Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

अखेर आरटीओ झाले दक्ष

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
अखेर आरटीओ दक्ष झाले आहेत. त्यांनी गुरुवारपासून उमेदवारांची ओळख पटल्याशिवाय त्यांना वाहन परवाना परीक्षेच्या सभागृहात प्रवेश करण्यास बंदी घातली आहे. शिकाऊ वाहन परवाना परीक्षेसाठी डमी उमेदवार बसल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.
आरटीओ कार्यालयात बुधवारी आकाश पांडे नावाच्या उमेदवाराच्या जागी साहिल चुडीवाल नावाचा तरुण परीक्षा देण्यासाठी आला होता. या घटनेनंतर गुरुवारी सकाळपासूनच वाहन परवाना परीक्षा देण्यासाठी आलेल्या उमेदवारांच्या ओळखपत्राची छाननी करण्यासाठी एका सहाय्यक मोटार वाहन निरीक्षकाची नेमणूक करण्यात आली होती. संबंधित कर्मचारी ‌शिकाऊ वाहन परवान्यासोबत जोडलेली कागदपत्रे आणि आपल्या सोबत ओळखपत्र असलेल्या उमेदवारांनाच प्रवेश देत होते. शिकाऊ वाहन परवाना घेण्यासाठी आलेल्या उमेदवारांचीही अशीच तपासणी करण्यात आली. या सभागृहात उमेदवारांशिवाय अन्य कोणलाही प्रवेश दिला जात नव्हता. डमी उमेदवार मिळाल्याचे प्रकरण सापडल्यानंतर, आरटीओ विभागाकडून ही कारवाई करण्यात आली.

आज शिकाऊ वाहन परीक्षा होणार
९ सप्टेंबर रोजी अनेक उमेदवारांनी शिकाऊ तसेच पक्के वाहन परवाना चाचणीसाठी अपॉइंटमेट घेतली आहे. त्यामुळे महालक्ष्मीसाठी सुटी जाहीर करूनही या उमदेवारांची गैरसोय टाळण्यासाठी वाहन चाचणी परवाना परीक्षा घेण्यात येणार आहे. याशिवाय १७ सप्टेंबर रोजी हैदराबाद मुक्तीसंग्राम दिनाची सुट्टी असल्याकारणाने अशा अपाइंटमेंट घेणाऱ्या उमेदवारांचे अर्ज १६ सप्टेंबर आणि १९ सप्टेंबर रोजी स्वीकारले जाणार आहेत, अशी माहिती सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे यांनी दिली.

वाहन परवाना परीक्षा देण्यासाठी बुधवारी डमी उमेदवार आला होता. विभागातील ही बोगसगिरी बंद करण्यासाठी आम्ही आजपासून उमेदवारांची ओळख पटल्यानंतरच त्याला परीक्षा सभागृहात प्रवेश दिला. ही कारवाई यापुढेही सुरू राहील. - सर्जेराव शेळके, प्रादेशिक परिवहन अधिकारी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


तुंबलेल्या खटल्यांवर समुपदेशन उतारा

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
कोर्टात कौटुंबिक वादांची अनेक प्रकरणे रखडली आहेत. त्यामुळे अनेकांचे आयुष्य उद‍्धवस्त होण्याच्या मार्गावर आहे. यावर तोडगा म्हणून नाशिक पाठोपाठ आता औरंगाबादमध्येही लेवा पाटीदार मंडळाने विवाह व कौटुंबिक वाद समुपदेशन या अभिनव केंद्राची स्थापना केली आहे. या केंद्राचे उदघाटन माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांच्या हस्ते १७ सप्टेंबर रोजी होणार आहे.
शहरात लेवा पाटीदार भ्रातृ मंडळाची स्थापना १६ ऑक्टोबर १९७९ रोजी झाली. मंडळाच्या विविध उपक्रमांसाठी जागाही विकत घेण्यात आली. या जागेवर हे समुपदेशन केंद्र सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष प्रवीणकुमार चौधरी व सचिव अविनाश फिरके यांनी गुरुवारी एका पत्रकार परिषदेत दिली. मयूरबन कॉलनीत शनिवारी सकाळी ११ वाजता खडसे यांच्या हस्ते केंद्राचे उद‍्घाटन होईल. या प्रसंगी लेवा पाटीदार भोरपंचायतचे कुटुंब नायक रमेश पाटील, खासदार रक्षा खडसे, माजी खासदार डॉ. गुणवंत सरोदे, माजी खासदार डॉ. उल्हास पाटील, आमदार हरिभाऊ जावळे, आमदार राजू भोळे, माजी आमदार नीळकंठ फालक यांची प्रमुख उपस्थिती राहाणार आहे, अशी माहिती चौधरी यांनी दिली.

तक्रारींचा जलद निपटारा
शहरात जवळपास तेरा हजार लेवा पाटीदार समाजाची लोकसंख्या आहे. प्रत्येक घरा-घरात वाद-विवाद होतात. भोरपंचायतीच्या माध्यमातून लेवा पाटीदार समाजातील प्रश्न सोडवले जातात. भोरपंचायतीसमोर सद्यस्थितीत ९ हजार ३४९ अर्ज कौटुंबिक वादाचे आलेले आहेत. त्यात ३०४ प्रकरणे मिटवली आहेत. घटस्फोटाचे ३ हजार ३०० अर्ज प्रलंबित आहेत. ५ हजार ६४७ अर्जांची चौकशी सुरू आहे. तक्रारींचे प्रमाण वाढते आहे. वेळेवर या तक्रारींचा निपटारा करण्यासाठी हे केंद्र काम करणार आहे. समुदेशक म्हणून अॅड. चैताली चौधरी-कुट्टी हे काम पाहणार आहेत.

गणपती देखावा स्पर्धा
लेवा पाटीदार भ्रातृ मंडळातर्फे समाजातील युवा वर्गाला जोडण्याकरिता घरगुती, वैयक्तिक गणपती देखावा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. गणपती आरास, देखाव्याचे फोटो पाठवण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. पाच सदस्यांची समिती पहिल्या तीन देखावा व आरास यांची निवड करणार आहे. त्यांना पारितोषिके देण्यात येणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वॉटरग्रीडचे काम सहा महिन्यांत सुरू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
दुष्काळी मराठवाड्याचा पाणीप्रश्न कायमचा दूर करण्यासाठी गुजरा‌तच्या धर्तीवर १५ हजार कोटी रुपये खर्च करून वॉटरग्रीड पद्धतीने पाणीपुरवठा योजना राबवण्यात येणार अाहे. येत्या सहा महिन्यांत या योजनेच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार असल्याची माहिती पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली.
विभागीय आयुक्त कार्यालयात महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाच्या वतिने वॉटरग्रीड संदर्भात पालकमंत्री बबनराव लोणीकर यांच्या उपस्थितीत सादरीकरण करण्यात आले. यावेळी लोणीकर म्हणाले की, सततच्या दुष्काळामुळे जलस्त्रोत झपाट्याने आटत आहेत. पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्नाला दरवर्षी सामोरे जावे लागते, हा प्रश्न कायमचा निकाली लागावा म्हणून वॉटरग्रीड करण्यात येणार आहे. मराठवाड्यातील मागणी असेल ती ग्रामपंचायत, नगरपालिका, महापालिका; तसेच एमआयडीसीला एकाच योजनेतून पाणीपुरवठा करण्यात येईल. या योजनेला राज्य शासनाची तत्वतः मंजुरी मिळाली अाहे. येत्या चार ते सहा महिन्यांमध्ये सर्वेक्षण पूर्ण झाल्यावर वॉटरग्रीडच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात होणार आहे. या योजनेत सर्व मराठवाड्याचा पाणीपुरवठा हाताळण्यासाठी ५० टक्के पाणी हे अस्तित्वात असलेल्या स्त्रोतातून, तर उर्वरित पाण्याची गरज मराठवाड्यालगत असलेल्या धरणांतून भागवण्यात येणार आहे.

असे होईल काम
पहिल्या टप्प्यामध्ये उजनी धरणातील पाणी मांजरा धरणात आणून विभागातील सर्व जिल्ह्यांतील ४० टक्के गावांना पुरविण्यात येईल. त्यासाठी साडेसहा कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. दुसऱ्या टप्प्यामध्ये इसापूर धरणाचे पाणी ऊर्ध्व मनारमध्ये आणि जायकवाडीच्या वरील क्षेत्रातून पाणी आणणे, जायकवाडीतून पाणी माजलगाव धरणात आणले जाईल. या टप्प्यामध्ये विभागातील ६० टक्के गावांचा समावेश राहणार असून, त्यासाठी साडेआठ कोटींचा खर्च अपेक्षित आहे.

या धरणांतून येणार पाणी
जायकवाडी : ८.४६
उजनी : ५.८५
खडकपूर्णा : ०.८३
ईसापूर : ३.३८
वाघूर : ०.१०
एकूण : १८.६२
( पाणी टीएमसीमध्ये)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

१३० वर्षांचे मंडळ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
शहरातील काही मोजक्या गणेश मंडळाची स्थापना स्वातंत्र्यापूर्वी झाली आहे. पद्मपुरा भागातील श्री बाल गजानन गणेश मंडळाची स्थापना निजामाच्या काळात झाली. या मंडळाला १३० वर्षांची परंपरा असून, गणेश मंडळाच्या माध्यमातून सांस्कृतिक वारसा जपण्याचे काम केले जात असल्याची माहिती मंडळाचे माजी अध्यक्ष नंदकूमार विठ्ठलराव देवतवाल यांनी 'मटा'शी बोलताना दिली.
पद्मपुरा भागात निजामाच्या राजवटीत श्री बाल गजानन गणेश मंडळाची स्थापना करण्यात आली. पद्मपुरा भागातील देवतवाल कुटुंबाची चौथी पिढी आज या मंडळाचे काम पाहत आहे. सध्या श्री बाल गजानन गणेश मंडळाचे काम कलश क्रीडा मंडळाच्या माध्यमातून पाहिले जाते. याबाबत गणेश मंडळाचे ज्येष्ठ सदस्य नंदकुमार देवतवाल यांनी सांगितले की, त्यांच्या दोन पिढ्यांआधी या मंडळांची स्थापना झाली होती. टिळकांनी १८९४मध्ये गणेशोत्सव सुरू केला, तर देवतवाल यांनी निजामाची राजवट असताना १८९६मध्ये औरंगाबादेत मंडळ स्थापन केल्याचे ते सांगतात. निजामाच्या काळात पद्मपुरा ते काळा दरवाजा यादरम्यान मिरवणूक काढण्यात येत होती, असे त्यांनी सांगितले.
गणेश मंडळाची जबाबदारी माझ्या वडिलांकडे आली. वडिलांकडून ती माझ्याकडे आली. टिळकांनी सांगितलेला गणेशोत्सव साजरा करण्याची परंपरा कायम ठेवली. त्या काळात रफीक झकेरिया, बाबुराव काळे यांच्यासहन अनेक मान्यवरांनी या मंडळाला भेटी दिल्या. या मंडळाने झांज पथकाची स्थापना केली आहे. पुण्याच्या कळसगावातून आलेल्या काही तरुणांचे झांज पथक शहरात आले होते. त्यानंतर कलश क्रीडा मंडळातर्फे झांज पथकाची पद्मपुऱ्यात करण्यात आली. पथकात सुरवातीस १५ ते १६ तरुण होते. हे तरुण युद्धकलेचीही प्रात्याक्षिके, अन्य कलाप्रकार सादर करीत होती. आज या मंडळात १५०हून अधिक तरुणांचा सहभाग आहे.

लाडू देणारा गणपती
पद्मपुऱ्याचा गणेश मंडळाने सजीव देखावे, तसेच अन्य सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्याची परंपरा आहे. पितामह भीष्मचा सजीव देखावा, कल्पना चावला ही भारतीय महिला अंतराळ गेल्याच्या प्रसंगावरून उपग्रहाचा सजीव देखावाही झांज पथकात सादर करण्यात आला होता. या मंडळाने लाडू देणारा गणपती असा देखावा सादर केला होता. हा देखावा प्रसिद्ध झाला होता.

उत्सवात झाले बदल
पूर्वीच्या गणेश मंडळात आणि आजच्या मंडळात बराच फरक आहे. पूर्वी गणेश मंडळे कमी होती. विविध उपक्रम, सामाजिक संदेश देणारे कार्यक्रम सादर केले जात होते. आज गणेश मंडळांची संख्या वाढली आहे. सामाजिक उपक्रम कमी असल्याचे जाणवते. गणेशोत्सवाद्वारे समाज जोडण्याचे मंत्र लोकमान्य टिळकांनी दिला होता. या संदेशाप्रमाणे कृत्य होणे अपेक्षित असल्याचे मत देवतवाल यांनी व्यक्त केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सामाजिक उपक्रमांची परंपरा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
श्री संस्थान गणपती हे औरंगाबादचे ग्राम दैवत. गणपतीचे मंदिर ऐतिहासिक व प्राचीन आहे. मंदिर शहराच्या मध्यवस्तीत आहे. मंदिराला प्र‌दक्षिणा घालण्यासाठी जागा नव्हती, मंदिराला शिखरही नव्हते. १९८२नंतर जिर्णोद्धार करण्यात आला. या संस्थानचे गणेशमंडळही त्याच वर्षी स्थापन करण्यात आले. मंडळाने विविध समाजिक उपक्रम सातत्याने राबवले जातात. त्यात रुग्णसेवेवर भर आहे
श्री संस्थान गणपती मंदिरातील श्री गणेशाची मूर्ती पूर्वाभिमूख, दोन फूट बाय दोन फूट या आकाराची आहे. ही मूर्ती डाव्या सोंडेची आहे. काळ्या पाशाणातील स्वयंभू मूर्ती अशी तीची ख्याती आहे. मूर्ती शेंदुराच्या तीन इंच थरात स्थिरावली आहे. आजपर्यंत अनेक मान्यवरांनी श्री संस्थान गणपती मंदिरात आराधना केली आहे. औरंगाबाद महापालिकेची पहिली निवडणूक मे १९८८मध्ये झाली. त्यावेळी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे प्रचारासाठी औरंगाबादेत आले होते. सभेला जाण्यापूर्वी त्यांनी श्री संस्थान गणपतीचे दर्शन घेतले होते. बहुमत मिळाले तर सोन्याचा मुकूट अर्पण करण्याचा नवस त्यांनी केला होता. निवडणुकीत शिवसेनेला सत्ता मिळाली. सत्तास्थापनेनंतर बाळासाहेब ठाकरे श्री संस्थान गणपतीचा नवस फेडण्यासाठी औरंगाबादला आले व त्यांनी गणपतीच्या मूर्तीला सोन्याचा मुकूट अर्पण केला.
मंदिराची व्यवस्था १९६०पासून सध्या कार्यरत असलेल्या ट्रस्टकडे आली. जिर्णोद्धारामुळे मंदिराचे रुपच पालटले. संगमरवरी दगडातील एक सुंदर मंदिर तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला. आज छोटेसेच पण संगमरवरी दगडातील मनाला प्रसन्न करणारे मंदिर औरंगाबादचे भूषण बनले आहे. भाविक मनोभावे दर्शन घेतात व आपल्या मनातील इच्छा गणपतीच्या चरणी अर्पण करतात. भक्तीभावाने व्यक्त केलेली इच्छा श्री संस्थान गणपती पूर्ण करतात अशी भाविकांची श्रद्ध आहे. अनेकांना असा अनुभव असल्याचे सांगितले जाते. रोज सकाळी व सायंकाळी गणपतीची आरती केली जाते. गणेशोत्सवातील दहा दिवस भंडाऱ्याचा कार्यक्रम होतो. गणेशोत्सवात मंदिराजवळ सनई चौघडा वाजवला जातो. या काळात आकर्षक विद्युत रोषणाई केली जाते. सजीव-निर्जीव देखावे तयार करून त्यातून समाज प्रबोधन केले जाते. गणेशोत्सवाच्या काळात श्री गणपती अथर्वशीर्षच्या सहस्त्रावर्तनाचे पठण केले जाते. मंदिरातर्फे दुर्गा महोत्सव, दहिहंडीचा कार्यक्रमही साजरा केला जातो. महाराष्ट्राच्या अनेक भागातून भाविक दर्शनासाठी श्री संस्थान गणपतीच्या मंदिरात येतात. श्री संस्थान गणपती मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष सोभागचंद चोरडिया असून, प्रफुल्ल मालाणी, नंदकुमार घोडेले, संतोष चिचाणी हे विश्वस्त आहेत.ट्रस्टतर्फे गरीबांना घटकातील रुग्णांना उपचारासाठी आर्थिक मदत केली जाते. हृदयरोग, कर्करोग व किडनीच्या आजाराच्या रुग्णांना प्रामुख्याने या ट्रस्टतर्फे मदत केली जाते. ट्रस्टतर्फे होमिओपॅथिक हॉस्पिटलही चालवले जाते. या शिवाय विविध मंदिरांच्या जिर्णोद्धारासाठीही या ट्रस्टतर्फे मदत केली जाते.

संस्थान गणपतीचा इतिहास मोठा आहे. ट्रस्टकडून दानधर्मही मोठ्या प्रमाणावर होत असते. भंडारा व समाजउपयोगी उपक्रम फार नियोजनपूर्वक केले जाते.
-प्रफुल्ल मालाणी, विश्वस्त संस्थान गणपती

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

माझं शिवार ः शेती निश्चित उत्पन्नाच्या दिशेने

$
0
0

tushar.bodkhe @timesgroup.com
Tweet : @tusharbMT
किमान हमीभावाची शाश्वती नसणे आणि बदलत्या हवामानाचा फटका शेतीचे चित्र बदलण्यास कारणीभूत ठरला आहे. पारंपरिक पीक पद्धती शेतीसाठी धोक्याची घंटा ठरली आहे. तीन ते सहा महिन्याच्या कालावधीत खरीप व रब्बी पीक घेणे अशक्यप्राय ठरत आहे. कापूस, सोयाबीन या नगदी पिकांच्या उत्पादकतेवर प्रतिकूल परिणाम झाला आहे. लागवड ते विक्री हा कालावधी शेतकऱ्यांसाठी अडचणीचा असतो. शेतमालाची विक्री होईपर्यंत चलन नसल्यामुळे व्यवहार रखडतात. दैनंदिन चरितार्थासाठी पैसे नसल्यामुळे चार-सहा महिने पिकावर अवलंबून रहावे लागते. दरवर्षी अशीच गैरसोय असूनही प्रतिकूल चक्रव्यूह भेदण्याची शेतकऱ्यांकडे युक्ती नाही. गटशेती किंवा शेतकरी गट या संकल्पनेतून आता प्रश्न निकाली निघत आहेत; मात्र, या योजनेत शेतकऱ्यांचे अत्यल्प प्रमाण आहे. वैयक्तिक पातळीवर शेतीतील समस्या निकाली काढण्यासाठी मोजकेच शेतकरी झगडतात. शेती व्यवसाय फायदेशीर असून नियोजनबद्ध शेती करणे शक्य असल्याचा संदेश लाडसावंगी (ता. औरंगाबाद) येथील शेतकरी सुधाकर रामकिसन पवार यांनी दिला आहे. फळबाग आणि भाजीपाला यांची पारंपरिक शेतीला जोड दिल्यामुळे व्यावसायिक यश मिळाले आहे. औरंगाबाद तालुक्यातील बहुतेक शेतकरी भाजीपाला लागवड करतात. स्थानिक आठवडी बाजार आणि औरंगाबाद कृषी उत्पन्न बाजार समिती या ठिकाणी भाजीपाला विक्रीची व्यवस्था आहे. त्यामुळे दर आठवड्याला निश्चित कमाईसाठी शेतकऱ्यांना भाजीपाला पिकाचा मार्ग गवसला आहे. पवार यांनी आपल्या शेतीचे योग्य नियोजन केले आहे. दीड एकर मोसंबी, एक एकर डाळिंब आणि दोन एकर क्षेत्रावर टोमॅटोची लागवड केली आहे. अद्रक, कपाशी या पिकांचीही जोड आहे. बहुपीक पद्धती शाश्वत शेतीसाठी उपयुक्त ठरली आहे. केवळ एका पिकावर अवलंबून राहिल्यास नैसर्गिक आपत्तीत नुकसान होण्याची दाट शक्यता असते. नैसर्गिक संकटात पिकाचे नुकसान झाल्यास किमान दुसऱ्या पर्यायी पिकातून किमान फायदा होण्याची शक्यता असते. आठवड्याला निश्चित उत्पन्न मिळण्यासाठी पवार यांनी दोन एकरावर टोमॅटो लागवड केली आहे. 'आठवडी बाजारात एक कॅरेट टोमॅटोचा दर २०० रुपये आहे. काही वेळेस दर कोसळतो, कधी समाधानकारक भाव मिळतो; मात्र, भाजीपाला विक्री शेतीसाठी सहाय्यभूत ठरली आहे,' असे पवार यांनी सांगितले. फळबागाचे योग्य व्यवस्थपान केल्यामुळे पाणी व खर्चात काही प्रमाणात बचत झाली आहे. ठिबक सिंचन असल्यामुळे फळबागेची योग्य निगा राखली गेली आहे. शिवाय नवीन तंत्राचा वापर करून दहा गुंठे स्वतंत्र टोमॅटो लागवड केली आहे. अत्युच्च दर्जाचे बियाणे, ठिबक सिंचन, ड्रिपद्वारे खत पुरवठा आणि फळधारणेवर विशेष लक्ष देणारा हा प्रयोग लक्षणीय ठरला आहे. सध्या टोमॅटोचे भरघोस उत्पादन निघत आहे. मोसंबी व डाळिंब फळबाग आणि भाजीपाला पवार यांना प्रतिकूल स्थितीत दिलासा देणारी पिके ठरली आहेत.
दुग्ध व्यवसायातूनही पवार यांना उत्पन्नाचा मार्ग सापडला आहे. मुख्य शेतीला पूरक व्यवसायाची जोड दिल्यास बिकट परिस्थितीवर मात करणे शक्य असल्याचा आत्मविश्वास त्यांच्या प्रयोगशील शेतीतून मिळतो.

दुष्काळात संघर्ष
२०१२ यावर्षी पडलेल्या दुष्काळात औरंगाबाद तालुक्यातील हजारो एकरवरील फळबागा पाण्याअभावी जळाल्या. या संकाटाची चाहूल लागल्यानंतर पवार यांनी तब्बल एक लाख रुपये खर्च करून टँकरद्वारे पाणी देऊन फळबाग जगवली. मागील वर्षी डाळिंब व मोसंबीची फळबाग वाचवण्यासाठी २५ ते ३० हजार रूपये खर्च करावा लागला. पाण्याचे योग्य नियोजन आणि कमीत कमी पाण्याचा वापर करून पवार यांनी फळबागा टिकवल्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महापौरांना डावलून सेनेची शिष्टाई

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

महापौर, सभागृहनेत्यांना डावलून शिवसेनेच्या शिष्टमंडळाने गुरुवारी सकाळी महापालिका आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांची भेट घेतली. शहराचा विकास आणि नागरी सुविधा या बद्दल बकोरिया यांना निवेदन देण्यात आले.

मंगळवारच्या सर्वसाधारण सभेत नगरसेवकाने अपशब्द वापरल्यामुळे आयुक्तांनी अधिकाऱ्यांसह सभात्याग केला होता. त्यामुळे पदाधिकारी, नगरसेवक विरुध्द आयुक्त असे वातावरण निर्माण झाले होते. आयुक्तांच्या या वर्तनाची पालकमंत्री रामदास कदम यांच्याकडे तक्रार करण्यासाठी महापौर त्र्यंबक तुपे, सभागृहनेता राजेंद्र जंजाळ कोकणात गेले आहेत. ते परतण्याची वाट न पाहता आज जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचे शिष्टमंडळ आयुक्तांना भेटले. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

शहरातील खड्डे बुजवण्याचे काम त्वरित हाती घ्यावे, बंद पथदिवे बंद त्वरित सुरू करावे, व्हाइट टॉपिंगच्या रस्त्यांना भेगा आणि खड्डे पडले आहेत. त्याची माहिती घेऊन चौकशी करावी व संबंधित अधिकारी, कंत्राटदाराला समज द्यावी. सर्व वॉर्डांना नियमित पाणीपुरवठा करण्याचे नियोजन काटेकोरपणे करावे, शेकडो सफाई कर्मचारी असताना शहरातील साफसफाई व औषध फवारणी नियमित करावी, अशा मागण्या शिष्टमंडळाने केल्या. शिष्टमंडळात उपजिल्हाप्रमुख नंदकुमार घोडेले, शहरप्रमुख राजू वैद्य, संतोष जेजूरकर, बाळासाहेब थोरात, माजी महापौर कला ओझा, गोपाळ कुलकर्णी, मकरंद कुलकर्णी, संतोष खेंडके, राजेंद्र दानवे, ज्ञानेश्वर दांडगे, चंद्रकांत इंगळे, संतोष मरमट, नलिनी बाहेती, संध्या जाधव, सुनंदा खरात, विद्या अग्निहोत्री, जयश्री राणा, हिरा सलामपुरे आदींचा समावेश होता.

३० सप्टेंबरपर्यंत रस्त्यांचे पॅचवर्क

३० सप्टेंबरपर्यंत सर्व रस्त्यांचे पॅचवर्क केले जाईल. गणेश विसर्जन मार्गावरील रस्त्यांवर असलेले खड्डे बुजवण्यासाठी विशेषाधिकार वापरण्यात आला आहे. विसर्जन मार्ग खड्डे मुक्त झाला आहे. पाणीपुरवठ्यात समस्या आहेत. नागरिकांना त्रास होऊ नये म्हणून विशेषाधिकार वापरून पाणीपुरवठ्याची कामे केली जाणार आहेत. पथदिव्यांची कामेही लवकरच सुरू करू, असे आश्वासन आयुक्तांनी शिष्टमंडळाला दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सात पोलिसांची उचलबांगडी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

अवैध धंद्याना प्रोत्साहन देऊन पैसे गोळा करीत असल्याच्या तक्रारींनंतर सात पोलिस कर्मचाऱ्यांची पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी मुख्यालयात बदली केली आहे. वाळूज, एमआयडीसी वाळूज, सातारा, छावणी, दौलताबाद व सिडको पोलिस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांचा यामध्ये समावेश आहे.

पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी अवैध धंद्यावर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. यामध्ये अवैध वाळू वाहतूक; तसेच अवैध दारू विक्रीचा देखील समावेश होता. काही पोलिस ठाण्यांच्या हद्दीत हे दोन्ही धंदे बिनबोभाट सुरू होते. यासंदर्भात पोलिस आयुक्तांकडे देखील तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. यामध्ये वाळूज, वाळूज एमआयडीसी, छावणी, सातारा, दौलताबाद व सिडको पोलिस ठाण्याच्या हद्दीत हे धंदे जास्त सुरू असल्याची माहिती देखील आयुक्तांना प्राप्त झाली होती. या तक्रारींची शहानिशा केल्यानंतर अवैध उद्योग करणाऱ्यांना पाठीशी घालणाऱ्या सात पोलिस कर्मचाऱ्यांची तडकाफडकी पोलिस मुख्यालयात बदली करण्याचे आदेश पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी दिले.

वाळूज पोलिस ठाण्याचे सुरेश कवडे, एमआयडीसी वाळूजचे सुनील म्हस्के, साताराचे नारायण गिरी, छावणीचे दिनेश तेजनकर, दौलताबादचे सानप, ढगे व सिडको पोलिस ठाण्याचे काकासाहेब पंडित यांच्याविरुद्ध अवैध धंद्यांना प्रोत्साहन देत असल्याच्या तक्रारी होत्या. तक्रारींची पडताळणी केल्यानंतर बदली करण्याचे आदेश दिले आहेत, असेही आयुक्त अमितेशकुमार यांनी सांगितले.

अधिकाऱ्यांचे काय?

अवैध धंद्यांना प्रोत्साहन देऊन पैसे गोळा करण्याच्या तक्रारींवरून पोलिस आयुक्तांनी सात पोलिसांवर उचलबांगडीची कारवाई केली. वरिष्ठ अधिकाऱ्यांचा वरदहस्त असल्याशिवाय अवैध धंदे चालू शकत नाहीत. त्यामुळे या अधिकाऱ्यांवर कारवाई होणार आहे का, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


दहावी, बारावी परीक्षेचे शुल्क वाढले

$
0
0

पालकांच्या खिशाला भुर्दंड; शिक्षण मंडळाच्या तिजोरीत ६० कोटीची भर

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

माध्यमिक व उच्चमाध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी, बारावी परीक्षेचे शुल्कात वाढ केली आहे. नवीन बदलाप्रमाणे प्रत्येक विद्यार्थ्याला परीक्षेच्या शुल्कापोटी अधिकच्या ७५ रुपयाची झळ सोसावी लागणार आहे. आयसीटीचा समावेश, विज्ञान विषयाचे दोन पेपर आणि कलचाचणी अशा नव्या धोरणांचा भुर्दंड पालकांच्या खिशाला बसणार आहे. मार्च २०१७ परीक्षेपासून हे बदल करण्यात आले आहेत. परीक्षा शुल्कवाढीमुळे मंडळाच्या तिजोरीत सुमारे ६० कोटी रुपयांची भर पडणार आहे.

परीक्षा शुल्कवाढीचा निर्णय २०११ पासून प्रलंबित होता. अखेर याला शासन, प्रशासनस्तरावरून मान्यता मिळाली आहे. मार्च-एप्रिल २०१७ परीक्षेपासून याची अंमलबजावणी होणार आहे. नव्या निर्णयामुळे यंदा दहावी, बारावी परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्कात ७५ रुपये अधिकचे द्यावे लागणार आहेत. परीक्षा शुल्कामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रथमच वाढ करण्यात आल्याची माहिती मंडळातील सूत्रांनी दिली आहे. नव्या दराप्रमाणेच शुल्क आकारावे अशा सूचना शाळा, ज्युनिअर कॉलेजांना दिल्याचे मंडळातील अधिकारी सूत्रांनी सांगितले. मंडळाच्या या परीक्षा शुल्कवाढीचा फटका पालकांना बसणार आहे. सततच्या दुष्काळामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या मराठवाड्यातील विद्यार्थ्यांनाही नव्या शुल्कवाढीचा आर्थिक भार सोसावा लागणार आहे.

'कलचाचणी', 'आयसीटी' जबाबदार; मंडळाचा दावा

शुल्कवाढीमागे कलचाचणी, आयसीटी, सायन्स विषयांचे विभाजन असे बदल असल्याचा अजब दावा मंडळाने केला आहे. यासह प्रात्यक्षिक परीक्षांसाठी बाह्य परीक्षकांची नेमणूक करण्याचा निर्णय, कलचाचणीच्या आयोजनासाठी होणारा खर्चही मोठा खर्च होत असल्याचे मंडळाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे विविध अशा बदलांचा भुर्दंड मात्र पालकांच्या खिशाला सोसावा लागणार आहे.

दरवर्षी ६० कोटी रुपयांची भर

मंडळाच्या ९ विभागीय कार्यालयाच्या मदतीने घेण्यात येणाऱ्या मार्च-एप्रिल दहावी परीक्षेला राज्यभरातून दरवर्षी सुमारे १७ लाख तर बारावीला १४ लाख विद्यार्थी परीक्षेला बसतात. यासह जुलै-ऑगस्टमध्ये सुमारे ६ लाख विद्यार्थी परीक्षेला नोंदणी करतात. प्रत्येक विद्यार्थ्यामागे ७५ रुपयाची वाढ केल्याने मंडळाच्या तिजोरीत दरवर्षी सुमारे ६० कोटी रुपयांची भर पडणार आहे.

बदललेले परीक्षा शुल्क
नियमित विद्यार्थी.. ४२५
खाजगी विद्यार्थी (फॉर्म नं-१७)... ४१५
पुनर्परीक्षार्थी.....४०५

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

केनियन विद्यार्थ्याची शिक्षा खंडपीठात कायम

$
0
0

व्हिसा संपूनही तो आठ वर्ष भारतात; १६ सप्टेंबरला जाणार मायदेशी

म. टा. विशेष प्रतिनिधी, औरंगाबाद

भारतातील बेकायदेशीर वास्तव्यप्रकरणी तुरुंगवासाच्या शिक्षेविरुद्धचे केनियन विद्यार्थ्याचे अपील मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या एन. डब्ल्यू. सांबरे यांनी फेटाळले. त्यामुळे आरोपी आयुगी ओढीयांबो हा आपली कारावासाची शिक्षा भोगूनच मायदेशी जावू शकणार आहे.

आरोपी आयुगी जॉन मिखायेल ओढीयांबो हा उच्च शिक्षणासाठी केनियातून १९९७ मध्ये भारतात आला. शहरातील एका स्थानिक कॉलेजमध्ये त्याने वाणिज्य शाखेत उच्च शिक्षणासाठी प्रवेश घेतला. २००२ मध्ये त्याच्या पासपोर्ट व व्हिसाची विहीत मुदत संपली, पण आयुगी याने नूतनीकरणासंबंधी कोणतीच कारवाई केली नाही. कटकट गेट परिसरातील घरमालकाकडे आयुगी वास्तव्यास होता. जून २०१० मध्ये विदेशी नागरिकांच्या तपासणी मोहिमेदरम्यान आयुगीच्या बेकायदा वास्तव्याची बाब पोलिसांच्या निदर्शनास आली. जिन्सी पोलिस ठाण्याचे तत्कालीन पोलिस उपनिरीक्षक यांनी फॉरेनर्स कायद्यांतर्गत आयुगी विरूद्ध रितसर फिर्याद नोंदवली. खटला चालून प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांनी आरोपीस मुदतबाह्य निवासाच्या आरोपावरून दोषी ठरविले. त्याला तीन महिने तुरूंगवास व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली होती. या शिक्षेविरुद्ध आरोपीने केलेले अपिल अतिरिक्त सेशन कोर्टाने फेटाळून लावले.

यानिर्णयाविरूद्ध आरोपी आयुगी याने औरंगाबाद खंडपीठात पुनर्निरिक्षण अर्ज सादर केला. त्यावर हायकोर्टाने शिक्षेत बदल करण्यास नकार दर्शविला. शासनाच्या वतीने सहायक सरकारी वकील चैतन्य धारूरकर यांनी काम पाहिले. दरम्यान, आरोपी आयुगी हा सेशन कोर्टाच्या निकालानंतर ताबडतोब पोलिसांच्या स्वाधीन झाला होता. शिक्षा भोगण्यासाठी त्याची रवानगी हर्सूल मध्यवर्ती तुरुंगात करण्यात आली. त्याला त्याच्या मायदेशी पाठविण्यासाठी पोलिसांनी केनियन दुतावासाशी संपर्क साधला. तेथील अधिकाऱ्यांनी हर्सूल जेलमध्ये आरोपीची भेट घेऊन त्याच्या नागरिकत्वाची सत्यता तपासली. तुरूंगातून बाहेर पडल्यानंतर त्याला मायदेशी परत पाठवण्यासंबंधी सर्व कायदेशीर पूर्तता पोलिसांनी केली. हायकोर्टात अर्ज फेटाळला गेल्याने आपली तुरूंगवासाची शिक्षा भोगून १६ सप्टेंबर रोजी आरोपी आयुगी हा इथियोपीयन एअरलाईन्सच्या विमानाने मुंबईच्या छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून मायदेशी केनियासाठी प्रयाण करणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जालना जिल्हा डासमुक्त करणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, जालना

नांदेड जिल्ह्यातील टेंभुर्णी गावाने 'मॅजिक पीट' या उपक्रमाद्वारे संपूर्ण गाव डासमुक्त केले असून, जालना जिल्हाही डासमुक्त करण्यासाठी हा उपक्रम जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे. या उपक्रमांतर्गत खोदण्यात येणाऱ्या शोषखड्ड्यांसाठी देण्यात येणाऱ्या अनुदानाच्या रकमेत वाढ करण्याबरोबरच या उपक्रमास टेंभुर्णीकरांचे नाव देण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचेही पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी सांगितले.
जालना गणेश फेस्टिव्हलमध्ये आयोजित स्वच्छता अभियान कार्यशाळा, माहिती व जनसंपर्क महासंचालनामार्फत सुरू असलेल्या संवाद पर्व अभियानाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी व्यासपीठावर संजय लाखे पाटील, अध्यक्ष राजेश राऊत, नगराध्यक्षा पार्वताबाई रत्नपारखे, उपनगराध्यक्ष शहा आलमखान यांची उपस्थिती होती. ते म्हणाले, 'जिल्ह्याच्या विकासाला दिशा देण्यासाठी, चर्चा करण्यासाठी विकासात्मक दृष्टिकोन ठेवून, जालना गणेश फेस्टिव्हलने समाजोपयोगी कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. ही बाब अभिनंदनीय आहे. येणाऱ्या काळातही अशाच प्रकारच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात यावे. महाराष्ट्र राज्य स्वच्छता अभियानामध्ये राज्यात जालना जिल्हा आठव्या क्रमांकावर आहे. जालना जिल्हा स्वच्छ व सुंदर करून स्वच्छतेच्या बाबतीत प्रथम क्रमांकावर येण्यासाठी प्रत्येक नागरिकाने सहभाग नोंदवायला हवा.' टेंभुर्णी या गावचे सरपंच प्रल्हाद पाटील टेंभुर्णीकर यांनी मॅजिक पीट या उपक्रमाच्या माध्यमातून गाव कशा प्रकारे डासमुक्त केले यासंदर्भात सविस्तर असे मार्गदर्शन केले.
राज्य स्वच्छ व सुंदर करण्याच्या दृष्टिकोनातून राज्यात वेळोवेळी महास्वच्छता अभियान राबविण्यात येत असून, जालना जिल्ह्यातही हे अभियान सातत्याने राबविण्यात येत आहे. या अभियानाच्या माध्यमातून शहरात साठलेल्या कचऱ्यापैकी १७ हजार टन कचरा साफ करण्यात आला आहे. जालना शहरातील नागरिकांना पाण्याच्या पुरवठ्यासाठी १२३ कोटी रुपयांचा निधी पाणी पुरवठ्याच्या योजनेसाठी मंजूर करण्यात आला आहे. शहरात भूमिगत गटारे उभारणीसाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नसल्याचेही त्यांनी सांगितले.
पाणी हेच जीवन असून सर्व नागरिकांना शुद्ध व फिल्टरचे पाणी मिळावे यासाठी गुजरात राज्याच्या धर्तीवर संपूर्ण मराठवाड्याला ग्रीड पद्धतीने पाणी पुरवठा करण्यात येणार असून, या योजनेस शासनाने तत्वत: मान्यता दिली असल्याचेही लोणीकर यांनी या वेळी सांगितले.

दिंडीमार्गासाठी निधी
राष्ट्रीय महामार्गांतर्गत दिंडी मार्ग म्हणून खामगाव-लोणार-मंठा-परतूर-माजलगाव-कळंब-बार्शी-पंढरपूर-सांगोला या ४३० किलोमीटर अंतराच्या रस्त्यास केंद्र सरकारने मान्यता दिली आहे. केंद्रीय वार्षिक नियोजनात ८६० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली असून, सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याचे काम सुरू असल्याचेही पालकमंत्री लोणीकर यांनी या वेळी सांगितले.

जालना-वडीगोद्री रस्त्याचे काम रखडले
जालना-अंबड-वडीगोद्री या ४६.६ किलोमीटर लांबीच्या रस्त्याच्या चौपदरीकरण करण्याच्या कामाला तत्त्वत: मान्यता देण्यात आली होती. या रस्त्याच्या प्रकल्पाचा बांधकाम खर्च २६५ कोटी रुपये होता आणि एकूण प्रकल्प किंमत ३१३.६५ कोटी रुपये होती. तसेच केंद्र व राज्य शासनाचा निधी प्राप्त न झाल्याने संबंधित कंत्राटदाराने हे काम करण्यास उदासिनता दर्शविल्याने या रस्त्याचे काम मार्गी लागू शकले नसल्याची माहिती पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी दिली. जालना-अंबड-वडीगोद्री या रस्त्याच्या बाबतीत वेळोवेळी व्यापारी, नागरिकांनी निवेदने देऊन या रस्त्याचे काम मार्गी लावण्याची विनंती केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निवडणुकीसाठी प्रशासन कामाला

$
0
0

निवडणुकीसाठी
प्रशासन कामाला

म. टा. प्रतिनिधी, जालना
राज्यामध्ये महापालिकांसह जिल्हा परिषद आणि नगरपालिका निवडणुकीचे वेध लागले असून, त्या दृष्टीने प्रशासनाच्या तयारीला सुरुवातही झाली आहे. जालना जिल्ह्यातील जालना, परतूर, अंबड आणि भोकरदन नगरपालिका निवडणुकीची तयारी जिल्हा प्रशासनाने सुरू केली असल्याची माहिती जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे यांनी शुक्रवारी दिली.
निवडणुकीच्या तयारीची माहिती जोंधळे यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली. या चारही नगरपालिकांसाठी नोव्हेंबरच्या अखेरच्या अथवा डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात मतदान होण्याची शक्यता असून, फेब्रुवारीमध्ये जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका होतील, असे जोंधळे यांनी असे ते म्हणाले. मतदार याद्यांमध्ये नावे समाविष्ट करण्यासाठी ३१ ऑगस्टपर्यंतची मुदत आहे, तोपर्यंत समाविष्ट असणाऱ्या मतदारांनाच मतदानाचा हक्क बजावता येईल. तसेच, २६ सप्टेंबर रोजी सर्व पालिकेच्या प्रभागनिहाय मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. यानंतर फक्त प्रभागातील नावात बदल झाला असेल, तर ते आक्षेप सुनावणी करून चुका दुरूस्ती करण्यात येणार आहेत, असे त्यांनी सांगितले.
जालना शहरातील ११ हजार नवीन मतदारांची नोंदणी करण्यासाठी अर्ज आलेले आहेत. त्यातील सुनावणी व चौकशी केल्यावर जवळपास निम्मे अर्ज फेटाळण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. मतदार जागृती अभियान राबविण्यात येणार असून, त्यासाठी विशिष्ट पद्धतीने काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्था व संघटना आणि जिल्हा प्रशासनाने काम सुरू केले आहे, असे उपजिल्हाधिकारी डाॅ. एन. आर. शेळके यांनी सांगितले. नगराध्यक्षपदाचे आरक्षण अद्याप निर्णय झालेला नाही आणि नगराध्यक्ष हा थेट जनतेतून निवडला जाणार आहे, असे आजपर्यंतचे आदेश आहेत, असे ते म्हणाले.

गणेश मंडळांना आवाहन
जालना शहरातील गणेशोत्सव मंडळांनी घाणेवाडी आणि मोती तलावात गणेश प्रतिमांचे विसर्जन करू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी जोंधळे यांनी केले आहे. जिल्ह्यामध्ये ज्या ठिकाणी पिण्याच्या पाण्यासाठी तलाव विहिरी आहेत तिथे गणेश प्रतिमांचे विसर्जन करून प्रदूषण वाढते आहे. या बद्दल नागरिकांनी दक्षता घ्यावी आणि शहराशेजारी असलेल्या विविध खदानींमध्ये गणेशाचे विसर्जनाची विशेष व्यवस्था करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

जालना : अ वर्ग पालिका
६१
एकूण नगरसेवक
३१
महिला

अनुसूचित जाती

अनुसूचित जमाती
१६
इतर मागासवर्गीय

अंबड : क वर्ग पालिका
१९
नगरसेवक
१०
महिला

अनुसूचित जाती

इतर मागासवर्गीय

परतूर : क वर्ग पालिका
२०
नगरसेवक
१०
महिला

अनुसूचित जाती

अनुसूचित जमाती

इतर मागासवर्गीय

भोकरदन : क वर्ग पालिका
१७
नगरसेवक

महिला

अनुसूचित जाती

इतर मागासवर्गीय

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रत्येक वॉर्डात एक कोटीची कामे

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
खड्ड्यांनी जर्जर झालेले शहर, रस्त्यांची रखडलेली कामे यामुळे शहरवासीयांचा तीव्र असंतोष आणि महापौरांसह पालिकेतील पदाधिकाऱ्यांच्या वाढत्या रोषानंतर विकास कामांचा नारळ मोठ्या जोशात फोडला जाणार आहे. शहरातील प्रत्येक वॉर्डात मार्चपर्यंत १ कोटी रुपयाची कामे केली जातील. त्यासाठी ११५ नगरसेवकांच्या वॉर्डात ११५ कोटींची तरतूद केली आहे, असा दावा आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांनी शुक्रवारी केला.
सहा सप्टेंबर रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेत नगरसेवकांनी अधिकाऱ्यांना उद्देशून केलेल्या 'गेंड्याच्या कातडीच्या' आरोपावरून आयुक्त विरुध्द नगरसेवक असे चित्र निर्माण झाले होते. सोळा महिन्यांत शहरात विकासाचे एकही काम झाले नाही, अशी नगरसेवकांची तक्रार होती. त्यामुळे सर्वसाधारण सभेत घडलेल्या घटनेमुळे येत्या काळातही विकास कामे होणारच नाहीत का, असा प्रश्न विचारला जात होता. या पार्श्वभूमीवर पत्रकारांशी बोलताना बकोरिया म्हणाले, शहरात विकास कामे होतील. त्यात कोणतीही अडचण येणार नाही. शहराचे नुकसान होईल असे आम्ही काहीही करणार नाही. प्रत्येक नगरसेवकाच्या वॉर्डात मार्च अखेरपर्यंत एक कोटी रुपयाचे काम करण्याचे ठरविले आहे. त्यामुळे मार्च अखेरपर्यंत एकशे पंधरा कोटी रुपयांची विकास कामे नक्की होतील.
शहरातील रस्ते विकासासाठी १५० कोटी रुपयांचा प्रस्ताव शासनाकडे पाठवला आहे. शासनाकडून सहकार्य मिळाले, तर रस्त्यांची कामे मोठ्या प्रमाणावर होतील. या कामासाठी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार (पीएमसी) नियुक्त करण्यात आले आहे. स्पीलच्या कामांनाही गती दिली जाणार आहे. स्पील मधील रस्त्यांची कामे प्रामुख्याने केली जातील, असा निर्धार आयुक्तांनी व्यक्त केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

साडेनऊ लाख लंपास; कोर्टाच्या आदेशाने गुन्हा

$
0
0



म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
एटीएममध्ये जमा करण्यासाठी दिलेले ९ लाख ६१ हजार रुपये लंपास केल्याप्रकरणी सिक्युरिटी कंपनीच्या तिघांविरुद्ध कोर्टाच्या आदेशाने क्रांतिचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुंबई येथील इ.पी.एस. अर्थात एक्स्प्रेस पेमेंट सिस्टीमला शहरातील विविध खासगी बँकेच्या एटीएममध्ये रक्कम जमा करण्याचे आऊटसोर्सिंग कॉन्ट्रॅक्ट दिले आहे. कंपनीने जूनमध्ये एक्टिव्ह सिक्युर कंपनीला औरंगपुऱ्यातील एटीएममध्ये भरण्यासाठी रक्कम दिली. यातले ९ लाख ६१ हजार रुपये एटीएममध्ये कमी जमा झाल्याचे निदर्शनास आले. ११ जून २०१५ ते १५ जानेवारी २०१६ या काळात हा प्रकार घडला. सिक्युरिटी कंपनीने फसवणूक केल्याप्रकरणी कंपनीचे अधिकारी सुशील भीमराव धुळे (रा. जवाहर कॉलनी) यांनी कोर्टात दाद मागितली. या प्रकरणी कोर्टाने क्रांतिचौक पोलिसांना सिक्युरिटी कंपनीच्या कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. त्यानुसार गुरुवारी एक्टिव्ह सिक्युर कंपनीचे मालक अर्जुन व्हराडे, कर्मचारी अमोल आखाडे, सूरज अंभोरे यांच्याविरुद्ध फसवणूक व विश्वासघात केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्हाप्रमुख दानवे यांना सेनेतून काढा

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
शिवसेनेत गेल्या पाच-सात वर्षांत ज्यांना पदे मिळाली ते जहागिरी मिळाल्याच्या थाटात वावरतात. त्यांनी पक्ष - संघटनेचे व्यावसायिकीकरण केले. त्यातून गटतट निर्माण झाले. त्यामुळे येत्या काळात जिल्ह्यात शिवसेनेचे संघटन टिकवायचे असेल, तर जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांची केवळ जिल्हाप्रमुख पदावरूनच नव्हे, तर पक्षातून हकालपट्टी झाली पाहिजे, या मागणीसाठी आपण पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहोत, असा स्फोटक निर्णय आमदार संजय शिरसाट यांनी शुक्रवारी जाहीर केला.
शिवसेना महोत्सवांतर्गत शहरातील विविध गणेश मूर्तींचे दर्शन व पूजेचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. याची सुरुवात कोकणवाडीतील सिद्धीविनायक गणेश मंदिरापासून होणार होती. हे मंदिर आमदार संजय शिरसाट यांच्या मतदार संघात आणि त्यांच्या कार्यालयासमोर आहे. मात्र, कार्यक्रमातून त्यांना वगळण्यात आले. निमंत्रण पत्रिकेवर फक्त अंबादास दानवे यांचे नाव होते. त्यामुळे संतापलेल्या शिरसाट यांनी सायंकाळी तातडीने पत्रकार परिषद घेतली. शिरसाट म्हणाले, जिल्हाप्रमुख अंबादास दानवे पक्षात जहागिरी मिळाल्याप्रमाणे वागत आहेत. दानवे यांच्यामुळे जिल्हापरिषद, पंचायत समिती, नगरपालिका गमवाव्या लागल्या. पूर्वी चार नगरपालिका ताब्यात होत्या, आता एकही नाही. जिल्हा परिषदही हातची गेली. पूर्वी चार नगरपालिका ताब्यात होत्या, आता एकही शिवसेनेच्या ताब्यात नाही. पूर्वी जिल्ह्यात शिवसेनेचे पाच आमदार होते, आता तीनच आहेत. सातारा-देवळाई पोटनिवडणुकीत गटबाजीमुळे शिवसेनेच्या दोन जागा गमवाव्या लागल्या. पक्षात व्यावसायिकीकरण आले असून, त्यामुळे गट निर्माण झाल्याचे शिरसाट म्हणाले. पत्रकार परिषदेला महानगरप्रमुख प्रदीप जैस्वाल, सहसंपर्क प्रमुख माजी आमदार अण्णासाहेब माने, जिल्हाप्रमुख नरेंद्र त्रिवेदी, माजी महापौर विकास जैन उपस्थित होते. त्यांनी या मागणीला पाठिंबा दिला.

आपल्यामुळे संघटना चालते या थाटात दानवे आहेत. पक्ष टिकवायचा असेल तर त्यांची हकालपट्टी झाली पाहिजे. याबाबत उद्धव ठाकरे यांची १८ सप्टेंबर रोजी भेट घेणार आहोत. - संजय शिरसाट, आमदार

संघटनेत गटबाजी राहिली, तर येणारा काळ घातक असेल. पूर्वी संघटनेत एकमेकांवर प्रेम करणाऱ्या व्यक्ती होत्या. उद्धव ठाकरे यांना एकत्र येऊन भेटू. ते यातून मार्ग काढतील. - प्रदीप जैस्वाल,महानगरप्रमुख, शिवसेना

मला पक्षातून काढल्यामुळे पक्षाची ताकद वाढणार असेल, तर माझी काहीही हरकत नाही. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे योग्य तो निर्णय घेतील. माझा त्यांच्या नेतृत्वावर विश्वास आहे. - अंबादास दानवे, जिल्हाप्रमुख, शिवसेना

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘मृत्युंजय’ने रुजवली पावलीची परंपरा

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
सिडको - हडको भागात गेल्या २५ वर्षापासून पावलीची परंपरा रुजवणारे अशी मृत्युंजय गणेश मंडळाने आपली ख्याती निर्माण केली आहे. अवघ्या दहा-बारा मित्रांसोबत स्थापन केलेल्या गणेश मंडळाचा आज वटवृक्ष झाला असून मंडळाच्या वतीने अखंडितरित्या सुरू असलेले समाजकार्य आणि दरवर्षीची आकर्षक देखाव्यांची परंपरा कायम आहे.
सामाजिक उपक्रम राबवण्याच्या उद्देशाने १९९०मध्ये प्रकाश मते-पाटील तसेच नि‌तीन चित्ते, संदीप कुलकर्णी, शंकर राजेभोसले, नीलेश पवार, संतोष मुंडवाडकर, सतीश सोनार त्यांच्यासह दहा-बारा मित्रांनी एन ९ येथील चौकात मृत्युंजय गणेश मंडळाची स्थापना केली. जुन्या औरंगाबाद शहरातील पावली पथक त्यावेळी प्रसिद्ध होते. शहरातील गणेश मंडळांप्रमाणे सिडको-हडको या नवीन शहराच्या भागामध्येही पावली पथक असावे, या उद्देशाने मंडळाच्या वतीने १९९२मध्ये ७० मुलांच्या मदतीने पावली सुरू करण्यात आली. मंडळाने पहिल्यांदाच केलेला हा प्रयोग भाविकांना आवडला. त्याच वर्षी सिडको-हडको गणेश मंडळ, औरंगाबाद गणेश मंडह तसेच पोलिसांचे बक्षीस मंडळाच्या पावली पथकाला मिळाले. त्यानंतर प्रत्येक वर्षी गणेश मंडळाने पावलीचे आयोजन करणे सुरू केले. यंदा मंडळामध्ये ३५ ढोल व ८ ते १० ताशा अशा वाद्यांसह २५० ते ३०० मुले तालबद्ध पावली खेळतात. पावली पाहण्यासाठी एन ९ भागासह परिसरातील एन ७, एन ११, टीव्ही सेंटर, प्रतापगडनगर, अयोध्यानगर, रायगडनगर, शिवनेरी कॉलनी या भागातील लोक गर्दी करतात. पावली सोबतच आकर्षक देखावे असावे यासाठी सर्वप्रथम मंडळाने रुद्रेश्वर लेणीचा देखावा सादर केला. याला नागरिकांनी भरभरून प्रतिसाद दिला. त्यानंतर प्रत्येक वर्षी विविध सामाजिक संदेश देणारे तसेच धार्मिक देखावे मंडळाच्या वतीने साकारले जातात. यामध्ये ३५ फुटांची श्री विठ्ठल मूर्ती, साईबाबा, तिरुपती बालाजी, गजानन महाराज, श्री स्वामी समर्थ आदींच्या हुबेहुब मूर्तींच्या देखाव्यांचा समावेश आहे. मृत्युंजय गणेश मंडळावर कोणत्याही पक्षाचा ठसा लागणार नाही, याची सर्व सदस्यांनी काळजी घेतली. दरवर्षी प्रत्येक पक्षाचे नेतेमंडळी आरतीसाठी येतात. त्यामुळे हे गणेश मंडळ शंभर टक्के सार्वजनिक असल्याचे सदस्य सांगतात. मंडळाच्या वतीने दरवर्षी सामाजिक उपक्रम राबवण्यात येतात. यामध्ये विविध आरोग्य शिबिर, रक्तदान शिबिर, अनाथ, गरजू मुलांना साहित्य वाटप, वृक्षारोपण आदी कार्यक्रम घेण्यात येतात. प्रत्येकवर्षी मंडळाच्या वतीने भंडाऱ्याचे आयोजन करण्यात येते.

यंदा जलसंधारण देखावा
गेल्या चार वर्षांपासून मराठवाड्याला दुष्काळाचे चटके सहन करावे लागत आहेत. नागरिकांना पाण्याचे महत्त्व कळावे यासाठी यंदा मंडळाच्या वतीने जलयुक्त शिवार, जलसंधारणाचा देखावा करण्यात आला आहे. यामध्ये कंपार्टमेंट बंडिंग, समतल चर, विहीर पुनर्भरण, जलफेरभरणामुळे पाण्याच्या बचतीचा तसेच योग्य वापराचा संदेश देण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गणेशोत्सवाची परदेशात धूम

$
0
0



Makarand.Kulkarni@timesgroup.com
Tweet : @makarandkMT
औरंगाबाद : परदेशात राहणाऱ्या मराठी कुटुंबांमध्ये गणेशोत्सव साजरा करण्यासाठी मोठी लगबग असते. सातासमुद्रापार अगदी इकडे जरा घरगुती उत्सव साजरा केला जातो. त्याच आनंदात बाप्पांचे स्वागत केले जाते. मूळ औरंगाबादचे, पण आता अमेरिकेतील टेक्सास राज्यातील डलास शहरात स्थायिक झालेले अभियंते मोहित पाडळकर यांच्या घरी यंदाच्या गणेशोत्सवाची धूम सुरू आहे.
घरगुती उत्सवाची माहिती मटाला देताना पाडळकर म्हणाले, नोकरी निमित्ताने १५ वर्षांपूर्वी औरंगाबाद सोडून अमेरिकेत स्थायिक झालो, पण श्रावण संपताच आम्हाला बाप्पांच्या आगमनाचे वेध लागतात. अमेरिकेत गणपतीच्या मूर्ती विक्रीसाठी उपलब्ध असतात. यंदा माझ्या छोट्या मुलाच्या पसंतीची मूर्ती आम्ही घरी आणली. पारंपरिक उत्साहात श्रींची प्रतिष्ठापना केली. मोदक, लाडूंचा प्रसाद, दहा दिवस भारतीयांच्या घरी मोठा सण असतो. आरतीला एकमेकांच्या घरी जाऊन शुभेच्छा देण्याची प्रथा इकडे रूढ झाली आहे. मुले जरी अमेरिकन संस्कृती वाढत असली तरी त्यांना भारतीय सणांची ओळख यानिमित्ताने राहते. ढोल, ताशांचा गजर मात्र ऐकू येत नाही. गणेशोत्सव काळात आपल्याकडे जसे वातावरण असते. ते मात्र आम्ही 'मिस' करतो.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

...बाजरीच्या भाकरीला फास्ट फूडचा तडका!

$
0
0


Abdulwajed.Shaikh@timesgroup.com
Twitter : @abdulwajedMT
अस्सल ग्रामीण परंपरंपरेचा वसा सांगणारे खाद्य पदार्थ आपल्या ताटातून गायब झालेत. पुरणपोळी, कटाची आमटी, कर्नाटकी हुग्गी आता याच रांगेत जाऊन बसलीय बाजरीची भाकरी. फास्टफूडच्या जमान्यातली तरुण पिढी भाकरी म्हटले की कदाचित नाक मुरडेल, पण तिलाच बाजरा सॅण्डविच म्हटले की त्यांच्या तोंडाला पाणी येईल. अशीच अगळीवेगळी रेसिपी घेऊन किराणा चावडी येथील जीवन पांडे आलेत आजच्या फास्टफूडमध्ये.
किराण चावडी मार्गावर असलेल्या एका हातगाडीवर जीवन पांडे यांनी सात वर्षांपूर्वी बाजरा सॅण्डविचचे दुकान थाटले. पांडे यांचे शिक्षण बी कॉमपर्यंत झाले आहे. त्यांना फूड इंड्रस्ट्रीजमध्ये यायचे होते. वडा पाव, पाव भाजी, पाणी पुरी या सारख्या खाद्य पदा‌र्थांची अनेक दुकाने आहेत, पण अस्सल महाराष्ट्रीयन वाण घेऊन त्यांनी या क्षेत्रात उतरण्याचा निर्णय घेतला. पांडे यांच्या घरी त्यांची आई लहानपणी मुलांना झटपट आणि त्यांना आवडेल असेल चटपटीत जेवण मिळावे म्हणून बाजरीच्या भाकरीत चटणी टाकून द्यायची. आईच्या याच खाद्य पदार्थात काही बदल करून नवीन खाद्य पदार्थ तयार करण्याचा विडा पांडे यांनी उचलला आणि त्यांनी तयार केले बाजारा सॅण्डविच.
बाजरा सॅण्डविच तयार करणे अगदी सोपे आहे. आपल्या दुकानात किती ग्राहक येतात याचा अंदाज बांधून पांडे घरातून बाजरीची भाकरी बनवून आणतात. जशी प्रत्येकाच्या घरी तयार करण्यात येते तशीच. त्यात वेगळे काही टाकलेले नसते. या भाकरीवर टाकली जाणारी चटणीही घरीच तयार केली जाते. ती हिरव्या मिरचीची असते. हिरव्या मिरचीमध्ये आले टाकून ती मिक्सरमधून बारीक केले जाते. बाजरीची भाकरी घेऊन त्याच्या अर्ध्या भागावर ही हिरव्या मिरचीची चटणी लावली जाते. यानंतर त्यावर बारीक केलेला कांदा, टोमॅटोच्या गोलाकारच्या चकत्या टाकल्या जातात.
यानंतर चटणी आणि टोमॅटोच्या चकत्यावर भाकरीचा उर्वरित अर्ध्या भागाची घडी केली जाते. या भाकरीचे चाकूने दोन तुकडे करून गॅसवरील पॅनमध्ये टाकले जातात. यानंतर तुप टाकून ही भाकरी खरपूर भाजली जाते. त्यानंतर तयार होते खमंग, झणझणीत, चटपटीत असे बाजरा सॅण्डविच. बाजरी भाकरीची चव, त्याला चटणी आणि टोमॅटोचा तुपातला तडका इथे तुम्हाला पुन्हा-पुन्हा यायला भाग पडतो. इथली वेगळी चव तुमच्या जीभेवर बाजरा सॅण्डविचचे नाव काढले की आपोआप तरळते. पांडे यांचे हे दुकान गेल्या सात वर्षांपासून सुरू आहे.
दुपारी पाच ते संध्याकाळी सातवाजेपर्यंत पांडे ते इथे असतात. त्यांच्या इथे मिळणारा बाजरा सॅण्डविचचा प्रकार महाराष्ट्रात कुठेही मिळत नाही. त्यामुळे औरंगाबादहून पुणे, मुंबई किंवा अन्य शहरात कामासाठी गेलेले अनेक जण येथे आले की, त्यांची पावले पांडे यांच्या दुकानाकडे हमखास वळतात.
आजवर आपण सॅण्डविचचे अनेक शाकाहारी प्रकार चाखले असतील. या पदार्थाचे वैशीष्ट म्हणजे आईच्या हातची चव त्यात मिसळलेली असते. आपली पावले आपसुकच गावाच्या शिवारात, शेताच्या बांधावर कांदा फोडून हिरव्या मिरचीच्या ठेच्यासोबत जी भाकरी खातो, अगदी तसाच अस्सल मातीतला आनंद आपल्याला बाजरा सॅण्डविच चाखले की होतो.

वेगवेगळे फ्लेव्हर
बाजरा सॅण्डविच हा प्रकार पूर्णतः महारा‌ष्ट्रीयन आहे. बाजरीची भाकरी शरिरासाठी खूप चांगली असते. सध्या हिरव्या मिरचीच्या चटणीसोबत हा पदार्थ आम्ही तयार करतो. आगामी काळात बाजरा सॅण्डविचमध्ये चिंचेची चटणी, पिवळी चटणी तसेच अन्य चटण्यांचा वापर करून बाजरा सॅण्डविच आणण्याचा प्रयत्न करणार आहे, अशी माहिती पांडे यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

३ हजार गावांना नळाची प्रतीक्षा

$
0
0



म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
मराठवड्यात होणाऱ्या वॉटरग्रीड योजनेसाठी करण्यात आलेल्या सर्व्हेक्षणात मराठवाड्याच्या आठही जिल्ह्यांतील ३ हजार २७० गावे, वाड्या - वस्त्यांपर्यंत अद्यापही शासनाची कोणतीही पाणीपुरवठा योजना पोचली नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
दुष्काळाने होरपळलेल्या मराठवाड्याचा पाणीप्रश्न कायमचा दूर करण्यासाठी वॉटरग्रीड योजनेच्या माध्यमातून प्रत्येक गावाला पाणीपुरवठा करण्याच‌े शासनाचे नियोजन आहे. या योजनेसाठी नुकतेच सर्व्हेक्षण करण्यात आले. यामध्ये मराठवाड्यातील संपूर्ण जिल्ह्यातील १२ हजार ९७८ पैकी ९ हजार ७०८ गाव, वाड्या - वस्त्यांमध्ये नळयोजना पूर्ण आहे. मात्र, उर्वरित ३२७० ठिकाणी अद्याप एकही योजना झालेली नाही, या ठिकाणी बोअर, हातपंपाच्या माध्यमातून नागरिकांची तहान भागवण्यात येते. सततच्या दुष्काळामुळे गाव, वाड्यांमधील जलस्त्रोत आटल्यानंतर येथील नागरिकांची तहान भागवण्यासाठी टँकर हाच एकमेव पर्याय ठरतो. काही महिन्यांपूर्वी मराठवाड्यात टँकरचा आकडा चार हजारांवर पोचला होता. गेल्या दुष्काळात प्रशासनाकडून कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आले होते. लातूर शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी रेल्वेने पाणी आणावे लागले. यामुळे दुष्काळी मराठवाड्याचे नाव दिल्लीपर्यंत पोचले होते. यामुळे शासनाचे विभागात गुजरातच्या धर्तीवर वॉटरग्रीड पद्धतीने पाणी देण्याचे नियोजन असून प्राथमिक सर्व्हेक्षण पूर्ण करण्यात आले आहे. मराठवाड्यातील बीड जिल्ह्यात सर्वाधिक ३,४४४ गाव-वाड्या-वस्त्या असून, यापैकी केवळ २१२७ ठिकाणीच नळयोजनांसारख्या स्थायी पाणीपुरवठ्याची सोय करण्यात आली आहे. उर्वरित १२९७ ठिकाणी ‌विहीर, बोअर, हातपंप व टँकरचा आधार घ्यावा लागतो. १५ हजार कोटी रुपये खर्च करून तयार करण्यात येणारी ही योजना ४ ते ५ वर्षांत पूर्ण करण्याची शासनाची योजना असून, ही योजना पूर्ण झाल्यास प्रत्येक गावातील पिण्याच्या पाण्याची अडचण दूर होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शास्त्रज्ञ पोहचले शेतकऱ्याच्या दारी

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
सध्या पाऊस समाधानकारक असला तरी खरीप पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव झाल्यामुळे खरीप हंगामाची उत्पादकता टिकवण्यासाठी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने 'विशेष पीक संरक्षण मोहीम' हाती घेतली आहे. या उपक्रमाअंतर्गत कृषी शास्त्रज्ञ थेट शेतकऱ्यांशी सुसंवाद साधत मार्गदर्शन करीत आहेत.
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ आणि कृषी विभाग संयुक्तपणे 'विद्यापीठ आपल्या दारी - तंत्रज्ञान शेतावरी' उपक्रम राबवत आहे. या माध्यमातून 'विशेष पीक संरक्षण मोहीम' हाती घेतली आहे. कृषी शास्त्रज्ञ थेट शेतात पीक पाहणी करून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करीत आहेत. दुष्काळामुळे गेली तीन वर्षे शेतीचे प्रचंड नुकसान झाले. या बिकट परिस्थितीत विविध रोगांमुळे पिकाची उत्पादकता घटली. या पार्श्वभूमीवर विद्यापीठाने उपाय सुचवून शेतकऱ्यांना दिलासा दिला होता. कृषी विद्यापीठांतर्गत आठ जिल्हे आणि ७६ तालुके आहेत. या उपक्रमात प्रत्येक जिल्ह्यासाठी स्वतंत्र पथक नेमण्यात आले आहे. तालुक्यातील पाच ते सहा गावांत पथक प्रत्यक्ष भेट देऊन पिकांची पाहणी करीत आहे. पाहणी करून निरीक्षणे नोंदवल्याशिवाय मार्गदर्शन शक्य नसते. त्यामुळे शेतकऱ्यांपर्यंत पोचण्याचे नियोजन केले, असे विस्तार शिक्षण संचालक डॉ. बी. बी. भोसले यांनी सांगितले.
खरीप पिकांवरील कीड व रोगांबाबत मार्गदर्शन, कमी खर्चात उपाययोजना, एकावेळी एकाच किटकनाशकाची फवारणी, एकात्मिक कीड व्यवस्थापन याविषयी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. '२००८ मध्ये दिवंगत डॉ. श्रीनिवास लोध यांनी उपक्रमात सक्रिय सहभाग घेतला होता. शेतकरी व शास्त्रज्ञातील सुसंवाद कृषी क्षेत्राला बळकटी देणारा आहे. तत्कालीन कुलगुरू डॉ. एस. एस. कदम यांनी प्रथम ही संकल्पना मांडली' असे विभागीय कृषी विस्तार शिक्षण केंद्राचे रामेश्वर ठोंबरे यांनी सांगितले. जालना जिल्ह्यातील जालना, मंठा, अंबड, घनसावंगी या तालुक्यातील २५ गावात पीक संरक्षण मोहीम पूर्ण झाली आहे. या मोहिमेत डॉ. सूर्यकांत पवार, डॉ. एस.डी. बंटेवाड, डॉ. एन. आर. पनगे, रामेश्वर ठोंबरे सहभागी झाले. शेतकऱ्यांनी मोहिमेला प्रतिसाद देत शंकांचे निरसन करून घेतले. औरंगाबाद जिल्ह्यातही सिल्लोड, फुलंब्री व सोयगाव तालुक्यात मोहीम पूर्ण झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images