौर प्रमोद राठोड, उपायुक्त अय्युब खान आदींची उपस्थिती होती. वॉर्ड फ मधील १०० मालमत्ताधारकांना अदालतीसाठी बोलाविले होते. त्यापैकी २८ जण उपस्थित होते. गेल्या पाच ते १५ वर्षांपासून मालमत्ता कराचे ६६ लाख २३ हजार रुपये वसूल होणे अपेक्षित होते. प्रशासकीय अडचणींचे वाद होते. कुठे कर जास्त लावण्यात आला होता. तर कुठे मालमत्ता खरेदी केल्याच्या वर्षीऐवजी दोन वर्षे पूर्वीपासून कर लावण्यात आला होता. प्रशासनाच्या वतीने या किरकोळ त्रुटी दूर करून देण्यात आल्या. त्यामुळे काही जणांनी रोखीने तर काहींनी चेकद्वारे कराचा भरणा केला.

सर्वाधिक थकबाकी जाफरगेट वाॅर्डात
शहरात मालमत्ता कराची सुमारे २९० कोटी रुपयांची थकबाकी आहे. यापैकी सर्वाधिक थकबाकी जाफरगेट वॉर्ड 'क' कार्यालयाच्या क्षेत्रात आहे. त्यामुळे सर्वात आधी या वॉर्ड कार्यालयावर लक्ष केंद्रित करून कर वसुली मोहीम राबवण्याची गरज आहे. मात्र, पालिका प्रशासनातर्फे सर्वाधिक व नियमित कर भरणाऱ्या वॉर्डावरच लक्ष केंद्रित केले जात आहे. गेल्या आठवड्यात क्रांतिचौक वॉर्ड 'ड' कार्यालय क्षेत्रासाठी अदालत आयोजित केली होती. पालिका प्रशासनाने कर अदालत आयोजित करण्याचे जाहीर केले तेव्हा वेळापत्रक तयार केले नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कॉस्मो गुंतवणार ८०० कोटी

$
0
0

म. टा. विशेष प्रतिनिधी, औरंगाबाद
वाळूज औद्योगिक वसाहतीत गेल्या ३५ वर्षांपासून विविध प्रकारच्या फिल्म उत्पादनात अग्रेसर असलेल्या कॉस्मो कंपनीकडून ८०० कोटींची गुंतवणूक केली जाणार आहे. कंपनीने इन्सेंटिव्हच्या मागणीचा प्रस्ताव बुधवारी उद्योग विभागाचे प्रधान सचिव अपूर्व चंद्रा यांना सादर केला आहे. या प्रकल्पातून ५०० जणांना रोजगार उपलब्ध होणार आहे.
बायअॅक्झिली ओरिएंटेड पॉलिप्रोपिलिन (बीओपीपी )फिल्म उत्पादनात कॉस्मो ही कंपनी जगात आघाडीची मानली जाते. औरंगाबादेतील वाळूज औद्योगिक वसाहतीत १९८१मध्ये कंपनीची सुरवात झाली. कंपनीचे भारतासह कोरिया आणि अमेरिकेत प्लँट अाहेत. २०१५-१६मध्ये कंपनीची १६.२ अब्ज रुपयांची उलाढाल झाली आहे.
वाळूजच्या प्लँटमध्ये तयार होणारे उत्पादन विविध वस्तूंचे रॅपर आणि लॅमिनेशन फिल्म म्हणून वापरले जाते. सद्यस्थितीत वाळूजमधील प्लँट व्यतिरिक्त शेंद्रा पंचातारांकित औद्योगिक वसाहतीमध्ये कॉस्मोची शाखा अाहे. तेथील १०० टक्के उत्पादन निर्यात केले जाते.
वाळूज प्लॅँटमध्ये विस्तारीकरण करण्याची योजना कंपनीने आखली अाहे. या प्लँटमध्ये आणखी ८०० कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार आहे. याचा सविस्तर प्रकल्प अहवाल कंपनीतर्फे बुधवारी उद्योग विभागाचे प्रधान सचिव अपूर्व चंद्रा यांच्याकडे सादर केला. त्यात विस्तारीकरणासाठी इन्सेंटिव्हची मागणी करण्यात आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार; कंपनीच्या या विस्तारीकरणानंतर आणखी ५०० जणांना रोजगार उपलब्ध होणार आहे.
उद्योग क्षेत्रात बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या यादीत कॉस्मोचा समावेश होतो. वाळूज औद्योगिक वसाहतीत गेल्या कित्येक वर्षांत नव्याने गुंतणवूक झाली नव्हती. दिल्ली मुंबई इंडस्ट्रिअल कॉरिडॉर (डीएमआयसी) च्या विकासात भविष्यात अनेक कंपन्या येतील, अशी अपेक्षा उद्योग विभागाकडून व्यक्त करण्यात येत आहे, पण सातत्याने उद्योग क्षेत्रातील मंदी, दुष्काळ यामुळे औरंगाबादकडे उद्योग येणे थांबले आहे. त्या पार्श्वभूमीवर कॉस्मोकडून केला जाणारा विस्तार निश्चितपणे दिलासाजनक ठरणारा आहे.


गुंतवणुकीस प्रोत्साहनासाठी इन्सेंटिव्ह
अविकसित भागात रोजगार निर्मितीसाठी उद्योगांची उभारणी करण्यात यावी, यासाठी सरकार उद्योगांना विविध माध्यमातून प्रोत्साहन देते. करांमध्ये सवलतीसह उद्योगांना इन्सेंटिव्ह देण्यात येतो. उद्योगांनी केलेल्या गुंतवणुकीच्या प्रमाणात काही रक्कम इन्सेंटिव्हच्या रुपाने परत दिली जाते. इन्सेंटिव्हचे प्रमाण सरकार व संबंधित उद्योग यांच्या चर्चेनंतर ठरते.

कॉस्मोकडून उद्योग प्रधान सचिव कार्यालयाकडे विस्तारीकरणाचा प्रस्ताव सादर झाला आहे. औरंगाबाद परिसरातील उद्योग क्षेत्रासाठी हे सकारात्मक पाऊस असून भविष्यात विकासात हातभार लावण्यास मदत मिळणार आहे.
- गजानन पाटील, सरव्यवस्थापक एआयटीएल

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डॉ. झाकीर नाईक यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा

$
0
0

म. टा. विशेष प्रतिनिधी ,औरंगाबाद
चिथावणीखोर भाषण केल्याने डॉ. झाकीर नाईक यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा यासाठी सिल्लोडच्या कोर्टात फौजदारी अर्ज केला आहे. या अर्जावर १६ ऑगस्ट रोजी सुनावणी होणार आहे.
भाजपा युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष सुनील काळे यांनी अर्ज केला आहे. डॉ. नाईक हे भारतीय नागरिक आहेत. त्यांची भारतीय संविधानावर श्रद्धा व निष्ठा दिसत नाही. त्यांच्या वक्तव्यामुळे देशाची सार्वभौमता व एकात्मता धोक्यात आली आहे. त्यांच्या भाषणामुळे मुस्लिम समाजातील तरुणांमध्ये द्वेषाची भावना तयार झाली आहे, असा दावा या अर्जात करण्यात आला आहे. डॉ. नाईक यांच्याविरुद्ध दंगल घडवून आणण्याच्या उद्देशाने प्रक्षोभन करणे, धर्म, वंश, भाषा या कारणावरून निरनिराळ्या गटांत शत्रुत्व वाढविणे, राष्ट्रीय एकात्मतेला बाधा आणणे, धर्माचा अपमान करण्याच्या उद्देशाने नुकसान करणे व धार्मिक श्रद्धांचा अपमान करून दृष्ट कृती करणे आदी गुन्हे दाखल करावे, अशी विनंती अर्जात करण्यात आली आहे. अर्जदाराची बाजू संदीप राजेभोसले व विजय मंडलेचा यांनी मांडली.

गुन्हा दाखल न केल्याने...
याप्रकरणी काळे यांनी अजिंठा पोलिस ठाण्यात निवेदन दिले. गुन्हा दाखल न झाल्याने सोमवारी सिल्लोड कोर्टात अर्ज दाखल केला. या अर्जावर प्रथम वर्ग दंडाधिकारी पी. आर. खान यांच्यासमोर प्राथमिक सुनावणी झाली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


औरंगाबाद-जालना मार्गावर पुराचे पाणी

$
0
0

जालना : जालना शहर आणि परिसरात बुधवारी सायंकाळी मुसळधार पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे औरंगाबाद रस्त्यावरील ओढ्याला पूर आला. त्यामुळे औरंगाबाद-जालना महामार्गावर पाणी आले आणि दोन्ही बाजूकडील वाहतूक खोळंबली होती. पाऊस रात्री उशिरापर्यंत सुरूच होता, त्यामुळे जालना शहरामध्येही मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे.
जालना शहर आणि परिसरात सायंकाळी सहा वाजल्यापासून पावसाने सुरुवात केली. औरंगाबाद रस्त्यावरील आरटीओ कार्यालयाजवळील रस्त्यावर असलेल्या टोल नाक्याजवळ ओढा आहे. या ओढ्याला या पावसाने पूर आला. या पुरामुळे रात्री नऊ वाजल्यापासून या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे थांबविण्यात आली होती. टोल नाक्यावरील बुथमध्ये पाणी शिरल्याने परिसर जलमय झाला होता. जालना बसस्थानकाजवळून सीना नदी ओसंडून वाहत आहे. या परिसरातील पुलाच्या कठड्यावर रात्री दहा वाजता पाणी आले होते. रामतीर्थ जवळील लहान पुलावरून पाणी वाहत आहे. बाळासाहेब ठाकरे रामतीर्थ बंधाऱ्याचे भिंतीवर किमान दोन फुट पाणी वाहत आहे. त्यामुळे वाहतूक व्यवस्था कोलमडली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सुरेश पाटील यांना अटकपूर्व जामीन

$
0
0

औरंगाबादः जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन सुरेश पाटील यांच्यासह चौघांना मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. एन. डब्ल्यू. सांबरे यांनी प्रत्येकी २५ हजार रुपयाच्या जातमुचलक्यावर अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर केला. जिल्हा व सत्र न्यायालयाने फसवणुकीच्या गुन्ह्यातील अटकपूर्व जामीन फेटाळला होता. त्या निर्णयाला चौघांनी हायकोर्टात दिले होते. चौघांनी पोलिस ठाण्यात हजेरी लावावी व तपासात सहकार्य करावे, असे आदेशात नमूद केले आहे. या याचिकेवर ९ ऑगस्ट रोजी सुनावणी होणार आहे. अर्जदारांतर्फे राजेंद्र देशमुख आणि सिद्धेश्वर ठोंबरे यांनी युक्तीवाद केला. क्रांतिचौक पोलिस ठाण्यात बँकेचे चेअरमन सुरेश पाटील, कार्यकारी संचालक राजेश्वर भीमराव कल्याणकर, अण्णा बापू भोपाळे आणि विजय उत्तमराव काळे यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पेट्रोल द्यावे की नाही, पंच चालकांसमोर पेच

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
अत्यावश्यक वस्तू कायद्यानुसार पेट्रोल नाकारणे हा गुन्हा ठरतो, तर परिवहन मंत्र्यांच्या आदेशाची अंमलबजाणी केली नाही, तर कारवाई होऊ शकते, या पेचात शहरातील पेट्रोल पंपचालक सापडले आहेत. पण राज्य संघटनेच्या आवाहनानुसार शहरातील पंचचालक एक ऑगस्टपासून इंधन खरेदी बंद आंदोलनात सामील होणार आहेत.
हेल्मेट असल्याशिवाय पेट्रोल द्यावे, असा आदेश परिवहन मंत्र्यांनी राज्यातील पेट्रोल पंपचालकांना दिला आहे. या आदेशांची अंमलबजावणी एक ऑगस्टपासून करण्याचे आदेश आहेत. या आदेशाविरुद्ध 'फामपेडा' या राज्यस्तरीय पेट्रोल डिलर्स असोसिएशनने एक ऑगस्टपासून इंधन खरेदी थांबवण्याचा निर्णय घेतला आहे.
पेट्रोल हे अत्यावश्यक वस्तूंच्या यादीत असल्याने ग्राहकांना पेट्रोल नाकारता येत नाही. हेल्मेटसक्ती लागू झाल्यानंतर पेट्रोल दिले न दिल्यास एखादा ग्राहक कायदेशीर लढा देऊ शकतो. याशिवाय हेल्मेट न घातलेल्या वाहनधारकांना पकडून पोलिस पेट्रोल पंपचालकावर कारवाई करू शकतात. या पेचामुळे पेट्रोल विक्रीमध्ये अडचण असल्याचे पंपचालकांनी सांगितले.

औरंगाबाद शहरात पोलिसांनी हेल्मेटसक्ती चांगल्या पद्धतीने लागू केली आहे. राज्यात सुद्धा औरंगाबादप्रमाणे हेल्मेटबद्दल जनजागरण करण्याची गरज होती. परिवहन मंत्र्यांच्या आदेशामुळे आमच्यासमोर पेच असून शहरातील पंप चालकांनी आंदोलनात सामील होण्याचा निर्णय घेतला आहे.
-अखिल अब्बास, सचिव, औरंगाबाद पेट्रोलियम डिलर्स असोशिएशन

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नवाबाच्या नावाने थाप; सव्वालाखाची फसवणूक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
हैदराबादचे अकबर नवाब यांच्या मालकीच्या प्लॉटच्या विक्रीचे अधिकार असल्याची थाप मारून एकाने महिलेची फसवणूक केली. तिच्याकडून सव्वालाख रुपये घेऊन प्लॉट न दिल्या वेदांतनगर पोलिस चौकीत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चंदू प्रभाकर नायडू, असे संशयित आरोपीचे नाव आहे.
सुमनबाई सुरडकर यांचे पती घाटी हॉस्पिटलमध्ये नोकरीस आहे. चंदू नायडू याने २००४ मध्ये सुरडकर यांना संपर्क करून मी हैदराबाद येथील अकबर नवाब यांचा जीपीएधारक असून त्यांच्या मालकीचे बागशेरजंग दाऊदपुरा परिसरातील काही प्लॉट शिल्लक आहेत. त्यापैकी वीस बाय तीस फूट आकाराचे दोन प्लॉट खरेदी करा, अशी गळ घातली. त्याच्यावर विश्वास ठेऊन सुमनबाई सुरडकर यांनी नायडूला एक लाख २० हजार रुपये देऊन दोन प्लॉट खरेदी केले. अकबर नवाब यांच्या सहीचे नोटरी तसेच करारनामाही नायडूने करून दिला. फिर्यादी महिला पतीसह प्लॉटवर संरक्षक भिंत बांधण्यासाठी गेल्या असता नायडू तेथे आला व पार्टनरसोबत वाद सुरू असून सध्या प्लॉट परिसरात येऊ नका, असे सांगितले.
काही दिवसानंतर त्या तेथे गेल्या असता जोगदंड नावाच्या व्यक्तीने घर बांधल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे नायडू याच्याशी संपर्क साधला असता त्याने मुख्य रस्त्यावरील प्लॉट देतो, असे सांगत २८ ऑगस्ट २००४ रोजी ५० हजार रुपये घेऊन खरेदीखत, करारनामा करून दिल्याचे तक्रारी म्हटले आहे. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर सुरडकर यांनी पोलिसांत तक्रार दिली आहे.

धनादेश बाउंस
अनेक महिने उलटूनही चंदू प्रभाकर नायडू प्लॉटचा ताबा देत नव्हता. प्लॉट दे अन्यथा पैसे परत कर, असा तगादा लावल्यानंतर त्याने एक लाख २० हजार रुपयांचे चार धनादेश दिले. त्यापैकी एक २० हजार रुपयांचे धनादेश वटला, इतर बाउंस झाले

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पालिकेच्या धनादेशाची रेल्वेला प्रतीक्षा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
जमीन संपादनापोटी रेल्वेला चुकीच्या नावाने दिलेला धनादेश महापालिकेने अद्याप दुरुस्त करून दिला नाही. यामुळे रस्त्यासाठी जमीन संपादनाच्या प्रक्रियेला उशीर होण्याची शक्यता आहे.
महापालिकेतर्फे क्रांतिचौक ते रेल्वे स्टेशन या रस्त्याचे रुंदीकरण करण्यात आले आहे. परंतु, रस्ता रुंदीकरणात रेल्वेची जागा येत असल्याने रुंदीकरणा पूर्ण झालेले नाही. रस्ता रुंदीकरणासाठी रेल्वेची जागा विनामोबदला मिळावी यासाठी खासदारा चंद्रकांत खैरे यांनी प्रयत्न केले, त्याला अपयश आल्यानंतर मालमत्ता कर थकबाकीच्या रकमेतून जमीन द्यावी, असा प्रस्ताव ठेवला. रेल्वे मंत्र्यांपर्यंत प्रयत्न करूनही हे प्रयत्न यशस्वी झाले नाहीत. अखेर दक्षिण मध्य रेल्वे महाव्यवस्‍थापक रवींद्र गुप्ता यांनी या प्रकरणात जमिनीच्या दरानुसार पैसे देण्याबाबत विनंती खासदारांना केली होती. महापालिकेने पुढाकार घेऊन रेल्वे विभागाला रक्कम देऊन बाळासाहेब ठाकरे मार्गासोबतच पैठणकडे जाणाऱ्या रेल्वे उड्डाणपूलाच्या बाजुची जागा सुद्धा संपादित करण्याचा निर्णय घेतला आहे.

दुसऱ्याच नावे धनादेश
पालिकेने चार दिवसांपूर्वी साडेतीन कोटी रुपयांचा धनादेश 'नांदेड रेल्वे विभागीय व्यवस्‍थापक' या नावे दिला आहे. पण, या नावाचा धनादेश स्वीकारला जात नाही, असे सांगून तो परत करण्यात आला. हा धनादेश 'विभागीय वित्त व्यवस्‍थापक' या नावे द्यावा, असे पालिकेला कळवण्यात आले आहे. पण पालिकेतर्फे दुरुस्त धनादेश अद्याप देण्यात आलेला नाही.

महापालिकेकडून दुरुस्त धनादेश मिळून तो वटताच भूसंपादनाची प्रक्रिया सुरू करू. जागा मोजून दिल्यानंतर रेल्वे स्टेशनची संरक्षक भिंत बांधण्यात येणार आहे. पालिकेने लवकर कारवाई केल्यास रेल्वेला सुद्धा त्वरित निर्णय घेता येईल.
-अखिलेश सिन्हा, डीआरएम

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images