Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

भुयारी मार्गासाठी २० डिसेंबरची मुदत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
संग्रामनगर रेल्वे क्रॉसिंगवर चार महिन्यात भुयारी मार्ग तयार करावा. अन्यथा २० डिसेंबरनंतर संग्रामनगर रेल्वे क्रॉसिंग गेट बंद करण्यात येईल, असे रेल्वे विभागाने बुधवारी प्रसिद्धीपत्रक जारी करून स्पष्ट केले आहे.
संग्रामनगर येतील तात्पुरते रेल्वे क्रॉसिंग गेट बंद करण्यास स्थानिक नागरिकांचा विरोध असल्यामुळे विभागीय आयुक्त, रेल्वेचे अधिकारी, जिल्हाधिकारी एमएसआरडीसी व लोकप्रतिनिधी यांच्या बैठकीत भुयारी मार्ग बांधण्याचे ठरवण्यात आले आहे. या बैठकीत राज्य शासनातर्फे गेट बंद करण्याचा निर्णय चार महिने पुढे ढकलावा, असी विनंती रेल्वे विभागाला करण्यात आली. त्यामुळे येत्या २० डिसेंबरपर्यंत भुयारी मार्ग बांधावा, त्यानंतर हे गेट २० डिसेंबरपासून बंद करण्यात येईल. या गेटचा वापर करताना चार महिन्यात अपघात झाला, तर त्याची जबाबदारी रेल्वे विभागावर राहणार नाही, असे प्रसिद्धीपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे. या गेटचे मेंटनन्स गेल्या दोन वर्षांपासून झालेले नाही.
रेल्वे विभागाने संग्रामनगर येथे राज्य शासनाच्या सहकार्याने उड्डाणपूल बांधला आहे. रेल्वे व राज्य शासनात झालेल्या करारानुसार पूल सुरू झाल्यानंतर रेल्वे गेट कायमचे बंद करण्यात येईल, असे ठरवण्यात आले आहे. हा पूल २०१४ मध्ये जनतेसाठी खुला करण्यात आला. या पुलाचे काम सुरू असताना तयार केलेले तात्पुरते रेल्वे क्रॉसिंग गेट बंद करू नये, अशी स्थानिक नागरिकाची मागणी आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


एसटी बसने चिरडल्याने सुरक्षारक्षक ठार

$
0
0

औरंगाबाद : कामावरून परत येत असलेला सुरक्षारक्षक एसटी बसने चिरडल्याने जागीच ठार झाला. ही घटना बुधवारी सकाळी आठ वाजता तिसगाव फाट्याजवळ घडली. याप्रकरणी बसचालकाविरुद्ध छावणी पोलिस ठाण्यात मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काकासाहेब अण्णासाहेब राखुंडे (वय ३६ रा. नागेश्वरवाडी) हे वाळूज एमआयडीसी परिसरातील एका खासगी कंपनीवर सुरक्षारक्षक म्हणून कार्यरत होते. ते रात्रपाळी संपवून बुधवारी सकाळी दुचाकीवरून घरी जात होते. या दुचाकीचा तिसगाव फाट्याजवळ पुणे-कन्नड बससोबत अपघात झाला. या अपघातात कारच्या मागच्या चाकाखाली आल्याने काकासाहेब चिरडले गेले. यामध्ये त्याचा जागीच मृत्यू झाला. छावणी पोलिसांनी मृतदेह घाटी ह‌ॉस्पिटलमध्ये पाठवला. याप्रकरणी छावणी पोलिसांनी बसचालक गोविंद उचित (वय ४०, रा. चापानेर) याला ताब्यात घेत बस जप्त केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाण्यासाठी नगरसेवकांचा जलकुंभावर ठिय्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
सिडको, हडको, मुकुंदवाडी, चिकलठाणा भागातील पाणीपुरवठा गेल्या दोन महिन्यांपासून विस्कळित झाला आहे. औरंगाबाद सिटी वॉटर युटीलिटी कंपनी तसेच महापालिका प्रशासन याकडे सातत्याने दुर्लक्ष केल्याच्या निषेधार्थ या भागातील नगरसेवकांनी बुधवारी सकाळी सिडको एन पाच जलकुंभावर ठिय्या आंदोलन केले. पालिकेचे अधिकारी आल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.
भर पावसाळ्यात नवीन औरंगाबादमधील पाणीपुरवठा विस्कळित आहे. दोन ऐवजी चार दिवसांआड आणि नियोजित वेळेपेक्षा दोन ते तीन तास उशिराने पाणी दिले जाते. 'समांतर'ला परत पाठविण्याचा निर्णय झाल्यापासून या प्रकारात वाढ झाल्याचा आरोप नगरसेवकांनी केला. सणासुदीच्या काळात नागरिकांना हंडाभर पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. पाण्याच्या वेळा बदलल्याने नगरसेवकांना नागरिक जाब विचारत आहेत. त्या पार्श्वभूमीवर मंगळवारी या भागातील नगरसेवकांनी आयुक्तांना पत्र देऊन पाणीपुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली होती. अगदी चार ते पाच दिवसाआड पाणी पुरवठा होत असल्याने वैतागलेले नगरसेवक बुधवारी सकाळी सिडको एन पाच जलकुंभावर पोचले. काँग्रेसचे भाऊसाहेब जगताप, भाजपच्या माधुरी देशमुख, जे. पी. नाडे, मोहन साळवे यांच्यासह दामोधर शिंदे, बालाजी मुंडे, रोजतकर, वळसे आदी उपस्थित होते. तिथे फक्त एकच सुरक्षारक्षक होता. पाण्याच्या हिशेब कुठे दिसत नसल्याचे पाहून जगताप यांनी आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांना संपर्क केला. बकोरियांनी चहल यांना घटनास्थळी पाठविले त्यांच्यासोबत खाजा हे अधिकारी होते. दोघे पोचल्यानंतर नगरसेवकांनी व्यथा मांडल्या. वॉटर युटीलिटी कंपनीचा एकही कर्मचारी नसल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. चहल यांनी समांतरचे अधिकारी तारिक खान यांना संपर्क केला पण, ते शहरात नव्हते. अन्य अधिकाऱ्यांकडूनही प्रतिसाद आला नाही. नगरसेवकांनी मात्र आम्हाला कंपनीशी घेणेदेणे नाही. पालिकेने पाणीपुरवठा सुरळीत करून दिला पाहिजे, अशी मागणी केली. चहल यांनी आश्वासन दिल्यानंतर ठिय्या आंदोलन मागे घेण्यात आले.

पाण्याची विक्री?
१४ ऑगस्ट रोजी १८१, तर १५ ऑगस्ट रोजी २४३ टँकरद्वारे पाणी पुरविले गेल्याची नोंद तिथे सापडली. एवढे पाणी कुठे दिले याची नोंद नाही. बहुधा टँकरची विक्री केली जात असावी, असा आरोप काँग्रेस नगरसेवक भाऊसाहेब जगताप यांनी केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिवसेनेसोबत युतीचा निर्णय स्थानिक पातळीवर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
आगामी नगरपालिका व जिल्हा परिषद निवडणुकीत शिवसेनेसोबत युती करण्याबाबतचा निर्णय स्थानिक जिल्हा कार्यकारिणी घेईल, अशी माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांनी दिली. मुंबई महापालिका निवडणुकीतही स्थानिक कार्यकारिणीच युतीचा निर्णय करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यामुळे त्यांनी युतीबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण केल्याचे मानले जात आहे.
दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण वर्गाच्या समारोपाचे भाषण केल्यानंतर प्रदेशाध्यक्ष दानवे यांनी पत्रकारांसोबत संवाद साधला. आगामी जिल्हा परिषद, नगरपालिका निवडणुकीत बहुमत मिळविण्याबद्दल कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यात आले. भाजपने निवडणुकीची तयारी पूर्ण केली असून स्थानिक पदाधिकारी कामाला लागले आहेत. राज्यात जिल्हा परिषद, नगरपालिका निवडणुकीत शिवसेनेसोबत युती करायची की नाही याचा निर्णय पक्षाच्या जिल्हा कार्यकारिणीकडे सोपविण्यात आला आहे. जिल्हा कार्यकारिणीच्या सदस्यांना वाटले, तर त्यांनी युती करावी. त्यांना युती करायची नसेल, तर स्थानिक पातळीवर युती मधून बाहेर पडावे, असे त्यांनी स्पष्ट केले. युतीबाबत सर्वाधिकार जिल्हा कार्यकारिणीला देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. आगामी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणूक यूतीबाबत अजून काही स्पष्ट निर्णय घेण्यात आलेला नाही. याबाबत बैठक घेण्यात येणार आहे. मात्र जो निर्णय संपूर्ण राज्यात लागू केलेला आहे, तोच मुंबईतही लागू आहे. मुंबईच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या निर्णयावर युतीचे भविष्य अवलंबून असल्याचे संकेत खासदार दानवे यांनी दिले.

सत्ता टिकविणे कार्यकर्त्यांच्या हाती
'राज्यात कधी तिसऱ्या, तर कधी चौथ्या स्थानावर असलेल्या भाजपने मुसंडी मारून देशात आणि राज्यात सत्ता मिळविली आहे. पक्षाला हे यश कार्यकर्ता मिळवून देतो, सत्ता टिकविणे त्याच्याच हातात आहे. कार्यकर्त्यांनी जिल्हा परिषद व नगरपालिका निवडणुकीत यश मिळवावे,' असे आवाहन प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांनी केले.
भाजप कार्यकर्त्यांसाठी तीन दिवसांच्या दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण कार्यक्रमात ते बोलत होते. ज्येष्ठ नेते माधव भंडारी, केशव उपाध्ये, राम कुलकर्णी यांची यावेळी उपस्थिती होती. 'पक्षाचा कार्यक्रम सर्वसामान्यांमध्ये राबविण्यासाठी नियोजन व कार्यकर्त्यांना प्रशिक्षण आवश्यक आहे. घरातील भांडे स्वच्छ न केल्यास पिवळा रंग चढतो. त्याप्रमाणे कार्यकर्त्यांसाठी प्रशिक्षण आवश्यक आहे. प्रत्येक जिल्ह्यात १७ आघाड्या आणि ७ मोर्चे नियुक्त केल्यानंतर राज्यात दोन लाखांवर कार्यकर्ते तयार होणार आहेत. शिवसेनेच्या मेळाव्यात एक लाख आणि मनसेत एक लाख कार्यकर्ते जमा होत असतात. मग भाजप मेळाव्यात एक लाख कार्यकर्ते जमा होणे अशक्य नाही,' असे ते म्हणाले. यावेळी विधान परिषदेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे, आमदार अतुल सावे, आमदार प्रशांत बंब, राज्य महिला आयोग अध्यक्षा विजया रहाटकर, रेखा कुलकर्णी, जिल्हाध्यक्ष एकनाथ जाधव, उपाध्यक्ष डॉ. भागवत कराड, प्रवीण घुगे आदींची उपस्थिती होती.

वेगळ्या विदर्भाचे समर्थन नाही
वेगळ्या विदर्भ राज्याबाबत विधानसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भूमिका जाहीर केली आहे. वेगळ्या विदर्भाचे आम्ही समर्थन करित नाही. राज्याच्या विकासासाठी छोटे राज्य होणे ही भूमिका भाजपची आहे, असे खासदार दानवे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. सध्या वेगळा मराठवाडा हा विषय नसल्याचे त्यांनी सांगितले. मराठवाड्याच्या योजना विदर्भाकडे दिल्या जात असल्याबद्दल पत्रकारांनी विचारणा केली. त्यावर अनेक योजनांमधून मराठवाड्याचा विकास करण्याचा प्रयत्न केला आहे. विदर्भ आणि मराठवाडा असा कोणताही भेदभाव सरकार करत नाही, असा दावा त्यांनी केला. मराठवाड्यात मंत्रिमंडळाची बैठक लवकरच घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. भाजप मंत्र्यांवरील भ्रष्टाचाराचे आरोप सिद्ध झालेले नाहीत. त्यामुळे आताच मंत्री व आमदारांना गुन्हेगार ठरविता येणार नाही, असे ते म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाट्यशास्त्र विभागात भावी स्टारचा कल्ला

$
0
0

Tushar.Bodkhe @timesgroup.com
औरंगाबाद ः मराठी चित्रपटांच्या यशाचा आलेख उंचावताच 'स्टार' होण्याचे स्वप्न बाळगत विद्यार्थ्यांनी शहरातील नाट्यशास्त्र महाविद्यालये 'हाउसफुल्ल' केली आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नाट्यशास्त्र विभागात दरवर्षीच्या तुलनेत यंदा दुप्पट प्रवेश झाले. देवगिरी महाविद्यालयातील नाट्यशास्त्र विभागाची प्रवेश क्षमता २२ असताना थेट ५४ प्रवेश झाले. या अनपेक्षित प्रतिसादामुळे विभागाला नवीन तुकडी वाढवावी लागली.
नाटक, टीव्ही, चित्रपट या क्षेत्रांत संधी वाढल्या आहेत. गेल्या तीन वर्षांत मराठी चित्रपटांची संख्या वाढली असून, चित्रपट तिकीट खिडकीवर यशस्वी ठरत आहेत. मराठी चित्रपटांच्या यशाचा चढता आलेख अनेक विद्यार्थ्यांना आकर्षित करीत आहे. नवख्या कलाकारांचे चित्रपट सुपरहिट ठरल्यानंतर ग्रामीण भागातील शेकडो कलाकार कला क्षेत्रातील पदार्पणासाठी इच्छुक आहेत. औरंगाबाद शहरातील नाट्यशास्त्र महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांची गर्दी आहे. मागील वर्षीच्या तुलनेत विद्यार्थ्यांची संख्या दुप्पट झाली आहे. बहुतांश विद्यार्थी ग्रामीण भागातील असून, हिरो होण्यासाठी प्रवेश घेतल्याचे त्यांनी सांगितले. नवीन कलाकारांना संधी मिळत असल्यामुळे आपणसुद्धा 'स्टार' होऊ असा विश्वास वाटत आहे. 'विभागाचे नाव नाट्यशास्त्र असले तरी 'फिल्म मेकिंग' शिकण्यावर विद्यार्थ्यांचा भर आहे. महाविद्यालयांनी फिल्म निर्मितीचे सामग्री खरेदी केली आहे. विभागात चांगले कॅमेरे व तांत्रिक साहित्य उपलब्ध आहे,' असे देवगिरी कॉलेजचे विभागप्रमुख प्रा. अनिलकुमार साळवे यांनी सांगितले. शॉर्टफिल्म बनवून विद्यार्थ्यांनी चित्रपट निर्मितीत पदार्पण केले आहे. सरस्वती भुवन महाविद्यालय, शिवछत्रपती महाविद्यालयातील विभागातही विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद आहे.

नाट्यशास्त्र विभाग प्रवेश
पदवीः २०१५-१६- २६, २०१६-१७- ४८
पदव्युत्तरः २०१५-१६- १३, २०१६-१७- ३७
बॅचलर ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स २०१५-१६- २०,२०१६-१७- ४५

विद्यार्थ्यांना रितसर नाट्यशास्त्र शिकावे वाटणे स्वागतार्ह आहे. फक्त एखाद्या सिनेमाचा प्रभाव पाहून मुंबईत येणे चूक ठरेल. नाटक जास्त दिवस करून अभिनय परिपक्व होईल. त्यामुळे नाटकात काम करताना संधीचे सोने करणे विद्यार्थ्यांच्या हाती आहे.
- संदीप पाठक, अभिनेते

एखाद्या चित्रपटाच्या प्रभावामुळे विद्यार्थ्यांची गर्दी झाली नाही, तर कला क्षेत्रातील संधीबाबत जागरुकता वाढली आहे. चित्रपटसृष्टीच चांगले काम करण्याची धडपड युवकांना नाट्यशास्त्र विभागापर्यंत घेऊन आली. हा प्रतिसाद उत्साह वाढवणारा आहे.
- प्रा. डॉ. अशोक बंडगर, नाट्यशास्त्र विभाग

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वीस लाख देईल तो प्राध्यापकः डॉ. कोतापल्ले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
एकेकाळी प्राध्यापक नेमताना गुणवत्तेची कदर केली जायची, आज कॉलेज व्यवस्थापन जो २० लाख रुपये मोजतो त्याला प्राध्यापक करतो,असा आरोप माजी कुलगुरू डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांनी केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातली हिंदी विषयाचे वरिष्ठ प्राध्यापक डॉ. माधव सोनटक्के यांच्या सेवागौरव समारंभात ते बोलत होते.
तापडिया नाट्यमंदिरात बुधवारी झालेल्या सोहळ्याला व्यासपीठावर हिंदी भाषेतील प्रख्यात साहित्यिक नरेंद्र मोहन, माजी कुलगुरू डॉ. इरेश स्वामी, डॉ. माधव सोनटक्के, सुषमा सोनटक्के, संयोजन समितीचे डॉ. सुधाकर शेंडगे, डॉ. संजय नवले यांची उपस्थिती होती. डॉ. कोत्तापल्ले पुढे बोलताना म्हणाले की, शिक्षण क्षेत्रात ज्ञानसाधना ही महत्त्वाची बाब आहे. परंतु, आज शैक्षणिक क्षेत्रात प्रामाणिकतेची पातळी कमी होत आहे. विद्यापीठांतील प्राध्यापकांना शिकवण्याशिवाय दुसरेच कामकाज करण्यात रस वाटतो. कॉलेज व्यवस्थापनाला गुणवत्तेची कदर उरलेली नाही. २० लाख रुपये देतो तो प्राध्यापक होतो. 'एपीआय' नावाचा प्रकारही आला आहे. 'एपीआय' वाढविण्यासाठी जर्नलमध्ये लेख प्रसिद्ध होणे आवश्यक असते. अशावेळी आपणच जर्नल काढायचे, असा प्रकार सुरू आहे, अशी खंत डॉ. कोलापल्ले यांनी व्यक्त केली. प्राध्यापकाकडे शिक्षणाबाबत प्रामाणिकपणा नसेल, तर त्याच्या प्राध्यापक असण्याला अर्थ नाही. या काळात डॉ. सोनटक्के यांच्यासारखे प्राध्यापक प्रामाणिकपणे ज्ञानसाधना करत आहेत, असे गौरवोद्गार त्यांनी काढले. यावेळी डॉ. स्वामी म्हणाले, मराठवाडा ही संतांची भूमी आहे. येथे अनेक साहित्यिक घडले त्यांना प्रेरणा मिळाली. डॉ. सोनटक्के त्यातील एक प्राध्यापक, साहित्यिक. सत्काराला उत्तर देताना डॉ. सोनटक्के म्हणाले, हा सत्कार माझा नसून माझ्या संस्कारांचा आहे. गुरुजन, विद्यार्थी यांच्यामुळे मी घडलो. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गोविंद बुरसे, शिल्पा जिवरग यांनी केले, तर आभार बळीराम धापसे यांनी मानले. सोहळा यशस्वी करण्यासाठी डॉ. देवीदास इंगळे, डॉ. गोविंद बुरसे, डॉ. सुकुमार भंडारे, डॉ. बळीराम धापसे, डॉ. नानासाहेब गोरे, डॉ. आबासाहेब राठोड, डॉ. रमेश शिंदे, डॉ. प्रकाश जेधे यांनी परिश्रम घेतले.

मराठीचा सोज्वळपणा जपावा
प्राकृत मराठीने जगाला अनेक दर्जेदार लेखक दिले आहेत. मराठी भाषेने मला कायम आपल्याकडे खेचून आणले आहे, असे मत प्रख्यात साहित्यिक नरेंद्र मोहन यांनी व्यक्त केले. येथील वारकारी संप्रदाय, साहित्य हे प्रेरणास्थानाप्रमाणे आहेत. सृजनात्मकता, रचनात्मकता टिकवायची असेल, तर या भाषेतील सोज्वळपणा आपल्याला जपावा लागेल. शब्द व पुस्तक कमी होत असताना डॉ. सोनटक्के यांच्यासारख्या प्राध्यापकांची ग्रंथसंपदा साहित्य चळवळीला बळ देणारी ठरते असे ते म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राखी आणण्यास निघालेल्या बहिणीचा अपघातात मृत्यू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
लहान भावासाठी राखी आणण्यास गेलेल्या आठ वर्षांच्या बहिणीचा कारच्या धडकेले मृत्यू झाला. चिकलठाणा परिसरातील आंबेडकर चौकात बुधवारी दुपारी ही घटना घडली. अपघातानंतर कारचालक पसार झाला.
अनुष्का भगवान दाभाडे असे मृत्युमुखी पडलेल्या बालिकेचे नाव आहे. गुरुवारी राखीपौर्णिमा असल्याने लहान भावाला आवडीची राखी घेण्यासाठी मोठ्या हट्टाने आजी, आजोबा, काका, काकू यांच्यासोबत अनुष्का दाभाडे (८, रा. शहानगर, चिकलठाणा) ही दुपारी दोनच्या सुमारास घरातून निघाली होती. राखीचे दुकान थाटलेल्या बाजारपेठेत जाण्यासाठी अनुष्का आंबेडकर चौक येथील मंडईमध्ये उभी होती. त्यावेळी मंडईतून वेगात आलेल्या अज्ञात कारने अनुष्काला धडक दिली. अनुष्काच्या जागीच कोसळली. उपस्थित नागरिकांनी धाव घेऊन तिला जवळच असलेल्या खासगी रूग्णालयात दाखल केले. तिची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगून डॉक्टरांनी तिला घाटीत नेण्यास सांगितले. सायंकाळी चारच्या सुमारास तिला घाटीत नेल्यानंतर डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले.

धावपळीत कारचालक पसार
घटना घडल्यानंतर अनुष्काच्या मदतीसाठी नागरिकांनी धाव घेतली. तिला रुग्णालयात नेण्याच्या धावपळीत कारचालक पसार झाला. याप्रकरणी एमआयडीसी चिकलठाणा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहाय्यक फौजदार मुरलीधर सांगळे करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विस्थापितांची सुंदरवाडी दुर्लक्षित

$
0
0

Sudhir.Bhalerao@timesgroup.com
औरंगाबाद ः पाणी, रस्ते, ड्रेनेज, वीज अशा मूलभूत प्राथमिक सुविधांपासून अनेक वर्षांपासून वंचित असलेले गाव म्हणजे सुंदरवाडी. ग्रुप ग्रामपंचायतीला सर्वाधिक कर भरूनही विकास होत नसल्याची खंत ग्रामस्थांच्या मनात आहे. महापालिकेपेक्षा स्वतंत्र ग्रामपंचायत केल्यास गावाचा विकास अधिक वेगाने होऊ शकेल, असा विश्वास ग्रामस्थांना वाटतो.
औरंगाबाद-बीड महामार्ग आणि उड्डाणपुलाच्या उभारणीनंतर सुंदरवाडी परिसर तीन भागात विभागला गेला. जायकवाडी धरणात विस्थापित झालेल्या कुटुंबांना राहण्याकरिता सुंदरवाडी परिसरात जागा देण्यात आली होती. विस्थापितांचे गाव म्हणूनही सुंदरवाडी ओळखली जाते. शहराजवळ असूनही मोजकीच लोकसंख्या असलेला हा परिसर आहे हे विशेष.
झाल्टा ग्रुप ग्रामपंचायतीत सुंदरवाडीचा समावेश आहे. ग्रामपंचायतीच्या नऊ सदस्यांमध्ये तीन सदस्य हे सुंदरवाडीचे प्रतिनिधित्व करतात, परंतु एकही सदस्य सुंदरवाडीत निवास करीत नाही, अशी स्थिती आहे. मतदारयादी तयार करताना सुंदरवाडीतील मतदारांची विभागणी केल्यामुळे सुंदरवाडीतील राहणाऱ्यांना ग्रामपंचायत सदस्य म्हणून प्रतिनिधित्व मिळू शकत नाही. याचा फटका गावाच्या विकासाला बसला असल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.

ड्रेनेज लाइन नाही
वस्ती विरळ असल्याने विकासाचा प्रश्न गंभीर बनलेला आहे. ड्रेनेज लाइनची कोणतीची व्यवस्था नाही. सांडपाणी वाहून जाण्याची व्यवस्थाही नाही. गटारीचे पाणी रस्त्यावरून वाहते. त्यामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण होतात. गावात आरोग्य केंद्र नसल्याने चिकलठाण अथवा थेट शहरातच उपचारासाठी जावे लागते.

रस्त्यांची बिकट स्थिती
सुंदरवाडीतील मुख्य रस्ते व अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. ग्रामस्थांनी वर्गणीतून कच्चे रस्ते तयार केले आहेत. वाढत्या लोकसंख्येचा विचार करून पक्के रस्ते होणे नितांत गरजेचे आहे. कर भरूनही पक्क्या रस्त्यांपासून या परिसरातील नागरिक वंचित आहेत. पक्के रस्ते नसल्याने विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, नोकरदार मंडळींना दररोजच अडथळ्यांची शर्यत करुनच प्रवास करावा लागतो.

शेती, दुध व्यवसाय
सुंदरवाडी गावाची लोकसंख्या दीड हजाराच्या आसपास आहे. वस्ती विरळ असल्याने सुरक्षेच्यादृष्टीने हा परिसर धोकादायक मानला जातो. ग्रामस्थांचा शेती हाच मुख्य आर्थिक उत्पन्नाचा स्त्रोत आहे. शहरालगत असल्याने काही शेतकऱ्यांनी दुध व्यवसाय सुरू केला. गावात १५ म्हशींचे गोठे आहेत.

सहा तास लोडशेडिंग
सुंदरवाडीत दररोज सहा तास लोडशेडिंग असते. अंतर्गत रस्त्यांवर पथदिवेही नाहीत. रात्री हा परिसर अंधारातच असतो. चोऱ्यांच्या अनेक घटना घडूनही पथदिवे सुरू झालेले नाहीत.

पाण्याचा गंभीर प्रश्न
सुंदरवाडीत पिण्याच्या पाण्याची कोणतीच सुविधा नाही. जलकुंभ नाही. नळ जोडणीही नाही. विहीर अथवा बोअरच्या पाण्यावरच ग्रामस्थ अवलंबून आहेत. उन्हाळ्यातील चार-पाच महिने विकतचेच पाणी घ्यावे लागते. भूगर्भातील पाण्याची पातळी खोलवर गेलेली आहे.

गृहनिर्माण प्रकल्पांची रेलचेल
औरंगाबाद शहरापासून दहा किलोमीटर आणि मुख्य रस्त्यालगत सुंदरवाडी परिसर येत असल्याने बांधकाम व्यावसायिकांनी मोठ्या प्रमाणावर शेतजमिनी गृहनिर्माण प्रकल्पांसाठी विकत घेतलेल्या आहेत. काही प्रकल्पांची उभारणी झालेली आहे. काही प्रस्तावित आहेत. काहींची मार्किंग झालेली दिसून येते. जमिनीचे भाव दोन कोटी एकरपर्यंत कडाडले होते. शहरातील प्रमुख बांधकाम व्यावसायिकांनी या परिसरात जागा विकत घेऊन ठेवलेली आहे. अधिकारी, राजकीय क्षेत्रातील व्यक्तींचाही त्यात समावेश आहे. झालर क्षेत्रात आल्यानंतर जमिनीचे विक्री झाली नसली तरी गावात आता जमिनही विक्रीसाठी शिल्लक राहिलेली नसल्याचे ग्रामस्थ सांगतात. जेवढी शेतजमिन आहे, त्यावर मुळ मालक हे शेती व्यवसाय करीत आहेत.

शाळा, पेट्रोल पंप, ढाबे
सुंदरवाडी परिसरात तीन-चार इंग्रजी शाळा आहेत. पेट्रोल पंपही आहेत. हॉटेल व्यावसायिकांनीही रस्त्यालगतची जागा विकत घेऊन ढाबे उभारलेले आहेत. व्यावसायिक जागेचा उपयोग अधिक असल्याने साहजिकच कर भरणाही सुंदरवाडी परिसरातून अधिक होतो, परंतु गावाच्या विकासात त्या रकमेचा उपयोग केल्याचे दिसून येत नाही.

दळणासाठी चिकलठाण्यात
विजेचा प्रश्न असल्याने गावात एकही पिठाची गिरणी नाही. दळणाबरोबरच भाजीपाला खरेदी, किराणा खरेदीसाठी ग्रामस्थांना चिकलठाणा गावातच जावे लागते. रात्रीच्यावेळी घरी येणाऱ्या नागरिकांना अंधाराचाच सामना करावा लागतो. विजेचा प्रश्न गंभीर असून, या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज असल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली. गावात स्मशानभूमीची सोय नाही. वाढती लोकवसाहत असल्याने स्मशानभूमीसाठी जागा द्यावी, अशी ग्रामस्थांची मागणी आहे.

हिवरेबाजार गावाप्रमाणे सुंदरवाडीचा विकास होणे गरजेचे आहे. गावात अनेक बांधकाम व्यावसायिकांनी गृहप्रकल्पांसाठी जागा घेतलेल्या आहेत. काही गृहप्रकल्पांची उभारणी होत आहे. अनेक वर्षांपासून मूलभूत सुविधांपासून वंचित असलेला हा परिसर भविष्यात एक नवे शहर म्हणून ओळखले जाणार आहे. त्यादृष्टीने गावाचा विकास होणे आवश्यक आहे.
- अॅड. संदीप आंधळे

ग्रुप ग्रामपंचायतीत गाव येत असूनही गावात विकासाची कामे दिसून येत नाहीत. रस्ते, नाले, वीज हे प्रश्न जैसे थे आहेत. महापालिकेत समावेश झाल्यानंतर गावाचा विकास अधिक वेगाने होऊ शकेल असे वाटते.
- संतोष साबळे

गेल्या ३५ वर्षांपासून मी सुंदरवाडीत राहतोय. अनेक अडचणींचा सामना ग्रामस्थ करीत आहेत. महापालिकेत समावेश करण्यापेक्षा स्वतंत्र ग्रामपंचायत केल्यास गावाचा विकास गतीने होऊ शकेल. शहरीकरणाचे अनेक प्रश्न निर्माण होऊ शकतात. त्यात गावपण हरवून जाण्याचीच शक्यता अधिक आहे.
- शशिकांत बडे

पस्तीस वर्षांपासून मी या परिसरात राहातोय. विहीर अथवा बोअरच्या पाण्यावरच आम्ही अवलंबून आहे. उन्हाळ्यात चार-पाच महिने विकतचेच पाणी घ्यावे लागते. लोडशेडिंगचा त्रास आहेच. दळणासाठीही चिकलठाण गावातच जावे लागते.
- प्रदीप बेळगे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सव्वादोन लाखांची भरपाई देण्याचे आदेश

$
0
0

म. टा. विशेष प्रतिनिधी, औरंगाबाद
निमसे वस्तीजवळ मोटार सायकल-ट्रकमध्ये झालेल्या अपघातातील मृताच्या पत्नीस ट्रकचालक आणि विमा कंपनीने संयुक्तरित्या २ लाख २५ हजार ५०० रुपये नुकसान भरपाई ९ टक्के व्याजासह द्यावी, असे आदेश मोटार अपघात न्यायाधिकरणाचे सदस्य के. बी. आप्पर यांनी दिले.
नागपूर-मुंबई हायवेवर निमसे वस्तीजवळ २९ जानेवारी दुपारी पावणेदोन वाजता कारभारी सारंगधर गायकवाड मोटार सायकलवरून कोपरगावकडे जात होते. त्यावेळी ट्रक चालकाने गायकवाड यांच्या मोटार सायकलला जोराची धडक दिली. या अपघातात कारभारी गायकवाड गंभीररित्या जखमी झाले. त्यांना उपचारासाठी लगेचच वैजापूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले.
याप्रकरणी वैजापूर पोलिस स्टेशनमध्ये जनार्धन गायकवाड यांनी दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी घटना स्थळाचा पंचनामा करून गुन्हा नोंदवला. मृत कारभारी सारंगधर गायकवाड यांच्या पत्नी जिजाबाई गायकवाड यांनी ट्रकचालक शेख अनीस शेख ताजउद्दिन व विमा कंपनी युनायटेड इंडिया इंशुरन्स कंपनीच्या विरोधात वैजापूर येथे मोटार अपघात न्यायाधिकरणात खटला दाखल केला. या खटल्याची सुनावणी न्यायाधिकरणाचे सदस्य के. बी. आप्पर यांच्या कोर्टात झाली.
हा अपघात ट्रक चालकाच्या निष्काळजीपणामुळे घडला. अपघातासाठी ट्रकचालकाचे दुर्लक्ष कारणीभूत आहे. अपघातापूर्वी कारभारी गायकवाड शेती काम करायचे. त्यातून त्यांना दरमहा ५ हजार रुपये उत्पन्न मिळत असे. त्यातून ते आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवित असत. काही चूक नसताना ट्रकचालकाच्या चुकीमुळे त्यांना जीव गमवावा लागला. त्यामुळे त्यांना अधिकाधिक नुकसान भरपाई देण्यात यावी अशी विनंती अर्जदाराचे वकील संदीप राजेभोसले यांनी केला. ती कोर्टाने मान्य केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संस्कृती जतनापासून इव्हेंट मॅनेजमेंटपर्यंत

$
0
0

Unmesh.Deshpande@timesgroup.com
गारखेडातील सूतगिरणी चौकात असलेल्या प्राइड इनिग्मा वसाहतीत शैलजा कुलकर्णी राहतात. वैशाली पाटील आणि स्मिता बेडेकर या दोघी त्यांच्या मैत्रिणी. तिघींनी मिळून पाच वर्षापूर्वी ओल्या खोबऱ्याचे पदार्थ तयार करून त्यांची विक्री करण्याचा घरगुती व्यवसाय सुरू केला. हा व्यवसाय सुरू करण्यामागची कथा कुलकर्णी सांगतात. सांगली माहेर मंडळ आम्ही स्थापन केले. या मंडळात गप्पागोष्टी व्हायच्या. असेच एकदा गप्पागोष्टींच्या ओघात उकडीच्या मोदकांचा विषय निघाला. उकडीच्या मोदकांचे औरंगाबादेत आकर्षण आहे, पण पुरेशा प्रमाणात ते मिळत नाहीत, असे लक्षात आल्यावर आपणच उकडीचे मोदक करून विकावेत, अशी कल्पना समोर आली आणि उकडीचे मोदक करण्याचा छोटासा व्यवसाय सुरू केला. पहिल्याच वर्षी गणेशोत्सवाच्या काळात एक हजार मोदक विकले गेले. त्यानंतर आत्मविश्वास निर्माण झाला. उकडीच्या मोदकाबरोबर नारळीभात, ओल्या नारळाच्या करंजा तयार करून त्याची विक्री करण्याचे काम सुरू करण्यात आले, असे कुलकर्णी म्हणाल्या.
गणेशोत्सवानंतर दिवाळी आली. दिवाळीसाठी फराळाचे पदार्थ तयार करून त्याची विक्री करण्याचा निर्णय घेतला आणि ते कामही सुरू केले. पाच वर्षांपूर्वी दिवाळीची पहिली ऑर्डर मिळाली आणि पहिल्याच ऑर्डरमध्ये अमेरिका आणि जपानला फराळाचे पदार्थ पाठवले गेले, असे त्या अभिमानाने सांगतात. ओळखीच्या काही व्यक्ती अमेरिका, जपानमध्ये राहतात. त्यांनी त्यांच्यासाठी व त्यांच्या परिचितांसाठी दिवाळीच्या निमित्याने फराळेचे पदार्थ मागवले व आम्ही ते पाठवले. चकल्यांना त्यावेळी मोठी मागणी होती. त्यामुळे आम्ही मैत्रिणींनी तब्बल बारा किलोच्या चकल्या केल्या. भारतीय सण, संस्कृतीची माहिती नवीन पिढीला नाही. कामाच्या व्यापामुळे त्यांना ही माहिती करून घेण्यासाठी वेळ मिळत नाही. आपल्या घरगुती व्यवसायातून सण, संस्कृती जतनाचे काम आम्ही करतो, असे कुलकर्णी सांगतात.
सणवारांचा व्याप सांभाळात कुलकर्णी आणि त्यांच्या मैत्रिणींनी बर्थडे पार्टी, किटी पार्टी यांच्या ऑर्डर घेणे सुरू केले. २५ जणांपर्यंत पार्टीच्या ऑर्डर त्या घेऊ लागल्या. बर्थडे पार्टी, किटी पार्टीबरोबरच इव्हेंट मॅनेजमेंटचे कामही त्यांनी सुरू केले. मंगळागौर, डोहाळ जेवणाचे कार्यक्रम आयोजित करण्याला काही महिन्यांपासून सुरुवात केल्याचे त्यांनी सांगितले. लग्न समारंभ, साखरपुडा, मंगळागौर, डोहाळ जेवण अशा कार्यक्रमांसाठी फुलांची रांगोळी काढणे, पायघड्या तयार करणे, अशी कामेही त्यांनी सुरू केली. आपण केलेले प्रत्येक काम दर्जेदार असले पाहिजे, याची काळजी आम्ही घेतो. कारण आम्हाला आमच्या नावाची काळजी आहे. आम्ही सर्वजण चांगल्या घरातील असल्यामुळे आपले नाव खराब होणार नाही याची खबरदारी आम्ही घेतो. खाद्यपदार्थ तयार करण्याची आवड होती. ती व्यवसायात बदलली. त्याला चांगला प्रतिसादही मिळाला, त्यामुळे हुरूप वाढला, असा शैलजा कुलकर्णी सांगतात. आता अनेकांना पुरणाची पोळी, गुळाची पोळी, सांजाची पोळी, खांडवी (तांदळाच्या रव्यापासून गुळ टाकून तयार केलेल्या वड्या) तयार करण्यासाठी वेळ नसतो. आम्ही हे पदार्थ तयार करून देतो. जशी ऑर्डर येईल तसे पदार्थ तयार करून विकले जातात. या पदार्थांनादेखील मागणी खूप आहे, अशी माहिती त्यांनी दिली. मराठमोळ्या पद्धतीचे भाकरी-पिठलं, ठेचा, वांग्याची रस्सा भाजी खिचडी, कढी देखील उपलब्ध करून दिली जाते. घर सांभाळून हे सगळे करताना समाधान मिळते. घरच्या घरीच हा व्यवसाय असावा, असे वाटते. कारण व्यवसायाची व्याप्ती वाढविली, तर घराकडे, मुलांकडे लक्ष द्यायला वेळ मिळत नाही. घर आणि मुलांचे शिक्षण याला प्राधान्य देत आमचे काम सुरू आहे, असे त्या सांगतात.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भावांचा शेततळ्यात मृत्यू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कन्नड
राखीपौर्णिमेसाठी मावस बहीण व आत्याला भेटण्यासाठी निघालेल्या दोन मावस भावांचा रस्त्यातील एका शेततळ्यात बुडून मृत्यू झाला. दोघांपैकी एक पाय घसरून शेततळ्यात पडला. त्याला वाचवण्याच्या प्रयत्नात दुसरा सुद्धा पडला. दोघांनाही पोहता येत नव्हते. कन्नड तालुक्यातील देवळाणा गावालगत देभेगाव शिवारात बुधवारी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास ही घटना घडली.
मृत मुले तालुक्यातील देवळाणा येथील रहिवासी असून, त्यांची नावे समाधान उर्फ शुभम वाल्मिक बोडखे (वय १६) व नामदेव उर्फ ज्ञानेश्वर संजय मालोदे (वय १३) अशी आहेत. त्यांच्यासोबत असलेला मित्र नकुल सुराशे हा या घटनेतून बचावला.
राखीपौर्णिमा गुरुवारी असल्यामुळे समाधान व नामदेव हे दोघे नकुल आप्पासाहेब सुरासे (वय १३) या मित्रासह जोड बोरसर येथील बहीण कडुबाई शेषराव भिंगारे व आत्याला भेटण्यासाठी बुधवारी सकाळी पायी निघाले होते. देवळाणा-बोरसर रस्त्याच्या बाजुलाच देभेगाव शिवारातील भारत सुखदेव बोडखे यांच्या गट क्रमांक ३५८मधील शेततळे पाहण्यासाठी ते गेले. शेततळ्याच्या काठावर उभे असताना प्लास्टिकच्या कापडावरून पाय घसरून समाधान बोडखे हा पाण्यात पडला. त्याला वाचवण्याच्या प्रयत्नात नामदेव मालोदे हा सुद्धा पाण्यात पडला. यावेळी शेततळ्यात अंदाजे १० ते १२ फूट पाणी होते. दोघानांही पोहता येत नसल्याने पाण्यात बुडून दोघांचा अंत झाला. सोबत असलेल्या नकुल सुरासे हा हे पाहून प्रचंड हादरला व त्याने पळत देवळाणा येथे जाऊन घटनेची माहिती दिली. देवळाणाचे सरपंच गणेश उबाळे, उपसरपंच अशोक जाधव, तंटामुक्त समिती अध्यक्ष रामकृष्ण सुरासे, आकाश उबाळे, गोपाल सुरासे यांनी ग्रामस्थांसह धाव घेऊन दोघांना बाहेर काढले, मात्र तोपर्यंत दोघांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी देवगाव रंगारी पोलिस ठाण्यात नोंद घेण्यात आली आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक राजश्री आढे, उपनिरीक्षक लालासाहेब कांबळे, बी. बी. खुळे, दादासाहेब चेळेकर यांनी घटनास्थळाची पाहणी केली.

नामदेव एकुलता
समाधान व नामदेव हे दोघे श्री गणेश विद्यालय देवगाव रंगारी येथे शिक्षण घेत होते. समाधान बोडखे अकरावी व नामदेव मालोदे सहावीमध्ये शिकत होता. नामदेव आई-वडिलांना एकुलता एक आहे. या दोन्ही कुटुंबांवर मोठा आघात झाला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

परंडा तालुक्यातील डोंजा सचिनने घेतले दत्तक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, उस्मानाबाद

पोषक वातावरण असतानाही विकासाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या उस्मानाबाद जिल्ह्यातील डोंजा (ता. परंडा) हे गाव मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरने दत्तक घेतले आहे. राज्यसभेवर असणाऱ्या सचिनकडून खासदार आदर्श ग्राम योजनेसाठी या गावाची निवड केल्यामुळे, विकासासाठी संधी मिळाल्याची भावना ग्रामस्थांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

प्रत्येक खासदाराने खासदार आदर्श ग्राम योजनेमध्ये एक गाव दत्तक घ्यावे आणि त्याचा विकास करून आदर्श निर्माण करावा, या भावनेतून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही योजना सुरू केली आहे. सचिनने या आधी आंध्र प्रदेशमधील नेल्लोर हे गाव दत्तक घेतले होते. मात्र, त्याने महाराष्ट्रातील गाव दत्तक घ्यावे, अशी मागणी होत होती. त्यानुसार त्याने नुकतेच ग्रामविकास व पंचायत राज सचिवांना पत्र दिले असून, परंडा तालुक्यातील डोंजा हे गाव दत्तक घेत असल्याचे त्यात म्हटले आहे. उस्मानाबादचे जिल्हाधिकारी प्रशांत नारनवरे यांनी या वृत्तास दुजोरा दिला आहे.
दरम्यान, आदर्श गाव म्हणून डोंजाची निवड व्हावी, यासाठी सरपंच गजेंद्र सूर्यवंशी सहा महिन्यांपासून प्रयत्नशील होते. त्यासाठी त्यांनी गावांची मा‌हिती सचिन तेंडुलकरपर्यंत पोहोचवली होती. त्यांनी केलेल्या सततच्या पाठपुराव्याला व पत्रव्यवहाराला यश आले आहे.

गावांत आनंदाचे वातावरण
डोंजा गावच्या प‌श्चिम बाजूला खैरी नदी तर पूर्व बाजूला नळी नदी आहे. दक्षिण बाजूला सीना नदी आहे. या ठिकाणी तीन नद्यांचा संगम होत असल्याने या गावाला भौगोलिक महत्त्व आहे. डोंजा गावाला ज्वारी व तंबाखूचे कोठार म्हणून ओळखले जाते. गावाची लोकसंख्या आठ हजार असून, ३३०० मतदार आहेत. गावात रेणुका देवीचे प्रसिद्ध मंदिर आहेत. येत्या काळात डोंजा गावातील विकास कामाला सुरुवात होणार असल्याने नागरिकांत आनंदाचे वातावरण आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

५१ जनावरांना सोडविले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
सिल्लेखान्यात गुरुवारी पहाटे चारच्या सुमारास महापालिका व पोलिस यांनी संयुक्तपणे कारवाई करून कत्तलीसाठी आणलेली ५१ जनावरे जप्त केली. यावेळी सिल्लेखान्यातील नागरिकांनी पालिका व पोलिसांच्या पथकावर दगडफेक केली. त्यामुळे वातावरण तणावपूर्ण बनले होते. गोवंश हत्या प्रतिबंध कायद्यानुसार चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. जप्त केलेली जनावरे महापालिकेच्या कोंडवाड्यात ठेवण्यात आली आहे.
सिल्लेखाना भागात जनावरांची कत्तल केली जाते, अशी तक्रार महापालिकेकडे प्राप्त झाली होती. त्याची दखल घेऊन पोलिसांच्या मदतीने महापालिकेने 'ऑपरेशन सिल्लेखाना' ही मोहीम आखली. त्याबद्दल कमालीची गुप्तता पाळण्यात आली होती. महापालिकेचे आयुक्त ओमप्रकाश बकोरिया व पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली दोन्ही खात्याचे अधिकारी, कर्मचारी पहाटे तीन वाजता एकत्र आले. कारवाईची माहिती फक्त वरिष्ठ अधिकाऱ्यांना होती. कर्मचाऱ्यांना सिल्लेखान्यातील ऑपरेशनची माहिती ऐनवेळी देण्यात आली. महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त रमेश पवार, उपायुक्त अय्युब खान, रवींद्र निकम, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. सुहास जगताप, क्रांतिचौक पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक नागनाथ कोडे यांच्यासह कर्मचारी पहाटे चारच्या सुमारास सिल्लेखान्यात दाखल झाले. त्यांनी प्रत्येक गल्ली पिंजून काढली. मौलाना मजीद अब्दुल करीम यांच्या वाड्यात दोन बैल, दोन वासरू आढळले. जाफर छोटे कुरेशी यांच्या वाड्यात तीन कालवडी व तीन गोऱ्हे सापडले. नदीम अब्बास कुरेशी यांच्या वाड्यात १९ गायी, एक गोऱ्हे, पाच कालवडी, एक वासरू सापडले. अनिस हनीफ कुरैशी यांच्या वाड्यात १५ गोऱ्हे सापडले. ही सर्व जनावरे जप्त करण्यात आली. त्यांची किंमत सुमारे दीड लाख रुपये असल्याचे पोलिसांनी पंचनाम्यात नमूद केले आहे. जप्त केलेल्या जनावरांना सिद्धार्थ उद्यानातील कोंडवाड्यात ठेवले आहे.
मौलाना मजीद अब्दुल करीम, जाफर छोटे कुरेशी, नदीम अब्बास कुरेशी, अनीस हनीफ कुरेशी यांच्याविरुद्ध गोवंश हत्त्या प्रतिबंध कायद्यानुसार क्रांतिचौक पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई पोलिस उपायुक्त राहुल श्रीरामे, सहाय्यक पोलिस आयुक्त रवीकांत बुवा, पोलिस निरिक्षक जगन्नाथ कोळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्ट्रायकिंग फोर्स, क्यूआरटी पथकाच्या जवानांनी केली.

पहिलीच मोठी कारवाई
सिल्लेखान्यात जनावरांची अवैध कत्तल केली जाते, अशा तक्रारी वारंवार महापालिकेच्या प्रशासनाकडे करण्यात येत होत्या. शिवसेना नगरसेवकांनी काही दिवसांपूर्वी पोलिस आयुक्तांकडेही याची तक्रार केली होती. त्या पार्श्वभूमीवर गुरुवारी कारवाई करण्यात आली. सिल्लेखान्यात केलेली ही आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सावंगीला समस्यांचा विळखा

$
0
0

Ravindra.Taksal@timesgroup.com
औरंगाबाद ः हर्सुलजवळच्या सावंगी परिसरात गेल्या काही वर्षांत फ्लॅट संस्कृती वेगाने वाढली. ग्रामपंचायतीने गावठाणात सुविधा पुरविल्या, मात्र परिसरातील वसाहती अद्याप मूलभूत सोयींपासून दूर आहेत. परिसरात सोयी-सुविधा पुरविण्यासाठी निधी कमी पडतो, अशी अडचण गावाचे कारभारी सांगतात. त्याचबरोबर या भागात अनधिकृत बांधकामे होत असल्याचीही तक्रार केली जाते. त्यामुळे शहरालगत, सावंगीतील नव्या वसाहतींत राहणाऱ्या नागरिकांची मात्र गैरसोय होत आहे.
सिडको झालरक्षेत्र विकास आराखड्यात असलेल्या सावंगी, तुळजापूर व अश्रफपूर या तीन गावांची ग्रुप ग्रामपंचायत आहे. महसुली क्षेत्र वेगवेगळे असलेल्या या तिन्ही गावाचे गावठाण क्षेत्र मात्र एकच आहे. महसुली रेकॉर्डवर या गावाची नावे वेगवेगळी असलीतरी आजघडीला सावंगी म्हणूनच त्यांची ओळख झाली आहे. सावंगीच्या गावठाण भागात गावपण कायम असलेतरी गाव परिसरात गेल्या काही वर्षात झपाट्याने फ्लॅट संस्कृती वाढली आहे.
शहरापासून अवघ्या दहा किलोमीटर अंतरावर असलेल्या सावंगीचा झपाट्याने विस्तार होत आहे. सावंगी, तुळजापूर व अश्रफपूर अशी ग्रुप ग्रामपंचायत असलेले हे गाव औरंगाबाद-सिल्लोड महामार्गावर, औरंगाबादपासून अवघ्या काही किलोमीटरवर आहे. गावापर्यंत जाण्यासाठी चांगला रस्ता आहे. महामार्ग असला तरी अपवाद वगळता बहुतेक एसटी बस येथे थांबत नाहीत. त्यामुळे येथील ग्रामस्थांना प्रवासासाठी खासगी वाहने, रिक्षा याशिवाय अन्य पर्याय नाही.
गणपती, मारोती, गजानन महाराज, विठ्ठल रुख्माई, कालिंका माता व कुलदैवत तुळजा भवानी आदी मंदिरे या गावात आहेत. राघवानंद महाराजांचा प्रसिद्ध मठही गावात आहे. शिवरात्रीला भाविकांची मोठी गर्दी असते. गावात कुस्तीची स्पर्धाही होते.
वाढत्या नागरी वसाहतींमुळे सावंगी गाव आता औरंगाबाद शहराचा भाग बनला आहे. गावाची लोकसंख्या शासकीय दफ्तरी सुमारे साडेपाच हजारांच्या आसपास असली, तरी नवीन वसाहतींत राहणाऱ्या नागरिकांची संख्या मिळून येथील एकूण लोकसंख्या ही बारा ते चौदा हजारांवर गेल्याचे ग्रामस्थ सांगतात. एस.एस. पार्क, कल्याण साई विश्व, हरिओम नगर, पन्नालाल नगर यांसह अनेक गृह प्रकल्प येथे नव्याने उभारले असून, अनेक प्रकल्पांची बांधकामे जोमाने सुरू आहेत. सर्वसाधारण, मध्यम उत्पन्न गटांतील ग्रामस्थांसह गेल्या काही वर्षांत नोकरदारांची संख्या येथे वाढली आहे. खामनदी गावाच्या शिवारातून जाते.

पंचायतीवर काँग्रेसची सत्ता
पंचायत समिती व जिल्हा परिषद सदस्य राष्ट्रवादी काँग्रेसचे आहे. गावात काँग्रेसची सत्ता असून, त्याखालोखाल भारतीय जनता पक्ष, शिवसेनेने प्राबल्य आहे.

सीटी बसची मागणी
सिल्लोड, अजिंठा महामार्गावरील महत्त्वाचे गाव असून, सावंगी येथे सर्व एसटी बस थांबत नाहीत. त्यामुळे खासगी वाहन, रिक्षा याशिवाय अन्य दुसरा पर्याय नाही. शहर बस सेवा सुरू व्हावी, अशी गावकऱ्यांची मागणी आहे.

शेती व दुग्ध व्यवसाय
सावंगी गावठाण भागात राहणाऱ्या बहुतेक ग्रामस्थ शेती व्यवसायात आहेत. शेती हेच त्यांचे उत्पन्नाचे मुख्य साधन आहे. कापूस, मका, गहू, मका, या पिकांबरोबरच येथील बहुतेक शेतकरी भाजीपाला लागवडीवर भर देतात. गावापासून औरंगाबाद तसेच जाधववाडी येथील कृषी उत्पन्न बाजार समिती हाकेच्या अंतरावर आहे. ही जमेची बाजू असून, वाहतूक खर्चही कमी लागतो. शेतीला जोडधंदा म्हणून काहीजण दुग्ध व्यवसायही करतात. सिडकोसह शहराच्या अन्य भागांत येथील शेतकरी दररोज दूध विक्रीसाठी येतात, तर काही तरुणांनी औरंगाबादेतील मयूर पार्कसह अन्य भागात स्वतःच्या खासगी दुध डेअरीही सुरू केल्या आहेत. सावंगीत दोन खासगी दूध डेअरी अाहेत. दूध विक्रीबरोबरच तूप, लोणी आदी दुग्धजन्य पदार्थही येथे तयार केले जातात, असे ग्रामस्थांनी सांगितले. गावात रेशन दुकान, वीड मंडळाचे सबस्टेशन, पोस्ट ऑफिस, एटीएम केंद्र आदी सुविधा अाहेत. पशुपालकांना नायगाव येथील केंद्रावर जावे लागते.

महामार्गावर थाटली दुकाने
सावंगी औरंगाबाद-सिल्लोड महामार्गावर आहे. वाहनांची नेहमी वर्दळ असल्याने हॉटेल, खत-बियाणे विक्री, मेडिकल, खासगी हॉस्पिटल, किराणासह अनेक छोटी-मोठी दुकाने, सेवा केंद्र थाटल्या गेली आहेत. त्यानिमित्ताने तरुणांना रोजगारांची संधी मिळत आहे. सावंगी गावाचे भौगोलिक क्षेत्र १ हजार २५७ हेक्टर असून, लागवडीलायक क्षेत्र ७८६ हेक्टर आहे. बिनशेती क्षेत्र सुमारे १६ हेक्टर, तर परिसरात गायरान क्षेत्र ९७ हेक्टर आहे. वनक्षेत्र २६५ हेक्टर आहे. तुळजापूर व अश्रफपूरचे भौगोलिक क्षेत्र अनुक्रमे ३५६ आणि २०५ हेक्टर अाहे. लागवडीलायक क्षेत्र अनुक्रमे २९२ व १७४ हेक्टर आहे. तुळजापुरात २६ हेक्टर, तर अश्रफपुरात सुमारे ९ हेक्टर गायरान जमीन असल्याचे महसूल अधिकाऱ्यांनी नमूद केले.

पाणीपुरवठा योजना गावठाणापुरतीच
ग्रामपंचायतीने राष्ट्रीय पेयजल योजनेतून गावासाठी पाणीपुरवठा उभारली. त्यासाठी दीड कोटी रुपये खर्च करण्यात आले. सावंगी तलावातील विहिरीतून पाणी आणण्यात आले. योजना अंतिम टप्प्यात आहे, मात्र या योजनेचा लाभ केवळ गावठाणालाच होणार आहे. उर्वरित भागात बोअर किंवा विकतच्या पाण्यावर नागरिक अवलंबून आहेत. त्यात गावठाण भागात सध्या दूषित पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारी असून, काही ग्रामस्थ विकतचे पाणी घेणे पसंत करतात.

आरोग्य केंद्रात सेवा पुरेशी नाही
गावात आरोग्य उपक्रेंद आहे. तेथे २४ तास वैद्यकीय सेवा मिळाली पाहिजे, अशी ग्रामस्थांची मागणी आहे. गावातील अंगणवाडीसाठी हक्काची इमारत नाही, तर सामाजिक सभागृहाची इमारतही जुनी झाली आहे. जिल्हा परिषद शाळा व परिसर स्वच्छ असून, येथे सातवीपर्यंतची शाळा आहे. गाव परिसरात बारावीपर्यंत खासगी शाळा असून, इंग्रजी माध्यमाच्या काही शाळा नव्याने सुरू झाल्या आहेत. औरंगाबादेहून अनेक विद्यार्थी याठिकाणी येतात.

नागरी समस्या कायम
गावठाण भागात रस्ते, ड्रेनेज यांसह अन्य सुविधा देण्याचा प्रयत्न झाला असला, तरी गावाच्या सर्व भागात या सुविधा नाहीत. आरोग्याचा प्रश्नही त्यामुळे निर्माण होतो. सिमेंट, डांबरी रस्ते गावठाण भागात अाहेत. विस्तारलेल्या गावात मात्र चिखलमय रस्त्याचा वापर करावा लागतो. गावाता विस्तार होत आहे, म्हणून विकासकामांसाठी निधी कमी पडतो, असे येथील कारभाऱ्यांचे म्हणणे आहे. गाव व परिसरात पुरेसे पथदिवेही नाहीत.

जमिनीचे भाव गगनाला
सिडको झालर विकास क्षेत्रात असलेले हे गाव भौगोलिक दृष्ट्या औरंगाबाद शहराचा एक भाग झाले आहे. गेल्या पाच ते सहा वर्षांत गावठाण परिसरात अनेक नवीन वसाहती निर्माण झाल्या असून, अनेक गृहप्रकल्प तेथे तयार होत आहे. झपाट्याने होणारे नागरीकरणामुळे येथील जमिनीला सोन्याचा भाव आला आहे, असे ग्रामस्थांनी सांगितले. काही ठिकाणी एक ते दोन कोटी रुपये एकर भाव असल्याचे त्यांनी सांगितले.

हॉटमिक्स, स्टोन क्रेशर
सावंगी परिसरात सुमारे सहा ते सात हॉटमिक्स प्रकल्प असून, ३०हून अधिक स्टोन क्रेशर आहेत. तेथे शेकडो कामगार कार्यरत असून, ते आता सावंगी गावाचे रहिवासी झाले आहेत. अनेक जण या प्रकल्पांच्या परिसरात राहतात.

गावाचा विस्तार होत आहे. सर्व परिसरात विकासकामे व्हावेत, हीच अपेक्षा आहे. त्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. सावंगी तलावात विहीर घेण्यात आली असून, तेथून गावाला पाणीपुरवठा केला जातो. अनेक नवीन वसाहती होत असल्याने विकासकामासाठी निधी कमी पडतो. झालर विकास क्षेत्रात हे गाव येत असून, अनेक भागांत चुकीची आरक्षणे टाकली आहेत. त्याचा फेरविचार झाला पाहिजे. अर्थात, महापालिका क्षेत्रापेक्षा ग्रामपंचायती बरी.
- राजेंद्र जगदाळे पाटील, सावंगी

दीड कोटी रुपये खर्चाची नवीन जलवाहिनी टाकून गावासाठी पाणीपुरवठा केला जात आहे. योजनेचे काम अंतिम टप्प्यात आहे, मात्र असे असलेतरी गावाचा वाढता विस्तार पाहात गावठाण परिसर वगळता उर्वरित भागात पाणीपुरवठा करणे शक्य होत नाही. सावंगी, तुळजापूर व अश्रफपूर अशी ग्रुप ग्रामपंचायत असून, तिन्ही गावाचे गावठाण एकत्रच आहे.
- शेख कदीर अब्दुल रहेमान, उपसरपंच, सावंगी

रस्ते, ड्रेनेज, पथदिवे असे अनेक नागरी प्रश्न पूर्णपणे सोडावले गेले नाहीत. आजही अनेक भागात नागरिकांना विकतचे पाणी घ्यावे लागते. शासनाची घरकूल योजना योग्य पद्धतीने गावात राबविण्याची गरज आहे. गावातील अनेकांकडे रेशनकार्ड नाही, ही परिस्थिती केव्हा बदलणार.
- आशा कुबेर, सदस्य ग्रामपंचायत, सावंगी

पालिका क्षेत्रात समाविष्ट झालेले हर्सूल गाव आमच्या सावंगीलगतच आहे. हर्सूलचा विकास झाला नाही, तेथे सावंगीचा विकास महापालिका केव्हा करणार. त्यापेक्षा ग्रामपंचायत किंवा विकास प्राधीकरणामार्फतच या गावाचा विकास होईल. भरीव आर्थिक तरतूद झाली पाहिजे.
- दामोदर अंबादास भालेराव, ग्रामस्थ

आमच्या वसाहतीकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले जात आहे. ड्रेनेज, पाणी पुरवठा, रस्ता अशा कोणत्याही नागरी सुविधा पुरविण्यात येत नाही. या समस्या सुटल्या पाहिजे.
- निलोफर समद शाह, ग्रामस्थ

आमच्या गावठाण भागात विविध विकासकामे झाले आहेत. पाणीपुरवठा आता सुरळीत होत असून, नवीन रस्ते तयार झालेत. स्वच्छतेवर भर दिला जातो.
- सपना जगदाळे, ग्रामस्थ

आम्ही गावठाणाबाहेर नवीन वस्तीत राहतो. त्याठिकाणी नागरी सुविधा अद्यापही नाही. त्याकडे अधिक लक्ष दिले पाहिजे. नागरिकांना फार त्रास होतो.
- सरोजनी जगदाळे, ग्रामस्थ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

माझं शिवार ः पाण्याच्या नियोजनाने बहरली फळबाग

$
0
0

Makarand.Kulkarni@timesgroup.com
औरंगाबादपासून जवळ असलेल्या दुधड या गावातील रहिवासी असलेले प्रभाकर बाबुराव काकडे यांनी स्थापत्य (सिव्हिल) शाखेची पदविका १९९७मध्ये मिळविली. दहा वर्षे सरकारी कंत्राटदार म्हणून काम केले. कंत्राटदारीतून दुसऱ्या व्यवसायात किंवा अन्य क्षेत्राकडे वळणे कठीणच, पण काकडे यांनी एक दिवस निर्णय घेतला आणि कंत्राटदार म्हणून काम करणे सोडले. घरी चार एकर शेती. पारंपारिक पिकांवर आधारित शेती असल्याने त्यात काहीतरी नवीन करण्याचा विचार सुरवातीला नव्हता. २०१२मध्ये त्यांनी शेतीकडे लक्ष देणे सुरू केले. काकडे यांनी सुरवातीला चार एकरांत कपाशीची लागवड केली होती. शेतीचा तसा फारसा अनुभव नव्हता. कापसात गवत वाढले होते. गवत काढणीसाठी कंत्राट दिले. पहिल्याच दिवशी काही वेळ गवत काढल्यानंतर मजुरांनी काम थांबविले आणि पैसे दुप्पट देण्याची मागणी केली. प्रभाकर काकडे यांना हे लक्षात येईना. आता काय करायचे? कारण दुप्पट पैसे देणे म्हणजे अडचणीचे होते. त्यांनी क्षणभर विचार केला आणि दुसऱ्या दिवशी ट्रॅक्टर आणून शेतातील उभे पीक मोडून काढले. दहा वर्षांचा कंत्राटदारीचा व्यवसाय सोडून शेतीकडे वळण्याचा निर्णय बरोबर की चूक, याचा अंदाज काकडे यांना येईना, पण इच्छाशक्ती प्रबळ होती. त्यांनी मागचा पुढचा विचार न करता दोन एकरात डाळिंब लागवड केली. भगवा जातीचे डाळिंब लावले. शेतात विहीर होती. पाण्याचे योग्य नियोजन करण्यासाठी त्यांनी ठिबक सिंचन केले. नवीन पाइप लाइन टाकली. त्यामुळे पाण्याचा योग्य वापर करता आला. डाळिंबशेतीत अभ्यासपूर्ण पद्धतीचा अवलंब केल्यामुळे १८ महिन्यांत पीक धरले आणि काकडे यांना चांगले उत्पन्न मिळाले. पारंपारिक शेतीपेक्षा प्लॅन केलेली शेती कधीही फायदेशीर असल्याचे सिद्ध झाले. पुढच्या वर्षी सर्वच्या सर्व चार एकरांवर डाळिंबाची लागवड केली. वर्षातून दोन बहार घेताना काकडे यांना चांगलाच फायदा झाला. नाशिकच्या बाजारपेठेत डाळिंबांची विक्री केली जाते. भविष्यात शेततळे करून शेतीत नवीन उपक्रम राबविण्याची प्रभाकर काकडे यांची इच्छा आहे.
शेतीमुळे समाधान मिळत असल्याचे सांगताना काकडे म्हणतात की आपल्या मनाप्रमाणे प्रयोग करता येतात. त्यातून मिळालेल्या यशातून येणारा आनंद अवर्णनीय असतो. पाणी आणि पीकपद्धतीचे नियोजन केले की शेती सारखे फायदेशीर काहीच नाही, असे ते आवर्जून सांगतात. प्रभाकर काकडे यांच्या नाविन्यपूर्ण उपक्रमाची दखल घेऊन गावातील तसेच लगतच्या गावातील शेतकऱ्यांनीही डाळिंब शेतीचा प्रयोग यशस्वी केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


स्वप्नील मणियारचा अर्ज कोर्टाने फेटाळला

$
0
0

म. टा. विशेष प्रतिनिधी,औरंगाबाद
श्रुती कुलकर्णी आत्महत्या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या स्वप्नील मणियारने दोषमुक्त करण्यात यावा, अशी विनंती अर्ज विशेष न्यायधीश एस. एस. नायर यांनी फेटाळला.
श्रुती कुलकर्णी या तरुणीने स्वप्नील मणियारच्या छाळाला कंटाळून १७ ऑगस्ट २०१५ रोजी विषारी औषध प्रशान करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. त्या तरुणीला बेशुद्ध अवस्थेत उपचारासाठी खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तिच्यावर उपचार सुरू असताना पोलिसांनी नोंदविलेल्या मृत्युपूर्व जबाबात स्वप्नील मणियारने केलेल्या छळाचा पाढा वाचला होता. उपचार सुरू असताना २० ऑगस्ट रोजी तिचा मृत्यू झाला. श्रुती कुलकर्णीच्या बहिणीच्या तक्रारीवरून आणि श्रुतीने लिहून ठेवलेल्या सुसाइड नोटच्या आधारे सिडको पोलिस ठाण्यात स्वप्नील मणियारविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी तपास करून २२ ऑगस्ट २०१५ रोजी अटक केली. स्वप्नील मणियार हा सध्या न्यायलयीन कोठडीत आहे. त्याने नियमित जामिनसाठी मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठात अर्ज दाखल केला. त्या नियमित जामिन अर्जावर सुनावणी सुरू असताना त्याने १५ फेब्रुवारी २०१६ रोजी जामीन अर्ज मागे घेतला. या खटल्याची सुनावणी तातडीने करण्यात यावी, अशी विनंती केली होती. दरम्यान, ९ मार्च २०१६ रोजी स्वप्नील मणियारने खून खटल्यातून दोषमुक्त करण्यात यावे, असा अर्ज सादर केला. हा गुन्हा गंभीर असून, स्वप्नील मणियारने खंडपीठात दिलेल्या हमीचे उल्लघंन केले असल्याचा युक्तीवाद विशेष सरकारी वकील के. जी. भोसले यांनी केला. कोर्टाने हा युक्तीवाद ग्राह्य धरून स्वप्नील मणियारचा विनंती करणारा अर्ज फेटाळून लावला

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘पीएमओ’च्या पत्राची टोलवाटोलवी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
शहराचे कारभारी खड्ड्यांवर काही उपाय करीत नसल्याचे पाहून एका नागरिकाने थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना साकडे घातले. पंतप्रधानांच्या कार्यालयाने लगेचच या तक्रारीची दखल घेतली व ती महाराष्ट्र सरकारकडे पाठविली. 'पीएमओ'तून पाठविण्यात आलेल्या या पत्राची महाराष्ट्रात टोलवाटोलवी सुरू झाली आहे. नगर विकास खात्याच्या अख्त्यारीत असलेला हा प्रश्न चौकशीसाठी चक्क सार्वजनिक बांधकाम विभागाकडे सोपविण्यात आला आहे.
नासेर बिन खालेद या तरुणाने शहरातील खड्ड्यांबाबत व्यथा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मांडली. हीच तक्रार आधी नासेर बिन खालेद यांनी महापालिका आयुक्तांकडे केली होती. त्यांच्याकडून प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी खड्ड्यांचा प्रश्न पंतप्रधानाच्या दरबारी मांडला. त्यांनी दहा ऑगस्टला पंतप्रधान मोदी यांच्या वेबसाइटवर तक्रार नोंदविली होती. या तक्रारीत त्यांनी, ऐतिहासिक औरंगाबाद शहरातील रस्त्यांची अवस्था अत्यंत वाईट आहे. महापालिकेचे अभियंते, कंत्राटदार आणि या व्यवस्थेवर जगणाऱ्या राजकारण्यांमुळे शहराची ही स्थिती झाली आहे. शहरातील खराब रस्त्यांमुळे वायू प्रदूषण आणि धुळीचाही त्रास नागरिकांना सहन करावा लागतो. शहराला खड्ड्यात घालणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी केली होती.
तक्रार केल्यानंतर दोन दिवसांतच पंतप्रधान कार्यालयाने त्याची दखल घेतली. तेथून ही तक्रार सोडविण्यासाठी राज्य शासनाचे अतिरिक्त मुख्य सचिव पी. एस. मीना यांच्याकडे दिली होती. बारा ऑगस्टनंतर काही दिवस सुट्या होत्या. या तक्रारीबाबत अर्जदार नासेर खालेद यांनी मीना यांच्या कार्यालयाशी संपर्क साधला. हे प्रकरण सार्वजनिक बांधकाम विभागाकडे पाठविण्यात आले असल्याची माहिती त्यांना देण्यात आली.
महापालिकेच्या कारभारावर नगरविकास विभागाच्या नियंत्रणात आहे. त्यामुळे ही तक्रार नगरविकास विभागाकडे पाठविणे अपेक्षित होते, मात्र ती सार्वजनिक बांधकाम विभागाकडे देण्यात आली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडे शहरातील काही मोजकेच रस्ते आहेत. ते महापालिकेच्या रस्त्यांच्या तुलनेत चांगल्या स्थितीत आहेत. तरीही ही तक्रार सार्वजनिक बांधकाम विभागाकडे पाठवून रस्ते चांगले असल्याचे किंवा रस्ते भविष्यात चांगले करण्याचे उत्तर मिळण्याची शक्यता आहे. यामुळे पीएमओ कार्यालयाकडून पाठविण्यात आलेल्या पत्राचीही टोलवाटोलवी सुरू असल्याचे चित्र समोर आले आहे.

पीएमओ कार्यालयाकडून औरंगाबादकराच्या तक्रारीची दखल घेण्यात आली, हीच मोठी गोष्ट आहे. ही तक्रार सार्वजनिक बांधकाम विभागाकडे देण्यात आली आहे. किमान या तक्रारीनंतर तरी औरंगाबादकरांच्या वेदना कमी करण्यासाठी प्रशासन पुढाकार घेतील, असा माझा विश्वास आहे.
- नासेर बिन खालेद, तक्रारकर्ते

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ब्रह्मकुमारीजच्या सर्व सेवाकेंद्रावर ‘राखीपर्व’ साजरे

$
0
0

औरंगाबाद : प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या तर्फे ११ सेवाकेंद्रावर 'राखीपर्व' साजरे करण्यात आले. कन्नड, वैजापूर, फुलंब्री, औरंगाबाद शहरातील भानुदासनगर, वाळूज, समर्थनगर, एन-९ सिडको, छत्रपतीनगर, उत्तरानगरी येथील केंद्रावर ब्रह्मकुमारी बहिणींनी अनेक बांधवांना आणि साधकांना परमपिता परमात्मा शिव यांची पवित्र्याची राखी बांधली.
भानुदास नगर सेवाकेंद्रावरील महापर्वात प्रमुख राजयोगिनी ब्रह्माकुमारी शीलादीदी यांनी राखीचे महत्त्व सांगितले. पवित्र्याचे व्रत आणि परमात्मा शिवा यांच्या राजयोगाच्या अभ्यासाविषयीही माहिती दिली. राजयोगिनी मंगलादीदी यांनी रक्षाबंधन पर्व शुभबंधन आहे. बंधन कोणाला आवडत नाही, परंतु या बंधनाद्वारे मन, वचन आणि कर्माची महान पवित्रता धारण करणे शक्य होते. राजयोगिनी सुमनदीदी यांनी राखीच्या शुद्धतेविषयी माहिती दिली. शांतादीदी यांनी या पर्वामुळे सुख, शांती आणि राजभाग्य प्राप्त होते असे सांगितले. यावेळी ब्रह्मकुमारी कमल, अनिता, स्नेहल, छाया, कुसुम, शीतल, उषा यांनी आत्मस्मृतिचा टिळा व पुष्पगुच्छ देऊन सर्वांचे स्वागत केले. ब्रह्मकुमारी दीपा यांनी सूत्रसंचालन केले. ऋतुजा हिने स्वागत नृत्य सादर केले. यावेळी ईश्वरीय परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुख्य इमारतीत प्रवेशासाठी पास

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने प्राध्यापकांच्या थेट विद्यापीठ भेटीबाबत प्रतिबंध घालण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. मुख्य इमारतीत प्रवेश करावयाचा असेल, तर यापुढे पास घेऊनच प्रवेश मिळणार आहे. यासह प्राध्यापक संघटना कितपत अधिकृत आहेत, त्यांचे पदाधिकारी कोण, परवानगी शिवाय विद्यापीठात कोण आले, याच्या नोंदी ठेवल्या जाणार आहेत. पदाधिकारही परवानगी शिवाय आल्यास प्राचार्यांना दोषी धरले जाणार आहे.
कॉलेजांमधील प्राध्यापक, उपप्राचार्य, कर्मचाऱ्यांनी प्राचार्यांच्या परवानगीनंतरच विद्यापीठात पाऊल ठेवावे, असे विद्यापीठ प्रशासनाने स्पष्ट केले. याबाबत ६ ऑगस्ट रोजी परिपत्रक काढण्यात आले. परवानगी शिवाय प्राध्यापक, कर्मचारी आला तर प्राचार्यालाच जबाबदार धरले जाणार आहे. प्राध्यापक, कर्मचारी संघटनांच्या आडून प्रशासनाला वेठीस धरणाऱ्यांना चाप बसेल, असे मानले जात आहे. त्यानंतर प्राध्यापक, संघटनांमध्ये नाराजीचा सूर आहे. त्यात आता यावर अधिक लक्ष ठेवण्यासाठी मुख्य इमारतीत प्रवेशासाठी पासची कल्पना पुढे आली आहे. मुख्य इमारतीत प्रवेशपास असेल तरच इमारतीत प्रवेश दिला जाणार आहे. तुमच्याकडे ओळखपत्र, शिफारसपत्र आणि कामाचे विवरणपत्र दाखविल्यानंतरच प्रशासकीय इमारतीत प्रवेश दिला जाईल, असे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. याबाबत प्राचार्यांनाही सूचना देण्यात आल्या आहेत. व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीतही प्रवेशपासबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे. अनेक संघटनांनी या परिपत्रकाला विरोध केला आहे.

संघटना रडारवर
विद्यापीठ प्रशासनावर दबाव आणणाऱ्या संघटनांच्या नेत्यांची वर्दळ लक्षात घेत संघटनांच्या नोंदणीची माहिती तपासण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. पदाधिकारी, त्यांचे उद्देश याची माहिती ठेवण्यात येणार आहे. संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनाही विद्यापीठात येण्यासाठी प्राचार्यांची परवानगी घ्यावी लागणार आहे.

प्राध्यापक, कर्मचारी संघटनेचा पदाधिकारी असो वा कोणी त्याने प्राचार्याची परवानगी घेणे आवश्यक आहे. यासह संघटना मान्यताप्राप्त आहेत का, त्यांचे पदाधिकारी त्यांची नावे त्यांच्या स्वतंत्र नोंदी ठेवल्या जातील. प्रशासकीय इमारतीत प्रवेशासाठी प्रवेशपास सिस्टिम लवकरच करण्यात येणार आहे.
- डॉ. सतीश पाटील, बीसीयूडी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लॉ प्रवेशाला सप्टेंबर उजाडणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
राज्यातील विधी अभ्यासक्रमांच्या प्रवेशाला सप्टेंबर महिना उजाडणार आहे. बार कौन्सिल ऑफ इंडियाने पात्र कॉलेजांची यादी शासनाला दिली असून, त्यात केवळ ६३ कॉलेजांचा समावेश आहे. मराठवाड्यातील केवळ ४ कॉलेज पात्र आहेत.
कॉलेजांच्या संलग्निकरणावरून सुरू असलेल्या वादामुळे विधी अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया रखडली आहे. बार कौन्सिलचे संलग्निकरण कॉलेजांनी घ्यावे, अशी अट उच्चशिक्षण विभागाने कॉलेजांना घातली. त्यानंतर कॉलेजांची धावपळ सुरू झाली. त्यात कौन्सिलने पात्र कॉलेजांची यादी नुकतीच उच्चशिक्षण विभागाला सादर केली. राज्यातील १२७पैकी ६३ कॉलेज पात्र असल्याचे कौन्सिलने पहिल्या यादीत स्पष्ट केले असून, उर्वरित कॉलेजांचे काय, याबाबत संभ्रमता कायम आहे. कॉलेजांच्या संलग्निकरणाचा प्रश्न कायम असल्याने प्रवेशाची प्रक्रियाच अद्याप सुरू होऊ शकलेली नाही. आता २० व २६ ऑगस्ट रोजी पुन्हा कौन्सिलच्या लॉ स्टँडिंग कमिटीची बैठक होणार आहे. त्यातही उर्वरित कॉलेजांचा फैसला होण्याची शक्यता आहे. त्यानंतरच लॉ अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया होणार आहे. २८ जुलैपर्यंतच संलग्निकरणाची प्रक्रिया पूर्ण करावे, असे उच्चशिक्षण विभागाने स्पष्ट केले होते.

पहिल्या यादीत मराठवाड्यातील ४ कॉलेज
'बार कौन्सिल ऑफ इंडिया'ने राज्यशासनाला सादर केलेल्या यादीत मराठवाड्यातील चार कॉलेजांच समावेश असल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातंर्गत एम. पी. लॉ. कॉलेज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर लॉ कॉलेज, व्ही. एन. पाटील लॉ कॉलेज, तर स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील शिवाजी लॉ कॉलेज यांचा समावेश आहे.

अनेक कॉलेज निकषांत नाहीत
बार कौन्सिलने कॉलेजांना संलग्निकरणाचे निकष घालून दिलेले आहेत. त्यामध्ये पायाभूत सुविधा, प्राचार्य, साठ जणांच्या तुकडीमागे तीन पात्र शिक्षक आदी आवश्यक आहे. १२७पैकी काही कॉलेज हे निकष पूर्ण करीत नाहीत, असे कौन्सिलच्या सदस्यांनी 'मटा'ला सांगितले.

शासनाने कौन्सिलकडे उशिराने याबाबत विचारणा केली. त्यामुळे प्रक्रियेला विलंब झाला आहे. जी कॉलेज निकषांत बसतील त्यांनाच मान्यता मिळेल. पहिल्या यादीत चार कॉलेजांचा समावेश आहे.
- सतीश देशमुख, उपाध्यक्ष, बार कौन्सिल ऑफ इंडिया

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images