Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

जालन्यात २१ लाखांची रोकड जप्त

$
0
0

जालना : जालन्यात निवडणूक विभागाच्या पथकांनी सोमवारी दुसऱ्या दिवशी केलेल्या दोन वेगवेगळ्या कारवाईत २१ लाखांची रोकड जप्त केली. नगर पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या कारवायांमुळे खळबळ उडाली आहे.
कन्हैयानगर चौफुलीवर, सायंकाळी चिखली येथून येणारी गाडी (एमएच १५ इपी ७९६५) तपासली असता त्यामध्ये राजमल घेवरचंद मुलोद (वय ४८, रा. लासलगाव, ता. निफाड जि. नाशिक) यांच्याजवळ १००० व ५०० रुपयांच्या नोटा आढळल्या. ही रक्कम ६.१५ लाख रुपये होती. कार्यकारी अभियंता एम. एम.
बजंत्री यांच्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल झाला आहे. दुसऱ्या कारवाईत नांदेड येथून येणारी गाडी (एमएच २६ व्ही ५६९) तपासली असता त्यात लक्ष्मण माणिकराव येजगे (वय ५४ रा नांदेड, नोकर, भवानी मिश्र फर्टिलायझर्स) यांच्याजवळ १००० व ५०० रुपयांच्या नोटा आढळल्या. ही रक्कम १५ लाख रुपये होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


चिंतामणी पार्श्वनाथांच्या दर्शनासाठी गर्दी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
श्री १००८ चिंतामणी पार्श्वनाथ दिगंबर जैन अतिशय क्षेत्र कचनेर येथे वार्षिक यात्रा महोत्सव रविवारपासून सुरू झाला. सोमवारी मुख्य दिवशी लाखो भाविकांनी भगवंतांचे दर्शन घेतले. मुख्य महामस्तकाभिषेक सोहळा उत्साहात पार पडला.
आचार्य गुप्तीनंदजी महाराज, आचार्य सचितानंद महाराज, गिरनारसागर महाराज, सुयेशगुप्ती महाराज, आचार्य चंद्रगुप्त महाराज, आर्यिका कुलभुषणमती माताजी, आर्यिका आस्थाश्री माताजी, आर्यिका सुनिधीमती माताजी, आर्यिका सुनितीमती माताजी, आर्यिका विनम्र्रमती माताजी,क्षुल्लक धर्मगुप्तजी, क्षुल्लिका धन्यश्री माताजी यांच्यासह हस्तिनापूर मंदिराचे पीठाधीश रवींद्रकिर्तीजी स्वामी आदींची प्रमुख उपस्थिती होती.
महामस्तकाभिषेकाचा बोलिया होऊन भक्तांना विविध बहुमान मिळाले. बोलियाचे वाचन क्षेत्राचे व्यवस्थापकीय संचालक सुरेश कासलीवाल यांनी केले. यात्रा महोत्सवाच्या मुख्य सोहळ्यास सकाळी सहापासून भक्तांची गर्दी झाली होती. यात्रा महोत्सवात गुरू परिवाराच्या वतीने रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. महोत्सवाच्या मुख्य सोहळयास न्या. कैलास चांदीवाल, आमदार संदीपान भुमरे, आमदार संजय पाटील, तहसीलदार सोनी आदींची प्रमुख उपस्थिती होती. यात्रा महोत्सव यशस्वी करण्यासाठी विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष डी. यू. जैन, उपाध्यक्ष माणिकचंद गंगवाल, व्यवस्थापकीय संचालक सुरेश कासलीवाल, विश्वस्त केशरीनाथ जैन, संजय कासलीवाल, प्रकाश पाटणी, दिलीप काला, कार्यकारिणी मंडळाचे अध्यक्ष प्रमोद कासलीवाल, सचिव भरत ठोळे आदींनी पुढाकार घेतला.

नोटाबंदीला पाठिंबा द्या
यावेळी आचार्य गुप्तीनंदी गुरुदेव यांनी चिंतामणी पार्श्वनाथ भगवंतांच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकला. ते म्हणाले,‘सरकारने घेतलेल्या निर्णयाला पाठिंबा द्या. या निर्णयाचा आज तुम्हाला थोडा त्रास सहन करावा लागत असेल, परंतु या पुढील दिवस हे तुमचे सुखाचे दिवस असतील. शहीद जवानांच्या कुटुंबीयांना मदत करा.’

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आम्हाला द्या सुट्ट्या नोटा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
पेट्रोल पंप चालकांना सुट्या नोटा देण्यात याव्यात, अशी मागणी औरंगाबाद पेट्रोल पंप डिलर्स असोसिएशनने बँकांकडे केली आहे. पाचशे, हजार रुपयांच्या नोटा २४ नोव्हेंबरपर्यंत पेट्रोल पंपावर स्वीकारण्यात येणार अाहेत. पेट्रोल पंपांवर ग्राहकाने पाचशे किंवा हजार रुपयांची नोट दिल्यानंतर परत देण्यासाठी सुट्या नोटा नसल्यामुळे वादाचे प्रसंग निर्माण होत आहेत. या पार्श्वभूमीवर ही मागणी करण्यात आली आहे.
पाचशे आणि हजाराच्या नोटा बंद करण्याची घोषणा करताच औरंगाबाद शहरात पेट्रोल पंपावर तुफान गर्दी जमा झाली होती. पेट्रोल पंप चालकांकडे ग्राहकांना उर्वरिक रक्कम देण्यासाठी सुट्या नोटा नव्हत्या. त्यामुळे ग्राहकांना पाचशे किंवा हजार रुपयांचे इंधन घेण्याची सक्ती केली जात होती.
बंद केलेल्या नोटा पेट्रोल पंपांवर स्वीकारण्यात येतील, असे सरकारने जाहीर केले. त्यामुळे सलग ‌तीन दिवस पेट्रोल पंपांवर गर्दी होती. पाचशे आणि हजारांच्या नोटांमुळे पेट्रोल पंप चालकांचा इंधन विक्रीचा व्यवसाय वाढला आहे. दररोज एका पेट्रोल पंपावर ११ हजार ते १२ हजार लिटर पेट्रोलची विक्री होत असते. नोटाबंदीच्या निर्णयानंतर त्यात वाढ झाली. गेल्या तीन दिवसांत एका पंपावर रोज १६ हजार लिटर पेट्रोल विकण्यात येत असल्याची नोंद आहे.
शहरातील एटीएममधून सुट्या नोटा मिळत नाहीत. त्यामुळे पेट्रोल पंपावर आलेले ग्राहक आता शंभर किंवा दीडशे रुपयाचे पेट्रोल घेऊन पाचशेची नोटा देत आहेत. पेट्रोल पंप चालकांकडे परत देण्यासाठी सुट्या नोटा नसल्याने ग्राहक आणि पेट्रोल पंप कर्मचारी यांच्यात वाद होत आहेच. आगामी काळात हे वाद वाढण्याची शक्यता आहे. यामुळे सुट्या नोटा देण्यात याव्यात, अशी मागणी पेट्रोल पंप चालक असोसिएशनने बँकांकडे केली आहे. पाचशे आणि हजारांची नोट जमा करण्याची परवानगी देणाऱ्या सरकारने पेट्रोल पंपाला सुट्ट्या नोटांचा पुरवठा करून ग्राहकांची होणारी हेळसांड थांबवावी, अशी संघटनेची मागणी आहे.

विक्री वाढली
औरंगाबाद शहरात दररोज तीन लाख लिटर पेट्रोलची विक्री होते, मात्र नोटाबंदीनंतर पेट्रोल विक्रीत सव्वाचार लाख लिटरपर्यंत वाढ झाल्याची माहिती पेट्रोल पंप डिलर्स असोसिएशनकडून देण्यात आली.

पेट्रोल पंपावर सुट्टे पैसे मागण्यासाठी ग्राहकांची गर्दी होत आहे. बँकांनी ‌दिलेल्या सुट्या पैशांमतील एक-एक रुपयाचा हिशेब आमच्याकडून घ्यावा, मात्र ग्राहकांची होणारी हेळसांड थांबविण्यासाठी आम्हाला सुट्या नोटा देण्याची मागणी बँकांकडे केली आहे.
- अखिल अब्बास, सचिव, औरंगाबाद पेट्रोलिअम, ऑइल डिलर्स असोसिऐशन

शहरात पेट्रोल पंप
बीपीसीएल ः ९
आयओसी ः २१
एचपीसीएल ः ११
रिलायन्स ः २
इस्सार ः १

जिल्ह्यात पेट्रोल पंपाची संख्या
बीपीसीएल ः ३१
आयओसी ः ४५
एचपीसीएल ः ३६

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अयप्पा मंदिरात दर्शनासाठी गर्दी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, सातारा
कार्तिक पौर्णिमेनिमित्त बीड बायपासवरील अयप्पा मंदिरात कार्तिक स्वामींच्या दर्शनासाठी सोमवारी हजारो भाविकांनी गर्दी केली. सकाळपासूनच दर्शनाला सुरुवात झाली असली तरी दर्शनासाठीचा मुहूर्त दुपारनंतर असल्यामुळे यावेळेत भाविकांच्या रांगा लागल्या होत्या. त्यात महिलांची संख्या मोठी होती.
पहाटे साडेचारपासून श्री कार्तिक स्वामी दर्शन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. भाविकाची गर्दी लक्षात घेता बीड बायपासहून जवळच असलेल्या गणपती मंदिराजवळच्या मैदानावर पार्किंगची व्यवस्था करण्यात आली होती. तेथून बॅरिकेट लावून रस्ता बंद करण्यात आला होता. कार्तिक स्वामींचे वाहन मोर असल्यामुळे मोराचे पीस अर्पण केल्यावर मनोकामना पूर्ण होते, असे मानले जाते. दर्शनासाठी येणारे भाविक मोरपीस अर्पण करत होते. विश्वस्तांकडून अन्नदान करण्यात आले.
सायंकाळी सहा वाजता ७५० दिवे लावण्यात आले. यासाठी मंदिराच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष राजन नायर, सेल्वकुमार, राजन नायर, टी. एन. राजन, विनोद पिल्लई, राधाकृष्ण पिल्लई, यू. के. नायर यांनी परिश्रम घेतले. मंदिर परिसरात पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मालमत्ता कराचे आठ कोटी जमा

$
0
0

विकास कामांना वेगाची अपेक्षा
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
गेल्या पाच दिवसांत मालमत्ता कराची वसुली आठ कोटी रुपयांलर पोचली आहे. महापालिकेच्या इतिहासात एवढी विक्रमी वसुली प्रथमच झाली आहे. करापोटी जमा झालेल्या रक्कमेतून विकास कामांना वेग येईल असे बोलले जात आहे.
केंद्र सरकारने ८ नोव्हेंबर रोजी पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाद केल्या. त्यानंतर नऊ नोव्हेंबरपासून महापालिका व नगर पालिकांना पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटांच्या माध्यमातून मालमत्ता कर व पाणीपट्टी भरून घेण्याची मुभा सरकारने दिली. सुरुवातीला ही मुभा ११ नोव्हेंबरच्या रात्री बारापर्यंत होती. त्यानंतर त्याची मुदत १४ नोव्हेंबरच्या रात्री बारापर्यंत वाढवण्यात आली. कर भरून घेण्यासाठी शासनाने दिलेली मुदत सोमवारी संपत असल्यामुळे महापालिकेने कर भरून घेण्यासाठी मोठी तयारी केली. वॉर्डावॉर्डांतून अॅटोरिक्षा फिरविल्या. रिक्षांमधून अनाउंसमेंट करून नागरिकांना कर भरण्यासाठी आवाहन करण्यात येत होते. महापालिकेची नऊ वॉर्ड कार्यालये आहेत, पण त्यापैकी सहा वॉर्ड कार्यालयांमधूनच कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या वॉर्ड कार्यालयांमध्ये कर भरण्यासाठी येणाऱ्या नागरिकांची गैरसोय होऊनये म्हणून विशेष काळजी घेण्यात आली होती.
कर वसुलीसंदर्भात महापालिकेतर्फे देण्यात आलेल्या माहितीनुसार रविवारपर्यंत मालमत्ता कराची वसुली ६ कोटी ६७ लाख रुपये झाली होती. सोमवारी रात्री आठपर्यंत १ कोटी २९ लाख रुपयांचा मालमत्ता कर वसूल झाला. त्याशिवाय पाणीपट्टीपोटी ३३ लाख ८६ हजार रुपये पालिकेच्या तिजोरीत जमा झाले. रात्री बारापर्यंत यात किमान २० लाखांची भर पडेल असे मानले जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चार दिवसांत बारा कोटींचा भरणा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
सरकारने पाचशे व हजारांच्या नोटा रद्द केल्यानंतर वीज बिल भरण्यासाठी जुन्या नोटा भरण्याची मुभा देण्यात आली. त्यानंतर गेल्या चार दिवसांत महावितरणकडे ग्राहकांनी सुमारे १२ कोटी रुपयांचा भरणा केला आहे. सोमवारी महावितरणाच्या वीज बिल भरणा केंद्रांवर ‌थकित पैसे भरणाऱ्यांची गर्दी होती. सुटीच्या दिवशी २ कोटी ५१ लाख रुपयांचा महसूल जमा झाला.
वीज बिलांसाठी जुन्या नोटा वापरण्याची मुभा दिल्यानंतर ११ नोव्हेंबर रोजी महावितरणाच्या वीज बिल भरणा केंद्रात ५ कोटी ९१ लाख रुपये जमा झाले. १२ नोव्हेंबर रोजी २ कोटी ५१ लाख रुपये आणि १३ नोव्हेंबर रोजी १ कोटी ९२ लाख रुपये जमा करण्यात आले. गुरूनानक जयंतीनिमित्त सार्वजनिक सुट्टी असल्यामुळे सोमवारी वीज बील भरणा केंद्रात गर्दी होती. सोमवारी २ कोटी ५१ रुपये वसुल करण्यात आले आहे. यात औरंगाबाद शहरातून १ कोटी ८० लाख रुपये, तर औरंगाबाद ग्रामीण विभागातून ४१ लाख रुपये वसूल करण्यात आले आहेत. जालना येथून ३० लाखांची वसुली महावितरणाची झाली आहे.
गेल्या चार दिवसांत महावितरणाला एकूण १२ कोटी ८५ लाख रुपयांची वसुली आतापर्यंत जुन्या नोटांच्या माध्यमातून करण्यात आली आहे. जुन्या नोटांचा ओघ आगामी २४ नोव्हेंबरपर्यंत कायम राहील, अशी शक्यता महावितरणाच्या सूत्रांनी व्यक्त केली आहे.

शहरात सर्वाधिक वसुली
औरंगाबाद विभागात जमा करण्यात आलेल्या १२ कोटी रुपयांत औरंगाबाद शहरातील वसुलीचे प्रमाण जास्त आहे. गेल्या तीन दिवसांत औरंगाबाद शहरात वीज ग्राहकांनी ४ कोटी ७० लाख रुपये महावितरणकडे जमा केले आहेत. महावितरणला प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणात महसूल मिळाला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आरटीओ कार्यालयांत ६३ लाख रुपये जमा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
केंद्र शासनाने पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटांवर बंदी घातल्यानंतर सरकारी कराची बाकी जमा करण्यास मुभा देण्यात आली आहे. औरंगाबाद, बीड आणि जालना या तीन जिल्ह्यांतील आरटीओ कार्यालयात ६३ लाख रुपये जमा झाले आहेत. औरंगाबाद आरटीओ कार्यालयात ४३ लाख रुपये नागरिकांनी भरले आहेत.
आरटीओ विभागात कर जमा करण्यासाठी सोमवारी, सुट्टीच्या दिवशी कार्यालय उघडे ठेवण्यात आले होते. कर भरण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. औरंगाबाद प्रादेशिक कार्यालयातंर्गत औरंगाबादसह जालना आणि बीड जिल्ह्यांचा समावेश होतो. सोमवारी जालना उपप्रादेशिक कार्यालयात ७ लाख ९५ हजार ८०२ रुपयांचा महसूल जमा करण्यात आला आहे. याशिवाय बीड उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात ११ लाख ४१ हजार ८१ रुपयांचा महसूल जुन्या नोटा जमा करण्यात आल्या आहेत. औरंगाबाद आरटीओ कार्यालयात दोन उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या तुलनेत जास्त पैसे जमा करण्यात आले आहेत. औरंगाबाद प्रादेशिक कार्यालयात ४३ लाख ८८ हजार ५२८ रुपये जमा करण्यात आला आहे.
प्रादेशिक परिवहन कार्यालयात सोमवारी एकूण ६३ लाख २६ हजार ८१ रुपये एकूण महसूल जुन्या नोटामधून जमा करण्यात आला असल्याची माहिती आरटीओ सर्जेराव शेळके यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सहा कोटींच्या नोटा तुळजापुरात जप्त

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, उस्मानाबाद
तुळजापुरातील उस्मानाबाद बायपासवरील रस्त्यावर नगर परिषद निवडणूक विभागाच्या भरारी पथकाने सोमवारी सकाळी सहा कोटी रुपयांची रक्कम जप्त केली. हे पैसे सांगली अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेचे असल्याचे सांगितले जात आहे.
सांगली अर्बन बँकेचे नाव असलेली पांढरी व्हॅन (एमएच १० बीएम ३१२७) उस्मानाबादहून सोलापूरला जात होती. ती अडवून निवडणूक पथकाने तपासणी केली. त्यात पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा आढळून आल्या. ही रक्कम सहा कोटी रुपये आहे. सध्या नगरपरिषद निवडणुकीची प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे त्यात केंद्र सरकारने पाचशे व हजार रुपयांच्या नोटा बंद केल्या आहेत. नोटाबंदीचा निर्णय आणि निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांना एकाच वाहनात एवढी मोठी रोकड सापडली. त्यामुळे या प्रकाराची चर्चा सुरु आहे. तहसीलदार दिनेश झापले, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी राजू बुबणे आणि पोलिस निरीक्षक राजेंद्र बोकडे यांच्या पथकाने ही कारवाई केली.
दरम्यान, रक्कम सांगली बँकेचे अध्यक्ष गणेश गाडगीळ यांची असल्याचे तपासात समोर आले आहे. व्हॅनमध्ये पाचशेच्या चार कोटी ४० लाख रुपयांच्या ८८ हजार, एक हजारांच्या एक कोटी रुपयांच्या एक हजार आणि शंभरच्या साठ लाख रुपयांच्या साठ हजार नोटा आढळून आल्या. पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा रद्द करण्यात आल्या असल्या, तरीही गाडीमध्ये शंभर रुपयांच्याही नोटा आढळून आल्यामुळे पोलिसांना संशय आला. त्यामुळे अधिक तपास केला असता, सत्य समोर आले. रात्री उशिरापर्यंत या प्रकरणाचा तपास सुरू होता. पंचनामा व मोजणीनंतर ही रोकड कोषागारामध्ये जमा करण्यात आली.

पैसे सांगली बॅँकेचे : गाडगीळ
सांगली : सांगली अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेच्या मराठवाड्यातील शाखांमधील पाचशे, हजार रुपयांच्या नोटांची सुमारे सहा कोटींची रक्कम तुळजापूरनजीक सोमवारी पोलिसांनी रोखली आहे. संबंधित संपूर्ण रक्कम सांगली अर्बन बँकेचीच आहे. ती रक्कम घेऊन येणारी व्हॅन, कर्मचारी बँकेचेच आहेत, शिवाय त्यांच्याकडे तसे लेखी पत्रही असल्याचा खुलासा बँकेचे अध्यक्ष गणेश गाडगीळ यांनी सांगलीत पत्रकारांशी बोलताना केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


केवळ १० एटीएम सुरू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
पाचशे, हजार रुपयांच्या नोटा बंद केल्यानंतर औरंगाबादमधील चलन संकट सोमवारी, सहाव्या दिवशीही कायम होते. गुरुनानक जयंतीनिमित्त सर्व बँका बंद असल्याने नोटा बदलण्याचे काम थांबले. त्याचबरोबर शहरातील ७००पैकी केवळ दहा एटीएम सुरू होते. त्यामुळे नागरिकांच्या हाती सुट्या नोटा आल्या नाहीत.
सोमवारी सकाळपासून नागरिक एटीएममध्ये रोख भरणाऱ्या सिक्युरिटी सर्व्हिसेसच्या गाड्यांची वाट पाहताना आढळले. सातारा परिसरातील अॅक्सिस, आयसीआयसीआय, सिडको मधील महाराष्ट्र बँक, त्रिमूर्ती चौकाकडून आकाशवाणीकडे जाताना लागत असलेली महाराष्ट्र ग्रामीण बँक यांचे सिडकोतील एटीएम आणि स्टेट बँक आफ हैदराबादचे सिडकोतील एटीएम असे दहा एटीएम सेंटर सोमवारी सुरू होते. या एटीएमवर गर्दी होती. संध्याकाळनंतर तेथील रोख रक्कमही संपली. त्यानंतर तेथे ‘आउट ऑफ कॅश’, ‘आउट ऑफ सर्व्हिस’चे बोर्ड झळकले. गुरूनानक जयंतीच्या सुटीने ९९ टक्के एटीएम सेंटरवरील सुरक्षा रक्षकांनाही या निमित्ताने आराम करण्याची संधी मिळाली. या सर्व एटीएमवर गेली चार दिवस ‘हेवी वर्क लोड’ होता. तेथे नेहमीपेक्षा अधिक ‌हिट्स (अधिक लोकंनी पैसे काढणे) झाल्याचे सांगत अनेक सुरक्षा रक्षकांनी रविवारी रात्री मशीन नादुरुस्त असल्याचेच सांगून टाकले होते.

आज सुरू होणार एटीएम
यासंबंधी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एटीएम नेटवर्कचे व्यवस्थापकांनी दिलेल्या माहितीनुसार; मंगळवारपासून शहरातील बहुतांश एटीएम पुन्हा सुरू होणार आहेत. शहरातील एटीएमवर मंगळवारपासून मुबलक कॅश उपलब्ध होणार असून, दोन-तीन दिवस एटीएमवर लक्ष ठेवले जाणार आहे. यामुळे परिस्थिती पुन्हा पुर्ववत होण्यास मदत होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बँका, एटीएमसमोर आज पुन्हा रांगा

$
0
0

औरंगाबाद : पाच-सहा दिवस सलग काम केल्यानंतर सोमवारी बँक कर्मचाऱ्यांना गुरूनानक जयंतीची सुटीमुळे एक दिवसाचा दिलासा मिळाला. त्यांना आता मंगळवारी पुन्हा ‘नोटाकुटी’चा सामना करावा लागणार आहे. एका दिवसाच्या विश्रांतीनंतर मंगळवारी बँकां, एटीएमसमोर नागरिकांच्या रांगा दिसतील.
स्टेट बँक ऑफ हैदराबादच्या बँक कर्मचारी असोस‌िएशनचे सचिव रवी धामणगावकर, ‘आम्ही सरकारी आदेशाप्रमाणे काम केले. त्यासाठी शहरातील नागरिकांनीही आम्हाला सहकार्य केले. शनिवार बँकेला सुटी असते. सरकारी आदेश असल्यामुळे सर्व कर्मचारी कामावर आले आणि त्यांनी ग्राहकांना सेवा दिली. सेवा देताना वेळ लागत होता, परंतु नागरिकही परिस्थिती समजून सहकार्य करीत होते. पोलिसांनीही आम्हाला चांगले सहकार्य केले. एका राष्ट्रीय कार्यात सहभागी झाल्याचे समाधान आहे.’
‘पंतप्रधानांनी घेतलेल्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. आरबीआय गर्व्हनर आणि केंद्रीय अर्थमंत्री मोठ्या प्रमाणावर नवीन नोटा असल्याचा दावा करतात, परंतु या नोटा अद्याप आमच्यापर्यंत पोचल्याच नाहीत,’ असे ऑल इंडिया बँक एम्पलॉइज असोसिएशनचे सरचिटणीस देवीदास तुळजापूरकर यांनी सांगितले.
‘गर्दी असूनही मोठ्या प्रमाणावर ग्राहकांनी रांगेत उभे राहून शांतपणे नोटा बदलून घेतल्या. पाच दिवस नोटा खात्यावर जमा करत असलेल्या ग्राहकांची खूप गर्दी होती. त्याप्रमाणात नोटा बदलून घेत असलेल्या नागरिकांची गर्दी कमी होती. या परिस्थितीत पुढच्या आठवड्यात सुधारणा होईल,’ असे एसबीएचच्या शहागंजशाखेचे मुख्य व्यवस्थापक ए. एल. देशपांडे यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्पीडब्रेकर्सवर पालिकेचा हातोडा

$
0
0



म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
निकष डावलून, चुकीच्या पद्धतीने तयार केलेल्या वेड्यावाकड्या स्पीडब्रेकर्सवर हातोडा मारण्यास महापालिकेने अखेर सुरुवात केली असून, दोन दिवसांत पंधरापेक्षा जास्त स्पीडब्रेकर्स तोडून टाकले आहेत. या प्रकरणी कंत्राटदारांवरही कारवाई केली जाणार आहे.
आविष्कार कॉलनीच्या रस्त्यावरील सदोष स्पीडब्रेकरमुळे गेल्या आठवड्यात विजय तंबारे व योगेश गुंजाळ या दुचाकीचालकांचा मृत्यू झाला. या घटनेचे पडसाद महापालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत उमटले. आविष्कार कॉलनी रस्त्यावरचा स्पीडब्रेकर काढून टाकण्यासंदर्भात चर्चा झाली. संयुक्त पाहणी करून स्पीडब्रेकर काढून टाकण्याबद्दल निर्णय घेण्याचे बैठकीत ठरले होते, पण अधिकारी-पदाधिकारी कुणीच पाहणी करण्यासाठी गेले नाहीत. त्यामुळे नगरसेवक मकरंद कुलकर्णी यांनीच पुढाकार घेऊन तो स्पीडब्रेकर नागरिकांच्या मदतीने काढून टाकला. या घटनेनंतर पालिका प्रशासनाला जाग आली आ​णि शहराच्या विविध रस्त्यांवर निकष डावलून तयार केलेले स्पीडब्रेकर काढून टाकण्याची कारवाई सुरू करण्यात आली.
इंडियन रोड काँग्रेसच्या निकषानुसार रस्त्यांवर स्पीडब्रेकर तयार केले पाहिजेत. ज्या रस्त्यावर जास्त वाहतूक आहे, तेथे रबरी साहित्य वापरून स्पीडब्रेकर केले पाहिजेत. मात्र, पालिकेच्या अभियंत्यांचे लक्ष नसल्यामुळे अनेक रस्त्यांवर चुकीच्या पद्धतीने स्पीडब्रेकर्स बांधण्यात आले. दोन दिवसांपूर्वी महापालिका आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांनी अधिकाऱ्यांना आदेश देऊन हे स्पीडब्रेकर्स तोडण्यास सांगितले. त्यानुसार वॉर्ड कार्यालयनिहाय कारवाई सुरू करण्यात आली आहे.
वॉर्ड कार्यालयाच्या क्षेत्रातील चुकीच्या पद्धतीने केलेले स्पीडब्रेकर्स स्पीडब्रेकर्स काढून टाकण्यात येत आहेत. विशेष म्हणजे तोडफोडीनंतरचा राडारोडाही तेथेच सोडून दिला जात असल्यामुळे वाहतुकीतील अडथळे कायम आहेत. आणखी आठ दिवस ही कारवाई सुरू राहणार आहे.

नवीन स्पीडब्रेकर्स टाकण्याचे काम यापुढे वाहतूक पोलिसांचे ना हरकत प्रमाणपत्र घेऊनच केले जाणार आहे. आता प्रत्येक स्पीडब्रेकरवर झेब्रा क्रॉसिंग, लेनचे मार्किंग केले जाणार आहे. ज्यांनी चुकीच्या पद्धतीने स्पीडब्रेकर्स टाकले त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे. काही व्यक्ती व व्यावसायिकांनी त्यांच्या सोयीसाठी रस्त्यांवर स्पीडब्रेकर्स टाकून घेतले आहेत. अशा व्यक्तींची माहिती गोळा करण्याचे काम सुरू आहे. त्यांच्यावरही कारवाई होऊ शकते. - सिकंदर अली, कार्यकारी अभियंता, महापालिका

-
‘मटा’भूमिका
---
अभियंत्यांचे 'कर्तृत्व'
-
रस्ते, वाहतूक, दुभाजक आणि स्पीडब्रेकरच्या बाबतीत पालिकेच्या अक्षम्य गलथानपणामुळे लहान-मोठे अपघात नित्याचे झाले आहेत. कागदोपत्री अभियंत्यांच्या देखरेखीखाली ही कामे झाली आहेत, परंतु एकाही जबाबदार अभियंत्याने प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केलेली दिसत नाही. आधीच रस्ते खराब, त्यात छुप्या स्पीडब्रेकर्समुळे लोक वैतागले आहेत. आता दोन दुचाकीचालक जीवानिशी गेल्यावर, आयुक्तांनी आदेश दिले तेव्हा यंत्रणा हलली. शास्त्रीनगर, जवाहर कॉलनी, सिडको, गारखेडा, बन्सीलालनगर आदी भागांत कोणतेही नियम न पाळता स्पीडब्रेकर बांधले गेले आहेत. एमजीएम परिसरातील गतिरोधकांनी तर सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. पैठण रस्त्यावरील गतिरोधकांना जागोजागी भगदाडे पडली आहेत. 'मां-बाप का दर्गा'शेजारचे दुभाजक दुचाक्यांनाही घासले जातात. नागरिकांची काळजी असेल तर पालिकेने संबंधित अभियंते, अधिकाऱ्यांवरही कारवाई केली पाहिजे. केवळ कंत्राटदारांवरांना दोषी ठरवून पालिकेला नामानिराळे राहता येणार नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आमदनी १० कोटी; खर्च ७ कोटी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
हजार आणि पाचशे रुपयांच्या नोटांच्या माध्यमातून चार दिवसांत महापालिकेकडे सुमारे दहा कोटी रुपये जमा झाले. या रक्कमेतून विकास कामांचा शुभारंभ केला जाईल, असे वाटत असताना महापालिका प्रशासनाने अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या पगारासह विजेचे बिल भरण्यासाठी हा पैसा खर्च केला. हा खर्च सुमारे सात कोटींच्या घरात आहे.
केंद्र सरकारने एक हजार आणि पाचशे रुपयांवर बंदी घातली, पण बंदी घातलेल्या नोटांच्या माध्यमातून नागरिकांना मालमत्ता कर व पाणीपट्टी भरता येईल, असे जाहीर केले. १४ नोव्हेंबरच्या रात्री बारापर्यंत बाद झालेल्या नोटांच्या स्वरुपात नागरिकांना कर भरता आला. त्यामुळे ११ नोव्हेंबर रोजी पालिकेच्या तिजोरीत मालमत्ता कराचे ३ कोटी ६५ लाख रुपये व ७३ लाख रुपये पाणीपट्टीचे जमा झाले. १२ नोव्हेंबर रोजी मालमत्ता कराचे ८२ लाख व पाणीपट्टीचे २५ लाख ५६ हजार रुपये, १३ नोव्हेंबर रोजी मालमत्ता कराचे १ कोटी ७ लाख तर पाणीपट्टीचे ३० लाख ५२ हजार रुपये, १४ नोव्हेंबर रोजी मालमत्ता कराचे १ कोटी ३९ लाख तर पाणीपट्टी ५१ लाख ८२ हजार रुपये जमा झाले. चार दिवसात जमा झालेली एकूण रक्कम ९ कोटी ९१ लाख रुपये इतकी आहे.
चार दिवसांत जमा झालेली रक्कम विचारात घेतल्यास १ एप्रिलपासून आतापर्यंत महापालिकेकडे मालमत्ता कर व पाणीपट्टीपोटी ५२ कोटी ३३ लाख रुपये जमा झाले आहेत.. गेल्यावर्षीच्या तुलनेत १४ कोटी रुपयांनी ही रक्कम जास्त असल्याचे सांगितले जात आहे.
गेल्या चार दिवसांत जमा झालेल्या ९ कोटी ९१ लाख रुपयांचा विनियोग महापालिकेच्या प्रशासनाने तातडीने केला. या पैशातून ६ कोटी ९७ लाख रुपयांची देणी महापालिकेच्या प्रशासनाने देऊन टाकली. त्यामुळे महापालिकेच्या तिजोरीत २ कोटी ९४ लाख रुपयेच शिल्लक राहिले आहेत.

असा केला खर्च
महावितरणचे वीज बिलः ३ कोटी ४४ लाख रुपये
अधिकारी, कर्मचाऱ्यांचे पगारः १ कोटी ९३ लाख रुपये
इन्कमटॅक्स विभागाला व्हॅटची रक्कमः १ कोटी रुपये.
पथदिव्याचे विजेचे बिलः ६० लाख रुपये

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आर्यन, अमन, अजय, रिचाची आगेकूच

$
0
0

आर्यन, अमन, अजय, रिचाची आगेकूच
राष्ट्रीय टेनिस स्पर्धा
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
एड्युरन्स्‌ मराठवाडा-एमएसएलटीए टेनिस सेंटरतर्फे आयोजित १४ वर्षांखालील राष्ट्रीय टेनिस स्पर्धेत मुलांच्या गटात आर्यन झवेरी, अमन तेजाबवाला, रुद्र कपूर, अजय मलिक, राजेश कन्नन यांनी तर, मुलींच्या गटात रिचा चौगुले, गार्गी पवार, बेला ताम्हणकर, रिया उबवेजा या खेळाडूंनी प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करून आगेकूच केली.
विभागीय क्रीडा संकुलातील एन्ड्युरन्स टेनिस सेंटरमध्ये सुरू असलेल्या या स्पर्धेत दुसऱ्या फेरीत मुलांच्या गटात अव्वल मानांकित आर्यन झवेरीने प्रणय चौधरीचा ६-१, ६-०, असा पराभव केला. रुद्र कपूरने अकराव्या मानांकित उदित गोगईचे आव्हान ३-६, ६-३, ६-४ असे संपुष्टात आणले. सहाव्या मानांकित राजेश कन्ननने कार्तिक सक्सेनाचा टायब्रेकमध्ये ४-६, ६-३, ७-६(३) असा पराभव केला.
मुलींच्या गटात अव्वल मानांकित रिचा चौगुलेने आदिती नारायणवर ७-६(१), ०-६, ६-२ असा संघर्षपूर्ण विजय मिळवला. तिसऱ्या मानांकित गार्गी पवारने रिया वाशिमकरला ६-०, ६-० असे नमविले. आठव्या मानांकित बेला ताम्हणकरने श्रीचंद्रा टेंटूला ६-२, ६-० असे नमविले.
स्पर्धेतील इतर निकाल ः दुसरी फेरी : मुले - ध्रुव टंगी वि. वि. ओंकार आपटे, अजय मलिक वि. वि. श्रीजीत सेन, एस बुपती वि. वि. अमन दहिया, अमन तेजाबवाला वि. वि. शशांक नरडे, कृष्णा हुडा वि. वि. अनिरुद्ध कृष्णा, निशांत दबस वि. वि. अर्जुन गोहड, व्हीएम संदीप वि. वि. हिरक वोरा.
मुली - अवी शहा वि. वि. कनिका सिवारामण, संदिप्ती राव वि. वि. दिव्या भारद्वाज, रिया उबवेजा वि. वि. रिद्धी काकरलामुडी, संस्कृती ढमेरा वि. वि. दीपा वनराजा.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ओवेसींच्या आदेशाला नगरसेवकांचा ठेंगा

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
बड्या नोटा जमा करण्यासाठी संध्याकाळपर्यंत नागरिक बॅँकेत रांगा लावत आहेत. हा त्रास कमी करण्यासाठी बॅँकेत शहरवासीयांच्या अल्पोपहाराची व्यवस्था करा, असे आदेश एमआयएम खासदार असुदुद्दिन ओवेसी यांनी नगरसेवकांना दिले होते. मात्र, बहुतांश नगरसेवकांनी या आदेशाला ठेंगा दाखवला.
आठ नोव्हेंबर रोजी सरकारने पाचशे आणि हजाराच्या नोटा चलनातून बाद केल्या. त्यावेळी ओवेसी मराठवाडा दौऱ्यावर होते. नऊ नोव्हेंबर रोजी त्यांनी शहरात पत्रकार परि‌षद घेऊन मोदींच्या निर्णयामुळे सामान्यांचे कसे हाल होतील, हे सांगितले. मराठवाडा, खान्देशात नगरपालिका निवडणुकीसाठी सभा घेतल्या. यावेळी पक्षाचे आमदार, पदाधिकाऱ्यांना नोटा बदलण्यासाठी बॅँकेत येणाऱ्या नागरिकांना मदत करा, असे आदेश दिले. नागरिकांच्या अल्पोपहार, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करा असे निर्देश दिले. आमदार इम्तियाज जलील यांनीही बीड आणि मुंबईला जाण्यापूर्वी या आदेशाची अंमलबजावणी करण्याच्या सूचना पक्षाचे सर्व नगरसेवक, पदाधिकाऱ्यांना दिल्या. या आदेशानंतर शहराध्यक्ष अन्वर कादरी यांनी रोझाबाग येथील स्टेट बॅँक ऑफ हैदराबादसमोर नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली. चेलिपुराच्या नगरसेविका सायरा बानो, गटनेते नासेर सिद्दिकी, नगरसेवक जफर बिल्डर आणि नगरसेविका सरवत आरेफ हुसैनी यांनी काही बँकांमध्ये पाणी आणि केळीचे वाटप केले. या नगरसेवकांव्यतिरिक्त अन्य कोणत्याही ठिकाणी एमआयएमच्या नगरसेवकांनी नागरिकांच्या घोटभर पाण्याचीही व्यवस्था केली नाही. याबाबत पक्षाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी काही नगरसेवकांना विचारणा केली. तेव्हा त्यांनी, ‘बँका आमच्या वॉर्डालगत नाहीत. यामुळे आम्ही कुठे मदत करायची?’ असा प्रतिप्रश्न केला.

एमआयएमच्या सर्व नगरसेवकांना मी स्वतः पक्ष प्रमुखांच्या आदेशाबाबत माहिती दिली. आमच्या नगरसेवकांनी काम केले आहे. त्याचा आढावा घेतला जात आहे. - नासेर सिद्दिकी, गटनेता, एमआयएम

पक्षप्रमुखांनी केलेल्या सूचनांची काटेकोर अंमलबजावणी करणे नगरसेवकांची जबाबदारी आहे. या कामाचा अहवाल घेतला जात आहे. या कठीण परि‌स्थितीत नागरिकांची मदत करणे आवश्यक आहे. जर कोणी त्यात टाळाटाळ केली, तर तसा अहवाल पक्षप्रमुखांना पाठवू. - अॅड. अन्वर कादरी, शहराध्यक्ष, एमआयएम

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नोट नसल्यामुळे सेतूमध्ये शुकशुकाट

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
नोटाबंदीमुळे संथ झालेल्या व्यवहाराचा परिणाम सेतू कार्यालयावरही झाला आहे. गेल्या आठ दिवसांमध्ये जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात असलेल्या सेतू कार्यालयातील प्रमाणपत्र घेणाऱ्यांचे प्रमाण २० ते २५ टक्के घसरले आहे.
गेल्या आठवड्यात पाचशे व हजार रुपयांच्या नोटा बंद करण्यात आल्याच्या निर्णयानंतर काही ठराविक ठिकाणे वगळता नोटा स्वीकारणे बंद झाले. सेतू कार्यालयात विविध प्रमाणपत्र काढण्यासाठी नागररिक, विद्यार्थ्यांची मोठी गर्दी असते. दररोज कार्यालयातून उत्पन्न, रहिवासी, भूमिहीन, राष्ट्रीयत्व, नॉन क्रिमीलेअर, विविध शपथपत्र, घोषणापत्र आदी प्रमाणपत्र काढण्यासाठी २२५ ते २५० प्रमाणपत्र काढण्यात येतात. मात्र गेल्या आठ दिवसांपासून यामध्ये घट झाली आहे. १ नोव्हेंबर ते ८ नोव्हेंबर दरम्यान सेतू कार्यालयामध्ये १६८१ प्रमाणपत्र घेण्यासाठी अर्ज करण्यात आले होते. मात्र नोटांच्या निर्णयापासून प्रमाणपत्र काढण्याच्या संख्येत दररोज सुमारे ३० ते ५० प्रमाणपत्रांची घट होऊन संख्या दररोज २०० ते ११० वर आली आहे. या कालावधीत शैक्षणिक अभ्यासक्रमांसंदर्भात प्रमाणपत्र काढणाऱ्यांची गर्दी तुलनेत कमी असली तरी इतर प्रमाणपत्र काढण्यासाठी असलेली गर्दी मात्र ओसरली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कमिशनवर चिल्लर देणाऱ्यावर नजर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
टक्केवारी घेऊन कुणी चिल्लर पैसे तर देत नाही, बड्या नोटाबंदीचा फायदा घेत कुणी बेकायदा व्यवहार करत नाही ना, यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांची विशेष पथके स्थापन करण्यात आली आहेत. ही पथके बुधवारपासून कारवाई करणार आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली.
पाचशे, हजारच्या नोटा बंदी व त्यानंतर चलन तुटवडा झाल्याने पैसे जमा करण्यासाठी तसेच नोटा बदलून घेण्यासाठी बँकासमोर गर्दी झाली आहे. या पार्श्वभूमीवर बँक अधिकाऱ्यांना येणाऱ्या अडीअडचणी जाणून घेण्यासाठी मंगळवारी पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी बँक अधिकाऱ्यांची बैठक घेतली. पोलिस उपायुक्त वसंत परदेशी, राहुल श्रीरामे, सहायक पोलिस आयुक्त रामेश्वर थोरात, पोलिस निरीक्षक मधुकर सावंत, सुरेश वानखेडे यांच्यासह वरिष्ठ पोलिस व बँक अधिकारी उपस्थित होते. नोटाबंदीचा फायदा घेत काही जण टक्केवारी घेऊन चिल्लर देत असावेत. तसेच बँकेत सध्या चार हजार रुपये बदलून मिळत आहे. यांचाच फायदा घेत काळा पैसा दडविलेले व्यक्तीनी घेण्याची शक्यता आहे. रोजदारींवर नेमलेल्या लोकांकरवी ते पैसे बदलून घेत असावेत, अशी शक्यताही समोर आल्याने अशा लोकांचा शोध घेत त्यांच्यावर कारवाईसाठी पोलिसांची खास पथके नेमण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नागरिकांच्या मदतीसाठी अनेक जण सरसावले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
नोटाबंदीच्या निर्णयानंतर बँकांसमोर रांगाच रांगा लागत आहेत. या रांगामधील ज्येष्ठ नागरिक, महिलांना पाणी, खाद्यपदार्थ तसेच अर्ज भरून देण्यासाठी अनेक जण सरसावले आहेत. बंदोबस्तासाठी तैनात असलेले पोलिस कर्मचारी, बँकेचे मॅनेजर, निवृत्त कर्मचारी शहरवासियांना मदत करून दिलासा देत आहेत.
समर्थनगर येथील एसबीआय बँकेसमोर पोलिस कॉन्स्टेबल योगेश कुलकर्णी यांची ड्यूटी आहे. ते गेल्या दोन दिवसांपासून बँकेत येणाऱ्या गरजूंना मदत करत आहेत. पैसे भरणे, काढण्यासाठीच्या स्लीप भरून देणे, नोटा बदलण्यासाठीचा फॉर्म भरुन देण्याचे काम ते करत आहेत. बँकेच्या प्रवेशद्वाराजवळ त्यांनी हे फॉर्म ठेवून घेतले आहेत. ज्यांना गरज आहे. ते त्यांच्याकडून फॉर्म भरून घेतात. ‘पोलिस कर्मचाऱ्याची खूप मदत झाली. मला नोटा बदलून घ्यायच्या होत्या. तो फॉर्म त्यांनी भरून दिल्याने अडचण दूर झाली,’ अशी प्रतिक्रिया शबाना सय्यद सुलेमान यांनी व्यक्त केली.
टीव्ही सेंटर येथील अॅक्सिस बँकेच्या वतीने ज्येष्ठ नागरिकांना चहा,कॉफीची सोय केली होती. ग्राहकांसोबत बँकेत येणाऱ्या बच्चेकंपनीला चॉकलेटही ठेवल्याचे ऑपरेशनल मॅनेजर शरद लहाने यांनी सांगितले. टीव्ही सेंटरच्या स्टेट बँक ऑफ हैदराबादच्या वतीने रांगेतील ग्राहकांसाठी पाण्याचे जॅर आणून ठेवले होते.

राजकीय पक्ष गायब
सुरवातीचे दोन दिवस भाजप आणि काँग्रेसने काही बँकांसमोरील रांगांमध्ये उभे असलेल्या ग्राहकांना पाणी, खाद्यपदार्थांचे वाटप केले होते. आता खरी गरज असताना मात्र कोणत्याच राजकीय पक्षाचे प्रतिनिधी, पदाधिकारी मदतीसाठी आल्याचे दिसून आले नाहीत. याची नागरिकांमध्ये चर्चा होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गांजा लागवडप्रकरणी दोन शेतकऱ्यांना अटक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
माळीवाडगाव शिवारातील एका कपाशीच्या शेतात गांजाची लागवड करण्यात येत असल्याची धक्कादायक घटना मंगळवारी उघडकीस आली. याप्रकरणी दोन शेतकऱ्यांना अटक करण्यात आली असून अधिक तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
गंगापूर देवगाव रंगारी रस्त्यावरील माळीवाडगाव शिवारातील एका शेतात गांजा पिकाची लागवड केली जात असल्याची माहिती सहायक पोलिस निरीक्षक सूर्यकांत कोंकणे यांना मिळाली. पोलिस अधीक्षक नवीनचंद्र रेड्डी व उपविभागीय पोलिस अधिकारी शरद बरडे यांच्या मार्गदर्शनाखाली कोंकणे व पथकाने मंगळवारी दुपारी कारवाई केली. यात एकनाथ आसाराम गवळी व गोरख आसाराम गवळी यांना पकडण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
गवळी याचे शेत मुख्य रस्त्यापासून सुमारे अर्धा किलोमीटर अंतरावर आहे. त्यांनी कापशीमध्ये गांजाची ३२४ झाडे लावल्याचे समोर आले आहे. एकूण चार लाख वीस हजार रुपयांचा गांजा जप्त करण्यात आला आहे. या गांजाची विक्री कोणाला करणार होते, यामागे गांजा तस्कर करणारी कोणती टोळी सक्रीय आहे, याचा तपास पोलिस करत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्ह्यातील तीन शेतकऱ्यांच्या आत्महत्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

तालुक्यातील जेहूर तांडा येथील उमराज रंगनाथ राठोड (वय ४५) व नाचनवेल जवळील मोहरा येथील रामराव गणपत गाडेकर (वय ६०) या दोन्ही शेतकऱ्यांनी सोमवारी झाडाला गळफास घेवून आत्महत्या केली. बिडकीन येथे ३५ वर्षीय शेतकऱ्याने गळफास घेऊन मंगळवारी आत्महत्या केली.

जेहूर तांडा येथील शेतकरी उमराज राठोड यांनी सोमवारी पहाटे जेहूर तांडा येथील स्वतःच्या शेतातील आंब्याच्या झाडाला गळफास घेवून आत्महत्या केली. त्यांनी नापिकीला कंटाळून व कर्जाचा बोजा वाढल्याने आत्महत्या केल्याचे त्यांच्या नातेंवाईकांनी सागितले. या घटनेची नोंद देवगाव रंगारी पोलिस ठाण्यात घेण्यात आली आहे. याप्रकरणी बीट जमादार यू. आर. औटे, दादाभाऊ चेळेकर हे पुढील तपास करत आहेत. नाचनवेल जवळील मोहरा गावातील रामराव गाडेकर या शेतकऱ्याने सोमवारी दुपारी तीनच्या सुमाराला बांधावरील झाडाला गळफास घेवून आत्महत्या केली. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले, दोन मुली, सुना, असा परिवार आहे. या घटनेची नोंद पिशोर पोलिस ठाण्यात घेण्यात आली असून बीट जमादार जगन्नाथ उबाळे, किसन गवळी हे तपास करीत आहेत.

पैठण तालुक्यातील बिडकीन येथे ३५ वर्षीय शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी घडली. सुदाम साहेबराव काळे, असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांचे नाव असून आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. बिडकीन येथील पैठण वेस या ठिकाणी राहणारे शेतकरी सुदाम साहेबराव काळे यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी बिडकीन पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. आत्महत्येचे कारण समजू शकले नसल्याची माहिती बिडकीन पोलिसांनी दिली. पोलिस निरीक्षक सिद्धार्थ गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार शिंदे हे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नोटांच्या गदारोळात खासदार कुठे?

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
नोटांच्या गदारोळात शहरातील नागरिक त्रस्त झाले असताना नेते मात्र बेपत्ता झाल्यामुळे संताप व्यक्त केला जात आहे. नोटाबंदीचा निर्णय केंद्र सरकारने घेतलेला असल्यामुळे जिल्ह्याचे प्रतिनिध‌ित्व करणारे खासदार चंद्रकांत खैरे कुठे आहेत, असा सवाल मंगळवारी रांगांमधील अनेक नागरिकांनी केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८ नोव्हेंबर रोजी पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाद केल्या. तेव्हापासून या परिस्थ‌ितीत नागरिकांच्या मदतीला एकही राजकीय नेता धावून आलेला नाही. नोटा बदलण्याच्या प्रक्रियेमुळे वैतागलेल्या नागरिकांनी आता खासदार खैरे कुठे आहेत, असा प्रश्न विचारणे सुरू केले आहे. गेल्या आठ दिवसांत खैरेच नव्हे तर शिवसेनेचे पदाधिकारीही धावून आले नाहीत.
यासंदर्भात ‘मटा’ प्रतिनिधीने खैरे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, ‘खैरे कुठे आहेत, असे नागरिकांनी विचारणे स्वाभाविक आहे. मी नागरिकांच्या बाजूनेच आहे. त्यामुळे मंगळवारी मी ‘मातोश्री’वर झालेल्या बैठकीला उपस्थित होतो. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मार्गदर्शन केले. त्यानुसार बुधवारी ममता बॅनर्जी यांच्यासह शिवसेनेचे खासदार राष्ट्रपतींना भेटणार आहेत. नागरिकांचे मत मांडण्यासाठीच आम्ही राष्ट्रपतींना भेटणार आहोत. नागरिकांसाठी मी मुंबईत आणि दिल्लीत बोलतो. काळा पैसा हद्दपार झाला पाहिजे अशीच आमची धारणा आहे, पण पंतप्रधानांनी हा निर्णय पूर्वतयारीनिशी घेतला नाही, हे देखील तेवढेच सत्य आहे.’

अन्य नेतेही गायब
नोटांमुळे मेटाकुटीला आलेल्या नागरिकांना दिलासा देण्यासाठी अन्य राजकीय पक्षाचे नेतेही रस्त्यावर उतरले नाहीत. पहिल्या एक-दोन दिवसांचा अपवाद वगळता अन्य दिवसांत नेते गायब झाल्याचेच चित्र आहे. सर्वसामान्य नागरिक नोटांमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीशी एकाकी लढत आहे. नेते ‘स्वतःतच’ व्यस्त आहेत का, असा प्रश्न संतप्त नागरिकांनी मंगळवारी विचारला.

नेत्यांकडून काय अपेक्षित होते?
- प्रमुख बँकांशी संपर्क साधून दैनंदिन परिस्थितीचा आढावा.
- एटीएम आणि बँकांबाहेर नागरिकांसाठी सावलीची व्यवस्था.
- नागरिकांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय.
- संयम पाळण्याचे आवाहन.
- वैयक्तिक पातळीवरील तांत्रिक अडचणींची सोडवणूक.
- नागरिकांची हेतूपुरस्सरपणे अडवणूक होत असेल तर मध्यस्थी.
- रुग्णालयांमध्ये असहाय झालेल्या नातेवाईकांची मदत.
- बॅंकांना भेटी देऊन नागरिकांना दिल्या जाणाऱ्या सेवेची विचारपूस.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images