Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

भेसळयुक्त ८७० किलो तूप, १५० किलो खवा जप्त

0
0

औरंगाबाद : अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) बुधवारी सिडको एन-३मधील अमोल डेअरीवर कारवाई करून भेसळ केलेले ८७० किलो तूप आणि १५० किलो खवा जप्त केला.
एफडीएच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार; सिडको एन-३मधील अमोल डेअरी येथे सकाळी दहा ते दुपारी दीड या कालावधीत कारवाई करण्यात आली. अन्न सुरक्षा अधिकारी डॉ. राम मुंडे व दक्षता विभागाने सहआयुक्त चंद्रकांत भा. पवार आणि सहायक आयुक्त (अन्न) अ. शि. पारधी यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई केली. दामोधर उत्रेश्वर केदर यांच्या मालकीची ही अमोल डेअरी आहे. या डेअरीतील विविध पदार्थांची विक्री आणि निर्मितीबाबत संशयास्पद बाबी आढळल्या. यामुळे या डेअरीतून सुमारे ८७० किलो तूप आणि १५० किलो खवा जप्त केला. तुपाची किंमत २ लाख ६० हजार ७६० रुपये असून, खवा सुमारे २४ हजारांचा आहे. तपासणीवेळी पेढीकडे परवाना उपलब्ध नसणे, अन्नपदार्थांच्या खरेदी विक्रीची बिले नसणे, अन्नपदार्थ कोणाकडून खरेदी करण्यात आले, याचीही माहिती नसणे याशिवाय अन्नपदार्थांत भेसळ असणे आदी प्रकार आढळल्याची माहिती सहआयुक्त पवार यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


चैतन्यसोहळ्याची सांगता

0
0

म. टा. विशेष प्रतिनिधी, औरंगाबाद
अवघ्या महाराष्ट्रात गेले दहा दिवस चैतन्य फुलविणाऱ्या श्री गणरायाच्या आनंदसोहळ्याची गुरुवारी दिमाखदार मिरवणुकीने सांगता होत आहे. गणरायाला निरोप देण्यासाठी औरंगाबादकर सज्ज झाले असून, महापालिका आणि पोलिसांनी मिरवणुकीची चोख तयारी केली आहे.
सुखकर्ता, विघ्नहर्त्या बाप्पाचे घरोघरी आणि सार्वजनिक गणेश मंडळांमध्ये गेल्या आठवड्यात वाजत-गाजत आगमन झाले. गेले दहा दिवस संपूर्ण वातावरण गणेशमय झाले होते. राज्यात समाधानकारक पाऊस होण्याची अपेक्षा बाप्पांनी यंदा पूर्ण केली होती. त्यामुळे, महालक्ष्मीला निरोप दिल्यानंतर शहरातील रस्त्यांवर गणेशभक्तांची गर्दी वाढू लागली. दहा दिवसांच्या या मंगलमयी उत्सवाची सांगता गुरुवारी सुरू होणाऱ्या विसर्जन मिरवणुकीने होणार आहे. मुख्य विसर्जन मिरवणूक सकाळी साडेदहा वाजता ग्रामदैवत संस्थान गणपती मंदिरापासून सुरू होईल. शहागंज, सिटी चौक, गुलमंडी, औरंगपुरा या मार्गाने जिल्हा परिषद मैदानावर मुख्य मिरवणुकीची सांगता होईल. त्याचबरोबर पैठण गेट मार्गावरून आलेली मिरवणूक बारभाई ताजिया येथून मुख्य मिरवणुकीत सहभागी होईल.
दहा दिवसांत देखाव्यांच्या माध्यमातून भाविकांना खिळवून ठेवणाऱ्या मंडळांनी विसर्जनासाठी विविध संकल्पनांवर आधारित रथ आणि सजावटीची तयारी केली आहे. मिरवणुकीसाठी पोलिस प्रशासनाने वाहतुकीच्या मार्गात बदल केले आहेत. महापालिकेने विसर्जन मार्गावरील रस्त्याची दुरुस्ती केली आहे. रात्री उशिरा या मिरवणुकीची सांगता होईल.
सिडको-हडको परिसरात मिरवणुकीची सुरुवात अाविष्कार कॉलनी चौकातून होईल. बळीराम पाटील शाळा, एम-२मार्गे टीव्ही सेंटर चौकातून मिरवणूक एन-१२ येथील विसर्जन विहिरीच्या परिसारात पोचेल. काही मंडळे बजरंग चौकमार्गे आणि काही मंडळे जळगाव रोडमार्गे मिरवणुकीत सहभागी होतील. नवीन औरंगाबाद महासंघाची मिरवणूक गजानन महाराज मंदिरापासून सुरुवात होईल. शिवाजीनगर येथील विहिरीत मिरवणुकीची सांगता होईल.

वरुणराजा हजेरी लावणार?
वरुणराजा बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीत दमदार हजेरी लावण्याचे संकेत हवामानशास्त्र विभागाने दिले आहेत. शहर आणि परिसरात बुधवारी दिवसभर ढगाळ वातावरण होते. काही भागात पावसाच्या काही हलक्या सरींनी हजेरी लावली. गुरुवारी काही जोरदार सरी कोसळण्याचा अंदाज आहे. शुक्रवारीही पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाज असल्याने विसर्जनासाठीच्या तयारीवर पाणी पडू नये, अशी अपेक्षा कार्यकर्त्यांना आहे.

येथे करा विसर्जन
शहरात गणपती बाप्पांच्या विसर्जनाची तयारी जोरात करण्यात आली आहे. जिल्हा परिषद मैदानावरील विसर्जन विहिरीची दोन दिवसांपूर्वी साफसफाई करण्यात आली. सोबतच स्मृतिवनातील तात्पुरते विसर्जन स्थळ, ज्योतीनगर, हडको एन बारा, शिवाजीनगर, मुकुंदवाडी, चिकलठाणा, वाळूज महानगर, सातारा येथील दोन तळे व एक विहीर, हर्सूल येथील तळे व विहीर आदी ठिकाणी शहरवासीयांना बाप्पांचे विसर्जन करता येईल. या विसर्जन ठिकाणी चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मोठ्या खंडानंतर मराठवाड्यात पाऊस परतला

0
0

म. टा. विशेष प्रतिनिधी, औरंगाबाद
गेल्या सुमारे महिनाभरापासून गायब असलेल्या पावसाचे मराठवाड्यात दमदार पुनरागमन झाले आहे. औरंगाबाद जिल्हा वगळता विभागातील सर्व जिल्ह्यांत मंगळवारी जोरदार हजेरी लावली. दुष्काळी लातूर, उस्मानाबाद, बीड, नांदेड, हिंगोली, परभणी या जिल्ह्यांत जोरदार पाऊस झाला. लातूर जिल्ह्यांत अतिवृष्टी झाली आहे. विभागातील सहा तालुक्यांत अतिवृष्टीची नोंद झाली. विभागातील ४२ महसूल मंडळात अतिवृष्टी झाली आहे. बुधवारी सकाळपर्यंत विभागात २४.७५ मिली मीटर पाऊस पडल्याची नोंद आहे. दरम्यान, येत्या ४८ तासांत मराठवाड्यात अतिवृष्टी होईल, असा इशारा भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिला आहे.
गेल्या तीन वर्षांपासून दुष्काळाचे चटके सहन करणाऱ्या मराठवाड्यात जून, जुलै महिन्यात जोरदार पाऊस झाला. त्यामुळे शेतकऱ्याच्या आशा पल्लवित झाल्या. खरिपाचे पेरणीक्षेत्रही वाढले. ऑगस्ट महिन्यात मात्र पावसाने पाठ फिरविली. त्यामुळे पुन्हा एकदा दुष्काळाचा सामना करावा लागतो की काय, असे चित्र निर्माण झाले. सप्टेंबर महिन्यातही पावसाने दमदार हजेरी लावली नव्हती. या पार्श्वभूमीवर बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे मराठवाड्यात पावसाचे पुनरागमन झाले आहे. बुधवारी सकाळी साडेआठपर्यंत विभागात २४.७५ मिली मीटर पाऊस पडल्याची नोंद आहे.
लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यात सर्वाधिक ९६.३८ मिली मीटर पाऊस पडला. त्याशिवाय अहमदपूर (७७.३३ मिली मीटर), चाकूर (९०), शिरूर अनंतपाळ (९१.६७), उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा (९१ मिली मीटर), नांदेड जिल्ह्यातील लोहा (९०.५ मिली मीटर) या तालुक्यांत अतिवृष्टी झाल्याची नोंद आहे. लोहा तालुक्यातील शिवडी मंडळात सर्वाधिक २११ मिली मीटर पाऊस पडला. त्याखालोखाल चाकूर तालुक्यातील नळेगाव मंडळात ११८ मिली मीटर पावसाची नोंद आहे. पूर्णा, नांदेड, अर्धापूर, कंधार, मुखेड (जि. नांदेड), धारूर (जि. बीड), औसा, उदगीर, जळकोट, देवणी (जि. लातूर), लोहारा (जि. उस्मानाबाद) या तालुक्यांत ५० मिली मीटरपेक्षा जास्त पाऊस पडला.

अतिवृष्टीचा इशारा
मराठवाड्यात येत्या ४८ तासांत ७० मिली मीटर ते ११० मिली मीटर पाऊस पडेल, असा इशारा भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) दिला आहे. १५ सप्टेंबर रोजी काही भागांत २०० मिली मीटरपर्यंत पाऊस पडू शकतो, असाही इशारा आयएमडीने दिला आहे.

२४ तासांतील पाऊस
जिल्हा.........पाऊस
औरंगाबाद.....००
जालना..........३.९८
परभणी.........२७.३६
हिंगोली..........१८.४८
नांदेड............३१.७१
बीड..............१९.६८
लातूर.............६६.८
उस्मानाबाद.....२९.९९
एकूण.............२४.७५
(पाऊस ः मिली मीटरमध्ये, बुधवारी सकाळपर्यंत)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मी कारभारीण : विश्वासाच्या बळावर दोन दशकांची वाटचाल

0
0

unmesh.deshpande@timesgroup.com
Tweet : @UnmeshdMT
ज्योतीनगरच्या न्यू एस.बी.एच. कॉलनीमधील कल्याणी गार्डन अपार्टमेंटमध्ये श्रद्धा अभ्यंकर राहतात. त्यांनी आपल्या कुटुंबाला आधार देण्यासाठी १९९६ मध्ये सुमारे अडीच हजार रुपये गुंतवून इमिटेशन ज्वेलरी विकण्याचा व्यवसाय सुरू केला. त्या काळात ही रक्कम सुध्दा मोठी वाटायची. अभ्यंकर यांना दागिने वापरण्याची आवड. बाहेर जाताना त्या दागिने घालून जायच्या. नवनवीन प्रकारचे दागिने वापरण्याची त्यांची आवड त्यांच्या मैत्रिणींना आकर्षित करू लागली. त्यामुळे त्यांनी स्वतःच ज्वेलरी विकण्याचे काम सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्या मोत्यांचे दागिने वापरायच्या. त्यामुळे त्यांनी हे दागिने विकण्याचा निर्णय घेऊन घरगुती व्यवसाय सुरू केला. लग्न झाल्यानंतर नवऱ्याने कंपनीमधील नोकरी सोडली आणि स्वतःचा व्यवसाय सुरू केला. व्यवसायात जम बसवण्यासाठी त्यांचा संघर्ष सुरू होता. या संघर्षाला साथ देण्यासाठी सुरुवातीला श्रद्धा यांनी मोत्याचे दागिने विक्रीचे काम सुरू केले. त्यानंतर सात-आठ वर्षांनी त्यांनी इमिटेशन ज्वेलरीच्या क्षेत्रात पाऊल टाकले. एलआयसी ऑफिस, बँका, शाळांमध्ये जाऊन त्यांनी दागिने विक्रीचे काम सुरू केले. अमेरिकन डायमंड, आयगोल्ड, मायक्रोप्लेटिंग पद्धतीचे दागिने आणून त्याची विक्री त्या करू लागल्या. शहरात लागणाऱ्या विविध प्रदर्शनात त्यांनी दागिने विक्रीचे स्टॉल लावले. त्यातून त्यांचा संपर्क वाढला. आता दागिने घेऊन शाळा, बँकांमध्ये जावे लागत नाही. मी ज्वेलरी विकते हे ज्या महिलांना माहिती आहे, त्या स्वतःहून घरी येतात आणि ज्वेलरी घेऊन जातात, असे त्या अभिमानाने सांगतात. विश्वासाच्या बळावर हे सगळे सुरू आहे, असा उल्लेख त्यांनी केला. दोन दशकांपासून विश्वासाच्या बळावर अनेक ग्राहक जोडून ठेवले आहेत. एखाद्या दागिन्याची गॅरेंटी नसेल, तर ग्राहकांना मी तसे स्पष्टच सांगते. त्यामुळे ग्राहकांचा भ्रमनिरास होत नाही. एखादा दागिना खराब झाला, तरी कुणी त्याची तक्रार करीत नाही. गॅरेंटी असेल, तर तसे सांगितले जाते. गँरेंटी नसेल, तर दागिने विकताना त्याचा स्पष्ट उल्लेख आम्ही करतो. त्यामुळे ग्राहाकांमध्ये किंतु, परंतु रहात नाही. मध्यंतरीच्या काळात आजारपणामुळे त्यांनी दागिने विक्रीचा व्यवसाय बंद केला होता, पण नेहमीच्या ग्राहकांच्या आग्रहामुळे एकाच वर्षात त्यांना पुन्हा हा व्यवसाय सुरू करावा लागला.
दागिन्यातील नवनवीन ट्रेंडस् आणि महिलांची फॅशन याची सांगड घालून श्रद्धा अभ्यंकर स्वतःच दागिन्यांची निवड करतात. पुणे, मुंबई आणि नागपूर येथे इमिटेशन ज्वेलरी तयार करून विक्री करणाचे होलसेलर आहेत. महिलांच्या मागणीनुसार नवनवीन प्रकारच्या ज्वेलरींची ऑर्डर या होलसेलर्सला दिली जाते. दागिने तयार करून घेतले जातात आणि ते आम्ही विकतो अशी माहिती त्यांनी दिली. मोत्यांचे दागिने विक्रीचा त्यांचा मूळ व्यवसाय आहे. या व्यवसायापासून त्या दूर गेल्या नाहीत. मोत्यांच्या दागिन्याला इमिटेशन ज्वेलरीची जोड त्यांनी दिली. चांगल्या दर्जाचे मोती असतील, तरच आम्ही त्याचे दागिने बनवून घेतो. दागिने बनवून देणारेही जुनेच आहेत. त्यामुळे आमची ऑर्डर त्यांना माहिती असते, असे त्या सांगतात. दागिने विक्रीच्या व्यवसायाची जाहिरात कधीच करावी लागली नाही. ज्या महिला ग्राहक संपर्कात आल्या, त्यांनीच आमची जाहिरात केली. त्यामुळे दागिने खरेदी करण्यासाठी येणाऱ्या महिलांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली. त्यांच्या विश्वासाला तडा जाऊ द्यायचा नाही, हेच ब्रीद घेऊन वाटचाल सुरू आहे, असा उल्लेख त्या अभिमानाने करतात. दागिने विक्रीच्या व्यवसायात घरच्यांची साथ चांगली मिळते. त्यांच्या साथीमुळेच दोन दशकांचा पल्ला गाठता आला, असे त्यांनी सांगितले. मोत्यांचे दागिने आणि इमिटेशन ज्वेलरीचे एखादे छोटेसे दुकान सुरू करण्याचे त्यांचे नियोजन आहे. येत्या काळात हा टप्पा पार करायचा, असे त्यांनी ठरविले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पडेगाव : नागरिकांनी केला स्वखर्चातून रस्ता

0
0

म. टा. प्रतिनिधी, पडेगाव

कच्च्या रस्त्यावरील खड्ड्यांमुळे हॉस्पिटलमध्ये नेण्यास उशीर झाल्याने हृदयविकाराच्या झटक्याने एकाचा मृत्यू व एका महिलेची रस्त्यावरच प्रसुती झाल्यामुळे कासंबरी दर्गा परिसरातील नागरिकांनी स्वतःच एक किलोमीटरचा कच्चा रस्ता तयार केला आहे.

कासंबरी दर्गा परिसरात मोठी लोकवस्ती झाली असून या परिसरातील नागरिक सातत्याने रस्त्याची मागणी करत आहेत. पण, मनपा प्रशासन व लोकप्रतिनिधींकडून दाद मिळत नसल्याने प्रचंड गैरसोयीला तोंड द्यावे लागत आहे. पाच दिवसांपूर्वी शेख शकील (वय ३५) यांचा हॉस्पिटलमध्ये नेताना हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. चांगला रस्ता असता, तर त्यांना वेळेवर उपचार मिळाले असते व जीव वाचला असता, अशी या भागातील नागरिकांची भावना आहे. त्यापूर्वी रस्त्यावरील खड्ड्यांमुळे त्रास होऊन येथील मशीदीच्या मौलानाच्या पत्नीची प्रसुती हॉस्पिटलमध्ये नेताना झाली. सहा महिन्यांपासून पाठपुरावा करूनही रस्ता होत नसल्याने या दोन घटनांनंतर मनपा प्रशासन व लोकप्रतिनिधींबद्दल प्रचंड चीड आहे.

या परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी नागरिकांनी सुमारे दीड लाख रुपये जमा केले व भावसिंगपुरा ते कासंबरी कॉलनी हा एक किलोमीटरचा कच्चा रस्ता तयार केला आहे. या रकमेतून रस्त्यावरील खड्ड्यात दगड टाकून मुरूम अंथरण्यात आला. या परिसराकडे प्रशासनाचे लक्ष नसल्याने नागरिकांना मुलभूत सोयींपासून वंचित राहावे लागत आहे. प्रशासनाने या भागाकडे लक्ष दिले नाही, तर लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा इशारा शेख आसीफ, शेख आरेफ, शब्बीर शेख, महंमद मसूद, शेख खय्यूम अहमद, शेख चाँद, एम. डी. नजीर, अकबर अली, शेख महेबुब, गणेश लोखंडे, सतीस सोनवणे आदींनी दिला आहे.

पालिका बिनघोर

मनपा प्रशासन लक्ष देत नसल्याने १५ दिवसांपूर्वी या परिसरातील एका महिनेने पुढाकार घेऊन नागरिकांकडून वर्गणी करून दुसऱ्या रस्त्यावरील खड्डे बुजवले होते. त्यानंतर तरी पालिकेला जाग येईल, अशी येथील नागरिकांची अपेक्षा होती. मात्र, त्यानंतर सुद्धा इकडे कोणीच फिरकले नाही.

सहा महिन्यांपासून मनपा आयुक्त, नगरसेवक, विरोधी पक्ष सर्वांकडे अर्ज विनंत्या केल्या. मात्र, लोकप्रतिनिधी व प्रशासनाने दखल घेतली नाही. त्यामुळे आम्ही नागरिकच रस्ता करत आहोत.

- शेख आसिफ

रस्त्याअभावी हॉस्पिटलमध्ये वेळेवर दाखल करता न आल्याने एकाला जीव गमवावा लागला. एका महिलेची प्रसुती रस्त्यावरच झाली. त्यामुळे आम्ही स्वखर्चातून रस्ता तयार करत आहोत.

- शेख आरेफ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पॅचवर्कवर आठवड्यात ९० लाख खर्च

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

गणेश विसर्जन मिरवणुकीच्या मार्गावरील रस्त्यांची मलमपट्टी करण्यासाठी महापालिकेने आठ दिवसांत ९० लाख रुपये खर्च केले. शहराच्या विविध भागांतील विसर्जन विहिरींकडे जाणाऱ्या सुमारे २२ रस्त्यांचे पॅचवर्क करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. पॅचवर्कसाठी वॉर्ड कार्यालयनिहाय नऊ लाखांची तरतूद करण्यात आली होती.

रस्त्यांवरील खड्ड्यांवरून गेल्या काही महिन्यांपासून नागरिकांमध्ये रोष आहे. पालिकेच्या सर्वसाधारण सभेतही नगरसेवकांनी खड्ड्यांच्या प्रश्नावरून पालिकेच्या प्रशासनाला धारेवर धरले होते. हायकोर्टाने ३० सप्टेंबरपर्यंत खड्डे बुजवा, असे आदेश महापालिकेला दिले आहेत. त्या पार्श्वभूमीवर पालिकेच्या प्रशासनाने पॅचवर्कचे काम सुरू केले. गणेशोत्सवामुळे विसर्जन मार्गावरील रस्त्यांचे पॅचवर्क करण्याला प्राधान्य देण्यात आले. या कामासाठी वॉर्ड कार्यालयनिहाय नऊ लाख रुपयांची तरतूद प्रशासनाने केली. नऊ वॉर्ड कार्यालयांतर्गत सुमारे ९० लाख रुपये आठ दिवसांत खर्च झाल्याची माहिती आहे.

रामनगर, मुकुंदवाडी, चिकलठाणा, सिडको एन १२, शिवाजीनगर, हर्सूल, औरंगपुरा, सातारा - देवळाई या भागातील आठ प्रमुख विसर्जन विहिरींकडे जाणाऱ्या रस्त्यांवर पॅचवर्क करण्यात आले. त्यात संस्थान गणपती मंदिर ते स्वातंत्र्य सैनिक कॉलनी मार्गे जिल्हा परिषद मैदान, जयभवानीनगर चौक ते शिवाजीनगर, एव्हॉन हॉटेल ते मुकुंदवाडी, सातारा-देवळाई, जिल्हाधिकारी कार्यालय ते गणेश कॉलनी, जटवाडा रोड या रस्त्यांचा समावेश आहे. गणेशोत्सवानंतर शहरातील अन्य रस्त्यांवर पॅचवर्कचे काम केले जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बाप्पा, पप्पा सुरक्षित घरी येतील का?

0
0

पोलिसांवरील हल्ल्याच्या विरोधात मूक निदर्शने

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'गणपती बाप्पा माझे पप्पा सुरक्षित घरी येतील का ?' हा फलक घेतलेला बालक बुधवारी पोलिसांवरील हल्ल्याच्या निषेधार्थ आयोजित करण्यात आलेल्या मूक निदर्शनामध्ये सहभागी झाला होता. पोलिसांवरील वाढत्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर हा फलक बरेच काही बोलून जात होता. विभागीय आयुक्त कार्यालयासमोर शुक्रवारी सकाळी सेवानिवृत्त महाराष्ट्र पोलिस अधिकारी, कर्मचारी असोसिएशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या मूक निदर्शनाला पोलिसांच्या कुटुंबीयांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

गेल्या क‌ाही दिवसांत पोलिसांवर समाजकंटकाकडून हल्ले झाल्याच्या घटना घडल्या आहेत. मुंबई येथील वाहतूक शाखेचे जमादार विलास शिंदे यांचा अशाच एका घटनेत मृत्यू झाला. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी या हल्ल्याच्या निषेधा‌र्थ मूक निदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या निदर्शनामध्ये निवृत्त पोलिस अधिकारी, कर्मचारी, त्यांचे कुटुंबीय, पोलिस बॉईज संघटना आदींचा सहभाग होता. यावेळी पोलिसांवरील हल्ल्यांमध्ये अजामीनपात्र गुन्हा दाखल करावा, कलम ३५३ मध्ये वाढीव दहा वर्षे शिक्षेची तरतूद करण्यात यावी, या हल्ल्याच्या बाबतीत असलेले खटले फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावे, हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांच्या वारसास शासकीय सेवेत विनाअट समावून घ्यावे, सेवानिवृत्तीनंतर उपचारासाठी कॅशलेस सुविधा मंजूर करावी, जिल्हा सैनिक कल्याण बोर्डाच्या धर्तीवर जिल्हा पोलिस कल्याण बोर्ड स्थापन करावे आदी मागण्या करण्यात आल्या. यावेळी असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रकांत पवार, जेम्स अंबिलढगे, सं.का. माने पाटील, शांताराम सावंत, दीपकसिंग गौर, वाल्मिक पवार, जग्गनाथ किनगे यांच्यासह इतर सेवानिवृत्त पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.

पोलिस दलात काम करीत असताना कनिष्ठ अधिकारी कर्मचाऱ्यांना वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पाठबळ द्यायला हवे. एखादी घटना घडल्यास कनिष्ठांचे खच्चीकरण न करता त्याला पाठिंबा दिल्यास अशा घटना घडणार नाही, असे मत उपस्थित सेवानिवृत्त अधिकाऱ्यांनी व्यक्त केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मृत्यू प्रमाणपत्रासाठीही यातना

0
0

घाटी, मनपाची टोलवाटोलवी; निधन झाल्यावर दीड वर्षानंतरही नातेवाईकांची मृत्यू प्रमाणपत्रासाठी फरफट

म. टा. विशेष प्रतिनिधी, औरंगाबाद

इतकेच मला जाताना

सरणावर कळले होते

मरणाने केली सुटका

जगण्याने छळले होते.

हा सुरेश भट यांचा शेर महापालिका व घाटी हॉस्पिटलने पुरता खोटा ठरविला आहे. दीड वर्षांपूर्वी दुर्दैवी निधन झालेल्या महिलेचे मृत्यू प्रमाणपत्र मिळविण्यासाठी तिचे नातेवाईक दोन्ही ऑफिसमध्ये जाऊन जाऊन थकले, पण आजवर हे प्रमाणपत्र मिळालेले नाही. महापालिकेचे कर्मचारी म्हणतात की घाटीतून कागदपत्रे मिळाली नाहीत. तर घाटीच्या रेकॉर्डमधून सांगतात की पालिकेचे कर्मचारी रेकॉर्ड स्वीकारत नाहीत. तुम्हीच येऊन घेऊन जा. या सगळ्या प्रकारात मृताच्या नातेवाईकांचे मात्र हाल होत आहेत.

एप्रिल २०१५ मध्ये घाटीच्या मेडिसीन विभागात उपचार घेताना वंदना (नाव बदलले आहे.) यांचे निधन झाले. चार दिवस उपचार सुरू होते. त्यांना स्वाइन फ्लू झाल्याचे निदान झाले. निधन झाल्यानंतर दहा दिवसांनी त्यांच्या नातेवाईकांनी महापालिकेच्या अ वॉर्ड कार्यालयात मृत्यू प्रमाणपत्रासाठी अर्ज सादर केला. त्यासाठी घाटीमधून मिळालेले प्रमाणपत्र तसेच अन्य आवश्यक कागदपत्रे जोडली. त्यांना तीन महिन्यांनंतरची म्हणजे सप्टेंबरमधील तारीख जावक क्रमांक टाकून मिळाली. तीन महिन्यांनंतर ठरलेल्या दिवशी वंदना यांचे नातेवाईक प्रमाणपत्र मागण्यासाठी गेले. नेहमीप्रमाणे कर्मचारी उपस्थित नव्हता. तीन दिवसांनंतर गेल्यानंतर कर्मचारी कसाबसा सापडला. त्याने पावती पाहून सांगितले, 'तुमचे रेकॉर्ड अजून घाटीतून आले नाही. १५ दिवसांनी या.' १५ दिवसांनी गेल्यानंतर तेच उत्तर मिळाले. एकतर माणूस गमावल्याचे दुःख आणि त्यात पालिकेकडून होणारी टोलवाटोलवी नातेवाईकांना संताप आणणारी होती. तीन महिने काहीच हालचाल झाली नाही. वैतागलेल्या नातेवाइकांनी ओळख काढून पालिकेत पुन्हा धडक मारली. ओळखीच्या दट्ट्याने अधिकारी, कर्मचारी अदबीने बोलले आणि त्यांच्यापैकी एकाने सांगितले,' घाटीतून रेकॉर्ड आल्याशिवाय आम्ही सर्टिफिकेट देऊ शकत नाही. तुम्ही घाटीत जाऊन बघा ना.'

वंदनाच्या नातेवाईकांच्या पालिकेनंतर घाटीत चकरा सुरू झाल्या. सुरुवातीला रेकॉर्ड रूमच सापडले नाही. कसाबसा पत्ता मिळाला. तिथे गेल्यावर अधिकारी, कर्मचारीच सापडले नाहीत. चौथ्या फेरीत कर्मचारी सापडले. त्यांना रेकॉर्डची विचारणा केल्यावर 'आम्ही तुमच्या हातात कसे देणार ? तुमची केस खूप जुनी आहे. रेकॉर्ड तेव्हाच पाठवले असेल. तिकडेच बघा.'

गेल्या दीड वर्षांपासून वंदनाच्या नातेवाईकांची महापालिका व घाटी प्रशासनाच्या टोलवाटोलवीमुळे अक्षरशः फरफट होत आहे. वॉर्ड अ कार्यालयातील कारभाराचा अनेकांना असा अनुभव येतो. अन्य प्रमाणपत्राच्या टोलवाटोलवीचे सहन करता येईल, पण मृत्यू प्रमाणपत्रासाठी होणारी अवहेलना कशी सहन करणार ? असा संतापजनक सवाल वंदनाच्या नातेवाईकांनी मटाशी बोलताना उपस्थित केला. वॉर्ड कार्यालयात संपर्क साधल्यानंतर माहिती द्या, तपासून लवकरात लवकर प्रमाणपत्र देण्याचे आश्वासन देण्यात आले. मुळात हा प्रश्न दीड वर्षांपूर्वीचा असल्याचे गांभीर्य मात्र कुणाच्या लक्षात आले नाही. दुसरीकडे घाटीच्या रेकॉर्ड रूममध्ये संबंधित मृताची माहिती देऊन विचारणा केल्यानंतर काहीच माहिती मिळाली नाही. तेथील अधिकाऱ्याकडून सांगण्यात आले, की आमच्याकडून कधी कधी महिना, दोन महिने उशिराने रेकॉर्ड महापालिकेकडे जाते. मात्र, तेथील कर्मचारी उद्धटपणे बोलून रेकॉर्ड परत करतात. त्यामुळे मृत्यू प्रमाणपत्र देण्यास अडचण येत असावी. आमच्या बाजुने आम्ही रेकॉर्ड तयार केले आहे. तुम्ही कागदपत्रे आणि नातेवाइकांना ओळखपत्रांसह घेऊन या. आम्ही रेकॉर्ड काढून देतो. ते पालिकेत न्या आणि मृत्यू प्रमाणपत्र काढून घ्या.

अर्धा किलोमीटर अंतरावर असलेल्या या दोन कार्यालयात संवादाचा अभाव असल्याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे. मृत्यू प्रमाणपत्रासाठीच्या यातना कोण थांबवणार, हा प्रश्न मात्रअनुत्तरित आहे.

अडचणींचा गुंता

मृत व्यक्तिचा विमा काढलेला असेल तर संबंधित कंपनीला क्लेम करण्यासाठी मृत्यू प्रमाणपत्र द्यावे लागते. दीड - दीड वर्षे प्रमाणपत्र मिळाले नाही तर क्लेम कसा सेटल होणार ? याबाबत मात्र कुणाकडेच उत्तर नाही. याशिवास पेन्शन किंवा अन्य सरकारी कामकाजासाठी मृत्यू प्रमाणपत्र अत्यावश्यक असते. तेच मिळाले नाही तर ही कामे अडणार. याला जबाबदार कोण ? पालिका, घाटी की दोघांसाठी घालून दिलेली सिस्टम याबाबत दोन्ही यंत्रणांच्या वरिष्ठांनी विचार करणे आवश्यक आहे.

मृत व्यक्तीचे डिटेल्स माझ्याकडे द्या. तपासून प्रमाणपत्र तत्काळ कसे देता येईल, याकडे लक्ष देतो.

- भालचंद्र पैठणे, वॉर्ड अधिकारी अ

तुमच्याकडे असलेली कागदपत्रे, फॉर्म घेऊन या. पालिकेत जमा केला असेल तर तिथून आणा. आम्ही उशिराने पाठविलेले रेकॉर्ड पालिकेतील कर्मचारी स्वीकारत नाहीत. त्यामुळे अशी अडचण येते. मृताच्या नातेवाईकांना सोबत आणा. आम्ही रेकॉर्ड देतो. ते पालिकेत जमा करून प्रमाणपत्र घ्या. तुमचे प्रमाणपत्र पाठविले की नाही याबाबत आता काही सांगू शकत नाही.

- श्रीमती चौधरी, रेकॉर्ड रूम प्रमुख, घाटी हॉस्पिटल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


खड्डे बुजवण्यासाठी आठ दिवसांची मुदत

0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
राज्यभर खड्डेनगरी अशी ओळख झालेल्या औरंगाबादमधील खड्डे बुजविण्यासाठी पालकमंत्री रामदास कदम यांनी पालिका प्रशासनाला आठ दिवसांची मुदत दिली आहे. रस्त्यांच्या कामात दोषी असणाऱ्या अधिकारी व कंत्राटदारांवर कायदेशीर कारवाई करा, असे आदेशही त्यांनी शनिवारी दिले.
कदम यांनी सुभेदारी विश्रामगृहात शहरातील रस्त्यांसंदर्भात बैठक घेतली. यावेळी खासदार चंद्रकांत खैरे, महापौर त्र्यंबक तुपे, आमदार अब्दुल सत्तार, इम्तियाज जलील, शिवसेनेचे जिल्हाप्रमु्ख अंबादास दानवे, पालिका सभागृहनेते राजेंद्र जंजाळ यांच्यासह जिल्हाधिकारी डॉ. निधी पांडेय, पालिका आयुक्त ओम प्रकाश बकोरिया, पालिकेचे अन्य अधिकारी, एमएसआरडीसी, सार्वजनिक बांधकाम विभाग, महावितरण, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी उपस्थित होते. बैठकीच्या सुरुवातीलाच कदम यांनी रस्त्यांवरील खड्डे आठ दिवसांत बुजवा असे आदेश आयुक्तांना दिले. २८ सप्टेंबर रोजी आपण पुन्हा येणार आहोत. त्यावेळी सोबत कदाचित युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेही असतील. तोपर्यंत खड्डे बुजवण्याचे काम पूर्ण झालेच पाहिजे. रस्त्यांच्या कामात जे अधिकारी व कंत्राटदार दोषी आढळतील त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करा. कुणालाही पाठीशी घालू नका. कुणाशीही तडजोड करू नका, त्यामुळे एक चांगला संदेश जनतेमध्ये जाईल, असे त्यांनी जिल्हाधिकारी व आयुक्तांना सांगितले.
शहरात आतापर्यंत किती रस्त्यांची कामे केली, गेल्या एक - दोन वर्षांत किती कामे झाली, त्यापैकी किती रस्ते खराब झाले, त्या रस्त्यांवर काम करणारा अधिकारी व कंत्राटदार कोण होता, त्या रस्त्यासाठी किती खर्च झाला, कंत्राटदाराला बिल देण्यात आले का, या संबंधीचा सविस्तर अहवाल आठ दिवसात द्या असे आदेशही त्यांनी पालिका आयुक्तांना दिले. रस्ते विकास महामंडळ आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी पालिकेकडे रस्ते हस्तांतरित केले असले तरी त्या रस्त्यांची देखभाल दुरुस्तीची जबाबदारी या दोन विभागांचीच आहे. त्यांनी हे काम लवकर पूर्ण करावे. बारापुल्ला गेट, मकईगेट, पानचक्कीचे गेट या तीन गेटच्या शेजारून नवीन पूल तयार करण्याचे अंदाजपत्रक सार्वजनिक बांधकाम विभागाने लवकर तयार करून सादर करावे, असेही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सांगितले. कटकटगेट रस्त्याचे काम त्वरित सुरू करा. या रस्त्यासाठी पन्नास लाख रुपये देऊनही अद्याप काम का सुरू केले नाही, असा सवाल कदम यांनी पालिकेचे कार्यकारी अभियंता सिकंदर अली यांना केला. या रस्त्यासाठी आणखी साठ लाख रुपये देण्याची घोषणा त्यांनी केली.

अधिकारी-कंत्राटदार मिलीभगत मोडून काढा
महापालिकेत अधिकारी आणि कंत्राटदारांची मिलीभगत आहे. या दोघांनी शहराचे मोठे नुकसान झाले. ही मिलीभगत मोडून काढा. त्यांच्यावर कारवाई करा, असे आदेश कदम यांनी पालिका आयुक्तांना दिले. आतापर्यंत फक्त आठ टक्केच मालमत्ता करवसुली झाली. त्यामुळे वसुली वाढवा. पालिका हातात कटोरी घेऊन मदतीसाठी फिरते आहे, असा उल्लेख त्यांनी केला.

कंत्राटदारंची कानउघाडणी
कदम यांनी कंत्राटदारांची वेगळी बैठक घेत त्यांच्याशी शहरातील रस्त्यांबद्दल चर्चा केली. हे आपले शहर आहे, असे मानून काम करा. रस्त्यांवर खड्डे खूप पडले आहेत. ते बुजवण्यासाठी पालिकेला सहकार्य करा. रस्त्यांसाठी दिलेला पैसा खड्ड्यात जातो असे लक्षात आल्यावर येत्या काळात मुख्यमंत्री रस्त्यांच्या कामासाठी पैसे देणार नाहीत. त्यामुळे शहराचेच नुकसान होईल. या कामात कुचराई करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा त्यांनी दिला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डी. पी. प्रकरणी उद्या सुप्रीम कोर्टात सुनावणी

0
0


म. टा. विशेष प्रतिनिधी, औरंगाबाद
शहराचा सुधारित विकास आराखडा रद्द करण्याचा निर्णय मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिल्यानंतर या विरोधात महापौरांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. या विशेष याचिकेवर सोमवारी सुनावणी होणार आहे.
या याचिकेवर शुक्रवारी न्या. गोपाल गौडा व न्या. आदर्शकुमार गोयल यांच्यासमोर सुनावणी झाली. विकास आराखडा तयार करण्याचे काम पालिकेने वेळेत केले नाही. सुधारित विकास आराखडा तयार करताना शासन नियुक्त अधिकारी नेमण्याची तरतूद नाही. त्यास मुदतीचे बंधन लागू होत नाही, असा युक्तीवाद अटर्नी जनरल व महापौरांचे वकील मुकुल रोहतगी यांनी केला. सुप्रीम कोर्टाने हा एकच बचावाचा मुद्दा आहे का, असे विचारले. त्यावर सोमवारी उत्तर देतो असे सांगून वेळ मागण्यात आली. विशेष म्हणजे महापौरांच्या दहा याचिकेत पालिकेचे वैधानिक प्रमुख असलेले आयुक्तांनाच प्रतिवादी करण्यात आले आहे. पालिका अधिनियमानुसार कोर्टात बाजूने किंवा विरुद्ध भूमिका मांडायची असेल, तर त्याचे अधिकार आयुक्तांना आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मराठा आरक्षणासाठी भीमशक्तीचे आंदोलन

0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
मराठा, धनगर समाजासह मुस्लीम समाजाला आरक्षण देण्यात यावे, अॅट्रॉसिटी कायद्याची कडक अंमलबजावणी करण्यात यावी या प्रमुख मागण्यांसाठी भीम शक्ती संघटनेने शनिवारी हैदराबाद मुक्तीसंग्राम दिनाचे औचित्य साधत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भर पावसात तीव्र निदर्शने केली.
राज्यात मराठा, धनगर, मुस्लीम समुदाय आपल्या शैक्षणिक, आर्थिक विकासासाठी आरक्षणाची मागणी करत असून, त्यांना त्वरित आरक्षण देण्यात यावे, यासह अन्य घोषणाबाजी करत आंदोलनकर्त्यांनी संपूर्ण परिसर दणाणून सोडला होता. मुस्लीम समाजाच्या उन्नतीसाठी असलेल्या सच्चर आयोगाच्या अहवालाची अंमलबजावणी करावी. अॅट्रॉसिटी कायद्याने दलित-आदिवासी व भटके विमुक्तांना कवच दिलेले आहे. वर्षांनुवर्षे या समाजावर अन्याय, अत्याचार वाढले असल्याने अॅट्रॉसिटी कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी, आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या. मराठा, धनगर समाजासह मुस्लीम समाजाला लवकरात आरक्षण देण्यात यावे, अॅट्रॉसिटी कायद्याची कडक अंमलबजावणी करण्यात यावी. या मागण्या मान्य झाल्या नाही तर आगामी काळात आंदोलन तीव्र करण्यात येईल, असा इशारा यावेळी भीमशक्ती संघटनेच्या वतीने देण्यात आला. आंदोलनाला प्रदेश उपाध्यक्ष दिनकर ओंकार, डी. एस. पगारे, बाबूराव वाकेकर, शब्बूभाई लखपती, दादाराव राऊत, निशिकांत गायकवाड, राजू मंजुळे, संतोष भिंगारे, तय्यब पटेल, भाऊसाहेब नवगिरे, कैलास जुमडे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चित्रपटातून भेटले दिलखुलास भालचंद्र नेमाडे

0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
जगाकडे पाहण्याची समतोल दृष्टी, विसंगती टिपणारी मिश्किल शैली अन् चिंतनातून प्रकटलेले प्रगल्भ लेखन. 'ज्ञानपीठ' पुरस्काप्राप्त ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांच्या प्रगल्भ लेखनाने पाच दशकं मराठी वाचकांची सोबत केली. हा विलक्षण कुतूहलपूर्ण प्रवास 'उदाहरणार्थ नेमाडे' चित्रपटात आहे. मराठीतील पहिला डॉक्युफिक्शन असलेला चित्रपट प्रेक्षकांना चिरंतन मूल्याची शिदोरी देऊन गेला.
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान विभागीय केंद्र, औरंगाबाद आणि महात्मा गांधी मिशन जनसंवाद महाविद्यालय यांच्या 'चित्रपट चावडी' उपक्रमात 'उदाहरणार्थ नेमाडे' चित्रपट दाखवण्यात आला. रुक्मिणी सभागृहात शनिवारी सायंकाळी हा उपक्रम झाला. 'कोसला' कादंबरीतील पांडुरंग सांगवीकर या नायकाचे गारूड ५० वर्षानंतरही कायम आहे. खेड्यातून शहरात शिक्षणासाठी आलेल्या आणि रोजगारासाठी स्थायिक झालेल्या तरुणांना पांडुरंग जवळचा वाटतो. 'हूल', 'झूल', 'बिढार', 'जरीला' या कादंबऱ्यातील चांगदेव आणि 'हिंदू'तील खंडेराव या नायकांनी वाचकांचा ताबा घेतला. कादंबरी नायकांना चिरंतन मूल्य देणारे भालचंद्र नेमाडे वाचकप्रिय लेखक आहेत. लेखन प्रासंगिकता आणि संवादातील परखडपणा कुतूहलाचा विषय आहे. नेमाडे यांचे साहित्य आणि व्यक्तिमत्वाचा वेध घेणारा 'उदाहरणार्थ नेमाडे' चित्रपट अक्षय इंडिकर यांनी दिग्दर्शित केला आहे. दीड तासांच्या चित्रपटात डॉक्युफिक्शन शैलीचा उत्तम वापर आहे. स्वतःच्या भूतकाळाबाबत बोलणारे नेमाडे आणि वास्तवात जगणारे नेमाडे अशा दोन टोकांवर चित्रपटात भाष्य आहे. जळगाव जिल्ह्यातील डोंगर सांगवी गावचे नेमाडे जागतिकीकरण आणि कृषी संस्कृतीवर नेमके बोलतात. सामाजिक विसंगतीवर टिपण्णी करतात. हा खुमासदार टप्पा इंडिकर यांनी समर्थपणे मांडला आहे. माहितीपटात गाणी-कविता यांचा सुरेख वापर असल्याने नेमाडे प्रेक्षकांपर्यंत सहज पोहचले आहेत. प्रेक्षकांनीही चित्रपटाला भरभरून प्रतिसाद दिला.
दरम्यान, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या वतीने चित्रपटाच्या टीमचे सदस्य दिग्दर्शक अक्षय इंडिकर, प्राची गुर्जर, निर्माता अरविंद पाखले, अभिनेता संजय मोरे, स्वप्नील शेटे, अमोल ठाकूर, तेजश्री कांबळे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ज्येष्ठ साहित्यिक रा. रं. बोराडे, 'एमजीएम'चे विश्वस्त सचिव अंकुशराव कदम, साहित्यिक रंगनाथ तिवारी, कवी वीरा राठोड, दासू वैद्य उपस्थित होते. या उपक्रमासाठी प्रतिष्ठानचे नीलेश राऊत, सुबोध जाधव, गणेश घुले, मंगेश निरंतर, श्रीकांत देशपांडे, उमेश राऊत यांनी परिश्रम घेतले.

आव्हान मांडणीचे
एका चित्रपटाच्या चर्चेसाठी अक्षय इंडिकर नेमाडे यांना भेटले. या चर्चेवेळी नेमाडे यांच्यावरच चित्रपट बनवावा असे इंडिकर यांना वाटले. 'दोन-अडीच वर्षे चित्रपटाचा प्रवास आहे. सिनेमा माध्यमातून नेमाडे यांना केलेला हा सलाम आहे. साहित्याकडे, जगाकडे, स्वतःकडे नेमाडे कसे बघतात हे टिपण्याचा प्रयत्न केला,' असे इंडिकर
यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भेदभाव संपुष्टात आणा

0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
जाती-पोटजातीतील भेदाभेद संपुष्टात आणण्याची गरज आहे. लेवा पाटीदार समाजाने भेदभाव सोडून सर्वांनी एकत्रित येत काम करावे, असे आवाहन माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी शनिवारी केले. लेवा पाटीदार भ्रातृ मंडळातर्फे मयूरबन कॉलनीत उभारलेल्या विवाह व कौटुंबिक वाद समुपदेशन केंद्राचे उदघाटन खडसे यांच्या झाले. यावेळी ते बोलत होते.
मुसळधार पावसाचा धागा पकडत खडसे म्हणाले, उत्तर नक्षत्राचा हा पाऊस समाजासाठी हा आवश्यक आहे. लेवा पाटीदार समाजाने जाती-पोटजातीचा भेदभाव संपुष्टात आणला पाहिजे. सुशिक्षित समाज वाढला असला, तरी तेवढेच वादविवादही निर्माण होत आहेत. त्याचे प्रमाण वाढते आहे. समुपदेशन केंद्रात आपापासातील प्रश्न सुटले पाहिजेत. यावेळी लेवा पाटीदार भ्रातृ मंडळाचे अध्यक्ष प्रवीणकुमार चौधरी यांनी प्रास्ताविक केले. सरला राणे यांनी सूत्रसंचालन केले. सचिव अविनाश फिरके यांनी आभार मानले. कार्यक्रमास लेवा पाटीदार भोरपंचायतचे कुटुंब नायक रमेश पाटील, माजी खासदार डॉ. गुणवंत सरोदे, माजी खासदार डॉ. उल्हास पाटील, आमदार हरिभाऊ जावळे, श्यामला सरोदे, बसवराज मंगरुळे, अॅड. चैताली चौधरी-कुट्टी, एस. पी. भंगाळे, नीळकंठ चौधरी, जनार्दन पाटील, योगेश झांबरे, प्रवीण जंगले, प्रमोद राणे आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सामाजिक स्वास्थ्याची सर्वांनी काळजी घ्यावी

0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
अलीकडच्या काळात सामाजिक चळवळी वाढल्या आहेत. मराठा समाजाच्या विरोधात दलित समाजानेही मोर्चा काढला. या मोर्चा-प्रतिमोर्चामुळे सामाजिक स्वास्थ बिघडणार नाही, याची काळजी सर्वच समाजाने घ्यायला हवी, असे आवाहन माजी महसूल मंत्री व भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी केले.
लेवा पाटीदार भ्रातृ मंडळाच्या कार्यक्रमाप्रसंगी शनिवारी खडसे शहरात आले होते. 'मटा'शी संवाद साधताना खडसे म्हणाले, सामाजिक चळवळींच्या माध्यमातून जे प्रश्न समोर येतात, ते सोडवण्याची जबाबदारी सरकारची आहे. ते प्रश्न टाळून, नाकारून जमणार नाही. दोघांच्या विचारातून मार्ग निघायला हवा. चर्चा करण्याची तयारी मुख्यमंत्र्यांनी दाखवली आहे. मोर्चे, प्रतिमोर्चे यामुळे सामाजिक स्वास्थ बिघडू नये, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केले. लेवा पाटील समाजातही अशा स्वरुपाच्या चर्चा होत आहेत. समाजातील भेदाभेद टाळून सर्वांनी एकोप्याने राहिले पाहिजे अशी भूमिका मांडली जात आहे. सर्वच समाजांनी सर्वांशी एकोप्याने राहण्याची आवश्यकता खडसे यांनी व्यक्त केली.

मंत्रिमंडळ समावेश; पक्ष निर्णय घेईल
मंत्रिमंडळात कधी परतणार या प्रश्नाला उत्तर देताना याविषयी पक्षच निर्णय घेईल, असे एकनाथ खडसे यांनी स्पष्ट केले. काळानुसार बदल होत आहेत. त्यात लेवा पाटील समाजही बदलत आहे. हुंडा पद्धत आता कालबाह्य झाली आहे. मुलींची संख्या घटत चालली आहे. त्यामुळे बेटी बचावला प्रतिसाद मिळत आहे. सेवा कार्य वाढण्याची गरज खडसे यांनी व्यक्त केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्वातंत्र्यसैनिकांच्या पेन्शनवर निर्णय घ्या

0
0


म. टा. विशेष प्रतिनिधी ,औरंगाबाद
स्वातंत्र्यसैनिक पेन्शन नामंजूर करण्याचे आदेश रद्द करून पुन्हा चार महिन्यात पुनर्विचार करण्याचे निर्देश मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. संजय गंगापूरवाला व न्या. के. एल. वडणे यांनी दिले.
पिंपळगाव वळण (ता. फुलंब्री) येथील त्रिबंक लहानू शिरसाठ यांनी हैदराबाद मुक्ती संग्रामात सक्रीय सहभाग घेतला होता. तसेच त्यांनी टाकळी कोलते (पारध) कॅम्पमध्ये सहभागी होऊन भूमिगत स्वातंत्र्य सैनिक म्हणून कार्य केले होते. त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज केला, व त्यासोबत दोन वर्ष तुरुंगवासाची शिक्षा भोगलेल्या दोन स्वातंत्र्य सैनिकांचे शपथपत्र दाखल केले होते. जिल्हा गौरव समितीने त्यांच्या नावाची शिफारस केली होती. मात्र, २३ नोव्हेंबर २०११ रोजी स्वातंत्र्य सैनिक उच्चाधिकार समिती (मुंबई) यांनी याचिकाकर्त्याने विहित निकषाची पूर्तता न केल्याने स्वातंत्र्य सैनिक सन्मान पेन्शन अमान्य करण्याचे आदेश दिले. या विरोधात याचिका दाखल करण्यात आली. या प्रकरणातील पुराव्यांची पडताळणी झाल्यानंतर शासनाने पेन्शन देण्याचे अमान्य केलेले आदेश रद्द केले. चार महिन्यात पुन्हा निर्णय घेण्याचे आदेश दिले. याचिकाकर्त्यातर्फे मनोज शेळके, स्वाती शेळके यांनी तर शासनातर्फे बी. व्ही. विर्धे, समितीतर्फे भूषण कुलकर्णी यांनी काम पाहिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मराठवाडा विकास अजेंड्यावरः सीएम

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मंत्रिमंडळ बैठकीपूर्वी मराठवाड्याच्या विकासाबाबत चर्चा करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठवाडा जनता विकास परिषदेच्या पदाधिकाऱ्यांना दिले. परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी आज त्यांची भेट घेत मंत्रिमंडळ बैठक घेण्याची तसेच येथील प्रश्नांवर चर्चेसाठी वेळ देण्याची मागणी केली. हैदराबाद मुक्तिसंग्राम दिनाच्या कार्यक्रमानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज सकाळी साडेनऊच्या सुमारास सुभेदारी विश्रामगृहात आले असता मराठवाडा जनता विकास परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांची भेट घेतली. मराठवाड्यात होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीला मागील ९ वर्षापासून खंड पडलेला असल्याने विभागातील अनेक प्रश्न प्रलंबित राहत आहेत. त्यामुळे मराठवाड्यात मंत्रिमंडळाची बैठक घेण्यात यावी आणि बैठकीपूर्वी मराठवाड्यातील विविध प्रश्नांवर चर्चेसाठी मराठवाडा जनता विकास परिषदेच्या पदाधिकाऱ्यांना वेळ द्यावा, अशा मागणीचे निवेदन देण्यात आले.

मुख्यमंत्र्यांनी दोन्ही मागण्या मान्य करत, ऑक्टोबरच्या शेवटच्या किंवा नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात बैठक घेण्याचे मान्य केले. त्यापूर्वी विविध प्रश्नांवर चर्चा करण्याचेही आश्वासन दिले. शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीची आचारसंहिता लक्षात घेत मंत्रिमंडळ बैठकीचे वेळापत्रक ठरविण्यात येईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. जनता विकास परिषदेच्या पदाधिकाऱ्यांशी सुमारे वीस मिनिटे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चर्चा केली. यावेळी प्रदीप देशमुख, व्यंकटेश काब्दे, गोपीनाथ वाघ, ताराबाई लड्डा, प्रा. शरद अदवंत, द. मा. रेड्डी, शिवाजीराव नरहरे, हेमराज जैन, सारंग टाकळकर यांची उपस्थिती होती.

सरकारने डाळ खरेदी करावी

मूग, उडीद डाळीचे भाव घसरल्याने मराठवाड्यातील शेतकरी अडचणीत सापडला आहे. मागील तीन वर्षांपासूनचा दुष्काळ, डाळीला हमी मिळत नाही. त्यामुळे शासनाने शेतकऱ्यांच्या डाळीला हमी भाव द्यावा, शासनानेच ही डाळ खरेदी करावी अशी मागणीही जनता विकास परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मराठा समाजमोर्चे सरकारविरोधातच!

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'मराठा मोर्चे हा समाजनेत्यांविरुद्धचा आक्रोश आहे', या मुख्यमंत्र्यांच्या विधानाला शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रत्युत्तर दिले. 'कर्जमाफी, मराठा आरक्षण अशा मागण्यांसाठी मराठा तरुण स्वयंप्रेरणेने रस्त्यावर उतरला आहे. हे मोर्चे सरकारविरोधातील असंतोषाचे प्रतीक आहे', असा टोला पवार यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारीच मराठा मोर्चांवरून समाजातील नेत्यांना व विशेषत: नामोल्लेख न करता शरद पवार यांनाच लक्ष्य केले होते. त्यानंतर शनिवारी लगेचच पवार यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत फडणवीस यांच्यावर शरसंधान साधले. 'राज्यकर्ते शेतीबद्दल असंवेदनशील असल्यानेच अनेक समस्या उद्भवल्या आहेत. इतर राज्यांत मराठा समाजाला आरक्षण आहे, तर महाराष्ट्रात का नाही. केंद्राच्या आदेशाप्रमाणे राज्य सरकारने मराठा आरक्षणाचा त्वरित निर्णय घ्यावा', अशी मागणीही पवार यांनी केली. 'मराठा मोर्चा, अॅट्रॉसिटी कायदा दुरुस्ती, कोपर्डीतील आरोपींना शिक्षा व्हावी, या सर्वांबाबत राज्यकर्त्यांमध्ये एकमत असले तरी याबाबत कृती दिसायला हवी. राज्यकर्त्यांनी सहमत आहे, असे म्हणून चालत नाही.'

पद घालवण्यासाठी त्यांचा पक्ष आहे...

मुख्यमंत्रिपदावरून हटवण्याचे प्रयत्न होत आहेत', या फडणवीस यांच्या वक्तव्याचाही पवार यांनी समाचार घेतला. 'फडणवीस यांचे मुख्यमंत्रिपद जावे, अशी कुणाची इच्छा असल्याचे मी तरी ऐकलेले नाही. त्यांना पदावरून घालवायचा मोर्चे हा मार्ग नाही. त्यासाठी त्यांचा पक्ष आहे', असा चिमटाही पवार यांनी काढला.

'माझ्या हाती सत्ता नाही'

'मी काय आता राज्यकर्ता नाही. माझ्या हाती काही सत्ता नाही. जे राज्यकर्ते आहेत त्यांनी याप्रकरणी ठोस भूमिका घेऊन तत्काळ कृती करणे गरजेचे आहे', असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी कोपर्डी बलात्कार व मराठा आरक्षण मुद्द्यावर केले.

'कोपर्डी बलात्काराची घटना ही सामाजिकच नव्हे, तर राजकीय दृष्टिकोनातूनही बरीच मंथन करणारी ठरली. त्याचे कारण म्हणजे लाखोंच्या संख्येने निघणारे मराठा समाजाचे मूकमोर्चे. जो समाज संख्याबळात आणि सत्ताकारणात आघाडीवर आहे, तोच समाज कोणत्याही नेतृत्वाविना रस्त्यावर येतो आणि सामाजिक सुरक्षेबरोबरच शेती, आरक्षण, शिक्षणाच्या समस्या मांडतो. याबाबत आता अनेक प्रश्न समोर येऊ लागले आहेत', असे पवार म्हणाले.

आठवले यांना कानपिचक्या

'केंद्रीय मंत्र्याने जबाबदारीने वक्तव्य करायला हवे. गंभीर समस्येवर विनोद किंवा काव्य करून मार्ग निघत नाही', अशा शब्दांत पवार यांनी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांना कानपिचक्या दिल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खिडकीतून उडी मारून रुग्णाची आत्महत्या

0
0

औरंगाबाद : वेदना सहन होत नसल्याने जळालेल्या रुग्णाने घाटी हॉस्पिटलच्या दुसऱ्या मजल्यावरील खिडकीतून उडी मारून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. गौतम दशरथ शिवराळे (वय ५०) असे मृत रुग्णाचे नाव आहे, अशी माहिती बेगमपुरा पोलिसांनी दिली.

खुलताबाद तालुक्यातील पळसवाडी येथील शिवराळे यांना ५ सप्टेंबर रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास जळालेल्या अवस्थेत घाटीतील २२-२३ वॉर्डात दाखल करण्यात आले होते. १३ सप्टेंबर रोजी रात्री त्यांनी वॉर्डातील सर्वजण झोपलेले असताना खिडकीतून खाली मारली होती. यात ते गंभीर जखमी झाले होते. ही घटना घाटी प्रशासनाने दडवून ठेवली. या घटनेची साधी एमएलसी सुद्धा करण्यात आली नाही. शुक्रवारी रात्री शिवराळे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यानंतर या घटनेची पोलिस चौकीत नोंद करण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्वातंत्र्य सैनिक नारायण घोडेंची फरफट

0
0

औरंगाबाद : भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या भोकरदन तालुक्यातील नारायण घोडे या स्वातंत्र्य सैनिकाची पेन्शन मिळवण्यासाठी फरफट सुरू आहे. पालकमंत्री रामदास कदम यांची भेट घेऊन त्यांना आपली व्यथा सांगण्यासाठी ते शनिवारी औरंगाबादेत आले होते, पण त्यांना कदमांच्या भेटीसाठी सुमारे चार तास तिष्टत बसावे लागले.

भोकरदन तालुक्यातील घोसेगावचे नारायण घोडे रहिवासी आहेत. संपतराव नाईक टाकळीकर व लाला लक्ष्मीनारायण जैस्वाल यांच्या बरोबर आपण हैदराबाद मुक्ती संग्रामाच्या लढ्यात सहभागी झालो होतो, असे त्यांनी सांगितले. पिंपळगाव कोलते या गावी रझाकारांच्या विरोधात लढण्यासाठी त्याकाळी नाईक आणि जैस्वाल यांच्या नेतृत्वाखाली आम्ही एकत्र आलो होतो. रझाकाराच्या सैन्याकडे मोठा दारूगोळा होता. ही बाब लक्षात घेऊन जैस्वाल यांनी फटाक्याची आतषबाजी केली. रझाकाराच्या सैन्याला दुसऱ्या बाजूने फायरिंग होत आहे असे वाटले आणि त्या सैन्याने फायरिंग सुरू केली. त्यांचा दारूगोळ्याचा साठा फायरिंगमध्ये संपला. त्यानंतर आमच्या बाजूने फायरिंग सुरू झाली. फायरिंगमध्ये रझाकारांचे ७५ तर आमचे पाच सैनिक कामी आले, असे घोडे यांनी सांगितले. हैदराबाद मुक्ती संग्रामात प्रत्यक्ष युद्धभूमीवर काम केल्यावरही घोडे यांना शासनाकडून स्वातंत्र्य सैनिकांसाठीची पेन्शन मंजूर झाली नाही.

आता नाही तर पुन्हा भेटू

पेन्शन मंजुरीच्या मागणीसाठी घोडे अर्ज घेऊन कदम यांना भेटण्यासाठी आले होते. अधिकारी, पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत गुंतलेल्या कदम यांच्या भेटीची संधी घोडे यांना सुमारे चार तास मिळाली नाही. आता नाही तर पुन्हा मंत्र्यांची भेट घेऊ असे घोडे म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाजप नेत्यांकडून खडसे बेदखल

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

राजकारणातील छोट्यातली छोटी किंवा मोठ्यातली मोठी व्यक्ती फक्त उगवत्या सूर्यालाच नमस्कार करते, हे शनिवारी पुन्हा एकदा स्पष्ट झाले. मंत्रिपद आणि लाल दिव्याची गाडी असलेल्या नेत्याच्या पुढेमागे कार्यकर्त्यांचा लवाजमा असतो. एकदा का हे पद आणि गाडी गेली की कुणीही त्या नेत्याचा नसतो. याची प्रचिती भाजपचे नेते एकनाथ खडसे यांना आज आली. ते दोन तास सुभेदारी विश्रामगृहात बसून होते, पण त्यांच्या स्वागतासाठी किंवा विचारपूस करण्यासाठी भाजपचा कोणीही स्थानिक नेता, पदाधिकारी, कार्यकर्ता फिरकला नाही.

लेवा पाटीदार समाजाच्या कार्यक्रमाच्या निमित्याने खडसे यांचे औरंगाबादेत आगमन झाले. सुमारे साडेदहाच्या सुमारास ते सुभेदारी विश्रामगृहात आले. लेवा पाटीदार समाजाचा त्यांचा कार्यक्रम पूर्वनियोजित होता. त्यामुळे त्यांच्या नावे सुभेदारी विश्रामगृहात एखादा सुट आरक्षित असणे अपेक्षित होते, पण त्यांच्या नावाने सूट आरक्षित करण्यात आला नव्हता. विश्रामगृहात आल्यावर कुठे थांबावे असा प्रश्न त्यांच्या समोर निर्माण झाला. त्यांची अशी अवस्था पाहून जिल्हाप्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी पालकमंत्री रामदास कदम यांच्यासाठी राखीव असलेला सूट खडसेंना उघडून दिला. खडसे सूटमध्ये गेले आणि एका व्हीआयपी खुर्चीवर बसले, पण त्यांच्याशी चर्चा करायला त्यावेळी तेथे कुणीच नव्हते. सूटबाहेर असलेल्या हॉलमध्ये नागरिक व कार्यकर्त्यांची गर्दी खूप होती, पण हे सर्वजण पालकमंत्र्यांसाठी आले होते. खडसेंची दखल त्यांनी घेतली नाही. खडसेंच्या स्वागतासाठी व त्यांना कंपनी देण्यासाठी भाजपचाही नेता, कार्यकर्ता, पदाधिकारी सुभेदारी विश्रामगृहात आला नाही. सर्वजण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मागे होते.

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली भेट

एकाकी खडसेंना त्यांच्या सुरक्षारक्षकांनी साथ दिली. ते त्यांच्या खुर्ची शेजारी येऊन उभे राहिले. तेवढ्यात जिल्हाधिकारी डॉ. निधी पांडेय तेथे आल्या. त्यांनी खडसे यांच्याशी थोडावेळ चर्चा केली, चहा मागवला. त्यानंतर त्याही उठून गेल्या. सुमारे एक तासाने लेवा पाटीदार समाजाच्या कार्यक्रमाचे संयोजक आले व खडसेंना घेऊन निघून गेले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images