Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

१५० शिक्षकांना चट्टोपाध्याय वेतनश्रेणी

$
0
0
शासन निर्णयानुसार बारा वर्षांची सेवा पूर्ण केलेल्या व चट्टोपाध्याय वेतनश्रेणीच्या लाभापासून वंचित असलेल्या उस्मानाबाद जिल्ह्यातील १७८ पैकी १५० शिक्षकांना जिल्हा परिषदेने चट्टोपाध्याय वेतनश्रेणी लागू केली.

महिलांसाठी बस सुरू करा

$
0
0
एसटी महामंडळाने महिलांसाठी विशेष बससेवा प्रायोगिक तत्वावर सुरू करावी. ती बससेवा शहरी व ग्रामीण भागात असली तरी चालेल परंतू त्याची तपासणी करून लवकरच महिला खास बस सुरू करावी.

चोरट्यांच्या मारहाणीत तिघेजण जखमी

$
0
0
तालुक्यातील नादी शिवारातील शेतवस्तीवर तीन अज्ञात चोरट्यांनी शनिवारी रात्री एकाच कुटुंबातील दोन महिलांसह तिघांना मारहाण करीत सोन्याचे दागिने, रोख रक्कम व मोबाइल असा एकूण ८६ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला.

गणेशोत्सवात महिलांना विशेष संरक्षण

$
0
0
गणेशोत्सवात महिलांची छेड व समाजविघातक कृत्ये करुन शांतता बिघडवणाऱ्यांची गय केली जाणार नाही. कायदेशीर कारवाई करुन त्यांची रवानगी कारागृहात करण्यात येईल असा इशारा पोलिस अधीक्षक (औरंगाबाद ग्रामीण) इशू सिंधु यांनी वैजापूर येथे आयोजित शांतता समितीच्या बैठकीत दिला.

विकासासाठी१८३ कोटीच्या आराखड्यास मान्यता

$
0
0
नांदेड जिल्ह्याच्या विकासाचा पुढील वर्षीचा २०१४-२०१५ चा जिल्हा वार्षिक योजनेचा प्रारुप आराखडा तयार करण्यात आला आहे. जिल्ह्यातील सर्वक्षेत्रातील विकासासाठीच्या १८३ कोटी ७७ लाख रुपयांच्या आराखडयास मान्यता देण्यात आली.

वादळी पावसाने उसाचे झाले नुकसान

$
0
0
शिवसेनेच्या जिल्हा परिषद सदस्या अनिता राजेंद्र राठोड यांच्या शेतातील ऊस वादळी पावसात आडवा झाला आहे. अनिता राठोड व त्यांचे पती राजेंद्र राठोड यांनी उन्हाळ्यात टँकरने पाणी आणून ऊस जगवला.

कुपोषित बालकांच्या संख्येत वाढ

$
0
0
सिल्लोड तालुक्यातील कुपोषित मुलांची संख्या गेल्या महिन्याच्या तुलनेत वाढून ७२७ झाली आहे. गेल्या महिन्यात तालुक्यात तीव्र श्रेणीची ४२६ बालके होती.

सरणावरील मृतदेह पोस्टमार्टमसाठी हलविले

$
0
0
स्मशानभूमीमध्ये सरण रचलेले, तरुणचा मृतदेह दहनासाठी त्यावर ठेवण्यात आला आणि अचानक सिडको पोलिस तेथे अवतरले. सदरील तरुणाचा मृत्यू अनैसर्गिक असल्याची तक्रार त्यांच्याकडे प्राप्त झाली होती.

समन्यायी पाण्यासाठी उद्या मोर्चा

$
0
0
जायकवाडी पाणी संघर्ष कृती समितीतर्फे मंगळवारी समन्यायी पाणी वाटपाच्या मागणीसाठी मोर्चा निघणार आहे. क्रांती चौकातून सकाळी दहा वाजता मोर्चाला सुरूवात होऊन विभागीय आयुक्तालयावर पोहोचेल.

मुख्यमंत्री दौऱ्याभोवती आंदोलनांची धग

$
0
0
मराठवाडा ही संतांची भूमी. मुख्यमंत्र्यांचा दोन दिवसांचा दौरा मराठवाड्याची राजधानी असलेल्या औरंगाबादेत होत आहे. कधी नव्हे ते मुख्यमंत्र्यांविरुद्धचा राग या दौऱ्यादरम्यान निषेध फलक, मोर्चा, उपोषण करून व्यक्त केला जात आहे.

आठवड्यातील पावसाने जागल्या आशा

$
0
0
पावसाने ऑगस्टमध्ये मोठी विश्रांती घेतल्याने निर्माण झालेली चिंता गेल्या आठवडाभरातील पावसामुळे काहीशी दूर झाली आहे. गेल्या आठ दिवसांत विभागात ५० मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद आहे.

भावासाठी भाजपची शेतकरी दिंडी

$
0
0
सोयाबीनला नऊ वर्षापूर्वीचा हमी भाव आणि कापसालाही अत्यल्प भाव दिल्यास शेतकरी कसा जिवंत राहील असा सवाल करीत योग्य भाव मिळावा या मागणीसह इतर मागण्यासाठी शेतकऱ्यांची लोदगा ते औरंगाबाद पायी दिंडी काढण्यात येणार असल्याची माहिती दिंडीचे नेते भाजपच्या किसान आघाडीचे राष्ट्रीय उपाध्यक्ष माजी आमदार पाशा पटेल यांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिली.

सामान्य जनता कांद्याला महाग

$
0
0
कांद्याच्या दरात प्रतिकिलो ६० ते ६५ रूपये झाल्याने सर्व सामान्याच्या जेवणातून कांदा गायब झाला आहे. परिणामी हॉटेल व भोजनालय आणि खाणवळीतून कांदा सर्व्हिस बंद झाली आहे.

जायकवाडीत पाणी सोडण्यासाठी लढा

$
0
0
जायकवाडी धरणात समन्यायी तत्वाने पाणी सोडण्यासाठी मराठवाड्यातील आमदारांना एकत्र करून लढा उभारला असून, मराठवाडा सुजलाम्‌ सुफलाम् करण्यासाठी जायकवाडीच्या धरणात पाणी सोडण्यात यावे, या मागणीसाठी आपण आग्रही असल्याचे गंगापूर-खुलताबादचे आमदार प्रशांत बंब यांनी सांगितले.

ध्वजवंदनाआधी धरणात पाणी सोडा

$
0
0
मराठवाड्यासाठी महत्वाचे असलेल्या जायकवाडी धरणात पाणी सोडण्यास नगर आणि नाशिक जिल्ह्यातून विरोध केला आहे. चांगला पाऊस पडूनही वरच्या धरणातून पाणी अडविले गेले आहे.

श्रेयासाठी पावसावरही ‘शिरजोरी’

$
0
0
उर्ध्व गोदावरी खोऱ्यातील धरणांतून तब्बल सुमारे १८ अब्ज घनफूट (टीएमसी) पाणी वळविल्यानंतर मराठवाड्यात राजकीय पक्षांच्या आंदोलनांना सुरुवात झाली आहे.

संस्थाचालकांचा आता ‘घंटानाद’

$
0
0
शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची रखडलेली भरती प्रक्रिया, शिक्षकांचे अॅप्रूव्हल, असे विविध प्रश्न सोडवू, असे दिलेले आश्वासन सरकारने पाळले नसल्याचे सांगत राज्यातील खाजगी शिक्षण संस्था पुन्हा आंदोलनाची भाषा बोलू लागल्या आहेत.

अनेक शाळांकडून नियमबाह्य कामे

$
0
0
सर्व शिक्षा अभियानातून प्राथमिक शिक्षणाच्या संवर्धनासाठी अपेक्षित उद्दिष्ट कुठेही साध्य होताना दिसत नाही. विविध उपक्रमांसाठी केंद्राकडून आलेला निधी योग्य प्रकारे खर्च होत नसल्याने जिल्हा परिषद शाळांमधील मुलभूत सुविधांची कमतरता आणखी समोर आली आहे.

बिनशेती परवाना पद्धती कालबाह्य

$
0
0
बांधकामांसाठी बिनशेती परवानगी पद्धती आता कालबाह्य झाली आहे. मध्य प्रदेशात ही संकल्पना रद्द करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे राज्यातही संकल्पना रद्द करण्याची शिफारस बेकायदा बांधकामांसंदर्भातील समितीने केली आहे.

वीजपुरवठ्याचे ‘तीन तेरा’

$
0
0
‘जीटीएल’च्या दर्जेदार वीजपुरवठ्याच्या दाव्याचे गणेशोत्सवात पाऊस सुरू होताच पितळ उघडे पडले आहे. या पावसाळ्यापूर्वी झाडांच्या फांद्यांची कापणी व इतर महत्त्वाची कामे न झाल्याने ऐन गणेशोत्सवात नागरिकांना वीज पुरवठा खंडित होत असल्याचा अनुभव वारंवार घ्यावा लागत आहे.
Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images