Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

कार्यक्षेत्राबाहेरील कर्ज सावकरांनी माफ करावे

$
0
0

Ravindra.Taksal@timesgroup.com
औरंगाबाद ः परवानाधारक सावकराकडून शेतकऱ्यांनी घेतलेले कर्ज शासनाने माफ केले आहे, परंतु काही सावकारांनी कार्यक्षेत्राबाहेरील शेतकऱ्यांना कर्ज दिलेले आहे. हा अनियमितपणा असून, असे कर्ज संबंधित सावकारांनी वसूल करू नये. शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली पाहिजे, असा प्रस्ताव शासनाच्या विचारधानी असल्याची माहिती राज्याचे सहकार, पणन, वस्त्रोद्योगमंत्री सुभाष देशमुख यांनी गुरुवारी 'महाराष्ट्र टाइम्स'शी बोलताना दिली.
सहकार क्षेत्राला अधिक विकास व्हावा. विश्वासहार्त निर्माण व्हावी, यासाठी प्रयत्नशील असल्याचे सहकारमंत्री देशमुख यांनी नमूद केले. त्याचाच एक भाग म्हणून सहकार खात्यात कार्यरत वरिष्ठ अधिकाऱ्यांपासून ते तालुका उपनिबंधकांपर्यंत सर्वांना पत्र पाठवून सहकार विभागाच्या हितासाठी सूचना, प्रस्ताव सादर करण्यास सांगितल्याचे देशमुख यांनी सांगितले. अधिकाऱ्यांकडून अनेक चांगल्या सूचना प्राप्त होत असून, येत्या १५ दिवसांत सर्व सूचना एकत्रित केल्या जातील. अभ्यास करून आराखडा तयार करण्यात येणार आहे. त्यानंतर त्याची अंमलबजावणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
अनेक विविध कार्यकारी सोसायट्या, सहकारी संस्था केवळ निवडणुकीपुरत्या आहेत. अशा कागदोपत्री संस्था नकोत. गावपातळीवरील विविध कार्यकारी सोसायटी महत्त्वाची संस्था असून, त्यावर आतापर्यंत केवळ एका गट किंवा काही ठराविक लोक संचालक राहत. त्यामुळे ज्यांच्याकडे सातबारा आहेत, त्यांना सभासद म्हणून घ्या, अशा सूचना सहकार अधिकाऱ्यांना दिल्याचे सहकारमंत्री देशमुख यांनी सांगितले.
परवानाधारक सावकारांनी कार्यक्षेत्रातच कर्जाचे वाटप करणे बंधनकारक आहे, मात्र अनेक सावकारांनी त्याचे उल्लंघन केल्याचे समोर येत आहे. अशा सावकारांनी कार्यक्षेत्राबाहेरील कर्जदार शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले पाहिजे. असा प्रस्ताव लवकरच मुख्यमंत्र्यांकडे सादर करणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

बाजार समित्यावर सनदी अधिकारी
सहकार खात्यातील अधिकारी, कर्मचाऱ्याकडे विविध स्वरुपाची कामे आहेत. त्यामुळेच कृषी उत्पन्न बाजार समित्यावर देखरेख, नियंत्रणासाठी वेगळी यंत्रणा असली पाहिजे. शंभर कोटी किंवा मोठ्या बाजार समित्यांवर सनदी अधिकारी वा अन्य सक्षम अधिकारी नेमण्याचा विचार अाहे. त्यासंदर्भातील प्रस्ताव लवकरच मांडणार असल्याचे सहकार मंत्र्यांनी यावेळी नमूद केले.

...तर भागभाडवल वापस देऊ
शेतकऱ्यांना कारखाना आपला वाटला पाहिजे, हे समोर ठेवूनच लोकमंगल कारखान्यात अधिक सभासद घेतले. सहकार तत्वावर; तसेच अनेक खासगी कारखान्यात हीच प्रचलित पद्धत आहे. तर ४९पेक्षा अधिक शेतकरी सभासदांकडून भागभांडवल घेऊ नये, तसे झाल्यास ते अनियमित असल्याचे सेबीने नमूद केले आहे. शेतकऱ्यांची आजघडीला कोणतीही मागणी नाही, मात्र सेबीने भागभागवल वापस करा करण्यास सांगितल्यास त्याप्रमाणे कार्यवाही करू, अशी माहिती यावेळी देशमुख यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


दलित तरुणाचा खून; आरोपपत्र तीस दिवसांत

$
0
0

सिल्लोड : जमिनीच्या वादातून झालेल्या मारहाणीत मृत्यू झालेल्या दलित तरुणाच्या कुटुंबीयांची जिल्हाधिकारी डॉ. निधी पांडेय यांनी गुरुवारी भेट घेऊन सांत्वन केले. याप्रकरणातील आरोपींवर ३० दिवसांत आरोपपत्र दाखल केले जाईल, असे आश्वासन दिले. सामाजिक न्याय विभागातर्फे जिल्हाधिकाऱ्यांनी पीडित कुटुंबीयांना अडीच लाख रुपयांची मदत दिली.

तालुक्यातील डोंगरगाव येथील इंदुबाई अशोक दांडगे, उषा मच्छिंद्र पगारे, वैशाली भगवान भोळे व अंध तरूण अमोल अशोक दांडगे यांना १४ ऑगस्ट रोजी मारहाण झाली होती. या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या अमोलचे मंगळवारी रात्री उपचार सुरू असताना निधन झाले. याप्रकरणी शेख महंमद जाकेर शेख याच्यासह सात जणांवर गुन्हा दाखल करून एकाला अटक करण्यात आली आहे. या तरुणाचा मृत्यू झाल्याने अॅट्रॉसिटी कायद्यासह खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांना निलंबित करा

डोंगरगाव येथे जागेच्या वादातून खून झाल्यामुळे आरोपींना त्वरित अटक करावी व कर्तव्यात कसूर करणाऱ्या पोलिसांना निलंबित करावे, अशी मागणी पंचायत समिती सभापती लताबाई वानखेडे यांनी केली आहे. सभापती वानखेडे, मजूर फेडरेशनचे अध्यक्ष दादाराव वानखेडे, गटविकास अधिकारी प्रकाश दाभाडे यांनी गुरुवारी डोंगरगाव येथे दांडगे कुटुंबाची भेट घेऊन सांत्वन करून २१ हजार रुपयांची मदत दिली. खटला जलदगती कोर्टात चालवावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाळूतस्करी जोरात; महसूलला कुंभकर्णी झोप

$
0
0

औरंगाबाद : जिल्ह्यात तीन, चार वाळूठेके वगळता वाळूउपसा बंद आहे. तरीही केवळ प्रशासनाच्या कुंभकर्णी झोपेमुळे शहरात चोरट्या मार्गाने सर्रास वाळू तस्करी सर्रास सुरू आहे. शहराच्या प्रत्येक दिशेला पोलिस, आरटीओ पथकाकडून वाहन तपासणी होत असली, तरी प्रत्यक्षात ही 'सर्कस' केवळ 'महसूल' गोळा करण्यासाठीच होत असल्याची चर्चा आहे.

वाळूजजवळ वाळूच्या ट्रकने धडक दिल्यामुळे गुरुवारी सकाळी दोघांना जीव गमवावा लागला. यापूर्वी ३ ऑगस्ट रोजी पुंडलिकनगर चौकामध्ये वाळूच्या ट्रकने धडक दिल्याने एक महिला गंभीर जखमी झाली होती. या घटनांवरून शहरात पुन्हा एकदा वाळूतस्कारांना अभय दिले जात असल्याचे स्पष्ट होते. शहरात फिरत असलेले काही वाळूचे ट्रक पोलिस व नेत्यांचे असल्याचे उघडपणे बोलले जाते.

एप्रिलमध्ये अपर जिल्हाधिकारी पी. एल. सोरमारे यांनी लिंबेजळगाव टोलनाक्यावर केलेल्या पाहणीत दोन तासात २५ वाहने शहरात येत असल्याचे निदर्शनास आले होते. याप्रकरणी गंगापूरच्या तहसीलदारांना दोन वेळेस नोटीस बजावली आहे, त्यानंतर एकाही वाहनावर कारवाई झाली नाही.

अधिकाऱ्यांचे कानावर हात

अपघात व जिल्ह्यातील किती वाळू वाहनांवर कारवाई झाले, असे सोरमारे यांना विचारले असता त्यांनी मी खासगी कामानिमित्त बाहेर आहे, तुम्ही निवासी उपजिल्हाधिकारी विश्वंभर गावंडे यांना विचारा, असे सांगून उत्तर देणे टाळले. गावंडे यांना दुपारी चार वाजता विचारणा केली असता त्यांनी वाळूच्याच ट्रकमुळे अपघात झाला का? अशी विचारणा करून नंतर माहिती देतो, असे सांगितले. नव्यानेच रुजू झालेल्या गौणखणिज अधिकारी श्रीमती जोशी यांनी नवीन असल्याने आकडेवारी नसल्याचे सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ट्रामा केअर सेंटरसाठी वैजापुरात संताप

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, वैजापूर

ट्रामा केअर सेंटर कार्यरत नसल्याने अमोल डवाळकर यांच्या मृत्यूस उपजिल्हा रुग्णालयाचा निष्काळजीपणा कारणीभूत आहे, असा आरोप वैजापूरमधील नागरिकांनी केला आहे. नागरिकांनी गुरुवारी उपविभागीय अधिकारी कार्यालयावर निषेध मोर्चा संताप व्यक्त केला. शिवाय उपजिल्हा रुग्णालयातील ट्रॉमा केअर सेंटर १५ दिवसांत सुरू न झाल्यास आमरण उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

अमोल डवाळकर यांची लुना व दुसऱ्या दुचाकीची मंगळवारी रात्री आठच्या सुमारास धडक बसली. या अपघातात गंभीर जखमी झालेले डवाळकर यांना उपजिल्हा रुग्णालयात उपचार करण्यासाठी दाखल करण्यात आले. परंतु, प्रशासनाने वेळेत रुग्णवाहिका दिली नाही, ट्रॉमा केअर सेंटर बंद असल्याने अमोलचा मृत्यू झाला, असा नागरिकांचा आरोप आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी गुरुवारी गुजराथी गल्लीपासून मूक मोर्चा काढून व काळ्या फिती लावून निषेध व्यक्त केला. रुग्णालयात तज्ज्ञ डॉक्टर उपस्थित राहत नाहीत, रुणालयात स्वच्छता नाही, औषधे मिळत नाहीत, ट्रॉमा केअर सेंटर बंद आहे त्यामुळे रुग्णांचे हाल होत आहेत, अशा तक्रारी शिवसेनेचे तालुकाप्रमुख रमेश पाटील बोरनारे, माजी नगराध्यक्ष साबेरखान, खुशालसिंह राजपूत, संतोष बोथरा यांनी केल्या. उपविभागिय अधिकारी लक्ष्मीकांत साताळकर व तहसीलदार सुमन मोरे यांना निवेदन देण्यात आले. यावेळी धोंडिरामसिंह राजपूत, अरूण शर्मा, धीरजसिंह राजपूत, सलीम वैजापुरी, विशाल संचेती, सुनील गायकवाड, अल्ताफ बाबा, संदीप टेके, सुधीर लालसरे, काझी, सचिन जोशी, सचिन राजपूत, ज्ञानेश्वर घोडके, राजेंद्र पारख, धर्मेंद्र त्रिभुवन, हेमंत संचेती, मनोज छाजेड, मोहन साळुंके, कैलास साखरे, रोहित जोशी आदींची उपस्थिती होती.

वैजापूर हे मोठे शहर असून तालुक्यातून नाशिक व अहमदनगर जिल्ह्यात वाहतूक होते. या रस्त्यांवरील अपघातामधील जखमींना त्वरित उपचार मिळावेत यासाठी येथे ट्रामा केअर सेंटर मंजूर करण्यात आले आहे. मात्र, हे सेंटर बंद असल्याने जखमींना उपचार मिळत नाहीत, याकडे 'म.टा.'ने सतत पाठपुरावा केला आहे. ट्रामा केअर सेंटर लवकरच सुरू होणार असल्याचे सांगितले जाते, पण पुढे काहीच होत नाही. उपजिल्हा रुग्णालयात सोनोग्राफीची सुद्धा सोय नाही.

हेल्मेट नव्हते

अमोल डवाळकर हे आजारी आजीला भेटण्यासाठी पत्नीसह लुनावरून दवाखान्यात जात होते. त्यांनी हेल्मेट घातले नव्हते, अशी माहिती आहे. अपघातात त्यांच्या डोक्याला मार लागल्यामुळे ते गंभीर जखमी झाले होते. ट्रामा केअर सेंटर बंद असल्यामुळे त्यांना औरंगाबाद येथे उपचारासाठी घेऊन जाण्यात येत होते. या प्रवासात त्यांचे मंगळवारी रात्रीच निधन झाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चिकलठाण्यात केम‌िकलचा स्फोट

$
0
0

स्फोटात महिला ठार; तीन किलोमीटरपर्यंतच्या आवाजाने गोपाळपूर परिसर हादरला

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

चिकलठाणा विमानतळाच्या मागील बाजूस असलेल्या गोपाळपूर वस्तीजवळ फायबरच्या वस्तू बनवणाऱ्या घरगुती वर्कशॉपमध्ये केम‌िकलच्या कॅनचा स्फोट झाला. गुरुवारी सकाळी पावणेदहा वाजता हा प्रकार घडला. या भीषण दुर्घटनेत एका महिलेचा जागीच मृत्यू झाला. या स्फोटाच्या आवाजाने जवळपासचा तीन किलोमीटर पर्यंतचा परिसर हादरला. एटीएससह फॉरेंसिक लॅबच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

चिकलठाणा गावाच्या पुढे बाजारतळासमोरून झाल्टा गावाकडे जाणारा जुना मार्ग आहे. १९९१ साली घडलेल्या विमान दुर्घटनेनंतर हा मार्ग वाहनांसाठी बंद करण्यात आला आहे. या मार्गावरच गोपाळपूर वस्ती आहे. या वस्तीजवळ गट क्रमांक ५८७ मध्ये लकी पार्क हा परिसर आहे. या परिसरामध्ये दोन महिन्यांपूर्वी ज्ञानेश्वर रुद्रके हे पत्नी, दोन मुले, सून व नातवंडासह राहण्यास आलेले आहेत. रुद्रके यांचा फायबरच्या वस्तू बनवण्याचा छोटा कारखाना असून घराजवळच शेड उभारून यामध्ये हे काम करण्यात येते. गुरुवारी सकाळी त्यांची पत्नी मीराबाई (वय ४४) या कारखान्यामध्ये गेल्या होत्या. तेथील केम‌िकलने भरलेली एक प्लास्टिकची कॅन त्या उचलून ठेवत असताना अचानक या कॅनचा स्फोट झाला. हा स्फोट एवढा शक्त‌िशाली होता की मीराबाईच्या कंबरेच्या वरील भाग छिन्नविछीन्न झाला.

ही घटना घडली तेव्हा त्यांचे पती व एक मुलगा बाहेर गेले होते. घरी लहान मुलगा, सून व नात होती. स्फोटाच्या आवाजाने सर्वजण धावत रुद्रके यांच्या घराकडे आले. मात्र, तोपर्यंत मीराबाईंचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी सिडको एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पीएसआय केदारे, जमादार सतीश जाधव, राम हत्तरगे यांनी घटनास्थळी पंचनामा केला. रात्री उशिरापर्यंत या प्रकरणी गुन्हा दाखल होणार असल्याची माहिती एमआयडीसी सिडको पोलिसांनी दिली.

मी दुचाकीवर शेतीकडे जात होतो. एवढ्यात जोरात स्फोटाचा आवाज आला. सुरुवातीला वाटले दुचाकीचे चाक फुटले. नंतर जाणवले हा वेगळा आवाज आहे. रुद्रकेच्या घराजवळच मी होतो. तिकडे धावत गेलो. मीराबाईंचा मृतदेह छिन्नविछिन्न झाला होता.

- बाबासाहेब दहीहंडे, प्रत्यक्षदर्शी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहराची आत्मकथा देऊन ‘राष्ट्रवादी’चे आंदोलन

$
0
0


औरंगाबाद : उपहासात्मक पद्धतीने लिहलेली 'औरंगाबादची आत्मकथा' महापालिकेच्या आयुक्तांना भेट देऊन राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी शुक्रवारी अभिनव आंदोलन केले.
राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या प्रदेश कार्यकारिणीचे सदस्य विजय वाहुळ यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. कार्यकर्त्यांनी महापालिकेच्या प्रवेशद्वारासमोर शहराच्या आत्मकथेचे होर्डिंग लावले होते. शहराची जीर्ण झालेली अवस्था, रस्त्यावर ठिकठिकाणी पडलेले खड्डे, फुटलेल्या ड्रेनेज लाइन, बंद असलेले पथदिवे, कोलमडलेली वाहतूक व्यवस्था याचा उल्लेख करून आत्मकथा लिहण्यात आली होती. एक महिन्यात बऱ्याच प्रमाणात शहराची कामे होतील असे आश्वासन आयुक्तांनी दिले. यावेळी विनायक गुंजाळ, शैलेश भिसे, कय्युम शेख, सुमित बनसोडे, विलास मगरे, किरण शिरवत, शंकर अडसुळ, नितीन गायकवाड, संतोष वाघ, गौतम बावस्कर, मनिष नरवडे, निलेश काळे आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते.

कर भरला का ?
आयुक्तांनी कार्यकर्त्यांशी चर्चा केली. त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. चर्चा करून कार्यकर्ते निघून जाताना बकोरिया यांनी त्यांना थांबवले. तुम्ही सर्वांनी मालमत्ता कर भरला आहे का, असा प्रश्न त्यांनी केला. कर भरा, त्यातूनच शहराचा विकास होईल, असे ते म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गुणवंत विद्या‌र्थिनीची आत्महत्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

घरातील आर्थिक परिस्थितीला कंटाळून दहावी परीक्षेतील गुणवंत विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केली. मयूरपार्क भागातील रामेश्वरनगर येथे शुक्रवारी हा प्रकार घडला. याप्रकरणी हर्सूल पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

कल्याणी भारतसिंह जाधव (वय १६, रा. रामेश्वरनगर) असे या मुलीचे नाव आहे. कल्याणीने सिंधू मेमोरियल विद्यालयातून दहावीची परीक्षा दिली होती. दहावीत ९० टक्के गुण घेऊन ती उत्तीर्ण झाली होती. छत्रपती कॉलेजमध्ये तिने अकरावी कॉमर्सला प्रवेश घेतला होता. कल्याणीचे वडील तुटपुंज्या पगारावर सुरक्षारक्षक म्हणून नोकरीला आहेत. तिच्या मोठ्या बहिणीचा विवाह झाला असून, एक मोठा भाऊ बीएसस्सीचे शिक्षण घेत आहे. तिच्या शिक्षणासाठी घरच्या मंडळीची धडपड सुरू होती. ते पाहून ती व्यथित झाली होती. आपल्या घरच्या आर्थिक स्थितीबाबत ती सारखी आपल्या भावाकडे बोलून दाखवत होती. जाधव यांचे दोन मजली घर आहे. शुक्रवारी सकाळी तिने खालच्या मजल्यावरील खोलीत छताच्या ‌हुकाला ओढणी बांधून गळफास घेत आत्महत्या केली. खाली आल्यानंतर पालकांना हा प्रकार समजला. तिला तात्काळ घाटी हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. पोलिसांनी तिच्या घरी पंचनामा केला, मात्र आत्महत्येपूर्वी लिहिलेली कोणतीही चिठ्ठी घरात आढळून आली नाही. याप्रकरणी हर्सूल पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नगरसेविका चावरिया यांच्या जात प्रमाणपत्रास आव्हान

$
0
0


औरंगाबाद : भाजपच्या औरंगपुरा वॉर्डाच्या नगरसेविका बबिता विजय चावरिया यांच्या भंगी जात वैधता प्रमाणपत्राला सिडकोत राहणाऱ्या भागवत यशवंत चव्हाण यांनी मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठात आव्हान दिले आहे. या याचिकेवर न्यायमूर्ती रवींद्र बोर्डे व न्यायमूर्ती के. के. सोनवणे यांच्यासमोर प्राथमिक सुनावणी झाली असता त्यांनी प्रतिवादींना नोटीस बजाविण्याचे आदेश दिले.
चावरिया यांनी ९ फेब्रुवारी १९९३मध्ये जातीचे प्रमाणपत्र काढले होते. हे प्रमाण काढताना दाखल केलेल्या संचिकेसोबत बनावट कागदपत्र सादर केले. तहसील कार्यालयातून अनुक्रमांक १२२७ चे जात प्रमाणपत्र चावरिया यांना देण्यात आले होते. ते प्रमाणपत्र बबिता राजू चावरिया यांच्या नावे तहसील कार्यालयाने निर्गमीत केले होते. त्याचबरोबर बबिता चावरिया यांनी भाऊ नितीन बागडीचे अनुक्रमांक ६७९०चे प्रमाणपत्र सादर केले असता, ते देखील बनावट असल्याचे याचिकेत म्हटले आहे. हे प्रमाणपत्र नंदू सूर्यनारायण यांच्या नावे तहसील कार्यालयातून काढण्यात आले आहे. त्याच बरोबर बबिता चावरिया यांनी वडिलाचे जात प्रमाणपत्र सोबत जोडले होते ती संचिकाच सापडत नाही. त्यामुळे जात पडताळणी समितीने दिलेले जात वैधता प्रमाणपत्र चुकीचे असून ते बेकायदा असल्याचे याचिकेत नमूद केले आहे. या याचिकेत नगरविकास विभागाचे प्रधान सचिव, सामाजिक न्याय विभागाचे सचिव, जात पडताळणी समिती, पालिका आणि नगरसेविका बबिता चावरिया यांना नोटीस बजाविण्यात आली. याचिकाकर्त्याची बाजू सिद्धेश्वर ठोंबरे हे मांडत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


वुडरिज शाळेने परस्पर नेमली पालक-शिक्षक समिती

$
0
0


औरंगाबाद : शैक्षणिक शुल्क वाढविणे, भोजनाची सक्ती तसेच अनेक मुद्यांवरून कायम चर्चेत असलेली वुडरिज शाळा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. शालेय शिक्षण विभागाने आखून दिलेले नियम डावलून शाळेने शिक्षक - पालक समिती नेमल्याचा आरोप होत आहे. वुडरिज इंग्रजी शाळेचा मुद्दा जिल्हा परिषदेच्या सभागृहात गेल्या अनेक दिवसांपासून गाजत आहे. शुल्क वाढ करणे, विद्यार्थ्यांना शाळेतील जेवण सक्तीचे करून त्यासाठी जास्तीचे पैसे आकारणे, आदी तक्रारी शाळाप्रशासनाविरुद्ध पालकांकडून केल्या गेल्या होत्या.
शिक्षण विभागाने शाळेमध्ये पालक आणि शिक्षकांची बैठक आयोजित करून त्यांच्यासमक्ष पालक-शिक्षक समिती नियुक्त करावी, असे आदेश जिल्हा परिषद अध्यक्षांनी शिक्षणाधिकाऱ्यांना दिले होते. मात्र, शाळेने पालकांना कोणत्याही प्रकारे विश्वासात न घेता परस्परच आपल्या मर्जीतील पालक- शिक्षक समिती नेमल्याचा आरोप आता केला जात आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष श्रीराम महाजन यांनी ही बाब शुक्रवारी पत्रकारांच्या निदर्शनास आणून दिली.
शाळेने २८ जुलै रोजी परस्परच पालक- शिक्षक समिती नियुक्त केली. त्याबाबतचे एसएमएस पालकांच्या मोबाइलवर पाठविल्याचे सांगण्यात आले. शिक्षणाधिकारी मोगल यांनी अध्यक्ष श्रीराम महाजन, झेडपी सदस्य दीपकसिंह राजपूत आणि रामदास पालोदकर यांना पत्र पाठवून दिनांक २० ऑगस्ट रोजी वुडरिज शाळेमध्ये पालक-शिक्षक संघाची सभा असून या सभेला उपस्थित राहावे असे कळविले आहे. कारण या प्रकरणातील चौकशी समितीचे हे तिघे सदस्य आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाळू तस्करांचा ‘रात्रीस खेळ चाले’ !

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
जिल्ह्यात अवघ्या चार ते पाच वाळूपट्ट्यांचा लिलाव झाला असताना शहरात अत्यंत सहजपणे भर दिवसा वाळू तस्करी सुरू आहे. शहरातील ठेक्यांवर वाळू पोचवण्यासाठी काही ठिकाणी रात्री वाळूचे ट्रक शहरात दाखल होतात. गेल्या महिन्याभरात शहरात दोन मोठे अपघात होऊनही या तस्करीकडे महसूल, महापालिका प्रशासनाने कानाडोळा केला आहे.
कटकटगेट, रोशनगेट, जयभवानीनगर, टीव्ही सेंटर, जकात नाका रस्त्यावर ‌ठिकठिकाणी वाळूचे बेकायदा डेपो आहेत. या ठिकाणी वीट भट्ट्यांवरून आणलेल्या विटांसोबत वाळूची विक्री होते. पैठण परिसरातून वाळूची तस्करी करून वाहने बीड बायपासमार्गे, गंगापूरकडून येणारी वाहने वाळूजमार्गे, फुलंब्रीकडून येणारी वाहने हर्सूलमार्गे बिनदिक्कतपणे पोलिसांसमोरून शहरात येतात. त्या-त्या ठेक्यांवर ही वाळू पोचवली जाते. रात्री १२ ते पहाटे पाचच्या दरम्यान वाळू शहरात आणण्याचा प्रकार सुरू असतो. दिवसभरात ज्यांना वाळू हवी त्यांच्याशी सौदेबाजी आणि दुसऱ्या दिवशी पहाटेपर्यंत पुरवठा असे माफियांचे सूत्र आहे.

बंद ट्रकमधून वाहतूक
वाळू आणण्यासाठी हायवासह बंद बॉडीच्या ट्रकचा वापर होतो. ट्रकच्या क्रमांकावरून ठरलेली चिरीमिरी पोलिस तसेच महसूलच्या अधिकाऱ्यांपर्यंत पोचल्यानंतर ट्रक पोहचण्यात कसलीही आडकाठी येत नाही. लिलाव झालेल्या साठ्यावरूनही वाळू आणली तरी वाहनांमध्ये क्षमतेपेक्षा जास्त वाळू असते. विशेष म्हणजे वाळू तस्करी करणारी अनेक वाहने पोलिस प्रशासनात काम करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची आहेत. त्यामुळे त्यांच्यावर कधीही कारवाई होत नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सोलार सिटीला ‘मॉडेल शहरा’ची प्रतीक्षा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
मॉडेल शहराच्या प्रस्तावात औरंगाबादची 'सोलार सिटी' अडकली आहे. एक वर्षापासून मॉडेल शहराचा प्रस्ताव केंद्र सरकारच्या अपारंपरिक ऊर्जा मंत्रालयात पडून असून, त्यावर अद्याप काहीच निर्णय झालेला नाही. त्यामुळे सोलार सिटीची कामे सुरू होण्याची प्रतीक्षा आहे.
केंद्र सरकारच्या अपारंपारिक ऊर्जा मंत्रालयाने सोलार सिटी प्रकल्पासाठी देशभरातील २० शहरांची निवड केली. त्यात औरंगाबाद शहराचा समावेश करण्यात आला. शासनाने २० शहरांसाठी ६६ कोटी ५० लाख रुपयांची तरतूद केली. औरंगाबाद शहरासाठी या निधीतून किमान पाच कोटी रुपये मिळतील, असे अपेक्षित होते. सोलार सिटी प्रकल्पाच्या अंमलबजावणीची जबाबदारी
महापालिकेवर टाकण्यात आली. महापालिकेने या प्रकल्पासाठी १८ सदस्यांची स्टेक होल्डर समिती स्थापन केली. आयुक्त या समितीचे अध्यक्ष आहेत. स्टेक होल्डर समितीच्या स्थापनेनंतर सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करून
'मेडा'च्या पुणे येथील कार्यालयास सादर करण्यात आला. सोलार सिटी योजनेत समावेश झाल्यामुळे शहराला सौर ऊर्जेच्या कामांसाठी ३० टक्के सबसिडी मिळणार होती. त्यात शहरात सौर ऊर्जेचे काम मोठ्या प्रमाणावर होणार नाही, ही बाब लक्षात घेऊन महापालिकेने औरंगाबाद शहराचा समावेश सोलार सिटीच्या मॉडेल शहरांच्या यादीत करण्याची विनंती केंद्र सरकारला केली. त्यासंदर्भातील प्रस्तावही सादर केला. मॉडेल शहरांच्या यादीत समावेश झाल्यास ५० टक्के सबसिडी मिळण्याची तरतूद आहे. त्यातून सौर ऊर्जेचे काम मोठ्या प्रमाणावर होऊ शकते, असे महापालिकेने केंद्र सरकारकडे पाठवलेल्या प्रस्तावात म्हटले आहे, परंतु एक वर्षापासून या प्रस्तावावर काहीच निर्णय झाला नाही.

सोलार सिटीत या वीस शहरांचा समावेश
केंद्र सरकारने जाहीर केलेल्या सोलार सिटीच्या वीस शहरांच्या यादीत आग्रा, गांधीनगर, राजकोट, सुरत, ठाणे,शिर्डी, नागपूर, औरंगाबाद, इम्फाळ, चंदिगड,गुडगाव, फरिदाबाद, विलासपूर, रायपूर,गोहाटी,जोहराट, म्हैसूर, शिमला, हमीरपूर,जोधपुर, विजयवाडा,लुधीयाना, अमतृसर, डेहराडून,पणजी, नवी दिल्ली या शहरांचा समावेश आहे.

सोलार सिटी योजनेत औरंगाबाद शहराचा समावेश मॉडेल शहरात व्हावा, असा प्रस्ताव महापालिकेने पाठवला आहे. अद्याप शासनाने त्यावर काहीच निर्णय घेतलेला नाही. शासनाचा निर्णय आल्यावर पुढील कार्यवाही करता येईल. एक वर्षापासून हा प्रस्ताव प्रलंबित आहे.
- सिकंदर अली, कार्यकारी अभियंता, महापालिका.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नवीद इनामदार यांना युवा पुरस्कार

$
0
0


औरंगाबादः संगीत नाटक अकादमीचा उस्ताद बिस्मिल्ला खाँ युवा पुरस्कार नवीद इनामदार यांना गुवाहाटी येथे प्रदान करण्यात आला. देशभरातील आठ नाट्य कलावंतांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. नेपथ्य या प्रकारात इनामदार यांची निवड करण्यात आली.
संगीत नाटक अकादमी, नवी दिल्ली व सांस्कृतिक मंत्रालय भारत सरकार यांच्या वतीने संगीत, नृत्य, नाट्य व लोककला प्रकारातील कलाकारांना प्रोत्साहीत करण्यासाठी पुरस्कारन दिला जातो. २००६ पासून उस्ताद बिस्मिल्ला खाँ युवा पुरस्कार सुरू करण्यात आला आहे. नाट्य क्षेत्रातील आठ कलावंतांची निवड करण्यात आली. यात नवीद इनामदार यांचा समावेश आहे. गुवाहाटी (आसाम) येथे आठ ऑगस्ट रोजी पुरस्कार प्रदान कार्यक्रमाला राज्यपाल पद्मनाभ बालकृष्णन आचार्य, मुख्यमंत्री सरबंदा सुनवर, संगीत नाटक अकादमीचे संचालक शेखर सेन यांची प्रमुख उपस्थिती होती. लातूर जिल्ह्यातील इनामदार यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नाट्यशास्त्र विभागात पदवी व पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. प्रसिद्ध नाट्य दिग्दर्शक वामन केंद्रे, नाटककार शफाअत खान, ज्येष्ठ रंगभूषाकार कृष्णा बोरकर, श्रीमंत ससाणे, नितीन कांबळे, गौतम सोनवणे, योगेश इरतकर, कपिल जोगदंड आदींनी अभिनंदन केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पवन ऊर्जेमुळे झाली ७५ टक्के वीजबचत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
पवन ऊर्जेमुळे घरगुती व व्यावसायिक वीज वापर सुमारे ७५ टक्क्यांनी कमी करणे शक्य असल्याचे समर्थनगरमधील डॉ. एन. के. हजारी यांनी दाखवून दिले आहे. रोज सुमारे ८ किलोवॅट वीज निर्मिती करून हॉस्पिटल आणि घर यांना लागणारी वीज ते स्वत:च तयार करत आहेत. त्यांनी २००२मध्ये शहरात पहिल्यांदा पवनचक्की लावून एक आगळावेगळा प्रयोग केला.
दहाहून अधिक खोल्यांचे लाइट, पंखे, कुलर, डोळ्यांचे हॉस्पिटल यांना रोज लागणारी वीज गेल्या १४ वर्षांत ते या पवनचक्कीपासूनच तयार करत आहेत. भरमसाठ वीज बिल व भारनियमन यामुळे सर्वच जण त्रस्त आहेत. अशी परिस्थिती असताना डॉ. हजारी यांनी २००२ ते २०१६पर्यंत फक्त १६ लाख रुपये खर्च करूत सोलार आणि पवनचक्की अशी हायब्रीड सिस्टिम बसवून दर महिन्याचे विजेचे येणारे बील ७५ टक्क्यांनी कमी केले आहे.
डॉ. हजारी म्हणतात, 'हवेच्या वेगावर चालणारी पवनचक्की आणि व वीज निर्मिती उपकरण घरावर बसवले. यासाठी ८०० ते १ हजार चौरस फूट जागा लागते. हवेद्वारे ही पवनचक्की फिरते आणि त्यातून वीजनिर्मिती होते. निर्माण होणारी वीज बॅटरींमध्ये साठविली जाते. बॅटरीद्वारे ही वीज संपूर्ण घराला पुरवली जाते. या सर्व युनिटचे सुमारे २० वर्षांचे आयुष्य असून, खर्चिक बाब असली तरी स्वत:च्या गच्चीवर वीज निर्मितीचा आनंद मी ध्यासपूर्वक घेतला. आलिशान गाड्या विकत घेऊन त्यात बसण्यापेक्षा अक्षय ऊर्जेसाठी जरा खर्च केला तर बिघडले कुठे. म्हणून मी ही वीजनिर्मिती ध्यासपूर्वक पूर्ण केली.'

पुण्याच्या एका खासगी कंपनीने गच्चीवर सोलार युनिट आणि पवनचक्कीचे युनिट बसवून दिले आहे. हायब्रीड युनिटमधून बॅटरी सुमारे ८ ते १० तासांत रिचार्ज होते आणि पुन्हा रोज वीज निर्मीतीस कार्यरत होते. आजपर्यंत सोळा वर्षांत एकदा बॅटरी बदलण्याचा खर्च आला होता तोही फक्त ४ लाख.
- डॉ. एन. के. हजारी.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सौर उपकरणे व्हावी ‘स्टेटस सिम्बॉल’

$
0
0

औरंगाबाद : सौर उपकरणासाठी एकदा खर्च केल्यानंतर पुन्हा खर्च करण्याची गरज नाही. उपकरण कार्यान्वित झाल्यानंतर दरवर्षी विजेवरील खर्चात बचत होते. घरावरील सौर उपकरणे 'स्टेटस सिम्बॉल' झाल्यास सौर ऊर्जेचा वापर वाढेल असे मत सौर ऊर्जा विषयाचे अभ्यासक श्याम दंडे यांनी व्यक्त केले. परंपरागत भारतीय मानसिकता सौर ऊर्जा वापरातील प्रमुख अडथळा ठरली आहे.
वीज टंचाई आणि वाढता खर्च यांचे आव्हान असताना सौर ऊर्जा वापरासाठी व्यापक जनजागृती करण्यात येत आहे, मात्र अजूनही सौर उपकरणे वापराबाबत प्रचंड अनास्था आहे. महागडी उपकरणे व केवळ दिवसा उपयोग असल्याच्या मुद्दयांवर अनेकजण सौर उपकरणे वापरण्यास विरोध करतात. शहर आणि ग्रामीण भागात ऊर्जा वापर वाढवण्यासाठी औरंगाबाद येथील अभ्यासक श्याम दंडे प्रयत्नशील आहेत. समर्थनगर येथे दंडे यांनी एक किलोवॅटचे पॉवर स्टेशन उभारले आहे. 'एक हजार लोकांनी घरावर एक किलोवॅटचे पॉवर स्टेशन उभारल्यास एक मेगावॅट वीज बचत होईल. एक मेगावॅट विजेतून पंधरा खेडी प्रकाशमान होतील' असे दंडे यांनी सांगितले. त्यामुळे जास्तीत जास्त नागरिकांनी छतावर सौर वीज निर्मिती करण्यावर भर देण्याची गरज आहे. एक किलोवॅट प्रकल्पासाठी ९० हजार ते एक लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. मात्र, एकदा गुंतवणूक केल्यास पुन्हा खर्चाची आवश्यकता नसते. उलट दरवर्षी वीज खर्चात बचत होते. या प्रकल्पातून मध्यमवर्गीय कुटुंबात एलईडी दिवे, दोन-तीन पंखे, फ्रीज, पाणी चढवण्याची छोटी मोटार, टीव्ही, कम्प्युटर उपकरणे चालू शकतात. मिक्सर किंवा जास्त वीज खेचणारे उपकरण लावण्यासाठी दुसरे एखादे उपकरण बंद केल्यास समस्या दूर होईल, असा पर्याय दंडे यांनी सुचवला आहे. सौर ऊर्जा वापराबाबत गैरसमज आहेत. शिवाय सरकारी नियमांची जाचकता असल्यामुळे वापर कमी आहे. दरम्यान, दंडे यांनी समर्थनगर येथे उभारलेल्या सौर पॉवर स्टेशनचे शनिवारी उद्घाटन करण्यात येणार आहे. या माध्यमातून सौर चळवळ अधिक व्यापक करण्याचा प्रयत्न आहे.

कारपेक्षा सौर हवे
आर्थिक सुबत्ता असलेल्या कुटुंबातही सौर ऊर्जा वापराबाबत उदासीनता आहे. लाखो रूपयांची कार सहज खरेदी करण्याची वृत्ती आहे; मात्र, नऊ लाख रुपये खर्च करून १० किलोवॅटचे पॉवर स्टेशन उभारण्यास धनाढ्य लोक चालढकल करतात. त्यामुळे सौर उपकरणे 'स्टेटस सिम्बॉल' झाल्याशिवाय वापर वाढणार नाही, असे दंडे यांना वाटते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सौर ऊर्जेतून उजळला कॉलेज कॅम्पस

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
संस्थेच्या विस्तारामुळे वीज वापरात सातत्याने होणारी वाढ, विजेच्या बिलाचा भार विचारात घेऊन एमआयटी कॉलेजमध्ये सौर ऊर्जेच्या वापराला सुरुवात करण्यात आली. कॉलेजने गेल्या चार वर्षांत केलेल्या प्रयत्नांमुळे विजेची सुमारे ४० टक्के गरज सौर ऊर्जेच्या माध्यमातून भागविण्यात येत आहे. त्यामुळे दरवर्षी सुमारे २४ लाख रुपयांची बचत होत आहे. संपूर्ण कॅम्पसमध्ये सौर ऊर्जेचा वापर करण्याचा संस्थेचा विचार आहे.
संस्थेच्या बीटेक कॉलेजच्या इमारतीवर २०११-१२मध्ये सौर ऊर्जेचे ७७२ पॅनल बसविण्यात आले. त्यानंतर संस्थेच्या इंजिनीअरिंग कॉलेजवरही ७७४ पॅनल बसविण्यात आले. या दोन प्रकल्पांतून सुमारे २०० किलोवॅट विजेची निर्मिती होते. १.१ मीटर बाय १.४ मीटर आकाराचे हे पॅनल आहेत. एका पॅनलमधून १३० ते १३५ वॅट विजेची निर्मिती होते. ही वीज संस्थेची इंजिनीअरिंग, बीटेक, पॉलिटेक्निक आदी कॉलेजांसाठी आणि विद्यार्थी, विद्यार्थिनींच्या वसतिगृहांसाठी वापरण्यात येत आहे. सध्या संस्थेच्या कॅम्पसमध्ये सुमारे ४० टक्के सौर ऊर्जा वापरण्यात येत आहे, अशी माहिती प्राचार्य एन. जी. पाटील, प्रकल्पाच्या समन्वयक प्रा. श्रीमती एस. एम. बडवे, प्रा. पवार यांनी दिली. सुट्यांच्या काळात कॅम्पसमधील विजेचा वापर कमी होतो. त्यावेळी ही वीज महावितरण कंपनीला विकण्यात येणार आहे.
विद्यार्थ्यांना अपारंपरिक ऊर्जेचे महत्त्व पटवून देण्यासाठीही सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्पाचा उपयोग करण्यात येत आहे. इंजिनीअरिंगच्या शेवटच्या वर्षातील विद्यार्थ्यांच्या प्रोजेक्टमध्ये सोलर एनर्जी या विषयाचा समावेश करण्यात आला आहे. सोलार पॅनलवर धूळ जमा होण्यामुळे ऊर्जा निर्मितीवर परिणाम होतो. एमआयटीच्या कौस्तुभ घुले या विद्यार्थ्यांने या प्रश्नावर आधारित प्रोजेक्ट तयार केला. युरोपिअन स्पर्धेत त्याने हा प्रोजेक्ट मांडले. त्यात त्याला कमी किमतीत बेस्ट डिझाइन गटात १० हजार युरोचे बक्षिस मिळाले आहे.

'सूर्यमित्र'साठी पुढाकार
केंद्र सरकारने सोलार एनर्जी क्षेत्रासाठी सूर्यमित्र उपक्रम सुरू केला आहे. त्यात तांत्रिक तज्ज्ञ म्हणून एमआयटी महाविद्यालय सहभागी झाले आहे. या उपक्रमात तरुणांना तीन महिन्यांचे प्रशिक्षण देण्यात येते. पहिल्या बॅचने मार्च ते जून या कालावधीत प्रशिक्षण घेतले. त्यातील अनेक विद्यार्थ्यांनी प्रशिक्षण सुरू केले आहे.

सोलार एनर्जी प्रकल्पाचे संस्थेला अनेक लाभ होत आहेत. खर्चात बचतीशिवाय सौर ऊर्जेचे महत्त्व विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिकासह पटवून देणे सोपे झाले आहे. या ऊर्जेमुळे आर्थिक बचत होते, हे पटवून देता येते. विद्यार्थ्यांमध्ये सौर ऊर्जेबद्दल उत्सुकता आहे. विद्यार्थीही सौर ऊर्जेवर प्रोजेक्ट करीत आहेत. त्याशिवाय सौर ऊर्जा क्षेत्रात कुशल मनुष्यबळ तयार करण्यासाठी केंद्र सरकारचा सूर्यमित्र हा प्रकल्पही संस्थेत राबविण्यात येत आहे.
- प्रा. मुनीष शर्मा, महासंचालक, एमआयटी, औरंगाबाद.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


रूफ टॉप सोलार सिस्टिममुळे फायदा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
विजेचे दरवर्षी वाढणारे दर, वाढती मागणी आणि उपलब्धततेची कमतरता यासाठी अपारंपारिक ऊर्जा स्त्रोतांचा वापर फायदेशीर ठरतो. त्यातही मराठवाड्यात किंबहुना औरंगाबादेत सूर्यप्रकाशापासून वीजनिर्मिती अत्यंत फायदेशीर ठरते. रूफ टॉप सोलार सिस्टिममुळे आपल्या फायदा होतो, असे प्रशांत नानकर यांनी सांगितले.
नानकर यांनी त्यांच्या चिकलठाण्यातील कंपनीत आणि समर्थनगर येथील घरावर रूफ टॉप सोलार सिस्टिम बसविली आहे. यासंदर्भात ते म्हणाले,'आपण घरगुती; तसेच व्यावसायिक वापरासाठी विजेचा उपयोग करतो. पवन ऊर्जा, सौर ऊर्जा निर्मितीसाठी अलिकडच्या काळात चालना दिली जात आहे, पण हे काम आणखी व्यापक झाले पाहिजे. एक किलोवॅट क्षमतेच्या सोलार सिस्टिम पॅनलच्या माध्यमातून आपण तीन ते पाच युनिट वीज प्रतिदिन निर्माण करू शकतो. आपल्या घराचे किंवा कंपनी, ऑफिसचा वीज वापर गृहित धरून त्या क्षमतेची सोलार सिस्टिम कार्यान्वित केली, तर लॉँग टर्म होतो. माझ्या कंपनीमध्ये मी ६६ पॅनल बसविले आहेत. त्यातून किमान आवश्यक विजेची निर्मिती होते. पॅनेल दक्षिणोत्तर बसविणे आवश्यक आहे. त्यामुळे अधिकाधिक काळ सूर्यप्रकाश उपलब्ध होतो. सूर्यकिरणांचा प्रभावीपणे वापर व्हावा, यासाठी विशिष्ट अंशांमध्ये हे पॅनेल सेट करावे लागतात. रूफ टॉफ सोलार सिस्टम घरीही खूप फायदेशीर आहे.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ऊर्जेचा स्मार्ट पर्याय

$
0
0

प्रा. महेश अष्टपुत्रे
महाराष्ट्र शासनाने सुरू केलेल्या नेट मीटर योजनेमुळे शहरी भागात राहणाऱ्या मध्यमवर्गीय कुटुंबासाठी सौर ऊर्जा आता फायदेशीर ठरत आहे. या क्षेत्रातील वाढत्या स्पर्धेमुळे दिवसेंदिवस सौर ऊर्जा उपकरणांची किंमत कमी होत आहे. त्यामुळे प्रारंभ‌िक गुंतवणूक आता खूपच कमी व मध्यमवर्गीयांना परवडणारी झाली आहे. साधरणपणे कारच्या किमतीपेक्षा अर्ध्या किमतीत हा प्रकल्प आता उपलब्ध आहे. एक कार घेतली, तर त्यात रोज पेट्रोल भरण्यासाठी पैसे द्यावे लागतात, परंतु सौर ऊर्जा प्रकल्प रोज पैसे वाचवणार आहे. त्याच बरोबर देशाच्या व पर्यावरणाच्या प्रगतीला हातभार लावणार आहे. 'मी देशासाठी अथवा पर्यावरणासाठी काय केले,' या प्रश्नाचे उत्तर म्हणून सौर ऊर्जा प्रकल्प हे उत्तम उदाहरण ठरू शकते. एका मध्यमवर्गीय कुटुंबाच्या घरात चार ट्युब, चार पंखे, टीव्ही, कम्प्युटर, फ्रीज, मोटर, मिक्सर, एसी आदी उपकरणे असतात. ज्या लोकांचा मासिक वीज वापर २०० ते २४० युनीट आहे. त्यांना २ किलोवॅट क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प पुरेसा आहे. हा प्रकल्प बसवण्यासाठी २०० ते २५० चौरस फूट मोकळी गच्ची पुरेशी आहे. बॅटरी विरहित सौर ऊर्जा प्रकल्प बसविल्यास त्याला देखभालीचा खर्च नाही. त्याचबरोबर याचे आयुष्य सुमारे २५ वर्षे आहे. २५वर्षे वीज फुकट, ही गोष्टच मनाला सुखावणारी आहे. तुमच्या घरात अथवा कार्यालयात वीज वापर नाही, त्यावेळेस या प्रकल्पाद्वारे तयार होणारी वीज ही 'एमएसईडीसीएल'च्या वाहिन्यांत पाठवून दिली जाते व तशी नोंदही ठेवली जाते. यासाठी एमएसईडीसीएलबरोबर २० वर्षे वीज खरेदीचा करार केला जातो व तुम्ही वापरलेली वीज आणि 'एमएसईडीसीएल'ला दिलेली वीज याची नोंद ठेवणारे नवीन मीटर बसवावे लागते. यालाच नेट मीटर म्हणतात. आज शहरामध्ये व्यावसायिक दराने वीज बील भरणारे ग्राहक आहेत. त्यांनी बॅटरी विरहित सौर ऊर्जा प्रकल्प बसविणे त्यांच्या स्वतःच्या, देशाच्या व पर्यावरणाच्या हिताचे आहे. २ किलोवॅटच्या सौर ऊर्जा प्रकल्प बसवण्यासाठी साधारणपणे १ लाख ६० हजार रुपये खर्च येतो.
पाच वर्षांमध्ये फक्त वीज बिलामध्ये संपूर्ण प्रकल्पाचा खर्च भरून निघतो. राहिलेली २० वर्षे वीज मोफत उपलब्ध होणार आहे. वरील उदाहरणात वीज दर पाच वर्षे स्थ‌िर राहील असे गृहित धरले आहे जे प्रत्यक्षात शक्य नाही. भविष्यात जसे जसे वीजदर वाढतील तसे प्रकल्पाचा खर्च पाच वर्षांपेक्षा कमी कालावधीत भरून निघेल. या प्रकल्पाची गॅरंटी ही पाच वर्षे आहे. म्हणजे गॅरंटीच्या कालावधीमध्येच त्याची किंमत पूर्णपणे वसूल होणार आहे.
भविष्यात तुमच्या घरात एखादे विद्युत उपकरण वाढले तरी त्याचा परिणाम या प्रकल्पावर होणार नाही अथवा त्याची क्षमता वाढविण्याची, प्रकल्प बदलण्याची गरज नाही. ज्या शहरांना स्मार्ट व्हावयाचे आहे, त्यांना सौर ऊर्जेशिवाय हे पर्याय नाही.

फायदेशीर गुंतवणूक
सौर ऊर्जा यंत्रणेसाठी सुरवातीला (२ किलोवॅट) एक लाख ६० हजार रुपये गुंतवणूक करावी लागते. आयकरात ३० टक्के (३८,४०० रुपये) सूट मिळते. दुसऱ्या वर्षी ही सूट सुमारे ७ हजार ६८० रुपये आहे. वर्षभरात २८८० युनीट विजेची निर्मिती होते. पाच वर्षांत १४ हजार ४०० युनीट वीज मिळते. आठ रुपये प्रतियुनीट दराने एक लाख १५ हजार २०० रुपये होतात. आयकर व निर्मित विजेचे मूल्य एकूण एक लाख ६१ हजार २८० रुपये आहे. पाच वर्षांत सौर ऊर्जा यंत्रणेसाठी गुंतविलेली रक्कम वसूल होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘स्मार्ट सिटी’ योजनेतील शहरांची घोषणा ३१ ऑगस्टला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

स्मार्ट सिटी योजनेच्या तिसऱ्या फेरीतील शहरांची घोषणा ३१ ऑगस्ट रोजी होण्याची शक्यता आहे. या फेरीत २९ शहरांचा समावेश असेल, अशी माहिती मिळाली आहे. त्यामुळे स्मार्ट सिटीमधील औरंगाबादच्या समावेशासाठी आणखी ११ दिवस वाट पहावी लागणार आहे.

केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी योजनेत देशभरातील शंभर शहरांची निवड करण्यात आली आहे. या शंभर शहरांमध्ये औरंगाबाद शहराचा समावेश झाला आहे. त्यापैकी पहिल्या यादीत २० शहरांची घोषणा करण्यात आली. त्यानंतर ११ शहरांची यादी जाहीर करण्यात आली. आता तिसऱ्या टप्प्यात २९ शहरांची घोषणा केली जाणार आहे. तिसऱ्या टप्प्यातील शहरांसाठी महापालिकेने मोठी तयारी केली आहे. स्मार्ट सिटीचा प्रस्ताव नव्याने तयार केला आहे. याशिवाय विविध संघटनांबरोबर सामंजस्य करार करून त्यांना 'स्मार्ट सिटी'शी जोडून घेण्याचा प्रयत्न केला आहे. चिकलठाणा येथील ग्रीनफिल्डच्या विकासाबरोबरच नक्षत्रवाडी येथेही ग्रीनफिल्डच्या विकासाचा समावेश प्रस्तावात करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर २९ शहरांच्या यादीत औरंगाबाद शहराचा क्रमांक लागेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

राज्य सरकारच्या नगरविकास खात्याने औरंगाबादच्या प्रस्तावाला जास्त गुण दिल्याचे बोलले जात आहे. असे असले तरी राज्यातील चार शहरे औरंगाबादच्या स्पर्धेत असलेल्याचे मानले जात आहे. स्पर्धेतील शहरांमध्ये पहिला क्रमांक ठाणे शहराचा असल्याची माहिती मिळाली आहे.

'समांतर'चा फटका

औरंगाबाद शहरासाठी राज्य व केंद्र सरकारने समांतर जलवाहिनीची योजना २००६मध्ये मंजूर केली दिली, पण २०१४पर्यंत या योजनेचे काम सुरू होऊ शकले नाही. या योजनेला केंद्र व राज्य शासनाने आर्थिक तरतूद केली होती. शासनाच्या मंजुरीनंतर आठ वर्षांनी समांतर जलवाहिनीचे काम सुरू झाल्यामुळे महापालिकेच्या एकूणच कामाबद्दल शासकीय पातळीवर अविश्वासाची भावना आहे. त्याचा फटका स्मार्ट सिटीच्या यादीत येण्यासाठी औरंगाबादला बसू शकतो, असे जाणकारांचे मत आहे.


स्मार्ट सिटी योजनेत...

- स्मार्ट सिटी योजनेत शहराच्या विकासाला २०० कोटींचा निधी मिळणार आहे
- निम्मा निधी केंद्र सरकारकडून आणि २५ टक्के निधी राज्य सरकारकडून मिळेल
- या योजनेत शहरातील पायाभूत सुविधा मजबूत करण्यात येणार आहेत.
- पॅन सिटीअंतर्गत वीज बचत करणारे पथदिवे, सार्वजनिक वाहतुकीचा समावेश
- चिकलठाणा, नक्षत्रवाडीत ग्रीन फिल्ड विकसित करण्याचा प्रस्ताव
- ग्रीन फिल्डमध्ये पर्यावरणपूरक शहर वसविणार
- महापालिकेच्या स्तरावर २५ कोटी रुपयांची उभारणी करावी लागणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘एसआयटी’ करणार श्रुती भागवत खुनाचा तपास

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

उल्कानगरी येथील बह‌ुचर्चित श्रुती भागवत खून प्रकरणाचा छडा लावण्यासाठी पोलिस उपायुक्तांच्या मार्गदर्शनाखाली विशेष तपास पथकाची स्थापना करण्यात आली आहे. पोलिस महासंचालक कार्यालयाच्या आदेशाने ह‌े पथक स्थापन करण्यात आले होते. १७ एप्र‌िल २०१२ रोजी श्रुती भागवत यांची त्यांच्या फ्लॅटमध्ये हत्या करण्यात आली होती.

उल्कानगरी परिसरातील श्रीनाथ अपार्टमेंट येथील शिक्षिका श्रुती भागवत यांच्या खून प्रकरणाला चार वर्षे चार महिने उलटले आहेत. त्यांच्या खुनाचा तपास सुरुवातीला जवाहरनगर पोलिस व नंतर गुन्हे शाखेने केला, मात्र जंग जंग पछाडूनही आरोपीचा माग काढण्यात तपास यंत्रणेला यश आलेले नाही. भागवत यांच्या नातेवाईकांना हा तपास सीआयडीकडे देण्याची मागणी केली होती. पोलिस महासंचालक कार्यालयाने ही मागणी फेटाळून लावत याप्रकरणी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्याचे आदेश पोलिस आयुक्तांना दिले होते. त्यानुसार भागवत यांच्या खुनाच्या तपासासाठी 'एसआयटी'ची स्थापना करण्यात आली आहे.

पोलिस उपायुक्त संदीप आटोळे, एसीपी खुशालचंद बाहेती यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक मधुकर सावंत, सहायक पोलिस निरीक्षक श्रीमती भांगे व काही निष्णात कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. हे पथक पुन्हा या तपासातील धागेदोरे तपासणार असून, आरोपीचा माग काढण्याचा प्रयत्न करणार आहे.

काय आहे प्रकरण?

श्रुती भागवत या उल्कानगरी भागातील श्रीनाथ अपार्टमेंटमध्ये एकट्या वास्तव्यास होत्या. त्यांचे पती आखाती देशात, तर मुलगा पुणे येथे नोकरीला होता. १७ जुलै रोजी पहाटे त्यांचा मृतदेह घराच्या गॅलरीत पेटलेल्या अवस्थेत आढळला होता. त्यापूर्वी मारेकऱ्यासोबत त्यांची झटापट झाली होती. फ्लॅटच्या सुरुवातीला रक्ताचे डाग पडलेले होते. त्यांचा मृतदेह ओढत नेऊन मागच्या बेडरुमच्या गॅलरीत पेटवण्यात आला होता. मारेकऱ्याच्या शोधासाठी अथक प्रयत्न करण्यात आले. ३००हून अधिक संशयितांची चौकशी करण्यात आली. मोबाइल डमडेटावरून अनेकांचा शोध घेण्यात आला. तत्कालीन पोलिस आयुक्त संजयकुमार यांनी मारेकऱ्याची माहिती देणाऱ्यासाठी ५० हजारांचे बक्षीस देखील जाहीर केले होते. भागवत यांच्या मारेकऱ्याच्या शोध घेण्यात यावा, यासाठी महिला संघटनांनी देखील जोरदार आंदोलन केले होते.

या प्रकरणाचा तपास लागावा यासाठी पूर्वीपासून पाठपुरावा करीत आहे. तपासासाठी एसआयटीची स्थापना केली, ही समाधानाची बाब आहे. एसआयटीमध्ये स्थानिक पोलिसच आहेत. यापेक्षा हा तपास सीआयडी किंवा सीबीआयकडे देण्यात यावा, अशी आमची मागणी आहे.

- मुकुल करंदीकर, श्रुती भागवतचे भाऊ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पैठण हायवे दिल्लीच्या कात्रीत

$
0
0

म. टा. विशेष प्रतिनिधी, औरंगाबाद

दिल्ली - मुंबई इंडस्ट्रिअल कॉरिडॉर (डीएमआयसी) साठी दळणवळणात अडचण येऊ नये म्हणून औरंगाबाद - पैठण हा राष्ट्रीय महामार्ग करावा, यासंदर्भातील प्रस्ताव सादर झाला आहे. यासोबतच शेंद्रा ते बिडकीन थेट जोडण्यासाठी नवीन प्रस्तावित रस्त्यासाठीही प्रस्ताव पाठविला असून दिल्लीत केंद्रीय सार्वजनिक बांधकाम विभागात हे दोन्ही प्रस्ताव अडकले आहेत. त्यामुळे या रस्त्यांचे भाग्य कधी उजळणार याबाबत प्रश्नचिन्ह कायम आहे.

औरंगाबाद - पैठण हा ५० किलोमीटरचा रस्ता गेल्या १० वर्षांपासून दुरुस्तीच्या प्रतिक्षेत आहे. राज्याच्या सार्वजनिक बांधकाम खात्याकडे हजारो प्रस्ताव पाठवूनही रस्ता दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध झाला नाही. केवळ औरंगाबाद शहरालगतचा काही भाग तात्पुरता मलमपट्टी करण्यात आला. उर्वरित रस्त्यासाठी अडचणी कायम होत्या. गेल्या वर्षी हा रस्त राष्ट्रीय महामार्ग म्हणून केंद्राच्या यादीत समाविष्ट करून घ्यावा, यासाठी प्रस्ताव पाठविण्यात आला होता. दरम्यान, केंद्राच्या भारतमाला योजनेत या रस्त्याचा समावेशही झाला. डीएमआयसीचे शेंद्रा परिसरातील काम प्रगतिपथावर आहे. बिडकीन परिसरातील पायाभूत सुविधांसाठी केंद्राने नुकतीच ६८८० कोटींची घोषणा केली आहे. त्या पार्श्वभूमीवर पैठण रस्ता लवकरात लवकर व्हावा, म्हणून डीएमआयसीने राज्य व केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठविला होता. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे हा रस्ता हस्तांतरित केला जाईल, असे सांगण्यात आले होते. पण त्याला कालमर्यादा नव्हती. दरम्यान, बिडकीनची कामे सुरू होणार असल्याने पंधरा दिवसांपूर्वी दिल्लीतील अधिकाऱ्यांनी डीएमआयसीला भेट दिली. यावेळी पीडब्ल्यूडी, एनएचएआयच्या अधिकाऱ्यांसमवेत झालेल्या बैठकीत रस्त्यांच्या प्रगतीचा आढावा घेतला. त्यात औरंगाबाद - पैठण व शेंद्रा - बिडकीन या रस्त्यांचा प्रस्ताव दिल्लीत अडकल्याची माहिती समोर आली.

संभ्रम कायम

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पुढच्या आठवड्यात डीएमआयसीकडून केंद्रीय सार्वजनिक बांधकाम विभागाकडे या रस्त्यांसंदर्भात मागणी केली जाणार आहे. पण त्यापुढे बजेट, निविदा तसेच प्रत्यक्ष कामाला सुरुवात अशी प्रक्रिया कधीपासून सुरू होणार याबाबत संभ्रम कायम आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images