Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

राजनगरमधील खुनाचे गूढ उकलले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शहरातील राजनगरमध्ये शनिवारी रात्री झालेल्या खुनाचे गूढ उकलले असून, पाणीजार वाटप करणाऱ्या मित्रानेच मनोज गवळीचा काटा काढल्याचे समोर आले आहे. आर्थिक व अनैतिक कारणावरून त्याचा खून केल्याचे सांगण्यात आले. या आरोपीला मंगळवारी (ता. सहा) रात्री उशिरा अटक झाली. यातील साथीदाराचा शोध पोलिस घेत आहेत.

हृषीकेश वायाळ असे संशयित तरुणाचे नाव आहे. त्याला राजनगर येथून अटक झाली असून, त्याची रात्री उशिरापर्यंत चौकशी सुरू होती. मनोज अशोक गवळी (वय १९, रा. शिवशाहीनगर-राजनगर, मुकुंदवाडी) या तरुणाचा दगडांनी ठेचून खून झाला होता. हा प्रकार रविवारी (ता. चार) सकाळी आठच्या सुमारास उघडकीस आला. हृषीकेश वायाळ मनोजचा जवळचा मित्र असून, मनोजसोबत मिळून तो पाणीजार वाटपाचे काम करीत होता. मनोजचा खून झाला, त्या दिवशी हृषीकेश पूर्ण दिवस मनोजसोबत होता. त्याचे वडील व आई कामानिमित्त बाहेर गेल्याची बाब त्याला माहीत होती. त्यामुळे त्याने थंड डोक्याने खून करण्याचा बेत आखला. यासाठी त्याने शनिवारची रात्र निवडली. वडील कामावर आणि आई माहेरी गेल्यामुळे मनोज घरी एकटाच झोपला होता. ही संधी साधून हृषीकेशने घराच्या उघड्या जिन्यावरून घरात प्रवेश केला. यानंतर तो मनोजच्या खोलीत घुसला. त्यावेळी मनोज झोपेतच होता. त्याने मनोजचा दगडाने ठेचून खून केला, अशी कबुली त्याने पोलिसांकडे दिली आहे.

खून केल्यानंतर त्याने घरातील कपाट धुंडाळत घराची चाचपणी केली. शोधाशोध केल्यानंतरही त्याला पैसे सापडले नसल्याने रिकाम्या हाताने परतावे लागले. मनोजने दहा ते पंधरा हजार रुपये घरात ठेवले होते, ते पैसे आपण शोधत होतो, असे हृषीकेशने सांगितल्याची माहिती पोलिसांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


अवैध सावकारीविरोधात पोलिसांची ‘हेल्पलाइन’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, उस्मानाबाद

अवैध सावकारीला आळा घालण्यासाठी राज्यात सर्वप्रथम उस्मानाबाद जिल्ह्यात पोलिस दलातर्फे हेल्पलाइन सुरू करण्यात आली आहे. यासाठीचा मोबाइल क्रमांक ७५८८५२७६२० असून, याचा वापर व्हॉटस्अपद्वारे देखील करता येईल, अशी माहिती जिल्हा पोलिस प्रमुख पंकज देशमुख यांनी दिली.

जिल्ह्यात अवैध सावकारीच्या जाचस कंटाळून आत्महत्या केल्याच्या घटना घडल्यानंतर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत आणि गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी उस्मानाबाद जिल्हा पोलिस दलाच्या वतीने तातडीने हेल्पलाइन कार्यान्वित करण्याच्या सूचना दिल्या होत्या. नागरिकांनी अवैध सावकारी संदर्भातील तक्रारी या हेल्पलाइनवर दिल्यास पोलिस विभाग याची तातडीने दखल घेत ही तक्रार पुढील कारवाईस्तव जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडे सुपूर्द करेल. जिल्ह्यातील सर्व पोलिस स्टेशनमधून ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या तक्रारीची दखल घेण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा कार्यान्वित केली आहे, अशी माहिती पंकज देशमुख यांनी दिली.
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर, उस्मानाबादसह मराठवाड्याच्या अनेक भागामध्ये अवैध सावकारी आणि त्यांच्या त्रासामुळे पिडित शेतकऱ्यांच्या घटना सातत्याने समोर येत आहेत.
उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये तरुण शेतकऱ्याने आत्महत्या केल्यानंतर या प्रश्नावर आणखी चर्चा होण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे, अवैध सावकारांवर कडक कारवाई करण्याच्या दृष्टीने सहकार विभाग आणि पोलिसांकडून पावले उचलण्यास सुरुवात झाल्याचे दिसत आहे. सहकार विभागाकडून काही सावकारांवर कारवाई केली आहे. मात्र, आणखी कडक कारवाई करत अवैध सावकारांमध्ये जरब निर्माण करण्याची मागणी सामान्य नागरिकांमधून व्यक्त करण्यात येत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जावयाची सासऱ्याला बेदम मारहाण

$
0
0

औरंगाबाद : शाब्दिक वादावादीमध्ये जावयाने सासऱ्याला स्टंपने बेदम मारहाण केल्याचा प्रकार सोमवारी दुपारी गरमपाणी भागात घडला. याप्रकरणी आरोपी जावयाविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी क्रांतिचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बाबुराव देवराव जाधव (वय ६५, रा. गरमपाणी) यांच्याकडे सोमवारी दुपारी त्यांचा जावई साहेबराव गंगाधर महापुरे (रा. पडेगाव, छावणी) हा आला होता. यावेळी त्यांच्यात किरकोळ कारणावरून शाब्दिक वादावादी झाली. यावेळी जाधव यांनी शिवीगाळ केल्याच्या कारणावरून महापुरे याने हातातील लाकडी स्टंपने बेदम मारहाण केली. यावेळी त्यांच्या डोक्यात, कपाळावर गंभीर जखमा झाल्या. याप्रकरणी साहेबरावच्या मेव्हणीने दिलेल्या तक्रारीवरून पोलिस ठाण्यात आरोपी साहेबराव विरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलिस निरीक्षक विजय घेरडे तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अभियंते, कंत्राटदाराकडून दहा लाखांची फसवणूक

$
0
0

‌म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

महापालिकेचे दोन शाखा अ‌भियंते व कंत्राटदारावर ड्रेनेज लाइनच्या कामात ९ लाख ९९ हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी बेगमपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महापालिकेचे कार्यकारी अभियंता हेमंत कोल्हे यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे.

पहाडसिंगपुरा वॉर्डातील जगदीशनगर नाला ते विद्यालंकार हाउसिंग सोसायटी यादरम्यान जलनिःसारण वाहिनी टाकण्याचे कंत्राट देण्यात आले होते. हे काम २१ फेब्रुवारी २०१४ ते ८ मार्च २०१६ या कालावधीत करण्यात आल्याचे दाखवण्यात आले. कंत्राटदार सचिन महापुरे यांनी या कामाचे कंत्राट घेतले होते, मात्र प्रत्यक्षात हे काम पूर्ण करण्यात आले नाही.

क‌ाम पूर्ण न करताच ते पूर्ण झाल्याची कागदपत्रे सादर करून महापालिकेची दहा लाखांची फसवणूक करण्यात आली. शाखा अभियंता बी. के. पवार यांनी या कामाचे बिल सादर केले. हे काम पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र घेऊन बिले उचलण्यात आली. कंत्राटदार सचिन महापुरे, शाखा अभियंते बी. के. गायकवाड व के. पी. पवार यांनी संगनमताने महापालिका व शासनाची फसवणूक केली. आयुक्तांच्या आदेशानुसार कार्यकारी अभियंता हेमंत कोल्हे (वय ५२, रा. एन पाच, सिडको) यांनी सोमवारी बेगमपुरा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून संशयित आरोपी अभियंते गायकवाड, पवार व कंत्राटदार सचिन महापुरे यांच्याविरुद्ध फसवणूक व खोटे हिशेब सादर केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक शेख सलीम याप्रकरणी तपास करीत आहेत.

तपासणीत उघड झाला गैरप्रकार
या कामाचा संशय आल्याने महापालिकेचे शहर अभियंता सखाराम पानझडे यांनी पूर्ण तपासणी करण्याचे आदेश दिले. याप्रकरणी कंत्राटदाराला म्हणणे सादर करण्याचे आदेश देण्यात आले, मात्र समाधानकारक उत्तर आले सादर केले नाही. त्यामुळे या कामाची पाहणी केली असता हा प्रकार उघड झाला. महापालिका आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांच्या निदर्शनास ही बाब आणून देण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बाजार फुलांनी बहरला

$
0
0

बाजार फुलांनी बहरला; महालक्ष्मीचे हार महागले
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
गणरायाचे आगमन झाले की, लगेच चाहूल लागते ती, महालक्ष्मीच्या आगमनाची. महालक्ष्मी म्हटले की सजावट, फुलांची आरास आणि फुलांचे हार आलेच. त्यासाठी बाजारात झेंडूच्या फुलांपासून ते विविध प्रकारची आरास करण्यासाठीचे फुले मोठ्या प्रमाणात आली आहेत.
यंदा हे हार सुमारे १५ ते २० टक्क्यांनी महागले आहेत. एक फूट ते १० फुटांपर्यंत हार यंदा १५० ते ८५० रुपयांपर्यंत मिळत आहेत. सिटी चौक, रंगारगल्ली, फूलमार्केट, आडवा सराफा, उस्मानपुरा या भागात सध्या फुलांचे हार आणि झेंडूच्या हर्राशीला चांगलाच भाव मिळाला आहे.
झेंडूची फुले १०० ते १२० रुपये किलो यानुसार मिळू लागली आहेत. जर्बेरा, ऑर्केड, केवडा, निशिगंधा, शेवंती आदींसह मोगरा व गुलाब यांचेही दर वाढले आहेत. जर्बेरा १५ ते २० रुपये नग, केवडा ४०० ते ४०० रुपये किलो, निशिगंधा ५०० ते ६०० रुपये किलो आणि शेवंती ४०० ते ४५० रुपये किलो यानुसार मिळू लागली आहेत. गणपती उत्सवात फुले महागली असून गौरी आवाहन (महालक्ष्म्यांचेआगमन) वेळी यात आणखी वाढ झाल्याचे युसूफ अमीन यांनी सांगितले. गावठी गुलाब ८० ते १०० रुपये डझन आणि इंग्लिश गुलाब सुमारे १० ते १२ रुपये नग यानुसार मिळत आहेत. उस्मानपुरा येथील फूल विक्रेते इरफान यांनी सांगितले की, झेंडुंचे हार गेल्या आठवड्यात ३० ते ४० रुपये हार या दराने विकले गेले. तर आता हे हार आज महालक्षमीच्या आगमनानिमित्त ६० ते ७० रुपयांना विकले जात आहेत.
वाशी, पुणे, मुंबई, हैदराबाद येथून फुले येत असून साधारण १५ ते २० टक्के आवकही वाढली आहे. आवक वाढली असली तरी फुलांचे दर काही कमी झालेले नाहीत. औरंगाबाद कृषी उत्पन्न बाजार समितीत, ‌सिटी चौक आणि इतर आडवा सराफा या भागात फुलांचे घाऊक (ठोकदर) दर कमी झालेले नाहीत. यामुळे किरकोळ दरातही वाढ झाल्याचे युसूफ अमिन यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घाटशीळमार्गेच मंदिरात प्रवेश

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, उस्मानाबाद
नवरात्राच्या काळामध्ये तुळजाभवानी मंदिरामध्ये गेल्या वर्षीप्रमाणेच घाटशीळमार्गेच प्रवेश देण्यात येणार आहे. सुरक्षितता आणि भाविकांच्या सोयीच्या दृष्टीने हे नियोजन करण्यात आल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
नवरात्राच्या काळामध्ये तुळजाभवानी मंदिरामध्ये मोठी गर्दी होत असते. लाखो भाविक दाखल होत असल्यामुळे, प्रशासनाला मोठी कसरत करावी लागत असते. सुरक्षिततेच्या दृष्टीने, प्रशासनाने गेल्या वर्षीपासून प्रवेशाच्या रचनेमध्ये बदल करत, भाविकांना घाटशीळमार्गे प्रवेश देण्यास सुरुवात केली आहे. मात्र, स्थानिक व्यापारी आणि नागरिकांकडून दर्शनी भागातील महाद्वारातून प्रवेश देण्याची मागणी करण्यात येत होती. मात्र, प्रशासनाने निर्णय कायम ठेवण्याची भूमिका घेतली आहे. श्री तुळजाभवानी मंदिर बरोबरच भाविकांची सुरक्षितता लक्षात घेऊन पोलिस विभाग आणि आपत्ती व्यवस्थापन यांच्या सुचनेनुसार घाटशील मार्गे प्रवेशाचा निर्णय देवस्थान समितीने घेतलेला आहे, अशी माहिती जिल्हा धिकारी तथा तुळजाभवानी देवस्थान समितीचे अध्यक्ष डॉ. प्रशांत नारनवरे यांनी दिली.
नवरात्रोत्सवात भाविकांना मंदिराच्या दर्शनी भागात असलेल्या महाद्वारातूनच प्रवेश देण्यात यावा अशी मागणी तुळजाभवानी देवस्थान समितीचे अशासकीय सदस्य असलेले आमदार मधुकरराव चव्हाण व नगराध्यक्षांनी केली. शिवाय हीच मागणी पुजारी मंडळाबरोबरच तुळजापूरच्या व्यापाऱ्यांनीही लावून धरली. राष्ट्रवादी काँग्रसेनेही याच मागणीचा पाठपुरावा केला. यामुळे मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात लोकप्रतिनिधी, विविध पक्षांचे पदाधिकारी, पुजारी मंडळाचे पदाधिकारी, सर्व संबंधित अधिकारी यांची एक बैठक बोलाविली होती. या बैठकीत जिल्हाधिकारी आपल्या निर्णयावर ठाम होते. तर लोकप्रतिनिधीसह पुजारी मंडळे महाद्वार मार्गेच भाविकांना मंदिरात प्रवेश द्यावा, या मागणीचा पाठपुरावा करीत होते. लोकप्रतिनिधी, पुजारी मंडळ व उपस्थित मंडळी यांच्या भावना लक्षात घेऊन भाविकांच्या प्रवेशासंबंधी विचार विनिमय करण्यासाठी आणखीन एक व्यापक बैठक घेण्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी मान्य केले.
या निर्णयामुळे येथील पुजारी मंडळींच्या सेवावर कुठलाही परिणाम होणार नाही. तसेच याचा फटका येथील व्यापारावर होणार नाही, याची पूर्ण काळजी देवस्थान समितीने घेतलेली आहे. गतवर्षी नवरात्रोत्सवात भाविकांना घाटशील मार्गेच मंदिरात प्रवेश देण्यात आला होता. या मार्गावर भाविकांसाठी देवस्थान समितीने सर्व सुखसोई उपलब्ध करून दिल्याने भाविकही समाधानी होते.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या या बैठकीस आमदार मधुकरराव चव्हाण व राणा जगाजितसिंह पाटील, तुळजापूरच्या नगराध्यक्ष मंजुषा मगर, जिल्हा पोलिस प्रमुख पंकज देशमुख, जिल्हा परिषद अध्यक्ष अॅड धीरज पाटील, पुजारी मंडळाचे अध्यक्ष सज्जनराव साळुंके, भोपी पुजारी मंडळाचे अध्यक्ष अमर परमेश्वर, तहसीलतदार सुजीत नरहरे व काशीनाथ पाटील आदी मंडळी उपस्थित होती.

सुरक्षेच्या दृष्टीने संवेदनशील
श्री तुळजाभवानी देवस्थान सुरक्षेच्या दृष्टीने संवेदनशील आहे. नवरात्रोत्सवात येथे येणाऱ्या भाविकांची संख्या लाखोंच्या घरात असते. नवरात्रोत्सवाच्या प्रारंभी मशाल घेऊन जाणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. तर उत्सवाच्या शेवटच्या टप्प्यात सोलापूरहून येणाऱ्या काठ्यांचा समावेश असतो. याशिवाय मंदिर परिसरात दररोज रात्री छबिना हा धार्मिक विधी पार पाडला जातो. या सर्व कार्यक्रमप्रसंगी भाविकांची सुरक्षितता महत्त्वाची आहे. या शिवाय हाय अॅलर्ट मध्ये करण्यात आलेला आहे. या सर्व बाबींचा तसेच आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेचा सर्वांगीण विचार करून व त्यांच्या शिफारसीनुसारच देवस्थान समितीचे भाविकांना मंदिराच्या मागील बाजूने घाटशीळ मार्गे प्रवेश देण्याचा निर्णय घेतलेला आहे.

देवीभक्तांशिवाय तुळजापूरकरांच्या धार्मिक भावना लक्षात घेऊन भाविकांचा मंदिराच्या दर्शनी भागातील महाद्वारातूनच प्रवेश देण्यात यावा.
- मधुकरराव चव्हाण,
आमदार तथा देवस्थान समिती सदस्य

देवस्थानची सुरक्षितता व भाविकांचे हित लक्षात घेऊनच केवळ नवरात्रोत्सवात भाविकांना घाटशीळमार्गे प्रवेश देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गेल्या वर्षी या बदलाचे भाविकांनी स्वागत केले. शिवाय घाटशीळ मार्गावर करण्यात आलेल्या सोयीसुविधांवर भाविक समाधानी होते.
- डॉ. प्रशांत नारनवरे,
जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष तुळजाभवानी देवस्थान समिती

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोलिसांवरील हल्ल्यांविरोधात मोर्चा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, लातूर
पोलिसांवरील वाढत्या हल्ल्यांच्या निषेधार्थ लातूरमध्ये बुधवारी मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. हल्लेखोरांवर कडक कारवाई करण्यात यावी आणि त्यांना कडक शिक्षा देण्यासाठी कायद्यात बदल करण्याची मागणी या वेळी करण्यात आली.
मुंबई वाहतूक शाखेत कार्यरत असणारे पोलिस हवालदार विलास शिंदे यांच्यावर हल्ला झाला होता आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला होता. त्यानंतरही राज्यात विविध ठिकाणी हल्ल्यांच्या घटना घडल्या आहेत. या हल्ल्यांच्या निषेधार्थ श्री गणेश वेल्फेअर सोसायटी व पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांच्या वतीने टाऊन हॉल ते जुने जिल्हाधिकारी कार्यालय या मार्गावर मूक निषेध मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये महापौर दीपक सूळ, मोईज शेख, राष्ट्रवादी काँग्रेसचे अशोक गोविंदपूरकर, शैलेश स्वामी यांच्यासह मनसे, छावा, एमआयएम यांच्यासह विविध पक्ष-संघटनांचे पदाधिकारीही सहभागी झाले होते. या मोर्चामध्ये चाळीस अंध युवकांनीही सहभाग घेतला होता.
मोर्चानंतर जिल्हाधिकारी पांडुरंग पोले यांना निवेदन देण्यात आले. त्यामध्ये विविध मागण्या करण्यात आले आहेत. पोलिसांवर झालेले हल्ले अजामीनपात्र गुन्हा नोंदविण्यात यावा, अशा गुन्ह्यांमध्ये कमीतकमी दहा वर्षांच्या शिक्षेची तरतूद करण्यात यावी, पोलिसांवर होणाऱ्या हल्ल्यांचे खटले फास्ट ट्रक कोर्टात चालविण्यात यावेत, सहा महिन्यांमध्ये त्याचा निकाल काढण्यात यावा, कर्तव्यावर असताना पोलिस अधिकारी-कर्मचारी मयत झाल्यास त्याच्या कुटुंबीयांना सरकारकडून तात्काळ पन्नास लाख रुपयांची आर्थिक मदत द्यावी, घरातील एका व्यक्तीस शासकीय नोकरीत देण्यात यावी, मृत पोलिस अधिकारी-कर्मचाऱ्याला शहिदाचा दर्जा देण्यात यावा, अशा मागण्या निवेदनात आहेत. गणेश वेल्फेअर सोसायटीचे अध्यक्ष एम. जी. पाटील आणि पदाधिकारी यांनी जिल्ह्याधिकाऱ्याना निवेदन दिले. मोर्चासमोर रवी जगताप आणि पोलिस पत्नी मनीष गणेश पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तुळजाभवानी कॉलेज वर्ग करा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, उस्मानाबाद

श्री तुळजाभवानी देवस्थान समितीच्या वतीने चालविण्यात येणारे तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालय सरकारकडे वर्ग करण्यात यावे. या कारवाईस कधीही विरोध केलेला नाही, असे आमदार मधुकरराव चव्हाण यांनी बुधवारी स्पष्ट केले.
या महाविद्यालयाच्या कारभाराबाबत तक्रारी असून, त्यामुळे हे महाविद्यालय राज्य सरकारकडे वर्ग करण्यात यावे, अशी मागणी गेल्या काही दिवसांपासून होत आहे. तसेच, स्थानिक लोकप्रतिनिधींचा या हस्तांतराला विरोध असल्याचा आरोपही करण्यात येत होता. या पार्श्वभूमीवर, चव्हाण यांनी वरील मागणी केली आहे. देवस्थान समितीवर अशासकीय सदस्य असून, या महाविद्यालयाचा संपूर्ण कारभार देवस्थान समितीचे अध्यक्ष या नात्याने जिल्हाधिकारी पाहत असल्याचे सांगतानाच,
स्थानिक लोकप्रतिनिधीचा हे महाविद्यालय सरकारकडे वर्ग करण्यास विरोध असल्याचा कांगावा केला जात आहे, ही बाब योग्य नाही. याबाबतीत आम्हाला विचारात घेण्यात आलेले नाही, असेही त्यांनी सांगितले. ते म्हणाले, 'जिल्हाधिकाऱ्यांनी शासनाला प्रस्ताव पाठविणे गरजेचे आहे. या संदर्भात देवस्थान समितीने बैठक बोलाविणे गरजेचे आहे. मात्र, अशी बैठक होत नाही. या महाविद्यालयास मीच तत्कालीन मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्याकडून विनाविलंब मंजुरी मिळवून दिलेली आहे.'
येथील प्राचार्य व प्राध्यापकांचा थकीत पगार रक्कम देवस्थान समितीने देवस्थानच्या निधीतून देणे गरजेचे आहे. प्राचार्य प्राध्यापक संस्थेविरोधात न्यायालयात गेले म्हणून त्यांचे वेतन न देणे, हे योग्य नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. देवस्थान समितीकडून हे महाविद्यालय चालविणे शक्य नसल्यास हे महाविद्यालय विनाविलंब सरकारकडे वर्ग करावे. या महाविद्यालयाला गतवैभव व प्रतिष्ठाप्राप्त व्हावी एवढीच अपेक्षा असल्याचेही त्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


महासंघ असलेले एकमेव शहर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
राज्यातील गणेश महासंघ असलेले औरंगाबाद एकमेव शहर आहे. महासंघ यंदाचा ९२वा गणेशोत्सव साजरा करीत आहे. निजामाच्या राजवटीत या महासंघाची मुहूर्तमेढ रोवण्यात आली आहे.
औरंगाबाद शहर ऐतिहासिक शहर म्हणून ओळखले जाते. निजामकालीन राजवटीत सर्व हिंदू एकत्र यावे या हेतूने सर्वप्रथम सराफा येथील रवी पेंटर यांच्या दुकानात रवी पेंटर, बाबुसेठ कदम, दत्तोपंत पवार, भुजंगराव पवार यांनी सार्वजनिक गणेशाची स्थापना केली. यानंतर या उत्सवाला एकत्रित स्वरूप प्राप्त झाले. त्यावेळी गणेश महासंघाची स्थापना करण्यात आली. त्यासाठी संग्रामसिंग चव्हाण, दादुराम बसैये, गोविंदभाई श्रॉफ, दादासाहेब गणोरकर, नाथप्रसाद दीक्षित, डॉ. शंकर पुरेवार, सरदार सतसिंग ग्रंथी आदींनी पुढाकार घेतला.

राजकीय नेत्यांचा उदय
जिल्हा गणेश महासंघाचे अध्यक्षपद हे अनेक तरुण कार्यकर्त्यांचे राजकीय क्षेत्रात स्थान देणारे ठरले. महासंघाचे अध्यक्षपद मिळणे ही सामाजिकदृष्ट्या मानाची बाब समजली जाते. राजकीय पक्षात आपसात कटुता व भेदभाव नको या दृष्टिकोनातून सर्वच राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्याला दरवर्षी एक याप्रमाणे संधी देण्यात येते. यंदाच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे अभिजित देशमुख यांची वर्णी लागली आहे.

एकखांबी नेतृत्व
महासंघ उत्सव समितीचे संस्थापक अध्यक्ष पृथ्वीराज पवार गेल्या ४६ वर्षांपासून महासंघाचे कामकाज पाहत आहेत. कोणत्याही राजकीय पक्षाशी बां‌धिलकी नसलेले पवार सामाजिक क्षेत्रात निष्कलंक म्हणून ओळखले जातात. त्यांच्या कडक शिस्तीमुळे अद्यापही महासंघांच्या कारभारात कोणत्याही प्रकारच्या राजकारणाने शिरकाव केलेला नाही.

अधिकृत स्वरूप प्राप्त
१९६६साली गणेश संघाचे जिल्हा गणेश महासंघात रुपांतर करण्यात आले. या महासंघाला अधिकृत महत्त्व प्राप्त झाले. पृथ्वीराज पवार, प्रकाश मुगदिया, अशोक पाटील डोणगावकर, राधाकृष्ण शेवाळे यांनी बदलत्या काळात महासंघाची सूत्रे हाती घेतली. १९६६मध्ये महासंघाची प्रथम निवडणूक घेण्यात आली. यावेळी मनमोहन अग्रवाल यांची अध्यक्षपदी निवड झाली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अॅड. अरुणभाई कापडिया यांनी काम पाहिले होते.

महासंघ उत्सव समितीची स्थापना
महासंघ स्थापन झाल्यानंतर ४६ वर्षांपूर्वी गणेश महासंघ उत्सव समितीची स्थापना करण्यात आली. अध्यक्ष म्हणून पृथ्वीराज पवार यांची निवड करण्यात आली. सध्या महासंघ उत्सव समितीतर्फे गणेशोत्सवाचे आयोजन करण्यात येते.

एकत्रित मिरवणुकीची परंपरा
महासंघाची स्थापना झाल्यानंतर संस्थान गणपती येथून सार्वजनिक मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली. शहरातील सर्वच सार्वजनिक गणेश मंडळ यामध्ये सहभागी होतात. ही परंपरा अद्यापही कायम आहे. मिरवणुकीचा प्रारंभ करताना शहरातील पोलिस आयुक्त, जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त यांची आवर्जून हजेरी असते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घरातील उत्सव होणार ‘ग्लोबल’

$
0
0

औरंगाबाद : विघ्नहर्त्या वरदविनायकाच्या उत्सवाला सुरुवात झाली आहे. घरोघरचे उत्सवी वातावरण आणि बाप्पाच्या स्वागतासाठी तुम्ही केलेला खास पदार्थ आणि आकर्षक सजावट आता जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचू शकणार आहे. 'महाराष्ट्र टाइम्स'ने वेबसाइटच्या माध्यमातून ही संधी उपलब्ध करून दिली असून, त्याद्वारे घराघरातला उत्सव आता खऱ्या अर्थाने ग्लोबल होणार आहे.
शहरात ठिकठिकाणी सोमवारी बाप्पांचे धूमधडाक्यात आगमन झाले. लाडक्या बाप्पाचे स्वागतासाठी घराघरात प्रत्येक सदस्याने मेहनत घेतली असून, गणरायाच्या आदरातिथ्यासाठी सजावटही केली आहे. गृहिणींनी पुढील दहा दिवसांसाठी प्रसादाचे बेत रचले आहेत. तुमचे हे नियोजन, बाप्पासाठी केलेली सजावट वेबसाइटद्वारे देश-विदेशांतील आप्तेष्टांनाही पाहता येणार आहे. या भक्तांसाठी वेबसाइटचे व्यासपीठ उपलब्ध केले आहे. सटावटीबरोबरच गृहिणींनी केलेली विविध खाद्यपदार्थांच्या रेसिपीही फोटोसह वेबसाइटवर अपलोड करता येणार आहेत. घरातील, सार्वजनिक गणपती मंडळ आणि विसर्जन मिरवणुकीचे व्हिडिओ देखील अपलोड करता येतील. त्यामुळे आता जास्त वाट पाहू नका. मोबाइल हातात घ्या आणि रेसिपी जगभरात पोहोचवा.

वेबसाइटवर स्वतंत्र विभाग
वेबसाइटवर स्वतंत्र विभाग करण्यात आले आहेत. गणेशमूर्ती, मंडळे, घरगुती गणेश, कुटुंबासह बाप्पा, बाप्पाचा फॅन या विभागांतर्गत तुम्ही गणरायाचे फोटो अपलोड करता येतील. फोटोंसाठी घरचा गणपती, सार्वजनिक गणपती, सेल्फी विथ बाप्पा आणि गणपती विसर्जन मिरवणूक असे चार विभाग कऱण्यात येणार आले आहेत. अधिक माहिती www.mtganeshutsav.com या वेबसाइटवर उपलब्ध आहे. याशिवाय गणेशभक्तांना ९२७७०००७११ या व्हॉटस अॅपवर, इन्स्टाग्राम वर #mtganeshutsav आणि ट्विटर हँडल #mtganeshutsav वर फोटो पाठवता येणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सजीव देखाव्यांची परंपरा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
सजीव देखाव्यांच्या माध्यमातून राष्ट्रीय एकात्मतेसह विविध विषयांवर जनजागृती करणारे मंडळ म्हणून जबरे हनुमान गणेश मंडळाची ओळख आहे. ही परंपरा मंडळाने यंदाही कायम ठेवत दहशतवाद या विषयावर संजीव देखाव्याचे नियोजन केले आहे. व्यसनमुक्तीसाठी प्रयत्नशील असलेल्या या मंडळाची स्थापना १९६७मध्ये स्व. लखन पहेलवान तुळशीबागवाले यांनी स्थापन केलेल्या जबरे हनुमान गणेश मंडळ ५०व्या वर्षांत पर्दापण करत आहे.
लखन पहेलवान तुळशीबागवाले व त्यांच्या मित्रांनी एकत्र येऊन दहीहंडी फोडण्यासाठी गोविंदा पथकाची स्थापन केली. पुढे यांच मित्रांनी जबरे हनुमान गणेश मंडळ स्थापन केले. मंडळात सध्या तिसरी, चौथी पिढी कार्यरत असून, वरिष्ठ कार्यकर्त्यांच्या मार्गदर्शनखाली मंडळाच्या कामासाठी अडीचशेहून अधिक कार्यकर्ते कार्यरत आहेत. तरुण पिढी हा देशाचा आधार असतो. ती निरोगी आणि व्यसनमुक्त व सदृढ असावी, असा जुन्या कार्यकर्त्यांचा आग्रह सदैव आहे. मुलांना व्यायाम, खेळाची आवड निर्माण व्हावी, यासाठी मंडळातर्फे विशेष प्रयत्न केले जातात.
१९६७पासून दहीहंडीची पंरपरा जोपासणारे व सध्या दहीहंडी फोडण्यात आघाडीवर असलेल्या या मंडळाच्या कार्यकर्त्यांनी गणेशोत्सवात सजीव देखावे सादर करण्याची परंपरा गेल्या २२ वर्षांपासून सातत्यांने टिकवून ठेवली आहे. १९८०मध्ये मराठवाडा विकास आंदोलनावर बोलके भाष्य करणारा मंडळाने सादर केलेला देखावा खूप गाजला होता.
बालविवाह, अक्षरधाम मंदिर हल्ला, हिमायतबाग चकमक, देशभक्तीपर देखावे यासह दरवर्षी सामाजिक आशय घेत सजीव देखावे सादर करण्याची मंडळाची परंपरा आहे. गणेशोत्सवाच्या सुमारे २० ते २५ दिवस आधीपासून यासाठी विशेष तयारी केली जाते. स्थानिक कलाकारांना या निमित्ताने आपले कलागुण दाखविण्याची संधी मिळते त्यांनी हक्काचे व्यासपीठ मिळते. रक्तदान शिबिर, भंडारा हे सामाजिक उपक्रम मंडळातर्फे राबविले जातात. मंडळाची विसर्जन मिरवणुकीत पाहण्यासारखी असते. तलवारबाजी, भाल फिरवणे यांसह विविध मर्दानी कवायती कार्यकर्ते सादर करतात. मंडळातर्फे यंदा दशहतवाद या विषयावर देखावा सादर करण्याचे नियोजन केले आहे.

यंदा सात फूट गणरायाची मूर्तीची प्रतिष्ठापना केली आहे. सजीव देखाव्याचे नियोजन सुरू आहे. ज्येष्ठ कार्यकर्त्यांच्या मार्गदर्शनाखाली आता तरुण कार्यकर्ते मंडळाचे कामकाज पाहतात.
- किशोर तुळशीबागवाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मी कारभारीण : ...उजळल्या छंदाने वाटा!

$
0
0

ravindra.taksal @timesgroup.com
Tweet : @rtaksalMT
सुलभा भाले जालना जिल्ह्यातील टेंभुर्णीच्या. माहेरचे नाव सुलभा हरिहर देव. वडील एस. टी. महामंडळात अधिकारी. नोकरीनिमित्त त्यांची चार ते पाच वर्षांत अन्य जिल्ह्यात बदली होई. त्यामुळे बीड, परभणी अशा विविध जिल्ह्यात देव कुंटुंबियांचे वास्तव्य झाले. आई गृहिणी. घरात पालकांसह चार बहिणी. सुलभा थोरल्या. पहिली ते आठवीपर्यंतचे शिक्षण लातूरला झाले. लहानपणापासून अभ्यासात हुशार असलेल्या सुलभा यांना खेळाची, वकृत्व स्पर्धेतची आवड होती. त्यातूनच त्यांच्यात खिलाडूपण व नेतृत्त्वाची जडणघडण झाली. सकाळी लवकर उठणे, देवपूजा, अभ्यासासह सर्व कामे वेळेवर करणे. त्यासाठीचे नियोजन आणि शिस्त त्यांना लहानपणापासून लागली. स्वावलंबनाचे धडे आणि व्यवहार ज्ञान त्यांना वडीलधाऱ्यांकडून मिळाले. नोकरीनिमित्ताने वडिलांना अन्य जिल्ह्यात जावे लागे. त्यामुळे किराणा भरणे, वीज बिलासह बँकिगच्या कामाची सर्व जबाबदारी सुलभा सांभाळत. ९ वी ते ११ वी पर्यंत त्यांचे शिक्षण परभणी जिल्ह्यातील वसमत येथे झाले. त्यावेळी वकृत्व स्पर्धेत सध्या सनदी अधिकारी असलेले जयराज फाटक यांच्याबरोबर स्पर्धा होत असे. वडिलांच्या बदलीनिमित्त त्या पुढे औरंगाबादला राहण्यास आल्या आणि औरंगाबादकर झाल्या.
१९७५मध्ये कला शाखेतून पदवीधर झाल्या. मराठी विषयात त्या विद्यापीठातून प्रथम आल्या होत्या. पुढे बीएड तसेच बी. कॉमचे शिक्षण घेतले. नोकरीसाठी आवश्यक म्हणून याच दरम्यान मराठी, इंग्रजी टंकलेखनाचे प्रशिक्षण पूर्ण केले.
हे सर्व शिक्षण सुरू असताना भरतकाम, विणकाम, शिवणकलेची गोडी लागली. या कलेच्या जोरावर गणेश मंडळातर्फे आयोजित स्पर्धेतही त्यांनी अनेक बक्षिसे मिळवली. या प्रोत्साहानामुळे अवगत कला, कौशल्याच्या माध्यमातून व्यवसाय सुरू करू, असे त्यांनी ठरविले. १९७९मध्ये वडिलांचे निधन झाले. घरच्यांच्या आधारासाठी त्यांनी शिकवणी वर्ग घेतले. छंद, अवगत कौशल्याच्या जोरावर गृहउद्योग सुरू करण्याच्या इच्छेला मुरड घालावी लागली, पण जिद्द संपली नव्हती. काही महिन्यातच त्यांना एस. टी. महामंडळात नोकरी लागली आणि पुढे औरंगाबादमध्ये एका नामांकित कंपनीत नोकरीस असलेल्या अशोक भाले यांच्याशी विवाह झाला. सासू, सासरे त्याकाळी नोकरीनिमित्त दिल्ली, तर हे नवविवाहित जोडपे समर्थनगरात राहत असे. सासरीही त्यांना माहेराप्रमाणे संपूर्ण निर्णय स्वतंत्र्य मिळाले. यातूनच त्यांनी त्याकाळी बचत गटाची स्थापना करत परिचित लोकांना विशेषतः महिलांना बचतीचे महत्त्व पटवून दिले. संसार वेल वाढला. घरकाम, दोन्ही मुलांचे संगोपण, नोकरी यांची सांगड घालत त्यांनी भरतकाम, विणकामसह अन्य छंद जोपासले. त्यात नवनवीन प्रयोग सुरू ठेवले. मावस बहीण विभा कुलकर्णी यांच्याकडून त्यांनी मोत्याचे विविध दागिने, वस्तू निर्मितीचे शिक्षण घेतले. व्यवसाय सुरू करण्याची जिद्द त्यांना शांत बसू देत नव्हती, पण पतीची खासगी नोकरी असल्याने नोकरी सोडून देण्याची जोखीम स्वीकारणे त्याकाळी शक्य नव्हते. थोड्याफार प्रमाणात त्या नवनवीन वस्तू तयार करून ओळखीच्यांना देत. त्याला चांगला प्रतिसाद मिळत असल्याने त्यांचे प्रोत्साहन वाढत गेले. २०१२मध्ये त्यांचे पती अशोक यांचे निधन झाले. २०१३मध्ये सुलभा सेवानिवृत्त झाल्या. योगायोगाने त्यांच्या मोठ्या मुलास चांगली नोकरी मिळाली. पुढील काही महिन्यातच त्यांनी घरगुती स्वरुपात सुरू असलेल्या मोत्यांच्या दागिने निर्मितीस व्यावसायिक स्वरूप दिले.
मोती सुपारी, मोबाइल कव्हर, टेबल मॅट, रांगोळ्या, फुले, महालक्ष्मीचा कंबर पट्टा, पावले आदी वस्तूंची निर्मिती करू लागल्या. ओळखीच्या लोकांसह परिसरातील महिलांकडून त्यास चांगली मागणी होऊ लागली. विविध प्रदर्शनाच्या माध्यमातून अनेक ग्राहकांनी सुलभा यांनी तयार केलेल्या वस्तूंना पसंती दिली. व्यवसाय वाढत असतानाच यात काहीतरी नवीन करावे, यासाठी त्या प्रयत्नशील होत्या. याच काळात 'महाराष्ट्र टाइम्स'मधील मुंबईच्या नंदिनी जोशी यांच्यावरील लेख त्यांच्या वाचनात आला. जोशी मोत्यांचे कंदील तयार करत. त्याप्रमाणे आपणही प्रयत्न करू, असे सुलभा यांनी ठरविले. फेसबूकच्या माध्यमातून त्यांनी जोशी यांना संपर्क साधला. त्यानंतर त्यांची प्रत्यक्ष भेट घेत काही टिप्स घेतल्या आणि मोती सुपारी, मोरे, मोबाइल कव्हर अशा विविध वस्तूसह आकर्षक अशा मोती कंदीलची निर्मिती सुरू केली. आकाश कंदीलाला मोत्यांची झालर देण्याचा हा प्रयोग चांगला यशस्वी झाला. अल्पकाळात त्यास मोठी मागणी वाढली. गेल्या दोन वर्षांपासून अनेकांची दिवाळी सुलभा यांनी तयार केलेल्या मोती कंदीलाने प्रकाशमान झाली. यंदाच्या दिवाळीसणांननिमित्त आतापासूनच सुमारे पन्नासहून अधिक कंदीलाचे बुकिंग झाले असून यात अमेरिका, लंडन तसेच कॅनडातून सुमारे दहा कंदील बुक झाले आहेत.
या कंदीलमध्ये तीन व्हॅटचा एलईडी लावता येतो. व्यवसाय वाढत असल्याने त्या आता मुंबईहून कच्चा माल आणतात. वस्तू तयार करणे, त्यांचे मार्केटिंग, हिशोब ठेवणे ही सर्व कामे त्या स्वतः करतात. जिद्द, मेहनत व नियोजन असले, तर व्यवसाय असो की अन्य क्षेत्र यश हमखास मिळते, असे त्या मानतात. एन ४, सिडको एफ सेक्टर भागात राहणाऱ्या सुलभा यांनी सुनेच्या नावाने आपल्या गृह उद्योगास 'श्वेताज पर्ल कलेक्शन' असे नाव दिले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

औरंगाबादेतही पोलिसांवर हल्ला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या चार्ली जवानाला चौघांनी मारहाण करीत गणवेश फाडला. भवानीनगर भागात सोमवारी रात्री अकरा वाजता हा प्रकार घडला. याप्रकरणी जिन्सी पोलिस ठाण्यात आरोपीविरुद्ध शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलिस कर्मचारी अंकुश गंगाराम वाघ हे पोलिस मुख्यालयात कार्यरत असून, सध्या जिन्सी हद्दीत चार्ली जवान म्हणून तैनात आहेत. सोमवरी रात्री वाघ गस्त घालित असताना त्यांना भवानीनगर येथील गल्ली क्रमांक चार येथे भांडण सुरू असल्याची माहिती पोलिस ठाण्याकडून देण्यात आली व घटनास्थळी जाण्याचे सांगण्यात आले. या माहितीवरून वाघ भवानीनगर भागात गेले. यावेळी तेथे चार ते पाच जण आपसात मारामारी करीत होते. हे भांडण सोडवून वाघ माहिती घेण्याचा प्रयत्न करीत असताना चौघांनी त्यांच्याशी व इतर जवानांशी हुज्जत घातली. पोलिसांना शिवीगाळ करीत वाघ यांचा गणवेश फाडून मारहाण करण्यात आली; तसेच तुम्ही येथे दादागिरी कशी काय करता, तुमची नोकरी घालवतो, अशी धमकी आरोपींनी दिली. याप्रकरणी वाघ यांनी दिलेल्या तक्रारीवरून आरोपी राहुल राधाकिसन कंकरिया, शंभू प्रभाकर चव्हाण, शैलेंद्र बाबुलाल मुदीराज व प्रवीण रामचंद्र गोरे (सर्व रा. भवानीनगर, जुना मोंढा) यांच्या विरुद्ध शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सरकता जिना हमालांच्या मुळावर

$
0
0

औरंगाबाद : रेल्वे स्टेशनवर प्रवाशांना जास्तीत जास्त चांगल्या सुविधा मिळाव्यात म्हणून नवनवीन अत्याधुनिक उपकरणांचा वापर सुरू केला जात आहे. काही दिवसांपूर्वीच रेल्वे स्टेशनवर सरकता जिना प्रवाशांच्या सेवेत दाखल झाला. मात्र, याचा फटका स्टेशनवरील हमालांना बसला आहे.

स्टेशनवर सध्या प्रवाशांचे सामान उचलण्याचे काम दिवसा सहा, तर रात्री सहा हमाल करत आहेत. मुख्यत्वेकरून एका प्लॅटफॉर्मवरून दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर सामान नेण्यासाठी प्रवासी या हमालांची मदत घेतात. रेल्वे स्टेशनवर आलेला प्रवासी बहुतांशवेळा आपले सामान स्वतःच प्लॅटफॉर्मवर घेऊन येतो. मात्र, दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर नेण्यासाठी हमालाला हमाली देऊन ते सामान त्याच्याकडून दुसरीकडे नेले जाते. तथापि, काही दिवसांपूर्वी प्रवाशांच्या सेवेत सरकता जिना दाखल झाल्याने आता बहुतांश प्रवासी या जिन्यावरून आपले सामान घेऊन जाताना दिसत आहेत. त्यामुळे येथील हमालांना मिळणारी हमाली कमी झाली आहे. लिफ्टच्या सेवेमुळेही त्यांची हमाली घटली होती. आता सरकत्या जिन्यामुळे त्यांना झळ सोसावी लागत आहे. दिवसाला ३०० ते ४०० रुपये कमाई होणाऱ्या हमालास आता दिवसाकाठी केवळ १०० ते २०० रुपये मिळू लागले आहेत.

चार लाख रुपये बोली

एकीकडे हमालांना रेल्वे स्टेशनवर काम नाही अशी ओरड केली जात आहे. मात्र, हमालाचे लायसन्स ट्रान्सफर करण्यासाठी चार लाख रुपयांपर्यंतची ऑफर सध्याच्या हमालांना केली जात असल्याची माहिती रेल्वेच्या सूत्रांनी दिली.

केंद्रात सत्ता बदल झाल्यानंतर 'अच्छे दिन आयेंगे' अशी घोषणा केली होती. रेल्वे स्टेशनवरील सुविधा वाढविल्यानंतर प्रवाशांसाठी झालेली सोय ही हमालांच्या पोटावर पाय देणारी ठरली आहे.

- शेख रफिक

हमालीचे काम येथे आता बंद झाल्यागत स्थिती आहे. लालू प्रसाद यादवांच्या काळात हमालांना रेल्वे सेवेत घेण्यात आले होते. तसाच एखादा निर्णय आता हमालांसाठी घ्यावा, अशी आमची मागणी आहे.

- युसूफ शहा

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आमदार निधीच्या खर्चात बागडे सर्वात ‘कंजूष’!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मतदारसंघातील विकासकामांसाठी शासनाकडून आमदारांना दिला जाणारा निधी खर्च करण्यात जिल्ह्यातील आमदार हात आखडता घेत आहेत. विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी आपल्या मतदारसंघात आमदार निधीतून केवळ ४४ हजार रुपये खर्च केले अाहेत. औरंगाबाद पूर्व व पश्चिम मतदारसंघातील आमदारांचा खर्चही प्रत्येकी दोन लाखांपेक्षा अधिक नाही.

निधी मिळत नसल्याने कामे होत नाहीत, असा नेहमीचा आरोप लोकप्रतिनिधी करीत असतात, मात्र शासनाकडून विकासकामांसाठी वेळेवर निधी मिळूनही खर्च करण्यात लोकप्रतिनिधी अपयशी ठरत असल्याचे चित्र औरंगाबाद जिल्ह्यात आहे. औरंगाबाद पूर्व, पश्चिम, मध्य मतदारसंघांत मोठ्या प्रमाणावर शहरी भागाचा समावेश आहे. शहरात नागरी समस्यांचे डोंगर उभे असताना येथील लोकप्रतिनिधींकडून मात्र हक्काचा निधी खर्च करण्यात रस दाखवित नसल्याचे चित्र आहे. आमदारांना त्यांच्या मतदारसंघात विकासकामे करण्यासाठी दरवर्षी दोन कोटी रुपयांचा आमदार निधी शासनाकडून दिला जातो. २०१६-१७ या आर्थिक वर्षासाठी शासनाकडून जिल्ह्यातील ९ विधानसभा आणि विधानपरिषदेवरील दोन आमदारांना प्रत्येकी दोन कोटींचा निधी उपलब्ध करून दिला आहे. एप्रिल ते ऑगस्ट या पाच महिन्यांच्या काळात खर्चाचे नियोजन करून प्रस्ताव सादर करून त्यास मंजुरी घ्यावी लागते. त्यानंतर कामे सुरू केली जातात.

विधानपरिषद सदस्यांची अवस्था काहीशी अशीच आहे. सतीश चव्हाण यांनी एक लाख तर सुभाष झांबड यांनी ७१ लाख ७६ हजारांचा प्रस्ताव सादर केला आहे. गेल्या पाच महिन्यांच्या काळात शहरातील आमदारांना ग्रामीण भागातील आमदारांनी खर्च करण्यात मागे टाकले आहे.

जाधव आघाडीवर, नानांची पिछाडी

निधी खर्च करण्यात कन्नड विधानसभा मतदारसंघाचे आमदार हर्षवर्धन जाधव आघाडीवर आहेत. त्यांनी ऑगस्ट महिन्यापर्यंत १ कोटी ९० लाख ६४ हजारांची कामे मंजूर करून घेतली आहेत. सर्वात कमी खर्च हा फुलंब्रीचे आमदार व विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी केला आहे. आतापर्यंत त्यांच्या ४४ हजारांच्या कामास मंजुरी मिळाली आहे.

समस्या रस्त्यांची अन् खर्च खेळावर

पालिका हद्दीत तीन विधानसभा मतदारसंघ आणि फुलंब्री मतदारसंघाचा काही भाग येतो. या तिन्ही मतदारसंघातील बहुतांश रस्ते खड्डेमय आहेत. मध्य विधानसभा मतदारसंघात रस्त्यांसाठी सर्वाधिक खर्च मंजूर केला आहे. औरंगाबाद पूर्व व पश्चिम मतदारसंघांतील आमदारांनी बहुतांश निधी बॅडमिंटन स्पर्धा, ग्रंथालयावर खर्च केले आहेत.

२०१६-१७ चे प्रस्ताव

आमदार.......................मतदारसंघ..............मंजुरीसाठी प्रस्ताव
अतुल सावे...................औरंगाबाद पूर्व............१ लाख
संजय शिरसाट..............औरंगाबाद पश्चिम......१ लाख ९६ हजार
इम्तियाज जलील...........औरंगाबाद मध्य.........७३ लाख ४१ हजार
अब्दुल सत्तार................सिल्लोड....................५ लाख ९४ हजार
हर्षवर्धन जाधव...............कन्नड......................१ कोटी ९० लाख
हर‌िभाऊ बागडे..............फुलंब्री......................४४ हजार
प्रशांत बंब.......................गंगापूर....................१३ लाख २४ हजार
संदीपान भुमरे..................पैठण.......................३० लाख ९९ हजार
भाऊसाहेब चिकटगावकर....वैजापूर....................३५ लाख ९९ हजार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


घाटीत एका बेडवर तीन मुलांवर उपचार

$
0
0

दूषित पाण्याने लहान मुलांचे आरोग्य बिघडले

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शहरातील लहान मुले डेंग्यू, मलेरियाने फणफणली आहेत. अचानक ही संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. मात्र, त्यांना ठेवण्यासाठी घाटीत जागा नसल्याने एका बेडवर तीन तीन मुलांवर उपचार करण्याची वेळ आली आहे.

दूषित पाण्यामुळे शहरात सर्वत्र आजार वाढलेले आहेत. घाटीच्या बाल रुग्णालय विभागात मोठ्या प्रमाणात शहरातून आणि ग्रामीण भागातून ग्रामीण मुलांना उपचारासाठी आणले जात आहे. रुग्णांची संख्या वाढलेली असल्याने घाटीच्या बाल रुग्णालय विभागात जागा अपुरी पडत आहे. एवढी की एक बेडवर तीन तीन बालकांवर उपचार करावे लागत आहेत.

लहान मुलांचा वॉर्ड असल्याने या मुलांसोबत त्यांचे पालकही काळजीपोटी येतातच. एकाच जागेवर दोन-तीन मुलांवर उपचार होत असल्याने या ठिकाणी पालकांची गर्दी वाढू लागली आहे. शिवाय वेगवेगळ्या आजारांचे रुग्ण एका ठिकाणी आल्याने पालकांच्या चिंतेत भर पडली आहे.

कोणत्याही हॉस्पिटलमध्ये नियमानुसार बेड आणि रुग्णांच्या उपचारासाठी विशिष्ट जागा देणे आवश्यक असते. मात्र, घाटीसारख्या शासकीय रुग्णालयातच हे नियम गुंडाळून ठेवले गेले आहेत. रुग्णांची संख्या प्रचंड वाढल्याने व अन्यत्र जाणे परवडणारे नसल्याने गोरगरीबांना आपल्या पाल्याला येथून दुसरीकडे नेणेही शक्य नाही. त्यामुळे आहे त्या परिस्थितीतच ते आपल्या मुलांना येथे उपचार मिळावे म्हणून धडपडत आहेत.

उपचार घेण्यासाठी आलेल्या लहान मुलांची संख्या घाटीत वाढली आहे. रुग्ण कसे वाढले हे कारण आम्हीही सांगू शकत नाही. एरवीही घाटीत रुग्णांची संख्या बरीच असते. तरीही आहे त्या परिस्थितीत चांगले उपचार देण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत.

- डॉ. सुहास जेवळीकर, अधिक्षक, घाटी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मराठा आरक्षणावर सुप्रीम कोर्टात याचिका

$
0
0

म. टा. विशेष प्रतिनिधी ,औरंगाबाद

मराठा आरक्षणासंदर्भात सुप्रीम कोर्टात याचिका करण्यात आली आहे.शैक्षणिक आरक्षण मिळावे, अशी विनंती करणाऱ्या याचिकेची सुनावणी १९ सप्टेंबरला घेण्याचे निर्देश न्या. ए. आर. दवे, न्या. आर. के. अग्रवाल व एल. नागेश्वर राव यांनी दिले आहेत.

सामाजिक कार्यकर्ते विनोद नारायण पाटील यांनी ही याचिका केली आहे. या याचिकेवर सुनावणी घेण्यास कोर्टाने संमती दिली. राज्य शासनाने मराठा समाजासाठी १६ टक्के आरक्षणाचा कायदा तयार केला होता, पण मुंबई हायकोर्टाने स्थगिती दिली आहे. हायकोर्ट यावर निर्णय घेईल, असे सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केले होते. वर्ष झाले तरी हायकोर्टात मराठा आरक्षणावर सुनावणी झाली नाही, असा आक्षेप याचिकाकर्ते पाटील यांनी घेतला. पाटील यांची बाजू जेष्ठ वकील जयंत भूषण व संदीप देशमुख हे मांडत आहेत.

>२५ जून २०१४ : मराठा समाजाला १६% आरक्षण देण्याचा निर्णय

>९ जुलै २०१४ : केतन तिरोडकर यांची मुंबई हायकोर्टात जनहित याचिका

>१४ नोव्हेंबर २०१४ : हायकोर्टाने आरक्षणास दिली स्थगिती

>१८ डिसेंबर २०१४: सुप्रीम कोर्टाने राज्य शासनाची याचिका फेटाळली. मुंबई हायकोर्टाला लवकर सुनावणी घेण्याचे आदेश

>९ जानेवारी २०१५ : १६ टक्के आरक्षणाचा कायदा संमत

>७ एप्रिल २०१५ : हायकोर्टाने दिली पुन्हा स्थगिती, अंतिम सुनावणी १ जुलैला ठेवण्याचे आदेश

>६ सप्टेंबर २०१६ : सुप्रीम कोर्टात याचिकाकर्त्याची धाव

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अल्पवयीन मुलीचा विनयभंग; शिक्षकाला ३ महिने सक्तमजुरी

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
भर वर्गात सर्वांसमोर अल्पवयीन विद्यार्थिनीशी अश्लील वर्तन करून विनयभंग करणाऱ्या शिक्षकाला ३ महिने सक्तमजुरी व पीडितेला ५० हजार रुपये नुकसान भरपाई देण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी ए. वाय. एच. मोहम्मद यांनी दिले.
या प्रकरणी शहरातील आठ वर्षीय पीडित मुलीच्या आईने फिर्याद दिली होती. फिर्यादीनुसार, ४ जानेवारी २०१२ रोजी संबंधित पीडित मुलगी शाळेत असताना आरोपी व सहाय्यक शिक्षक विजय बावस्कर (रा. मारोतीनगर, मयूर पार्क, औरंगाबाद) याने भर वर्गात पीडित मुलीशी अश्लील वर्तन केले व तिची छेड काढून विनयभंग केला. या प्रकाराविषयी कुणाला सांगितल्यास परीक्षेत नापास करण्याची धमकी आरोपीने मुलीला दिली. घडला प्रकार पीडित मुलीने आपल्या आईला सांगितला आणि पीडितेच्या आईने ५ जानेवारी २०१२ रोजी सिडको पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर इतर विद्यार्थिनींनीदेखील आरोपीविरुद्ध मुख्याध्यापकांकडे तक्रारी केल्या. दरम्यान, महिला तक्रार समितीच्या सदस्यांनी पीडित व इतर विद्यार्थिनींचे जबाब नोंदविले. या प्रकरणी तपास अधिकारी पोलिस निरीक्षक हेमंत कदम यांनी तपास करून ९ जानेवारी २०१२ रोजी आरोपी शिक्षकाला अटक केली व कोर्टात दोषारोपपत्र दाखल केले.

६ साक्षीदार तपासले
खटल्याच्या सुनावणीवेळी सहाय्यक सरकारी वकील एन. एन. पवार यांनी ६ साक्षीदार तपासून गुन्हा सिद्ध केला. दोन्ही बाजुंच्या युक्तिवादानंतर कोर्टाने आरोपीला कलम ३५४ अन्वये तीन महिने सक्तमजुरीची शिक्षा व ५० हजार रुपये दंड व दंड न भरल्यास अजून एक महिना सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली. तसेच दंडाची रक्कम नुकसान भरपाई म्हणून पीडितेला देण्याचे आदेश कोर्टाने दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहर अभियंता पानझडे निलंबित

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
हर्सूल तलावातील गाळाचे टेंडर आणि टीव्ही सेंटर चौक ते जळगाव रोड रस्त्याच्या व्हाइट टॉपिंगच्या प्रकरणात महापालिकेचे आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांनी गुरुवारी शहर अभियंता सखाराम पानझडे यांना निलंबित केले. त्यांची विभागीय चौकशी करण्याचेही आदेश बकोरिया यांनी दिले आहेत. पानझडे यांच्यावर कारवाई करण्याचे धारिष्ट्य आतापर्यंत कोणत्याही आयुक्ताने दाखवले नव्हते. या कारावाईमुळे पालिकेतील अधिकाऱ्यांच्या लॉबीला मोठा हादरा बसला आहे. हर्सूल तलावातील गाळ प्रकरण व रस्त्याच्या व्हाइट टॉपिंगचे प्रकरण 'मटा'ने उघडकीस आणले होते.
हर्सूल तलावातील गाळाच्या टेंडरचे प्रकरण 'मटा'ने सर्वप्रथम ७ ऑगस्ट २०१५ रोजी उघडकीस आणले, तर 'रस्त्यांच्या कामाचे गौडबंगाल' या वृत्त मालिकेच्या माध्यमातून टीव्ही सेंटर चौक ते जळगाव रोड या रस्त्याच्या व्हाइट टॉपिंगच्या कामाचे प्रकरण २९ जून २०१६ रोजी उघड केले होते. या दोन्ही प्रकरणात आयुक्तांनी ही कारवाई केली आहे.
आयुक्तांनी पानझडे यांच्या निलंबनाच्या आदेशात म्हटले आहे की, हर्सूल तलावातील गाळ काढण्याच्या प्रकरणात गैरलागू दरसूचीनुसार तयार केलेल्या अंदाजपत्रकाची शहानिशा न करता, ते मंजुरीसाठी सादर केले. गाळ काढण्याच्या टेंडरला सर्वसामान्यांच्या नजरेस न पडणाऱ्या वृत्तपत्रात प्रसिद्धी देऊन विशिष्ट मर्जीतील व्यक्तीस हे काम मिळवण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. टेंडरमधील अटी-शर्ती शासन नियमांविरुद्ध आहेत. एक कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कमेच्या कामासाठी थर्डपार्टी तांत्रिक लेखापरीक्षण आवश्यक असताना शासनाचे निर्देश डावलून बिल सादर करण्यात आले.
टीव्ही सेंटर चौक ते जळगाव रोड जंक्शन रस्त्याच्या व्हाइट टॉपिंगप्रकरणी एक कोटीचे काम निविदा न काढता दरपत्रक मागवून मंजूर करण्यात आले. त्यात शासनाच्या नियमाचे पालन करण्यात आले नाही. कार्यकारी अभियंत्यांनी कंत्राटदार आर. के. इन्टरप्रायजेस हे अंदाजपत्रकीय दराने काम करण्यास तयार असल्याचे स्पष्ट केले असताना शहर अभियंता या नात्याने आपण ७.५ टक्के जास्त दराने काम मंजूर केले. त्यामुळे महापालिकेचे साडेसात लाख रुपयांचे नुकसान झाले. त्याला शहर अभियंता म्हणून आपणच जबाबदार आहात, असेही या आदेशात म्हटले आहे.
सर्वसाधारण सभा, स्थायी समितीची दिशाभूल झाली आहे. संगनमत करून एका विशिष्ट कंत्राटदाराला लाभ मिळावा या हेतूने शासनाच्या व महापालिकेच्या निधीचे नुकसान केले आहे, असा ठपका पानझडे यांच्यावर आयुक्तांनी ठेवला आहे. त्याचबरोबर पानझडे यांची विभागीय चौकशी करण्याचे आदेशही त्यांनी दिले आहेत.

सहा अधिकाऱ्यांवर कारवाई
बकोरिया यांनी २६ फेब्रुवारी २०१६ रोजी आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारली. आतापर्यंत, सहा महिन्यांत त्यांनी सहा अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली. टीडीआर प्रकरणात नगररचना विभागाचे सहाय्यक संचालक डी. पी. कुलकर्णी, उपअभियंता शिरीष रामटेके, कनिष्ठ अभियंता आर. पी. वाघमारे यांना निलंबित करून त्यांच्या विभागीय चौकशीचे आदेश दिले. बिबट्याच्या पिलांच्या मृत्युप्रकरणी प्राणिसंग्रहालयाचे संचालक डॉ. बी. एस. नाईकवाडे यांना निलंबित केले. पशूवैद्यकीय हॉस्पिटलमध्ये मुदत संपलेली औषधी वापरल्याप्रकरणी पशूवैद्यकीय अधिकारी शेख शाहेद यांना निलंबित केले. आता सखाराम पानझडे यांच्यावर त्यांनी निलंबनाची कुऱ्हाड कोसळली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सामाजिक असहिष्णुतेमुळे पोलिसांमध्ये असुरक्षितता

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
सामाजिक असहिष्णुतेमुळे पोलिसांत असुरक्षिततेची भावना निर्माण होत आहे. हा बेबनाव दूर करण्यासाठी गणेशोत्सवात दहा हजार पत्रके व डिजिटल बोर्ड लावून जनजागृती करण्याचे प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी दिली.
तुम्हीच आमचे डोळे, तुम्हीच आमचे कान, ठेवा आपल्या सुरक्षिततेसाठी आमचा मान किंवा तुमची सुरक्षितता हीच आमची भक्ती आणि जनता हीच आमची शक्ती, असे स्लोगन घेऊन बेबनाव दूर करण्यासाठी शहर पोलिस प्रयत्नशील आहेत. वर्षभरात पोलिसांवर हल्ले करण्याचे चाळीस प्रकार घडले. यामध्ये मुख्यतः वाहतूक पोलिस व चार्ली पथकासोबत असे प्रकार झाले. जनतेने देखील समजूतदारपणा दाखवत पोलिसांना आदर दिला पाहिजे, असे मत पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी व्यक्त केले.

गणेशोत्सव, ईदसाठी सज्ज
गणेशोत्सव काळातच सोमवारी बकरी ईद सण आहे. यानंतर गुरुवारी गणेश विसर्जन असून, शुक्रवारी छावणी येथील गणेश महासंघाचे विसर्जन आहे. यानंतर शनिवारी मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन असून या दिवशी मुख्यमंत्र्याचा दौरा आहे. हे पूर्ण दहा दिवस कडक बंदोबस्ताचे आहेत. या दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडल्यास पोलिस यंत्रणा त्यांच्याकडे असलेल्या सर्व शस्त्रअस्त्रानिशी सज्ज आहे, असे अमितेशकुमार म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images