Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा

$
0
0

जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा
नऊ जुगारी गजाआड
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
जुगार अड्ड्यावर छापा टाकत रोकडा हनुमान कॉलनी परिसरात जुगार खेळणाऱ्या नऊ जुगाऱ्यांना क्रांतिचौक पोलिसांनी अटक केली आहे. रविवारी दुपारी एक वाजता ही कारवाई करण्यात आली.
क्रांतिचौक पोलिस ठाण्याचे डीबी पथक पेट्रोलिंग करीत असताना त्यांना खबऱ्याकडून माहिती मिळाली की, सदरील परिसरात भारत गॅस एजन्सीच्या बंद पडलेल्या गोडाऊनजवळ काही इसम जुगार खेळत आहेत. मिळालेल्या माहितीवरून या ठिकाणी दुपारी एक वाजेच्या सुमारास छापा टाकला असता तेथे काही जण झन्नामन्ना प्रकारचा जुगार खेळताना दिसून आले. त्या सर्व नऊ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. अमरसिंग भगतसिंग विश्‍वकर्मा, रामबहाद्दूर गोपाल सोनार, शेख सरोजोद्दीन शेख इनामउल्ला, भजनसिंग मान बहाद्दूर कामी, नरबहाद्दूर कालुसिंग बोहरा, पुष्पराज गगनसिंग विश्‍वकर्मा, दिलबहाद्दूर मनबहाद्दूर बीके, उमेश डमर कामी, शेरधन बहाद्दूर कामी अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. आरोपींच्या ताब्यातून साडेपंधरा हजार रूपये रोख जप्त करण्यात आले आहेत. सदरील कारवाई परिमंडळ एकचे उपायुक्त वसंत परदेशी पोलिस निरीक्षक नागनाथ कोडे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक इंदलसिंग बहुरे व पथकाने केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


लज्जतदार मोदकांनी वाढविली स्पर्धेची रंगत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
कोथिंबीर, मका, रवा, साखर, पानमसाला, सुकामेवा, विविध फळे यांपासून ते थेट पारंपरिक उकडीच्या रेसिपींनी रविवारच्या संध्याकाळ गृहिणींनी अगदी लज्जतदार केली. निमित्त होते 'महाराष्ट्र टाइम्स'ने आयोजित केलेल्या मोदक स्पर्धेचे.
हॉटेल मॅनोरमध्ये आयोजित या मोदक स्पर्धेस उत्स्फूर्त प्रतिसाद ‌मिळाला. आदिती गोरे यांनी या स्पर्धेत पहिला क्रमांक पटकावला. त्यांनी उकडीचे मोदक करून आणले आहेत. दुसरा क्रमांक ज्योती काबरा यांनी पटकावला त्यांनी पेंडखजूरचे मोदक सुकामेवा घालून केले होते, तर तिसरा क्रमांक विशाखा केदारे यांनी मिळवला त्यांनी गुलाब-गुलकंद मोदक बनवले होते. मोदकांचे परीक्षण चव, रंग, करण्याची पद्धत, सजावट आणि त्याचे सादरीकरण या निकषांवर करण्यात आली. स्पर्धेत महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. परीक्षण शीतल शेवतेकर आणि मनीषा यादव यांनी केले. यावेळी हॉटेल मॅनोरचे व्हाइस प्रेसिडेंट सुनील मुखर्जी यांचीही उपस्थिती होती. 'मटा'तर्फे मुखर्जींसह परीक्षकांचा यथोचित गौरव करण्यात आला. सर्व सहभागी स्पर्धक महिलांनी त्यांच्या रेसिपी आणि मोदकांविषयी सर्वांना माहिती दिली. राहुल खरात यांनी सूत्रसंचालन केले. सहभागी स्पर्धकांसाठी स्पर्धेनंतर मनोरंजन खेळ घेऊन त्यांनी स्पर्धेत रंगत आणली.
आकर्षक भेट : 'महाराष्ट्र टाइम्स'तर्फे या स्पर्धेचे व्हेन्यू पार्टनर हॉटेल मॅनॉर होते. विजेत्यांना बक्षीस म्हणून गणपतीचे चांदीचे नाणे व इतर आकर्षक भेटवस्तू देण्यात आल्या. स्पर्धकांनी छानशी रेसिपी घरीच बनवून, आकर्षक सजावट करून एका कागदावर सुवाच्च अक्षरात लिहून आणल्या होत्या.

पारंपरिक असणारे उकडीचे मोदक मी तयार करून आणले. त्याची पद्धती, मोदकाच्या पाळ्या, जिन्नस यातील वेगळेपण आणि सजावटीसह त्याची रंगसंगती हे याचे वैशिष्ट्ये ठरले असे वाटते. स्पर्धेतील अनुभव वेगळा होता आणि प्रथम क्रमांकाचे बक्षिस मिळाल्याचा आनंद आहे.
- आदिती गोरे, प्रथम विजेत्या

'मटा'ने आयोजित केलेल्या स्पर्धेतून महिलांना त्यांची पाककला दाखवण्याची संधी मिळाली. सातत्याने आयोजित केलेल्या या स्पर्धेबद्दल आयोजकांचे आभार व धन्यवाद.
- सुधा उपाध्ये, स्पर्धक

स्पर्धेत सहभाग नोंदवून आज हुरूप वाढला आहे. पान मसाल्याच्या जिन्नसांपासून तयार केलेल्या मोदकांची रेसिपी मी तयार करून आणली होती.
- नयन कुलकर्णी, स्पर्धक

रंग, चव, आणि सजावट या निकषांवर आधारित मह‌िलांनी तयार करून आणलेल्या मोदकांच्या रेसिपी खूपच सुंदर आणि आकर्षक होत्या. महिलांनी खरोखरच रेसिपींना योग्य न्याय देत त्या लज्जतदार कशा होतील याकडे लक्ष दिले.
- शीतल शेवतेकर, परीक्षक

महिलांनी आपआपल्या परीने अतिशय उत्तम मोदक बनवून आणले होते. तयार रेसिपीतून त्यांची मेहनत दिसत होती. 'मटा'च्या या स्पर्धेला त्यांनी भरभरून प्रतिसाद दिला. वेगवेगळ्या रेसिपीची पद्धत आम्हालाही नव्याने कळाली.
- मनिषा यादव, परीक्षक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सजीव देखाव्याची गौरवशाली परंपरा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
नवाबपुरा येथील राजकमल सार्वजनिक गणेश मंडळाला तब्बल ५५ वर्षे पूर्ण झाली आहेत. चार वर्षांपूर्वी या मंडळाने सुवर्ण महोत्सव साजरा केला आहे. पौराणिक व ऐतिहासिक विषयांवर सजीव देखावे सादर करण्याची या मंडळाची परंपरा आहे.
नवाबपुरा परिसरातील हनुमान मंदिर हे प्र‌ाचिन मंदिर म्हणून पंचक्रोशीत ओळखले जाते. या ठिकाणी १९६२मध्ये नारायण‌सिंग होलिये, सीताराम ‌होलिये, प्रल्हाद चिरोटे, दिगंबर जगताप, प्रदीप पवार, राधाकृष्ण बनकर यांनी राजकमल सार्वजनिक गणेश मंडळाची स्थापना केली. देशभक्तीच्या ध्यासाने झपाटलेल्या या मंडळीनी सुरुवातीपासून धार्मिक, ऐतिहासिक, देशभक्ती आदी विषयांवर सजीव देखावे सादर करण्यावर भर दिला आहे. यामध्ये प्रामुख्याने भगतसिंग यांना फाशी, हिमालयापर्वतवर शिवशंकर, द्रौपदी वस्त्रहरण, जय जवान जय किसान, शिवाजी महाराजांना तलवार देताना माता तुळजाभवानी, दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या आत्महत्या, शिवाजी महाराज राज्याभिषेक, झांशी राणी लक्ष्मीबाईचे इंग्रजासोबत युद्ध, शाहिस्तेखानाचे बंड, अफजलखान वध, धर्मविर संभाजीराजे, रायगडावरून छत्रपती ‌शिवाजी व संभाजीराजे यांची सुटका, मार्केंडेय मृत्युजंय, दहशतवाद, हुंडाबळी, गो हत्या आदी विषयांवरीव सजीव देखाव्यांचा समावेश आहे.

सामाजिक उपक्रमांत अग्रेसर
राजकमल गणेश मंडळाचे सामाजिक क्षेत्रात देखील योगदान दिले आहे. गरजू व्यक्तींना मदत, पाणी टंचाई असलेल्या गल्लीत बोअर घेणे, बेटी बचाओ उपक्रम आदीं कामांत मंडळाचा सहभाग आहे. सध्या या मंडळाचे काम जयसिंह होलिये, दरबारसिंह होलिये, जगदीश चिरोटे आदी बघत आहेत.

पाडवा, शिवजयंती उत्साहात
राजकमल गणेश मंडळाच्या वतीने गणेशोत्सवासोबतच गुढी पाडवा व शिवजयंतीची मिरवणूक देखील काढण्यात येते. या दोन्ही मिरवणुकीमध्ये भारतीय परंपरा दर्शवणाऱ्या घोडे व उंटावरून मिरवणूक; तसेच पारंपारिक वेषभूषा असलेले मावळे मिरवणुकीचे आकर्षण ठरतात.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पर्यटनस्थळांची उपेक्षा संपेना

$
0
0

tushar.bodkhe@timesgroup.com
Tweet : @tusharbMT
औरंगाबाद ः म्हैसमाळ, वेरूळ, शूलिभंजन, खुलताबाद पर्यटनस्थळांच्या विकासासाठी स्वतंत्र पर्यटन प्राधिकरण स्थापन करण्यात आले. या प्राधिकरणांतर्गत प्रारूप आराखडा तयार करून शासनाकडे पाठवण्यात आला; मात्र निधी मंजूर झाला नसल्यामुळे पर्यटनस्थळांची दुरवस्था कायम आहे. जिल्ह्यात वेगळे प्राधिकरण तयार केल्यानंतरही पर्यटकांची गैरसोय थांबली नाही.
म्हैसमाळ-खुलताबाद पर्यटन विकास प्राधिकरणाचा आराखडा तयार करण्यासाठी ३ मे २०१४ रोजी समिती नेमण्यात आली होती. १७ एप्रिल २०१५ रोजी सरकारने औरंगाबाद जिल्ह्याला 'पर्यटन जिल्हा' घोषित केले. या महत्त्वाच्या निर्णयानंतरही जिल्ह्यातील पर्यटनस्थळांची सुधारणा झाली नाही. अविकसित पर्यटनस्थळांचा विकास करण्यासाठी म्हैसमाळ, वेरूळ, शूलिभंजन, खुलताबाद पर्यटन प्राधिकरण स्थापन करण्यात आले, पण दोन वर्षांनंतरही पर्यटनस्थळांची दैना संपली नाही. काही महिन्यांच्या अंतराने बैठक घेणे आणि प्रस्ताव शासनाकडे पाठवणे हीच कामे विभागीय आयुक्तांच्या नियंत्रणात सुरू आहेत. पर्यटनस्थळांच्या विकासासाठी एप्रिल २०१५मध्ये दीडशे कोटी रुपयांचा प्रारूप आराखडा शासनाला सादर करण्यात आला. प्रत्यक्षात निधी मिळाला नसल्याने पर्यटन विकास सुरू झाला नाही. दौलताबाद घाटातील मोमबत्ता तलावात बोटिंग आणि म्हैसमाळला वातानुकूलित तंबू करण्यासाठी जिल्हा नियोजन समितीने निधी दिला होता. वन विभागाचा जवळपास ९० लाख रुपये खर्चाचा एसी तंबू प्रकल्प रखडला आहे. स्थानिक पातळीवरील वादातून प्रकल्प गुंडाळण्यात आला, तर प्राधिकरणातील कामासाठी निधी नसल्याची वस्तुस्थिती आहे. वेरूळ लेणीची माहिती चार भाषांत देणारे मोबाइल अॅप जिल्हा प्रशासन व भारतीय पुरातत्व विभागाने तयार केले आहे. या अॅपमुळे गाइडच्या माहितीशिवाय लेणी पाहण्याची सुविधा मिळणार होती, मात्र प्रशासनाच्या दुर्लक्षाने हा प्रकल्प अडगळीत पडला आहे. म्हैसमाळ, वेरूळ, शुलिभंजन आणि खुलताबाद परिसराचा विकास केल्यास पर्यटनाला अधिक चालना मिळणार आहे. नियोजनबद्ध विकास करण्यासाठी पर्यटन विकास प्रारूप आराखडा तयार करण्यात आला, मात्र प्रत्यक्ष कामकाज नसल्यामुळे परिसर विकासापासून वंचित राहिला आहे.

समस्यांची जंत्री
थंड हवेचे ठिकाण असलेल्या म्हैसमाळला जाणे पर्यटकांसाठी शिक्षा ठरली आहे. खडतर आणि धोकादायक रस्ता असल्यामुळे पर्यटकांनी पाठ फिरवली आहे. मागील दोन वर्षांपासून रस्त्याचे समाधानकारक काम झाले नाही. म्हैसमाळसह इतर सर्व पर्यटनस्थळी पिण्याचे पाणी, उत्तम रस्ते, सुरक्षा यंत्रणा आणि माफक दरातील कँटीनची गरज आहे. सध्या गैरसोय सहन करून पर्यटक पर्यटनस्थळ पाहत आहेत.

शासनाच्या वेगवेगळ्या विभागांमार्फत काम सुरू होते. आता महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ पूर्ण काम करणार आहे. येत्या २१ सप्टेंबरला अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची बैठक आहे. या बैठकीत सर्व आराखडे दाखवणार आहोत. पाणी, रस्ते, वीज या पायाभूत सुविधा पहिल्या टप्प्यात देण्याची मागणी करणार आहोत.
- प्रशांत बंब, आमदार, गंगापूर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रस्त्यावरील खड्ड्यामुळ लष्करी जवान गंभीर

$
0
0

औरंगाबाद : रस्त्यावरील खड्ड्यांचा फटका लष्करी सेवेतील जवानाला बसला आहे. रविवारी पहाटे साडेपाच वाजता खड्ड्यात दुचाकी आदळून दुभाजकावर आपटल्याने हा जवान जखमी झाला. आभादेव अशोक जाधव (वय ३५, रा. मायानगर, पडेगाव) असे या जवानाचे नाव आहे.
आभादेव जाधव यांची पोस्टिंग सध्या अरुणाचल प्रदेश येथे आहे. सध्या ते रजेवर आलेले आहेत. रविवारी सकाळी नाशिक येथे काम असल्यामुळे ते जनशताब्दी एक्स्प्रेसने जाण्यासाठी दुचाकीवर रेल्वे स्टेशनकडे निघाले होते. यावेळी महावीर चौकाकडून ते स्टेशनकडे जात असताना खड्ड्यामध्ये दुचाकी आदळून ते दुभाजकावर कोसळले. त्यामुळे जाधव यांच्या डोक्याला गंभीर जखम झाली. हा अपघात पाहताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. नागरिकांनी त्यांना तात्काळ उपचारासाठी घाटी हॉस्पिटलमध्ये हलवले. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत वेदांतनगर अथवा क्रांतिचौक पोलिसात नोंद करण्यात आली नव्हती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वेरुळ, अजिंठा महोत्सव : अमिताभबाबत साशंकता

$
0
0

वेरुळ, अजिंठा महोत्सवाच्या तयारीची लगबग सुरू; एमटीडीसीचे वरिष्ठ अधिकारी जिनिव्हा टूरिस्ट फेअरला रवाना

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

महिन्याभरात होऊ घातलेल्या वेरुळ-अजिंठा महोत्सवाच्या तयारीसाठी प्रशासनाची लगबग सुरू झाली आहे. महोत्सवाला जास्तीत जास्त पर्यटक येतील यासाठी प्रयत्न करण्यात येत असून एमटीडीसीचे वरिष्ठ अधिकारी जिनिव्हा टूरिस्ट फेअरला रवाना झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. मात्र त्याचवेळी या महोत्सवासाठी जाहीर करण्यात आलेल्या प्रमुख कलाकारांमधील ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या महोत्सवाला येण्याबाबत अद्याप होकार, नकार काहीही कळालेले नाही.

देशी विदेशी पर्यटकांसाठी मेजवानी असलेला वेरुळ महोत्सव गेल्या काही वर्षांपासून खंडित झाला होता. मात्र, विभागीय आयुक्त डॉ. उमाकांत दांगट यांनी जून महिन्यात बैठक घेऊन महोत्सव घेण्याचा निर्णय घेतला. तसेच यापुढे महोत्सवात खंड पडू नये म्हणून ट्रस्ट स्थापन करण्याचाही निर्णय घेण्यात आला. यानंतर झालेल्या बैठकीमध्ये १४, १५ व १६ ऑक्टोबरला महोत्सव घेण्याचे ठरले. शहरातील बीबी का मकबरा, सोनेरी महल तसेच वेरुळ येथे हा कार्यक्रम घेण्यात येणार आहे. महोत्सवाला अजय अतुल, ग्रेसी सिंग, अदनान सामी यासह अनेक दिग्गज कलाकारांना निमंत्रण पाठवण्यात आले असून यांच्याकडून होकारही मिळाला असल्याचे सुत्रांनी सांगितले. महोत्सवात अदनान सामी आणि कनिका कपूर यांचे सूफी व गझल गायन, पुणे येथील गायिका सानिया पाटणकर यांचे शास्त्रीय गायन, उद्धव आपेगावकर-बेल्जियमचे कलावंत बर्ड कॉनिर्लिस यांच्यातील मृदंग आणि सितारची जुगलबंदी, अभिनेत्री ग्रेसी सिंगचे नृत्य आदी कलांचा आस्वाद घेता येईल.

बीग बीचा होकार मिळेना

ऐतिहासिक औरंगाबाद शहरात पर्यटकांसाठी पर्वणी ठरणाऱ्या महोत्सवाचे सर्वात मोठे आकर्षण महानायक अमिताभ बच्चन आहेत. त्यांना निमंत्रणही पाठवण्यात आले आहे. तरी अद्यापही बीग बी यांचा होकार मिळालेला नाही. तथापि, त्यांनी नकारही कळविलेला नाही. महानायकाची तारीख मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे कळते.

प्रचार - प्रसारासाठी अधिकारी जिनिव्हात

महोत्सवाला परदेशी पर्यटक यावे यासाठीही मोठ्या प्रमाणावर प्रयत्न केले जात आहेत. एमटीडीसीचे व्यवस्थापकीय संचालक आणि जनरल मॅनेजर हे दोघे इंडोनेशियातील जिनिव्हा येथील टूरिस्ट फेअरला उपस्थित राहण्यासाठी गेले आहेत. हे अधिकारी भारतातील वेरुळ आणि अजिंठा या महोत्सवाबद्दल माहिती देतील. या शिवाय वेगवेगळ्या देशातील कौन्सिलला पत्र पाठवून महोत्सवाबद्दल कळवण्यात येणार आहे.

१ ऑक्टोबरला 'पूर्वरंग'

शहरातील वातावरण निर्मितीसाठी १ ऑक्टोबर रोजी तापडीया नाट्यमंदिरात महोत्सवाचा पुर्वरंग हा कार्यक्रम घेण्यात येणार आहे. महोत्सवात सातत्य राहावे, अखंडपणे हा महोत्सव व्हावा, यासाठी पुढील पाच वर्षात घेण्यात येणाऱ्या महोत्सवाच्या तारखा या माहिती पुस्तकात प्रसिद्ध करण्याचे नियोजन सध्या करण्यात येत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पैठण रोडवर ५२ कोटी खर्चाचा घाट

$
0
0

Makarand.Kulkarni@timesgroup.com

Tweet : @makarandkMT

औरंगाबादः गेल्या दहा वर्षांपासून दुरुस्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या पैठण रस्त्याला राज्य सरकारकडून निधी देण्यास टाळाटाळ केली जात होती. त्याला कंटाळून हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे हस्तांतरित करण्याचा प्रस्ताव गेल्या वर्षी मंजूर करण्यात आला आहे, पण दिल्लीत हालचाली थंडावल्याने त्याची अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही. दरम्यान, याच रस्त्याच्या दुरुस्तीसाठी आता सार्वजनिक बांधकाम विभागाने ५२ कोटी रुपये मंजूर केले असून, हा पैसा विनाकारण खर्च केला जाणार आहे.

पैठण रस्त्याच्या दुरुस्तीला सार्वजनिक बांधकाम खात्याने ५२ कोटी ५० लाख रुपयांचा निधी गेल्या महिन्यात मंजूर केला. या ५० किलोमीटरच्या रस्त्याचे डांबरीकरण, काही ठिकाणी खड्डे भरणे ही कामे करणे अपेक्षित आहे. सध्या पावसाळा असल्याने या कामांना ऑक्टोबर नंतरचाच मुहूर्त मिळणार आहे.

पैठण रस्त्याच्या दुरुस्तीसाठी गेल्या दहा वर्षांपासून वेळोवेळी मागणी करण्यात आली होती, पण सार्वजनिक बांधकाम विभागाकडून निधी देण्यास नकार दिला गेला. रस्त्याच्या मजबुतीकरणासाठी पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशीप (पीपीपी) तत्त्वावर रस्ता देण्यासाठी दोन वेळा निविदा मागविण्यात आल्या, पण त्यालाही प्रतिसाद मिळाला नाही. या कामासाठी केंद्र व राज्य सरकारचे प्रत्येकी दहा टक्के आणि उर्वरित ८० टक्के कंत्राटदाराने देणे अपेक्षित होते. कंत्राटदाराची रक्कम टोल नाक्यातून वसूल करण्याची मुभा देण्यात येणार होती, पण या रस्त्यावरील वाहतूक पाहून कंत्राटदारांनी निविदा भरण्याकडे पाठ फिरविली होती. ३०० कोटी रुपये देण्यास सार्वजनिक बांधकाम विभागाचा नकार होता. पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्व असलेला हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे वर्ग होऊन हा मार्ग राष्ट्रीय महामार्गात हस्तांतरित व्हावा, असा प्रस्ताव पाठविण्यात आला. त्यास तत्त्वतः मंजुरी मिळाली, पण हस्तांतरणाची प्रक्रिया अद्याप सुरू झालेली नाही. दरम्यान, दिल्ली-मुंबई इंडस्ट्रिअल कॉरिडॉरच्या बिडकीन टप्प्यासाठी केंद्राने निधी मंजूर केला. पायाभूत सुविधांची कामे दिवाळीनंतर सुरू होती. त्या पार्श्वभूमीवर दिल्लीच्या अधिकाऱ्यांनी गेल्या महिन्यात या परिसराची पाहणी करून हा रस्ता लवकरात लवकर राष्ट्रीय महामार्ग व्हावा, अशी मागणी केली आहे.

त्यानुसार लवकरच प्रक्रिया पार पडेल आणि हा रस्ता सहा पदरी होण्याची शक्यता आहे. केंद्राकडून कोट्यवधींचा निधी या रस्त्यासाठी दिला जाईल. असे असताना राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने डागडुजीसाठी ५२ कोटी रुपये मंजूर करून ते खर्च करण्याचा घाट घातला आहे. यामुळे सर्वासामान्यांच्या निधीचाच चुराडा होणार आहे.

चार टप्प्यांत होणारी कामे
- ५२ कोटी ५० लाखांचा एकूण निधी मंजूर
- ३० कोटी महानुभौव चौक ते वाल्मी चौपदरीकरण
- १० कोटी ढोरकीन ते पैठण रस्ता नूतनीकरण
- १० कोटी रस्ता डांबरीकरण, नूतनीकरणासाठी
- २.५ कोटी रस्त्यावरील पाणी निचरा कामासाठी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सेरेब्रेल पाल्सी ग्रस्त भक्ताची अनोखी साधना

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

भक्ताला अन् कलावंताला कशाचीच मर्यादा असू शकत नाही, हे पुन्हा एकदा सिद्ध केले आहे शहरातील 'सेरेब्रल पाल्सी'ग्रस्त तरुणाने. या गंभीर आजाराने ग्रस्त असताना आणि विशेष म्हणजे या आजारामुळे हात, पाय व जीभ यांच्यावर सर्वाधिक परिणाम झाला असतानाही, या तरुणाने गणेशाची असंख्य मनमोहक रुपे साकारली आहेत. तो गणेशोत्सवात गणेशाची कितीतरी चित्रे-पेंटिग्ज साकारत असून, कुटुंबीयांसह परिचितांना-मित्रांना त्यांच्या वाढदिवशी ही अनोखी भेट स्वतः देत आहे. हा तरुण म्हणजे समीर सुधीर हंप्रस.

समीर हा जवळजवळ जन्मल्यापासूनच 'सेरेब्रल पाल्सी'शी अखंड झुंज देत आहे. अर्थात, त्याच्या या लढाईत त्याला त्याच्या कुटुंबीयांची फार मोठी व मोलाची साथ आहे. त्यातही विशेषत्वाने त्याची आई प्रतिभा हंप्रस या त्याच्या पाठीशी सदैव खंबीरपणे आहेत आणि म्हणूनच त्याने आजपर्यंत या निर्दयी आजाराशी यशस्वी मुकाबला केला आहे व या आजारावर मात करून मोकळेपणाने व्यक्त होत आहे.

प्रत्येक सर्वसामान्य व्यक्तीला चित्र रेखाटणे जमेलच असे नाही; पण समीरने 'सेरेब्रल पाल्सी' असतानाही ते शक्य करून दाखविले आहे. समीरचे हात-पाय-जीभ यांवर आजाराचा खूप परिणाम झाला आहे. त्यामुळेच त्याचे त्याच्या हात, पाय व जिभेवर नियंत्रण नाही. तरीही तो चार-पाच वर्षांचा असल्यापासून पेन्सिल हातात घेतल्या-घेतल्या ज्या काही रेघोट्या मारत होता, त्यातही काही कलात्मकता असल्याचे त्याच्या आई-वडिलांनी हेरले आणि जसे जमेल तसे त्याला चित्र काढण्यास प्रोत्साहित केले. जे काही आणि ज्या काही पद्धतीने त्याला शिकवता येईल ते त्याच्या आईने-कुटुंबीयांनी शिकवण्याचा प्रयत्न केला. हळुहळु समीरचे हात आकार चित्रांना देऊ लागले आणि मोटारीपासून ते डोंगर-दऱ्यांपर्यंत आणि देव-देवतांपासून ते पक्षी-प्राणी-नेते-अभिनेत्यांपर्यंतची चित्रे तो आपल्यापरीने रेखाटू लागला. अर्थात, गंभीर आजारामुळे त्याच्या हातावर कुठलेही नियंत्रण नाही आणि त्यामुळेच हातांना कलात्मक धार येण्यासाठी समीरला खूप झुंजावे लागले. त्याची चित्रकला-पेंटिग्जची गोडी सतत वाढत गेली आणि नंतर तर तो सर्व प्रकारची चित्रे-पेंटिग्ज काढू लागला. कुटुंबातील सदस्यांचा तसेच परिचितांचा वाढदिवस आवर्जून लक्षात ठेऊन त्यांना एखादे तरी चित्र किंवा पेंटिग्ज भेट देत आहे. कुणाला साईबाबा, कुणाला महालक्ष्मी, तर कुणाला गणपतीचे चित्र तो भेट म्हणून देत आहे. आजपर्यंत ४००पेक्षा जास्त पेंटिग्ज त्याने काढल्याचे प्रतिभा हंप्रस यांनी 'मटा'ला सांगितले.

साहित्य-संगीताची मनस्वी आवड

चित्रांबरोबरच समीर हा सर्व प्रकारच्या संगीतात व साहित्यात पार रमून जातो. जुनी-नवी मराठी-हिंदी गाणी, व. पु. काळेंच्या कथा, ओशोंची प्रवचने, शास्त्रीय-सुगम संगीताच्या कॅसेटचा मोठा संग्रह समीरने विकसित केला आहे. मात्र हल्ली कॅसेट मिळत नसल्याने तो आता 'आयपॉड' व इतर आधुनिक माध्यमांकडे वळाला आहे. समीर 'टेक्नोसॅव्ही' असून, परदेशातील बहिणींशी स्वतः 'स्काइप'वर संवाद साधतो, इंटरनेट सर्रास हाताळतो, देश-विदेशातील घडामोडींवर घरच्यांशी चर्चा करतो.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


गांजा विकणाऱ्यास माळीवाड्यात अटक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पडेगाव

माळीवाडा येथे गांजा विकणाऱ्यास अटक करून त्याच्याजवळून अडीच किलो गांजासह एकूण ३१ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. दुसऱ्या एका घटनेत दौलताबाद येथे कल्याण मटका चालविणाऱ्यास पोलिसांनी अटक करण्यात आली.

माळीवाडा येथे गांजा विकला जात असल्याची माहित गुन्हे शाखेला मिळाली होती. या माहितीवरून पोलिस निरीक्षक ज्ञाने‍श्वर साबळे, उपनिरीक्षक शेख आरिफ, खंडागळे, गाडेकर, पाटील यांच्या पथकाने शेख आयुब याच्या घरी छापा मारला. त्या घरातून अडीच किलो गांजा (अंदाजे किंमत २८,८०० रुपये), रोख १२,५०० रुपये, गांजाचे वजन करण्यासाठीचा तराजू, माप, प्लास्टिक पिशव्या आदी एकूण ३१,५०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. उपनिरीक्षक शेख आरिफ यांच्या फिर्यादीवरून दौलताबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रेमसागर चंद्रमोरे हे करीत आहेत.

दौलताबाद येते मटका सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्या माहितीवरून दौलताबाद बस्थानकाजवळ मटका अड्डा चालवताना रावसाहेब पंडित आढाव (वय ४५, रा. राजवाडा दौलताबाद), याला याला अटक करण्यात आली. त्याच्याजवळील रोख २६० रुपये व जे. बी. कल्याण मटका नावाच्या चिठ्ठ्या, एक बुक,असे साहित्य जप्त करण्यात आले. दौलताबाद येथे मटका घेतला जात असून मुले, तरूण व वृद्ध त्याच्या आहारी गेले आहेत, अशा महिलांच्या तक्रारी होत्या. याप्रकरणी हेडकॉन्स्टेबल राजेंद्र शिंदे यांनी फिर्याद दिली. पुढील तपास एस. आय. मंडलिक करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

१७ भूमिहीनांना जमीन; भाकपला यश

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कन्नड
भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या आंदोलनाला सोमवारी अंशतः यश आले. दोन महिन्यांपासून पाठपुरावा केल्यानंतर कर्मवीर दादासाहेब गायकवाड स्वाभीमान सबलीकरण योजनेतून तालुक्यातील १७ भूमिहिनांना ६७ एकर जमिनीचे वाटप करण्यात आले. तालुक्यात ७५ पात्र भूमिहीन असून उर्वरित नागरिकांच्या हक्कासाठी लढा सुरू राहील, असे भाकपचे जिल्हा सचिव कॉ. राम बाहेती यांनी सांगितले.
कर्मवीर दादासाहेब गायकवाड स्वाभीमान सबलीकरण योजनेतील अर्ज प्रलंबित असल्यामुळे भाकपतर्फे १३ जुलै रोजी आंदोलन करण्यात आले होते. त्यावेळी प्रशासनाने १ सप्टेंबर रोजी जमीन वाटपाचे लॉट काढण्यात येतील, असे आश्वासन देण्यात आले होते. परंतु, याबाबत कारवाई न झाल्याने ८ सप्टेंबरपासून उपविभागीय कार्यालयासमोर भाकपतर्फे दोन दिवस धरणे आंदोलन करण्यात आले. परंतु, सोमवारी लॉट काढण्याचे लेखी आश्वासन मिळाल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
आश्वासनानुसार सोमवारी दुपारी दोन वाजता उपविभागीय अधिकारी राजीव नंदरकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत समाज कल्याण विभागाचे निरीक्षक सुभाष जाधव, कन्नडचे तहसीलदार विनोद गुंडमवार, तालुका कृषी अधिकारी, भूमापन विभागाचे अधिकारी, अर्जदारांतर्फे कॉ. राम बाहेती व काही भूमिहीन शेतकरी यांच्या उपस्थितीत सहा वर्षीय अाकांक्षा पवार या बालिकेच्या हस्ते १७ पात्र लाभार्थ्यांच्या चिठ्ठ्या काढून निवड करण्यात आली. या शेतकऱ्यासाठी जमीन नावे करेपर्यंत संघर्ष सुरू राहणार आहे. उर्वरित ५५ लाभार्थी व तालुक्यातील नवीन १०० नवीन प्रस्ताव दाखल करण्यात आले आहेत. त्यांच्यासह जिल्हा व विभागस्तरावर भूमिहीनांचे आंदोलन तीव्र करण्यात येणार असल्याचे कॉ. बाहेती यांनी सांगितले.

यांना मिळाली जमीन
मेहेगाव येथील गणेश रामदास वाघ, भीमसिंग शामसिंग वाघ, खातखेडा येथील मोतीलाल बारकू शेवाळे, राजू भावसिंग शेवाळे, शेखलाल नथ्थू पवार, रुपचंद गबाजी शेवाळे, कोळंबी येथील भीमराव पुंजाराम देहाडे, कचरू नागू सौदागर, बारकू पांडुरंग भिवसणे, पिशोर येथील दिलीप बारकू पवार, देवानंद नारायण जोगदंड, देवपूळ येथील साईनाथ वामन आगळे, कविता सांडू पवार, साखरवेल येथील रामजी लालचंद रमणे, संताराम दलचंद रमणे, सायगव्हाण येथील रामराव गणपत गडवे, राजेंद्र बाबुराव सूर्यवंशी यांना जमीन मिळाली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मालमत्ता करवसुलीस बजाजनगरात सुरू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी वाळूज
वडगाव कोल्हाटी ग्रामपंचायतीने बजाजनगरमधून आतापर्यंत एक लाख ३६ हजार रुपयांचा मालमत्ता कर वसूल केला आहे. जिल्हाधिकारी यांच्या आदेशान्वये बजाजनगरमध्ये ग्रामपंचायती मार्फत साफसफाई करण्यात येत आहे. त्यानंतर ग्रामपंचायतीमार्फत बजाजनगरमध्ये कर वसुली मोहीम राबवण्यात येत आहे.
ग्रामपंचायतीने आतापर्यंत बजाजनगर हद्दीतील सर्व मालमत्ताधारकांना कर भरण्याची नोटीस बजविली आहे. ग्रामपंचायतीकडून प्रथमच मालमत्ता कर भरण्याची नोटीस आल्याने मालमत्ताधारकांमध्ये एमआयडीसीकडून होणारी कर आकारणी व ग्रामपंचायतीकडून होणारी कर आकारणीबद्दल संभ्रम निर्माण झाला आहे. त्यामुळे कर नेमका कोणाला भरावा, असा प्रश्न मालमत्ताधारकांसमोर उभा राहिला आहे. त्यातच ग्रामपंचायतीने कर भरणा केल्याशिवाय प्रमाणपत्रे देण्यास नकार दिल्याने अनेकांकडून कर भरण्यास पुढाकार घेतला जात आहे. दरम्यान, बजाजनगर वडगाव कोल्हाटी ग्रामंपचायतीच्या सर्व सदस्यांनी स्व:त कर भरून नागरिकांना कर भरण्याचे आवाहन केले आहे.

एमआयडीसी घेणार सेवा कर
बजाजनगरात रस्ते, ड्रेनेज, दिवाबत्ती व पिण्याचे पाणी एमआयडीसीकडून देण्यात येते. या बदल्यात सेवा कर आकारला जातो. एमआयडीसीकडून आतापर्यंत मालमत्ता कर आकारणी करण्यात आलेली नाही, त्यामुळे मालमत्ता कर वसुली स्थानिक स्वाराज्य संस्थेकडे असते, अशी माहिती एमआयडीसीचे उपअभियंता डी. एस. परळीकर यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

परभणीत कत्तलखान्याकडे जाण्‍ाारा टेम्पो पकडला

$
0
0


परभणी - पूर्णा तालुक्यातील ताडकळस पोलिस ठाण्याच्या हद्दीतून कत्तलखान्याकडे नेण्यात येत असलेल्या २६ जनावरांचा टेम्पो पोलिसांनी पकडला. या प्रकरणी चार जणांना पोलिसांनी अटक केली. ही कारवाई परभणी-वसमत या राष्ट्रीय महामार्गावर रविवारी दुपारी करण्यात आली. दरम्यान, आरोपींना सोमवारी परभणी न्यायालयात हजर केले असता त्यांची १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्याचे आदेश दिले.
रविवारी नांदेडहून वसमत मार्गे परभणीकडे येत असलेल्या एटीएस पथकाला राहाटी शिवारात विश्वशांती गुरूकुलाच्या जवळ हा टेम्पो निदर्शनास आला होता. संशय आल्याने त्यांनी या टेम्पोला थांबवून चौकशी केली असता त्यामध्ये २६ जनावरे आढळून आली. या जनावरांची दाखले नसल्याने सदर पथकाने या कार्यक्षेत्रातील ताडकळस पोलिसांना कळवले. त्यानंतर संपूर्ण चौकशीनंतर सदर जनावरे परभणीच्या कत्तलखान्याकडे जात असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार ताडकळस पोलिसांनी गोवंश हत्याबंदी कायद्यान्वये या प्रकरणात रात्री ११ वाजता गुन्हा दाखल केला. दरम्यान ईदच्या पार्श्वभुमीवर ही जनावरे परभणीतील कत्तलखान्याकडे नेण्यात येत होती. या प्रकरणात अटक करण्यात आलेल्यांमध्ये टेम्पोचा चालक शे. मिराज शे. मुमताज, शे. युनुस शे. युसुफ, रहेमान शे. वलीमियाँ व मोहंमद यातेशाम (सर्व जण रा. परभणी) आदींना अटक करण्यात आली.
त्यांना सोमवारी परभणी न्यायालयात हजर केले असता त्यांची १४ दिवसांसाठी न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्याचे आदेश न्यायाधिशांनी बजावल्याची माहिती ताडकळस पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश लांडगे यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पालिकेत युती बॅकफुटवर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
महापालिका आयुक्तांच्या विरोधात आक्रमक झालेले शिवसेना, भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक बॅकफुटवर आले आहेत. 'अविश्वास ठराव आणण्याच्या फंदात पडू नका. आयुक्तांकडून कामे करून घ्या,' असे म्हणत भाजपचे नेते व विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी आपल्याच पक्षाच्या नगरसेवकांचे कान टोचले. 'एमआयएम काहीच भूमिका घ्यायला तयार नाही, मग आम्हीच का टार्गेट व्हायचे,' असे म्हणत शिवसेनेही मवाळ भूमिका स्वीकारली आहे.
महापालिकेतील पदाधिकारी व नगरसेवकांनी आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांच्याबद्दल असंतोषाची भावना व्यक्त केली. सहा सप्टेबर रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेत 'एमआयएम'चे नगरसेवक शेख जफर यांनी थेट अधिकाऱ्यांवर आरोप केले. 'महापालिकेचे अधिकारी गेंड्याच्या कातडीचे आहेत, त्यांच्यावर कशाचाही परिणाम होत नाही,' असे वक्तव्य त्यांनी केले होते. बकोरिया यांनी या विधानाचा निषेध करीत अधिकाऱ्यांसह सभात्याग केला. त्यामुळे महापौरांसह सर्व पदाधिकारी व नगरसेवकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. विभागीय आयुक्तांची भेट घेऊन पर्यायी आयुक्त देण्याची मागणी केली. त्यानंतर महापौर त्र्यंबक तुपे, सभागृहनेते राजेंद्र जंजाळ यांनी कोकणात जाऊन पालकमंत्री रामदास कदम यांची भेट घेतली. उपमहापौर प्रमोद राठोड यांनी भोकरदन येथे जाऊन भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांची भेट घेतली व आयुक्तांच्या विरोधात अविश्वास आणला पाहिजे, असे सांगितले, पण या दोन्ही नेत्यांनी महापालिकेतील पदाधिकाऱ्यांची मागणी फारशी मनावर घेतली नाही. त्यामुळे सोमवारी हरिभाऊ बागडे यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली. यावेळी शहराध्यक्ष किशनचंद तनवाणी, आमदार अतुल सावे उपस्थित होते.
भाजपच्या उस्मानपुरा येथील कार्यालयात बैठक झाली. यावेळी नगरसेवकांनी बागडे यांच्याकडे विकास कामांबद्दल तक्रारी केल्या. 'निवडून आल्यापासून विकास कामे झालीच नाहीत,' असे ते म्हणाले. सर्वसाधारण सभेत आयुक्तांनी केलेल्या अपमानाचा उल्लेखही नगरसेवकांनी केला. बागडे यांनी सर्व नगरसेवकांचे म्हणणे ऐकून घेतले आणि 'अविश्वासाच्या फंदात पडू नका. आयुक्तांकडून कामे करून घ्या,' असे आदेशच नगरसेवकांना दिले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस १७ सप्टेबर रोजी शहरात येणार आहेत. त्यावेळी त्यांची भेट घेऊन विकास कामांच्या संदर्भात समस्या मांडू, असे बागडे यांनी नगरसेवकांना सांगितले.
एमआयएमचे नगरसेवक शेख जफर यांच्या आरोपामुळे सहा सप्टेबरच्या सर्वसाधारण सभेत आयुक्तांविरोधात वादळ उठले होते. आता याच पक्षाने या सर्व प्रकरणात अलिप्त राहण्याची भूमिका घेतली आहे. एमआयएम काहीच करायला तयार नाही, मग आम्हीच का टार्गेट व्हायचे, असे म्हणत शिवसेनेही शांत राहणे पसंत केले असल्याचे शिवसेनेच्या एका पदाधिकाऱ्याने सांगितले.
-
एमआयएम आयुक्तांच्या बाजूने
महापालिकेत एमआयएमने आयुक्तांच्या पाठीशी राहण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात आमदार इम्तियाज जलील यांनी सांगितले की, 'दरवेळी आयुक्त हटाव, असा निर्णय घेणे शहरासाठी चांगले नाही. सध्याचे आयुक्त ओम प्रकाश बकोरिया चांगले काम करीत आहेत. सत्ताधारी पक्षातील काही नेते आणि महापालिकेतील अधिकारी यांची गेल्या काही वर्षांपासून एक गँग तयार झाली होती. या गँगने शहराचे वाटोळे केले. पानझडे यांना निलंबित करून बकोरिया यांनी ही गँग तोडण्याचा प्रयत्न केला आहे. अशा आधिकाऱ्यांच्या पाठीशी एमआयएम ठामपणे उभी आहे. वॉर्डांत विकासकामे होत नाहीत म्हणून त्यादिवशी सर्वसाधारण सभेत नगरसेवकाने आपला राग शब्दांच्या माध्यमातून व्यक्त केला. विधानसभेत यापेक्षा गंभीर स्वरुपाचे आरोप अधिकाऱ्यांवर केले जातात हे आयुक्तांनी लक्षात घेतले पाहिजे.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

देखावे पाहण्यासाठी झुंबड

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
प्रबोधनात्मक आणि धार्मिक देखावे गणेशोत्सवाचे खास आकर्षण असते. सजीव देखावे पाहण्यासाठी मध्यवर्ती भागात दोन दिवसांपासून गर्दी उसळली आहे. गणेश मंडळांना देखावे सादरीकरणासाठी पोलिस प्रशासनाने तीन दिवस रात्री बारापर्यंत परवानगी दिली आहे. गणेशोत्सवाचे शेवटचे तीन दिवस असल्यामुळे सोमवारी रात्री भाविकांची गर्दी उसळली.
शहरात गणेशोत्सवाचा उत्साह शिगेला पोहचला आहे. ढोल पथकांची तालीम वेगात सुरू असून, ठिकठिकाणी पथकांचा आवाज दुमदुमत आहे. गणेश मंडळांनी शनिवारपासून सजीव व निर्जिव देखावे सादरीकरण सुरू केले आहे. सलग चार दिवस सुटी असल्यामुळे भाविकांनी देखावे पाहण्यासाठी गर्दी केली होती. आता उत्सवाचे शेवटचे तीन दिवस शिल्लक असून देखावे पाहण्यासाठी झुंबड उडाली आहे. गुलमंडी, औरंगपुरा, खडकेश्वर, सराफा बाजार, किराणा चावडी, जाधवमंडी, शहागंज या मध्यवर्ती भागात सर्वाधिक देखावे आहेत. टीव्ही सेंटर चौक, सिडको, चिकलठाणा या भागातही सजीव देखावे सादर करण्यात आले आहेत. पोलिस प्रशासनाने मंडळांना रात्री बारापर्यंत कार्यक्रम सादर करण्याची परवानगी दिली आहे. सोमवार ते बुधवार या शेवटच्या तीन दिवसात अपेक्षित गर्दी लक्षात घेऊन मंडळांनी विशेष तयारी केली आहे. सजीव देखाव्यांना भाविकांचा सर्वाधिक प्रतिसाद मिळत आहे. राजाबाजार येथे 'सैराट' चित्रपटाचा सजीव देखावा आहे. आर्ची, लंगड्या, परश्या यांच्या भूमिका स्थानिक कलाकारांनी केल्या आहेत. संस्थान गणपती येथे 'बेटी बचाओ, बेटी बढाओ' या विषयावर सजीव देखावा आहे. या देखाव्याचे दिग्दर्शन रंगकर्मी प्रा. राजू सोनवणे यांनी केले आहे. द्रौपदी वस्त्रहरण ते सध्याचे महिला अत्याचार असा पट देखाव्यात मांडला आहे. आता मुलींनीच अत्याचाराविरोधात सक्षमपणे लढा द्यावा असा संदेश या देखाव्यातून देण्यात आला आहे. जाफरगेट भागातील त्रिशूल गणेश मंडळाने शंकर-पार्वती देखावा साकारला आहे. चिकलठाणा येथील सावता गणेश मंडळाने समुद्रमंथनाचा देखावा सादर केला आहे. देखावे पाहण्यासाठी भाविकांची गर्दी झाली आहे.

मुलींची संख्या लक्षणीय
वेगवेगळ्या संगीत चालीत मिरवणूक गाजवण्यासाठी ढोल पथक सज्ज झाले आहेत. औरंगपुरा मैदान, फकीरवाडी, गजानन महाराज मंदिर मैदान, संग्रामनगर मैदान, कोकणवाडी, औरंगपुरा या ठिकाणी मोठ्या पथकांची तालीम वेगात सुरू आहे. ढोल पथकात मुलींची संख्या लक्षणीय आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जनजागृती करणारे देखावे

$
0
0

औरंगाबाद : शहराच्या मध्यभागी असलेल्या कुंभारवाडा येथील तरुण भारत गणेश मंडळाचे यंदा ६१वे वर्ष असून, गेल्या काही वर्षांपासून सामाजिक बांधिलकी आणि जनजागृती करणारे देखावे सादर करून मंडळाने परंपरा घालून दिली आहे.
सुपारी हनुमान मंदिरापासून भाजीमंडई रस्त्यावर अमृतेश्वर रामंदिरालगत गणेशाची स्थापना केली जाते. ६० वर्षांपूर्वी जगन्नाथ पल्लोड, प्रेमचंद मुगदिया, लाला लक्ष्मीनारायण जैस्वाल, नागोरी यांच्या पुढाकाराने मंडळाची स्थापना झाली. रंगारगल्ली आणि कुंभारवाड्याच्या कॉर्नरवर पूर्वी श्रींची प्रतिष्ठापना होत होती. पुढे दुसऱ्या पिढीने हा वारसा सुरू ठेवला. ८०च्या दशकात ही धुरा अजय जैस्वाल, संजय जैस्वाल, गोपाल चांडक, शेखर मुगदिया आणि मंडळींनी स्वीकारली. ८४-८५ च्या काळात गणेशोत्सवातल विद्युत रोषणाई कुंभारवाडा येथील तरुण भारत गणेश मंडळाने सुरू केली. म्युझिकल लाइटिंग करत पुढे कठपुतलीचे देखावेही साकारले. धुमकेतूचा देखावा त्या काळी शहरात गर्दी खेचणारा ठरला होता.
मंडळाच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात. गणेशोत्सवातील अखेरचे पाच दिवस गणेशभक्तांसाठी महाप्रसादाची व्यवस्था केली जाते. विद्यमान कार्यकारिणीमध्ये अध्यक्ष संतोष जैस्वाल, कन्हैया रानडे, गोपाल चांडक, सुनील वालेकर पाटील, विशाल राऊत, विजय पल्लोड, विश्वजित भावे, प्रांजल व्यवहारे आणि मंडळाचे पदाधिकारी पुढाकार घेत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


जपला सामाजिक वारसा!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
श्री गणेशाची भव्य मूर्ती, सामाजिक उपक्रम आणि ढोल पथक ही पावन गणेश मंडळाची खासियत. २३ वर्षांपूर्वी मूर्ती जागेवरून हलली नसल्यामुळे विसर्जन करण्यात आले नाही. तेव्हापासून गणेशाची मंदिरात दररोज पूजा-अर्चा सुरू आहे. या वैशिष्ट्यपूर्ण मंडळाची रौप्य महोत्सवी वर्षाकडे वाटचाल सुरू आहे.
शहरातील वैशिष्ट्यपूर्ण गणेश मंडळात फकीरवाडी भागातील पावन गणेश मंडळ प्रसिद्ध आहे. १९९३ यावर्षी गणेश उत्सवात भव्य मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली होती. अनंत चतुर्दशीच्या दिवशी विसर्जनासाठी भाविकांनी ही भव्य मूर्ती हलवण्यास सुरुवात केली, मात्र मूर्ती तसूभरही हलली नाही. अखेर गणेशाचे विसर्जन करायचे नाही, असा निर्णय घेण्यात आला. या जागेवर प्रमोद नरवडे पाटील आणि सहकाऱ्यांच्या प्रयत्नातून मंदिर उभारण्यात आले. या मंदिरात मागील २३ वर्षांपासून गणेशाची दररोज पूजा-अर्चा करतात. पावन गणेशाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची वर्दळ असते. वर्षभर वेगवेगळ्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न करतात. गणेश जयंतीला ५६ भोग कार्यक्रम असतो. रथसप्तमीला सात ते आठ हजार लोकांसाठी भंडारा असतो. हा महाप्रसाद घेण्यासाठी भाविकांची गर्दी होते. गरजू विद्यार्थ्यांना मंडळ शिक्षणासाठी वेळोवेळी मदत करीत आहे. नेत्र तपासणी शिबिर, बालरोग तपासणी शिबिर अशा उपक्रमांचे आयोजन असते. अठरापगड जातीतील भाविकांच्या सहभागातून पावन गणेश मंडळाची वाटचाल सुरू आहे. गणेशोत्सव आनंदात साजरा व्हावा, पण सामाजिक भान सुटू नये अशी मंडळाची भूमिका असते, असे नरवडे पाटील यांनी सांगितले.

ढोल पथकाची कामगिरी
पावन गणेश मंडळाचे ढोल पथक विसर्जन मिरवणुकीचे खास आकर्षण असते. पावन गणेशाच्या प्रतिकृतीचे दरवर्षी विसर्जन करतात. या पथकात मुला-मुलींचा सहभाग असतो. वेगवेगळ्या चालीच्या माध्यमातून पथकाने गणेशभक्तांची मने जिंकली आहेत. या पथकात पारंपरिक वाद्यांचाच वापर करतात. गणेशोत्सव अधिक आदर्श करण्यावर मंडळाचा भर आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सामाजिक कार्यात पुढाकार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगपुरा
औरंगपुरा येथील श्री तरूण मराठा गणेश मंडळ १९५४मध्ये स्थापन झाले. सामाजिक बांधिलकी जपत या मंडळाने सरस देखाव्यांची परंपरा जपली आहे.
पांडुरंगराव नरवडे, श्रीरंग नरवडे, बचाटे काका, जगताप काका, शिंदे, कानकाटे काका यांनी मंडळाची स्थापना केली. १९८५-८६पर्यंत औरंगपुरा भागातील बसैये तालमीच्या ओट्यावर गणेशाची स्थापना केली जात असे. १९८६मध्ये नाथमंदिरासमोरील मैदानावर वसंतराव नरवडे पाटील यांच्या पुढाकाराने गणेशाची स्थापना करण्यात आली. २०१२ पर्यंत दरवर्षी नवनवीन देखावे सादर करण्याची परंपरा औरंगपुरा मंडळाने राखली. 'पाणी अडवा पाणी जिरवा' चा संदेश देणारा देखावा सादर करून श्री तरुण मराठा गणेश मंडळाने तत्कालीन जिल्हाधिकारी व्ही. राधा यांनी जाहीर केलेले बक्षीस मिळविले होते. जरासंध वध, साईबाबा दर्शनचे देखावे गर्दी खेचणारे ठरले होते. पुढच्या पिढीतील शिलेदार नारायण कानकाटे, गोपाल कुलकर्णी, उल्हास नरवडे आणि टीमने दरवर्षी नवनवीन देखाव्यांची परंपरा पुढे कायम ठेवली. जिल्ह्यात चार वर्षांपासून दुष्काळ आहे. सामाजिक बांधिलकी म्हणून मंडळाने आठ कुटुंबांना प्रत्येकी २० हजारांची आर्थिक मदत केली. यंदा पंकज जगताप यांच्या अध्यक्षतेखाली मंडळाची सामाजिक बांधिलकी जपण्याची परंपरा यशस्वीपणे सुरू आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विसर्जन विहीर साफ करा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
जिल्हा परिषदेच्या मैदानावरील गणेश विसर्जन विहीर तातडीने साफ करावी, असे आदेश महापौर त्र्यंबक तुपे यांनी दिले.
महापौरांनी सोमवारी विसर्जन विहिरीची पाहणी केली. त्यावेळी सभागृह नेते राजेंद्र जंजाळ, अतिरिक्त आयुक्त रमेश पवार, कार्यकारी अभियंता सिकंदर अली, हेमंत कोल्हे, वॉर्ड अभियंता एम. एम. खान आती उपस्थित होते.
जिल्हा परिषदेच्या मैदानावरील विहिरीत गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यात येते. विसर्जनापूर्वी महापालिका या विहिरीची साफसफाई करते. त्यानंतर विहिरीत पाणी सोडण्यात येते. महापालिकेने विसर्जन विहिरीच्या सफाईचे काम सुरू केले आहे. 'विहिरीच्या सफाईचे काम तातडीने पूर्ण करावे व विहिरीत पाणी टाकावे,' असे आदेश महापौर तुपे यांनी यावेळी दिले.
स्मृतिवन येथे तयार करण्यात आलेल्या तात्पुरत्या विसर्जन स्थळाचीही महापौरांनी पाहणी केले. तेथे सुरू असलेल्या कामाबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिक्षकांच्या हजेरीवर आता ‘स्ट्रॉम’चे लक्ष

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

जिल्हा परिषदेच्या शिक्षकांच्या हजेरीचा प्रश्न कायम चर्चेचा विषय असतो. कुठलीही सिस्टम लावली तरी शिक्षकांची हजेरी योग्य पद्धतीने नोंदविली जात नसल्याच्या तक्रारी वारंवार प्रशासनाकडे येतात. त्यावर तोडगा काढण्यासाठी औरंगाबाद जिल्हा परिषद आता स्मार्ट फोनवर असलेल्या 'स्ट्रॉम' अॅप्लिकेशनच्या सहाय्याने लक्ष ठेवण्यात येणार आहे.

जिल्हा परिषदेचे सीईओ मधुकरराजे अर्दड यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, मी काही गावांना भेटी दिल्या. पैठण तालुक्यातील एका गावात शाळेविषयी तक्रार होती. जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक वेळेवर उपस्थित राहत नसल्याचे गावकऱ्यांनी सांगितले. त्यावर उपाययोजना करण्यासाठी जळगाव जिल्हा परिषदेत स्ट्रॉम नावाने अॅप तयार केले आहे. स्मार्ट फोनच्या सहाय्याने शाळेत आलेल्या शिक्षकांना फोटो काढून या अॅपचा उपयोग करता येतो. गटशिक्षणाधिकाऱ्यांकडे तालुक्यातील सर्व शाळांचा अहवाल प्राप्त झाला की त्याचे एकत्रित संकलन करून मुख्यालयी अहवाल पाठविता येतो. जळगावात यशस्वी झालेला हा प्रयोग आपल्या जिल्हा परिषदेत राबविण्याचा विचार आम्ही करत आहोत. याबाबत अभ्यास करून पुढची दिशा निश्चित केली जाईल, अशी माहिती त्यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोस्टमार्टेम न केल्याने पालकांची धावपळ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, खुलताबाद

सुलीभंजन येथील सूर्यकुंड तलावात बुडून विशाल किशोर मोरे (वय ३) याचा सोमवारी दुपारी बारा वाजता मृत्यू झाला. याबाबत खुलताबाद पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या बालकाच्या पोस्टमार्टेमसाठी पालकांना औरंगाबाद व खुलताबाद अशा फेऱ्या माराव्या लागल्या.

सूर्यकुंड येथे बालक बुडाल्यानंतर त्याच्या पालकांनी औरंगाबाद येथील घाटी दवाखान्यात उपरचारासाठी धाव घेतली. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून बालकास मृत घोषित केले. या बालकाच्या नातेवाईकांनी पोस्टमार्टेमची वाट पाहिली, पण मृतदेह घेऊन न सांगता सुलीभंजन येथे आले. यामुळे पोलिस व घाटी प्रशासनाची एकच धावपळ उडाली. घाटी पोलिस चौकीतून याची माहिती खुलताबाद पोलिस ठाण्यात देण्यात आली. बीट जमादार शेख नदीम यांनी सुलीभंजन येथे जाऊन बालकाच्या नातेवाईकांना पोस्टमार्टेम करण्याबद्दल माहिती दिली. त्यानंतर ते खुलताबाद ग्रामीण रुग्णालयात आले. पण, बालकाचा मृत्यू घाटी हॉस्पिटलने जाहीर केलेला असल्याने तेथेच घेऊन जाण्यास सांगण्यात आले. त्यामुळे मृतदेह घेऊन पालक पुन्हा औरंगाबादला गेले. अखेर पोस्टमार्टेम केल्यानंतर सायंकाळी उशिरा सुलीभंजन येथे अत्यंसंस्कार करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images