Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

तहसीलदारांच्या निषेधाचा शिक्षण समितीत ठराव

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
सिल्लोड येथील तहसीलदारांनी गटशिक्षणाधिकारी, मुख्याध्यापक, शिक्षकांवर केलेल्या फौजदारी कारवाईचा जिल्हा परिषदेच्या शिक्षण समितीत ठराव घेण्यात आला.
शिक्षण समितीची मासिक बैठक शनिवारी झाली. सभापती विनोद तांबे अध्यक्षस्थानी होते. फक्त निवडणूक कार्यासाठी शिक्षकांना प्रतिनियुक्तीवर घेण्यात यावे, असा आदेश असताना सिल्लोडचे सहा शिक्षक कार्यरत होते. त्यांना कार्यमुक्त करावे, असे गटशिक्षणाधिकाऱ्यांनी तहसीलदारांना कळविले होते.
असल्याचे गटशिक्षणाधिकारी सांगितले. त्यांना कार्यमुक्त न करता तहसीलदारांनी फौजदारी गुन्हा नोंदविला. यासंबंधी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांमार्फत जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठवून दाद मागितली जाईल, असे तांबे यांनी बैठकीत सांगितले. नियमबाह्य कारवाईच्या निषेधाचा ठराव मांडण्यात आला. त्यास सर्व सदस्यांनी अनुमोदन दिले.
उपशिक्षणाधिकारी पदे रिक्त असल्याने प्रशासकीय कामे बंग आहेत, हा मुद्दा बैठकीत मांडण्यात आला. त्यावर आठवडाभरात प्रश्न निकाली लागतील, असे आश्वासन शिक्षणाधिकारी आर. एस. मोगल यांनी दिले. या पुढे दिनांक निहाय प्रस्ताव यादी बनविण्यात येईल, त्या नुसार प्रस्ताव काढावेत, असा आदेश तांबेंनी दिला. बैठकीस सदस्य प्रभाकर काळे, बबन कुंडारे, पुष्पा जाधव, संगीता सुंब, आबासाहेब जगताप आदी उपस्थित होते.

‘जीपीएफ’चे प्रस्ताव पडून
श्याम राजपूत यानी शिक्षण विभागाच्या कार्यपद्धतीबाबत नाराजी व्यक्त केली. ‘जीपीएफ’चे प्रस्ताव जाणीवपूर्वक प्रलंबित ठेवण्यात येतात. शिक्षकांचे प्रस्ताव कर्मचारी काटे यांच्या कपाटात पडून आहेत व जे हितसंबंध जपतात अशा शिक्षकांचे प्रस्ताव तत्काळ मंजूर केले जातात, असा आरोप त्यांनी केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


इंजिनीअरिंग कॉलेज घडविणार उद्योजक

$
0
0

पॉलिटेक्निक, इंजिनीअरिंग कॉलेजांना सरकारचे टार्गेट
ashish.choudhari@timesgroup.com
Tweet : @ashishcMT
औरंगाबाद ः पॉलिटेक्निक, इंजिनीअरिंगचे शिक्षण घेऊन उद्योजक बनण्याचे प्रमाण नगण्य आहे. आता तर नव्या अभियंत्यांना नोकरीचीही शाश्वती नाही. हे लक्षात घेत इंजिनीअरिंगपूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांनी उद्योजक बनावे, यासाठी तंत्रशिक्षण विभाग ‘गो फॉर अांत्रप्युनर’ मोहीम राबवित आहे. उद्योगाच्या संकल्पनेपासून ते शासकीय पातळीवरील मदत कॉलेजस्तरावरून केली जाणार आहे. पॉलिटेक्नक, इंजिनीअरिंग कॉलेजांना वर्षातून एक उद्योजक बनविण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे.
अभियांत्रिकी अभ्यासक्रमाची मागील काही वर्षांत वाताहत झाली आहे. विद्यार्थ्यांचा कल कमी झाल्याने राज्यातील ८० हजारांपेक्षा अधिक जागा रिक्त आहेत. अभियांत्रिकीचे शिक्षण घेऊनही नोकरीची शाश्वती राहिली नाही. त्यासह उद्योजक निर्माण होण्याची प्रक्रियेलाही ब्रेक बसलेला आहे. त्यानंतर आता नोकरी शोधण्यापेक्षा उद्योजक निर्माण व्हावेत, यासाठी पुढाकार घेतला जाणार आहे. कॉलेजांमधील ‘इनक्युबेशन सेंटर’च्या माध्यमातून विद्यार्थ्यांना नवनवीन उद्योगांशी निगडित प्रोजेक्ट दिले जाणार आहेत. विद्यार्थ्यांनाही कल्पना मांडता येणार आहेत. त्यासाठी उद्योजकांचीही मदत घेतली जाणार आहे. हा प्रोजेक्ट उद्योगाच्या स्वरुपात उभा करण्यास विद्यार्थी उत्सुक असेल, तर त्याला तंत्रशिक्षण कॉलेजच्या मदतीने उद्योग उभारणीसाठी लागणारी खाजगी आणि प्रशासकीय पातळीवरील आवश्यक ती मदत करणार आहे. त्यासाठी खाजगी उद्योगांचीही मदत घेतली जाणार आहे.

औरंगाबादमध्ये प्राचार्यांना प्रशिक्षण
‘गो फॉर अांत्रप्युनर’ संकल्पनेतंर्गत राज्यातील निवडक अभियांत्रिकी कॉलेजच्या प्राचार्यांना औरंगाबादमध्ये मार्गदर्शन, प्रशिक्षण देण्यात आले. शासकीय अभियांत्रिकी कॉलेजमध्ये दोन दिवसांच्या कार्यक्रमात प्राचार्य, प्लेसमेंट ऑफिसर यांना उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञ, तंत्रशिक्षणाचे अधिकारी यांनी मार्गदर्शन केले. यामध्ये आयबीएमचे संचालक आदेश गोखले, नॅसकॉम प्रतिनिधी साहिल गुप्ता, तंत्रशिक्षण संचालक डॉ. एस. के. महाजन, वाय. आय. शहा हे उपस्थित होते.

वर्षभरात एक उद्योजक
शासकीय कॉलेजांमध्ये सुरुवातीला हा उपक्रम राबविला जात आहे. प्रत्येक अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक कॉलेजला वर्षभरात विद्यार्थ्यांमधून किमान एक उद्योजक निर्माण करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. त्यानंतर प्रत्येक शाखेला एक उद्योजक निर्माण करण्याचे उद्दिष्ट दिले जाणार असणार आहे. त्यासाठी डिसेंबर २०१६ ते डिसेंबर २०१७ असा कालावधी देण्यात आला आहे.

अभियांत्रिकी कॉलेजमधून उद्योजक निर्माण होण्याचे प्रमाण नगण्य आहे. हे चित्र बदलायची गरज आहे. त्यामुळे ही संकल्पना राबविण्याचा आम्ही निर्णय घेतला आहे. विद्यार्थ्यांना यापुढे दिले जाणारे प्रकल्प उद्योगाशी संबंधितच असतील. त्यातील काही कल्पना उद्योग उभारणीच्या दृष्टिकोनातून उपयुक्त असतील तर त्यांना आवश्यक ते मदत केली जाईल. कॉलेजांनी वर्षभरातून एक उद्योजक निर्माण करावा, असे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
- डॉ. एस. के. महाजन, संचालक, तंत्रशिक्षण विभाग.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भरडधान्य खरेदीच्या कामाला विरोध

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
वाढता कामाचा व्याप, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका यांमुळे भरडधान्य खरेदीप्रक्रियेत गोदामपाल म्हणून काम करणार नाही, असा पवित्रा महसूल कर्मचाऱ्यांनी घेतला आहे. कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना याबाबत निवेदन सादर केले.
शासनाकडून भरडधान खरेदीची प्रक्रिया सुरू होते आहे. ऑक्टोबर-नोव्हेंबर ते मार्चपर्यंत भरडधान्य खरेदीची प्रक्रिया होते. महसूल कर्मचाऱ्यांनी या प्रक्रियेला विरोध केला आहे. कामाचा ताण वाढला असून, त्यात निवडणुका आहेत. त्यामुळे गोदामपाल म्हणून लिपिक, अव्वल कारकून यांना नेमण्यात येऊ नये, अशी मागणी केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, कर्मचाऱ्यांना दिवसभर गोदामावर उपस्थित राहून भरडधान्य खरेदी करून घेणे व त्यानंतर शासकीय संकलन ही कामे करणे शक्य होत नाही. खरेदी केलेले भरडधान्य हे मेदयुक्त असल्यामुळे त्यास हमखास कीड लागते. गोदाम अद्ययावत नाहीत, खरेदी -विक्री संघ त्याकडे लक्ष देत नाहीत. अाद्रता, कीड यामुळे तूट सहा ते आठ टक्क्यांपर्यंत जाते. ही रक्कम शासकीय कर्मचाऱ्यांकडून व्याजासह वसुली केली जाते. धान्यातील तुटी बाबत महसूल कर्मचाऱ्यांना जबाबदार न धरण्यास काम करण्यास हरकत नसल्याचेही कर्मचाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. निवेदनावर राज्य कोषाध्यक्ष विष्णू लोखंडे, राज्य महिला प्रतिनिधी वसुंधा बागूल, राज्य कार्याध्यक्ष डी. एम. देशपांडे, राहुल बनसोडे, अरविंद धोंगडे, महेंद्र गिरगे, संतोष अनर्थे, सुधाकर मोरे, परेश खासरे, बबन आवळे, मंगला मोरे, दिनेश हापत, फकिरचंद खंडागळे यांच्या स्वाक्षरी आहेत.

निवृत्तीवेतन बंद!
धान्यात तूट आल्यानंतर सरकारी कर्मचाऱ्यांकडून वसुली करण्यात येते. त्याचा कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीवेतनावरही परिणाम होतो. धान्य कमी आल्यामुळे महसूल विभागाच्या अनेक कर्मचाऱ्यांचे निवृत्ती वेतन बंद आहे. या सगळ्यांचा विचार करता अन् कामाचा व्याप लक्षात घेता इतर विभागातील कर्मचाऱ्यांची त्या कामासाठी नियुक्ती करावी, अशी मागणी कर्मचाऱ्यांनी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
शाहीरमहर्षी आत्माराम पाटील यांच्या सहाव्या स्मृतिदिनानिमित्त ‘जागर आत्मशाहिरीचा’ कार्यक्रम घेण्यात आला. गरवारे कम्युनिटी सेंटर येथे झालेल्या कार्यक्रमात युवा शाहिरांनी पोवाड्यांचे सादरीकरण केले. ज्येष्ठ शाहिरांचे मार्गदर्शन आणि तरुणांचा सहभाग लक्षणीय असल्यामुळे कार्यक्रम विशेष रंगला.
शाहीरमहर्षी आत्माराम पाटील शाहिरी मंचातर्फे गरवारे कम्युनिटी सेंटरच्या सभागृहात गुरुवारी (१० नोव्हेंबर) ‘जागर आत्मशाहिरी’चा कार्यक्रम झाला. यावेळी रंगमंचावर शाहीर अंबादास तावरे, प्रा. डॉ. समाधान इंगळे, प्रा. डॉ. राजू सोनवणे, गरवारे कम्युनिटी सेंटरचे संचालक सुनील सुतवणे, शाहीर मीरा उमप, रामदास धुमाळ, भारुडकार प्रभाकर कुटे, देवदत्त म्हात्रे, खंडूजी गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती. शाहीर तावरे, प्रा. इंगळे आणि प्रा. सोनवणे यांनी शाहीर आत्माराम पाटील यांच्या एकूण कार्यावर प्रकाश टाकला. संयुक्त महाराष्ट्राची चळवळ, सामाजिक जनजागृती आणि मराठी मुलखात आत्मभान निर्माण करण्याचे काम शाहीर पाटील यांनी केले. या कामासाठी महाराष्ट्राच्या इतिहासात त्यांची विशेष नोंद घ्यावी लागेल असे मान्यवर म्हणाले. तरूण शाहिरांनी हा सामाजिक प्रबोधनाचा वारसा टिकवण्याची गरज व्यक्त करण्यात आली. या कार्यक्रमानंतर युवा शाहीर रामानंद उगले (जालना), शाहीर यशवंत जाधव, अजिंक्य लिंगायत, सुमीत धुमाळ, शाहीर गोकुळ पाटील (जळगाव) यांनी दमदार पोवाडे सादर केले. महाराष्ट्र गीताला रसिकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. सादरीकरणातील दमदारपणा उपस्थितांना विशेष भावला. या शाहिरांना कल्याण उगले (ढोलकी) आणि गरवारे कम्युनिटी सेंटरमधील लोककला प्रशिक्षण शिबिरातील विद्यार्थ्यांनी साथसंगत केली. भारूडकार प्रभाकर कुटे यांनी स्त्रीभ्रूण हत्येवरील गीत सादर केले. तर शाहीर मीरा उमप यांनी पोवाडा आणि संत तुकडोजी महाराज रचित गीत सादरीकरणाने कार्यक्रमाचा समारोप केला. या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी शुभांगी जाधव, पल्लवी लिंगायत, विशाल उगले, सागर उदावंत यांनी पुढाकार घेतला. यावेळी रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

वारसा शाहिरीचा
तरुण शाहिरांना एकत्रित आणून शाहिरी परंपरा जोपासण्याचे काम शाहीरमहर्षी आत्माराम पाटील शाहीर मंच करीत आहे. शाहिरी महोत्सव, शाहिरी प्रशिक्षण शिबीर, शाहीर आत्माराम पाटील स्मृतीदिन अशा विविध उपक्रमातून कला जोपासना सुरू आहे. मराठवाड्यातील अनेक शाहीर या मंचाने जोडले आहेत. या कार्यक्रमात तरुणांचा अधिक सहभाग असल्यामुळे कार्यक्रम विशेष रंगतदार झाला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शास्त्रीय नृत्याने पाहुणे अचंबित

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
भारतीय संस्कृतीचा अनुभव घेण्यासाठी भारतात आलेल्या जपानी विद्यार्थ्यांनी ‘महागामी’ संस्थेला भेट दिली. संस्थेच्या संचालिका पार्वती दत्ता यांनी ओडिसी नृत्याचे धडे देऊन या विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणित केला. या उपक्रमात जपानचे १५ विद्यार्थी आणि पाच शिक्षक सहभागी झाले.
भारतीय संस्कृती जाणून घेण्यासाठी भारताच्या दौऱ्यावर असलेल्या जपानच्या चमूने दोन दिवस औरंगाबाद शहरात घालवले. ‘महागामी’ संस्थेत १६ आणि १७ नोव्हेंबरला शास्त्रीय नृत्याची माहिती करून घेतली. संचालिका पार्वती दत्ता यांच्यासह शिष्यांनी जपानी चमूला मार्गदर्शन केले. भारतीय प्राचीन वारसा आणि शास्त्रीय नृत्याचा संबंध उलगडणारे नृत्य सादर करण्यात आले. ‘महागामी’च्या विद्यार्थिनींनी कोणार्क मंदिरावरील शिल्पाकृतीचे दर्शन घडवणारे ‘बातू’, ‘अरभी पल्लवी’ आणि पावसाच्या पाण्याचे विलोभनीय दर्शन घडवणारे ‘जलबिंदू’ नृत्य रचना सादर केली. जपानी विद्यार्थ्यांनीही ताल पकडत ओडिसी नृत्याचे धडे पार्वती दत्ता यांच्या मार्गदर्शनाखाली गिरवले. संगीत साथसंगत विनय शंकपाळ आणि श्रीकांत गोसावी यांनी केली. दुसऱ्या दिवशी चित्रकार माणिक वालावलकर यांच्याकडून विद्यार्थ्यांनी भारतीय चित्रकलेचे महत्त्व जाणून घेतले. भारतीय नृत्याचा प्राचीन वारसा समजल्यानंतर शिक्षकांनी विशेष समाधान व्यक्त केले.

सांस्कृतिक पर्यटन
‘सांस्कृतिक पर्यटन’ या संकल्पनेअंतर्गत जपानी विद्यार्थी ‘महागामी’ संस्थेत आले होते. या दोन दिवसात त्यांनी भारतीय संस्कृतीची माहिती घेतली. ‘औरा औरंगाबाद’ या कार्यक्रमातून ‘महागामी’ने औरंगाबाद शहराचा प्राचीन वारसा अधोरेखित केला आहे. आता पुन्हा एकदा सांस्कृतिक पर्यटनासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महापौरांचा राजीनामा ३० नोव्हेंबरला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
शिवसेना आणि भाजपमध्ये ठरलेल्या कराराप्रमाणे महापौर त्र्यंबक तुपे यांची दीड वर्षाची मुदत संपली. वरिष्ठांच्या आदेशानुसार तुपे ३० नोव्हेंबर रोजी विशेष सर्वसाधारण सभेत राजीनामा सादर करणार आहेत. गेल्या १५ दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चेला आता पूर्णविराम मिळणार आहे.
शिवसेना आणि भाजप युतीमध्ये पूर्वीच महापौरपद आणि स्थायी समिती सभापतिपदाबाबत निर्णय झालेला आहे. त्यानुसार पहिले दीड वर्ष शिवसेनेकडे महापौरपद होते. त्र्यंबक तुपे यांचा कालावधी संपला असून, आता ठरल्याप्रमाणे पुढील एक वर्ष महापौरपद भाजपकडे जाणार आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे १५ दिवसांपूर्वी परदेशात गेले होते. त्यामुळे यासंदर्भात निर्णय झाला नव्हता. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार; शनिवारी मातोश्रीवरून राजीनाम्यासंदर्भात निरोप आला. त्यानुसार ३० नोव्हेंबर रोजी आयोजित विशेष सर्वसाधारण सभेत महापौर तुपे राजीनामा सादर करतील.
महापालिकेची सर्वसाधारण सभा शनिवारी झाली. या सभेतच महापौर तुपे हे राजीनामा सादर करतील, अशी शक्यता होती. त्यानंतर महापौरांना पक्षाच्या वतीने अधिकृतरित्या सांगण्यात आले. त्यानुसार महापौर त्र्यंबक तुपे यांनी ३० रोजी विशेष सभा आयोजित केली आहे. त्याची विषयपत्रिका लवकरच काढण्यात येणार आहे, असे सूत्रांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कंटेनरच्या धडकेत पाच जणांचा मृत्यू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, उस्मानाबाद
येडशीहून लातूरकडे निघालेल्या कंटेनरने रस्त्याच्याकडेने पायी चालत निघालेल्या पाच जणांना चिरडल्याने त्यांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये एका बालिकेचा समावेश आहे. ही घटना उस्मानाबाद जिल्ह्यातील ढोकी शिवारात रविवारी सायंकाळी सहाच्या सुमारास घडला. पळून जाणाऱ्या कंटेनर चालकाला घटनास्थळापासून दोन किलोमीटरवर नागरिकांनी पकडले.
पोलिसांनी सांगितले की, याकुब रहिमखान पठाण (वय ५० ढोकी), राजाराम बाजीराव काळे (वय ५० रा. ढोकी), पठाण अनिसा फतेमा ( वय ४० रा. लातूर), पटेल मसीना जमीरखान (वय ३० रा. औसा), पटेल उमेर इफतेरखान (वय ३, रा. लातूर) अशी अपघातात मरण पावलेल्यांची नावे आहेत. चालकाचा कंटेनरवरील ताबा सुटल्याने हा अपघात घडल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, घटनेनंतर कंटेनर घेऊन चालक पळून जात होत. नागरिकांनी त्याचा पाठलाग केला. त्याला घटनास्थळापासून दोन किलोमीटर अंतरावर पकडण्यात यश आले.
ढोकी येथील आरोग्य केंद्रात मृतांचे पोस्टमार्टेम करण्यासाठी डॉक्टर रात्री उशिरापर्यंत नव्हते. याप्रकरणी ढोकी पोलिस ठाण्यात एपीआय किशोर मानभाव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा नोंद झाला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राजकीय दातृत्वाचा पान्हा आटला!

$
0
0

manoj.kulkarni@timesgroup.com
Tweet : @manoj.kulkarniMT
औरंगाबाद ः ऐन निवडणुकीत हात सैल सोडून धनलक्ष्मी खळाळती ठेवणाऱ्या, लग्नकार्यात वारेमाप संपत्तीचे ओंगळवाणे प्रदर्शन घडविणाऱ्या आणि चार-चार सोन्याच्या अंगठ्यांतून गर्भश्रीमंती मिरवणाऱ्या तमाम राजकीय नेत्यांच्या सामाजिक दातृत्वाचा पान्हा सणासुदीतही आटला आहे. दिवाळीत सर्वसामान्यांनी यथाशक्ती गरजूंचा आनंद द्विगुणित करण्याचा प्रयत्न केला, पण एकाही राजकीय नेत्याने शहरातल्या सामाजिक संस्थांना मदतीचा हात देण्याची दानत दाखविली नाही.
मातोश्री वृद्धाश्रमात सध्या ४५ आजी-आजोबा राहतात. आश्रमाला या काळात सर्वाधिक मदतीला ओघ मिळाला तो कॉलेजचे ग्रुप आणि सर्वसामान्यांकडून. नागेश भाले यांनी सुवासिक तेल-उटणे, अभ्यंकर यांनी फराळाचे साहित्य, डॉ. सतीश पटवर्धन यांनी नाष्टा आणि विवेक शाक्य यांनी फोटोग्राफीचे आयोजन केले. डॉ. आतिश लढ्ढा आणि हर्षल लढ्ढा यांनी २५ हजारांच्या औषधींची मदत केली. मात्र, मदत करणाऱ्यांमध्ये एकाही राजकीय नेत्याचा समावेश नव्हता, अशी माहिती सागर पागोरे यांनी दिली.
आरंभ स्वमग्न केंद्रात सध्या ३२ मुले शिक्षण घेतात. या संस्थेला कसलेही अनुदान नाही. दिवाळीत या चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलवण्यासाठी शहरवासीयांनीच पुढाकार घेतला. भावना रत्नाळीकर यांनी २० हजार, पुणेस्थित उद्योगपतींनी पाच हजार, तर आर्यन स्टोअर्सने वस्तूंच्या स्वरुपात मदत केली. कुणीही राजकीय नेता मात्र मदतीसाठी आला नाही.
भगवानबाबा अनाथाश्रमात ९४ मुली, ५१ मुले निवासी आहेत. भारतीय समाज सेवा केंद्रात सध्या २८ अनाथ मुलांचे संगोपन, पुनर्वसन होते. बाबासाई एड्स बालगृहात सध्या ४२ मुलांचे शिक्षण, उपचार, निवासाची सोय केली जाते. या संस्थांचे लाखो रुपयांचे अनुदान गेल्या आठ वर्षांपासून सरकारकडे थकले आहे. त्यामुळे यंदाची दिवाळी कशी साजरी करायची, असा प्रश्न होता. मात्र, शहरातल्या आम आदमीने वस्तू, धान्य, कपडे, फराळ देऊन त्यांची दिवाळी गोड केली. मात्र, एकाही राजकीय नेत्याने या काळात मदतीचा हात पुढे केला नाही, अशी माहिती बाबासाईचे नितीन वाकुडे, भगवानबाबाच्या कविता वाघ आणि भारतीय समाज सेवा केंद्राच्या वसुधा जातेगावकर यांनी दिली.

डझनभर केळी अन् फोटो
एका सामाजिक संस्थेचा अनुभव तर विचित्र होता. एका राजकीय नेत्याच्या चेल्याचा साहेब येणार म्हणून फोन आला. सर्वजण जेवण सोडून थांबले. साहेब नेहमीप्रमाणे तासभर उशिरा आणि फक्त दोन डझन केळी घेऊन आले. त्यांनी केळीवाटपाचे फोटो काढले. दुसऱ्या दिवशी बातम्या छापून आल्या. आमचे उपाशी आशादायी चेहरे कुणाला दिसलेच नाहीत, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

वर्षभर कुठलाच राजकीय नेता मदतीसाठी पुढे येत नाही. मदत करण्यात सर्वसामान्य आघाडीवर असतात. रोजच्या काटकसरीतून अनेकजण आमच्या संस्थेला फुल न फुलाची पाकळी मदत करतात.
- अंबिका टाकळकर, संचालिका, आरंभ

दिवाळीत कुठल्याही राजकीय नेत्याने मदत केली नाही. कॉलजचे ग्रुप, सर्वसामान्यांकडून वस्तू, कपडे, धान्य, फराळाच्या स्वरुपात आम्हाला मदत मिळाली. सामान्य लोक पाठिशी आहेत याचाच आनंद वाटतो.
- नितीन वाकुडे, बाबासाई एड्स बालगृह

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


एडीसीएची निवडणूक स्थग‌ित

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
औरंगाबाद जिल्हा क्रिकेट संघटनेची (एडीसीए) येत्या २७ नोव्हेंबरला होणारी निवडणूक स्थगित करण्यात आली आहे. क्रिकेट संघटनेत गेल्या २८ वर्षांपासून सुरू असलेला वाद मिटला आहे.
औरंगाबाद जिल्हा क्र‌िकेट संघटनेच्या आजीव सभासदांची सोमवारी हॉटेल बग्गा इंटरनॅशनलमध्ये सायंकाळी बैठक झाली. या बैठकीला धर्मादाय आयुक्तांकडे प्रलंबित असलेल्या सर्व प्रकरणातील प्रतिनिधींची उपस्थ‌िती होती. या बैठकीत संघटनेचे माजी अध्यक्ष राम भोगले, वर‌िष्ठ अॅड. दिनेश वकील- गंगापूरवाला, उद्योगपती रवी माछर, प्रसिद्ध वास्तू विशारद विजय तावडे, सीए गौतम नंदावत, जे के ग्रोवर, हिरालाल गादीया, डॉ. उल्हास गवळी, डॉ. सुनील देशपांडे आदींसह संघटनेचे जवळपास ५० सभासद उपस्थ‌ित होते. या बैठकीत सध्या धर्मादाय आयुक्त कार्यालयात प्रलंबित असलेल्या प्रतिनिधींव्यति‌रिक्त काही आजीव सभासदांचा समावेश करून अस्थायी समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. ही समिती स्थापन करण्यात आल्याचे धर्मादाय आयुक्तांना कळविले जाणार आहे. या समितीवर धर्मादाय आयुक्तांकडे शिक्कामोर्तब करण्याची विनंती केली जाणार आहे.२७ नोव्हेंबरला होणाऱ्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया शनिवारपासून सुरू झाली आहे. मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता.
अस्थायी समिती अशी ः राम भोगले, जे. यू. मिटकर, सचिन मुळे, सुभाष पटेल, शिरीष बोराळकर, चक्रधर दळवी, मोहन बोंबले, दिनेश वकील, अतुल कराड, गौतम नंदावत, डॉ. सुनील देशपांडे, हेमंत मिरखेलकर, मोहन बोरा, वसंत शर्मा.

सहा महिन्यांत निवडणुका
धर्मादाय आयुक्त कार्यालयाला मंगळवारी तडजोडीचे पत्र सादर केले जाणार आहे. येत्या तीन महिन्यांत न्या. आर. एम. लोढा यांनी शिफारस केल्याप्रमाणे महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या आदेशानुसार आैरंगाबाद जिल्हा क्रिकेट संघटनेची नव्याने घटना तयार केली जाईल. आणि त्यानंतर तीन महिन्यांत संघटनेच्या नवीन घटनेनुसार निवडणूक घेण्याचा निर्णय या बैठकीत नि‌श्चित करण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुदतवाढ न देता कारवाई करा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, खुलताबाद
महावितरण कंपनीची कामे मुदतीत पूर्ण न करणाऱ्या कंत्राटदाराला मुदतवाढ न देता दंड वसूल करावा. वेळीच काम न झाल्यामुळे शेतकऱ्यांना वीजपुरवठा होत नसून शेतीचे नुकसान होत आहे. या नुकसान भरपाईसाठी कंपनीविरुद्ध कोर्टात दावा करणार आहे, असा इशारा आमदार प्रशांत बंब यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना दिला.
गंगापूर तालुक्यातील लासूर स्टेशन येथे नुकत्याच झालेल्या तक्रार निवारण बैठकीत ते बोलत होते. आमदार बंब यांनी गंगापूर-खुलताबाद तालुक्यातील वीज समस्या सोडवणुकीसाठी बैठक आयोजित केली होती. गेल्या महिन्यात झालेल्या बैठकीत उपस्थित मुद्द्यांची उत्तरे या बैठकी अधिकाऱ्यांकडे मागण्यात आली. पण, त्यावर अधिकारी खुलासा करू शकले नाहीत. येत्या १५ दिवसात सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांची मुख्य अभियंता यांच्याकडे बैठक घेणार असल्याचे सांगितले. यावेळी बाजार समितीचे माजी सभापती नंदकुमार गांधिले, पंचायत समिती सदस्य कृष्णा सुकासे, खुलताबाद पंचायत समितीचे उपसभापती दिनेश अंभोरे, प्रकाश वाकळे, किशोर नलावडे, महावितरणचे कार्यकारी अभियंता राम काळे, गंगापूरचे प्रशांत तोडकर, उपकार्यकारी अभियंता एस. एस. शिंपी, माधुरी मनोरकर आदींची उपस्थिती होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

झेडपी अधिकाऱ्यांकडून गोळेगावात पाहणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, खुलताबाद
जिल्हा परिषदेच्या ‘एक दिवस ग्रामस्थांसोबत’ या उपक्रमात शनिवारी तालुक्यातील गोळेगाव येथे मुख्य कार्यकारी अधिकारी मधुकरराजे आर्दड यांच्यासह जिल्हा परिषदेचे सर्व अधिकाऱ्यांनी दिवस घालवला. यावेळी गावात राबवलेल्या विविध विकास कामांची पाहणी करण्यात आली.
गोळेगावला निर्मलग्राम पुरस्काराने राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मानित करण्यात आले आहे. सरपंच संतोष जोशी यांनी प्रास्ताविकात ग्रामस्थांच्या सहकार्याने लोकसहभागातून करण्यात आलेल्या विविध कामांची माहिती दिली. जिल्हा परिषद शाळेची पाहणी करून वृक्षारोपण करण्यात आले. विविध योजनांचा लाभ देऊन गावाच्या विकासासाठी सर्वोतोपरी मदत करणार असल्याचे सीईओ आर्दड यांनी सांगितले.
विशेष घटक योजनेतील विहीर अनुदानाचे धनादेश लाभार्थ्यांना वाटप करण्यात आले. पशुधन तपासणी करण्यात आली. पशुधन विमा योजनेंतर्गत १०३ लोकांनी पशुविमा काढला होता त्यांचे पॉलिसीचे वितरण आर्दड यांच्या हस्ते करण्यात आले. ग्राम संघ, महिला बचतगटांना मार्गदर्शन करण्यात आले. याप्रसंगी पंचायत समिती सभापती फरजाना पटेल, डी. डी. काळे, अनिल पाटील श्रीखंडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश बेदमुथा, उपमुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंके, जिल्हा परिषद कृषी विकास अधिकारी आनंद गंजेवार, शिक्षणाधिकारी आर. एस. मोगल, पशुसंवर्धन अधिकारी डॉ. डी. एस. कांबळे, गटविकास अधिकारी डॉ. राम लाहोटी, गटशिक्षणाधिकारी व्ही. सी. केवट आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोस्ट कर्मचाऱ्याला वेरूळमध्ये मारहाण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, खुलताबाद
आत्ताच आमच्या आरडीचे पैसे दे, असे म्हणून शिवीगाळ करून डाक सहायक गणेश शिवराम कदम (वय २७, रा. वेरूळ) यांना मारहाण करण्यात आली. हा प्रकार वेरूळ पोस्ट कार्यालयात शनिवारी घडला. याप्रकरणी सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी लहू परभत भालेराव (रा. वेरूळ) याच्याविरुद्ध खुलताबाद पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
लहू परभत भालेराव यांच्या पत्नीने वेरूळ पोस्ट कार्यालयात आरडी (बचत खाते) उघडून पैसे जमा केलेले आहेत. उपचारासाठी पैशांची गरज असल्याने भालेराव हे शनिवारी पोस्ट कार्यालायत गेले तेव्हा कर्मचारी पैसे मोजत होते. भालेराव याने अरेरावीची करून डाक सहायक गणेश कदम यांना आत्ताच आरडीचे पैसे दे, तू मला पोस्ट ऑफिसबाहेर भेट, तुला दाखवतो अशी धमकी देत शिवीगाळ करून मारहाण करण्यास सुरुवात केली. या मारहाणीत कदम यांच्या डोळ्याला दुखापत झाली. कदम यांची वैद्यकीय तपासणी करून त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस हेडकॉन्स्टेबल गणेश काथार तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

...तर शनिवारीच द्यावा लागला असता राजीनामा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
महापौर त्र्यंबक तुपे यांनी शनिवारची सर्वसाधारण सभा लवकर संपवली. सर्वसाधारण सभा नेहमीप्रमाणे सायंकाळपर्यंत चालली असती, तर त्याच सभेत त्यांना महापौरपदाचा राजीनामा द्यावा लागला असता, अशी माहिती सूत्रांनी दिली.
महापौर त्र्यंबक तुपे यांनी शनिवारी (१९ नोव्हेंबर) सर्वसाधारण सभेचे आयोजन केले होते. त्यांच्या कार्यकाळात झालेल्या प्रत्येक सर्वसाधारण सभेत सुरुवातीला नगरसेवकांनी विचारलेल्या प्रश्नांवर चर्चा होते. त्यानंतर विषयपत्रिकेवर चर्चा होऊन त्यावर निर्णय घेतला जातो. विषयपत्रिकेनंतर अत्यावश्यक विषयांवर चर्चा होते. शनिवारच्या सर्वसाधारण सभेत तुपे यांनी हा क्रम बदलला. थेट विषयपत्रिकेलाच त्यांनी हात घातला आणि अकरा वाजता सुरू झालेली सर्वसाधारण सभा दीड वाजता संपवली.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार; तुपे यांच्या महापौरपदाच्या राजीनाम्याबद्दल शनिवारी दुपारी तीनच्या सुमारास मुंबईत बैठक झाली. त्याच बैठकीत राजीनाम्याचा निर्णय घेण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना केलेला फोन या निर्णयात महत्त्वाचा ठरला. शनिवारी सर्वसाधारण सभा सुरू असताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे शहरातच होते. त्यांनी मुख्यमंत्र्यांशी संपर्क साधून तुपे यांच्या राजीनाम्याबद्दल ठाकरे यांच्याशी चर्चा करण्याची विनंती केली. त्यानुसार फडणवीस व ठाकरे यांच्यात चर्चा झाली आणि तुपे यांच्या राजीनाम्याचा निर्णय मुंबईत झाला, परंतु तोपर्यंत महापालिकेची सर्वसाधारण सभा संपली होती. नेहमीप्रमाणे सायंकाळपर्यंत सर्वसाधारण सभा चालली असती तर तुपे यांना राजीनामा देण्याचा आदेश सर्वसाधारण सभेदरम्यानच आला असता.
तुपे यांना मुंबईतील बैठकीची कुणकूण लागली व त्यांनी लवकर सर्वसाधारण सभा संपवली, असेही आता चर्चिले जात आहे. महापौरपदाच्या राजीनाम्याचा शनिवारी मुंबईत दुपारी झालेला निर्णय जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांना कळविण्यात आला. दानवे यांनी रविवारी सकाळी त्याची माहिती तुपे यांना दिली व राजीनामा देण्याची सूचना केली.

उद्धव ठाकरेंना मेल पाठवला
अंबादास दानवे यांनी त्र्यंबक तुपे यांना ‘मातोश्री’चा निरोप पोचविला. त्यानंतर रविवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास तुपे यांनी आपल्या स्टाफला महापौर कार्यालयात बोलावले. तेथून शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना ई-मेलद्वारे पत्र पाठविले. ‘आपल्या आदेशानुसार मी महापौरपदाचा राजीनामा देणार आहे. राजीनामा देण्यासाठी ३० नोव्हेंबर रोजी विशेष सर्वसाधारण सभा आयोजित केली आहे,’ असे या पत्रात म्हटले आहे.

अशी असेल राजीनाम्याची पद्धत
३० नोव्हेंबरच्या सर्वसाधारण सभेत प्रथम प्रमोद राठोड उपमहापौरपदाचा राजीनामा महापौर त्र्यंबक तुपे यांच्याकडे देतील. त्यांचा राजीनामा घेतल्यानंतर तुपे सभागृहातील ज्येष्ठ नगरसेवकाला किंवा स्थायी समितीच्या सभापतींना महापौरांच्या खुर्चीवर बसण्याची विनंती करतील. महापौरांच्या खुर्चीत बसलेल्या सदस्याकडे ते महापौर व उपमहापौरपदाचा राजीनामा सादर करतील. महापौरांच्या खुर्चीत बसलेला सदस्य राजीनामा स्वीकारून तो पुढील कारवाईसाठी आयुक्तांना देईल. आयुक्त राजीनाम्याची माहिती विभागीय आयुक्तांना देतील. नवीन महापौर निवडीची सर्वसाधारण सभा विभागीय आयुक्त आयोजित करतील. विभागीय आयुक्तांनी नियुक्त केलेल्या अधिकाऱ्याच्या अध्यक्षतेखालील सर्वसाधारण सभेत नवीन महापौरांची निवड होईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

साताऱ्यातील समस्यांकडे मनपाचे दुर्लक्ष

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, सातारा
कित्येक वर्षांपासून सातारा, देवळाईतील रहिवाशी सुविधांपासून वंचित आहेत. महापालिकेत समावेश होऊन वर्ष झाले तरी समस्यांची सोडवणूक करण्यास अद्याप सुरुवात झालेली नाही. त्यामुळे आधी सुविधा द्या, नंतरच कर वसुली करा, अशी येथील नागरिकांची भूमिका आहे. यासंदर्भात सातारा देवळाई जनसेवा कृती समितीतर्फे पालिका आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांना नुकतेच निवेदन देण्यात आले.
कायमस्वरूपी पाणीपुरवठा योजना नसल्यामुळे दरवर्षी बोअरचे पाणी आटल्यावर उन्हाळ्यात पाणीटंचाईला सामोरे जावे लागते, पाणी विकतच घ्यावे लागते. रस्ते नसल्यामुळे पावसाळ्यात सर्वत्र चिखल व पाण्याचे डबके साचतात. त्यामुळे अशा रस्त्यांवरून वाहन चालवणे तर दूर पायी चालणेही अवघड होते. परिसरातील पथदिवे कित्येक वर्षांपासून बंद आहेत. याशिवाय एनए ४५ मध्ये झालेली बांधकामे नियमित करावी, मालमत्ता नियमित व्हावी याकरिता ४७ ब करण्यासाठी ३ वर्षांपूर्वी भरलेले पैसे, बांधकाम परवानगी, मोकाट कुत्रे, डुकरांचा वाढता उपद्रव, बीड बायपासला सर्व्हिस रोड या समस्याही प्रलंबित आहेत. येथील नागरिक स्वत:हून कर भरण्‍यास तयार आहेत. परंतु, महापालिकेने आधी सुविधा देण्‍याची मागणी आयुक्‍तांना निवेदनाद्वारे करण्‍यात आली आहे.
निवेदनावर रामचंद्र मोरे, डॉ. वसंत बावणे, लक्ष्‍मण वारकरे, बाबुराव गिते, लिंबाजी नरवडे, रामदास मनगटे, गायके, ताराचंद राजपूत, अशोक सपाटे, शिवाजी जाधव आदींच्‍या स्‍वाक्षऱ्या आहेत.

४७ ब करण्यासाठी तीन वर्षांपूर्वी पैसे भरलेले आहेत. अद्याप त्यावर काहीच निर्णय झालेला नाही. येथील रहिवाशी कर भरण्यास तयार आहेत. परंतु, महापालिकेने आधी सुविधा देणे गरजेचे आहे.
-मेघा थोरात

बीड बायपासवर झालेल्या अपघातांमुळे अनेकांचे बळी गेलेले आहेत. तेथून अवजड वाहनांची दिवसरात्र वाहतूक सुरू असते. त्यामुळे महापालिकेने सर्व्हिस रोडचे काम तातडीने केले पाहिजे.
स्वाती शिंदे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पैठण रोडवर पुन्हा खड्डे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
शहरात सद्यस्थितीला सर्वाधिक रहदारीचा असलेला औरंगाबाद-पैठण रस्ता पुन्हा एकदा खड्ड्यात गेला आहे. महानुभाव चौक ते पैठण लिंक रोड हा रस्ता गेल्या तीन वर्षांपासून दरवर्षी दुरुस्त केला गेला, पण काही महिन्यातच रस्त्यावर पुन्हा खड्डे पडले. गेल्या वर्षी तर दोन किलोमीटर अंतराच्या या रस्त्याच्या साइडपट्ट्या करून रस्ता रुंद करण्यात आला, पण दुरुस्त न केलेल्या रस्त्यावर पुन्हा खड्डे पडल्याने नागरिकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. हा रस्ता संपूर्णपणे कधी दुरुस्त होणार याबाबत मात्र प्रश्नचिन्ह आहे.
औरंगाबाद-पैठण या पन्नास किलोमीटरच्या रस्त्यावरील सर्वात महत्त्वाचा टप्पा म्हणून महानुभाव चौक ते पैठण लिंक रोड हा रस्ता ओळखला जातो. शहराच्या हद्दीत असलेला हा रस्ता २४ तास वर्दळीचा असतो. या रस्त्याची दरवर्षी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून डागडुजी करण्यात आली.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार; २०१३मध्ये दीड कोटी खर्च करण्यात आला. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना ६२ झाडे आहेत. या रस्त्याच्या बाजूने असलेल्या साइडपट्ट्यांचे डांबरीकरण केले जात नव्हते. त्यामुळे उपलब्ध रस्त्यावर कितीही डागडुजी केली तरी काही दिवसांत खड्डे पडतात. दोन वर्षांत हा रस्ता पुन्हा चाळणी झाला. २०१५च्या जुलै महिन्यात एका कार्यक्रमासाठी संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर आणि रेल्वेमंत्री सुरेश प्रभू औरंगाबादेत आले होते. त्यावेळी जालना रस्त्यावर तीन उड्डाणपुलांची कामे सुरू असल्याने वाहतुकीस अडथळा येऊ नये म्हणून मंत्र्यांना या रस्त्याने नेण्याचा निर्णय झाला. केवळ डागडुजी करण्याऐवजी साइडपट्ट्यांचे मजबुतीकरण करण्याचे ठरले. त्यावेळी १५ दिवसांत दोन कोटी रुपये खर्चून हा रस्ता तयार केला गेला. त्याला वर्ष होत नाही तोच साइडपट्ट्यांच्या मधला रस्ता पुन्हा उखडला आहे. वाळूज, नगर, मुंबईकडे बीडबायपासकडून जाणारी जड वाहने या रस्त्यावरून जातात. वाहनांची संख्या पाहून पीडब्ल्यूडीने मजबुतीकरणाचे निकष ठरविणे आवश्यक होते, पण तसे न झाल्याने पुन्हा एकदा रस्ता खड्ड्यात गेला आहे.
खड्ड्यातून वाट काढताना वाहनधारकांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या रस्त्याच्या मजबुतीकरणासाठी ३० कोटी रुपये मंजूर केले गेले असून, निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर या रस्त्याचे काम सुरू होईल, पण आणखी किती दिवस नागरिकांना त्रास सहन करावा लागणार हा प्रश्न मात्र अनुत्तरित आहे.

महानुभाव चौक ते पैठण लिंक रोड रस्त्यावर खड्डे पडले आहेत. रस्त्यासाठी निधी मंजूर झाला आहे. ती प्रक्रिया लवकरच होईल पण तोवर नागरिकांची अडचण होऊ नये, यासाठी तातडीने खड्डे बुजविण्यास सांगितले आहे. त्या कामाला लवकरच सुरवात होईल.
- मिलिंद बारभाई, कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


दिल्लीत ७ डिसेंबरपासून आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सव

$
0
0

औरंगाबाद : विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालय, भूविज्ञान मंत्रालय आणि विज्ञान भारती यांच्यातर्फे नवी दिल्ली येथे ७ ते ११ डिसेंबर या कालावधीत इंडिया इंटरनॅशनल सायन्स फेस्टिव्हल आयोजित करण्यात आले आहे.
‘सायन्स फॉर द मासेस’ या संकल्पनेवर आधारित हे सायन्स फेस्टिव्हल राहाणार आहे. कौन्सिल फॉर सायन्टिफिक अँड इंडस्ट्रिअल रिसर्चचे सहकार्य या फेस्टिव्हलला लाभले आहे. विज्ञान व तंत्रज्ञानाची माहिती सर्वसामान्यांना व्हावी, हा दृष्टिकोन या आंतरराष्ट्रीय महोत्सवाचा आहे. सायन्स फेस्टिव्हलसाठी विज्ञान भारतीचे स्थानिक अध्यक्ष डॉ. एन. जी. पळसकर, सचिव डॉ. ज्योती जोशी-वरूडकर यांनाही निमंत्रित करण्यात आलेले आहे. देश-विदेशातील शास्त्रज्ञ, तंत्रज्ञ व सामान्य नागरिकांचाही यात सहभाग असणार आहे. यंग सायंटिस मीट, सायंटिफिक वर्कशॉप, सायन्स व्हिलेज, इंडस्ट्री अॅकॅडेमिया इंटरॅक्शन, सायन्स फिल्म फेस्टिव्हल, टेक्नॉलॉजी अँड इंडस्ट्री एक्स्पो अशा विविध कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले आहे. त्यात प्राध्यापक, शिक्षक, संशोधक, उद्योजक, शास्त्रज्ञ, शेतकरी, अभियंते, डॉक्टर्स, विद्यार्थी आदींनी सहभागी व्हावे. या फेस्टिव्हलची सविस्तर माहिती ‘आयआयएसएफ’च्या www.scienceindiafest.org या वेबसाइटवर आहे. अधिक माहितीसाठी डॉ. पळसकर व डॉ. ज्योती जोशी यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महामंडळाला आर्थिक सहकार्याचे आवाहन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या कार्यासाठी आर्थिक सहकार्य करण्याचे आवाहन अध्यक्ष श्रीपाद भालचंद्र जोशी करीत आहेत. सोशल मीडियाचा प्रभावी वापर करून जोशी यांनी तीन महिन्यांत एक लाख २० हजार रुपयांची मदत गोळा केली. सर्वसामान्यांकडून मदत गोळा करणाऱ्या महामंडळाने शासनाचे अनुदान नाकारावे अशी टीका सुरू आहे. तर ‘फुलाची पाकळी नको, फूलच द्या’ असे जोशी यांनी लघुसंदेशात म्हटले आहे.
अखिल भारतीय साहित्य महामंडळ आर्थिकदृष्ट्या सक्षम झाल्याशिवाय मराठी भाषेचे भले होणार नाही अशी चर्चा अनेक वर्षांपासून सुरू आहे. महामंडळाच्या तत्कालीन अध्यक्ष दिवंगत वसुंधरा पेंडसे-नाईक यांनी निधी कोश सुरू करून एक रूपया मदत देण्याचे आवाहन केले होते. मात्र, आवाहनानंतरही पुरेसा निधी उभा राहिला नाही. सध्या महामंडळाचे अध्यक्ष श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी निधी गोळा करण्याचे विशेष नियोजन केले आहे. मागील तीन महिने ई-मेल, पत्र, एसएमएस या माध्यमातून त्यांची धडपड सुरू आहे. राज्यातील हजारो मराठी भाषिकांपर्यंत त्यांचा संदेश पोहचला आहे. एकदा आवाहन केल्यानंतर वाचकांना विसर पडतो. त्यामुळे जोशी पुन्हा-पुन्हा वाचकांशी संपर्क साधत आहेत. परिणामी, तीन महिन्यांत एक लाख २० हजार रुपये मदत गोळा झाली. मराठवाड्यातील साहित्यिक, वाचक आणि विविध संस्थांना मदतीचे आवाहन करण्यात आले आहे. व्हॉटसअॅप व फेसबुक या सोशल मीडियाचा प्रभावी वापर करण्यात आला आहे. दरवर्षी साहित्य संमेलन घेण्यासाठी स्वागताध्यक्षाचा शोध घ्यावा लागतो. साहित्य संमेलन कुणी आणि कसे घ्यावे यावरून वाद-विवाद होतात. शासनाच्या तुटपुंज्या निधीत महामंडळाचा कारभार सुरू आहे. महामंडळाचे पदाधिकारी आणि कर्मचारी यांना पुरेसे मानधन नसण्याचा मुद्दा ऐरणीवर आहे. या प्रश्नावर तीन वर्षांत काही प्रमाणात तोडगा काढण्याचा जोशी यांचा दावा आहे.
दरम्यान, मराठी भाषिकांकडून मदत गोळा करण्याचा महामंडळाला नैतिक अधिकार नाही. मदत गोळा करणारे महामंडळ शासनाचे अनुदान नाकारणार का असा सवाल साहित्यप्रेमींनी केला आहे.

शाळांना आवाहन
सुज्ञ वाचकांना आवाहन केल्यानंतर महामंडळाने शाळांकडे मोर्चा वळवला आहे. विद्यार्थी व शिक्षकांना एक ते दहा रूपये मदत करावी असे आवाहन करण्यात आले आहे. या उपक्रमातून मोठा निधी उभा राहील. मराठीच्या भवितव्याबद्दल काळजी वाटत असलेल्या मराठी माणसांनी मदत करणे अपेक्षित आहे. ‘फूल न् फुलाची पाकळी द्यावी,’ असे म्हणण्याची रित आहे, मात्र ‘पाकळी नको, फूलच द्या’ असे आवाहन जोशी यांनी केले आहे.

साहित्य संमेलनाच्या नियोजनाशी साहित्य महामंडळ जमा करीत असलेल्या मदतीचा काही संबंध नाही. भाषा, साहित्य, संस्कृतीबाबत काम करण्यासाठी महामंडळाकडे पैसे नाहीत. एकीकडे महामंडळ काय करते म्हणायचे आणि दुसरीकडे टीका करायची. जनतेची इच्छा असल्यास महामंडळ निश्चित चांगले काम करील.
- श्रीपाद भालचंद्र जोशी, अध्यक्ष, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ

मागील काही वर्षांत एककल्ली कारभाराने अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाने विश्वासार्हता गमावली. वाचक, लेखक, प्रकाशक महामंडळापासून अलिप्त आहेत. शासनाच्या अनुदानातून साहित्य संमेलन घेणे एवढीच जबाबदारी महामंडळ पार पाडते. मराठी भाषेच्या संवर्धनासाठी भरीव काम केले नाही. जनतेचा विश्वास मिळवल्यास महामंडळाला मदत कमी पडणार नाही.
- प्रा. डॉ. गणेश मोहिते, समीक्षक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सुदृढ, निरोगी जीवनशैली आवश्यक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
आजच्या धकाधकीच्या जीवनात सुदृढ व निरोगी जीवनशैली आत्मसात करणे अत्यावश्यक आहे, असे प्रसिद्ध उद्योजक व लॉजिकल सोल्युशन्सचे व्यवस्थापकीय संचालक अभय देशमुख यांनी सांगितले.
रोटरी क्लबच्या (औरंगाबाद पश्चिम) साप्ताहिक सभेत ते बोलत होते. त्यांनी अतिशय रोचक पद्धतीने, साधी व सोपी उदाहरणे देत विषयाची मांडणी केली. प्रत्येक माणसाने स्वतःचे हेल्थ ऑडिट करणे आवश्यक आहे, असे सांगून त्यांनी, १९६६ ते २०१६ यादरम्यानचा त्यांच्या स्वतःच्या जीवनाचा आलेख त्यांनी श्रोत्यांसमोर मांडला.
निरोगी जीवनशैली आत्मसात करण्याचे महत्त्वाच सांगताना त्यांनी विविध उदाहारणे दिली. निरोगी राहण्याने आत्मविश्वास वाढतो, तणाव कमी होतो. आजच्या काळात शांत जगणे अवघड आहे, पण त्याहीपेक्षा शांतपणे मरण अवघड आहे. निरोगी माता-पिता ही आपण आपल्या मुलांना देऊ शकणारी सर्वात चांगली भेट असते. आजकालची उपचारपद्धती अत्यंत क्लिष्ट आणि महाग झाली आहे. चांगले डॉक्टर व योग्य सल्ला मिळणे अवघड झाले आहे. डॉक्टर उपचार देऊ शकतात पण काळजी फक्त कुटुंबीयांनाच घ्यावी लागते. कुटुंब न्युक्लिअर झाल्यामुळे सर्व कुटुंब व्यवस्था बिघडून जाते, असे त्यांनी सांगितले.
रोटरीचे हेमंत लांडगे यांनी स्वागत केले. क्लबचे अध्यक्ष अनंत पंडित यांनी प्रास्ताविक केले, सचिव अनिरुद्ध नाईक यांनी आभार मानले. अजित वैष्णव, डॉ. शिल्पा वैष्णव, डॉ. रुपाली अष्टपुत्रे, वर्षा देशमुख, स्वाती पंडित, मंजुषा लांडगे ह्यांची प्रमुख उपस्थिती होती.

व्यायाम टाळण्याची कारणे अनेक
मला वेळ नाही. मला जमत नाही. मी लवकर उठूच शकत नाही. मला रक्तदाब, डायबेटीज नाही. मी दारू, सिगारेट पीत नाही. मी नॉनव्हेज खात नाही. मला काही होऊच शकत नाही. मी अधून-मधून योग करतो. आमच्या कुटुंबात कुणालाच झाले नाही. त्याचबरोबर अनेक व्यावसायिक करणेही असतात, पण दिवसातला १ तास स्वतःसाठी देणे आवश्यक असते कारण बाकीचे २३ तास आपण निष्क्रिय असतो व हवी तशी ऊर्जा आपण खर्च करत नाही, असे देशमुख यांनी सांगितले.

खाताना करा विचार
इमानदारीने जसा पैसा कमावला पाहिजे; तसेच इमानदारीने खाल्ले पाहिजे. म्हणजे प्रत्येक गोष्ट खाताना, ही मी कमवली आहे का, ही खाण्याचा आज मला अधिकार आहे का, याचा विचार करणे आवश्यक आहे. त्यासाठी आवश्यक व्यायाम मी आज केला आहे का, हा विचार करणे आवश्यक आहे. आहारातला नियमित समतोल आणि नियमित व्यायाम ही उत्तम आरोग्याची गुरुकिल्ली आहे, असे त्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पालिकेचे वाचनालय पाच दिवसांपासून बंद

$
0
0

औरंगाबाद ः महापालिकेचे रोशनगेट येथील वाचनालय (वाचन केंद्र) पाच दिवसांपासून बंद असून, त्यामुळे वाचकांची गौरसोय होत आहे, अशी तक्रार जनजागरण समितीचे अध्यक्ष माजी नगरसेवक मोहसीन अहेमद यांनी महापालिकेचे आयुक्त ओम प्रकाश बोकोरिया यांच्याकडे केली आहे.
रोशनगेट जवळील सर सय्यद कॉलेजच्या शेजारी पालिकेचे वाचन केंद्र आहे. तेथे विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक नियमित दुपारी चार ते रात्री आठदरम्यान वाचन करण्यासाठी येतात, परंतु पाच दिवसांपासून हे केंद्रच बंद अाहे. त्यामुळे या सर्वांची गैरसोय होऊ लागली आहे, असे मोहसीन अहेमद यांनी म्हटले आहे.
वाचन केंद्र सुरू करण्यात यावे. त्यावर फलक लावून तेथे वाचन केंद्राच्या वेळा लिहिव्यात, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात यावी, तुटलेली संरक्षक भींत दुरुस्त करण्यात यावी, अशा मागण्याही त्यांनी आयुक्तांकडे केली आहे.

दोन दिवसांत केंद्र सुरू
यासंदर्भात ‘मटा’ प्रतिनिधीने पालिकेच्या ग्रंथपाल समता लोंढे यांच्याशी संपर्क साधला असता त्या म्हणाल्या,‘वाचन केंद्रातील कर्मचारी हज यात्रेसाठी गेल्यामुळे दोन दिवसांपासून ते केंद्र बंद आहे. पर्यायी व्यवस्था करण्याचा प्रयत्न सुरू आहे. येत्या दोन-तीन दिवसांत कर्मचारी उपलब्ध करून देऊन वाचन केंद्र सुरू केले जाईल.’

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तरुणाचा मृतदेह सलीम अली सरोवरात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
गेल्या दोन दिवसांपासून घरातून बेपत्ता असलेल्या एका २२ वर्षांच्या तरुणाचा मृतदेह सोमवारी सलीम अली सरोवरात आढळला. ज्ञानेश्वर कवडे (रा. सुदर्शनगर, हडको) असे मृताचे नाव असून, याप्रकरणी सिटी पोलिस तपास करत आहेत.
सलीम अली सरोवरात एका युवकाचा मृतदेह असल्याची माहिती पोलिसांना सकाळी साडेअकराच्या सुमारास मिळाली. सिटी चौक पोलिसांसह अग्निशमन दलाच्या जवानांनी मृतदेह पाण्याबाहेर काढला. मृताच्या खिशात आधारकार्ड सापडले. त्यावरून मृताचे नाव ज्ञानेश्वर भाऊसाहेब कवडे (रा. सुदर्शन नगर) असल्याचे समोर आल्याचे पोलिसांनी सांगितले.
ज्ञानेश्वर हा जालना येथील शासकीय तंत्रनिकेतन कॉलेजात शिक्षण घेत होता. द्वितिय वर्षांत काही विषयांत अनुत्तीर्ण झाल्याने तो चिंतेत होता. या निराशातून त्याने आत्महत्या केली असावी, अशी शक्यता नातेवाईकांनी व्यक्त केली. हेडकॉस्टेबल दिलीप भताने अधिक तपास करत आहेत.

‘बाहेर जाऊन येतो...’
ज्ञानश्वर १९ नोव्हेंबर रोजी सकाळीच घराबाहेर पडला. ‘आई फराळाचे करून ठेव. मी कामानिमित्त बाहेर जाऊन येतो,’ असे त्याने आईला सांगितले होते. रात्री उशिरापर्यंत तो घरी न आल्याने नातेवाईकांनी शोधाशोध केली; तसेच सिडको पोलिस ठाण्यात तो हरवल्याची तक्रार देखील दिली होती. त्याचे वडील न्यायवैद्यक कॉलेजमध्ये कर्मचारी म्हणून कार्यरत आहेत, तर आई गृहिणी अाहे. त्याचा एक भाऊ व बहीण शिक्षण घेत असल्याचे सूत्रांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images