Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

तंटामुक्ती अध्यक्ष, शिक्षकास जुगार खेळताना अटक

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, कन्नड
डोणगाव व दाभाडी शिवारात कन्नड शहर पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात आदर्श गाव बहिरगावच्या तंटामुक्त समितीच्या अध्यक्षासह एका शिक्षकासह ९ जुगारींना बेड्या ठोकल्या. पोलिसांनी त्यांच्याकडून २० हजार ५० रोख रकमेसह २ लाख १६ हजार ६३० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
कन्नड शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक शिवलाल पुरभे, पोलिस उपनिरीक्षक अस्मान शिंदे, सतीश दिंडे, पोलिस हेडकॉन्स्टेबल कैलास निंभोरकर, मयूर पाटील, अंकुश सरोदे, योगेश ताठे, प्रवीण बर्डे, युसूफ शेख यांच्या पथकाने डोणगाव शिवारातील गायरानामध्ये जुगार अड्ड्यांवर छापा टाकला. आदर्श बहिरगावच्या महात्मा गांधी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष सोमनाथ नारायण दाबके, तंटामुक्ती अध्यक्ष, संजय नारायण दाबके, संजय राघोबा पवार, एकनाथ नामदेव दाबके, सुभाष रामराव जाधव, ज्ञानेश्वर बाळू दाबके, शिवाजी साहेबराव जाधव, विनोद अशोक तुप्सशेन्द्रे, राजेंद्र भिकान सोनवणे, शिक्षक राहुल भाऊसाहेब पवार, (रा. सर्व बहिरगाव) व प्रदीप लक्ष्मण वाघ (रा. डोणगाव) या ११ जुगाऱ्यांना बेड्या ठोकल्या. त्यांच्याकडून एकूण १९ हजार रुपये नगदी व मोटार सायकल व मोबाइल असा एकूण २ लाख १६ हजार ६७० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. डोणगावपासून जवळच असलेल्या दाभाडी येथील दुसऱ्या छाप्यात दाभाडी शिवारातील बाळू आदिनाथ आदिक यांच्या शेतातून १ हजार ५० नगदी रुपये व मुद्देमाल जप्त करून यात पाच जुगार खेळणाऱ्यांना अटक करण्यात आले. त्यांच्यावर जुगार कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पुढील तपास पोलिस निरीक्षक शिवलाल पुरभे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक अस्मान शिंदे व किरण गंडे करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


एसटी थांबेना; विद्यार्थ्यांचा जीवघेणा प्रवास सुरू

$
0
0


पैठण : पैठण शहागड रस्त्यावरील फाट्यावर एसटी थांबत नसल्याने या रस्त्यावरील जवळपास पंधरा गावांतील विद्यार्थाना खासगी वाहनाने जीवघेणा प्रवास करून शिक्षणासाठी पैठणला यावे लागत आहे.
पैठण शहागड रस्त्यावरील वडवली, वाघाडी, गोपेवाडी, नायगाव, मायगाव, आपेगाव, आगार नादर, नवगाव आदी दहा ते पंधरा गावांतून हजारो विद्यार्थी शिक्षणासाठी पैठणला येतात. यातील बहुतांश विद्यार्थ्यांनी दररोज प्रवास करण्यासाठी एसटीचे पास काढले आहे. मात्र, मागच्या पंधरा दिवसांपासून पैठण-शहागड रस्त्यावर धावणाऱ्या बहुतांश बस या गावांच्या फाट्यावर थांबत नाहीत. त्यामुळे या विद्यार्थ्यांना काळीपिवळी, रिक्षा व खासगी वाहनाने प्रवास करावा लागत आहे. खासगी वाहन चालक क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी घेत असल्याने विद्यार्थ्याना या वाहनांना व ज्या थोड्या एसटी बस फाट्यावर थांबतात त्यांना लटकून जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. पैठण शहागड रस्त्यावर धावणारी प्रत्येक बस गावाच्या फाट्यावर थांबवावी, यासंबंधीचे निवेदन विद्यार्थ्यांनी पैठण एसटीच्या व्यवस्थापकाला ४ व ८ ऑगस्ट रोजी दिले आहे. मात्र, एसटी व्यवस्थापकांनी कारवाई केली नसल्याची माहिती भाऊसाहेब दसपुते, रोहित देशमुख, आसाराम शहादेव, विकास काळे, सिद्धेश्वर साळुंके आदी विद्यार्थ्यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हिंगोलीतून चौथा संशयित उचलला

$
0
0

औरंगाबाद ः 'आयएस'शी संबंध असल्याच्या संशयावरून हिंगोलीतील आजम कॉलनीतून जिल्हा परिषद शाळेतील एका शिक्षकास सोमवारी पहाटे औरंगाबाद एटीएसने उचलले. 'आयएस'चे धागेदोरे परभणीनंतर हिंगोलीपर्यंत पोचले आहेत. आतापर्यंत मराठवाड्यातील चार संशयितांना अटक करण्यात आली आहे. हिंगोली येथील जिल्हा परिषदेच्या शाळेवर उर्दू माध्यमाचा शिक्षक म्हणून कार्यरत असलेल्या रईसोद्दिन सिद्दिकी (३८) याला अटक केल्याचे सूत्रांनी सांगितले. हिंगोली शहरातील जिल्हा परिषद उर्दू प्राथमिक आणि माध्यमिक शाळेत तो इंग्रजीचा सहशिक्षक आहे. २६ जून २००३ रोजी हिंगोली जिल्हा परिषदेमध्ये शिक्षक म्हणून रुजू झाला होता. आजम कॉलनीमध्ये भाड्याने घर घेऊन तो कुटुंबीयांसह राहत होता. सिद्दिकी हा मूळ परभणीचा रहिवासी आहे. मागील तीन वर्षांपासून हिंगोलीतील उर्दू शाळेत कार्यरत होता. त्याचे परभणीला जाणे-येणे सुरू असायचे. तो इतरांना प्रशिक्षित करीत होता, या संशयावरून त्याला ताब्यात घेतल्याचे सूत्रांनी सांगितले. याआधी अटक करण्यात आरोपींच्या चौकशीमध्ये सिद्दिकीचा गुन्ह्यात सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्याने सोमवारी सायंकाळी साडेपाच वाजता अटक केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गुरूमंत्र : अभ्यासातून स्वावलंबनाचे धडे

$
0
0

Ashish.Choudhari@timesgroup.com
शिक्षण हे केवळ गुणांपुरते मर्यादित राहिले आहे. गुणांच्या मागे धावणारे विद्यार्थी घडवून फारसा उपयोग होणार नाही, हे संध्या करमनकर यांच्यासारख्या शिक्षकांना चांगलेच माहिती आहे. पाठ्यपुस्तकात पाठाचा समावेश काही उद्दिष्टे ठेवूनच केलेला असतो. त्या धड्यामागे काही मूल्य, संस्कार असतात. ते मुलांपर्यंत पोचावित त्यांचा प्रयत्न असतो. त्यासाठी विद्यार्थ्याला विषय अवघड न वाटता ती मूल्ये सोप्या आणि कृतीयुक्त शिक्षणातून समजावीत म्हणून त्यांनी अध्यापन पद्धतीत बदल करून विविध उपक्रम, प्रयोग राबविले. संध्या करमनकर यांनी १९९४मध्ये शिशु विकास शाळेत शिक्षिका म्हणून सुरुवात केली. एक वर्षानंतर १९९५मध्ये जिल्हा परिषदेत त्यांची निवड झाली. जिल्हा परिषदेच्या लामकाणवाडी येथील प्राथमिक शाळेत असताना अनंत विद्या मंदिरची सहशिक्षिकापदाची जाहिरात आली. त्यावेळी प्रत्यक्ष वर्गावर पाठ घेण्यास त्यांना सांगण्यात आले. सहावीच्या वर्गात गणिताचा पाठ घेतला. विषय सोपे करून सांगण्याची हातोटी असल्याने पाठ चांगला झाला अन् वीस वर्षांपूर्वी त्या या शाळेत रुजू झाल्या. सुरुवातीला गणित, हिंदी व चित्रकला हे विषय त्यांच्याकडे होते. त्यात सलग ४-५ वर्षे शाळेने विविध स्पर्धांमध्ये अनेक पारितोषिके मिळविली. त्यानंतर त्यांच्याकडे सातवी वर्गात इंग्रजी विषय शिकविण्याची जबाबदारी आली. प्राथमिकस्तरावर इंग्रजी विषयाचा बेस पक्का झाला, तर पुढे विद्यार्थी विषयात अडखळणार नाही. यासाठी त्यांनी सुरुवातील विषयाची भीती कशी दूर होईल यासाठी प्रयत्न केले. त्यासाठी विद्यार्थी स्वावलंबी कसा होईल यावर त्यांचा भर असतो. घरी जाताना प्रत्येकाला दहा शब्द दिले जातात. त्यातील प्रत्येक शब्द हा पाचवेळा वहीवर लिहावा लागतो. त्यातून शब्दांची तयारी झाली की मग वाचनावर भर देण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. विषय सोप्या आणि सुटसुटीत भाषेत, छोट्या-छोट्या मुद्यांच्या स्वरुपात मांडण्यावर त्यांचा भर असतो. इंग्रजीत विद्यार्थ्यांना योग्य उच्चार व आरोह-अवरोहांसह वाचन येणे आवश्यक असते. वर्गात वाचन घेण्यास काहीवेळा मर्यादा येते. एकावेळी एकच विद्यार्थी वाचू शकतो. त्यामुळे पुरेसा वेळ मिळत नाही. यावर उपाय म्हणून विद्यार्थ्यांना पुस्तके घेऊन ४-५च्या गटाने पार्किंगमध्ये बसविण्यात यायचे व वाचन केले जायचे. उपक्रमामुळे एकाचवेळी अनेक विद्यार्थ्यांचे वाचन घेता आले. विद्यार्थी वाचनात दंग होतात. हा तास विद्यार्थ्यांसाठी आनंददायी शिक्षणाचा ठरतो. अशा उपक्रमातून विद्यार्थ्याला विषयात अधिकाधिक सहभागी करून घेण्यावर त्यांचा भर असतो. केवळ सांगणे व ऐकणे नको, तर संवादातून, काहीवेळा कृतीयुक्त शिक्षण यावरही त्यांचा भर असतो. कृतीयुक्त शिक्षणासाठी त्या पाठाच्या संकल्पनेनुसार शैक्षणिक साहित्य निर्मिती करून आणतात. त्यामुळे विद्यार्थ्याला ती संकल्पना स्पष्ट होते. शब्दांचे उच्चार नीट व्हावेत या दृष्टिकोनातून इंग्रजी संभाषणाच्या ऑडिओ कॅसेटही विद्यार्थ्यांना ऐकविल्या जातात. विषयाच्या अनुशंगाने इंग्रजी बातम्यांचे कात्रण वाचनही घेतले जाते. त्यामुळे वाक्यातील योग्य चढ-उतार, स्पष्ट उच्चार, विशिष्ट शब्दांवर जोर याबाबत सहज मार्गदर्शन होते. विद्यार्थी अभ्यासात स्वावलंबी व्हावा म्हणून त्यांचे उपक्रम कायम प्रोत्साहन देणारे ठरतात. जो पाठ शिकवायचा आहे, त्याची पुरेशी तयारी करूनच वर्गावर जावे, असा त्यांचा प्रयत्न असतो. त्यासह विद्यार्थ्यांनी त्या पाठाशी संबंधित अवघड वाटणाऱ्या शब्दांचे लिखाण, पाठांतर केले पाहिजे याबाबत त्या आग्रही असतात. त्यांचा 'आधी वाचन, मग जेवण' हा उपक्रमही उल्लेखनीय ठरला. प्रत्येक विद्यार्थ्याला घरी गेल्यानंतर हा होमवर्क असतो. कुटुंबातील कोणासमोरही विद्यार्थ्यांने इंग्रजीच्या पाठातील एक परिच्छेद वाचायचा असतो. त्याची विद्यार्थ्यांच्या दैनंदिनीमध्ये नोंद असते. या उपक्रमामुळे वाचनाची गोडी आणि विद्यार्थ्यामध्ये आत्मविश्वास निर्माण झाला. त्याचा फायदा विषयात विद्यार्थी पारंगत होण्यास झाला. प्रत्येक विद्यार्थी एक स्वतंत्र व्यक्तिमत्व आहे. प्रत्येकाच्या आवडी-निवडी, कौशल्य यात फरक असतो. त्यांचे वेगळेपण जपत, त्यांना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न शिक्षकाने केला पाहिजे.
प्राथमिक स्तरावर विद्यार्थ्यांसाठी शिक्षकच 'रोल मॉडेल' असतात. ते कसे बोलतात, कसे वागतात, कसा पोशाख परिधान करता या सगळ्या गोष्टींकडे विद्यार्थ्यांचे अतिशय बारकाईने लक्ष असते. अशावेळी शिक्षकाची जबाबदारी महत्त्वाची ठरते, असेही त्यांना वाटते.

पुस्तक वाचन उपक्रम
विद्यार्थ्यांना सकस वाचनाचा अनुभव देण्यासाठी 'पुस्तक वाचन उपक्रम' राबविण्यात येतो. सुरुवातीला 'अभ्यासातील यशाची गुपिते' या पुस्तकातील दोन पाने रोज परिपाठात घेतली गेली. त्यातून मुलांना आदर्श प्रकट वाचनाचा आनंद तर मिळालाच, शिवाय अभ्यास कसा करावा, त्यात कसे यशस्वी व्हावे याचे सोप्या भाषेत मार्गदर्शन मिळाले. उत्तम श्रवणाचा अनुभव विद्यार्थ्यांना मिळाला यासह समजपूर्वक ऐकण्याची सवय विकसित होण्यास मदत मिळाली.

मी शाळा बुडवणार नाही
विद्यार्थ्याला शाळेबाबत गोडी निर्माण व्हावी, दैनंदिन उपस्थिती वाढावी म्हणून त्यांनी 'मी शाळा बुडवणार नाही' उपक्रम हाती घेतला. त्यात सर्वाधिक दिवस हजर राहणारा विद्यार्थी, विद्यार्थिनी निवडली जाते. दरमहा प्रत्येकाला तसे प्रमाणपत्र दिले जाते. वर्षाच्या शेवटी जो सर्वाधिक दिवस शाळेत उपस्थित होता, त्याला पारितोषिक म्हणून विद्यार्थ्याला एक पुस्तक भेट दिले जाते. त्यामुळे वाचन संस्कृती वाढविण्यास बळ मिळते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भर पावसाळ्यात केले बेघर

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
भर पावसाळ्यात कुटंबकबिला घेऊन जाणार कुठे? या प्रश्नाने पहाडसिंगपुऱ्यातील रहिवाशांच्या डोळ्यांत अश्रू, काळजात बेघर होण्याची भीती होती. मूळ मालकाने कोर्टात अवमान याचिका दाखल करून येथील घरांचा ताबा मागितला आहे. त्यामुळे या रहिवाशांना सोमवारी महसूल प्रशासनाने ७ दिवसांत घरे खाली करण्याची ताकीद दिली.
गेल्या वर्षभरापासून रेणुकामातानगर व ताजमहल कॉलनी या १८ एकर जमिनीसंदर्भात वाद सुरू आहे. जमिनीचे मूळ मालक माधव सोनवणे यांना सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने महसूल विभागाने ३१ ऑगस्ट २०१५ रोजी या जमिनीवरील घरे रिकामी करून जमिनीचा ताबा दिला होता. मात्र, येथील रहिवाशांनी घरे खाली करण्यासाठी कोर्टाकडून १० दिवसाची मुदतवाढ मिळवली. ३१ ऑगस्ट रोजी झालेल्या कारवाईमध्ये एकशेपाच कुटुंब रस्त्यावर आली होती. भूखंड माफियांनी या ग्रिन बेल्ट परिसराची अनधिकृत प्लॉटींग करून विक्री केल्यामुळे भूखंड माफियांवरही गुन्हे दाखल करण्यात आले होते. प्लॉट खरेदीत येथील रहिवाशांचीच फसवणूक झाली होती. भाकपच्या नेतृत्वाखाली वर्षभरापासून येथील रहिवासी आपल्या घरासाठी विविध मार्गाने लढा देत आहेत. याविरोधात कायदेशीर लढा उभारण्याचा इशारा भाकपने दिला आहे.

नोटीस स्वीकारण्यास नकार
सोमवारी सकाळी महसूल विभागाचे पथक पोलिसांच्या ताफ्यासहीत पहाडसिंगपुऱ्यात दाखल झाले. लाऊड स्पीकरवरून येथील नागरिकांना सात दिवसांत घरे खाली करण्याचे आवाहन करण्यात आले. नागरिकांना लेखी नोटीस बजावण्याचा प्रयत्न प्रशासनाने केला. मात्र, येथील रहिवाशांनी नोटीस घेण्यास नकार दिला.

समस्यांचा महापूर
गेल्या वर्षी जमिनीचा ताबा घेतल्यानंतर मूळ मालकाने या जमिनीवर सुरक्षारक्षक नेमले होते. या सुरक्षारक्षकामध्ये व रहिवाशांत सातत्याने वाद होत होते. गेल्या वेळी झालेल्या कारवाईच्या वेळी या परिसरातील रहिवाशांचा विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला होता. तो काही महिन्यांपूर्वी सुरू करण्यात आला आहे.
-
पहाडसिंगपुरा येथील रहिवाशांची प्रशासन, भूमाफिया व राजकारण्यांनी मिळून केलेली ही फसवणूक आहे. या रहिवाशांसाठी भाकपच्या वतीने सुरुवातीपासून लढा सुरू आहे. निवेदन, मोर्चे व बेमुदत उपोषण आदी आंदोलने करण्यात आली. शासनाने स्टँपड्युटी घेऊन खरेदीखत करून दिले आहे. ज्याप्रमाणे शासन कारखाने, धरण आदीसाठी जमीन संपादित करून मुआवजा देते. तसे पहाडसिंगपुरावासियांसाठी ही जमीन संपादित करावी. - अॅड. अभय टाकसाळ, भाकप
-
गेल्या अनेक वर्षांपासून या ठिकाणी आम्ही राहतो. आमचा दूध विक्रीचा व्यवसाय आहे. आम्ही आमची जनावरे घेऊन कुठे जायचे हा प्रश्न पडला आहे. - उमेश मेघावाले
-
कष्टाच्या पैशाने आम्ही प्लॉट विकत घेऊन घर बांधले. आमचे हक्काचे घर सोडून आम्ही कुठे जाणार, घर सोडायचा प्रश्नच नाही. - मनिषा दांडगे

-
वर्षभरापासून आमचा लढा सुरू आहे. आम्हाला सात दिवसांत घरे खाली करण्यास सांगण्यात आले आहे. याविरुद्ध आम्ही कोर्टात जाणार आहोत. - विष्णू मुळे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पीएचडीचे अधिकार कॉलेजांना नको

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने संशोधनासंदर्भात मार्गदर्शकांच्या कॉलेजांना दिलेले अधिकार विद्यार्थ्यांच्या हिताचे नसल्याचा दावा करून सर्व विद्यार्थी संघटनांनी सोमवारी निदर्शने केली. 'जागतिक दर्जाचे संशोधन ः एक अफवा', 'पीएच.डी. 'विभागाकडेच अधिकार रहावेत' अशा घोषणांनी विद्यापीठ परिसर दणाणला.
विद्यापीठात संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांना आपला संशोधन आराखडा, प्रगती अहवाल, शोधप्रबंधाबाबतची प्रक्रिया कॉलेजस्तरावरच करावी लागणार आहे. याबाबत विद्यापीठाने ११ जुलै रोजी परिपत्रक काढले. संशोधनाबाबत बहुतांश प्रक्रिया कॉलेजस्तरावर करण्यास विद्यार्थ्यांचा विरोध आहे. प्रशासनाच्या या निर्णयाविरोधात आज सर्व विद्यार्थी संघटनांतर्फे निदर्शने करण्यात आली. मुख्य इमारतीसमोर झालेल्या या निदर्शनात निर्णयाविरोधातील‌ विविध फलक हाती घेत संघटनांचे प्रतिनिधी, कार्यकर्ते सहभागी झाले होते. आर्थिक, मानसिक छळ करणारा हा निर्णय विद्यापीठाने तात्काळ मागे घ्यावा, पीएच.डी. विभाग सक्षम करून विद्यापीठातच सर्व प्रक्रिया व्हावी अशी मागणी करण्यात आली. प्रशासनाच्या या निर्णयाविरोधात घोषणाबाजीही करण्यात आली. राहुल तायडे, सुनील राठोड, नीलेश आंबेवाडीकर, कुणाल खरात, सचिन बोर्डे, वैभव मिटकरी, अमोल दांडगे, नितीन वाव्हळे, रमेश जोशी, सागर साळुंके, अविनाश सावंत, राजीव जवळीकर यांची निवेदानावर नावे आहेत.

विद्यार्थी संघटनांच्या मागण्या
- पीएच.डी.संदर्भात कॉलेजांना अधिकार देणारे ११ जुलैचे परिपत्रक तत्काळ रद्द करावे.
- पदव्युत्तर द्वितीय वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना देखील 'पेट' परीक्षा देण्याची मुभा देण्यात यावी
- गोल्डन जुबली, शेतकरी-शेतमजूर पाल्य संशोधन फेलोशिपची यादी तत्काळ प्रसिद्ध करावी.
- शेतकरी-शेतमजूर संशोधन फेलोशीपच्या निधीच्या गोंधळाबाबत चौकशी करावी.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सर्व पुलांचे ऑडिट करा

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
ऐतिहासिक औरंगाबादमध्ये असलेल्या सर्वच पुलांचे तत्काळ ऑडिट करून अहवाल सादर करा, असे आदेश विभागीय आयुक्त डॉ. उमाकांत दांगट यांनी महापालिका प्रशासनाला दिले आहेत.
गेल्या अनेक वर्षांपासून शहरातील विविध ऐतिहासिक दरवाजांनजीक असलेल्या पुलांचा आजही वापर सुरू आहे. नेहमी वाहत असलेले पाणी, कचरा यामुळे पुलांची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. यामध्ये ऐतिहासिक असलेल्या बारापुल्ला दरवाजा, पानचक्की जवळ तसेच मकाई गेट जवळ असलेले पूल यांचा समावेश आहे. या पुलांसह शहरातील इतर पुलांची अवस्थाही वाईट झाली आहे. आता आयुक्तांच्या आदेशानंतर शहरातील इतर पुलांचीही तत्काळ माहिती घेऊन त्याचे स्ट्रक्चरल ऑडिट महापालिका प्रशासनाला करावे लागणार आहे. महाडजवळ सावित्री नदीवरील पूल कोसळून झालेल्या घटनेमुळे येथील घटनेनंतर राज्यातील सर्वच पुलांचे ऑडिट करण्याचे आदेश सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार महापालिका प्रशासनाने शहरातील पुलांच्या स्ट्रक्चरल ऑडिट संदर्भात शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाला पत्र दिले असून महाविद्यालयाच्या प्रतिसादानंतर सार्वजनिक बांधकाम विभागालाही पत्र देण्यात येणार आहे.

या पुलांचे होणार ऑडिट
बारापुल्ला गेटजवळील पूल, पानचक्कीजवळील पूल तसेच मकाई गेटजवळील असलेल्या ऐतिहासिक पुलांसह नागेश्वरवाडी, औषधीभवन, पंचकुँआ कब्रस्तान चौकातील पूल, फाजलपुरा, सिद्धार्थ उद्यानासमोरील तसेच पंचायत समिती कार्यालयामागे असलेल्या पुलाचे ऑडिट करण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

१९ लाखांचा कर चुकवला

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
१९ लाखांचा वाहन कर चुकविल्याप्रकरणी रेनो कार डिलरला आरटीओने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. गाडीची १० लाखांपेक्षा जास्त किंमत असताना ती ९ लाख रुपये भासवून आरटीओला गंडविण्यात आले. शहरातील आणखी ४ एजन्सीजनी असा महाप्रताप केल्याचे बिंग लेखा परीक्षण अहवालातून फुटले आहे.
'रेनो'च्या डिलरने दहा लाखांपेक्षा जास्त किंमत असलेल्या गाड्यांची किंमत ९ लाख दाखवली. त्यासाठी आरटीओमध्ये नोंदणीसाठी ११ टक्क्यांनी कर भरला. नियमानुसार दहा लाखांवर कारची किंमत असल्यास यासाठी १२ टक्के कर वसुली आवश्यक आहे. मात्र, नऊ गाड्यांच्या इनव्हाइसवर किंमत कमी दाखवून, टॅक्सस कमी वसूल करण्यात आला आहे. त्यामुळे आरटीओला १९ लाखांचा भुर्दंड सहन करावा लागल्याचे लेखा परीक्षण अहवालातून उघड झाले. या प्रकरणात 'रेनो'च्या डिलरला कारणे दाखवा नोटीस बजाविण्यात आली आहे. यावरील खुलाशानंतर योग्य ती कारवाई करू, अशी माहिती आरटीओ सर्जेराव शेळके यांनी दिली.

एकाला नोटीस; दुसरा वठणीवर
आरटीओच्या बडग्यानंतर कर चुकविणारे इतर डिलर खडबडून जागे झाले आहेत. ४ गाड्यांच्या किमती कमी दाखवून गंडा घालणाऱ्या एका डिलरने कारवाई होण्यापूर्वीच आपल्याकडील रक्कम भरून स्वतःची या कारवाईतून सुटका करून घेतली आहे.
-
मी नुकताच रेनो कार डिलर्सच्या व्यवस्थापक पदाचा कारभार स्वीकारला आहे. मुळात ही रक्कम १९ लाख इतकी जास्त असूच शकत नाही. ती अडीच ते तीन लाख रुपये असावी. आमचा कारभार पारदर्शक आहे. आम्ही कोणत्याही प्रकारची कर चुकवेगिरी केली नाही. या प्रकरणात आमच्या एजन्सीकडून योग्य तो खुलासा आम्ही आरटीओ कार्यालयास सादर करू. - बालाजी तळेकर, व्यवस्थापक, रेनो कार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


घडमोडे, शिंदेंना तनवाणींचे आव्हान

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
आगामी महापौर निवडणुकीसाठी भाजपचे भगवान घडमोडे व राजू शिंदे यांना स्वगृहातून नगरसेवक राजू तनवाणी यांचे तगडे आव्हान असेल, असे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. या निवडणुकीला अडीच महिन्यांचा काळ शिल्लक असला, तरी सारेच उमेदवार गुडघ्याला बाशिंग बांधून सज्ज झालेत.
शिवसेना आणि भाजपमधील युतीनुसार पहिल्या अडीच वर्षांतील दीडवर्ष शिवसेनाचा महापौर असेल असे ठरले आहे. उर्वरित एक वर्ष भारतीय जनता पक्षासाठी देण्यात आले आहे. शिवसेनेच्या महापौरांचा कार्यकाळ युतीत झालेल्या करारानुसार ऑक्टोबर अखेरीस संपेल. त्यात काही बदल झाल्यास शिवसेनेच्या महापौरांना एखादा महिना जास्तीचा मिळू शकतो. महापौरपदासाठी भाजपतर्फे आतापर्यंत भगवान घडमोडे आणि राजू शिंदे यांच्या नावाची चर्चा सुरू होती. आता या चर्चेत राजू तनवाणी यांचे नाव पालिकेच्या वर्तुळात आघाडीवर आहे. घडमोडे महापालिकेतील भाजपचे गटनेते आहेत. प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे व विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे या दोन्हीही नेत्यांना धरून ते आहेत. महापालिकेत काम करण्याचा त्यांना चार टर्मचा अनुभव आहे, उपमहापौर म्हणूनही त्यांनी काम केले आहे. राजू शिंदे देखील भाजपचे जुने कार्यकर्ते असून पालिकेत काम करण्याचा त्यांनाही चार टर्मचा अनुभव आहे. हरिभाऊ बागडे यांचे समर्थक म्हणून त्यांची ओळख आहे. बागडे यांच्या आशीर्वादामुळे त्यांना महापालिकेत आतापर्यंत स्थायी समितीचे सभापतिपद, उपमहापौरपद भूषवता आले आहे. घडमोडे किंवा शिंदे यांच्यापैकीच एकजण भाजपचा महापौरपदाचा उमेदवार असेल असे बोलले जात होते, पण आता भाजपचे शहराध्यक्ष किशनचंद तनवाणी यांचे बंधू राजू तनवाणी यांच्या नावाची भर पडली आहे. तनवाणी यांची नगरसेवक म्हणून यंदाची पहिलीच टर्म असली तरी त्यांच्या पाठिशी किशनचंद तनवाणी असल्यामुळे महापौरपदाच्या निवडणुकीत ते स्पर्धेत असतील असे बोलले जात आहे.

प्रदेशाध्यक्षांसोबतचे घनिष्ठ संबंध येणार कामी
किशनचंद तनवाणी यांनी भाजप प्रवेशानंतर अल्पावधीत पक्षात वर्चस्व प्रस्थापीत केले. प्रदेशाध्यक्ष दानवे यांच्याशी असलेल्या घनिष्ट संबंधांमुळे त्यांना शहराध्यक्ष म्हणूनही नियुक्त करण्यात आले. प्रदेशाध्यक्षांशी असलेले संबंध ते राजू तनवाणी यांच्यासाठी वापरतील, असे सूत्रांनी सांगितले. तनवाणी यांचे आव्हान कसे थोपवायचे याचा विचार घडमोडे, शिंदे यांना येत्या काळात करावा लागणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ग्रामपंचायत आयएसओ; गाव बकाल

$
0
0

Ravindra.Taksal@timesgroup.com

औरंगाबाद ः शहरालगत असलेले ओहर हे गाव आजही पायाभूत सुविधांपासूनच दूरच आहे. ग्रामपंचायतीच्या कार्यालयाला आयएसओ प्रमाणपत्र मिळालेले आहे, मात्र गावातील नागरिकांना अस्वच्छता, आरोग्य, पाणी, अंतर्गत रस्ते, सफाई या प्रश्नांना सामोरे जावे लागत आहे. डांबरी रस्ता असूनही गावाला एसटीबसची प्रतीक्षा आहे. आरोग्य उपकेंद्रही येथे नावापुरतेच आहे. प्रामुख्याने शेती व दुग्ध व्यवसायावर गावगाडा सुरू असून, सिडको झालर क्षेत्रात असलेल्या या गावाचा सर्वांगीण विकास केव्हा होणार, असाच प्रश्न येथील ग्रामस्थांना पडला आहे. महापालिकेत समावेश झाल्यास गावाचा विकास होईल, असे काही ग्रामस्थांना वाटते.

जागतिक नकाशावर पर्यटननगरी अशी ख्याती असलेल्या औरंगबाद शहर झपाट्याने वाढत आहे. औद्योगिकीकरण, डीएमआयसी प्रकल्प यांसह शैक्षणिक कारणामुळे नागरीकरण वाढू लागले आहे. परिणामी, शहरालगत असलेली अनेक गावे आता शहराचाच एक भाग बनू लागली आहेत. या गावशिवारापर्यंत नवनवीन वसाहती निर्माण होऊ लागल्या असून, एका अर्थाने उपनगरे म्हणून या गावाकडे आता पाहिले जात आहे. त्यापैकी एक गाव म्हणजे औरंगाबाद तालुक्यातील ओहरचा प्रामुख्याने समावेश होतो. हर्सूल मध्यवर्ती कारागृहापासून जटवाड्याकडे जाताना अवघ्या साडेचार किलोमीटर अंतरावरील हे गाव. लोकसंख्या सुमारे तीन हजारांच्या घरात आहे. खाम नदीच्या तिरावर असलेल्या या गावात सर्वधर्मीय नागरिक राहतात. गावात मध्यम व अल्प उत्पन्न गटातील ग्रामस्थांची संख्या जास्त आहे.

एसटी बसचे दर्शनच नाही
शहरालगत असलेले या गावातूनच खुलताबादकडे रस्ता जातो. जटवाडा गावासह अनेक गावांना जाण्यासाठी ओहरमार्गे जावे लागते. असे असतानाही एसटी बसचे दर्शन येथे होत नाही. त्यामुळे ग्रामस्थांसह शाळकरी मुलांची मोठी अडचण होते. खासगी वाहनाशिवाय पर्याय नाही. गावातील काही तरुणांनी रिक्षा व्यवसाय सुरू केल्याने या प्रश्नांची तीव्रता थोडी कमी झाली आहे. गावात अद्याप बँकेची सुविधाही नाही.

शेती हेच उदरनिर्वाहाचे मुख्य साधन
शेती हेच येथील लोकांचे मुख्य उदरनिर्वाहाचे मुख्य साधन आहे. गावाचे एकूण क्षेत्र सुमारे १ हजार ५०० हेक्टर असून, त्यापैकी सुमारे १ हजार ३२ हेक्टर क्षेत्र लागवडीलायक आहे. कापूस, मका, गहू, कांदा या पिकांबरोबरच येथील बहुतेक शेतकरी भाजीपाला लागवडीवर भर देतात. काही प्रमाणात फळबागांचीही लागवड केली आहे. गाव शहरालगत असल्याने वाहतूक खर्च कमी येतो. त्यामुळे भाजीपाला, फळबागांकडे कल आहे. शेतीला जोड धंदा म्हणून अनेकजण आता दुग्ध व्यवसायातही आहेत. औरंगाबादेतील सिडको, जाधववाडी या भागात ते प्रामुख्याने दूध विक्री करतात, मात्र गावातील सुमारे तीस टक्क्यांहून अधिक नागरिकांकडे शेती नाही. त्यामुळे शेतमजूर किंवा परिसरातील वीटभट्ट्यावर ते कामाला जातात. नियमित रोजगार उपलब्ध नसल्याने त्यांचे हातावरच पोट आहे, अशी माहिती ग्रामस्थांनी दिली.

कर वसुली नगण्य
ओहर ग्रामपंचायत कार्यालयाला आयएसओ प्रमाणपत्र मिळालेले आहे, मात्र असे असतानाही येथील गावातील नागरी समस्याचा डोंगर मात्र कमी झालेला नाही. निधी कमी, त्यामुळे विकास कसा होणार, असा प्रश्न येथील कारभाऱ्यांनी केला. पाणी व घरपट्टी वसूलीचे प्रमाण नगण्य आहे. ग्रामपंचायत समोरील काही भागात सिमेंटचे गट्टू (पेव्हर ब्लॉक) बघायला मिळतात. आमदार निधीतून स्मशानभूमी; तसेच एका सिमेंट रस्त्याचे काम येथे झाले आहे. गावातील अंतर्गत रस्ते अद्यापही तयार झालेले नाही. पावसाळ्यात चिखलातून वाट काढत जावे लागते. गटार योजना पूर्ण नसल्याने सांडपाण्याचा प्रश्न कायम असून, गाव पूर्णतः पाणंदमुक्त झाले नाही. या कारणामुळे सार्वजनिक आरोग्याचा प्रश्नही निर्माण होतो.

विजेचा लपंडाव
गावात रेशन दुकान आहे, मात्र गॅस सिलिंडरसाठी सुमारे तीन किलोमीटरवरील ग्रामस्थांना सहारा वैभवपर्यंत जावे लागते. गाय, म्हशीसह अन्य जनावरांच्या वैद्यकीय उपाचारासाठी पशुपालकांना सुमारे सहा किलोमीटर अंतरावर असलेल्या नायगाव केंद्रावर जावे लागते. गावात सिंगल फेज असले तरी विजेचा लपंडाव सुरू असतो. शेतात वीज नसते, असे गावकऱ्यांनी सांगितले. शाळेच्या परिसरातील मोकळी जागा वगळता मुलांना खेळण्यासाठी मैदान नाही.

विहिरीतून पाणीपुरवठा
गावालगत असलेल्या एका विहिरातून नागरिकांना पिण्याचे पाणी पुरविले जाते. पाण्याच्या टाकीचे काम सुरू आहे, मात्र नियमितपणे पाणीपुरवठा होत नसल्याची ओरड आहे. शुद्ध पाणीपुरवठ्यासाठी आरओ यंत्रणा बसविण्यात येत आहे.

अंगणवाडीला गळती
गावातील अंगणवाडीची एक इमारत आता दुरुस्तीला आली आहे. अंगणवाडीच्या अन्य एका नवीन इमारतीचे बांधकाम सुरू आहे. गावात जिल्हा परिषदेची सातवीपर्यंत शाळा आहे. त्यात मराठी व उर्दू माध्यमाचे मिळून एकूण १८० विद्यार्थी शिक्षण घेतात. गावालगत एक किलोमीटर अंतरावर असलेल्या एका खासगी शैक्षणिक संस्थेत बारावीपर्यंत शिक्षणाची सोय आहे. काही मुले हर्सूल भागातही शिक्षणासाठी जातात. गावालगत एक कॉलेजही सुरू झाले आहे. खासगी शाळेत शिकणाऱ्या मुलांसाठी संबंधित शाळांनी स्कूलबसची सोय केली आहे.

जमिनीचे भाव गगनाला
जटवाड रोडटच जमीनीचे भाव सुमारे ५० लाख रुपये एकर अाहे. रस्त्यालगत जमिनीचे भाव जास्त आहेत. आतील भागात भाव कमी आहेत. जमिनीच्या जमिनीच्या प्रतीप्रमाणे कमी-अधिक भाव असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.

आघाडी, युतीची सत्ता
पंचायत समिती व जिल्हा परिषद सदस्य राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत. ग्रामपंचायतीवर मात्र शिवसेना-भारतीय जनता पक्ष युतीचे वर्चस्व आहे.

गावाचा विकास आराखडा तयार करून शासनास सादर केला आहे. त्यासाठी निधी मिळाला पाहिजे. तसे झाल्यास विकासाला गती मिळाले. सिडकोतील झालर क्षेत्रापेक्षा महापालिकेत समावेश झाल्यास अधिक फायदा होईल.
- गणेश नलावडे, उपसरपंच, ग्रामस्थ

दळवळणाची सोय नसल्याने त्रास होतो. प्रामुख्याने विद्यार्थी व आजारी व्यक्तींना त्यांचा सामना करावा लागतो. महापालिका क्षेत्रात हे गाव असल्यास अधिक सुविधा मिळतील, असे वाटते.
- रशीद पठाण, ग्रामस्थ

पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक पाळले पाहिजे. महिलांना यांचा खूप त्रास होतो. गावात स्वच्छता कशी राखली जाईल, याकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे. एसटी बसची सुविधा तातडीने होणे आवश्यक आहे. आजारी असल्यास खासगी हॉस्पिटलमध्ये जावे लागते.
- सुनीता चव्हाण, ग्रामस्थ

गावाचा सर्वागीण विकास अधिक वेगाने झाला पाहिजे. त्यासाठी शासनाने अधिक निधी देण्याची गरज आहे. हे गाव महापालिका क्षेत्रात आल्यावर कर वाढेल. गावात अनेक गरीब लोक राहतात. सर्वांना ते कसे परवडेल.
- नामदेव नलावडे, माजी सरपंच

पाणीपुरवठा नियमित होत नाही. वेळापत्रक कागदावर असल्याने खूप त्रास होता. उन्हाळ्यात पाणीप्रश्न तीव्र होतो. गेल्या वर्षी टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात आला. गावात ड्रेनेज लाइन नाही. त्यामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण होतो.
- कारभारी चव्हाण, ग्रामस्थ

जिल्हा परिषदेच्या शाळेत सातवीपर्यंतच वर्ग आहेत. पुढील शिक्षणाची सोय झाली पाहिजे. डिजिटल शाळा व्हावी, यासाठी शासनाने मदत करावी. अंतर्गत रस्त्यांची कामेही झाली पाहिजे.
- अमित फुके, ग्रामस्थ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उद्योग पाणीकपात हायकोर्टाकडून रद्द

$
0
0


म. टा. विशेष प्रतिनिधी, औरंगाबाद
मराठवाड्यासह खान्देश व नगर जिल्ह्यातील उद्योगांसाठी २७ एप्रिलपासून असलेली पाणीकपात सोमवारी मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. संभाजी शिंदे व न्या. संगीतराव पाटील यांनी रद्द केली. जायकवाडी धरणात ४१ टक्के पाणी आल्याचे आज सरकारी पक्षातर्फे कोर्टात सांगण्यात आले.
दोन टप्यात करावयाच्या पाणीकपातीमध्ये दारूच्या कारखान्यांसाठी पन्नास व साठ तर साधारण उद्योगांच्या पाणीकपातीमध्ये अनुक्रमे वीस व पंचविस टक्के कपात करण्याचे अंतरिम आदेश २६ एप्रिलला दिले होते. या पाणीकपातीस ३ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. मद्य उद्योगांची कपात पिण्याच्या पाण्यापेक्षा कमी (५० ते ९० टक्के) करू नये, अशी विनंती अ‍ॅड. सतीश तळेकर यानी केली होती. कोपरगाव येथील समाजसेवक संजय काळे यांच्यावतीने पाण्यासंबंधी जनहित याचिका दाखल केली होती. सरकारी वकील अमरजितसिंह गिरासे यांनी बाजू मांडली. या याचिकेची सुनावणी सोमवारी नव्हती, पण न्यायमूर्तींनी स्वतःहून या याचिकेची दखल घेऊन अंतरिम आदेश रद्द केले. दुष्काळामुळे पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली होती. आज ही परिस्थिती नाही. जायकवाडी धरणात वर्षभर पुरेल इतके पाणी आले आहे. आणखी पाणी वाढणार आहे, असे मत कोर्टाने व्यक्त केले. या निर्णयामुळे उद्दोगांना ५६ एमएलडी पाणी रोज मिळणार आहे.
-
उद्योगाची पाणीकपात मागे घेतली गेली या निर्णयाचे स्वागत. दुष्काळामुळे उद्योगांच्या उत्पादनावरही परिणाम झाला होता. आता पुरेसे पाणी मिळणार असल्याने निश्चितच उद्योजजगतात आनंदाचे वातावरण पसरणार आहे. - गुरप्रीतसिंह बग्गा, अध्यक्ष सीएमआयए
-
निर्णयाचे स्वागत. उद्योगांना चांगले दिवस येतील. डीएमआयसीच्या विकासाला चालना मिळेल. पाण्यासंदर्भातील अडथळे आता दूर होण्यास मदत मिळेल. - विजय लेकुरवाळे, अध्यक्ष, मासिआ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जायकवाडीच्या निमित्ताने ‘डीपी’वर काथ्याकूट

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
जायकवाडी धरणाला भेट देण्याचे निमित्त करून महापालिकेतील धुरिणांनी सोमवारी वादग्रस्त ठरलेल्या आणि हायकोर्टाने रद्द केलेला विकास आराखडा अर्थात 'डीपी'वर चर्चा केली. या निर्णयाला सुप्रीम कोर्टात आव्हान देण्यासंदर्भात यावेळी चर्चा झाल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.
शहराच्या १८ खेड्यांसाठी तयार केलेला सुधारित विकास आराखडा हायकोर्टाच्या औरंगाबाद येथील खंडपीठाने रद्द केला. त्यामुळे महापालिकेचे प्रशासन व लोकप्रतिनिधींचे धाबे दणाणले आहे. या आराखड्यातील सुधारणा हायकोर्ट मान्य करेल, असे प्रशासन व काही लोकप्रतिनिधींना वाटत होते, पण हायकोर्टाच्या झब्बूमुळे त्यांचा हिरमोड झाला. या निर्णयाच्या विरोधात सुप्रीम कोर्टात आव्हान जाण्याची तयारी सध्या पालिकेत केली जात आहे. हे आव्हान कसे द्यायचे, कुणामार्फत द्यायचे, त्यासाठी यंत्रणा कशी राबवायची याबद्दल एकांतात चर्चा करण्यासाठी पदाधिकाऱ्यांनी आज पैठण पर्यटन केले. महापौर त्र्यंबक तुपे, उपमहापौर प्रमोद राठोड, शिवसेनेचे गटनेते राजू वैद्य, भाजप गटनेते भगवान घडमोडे, स्थायी समितीचे माजी सभापती दिलीप थोरात यांनी जायकवाडीला भेट दिली. त्यांच्या भेटीबद्दल पालिका प्रशासनाने प्रसिद्धी पत्रक दिले. त्यात म्हटले आहे की, जायकवाडी धरणात मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवक सुरू झाल्यामुळे ३ जुलैपासून शहरासाठीची आपतकालीन पाणीपुरवठा योजना बंद करण्यात आली. जायकवाडी धरणात ९५०.२७३ दशलक्ष घनमीटर जिवंत पाणीसाठा आहे. मात्र, बहुतांश भागात पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. त्या अनुषंगाने पदाधिकाऱ्यांनी जायकवाडी येथील पालिकेच्या पंपहाउस सह फारोळा येथील जलशुद्धीकरण केंद्राला भेट दिली. पंपहाउसच्या तोंडाला असलेल्या विहिरीत गाळ व गवत येत असल्यामुळे पाणी उपशावर परिणाम होत आहे. पंपहाउसमध्ये गाळ व गवत येऊ नये यासाठी विशेष काळजी घेण्याची सूचना महापौरांनी अधिकाऱ्यांना केली. वादळी वाऱ्यामुळे विद्युत पुरवठा खंडित होण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत. त्यामुळे पाणीपुरवठ्यात अडचणी निर्माण होत आहेत. ही बाब लक्षात घेऊन नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहनही महापौरांनी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

इक्बालच्या घरात तयार केला बाँब

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

परभणीच्या शेख इक्बाल शेख कबीर अहमद याच्या घरातच दीड किलोचा बाँब तयार करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. इस्लामिक स्टेट (आयएस) या आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनेशी इक्बालचेही 'कनेक्शन' असल्याचे कागदपत्रांवरून उघड झाले आहे.

'एटीएस'च्या तपासामध्ये शेख इक्बालच्या घरात चौघा मित्रांनी मिळून बाँब तयार केल्याचे समोर आले आहे. बाँबचे सर्किट इक्बालच्या घरात सापडले आहे. तसेच 'आयएस'शी संबंध असल्याचे व या संघटनेशी इंटरनेटद्वारे इक्बालने वारंवार संपर्क केल्याचेही समोर आले आहे. या संबंधीची कागदपत्रे, दस्तावेज इक्बालच्या घरातून जप्त केला आहे. इक्बालने एजंटमार्फत 'व्हीसा'साठी अर्ज केला होता आणि सीरियामध्ये जाण्याच्या तयारीत असल्याचेही तपासात निष्पन्न झाले आहे.

दरम्यान, 'एटीएस'च्या कोठडीत असलेल्या नासेरबिन व शाहेद यांनी दिलेल्या माहितीवरून परभणीच्या गुलजार कॉलनी (मदिना पाटी) परिसरात राहात असलेल्या शेख इक्बाल शेख कबीर अहमद याला रविवारी (७ ऑगस्ट) 'एटीएस'ने अटक केली. त्याला सोमवारी कोर्टात हजर करण्यात आले असता, शुक्रवारपर्यंत (१२ ऑगस्ट) 'एटीएस'च्या कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एम. ए. हुसेन यांनी दिले.


हिंगोलीतून चौथा संशयित उचलला

'आयएस'शी संबंध असल्याच्या संशयावरून हिंगोलीतील आजम कॉलनीतून जिल्हा परिषद शाळेतील एका शिक्षकास सोमवारी पहाटे औरंगाबाद एटीएसने उचलले. 'आयएस'चे धागेदोरे परभणीनंतर हिंगोलीपर्यंत पोचले आहेत. आतापर्यंत मराठवाड्यातील चार संशयितांना अटक करण्यात आली आहे. हिंगोली येथील जिल्हा परिषदेच्या शाळेवर उर्दू माध्यमाचा शिक्षक म्हणून कार्यरत असलेल्या रईसोद्दिन सिद्दिकी (३८) याला अटक केल्याचे सूत्रांनी सांगितले. हिंगोली शहरातील जिल्हा परिषद उर्दू प्राथमिक आणि माध्यमिक शाळेत तो इंग्रजीचा सहशिक्षक आहे. २६ जून २००३ रोजी हिंगोली जिल्हा परिषदेमध्ये शिक्षक म्हणून रुजू झाला होता. आजम कॉलनीमध्ये भाड्याने घर घेऊन तो कुटुंबीयांसह राहत होता. सिद्दिकी हा मूळ परभणीचा रहिवासी आहे. मागील तीन वर्षांपासून हिंगोलीतील उर्दू शाळेत कार्यरत होता. त्याचे परभणीला जाणे-येणे सुरू असायचे. तो इतरांना प्रशिक्षित करीत होता, या संशयावरून त्याला ताब्यात घेतल्याचे सूत्रांनी सांगितले. याआधी अटक करण्यात आरोपींच्या चौकशीमध्ये सिद्दिकीचा गुन्ह्यात सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्याने सोमवारी सायंकाळी साडेपाच वाजता अटक केली.

परभणीत रचले कटकारस्थान

परभणीतील एका प्रार्थनास्थळाजवळील मैदानामध्ये बाँबनिर्मिती व स्फोटके घडवून आणण्याचे कटकारस्थान शिजत होते, तर प्रत्यक्ष बाँबनिर्मितीचे काम परभणीच्या शेख इक्बाल शेख कबीर अहमद याच्या घरात होत होते. प्रार्थनास्थळामध्ये प्रार्थना झाल्यानंतर हे चौघे मित्र मैदानात जमत व नंतर मैदानात नियोजन केले जात असल्याचे तपासात समोर आले आहे.

या प्रकरणातील नासेरबिन अबुबकर याफई चाऊस (३४, रा. देशमुख गल्ली, परभणी) हा इंटरनेटद्वारे 'आयएस'च्या संपर्कात होता. देशविघातक कृत्य करण्यासाठी आणि या संघटनेत सहभागी होण्यासाठी इराक व सीरिया या देशांमध्ये जाण्याच्या तयारीत असताना, 'एटीएस'ने त्याला १४ जुलै रोजी परभणी येथे अटक केली होती. नासेरबिनकडून २ लॅपटॉप, ५ मोबाईल हँडसेट, २ पेनड्राइव्ह, १ कार्ड रिडर, १ ब्ल्यूटुथ कनेक्टर, २ बॅटरी सेल, २ पासपोर्ट जप्त करण्यात आले होते आणि 'एटीएस'च्या तपासात नासेरबिनने बाँब तयार केल्याचे स्पष्ट झाले होते. बाँबनिर्मितीची सगळी माहिती नासेरबिनला सिरियास्थित फारुकने इंटरनेटद्वारे दिली आणि नासेरबिनने नागपूर, हैदराबाद, मुंबईतून बाँबचे साहित्य आणून बाँब तयार केला. या तयार केलेल्या बाँबचे छायाचित्र नासेरबिनने 'टेलिग्राम अॅप'द्वारे फारुकला पाठवल्याचेही तपासात समोर आले. त्यासाठी नासेरबिनला 'हवाला'मार्फत पैसे मिळाल्याचेही निष्पन्न झाले. नासेरबिननेच दिलेल्या माहितीवरुन परभणीतील गोलघुमट परिसरातील मोहम्मद शाहेद खान मोहम्मद कादरअली खान (२४) याला २३ जुलैला 'एटीएस'ने अटक केली होती. शाहेद खान हादेखील इंटरनेटद्वारे सीरियास्थित फारुकच्या संपर्कात होता. या दोघांनी दिलेल्या माहितीवरून शेख इक्बाल व रईसुद्दीन सिद्दीकी यांना 'एटीएस'ने अटक केली.

परभणीच्या शेख इकबाल शेख कबीर अहमद याच्या घरातच दीड किलोचा आयइडी बाँब तयार करण्यात आल्याचे व 'इस्लामिक स्टेट' (आयएस) या आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनेशी इक्बालचेही 'कनेक्शन' असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर त्याला 'एटीएस'च्या पथकाने रविवारी (७ ऑगस्ट) अटक केली. तो 'आयएस'शी संपर्कात असल्याचे अनेक धागेदोरे इक्बालच्या घरात सापडले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘आदिवासींमध्ये होणारी घुसखोरी रोखा’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
'आदिवासी बांधवांच्या आरक्षणात होणारी घुसखोरी थांबवा,' अशी मागणी रिपब्लिकन सेनेचे नेते आंनदराज आंबेडकर यांनी केली. आदिवासी बांधवांचे प्रश्न सोडविण्यासाठी सर्वांतोपरी प्रयत्नशील राहणार, अशी ग्वाही त्यांनी दिली.
भारतीय आदिवासी पँथर संघटनेतर्फे मंगळवारी जागतिक आदिवासी दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्ताने सिडको येथील संत तुकाराम नाट्यागृहात शिक्षण हक्क मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेचे उद्घाटन आंबेडकर यांच्या हस्ते झाले. स्वाभिमानी मुक्टा संघटनेचे अध्यक्ष डॉ. शंकर अंभोरे, लोकसंघर्ष मोर्चाचे प्रकाश बारेला, आदिवासी कर्मचारी संघटनेचे विलास कटारे, विष्णू हाळे यांच्यासह आदिवासी
पँथर संघटनेचे अध्यक्ष प्रशांत बोडखे, उपाध्यक्ष तुळशीराम खोटरे आदी उपस्थित होते. 'आदिवासी बांधवांच्या आरक्षणात घुसखोरी करण्याचा प्रयत्न होत आहे. हे चुकीचे असून आदिवासी बांधवांच्या न्याय हक्कावर घाला घालण्याचे हे काम आहे. ही घुसखोरी थांबविण्यात यावी,' अशी मागणी आनंदराज आंबेडकर यांनी यावेळी केली.
आदिवासी समाजातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळाले पाहिजे, यासह विविध प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्नशील राहू, अशी ग्वाही त्यांनी दिली. तुळशिराम खोटरे, प्रवीण तुमराम, मोतीराम लिंबाळकर, माधव गावित, गीता पावरा, रिना पाडवी यांच्यासह आदिवासी विद्यार्थी कृती समितीचे अनेक विद्यार्थी उपस्थित होते.
आदिवासी दिनानिमित्त आदिवासी पँथर संघटनेतर्फे सकाळी फेरी काढण्यात आली. सिडको येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय येथून फेरीला सुरुवात करण्यात आली. वेणुताई चव्हाण हायस्कूल, बजरंगचौक मार्गे काढण्यात आलेल्या या फेरीची सांगता संत तुकाराम नाट्यगृह येथे करण्यात आली. 'आदिवासी हेच देशाचे मूळ निवासी आहेत', 'बोगस हटाव, आदिवासी बचाव', अशा घोषणा देत विद्यार्थ्यांनी संपूर्ण फेरीमार्ग दणाणून सोडला. या फेरीत विद्यार्थी पांरपरिक वेशभूषेत सहभागी झाले होते.

प्रकल्प कार्यालयात उत्साह
एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयात जागतिक आदिवासी दिन व ऑगस्ट क्रांतिदिन उत्साहात साजरा करण्यात आला. प्रकल्प अधिकारी गजानन फुंडे यांच्या हस्ते आदिवासींचे प्रेरणास्थान तंट्या भिल व बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यांनी सर्वांना जागतिक आदिवासी दिनाच्या शुभेच्छा दिल्या. आदिवासी दिनाच्या पूर्वसंध्येला कार्यालयावर रोषणाई करण्यात आली होती, इमारतीवर शुभेच्छा फलक लावण्यात आला. प्रकल्पांतर्गत शासकीय व अनुदानित आदिवासी आश्रमशाळा, वसतिगृहांमध्ये आदिवासी संस्कृती व कला दाखविणारे कार्यक्रम, व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पालिका अधिकाऱ्यांत खड्ड्यावरून बेबनाव

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त झालेले असताना महापालिकेचे अधिकारी, मात्र जबाबदारी एकमेकांवर लोटत असल्याचे चित्र आहे. अधिकाऱ्यांमधील बेबनाव मंगळवारी झालेल्या आढावा बैठकीत उघड झाला. या बेबनावावर पांघरून घालत मनपा आयुक्तांनी खड्डे बुजवण्याचे काम चार-पाच दिवसात सुरू होईल, असे सांगितले.
शहरातील रस्त्यांवर सर्वत्र खड्डे पडले आहेत. त्यामुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. त्यावर मंगळवारी झालेल्या महापौरांच्या अध्यक्षतेखालील आढावा बैठकीत चर्चा झाली. रस्त्यांवरील खड्डे बुजवण्यासाठी काय करणार, अशी विचारणा महापौरा त्र्यंबक तुपे यांनी केली. आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांनी कार्यकारी अभियंत्यांना याबद्दल खुलासा करण्यास सांगितले. अंदाजपत्रकांच्या सर्व फाइल मंजुरीसाठी लेखा विभागाकडे पाठवल्या आहेत. फाइल मंजूर झाल्यानंतर पुढील कारवाई केली जाईल, असे कार्यकारी अभियंता सिकंदर अली यांनी सांगितले. सिकंदर अली यांचे वक्तव्य संपताच मुख्यलेखाधिकारी संजय पवार म्हणाले, लेखा विभागात एकही फाइल शिल्लक नाही. सर्व फाइल क्लिअर केल्या आहेत. दोन अधिकाऱ्यांमधील हा बेबनाव उघड झाल्यानंतर आयुक्तांनी हस्तक्षेप केला. ते म्हणाले, चार-पाच दिवसांत खड्डे बुजवण्याच्या कामाला सुरूवात केली जाईल. गटनेते राजू वैद्य यांनी क्रांतिचौक उड्डाणपुलाचा प्रश्न उपस्थित केला. या उड्डाणपुलावर मोठे खड्डे पडले आहेत. तो उड्डाणपुल महापालिकेकडे हस्तांतरीत झाला असेल, तर पालिकेने ते बुजवले पाहिजेत. उड्डाणपुलाच्या हस्तांतरणाबद्दल महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे फक्त पत्र आले आहे, असे आयुक्तांनी सांगितले. नुसत्या पत्राने हस्तांतरण होत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. कार्यकारी अभियंता सिकंदर अली म्हणाले, त्या उड्डाणपुलाच्या देखभाल दुरूस्तीचे काम पाच वर्षांसाठी संबंधित कंत्राटदाराकडे आहे. रस्ते विकास महामंडळाने ते करून घेतले पाहिजे. या संदर्भात रस्ते विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांशी आम्ही बोलू, असे आश्वासन त्यांनी दिले.

पोलिसांकडून एनओसी प्राप्त
सेव्हनहिल्स ते सुतगिरणी चौक आणि गजानन महाराज मंदिर ते जयभवानीनगर या रस्त्यांच्या व्हाइट टॉपिंगच्या कामासाठी वाहतूक पोलिसांची एनओसी मिळाली आहे. या रस्त्यांची कामे दोन दिवसांत सुरू होतील, अशी ग्वाही सिकंदर अली यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शिस्त अन् संयमाचे ‘मूक’दर्शन

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
वेगवेगळी सामाजिक आंदोलने पाहिलेल्या शहरवासीयांनी मंगळवारी मराठा क्रांती मोर्चा अनुभवला. यापूर्वी एवढा विराट मूकमोर्चा निघाला नसल्याची उत्स्फूर्त प्रतिक्रिया उमटली. प्रचंड जनसमुदाय असूनही शिस्तीत निषेध नोंदवण्यात आला. बाजारपेठेतून जाताना मोर्चेकऱ्यांनी शिस्तीचे दर्शन घडवले. समारोप झाल्यानंतर हजारो स्वयंसेवकांनी क्रांतिचौक ते विभागीय आयुक्तालय रस्त्यावरील कचरा जमा केला.
कोपर्डी घटनेच्या निषेधार्थ निघालेल्या मराठा क्रांती मोर्चाने औरंगाबाद शहराच्या सामाजिक चळवळीत एक नवी नोंद केली. शहरात आतापर्यंतचा हा सर्वांत मोठा मोर्चा ठरला. शेतकरी, उद्योजक, महिला, विद्यार्थी, सामाजिक कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी, कलाकार, लेखक, व्यावसायिक, प्राध्यापक, वकील, डॉक्टर, सीए अशा विविध क्षेत्रातील नागरिक मोर्चात सहभागी झाले. 'आमच्या पोरीची अब्रू इतकी स्वस्त कशी, कोपर्डीच्या नराधमांना तत्काळ फाशी' अशा घोषणांचे फलक घेऊन हजारो विद्यार्थिनी मूकमोर्चात सहभागी झाल्या. क्रांतिचौकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून सकाळी ११ वाजता मूकमोर्चा मार्गस्थ झाला. दुपारी १२ वाजता विभागीय आयुक्तालय परिसरात पोहचला. त्यावेळी शेवटचे मोर्चेकरी क्रांतिचौकात होते. प्रचंड गर्दी असूनही मोर्चाला गालबोट लागले नाही. परिणामी, मोठा फौजफाटा असलेल्या पोलिसांवर अतिरिक्त ताण पडला नाही. मूकमोर्चा पाहण्यासाठी बाजारपेठेत दुतर्फा गर्दी झाली होती. मोर्चाचा समारोप झाल्यानंतर उद्योजक आणि इतर स्वयंसेवकांनी रस्त्यावर पडलेले पाण्याचे पाऊच व बाटल्या जमा केल्या. त्यामुळे तासाभरातच रस्ते पूर्ण स्वच्छ झाले. शिस्त आणि स्वच्छता यांचा आदर्श पायंडा घालणारा मोर्चा काढल्याबद्दल पोलिस व प्रशासनाने प्रमुख संयोजकांचे आभार मानले.

मुलींना सुरक्षा द्या; आयुक्तांना निवेदन
'आम्हाला सुरक्षा द्या. कोपर्डी घटनेप्रकरणी न्याय द्या,' म्हणत मोर्चातील सहभागी युवतींनी विभागीय आयुक्त डॉ. उमाकांत दांगट यांना मागण्यांचे निवेदन दिले. निवेदन देण्यासाठी कन्या दहिभाते, ज्योती भोंडेकर, कीर्ती जाधव, लीला देशमुख, रुपाली मोकाशे, प्रियांका शिंदे, सुनिता औरादे आणि अश्विनी पडूळ या युवतींचा सहभाग होता. डॉ. दांगट यांना निवेदन देताना युवती म्हणाल्या, कोपर्डीच्या घटना यापुढे होऊ नयेत, याची दक्षता घ्यावी. ग्रामीण भागातील विद्यार्थिनींना सुरक्षा पुरवावी. प्रत्येक मुलींची राहणीमानाची आपापली पद्धत आहे. महाविद्यालयांचे वेगवेगळे गणवेश असतात. त्याला आम्ही काय करावे? कोपर्डीतील आरोपींवर तत्काळ कारवाई करावी. निर्भया कायद्याप्रमाणे पुढील दोन आठवड्यात अंतिम आरोपपत्र दाखल करावे. राज्य सरकारने घोषित केल्याप्रमाणे या प्रकरणाची जलदगती न्यायप्रक्रिया त्वरित सुरू करून, सलग सुनावणीद्वारे येत्या सहा महिन्यांच्या कालमर्यादेत सर्व गुन्हेगारांना मरेपर्यंत फाशी द्यावी. राज्यातील मुलींच्या शालेय, महाविद्यालयीन शिक्षणात खंड पडू नये, यासाठी आवश्यक ती कारवाई करावी.'आयुक्तांनी शांततेत निघालेल्या मोर्चाचे कौतुक केले. 'निवेदन शासनाकडे पाठवू, यावर काय कारवाई करायची याचा निर्णय घेऊ,' असे आश्वासन दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘डीएमआयसी’ला गती हवी!

$
0
0


म. टा. विशेष प्रतिनिधी, औरंगाबाद
दिल्ली मुंबई इंडस्ट्रिअल कॉरिडॉर (डीएमआयसी) च्या माध्यमातून शेंद्रा बिडकीन परिसरात ऑरिक सिटीमध्ये पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी युद्धपातळीवर काम सुरू झाले आहे, पण त्यात अधिक गती आवश्यक आहे. रस्ते, पाणी आणि वीज या तीनही गोष्टींची हमी आल्याशिवाय उद्योग याठिकाणी येण्यास संमती देणार नाहीत. मात्र, यासाठी लागणाऱ्या सुविधा पुरविण्यास यंत्रणा हलणे आवश्यक आहे.
केंद्र सरकारची महत्त्वकांक्षी असलेल्या डीएमआयसी योजनेचा महत्वाचा टप्पा औरंगाबाद लगतच्या शेंद्रा बिडकीनच्या रुपात मिळाला आहे. देशातील सहा राज्यांतून जाणाऱ्या या कॉरिडॉरसाठी लागणारी जमीन शेंद्रा करमाड परिसरात सर्वाधिक वेगाने संपादित केली गेली. शेंद्रा, करमाड आणि बिडकीन परिसरात दहा हजार एकर जमीन संपादित केली गेली. गेल्या वर्षी शेंद्रा परिसरात पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी शापूर्जी पालंजी कंपनीला ७०० कोटींचे कंत्राट देण्यात आले. आगामी दीड वर्षांत या कंपनीकडून रस्ते, अंतर्गत वीजवाहिन्यांसाठीची सुविधा, ड्रेनेजलाइनची सोय करून दिली जाईल. करमाड परिसरात दोन उड्डाणपूल उभारण्याचे काम पाटील कन्स्ट्रक्शन्सला मिळाले असून त्यात एका पुलाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.
अत्याधुनिक सुविधांनी युक्त असणारा हा परिसर ऑरिक सिटी नावाने ओळखला जाणार आहे. ऑरिक सिटीची माहिती तसेच या परिसरावर नियंत्रण ठेवण्यासाठी सुसज्ज मध्यवर्ती प्रशासकीय इमारत उभारली जाणार आहे. त्यासाठीची निविदाही नुकतीच काढण्यात आली आहे. त्यापुढचा टप्पा पार करताना दहा दिवसांपूर्वी दिल्लीत झालेल्या बैठकीत बिडकीन डीएमआयसीच्या विकासासाठी ६८८० कोटींच्या प्रस्तावास मंजुरी देण्यात आली. थोडक्यात पुढच्या दोन वर्षांत ऑरिक सिटीचा परिसर पायाभूत सुविधांनी युक्त राहणे अपेक्षित आहे, पण एवढ्या भांडवलावर परदेशी कंपन्या ऑरिकसिटीमध्ये आकर्षित होतील, असे मानता येणार नाही. कारण कागदावरचे प्लॅनिंग प्रत्यक्षात उतरणे आवश्यक आहे. काही पायाभूत सुविधा पुरविल्या गेल्या पण पाणी, रस्ते आणि वीज याची हमी जोवर उद्योगांना मिळत नाही तोवर ऑरिक सिटी प्रत्यक्षात साकारणे अवघड आहे. ऑरिक सिटीसाठी उच्चदाबाचा वीजपुरवठा लागणार आहे. त्यासाठी महावितरणने सहकार्य करण्याचे जाहीर केले आहे. हे कामही लवकरच सुरू होईल. थोडक्यात प्राथमिक पायाभूत सुविधा मिळतील पण त्याचे मार्केटिंगही तेवढेच प्रभावीपणे करण्याची गरज आहे.

पाण्यासाठी प्रतीक्षा
ऑरिक सिटीसाठी ७४ एमएलडी पाणीपुरवठा करण्यासाठी एक स्वतंत्र जलवाहिनी टाकण्यात येत आहे. या जलवाहिनीचे काम ५० टक्के पूर्ण झाले आहे. उर्वरित काम कधी होणार ? असा प्रश्न आहे. जून महिन्यात ही जलवाहिनी शेंद्रापर्यंत पोचणे अपेक्षित होते. पूर्वी पाइपची कमतरता असल्याने काम थांबले आहे. आता या कामाचा वेग मंदावल्याने ऑरिकसिटीसाठी स्वतंत्र पाणी कधी मिळणार ? हा प्रश्न कायम आहे.

सांडपाणी पुनर्वापर प्रकल्पाबाबत प्रश्नचिन्ह
शेंद्रा बिडकीन ऑरिक सिटीमधील उद्योगांना लागणारे जे पाणी असेल त्यापैकी ५० टक्के पाणी हे औरंगाबाद शहराच्या सांडपाण्यावर प्रक्रिया करून दिले जाण्याचे जाहीर करण्यात आले आहे. डीएमआयसीच्या प्लॅनिंगमध्येही त्या प्रकारचा उल्लेख आहे, पण प्रत्यक्षात सांडपाणी पुनर्वापर प्रकल्प कधी उभा राहणार ? त्याची साइट कुठे असेल ? एखाद्या संस्थेने त्यासंदर्भात विचारणा केली आहे काय ? निविदा कधी निघणार ? याविषयी काहीच हालचाली नाहीत. उद्योग आकृष्ट होण्यास हा एक महत्वाचा अडसर आहे. कारण ५० टक्के पाणी कसे मिळणार याचे कुठे प्रेझेंटेशन केले गेले नाही.

हव्यात इंटरनॅशनल स्कूल्स
ऑरिक सिटीमध्ये राष्ट्रीय - बहुराष्ट्रीय उद्योग मोठ्या संख्येने येतील. याठिकाणी येणाऱ्या अधिकाऱ्यांच्या पाल्यांसाठी इंटरनॅशनल स्कूलची आवश्यकता आहे. सद्यस्थितीत औरंगाबादमध्ये एकही इंटरनॅशनल स्कूल नाही. वोकहार्टकडून शेंद्रा परिसरात एक स्कूल साकारले जात आहे, पण अशा किमान तीन चार स्कूल या परिसरात आवश्यक आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बेगमपुरा निवडणूक; सेना-भाजप दिलजमाई

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
बेगमपुरा वॉर्डाच्या पोटनिवडणुकीसाठी मंगळवारी अखेरच्या क्षणी शिवसेना-भाजपची युती झाली. शिवसेनेचे सचिन खैरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. बेगमपुरा वॉर्डातून ११ जणांनी, तर बुढीलेन वॉर्डातून सहा जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले.
बेगमपुरा - पहाडसिंगपुरा (वॉर्ड क्रमांक १२) व बुढीलेन (वॉर्ड क्रमांक २१) ची पोटनिवडणूक २८ ऑगस्ट रोजी होत आहे. या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस होता. या दोन्ही वॉर्डात शिवसेना - भाजप एकमेकांविरुद्ध उमेदवार उभे करतील, असे मानले जात होते. दोन्हीही पक्षांनी तशी तयारी केली होती, पण आज दुपारी दोनच्या सुमारास दोन्हीही पक्षांच्या नेत्यांकडून युती झाल्याचा निरोप आला आणि भाजपला माघार घ्यावी लागली. युतीतर्फे शिवसेनेचे सचिन खैरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.
एप्रिल २०१५ च्या पालिका निवडणुकीत सचिन यांना गुलमंडी वॉर्डातून शिवसेनेने उमेदवारी दिली होती, पण त्यावेळी त्यांचा पराभव झाला. आता पुन्हा खासदार चंद्रकांत खैरे यांच्या आग्रहामुळे सचिन यांना बेगमपुरा वॉर्डातून उमेदवारी देण्यात आली आहे. उमेदवारी अर्ज दाखल करताना शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अंबादास दानवे, भाजप शहराध्यक्ष किशनचंद तनवाणी, शिवसेनेचे महानगरप्रमुख प्रदीप जैस्वाल, महापौर त्र्यंबक तुपे, स्थायी समितीचे सभापती मोहन मेघावाले, गटनेते राजू वैद्य, उपजिल्हाप्रमुख नंदुकुमार घोडेले, शहरप्रमुख बाळासाहेब थोरात, जिल्हा युवाधिकारी ऋषिकेश खैरे, संतोष माने, माजी महापौर कला ओझा, महिला आघाडीच्या शहरसंघटक प्रतिभा जगताप, उपशहरप्रमुख हिरा सलामपुरे, गणू पांडे, गणेश पेरे, माजी नगरसेवक ज्ञानेश्वर जाधव उपस्थित होते. उमेदवारी अर्जांची छाननी बुधवारी होणार आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख १२ ऑगस्ट असून २८ ऑगस्ट रोजी मतदान होणार आहे.

वॉर्ड निहाय उमेदवार
बेगमपुरा-पहाडसिंगपुराः नागराज गायकवाड (अपक्ष), संतोष भिंगारे (भाजप), अशोक बेहडे (अपक्ष), सचिन खैरे (शिवसेना), अनिल भिंगारे (अपक्ष), डॉ. प्रमोद दुथडे (अपक्ष), मच्छिंद्र खेत्रे (अपक्ष), बाळू गजहाळ (अपक्ष), पूनमचंद जावळे (अपक्ष), माधुरी गरूड (भाकप), प्रीतम घनघावे (अपक्ष).
बुढीलेनः - शेहनाज बेगम महोम्मद ख्वाजा मियाँ (एमआयएम), महेमुद तरन्नूम अकील (अपक्ष), परवीन कैसर खान (राष्ट्रवादी काँग्रेस), निखत परवीन एजाज (काँग्रेस), नसरीन बेगम सय्यद आबेद अली (अपक्ष), खान सुमय्या फैसल (आंबेडकर नॅशनल काँग्रेस)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

झाल्ट्याच्या नशिबी अंधारयात्रा

$
0
0

Sudhir.Bhalerao@timesgroup.com
औरंगाबाद ः झगमगणाऱ्या औरंगाबादलगत असलेल्या झाल्टा गावातील प्रत्येक कोपरा रात्र काळोखाने कवेत घेतलेला असतो. गावालगतची सुखना नदी औद्योगिक प्रदूषणाचा शाप घेऊन वाहते. त्यामुळे परिसरातील जलस्त्रोत दूषित. आरोग्य सेवेचा गावात मागमूसही नाही. अशा परिस्थितीत शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या झाल्या गावातील ग्रामस्थ जीवन जगत आहेत, पण आपल्या गावाचा महापालिकेत समावेश व्हावा, असे गावातील नागरिकांना वाटत नाही. सरकारने आमच्या गावाचा विकास करावा, एवढेच झाल्ट्यातील नागरिकांचे मागणे आहे.
महापालिका क्षेत्रात यापूर्वी समाविष्ट झालेल्या गावांचाच विकास अद्याप झाला नाही. हा निर्णय बांधकाम व्यावसायिकांच्या फायद्याचा वाटतो. ग्रामपंचायतच्या माध्यमातूनच झाल्टाचा विकास होऊ शकतो, अशा शब्दांत सरपंचांसह गावकऱ्यांनी झाल्टा गावाचा महापालिकेत समाविष्ट करण्याच्या निर्णयाचा विरोध दर्शविला.
औरंगाबाद शहरापासून अवघ्या दहा किलोमीटर अंतरावर असलेल्या झाल्टा गावाला काही वर्षांपूर्वी एकही मुख्य रस्ता नव्हता. विमानाच्या अपघातानंतर जालना रोड ते बीड रोडला जोडणारा हायवे रस्ता तयार करण्यात आला. या रस्त्याने झाल्टा गावाला मुख्य रस्ता लाभला आणि गावाची प्रतिमा झपाट्याने बदलत गेली. मुख्य रस्त्यालगत गाव आल्याने झाल्टा गावाकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलला.
मुख्य रस्त्यालगतच गावात प्रवेश करण्यासाठी एक कमान उभारण्यात आली आहे. तीन-चार वळसे घेतले की गावाच्या मुख्य भागात पोहोचतो. गावात प्रवेश करताच दर्शन घडते ते जुन्या दगडी बांधकाम केलेल्या तटबंदीचे. काळाच्या ओघात तटबंदीचा दरवाजा निखळून पडलेला आहे. आजही त्याचे अवशेष इतिहासाची साक्ष देत आहेत.

पुनवर्सित गाव
ग्रामपंचायत कार्यालय, मंदिर, जिल्हा परिषद शाळा आणि अगदी गावालगत वाहणारी सुखना नदी असे झाल्टा गावाचे वर्णन करावे लागेल. झाल्टा गाव तीन-चार वेळेस ओस पडल्याची आख्यायिका गावातील ज्येष्ठ सांगतात. गावात आजही काही जुने वाडे आस्तित्व टिकवून आहेत. या वाड्यांचे चिरे खिळखिळे झाले असले, तरी त्याचे वैभव डोळ्याना दिपवणारे आहे. शहरालगत असल्याने गावातील अनेक घरे शहरीकरणाकडे वाटचाल करणारी दिसून येतात.

रात्र अंधारात
शहरालगत असूनही झाल्टा गावात अखंड वीज पुरवठा होत नाही. आठ तासच वीज असल्याने ग्रामस्थांना रात्र अंधारातच काढावी लागत आहे. वीज नसल्याने शेतीबरोबरच अन्य कामांना खिळ बसत आहे. महापालिका क्षेत्रात आल्यानंतर किमान अखंड वीज पुरवठा होऊन अंधारातून आपली सुटका होईल, असे ग्रामस्थांना वाटते.

सातवीपर्यंतच शाळा
झाल्टा गावात जिल्हा परिषदेची शाळा आहे. पहिली ते सातवीपर्यंत या ठिकाणी शिक्षण दिले जाते. गावातील २६६ विद्यार्थी याच शाळेत शिक्षण घेतात. गावालगतच केंब्रिज स्कूल आणि टेंडर केअर होम या दोन इंग्रजी शाळा आहेत. गावातील शिक्षणाचे प्रमाण वाढले आहे. गावातून काही इंजिनीअर, वकिल घडले आहेत.

कधी आघाडी, तर कधी युती
गेल्या दहा वर्षांपासून झाल्टा ग्रामपंचायतीचा कारभार काँग्रेसचे सरपंच चालवत आहेत. त्यापूर्वी युतीकडे सत्ता होती. पक्ष कोणताही असला तरी गावात नात्या-गोत्यातील राजकारण महत्त्वाचे ठरते. शिंदे व सुराशे या दोन कुटुंबांचा वरचष्मा असतो.

बससेवा नाही
झाल्टा ग्रामपंचायतीने आयएसओ प्रमाणपत्र मिळवले असले तरी अनेक नागरी सुविधांपासून नागरिक वंचितच आहेत. गावात अद्यापपर्यंत बस पोहचलेली नाही. सिटर रिक्षा व वैयक्तिक वाहनांचाच उपयोग करावा लागतो. माजी आमदार कल्याण काळे यांच्या २० लाखांच्या स्वेच्छा निधीतून गावात सिमेंटचे रस्ते, डांबरीकरण करण्यात आले. गावात सार्वजनिक शौचालय असावे, मैदान विकसित व्हावे, जिल्हा परिषद शाळा दहावीपर्यंत असावी, स्मशानभूमीकडे जाणारा पक्का रस्ता असावा, चिकलठाण परिसराला जोडणारा पक्का रस्ता अशा अनेक मागण्या ग्रामस्थांच्या आहेत.

ग्रामस्थांचा विरोध
महापालिका क्षेत्रात गावाचा समावेश करण्यास ग्रामस्थांचा विरोध आहे. गावाची लोकसंख्या पाच हजारांच्या आसपास असून गावात अडीचशेच्या आसपास घरे आहेत. शहरालगत असूनही गावाच्या विकासाकडे गांभीर्याने लक्ष दिले नाही. महापालिकेत समाविष्ट करण्यात आलेल्या गावांचाही विकास अद्यापही होऊ शकलेला नाही. झाल्टा गावाचा विकास अगोदर करावा आणि नंतरच महापालिकेत समावेश करावा, अशी भूमिकाही काही ग्रामस्थांनी मांडली. त्यात सरपंचांनीही आपला सूर मिसळला.

शेती हाच मुख्य आर्थिक स्त्रोत
झाल्टा गावातील बहुतांश रहिवाशांचा मुख्य आर्थिक स्त्रोत हे शेती उत्पन्न हेच आहे. मका व कापूस ही दोन मुख्य पिके आहेत. नगदी पिके असल्याने शेतकऱ्यांचा या दोन पिकांवरच अधिक भर आहे. पूर्वीच्या काळात या परिसरात मोसंबीच्या अनेक बागा होत्या. पाण्याअभावी आता मोसंबीच्या बागा नष्ट झालेल्या आहेत. त्यामुळे आर्थिक उत्पन्नात मोठी घट झाल्याची खंत शेतकऱ्यांच्या मनात आहे.

नऊ किलोमीटरहून पाणीपुरवठा
झाल्टा गावातूनच सुखना नदी वाहात असली तरी नदीच्या पाण्याचा उपयोग पिण्यासाठी करता येत नाही. पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी ग्रामपंचायतने गांधेली येथील पाझर तलावात विहीर खोदली. तेथून पाणी पुरवठ्यासाठी जलवाहिनी टाकली आहे. नऊ किलोमीटर अंतरावरून पाणी गावातील जलकुंभापर्यंत आणले जाते. जलकुंभातून गावाला पाणी पुरवठा केला जातो. सुखना नदीचे पाणी दूषित झाले अाहे. कारखान्यांतून सोडण्यात येणायऱ्या घातक रसायनांमुळे पाणी पिण्यायोग्य राहिलेले नाही. गावातील विहिरी, बोअरमधून लाल रंगाचे पाणी येते. हे पाणी आरोग्याच्यादृष्टीने योग्य नसल्याने गांधेलीतील पाझर तलाव हाच झाल्टावासीयांसाठी एकमेव पर्याय आहे.

जमिनीला लाखमोलाचा भाव
गावाला मुख्य महामार्ग लाभल्यानंतर शेत जमिनीला एकदम भाव येण्यास सुरुवात झाली. शहरालगत हा परिसर असल्याने बांधकाम व्यावसायिकांची नजर या भागाकडे वळली. पाच वर्षांपूर्वी एक-दीड कोटी रुपयांचा भाव एक एकरला मिळत होता. अलीकडच्या काळात एक एकरला ४०-५० लाख रुपये भाव मिळत असल्याने शेत जमिनी विकण्याच्या व्यवसायाला थोडा ब्रेक मिळाला आहे. बांधकाम व्यावसायिकांसह अधिकारी, डॉक्टर, वकिली अशा मंडळींनी झाल्टा परिसरात अनेक शेत जमिनी विकत घेतलेल्या आहेत. यात महापालिकेतील काही मोठ्या अधिकाऱ्यांचाही समावेश आहे.

उपचारासाठी शहराकडेच धाव
गावात आरोग्य केंद्र नसल्याने ग्रामस्थांना उपचारासाठी शहराकडेच धाव घ्यावी लागते. गावात आरोग्य केंद्र सुरू करावे, अशी ग्रामस्थांची मागणी आहे.

झाल्टा गावाचा महापालिका हद्दीत समावेश करण्यास ग्रामस्थांचा विरोध आहे. या अगोदर महापालिकेत समाविष्ट झालेल्या गावांचीच स्थिती अद्यापही खेड्यासारखीच आहे. त्यापेक्षा आमची वेगळी स्थिती होणार नाही. महापालिकेपेक्षा ग्रामपंचायत व्यवस्थाच ठीक राहिल.
- संजय शिंदे,सरपंच, झाल्टा ग्रामपंचायत

महापालिकेत समाविष्ट झाल्यानंतर झाल्टावासियांच्या त्रासात भरच पडणार आहे. आगीतून निघालो आणि फुफाट्यात पडलो अशी स्थिती होण्याची शक्यता अधिक आहे. चौधरी कॉलनी, चिकलठाणा गावाची परिस्थिती आम्ही पाहतो.
- खुशालराव शिंदे

झाल्टा गावात अद्यापही बससेवा नाही. जिल्हा परिषदेची शाळा सातवीपर्यंतच आहे. गावात सार्वजनिक शौचालयगृह नाही. सोयी-सुविधा अगोदर द्याव्यात नंतरच याचा विचार केला जावा.
- सोमनाथ शिंदे, माजी तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष

झाल्टा हे पुनवर्सित गाव आहे. शहरालगत असूनही या गावात प्राथमिक सुविधांचा अभाव आहे. महापालिका क्षेत्रात आल्यानंतर कराचा बोझा नागरिकांवर पडणार आहे. शेती उत्पन्न हेच गावकऱ्यांचे मुख्य आर्थिक स्त्रोत आहे. उत्पन्नात भर पडण्याऐवजी खिसा रिकामा होण्याचे प्रमाण वाढणार आहे.
- साहेबराव सुराशे, ज्येष्ठ नागरिक

महापालिकेत समाविष्ट झाल्यानंतर झाल्टा गावाचा विकास अधिक वेगाने होऊ शकेल. सोयी-सुविधांमध्ये निश्चितच भर पडेल. गावात आजही आठ तासच वीज पुरवठा आहे. आठ तास नागरिकांना लोडशेडिंगचा अनुभव घ्यावा लागतो.
- योगेश शिंदे

शेती हाच मुख्य उत्पन्नाचे स्त्रोत आहे. रोजगाराचे दुसरे कोणतेही साधन नाही. महापालिकेत आल्यानंतर यात कितीपत बदल होईल याविषयी शंकाच आहे. गावाचा विकास केल्यानंतरच याविषयीचा निर्णय घेतला जावा असे वाटते.
- तोताराम सुराशे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उद्योजक व्हा... : वेगळी वाट निर्मितीच्या शोधात

$
0
0

Nikhil.Nirkhee@timesgroup.com
गुटे कुटुंब हे मूळचे परळी वैजनाथचे. रुचिकेतन यांचे वडील संभाजीराव गुटे हे पोलिस खात्यामध्ये होते आणि उपाधीक्षक म्हणून निवृत्त झाले. त्यांच्यामुळे गुटे कुटुंबीय औरंगाबादला आले आणि नागपूरहून 'एमडीएस' पूर्ण केलेल्या डॉ. रुचिकेतन यांनी औरंगाबादला २००८मध्ये स्वतःचे 'डेन्टल क्लिनिक' सुरू केले. अल्पावधीत डॉ. रुचिकेतन यांची प्रॅक्टिस स्थिरावली आणि ते प्रॅक्टिसमध्ये पूर्णपणे व्यग्र झाले. केवळ शहरात नव्हे, तर जालना, नांदेड, परभणी, बीड, श्रीरामपूर, गंगापूर आदी ठिकाणीही ते महिन्यातून एकदा तरी दंतोपचाराच्या सेवा देण्यासाठी हमखास जातात. तसेच शहरातील किमान २० हॉस्पिटल-क्लिनिकशी त्यांचे 'टायअप' झालेले आहे. 'ऑर्थोडोन्टिक्स' हा त्यांचा स्पेशलायझेशनचा विषय असून, 'डेन्टिस्ट' म्हणून दंतोपचाराच्या सेवा देण्यात त्यांनी कधीही तडजोड केली नाही, मात्र वर्षानुवर्षे तेच काम करण्यात डॉ. रुचिकेतन यांना एकसुरीपणा वाटू लागला आणि काहीतरी वेगळे केले पाहिजे, अशी उसळी त्यांचे मन त्यांच्याही नकळत घेऊ लागले. काहीतरी क्रिएटिव्ह केले पाहिजे, ज्यामुळे नवनिर्मितीची भूक शमेल, या तीव्र इच्छेतून नाविन्याचा शोध सुरू असतानाच, डॉ. रुचिकेतन यांचा मित्र वेगवेगळ्या कंपन्यांचे मार्केटिंग करत होतो आणि यात स्वतःच्या कल्पनाशक्तीला, नवनिर्मितीच्या विचारांना, सौंदर्यविषयक दृष्टिकोनाला; तसेच ग्राहकाच्या गरजांनुसार बदल करण्यास कुठेच स्थान मिळत नाही, हे डॉक्टरांच्या लक्षात आले. त्यामुळे कंपनीकडून आलेले फर्निचर जसेच्या तसे विकण्यापलीकडे काहीही भूमिका 'मार्केटिंग'मध्ये राहात नाही आणि यामुळे ग्राहकांचे संपूर्ण समाधान होऊ शकत नाही. अगदी रंगामध्येदेखील बदल करणे शक्य होत नसल्याचे लक्षात आल्यानंतर, दुसऱ्या कंपन्यांच्या फर्निचरचे 'मार्केटिंग' करण्यापेक्षा आपणच का गरजेनुसार 'मॅन्युफॅक्चरिंग' करू नये आणि 'क्वालिटी प्रोडक्ट' थेट ग्राहकांपर्यंत का पोहोचवू नये, असा विचार डॉक्टरांच्या मनामध्ये चमकला. मित्रानेही डॉक्टरांच्या निर्मितीच्या विचाराला उत्स्फूर्त दाद दिली आणि २०१३ मध्ये स्वतःच फर्निचर निर्मितीमध्ये पाऊल ठेवण्याचे दोघांनी निश्चित केले. 'मिरॅकस प्रायव्हेट लिमिटेड' या नावाने छोटी कंपनी स्थापन केली आणि पैसा कमावण्यासाठी नव्हे तर केवळ आणि केवळ 'क्वालिटी प्रोडक्ट' तयार करण्याचेही दोघांनी सुरुवातीलाच ठरवून टाकले; किंबहुना त्याच एकमेव उद्देशाने फर्निचर निर्मितीच्या क्षेत्रात पाऊल ठेवले. सुर्दैवाने डॉक्टर व त्यांच्या मित्राचा 'ब्रेड बटर'चा विषय नव्हता आणि दोघांनाही पुरेसा पैसा त्यांच्या पूर्वीच्या व्यवसायातून मिळत होता. त्यामुळे फर्निचर निर्मितीचा ध्यास केवळ नवर्निमितीची भूक भागवण्यासाठी होता आणि त्याच व्यापक हेतूने त्यांनी त्यात पहिल्यापासून लक्ष घातले.

जिद्दीने मिळवली माहिती अन् तंत्रज्ञान
फर्निचरचे युनिट शेंद्रामध्ये सुरू केले आणि फर्निचरसंबंधी प्रत्येक बारीक-सारीक गोष्ट समजून शिकून घेण्यासाठी डॉक्टरांनी दिवस-दिवस घालवले, चक्क कामगारासारखे प्रत्यक्ष काम केले आणि डिझायनिंग-प्रोडक्शनमधील बहुतांश बारकावे काही महिन्यात समजून घेतले. या क्षेत्रातील सगळी इत्यंभूत माहिती-तंत्रज्ञान असे काही डॉक्टरांनी जिद्दीने मिळवले की आज कोणत्याही कामगार-कर्मचाऱ्याचे चूक केली की ती डॉक्टरांच्या लक्षात आल्याशिवाय राहात नाही. अर्थातच, युनिटसाठी अपेक्षेप्रमाणे कुशल कामगार-कर्मचारी मिळाले नाही; पण त्यांना पूर्णपणे प्रशिक्षित करण्याची जबाबदारी डॉक्टरांनी यशस्वीरित्या पार पाडली. युनिटच्या अत्याधुनिकरणावर पहिल्यापासूनच लक्ष घातले आणि ऑर्डरमधून मिळालेले पैसे पुन्हा मशीनवर व अत्याधुनिकरणावर खर्च केले. त्यातूनच युनिटमध्ये जर्मन बनावटीच्या मशीन येत गेल्या आणि बघता-बघता काम वाढत गेले. कामाची गुणवत्ता-वैविध्य पाहून आणि पैशाकडे नव्हे तर 'क्वालिटी प्रोडक्ट'चा डॉक्टरांचा ध्यास लक्षात आल्यानंतर ग्राहकांची यादी हळुहळु वाढत गेली.

प्रयोगशाळा फर्निचरवर लक्ष केंद्रित
बहुतांश कंपन्यांचे प्रयोगशाळा फर्निचरकडे फारसे लक्ष नसल्याची संधी ओळखून डॉक्टरांनी प्रयोगशाळा तसेच कार्यालयीन फर्निचरवर लक्ष केंद्रित केले. वेगवेगळ्या पॅथॉलॉजी लॅब, शाळा-महाविद्यालयांमधील प्रयोगशाळा, हॉस्पिटलमधील प्रयोगशाळा, फार्मा कंपन्यांच्या प्रयोगशाळांच्या नेमक्या गरजा ओळखून त्यांना उत्तमोत्तम फर्निचर तयार करुन देण्याचा धडाका डॉक्टरांनी सुरू केला. त्यासाठी पार्टिकल वूड व मेटलचा अनोखा मिलाफ करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. उत्तमोत्तम डिझाईनवर भर देत आणि मुख्य म्हणजे गुणवत्तेशी कधीही तडजोड न करता आतापर्यंत सुमारे ५० 'टर्न की प्रोजक्ट' यशस्वी पूर्ण केले. भविष्यात किचन व हॉस्पिटल फर्निचरकडे लक्ष केंद्रीत करण्याचे त्यांनी ठरवले आहे. अर्थात, हे करताना डॉक्टरांनी त्यांच्या मूळ पेशाकडे दुर्लक्ष होऊ दिलेले नाही. आजही सकाळी तीन तास व संध्याकाळी तीन तास त्यांची प्रॅक्टिस सुरू असते. त्याशिवाय बाहेरील 'व्हिझिट'देखील सुरू असतात, मात्र दुपारी एक ते सहापर्यंतचा वेळ ते 'प्रोडक्शन इन्चार्ज' असतात आणि युनिटच्या प्रोडक्शनची संपूर्ण जबाबदारी ते समर्थपणे पार पाडतात आणि आपल्या स्वतःच्या 'क्रिएटिव्हिटी'ची भूक पुरेपूर भागवतात. पैसा नव्हे तर अमेरिकेतील 'स्टीलकेस'प्रमाणे आंतरराष्ट्रीय स्तरावर फर्निचरच्या क्षेत्रात नाव कमावायचे आहे आणि त्यासाठी वाट्टेल ते कष्ट उपसण्याची तयारी असल्याचे डॉ. रुचिकेतन गुटे आवर्जुन म्हणतात.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images