Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

भडक्याने श्वसनविकारांचे गंभीर फटके

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
जिल्हा परिषद मैदानावरील फटाक्यांच्या बाजाराला आग लागून अवघ्या ४० मिनिटांमध्ये फटाक्यांच्या दुकानांची शनिवारी (२९ ऑक्टोबर) राखरांगोळी झाली. याचे गंभीर परिणाम घटनास्थळाच्या दोन ते तीन किलोमिटपर्यंतच्या रहिवाशांवर होणार आहे. यामुळे एकूणच श्वसनविकार व दमा असणाऱ्यांचा त्रास वाढण्याची मोठी शक्यता असून, ‘रिअॅक्टिव्ह एअरवे डिस्फक्शन सिन्ड्रोम’चा (रॅडस्) त्रास सर्व वयातील व्यक्तींना आणि त्यातही लहान मुले व वृद्धांना होण्याची शक्यता असून, काळजी व वेळीच उपचार घेण्याचे आवाहन वैद्यकतज्ज्ञांनी केले आहे.
फटाका मार्केटला शहरातील सर्वांत मोठी आग लागून फार मोठे नुकसान झाले. याचे व्यापक परिणाम दिसून येत आहेत. यासंदर्भात श्वसनविकारतज्ज्ञ डॉ. व्यंकटेश देशपांडे म्हणाले, ‘अशा प्रकारच्या घातक वायुच्या भडक्यामुळे ‘रिअॅक्टिव्ह एअरवे डिस्फक्शन सिन्ड्रोम’चा (रॅडस्) त्रास सर्व वयातील व्यक्तींवर होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. त्यातही घटनास्थळाच्या दोन ते तीन किलोमीटरपर्यंतच्या व्यक्तींना याचा सर्वाधिक त्रास होण्याची शक्यता आहे. परिणामी, घशात खवखव होणे, श्वसनमार्गाला सूज येणे, छाती भरून येणे, दम लागणे, गुदमरल्यासारखे वाटणे, कोरडा खोकला होणे, दम्याचा त्रास होणे किंवा असलेला दम्याचा त्रास वाढणे असे त्रास होऊ शकतात. असे वेगवेगळे त्रास होणाऱ्यांपैकी अनेकांना उपचारांची आवश्यकता भासू शकते.’
मुळात वातावरण बदलामुळे शहरात काही दिवसांपासून ‘ब्राँकायटिस’ वाढला आहे. त्यातच फटाक्यांच्या तीव्र घातक धुरामुळे एकूणच श्वसनविकार निश्चितच बळावणार आहेत आणि यातील काहींना रुग्णालयातदेखील दाखल करावे लागू शकते. त्यामुळे योग्य काळजी घ्या, त्रास होत असेल तर उपचार घ्या, असे आवाहनही डॉ. देशपांडे यांनी केले आहे.
कान-नाक-घसातज्ज्ञ डॉ. अतुल पोरे यांच्यानुसार, साध्या सर्दीपासून वेगवेगळ्या जंसुसंसर्गांचा त्रास होणे, रॅश येणे, तात्पुरत्या स्वरुपात बहिरेपणा येणे, असे विविध त्रास संभवतात. दम्याच्या रुग्णांनी स्वतःला जपणे खूप आवश्यक आहे. वेळच्या वेळी औषधे घेणे गरजेचे असून, गरजेनुसार डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

अॅलर्जीमुळे होऊ शकतात नेत्रविकार
घातक वायुमुळे दोन किलोमीटरच्या परिघात राहणाऱ्या रहिवाशांना अॅलर्जीमुळे डोळे येणे, डोळ्यांना जळजळ होणे, डोळ्यांची आग होणे, खाज सुटणे असे वेगवेगळे त्रास होऊ शकतात. डोळ्यांच्या त्रासासाठी वारंवार थंड पाण्याने डोळे धुणे, गरजेनुसार नेत्रतज्ज्ञांचा सल्ला घेणे गरजेचे आहे, असे नेत्रतज्ज्ञ डॉ. अमित वांगीकर यांनी ‘मटा’ला सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


फटाका दुर्घटना; केंद्राच्या टीमकडून पाहणी

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

औरंगपुरा येथील जिल्हा परिषद मैदानावर दिवाळीनिमित्त भरविण्यात आलेल्या फटाका मार्केटला शनिवारी आग लागून कोट्यवधींचे नुकसान झाले. या दुर्दैवी घटनेच्या चौकशीसाठी केंद्राच्या एक्सप्लोझिव्ह टीमचे अधिकारी औरंगाबादेत दाखल झाले.

जिल्हा परिषद मैदानावरील १४० फटाका स्टॉल शनिवारी सकाळी आगीत भस्मसात झाले. दुपारी चारच्या सुमारास मुंबईहून एक्सप्लोझिव्ह टीमचे अधिकारी अभिराम बसाक यांनी मैदानाची पाहणी केली. स्थानिक पोलिस अधिकारी त्यांच्यासमवेत होते. बसाक यांनी मैदानाचा नकाशा, स्टॉल्स कोणत्या पद्धतीने लावण्यात आले होते याची पाहणी केली. ‘अशा घटना घडू नयेत, यावर आमचा भर असतो. या घटनेतून बोध घेऊन भविष्यात सुधारणा करण्याच्या दृष्टीने आमचा विभाग कार्यवाही करत असतो. या अपघाताची माहिती संकलित करून सादर करण्यात येईल,’ असे त्यांनी सांगितले.

जिल्हा परिषद मैदानावर बघ्यांची गर्दी

जिल्हा परिषद मैदानावर आगीत जळून खाक झालेले मैदान पाहण्यासाठी रविवारी दिवसभर बघ्यांची गर्दी झाली होती. स्वातंत्र्यसैनिक कॉलनी, सभु महाविद्यालय; तसेच शिवाई ट्र्स्टच्या बाजूने असलेल्या प्रवेशद्वारासमोर सकाळीच कोंडी झाली. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला. तिन्ही रस्ते नागरिकांसाठी बंद केले गेले. मैदानावर दिवसभर अग्निशमन दलाचा बंब उभा करण्यात आला होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पानझडेंना पालिकेची शिस्तभंगाची नोटीस

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
औरंगाबाद शहरातील २४ कोटींच्या रस्ते प्रकरणात महापालिका आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांनी शहर अभियंता सखाराम पानझडे यांना शिस्तभंगाची नोटीस बजावली असल्याची माहिती मिळाली आहे. ‘रस्ते कामात शासनाची १ कोटी ६७ लाख रुपयांची फसवणूक झाली आहे. त्यामुळे तुमच्यावर शिस्तभांगीचा कारवाई का करण्यात येऊ नये,’ असे नोटीसमध्ये नमूद करण्यात आल्याचेही सूत्रांनी सांगितले.
रस्त्यांच्या कामासाठी राज्य शासनाने २४ कोटी ३३ लाख रुपयांचा निधी दिला. या निधीतून पाच रस्त्यांचे व्हाइट टॉपिंगचे काम करण्याचा निर्णय घेण्यात आला. पाचपैकी चार रस्त्यांची कामे सुरू करण्यात आली. त्यात १ कोटी ६७ लाख रुपयांचा गैरव्यवहार झाला. त्यात शासनाची फसवणूक करण्यात आली, असा निष्कर्ष महापालिका आयुक्त, जिल्हाधिकारी व विभागीय आयुक्तांनी हायकोर्टात सादर केलेल्या शपथपत्रातून स्पष्ट झाला आहे.
रस्ते प्रकरणात संबंधितांवर महापालिका आयुक्तांनी त्यांच्या स्तरावर कारवाई करावी, असे आदेश विभागीय आयुक्तांनी दिले. महापालिकेला कारवाईचा अहवाल १९ नोव्हेंबर रोजी हायकोर्टात सादर करायचा आहे. त्या पार्श्वभूमीवर पालिका आयुक्तांनी पानझडे यांना नोटीस पाठवली असून, शिस्तभंगाची कारवाई का करण्यात येऊ नये, असे त्यात म्हटले आहे.

कंत्राटदाराची निवड संशयास्पद
रस्त्यांच्या कामासाठी पीएमसी नियुक्त करणे, कंत्राटदाराची निवड करून त्याला कार्यादेश देणे या कृती संशयास्पद असल्याचेही नोटीसमध्ये नमूद करण्यात आले आहे. पालिका आयुक्त बकोरिया यांनी नोटीस बजावल्याच्या प्रकरणाला दुजोरा दिला. नव्याने आणखीन कोणतीही नोटीस बजावण्यात आली नाही, असे ते म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

टीडीआरप्रकरणी फौजदारीस टाळाटाळ

0
0

औरंगाबाद : मंजूरपुरा आणि चेलिपुरा येथील टीडीआर प्रकरणात संबंधिताविरुद्ध फसवणुकीची तक्रार करण्यात यावी, असे आदेश पालिका आयुक्तांनी दिले. त्याचबरोबर विधी विभागानेही यासंदर्भात सुस्पष्ट अभिप्राय दिला असताना नगररचना विभागातील अधिकारी मात्र पोलिसात तक्रार देण्यास टाळाटाळ करीत असल्याची माहिती मिळाली आहे.
मंजूरपुरा आणि चेलिपुरा येथील जागा रस्ता रुंदीकरणासाठी १९९७च्या सुमारास महापालिकेने संपादित केल्या. या दोन्ही जागांसाठी प्रत्येकी सव्वाआठ रुपयांचा मोबदला देण्यात आला. त्याची नोंद रजिस्ट्रीमध्ये करण्यात आली. मोबदला दिल्यानंतर त्याच जागेसाठी टीडीआर मागण्यात आला. टीडीआर देण्याचा प्रयत्न पालिकेच्या नगररचना विभागात करण्यात आला. समाजिक कार्यकर्ते किशोर राजपूत यांनी यासंदर्भात पालिका आयुक्तांकडे तक्रार करून ‘डबलगेम’ प्रकरणात कारवाई करण्याची मागणी केली. ‘मटा’ने यासंदर्भात वृत्त प्रसिद्ध केले होते. आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांनी कागदपत्रांची तपासणी करून दोषींवर गुन्हा दाखल करण्याची कारवाई करा, असे आदेश नगररचना विभागाला दिले आहेत.
आयुक्तांचे आदेश असताना नगररचना विभागाने टीडीआरची फाइल अभिप्रायासाठी विधी विभागाला पाठवली. ‘टीडीआर प्रकरणी पोलिसात फसवणुकीची तक्रार देण्यात काहीच हरकत नाही,’ असे मत विधी विभागाने दिवाळीच्या दोन दिवसआधी नोंदविले. त्यानंतरही नगररचना विभाग पोलिसात तक्रार देण्यास टाळाटाळ करीत आहे. यासंदर्भात राजपूत यांनी बुधवारी आयुक्तांना निवेदन‌ दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पडेगावात चोरांचा धुमाकूळ

0
0


म. टा. प्रतिनिधी, पडेगाव
पडेगाव परिसरातील घरांना चोरांनी लागोपाठ दुसऱ्या दिवशी लक्ष्य केले आहे. पडेगाव येथे मंगळवारी रात्री पाच घरे फोडून ऐवज लंपास केला. चोरी झालेली दोन घरे रामगोपालनगर व तीन घरे माजीसैनिक कॉलनीमधील आहेत.
जम्मू कश्मीरमध्ये कार्यरत असलेले सैनिक नेमीनाथ बाजीराव तायडे यांचे कुटुंबह माजीसैनिक कॉलनीत शिवाजी दैतकर यांच्या घरी भाड्याने राहतात. ते बाहेरगावी गेल्याची संधी साधून चोरांनी घरफोडी करून रोख आठ हजार रुपये लंपास केले. या बंगल्यातील अश्विन राठोड यांच्या घरातील सामान चोरांनी अस्तव्यस्त केले. याच कॉलनीमधील रहिवासी व पोलिस आयुक्तालयात कार्यरत पोलिस शिपाई संतोष गिरीराज वाघ यांच्या घरातून सोन्याच्या तीन अंगठ्या, एक घड्याळ, जोडवे व आठ हजार रुपये रोख असा ऐवज चोरून नेला.
रामगोपालनगर येथील शिक्षक प्रशांत हिवर्डे यांच्या घरातील १२ हजार रोख व मुलांचे दागिने चोरांनी चोरून नेले. त्यांच्या घराचा दरवाजा दुचाकीतून पेट्रोल काढून पेटवण्याचा प्रयत्न करण्यात आला. या घरात भाडेकरू मिलिंद रामराव भागवत हे बाहेरगावी गेले आहेत. त्यांच्या घरातून ऐवज चोरण्यात आला. या पाच घरफोड्यांमध्ये चोरट्यांनी एकूण ५४ हजार २०० रुपयांचा ऐवज चोरून नेला. या घटनांची नोंद छावणी पोलिस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक खंडागळे हे करत आहेत.

नागरिक भयभित
पीस होम हाउसिंग सोसायटीमध्ये सात रो-हाउस फोडल्यानंतर दुसऱ्याच रात्री पुन्हा पाच घरांत घरफोडी झाली. यामुळे पडेगाव, मिटमिटा, माळीवाडा परिसरातील नागरिक भयभित झाले असून पोलिसांनी गस्त वाढवावी, अशी मागणी करण्यात येत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नव्या जीवनदायी योजनेच्या मदतीत निम्मी कपात

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेचे नाव बदलून आता महात्मा फुले जनआरोग्य योजना असे नाव होणार असून, त्यात आणखी सुमारे १३० नव्या वैद्यकीय प्रक्रिया-शस्त्रक्रिया-उपचारांचा समावेश होणार असल्याचे सांगण्यात येते, मात्र योजनेमध्ये सुधारणा करताना ‘क्रिटिकल केअर’चे पॅकेजेस वाढवण्याऐवजी चक्क निम्म्याने घटवण्यात आल्याचे समोर आले आहे. अर्थात, नवी योजना अद्याप लागू झाली नसली, तरी या बाबींचा विचार झाला नाही तर योजनेलाच हरताळ फासल्या जाणार असल्याची भीती वैद्यकतज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
२०१२मध्ये राजीव गांधी योजना ‘पायलट प्रोजेक्ट’ म्हणून राज्यातील निवडक जिल्ह्यांमध्ये सुरू झाली आणि २०१३पासून ही योजना संपूर्ण राज्यात लागू झाली. सद्यस्थितीत या योजनेमध्ये ९७१ प्रकारच्या वैद्यकीय प्रक्रिया, शस्त्रक्रिया व उपचारांचा समावेश आहे. आघाडी सरकारने आणलेल्या या योजनेमुळेच बीपीएल रुग्णांना सर्वांत पहिल्यांदा खासगी रुग्णालयांमध्ये मोफत उपचार उपलब्ध झाले, मात्र योजनेतील त्रोटक पॅकेजेसमुळे अनेक प्रकारच्या उपचारांवर मर्यादा आल्या व उत्तम उपचारांसाठी योजनेतील पॅकेजेस वाढविण्याचा सूर वैद्यकीय वर्तुळातून वारंवार व्यक्त झाला. आता या योजनेचे नाव बदलून ‘महात्मा फुले जनआरोग्य योजना’ होणार अाहे. त्यामध्ये अनेक सुधारणा अपेक्षित आहेत. अर्थातच, ‘क्रिटिकल केअर’चे पूर्वीचे पॅकेजेस निदान आधीपेक्षा वाढवणे अपेक्षित असताना, उलट ते निम्म्याने घटवण्यात आल्याचे दिसून येत आहे. ‘अॅक्यूट रेस्पायरेटरी डिस्ट्रेस सिन्ड्रोम’चे (एआरडीएस) पॅकेज एक लाखावरून ६० लाखांवर आणण्यात आले आहे. ‘सीओपीडी’चे (दमा) पॅकेज ७० हजारांवरुन ४२ हजार, ‘स्वाईन फ्लू’चे पॅकेज ६५ हजारांवरून ४८ हजारांवर, ‘एआरडीएस प्लस डीआयसी’चे पॅकेज १ लाख २० हजारांवरून ७२ हजारांवर आणण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. नव्या योजनेत खरोखर हेच पॅकेजेस कायम राहिले तर मात्र रुग्णांवर योजनेअंतर्गत उपचार करणे कठीण होऊन, असंख्य रुग्ण नव्या योजनेपासून वंचित राहतील, अशी भीती व्यक्त होत आहे.

अशी आहे उपचारांची टांगती तलवार
उपचार..............पूर्वीचे पॅकेज.........आताचे पॅकेज
एआरडीएस.........१ लाख रु...........६० हजार रु
सीओपीडी...........७० हजार रु........४२ हजार रु
स्वाईन फ्लू........६५ हजार रु.........४८ हजार रु
एआरडीएस........१.२० हजार रु.......७२ हजार रु
प्लस डीआयसी

‘क्रिटिकल केअर’चे पॅकेजेस खरोखर घटवले, तर रुग्णांवर उपचार करणे कठीण होऊन योजनेलाच काही अर्थ राहणार नाही. त्यामुळे योग्य बदल करूनच योजना लागू व्हावी, अशी अपेक्षा आहे.
– डॉ. व्यंकट होळसांबरे, मुख्य कार्यकारी अधिकारी, कमलनयन बजाज हॉस्पिटल

एआरडीएस किंवा कोणत्याही गंभीर आजारामध्ये रुग्णाला किती दिवस आयसीयूमध्ये, व्हेंटिलेटरवर ठेवावे लागेल, कोणकोणते गुंतागुंतीचे उपचार-चाचण्या कराव्या लागतील, हे सांगता येत नाही. काहींना २-३ आठवडे, तर काहींना महिना-दीड महिना उपचार द्यावे लागतात. पूर्वीच्या पॅकेजेसमध्येच उपचार देण्यासाठी कसरत करावी लागत होती, आता तर नव्या योजनेत पॅकेजेस निम्म्याने घटविण्यात आल्यास उपचार देणे कठीण होईल.
– डॉ. आनंद निकाळजे, वैद्यकीय संचालक, एमआयटी हॉस्पिटल

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

टेम्पोच्या धडकेत दोन तरुण ठार

0
0


म. टा. प्रतिनिधी, फुलंब्री
तालुक्यातील वडोदबाजार पोलिस ठाण्याच्या हद्दीमधील बनकिन्होळा शिवारात दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील दोन तरुण ठार झाले. हा अपघात बुधवारी सायंकाळी साडेचार वाजता झाला.
सिद्धार्थ अर्जुन नागरे (वय २६, रा. संगम जळगाव, ता. गेवराई जि. बीड) व देविदास बाबासाहेब खडके (वय २७, रा. देवकी, ता. गेवराई, जि. बीड), अशी मयत तरुणांची नावे आहेत. नागरे व खडके हे दोघे दुचाकीवरून (एम. एच. २३ ए. के. ९२६८) भोकरदन येथून सिल्लोडमार्गे औरंगाबादकडे जात होते. त्यावेळी बाभुळगांव शिवारात एका अज्ञात टेम्पोने धडक दिली. या अपघातात जबर मार लागल्याने दोघे ठार झाले. अपघात होताच टेम्पो घटनास्थळावरून पसार झाला. फुलंब्री येथील महात्मा फुले क्रीडा संस्थेच्या रुग्णवाहिकेचे चालक विजय देवमाळी व सय्यद इरफान यांनी फुलंब्री ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी दोन्ही तरुणांना तपासून मृत घोषित केले. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत वडोदबाजार पोलिस ठाण्यात अपघातांची नोंद घेण्यात आली नव्हती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फटाक्यांच्या राखेवर प्रशासनाच्या रेघोट्या!

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद,
फटाका मार्केटमध्ये झालेल्या अग्नितांडवाला चार दिवस उलटून गेले तरी अहवालाच्या नावावर प्रशासनाचा कागदी खेळ सुरू आहे. महापालिका, पोलिस, महावितरण या यंत्रणांकडून तपासाचे काम सुरू आहे आणि लवकरच अहवाल सादर करू, असे सरकारी उत्तर देत प्रशासन राखेवर रेघोट्या मारण्याचे काम करीत आहे.
जिल्हा परिषदेच्या मैदानावरील फटाका बाजारात २९ ऑक्टोबरला झालेल्या अग्नितांडवात सुमारे १३ कोटी रुपयांची राखरांगोळी झाली असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवून या दुर्घटनेत जीवित हानी झाली नाही, या आनंदात महसूल, महापालिका तसेच पोलिस प्रशासनाने दिवाळी साजरी केली. संपूर्ण घटनेची चौकशी करण्यासाठी अप्पर जिल्हाधिकाऱ्यांची नेमणूक करुन जिल्हाधिकाऱ्यांनी तत्परता दाखवली, मात्र दिवाळी सणामुळे चौकशीचे गाडे मात्र पुढे सरकलेच नाही. सोमवारी भाऊबीजेनिमित्त शासकीय सुटी अाल्यामुळे चौकशी लांबणीवर पडली. ‘घटना घडली त्या दिवशी आम्ही सर्व रात्री आठ वाजेपर्यंत घटनास्थळावर उपस्थित होतो. तत्काळ पंचनामे केले व शासनाला प्राथमिक माहिती पाठवली’, असे उत्तर चौकशी समितीकडून देण्यात आले. घटनेच्या चौकशीबाबत अप्पर जिल्हाधिकारी पी.एल. सोरमारे यांना विचारले असता पोलिस, महापालिका, महसूल विभाग आपापल्या पद्धतीने चौकशी करत असून, आठवड्याभरात अंतिम अहवाल जिल्हाधिकाऱ्यांसमोर सादर केला जाईल, असे त्यांनी बुधवारी सांगितले. भीषण आगीत १४० स्टॉल्स बेचिराख झाले. वाहनधारक व फटाका व्यापाऱ्यांचे सुमारे १३ कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज प्रशासनाने वर्तवला होता. मात्र, सुट्यांनंतरही चौकशी रेंगाळली आहे. त्यामुळे दुर्घटनेचे कारणही गुलदस्त्यातच आहे.

११ व्यापाऱ्यांचा तहसीलमध्ये जबाब
फटाका बाजारात झालेल्या घटनेनंतर महसूल व पोलिस प्रशासनाने पंचनामे सुरू केले होते. त्या दिवशी ज्या व्यापाऱ्यांचा जबाब नोंदवला नाही, अशा ११ जणांना बुधवारी तहसील कार्यालयात बोलावण्यात आले. या जबाबामध्ये दुकानासाठी घेण्यात आलेल्या परवानग्या, फटाक्यांचा तपशील, विक्रीसाठी ठेवण्यात आलेल्या फटाका तसेच इतर मालाचा तपशील व किंमत, वाहनांची माहिती, एकूण नुकसानाची अंदाजे रक्कम आदी माहिती जबाब दरम्यान घेण्यात आली.

दुकानात दीड ते पाच लाखांपर्यंतचे फटाके
फटाका बाजारातील १४० दुकानांमध्ये प्रत्येकी दीड ते पाच लाख रुपयांपर्यंतचे फटाके होते, असे जबाब नोंदवण्यासाठी आलेल्या एका फटाका व्यापाऱ्याने सांगितले. दुकानात भरण्यात आलेल्या सर्व मालाच्या रितसर पावत्या, बिलेही व्यापाऱ्यांकडे असल्याचे या व्यापाऱ्याने सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


आगीच्या कारणावरून तर्कवितर्कांना उधाण

0
0

औरंगाबाद : जिल्हा परिषद मैदानावरील फटाका मार्केटच्या अग्नितांडवाला चार दिवस उलटून गेले असले, तरी या अग्नितांडवात दोषी कोण, असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांसमोर अाहे. त्यामुळे शहरात पाचव्या दिवशीही अग्नितांडवाबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत.
शनिवारी लागलेल्या आगीनंतर प्रशासकीय यंत्रणांनी रात्री उशिरापर्यंत घटनास्थळी पंचनामे केले, मात्र त्यानंतर दिवाळी सणामुळे चौकशीला गती मिळाली नाही. यामुळे अग्नितांडवाबाबत तर्कवितर्कांना उधाण आले आहे. फटाका बाजारामध्ये काही दिवसांपासून मोठमोठे पाइप टाकले आहेत. या पाईपमध्ये काही तरुण दररोज गांजा; तसेच इतर नशा करतात. हे लोक अग्नितांडवाला जबाबदार असल्याची चर्चा आहे.
एका प्रत्यक्षदर्शीच्या मते दुकानाच्या मागच्या बाजूस एका कचरावेचक महिलेने कचऱ्याला आग लावली होती, अशीही चर्चा आहे. दरम्यान, घटनेला चार दिवस उलटून गेले असले, तरी जिल्हा परिषद मैदानावर बघ्यांची गर्दी कायम आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘परवाने नसलेल्यांवर गुन्हे’

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
फटाका मार्केटमध्ये दुसऱ्याच्या लायसन्सवर दुकाने थाटलेल्यांवरही गुन्हा दाखल करणार असल्याचा इशारा पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी दिला. पोलिसांकडे असलेल्या १८६ दुकानदाराच्या लायसन्सची चौकशी करण्यात येत असल्याची माहिती त्यांनी दिली.
फटाका मार्केटमधील दुकानांना पोलिस प्रशासनाकडून परवाना नूतनीकरण करण्यात येते. नवे परवाने देणे बंद करण्यात आले आहे. यावर्षी १८६ दुकानांच्या परवान्यांने नूतनीकरण करण्यात आले होते. यापैकी १४० दुकाने थाटण्यात आली होती. शनिवारी लागलेल्या आगीमध्ये ही दुकाने जळून खाक झाली आहे. फटाका मार्केटमध्ये अनेक परवानाधारक स्वतः दुकान थाटत नाहीत. ते आपले लायसन्स दुसऱ्याला वापरण्यासाठी देतात. अनेक दुकानदारांनी फटाका मार्केटमध्ये यावर्षी स्वतः दुकाने थाटली नव्हती. त्यांच्या लायसन्सचा वापर दुसरे कोणी करीत होते. दुसऱ्याच्या लायसन्सवर दुकान चालवणे हे बेकायदा असल्याची माहिती पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी दिली. जळालेल्या १४० दुकानांमध्ये पोलिसांनी नूतनीकरण केलेल्या परवानाधारकांची दुकाने होती का, की त्यांनी अन्य कोणाला लायसन्स वापरण्यासाठी दिले होते, याची चौकशी सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली. दुसऱ्याचे लायसन्स
वापरणारे आणि लायसन्स दुसऱ्याला वापरण्यासाठी देणारे या दोघांवर गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचे पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी सांगितले.

३० दुकानदारांचे जबाब नोंदवले
फटाका मार्केटमध्ये लागलेल्या आगप्रकरणात गुन्हे शाखेने व्यापाऱ्यांचे जबाब नोंदविण्याचे काम सुरू केले आहे. त्यानंतर तपासाची दिशा ठरवून दोषींवर दोन दिवसांत गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत, अशी माहिती पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी दिली. फटाका मार्केटला लागलेल्या आगीच्या घटनेला पाच दिवस झाले. सणाचे दिवस असल्याने या घटनेच्या तपासाला गती मिळत नव्हती. बुधवारपासून या तपासाने वेग घेतला आहे. ३० दुकानदारांचे जबाब पोलिसांनी नोंदवले. यामध्ये त्यांचे नाव, दुकान कधी थाटले, माल कितीचा होता, घटना घडली तेव्हा कुठे होते आदी माहिती घेण्यात येत आहे. दरम्यान, याप्रकरणी पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी सांगितले की, सर्व व्यापाऱ्यांचे जबाब नोंदवल्यानंतर अधिक माहिती समोर येईल. त्यानंतर याप्रकरणात दोषींवर गुन्हा दाखल करण्यात येणार अाहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फटाक्यांशी खेळ धोकादायक

0
0

औरंगाबाद : फटाक्याचा व्यवसायामध्ये कायम खबरदारी बाळगणे गरजेचे असते. त्यांच्याशी छेडछाड झाल्यास मोठा धोका होऊ शकतो, अशी माहिती शहरातील जुने फटाका व्यवसायिक युसून हुसैनी यांनी दिली. गेल्या ४० वर्षांपासून सिटीचौक भागात हुसैनी फटाक्यांचा होलसेल व्यवसाय करतात.
शहरात तवक्कल एक्सप्लोझिव्ह म्हणून हुसैनी यांचे फटाक्याचे दुकान आहे. दुकानाच्या सुरक्षिततेबाबत त्यांनी माहिती दिली. यामध्ये आग विझविणासाठी फायर इस्टिंगविशर, पाण्याची व्यवस्था असावी. विजेची व्यवस्था दुकानाबाहेर असली पाहिजे, असे त्यांनी सांगितली. दुकानात काही अनुचित घटना घडल्यास ती आटोक्यात आणण्यासाठी सर्वच उपाययोजना करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. जास्त दाबाने पाण्याचा फवारा मारणारी विद्युत मोटारच त्यांनी कायमस्वरुपी बसवली आहे. फटाक्याचा व्यवसाय धोकादायक नाही, परंतु व्यवसाय करीत असताना दुकानमालकाने पूर्णपणे काळजी घेणे आवश्यक अाहे. शेवटी अपघात कधीही होऊ शकते, असे मत व्यक्त केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जखमींची संख्या पन्नासच्या घरात

0
0

औरंगाबाद : ऐन दिवाळीच्या तोंडावर जिल्हा परिषदेच्या मैदानावरील फटाका मार्केटला आग लागून, तब्बल १४० फटाक्यांची दुकाने जळून खाक झाली. याचा काहीसा परिणाम फटाके कमी उडवण्यावर झाला आणि त्यामुळेच जखमींचा संख्यादेखील काहीशी कमी झाल्याचे दिसून आले. तरीही संपूर्ण शहरात किमान ५० व्यक्ती फटाक्यांमुळे जखमी झाल्या आणि त्यातील किमान तीन ते चार व्यक्तींना गंभीर जखमा झाल्याचे स्पष्ट झाले.
संपूर्ण दिवाळीच्या काळात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयामध्ये (घाटी) फटाक्यांचे सुमारे १५ जखमी रुग्ण उपचारासाठी आले. यातील बहुतांश मुलेच होती. त्यांच्या हाताला किरकोळ जखमा झाल्या होत्या. त्यांच्यावर अपघात विभागात उपचार करून त्यांना काही वेळाने सोडण्यात आल्याचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुधीर चौधरी यांनी सांगितले. यंदा फटाक्यांच्या जखमींचे प्रमाण काहीसे कमी दिसून आल्याचेही त्यांनी आवर्जून सांगितले. बेंबडे हॉस्पिटलमध्ये सुमारे १७ जखमी रुग्णांनी उपचार घेतले. यातील बहुतांश जखमींच्या हातांना व चेहऱ्यावर जखमा झाल्या होत्या. तीन रुग्णांना गंभीर जखमा झाल्या होत्या. यामध्ये अडीच वर्षांच्या बालकासह १४ वर्षांचा मुलगा व २५ वर्षांच्या तरुणाचा समावेश असून, त्यांच्यावर उपचार करण्यात येत असल्याची माहिती डॉ. रमाकांत बेंबडे यांनी ‘मटा’ला दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फटाका परवान्यांचे गौडबंगाल

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंबाद
जिल्हा परिषद मैदानावरील फटाका बाजारात प्रत्यक्ष दुकान चालवणाऱ्या अनेक व्यापाऱ्यांकडे परवानाच नसल्याची माहिती सूत्रांनी दिली. दुकानांची बोली लावल्यानंतर परवानाधारक आपला परवाना भाडेतत्वावर वापरण्यासाठी देतात व पैसे कमावत असल्याचे एका व्यापाऱ्याने सांगितले.
शहरात जिल्हा परिषद मैदानावर झालेल्या अग्नितांडवानंतर अनेक प्रकरणे समोर येत आहेत. १८० दुकानांसाठी परवाने देण्यात आले होते. सुरक्षेच्या कारणांवरून १४० दुकाने उभारण्यास मान्यता देण्यात आली, मात्र १८०पैकी किती परवानाधारकांनी स्वतः दुकान थाटले, असा प्रश्न समोर आला आहे. दुकान वाटपासाठी असोसिएशनकडून लिलाव करण्यात येतो. त्यानंतर परवानाधारक आपल्या दुकानाची स्थिती पाहून रक्कम ठरवतो व एखाद्याला दुकान चालवण्यासाठी देतो. या प्रक्रियेमध्ये करार अथवा अन्य कोणत्याही बाबी होत नाहीत. परवानाधारकाला दुकानात माल ठेवायचा असेल, तर त्याचे दरही वेगळे ठरवण्यात येतात.
जिल्हा परिषदेच्या मैदानावरील अनेक दुकानांचे व्यवहार मूळ परवानाधारकांऐवजी त्यांचे मुले, नातू करतात. असोसिएशने ठरवलेली रक्कम भरल्यानंतर आणि लिलावानंतर खरा व्यवहार सुरू होतो. आठवड्याभरात होत असलेल्या या कमाईमुळे या धंद्यात बाहेरचे अनेक लोक उडी घेतात, अशी चर्चा आगीच्या दुर्घटनेनंतर सुरू झाली आहे.
परवाना भाडेतत्वावर देणे बेकायदा असल्यामुळे आता दुकानात नेमके नुकसान कुणाचे झाले, असा प्रश्न आहे. आगीच्या या घटनेमुळे नुकसान भरपाईची मागणी होत असताना आता दुकानाचे मूळ परवानाधारक पुढे येत अाहेत. भाडेतत्वावर परवाना घेणाऱ्यांचे मात्र नुकसान होणार आहे.

फटाक्यांच्या ‘गुलमंडी’ला सर्वाधिक मागणी
लिलावामध्ये फटाका मार्केटच्या कोणत्या बाजूला दुकान मिळाले, त्यावर परवान्याचे भाडे ठरते. फटाका मार्केट शेजारी असलेल्या नाल्याच्या बाजूने; तसेच त्याच्या समोरच्या भागाला सर्वाधिक मागणी असते. या भागाला गुलमंडी असे संबोधले जाते.

बड्या व्यापाऱ्यांचा सुटण्याचा प्रयत्न
फटाका मार्केटमध्ये १५ ते २० बडे व्यापारी लाखोंची उलाढाल करतात. हे ‌व्यापारी विविध ठिकाणांहून माल मागवतात. आता हे व्यापारी आपले कर चुकवण्यासाठी; तसेच चौकशीचा ससेमिरा टाळण्यासाठी प्रयत्न करीत असल्याचे सूत्रांनी सांगितले. ‌चौकशी टाळण्यासाठी अनेक व्यापारी भाडेतत्वावरील व्यापाऱ्यांना दूर करण्याचा व नुकसान कमी दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फटाका बाजारात दोन संघटना

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
औरंगपुरा येथील जिल्हा परिषद मैदानावरील फटाका बाजारातील विक्रेते दोन संघटनांमध्ये विभागले गेले आहेत. दोन्ही संघटनांच्या सदस्य असलेल्या विक्रेत्यांना बाजारात सामावून घेण्यासाठी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना विशेष लक्ष घालावे लागते, अशी माहिती आहे.
जिल्हा परिषद मैदानावरील फटाका बाजार पूर्वी ‘औरंगाबाद फटाका असोसिएशन’ या संघटनेचाच होता. या संघटनेतर्फे बाजार भरविण्याचे नियोजन करण्यात येत होते. दुकानांची संख्या, त्यानुसार त्यांची रचना, विक्रेत्यांसाठी दुकानांचा ड्रॉ, मार्केटची देखभाल ही सर्व कामे औरंगाबाद फटाका असोसिएशनच्या माध्यमातून करण्यात येत होती. त्यानंतर संभाजीनगर फटाका असोसिएशनची स्थापना करण्यात आली.
औरंगाबाद फटाका असोसिएशनचे नाव संभाजीनगर करण्याचा आग्रह धरण्यात आला होता, पण त्याला विरोध झाल्यामुळे संभाजीनगर नावाने स्वतंत्र संघटना स्थापन करण्यात आली. या संघटनेचे सुमारे ४० ते ४५ सदस्य असल्याची माहिती मिळाली आहे. औरंगाबाद फटाका असोसिएशनच्या सदस्यांची संख्या १२०च्या घरात आहे.

१९ हजार रुपये शुल्क
मार्केटमध्ये स्टॉल्स लावताना विक्रेत्यांकडून असोसिएशन ठराविक रक्कम वसूल करते. यंदा शुल्कापोटी १९ हजार रुपये वसूल करण्यात आले होते. या शुल्कातून स्टॉलची उभारणी, स्टॉलसाठी आवश्यक असलेल्या सुविधा पुरविणे, सुरक्षा यंत्रणा पुरविणे, प्रत्येक दुकानासाठी दोनशे लिटरचे पाण्याचे ड्रम भरून ठेवणे, दोन टँकर पाण्याने भरून मार्केटच्या ठिकाणी कायमस्वरूपी उभे करणे ही कामे केली जातात.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मी कारभारीण : ...सक्षमा घडविणारी कृष्णामाई!

0
0

unmesh.deshpande@timesgroup.com
Tweet : @UnmeshdMT
शकुंतला पाटील. गेल्या बारा वर्षांपासून घरगुती पद्धतीने छोटा-मोठा व्यवसाय करून आपल्या कुटुंबाला हातभार लावत आहेत. नुसते घरी बसून काय करायचे, असे त्यांना वाटले आणि त्यांनी आपल्या घरच्यांच्या मदतीने व्यवसाय सुरू केला. सुरुवातीच्या काळात मेणबत्त्या तयार करणे, उदबत्त्या तयार करणे व त्याची विक्री करणे अशी कामे त्या करत. द्रोण तयार करून त्याची विक्री करण्याचेही काम त्यांनी केले. पाटील यांचा कृष्णा महिला बचत गट आहे. अनेक महिला त्यांच्याशी जोडल्या आहेत.
सर्वांना सोबत घेऊन त्यांनी व्यवसायाची मुहूर्तमेढ रोवली. त्यातून त्यांच्यासह इतर महिलांना देखील रोजगार मिळाला. आपण आपल्या पायावर उभे रहात आहोत, याचा आनंदही त्यांच्यात निर्माण होऊ लागला. त्यातून त्यांनी उभारी घेतली आणि मोठे काहीतरी करण्याचा निर्णय आपल्या घरच्यांशी चर्चा करून घेतला. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेशी त्यांचा बचत गट संलग्न आहे. बँकेकडून त्यांना कर्ज देखील मिळाले. कर्जातून मिळालेल्या पैशातून त्यांनी पापड व शेवयाची मशीन खरेदी केली. गारखेडा भागातील शिवनेरी कॉलनीत राजे चौकात पाटील यांचे घर. घराच्या वरच्या मजल्यावर बांधकाम करून तेथे या मशीन ठेवण्यात आल्या आहेत. तेथेच पापड, शेवया तयार करून देण्याचे काम केले जाते. शेवया व पापड तयार करण्याची मशीन घेण्याची कल्पना पाहुण्यांमुळे सुचली, असे त्या सांगतात. पाहुण्यांची त्यांच्या घरी पापड तयार करण्याची मशीन घेतली होती, पण त्यांचे घर किरायाचे होते. घर मालकाने आक्षेप घेतला. त्यामुळे त्यांना पापड तयार करण्याचा व्यवसाय त्यांना बंद करावा लागला. आपले स्वतःचे घर आहे, जागा आहे. आपण हा व्यवसाय सुरू करू शकतो, असे पाटील यांना वाटले आणि त्यांनी बँकेच्या माध्यमातून कर्ज घेऊन पापड आणि शेवयाच्या मशीन्स खरेदी केल्या. यासाठी तीन लाखांची गुंतवणूक करावी लागली. रोज एक क्विंटल शेवया आणि पन्नास किलो पापड तयार केले जातात. यासाठी घरातील व्यक्तींबरोबरच कोकीळा वाकळे, साईनाथ वाकळे यांचीही खूप मदत मिळते. त्याशिवाय पाच महिला त्यांच्याबरोबर काम करतात. त्यामुळे स्वतःसह पाच-सहा व्यक्तींच्या हाताला काम दिल्याचे समाधान मिळते, असा उल्लेख पाटील करतात. पापडाच्या मशीनवर केवळ उडदाचेच नव्हे, तर तांदूळ, नागली, मूग, साबुदाण्याचे पापड देखील तयार करून दिले जातात. शेवयांमध्ये गव्हाच्या आणि रव्याच्या शेवया तयार करून दिल्या जातात. भाजणीच्या शेवया गुजरातहून आणून देतो, असे त्यांनी सांगितले.
पाटील यांच्याकडून पापड तयार करून घेण्यासाठी शहराच्या विविध भागातून महिला येतात. त्याशिवाय वाळूज, पंढरपूर, चितेगाव येथूनही महिला पापड व शेवया तयार करून घेण्यासाठी येतात. पापड किंवा शेवया समोरासमोर तयार करून मिळतात. त्यामुळे आपल्या समोर हे सर्व करून मिळत आहे, याचे समाधान महिलांमध्ये असते. स्वतः येऊन पापड करून नेण्याकडे महिलांचा कल वाढू लागला आहे, असे पाटील सांगतात. यंदा ठाणे, परभणीलाही पापड, शेवया गेल्या. तेथील ग्राहकांनी संपर्क साधून हे पदार्थ मागवले. त्यामुळे आता जिल्ह्याच्या सीमा ओलांडल्याचे भाग्य मिळाले, अशी भावना त्यांच्यात आहे. येत्या काळात पॅकिंगची मशीन घेण्याचे त्यांचे नियोजन आहे. सध्या पॅकिंगची मशीन नसल्यामुळे हातानेच पॅकिंग करावे लागते. मशीन घेतल्यावर आपोआप पॅकिंग होईल आणि त्यात एकसारखेपणा देखील येईल, असे पाटील यांना वाटते. महिलांच्या हाताला काम देऊन त्यांना सक्षम बनवणे याकडे त्यांचा कल आहे. त्यासाठीच पाटील यांचा कृष्णा महिला बचत गट अथक परिश्रम करतोय.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘ईआरपी’च्या नावाखाली दोन कोटी रुपयांचा चुराडा

0
0



म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
महापालिकेतील प्रमुख विभागाचे संगणकीकरण करण्यासाठी आणलेली ‘ईआरपी’ (इंटरप्राइज रिसोर्स प्लॅनिंग) योजना अधिकारी लॉबीने आपले महत्त्व कमी होईल म्हणून हाणून पाडली. त्यामुळे शासनाच्या दोन कोटींच्या निधीचा चुराडा झाला. आता या सर्व प्रकरणाची चौकशी सुरू झाली असून, शासनाने पैसे वसुलीचे आदेश दिले आहेत.
आठ वर्षांपूर्वी तत्कालीन आयुक्त असीमकुमार गुप्ता यांनी पालिकेत ‘ईआरपी’ योजना लागू करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी चार कोटींची तरतूद केली. नगररचना विभाग, लेखाविभाग, मालमत्ता विभाग व कर आकारणी विभागाचे संगणकीकरण या माध्यमातून केले जाणार होते. या कामासाठी टेंडर काढून ‘सॅप’ आणि ‘सीएमसी’ या कंपन्यांना काम दिले.
चार कोटींपैकी दोन कोटी सॉफ्टवेअर खरेदीसाठी खर्च केले. ‘सॅप’ने खरेदी केलेले सॉफ्टवेअर विकसित करायचे व ‘सीएमसी’ कंपनीने विविध विभागांसाठी त्या सॉफ्टवेअरची आखणी करायची असे ठरले होते. सॉफ्टवेअरच्या खरेदीपर्यंतची प्रक्रिया पूर्ण झाली, पण त्यानंतरचे काम पालिकेतील अधिकाऱ्यांच्या लॉबीने चक्क हाणून पाडले. त्यामुळे त्यामुळे आठ वर्षांपूर्वी दोन कोटी रुपये
पाण्यात गेले. या प्रकरणाची चौकशी शासनाच्या स्तरावरून केली जात आहे. ज्या अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे या पैशांचा चुराडा झाला त्या अधिकाऱ्यांकडून पैसे वसूल करण्याचे आदेश शासनाने पालिका आयुक्तांना दिले असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

‘ईआरपी’चा फायदा काय झाला असता ?
‘ईआरपी’ योजना कार्यान्वित झाली असती, तर विविध विकास कामांचे अंदाजपत्रक संगणकावर ऑनलाइन पाहता आले असते. त्यांची प्राधान्य क्रमानुसार रचना आपोआप झाली असती. नगरसेवकांना त्यांच्या वॉर्डातील विकास कामांचे अंदाजपत्रक तयार करून घेण्यासाठी अधिकाऱ्यांच्या टेबलवर जाण्याची वेळ आली नसती. त्या माध्यमातून पेपरलेस काम झाले असते. अधिकारी-कर्मचाऱ्यांवर बंधने आली असती. कोणत्या अधिकाऱ्याने कोणत्या फाइलसाठी किती काम केले, कोणते काम केले, एका फाइलसाठी किती वेळ दिला, फाइलमध्ये खाडाखोड करण्यात आली आहे, याची माहिती एका क्लिकवर उपलब्ध होणार होती.
-
‘मटा’भूमिका
-
आठ वर्षांनी जाग
-
आठ वर्षांपूर्वी महापालिकेतील व्यवहार पारदर्शक व्हावेत, लोकांना बांधकामाची परवानगी वेळेवर मिळावी, कर आकारणी सुकर व्हावी यासाठी ईआरपी यंत्रणा बसविण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी मोठी तरतूदही करण्यात आली, पण तसे झाले असते तर आपल्या पदरात काय पडणार, या विवंचनेतूनच काही अधिकाऱ्यांनी ही योजना हाणून पाडली आहे. अर्थात, एखाद्या सुधारणेबद्दल आठ वर्षांनी शासनाला जाग यावी, हेही धक्कादायकच आहे. शासन आणि प्रशासनाच्या अशा ढिसाळ कारभारामुळे काही अधिकाऱ्यांचे फावते आणि ते शहराला बोटावर नाचवतात. आपल्याला कोणताही धोका नाही, हे त्यांनी कित्येक वर्षांच्या अनुभवातून जाणले आहे. यापैकी कित्येक अधिकारी निवृत्तही झाले, पण त्यांनी केलेल्या 'उद्योगां'ची खबरही प्रशासनाला लागलेली नाही. पारदर्शक व्यवहार होऊ नयेत म्हणून सक्रिय झालेल्या अधिकाऱ्यांवर आता शासनानेच कारवाई केली पाहिजे. अन्यथा सुधारणेच्या दिशेने टाकलेले एकही पाऊल ते यशस्वी होऊ देणार नाहीत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पेट्रोलचे चटके

0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
पेट्रोल पंप चालकांनी गुरुवारी केवळ पाच टक्के तेल खरेदी केल्यामुळे शहरात शुक्रवारी ‘नो स्टॉक’चे बोर्ड झळकण्याची शक्यता आहे. त्यामुळे ज्यांनी आज पेट्रोल भरले नाही, अशा वाहनधारकांना घाम फुटू शकतो.
अपूर्व चंद्रा कमिटीचा अहवाल लागू करावा या मागणीसाठी फामपेडा संघनेच्या वतीने पुकारण्यात आलेल्या संपात राज्याभरातील पेट्रोल पंप चालकांनी सहभागी होत पेट्रोल आणि डिझेलची खरेदी बंद केली आहे. औरंगाबाद आणि जालना शहरात आज ९५ टक्के पेट्रोल खरेदी झाली नाही. बुधवारी शहरातील पेट्रोल पंप चालकांसाठी तेलाचा पुरवठा रात्री उशिरापर्यंत करण्यात झाला होता. यामुळे गुरुवारी शहरातील पेट्रोल पंपावर नागरिकांना पेट्रोल खरेदीत कोणतीही अडचण आली नाही. मात्र, शुक्रवारीही हे आंदोलन कायम राहणार आहे. त्यामुळे खरे चटके उद्यापासूनच बसणार आहेत.

आंदोलकांच्या मागण्या
पेट्रोल पंपावरील शौचालय बंद असल्यास किंवा स्वच्छ नसल्यास कंपनीकडून १५००० रुपयांचा दंड केला जातो. पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांचे पगार, वीज बिल, तसेच अन्य सुविधांवर होणारा खर्च जास्त असतो. छोट्या पेट्रोल पंप चालकांना कमी कमीशन मिळत असल्यामुळे सुविधा देता येत नाहीत. यामुळे पेट्रोल पंप चालकांचे कमिशन वाढवावे. पानेवाडी ऑइल डेपोसह अन्य ऑइल डेपोत पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रण करण्याचे कोणतेही तंत्र नाही. यामुळे इथेनॉल पेट्रोलमध्ये पूर्णतः मिक्स होत नाही. पेट्रोल टाकीत पाणी गेल्यास पेट्रोल मिश्रित इथेनॉलचे पाण्यात रुपांतर होते. याचा फटका वाहनधारकांसह पंप चालकांना बसत आहे. याबाबतही निर्णय घ्यावा, अपूर्व चंद्रा कमिटीचा अहवाला लागू करावा, अशी मागणी आंदोलकांनी केली आहे.

रविवारी बैठक
चार नोव्हेंबरला दिल्लीत तेल कंपन्यांसोबत बैठक आहे. या बैठकीत पेट्रोल पंप चालकांच्या बाजूने निर्णय लागला नाही, तर शनिवारी सात ते आठ वाजेपर्यंत पेट्रोल पंप सुरू ठेवण्यात येणार आहेत. रविवारी पेट्रोल पंप बंद राहतील, अशी माहिती औरंगाबाद पेट्रोलियम डिलर्स असोसिएशनचे सचिव अखिल अब्बास यांनी दिली.

औरंगाबाद आणि वाळूज भागात ५० च्या वर पेट्रोल डिलर्स आहेत. यातील ९५ टक्के पंप चालकांनी गुरुवारी पेट्रोल खरेदी केली नाही. शुक्रवारीही हे आंदोलन सुरू राहणार आहे. त्यामुळे दुपारनंतर पंप कोरडे होतील. - अखिल अब्बास, सचिव, औरंगाबाद पेट्रोलियम डिलर्स असोसिएशन

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘टीडीआर’चे आरोपपत्र तयार

0
0



म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
टीडीआर घोटाळाप्रकरणी पालिकेचे निलंबित अधिकारी डॉ. डी. पी. कुलकर्णी व डॉ. बी. एस. नाईकवाडे यांच्या विभागीय चौकशीसाठी प्रशासनाने आरोपपत्र तयार केले आहे. या अधिकाऱ्यांच्या विभागीय चौकशीच्या प्रस्तावाला सर्वसाधारण सभेच्या मंजुरीनंतर सुरुवात केली जाणार आहे.
पालिका आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांनी टीडीआर घोटाळा प्रकरणात नगररचना विभागाचे सहाय्यक संचालक डॉ. डी. पी. कुलकर्णी, उपअभियंता शिरीष रामटेके, शाखा अभियंता आर. पी. वाघमारे यांना निलंबित केले. प्राणिसंग्रहालयातील राणी बिबट्याच्या तीन पिल्लांच्या मृत्यूप्रकरणी बकोरिया यांनी प्राणिसंग्रहालयाचे संचालक डॉ. बी. एस. नाईकवाडे यांना निलंबित केले. या अधिकाऱ्यांची आता विभागीय चौकशी केली जाणार आहे. त्यासाठी प्रशासनाने आरोपपत्र तयार केले. आरोपपत्रासह विभागीय चौकशीच्या परवानगीचा प्रस्ताव सर्वसाधारण सभेसमोर ठेवला जाणार आहे. तशी अशी विनंती प्रशासनातर्फे महापौरांना करण्यात आली आहे. हा प्रस्ताव कोणत्या सर्वसाधारण सभेत ठेवायचा हे ठरविण्याचा अधिकार महापौरांचा आहे. कुलकर्णी यांच्या संदर्भात तयार केलेल्या आरोपपत्रात टीडीआरसह ‘इआरपी’ चा उल्लेखही केला आहे. ‘इआरपी’ सिस्टीम पालिकेत यशस्वी होऊ शकली नाही, त्यासाठी कुलकर्णी यांच्यासह अन्यही काही अधिकाऱ्यांना जबाबदार धरले आहे. यासंदर्भात बकोरिया यांनीही दुजोरा दिला. ‘टीडीआर’ आणि ‘इआरपी’ अशा दोन्हीही पातळीवर कुलकर्णी यांची विभागीय चौकशी केली जाईल, असे ते म्हणाले.

पानझडेही जात्यात
हर्सूल तलावाचे गाळ प्रकरण आणि टी. व्ही. सेंटर चौक ते जळगाव रोड या रस्त्याच्या कामावरून बकोरिया यांनी शहर अभियंता सखाराम पानझडे यांना निलंबित केले आहे. त्यांचीही विभागीय चौकशी केली जाणार आहे. पानझडे यांच्या विभागीय चौकशीसाठी आरोपपत्र तयार करण्याचे काम सुरू असून त्यातही ‘इआरपी’ चा उल्लेख केला जाणार आहे.

‘जीबी’ ने प्रस्ताव फेटाळला तर...
निलंबित अधिकाऱ्यांच्या विभागीय चौकशीचा प्रस्ताव सर्वसाधारण सभेने फेटाळला, तर आयुक्त सर्वसाधारण सभेचा निर्णय शासनाकडे पाठवून तो विखंडित करू शकतात. त्यानंतर ते स्वतःच्या पातळीवर या अधिकाऱ्यांच्या विभागीय चौकशीचा निर्णय घेऊ शकतात. पानझडे आणि कुलकर्णी हे दोघेही वरिष्ठ अधिकारी असल्यामुळे त्यांची चौकशी करण्यासाठी पालिकेला बाहेरचा अधिकारीच नियुक्त करावा लागेल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘जीवनदायी’त ११०० उपचारांची संजीवनी

0
0

nikhil.nirkhee@timesgroup.com
Tweet : nnirkheeMT
औरंगाबाद ः नव्या जीवनदायी योजनेमध्ये ‘क्रिटिकल केअर’चे अनेक पॅकेजेस ४० ते ५० टक्क्यांपर्यंत घटवल्याने गोरगरीब रुग्णांवर ‘आयसीयू’मध्ये टांगती तलवार असली तरी, या योजनेमध्ये अनेक सकात्मक बदलही होणार असल्याचे समोर आले आहे. पूर्वीच्या ९७१ प्रकारचे उपचार-प्रक्रिया-शस्त्रक्रियांची संख्या तब्बल ११०० पर्यंत वाढवण्यात येणार असून, ‘नी रिप्लेसमेंट’, ‘हिप रिप्लेसमेंट’बरोबरच डेंगीचे उपचारही नव्या योजनेमध्ये होणार आहेत. त्याशिवाय इतरही अनेक पॅकेजेस वाढवण्यात आल्याचे आणि नोव्हेंबरच्या तिसऱ्या आठवड्यापासून नवी योजना लागू होणार असल्याचे अधिकृत सूत्रांनी सांगितले.
एक लाखापर्यंतचे वार्षिक उत्पन्न असणाऱ्यांसाठी राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना ही २१ नोव्हेंबर २०१३ पासून संपूर्ण राज्यात लागू झाली आणि या योजनेअंतर्गत ९७१ प्रकारचे उपचार-प्रक्रिया-शस्त्रक्रिया केल्या जातात. आता या योजनेचे अनेक सुधारणांसह ‘महात्मा फुले जनआरोग्य योजना’ असे नामकरण होणार असल्याचे यापूर्वीच जाहीर झाले आहे. येत्या २१ नोव्हेंबर २०१६ पासून नवीन योजना लागू होणार असल्याचे समजते. नव्या योजनेमध्ये उपचार-प्रक्रिया-शस्त्रक्रियांची संख्या ११०० पर्यंत वाढवण्यात येणार असून, पूर्वी कुटुंबाला असलेले दीड लाखापर्यंतचे विम्याचे कवच आता दोन ते अडीच लाखापर्यंत वाढवण्यात येणार आहे. त्यामुळे योजना लागू असणाऱ्या कुटुंबातील सदस्यांना वर्षभरात दोन ते अडीच लाखांपर्यंतचे उपचार घेता येतील. यामध्ये मूत्रपिंड प्रत्यारोपणाचा (किडनी ट्रान्स्प्लान्ट) अपवाद पूर्वीप्रमाणेच राहणार आहे. ‘किडनी ट्रान्स्प्लान्ट’च्या शस्त्रक्रियेसह औषधांसाठी पूर्वी अडीच लाख रुपयांचे पॅकेज होते. आता हे पॅकेज तीन ते साडेतीन लाखांपर्यंत वाढवण्यात येणार आहे. आतापर्यंत योजनेमध्ये समावेश नसलेल्या गुडघ्याच्या व सांध्यांच्या प्रत्यारोपणासह जन्मजात बहिरेपणा असलेल्या मुलांवर केल्या जाणाऱ्या आणि महानगरांमध्ये खासगीत तब्बल ७ ते १० लाखांचा खर्च असणाऱ्या ‘कॉक्लिअर इम्प्लान्ट’चाही योजनेमध्ये समावेश केला जाणार असल्याचे समजते. अर्थात, फार मोठ्या खर्चामुळेच ‘कॉक्लिअर इम्प्लान्ट’बाबत शंका उपस्थित केली जात असली तरी नी व हिप रिप्लेसमेंटचा समावेश होण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. अलीकडे संपूर्ण महाराष्ट्रात फार मोठ्या प्रमाणात दिसून येणाऱ्या डेंगीचा योजनेत समावेश होणार असल्याचे समजते.

अनेक पॅकेजेसमध्ये वाढ
नव्या योजनेत अनेक पॅकेजेसमध्येही वाढ करण्यात येत आहे. यामध्ये ‘किडनी स्टोन’च्या शस्त्रक्रियांसाठी २५ हजारांवरून ३० हजारांपर्यंत पॅकेज वाढवण्यात येत आहे. तसेच ‘स्नेक बाईट’चे पूर्वी एकच असलेले पॅकेज आता व्हेंटिलेटरसह व व्हेंटिलेटरशिवाय असे दोन स्वतंत्र पॅकेज केले जाणार आहे व तेही वाढवण्यात येणार आहे. मराठवाड्यातील सर्व ८ व विदर्भातील ६ अशा १४ जिल्ह्यांतील सर्व शेतकऱ्यांना ही योजना लागू झाली. सात-बारा दाखवा आणि उपचार मिळवा, ही सुविधा शेतकऱ्यांना पुढेही मिळेल.

असा आहे ‘जीवनदायी’चा भक्कम आधार
- जिल्ह्यातील एकूण लाभार्थी : १८ हजार ११४
- योजनेत एकूण शस्त्रक्रिया : २८ हजार २१८
- एकूण रुग्णांना मान्यता : २८ हजार ७७८
- योजना लागू असलेली शहरातील रुग्णालये : २३
(२१ नोव्हेंबर २०१३ ते ०२ नोव्हेंबर २०१६)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भूमाफियाविरोधात नागरिक पोलिसांत

0
0



म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
ले आउटमध्ये मोकळे सोडलेले व महापालिकेच्या नावावर असलेले भूखंड भूमाफियांच्या तावडीतून वाचवण्यासाठी टिळकनगरातील नागरिक संघर्ष करीत आहेत. या नागरिकांच्या तक्रारीवरून महापालिकेने गुरुवारी एका भूखंडावरील अतिक्रमण हटविले. मात्र, पालिकेच्या पथकाची पाठ फिरताच भूमाफियांनी पुन्हा अतिक्रमण केले. त्यांच्या विरोधात नागरिकांनी पोलिस स्टेशनमध्ये धाव घेतली.
टिळकनगरातील पालिकेच्या भूखंडावर अतिक्रमण होत असल्याची तक्रार या भागातील नागरिकांनी वेळोवेळी पालिकेकडे केली, पण त्याची दखल घेतली जात नव्हती. गुरुवारी काही नागरिकांनी अतिक्रमणांच्या संदर्भात महापौर त्र्यंबक तुपे व आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांच्याशी संपर्कसाधून तक्रार केली. तुपे व बकोरिया दोघेही टिळकनगरात दाखल झाले. एका भूखंडावर टपरीचे अतिक्रमण होते. ते अतिक्रमण पाडण्याचे आदेश बकोरिया यांनी अधिकाऱ्यांना दिले. त्यांच्या आदेशानुसार पालिकेच्या पथकाने अतिक्रमण पाडले. हे पथक निघून गेल्यावर भूमाफियांनी पुन्हा त्याच ठिकाणी टपरी उभारली व नागरिकांना धमकावले. या प्रकरणी नागरिकांनी जवाहरनगर पोलिस स्टेशनमध्ये धाव घेतली. पालिकेच्या अतिक्रमण हटाव पथकाच्या दुसऱ्या पथकाने सिडको एन ९ भागात कारवाई करून अतिक्रमित इमारत पाडली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images