Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

थंडीच्या कडाक्याला सुरुवात

0
0

टीम मटा, औरंगाबाद

राज्याच्या विविध भागांमध्ये थंडीने जोर धरला असून, मराठवाड्यामध्ये किमान तापमानामध्ये घसरण होऊ लागली आहे. यंदा सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाल्यामुळे थंडी वाढली असून, आणखी काही दिवस थंडी कायम राहणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
उत्तरेकडील राज्यांमध्ये तापमान घसरत आहे. त्यातच, देशभरातून मान्सूनही पूर्णपणे माघारी गेला आहे. मध्य महाराष्ट्र व विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय घट झाली आहे. कोकण-गोव्याच्या काही भागात तर मध्य महाराष्ट्राच्या व विदर्भाच्या उर्वरित भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय घट झाली आहे. त्यामुळे, वातावरणातील बाष्पाचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे, थंडीचे प्रमाण वाढत आहे. हीच परिस्थिती आगामी चार ते पाच दिवस कायम राहण्याचा अंदाज हवामान खात्याकडून व्यक्त करण्यात येत आहे.
गेल्या आठवडाभरापासून सर्वच भागांमध्ये तापमान दिवसेंदिवस खाली येत आहे. दिवाळीपूर्वी १५ ते २० अंशांदरम्यान असलेले किमान तापमान आता १० अंश सेल्सिअसवर आले आहे. नोव्हेंबरच्या सुरुवातीपासून १२ ते १४ अंशांदरम्यान तापमान राहू लागले. त्यामुळे अचानक थंडीची लाट आल्याचा अनुभव मराठवाड्यातील नागरिक घेत आहेत. परभणीमध्ये सोमवारी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या हवामान विभागात १० अंश सेल्सिअस एवढ्या तापमानाची नोंद झाली आहे.
प्रमुख शहरांमध्ये सकाळी ८ वाजेपर्यंत वातावरणात धुके दिसत आहे. तसेच, सायंकाळी सहा वाजल्यापासून थंडी वाढत असून, नागरिकांना शाल, मफलर, स्वेटर घालूनच घराबाहेर पडावे लागत आहे. सकाळी मार्निंग वॉकला जाणाऱ्यांची संख्या देखील यामुळे रोडवली आहे. स्वेटरला मागणी वाढली
मराठवाड्यामध्ये थंडीचा वाजवू लागल्यामुळे, उबदार कपड्यांची मागणी वाढली आहे. शहरातील दुकानांसोबतच ठिकठिकाणी असणाऱ्या तिबेटीयन लोकांच्या दुकानांवर खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी वाढली आहे. या ठिकाणी नेहमीच्या स्वेटरबरोबरच, नव्या डिझाईनच्या कपड्यांचीही आवक वाढली आहे. विशेषत: लहान मुलांसाठी विविध कार्टून, छोटा भीम, कृष्णा, मोटू-पतलूंच्या छबी असलेल्या माकड टोप्या व स्वेटरना मोठी मागणी आहे.

परभणी नीचांकी पोहोचणार का?
परभणी शहरामध्ये सर्वांत कमी तापमानाची नोंद होत असून, यंदा नीचांकी तापमानाचा विक्रम नोंदविणार का, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. परभणीमध्ये १७ जानेवारी २००३ रोजी परभणीचे तापमान केवळ २.८ अंश सेल्सिअस एवढे नीच्चांकी नोंदविण्यात आले होते. गेल्या वर्षी २०१५च्या डिसेंबरअखेर ६.५ अंश सेल्सिअस एवढे तापमान नोंदविण्यात आले होते. यावर्षी नोव्हेंबरच्या सुरुवातीलाच १० अंश सेल्सिअसवर तापमान आल्याने डिसेंबरअखेरचे तापमान परभणीचा २००३ चा रेकॉर्ड मोडेल, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.

शहर किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये)
औरंगाबाद १५.४
परभणी १३.८
उस्मानाबाद १०.९
नांदेड १५.५

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


दिवाळीच्या गर्दीत एसटी जोरात

0
0

दिवाळीच्या गर्दीत एसटी जोरात

लातूर विभाग अव्वल

म. टा. प्रतिनिधी, लातूर

राज्य परिवहन महामंडळाच्या राज्यातील तीस विभागांमध्ये फक्त तीनच विभाग नफ्यात असून, त्यामध्ये लातूर विभाग पहिल्या क्रमांकावर असल्याची माहिती महामंडळाचे लातूर विभाग नियंत्रक के. एस. लांडगे यांनी दिली.
लातूर विभागाने सातत्याने खर्चात कपात करून उत्पन्न वाढीवर भर दिला आहे. के. एस. लांडगे म्हणाले, ‘महामंडळाचे औरंगाबाद, परभणी आणि लातूर हे तीनच विभाग नफ्यात आहेत. त्यात ही सर्वात पुढे लातूर विभाग आहे. अकरा वर्षांपासून लातूर विभाग नफ्यात आहे. लातूर विभागात पाच आगार असून, दररोज ५१५ बस ३५० मार्गांवर धावतात. दोन हजार ८५० कर्मचाऱ्यांच्या सहायाने या सर्व बस एक लाख ८६ हजार किलोमीटर धावतात. एक लाख ५५ हजार प्रवाशांची वाहतूक केली जाते.’ येत्या काही दिवसात ११० वाहक आणि चालकांची भरती केली जाणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.
एसटीसमोर आता खासगी वाहतुकीचे आव्हान आहे. त्यामुळे मुख्यालयाकडे १० स्लिपर कोच, ३० वातानुकुलित बसची मागणी केली आहे. या बस मिळाल्यानंतर प्रवाशांची आणखी सोय होणार आहे. काही महिन्यात बसचे भारनियमन वाढले आहे. पुशबॅक सिस्टीमच्या बसचा वापरही केला जात आहे. दिवाळीनिमित्त प्रवाशांच्या सोयीसाठी जादा बस सोडण्यात आल्या होत्या. २२ ऑक्टोबर ते सहा नोव्हेंबर या कालावधीत ६६७ फेऱ्यात दोन लाख चार हजार ८६ किलोमीटर बस धावल्या आहेत. त्यातून ५९ लाख ३१ हजार ५०१ रुपये उत्पन्न मिळाल्याची माहिती लांडगे यांनी दिली.


उस्मानाबादची उडी कोटीपलिकडे

उस्मानाबाद : दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये प्रवाशांची गर्दी आणि जादा बसेस यांमुळे उस्मानाबाद एसटी विभागाचे उत्पन्न एक कोटी रुपयांच्या पार गेले आहे.
दिवाळीत प्रवासी वाहतूक करण्यासाठी जादा बस उस्मानाबाद विभागातून राज्यातील प्रमुख शहरांमध्ये सोडण्यात आल्या होत्या. २७ ऑक्टोबर ते ६ नोव्हेंबरच्या काळात विविध मार्गांवर उस्मानाबाद विभागाने चालविलेल्या जादा बसमुळे एक कोटी पंधरा लाख रुपयांचे उत्पन्न मिळाल्याची माहिती विभाग नियंत्रक राजीव साळवे यांनी दिली. विभागीय वाहतूक अधिकारी अमोल गोंजारी तसेच विभागातील अन्य सर्व अधिकारी या वेळी उपस्थित होते. या कामी आगारप्रमुख, चालक व वाहक, यांत्रिक कर्मचारी, वाहतूक पर्यवेक्षकीय कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतल्याचे अमोल गोंजारी यांनी सांगितले.
दिवाळीनिमित्त उस्मानाबाद विभागातील उस्मानाबाद, उमरगा, भूम, तुळजापूर, कळंब आणि परांडा या सहा आगारांतून पुणे, पिंपरी-चिंचवड, मुंबई, हैदराबाद, औरंगाबाद, नांदेड या शहरांसाठी जादा बस सोडण्यात आल्या. दिवाळीच्या काळात दहा दिवस जादा बस चालविल्यामुळे एसटीला एक कोटी पंधरा लाख रुपयांचा महसूल मिळाल्याचे साळवे यांनी सांगितले. दिवाळीत प्रवाशांची गर्दी लक्षात घेता दैनंदिन गाड्याव्यतिरिक्त जादा गाड्या सोडण्यासाठी एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी विभागाला ५५ गाड्या उपलब्ध करून दिल्या.

बसस्थानक ‘आहे तसेच’
उस्मानाबाद बसस्थानकाला फाइव्ह स्टार लूक देत या स्थानकाचे रुपडे पालटण्यासाठी व आधुनिकीकरणासाठी आघाडी सरकारच्या काळात शिवाय उस्मानाबादचे रहिवासी असलेले एसटी महामंडळाचे अध्यक्ष जीवनराव गोरे यांनी उस्मानाबाद व बीड येथील बसस्थानकांसाठी प्रत्येकही १४ कोटी रुपये खर्चून नवीन बसस्थानक उभारण्याची निर्णय घेतला. या कामाचे भूमिपूजनही करण्यात आले. मात्र त्यानंतर नव्या सरकारच्या काळात बसस्थानकांच्या कामांना स्थगिती देण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ज्याचे त्याचे हाती कर्तव्याचे माप

0
0



म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी रात्री ५०० व १००० रुपयांच्या नोटा बंद करण्याची घोषणा करताच औरंगाबादकर थंडीची तमा न बाळगता रस्त्यावर आले. मोदींचा निर्णय योग्य की अयोग्य यावर जोरदार चर्चा करत अनेकांनी शंभरच्या नोटा काढण्यासाठी एटीएमवर रात्री उशिरापर्यंत रांगा लावल्या. त्यामुळे अनेक एटीएमला कधी नव्हे ते ‘अच्छे दिन’ आले. पेट्रोलपंपावरही पाचशे, हजाराची नोट खपवण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली.
मोदी यांनी रात्री दूरचित्रवाणी वाहिनीवरून बड्या नोटा बंद करण्याची घोषणा केली. निकष ठेवून विशिष्ट मुदत देण्यात येणार आहे, पण आपल्याकडे असलेल्या नोटा कटवण्याच्या हेतूने औरंगाबादकरांनी पेट्रोलपंपावर लांबच लांब रांगा लावल्या. एरव्ही रात्री तुरळक गर्दी असलेल्या पेट्रोलपंपांवर झालेली गर्दी रात्री उशिरापर्यंत कायम होती. ५०० व १००० रुपयांच्या नोटा देऊन १००, १५० रुपयांचे पेट्रोल भरल्यानंतर चिल्लर देताना अनेक ठिकाणी अडचणी आल्या. ५०, १०० रुपयांच्या नोटा संपल्याने काही पेट्रोलपंपांवर मोठ्या नोटा घेणे बंद झाले होते.
एटीएमवर नोटा काढण्यास व भरण्यासही रांगा लागल्या. पैसे काढताना ४०० रुपयांची लिमिट ठेवण्यात अनेकांनी धन्यता मानली. ४०० रुपये तीन वेळा काढून पुढच्या दोन दिवसांची सोय करून घेण्यासाठी एटीएमसमोर लागलेल्या रांगा रात्री उशिरापर्यंत लागलेल्या होत्या. अनेक एटीएममधील १०० च्या नोटा संपल्यामुळे एटीएम बंद झाले. शहरात चार ठिकाणी पैसे भरण्याची मशीन (सीडीएम) आहे. तिथेही गर्दी झाली होती.

रेल्वे स्टेशनवर धावपळ
रेल्वेस्टेशनवर तिकीट देणाऱ्या कर्मचाऱ्यास नातेवाईक व त्यांच्या अधिकाऱ्यांकडून १०० नोटांची विचारणा करण्यात येत होती. आमच्यासाठी एवढ्या नोटा काढून ठेवा, असे फोन घेता घेता त्या कर्मचाऱ्याला नाकीनऊ आले होते. पॅसेंजर, एक्स्प्रेसने जाणाऱ्या प्रवाशांकडूनही जवळच्या स्टेशनच्या तिकिटासाठी ५०० व १००० ची नोट दिली जात असल्याने गोंधळ उडाला होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नोटा बदलण्याची वेळ आली

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
पाचशे, हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केल्यानंतर सोशल मीडियाला संदेशांसाठी नवाकोरा विषय मिळाला. विविध मनोरंजक, गमतीशीर संदेश व्हॉट्स अॅप, फेसबूकवर झळकले.
विविध सामाजिक, राजकीय घडामोडींवर सोशल मीडियावर नेमक्या शब्दांत गमतीशीर भाष्य केले जाते. पंतप्रधान मोदी यांनी पाचशे, हजार रुपयांच्या नोटा रद्द करण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर सोशल मीडियावर संदेशांचा पाऊस पडला. एका साबणाच्या जाहिरातीचा संदर्भ घेऊन, ‘उठा उठा दिवाळी झाली, पाचशे हजारच्या नोटा बदलण्याची वेळ आली,’ हा व्हॉट्स अॅपवर फिरत होता.
फेसबूक, व्हॉट्स अॅपवर चर्चेत असलेल्या संदेशांपैकी निवडक संदेश असे; ‘आज ज्यांना शांत झोप लागणार ते सर्वात श्रीमंत’, ‘अमेरिकन काउंटिंग वोट्स, इंडियन काउंटिंग नोट्स’, ‘आता महिला मंडळ नवऱ्यापासून लपवून ठेवलेल्या नोटा बाहेर काढणार, ही मोदींची खेळी’, ‘मोदी प्लेड द ‘ट्रम्प’कार्ड पुरी इंडिया ‘हिल’री है...’, ‘आज रात जिस घर की लाइट जलती हुई दिखे समजलो नोटोंकी गिनती शुरू है’, ‘पुणेरीपाटी ः येथे हजार आणि पाचशेच्या नोटांची रद्दी स्वीकारली जाईल’, ‘पाचशे व हजाराच्या नोटांना भावपूर्ण श्रद्धांजली’, ‘नवा धंदा हजारची नोट द्या आणि शंभरच्या तीन घ्या’, ‘एकच फाइट वातावरण टाइट’, ‘काळापैसा पांढरा करा... नसता, बारानंतर बाराच वाजतील’, ‘चोर पण आता चोरी करणार नाही...’, ‘शंभर-दोनशे अॅटॅक येऊन पडले असतील अॅम्बुलन्सवालाही ५००, १०००च्या नोटा घेणार नाही...’ असे मेसेज सोशल मीडियावर फिरत होते.

राजकारण्यांवर टिप्पणी
व्हॉट्स अॅप, सोशल मीडियावर अनेक राजकीय नेत्यांवर टिप्पणी करण्यात आली. ‘पालिका निवडणुकीच्या तोंडावर तमाम भावी नगरसेवकांना मोठा धक्का... वाटा आता पैसा... वाटा...’ अशा शब्दांत नगर पालिका निवडणुकीवर सोशल मीडियावर भाष्य करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चीनी वस्तूंची होळी

0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
‘करुया निर्धार, चायना माल करू हद्दपार’, ‘भारतीय आहोत, भारतीय वस्तूंची खरेदी करणार’, अशा संदेशांचे फलक हाती घेत मंगळवारी भाजपच्या महिला व्यापारी आघाडीने गुलमंडी चौकामध्ये चीनी वस्तूंची होळी केली.
महिला आघाडीच्या पदाधिकारी, सदस्यांनी व्यापाऱ्यांना चायनीज वस्तू वापरू नका असे आवाहन केले. ‘प्रत्येक व्यापाऱ्याने चायनीज वस्तूंची विक्री करू नये’, असे आवाहन नगरसेविका अॅड. माधुरी अदवंत यांनी केले. ‘आमच्या उपक्रमाची ही सुरुवात असून शहरातील महत्त्वाच्या चौकात जाऊन असे आंदोलन करू. व्यापारी महिला आघाडीच्या वतीने आम्ही हा निर्धार केला आहे’, असे आघाडीच्या अध्यक्ष रितू अग्रवाल यांनी ‘मटा’स सांगितले. आमदार अतुल सावे यांनी आंदोलनास शुभेच्छा दिल्या. प्रदूषण टाळण्यासाठी मोजक्या वस्तूंची होळी करण्यात आली. यावेळी शहर जिल्हा अध्यक्ष किशनचंद तनवाणी, शहर महिला मोर्चा आघाडीच्या अध्यक्षा मनिषा भन्साळी, महिला मोर्चाच्या उपाध्यक्ष मृणालिनी फुलगिरकर व ज्योती पांडे, सरचिटणीस लता सरदार, बापू घडामोडे, मंगलमूर्ती शास्त्री, अरुणा पाटील, वंदना दहिवाल, बबिता करवा, मंजू पाटणी, माधुरी कांबळे, ज्योती अग्रवाल आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उद्धवांच्या परतीनंतर महापौरांच्या राजीनामा निर्णय

0
0



औरंगाबाद : महापौर त्र्यंबक तुपे यांच्या राजीनाम्याचा फैसला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मायदेशी परतल्यावर घेतला जाणार आहे. महापौरांच्या राजीनाम्या संदर्भात सोमवारी रात्री युतीच्या स्थानिक नेत्यांची बैठक झाली, पण त्यात कोणताही निर्णय झाला नाही.
पालिकेत शिवसेना-भाजप युतीमध्ये झालेल्या करारानुसार पहिल्या अडीच वर्षातील पहिले दीड वर्ष शिवसेनेच्या वाट्याला देण्यात आले, तर उर्वरित एक वर्षाचे महापौरपद भाजपच्या वाट्याला देण्यात आले आहे. शिवसेनेचे त्र्यंबक तुपे सध्या महापौर आहेत. युतीतील करारानुसार त्यांची महापौरपदाची मुदत ३० ऑक्टोबर रोजी संपली. त्यांनी राजीनामा द्यावा व नवीन महापौरपदासाठी निवडणूक व्हावी, अशी भाजप नेत्यांची इच्छा आहे. तुपे यांच्या राजीनाम्यासंदर्भात चर्चा करून निर्णय घेण्यासाठी सोमवारी रात्री बैठक झाली. शिवसेनेचे संपर्कप्रमुख विनोद घोसाळकर, खासदार चंद्रकांत खैरे, महानगरप्रमुख प्रदीप जैस्वाल, जिल्हाप्रमुख नरेंद्र त्रिवेदी, भाजपचे शहरजिल्हाध्यक्ष किशनचंद तनवाणी, माजी महापौर डॉ. भागवत कराड, पालिकेतील भाजप गटनेते भगवान घडमोडे आदी बैठकीला उपस्थित होते. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे विदेशात गेले आहेत. १२ नोव्हेंबर रोजी ते मायदेशी परतणार आहेत. ते आल्यावर तुपे यांच्या राजीनाम्याबद्दल निर्णय होईल, आमच्या स्तरावर राजीनाम्याबद्दल निर्णय घेणे शक्य नाही, असे शिवसेनेच्या नेत्यांनी भाजप पदाधिकाऱ्यांना सांगितल्याची माहिती सूत्रांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कलाकारांना ट्रेनिंग गरजेचे

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
इंद्रधनुष्य महोत्सवातील सादरीकरणात अनेक दुय्यम दर्जाचे स्पर्धक असल्यामुळे काही प्रकारात चुरस निर्माण झालीच नाही. संबंधित विद्यापीठाच्या निवड समितीची उदासीनता, सरावाचा अभाव आणि विद्यार्थ्यांचा निरुत्साह स्पर्धेसाठी मारक ठरला. या प्रकाराला संबंधित कॉलेज, विद्यापीठ जबाबादार आहेत, असे तज्ज्ञांना वाटते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात १४ वा महाराष्ट्र राज्य आंतरविद्यापीठ सांस्कृतिक युवा महोत्सव सुरू आहे. २००३पासून राजभवनाकडून राज्यपातळीवर हा महोत्सव घेतल्या जातो. विद्यापीठस्तरावर केंद्रीय युवक महोत्सव घेण्यात येतो. त्या महोत्सवात अव्वल ठरलेल्या विद्यार्थी कलावंतांना राज्यपातळीवर आपल्या कलेचे सादरीकरण करता यावे. त्यांना मोठे व्यासपीठ मिळावे, या हेतूने हा महोत्सव सुरू करण्यात आला. यंदाच्या पाच दिवसांच्या महोत्सवात विविध कलाप्रकारांमध्ये विद्यार्थ्यांचे सादरीकरण झाले. त्यात अनेक कलाप्रकारांमध्ये स्पर्धक दुय्यम दर्जाचे असल्याचे पहायला मिळाले. त्यामुळे काही कलाप्रकारांमध्ये चुरस निर्माण झाली नाही. विद्यापीठतंर्गत कॉलेजांमधील स्पर्धकांमधून संबंधित कलाप्रकारात अव्वल ठरलेल्या या स्पर्धकांकडून तेवढेच दर्जेदार सादरीकरण अपेक्षित असते, परंतु अनेक कलाप्रकारात दर्जेदार सादरीकरण पहायला न मिळाल्याने अनेकांची निराशा झाली. मोजक्याच कलाप्रकारांमध्ये चुरस पहायला मिळाली. त्यामुळे विद्यापीठ निवड समितीवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहेत. त्याबाबत परीक्षकांपासून तज्ज्ञांनीही नाराजी व्यक्त केली आहे.

महोत्सवांत २४ कला प्रकारांचा समावेश
विद्यापीठस्तरावरील युवक महोत्सवात ३५ कला प्रकारांत सादरीकरणाची संधी मिळते. इंद्रधनुष्यमध्ये २४ कलाप्रकारांचा समावेश आहे. त्यामध्ये लोकवाद्य वृंद, प्रश्नमंजुषा, शास्त्रीय तालवाद्य, प्रहसन, लोक आदिवासी नृत्य, मूक अभिनय, वादविवाद, वक्तृत्व, एकांकिका, शास्त्रीय सूरवाद्य, शास्त्रीय गायन, समूह गायन पाश्चात्य, समूह गायन भारतीय यांचा समावेश आहे.

सरावासाठी कमी कालावधी
इंद्रधनुष्यसाठी विद्यापीठाचा निवडक संघ येतो. एका विद्यापीठाचा केवळ ४० जणांचा संघ असतो. विद्यापीठीय केंद्रीय युवक महोत्सवाच्या चाळणीतून निवडणून आलेले हे स्पर्धक असतात. त्यामुळे स्पर्धकांमध्ये चुरस अपेक्षित असतेच. काही स्पर्धक दुय्यम दर्जाचे असण्यामागे अनेक कारणे तज्ज्ञांनी मांडली. त्यात विद्यापीठस्तरावरील निवड समिती, प्रशिक्षणाचा अभाव, कॉलेज, विद्यापीठाची उदासनिता, सत्र पद्धतीमुळे विद्यार्थ्यांना सरावासाठी मिळणारा कमी कालावधी, अशी निरीक्षणे तज्ज्ञांनी ‘मटा’कडे मांडली.

विद्यापीठस्तरावर असलेल्या निवड समितीची मुख्यत्वे जबाबदारी मोठी असते. कॉलेजांमध्ये सांस्कृतिक विभागासाठी दिले जाणारे शिक्षक कसे आहेत. ते विद्यार्थ्यांना कसे मार्गदर्शन करतात, यावरही सारे काही अवलंबून असते. अनेक कॉलेज या विभागाकडे दुर्लक्ष केले जाते. याचबरोब सत्रपद्धती स्वीकारलेली आहे. त्यामुळे विद्यार्थी कायम परीक्षेत गुंतलेले असतात. त्याला अशा कलागुणांच्या सरावासाठी पुरेसा वेळ मिळत नाही. या सगळ्याचा परिणाम महोत्सवावरही झाला आहे.
- डॉ. अरुण पाटील, ज्येष्ठ मार्गदर्शक

राजभवनातर्फे मोठ्या उत्साहात होणाऱ्या या कार्यक्रमाच्या कक्षा अजून विस्तारित झाल्या पाहिजेत. राज्यभरातून अनेक कसोट्या पार पाडून आलेले हे कलावंतांचे ‘क्रीम’ युवक महोत्सव एके युवक महोत्सव असे मर्यादित न राहता त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात करिअरच्या वाटा शोधण्यात आणि समर्थपणे उभे राहण्यात यशस्वी ठरले पाहिजे.
- डॉ. संभाजी भोसले, संयोजक

अशा स्पर्धा होत असताना प्रत्येक विद्यापीठाचा सांस्कृतिक विभाग किती सक्षम आहे, हे पहायला मिळते. काही विद्यापीठांनी सांस्कृतिक विभागाकडे चांगल्या प्रकारे लक्ष दिल्याचे जाणवते. विद्यापीठांनी वेळकाढूपणा केला, तर त्यांच्या संघांचा तेवढा दर्जा उंचावलेला दिसणार नाही. त्यामुळे विद्यापीठ प्रशासनावर सारे काही अवलंबून असते. काही विद्यापीठांनी स्वतंत्र सांस्कृतिक समन्वय नेमलेला आहे. अशा विद्यापीठांची तळमळही यातून दिसते. सांस्कृतिक दर्जा सुधारण्यासाठी अशा महोत्सवांचे सांस्कृतिक ऑडिट होणे त्यामुळेच महत्त्वाचे आहे.
- डॉ. मुस्तजीब खान, संयोजक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महापालिकेकडे ५५ कोटी थकित; महावितरणचा दावा

0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
महापालिकेची कसलिही थकबाकी महावितरणकडे नाही. उलट महावितरणचे ५५ कोटी ८६ लाख पालिकेकडे थकले आहेत, असा दावा मंगळवारी महावितरण कार्यालयाकडून करण्यात आला.
महापालिका आणि महावितरणमध्ये सध्या थकबाकीवरून कलगीतुरा रंगला आहे. थकबाकी असेल तर महावितरणला टाळे ठोका, असा आदेश आयुक्तांनी सोमवारी दिला. त्यानंतर मंगळवारी लगेच महावितरणने आपली भूमिका मांडली. महावितरणने पालिकेकडील थकबाकी वसूल करण्यासाठी पालिका कार्यालयाची वीज कापली होती. या कारवाईनंतर या दोन्ही विभागांमध्ये वसुलीवरून संघर्षाची ठिणगी पडली. महापालिका पदाधिकाऱ्यांनी महावितरणकडून शहरातील कार्यालयाचा वापर वाणिज्यिक होत आहे. यामुळे या कार्यालयांचा मालमत्ता कर वाढविण्याची मागणी केली. या प्रकरणानंतरही महावितरणाने खुलासा केला होता. सध्या महापालिकेकडे पालिकेचे कार्यालये, पथदिवे आणि पाणीपुरवठ्याचे वीज बिलाची थकबाकी ५५ कोटी ८६ लाख रुपये थकित आहेत. या वसुलीसाठी वारंवार स्मरणपत्र, नोटीस पाठविल्यानंतर वीज जोडणी तोडण्याची कारवाई करावी लागली, अशी माहिती देण्यात आली. याशिवाय एलबीटी २० कोटी रुपये थकित असल्याचा विषय काढण्यात आला. मात्र, हे प्रकरण कोर्टात प्रलंबित आहे. कोर्टाच्या आदेशानुसार एलबीटी बाबत निर्णय घेण्यात येईल, असे सांगण्यात आले.

जुन्या दराने वसुली
महापालिकेने पाणी पुरवठा योजना औरंगाबाद युटीलिटी कंपनीकडे दिली होती. त्यानंतर वीज नियामक आयोगाच्या निर्देशानुसार संबंधित कंपनीला वाणिज्यिक दरानुसार वीज बिल लावण्यात आले. आता पुन्हा शहराचा पाणी पुरवठा पालिकेकडे येताच, पूर्वीच्या सामान्य जुन्या दराने वीज बिल वसुली केली जात आहे, अशी माहिती महावितरण कार्यालयाकडून देण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘कार्तिकी’साठी जादा गाड्या

0
0



औरंगाबाद : कार्तिकी एकादशीनिमित्त आळंदीला जाण्यासाठी एसटी विभाग १५ नोव्हेंबरपर्यंत २१ जादा बस सोडणार आहे. त्याचबरोबर नांदेडहून पंढरपूरला जाण्यासाठी विशेष रेल्वे सोडण्यात आल्या आहेत.
आळंदीला जाण्यासाठी सिडको बसस्थानकातून २, मध्यवर्ती बसस्थानकातून ४, सिल्लोड २, पैठण २, कन्नड २, वैजापूर ४ , गंगापूर ४ आणि सोयगाव येथून १ बस सोडण्यात येणार आहे. पैठण येथे जाण्यासाठी शुक्रवारी २१ अतिरिक्त गाड्या सोडण्यात येणार आहेत.

नांदेडहून रेल्वे
कार्तिकी एकादशीनिमित्त पंढरपूरला जाण्यासाठी नांदेड विभागाने दोन रेल्वे सोडण्याचा निर्णय घेतला आहे. यात रेल्वे क्रमांक ०७५०१/०७५२५ आदिलाबाद-पंढरपूर आणि पंढरपूर–नांदेड मार्गे लातूर २ फेऱ्या करेल. ही रेल्वे ०७५०१ आदिलाबादहून पंढरपूरसाठी १० नोव्हेंबर रोजी दुपारी २.०० वाजता सुटेल. ती नांदेड येथे किनवट मार्गे सायंकाळी ६.४० वाजता पोहोचेल. ११ नोव्हेंबर रोजी ही गाडी सकाळी ०७.०० वाजता पंढरपूर येथे पोहचेल. परतीच्या प्रवासात रेल्वे क्रमांक ०७५२५ पंढरपूर ते आदिलाबाद ११ नोव्हेंबर रोजी सकाळी ०८.०० वाजता सुटेल आणि नांदेड येथे रात्री ८.४५ वाजता पोहोचेल.
रेल्वे (क्रमांक ०७५२४/०७५०२) नांदेड–पंढरपूर आणि पंढरपूर ते आदिलाबाद मार्गे लातूर ही रेल्वे २ फेऱ्या करेल. ही रेल्वे नांदेड येथून १५ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७.२५ वाजता सुटेल. ती परभणी, लातूर मार्गे पंढरपूर येथे दुसऱ्या दिवशी सकाळी ७ वाजता पोहचेल. परतीच्या प्रवासात रेल्वे क्रमांक ०७५०२ ही रेल्वे १६ नोव्हेंबर रोजी सकाळी ०८.०० वाजता निघून नांदेड येथे रात्री ८.४५ वाजता पोहचेल आणि नांदेड येथून ८.५० ला निघून आदिलाबाद येथे दुसऱ्या दिवशी ००.३० वाजता पोहचेल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रंगमंचावर अवतरले नेते-अभिनेते

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
इंद्रधनुष्य युवा महोत्सवाचा चौथा दिवस मिमिक्री कला प्रकाराने गाजला. शरद पवार, रामदास आठवले, बाळासाहेब ठाकरे, राज ठाकरे, अजित पवार, नरेंद्र मोदी या नेत्यांसह अभिनेते रंगमंचावर अवतरले. युद्धातील शस्त्रे, वाहने, पशू-पक्षी यांच्या आवाजाच्या हुबेहूब नकलांनी भरभरून प्रतिसाद मिळाला. मिमिक्रीत नावीन्य जपणाऱ्या स्पर्धकांनी चुरस वाढवली.
राज्यस्तरीय इंद्रधनुष्य युवा सांस्कृतिक महोत्सवात मंगळवारी वेरूळ रंगमंचावर मिमिक्री कला प्रकार सादर झाला. या स्पर्धेवरही ‘सैराट’ चित्रपटाची छाप दिसली. ‘सैराट’ सिक्वलच्या ऑडिशनसाठी नेते गेल्यानंतर उडणारी धमाल सादर करीत स्पर्धकांनी दाद मिळवली. रेल्वे प्रवासाला निघालेल्या नेते-अभिनेत्यांच्या जुगलबंदीला उपस्थितांची हसता-हसता पुरेवाट झाली. नेते रामदास आठवले यांच्या शैलीत कविता सादर करून स्पर्धकांनी हशा निर्माण केला. शरद पवार, बाळासाहेब ठाकरे, नरेंद्र मोदी, राज ठाकरे या नेत्यांची मिमिक्री सादर करण्यात आली. कवी अशोक नायगावकर, नाना पाटेकर, इरफान खान, नवाजुद्दीन सिद्दीकी, राजकुमार, शत्रूघ्न सिन्हा, सुनील शेट्टी, अजय देवगण, निळू फुले, मकरंद अनासपुरे, भरत जाधव, डॉ. श्रीराम लागू असे कलाकार मिमिक्रीच्या माध्यमातून रंगमंचावर अवतरले. उत्तम संकल्पनेत सर्वांना एकत्र आणण्याचा प्रयत्न विद्यार्थ्यांनी केला. रामायण चित्रपटाच्या ऑडिशनसाठी गेलेल्या अभिनेत्यांना आलेले अनुभव दाद देण्यासारखे होते. मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थिनीने शिनचॅन, नोबिका, डोरेमॉन या कार्टून पात्रांचे हुबेहूब आवाज काढले. गायिका, कार्टून पात्र, पशू-पक्षी यांचा सुरेख मेळ साधत विद्यार्थिनीने सर्वांचे लक्ष वेधले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या स्पर्धकाने वाहनांचे सुरेख आवाज सादर केले. मिमिक्री कला प्रकार पाहण्यासाठी गर्दी उसळली होती. देवगिरी रंगमंचावर समूह गायन स्पर्धा रंगली. देशभक्तिपर गीत आणि लोकगीत असा दुहेरी मेळ घालत स्पर्धकांनी बाजी मारली. ‘नगर नगर शहर शहर, नया गीत सुनायेंगे’ अशा उत्तम गीतातून स्पर्धकांनी संवाद साधला. ‘सागरा प्राण तळमळला’ ही रचना मुंबई विद्यापीठाच्या चमूने वेगळ्या चालीत गायली. वाद्य, वेशभूषा आणि सादरीकरणात वैविध्य ठेवत स्पर्धकांनी लक्ष वेधून घेतले.
‘भलरी दादा भलरी’, ‘मला जायाचं काळूबाईला’ अशा लोकगीतांवर उपस्थितांनी ठेका धरला. समूह गीत ऐकण्यासाठी नाट्यगृह गर्दीने फुलले. दुपारच्या सत्रात एकांकिका स्पर्धा पार पडली. तीन दिवस चाललेल्या एकांकिका स्पर्धेचा प्रेक्षकांच्या प्रतिसादात समारोप झाला. उत्तम संहिता, अभिनय आणि सादरीकरणाने एकांकिका प्रेक्षकांच्या पसंतीत उतरल्या.

महोत्सवात कलाकार
इंद्रधनुष्य महोत्सवासाचे परीक्षण करण्यासाठी चार दिवस विविध मान्यवरांनी हजेरी लावली. दिग्दर्शक हेमंत भालेकर, दिग्दर्शक शिव कदम, अभिनेते राजू पाटोदकर, गायक गणेश चंदनशिवे, दिग्दर्शक प्रमोद शेलार महोत्सवाला उपस्थित होते. मुंबई विद्यापीठाच्या संघात ‘स्लॅमबुक’ चित्रपटाचा अभिनेता शंतनू रांगणेकर सहभागी झाला. या मान्यवरांनी विद्यार्थी कलाकारांना मार्गदर्शन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुरातन पूल पाडला; नहर तोडली

0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
भूमिगत गटार योजनेच्या कामासाठी फाजलपुरा येथील सुमारे ४०० वर्ष जुना पूल पाडण्याचा महाप्रताप कंत्राटदाराने केला. यावेळी जेसीबीच्या धक्क्याने पुरातन नहर तुटली. या विध्वंसक कृत्याने स्थानिकांचा संताप अनावर झाल्याने त्यांनी काम बंद पाडले.
भूमिगत गटार योजनेचे काम महापालिकेतर्फे खिल्लारी इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीच्या माध्यामतून करून घेतले जात आहे. शहराच्या विविध भागात या कंपनीने ड्रेनेज लाइन टाकली. प्रामुख्याने नाल्यातून ड्रेनेज लाइन टाकण्याचे काम करण्यात आले. फाजलपुऱ्यातही कंपनीने काम सुरू केले. या भागातून वाहणाऱ्या नाल्यावर मोठा पूल बांधण्यात आला आहे. या पुलाच्या बांधकामातून नहरीचे पाइप देखील गेले आहेत. याच पुलाखालून ड्रेनेज लाइन टाकण्याचे काम कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी मंगळवारी सकाळी सुरू केले. पाइप टाकण्यासाठी पुलाची एक बाजू जेसीबीच्या सहाय्याने पाडण्यास सुरुवात केली. तेव्हा फाजलपुरा येथील नागरिक रस्त्यावर आले. त्यांनी भूमिगत गटार योजनेच्या कामाला विरोध केला. मलिक अंबरच्या काळातला हा पूल असून, पुलाच्या खालून नहरीचे पाइप गेले आहेत. हा पूल शहराचा ऐतिहासिक ठेवा आहे. त्यामुळे तो पाडणे योग्य नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली. दरम्यानच्या काळात महापालिकेच्या हेरिटेज कमिटीच्या सदस्य प्रा. दुलारी कुरैशी देखील दाखल झाल्या. त्यांनीही भूमिगत गटार योजनेच्या कामाला आक्षेप घेतला. कार्यकारी अभियंता अफसर सिद्दिकी देखील आले. त्यांनी कंपनीच्या कर्मचाऱ्यांना काम थांबवण्याचे आदेश दिले. दुपारी आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांनीही भेट दिली. परिस्थितीचा अंदाज घेऊन त्यांनीही काम थांबवण्याचे आदेश दिले.

बायपास करण्याचे होते ठरले
पूल पाडून ड्रेनेज लाइन न टाकता पुलाला बायपास करून ड्रेनेज लाइन टाकण्याची सूचना महापालिकेतर्फे कंपनीला देण्यात आली होती, पण कंपनीने ही सूचना न मानता थेट पूल पाडूनच ड्रेनेज लाइन टाकण्याचे काम सुरू केले. त्यामुळे चेलिपुरा ते जिल्हाधिकारी कार्यालय हा रस्ता रहदारीसाठी बंद झाला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रांगोळीतून उमटले भावरंग

0
0

औरंगाबाद ः देशाच्या सीमेवर आपले कर्तव्य बजावताना शहीद झालेल्या सैनिकांचा सन्मान करण्याचा संदेशापासून ते पाणी टंचाई, पर्यावरण, स्त्रीयांवरील अत्याचार, सांस्कृतिक महत्त्व अशा विविध विषयांवर रांगोळीतून ‘इंद्रधनुष्य’मध्ये विद्यार्थ्यांनी प्रकाश टाकला.
महोत्सवात मंगळवारी अंजिठा रंगमंचावर (स्टेज क्रमांक ४) येथे रांगोळी स्पर्धा झाली. विविध विद्यापीठातील १४ संघांनी यात सहभाग घेतला. रांगोळी काढण्यासाठी प्रत्येक स्पर्धकाला अडीच तासांचा कालावधी देण्यात आला होता. स्पर्धक विद्यार्थ्यांनी विविध विषयावर प्रकाश टाकत रांगोळी साकारली. यामध्ये देशासाठी शहीद झालेल्या सैनिकांचा गौरव करणारी रांगोळी साकारत ‘अमर जवान’चा संदेश दिला. स्पर्धकांनी आपल्या रांगोळीतून नवयुगाची निर्मिती, निसर्ग, पर्यावरणांचा संदेश देणारी रांगोळी साकारली. इंद्रधनुष्यचे महत्त्व सांगणारी सप्तरंगाचा इंद्रधनुष्य, पाणी टंचाईच्या प्रश्नावर रांगोळीतून ‘पाणी बचतीचा संदेश’ ही विद्यार्थ्यांनी दिला. विविध विषयांवर प्रकाश टाकला. काही स्पर्धकांनी रांगोळीला ‘थ्री डी’चा लूक दिला. स्पर्धकांनी आकर्षक अशा रांगोळी सादर करत, स्पर्धेत चुरस निर्माण केली.

स्पर्धकांनी टिपले निसर्गचित्र
‘स्पॉट फोटोग्राफी’ कलाप्रकारात सहभागी स्पर्धकांनी आपल्या कॅमेरातून उत्तम निसर्गचित्र टिपण्याचा प्रयत्न केला. स्पर्धेत सहभागी विद्यार्थी कलावंतांना विद्यापीठ परिसर, लेणी, विलोभनीय निसर्ग असे विषय देण्यात आला होता. स्पर्धकांनी आपल्या कॅमेरातून निसर्ग टिपण्याचा सुरेख प्रयत्न केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाहतूक व्यवस्थेअभावी कलावंतांचे हाल

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
राजभवनातर्फे आयोजित इंद्रधनुष्य महोत्सव डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात सुरू आहे. राज्यभरातील विविध विद्यापीठातील विद्यार्थी महोत्सवात सहभागी झाले आहेत. विद्यार्थ्यांना एका स्टेजपासून दुसऱ्या स्टेजपर्यंत जाण्यासाठी वाहतुकीची व्यवस्था करण्यात आलेली नाही. सोमवारी तर एकांकिका स्पर्धेसाठी आवश्यक त्या साहित्याचे ओझे डोक्यावर वाहून नेण्याची वेळ आली.
इंद्रधनुष्यसाठी राज्यातील २० विद्यापीठातील ८०० विद्यार्थी कलावंत इंद्रधनुष्यसाठी विद्यापीठात आलेले आहेत. महोत्सवातील विविध कलाप्रकारांचे चार स्टेजवर सादरीकरण सुरू आहे. मुख्य स्टेज हे नाट्यगृहात आहे. त्याला देवगिरी मंच असे नाव देण्यात आले आहे. त्यासह प्राणीशास्त्र विभागात ‘प्रतिष्ठान’, सीएफसी सभागृहात ‘वेरूळ’, तर ललितकला विभागात ‘अजिंठा’ हे व्यासपीठ उभारण्यात आले आहेत. महोत्सवासाठी आलेल्या विद्यार्थिनींची निवासाची व्यवस्था नवीन वसतिगृहात तर मुलांच्या निवासाची व्यवस्था क्रीडा विभागाच्या बाजूला असलेल्या तात्पुरत्या वसतिगृहात निवासाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. कलावंत विद्यार्थ्यांना एका व्यासपीठापासून दुसऱ्या व्यासपीठापर्यंत पायपीट करत जावे लागते. नाट्यगृहपासून इतर तीन व्यासपीठापर्यंतचे अंतर दूर आहे. तर निवास व्यवस्थेपर्यंतचेही अंतर दूर आहे. त्यामुळ विद्यार्थ्यांची अडचण होते. विविध कलाप्रकारांसाठी आवश्यक ते साहित्याची ने आण करण्यासाठी विद्यार्थ्यांची तारांबळ उडाल्याचे दिसले. सोमवारी एकांकिका स्पर्धा होत्या. एका विद्यापीठाच्या विद्यार्थी कलावंताना एकांकिकेसाठी लागणारे साहित्याचे ओझे वाहून न्यावे लागले.

सूचनानंतरही दुर्लक्ष
महोत्सवासाठी राज्यपाल कार्यालय विद्यापीठाला विविध सूचना करते. यामध्ये वाहतूक व्यवस्थेच्या सूचनेचा समावेश असल्याचे सूत्रांनी ‘मटा’ला सांगितले. सूचनेनंतरही विद्यापीठ प्रशासनाकडून दुर्लक्ष करण्यात आल्याचेही निरीक्षण नोंदविण्यात आल्याचे कळते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाचशे, हजाराच्या पेट्रोलची सक्ती

0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
बड्या नोटा बंद केल्यामुळे मंगळवारी रात्रीच पेट्रोल पंपावर उसळलेली गर्दी बुधवारीही कायम होती. अनेक पंपचालकांनी पाचशे, हजारांचे पेट्रोल भरण्याची सक्ती केली. त्यामुळे ग्राहक आणि कर्मचाऱ्यांत वाद झाला. त्यामुळे अनेकांनी सकाळीच पेट्रोल पंप बंद केले.
पेट्रोल पंपावर चिल्लरवरून पंप कर्मचारी आणि ग्राहकांमध्ये आज दिवसभर ठिकठिकाणी वादावादी झाली. पंपावरील परिस्थिती बिघडण्याची चिन्हे असल्याने पेट्रोल पंप चालक आणि जिल्हाधिकारी यांच्यात बुधवारी संध्याकाळी तातडीची बैठक घेण्यात आली. गुरुवारी पेट्रोल पंपावर शांतता बिघडण्याची शक्यता असल्यास पोलिसांची सुरक्षा देण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. शहरातील रिलायन्स पेट्रोल पंप खासगी मालकीचा आहे. त्यांना पाचशे, हजारांच्या नोटा स्वीकारण्याबाबत कोणतेही आदेश आले नाहीत. त्यामुळे शहरातील दोन्ही पेट्रोल पंप बंद ठेवल्याची माहिती, रिलायन्स पेट्रोल पंपाचे मालक दत्ताभाऊ पाथ्रीकर यांनी दिली. इस्सार पेट्रोल पंपावर पाचशे आणि हजाराच्या नोटा स्वीकारल्या जात नव्हत्या.

पंप पेटविण्याचा प्रयत्न
बुधवारी रात्री साडेआठच्या दरम्यान बाबा पेट्रोल पंपावर एक व्यक्ती आला. त्याने पाचशे रुपयांचे चिल्लर पेट्रोल पंप कर्मचाऱ्याकडे मागितले. चिल्लर नसल्याचे सांगताच त्या व्यक्तीने पंप पेटवून देण्यासाठी आगपेटी काढली. या व्यक्तीला पेट्रोल पंप कर्मचाऱ्यांने रोखले. त्याला पकडून पोलिसाला कळवण्यात आले. मात्र, तोपर्यंत तो व्यक्ती पळून गेल्याची माहिती पेट्रोल पंपाचे झेक्झियस प्रिंटर यांनी दिली.

अनेक पेट्रोल पंपावर लांबच लांब रांगा लागल्या होत्या. पेट्रोल पंप चालकांकडेही चिल्लर नसल्याने अनेक ठिकाणी वादावादी झाली. याचा फटका पेट्रोल पंपाला बसतो आहे. - हितेन पटेल कोषाध्यक्ष, औरंगाबाद पेट्रोल ‌डिलर्स असोसिएशन

मोंढ्यात ९० टक्के व्यवहार बंद
जाधववाडी मोंढ्यातील सुमारे ९० टक्के व्यवहार बुधवारी बंद होते. उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीत नोटांचा प्रश्न बिकट झाला होता. शंभर, पन्नास, वीस आणि दहांच्या नोटांचा तुटवडा जाणवत होता. हमाल व मापाडींनी दिवसभरात बिनपगारी काम केले. मोंढ्यातील ज्येष्ठ व्यापारी हरीश पवार यांनी सांगितले की, ‘मोंढ्यात सुमारे ८० ते ९० दुकाने आहेत. याशिवाय भाजीपाल्यांचाही लिलाव होतो. आज हा व्यवहार ठप्प होता. मक्याची मंगळवारपर्यंत सुमारे १८०० ते २००० क्विंटल एवढी आवक होत होती. बुधवारी ही आवक एकदम घटून २०० ते २५० क्विंटलवर आली. हमाल-मापाडींनी फुकटात काम केले. १० ते १५ कोटींचे व्यवहारास व्यापारी वर्गास मुकावे लागले. शेतकरीही गावाकडून माल घेऊन आले नाहीत. नेहमी सिल्लोड, फुलंब्री, सोयगाव, पळशी यासह जिल्ह्यातून शेतकरी येतात. आज या शेतकऱ्यांनी पाठ फिरवली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रुग्ण, नातेवाईकांची तारांबळ

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
पंतप्रधानांनी मंगळवारी रात्री केलेल्या भाषणात केवळ सरकारी रुग्णालयांमध्येच पाचशे व हजार रुपयांच्या नोटा स्वीकारल्या जातील, असे जाहीर केल्यामुळे बुधवारी बहुतांश खासगी रुग्णालयांमध्ये, रक्तपेढ्यांमध्ये व छोट्या क्लिनिकमध्ये या रुपयांच्या नोटा स्वीकारल्या नाहीत. त्यामुळे क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, चेक नसलेले रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांचे दिवसभर मोठे हाल झाले. त्यातही ग्रामीण भागातील व सामान्यांनी धावपळ झाली आणि अनेक ठिकाणी वादावादीचेही प्रसंग उद्भवले. त्याचवेळी अनेक रुग्णालयांनी ‘क्रेडिट’ देऊन उपचार दिल्याचेही दिसून आले.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयावर (घाटी) या निर्णयाचा कुठलाच परिणाम दिसून आला नाही. सर्व व्यवहार नेहमीप्रमाणेच सुरू होते, मात्र खासगी क्लिनिक; तसेच रुग्णालयांमध्ये या निर्णयाचा परिणाम बुधवारी सकाळपासूनच दिसून आला. अनेक खासगी रुग्णालयांमध्ये पाचशे व हजार रुपयांच्या नोटा स्वीकारल्या जाणार नसल्याचे फलक लावले होते. शहरातील बहुतांश खासगी रुग्णालयांचे ओपीडी शुल्क हे सुमारे १०० ते ३०० रुपयांपर्यंत आहे आणि हे शुल्क भरण्यासाठी अनेकांकडे १०० रुपयांच्या नोटा नव्हत्या. त्यामुळे अनेक ठिकाणी वादावादी झाली. ‘खासगी रुग्णालयांनाही या नोटा स्वीकारण्याचे आदेश आहेत व त्यामुळे रुग्णालयांनी या नोटा स्वीकारव्यात,’ असाही तगादा लावण्यात येत होता.
‘आयपीडी’मध्ये दाखल करताना किंवा सुटी होताना बिल भरण्यासाठी, तसेच दाखल रुग्णांना औषधे आणण्यासाठी ही अडचण प्रामुख्याने दिसून आली. ग्रामीण भागातून आलेले अनेक रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांकडे क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, चेकबूक नव्हते. त्यामुळे करावे काय, असा प्रश्न त्यांच्यासमोर होता. अनेक रुग्णांचे नातेवाईक अनेक तास ताटकळत उभे असल्याचे चित्र जवळजवळ सगळ्याच खासगी रुग्णालयांमध्ये होते. अनेक रुग्णालयांमध्ये अशा रुग्ण व नातेवाईकांना ‘क्रेडिट’ दिले गेले, हमीपत्र लिहून घेऊन रुग्णसेवा देण्यात आली. त्याचबरोबर रुग्णालयांमध्ये ऑनलाइन व क्रेडिट कार्ड-डेबिट कार्डचे व्यवहार अचानक वाढल्याचे दिसून आले. अशीच परिस्थिती थोड्या-बहुत फरकाने औषधी दुकानांवर होती. काहीजण एकमेकांचे पैसे देतानाही दिसून आल्याचे वेगळे चित्र रुग्णालयांमध्ये पाहायला मिळाले.

आधी जमा करून घेतले पैसे
समर्थनगरातील एका क्लिनिकमध्ये संबंधित डॉक्टरांनी रुग्णांना तपासण्याआधीच रुग्णांकडून पैसे जमा केले जात होते. १००च्या नोटा असणाऱ्यांचा रांगा लावून व पैसे भरल्यानंतरच रुग्णांना डॉक्टरांकडे पाठवण्यात येत होते. त्यामुळे रुग्ण व नातेवाईक त्रासून गेले होते.

सर्व ठिकाणी अडचणी
मी बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यातील खेर्डा गावातील असून, दोन दिवसांपासून माझे नातेवाईक जवाहर कॉलनी परिसरातील एका हॉस्पिटलमध्ये दाखल आहे. माझ्याकडे क्रेडिट कार्ड, चेकबुक नाही. त्यामुळे आज रक्तपेढीपासून औषधी दुकानांपर्यंत सर्व ठिकाणी अडचणी आल्या, असे रुग्णाचे नातेवाईक विलास राजपूत यांनी सांगितले.

आम्ही रद्द झालेल्या रुपयांच्या नोटा स्वीकारल्या नाहीत. पैसे देण्याची कुठलीच सोय नसलेल्यांकडून हमीपत्र घेऊन त्यांना रुग्णसेवा देण्यात आल्या. एकही रुग्ण उपचाराशिवाय वापस गेला नाही. आज दिवसभर रुग्ण-नातेवाईकांची धावपळ झाली, हे निश्चित.
- डॉ. अनंत पंढरे, वैद्यकीय संचालक, डॉ. हेडगेवार रुग्णालय

रद्द केलेल्या नोटा रुग्णालयात स्वीकारल्या नाहीत. ‘क्रेडिट’वर रुग्णांवर उपचार केले, रुग्णांना दाखलही करून घेतले. कुठल्याही परिस्थितीत तातडीची रुग्णसेवा नाकारली नाही, मात्र रुग्ण-नातेवाईकांची तारांबळ उडाली.
- डॉ. व्यंकट होळसांबरे, मनुख्य कार्यकारी अधिकारी, कमलनयन बजाज हॉस्पिटल

आम्ही ‘आयडी प्रुफ’ घेऊन पाचशे व हजार रुपयांच्या नोटा स्वीकारल्या. त्यामुळे आमच्याकडे कुठेही अडचण आली नाही.
- डॉ. अनंत कुलकर्णी, इन्टेसिव्हिस्ट, आधार हायटेक हॉस्पिटल

स्पष्ट आदेशामुळेच आम्ही या नोटा स्वीकारल्या नाहीत. रुग्णांवर उधारीवर उपचार केले व औषधेही दिली. कोणतीही रुग्णसेवा ही तातडीच्या सेवेमध्ये मोडते व म्हणूनच केंद्र सरकारने तातडीने अध्यादेश काढून खासगी रुग्णालयांनादेखील या नोटा स्वीकारण्याचे आदेश दिले पाहिजे.
- डॉ. उल्हास कोंडपल्ले, वैद्यकीय संचालक, माणिक हॉस्पिटल

मी माझ्या दुकानात ५००-१००० रुपयांच्या नोटा स्वीकारल्या, मात्र ग्राहकांना पैसे परत देण्यासाठी १०० रुपयांच्या नोटा नसल्याने मोठी अडचण येत आहे. तरीदेखील ओळखीच्या लोकांना उधारीवर औषधे दिली.
- आशिष कोटगिरे, मेडिकल दुकानचालक

केंद्र सरकार या संबंधी रात्रीपर्यंत अध्यादेश काढून खासगी रुग्णालयांना पाचशे व हजार रुपयांच्या नोटा स्वीकारण्याबाबत स्पष्ट करणार असल्याचे समजते. असे झाले नाही तर मात्र ‘आयएमए’च्या राष्ट्रीय पातळीवरील संघटनेमार्फत निवेदान देऊन याकडे लक्ष वेधण्यात येणार आहे.
- डॉ. जयेश लेले, राज्य अध्यक्ष, आयएमए

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


वातानुकूलित डब्यांचे तिकीट बुकिंग बंद

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
केंद्र सरकारने पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा बंद केल्यानंतर रेल्वे विभागाकडे चलन टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे रेल्वेने गुरुवारी दुपारपासून एसी डब्यांचे तिकीट बुकिंग बंद केले. त्यामुळे रेल्वे प्रवाशांची गैरसोय झाली. याआधी तिकीट बुकिंग केलेल्या प्रवाशांना ११ नोव्हेंबरनंतर पैसे परत करण्यात येणार आहेत, असे परिपत्रक दक्षिण मध्य रेल्वेला काढले आहे.
औरंगाबाद रेल्वे स्टेशनवर आरक्षण कार्यालयात आलेले प्रवाशी तिकीट बुकिंगसाठी पाचशे किंवा हजार रुपयांच्या नोटा देत होता. यामुळे आरक्षण कार्यालयात शंभर, पन्नास, वीस व दहा रुपयांच्या नोटांचा तुटवडा निर्माण झाला. अशीच ‌परिस्थिती तिकीट बुकिंग काउंटरवरही झाली होती. तेथे रेल्वे कर्मचारी आणि ग्राहकांमध्ये पाचशेच्या नोटांवरून वाद होत होता. रेल्वे स्टेशनच्या फलाटावर दुकानांवर पाचशेच्या नोटा घेऊन बाटलीबंद पाणी किंवा खाद्यपदार्थ घेण्यासाठी अनेक प्रवासी थांबले होते.
रेल्वे आरक्षण कार्यालयावर तिकीट रद्द करण्यासाठी आलेल्या प्रवाशांना एक विशेष फार्म भरून रेल्वेत जमा करावा लागत होता. रेल्वे विभागाने सध्या सुटे पैसे नसल्याने तिकीट रद्द केल्यावर प्रवाशांना काही दिवसांनंतर पैसे परत करण्यात येणार आहेत. है पैसे थेट ग्राहकांच्या पत्यावर पाठविण्यासाठी विशेष फार्म भरून घेतला आहे.
एसी क्लासच्या टू टिअर तिकिटांची बुकिंगही बंद करण्याचे आदेश रेल्वे विभागाकडून देण्यात आले आहेत. याबाबत रेल्वे विभागाच्या अधिकाऱ्यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, टू टिअर एसी तिकीट खरेदी करण्याच्या प्रक्रियेचा वापर काळा पैसे चलनात आणण्यासाठी होण्याची शक्यता असल्याने ही कार्यवाही करण्यात अाली आहे.

जेवण देण्याचे नाकारले
रेल्वे प्रवासादरम्यान अनेक जणांनी प्रवाशांनी पॅन्ट्री कारला जेवणाची ऑर्डर दिली होती. जेवणाची ऑर्डर घेताना तेथील कर्मचारी सुट्या पैशांची विचारणा करीत होते. अनेक प्रवाशांकडे पाचशे रुपयांच्या नोटा असल्याने त्यांना जेवण न देण्याचा निर्णय पॅन्ट्री कार चालकांनी घेतल्याची माहिती रेल्वेच्या प्रवाशांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कर वसुलीला दोन लाखांचा फटका

0
0

औरंगाबाद : मालमत्ता कर वसुलीला बुधवारी दिवसभरात दोन लाखांचा फटका बसला. दररोज सरासरी २० लाख रुपयांचा मालमत्ता कर जमा होतो. गुरुवारी १७ लाख ८५ हजार रुपयांचा कर जमा झाला. मोबाइल टॉवर्सच्या कंपन्यांनी अचानकपणे कर भरल्यामुळे मालमत्ता कराची दिवसभराची वसुली ५१ लाख ३४ हजारांवर पोचली. दरम्यान, महापालिकेच्या प्रशासनाने बँकेकडे आणखी स्वॅपिंग मशीन्सची मागणी केली आहे.
पंतप्रधानांनी पाचशे आणि एक हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाद केल्याची घोषणेचा परिणाम सर्वच क्षेत्रावर दिसून आला. महापालिकेच्या मालमत्ता कर वसुलीवरही त्याचा परिणाम झाला. करापोटी रोख रक्कम भरणारे नागरिक गुरुवारी वॉर्ड कार्यालयांमध्ये फारच कमी संख्येने आले. बहुतांश नागरिकांनी चेकच्या माध्यमातून कर भरला, अशी माहिती लेखा विभाग व कर आकारणी-वसुली विभागातर्फे देण्यात आली. दिवसभरात ५१ लाख ३४ हजार रुपयांचा मालमत्ता कर पालिकेच्या तिजोरीत जमा झाला. त्यात मोबाइल टॉवर्सच्या कंपन्यांच्या ३४ लाख रुपयांचा समावेश आहे. मालमत्ता करापोटी नागरिकांकडून १७ लाख ८५ हजार रुपये जमा झाले. नागरिकांनी धनादेशाद्वारे हा कर जमा केला, अशी माहिती मिळाली आहे.

स्वॅप मशीनची मागणी
नागरिकांना एचडीएफसी बँकेत जाऊन महापालिकेच्या नावावर कर भरावा लागतो. महापालिकेच्या ६ झोन कार्यालयांत एचडीएफसी बँकेने स्वॅप मशीन दिले आहेत. महापालिकेने बँकेकडे आणखी २५ मशीन्सची मागणी केली आहे, अशी माहिती आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांनी दिली. दिवसभरात बँकेने १७ मशीन्स महापालिकेला उपलब्ध करून दिल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सोन्याने घेतली सहा हजाराने उसळी

0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
सोन्याने बुधवारी तब्बल सहा हजाराने उसळी मारली. तोळ्यामागे २८ ते २९ च्या दरम्यान असणारा दर ३४ हजार ५०० रुपयांवर पोहचला. त्यामुळे बहुतांश पेढ्यांकडे ग्राहकांनी पाठ फिरवली. काही नामवंत सराफा व्यावसायिकांनी आपली दुकाने बंद ठेवली.
मंगळवार रात्रीपासूनच सराफा पेढ्यातील व्यवहार कमी झाले होते. बुधवारी अचानक सोन्याचे दर वाढल्याने व्यवहार जवळपास बंद झाले. नागरिकांनी उत्सुकतेपोटी फक्त सोन्याचे दर किती झाले, याची विचारणा करत पेढ्यांवर दूरध्वनीवरून संपर्क साधला. गुरुवारीही हीच परिस्थिती कायम असेल. सोमवारपासून सराफा बाजारात व्यवहार सुरळीत होतील, असा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत.

शिल्लक पैक्याची रणनीती
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा बंद केल्याची घोषणा करताच एकच खळबळ उडाली. चिंताग्रस्त व्यापाऱ्यांनी या विषयावर चर्चा करण्यासाठी गटागटाने जवळचे हॉटेल, बार, परमीटरूम गाठले. या ठिकाणी फक्त मोदींच्या घोषणेचे अर्थव्यवस्थेवर होणारे परिणाम, खरेच काळा पैसा बाहेर येईल का अशा नाना विषयांवर गप्पा आणि चर्चांचे फड रंगले. मोदी यांनी मंगळवारी रात्री नऊ वाजता बड्या नोटा बंदीची घोषणा झाली. ज्यांच्याकडे लाखोंच्या संख्येने हजार पाचशे रुपयांच्या नोटा आहेत, त्यांना या गोष्टीचा झटका बसला. शहरात देखील या घोषणेने रात्री दहानंतर एकच खळबळ उडाली. अनेक व्यापाऱ्यांचे भागीदारीत किंवा एकत्रित समूह करून व्यवसाय सुरू आहेत. ही व्यापारी तसेच उद्योजक मंडळी या घोषणेने हादरली. या विषयावर तत्काळ चर्चा करणेही आवश्यक होते. त्यातील अनेकांनी एकमेकांना फोनाफोनी केली. आता अचानक भेटायचे कुठे, असा प्रश्न निर्माण झाला. तेव्हा अनेकानी जिथे जमेल तिथे जवळचे हॉटेल, बार, परमिट रूम गाठले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रजिस्ट्री कार्यालयात मालमत्तांची नोंदणी मंदावली

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
हजार आणि पाचशे रुपयांच्या नोटा रद्द केल्यानंतर बुधवारी औरंगाबादेत रजिस्ट्री कार्यालयातील कामकाज मंदावले. रजिस्ट्रीचे सर्व व्यवहार ऑनलाईन होत असले, तरी बँका बंद असल्यामुळे चलान काढता आले नाहीच. त्यामुळे रजिस्ट्री कार्यालयात केवळ गहाण खत, इसार पावती, भाडे करार नोंदणींसह अन्य किरकोळ व्यवहार झाले.
व्यवहारातून पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा बाद करण्याच्या निर्णयानंतर कायम गजबजलेल्या नोंदणी व मुद्रांक विभागाच्या कार्यालयात (रजिस्ट्री ऑफिस) शुकशुकाट होता. जिल्हाधिकारी कार्यालयागील बाजुला आणि बीड बायपास रोडवर तीन कार्यालये आहेत. या सर्व कार्यालयांत गुरुवारी किरकोळ व्यवहारांची नोंदणी करण्यात आली. या कार्यालयांत कोणत्याही मोठ्या व्यवहारांची नोंद झाली नाही. त्यामुळे या कार्यालयांत शुकशुकाट होतो.
जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात असलेल्या जिल्हा मुद्रांक कार्यालयाच्या तीन विभागात दररोज किमान २० ते २५ मालमत्तांच्या खरेदी-विक्री व्यवहारांची नोंदणी करण्यात येते. व्यवहारातून नोटा बंद करण्यात आल्यामुळे दस्तनोंदणीचे व्यवहार मंदावले. शुकवारी कार्यालयामध्ये केवळ गहाण खत, इसार पावती, भाडे करारनामा; तसेच इतर किरकोळ अशा केवळ ८ ते १० व्यवहारांची नोंदणी करण्यात आली.
मालमत्तांच्या खरेदी-विक्री व्यवहाराला ‘ब्लॅक’ आणि ‘व्हाइट’ची किनार असते. एखाद्या मालमत्तेचा व्यवहार कागदोपत्री ठरल्यानुसार त्याचे रजिस्ट्री शुल्क भरण्यात येते आणि उर्वरित ठरलेली रक्कम ही संबंधितांना ‘ब्लॅक मनी’ स्वरुपात देण्यात येते. अशा व्यवहारात हजार, पाचशे रुपयांच्या नोटांचा वापर करण्यात येतो. त्याशिवाय मुद्रांक शुल्क डीडी (धनाकर्ष) स्वरुपात जमा केले जाते. त्याचबरोबर काही व्यवहारात हे शुल्क बँक चलान स्वरुपात भरले जाते. नोटाबंदीच्या निर्णयामुळे गुरुवारी हे व्यवहार झाले नाहीत. ज्यांनी काही दिवसांपूर्वी चलान भरून अन्य कागदपत्रांची पूर्तता केली आहे, अशा नागरिकांच्या व्यवहारांची नोंदणी करण्यात आली.

काही दिवस व्यवहार थंडावणार
नोटाबंदीच्या निर्णयामुळे बाजारात मोठे व्यवहार होण्याची चिन्हे कमी असल्यामुळे काही दिवसांसाठी मालमत्ता खरेदी-विक्रीच्या नोंदणीते काम मंदावण्याची शक्यता आहे. येत्या दोन दिवसांमध्ये बँकांचे व्यवहार सुरळीत होणार असले, तरी एका खातेदारांना मर्यादित पैसे काढण्याची मुभा आहे. त्याचा परिणाम येणाऱ्या काही दिवसांत रजिस्ट्रीवर होण्याची चिन्हे आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रजिस्ट्री न झाल्यामुळे बांधकाम क्षेत्रात टेन्शन

0
0

औरंगाबाद : केंद्र सरकारने पाचशे, हजार रुपयांच्या नोटा रद्द केल्याने बुधवारी बँका बंद राहिल्याने बांधकाम क्षेत्रात टेन्शन होते. शहरवासीयांनी रजिस्ट्री न करण्यावर भर दिल्याने त्यात भर पडली. औरंगाबादमध्ये रजिस्ट्री कार्यालयात केवळ काही किरकोळ व्यवहारांची नोंदणी करण्यात आली. यापुढे आता या व्यवहारात पारदर्शकता येईल आणि शिस्त लागेल, असे बांधकाम व्यावसायिकांचेच म्हणणे आहे.
छोट्या गृह प्रकल्पात असेही गृहकर्जाशिवाय व्यवहार होत नाहीत. ते आता १०० टक्के पारदर्शकता येतील. यापुढे बिल्डर्सकडून त्यांच्या गृहप्रकल्पांच्या किंमतीही कमी होण्याची शक्यता आहे, असे तज्ज्ञ सांगतात.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा रद्द करून ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. भ्रष्टाचार, काळा पैसा यांवर निर्बंध येणार आहे. शिस्त लावण्याचा हा प्रयत्न आहे. आगामी काळात बिल्डर्सही सावध पवित्रा घेतील. ‘एलआयजी’ आणि ‘एमआयजी’ वर्गातील घरांची विक्रीसाठी बँकांकडून कर्ज घेतले जाते. घरे खरेदी-विक्रीच्या व्यवहारात भविष्यात आणखी पारदर्शकता आणि शिस्त लागेल, असे मत क्रेडाईचे सचिव विकास चौधरी यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images