Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

तक्रारीची ‘पीएमओ’कडून दखल

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
देशभरातल नर्सिंग अभ्यासक्रमांबाबत ध्येयधोरणे व प्रशासकीय घडी सांभाळणाऱ्या इंडियन नर्सिंग कौन्सिलच्या कारभाराबद्दल महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिलने तक्रार केली आहे. गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणावर आर्थिक अनियमितता करून २२१ कोटींचा गैरप्रकार झाल्याचा आरोप महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिलचे अध्यक्ष डॉ. रामलिंग माळी यांनी केला होता. त्यांनी या तक्रारीची प्रत पंतप्रधान कार्यालयासही पाठविली होती. त्याची दखल घेण्यात आली असून या तक्रारीची रितसर चौकशी करून योग्य ती कारवाई करावी, अशी सूचना पंतप्रधान कार्यालयाने केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाला दिल्या आहेत.
महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिलचे अध्यक्ष डॉ. रामलिंग माळी यांच्यासह संगीता विखे आणि आय. टी. थोरात यांनी आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्रालयाच्या चेअरमनकडे २३ ऑगस्ट रोजी १६ पानी लेखी तक्रार दिली होती. तक्रारीत इंडियन नर्सिंग कौन्सिलने गेल्या काही वर्षांत कशा प्रकारची अनियमितता केली. त्याचे मुद्दे समाविष्ट केले होते. २२१ कोटी जागतिक आरोग्य संघटनेकडून आलेल्या ५० कोटींच्या निधींची अनियमिता, आयएनसीच्या नवीन इमारतीत साहित्य खरेदीसाठी ७० कोटींचा नियमबाह्य वापर, इंडियन नर्सिंग कौन्सिलचे अध्यक्षपद आणि सदस्यत्व गेल्या १५ वर्षांपासून नियमबाह्यपणे सांभाळणे, कर्मचारी, अधिकाऱ्यांच्या नियमबाह्य नियुक्त्या, आयएनसी सदस्यांना माहिती, दस्तावेज न पुरविणे, सचिवांची अवैधरीत्या नियुक्ती करणे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे देशभरातील नर्सिंग महाविद्यालयात तपासणीसाठी गेलेल्या निरीक्षकांकडून आलेल्या अहवालांमध्ये परस्पर फेरफार करणे आदी आरोप करण्यात आले होते. एकूणच गेल्या काही वर्षांत इंडियन नर्सिंग कौन्सिलच्या कारभारात मोठ्या प्रमाणावर आर्थिक अनियमितता आढळून आल्याने २२१ कोटींच्या गैरव्यवहाराचा आरोप महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिलचे अध्यक्ष माळी यांनी तक्रारीतून केला होता. या तक्रारीची प्रत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यालयासही पाठविली होती. त्यावर माळी यांना नुकतेच उत्तर प्राप्त झाले असून पंतप्रधान कार्यालयाने केंद्रीय आरोग्य खात्याला संबंधित प्रकरणाची चौकशी करावी आणि योग्य ती कारवाई करण्याची सूचना केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कार्ड बदलून पावणेदोन लाख लंपास

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शहरात सायबर ठगाकडून नागरिकांना गंडवण्याचे प्रकार सुरू आहेत. मुकुंदवाडीमध्ये एका अल्पवयीन मुलाचे एटीएम कार्ड बदलून तब्बल १ लाख ८५ हजाराची रक्कम लंपास करण्यात आली. दुसऱ्या एका घटनेत महिलेच्या खात्यावरून ऑनलाइन १ लाख ४५ हजार रुपये काढण्यात आले. याप्रकरणी सबंधित पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

मुकुंदवाडी येथील एक १६ वर्षांचा मुलगा सोमवारी रात्री नऊ वाजता मुकुंदवाडी भाजीमंडई येथे असलेल्या एसबीआय बँकेच्या एटीएम सेंटरवर गेला होता. त्यावेळी एक अनोळखी व्यक्ती त्याला भेटला. त्याने तुला मिनी स्टेटमेंट काढून देतो, असे सांगत या मुलाच्या हातातील एटीएम कार्ड घेतले. यानंतर त्याने हातचलाखीने त्याच्या जवळील एटीएम कार्ड या मुलाच्या हातात देत निघून गेला. त्यानंतर त्याने वेळोवेळी या एटीएम कार्डचा वापर करीत वेगवेगळ्या एटीएममधून १ लाख ८५ हजार रुपयाची रक्कम पासवर्डचा वापर करीत काढून घेतली. याप्रकरणी मुलाने गुरुवारी मुकुंदवाडी पोलिस ठाणे गाठून फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. याप्रकरणी पोलिस निरीक्षक नाथा जाधव तपास करीत आहेत.

महिलेला दीड लाखांचा गंडा

सायबर ठगाने महिलेला गंडवल्याची घटना १ सप्टेंबर २०१६ रोजी छावणी भागात घडली. छावणी आयकर भवन कार्यालय परिसरात एक ५४ वर्षाची महिला राहते. या महिलेच्या बँक खात्याचा क्रमांक अज्ञात आरोपीने‌ मिळवला. यानंतर महिलेच्या नावाने बँकेला ई-मेल करून आरोपीच्या खात्यावर १ लाख ४५ हजार रुपये ट्रान्सफर करण्याचे सांगितले. या प्रकरणी महिलेच्या तक्रारीवरून छावणी पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध फसवणूक व माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक चंद्रकांत सावळे याप्रकरणी तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शेतकऱ्यांच्या चौपट गृहिणींच्या आत्महत्या

$
0
0

nikhil.nirkhee@timesgroup.com
Tweet : @nnirkheeMT

औरंगाबाद : एकीकडे शेतकऱ्यांच्या आत्महत्यांकडे लक्ष वेधले जाते आणि त्यावर प्रभावी उपाययोजना करण्याऐवजी बहुतेक राजकीय पक्षांकडून त्याचे राजकारण केले जाते. मात्र, शेतकऱ्यांच्या चौपटीने गृहिणींच्या आत्महत्या झाल्याचे 'नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरो'नुसार (एनसीआरबी) स्पष्ट झाले आहे. देशभरात ५ हजार ६५० शेतकऱ्यांनी, तर तब्बल २० हजार ४१२ गृहिणींनी आपले जीवन संपवले. मात्र, या आत्महत्यांबाबत कोणत्याही राजकीय पक्षाकडून किंवा सरकारकडून आजपर्यंत चकार शब्दही काढला गेला नाही.

'एनसीआरबी'नुसार २०१४-१५ मध्ये देशभरात झालेल्या एकूण आत्महत्यांमध्ये १८ टक्के प्रमाण हे गृहिणींचे आहे, तर ४.३ टक्के प्रमाण हे शेतकऱ्यांचे आहे. मात्र, आजपर्यंत गृहिणींच्या आत्महत्यांबाबत फारशी कधीही चर्चा झाली नाही. त्यातही गृहिणींच्या आत्महत्यांमागे घगुती हिंसा हेच प्रमुख कारण असल्याचे समोर आले आहे. वैवाहिक जीवनातील असमाधान, वैवाहिक प्रश्न, आर्थिक समस्या, कुटुंबाकडून अव्हेरले जाणे, हुंड्यासह विविध कारणांसाठी सासरकडून होणारा छळ आदींसह जनुकीय दोष, नैराश्य, स्किझोफ्रेनिया यासारखे काही मानसिक आजारदेखील गृहिणींच्या आत्महत्यांमागील कारणे आहेत. म्हणूनच 'कनेक्ट, कम्युनिकेट, केअर' ही यंदाची थीम आहे. नांदेड येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील मनोविकृती विभागप्रमुख प्रा. डॉ. प्रसाद देशपांडे यांच्यानुसार, आत्महत्या करणाऱ्या व्यक्ती या एकलकोंड्या असतात किंवा होतात. त्यांचा इतर कुटुंबियांशी किंवा इतरांशी संपर्क तुटतो. त्यामुळे त्यांच्या मनात सुरू असणारे वादळ इतरांच्या लक्षात येत नाही. अशा व्यक्तींचे मन मोकळे होणे आवश्यक आहे. त्यांच्याशी सकारात्मक संवाद प्रस्थापित होणे, त्यांचे मनापासून ऐकणे, प्रश्न समजून घेणे-सोडवणे, त्यांची काळजी घेणे खूप महत्त्वाचे आहे. आत्महत्या हा कुठल्याही समस्येवर तोडगा नसून, प्रश्न सोडवणे हाच तोडगा आहे व असा तोडगा काढणे शक्य आहे, हे त्यांना मनापासून पटवणे गरजेचे आहे. यातून निम्म्यापेक्षा जास्त आत्महत्या रोखणे शक्य आहे, असेही डॉ. देशपांडे म्हणतात.

दर ४० सेकंदांना १ आत्महत्या

जागतिक आरोग्य संघटनेनुसार दरवर्षी जगभरात ८ लाख व्यक्ती आत्महत्या करतात; म्हणजेच दर ४० सेकंदांना एक आत्महत्या होते. 'कनेक्ट, कम्युनिकेट, केअर' या तीन 'सी'च्या अंमलबजावणीतून या आत्महत्या रोखल्या जाऊ शकतात, असेही 'डब्ल्यूएचओ' म्हणते.

आत्महत्यांमागे जेनेटिक डिसॉर्डर, नैराश्य, स्किझोफ्रेनिया हीदेखील कारणे आहेत. अशा व्यक्तींच्या मेंदुतील 'सिरोटोनिन केमिकल'ची पातळी घटते, तर 'डोपामाइन'ची पातळी वाढते. अशांवर समुपदेशनासह औषधोपचारही करावे लागतात. - प्रा. डॉ. प्रसाद देशपांडे, मनोविकारतज्ज्ञ

६० टक्के आत्महत्या या नैराश्यातून (डिप्रेशन) होतात व नैराश्याचे प्रमाण पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्ये दुपटीने असते. तसेच आत्महत्या किंवा आत्महत्येचा विचार मनात येणे हे मानसिक आजाराचे लक्ष असू शकते व त्यावर खात्रीने उपाय होऊ शकतात. - डॉ. विनय बाऱ्हाळे, ज्येष्ठ मनोविकारतज्ज्ञ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शासकीय सुट्या घेण्यास मज्जाव करणारा आदेश रद्द

$
0
0


म. टा. विशेष प्रतिनिधी, औरंगाबाद
पोलिस प्रशिक्षण केंद्रात कार्यरत असलेल्या पोलिस निरीक्षक आणि पोलिस उपअधीक्षक यांना शासकीय सुट्या उपभोगता येणार नाहीत, असा आदेश प्रशिक्षण केंद्राच्या प्राचार्यांनी काढला होता. या आदेशास महाराष्ट्र प्रशासकीय न्यायप्राधिकरणात (मॅट)आव्हान दिले. या याचिकेवर मॅटचे न्या. जे. डी. कुलकर्णी यांच्या समोर झाली असता त्यांनी सुट्या उपभोगण्यापासून रोखता येणार नाही, असा निर्णय देत याचिका निकाली काढली.
धुळे येथील पोलिस प्रशिक्षण केंद्रात कार्यरत असलेले पोलिस निरीक्षक, पोलिस उपअधीक्षकांसह काही शिक्षकांना मंजूर करण्यात आलेली एक टप्पा पदोन्नोत्ती रद्द करण्यात आली आहे. पोलिस निरीक्षक आणि पोलिस उपअधीक्षकांना यापुढे शासकीय सुट्या उपभोगता येणार नाहीत, त्याच बरोबर साप्ताहिक सुट्टीच्या दिवशी मुख्यालय सोडण्यापूर्वी त्यांना केंद्राच्या प्राचार्यांची परवानगी घ्यावी, शासकीय सुट्टी उपभोगण्याची परवानगी मागू नये, असे आदेश २९ नोव्हेंबर २०१५ रोजी काढले होते. या आदेशाचे उल्लघंन करणाऱ्या अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशारा दिला होता. या आदेशाला केंद्रातील पोलिस निरीक्षक रामराव सोमवंशी यांनी मॅटमध्ये आव्हान दिले होते. नोव्हेंबरपासून बंद केलेल्या सुट्यांदरम्यानचा मोबदला प्रशिक्षण केंद्रातील प्राचार्यांच्या पगारातून द्यावा, प्राचार्यांनी काढलेला आदेश रद्द करावा अशी विनंती याचिकेत केली. सुनावणीअंती मॅटने प्राचार्यांनी काढलेले आदेश रद्दबातल ठरविले. याचिकाकर्त्यांची बाजू प्रकाशसिंह पाटील, यांनी तर प्रिया भारस्वाडकर यांनी पोलिस केंद्रातर्फे बाजू मांडली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दहावीतील आकाशची गळफास घेऊन आत्महत्या

$
0
0



म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
दहावीत शिकणाऱ्या आकाश भीमा सुतार (शांतीपुरा, छावणी) या विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली. आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप समजू शकले नाही.
आकाशचे (वय १६) आई-वडील मुंबईत मोलमजुरी करतात. एक मोठा भाऊ पुण्यात खासगी नोकरीला आहे, तर शिक्षणासाठी आकाश हा त्याच्या आजीकडे राहत होता. छावणी परिसरातील एका खासगी शाळेत तो दहावीला होता. आजी कामानिमित्त घराबाहेर गेली असता आकाशाने गळफास घेतला. आज सकाळी साडेअकराच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला. नीतेश दीपक घाडगे यांनी अन्य शेजाऱ्यांच्या मदतीने बेशुद्ध अवस्थेत असलेल्या आकाशाला घाटी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यास तपासून मृत घोषित केले.

धमकावल्यामुळे टोकाचा निर्णय
आकाशला दोन ते तीन दिवसांपूर्वी कांही मुलांनी जुन्या भांडणावरून धमकावले होते. एका मुलाने त्यास भावाचा फोन नंबर मागितला होता. त्यामुळे घाबरलेल्या आकाशाने टोकाचे पाऊल उचलले, अशी चर्चा आहे. मात्र, आत्महत्येमागील कारण अद्याप अस्पष्ट असून तपास सुरू असल्याचे छावणी पोलिसांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पावणेतीन कोटींची डांबर खरेदी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
खडड्यांनी जर्जर झालेल्या आणि शहरवासियांच्या उरात धडक भरविणाऱ्या खड्डेमय रस्ता दुरुस्तीचे काम महापालिकेने मनावर घेतले आहे. या कामाच्या डांबरासाठी २ कोटी ८९ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली असून, टेंडर तयार करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे, अशी माहिती आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांनी दिली.
रस्त्यांवरील खड्डे आणि डांबरीकरण या संदर्भात नागरिकांमध्ये असंतोषाची भावना आहे. खड्डे लवकर बुजले पाहिजेत अशी मागणी होत आहे. नगरसेवकही खड्ड्यांच्या प्रश्नावरून त्रस्त झाले आहेत. कंत्राटदारांच्या माध्यमातून पॅचवर्क करू नका असे आदेश महापौरांसह सर्व पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाला दिले आहेत. कंत्राटदारांच्या माध्यमातून पैसे खर्च होतात आणि खड्डे मात्र बुजवले जात नाहीत, असा पदाधिकाऱ्यांचा अनुभव आहे. त्यामुळे महापालिकेने स्वतःच पॅचवर्कचे काम करावे, असे पदाधिकाऱ्यांना सांगितले आहे. त्या पार्श्वभूमीवर पॅचवर्क आणि रस्त्याच्या कामासाठी लागणारे साहित्य खरेदी करण्याचे ठरविले आहे, असे बकोरिया यांनी सांगितले. त्यात डांबर खरेदी बरोबरच जेसीबी, टिप्पर्सची खरेदी केली जाणार आहे. पॅचवर्क व रस्त्यांच्या डांबरीकरणासाठी महापालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून काम करून घेतले जाणार आहे. त्यामुळे कामे योग्य प्रकारे होतील, असा विश्वास बकोरिया यांनी व्यक्त केला.

...अन् निर्णय बदलला
रस्त्याच्या पॅचवर्कची कामे दरवर्षी महापालिकेतर्फे कंत्राटदारांच्या माध्यमातून केली जातात. त्यासाठी पाच ते सात कोटी रुपये खर्च होतो. पॅचवर्क केलेले खड्डे काही दिवस सुस्थितीत राहतात आणि नंतर त्याच ठिकाणी खड्डा होतो. त्यामुळ खर्च केलेला पैसा वाया जातो. ही बाब लक्षात घेऊन पालिकेचे तत्कालीन आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी पालिकेचा स्वतःचा डांबरप्लांट असावा असा ठराव मांडला, त्यासाठी तीन कोटी रुपयांची तरतूद देखील केली. सर्वसाधारण सभेने हा ठराव मंजूर केला. मात्र, त्यानंतर डांबराचा स्वतंत्र प्लांट महापालिकेला परवडणारा नाही, असे म्हणून पालिकेतील अधिकाऱ्यांनी डांबर प्लांटला खो देण्याचा प्रयत्न केला. बकोरिया यांचेही मत डांबर प्लांट परवडणार नाही असे झाले. त्यामुळे त्यांनी पॅचवर्कच्या कामासाठी वॉर्ड कार्यालयनिहाय तरतूद करण्याचा निर्णय घेतला. त्यालाही विरोध झाल्यामुळे डांबरीकरणासाठी लागणारे मटेरियल खरेदी करण्याचा निर्णय बकोरिया यांनी घेतला. त्यानुसार डांबरासह आवश्यक असलेली यंत्रसामुग्री खरेदी केली जाणार आहे. या यंत्रसामुग्रीच्या माध्यमातून महापालिका कर्मचाऱ्यांच्या मार्फत डांबरीकरणाचे व पॅचवर्कचे काम केले जाणार आहे. पुरेसे कर्मचारी उपलब्ध न झाल्यास आऊटसोर्सिंगच्या माध्यमातून कर्मचारी घेण्याचा विचार देखील केला जाण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रेणू बिबट्याने दिला दोन पिलांना जन्म

$
0
0



म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
शहरवासीयांसाठी एक खूशखबर. महापालिकेच्या प्राणिसंग्रहालयातील रेणू बिबट्याने शनिवारी सकाळी दोन पिलांना जन्म दिला. त्यामुळे प्राणिसंग्रहालयातील बिबट्यांची संख्या आता पाच झाली आहे.
डॉ. प्रकाश आमटे यांच्या हेमलकसातील प्राणिसंग्रहालयातून फेब्रुवारी महिन्यात रेणू आणि राजा बिबट्याची जोडी आणण्यात आली. त्यानंतर रेणुने ७ मार्च रोजी तीन पिलांना जन्म दिला. पिलांची योग्य प्रकारे निगा न राखल्याने ९ मार्च रोजी तिन्ही पिलांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे रेणू आणि राजाची विशेष काळजी प्राणिसंग्रहालयाच्या व्यवस्थापनाकडून घेतली जात होती. शुक्रवारी सकाळी रेणूने दोन पिलांना जन्म दिला. पिलांची प्रकृती चांगली असून दोन्हीही पिले आईचे दूध पीत असल्याची माहिती प्राणिसंग्रहालयातून देण्यात आली. पिलांचे डोळे अद्याप उघडलेले नाहीत. पूर्वानुभव लक्षात घेता पिल्ले व त्यांच्या आईला सुरक्षित ठिकाणी ठेवले आहे. त्यांची प्रकृती उत्तम असून किमान आठ दिवस कुणालाही त्यांच्या पिंजऱ्याजवळ जाण्याची परवानगी दिली जाणार नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिजामाता, जयभवानी, देवगिरी संघांची आगेकूच

$
0
0

जिजामाता, जयभवानी, देवगिरी संघांची आगेकूच
शालेय कबड्डी स्पर्धा
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
जिल्हा क्रीडा कार्यालय व महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आंतरशालेय कबड्डी स्पर्धेत जिजामाता कन्या विद्यालय, जयभवानी विद्यामंदिर, देवगिरी ग्लोबल अकॅडमी, औरंगाबाद पोलिस पब्लिक हायस्कूल या संघांनी विजय मिळवून आगेकूच केली.
एमजीएम क्रीडा संकुलात शालेय कबड्डी स्पर्धेला शनिवारी प्रारंभ झाला. या स्पर्धेत १४ वर्षे, १७ वर्षे, १९ वर्षे या वयोगटांत एकूण ११८ संघांनी सहभाग घेतला आहे. भारतीय कबड्डी महासंघाचे उपाध्यक्ष व माजी आमदार किशोर पाटील यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. या प्रसंगी डॉ. प्रवीण सूर्यवंशी, मनपा उपायुक्त रवींद्र निकम, कबड्डी संघटनेचे सचिव बाबुराव अतकरे, जिल्हा क्रीडा अधिकारी ऊर्मिला मोराळे, मनीष पोलकम यांची प्रमुख उपस्थिती होती. मनपा क्रीडाधिकारी संजीव बालय्या यांनी स्वागत केले.
१४ वर्षांखालील गटामधील सामन्यांचे निकाल ः जिजामाता कन्या विद्यालय वि. वि. विश्वकर्मा विद्यामंदिर (३३-०), जयभवानी विद्यामंदिर वि. वि. रवींद्र प्राथमिक शाळा (२४-१४), राजर्षी शाहू विद्यालय वि. वि. रायझिंग स्टार (३५-२८), ऑक्सफर्ड स्कूल वि. वि. न्यू हायस्कूल, हर्सूल (३६-१३), मनपा प्रियदर्शनी शाळा वि. वि. रिवायवल स्कूल (२३-९), मोईन उल उलूम हायस्कूल वि. वि. गुरु तेग बहादूर हायस्कूल (४०-२६), देवगिरी ग्लोबल वि. वि. एलोरा हायस्कूल (५१-९), औरंगाबाद पोलिस पब्लिक हायस्कूल वि. वि. बून हायस्कूल (४०-९), मनपा हर्सूल शाळा वि. वि. गीता विद्यामंदिर (४५-८), लिटिल वंडर स्कूल वि. वि. एमजीएम स्कूल (२९-१९), वरद विद्यामंदिर वि. वि. सेंट जॉन स्कूल (३५-५), एम. एस. पब्लिक स्कूल वि. वि. होली क्रिसेंट स्कूल (२७-२५), संत मीरा विद्यालय वि. वि. पोदार इंटरनॅशनल स्कूल (३८-१४), मनपा इंदिरानगर शाळा वि. वि. नागसेन विद्यालय (१८-१५), जयभवानी विद्यामंदिर वि. वि. जिजामाता कन्या विद्यालय (३४-२३), सरस्वती भुवन विद्यालय वि. वि. राजर्षी शाहू (४२-२५), पोलिस पब्लिक स्कूल वि. वि. न्यू हायस्कूल, चिकलठाणा (३२-४), एम. एस. पब्लिक स्कूल वि. वि. मनपा इंदिरानगर शाळा (२८-१७), बीएसजीएम स्कूल वि. वि. संत मीरा विद्यालय (२९-११), गोदावरी पब्लिक स्कूल वि. वि. ऑक्सफर्ड स्कूल (३९-४), देवगिरी ग्लोबल अकॅडमी वि. वि. ड्रीम लँड स्कूल (३४-१८), सरस्वती भुवन हायस्कूल वि. वि. मोईन उल उलूम (३५-३), एम. एस. पब्लिक स्कूल वि. वि. लिटिल वंडर स्कूल (१९-१०).
१७ वर्षांखालील मुले ः औरंगाबाद पोलिस पब्लिक स्कूल वि. वि. सेंट लॉरेन्स हायस्कूल (२६-८), नागसेन विद्यालय वि. वि. ज्ञानज्योत विद्यालय (१९-४), राजे संभाजी विद्यालय वि. वि. रवींद्रनाथ प्रशाला (४३-५), रायझिंग स्कूल वि. वि. रेयान इंग्लिश स्कूल (३८-९), राजर्षी शाहू वि. वि. बबनराव ढाकणे हायस्कूल (३९-३७), बालाजी हायस्कूल वि. वि. संस्कार विद्यालय, नक्षत्रवाडी (३२-१९).

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


यादगार देखाव्याची देखणी परंपरा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
यादगार गणेश मंडळाची औरंगाबादचा राजा अशी ओळख. जाधवमंडी येथे १९६५मध्ये या मंडळाची दिमाखात मुहूर्तमेढ रोवली. नगरसेवक नंदकुमार घोडेले यांचे बंधू गोपी घोडेले, आनंद गायकवाड व कंपनीने गेल्या ३० वर्षांपासून या मंडळासाठी तन-मन-धनाने कष्ट उपसले.
सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक आणि तत्कालिक घटनांवर आधा‌रित संदेश देणारे देखावे सादर करण्यात यादगार मंडळाचा हातखंडा आहे. मंडळाने २५ वर्षांपूर्वी गणेश मंदिर उभारले. या मंदिरातच गणेशस्थापना केली जाते. सुमारे ८० किलोहून जास्त खामगावी चांदी आणून विश्वकर्मा ज्वेलर्सकडून गणेश मूर्ती मढवली. सिंहासन, मुकुट सजावट करून घेतला, अशी माहिती मंडळाचे विद्यमान अध्यक्ष गोपी घोडेले यांनी दिली. मंडळाने यावर्षी शिर्डीच्या साईबाबांच्या साईलीला यांचा देखावा सादर केला आहे. साईंच्या जन्मापासून ते समाधीपर्यंतच्या प्रमुख गोष्टी दाखविण्याचा प्रयत्न देखाव्यातून सादर केला आहे. २०१४मध्ये या मंडळाने 'कुंभकर्णाची झोप' हा सादर केलेला देखावा तुफान गाजला. २०११ मध्ये भ्रष्टाचाराची दहीहंडी फोडण्याचा देखावा सादर केला होता. यात अण्णा हजारे यांच्या भ्रष्टाचारविरुद्धच्या आंदोलनाला अधोरेखित केले होते. मुंबईतील कलाकारांची एक टीम या देखाव्यासाठी रात्रंदिवस काम करत होती. दहीहंडी फोडण्यासाठी ४० कठपुतळ्या तयार केल्या होत्या. या देखाव्यासोबतच स्त्री भ्रूणहत्येच्या विरोधात प्रबोधन करण्यासाठी प्रोजेक्टरवर एक चित्रफीत दाखवली जात होती. स्त्रीजन्माचे स्वागत करा, बेटी बचाओ देश बचाओ, स्त्री जगली, तर प्रगती होईल, यासारखे संदेश या चित्रफितीतून देण्यात आला.

मंदिर नेहमी सामाजिक आणि धार्मिक देखावे तयार करत असते. याशिवाय चतुर्थीला साबुदाणा खिचडी वाटप आणि घाटी सारख्या हॉस्पिटल्समध्ये रुग्णांना दर वर्षी खिचडी व फळवाटप करतो. - गोपी घोडेले, अध्यक्ष, यादगार मंडळ

यादगार गणेश मंडळाचा देखावा दर वर्षी यादगारच होतो. मंडळाला आजपर्यंत ४-५ पुरस्कारही मिळाले असून, शहरातच नव्हे तर मराठवाड्याच्या पातळीवर मंडळाचा गौरव झाला आहे. मंडळात सध्या ६० हून अधिक जण कार्यरत आहेत. - आनंद गायकवाड, सदस्य, यादगार मंडळ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

व्हॉलिबॉलमध्ये सभु., नाईक, पाटील संघ विजेते

$
0
0

व्हॉलिबॉलमध्ये सभु., नाईक, पाटील संघ विजेते
क्रीडा महोत्सव
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
श्री सरस्वती भुवन शिक्षण संस्था आणि अॅडव्होकेट्स स्पोर्टस असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मराठवाडा मुक्तिसंग्राम क्रीडा महोत्सवात व्हॉलिबॉलमध्ये कर्मवीर शंकरसिंग नाईक शाळा, सरस्वती भुवन प्रशाला, बळीराम पाटील हायस्कूल या संघांनी सहभागी गटात विजेतेपद पटाकाविले.
सरस्वती भुवन शिक्षण संस्थेच्या मैदानावर पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांच्या हस्ते क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. या प्रसंगी आमदार अतुल सावे, संस्थेचे सरचिटणीस अॅड. दिनेश वकील यांची प्रमुख उपस्थिती होती. लोणीकर म्हणाले, 'आजकाल मुले संगणक, टीव्ही आणि मोबाइलला चिकटून बसतात. परिणामी आरोग्य ढासळते. अभ्यासावरही विपरित परिणाम होतो. मुलांनी मैदानी खेळांना आपल्या जीवनात प्राधान्य द्यावे.'
अॅड. गोपाल पांडे यांनी प्रास्ताविक केले. यावेळी ऋग्वेद जोशी, स्वामिनी मंडलिक, ऋतुजा बक्षी, शेख रफिक, गोपाल पांडे या खेळाडूंचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास राजू वैद्य, राजू बागडे, अनिक मकरिये, सुनील सुतवणे, रामकृष्ण जोशी, जुगलकिशोर धूत, मिलिंद रानडे, डॉ. विशाल देशपांडे, डॉ. दयानंद कांबळे, चंद्रशेखर पाटील, पद्माकर इंगळे, उदय पंड्या, राहुल अहिरे, सतीश पाठक यांची प्रमुख उपस्थिती होती. अॅड. संकर्षण जोशी यांनी सूत्रसंचालन केले.
या क्रीडा महोत्सवात कबड्डी, लंगडी, खोखो, व्हॉलिबॉल, फुटबॉल, बॅडमिंटन, बास्केटबॉल, अॅथलेटिक्स, जिम्नॅस्टिक्स, मल्लखांब या खेळांमध्ये एकूण ३,५०० खेळाडूंनी सहभाग घेतला आहे.
व्हॉलिबॉल स्पर्धेचा अंतिम निकाल ः १४ वर्षांखालील मुली - १. कर्मवीर शंकरसिंग नाईक शाळा, २. बळीराम पाटील, ३. शारदा मंदिर कन्या प्रशाला. मुले - १. सरस्वती भुवन प्रशाला, २. बळीराम पाटील हायस्कूल, ३. कर्मवीर शंकरसिंग नाईक शाळा.
१७ वर्षांखालील मुली - १. बळीराम पाटील हायस्कूल, २. कर्मवीर शंकरसिंग नाईक शाळा, ३. शारदा मंदिर कन्या प्रशाला. मुले - १. सरस्वती भुवन प्रशाला, २. बळीराम पाटील हायस्कूल, ३. कर्मवीर शंकरसिंग नाईक शाळा.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘हर हर महादेव’चे जिगरबाज सादरीकरण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
नाना जिगरबाज क्रीडा प्रकार सादर करून प्रत्येक गणेश मिरवणुकीत शहरवासीयांची मने जिंकणारे मंडळ म्हणून हर हर महादेव क्रीडा मंडळाची ख्याती. विविध उपक्रमांच्या माध्यमातून गेल्या २८ वर्षांपासून या गणेश मंडळाने औरंगाबादकरांच्या मनात अढळ स्थान निर्माण केले आहे.
पदमपुरा भागातील काका चौकात गणेशोत्सवाची सुरुवात होताच, ढोल-ताशे पथकांसोबत झांज पथकाचा सराव सुरू होतो. पथकात लहान मुले आणि युवकांचा समावेश असतो. मंडळाचे अध्यक्ष संतोष मरमठ्ठ, सचिव संजय बारवाल, उपाध्यक्ष संतोष बारवाल, चंदू तोंडगिरे, राजू कांबळे दिनेश जीवनवाल यांच्यासह मंडळाचे तरुण कार्यकर्ते यांच्या नेतृत्वाखाली पंरपरा सुरू आहे. १९८८मध्ये मंडळाची स्थापना झाल्यानंतर पहिल्यांदा १९९०मध्ये झेंडा पथक काढण्यात आले. शिस्तबद्ध झालेल्या या कार्यक्रमानंतर १९९४ पासून पावली पथक आणि झांज पथकाची सुरुवात करण्यात आली. सुरवातीला या पथकामध्ये ४० जण होते. आता ही संख्या ३०० च्या घरात आहे. पथकामध्ये कर्णपुरा, पदमपुरा आणि रेल्वे स्टेशन भागातील तरुणही सक्रिय सहभाग नोंदवितात.
गणेशोत्सवात या क्रीडा प्रकारांसोबतच विविध सामाजिक संदेश देणारे देखावे सादर करण्यात येतात. झाडे लावा झाडे जगवा, सिंहअवतार, मुंबई हल्ला देखावा हे मंडळाचे काही गाजलेले देखावे. एड्स जनजागृतीसाठी मंडळाने ‌अभियानही राबविले आहे. दरवर्षी हर हर महादेवच्या झांज पथकामध्ये शिवकालीन युद्ध कलेचे सादरीकरण केले जाते. हे पथक गांधी पुतळामार्गे सिटीचौकात येताच सीमेवर रक्षण करणाऱ्या शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण करते. मंडळाच्या वतीने दरवर्षी काका चौकात मोठा भागवत सप्ताहाचे आयोजन केले जातो. पथकाने भूकंपग्रस्तांना मदतीच्या कार्यक्रमात आपला सहभाग नोंदविला आहे.

२३ वर्षांपासून मूर्ती कायम
हर हर क्रीडा मंडळाने १९९३मध्ये गणरायाची प्रतिष्ठापना केली. विसर्जनासाठी मिरवणूक निघाली. मिरवणूक संपायला पहाट झाली. गणेशाची मूर्ती विसर्जित करणार तोच भूकंप झाला. आम्ही सर्वजण स्तब्ध झालो. बाजूला येऊन काहीवेळ शांत बसलो. या घटनेनंतर अद्यापपर्यंत गणेश मूर्तीचे विसर्जन केले नाही, अशी अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष संतोष मरमठ्ठ यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘एमआयएम’ची बीडमध्ये उडी

$
0
0



म. टा. प्रतिनिधी, बीड

नगरपालिका निवडणुका अजून काही महिने लांब असतानाच, 'एमआयएम'ने बीडमध्ये शेख शकीला निजाम यांना नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी जाहीर करत आघाडी घेतली आहे.
राज्यात सर्वत्र या वर्षाच्या अखेरीस नगरपालिकांच्या नोव्हेंबरच्या अखेरीस किंवा डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये नगरपालिका निवडणुका होण्याची शक्यता आहे. त्या दृष्टीने प्रशासनाची तयारी सुरू झाली असली, तरीही राजकीय पक्षांकडून चाचपणी घेतली जात आहे. विशेषत: नगराध्यक्षपदाची निवड थेट मतदारांमधून होणार असल्यामुळे, राजकीय डावपेच रंगू लागले आहेत. या पार्श्वभूमीवर, बीडमध्ये 'एमआयएम'ने नगराध्यक्षपदाचा उमेदवार जाहीर केला आहे. बीडमध्ये नगरपालिका निवडणुकीसाठी वॉर्ड रचना जाहीर करण्यात आली आहे. मात्र, नगराध्यक्षपदाचे आरक्षण सोडत अजून पडलेली नाही. त्यामुळे नगराध्यक्ष पदाचे आरक्षण जाहीर झाल्यानंतरच सर्व पक्ष आपले नगराध्यक्ष पदाचे चेहरे उघड करतील. मात्र, 'एमआयएम'चे शहराध्यक्ष डॉ. इद्रीस हाश्मी यांनी शनिवारी पत्रकार परिषद घेत नगराध्यक्ष पदाची उमेदवारी जाहीर केली. बीडच्या नगराध्यक्षपदासाठी शेख शकीला निजाम यांना उमेदवारी देण्यात आली आहे. शेख शकीला निजाम यांचे पती शेख निजाम यांनी नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काही दिवसांपूर्वी 'एमआयएम'मध्ये प्रवेश केला होता. त्यामुळे उमेदवारी जाहीर करून त्यांना लगेच प्रवेशाचे बक्षीस मिळाले, असे मानले जात आहे.

मुस्लिम मतांचे समीकरण
बीड नगरपालिकेत सद्यस्थितीला राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत आहे. ४६ पैकी ४५ नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत. मात्र, शहरात मुस्लिम मतदार मोठ्या प्रमाणात असल्याने 'एमआयएम'ला बीडमध्ये नगरपालिकेत चांगले यश मिळेल, अशी अपेक्षा आहे. त्यामुळे 'एमआयएम'ने अातापासून उमेदवार जाहीर करून प्रचारासाठी वेळ मिळविला आहे. 'एमआयएम'चा उमेदवार जाहीर झाल्यानंतर, आता अन्य पक्ष उमेदवार केव्हा जाहीर करतात, या चर्चेला सुरुवात झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘समांतर’ घेण्यास पालिका सज्ज

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'समांतर'वर कराराप्रमाणे कारवाई करता येईल, असा निकाल कोर्टाने दिल्याने, पाणी योजना ताब्यात घेण्यासाठी शनिवारी महापालिकेत आढावा बैठक झाली. आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांनी संबंधित अधिकाऱ्यांच्या बैठकीत, 'समांतर'कडे असलेले पालिकेचे २७० कर्मचारी वर्ग करून घेण्याचे आदेश दिले. निर्णयाची लेखी प्रत मिळताच पालिका केव्हाही योजना ताब्यात घेऊ शकते.
कराराप्रमाणे 'समांतर'च्या कंपनीवर कारवाई करता येईल, असा निकाल न्यायालयाने दोन दिवसांपूर्वी दिला. त्याची प्रत अद्याप पालिकेला मिळालेली नाही. प्रत मिळेपर्यंत वाट न पाहता बकोरिया यांनी पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन एकूणच तयारीचा आढावा घेतला. सलग सुट्ट्या आल्यामुळे न्यायालयाच्या निकालाची प्रत मिळू शकली नाही, सोमवारी कदाचित ती मिळू शकेल, त्यानंतर केव्हाही समांतर जलवाहिनीच्या कंपनीवर महापालिका करारानुसार कारवाई करू शकते, असे पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता सरताजसिंग चहल यांनी सांगितले. त्या अनुषंगाने बकोरिया यांनी बैठक घेतल्याचे ते म्हणाले.
महापालिकेने वसूल झालेली पाणीपट्टी जमा करण्यासाठी बँकेत स्वतंत्र खाते उघडले आहे. त्यामुळे यापुढे वसूल होणारी पाणीपट्टी पालिकेच्याच बँक खात्यात जमा होईल, कंपनीचा आणि वसुलीचा काही संबंध राहणार नाही. औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटी कंपनीकडे महापालिकेचे २७० कर्मचारी होते, हे सर्व कर्मचारी पुन्हा महापालिकेत सामावून घेण्याचे आदेश आयुक्तांनी दिल्याचे चहल यांनी स्पष्ट केले. या २७० कर्मचाऱ्यांशिवाय आणखी १०५ कर्मचाऱ्यांची पाणीपुरवठा विभागाला गरज भासणार आहे. हे कर्मचारी आऊट सोर्सिंगच्या माध्यमातून भरले जाणार आहेत, यासाठी टेंडर प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. पाणीपुरवठ्याच्या देखभाल दुरूस्तीसाठी झोन कार्यालय निहाय २५ लाखांचे टेंडर काढण्यात आले आहे, त्यामुळे येत्या काळात देखभाल दुरूस्तीची कामेही मार्गी लागतील असा विश्वास चहल यांनी व्यक्त केला.

विधी विभागाचा होता स्पष्ट अभिप्राय
पालिकेच्या ३० जूनच्या सर्वसाधारण सभेत समांतर जलवाहिनीचा 'पीपीपी' तत्वावरचा करार रद्द करण्याचा निर्णय झाला. या निर्णयाच्या आधारे महापालिकेने कंपनीला करार रद्द करण्याची इच्छा व्यक्त करणारी नोटीस बजावली. त्यानंतर सर्वसाधारण सभेने घेतलेला निर्णय प्रशासनाने विधी विभागाकडे अभिप्रायासाठी पाठवला. विधी विभागाने अभिप्राय नोंदवताना महापालिका पीपीपीचा करार रद्द करण्याची कारवाई थेट करू शकते असा अभिप्राय नोंदवला. विधी विभागाच्या अशा अभिप्रायानंतरही पालिकेच्या प्रशासनाने पाणीपुरवठा योजना ताब्यात घेण्यास उशीर लावला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पानझडे यांचे निलंबन रद्द करण्याच्या हालचाली

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
स्थायी समितीच्या माध्यमातून शहर अभियंता सखाराम पानझडे यांचे निलंबन रद्द करण्याच्या हालचाली महापालिकेत सुरू झाल्या आहेत. काही नेत्यांच्या दबावामुळे पानझडेंना पुन्हा सेवेत घेण्याचा निर्णय होऊ शकतो अशी माहिती सूत्रांनी दिली.
हर्सूल तलावातील गाळ प्रकरण आणि टीव्ही सेंटर ते जळगाव रोड या रस्त्याच्या व्हाइट टॉपिंग प्रकरणी पालिका आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांनी पानझडे यांना निलंबित केले आहे. त्यांचे निलंबन रद्द करण्याच्या मागणीसाठी शुक्रवारी महापालिकेच्या विविध विभागातील अधिकारी, अभियंत्यांची बैठक झाली. 'निलंबन रद्द करा, अन्यथा आयुक्तांना हटवा', अशा आशयाची चर्चा बैठकीत झाली. महापौरांसह सर्व पदाधिकाऱ्यांना, सोमवारी अधिकारी यासंदर्भात निवेदन देणार आहेत.
आयुक्तांनी निलंबन रद्द केलेच नाही तर, स्थायी समितीच्या माध्यमातून ते रद्द करण्याच्या हालचालाही सुरू आहेत. तसे अधिकार स्थायीला आहेत. त्यामुळे पंधरा दिवस ते एक महिना वाट पाहून स्थायीसमोर त्याबाबतचा प्रस्ताव मांडला जाण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली. तसा प्रस्ताव स्थायीसमोर यावा यासाठी काही नेते सक्रीय झाले आहेत. त्यामुळे जास्तीत जास्त महिनाभर पानझडे निलंबित राहू शकतील असे बोलले जात आहे.

ठराव होऊ शकतो विखंडीत
पानझडे यांचे निलंबन रद्द करण्याचा ठराव स्थायी समितीने घेतला तरी, हा ठराव विखंडीत करण्याची विनंती आयुक्त राज्य सरकारकडे करू शकतात. आयुक्तांनी केलेली विनंती सहसा राज्य सरकार टाळत नाही, कारण आयुक्त महापालिकेचे प्रशासकीय प्रमुख असतात, याकडे सूत्रांनी लक्ष वेधले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अपहार प्रकरणातील अधिकारी अटकेत

$
0
0


औरंगाबाद : स्टेट बँकेच्या पार्किंग खात्यातील अडीच कोटींचा अपहार केल्याप्रकरणी स्नेहल अंबरनाथ पवार यांना छावणी परिसरातून शनिवारी रात्री उशिरा अटक करण्यात आली. या प्रकरणी मार्चमध्ये गुन्हा दाखल झाला होता.
पोलिस निरीक्षक शरद इंगळे म्हणाले, 'पवार स्टेट बँकेत सहायक प्रबंधक पदावर २०१२ पासून होत्या. सात सप्टेंबर २०१५ रोजी सहायक महाप्रबंधकपदी अन्य एक अधिकारी रुजू झाले. पार्किंग खात्यातील बरीच रक्कम वळती करण्यात आल्याचे, तसेच व्यवहारात विसंगती असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. बँकेच्या चौकशीत पार्किंग खात्यात जमा होणारा दंड, व्याज व कमिशनची रक्कम कर्जदाराच्या खात्यात जमा केल्या. त्या खात्यातून पवार यांनी नातेवाइकांच्या नावे बोगस खात्यांवर रकमा वळवल्याचे समोर आले. दरम्यान, अटक केली तरी आत्महत्या करेल, अशी धमकी तिने दिल्याची माहिती सूत्रांनी दिली. सात महिन्यांत ती परराज्यात पसार होती. शनिवारी छावणी भागातील गड्डीगोदाम भागात आल्याची माहिती खबऱ्याला मिळाली. त्यानुसार वेदांतनगर पोलिसांनी सापळा रचून तिला अटक केले. निरीक्षक शरद इंगळे, मंगेश अभंग, महेश उगले, किशेार बनसोडे, कांबळे महिला कर्मचारी नरवडे, तडवी यांच्या पथकाने ही कारवाई केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


उदयनराजे भोसलेंविरुद्ध पँथर सेनेचे आंदोलन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

अॅट्रासिटी कायदा रद्द करण्याची मागणी केल्याच्या निषेधार्थ खासदार उदयनराजे भोसले यांच्या विरोधात पॅंथर्स सेनेने शनिवारी सिडकोतील वसंतराव नाईक चौकात जोरदार निदर्शने केली.

उदयनराजे भोसले यांनी पुणे येथे अॅट्रॉसिटी कायदा रद्द करण्याची मागणी केली होती. त्यांच्या वक्तव्याने राज्यात सामाजिक स्वास्थ बिघडत असून, जातीय तेढ निर्माण होत आहे. या विरोधात संघटनेचे राज्य प्रमुख दीपक केदार यांनी सोशल मीडियावर प्रतिकात्मक निषेधाची पोस्ट टाकली. त्यामुळे उदयनराजे समर्थकांनी साताऱ्यात केदार यांच्या विरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल केला. त्यामुळे उदयनराजे यांच्या विरोधात आणि केदार यांच्या समर्थनार्थ हे आंदोलन करण्यात आल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले.

अॅट्रासिटी कायद्याच्या विरोधात वक्तव्य केली जात असल्याने अनुसूचित जाती, जमाती व आंबेडकरी समाज भयभित झाला असताना, राज्य शासन बघ्याची भूमिका घेत आहे, असा आरोप सेनेने केला. अॅट्रासिटी कायद्याची कडक अंमलबजावणी करावी, खटले स्वतंत्र कोर्टात चालवावेत, हा कायदा रद्द करण्याची भाषा करणाऱ्यांवर कडक कारवाई व्हावी अशा मागण्या आंदोलनकर्त्यांनी केल्या. यावेळी संघटना प्रमुख सतीश पट्टेकर, राज्य प्रमुख दीपक केदार, संघटक आनंद लोखंडे, संदीप नाथभजन, प्रकाश नरवडे, प्रकाश नवतुरे, सुनील निकाळजे, अशरफ शेख, सचिन तिवारी, सचिन नरवडे, संघर्ष खिल्लारे, संतोष अंभोरे, दीपक गायकवाड, सिद्धार्थ मगरे, किरण तुपे, राहुल लांडगे, प्रदीप गायकवाड, अनिल बनसोडे आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शेतकऱ्याचा फायनांस कंपनीला १३ लाखांचा गंडा

$
0
0

शेतकऱ्याचा फायनांस कंपनीला १३ लाखांचा गंडा
बनावट कागदपत्राआधारे ट्रॅक्टर खरेदी
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
बनावट कागदपत्राआधारे शेतकऱ्याने हप्त्यावर ट्रॅक्टर खरेदी करीत फायनांस कंपनीला गंडा घातला. ऑगस्ट २०१२ ते ऑगस्ट २०१६ च्या दरम्यान अदालत रोडवरील महेंद्रा फायनांस कंपनीच्या कार्यालयात हा प्रकार घडला. याप्रकरणी बिडकीन येथील शेतकऱ्याविरुद्ध क्रांतिचौक पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अदालत रोडवरील रत्नप्रभा बिल्डिंग येथे महेंद्रा अँड महेंद्रा फायनांशीयल सर्विसेस कंपनीचे कार्यालय आहे. या कार्यालयातून १० फेब्रुवारी २०१२ रोजी अनिल अशोक गिरी (वय ४५, रा. बिडकीन) या शेतकऱ्याने महेंद्र अर्जुन ट्रॅक्टर खरेदी केले होते. पाच लाख २५ हजाराचे ट्रॅक्टर खरेदी करताना गिरी यांनी शेतीची कागदपत्रे तसेच हमीदाराची कागदपत्रे सादर करीत करार केला होता. या करारानुसार १० ऑगस्ट २०१६ मध्ये त्यांना पहिला हप्ता भरणे आवश्यक होते. त्यांनी ‌पहिला हप्ता भरला नाही, म्हणून त्यांना कार्यालयात बोलावण्याबाबत वारंवार संपर्क करण्यात आला. मात्र, गिरी हे कार्यालयात आले नाही. याप्रकरणात संशय आल्याने फायनांस कंपनीच्या वतीने त्यांनी सादर केलेल्या कागदपत्रांची तपासणी करण्यात आली. यामध्ये त्यांनी हमीदाराची खोटी कागदपत्रे सादर केल्याचे निष्पन्न झाले. तसेच गेल्या चार वर्षात एकही हप्ता भरला नसल्याचे दिसून आले. याप्रकरणात आरोपी अनिल गिरी यांनी फायनांस कंपनीचे सव्वा पाच लाखांचे कर्ज व त्यावरील व्याज असे एकूण १३ लाख ११ हजार रुपयांची फसवणूक केल्याचे समोर आले. या प्रकरणी फायनांस कंपनीने कोर्टात दादा मागितली होती. कोर्टाने या प्रकरणात क्रांतिचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. फायनांस कंपनीचे अधिकारी संदीप तिवारी यांच्या तक्रारीवरून या प्रकरणी आरोपी अनिल गिरी विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीएसआय अनिल कुरूंदकर याप्रकरणी तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘सम्यक’ला दणका

$
0
0

'सम्यक'ला दणका
१६ लाख रुपये देण्याचे तक्रार निवारण मंचचे आदेश
म. टा. विशेष प्रतिनिधी, औरंगाबाद
शहरात सदनिका व घरे उपलब्ध करून दिले नाहीत. दोन वर्षांपेक्षा जास्त कालावधी जाऊनही सदनिकेचा ताबा दिला नाही म्हणून सम्यक निवासी हक्क संघ या गृहनिर्माण संस्थेला १६ लाख रुपयांचा फटका बसला आहे. १६ तक्रारदारांना त्यांची रक्कम १२टक्के व्याजदराने देण्याचे आदेश औरंगाबाद जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचचे अध्यक्ष नीलिमा संत, सदस्य संध्या बारलिंगे व किरण ठोले यांनी िदले आहेत.
भावसिंगपूरा येथील सदनिकेचा ताबा दिला नाही, खोटी आश्वासने देऊन योग्य व्यापार पद्धतीचा अवलंब केला. अशी विनंती इब्राहिम जाफर खान, बन्सीलाल तांबे, प्रकाश गाडे, राजू मिसाळ, मोहन आहेरकर, मच्छिंद्र वाघचौरे, हौशिराम गायकवाड, देविदास पोकळे,श्रीकृष्ण दळवी, दीपक साबळे, नारायण भालेकर, रत्ना गेंदणे, राजू शिरसाट, भागवत नेटके, कंबा साठे, दिलीप शेंडगे यांनी वैयक्तिक तक्रार अर्ज दाखल केला, यापैकी काही जणांनी ७० हजार तर काही जणांनी ६० हजार रुपये सम्यकचे अध्यक्ष मधुकर सुर्यवंशी यांना दिले होते. ही बुकिंगची रक्कम होती.
गृहनिर्माण संस्थेचे अध्यक्ष यांच्या म्हणण्यानुसार त्यांना तक्रारदारांनी दिलेली रक्कम सदनिकेच्या बुकिंगकरिता स्वीकारली आहे. या रकमेतून चार मजल्यापर्यंतचे बांधकाम केलेले आहे. दोन वर्षांत ताबा देण्यात येईल असा कोणताही करार झालेला नाही, पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष निर्माण झाल्यामुळे शासनाने बांधकाम थांबविण्याचे आदेश दिलेले आहेत. त्यामुळे ही तक्रार फेटाळण्यात यावी अशी विनंती सम्यकतर्फे करण्यात आली.
सम्यकच्या विरोधात या मंचात अनेक तक्रारी दाखल झाल्या आहेत. कमी उत्पन्न गटातील लोकांनी जास्तीत जास्त संख्येने या गृहयोजनेत सहभागी व्हावे म्हणून आकर्षक अशी योजना आखण्यात आली. ही योजना सप्टेंबर २०११मध्ये आखली. ही योजना फसवी आहे हे तक्रारदारांच्या लक्षात येताच त्यांनी सम्यककडे भरलेली रक्कम परत मागितली मात्र त्यांनी ती रक्कम देण्याचे नाकारले. सम्यकच्या अध्यक्षांनी तक्रारदारांकडून घेतलेली ६०, ७० आणि ८० हजार रुपये १० जानेवारी २०१२पासून १२ टक्के व्याजदराने देण्याचे आदेश मंचाने दिले आहेत. तक्रारीच्या खर्चाची भरपाई, मानसिक त्रास याबद्दल सम्यस संस्थेने १६ तक्रारदारांना प्रत्येकी २५ हजार रुपये देण्याचे आदेशही मंचाने दिले आहेत.
गृहनिर्माण योजना फसवायच्या उद्देशानेच
सम्यकने आखलेली गृहनिर्माण योजना बेकायदेशीर आणि फसवायच्या उद्देशानेच आखली आहे. चार मजले बांधून झाले आहेत, अशी भूमिका त्यांनी घेतली असली तरी त्याबाबतचा कोणताही पुरावा मंचात दाखल केला नाही. शासनाच्या पाणीवापरावरील निर्बंध केवळ काही महिन्यांपुरते होते. चार वर्षांपेक्षा अधिक कालावधी व्यतीत झाला आहे. प्राप्त परिस्थितीत ही योजना पूर्णत्वास जाण्याची शक्यता नाही. त्यामुळे उरलेली रक्कम स्वीकारून सदनिकेचा ताबा द्या असा आदेश देणे योग्य होणार नाही. सदनिकेच्या किंमतीची केवळ दहा टक्के रक्कम तक्रारदारांनी भरलेली आहे. ही रक्कम सव्याज परत करण्याचा आदेश देणे व अयोग्य व्यापार पद्धतीचा अवलंब केल्याबद्दल दंडीत करणे योग्य होईल असे मंचास वाटते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बँकेला अडीच कोटींचा गंडा घालणाऱ्या महिलेला कोठडी

$
0
0

बँकेला अडीच कोटींचा गंडा घालणाऱ्या महिलेला कोठडी
बोगस खाते उघडून केला दोन कोटींचा अपहार
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
एसबीआय बँकेच्या पार्किंग खात्यात जमा होणारी कोट्यावधीची रक्कम दहा बोगस खात्यात आणि सहा निकटवर्तीयांच्या खात्यात जमा करून ती स्वत:च्या खात्यावर वळती करणाऱ्या तत्कालीन सहायक प्रबंधक व्यवस्थापक महिलेला शनिवारी (१० सप्टेंबर) अटक करण्यात आली. तिला रविवारी कोर्टात हजर करण्यात आले असता शुक्रवारपर्यंत (१६ सप्टेंबर) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी आर. बी. बहिरवाल यांनी दिले.
जालना रोडवरील महर्षी चौकात असलेल्या एसबीआय बँकेच्या शाखेत आरोपी स्नेहल पवार ही सहायक प्रबंधक पदावर २०१२ पासून कार्यरत होती. या शाखेत ७ सप्टेंबर २०१५ रोजी नंदकिशोर रामबिलास मालू (५८, रा. बी-५, प्राईड प्लाझा, वेदांतनगर) हे सहायक महाप्रबंधक म्हणून रुजू झाले. त्यांनी बँकेच्या सर्व खात्यांची तपासणी केली असता बँकेच्या पार्किंग खात्यातील (क्रमांकः ३१६७८८६६६८२) बरीच रक्कम वळती करण्यात आल्याचे निदर्शनास आले. याबाबत त्यांनी सहायक प्रबंधक स्नेहल पवार हिच्याकडे पार्किंग खात्याबाबत चौकशी केली. तेव्हा बँकेच्या पार्किंग खात्यात जमा होणारी दंड, व्याज व कमीशनची रक्कम कर्जदाराच्या खात्यात जमा करण्यात आल्याचे दिसून आले. त्या खात्यातून पवार हिने निकटवर्तीय व नातेवाईकांच्या नावे वेगवेगळे बोगस खाते स्वत: उघडले. तसेच पार्किंग खात्यातील रकमा बोगस खात्यात व निकटवर्तीयांच्या खात्यात जमा करून १ कोटी ९८ लाख २२ हजार ९२९ रुपयांचा अपहार केला. दरम्यान, स्नेहल पवार हिने बँकेच्या पार्किंग खात्यात अफरातफर करुन रक्कम काढल्याचे उघडकीस आल्यानंतर तिचे पती विनोद पवार यांनी बँकेकडे १४ जानेवारी २०१६ रोजी ११ लाख ४४ हजार रुपये जमा केले होते. मात्र, उर्वरित रक्कम जमा होत नसल्याचे पाहून सहायक महाप्रबंधक नंदकिशोर मालू यांनी क्रांतिचौक पोलिस ठाण्यात स्नेहल हिच्या विरोधात तक्रार दिली. तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल होताच स्नेहल पवार पसार झाली होती.
छावणीत आरोपीचा सुगावा
वेदांतनगर पोलिस चौकीच्या कर्मचाऱ्यांना तपास सुरू असताना स्नेहल पवार ही छावणी परिसरातील गड्डीगुडम भागात असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीवरुन पोलिसांनी शनिवारी (१० सप्टेंबर) स्नेहल पवार हिला अटक केली. तिला कोर्टात हजर केले असता, आरोपीला पोलिस कोठडी देण्याची विनंती सहाय्यक सरकारी वकील एन. एन. पवार यांनी कोर्टात केली. ही विनंती ग्राह्य धरून कोर्टाने आरोपीला शुक्रवारपर्यंत (१६ सप्टेंबर) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ट्रक चोरणारा गजाआड

$
0
0

ट्रक चोरणारा गजाआड;
१४ सप्टेंबरपर्यंत कोठडी
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
मदनी चौकातील मिनी ट्रक चोरणाऱ्याला बुधवारपर्यंत (१४ सप्टेंबर) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी आर. बी. बहिरवाल यांनी दिले.
या प्रकरणी शेख आवेज शेख मोहंमद (२६, रा. संजयनगर, बायजीपुरा) यांनी फिर्याद दिली होती. फिर्यादीनुसार, फिर्यादीकडे मिनी ट्रक (एमएच-४६, एफ-२९९८) असून ९ मे २०१६ रोजी रात्री ८ वाजता फिर्यादीचा ट्रक हा चालक शेख अजीम शेख करीम याने मदनीचौक येथे लावला. दुसऱ्या दिवशी ट्रक चोरीला गेल्याचे लक्षात आल्यानंतर फिर्यादीने जिन्सी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. या तक्रारीवरुन गुन्हा दाखल झाला व पोलिसांनी रविवारी (११ सप्टेंबर) शेख आमेर शेख इसाक (२४, रा. फातेमानगर, हर्सुल) याला अटक केली. त्याला कोर्टात हजर केले असता कोर्टाने त्याला बुधवारपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images