Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

मी कारभारीण : ...पहिली बेटी; धनाची पेटी!

$
0
0

Ravindra.Taksal@timesgroup.com
गायत्री जोशी. नागपूरच्या रहिवासी. माहेरचे नाव गायत्री माताडे. घरात पालकांसह दोन बहिणी, एक भाऊ. वडील फर्निचर व इलेक्ट्रॉनिक्स् व्यवसायात. त्यामुळे गायत्री यांना लहानपणापासून आपलाही स्वतःचा व्यवसाय असावा असे स्वप्न होते. वडील कडक शिस्तीचे. त्यामुळे सकाळी लवकर उठणे, देवपूजा, अभ्यास यासह सर्व कामे वेळेवर करणे अशी शिस्त गायत्री यांना लागली. स्वावलंबनाचे धडे आणि व्यवहार ज्ञानही त्यांना वडीलधाऱ्यांकडून मिळाले. शालेय शिक्षणात अभ्यासबरोबरच क्रीडा स्पर्धात त्या नेहमी आघाडीवर असत. अनेक स्पर्धेत त्यांनी नेत्रदीपक कामगिरी केली. त्यांच्यातल्या नेतृत्त्वाची येथेच जडणघडण झाली. त्यांना नृत्याची आवड. त्यामुळे गायत्री यांनी भरतनाट्यमचे शिक्षण पूर्ण केले.
नागपूर येथील एका नामांकित कॉलेजात वाणिज्य शाखेतून पदवीचे शिक्षण घेतानाच त्यांनी एअर लाइन संबंधित 'डिप्लोमा इन इंटरनॅशनल एअर कार्गो अॅंड मॅनेजमेंट' तसेच पर्यटन व्यवसायाशी निगडित 'आयटा कोर्स' पूर्ण केला. वाणिज्य शाखेत त्या २००३ मध्ये पदवीधर झाल्या, पण निकाल लागण्यापूर्वीच त्यांना मुंबई येथे एअर इंडियामध्ये नोकरी मिळाली. या कामातील अनुभवाच्या आधारे अन्य एका खासगी विमान कंपनीत त्यांना चांगल्या हुद्यावर काम करण्याची संधी २००५मध्ये मिळाली. नोकरीनिमित्त त्या पुण्यात गेल्या. त्याठिकाणी त्या जर्मन भाषा शिकल्या. कामानिमित्त त्यांना अनेक शहरात जावे लागे. २००८मध्ये त्यांची औरंगाबादमध्ये बदली झाली. याच ठिकाणी अन्य एका विमान कंपनीत कार्यरत असलेल्या अनिकेत जोशी यांच्याशी त्यांचे २००९मध्ये लग्न झाले.
सासरी पतीसह सासू-सासरे, दीर, जाऊ असा मोठा परिवार. या एकत्रित कुटुंबात गायत्री यांना माहेरप्रमाणेच पूर्णपणे निर्णय स्वातंत्र मिळाले. घरातील सर्व जबाबदारी पार पाडत त्यांनी नोकरी सांभाळली. कंपनीच्या कामानिमित्त त्यांना मुंबई, नागपूरसह अन्य मोठ्या शहरात नेहमी जावे लागायचे. चांगल्या पगाराची नोकरी असतानाही स्वतःचा व्यवसाय असावा, ही जिद्द त्यांच्यात होती. त्यासाठी गायत्री यांची धडपड सुरू होती. इंटरनेटवर सर्चिंग आणि व्यवसाय संबंधी विविध पुस्तके त्या नियमित वाचत. याच काळात २०१२मध्ये मुलगी 'न्यासा'चा जन्म झाला. काही काळ त्यांनी बाळाला सांभाळण्यासाठी नोकरीतून सुटी घेतली. 'न्यासा'चे संगोपण, घरातील सर्व जबाबदारी पार पाडून त्यांच्याकडे बराच वेळ मोकळा राहत होता. सहा ते आठ महिने असेच गेल्यानंतर त्यांनी नोकरीपेक्षा स्वतःचा व्यवसाय सुरू करावा, यासाठी धडपड सुरू केली.
गायत्री यांची नागपूर येथे राहणारी बहीण साडी, ड्रेस विक्री व्यवसायात पूर्वीपासून कार्यरत आहे. त्यामुळे गायत्री यांनीही बहिणीप्रमाणे याच व्यवसायात शिरण्याचा निर्णय घेतला. चांगल्या पगाराची नोकरी सोडून व्यवसाय करणे जोखमीचे होते, पण पतीसह सासरच्या लोकांनी त्यांना मोलाची साथ दिली. गायत्री यांच्या निर्णयाला घरातून प्रोत्साहन मिळाले. या प्रेरणेतून त्यांनी २०१३मध्ये नोकरीला सोडचिठ्ठी दिली. 'न्यासा' कलेक्शन नावाने साडी, ड्रेस मटेरियलचे छोटेखानी स्वतःच्या राहत्या घरी सिडको एन ३, दर्पण गार्डन येथे सुरू केले. सुरुवातीस अवघ्या ५ हजार रुपयांची गुंतवणूक केली. ड्रेस मटेरिअल, विविध प्रकारच्या डिझायनर साड्या येथे अत्यंत वाजवी किंमतीत मिळतात, अशी तोंडीच भरपूर जाहिरात झाल्यामुळे परिसरातील ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. त्यामुळे दुसऱ्याच महिन्यात त्यांना आपल्या व्यवसायातील गुंतवणूक वाढवावी लागली. कोलकत्ता, बनारस येथून त्या ठोक भावात साड्या, ड्रेस मटेरिअलची खरेदी करतात. मुलीचे संगोपण, घरातील सर्व जबाबदारी यांची सांगड घालत त्यांनी व्यवसाय नेटाने पुढे नेला. याच काळात त्यांना महिला बचत गट तसेच अन्य प्रदर्शनात सहभागी होण्याची संधी मिळाली. तिथेही ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद मिळाल.
मोठ्या दुकानापेक्षा गायत्री यांच्याकडे विविध प्रकाराचे फॅशनबेल कपडे वाजवी किंमतीत मिळत असल्यामुळे आपसुकच तरुण वर्गासह इतर सर्व ग्राहक जोडले गेले. ही संख्या वाढतच आहे. व्यवसायानिमित्त अनेक महिला, कॉलेज तरुणी यांच्याशी त्यांची चांगली मैत्री झाली. नोकरीत मिळणाऱ्या पगारापेक्षा व्यवसायातून अधिक कमाई होते, असे त्या आवर्जून सांगतात. पारदर्शकता, कामातील प्रामाणिकपणा आणि मार्केटिंग कौशल्याच्या जोरावर त्यांनी या क्षेत्रात वेगळा ठसा उमटवला. या व्यवसायाच्या माध्यमातून अन्य काही महिलांना रोजगारांच्या संधी मिळाव्या हे त्यांचे ध्येय आहे. वडिलांप्रमाणे स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचे गायत्री यांचे स्वप्न होते, ते पूर्ण झाले आहे. या स्वप्नपूर्तीत त्यांना पती अनिकेत, सासू-सासरे यांच्या प्रोत्साहानामुळे प्रेरणा मिळाले. अन् जीवापाड प्रिय असणारी 'न्यासा' ही त्यांची पहिली बेटी. तिला पाहताच गायत्री यांचा सर्व आळस, समस्या, अडचणी भुर्रकन पळून जातात. तिच्या नावाने सुरू केलेले 'न्यासा' कलेक्शन आज खऱ्या अर्थाने 'पहिली बेटी; धनाची पेटी', ठरले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘जनशताब्दी’मध्ये नाष्टा महाग

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

प्रवाशांना रुचकर नाष्टा स्वस्त मिळावा यासाठी रेल्वेने शताब्दी, जनशताब्दी एक्स्प्रेसमध्ये एजन्सी नेमून सुविधा उपलब्ध करून दिली. मात्र, फलाटावर मिळणाऱ्या अन्नापेक्षा रेल्वेतले अन्न अजूनही महाग आहे. एजन्सीचालकच्या या मनमानी वृत्तीमुळे प्रवाशांच्या खिशाला चाट बसत आहे.

जालना ते दादर मार्गावर धावणाऱ्या जनशताब्दी एक्स्प्रेसहून अनेक प्रवासी सकाळी साडेसहा वाजता मुंबईला ‌निघतात. ही गाडी दुपारी एक वाजता मुंबईत पोहचते. या काळात प्रवाशांच्या सुविधेसाठी जनशताब्दीमध्ये नाष्ट्याची व्यवस्था करून देण्यात आली. यात सॅण्डविच, बर्गर, वडापाव, ऑम्लेट सारख्या पदार्थांची विक्री करण्यात येते.

रेल्वे फलाटावर मिळणारा नाष्टा आणि रेल्वेतल्या नाष्ट्याच्या दरामध्ये जवळपास पंधरा ते वीस टक्क्यांची तफावत आहे. येथे सॅण्डविच ५० रुपये, बर्गर ५० रुपये, ऑम्लेट ६० रुपयांना मिळते. हे दर महाग असल्याच्या तक्रारी प्रवासी करत आहेत. इतकेच काय रेल्वेत १५ रुपयांना पाण्याची बाटली विका असे आदेश देऊनही सध्या ती २० रुपयांना विकली जाते. रेल्वेच्या नियमानुसार प्रत्येक डब्यात दरपत्रक लावणे आवश्यक आहे. जनशताब्दीच्या बहुतांश डब्यात हे दरपत्रक नाही. जिथे आहे, तिथेही त्यावरील किमती खोडल्या आहेत. यामुळे एजन्सीधारकांचे फावते आहे. तक्रारी करूनही त्यांच्यावर आजवर कोणतीही कारवाई झालेली नाही.

'तपोवन'मध्ये जेवण निकृष्ट

नांदेड-मुंबई जाणाऱ्या तपोवन एक्स्प्रेसमध्येही जेवण महाग दिले जाते. या जेवणाचा दर्जाही चांगला नसतो. चहासाठी १० रुपये मोजावे लागतात. मात्र, त्यात नुसते पाणी असते. यामुळे रेल्वेतील या सेवेकडे अनेक प्रवाशांनी पाठ फिरवली आहे.

मी कालच 'तपोवन'ने मुंबईहून औरंगाबादला आलो. रेल्वेमधील जेवण दर्जेदार नसते. किमतीमध्ये गोंधळ होत असतो. यामुळे रेल्वेतील जेवणाला प्रवासी नकार देतात. याशिवाय जनशताब्दीमधील जेवणाचीही तशीच गत आहे. याबाबत रेल्वे प्रशासनाने विशेष लक्ष द्यावे.

- ओमप्रकाश वर्मा, मराठवाडा रेल्वे विकास समिती

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सहाय्यक व्यवस्थापकास पोलिस कोठडी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, जालना
बँकेच्या मुख्य एटीएम खात्यातील रक्कम मुलांच्या व्यक्तीगत खात्यात परस्पर वळऊन कोट्यावधी रुपयांचा बँकेला चुना लावणाऱ्या सहाय्यक व्यवस्थापकाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या. विशेष म्हणजे याच ठकसेनाने अशाच पद्धतीने औरंगाबादला केलेल्या प्रकरणाचा बोभाटा झाला. हा भामटा अधिकारी जालन्यात काही वर्ष होता. त्यामुळे त्याने काही भानगड केली आहे का याचा शोध घेताना हे स्कँडल उजेडात आले. ही घटना जालना येथील भारतीय स्टेट बँकेच्या मुख्य शाखेत घडली. याप्रकरणी २८ ऑगस्टपर्यंत न्यायालयाने पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.
औरंगाबाद येथील रहिवासी असलेला बळवंत यशवंतराव देशमुख जालन्यातील भारतीय स्टेट बँकेच्या मुख्य शाखेत ८ मार्च २०१३ ते ८ जून २०१५ या काळात सहाय्यक व्यवस्थापक म्हणून काम करीत होता. बँकेच्या एटीएममध्ये रोख रक्कम भरण्याची प्रक्रिया तो करत होता. याच कामात देशमुख याने आठवेळा लाखो रुपयांची रक्कम त्याचा मुलगा ऋषीकेश आणि मुलगी भाग्यश्री यांच्या खात्यात परस्पर जमा केली. ही रक्कम एक कोटी २२ लाख ८९ हजार ९७८ रुपये इतकी आहे.
दरम्यान, देशमुख याने अतिशय हातचलाखीने जालन्यात हा मलिदा लाटला. त्याची बदली औरंगाबाद येथे झाली. एटीएमच्या खात्यातून असेच घबाड लाटण्याची सवय जडलेल्या देशमुख याने औरंगाबाद येथे अशाच पद्धतीने ७१ लाख ५१ हजार ९२३ रुपये लाटले. मात्र, औरंगाबाद येथे देशमुख याची चोरी बॅँकेच्या वरिष्ठांना लक्षात आली व त्यानी देशमुखाला रंगेहात पकडले. त्याच्याकडून १९ जुलै २०१६ रोजी एक शपथपत्र लिहून घेतले. ७० लाख रुपये भरून घेतल्यानंतर हे प्रकरण मिटले.
यानंतर देशमुख हे जालन्यात कार्यरत होता. हे सगळेच जाणून होते, त्यामुळे जालन्यातील देशमुखाचे सगळे व्यवहार अंतर्गत यंत्रणेने तपासणी केली असता हा प्रकार जालन्यात उघडकीस आला. भारतीय स्टेट बँकेचे अधिकारी या संदर्भात काहीही बोलण्यास तयार नाहीत. पोलिसांनी देशमुख याला बुधवारी अटक केली. त्याला २८ ऑगस्टपर्यंत न्यायालयाने पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश कोर्टाने दिले. जालना येथील भारतीय स्टेट बँकेचे मुख्य प्रबंधक संग्रामकिशोर गुरूचरण साहू यांनी पोलिसांना देशमुख याच्या विरोधात तक्रार दिली आहे. या प्रकरणाचा तपास सदर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक साईनाथ ठोंबरे, पोलिस उपनिरीक्षक नेत्रे, कर्मचारी रणजीत वैराळ करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सोनपेठ पालिकेतील काँग्रेसच्या सहा नगरसेवकांचे सदस्यत्व रद्द

$
0
0

म. टा. विशेष प्रतिनिधी, औरंगाबाद
पक्षादेश डावलून पक्षाचे सदस्य असलेल्या उपाध्यक्षांविरुद्ध अविश्वास ठरावाच्या बाजूने मतदान करणाऱ्या काँग्रेस पक्षाच्या सहा नगरसेवकांचे सदस्यत्व रद्द करण्याचा आदेश मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. टी. व्ही. नलावडे यांनी दिले आहेत.
या प्रकरणी सोनपेठ ( जि. परभणी) नगरपालिकेच्या तत्कालीन उपाध्यक्ष पद्मा देशमुख यांनी याचिका दाखल केली होती. त्यानुसार सोनपेठ पालिकेत नगरसेवकांची संख्या १७ असून यापैकी सात काँग्रेस पक्षाचे आहेत. काँग्रेस पक्षाच्या सदस्य आणि नगर परिषदेच्या उपाध्यक्ष देशमुख यांच्यावर अविश्वास ठराव मांडून तो १४ विरुद्ध २ मतांनी मंजूर करण्यात आला. मात्र, त्यापूर्वी ३ जुलै २०१२ रोजी काँग्रेस पक्षाने एक पक्षादेश काढून अविश्वास ठरावाच्या विरुद्ध मतदान करण्याचे आदेश दिले होते. मात्र पक्षादेश डावलून नगरसेवक वैशाली कुसुमकर, शेख शाहेदबी अन्सार, दिगंबर पाटील, राजरईसबेगम जहिरोद्दीन, कुरेशी उस्मान कादरी आणि चंद्रकांत राठोड यांनी मतदान केले. या नगरसेवकांना अपात्र ठरविण्यात यावे असा विनंती अर्ज उपाध्यक्षांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केला. मात्र तो फेटाळण्यात आला.
या विरोधात श्रीमती देशमुख यांनी अॅड. सचिन देशमुख यांच्यामार्फत उच्च न्यायालय खंडपीठात याचिका दाखल केली. संबंधित नगरसेवकांनी काँग्रेस पक्षाच्या जिल्हाध्यक्षांनी काढलेला पक्षादेश डावलून अविश्वास ठरावाच्या बाजूने मतदान केले. त्यांची ही कृती महाराष्ट्र स्थानिक स्वराज्य संस्था सदस्य अपात्रता कायदा १९८६ च्या कलम तीनचा भंग करणारी आहे असे याचिकेत म्हटले होते. या प्रकरणी सुनावणीअंती खंडपीठाने याचिका मंजूर करीत सर्व सहा नगरसेवकांना अपात्र ठरविले. या आदेशाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्याकरिता चार आठवडे स्थगिती देतानाच खंडपीठाने संबंधितानी कोणतेही आर्थिक लाभ घेऊ नयेत, असेही आदेशात स्पष्ट केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

परभणी शहरात पाणीटंचाई

$
0
0

म. टा. प्र्रतिनिधी, परभणी
परभणी शहराला पाणीपुरवठा करणारी योजना गेल्या १४ वर्षांपासून नियोजनाअभावी रखडली आहे. येथील नळ योजना सुमारे ५० वर्षांपुर्वीची असल्याने जागोजागी गळती लागली आहे. १४ किलोमीटर अंतरावर असलेल्या येलदारी धरणातून पाणी पुरवठा करण्यात येतो, त्यामुळे पाण्याचा मोठ्या प्रमाणात अपव्यय होत आहे. या सर्व कारणामुळे परभणी शहराला १५ दिवसाआड पाणी पुरवठा करण्यात येतो. त्यामुळे शहरात मोठ्या प्रमाणात टंचाई जाणवत असल्याने नागरिकांचे हाल होत आहेत.
महापालिकेच्या नियोजनाअभावी गेल्या अनेक वर्षांपासून पाणीपुरवठा योजना रखडली आहे. परभणी शहराला सुमारे १४ किलोमीटर अंतरावर असलेल्या येलदारी धरणातून पाणीपुरवठा केला जातो. त्यासाठी नदीतून कालव्यात, कालव्यातून बंधाऱ्यात, बंधाऱ्यातून पाइपलाइनद्वारे शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी टाक्यात पाणी येते. शंभर लिटर पाणी सोडले तर शहरात येईपर्यंत केवळ २० लिटर पाणी शिल्‍ल्क राहते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाण्याचे अपव्यय होत आहे. त्यासोबतच पाणी साठा करण्यासाठी टाक्या नसल्याने साठवण करण्यात अडचणी निर्माण होत आहेत.
राज्य सरकारकडून मंजूर करण्यात आलेल्या पाणी पुरवठा योजनेचे काम गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. आतापर्यंत या योजनेवर एक कोटी दहा लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत. तर अजून या योजनेसाठी १०० कोटी रुपयांची गरज आहे. शहराला पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी सुमारे ५० वर्षांपूर्वीची आहे. त्यामुळे जागोजागी गळती लागली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या योजनेचे काम सुरू आहे. मात्र, हे काम पूर्ण झालेले नाही. काही दिवसांपूर्वीच जीव प्राधिकरणाचे सचिव संतोष कुमार यांनी पाहणी केली. मात्र, या योजनेचे काम ट्रेसर दर्जाचा कर्मचारी पाहत असल्याने सर्वत्र गोंधळच आहे.
पाणीपुरवठा योजना रखडल्याने गेल्या अनेक दिवसांपासून शहराला मोठ्या प्रमाणात टंचाई जाणवत आहे. नळाला १५ दिवसातून एकदा पाणी येते. पाणी कधी येते याची कल्पना नागरिकांना नसल्याने वाट पाहतच बसावे लागते. काही जागरूक नगरसेवक त्या भागात पाणी आल्यानंतर मेसेज करून वार्डातील नागरिकांना पाणी आल्याचे सूचना देतात. त्यामुळे पाणी आल्यानंतर घरातील सर्व भांड्यात पाणी भरून ठेवावे लागते.

टँकर लॉबी सक्रिय
परभणी श‌हरात पाणी पुरवठा करण्यासाठी ७० टँकर आहेत. टंचाई जाणवत असलेल्या भागात नगरसेवकाच्या सांगण्यावरून पाणीपुरवठा केला जातो. तर ‌काही ठिकाणी ह‌े टँकर चालक पैसे घेऊन मागेल त्याला पाणीपुरवठा करीत असल्याने या ठिकाणी मोठी टँकर लॉबी सक्रिय असल्याची चर्चा नागरिकांतून ऐकावयास मिळते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

व्हॅन चालकास १० वर्षे सक्तमजुरी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
भरधाव वेगात ओव्हरटेक करणाऱ्या पिकअप व्हॅनला ट्रकची जोरात धडक बसून तब्बल आठ प्रवाशांच्या मृत्युला कारणीभूत ठरलेल्या व्हॅन चालकास १० वर्षे सक्तमजुरी व १४ हजार ५०० रुपयांचा दंड जिल्हा व सत्र न्यायाधीश पी. एस. शिंदे यांनी ठोठावला. ही घटना २०१० मध्ये घडली होती व ही व्हॅन फुलंब्रीहून औरंगाबादकडे येत होती.
याप्रकरणी फुलंब्री पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक लक्ष्मण गंगाराम काळे यांनी फिर्याद दिली होती. फिर्यादीनुसार, २१ फेब्रुवारी २०१० रोजी दुपारी बाराच्या सुमारास फुलंब्रीहून औरंगाबादकडे व्हॅन (क्रमांक एमएच २०, ए टी ३०६९) निघाली होती. व्हॅनमध्ये चालक संजय बाबूराव सपकाळ (रा. वसई) याने तब्बल ३५ प्रवासी बसविले होते. फुलंब्री रोडवर भरधाव वेगात ओव्हरटेक करताना समोरून येणाऱ्या भरधाव ट्रकने (क्रमांक एमएच ०४, सी यू ५१३०) व्हॅनला जोराची धडक दिली. या अपघातातील सर्व ३५ प्रवाशांना घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान ८ प्रवाशांचा मृत्यू झाला. याप्रकरणी फिर्यादीने दिलेल्या तक्रारीनंतर फुलंब्री पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. व्हॅनचालकाने निष्काळजीपणे व्हॅन चालवल्यामुळे अपघात झाल्याचे तपासात निष्पन्न झाले. या प्रकरणी तपासी अंमलदार मिलिंद वाघमारे यांनी दोषारोपपत्र दाखल केले. सुनावणीदरम्यान सहाय्यक सरकारी वकील बाळासाहेब मेहेर यांनी ८ साक्षीदार तपासून गुन्हा सिद्ध केला. यातील दोन साक्षीदार फितूर झाले, तर चौघांच्या साक्षी महत्त्वपूर्ण ठरल्या.

एकूण ७ कलमांन्वये शिक्षा
दोन्ही बाजूंच्या युक्तिवादानंतर कोर्टाने आरोपी चालक संजय सपकाळ याला कलम २७९ अन्वये ६ महिने सक्तमजुरी व १ हजार रुपये दंड, कलम ३०४ (पार्ट टू) अन्वये १० वर्षे सक्तमजुरी व ५ हजार रुपये दंड, कलम ३०४ (अ) अन्वये २ वर्षे सक्तमजुरी व १ हजार रुपये दंड, कलम ३३७ अन्वये ६ महिने सक्तमजुरी व ५०० रुपये दंड, कलम ३३८ अन्वये २ वर्षे सक्तमजुरी व १ हजार रुपये दंड, कलम ४२७ अन्वये २ वर्षे सक्तमजुरी व १ हजार रुपये दंड, तर मोटार वाहन कायद्यानुसार २ वर्षे सक्तमजुरी व ५ हजार रुपये दंड ठोठावला. दंड न भरल्यास १ ते ६ महिन्यांपर्यंतची साधी कैद आरोपीला भोगावी लागणार आहे. पुराव्याअभावी ट्रकचालक राहुल हिरालाल सुरे याची कोर्टाने निर्दोष मुक्तता केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘समांतर’ला सप्टेबरमध्ये गुडबाय

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
सप्टेबरमध्ये समांतर जलवाहिनीच्या पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप (पीपीपी) तत्त्वावरील कराराला गुडबाय करण्याचा निर्णय महापालिकेच्या प्रशासनाने घेतला आहे. पाणीपुरवठा योजना पुन्हा महापालिकेच्या ताब्यात आल्यावर अडचणी येऊ नयेत म्हणून ५३९ पदे आउटसोर्सिंगच्या माध्यमातून किंवा मानधनावर भरण्याचा प्रस्तावही प्रशासनाने येत्या बुधवारी (३१ ऑगस्ट) होणाऱ्या सर्वसाधारण सभेसमोर ठेवला आहे.
प्रस्तावात आयुक्तांनी म्हटले आहे की, महापालिकेतर्फे ४ जुलै २०१६ रोजी कन्सेशनरला 'नोटीस फॉर इनटेंशन टू टर्मिनेट' (करार रद्द करण्याची इच्छा व्यक्त करणारी नोटीस) बजावली आहे. या नोटीसची मुदत २ ऑगस्ट २०१६ रोजी संपत आहे. त्यानंतर केव्हाही महापालिकेकडून कन्सेशन अॅग्रिमेंट रद्द करण्याची कारवाई होणे अभिप्रेत आहे. ही बाब लक्षात घेता अचानक पाणीपुरवठा खंडित होऊ नये म्हणून आणि पाणीपुरवठ्याचे प्राधान्य लक्षात घेऊन ५३९ पदे मानधनावर किंवा आउटसोर्सिंगच्या माध्यमातून भरण्याची परवानगी देण्यात यावी.
या प्रस्तावात पुढे म्हटले आहे की, समांतर जलवाहिनीच्या 'पीपीपी' तत्त्वावरील प्रकल्पासंदर्भात कन्सेशनरने माइलस्टोननुसार कामाची गती राखली नसल्याने व प्रकल्पातील इतर अनियमितता लक्षात आल्याने महापालिकेने कन्सेशनरला ५ एप्रिल २०१६ रोजी नोटीस दिली. त्यावर कन्सेशनरने २० एप्रिल रोजी खुलासा सादर केला. कन्सेशनरचा खुलासा समाधानकारक नसल्यामुळे महापालिका प्रशासनाने सर्वसाधारण सभेसमोर प्रस्ताव ठेवला. ३० जून रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेत समांतर जलवाहिनीचा 'पीपीपी' तत्त्वावरील प्रकल्प रद्द करण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला. भविष्यात औरंगाबाद शहराची ही वाढीव पाणीपुरवठा योजना महापालिका राबवण्याची शक्यता लक्षात घेता तांत्रिक व इतर संवर्गातील कर्मचाऱ्यांची तातडीने आवश्यकता भासणार आहे. सध्याच्या स्थितीत कंपनीकडे महापालिकेमार्फत प्रतिनियुक्तीवर गेलेल्या क्षेत्रीय कर्मचाऱ्यांसह महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागात स्थापत्य व यांत्रिकी शाखेचे एकूण २७९ कर्मचारी कार्यरत आहेत. अस्तित्वात असलेल्या पाणीपुरवठा योजनेचे संचलन, देखभाल दुरुस्ती व नवीन योजना राबवण्यासाठी तांत्रिक व इतर संवर्गांतील ५३९ कर्मचाऱ्यांची तातडीने आवश्यकता आहे. त्यामुळे या अभियंत्यांची, कर्मचाऱ्यांची आवश्यकतेनुसार कायमस्वरुपी भरती, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून प्रतिनियुक्तीवर नियुक्ती, आउटसोर्सिंग किंवा मानधनावर नियुक्ती करण्याचा निर्णय सर्वसाधारण सभेने घ्यावा.
ही ५३९ पदे भरल्यावर महापालिकेच्या तिजोरीवर किती ताण पडणार आहे याचा उल्लेख मात्र प्रस्तावात करण्यात आलेला नाही. यापदांमध्ये कार्यकारी अभियंता, उप अभियंता, कनिष्ठ अभियंता, भांडारपाल, लाइनमन, मजूर, जोडारी, प्रयोगशाळा सहाय्यक आदी २२ पदांचा समावेश आहे.

प्रस्तावित पदे
कार्यकारी अभियंता ः १
उप अभियंता ः १०
कनिष्ठ अभियंता ः ३४
दुय्यम आवेक्षक ः ३७
पंप चालक ः ४६
लाइनमन ः २८५
मुख्य योजना मजूर ः ७१
विजतंत्रा ः १०
सॅम्पल कलेक्टर ः ६
जोडारी ः १२

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नवी उपनगरे : रामपूर सुविधांपासून दूरच

$
0
0

Ravindra.Taksal@timesgroup.com
औरंगाबाद ः ड्रेनेज व्यवस्था नाही, पथदिवे कुठे सुरू, कुठे बंद, अंतर्गत रस्ते नाहीत, अशा परिस्थितीत शहराजवळ असलेल्या रामपूर या गावातील ग्रामस्थ जीवन जगत आहे. गावात केवळ एक सिमेंट रस्ता तयार झाला असून, पाणी पुरवठ्याची योजना नाही. त्यामुळे ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते. शहराप्रमाणे रामपूरचाही विकास व्हावा, अशी ग्रामस्थांची अपेक्षा असून, झालर क्षेत्रातील या गावाचा अद्यापही विकास न झाल्याने सिडकोपेक्षा महापालिकाच बरी, अशी भावनाही काही ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.
शहरापासून काही किलोमीटरवर व शेंद्रा एमआयडीसीजवळ असलेल्या रामपूर गावाला गेल्या काही वर्षांत महत्त्व प्राप्त झाले आहे. सिडको विकास झालरक्षेत्रात हे गाव येते. चिकलठाणा येथून सात ते आठ किलोमीटर अंतरावर वरूड काजी मार्गावर हे गाव आहे. गावाकडे जाणारा रस्ता जागोजागी उखडलेला अाहे. या अंरुद रस्त्यावर मोठ्या वाहनांची वर्दळ असते. या गावाला जाण्यासाठी औरंगाबादहून सकाळी नऊ वाजताच एक एसटी बस जाते. हा अपवाद वगळता या गावाला जाण्यासाठी रिक्षा अथवा खासगी वाहनांशिवाय अन्य दुसरा पर्याय नाही. महालपिंप्री, वरूड काजी, चिकलठाणा, नारेगाव ही गावे रामपूरपासून जवळ आहेत, मात्र दळणवळणाची ठोस सोय नसल्याने त्रास होतो. उच्च शिक्षणासाठी घराबाहेर पडणाऱ्या विद्यार्थिनींच्या सुरक्षेची चिंता ग्रामस्थांना सतावते आहे. गावातील अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. चिखलातून रस्ता शोधावा लागतो. स्वच्छता, आरोग्य सुविधा या मूलभूत सोयींसुविधांचा बोजवारा उडाला असून, पिण्याचा पाण्याचा प्रश्नही गंभीर आहे. महालपिंप्री ग्रुप ग्रामपंचायतीत हे गाव असून, परिसरात सोयी-सुविधा पुरविण्यासाठी निधी कमी पडतो, अशी अडचण गावाचे कारभारी सांगतात.
शहराजवळ असलेल्या गावांचा गेल्या काही वर्षांत चेहरामोहरा बदलत गेला. नागरी वसाहती विस्तारल्या, पण रामपूर हे गाव सांवगी रिंगरोडपासून आतील बाजूस असल्याने गावाचे गावपण अद्यापही पूर्वीसारखेच आहे. गावाची लोकसंख्या सुमारे एक हजारांच्या आसपास. गावात हनुमान मंदिर. गाव पाणंदमुक्त झालेले नाही. या गावाच्या विकासासाठी स्वाध्याय परिवाराने मोठी कामे केल्याचे ग्रामस्थ सांगतात. दहा ते पंधरा विहिरींचे तसेच काही कुपनलिकांचे पुर्नभरण करण्यात आले. घरासमोर शौचखड्ड्यासाठी पुढाकार घेतला आहे.

शेती आणि कंत्राटी कामगार
रामपूरचे भौगोलिक क्षेत्र ११७ हेक्टर असून, लागवडीलायक क्षेत्र १०३ हेक्टर आहे. गावठाण क्षेत्र सुमारे २ हेक्टर आहे. येथे सुमारे ८.७९ हेक्टर आर गायरान जमीन असल्याचे महसूल अधिकाऱ्यांनी सांगितले. बहुतेक ग्रामस्थांचे शेती उत्पन्नाचे मुख्य साधन आहे. परिसरात कोणताही मोठा सिंचन प्रकल्प नसून, शेती पावसाच्या पाण्यावर अंवलबून आहे. पाऊस चांगला झाला तरच विहिरींना पाणी असते. कोरडवाहू क्षेत्र अधिक असून, कापूस, मका, बाजरी, गहू आदी पिके जास्त प्रमाणात घेतले जातात. काही प्रमाणात भाजीपाला लागवडही केली जात असून, जाधववाडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतमालाची विक्री केली जाते. गावात शेतमजूर, रोजंदारीवर काम करणाऱ्यांची संख्या अधिक असून, काही तरुण चिकलठाणा, शेंद्रा औद्योगिक वसाहतीत कामाला जातात. यातही कंत्राटी कामगारांची संख्या अधिक आहे.

पिण्याचा पाण्याचा प्रश्न गंभीर
गावात पिण्याचा पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. रामपूरला पाणीपुरवठ्याची कोणतीही योजना सध्या नाही. महालपिंप्री ग्रुप ग्रामपंचायतीमध्ये समाविष्ट असलेल्या या गावाकडे काहीसे केलो जाते, असा आरोप केला जाते. गावात नाही म्हणायला पंचायतीमार्फत काही बोअर घेण्यात आले आहे, पण त्यात पावसाळ्यातच पाणी असते. त्यात सातपैकी केवळ तीन बोअर सुरू आहेत. अन्य कुपनलिकांची तातडीने दुरुस्ती व्हावी, अशी नागरिकांची मागणी आहे. काही नागरिकांनी खासगी कुपनलिका घेतल्या आहेत, मात्र बहुतेकांना पाण्यासाठी वणवण फिरावे लागते. गावाशिवारातूनच शेंद्रा एमआयडीसीला पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी गेली आहे. तेथील एका व्हॉल्व्हमधून पडणारे पाणी ग्रामस्थ पिण्यासाठी वापरतात. गावाजवळील पाझर तलावात पाणीपुरवठ्यासाठी एक विहीर घेतली जात आहे, पण हे काम केव्हा होईल, असा प्रश्न गावकऱ्यांना पडला आहे.

सुविधा नाममात्रच
गावात अनेक पायाभूत सोयी सुविधाचा अभाव येथे दिसून येतो. दलित वस्ती सुधार योजनेंतर्गत गावात एका सिमेंट रस्त्याचे काम करण्यात आले. हा अपवाद वगळता कुठेही विकासकामांच्या खुणाही दिसत नाहीत. गावातील अन्य अंतर्गत रस्ते नाहीत. पावसाळ्यात चिखल तुडवत जावा लागते. ड्रेनेज लाइन नाही. पथदिवे सर्वत्र नाहीत. गाव पाणंदमुक्त झाले नाही. त्यामुळे सार्वजनिक आरोग्याचा प्रश्नही निर्माण होतो. गायी, म्हशींसह अन्य जनावरांच्या वैद्यकीय उपाचारासाठी सुमारे चार किलोमीटर अंतरावर असलेल्या वरूड काजी केंद्रावर जावे लागते. गावात व्यायाम शाळा, वाचनालय आदी कोणत्याही सोयी सुविधा गावात नाहीत.

गावात शाळा पाचवीपर्यंत
गावात जिल्हा परिषदेची पाचवीपर्यंत शाळा आहे. तेथे ९१ विद्यार्थी शिक्षण घेत असून, चार शिक्षक कार्यरत आहेत, परंतु शाळा इमारतीची दुरवस्था झाली अाहे. दोन वर्गखोल्या मोडकळीस आल्या आहेत. संरक्षक भिंत नसल्याने मोकाट कुत्रे, जनावरांचा मोठा त्रास होतो. पाचवीनंतर येथील विद्यार्थी दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या महालपिंप्री येथील शाळेत जातात, पण तेथेही आठवीपर्यंत शिक्षणाची सोय आहे. त्यामुळे बहुतेक विद्यार्थी हे चार किलोमीटर अंतरावर असलेल्या वरूड काजी येथे जातात. तेथे बारावीपर्यंत शिक्षणाची सोय आहे, असे ग्रामस्थांनी सांगितले. शाळेपर्यंत जाण्यासाठी दळणवळणाची कोणतेही सोय नाही. ही बाब शिक्षणासाठी अडसर ठरत आहे.

आरोग्य सुविधा नाहीत
गावात साधे मेडिकल स्टोअरही नाही. गावापासून चार किलोमीटर अंतरावर असलेल्या वरूड काजी येथे शासनाचे आरोग्य उपकेंद्र आहे. त्यामुळे उपचारासाठी ग्रामस्थ औरंगाबाद शहर, नारेगाव येथील हॉस्पिटलला प्राधान्य देतात.

जमिनीचे भाव गगनाला
सिडको झालर विकास क्षेत्रात असलेले हे गाव भौगोलिक दृष्ट्या औरंगाबाद शहरालगत आहे. नारेगाव, चिकलठाण्यापासून या गावाचे शिवार सुमारे सहा ते सात किलोमीटरवर आहे. वरूड काजी रोडवर हे गाव आहे. त्यामुळे येथील जमिनीला सोन्याचा भाव आला आहे. रोडलगत जमीन सुमारे पन्नास लाख रुपये एकर असून, अंतर्गत भागात कमी-अधिक भाव असल्याचे ग्रामस्थ सांगतात. झालर क्षेत्रात असल्याने गेल्या काही वर्षांत खरेदी विक्रीची व्यवहार अपवाद वगळता झाले नाहीत, असे त्यांनी नमूद केले.

गावात अवेक नागरी प्रश्न कायम आहेत. पिण्याचा पाण्याचा प्रश्न तातडीने निकाली लागला पाहिजे. गावाच्या विकासाकडे दुर्लक्ष होता कामा नये. त्यामुळे स्थानिकांना खूप त्रास सहन करावा लागतो.
- छगन लाटे, ग्रामस्थ, रामपूर

आमची ग्रुपग्रामपंचायत असून, गाव परिसरात विकासकामासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत, पण तुलनेते निधी कमी पडतो. रामपूरसाठी विहीर घेऊन पाणीपुरवठा केला जावा, यासाठी प्रयत्न सुरू आहे.
- जिजाबाई अंभोरे, सरपंच, महालपिंप्री

रामपूर गावात कोणतीही ठोस विकास कामे झालेली नाहीत. दलित वस्ती सुधारण योजनेतंर्गत एक सिमेंट रस्ता झाला आहे. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर असून, तो तातडीने सोडविणे आवश्यक आहे. दळणवळणाची सोय नसल्याने शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठी अडचण होते.
- भीमाताई वखरे, ग्रामपंचायत सदस्य, रा. रामपूर

अंतर्गत रस्त्यांच प्रश्न गंभीर असून, हे काम तातडीने होणे आवश्यक आहे. पावसाळ्यात चिखल तुडवत जावे लागते.
- विकास कोलते, ग्रामस्थ, रामपूर

शासनाची किंवा ग्रामपंचायततर्फे कोणताही ठोस विकास योजना गावात झालेली नाही. गावाचा विकास व्हावा, हीच अपेक्षा.
- रवींद्र ससाणे, ग्रामस्थ, रामपूर

गावाचा विकास झाला पाहिजे. अनेक नागरी प्रश्न आहेत. याकडे अधिक लक्ष दिले जावे. सरकारने निधी दिल्यास येथील कामे होणे शक्य आहे.
- सदानंद वाघमारे, ग्रामस्थ, रामपूर

गावाचा विकास अधिक जोमाने झाला पाहिजे. ड्रेनेजचे काम तातडीने पूर्ण होणे आवश्यक आहे. रस्त्यावरून पाणी वाहते. त्यामुळे त्रास होतो. अंतर्गत रस्त्यांचा प्रश्न कायम आहे.
- प्रतिक लाटे, ग्रामस्थ, रामपूर

महालगाव पिप्री येथील रहिवासी असून, माझी शेती मल्हारपूर महसूल क्षेत्रात आहेत. झालर विकास आराखडासंदर्भात तातडीने योग्य तो निर्णय झाला पाहिजे. विकासाला गती येईल.
- दशरथ अंभोरे, ग्रामस्थ, रामपूर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


दहा वर्षांत उद्योग विस्तार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
'डीएमआयसी आणि नागपूर-मुंबई महामार्ग या दोन प्रकल्पांनी १० वर्षांत मराठवाड्याचे स्वरूप बदलणार आहे. सध्या ऑटो क्षेत्रात आघाडीवर असलेल्या औरंगाबाद शहरात औषधी उद्योग, पर्यटन व्यवसाय व दुग्धोत्पादनाला अधिक संधी आहेत. २०२० यावर्षी डीएमआयसी कार्यरत होऊन २०३० पर्यंत हा परिसर मेगा इंडस्ट्रीअल बेल्ट होईल,' असे प्रतिपादन उद्योजक मानसिंग पवार यांनी केले. औरंगाबाद शहर विकासावर आयोजित चर्चासत्रात ते बोलत होते.
स्वातंत्र्यसेनानी आणि काँग्रेस नेते बाबूराव काळे यांच्या ९० व्या जयंतीनिमित्त 'औरंगाबाद शहर आणि परिसराचा विकास - काल, आज आणि उद्या' या विषयावर चर्चासत्र घेण्यात आले. यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात गुरुवारी दुपारी कार्यक्रम झाला. यावेळी मंचावर अजिंठा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रंगनाथ काळे, माजी खासदार पुंडलिक दानवे, माजी आमदार संतोषराव दसपुते, 'मसिआ'चे अध्यक्ष विजय लेकुरवाळे, काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष केशवराव औताडे, काँग्रेस नेते चंद्रभान पारखे, ज्ञानेश्वर भांदरगे, द्वारकाभाऊ पाथ्रीकर, हरिश्चंद्र लघाने व प्रकाश काळे यांची प्रमुख उपस्थिती होती. या चर्चासत्रात औरंगाबादचा औद्योगिक विकास व सद्यस्थितीवर चर्चा झाली. पुढील दहा वर्षांत परिसराचा कायापालट होणार असल्याचे उद्योजक मानसिंग पवार यांनी सांगितले.
'शासकीय निर्णयांची अंमलबजावणी होण्यास वेळ लागल्यामुळे मराठवाड्यात आमूलाग्र बदल झाले नाहीत. मराठवाडा विकास आंदोलनाच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत २५-३० वर्षांचा कालावधी उलटला, पण आता शहर बदलत असून मॉल्स, बँका, रूग्णालये, शिक्षणसंस्था विस्तारत आहेत. १९६० मध्ये रेल्वे स्टेशन एमआयडीसी सुरू झाली. त्यानंतर चिकलठाणा, वाळूज, शेंद्रा एमआयडीसीने झेप घेतली. डीएमआयसीच्या माध्यमातून २०३०पर्यंत शहर परिसरात 'मेगा इंडस्ट्रीअल बेल्ट' तयार होईल. बीड, परभणी व हिंगोली जिल्ह्यात औद्योगिकीकरण नाही. २०१४-१५ मध्ये देशाच्या एकूण उत्पन्नात सेवा क्षेत्राचा वाटा ६५ टक्के आहे. तर शेतीचा अवघा १६ टक्के वाटा आहे. यावरून बदलत्या परिस्थितीचा अंदाज येतो. ऑटो, फार्मा, सीड्स, ब्रेव्हरीज, स्टील आणि इलेक्ट्रॉनिक उत्पादनात औरंगाबाद आघाडीवर आहे. मात्र, भविष्यात फार्मा आणि कृषी उत्पादनांना मोठी संधी आहे. आठ हजार हेक्टरवर शेंद्रा-बिडकीन इंडस्ट्री उभी राहणार आहे. २०२२ ते २०४२ असा दर दहा वर्षांनी विकासाचा टप्पा आहे. दहा लाख रोजगार उपलब्ध होऊन ५० लाख लोकसंख्येचे नवे शहर उभे राहील,' असे पवार म्हणाले. 'पर्यटन राजधानी असलेल्या औरंगाबादच्या विकासाकडे प्रत्येक सरकारने दुर्लक्ष केले. महानगरपालिकेची अवस्था वाईट आहे. शहर आणि परिसरात शेकडो ऐतिहासिक स्थळे असून, उद्योजकांनी पर्यटन विकासासाठी पाठपुरावा करावा,' असे आवाहन रंगनाथ काळे यांनी केले. यावेळी चंद्रभान पारखे यांचा मानपत्र देऊन विशेष सत्कार करण्यात आला. डॉ. अशोक नाईकवाडे यांनी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. यावेळी विविध क्षेत्रातील नागरिक उपस्थित होते.

२४ हजार कोटींचा महामार्ग
'नागपूर - मुंबई महामार्ग पूर्ण झाल्यास दोन्ही शहरातील अंतर १६ तासांवरून सहा तासांवर येणार आहे. एक किलोमीटर रस्त्यासाठी ३४ कोटी रुपये खर्च आहे. तीन वर्षांत प्रकल्प पूर्ण करण्याचे सरकारचे नियोजन असून या कामासाठी २४ हजार कोटी खर्च अपेक्षित आहे. रस्त्यावर नवीन २४ हब (शहरे) तयार केली जातील. जालना, औरंगाबाद, वैजापूर आणि गंगापूर परिसराचा त्यात समावेश आहे. हा रस्ता पूर्ण झाल्यानंतर विकासाला अधिक वेग येईल,' असे पवार यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

माझं शिवार : शेतकऱ्यांना ‘कुबेर’ करणारी फळझाडांची किमया

$
0
0

Tushar.bodkhe@timesgroup.com
हवामान बदलाच्या संकटात शेतकऱ्यांनी एका पिकावर अवलंबून राहणे धोकादायक ठरत आहे. अतिरिक्त पाऊस, गारपीट, दुष्काळ, पावसाचा खंड, रोगराई अशा नैसर्गिक संकटांनी पिकाचे प्रचंड नुकसान होते. एखाद्या पिकाचे नैसर्गिक आपत्तीत नुकसान झाले तरी दुसऱ्या पिकावर फारसा परिणाम दिसत नाही. त्यामुळे एक पीक हातचे गेल्यानंतर दुसऱ्या पिकातून शेतकऱ्याचे नुकसान भरून निघण्याची शक्यता असते. खरीप, रब्बी या पिकांबाबतच काही शेतकरी हा प्रयोग करीत आहेत, पण कुबेर गेवराई (ता. औरंगाबाद) येथील शेतकरी जनार्दन कुबेर यांनी फळबाग लागवडीत वैविध्य ठेवत नवा पायंडा पाडला आहे. डाळिंब, मोसंबी, लिंबू, टोमॅटो, भाजीपाला, कांदा अशा विविध पिकातून त्यांनी फायदेशीर शेतीचा अवलंब केला. औरंगाबाद शहर परिसरातील बहुतेक शेतकरी भाजीपाला आणि फळबाग लागवड करतात. दररोज शहरातील बाजारपेठेत भाजीपाला व फळ विक्री करण्याचे नियोजन असते. कुबेर यांनी बहुविध पीक पद्धतीतून फायदेशीर शेतीचा उद्देश साध्य केला. आठ एकर शेतीचे त्यांनी योग्य व्यवस्थापन केले आहे. सध्या डाळिंबाची ८०० झाडे, लिंबाची ६५ आणि इतर भागात टोमॅटो आहेत. 'बारा महिने मंडई झाली पाहिजे' हा परिसरातील अनेक शेतकऱ्यांचा शिरस्ता आहे. त्यानुसार कुबेर यांनी शेतीचे नियोजन केले आहे.
'डाळिंबाचे उत्पादन दोन टप्प्यात घेतो. जानेवारी महिन्यात डाळिंबाला पाणी दिल्यास जुलै ते सप्टेंबरपर्यंत फळं निघतात. एक जूनला टोमॅटो लागवड केल्यानंतर ऑगस्टपासून पुढील वर्षभर टोमॅटो उत्पादन निघते. तर लिंबाचे उत्पादन वर्षभर निघते' असे कुबेर यांनी सांगितले. विशेष म्हणजे शेतमाल खरेदी करण्यासाठी दिल्लीचे व्यापारी या भागात दाखल झाले आहेत. सध्या टोमॅटो खरेदी सुरू आहे. पाच गावातील भाजीपाला खरेदीसाठी नेहमीच परराज्यातील व्यापारी येत असतात. या शेतीकामात जनार्दन कुबेर यांचा मुलगा गणेश सहकार्य करतो. जनार्दन कुबेर १९७२मध्ये पदवीधर झाले. शिकल्यानंतर ते शेती करीत असले तरी शिक्षणाचे महत्त्व ओळखून त्यांनी आपल्या तीन मुलांना उच्च शिक्षण दिले. मोठा मुलगा शिक्षक असून, लहान मुलगा पुण्याला अभियांत्रिकी शाखेत शिकतो. गणेश यांनी पद‍वीधर झाल्यानंतर आवडीनुसार शेती करण्याचा निर्णय घेतला. वडील आणि मुलगा एकत्रित उत्तम शेती करतात. फळबागांची विशेष निगा राखली आहे. ठिबक सिंचन आणि तणनाशक यांचा समतोल साधला आहे. शेतीकामासाठी मजूर मिळण्याचा प्रश्न गेवराई गावातसुद्धा आहे, मात्र कमी खर्चात जास्त उत्पादन काढण्यासाठी शेतकऱ्यांनी यांत्रिकीरणाचा पर्याय स्वीकारला आहे. या नवीन पर्यायातून बरेच प्रश्न निकाली निघाले आहेत. औरंगाबादच्या बाजारपेठेत लिंबाची विक्री ४० रुपये प्रतिकिलो दराने होते, तर स्थानिक बाजारपेठेपेक्षा चढा दर मिळाल्यामुळे त्यांनी दिल्लीच्या व्यापाऱ्यांना टोमॅटोची विक्री केली आहे. समृद्ध शेतीसाठी पाणी आणि व्यवस्थापन आवश्यक असते. या तंत्राचा पुरेपूर अवलंब करण्यात आला आहे. शेताच्या सभोवती फळझाडे लावतानाच प्रत्येक कामाचे नियोजन करण्यावर कुबेर यांचा भर असतो. शेतीचे काम सूर्योदयापूर्वी सुरू करतात. या कामासाठी आवश्यक साहित्याची जमवाजमव रात्रीच करतात. ऐनवेळी साहित्य शोधण्यात आणि आणण्यात वेळेचा अपव्यय होऊ नये म्हणून ही शिस्त ठेवली, असे गणेश यांनी सांगितले. आंबा, चिंच, चिकू या झाडांनी शेतीच्या वैभवात भर पडली आहे. नोकरी करण्यापेक्षा शेतीत घाम गाळल्यास जास्त उत्पन्न मिळवणे शक्य आहे असा संदेश कुबेर कुटुंबाने दिला आहे. आपल्या शेतीच्या क्षमता ओळखून प्रत्येकाने नियोजन केल्यास हमखास यश मिळेल, असे कुबेर म्हणाले. कृषीतज्ज्ञ, शेतकरी ही आदर्श शेती पाहण्यासाठी आवर्जून गेवराईला जातात.

फळझाडांची किमया
शेतीच्या एकूण क्षेत्रापैकी ३० ते ४० टक्के क्षेत्रावर फळझाडे, ३० ते ४० टक्के भाजीपाला आणि २० टक्के क्षेत्रात धान्यासाठी पिकाची लागवड करावी हा कुबेर यांच्या शेतीचा मूलमंत्र आहे. प्रत्येक ठिकाणी पाणी उपलब्ध नसते. त्यामुळे जांभूळ, चिंच, सिताफळ या कोरडवाहू फळझाडांचा अवश्य विचार करावा. कमी खर्चात जास्तीचे उत्पन्न मिळवण्यासाठी फळझाड हा एकमेव पर्याय आहे असे जनार्दन कुबेर आवर्जून सांगतात, तर अनुभवी शेतकऱ्यांशी सल्ला-मसलत करून शेतीचे नियोजन करीत असल्याचे गणेश यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बजेट बुकमुळे कामे अडली

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
आयुक्तांमुळे कामे तुंबली असा हल्लाबोल करत आणि राणाभीमदेवी थाटात राजीनामा घेण्याची आणि देण्याची भाषा करणाऱ्या महापौर, उपमहापौरांना ओम प्रकाश बकोरिया यांनी गुरुवारी चोख प्रत्युत्तर दिले. 'प्रशासनाला बजेट बुक मिळाले नसेल, तर कामे कसे करणार? बजेट बुक काही दिवसांपूर्वी मिळाले. आता कामेही सुरू करू,' असे म्हणत नगरसेवकांना दिलासाही दिला.
विकासकामे तुंबली म्हणत बुधवारी महापौर त्र्यंबक तुपे, उपमहापौर प्रमोद राठोड, भाजप शहराध्यक्ष किशनचंद तनवाणी यांनी आयुक्तांवर शाब्दिक हल्ले केले होते. प्रशासन काम करणार नसेल, तर सर्वसाधारण सभेत निर्णय घ्यावा लागेल, असा अप्रत्यक्ष इशारा दिला होता. यावर आयुक्त काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष होते. बकोरिया यांनी आज सकाळी जाफरगेट येथील वॉर्ड कार्यालयात जाऊन नगरसेवकांची बैठक घेतली. दुपारी बारी कॉलनी येथील वॉर्ड कार्यालयात बैठक घेतली. दोन्ही ठिकाणी त्या-त्या वॉर्ड कार्यालयाच्या अंतर्गत असलेल्या नगरसेवकांना निमंत्रित केले होते. बैठक सुरू झाल्यावर बकोरिया यांनी नगरसेवकांना त्यांच्या वॉर्डातील कोणती कामे होणे अपेक्षित आहे ते सांगा, असे आवाहन केले. कामांचे अंदाजपत्रक झालेले नाही, टेंडर निघालेले नाही. त्यामुळे नागरिकांचा रोष वाढत आहे, असे नगरसेवकांनी बकोरिया यांच्या लक्षात आणून दिले. सर्व नगरसेवकांचे म्हणणे ऐकून घेतल्यावर बकोरिया यांनी पालिका बजेटला हात घातला. ते म्हणाले, 'प्रशासनाने स्थायी समितीला वेळेवर बजेट सादर केले. त्यात सुधारणा करून सर्वसाधारण सभेने लवकर बजेट बुक दिले असते, तर कामे सुरू करणे शक्य झाले असते. बजेट बुक १२ ऑगस्टनंतर मिळाले. त्यामुळे सर्व वॉर्डांमध्ये आता कामे सुरू होतील. वॉर्डांतर्गत कामे लवकर करण्याचा प्रयत्न असेल,' अशी ग्वाही दिली.

बैठकीला बकोरिया यांच्याबरोबर सर्व विभागप्रमुख उपस्थित होते. नगरसेवकांनी केलेल्या सूचना, सांगितलेली कामे विभागप्रमुखांनी नोंद करून घ्यावीत व कामांना तत्काळ सुरुवात करावी, असे आदेश त्यांनी दिले. जाफरगेट येथील वॉर्ड कार्यालय नगरसेवकांसाठी एका बाजूला आहे. त्यामुळे हे कार्यालय मध्यवस्तीत असले पाहिजे, अशी सूचना नगरसेवकांनी केली. ती आयुक्तांनी मान्य केली. तुम्ही बारा नगरसेवक एकत्र बसा, वॉर्ड कार्यालयासाठी जागा ठरवा. तुम्ही जागा ठरवाल तेथे वॉर्ड कार्यालय सुरू करू, असे आश्वासन दिले. सिद्धार्थ उद्यानातील स्वच्छतागृह पहाटे पाच वाजेपासून सुरू ठेवण्याचे आदेश त्यांनी दिले. घाटी रुग्णालयात महापालिकेतर्फे जन्म - मृत्यू प्रमाणपत्र देण्यासाठी स्वतंत्र कर्मचारी नियुक्त करण्याचे मान्य केले. आता हे प्रमाणपत्र घेण्यासाठी नागरिकांना महापालिकेच्या झोन क्रमांक १ च्या कार्यालयात यावे लागते. या ठिकाणी प्रमाणपत्र देण्यास टाळाटाळ केली जाते. त्यामुळे नागरिकांना मानसिक त्रास सहन करावा लागायचा. त्या त्रासातून आता सुटका होणार आहे.
-
पतिराजांना बाहेरचा रस्ता
-
वॉर्ड कार्यालयात नगरसेवकांची बैठक आयुक्तांच्या उपस्थितीत होणार असल्यामुळे महिला नगरसेवकांचे पती देखील त्यांच्याबरोबर बैठकीला आहे होते. बैठक सुरू झाल्यावर आयुक्तांनी या पतिराजांनी बाहेर थांबावे, अशी सूचना केली. महिलांना निर्णय प्रक्रियेत येऊ द्या. त्यांना समर्थपणे निर्णय घेऊ द्या, असे ते पतींना उद्देशून म्हणाले. त्यामुळे पतिराजांना बैठकीतून बाहेर जावे लागले.
-
१०४ कोटींच्या कामांना महिनाभरात मंजुरी
-
महापालिका आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांनी महिनाभरात तब्बल १०४ कोटींच्या कामांना मंजुरी दिली, पण या कामांचे टेंडर व वर्क ऑर्डर अजून निघालेले नाही. अशी माहिती लेखा विभागाकडून मिळाली आहे. आयुक्तांनी महिनाभरात स्पीलची ६४ कोटींची २०० कामे मंजूर केली. याशिवाय बजेट मधील ४०० कामांना मंजुरी दिली. या कामांची किंमत ४० कोटी रुपये आहे. एकूण १०४ कोटी रुपये किमतीची ६०० कामे आयुक्तांनी मंजूर केली. कामे मंजूर झाली असली तरी त्याचे टेंडर अद्याप निघालेले नाही. त्यामुळे कामे प्रत्यक्ष सुरू झाली नाहीत. येत्या एक ते दीड महिन्यात टेंडर काढून वर्क ऑर्डर दिल्या जातील, अशी माहिती सूत्रांनी दिली. आठवड्यातील दोन दिवस महापालिकेच्या मुख्यालायत थांबण्याचे आयुक्तांनी ठरविले आहे. सोमवार व शुक्रवार बकोरिया महापालिकेच्या मुख्यालयात बसून काम करतील. उर्वरित दिवशी ते विविध वॉर्ड कार्यालयात जाऊन काम करणार आहेत. त्यामुळे वॉर्ड कार्यालयाच्या स्तरावर कामे मार्गी लागतील, असे बोलले जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

इको फ्रेंडली गणपती फॅमिली कॉर्निव्हल

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
गणराय म्हणजे विघ्नहर्ता. साऱ्या कलांचे अधिष्ठान. तुमचा उत्सव म्हणजे आनंदाचा आगर. शहरवासीयांसाठी हा सोहळा चैतन्यदायी आणि पर्यावरणपूरक करण्यासाठी 'मटा'ने यावर्षी आणला आहे 'इको फ्रेंडली गणपती फॅमिली कॉर्निव्हल.' रविवारी या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
गरवारे कम्युनिटी सेंटर येथे सकाळी साडेअकरा वाजता सुरू होणाऱ्या या कार्यशाळेत शाडूच्या मातीपासून गणपती बनविण्याचे प्रशिक्षण दिले जाईल. तज्ज्ञ मार्गदर्शक माती मळण्यापासून ते गणपतीच्या सुबक मूर्ती तयार कशा कराव्यात, याचे मार्गदर्शन करतील. सोबत सजावटीमध्ये वारली चित्रांचा वापर कसा करावा, याचे प्रशिक्षण दिले जाईल. कार्यशाळेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांनी पेन्सिल, पट्टी, रबर, पॅड, पोस्टर आणि वॉटर कलर हे साहित्य सोबत आणावे. सहभागी होण्यासाठी पूर्वनोंदणी आवश्यक आहे. मग कसला विचार करताय, उचला फोन आणि संपर्क साधा आमच्याशी.
-
...हे लक्षात ठेवा!
-
- दिनांकः २८ ऑगस्ट, रविवार
- वेळः सकाळी ११.३० वाजता
- स्थळः गरवारे कम्युनिटी सेंटर, सिडको
- नोंदणीसाठीः ९८२२६३०५५५

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एजंटगिरीला ऑनलाइन वेसण

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
प्रादेशिक परिवहन कार्यालयातील (आरटीओ) एजंटगिरीला ऑनलाइन वेसण घालण्यात येणार आहे. ग्राहकांच्या कामात कुणाचाही हस्तक्षेप होऊ नये म्हणून आरटीओचे संगणकीकरण सुरू आहे, अशी माहिती गुरुवारी परिवहन आयुक्त प्रवीण गेडाम यांनी दिली.
गेडाम यांनी आरटीओ कार्यालयाला भेट देत विभागाच्या अडचणी जाणून घेतल्या. आरटीओ सर्जेराव शेळके, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अमर पाटील यांच्यासह अन्य अधिकारी, कर्मचाऱ्यांनी आपल्या समस्या आयुक्तांसमोर मांडल्या. गेडाम यांनी कार्यालय परिसरातील कामांची पाहणी केली. पत्रकारांशी बोलताना गेडाम म्हणाले, 'आरटीओतील एजंटगिरी बंद करण्यासाठी संगणकीय वापर वाढवणे हा दीर्घकालीन उपाय आहे. कोल्हापूर, नवीन मुंबईच्या धर्तीवर सारथी दोन ही प्रणाली औरंगाबादमध्ये सुरू करणार आहोत. यामुळे बीड, जालन्यातील गाडीवर, चालकावर गुन्हा आहे का याची माहिती चुटकीसरशी संगणकावर मिळेल. आरटीओतील मनुष्यबळाची अडचण सोडविण्यासाठी लवकरच एक हजार सहाय्यक मोटारवाहन निरीक्षकांची नियुक्ती केली जाईल. स्मार्ट कार्डबाबत मुंबई स्तरावर निर्णय घेऊ. औरंगाबाद आरटीओ कार्यालयासाठी करोडी येथे जागा घेतली आहे. जालना आणि बीड येथील जागेवर आरटीओ कार्यालय उभारायचे आहे. हा विषय प्रधान सचिवांकडे आहे. यावर लवकर बैठक घेऊन बांधकामासाठी निधी उपलब्ध करून देणार आहोत,' असे आश्वासन गेडाम यांनी दिले.
कार्यालयाची पाहणी करताना गेडाम यांनी पासिंगसाठी आलेल्या रिक्षाजवळ मोटार वाहन निरीक्षकांची परीक्षा घेतली. वाहनांचे नेमके काय चेक करता, असा प्रश्न त्यांना विचारला. निरीक्षकांनी कागदपत्रे असे उत्तर दिले. त्यावर वाहनांचे कोणते भाग, असा प्रतिप्रश्न केला. त्यावर हेडलाइट, रेडियम पट्टे, ब्रेक, इंजीन नंबर असे उत्तर निरीक्षकांनी दिले.
-
विशेष प्रकरण माझ्याकडे पाठवा
-
गेडाम यांच्या भेटीदरम्यान विजय मच्छवाल यांनी आपण खरेदी केलेल्या सेकंड हॅँड इनोव्हावर अचानक अतिरिक्त कर लावला. मी गाडी घेतानाच या छुप्या कराची माहिती मला दिली नाही, अशी तक्रार केली. आरटीओ शेळके यांनी हे अडीच कोटींच्या करचुकवेगिरीचे जुने प्रकरण असल्याचे सांगितले. या प्रकरणी १७ जणांना नोटीस बजाविल्याची माहिती दिली. हे प्रकरण गंभीर आहे. त्यामुळे हे विशेष म्हणून आपल्याकडे पाठवा, असे आदेश गेडाम यांनी दिले.
-
परिवहन आयुक्तांचे आदेश
-
- वाहन परवान्यासाठी फोटो काढताना घेताना तो ग्राहकांना दिसावा यासाठी एक स्क्रिन लावा.
- आरसी बुक, परवाने पोस्टाकडून परत येतात. ते कार्यालयात जमा करून तातडीने वितरण करा.
- महत्त्वाची कागदपत्रे ग्राहकांना पोहचली नाही, तर संबंधितांना संदेशाद्वारे माहिती द्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बेगमपुऱ्यात आतले विरुद्ध बाहेरचे

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
बेगमपुरा - पहाडसिंगपुरा वॉर्डाच्या पोटनिवडणुकीचा प्रचार शेवटच्या टप्प्यात पोहचला आहे. वॉर्डात तिरंगी लढत होणार असून अस्तित्व टिकवण्यासाठी शिवसेनेला कडवा संघर्ष करावा लागेल. त्यामुळे कोण टिकतो आणि कोण पडतो याचे आकडेमोड आणि अंदाज बांधणे आत्तापासून सुरू झाले आहे.
ज्ञानेश्वर जाधव यांचे जात प्रमाणपत्र अवैध ठरल्यामुळे महापालिका आयुक्तांनी त्यांचे नगरसेवकपद रद्द केले. त्यामुळे बेगमपुरा - पहाडसिंगपुरा वॉर्डात २८ ऑगस्ट रोजी पोटनिवडणूक होत आहे. हा वॉर्ड तसा परंपरेने शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो, पण २०१५मध्ये झालेल्या पालिका निवडणुकीत सेनेचा हा बुरुज ढासाळला. ज्ञानेश्वर जाधव अपक्ष म्हणून निवडून आले. आता ही पडझड रोखण्यासाठी शिवसेना प्रयत्नाची पराकाष्टा करीत आहे. त्यासाठी खासदार चंद्रकांत खैरे या वॉर्डात तळठोकून आहेत. आमदार संजय शिरसाट, जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांच्यासह शिवसेनेचे सर्वच पदाधिकारी वेळ देऊन प्रचारात गुंतले आहेत. खैरे यांचे पुतणे सचिन यांना शिवसेनेने या वॉर्डातून उमेदवारी दिली आहे. सचिन यांना २०१५मध्ये झालेल्या निवडणुकीत गुलमंडी वॉर्डात पराभव स्वीकारावा लागला होता. आता त्यांचे राजकीय पुनर्वसन करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. बेगमपुरा वॉर्डात त्यांचा उल्लेख 'बाहेरचे' असा केला जातो. बाहेरच्याला मतदारांनी आपलेसे करावे म्हणून खुद्द पालकमंत्री रामदास कदम या वॉर्डात येऊन गेले. संपर्कनेते विनोद घोसाळकर दोन दिवसांपासून वॉर्ड पिंजून काढत आहेत. एवढे परिश्रम घेऊनही बाहेरचा उमेदवार 'बाहेरच' राहिला तर शिवसेनेला आत्मपरीक्षण करण्याशिवाय दुसरा मार्ग राहणार नाही.
२०१५ च्या निवडणुकीत याच वॉर्डातून दुसऱ्या क्रमांकावर राहिलेले अनिल भिंगारे यावेळी अपक्ष उमेदवार म्हणून नशिब आजमावत आहेत. शिवसेनेकडून तिकीट मिळेल असा त्यांना विश्वास होता, पण ऐनवेळी सचिन खैरे यांनी तिकीट मिळवण्यात बाजी मारली. त्यामुळे त्यांनी अपक्ष म्हणून चूल मांडली. शिवसेनेतील बड्या पदाधिकाऱ्यांशी त्यांचे घनिष्ट संबंध आहेत, त्याशिवाय अन्य राजकीय पक्षाचे पदाधिकारीही भिंगारे यांच्यासाठी काम करीत असल्याची चर्चा आहे. त्यामुळे ऐनवेळी भिंगारे स्पर्धेत येऊ शकतील असे बोलले जात आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे संतोष भिंगारे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. दोन भिंगारेंमध्ये लढत होणार की खैरे आपले अस्तित्व दाखवून देणार याचा निकाल रविवारी मतपेटीत बंद होईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘मायनेट’चा उपक्रम ‘सीएसआर’ राबवा

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
'महापालिकेतील संगणकीकरणांतर्गत 'मायनेट'चा उपक्रम राबवण्यासाठी पालिकेचा निधी नको, तर 'सीएसआर' फंडाचा वापर करा,' असे आदेश स्थायी समितीचे सभापती मोहन मेघावाले यांनी शुक्रवारी दिले.
शासनाने उपलब्ध करून दिलेल्या 'मायनेट'च्या माध्यमातून इ - गव्हर्नन्स प्रकल्पाची अंमलबजावणी केली जाणार आहे. संकेतस्थळ अद्ययावत करणे, विविध सेवा ऑनलाइन करून देणे, एम गव्हर्नन्सची अंमलबजावणी करणे, मोबाइल अॅप विकसित करणे, अद्ययावत डाटा सेंटर सुरू करणे अशी कामे 'मायनेट'च्या माध्यमातून केली जाणार आहेत. यासाठी शासनाने पाच संस्था नक्की केल्या आहेत. पाचपैकी कोणत्याही एका संस्थेकडून पालिकेने काम करून घ्यावे, असे शासनाचे निर्देश आहेत. त्यानुसार पालिका प्रशासनाने प्रस्ताव तयार करून, तो स्थायी समितीसमोर ठेवला. दर महिन्याला ५ लाख ४० हजार रुपये या उपक्रमासाठी खर्च केले जाणार आहेत. वर्षाला साठ लाखांपेक्षा जास्त निधी खर्च होणार आहे. त्यामुळे हा निधी महापालिकेच्या फंडातून खर्च न करता 'सीएसआर' फंड या उपक्रमासाठी मिळवा व त्यातून हे काम करा, असे आदेश सभापती यांनी दिले. या संदर्भात झालेल्या चर्चेत राजगौरव वानखेडे, कैलास गायकवाड, रावसाहेब आम्ले या नगरसेवकांनी सहभाग घेतला होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


व्हिडिओ शुटिंग दाखवून वारंवार अत्याचार

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
तेरा वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार करणाऱ्या ४२ वर्षीय टॅक्सीचालक शेख शकील शेख जाफर याला १० वर्षे सक्तमजुरी व १० हजार रुपयांचा दंड सत्र न्यायाधीश एस. एल. पठाण यांनी ठोठावला. या अत्याचाराचा व्हिडिओ शुटींग करून पीडितेला त्याची वारंवार भीती दाखवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. त्यामुळे कोर्टाने पोर्नोग्राफी कायद्यांतर्गत आरोपीला ५ वर्षे सक्तमजुरी आणि तीन हजार रुपये दंड ठोठावला. तसेच पीडित मुलीला मानसिक धक्का बसल्यामुळे आरोपीला २ वर्षे सक्तमजुरी व दोन हजार रुपये दंड ठोठावला. या दोन कायद्यांतर्गत औरंगाबादच्या सेशन कोर्टाने प्रथमच आरोपीला शिक्षा ठोठावल्याचे सरकारपक्षाकडून सांगण्यात आले.
पीडित मुलीच्या घराशेजारी आरोपी व टॅक्सीचालक शेख शकील हा राहतो. संबंधित मुलीला २०१२ मध्ये एकदा शिकवणीच्या वर्गाला आरोपीने स्वत:च्या कारने सोडले होते. त्यानंतर दुसऱ्यावेळेस शिकवणीला सोडण्याच्या बहाण्याने आरोपीने मुलीला एप्रिल २०१३मध्ये थेट गाढे जळगाव येथे नेले. कारच्या काळ्या काचा वर चढवून कारमधील छोट्या टीव्हीवर अश्लील चित्रपट सुरू केला. मुलीने विरोध करताच तिच्यावर बलात्कार करून त्याचे व्हिडिओ शुटींग केले. त्यानंतर व्हिडिओ क्लिप नेटवर टाकण्याची धमकी देऊन संबंधित मुलीवर जून २०१३पर्यंत वेगवेगळ्या ठिकाणी वारंवार अत्याचार केला. त्यामुळे संबंधित मुलीचे मानसिक संतुलन बिघडले होते. टीव्ही-मोबाइल पाहून तिला भीती वाटत होती. मुलीच्या आईने तिला विश्वासात घेऊन विचारले असता, मुलीने सगळी कहाणी सांगितली. त्यानंतर तिच्यावर आधी घाटीतील मनोविकृती विभागात व नंतर पुण्यात उपचार करण्यात आले. मुलीच्या आईच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल होऊन पोलिस उपनिरीक्षक आशा भांगे यांनी मुलीचा जबाब नोंदविला. विशेष पथकामार्फत गुन्ह्याचा तपास करून कोर्टात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले.
-
संपूर्ण सुनावणी 'इन कॅमेरा'
-
खटल्याच्या सुनावणीच्या वेळी विशेष सरकारी वकील राजेंद्र मुगदिया यांनी एकृण १९ साक्षीदारांचे जबाब नोंदवून गुन्हा सिद्ध केला. त्यापैकी तीन साक्षीदार फितूर झाले. या प्रकरणात मूळ फिर्यादीतर्फे अ‍ॅड. जनार्दन बी. नवले यांनी सरकार पक्षाला सहाय्य केले. सदर खटल्याची संपूर्ण सुनावणी 'इन कॅमेरा' झाली. सर्व शिक्षा आरोपीला एकत्रितपणे भोगावयाच्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घर बांधण्यासाठी लाखाच्या खंडणीची मागणी

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
घराचे बांधकाम पूर्ण करण्यासाठी एक लाखाच्या खंडणीची मागणी घरमालकाला करण्यात आली. ही मागणी पूर्ण केली नाही तर मनपा अधिकाऱ्याला सांगून घर पाडण्याची धमकी देण्यात आली. गेल्या शनिवारी शरीफ कॉलनी भागात हा प्रकार घडला. याप्रकरणी दोन आरोपींविरुद्ध जिन्सी पोलिस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सय्यद रौनक अली सय्यद रहेमान (वय ४० रा. शरीफ कॉलनी, कटकटगेट) यांच्या घराचे बांधकाम शरीफ कॉलनी येथे सुरू आहे. शनिवारी सय्यद रौनक यांच्या घरासमोर संशयित आरोपी शेख लईक अहेमद (रा. आसिफिया कॉलनी) व अब्दुल रफिक अब्दुल रहीम (रा. प्रगती कॉलनी) हे दोघे आले. सय्यद रौनक यांना तुमच्याकडे महानगरपालिकेचा घर बांधण्याचा परवाना नाही, तुम्ही आम्हाला एक लाख रुपये द्या. मनपाचे अधिकारी आमच्या ओळखीचे आहेत, तुम्ही पैसे दिले नाही तर त्यांना घर पाडायला सांगू, तसेच घरातील व्यक्तीला ठार मारू अशी धमकी दिली. या प्रकरणी सय्यद रौनक यांनी पोलिस ठाणे गाठून दोन्ही आरोपींविरुद्ध खंडणी व धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. सहायक फौजदार सिद्दिकी याप्रकरणी तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खड्डयांनी स्वागत, खड्ड्यांनीच निरोप!

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
ऐतिहासिक शहराचा फेरफटका मारण्यासाठी जग आणि देशभरातून आलेल्या पर्यटक, प्रवाशांचे रेल्वे स्टेशनसमोर खड्डे आणि खड्ड्यात साचलेले घाण पाण्याने स्वागत होते. नाकाला रुमाल लावूनच त्यांना स्थानकाबाहेर पडावे लागते. अन् निरोपही असाच दिला जातो.
रेल्वे स्टेशनवरून दररोज २२ एक्स्प्रेस आणि १२ पॅसेंजर रेल्वे धावतात. या गाड्यांमधून अंदाजे १७ हजार शहरात येतात. रेल्वेला या स्टेशनवरून दररोज १७ लाखांची कमाई होते. वेरूळ-अजिंठ्याची लेणी, बीबी-का-मकबरा, दौलताबादचा किल्ला यामुळे औरंगाबादचे कीर्ती जगभर पसरली आहे. त्यामुळे या शहर परिसरातील पर्यटन करावे, असा मोह कुणालाही आपसुक होतो. प्रवासी, पर्यटक वाढल्याने रेल्वेचे उत्पन्नही वाढले. या स्टेशनचा समावेश 'अ' दर्जामध्ये करण्यात आला. त्यानुसार स्टेशनच्या इमारतीत अनेक फेरबदल करण्यात आले. प्रवाशांसाठी विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या. गाडीतून प्रवासी उतरताच स्टेशनवर चांगले वाटते. पावले बाहेर पडताच प्रवाशांचे पाय खड्ड्यात पडतात. हात पॅँटच्या खिशाकडे जातो. या खड्ड्यात साचलेल्या घाण गटार पाण्याच्या दुर्गंधीमुळे रुमाल नाकावर लावलेला असतो. रेल्वेच्या कॅंटीनमधून येणारे हे पाणी इमारतीसमोर साचते. याबाबत वारंवार तक्रार करण्यात आली, मात्र संबंधितांवर कोणतीही कारवाई झाली नाही.
रेल्वे स्टेशमधून बाहेर पडण्यासाठी असलेल्या 'इन'गेटसमोर मोठे खड्डे आहेत. तसेच खड्डे शहरातील खड्डेमय रस्त्याचा प्रवास संपवून रेल्वे स्टेशनमध्ये प्रवेश करतानाही लागतात. प्रवाशांचे खड्ड्यांनी स्वागत होते. त्यांना शहर खड्ड्यांच्या आठवणीनेच निरोप देते. शहराचे दळभद्रीपण जगभर पोचविणारे हे खड्डे कधी संपणार?

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खर्चाचे आकडे नकोत, कामाचे बोला!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
'जलयुक्त शिवार योजने'त एक घनमीटर गाळ काढण्यासाठी सरकारी दर १८० रुपये व तोच गाळ काढण्यासाठी खासगी पोकलेनचा दर २५ रुपये आहे. आपल्याला स्वस्तात पोकलेन मिळत नव्हते का, असा सवाल करीत विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी प्रशासकीय अधिकारी आणि मंत्र्यांना खडे बोल सुनावले. किती निधी खर्च झाला यापेक्षा किती काम पूर्ण झाले या मुद्यावर चर्चा करा, असे सांगत बागडे यांनी खासगी कामाचे कौतुक केले.
मराठवाडा विभागातील 'जलयुक्त शिवार योजने'च्या कामाचा आढावा घेण्यासाठी जलसंधारण मंत्री राम शिंदे यांनी शुक्रवारी विभागीय आयुक्तालयात बैठक घेतली. विभागातील आमदार, प्रशासकीय अधिकारी आणि मंत्री यांनी 'पीपीटी'द्वारे प्रत्येक जिल्ह्याचा धावता आढावा घेतला. औरंगाबाद जिल्ह्यातील 'जलयुक्त'च्या कामाची माहिती जिल्हाधिकारी डॉ. निधी पांडेय देत असताना विधानसभा अध्यक्ष यांनी हरिभाऊ बागडे यांनी रोखठोक मत मांडले. '१९८३ पासून राज्यात पाणलोटाची कामे सुरू असली तरी एकाही जिल्ह्यात पाणलोटाची शंभर पूर्ण कामे नाहीत. पाणलोटाची लाखो कामे झाली असे फक्त सांगतात. सिमेंट आणि साखळी बंधाऱ्यांचा आग्रह कशासाठी? नदी-नाल्याचे रुंदीकरण-खोलीकरण केल्यास ३०-३५ लाखांत अवघ्या गावाचा पाण्याचा प्रश्न सुटतो. सिमेंट बंधाऱ्यामुळे फक्त २०-२५ जणांचा फायदा होतो. एक घनमीटर गाळ काढण्यासाठी सरकारी दर १८० रुपये आणि खासगी दर २५ रुपये आहे. प्रशासनाला स्वस्तात पोकलेन मिळत नव्हते का, लोण्यासारखा मऊ गाळ काढण्यासाठी पाषण खडक फोडण्याचा दर कसा लावता, असा प्रश्न बागडे यांनी उपस्थित केला. एवढ्या निधीत चारपट काम झाले असते. किती निधी खर्च झाला, यावर चर्चा करण्यापेक्षा किती काम पूर्ण झाले यावर चर्चा करा. अधिकारी फक्त आकडेवारी सांगतात. प्रत्यक्ष कामाबाबत बोलत नाहीत. निधी खर्च करणे हे उद्दिष्ट नसावे, तर काम पूर्ण करणे उद्दिष्ट असावे. या कामासाठी सरकारी यंत्रणा तयार नसेल तर खासगी यंत्रणा तयार आहे, असे बागडे यांनी सुनावले. खासगी संस्थांनी पाणी अडवण्यासाठी केलेल्या कामाचेही त्यांनी कौतुक केले. बोलणे संपताच बागडे यांनी बैठक सोडली. जलसंधारणाच्या कार्यक्रमासाठी जात असल्याचे सांगत त्यांनी जलसंधारण मंत्री राम शिंदे यांचा निरोप घेतला. मात्र, बागडे पोटतिडकीने बोलत असताना परिवहन मंत्री दिवाकर रावते, इतर आमदार व सरकारी अधिकारी स्तब्ध झाले होते.

दुरुस्ती कशी करणार?
मागील वर्षी सिल्लोड, सोयगाव आणि फुलंब्री तालुक्यात सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टीमुळे केटीवेअरचे नुकसान झाले. दुरुस्तीसाठी जलसंधारण विभागाकडे २१ कोटी रुपये मागितले होते; मात्र मागच्या कामाचे १६० कोटी रुपये देणे बाकी असल्यामुळे नवीन निधी देता येणार नसल्याचे त्यांनी कळवले. हा अट्टहास कायम राहिल्यास पाझर तलाव व सिमेंट बंधारे दुरुस्तच करायचे नाहीत का, असा सवाल बागडे यांनी केला. या कामासाठी नव्याने नियोजन करू, असे राम शिंदे यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फूड कॉर्नर : हैदराबादी कुबानी, मोगलाई पनीर जहागीरदार

$
0
0

Abdulwajed.Shaikh@timesgroup.com
भडकल गेट भागात द ग्रेट सागर रेस्टॉरंट सय्यद शकील (सागर) हे चालवित आहे. ते फूड इंड्रस्ट्रीमध्ये लहानपणापासून काम करीत आहेत. औरंगाबादकर खवय्यांना नवीन खाद्यपदार्थ उपलब्ध करून देण्याचा त्यांचा प्रयत्न असतो.
पनीर जहागीरदार हा मोगलाई पद्धतीचा पदार्थ. त्यात काजूकनी, ‌पनीर, पांढरी व पिवळ्या रंगाची ग्रेव्ही असते. एका पातेल्यात तेल टाकलो जाते. तेल गरम झाल्यानंतर त्यात जिले टाकले जातात. त्यानंतर आलं-लसूण पेस्ट, सिमला मिर्ची, बारीक चिरलेला कांदा, हिरव्या मिरच्याची पेस्ट आदी टाकले जाते. हे मिश्रण चांगल्या प्रकारे परतून घेतले जाते. कांद्याचा रंग लालसर होऊ द्यावा. यानंतर काजूकनीची पेस्ट टाकून हे मिश्रण एकजीव केले जाते. त्यानंतर त्यात पनीरचे तुकडे टाकले जाते. काजूच्या पेस्टमुळे एक भाग हा पांढऱ्या रंगाचा राहतो, तर दुसऱ्या भागात पिवळी ग्रेव्ही असते. हळद, मसाले वापरून पिवळ्या रंगाची ग्रेव्ही तयार करण्यात येते. बारीक चिरलेली कोथंबीर, चिजचा बारीक किस टाकून पनीर जहागीरदार हा पदार्थ सर्व्ह केला जातो.
पूर्वी शहरातील अनेक जण हैदराबादहून कुबानी खाद्य पदार्थ मागवित असत. खाद्यप्रेमींची मागणी लक्षात घेऊन हैदराबादची कुबानी आपल्या रेस्टॉरंटमध्येही उपलब्ध करून देण्याचा विचार सय्यद शकील यांनी केला. हैदराबादी कुबानी तयार करण्यासाठी जर्दाळू एक दिवस पाण्यात भिजवितात. २४ तास पाण्यात राहिल्याने जर्दाळू माऊ होते. पाण्यातून काढल्यानंतर जर्दाळूमधील बी काढतात. जर्दाळू बारीक वाटून घेतला जातो. त्यानंत एका पातेल्यात शुद्ध तुपामध्ये साखर टाकली जाते. साखर विरघळल्यानंतर वाटलेली जर्दाळू पेस्ट त्यात दुधासह टाकली जाते. हे मिश्रण सुमारे दोन ते अडीच तास गॅसवर ठेवले जाते. मिश्रण एकजीव झाल्यानंतर त्यात काजू, बदाम आदी सुकामेवा टाकून कुबानी तयार केली जाते. अनेक जण फक्त कुबानी आणि क्रिम खातात, तर काही जण हैदराबादी कुबानी आइसक्रिमसह खाण्यास प्राधान्य देतात.

शाकाहारी स्वयंपाकाची स्वतंत्र व्यवस्था
या हॉटेलमध्ये व्‍‌हेज आणि नॉनव्हेज प्रकारचे खाद्य पदार्थ मिळतात. व्हेज पदार्थ तयार करण्यासाठी स्वतंत्र व्यवस्‍था करण्यात आली आहे. या दोन स्वयंपाकघरात भांडेही वेगवेगळे आहेत. दोन्ही स्वयंपाकघरांतील भांड्यांची आदलाबदल होऊ नये, याची विशेष काळजी घेतली जाते, अशी माहिती द ग्रेट सागरचे सय्यद शकील यांनी दिली..

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images