Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

‘फोटो’ विकला साडेचार लाखाला

0
0
एखाद्या चित्रकाराचं अमुक एक चित्र ठराविक किंमतीत विकलं गेलं. एका शिल्पकाराचं शिल्प काही लाखात विकलं गेलं असं आपण नेहमी ऐकतो, पाहतो किंवा अनुभवतोदेखील. एखाद्या फोटोग्राफरचा फोटो जर, साडेचार लाखात विकला गेला असं कोणी म्हटलं तर आश्चर्य वाटेल हो ना.

‘डीपी रोड’मध्ये अडकली गुंठेवारी

0
0
शहर विकास योजनेतील रस्त्यांची (डीपी रोडस्) हद्द निश्चित न झाल्यामुळे गुंठेवारी अंतर्गत घरे नियमित करून घेण्याच्या फायली अडकल्या आहेत.

‘सिद्धार्थ’ला हायअलर्ट

0
0
चमत्कारिक आजारामुळे लखनौच्या प्राणीसंग्रहालयातील दहा हरणे चार दिवसांत मेली. त्यामुळे आता औरंगाबाद महापालिकेच्या प्राणिसंग्रहालयात हायअलर्ट जारी करण्यात आला आहे.

पतसंस्थेच्या संचालकाविरुध्द गुन्हा

0
0
पतसंस्थेच्या सभासदांच्या विम्यापोटी आलेले ७८ लाख रुपये परस्पर वापरणाऱ्या चेअरमन, ‌सचिव व उपव्यवस्थापकाविरुद्ध क्रांतीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

धोरणात्मक निर्णय ‘MSP’ने घेऊ नये

0
0
मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाच्या नव्या निवडून आलेल्या विश्वस्तांनी संस्थेच्या रचनेसंदर्भात येत्या गुरुवारपर्यंत धोरणात्मक निर्णय घेऊ नये असा अंतरिम आदेश मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. के. यू. चांदीवाल व न्या. ए. आय. एस. चिमा यांनी दिले.

जलपुनर्भरण हेच लातूरसमोर आव्हान

0
0
‘पावसाच्या प्रत्येक थेंबाचे कोणत्या पद्धतीने पुनर्भरण होणार, हे लातूर जिल्हा परिषदेसमोरचे आव्हान असून लोकसहभागाशिवाय ते पेलणार नाही. त्यासाठी प्रत्येकाने स्वत:पासून सुरुवात करावी,’ मत लातूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नामदेव ननावरे यांनी व्यक्त केलं.

शेतक-याला नुकसानभरपाई मिळणार

0
0
कपाशीचे बियाणे सदोष निघाल्याने संबंधित बियाणे कंपनीने तालुक्यातील पेंडेफळ येथील शेतकऱ्यास २९ हजार रुपये नुकसानभरपाई द्यावी, असे आदेश औरंगाबादच्या जिल्हा तक्रार निवारण मंचने दिले आहेत.

महिला कंडक्टरची छेड काढणारा अटकेत

0
0
पंढरपूर ते औरंगपुरा या मार्गावर चालणाऱ्या सिटीबसमधील महिला कंडक्टराची छेड काढणाऱ्या क्रांतीनगरच्या एका युवकांला प्रवाशांच्या मदतीने पकडून पोलीसांच्या हवाली करण्यात आले.

मतदान नोंदणी बैठकीकडे राजकीय पक्षांची पाठ

0
0
लोकसभा निवडणुकीसाठी प्रशासनाने निवडणूक याद्या अद्ययावत करण्याची मोहीम सुरू केली आहे. या संदर्भात प्रशासनाने राजकीय पक्षांची बैठक आयोजित केली होती.

सौंदर्यीकरणासाठी चौक दत्तक देणार

0
0
बजेटमध्ये तरतूद असूनही चौकांच्या सौंदर्यीकरणाचे काम केले जात नसल्यामुळे आता पालिकेने नामी शक्कल लढवली आहे. विविध संस्था, उद्योगांना चौक दत्तक देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

पोलिस आयुक्तालयात ढोलताशांचा घुमला गजर

0
0
गणोशोत्सानिमित्त पोलिस आयुक्तालयाच्या वतीने शुक्रवारी ढोल, झांज, लेझीम आणि पावली स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सामाजिक सलोख्यचे वातावरण निमार्ण व्हावे तसेच पारंपरिक कलेला प्रोत्साहन मिळावे या हेतूने या स्पर्धेचे आयोजन पोलिस आयुक्त संजयकुमार यांनी केले होते.

आज पाणी नाही

0
0
औरंगाबाद पाणीपुरवठा योजनेवरील फारोळा येथील नवीन व जुन्या पंपगृहाच्या २२० केव्ही उपकेंद्रातून होणारा वीज पुरवठा वादळी पावसामुळे दुपारी साडेचारपासून खंडीत झाला.

वादळी पावसाने दाणादाण

0
0
शहरात शुक्रवारी सायंकाळी झालेल्या वादळी पावसात वेगवेगळ्या भागात झाडे उन्मळून पडली. विजेच्या तारांवर फांद्या पडून व फीडर ट्रीप झाल्याने निम्या शहराची वीज तब्बल तीन तास गायब झाली.

शाळा-कॉलेजांत प्रमाणपत्रांसाठी मोहीम

0
0
विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रवेशासाठी लागणाऱ्या प्रमाणपत्रांचे वाटप करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने शाळा, कॉलेजांत कॅम्प सुरू केले आहेत. सुमारे ५० हजार प्रमाणपत्रांचे वितरण या मोहिमेद्वारे करण्याचा प्रशासनाचा संकल्प आहे.

लेणीच्या व्यावसायिकांची समस्या सोडविणार

0
0
पर्यटकांना सुविधा देण्यासाठी वेरूळ येथे पर्यटन माहिती केंद्र तयार करण्यात आले आहे. हे नवीन केंद्र झाल्यांनतर या भागात पर्यटकांची रेलचेल वाढणार आहे.

चेतक घोडा नवीन रुपात अवतरणार

0
0
उल्कानगरी भागातील चेतक घोडाच्या मोडतोडीनंतर एका मूर्तीकाराने या घोड्याची प्रतिकृती तयार करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. विशेष म्हणजे याच मूर्तीकाराने तीस वर्षांपूर्वी हा घोडा तयार करून पालिकेच्या स्वाधीन केला होता.

७८ लाखांच्या रक्कमेचा अपहार

0
0
पतसंस्थेच्या सभासदांच्या विम्यापोटी आलेले ७८ लाख रुपये परस्पर वापरणाऱ्या चेअरमन, ‌सचिव व उपव्यवस्थापकाविरुद्ध क्रांतीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

व्यसनमुक्ती केंद्राला पालिकेचे सील

0
0
जयनगरातील विनापरवाना सुरू असलेल्या केळकर मानस हॉस्पिटल व व्यसनमुक्ती केंद्राला आज शुक्रवारी महापालिकेच्या आरोग्य विभागाने सील ठोकले.

कारखान्याला कामगारांनी कुलूप ठोकले

0
0
वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या काळातील थकित ग्रॅच्युइटी मिळावी या मागणीसाठी कारखान्याच्या कामगारांनी गोपीनाथ मुंडे यांच्याविरोधात प्रचंड घोषणाबाजी करत शुक्रवारी संत एकनाथ कारखान्याला कुलूप ठोकले.

केवळ महिलांसाठी ऑटो

0
0
जिल्हा पोलिस दलाच्या पुढाकाराने राज्यात प्रथमच फक्त महिलांसाठी ऑटो रिक्षा सुविधा उस्मानाबाद शहरात सुरू करण्यात आली. जिल्हा पोलिस प्रमुख सचिन पाटील यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात येत असून शुक्रवारी लोकप्रतिष्ठानच्या अध्यक्षा, सामाजिक कार्यकर्त्या डॉ. स्मिता शहापूरकर यांच्या हस्ते उपक्रमाला सुरुवात करण्यात आली.
Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images