Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

घरफोड्याला मुद्देमालासह बेड्या

0
0



म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
लघु उद्योजकाच्या घरात चोरी करून तब्बल सव्वानऊ लाखांचा ऐवज लंपास करणाऱ्या शेख नासेर शेख दाऊद (मूळ रा. वसमत जि. परभणी ह. मु. रांजणगाव) या आरोपीला पोलिसांनी मुद्देमालासह बेड्या ठोकल्या. सायबर सेल व एमआयडीसी वाळूज पोलिसांनी ही कारवाई केली.
लघु उद्योजक सचिन अशोक सेठ यांच्या घरी दिवाळीपूर्वी घरफोडी झाली. घराला कुलूप असल्याची संधी साधत चोरट्याने डल्ला मारत लाखोंचा ऐवज लंपास केला. वाळूज पोलिस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, या चोरीमागे शेख नासेर शेख दाऊद याचाच हात असल्याची माहिती तांत्रिक कौशल्याच्या आधारे व गुप्त माहितीदारांकडून पोलिसांना मिळाली. त्याआधारे पोलिस उपायुक्त संदीप आटोळे, सहायक पोलिस आयुक्त खुशालचंद बाहेती यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक मधुकर सावंत, एम. वाळूज पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक नाथा जाधव, सायबर सेलचे सहायक पोलिस निरीक्षक गजानन कल्याण, उन्मेष थिटे, पोलिस उपनिरीक्षक नितीन आंधळे, हेमंत तोडकर, अमोल देशमुख वासुदेव राजपूत आदी पोलिस कर्मचाऱ्यांनी कारवाई करत वसमत येथून शेख नासेर याच्या मुसक्या आवळल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


...नवराई माझी लाडाची-लाडाची ग!

0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
‘नवराई माझी लाडाची लाडाची ग
आवड हिला चंद्राची चंद्राची ग
नवराई माझी नवसाची नवसाची ग
अप्सरा जशी इंद्राची इंद्राची ग’
नववधूच्या वेशभूषेत नटलेली चिमुकली आणि तिच्यासोबत तितक्याच गोड दिसणाऱ्या मुलींनी या गाण्यावर उपस्थितांना खिळवून ठेवणारे नृत्य केले आणि टाळ्यांचा कडकडाट झाला. एलोरा इंग्रजी शाळेच्या वार्षिक स्नेहमिलनाचा कार्यक्रम आणि शाळेचा अकरावा वर्धापन दिन शनिवारी अभिनेत्री उर्मिला कानिटकर हिच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संत एकनाथ रंगमंदिरात मोठ्या उत्साहात साजरा झाला.
‌व्यासपीठावर आमदार सतीश चव्हाण, अध्यक्ष अशोक तांबटकर, मुख्याध्यापिका संगीता शिंदे, सचिव प्रल्हाद शिंदे, मनोज पाटील आदी उपस्थित होते. यावेळी एलोरा स्कूलच्या चिमुकल्यांनी ‘काला चश्मा....,' 'झिंगाट...' आदीं गाण्यांवर डान्ससह पारंपरिक कोळी नृत्य व इतर लोककलाप्रकार सादर केले. आपल्या मुलांना दाद द्यायला पालकांनी रंगमं‌दिरात एकच गर्दी केली होती.
उर्मिलाने नाट्यमंदिरात प्रवेश केला तेव्हा शेकडो कॅमेरे तिची एकच छबी टिपण्यासाठी सरसावले होते. उर्मिलानेही आपल्या लहान-मोठ्या सर्वच फॅन्सला नाराज न करता सेल्फी तर दिलेच, आपल्या गोड आवाजात गाणेही गायले. द्वीपप्रज्वलानाने कार्यक्रमाचा सुरुवात झाली. यानंतर उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा उर्मिलाच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी शाळेच्या संपूर्ण शिक्षिकांनी परिश्रम घेतले.

ऐतिहासिक भूमिका हव्या
‘भारताचा इतिहास असे जेव्हा आपण म्हणतो, तेव्हा केवळ स्वातंत्र्यलढा आपल्याला शिकवला जातो. त्यापूर्वीही आपला इतिहास होताच की. अनेक ऐतिहासिक पात्रांविषयी नव्या पिढीला खूप कमी माहिती आहे. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर या व्यक्तीमत्वाविषयी पाठ्यपुस्तकांमध्ये सुद्धा खूप कमी माहिती आहे. नव्या पिढीला तर अहिल्याबाईंविषयी फार माहिती नसावी. त्यामुळे अहिल्याबाई होळकर यांची भूमिका मला करायला मिळणार म्हणून मी खूप उत्सा‌ही होते. मराठीमध्ये अशा पात्रांवर आधारित काम व्हावे,’ असे विचार उर्मिलाने पत्रकारांशी संवाद साधताना व्यक्त केले. यावेळी शाळेचे दिवस, नृत्यावरचे प्रेम, अभिनय क्षेत्रातील अनुभव ते आपल्या विविध भूमिका यावर तिने मनसोक्त गप्पा मारल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुस्लिम समाजाला पाच टक्के आरक्षण द्या

0
0



म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
मुस्लिम समाजाला पाच टक्के आरक्षण मिळावे, यासाठी शनिवारी मुस्लिम आरक्षण आंदोलन संघटनेच्या वतीने निदर्शने करण्यात आली. मुस्लिम समाज आर्थिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासलेला असून सच्चर समितीने यासंदर्भात अहवाल सादर केला आहे. सरकारकडे पाच टक्के आरक्षणाची शिफारस करण्यात आली होती, पण त्याची दखल घेतली गेली नाही. आर्थिक, शैक्षणिक, सामाजिक स्थितीचा विचार करून मुस्लिमांना पाच टक्के आरक्षण त्वरित द्यावे, मुस्लिम समाजातील बेरोजगार तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावे, दलित आदिवासी यांना संरक्षण देणाऱ्या अॅट्रॉसिटी कायद्याची अंमलबजावणी करण्यात यावी, मुस्लिम समाजाच्या तरूणांवर खोटे गुन्हे दाखल करून अटक केलेल्या तरुणांना मुक्त करण्यात यावे, मुस्लिम पर्सनल लॉमध्ये सरकारने हस्तक्षेप करू नये, गोवंश हत्याबंदीचा अतिरेक थांबवावा आदी मागण्या करण्यात आल्या. यावेळी मुख्य निमंत्रक सय्यद तौफिक, सहनिमंत्रक नासेर चाऊस आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रजक-धोबी समाजाची मार्चमध्ये महाफेरी

0
0



म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
देशातील सतरा राज्यात रजक-धोबी समाजाचा अनुसूचित जातीमध्ये समावेश आहे, तर महाराष्ट्रासह अकरा राज्य, चार केंद्रशासीत प्रदेशात हा समावेश झालेला नाही. देशपातळीवर समाजाचा एससी या एकच वर्गवारीत समावेश करावा, अशी मागणी राज्य परिट(धोबी) सेवा मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष बालाजी शिंदे यांनी शनिवारी केली. या मागणीसाठी १० मार्च रोजी दिल्लीत महाफेरी काढण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
स्वातंत्र्याच्या सत्तर वर्षानंतरही धोबी समाजाची स्थिती फारशी सुधारलेला नाही. विविध क्षेत्रात मागे असलेल्या समाजाला मुख्य प्रवाहत आणण्यासाठी समाजाचा अनुसूचित जातीमध्ये समावेश करण्यात यावा, या मागणीसाठी मार्चमध्ये दिल्लीला महाफेरी काढण्यात येणार आहे. २० जानेवारी रोजी कन्याकुमारी येथून ही फेरी काढण्यात येईल. फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात ही फेरी महाराष्ट्रात असणार आहे. पूर्वतयारीचा भाग म्हणून राज्यव्यापी बैठक आज औरंगाबादमध्ये पार पडली. यावेळी प्रदेशाध्यक्ष डी. डी. सोनटक्के, कार्याध्यक्ष ईश्वर मोरे, राजेंद्र सोनवणे, कचरू पालगरे, सोमनाथ बोरूडे, जयराम वाघ, संजय वाल्हे यांची उपस्थिती होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खासदारांच्या हातावर तुरी

0
0



म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
नेहमी शिवसेनेच्या निर्णयात अग्रभागी असणाऱ्या खासदार चंद्रकांत खैरे यांच्या हातावर आजी - माजी आमदार, जिल्हाप्रमुख यांनी शनिवारी तुरी दिल्याचे उघडकीस आले. त्यांनी उपमहापौर, सभागृहनेतेपदासाठीच्या नगरसेवकांची यादी खैरे यांना डावलून मुंबईला संपर्क नेत्यांच्या हाती दिली. त्यामुळे खैरे गटाकडून दुसरी यादी मुंबईला पाठवली जाण्याची शक्यता आहे.
त्र्यंबक तुपे यांनी महापौरपदाचा व प्रमोद राठोड यांनी उपमहापौरपदाचा राजीनामा दिल्यामुळे १४ डिसेंबर रोजी नवीन महापौर - उपमहापौरांची निवड होणार आहे. यावेळेस महापौरपद भाजपकडे असणार असून उपमहापौरपदावर शिवसेनेच्या नगरसेवकाची वर्णी लागणार आहे. महापौर - उपमहापौरांच्या निवडीबरोबरच सभागृहनेताही बदलला जाण्याची शक्यता आहे. महापौरपदाचा उमेदवार ठरविण्यासाठी भाजपच्या कोअर कमिटीची बैठक येत्या दोन - तीन दिवसांत होणार असल्याचे सांगितले जात आहे. शिवसेनेने मात्र उपमहापौर व सभागृहनेतेपदाच्या नियुक्तीसाठी पुढाकार घेत संपर्कनेते विनोद घोसाळकर यांना शनिवारी मुंबईत एक यादी सादर केली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार घोसाळकर यांना यादी देण्यासाठी आमदार संजय शिरसाट यांनी पुढाकार घेतला. त्यांनी यासाठी खासदार चंद्रकांत खैरे यांना डावलत जिल्हाप्रमुख अंबादास दानवे व महानगरप्रमुख, माजी आमदार प्रदीप जैस्वाल यांची साथ घेतली.
घोसाळकर यांना देण्यात आलेल्या यादीत उपमहापौरपदासाठी स्मिता घोगरे, राजेंद्र जंजाळ व गजानन मनगटे यांची नावे आहेत. सभागृहनेतेपदासाठी नंदकुमार घोडेले व विकास जैन यांची नावे देण्यात आली आहेत. स्मिता घोगरे यांच्या नावाची शिफारस आमदार संजय शिरसाट यांनी केल्याची माहिती मिळाली आहे. प्रदीप जैस्वाल यांनी जंजाळ यांच्या नावाची, तर मनगटे यांच्या नावाची शिफारस अंबादास दानवे यांनी केल्याचे वृत्त आहे. सभागृहनेतेपदासाठी देण्यात आलेल्या दोन नावांपैकी नंदकुमार घोडेले हे खासदार खैरे यांच्या गटाचे मानले जातात, तर विकास जैन यांची साथ संजय शिरसाट यांना आहे. घोडेले यांचे नाव यादीत टाकून शिरसाट-जैस्वाल-दानवे यांनी खैरे यांची रोष व्यक्त करण्याची संधी हिरावून घेतल्याचे बोलले जात आहे. असे असले तरी उपमहापौर, सभागृहनेतेपदासाठीची संभाव्य उमेदवारांची यादी परस्पर संपर्क नेत्यांना देण्यात आल्यामुळे खैरे अस्वस्थ झाले आहेत. यादी अंतिम करण्यात पालकमंत्री रामदास कदम यांनी लक्ष न घातल्यास खैरे यादीमध्ये बदल घडवून आणू शकतात असे बोलले

भाजपचे निरीक्षक आज येणार
महापौरपदाच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यासाठी आमदार संजय कुटे व आमदार सुजितसिंह ठाकूर हे दोन निरीक्षक उद्या रविवारी शहरात येणार आहेत. सकाळी अकरा वाजता त्यांच्या उपस्थितीत बैठक होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली. शहर विकास आराखड्याचे प्रकरण ‘डोळ्यासमोर ठेवून’ महापौरपदाचा उमेदवार ठरवला जाणार असल्याचे बोलले जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मजुरांच्या मुलांसाठी बालवाड्या सुरू करा

0
0



म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
‘बांधकामांच्या विविध साइटस्वर मोठ्या संख्येने मजूर काम करतात. या मजुरांच्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी आपलीच आहे. त्यांच्यासाठी साइटवरच बालवाडी सुरू करा,’ अशा कडक शब्दांत महापालिका आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांनी शनिवारी बिल्डर्स लॉबीला बजावले.
स्वच्छ भारत अभियानाच्या संदर्भात बकोरिया यांनी महापालिकेचे अधिकारी व एजीओंची बैठक घेतली. या बैठकीला रमेश नागपाल यांच्यासह काही बांधकाम व्यावसायिक देखील उपस्थित होते. स्वच्छ भारत अभियानात महापालिकेला सहकार्य करण्याचे आवाहन बकोरिया यांनी बिल्डर्सला केले.
बिल्डर्सला उद्देशून बकोरिया म्हणाले, ‘बिल्डर्सच्या विविध साइटस्वर मोठ्या संख्येने मजूर काम करतात. त्यांच्या मुलांच्या शिक्षणाची मोठी गैरसोय होते. बिल्डर्सनी त्यांच्या बांधकामाच्या साइटवर मजुरांच्या मुलांसाठी बालवाडी सुरू करावी व आत्मीयतेने या मुलांना शिक्षण द्यावे. स्वच्छ भारत अभियानाच्या उपक्रमात शहरात महापालिकेतर्फे काम केले जात आहे. या कामाची पाहणी करून राज्यस्तरावर व केंद्र स्तरावर औरंगाबाद शहराचे रँकिंग ठरविण्यासाठी ४ ते ६ जानेवारी दरम्यान केंद्र सरकारची टीम शहरात येणार आहे. या टीमला आपले शहर स्वच्छ व सुंदर आहे असे दिसले पाहिजे. यासाठी शिक्षण, आरोग्य, पर्यावरण आदी क्षेत्रात काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांनी (एनजोओ) महापालिकेला सहकार्य करावे,’ असे आवाहन बकोरिया यांनी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

२० दिवसांनी पुन्हा टोलनाके सुरू

0
0



औरंगाबाद : नोटबंदीमुळे राज्यातील टोलनाके तब्बल वीस दिवस बंद ठेवण्यात आले होते. राज्य सरकारच्या आदेशानुसार शुक्रवारी मध्यरात्रीपासून टोलनाके सुरू झाले. औरंगाबाद जिल्ह्यातील पाचही टोलनाक्यांवर वसुली पुन्हा सुरू झाली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आठ नोव्हेंबर रोजी ५०० व १००० च्या नोटा चलनातून रद्द करण्याचे जाहीर केले. त्याचा सर्वाधिक फटका टोलनाक्यांना बसला होता. सुटे नसल्याने वाहनचालक आणि टोलचालकांमध्ये वाद निर्माण झाले. नऊ नोव्हेंबर रोजी सकाळी मुंबईसह राज्यातील सर्व टोलनाक्यांवर लांबच लांब रांगा लागल्या होत्या. वाहतुकीस अडथळा येऊ नये, यासाठी राज्य सरकारने काही दिवसांची टोलबंदी केली होती, पण पुढे केंद्राच्या आदेशानुसार ती दोनवेळा वाढवून दोन डिसेंबरपर्यंत टोलवसुली बंद ठेवली होती. शुक्रवारी मध्यरात्रीपासून पुन्हा एकदा टोलवसुली सुरू झाली. औरंगाबाद जिल्ह्यात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जागतिक बँक प्रकल्पांतर्गत लाडगाव ( जि. औरंगाबाद) आणि नागेवाडी (जि. जालना) हे दोन टोलनाके आहेत. राज्य सरकारने गेल्या वर्षी खासगी वाहनांना टोलमधून सूट दिली होती. त्यानंतर या दोन्ही टोलनाक्यांवर दररोज अंदाजे आठ ते नऊ लाख रुपये वसुली होती होती. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळांतर्गत औरंगाबाद एकात्मिक रस्ते विकास योजनेतून सावंगी, चितेगाव आणि लासूर स्टेशन येथे टोलनाके बसविण्यात आले होते. त्याठिकाणाहून वसूल होणाऱ्या महसुलातून औरंगाबादेत उड्डाणपूल बांधण्यात येत आहेत. हे तीनही टोलनाके शुक्रवारी मध्यरात्रीपासून सुरू झाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दत्तक घेतलेले डोंजा गाव होणार कॅशलेस

0
0


म. टा. प्रतिनिधी, उस्मानाबाद
परंडा तालुक्यातील डोंजा गावाची वाटचाल सध्या ‘कॅशलेस ग्राम’च्या दिशेने सुरू आहे. डोंजा हे गाव आदर्श गाव योजनेतंर्गत मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांनी दत्तक घेतलेले आहे. यामुळे सध्या डोंजा या गावास आगळे-वेगळे महत्त्व प्राप्त झाले आहे.
कॅशलेस ग्राम, महिला सक्षमीकरण व युवकांसाठी स्वंयरोजगार उभा करण्यासाठी सध्या पुणे, मुंबई येथील विविध सामाजीक संस्थानी पुढाकार घेतला होता. डोंजा हे पहिले कॅशलेस ग्राम व्हावे यासाठी मुंबई येथील हक्क दर्शक सामाजिक संस्था पुणे व शासनाच्या महिला व बालविकास विभागाच्यावतीने महिला बचत गटातील महिलांची एक बैठक घेण्यात आली. यावेळी विविध विभागाचे शासकीय अधिकारी उपस्थित होते. यावेळी महिलांना एका अॅपद्वारे शासनाच्या विविध प्रकारच्या सहाशे योजनांची माहिती व त्याच्या लाभ याबाबतची महिती देण्यात आली. या अॅपद्वारे शासनाच्या विविध प्रकारच्या सहाशे योजनांची माहिती व त्याचा लाभ याबाबतची माहिती देण्यात आली आहे. हक्क दर्शक सामाजिक संस्थेच्यावतीने कॅशलेस ग्राम करण्यासाठी स्वाइप मशीनची माहिती देण्यात आली. अॅप डाऊनलोड केल्यानंतर मोबाइलवर संदेश पाठविण्यात येणार आहेत. व्हॅलेट अपची माहिती देण्यात आली. एटीएमकार्ड नसेल त्यास आधारकार्ड स्वाइप करता येणार आहे. एटीएमकार्ड व आधार‌कार्ड केंद्र डोंजा येथे सुरू करण्यात येणार आहे.

डोंजा येथे शंभर टक्के कॅशलेस व्यवहारासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी स्वाईप मशीनबाबतची माहिती देण्यात येत आहे. लवकरच येथील सर्व दुकांनात स्वाइप मशीन बसविण्यात येतील.
हर्षदा विनिया, रिर्सच मॅनेजर, हक्क दर्शक संस्था.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


चेलिपुरा टीडीआर प्रकरणीही गुन्हे

0
0

औरंगाबादः चेलिपुरा टीडीआर व मोबदला या डबलगेम प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे आदेश महापालिकेचे आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत. तसे झाल्यास या प्रकरणातील तो तिसरा गुन्हा ठरेल.

चेलिपुरा येथील सीटीएस क्रमांक १०३१० वरील मालमत्तेचे भूसंपादन महापालिकेच्या प्रशासनाने १५ मीटर रुंद रस्त्यासाठी केले होते. जागेसाठी ३ ऑक्टोबर १९९७ रोजी जमीन मालकाला ८ लाख २५ हजारांचा मोबदला दिला होता. त्याच जागेसाठी जमीन मालकाच्या मुलाने टीडीआरची मागणी केली. नगररचना विभागाने २ ऑगस्ट २०११ रोजी टीडीआर मंजूर केला. रोखीने मोबदला दिल्यावरही टीडीआर मंजूर केल्याचे प्रकरण ‘मटा’ने उघड केले. याच प्रकरणात सामाजिक कार्यकर्ते किशोर राजपूत यांनी संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी १० ऑक्टोबर २०१६ रोजी आयुक्तांकडे केली. त्यानंतर त्यांनी १ डिसेंबर रोजी स्मरणपत्रही दिले. आयुक्तांनी लक्ष घालून गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

न्यायमूर्तींच्या मुलासाठी ‘प्रोटोकॉल’ धाब्यावर

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठातील निबंधक विभागाने राजशिष्टाचाराचे नियम धाब्यावर बसविल्याचे उघड झाले आहे. न्या. पी. आर. बोरा यांचा मुलगा अक्षयला राजस्थान दौऱ्यासाठी व्हीआयपी यंत्रणा सज्ज ठेवण्याचे पत्र राजस्थान हायकोर्टाच्या निबंधकाला पाठविले. आता मात्र, नजरचुकीने असे पत्र पाठविल्याचे तसेच, तशी बडदास्त देण्यात न आल्याचा खुलासा विभागाने केला आहे.

निबंधक विभागाने राजशिष्टाचार धाब्यावर बसवून अक्षयसाठी बडदास्त ठेवण्याचे सांगण्यात आले होते. खंडपीठाचे उपनिबंधक एस. डी. धोंगडे यांच्या स्वाक्षरीने हे पत्र १८ ऑक्टोबर रोजी पाठविण्यात आले होते. ‘अक्षय नऊ दिवसांच्या राजस्थान दौऱ्यावर येत असून अति महत्त्वाच्या व्यक्तीसाठी राहण्याची सोय आणि लाल दिव्याची चांगल्या स्थितीतील इनोव्हा द्यावी,’ असे या पत्रात म्हटले होते. त्यांचा दौरा शनिवारपासून सुरू झाला आहे. ते जयपूर, जोधपूर, जैसलमेर, माउंट अबू, उदयपूर या पर्यटनस्थळांना भेट देणार असल्याचे पत्रात म्हटले आहे. अक्षय यांनी जयपूरहून त्यांच्या दौऱ्यासाठी खासगी टॅक्सी बुक केली होती.

दरम्यान, हे पत्र नजरचुकीने लिपिकाने टाइप केले होते. त्याची दुरुस्ती लगेचच राजस्थान हायकोर्टाकडे पाठविण्यात आल्याचे स्पष्टीकरण धोंगडे यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स’कडे केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शीतल गादगेंचे नगरसेवकपद रद्द

0
0

औरंगाबादः निवडणूक खर्च योग्य प्रकारे सादर न केल्याने शिवसेनेच्या शीतल गादगे यांचे नगरसेवकपद रद्द झाले आहे. त्यांना पुढील तीन वर्षांसाठी नगरसेवक म्हणून काम करण्यास व निवडणूक लढविण्यासदेखील प्रतिबंध घालण्यात आला आहे. विभागीय आयुक्त डॉ. उमाकांत दांगट यांनी हा आदेश दिला आहे. अशा प्रकारे पद जाणाऱ्या त्या पहिल्याच नगरसेवक ठरण्याची शक्यता आहे.

गादगेंना अपात्र ठरविण्याची मागणी प्रतिस्पर्धी उमेदवार विमल राजपूत यांनी तक्रारीद्वारे विभागीय आयुक्तांकडे केली होती. निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार उमेदवाराने विशिष्ट खात्यातून खर्च करून हिशेब दाखल करणे बंधनकारक आहे. गादगे यांनी त्याचे पालन केले नाही तसेच बोगस स्वाक्षऱ्या असलेली बिले सादर केल्याने त्यांचे पद रद्द करण्याची मागणी राजपूत यांनी केली होती.

दरम्यान, गादगे यांनी याबाबत कोर्टाकडे धाव घेतली होती. कोर्टाने महापालिका आयुक्तांना गादगे यांच्या स्वाक्षऱ्या तपासण्याचे आदेश दिले. त्याला गादगे यांनी आक्षेप घेतला व शासकीय स्वाक्षरी तज्ज्ञाकडून स्वाक्षरी तपासून घेण्याची विनंती केली. त्यांच्या स्वाक्षरींची कागदपत्रे तज्ज्ञांकडे पाठविण्यात आली. उमेदवारी अर्जावरील स्वाक्षरीशी बिलांवरील स्वाक्षरी जुळत नसल्याचे मत तज्ज्ञांनी नोंदवले.

महापौरपद निवडणूक कार्यक्रम जाहीर

महापौरपदासाठी १४ डिसेंबर रोजी होणाऱ्या निवडणुकीचा कार्यक्रम शनिवारी जाहीर झाला. उमेदवारी अर्जांचे वाटप ८ व ९ डिसेंबर रोजी केले जाईल. अर्ज १० डिसेंबर रोजी सायंकाळी सहापर्यंत स्वीकारले जातील. अर्ज मागे घेण्यासाठी १४ डिसेंबर रोजी सर्वसाधारण सभा सुरू झाल्यावर १५ मिनिटांचा वेळ देण्यात येईल. त्यानंतरही गरज पडल्यास हात वर करून मतदान घेतले जाणार आहे.

मंगल कार्यालये दवाखान्यांना नोटिसा

पेट्रोलपंपांपाठोपाठ महापालिकेने आता दवाखाने व मंगल कार्यालयांना लक्ष्य करण्याचे ठरविले आहे. या दोन्ही आस्थापनांची आता ‘फायर एनओसी’सह बांधकाम परवानगी, मालमत्ता कर व पाणीपट्टीची थकबाकी पालिकेच्या पथकाकडून तपासली जाणार आहे. पन्नास खाटा किंवा त्यापेक्षा जास्त खाटा असलेले दवाखाने व सर्व मंगल कार्यालयांना फायर एनओसी सक्तीची असते, पण बहुतांश दवाखान्यांसाठी व मंगल कार्यालयांसाठी ती कार्यवाही केली नसल्याचे पालिकेच्या पाहणीत स्पष्ट झाले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पवारांच्या दौऱ्यामुळे मराठवाड्यात ‘पॉवर’

0
0

Sachin.Waghmare @timesgroup.com
Tweet : wsachinMT

उस्मानाबाद : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची रणनिती अजूनही जादू करू शकते ते बीड आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील निकालांवरून दिसून आले आहे. या जिल्ह्यांत पक्षाने १४ नगरपालिकांपैकी ७ नगराध्यक्षपदे मिळविल्याचे श्रेय पवारांच्या सातत्यपूर्ण ऋणानुबंधाला दिले जात आहे. इतकेच नव्हे तर, गेल्या काही महिन्यांत त्यांनी दोन्ही जिल्ह्यांत चक्क मुक्कामच ठोकल्याची आठवणही अनेक कार्यकर्ते जागवत आहेत.

पवारांनी मे २०१५नंतर दुष्काळी भागाचा दौरा केला अन तो सर्वार्थाने गाजला. दुष्काळी परिस्थितीचे गांभीर्य समजून घेऊन त्यांना जनतेला आधार दिल्याची भावना तयार झाली. ३१ मे ते २ जून दरम्यान त्यांनी उस्मानाबाद, बीड आणि लातूर या भागाचा दौरा केला. उस्मानाबादेत डॉ. पद्मसिंह पाटील यांच्या निवासस्थानी तर अंबाजोगाईत डॉ. विमल मुंदडा यांचे पुत्र अक्षय मुंदडा यांच्या निवासस्थानी मुक्काम करून राजकीय मुत्सद्दीपणा दाखवत पवार यांनी कार्यकर्त्यांना बळ दिले. त्यानंतर १४ ऑगस्ट २०१५ रोजी उस्मानाबादेत सरकारविरोधात जेलभरो आंदोलन केले. तेव्हा त्यांनी बीडचाही दौरा केला.

त्यानंतर १ फेब्रुवारी २०१६ रोजी उस्मानाबाद जिल्ह्यातील दुष्काळी भागाचा दौरा केला तर ७ ऑगस्ट २०१६ रोजी उस्मानाबादेतील पीडित मुलीच्या घरी भेट देऊन सांत्वन केले.

१७ सप्टेंबर २०१६ रोजी बीड जिल्ह्यातील माजलगाव कारखाना परिसरातील माजी उपमुख्यमंत्री सुंदरराव सोळुंके यांच्या पुतळा अनावरणप्रसंगात ते सहभागी झाले होते. २५ ऑक्टोबर २०१६ रोजी परळीत पंडितअण्णा मुंडे यांच्या निधनानंतर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन त्यांनी केले.

असे आहेत सात नगराध्यक्ष

उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर, नळदुर्ग, भूम, परंडा व कळंब तर बीड जिल्ह्यातील बीड व परळीत राष्ट्रवादी काँग्रेसचे नगराध्यक्ष निवडून आले आहेत. तर उस्मानाबाद पालिकेत कमी फरकाने राष्ट्रवादीचे पाटोदेकर पराभूत झाले असले तरी मोठा पक्ष म्हणून राष्ट्रवादीने बाजी मारली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कॅशलेस व्यवहाराचे प्रशिक्षण द्यावे

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
नोटबंदीच्या निर्णयानंतर रोख व्यवहारात अडचणी निर्माण झाल्या आहेत. नागरिकांनी ‘कॅशलेस’ व्यवहार करावा यासाठी शासनाकडून प्रयत्न केले जात आहेत. यापद्धतीच्या व्यवहारासाठी ग्रामीण भागात प्रशिक्षण शिबिरे आयोजित करावेत, अशा सूचना अपर जिल्हाधिकारी पी. एल. सोरमारे यांनी दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयात तहसीलदार, उपजिल्हाधि‌कारी तसेच उपविभागीय अधिकाऱ्यांना बँकेतर्फे ‘कॅशलेस’ व्यवहाराचे प्रशिक्षण नुकतेच देण्यात आले, यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी निवासी उपजिल्हाधिकारी विश्वंभर गावंडे यांची उपस्थिती होती. मोबाइल बँकिंगसह ‘कॅशलेस’ व्यवहारासाठी अॅप्सचा वापर याची माहिती देण्यात आली. जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक जी. जी. वाकडे आणि एसबीएचचे विशाल सोनवणे यांनी अधिकाऱ्यांना प्रात्यक्षिक दाखवले. या बैठकीत बँकांना देखील तालुकास्तरावर प्रशिक्षण शिबिर घेण्याच्या सूचना देण्यात आल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मायक्रो एटीएमद्वारे जिल्ह्यात व्यवहार

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
नोटबंदीच्या निर्णयानंतर सर्वांनाच ‘प्लास्टिक मनी’ची आठवण झाली आहे. पण, औरंगाबाद जिल्ह्यात चार वर्षांपासून ५५५ मायक्रो एटीएमद्वारे व्यवहार करण्यात येत आहेत. गेल्या काही दिवसांत या व्यवहारात वाढ झाल्याची माहिती जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक जी. जी. वाकडे यांनी दिली. सध्या विविध बँकांचे चार ते साडेचार लाख ग्राहक या सुविधेचा उपयोग करत आहेत.
औरंगाबाद जिल्ह्यात विविध बँकांच्या ५५५ मायक्रो एटीएमच्या माध्यमातून व्यवहार करण्यात येतात. संबंधित बँकांतर्फे नियुक्त केलेले व खासगी तत्वावरील वाणिज्य प्रतिनिधी (बिझनेस करस्पॉन्डन्ट) मायक्रो एटीएम हाताळतात. या प्रतिनिधींना तीन ते चार गावे देण्यात आली असून आधार क्रमांक लिंक बँक खातेदार केवळ अंगठ्याचा ठसा उमटवून दोन हजार रुपयांपर्यंत रक्कम काढू शकतो. मशीनवर ठसा उमटल्यानंतर प्रतिनिधीकडून खातेधारकाला दोन हजार रुपयांपर्यंत रक्कम देण्यात येते. कोणत्याही बँकेच्या मायक्रो एटीएमद्वारे पैसे काढण्याची सुविधा काही निवडक बँकांनी उपलब्ध करून दिली आहे. बँकांकडूनच प्रतिनिधींना कमीशन दिले जात असल्याने खातेधारकांना अधिकचा भुर्दंड पडत नाही. सध्या विविध बँकांचे चार ते साडेचार लाख ग्राहक या सुविधेचा उपयोग करत असल्याचे वाकडे यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आग लागून शेतात ठेवलेले सोयाबीन खाक

0
0

म. टा. प्रतिनिधी, फुलंब्री
तालुक्यातील टाकळी कोलते येथील शेतकरी नामदेव भागाजी काकडे यांच्या गट नंबर ३५२ मधील एक हेक्टर २० आर क्षेत्रावरील सोयाबीनच्या गंजीला शुक्रवारी सायंकाळी अचानक आग लागली. या आगीत अंदाज एक लाख १० हजार रुपयांचे ३५ क्विंटल सोयाबीन जळून खाक झाले.
नामदेव काकडे यांनी सोयाबीनची सोंगणी करून त्याची गंजी घातली होती. या गंजीला शुक्रवारी सायंकाळी अचानक आग लागली. या रस्त्याने जाणाऱ्यांनी आगीची माहिती काकडे यांना दिली. ते व सरपंच विजय आहेर, उपसरपंच रामदास काकडे, पोलिस पाटील नारायण शिंदे, दिलीप कोलते, कुणाल जीवरग आदींनी घटनास्थळी धाव घेतली तोपर्यंत सर्व पीक जळून खाक झाले होते. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर तलाठी भरत दुतोंडे यांनी शनिवारी पंचनामा केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


लाल्यामुळे झाल्या कपाशीच्या पऱ्हाट्या

0
0

म. टा. प्रतिनिधी, सिल्लोड
सिल्लोड तालुक्यात कापसावर मोठ्या प्रमाणात लाल्या रोगाचा प्रादूर्भाव झाला आहे. यामुळे कापसाच्या झाडाची पागगळती होऊ लागली आहे. त्यामुळे झाडांची वाढ खुंटून नवीन कैऱ्या, पुड्या, पात्या लगडत नसल्याने एक-दोन वेचणीत कापसाच्या पऱ्हाट्या होणार आहे. कापसाचे अपेक्षित उत्पादन निघणार नसल्याचा अंदाज आल्याने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.
यंदा चांगला पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांनी कापूस पेरणीला प्राधान्य दिले आहे. मोठा खर्च करून हे पीक जोपासले, मात्र अपेक्षित उत्पादन निघणार नसल्यामुळे शेतकऱ्यांचे अर्थचक्र कोलमडणार आहे. यावर्षी शेतकऱ्यांनी नगदी पीक म्हणून कपाशीला प्राधान्य दिले. यावर्षी सततच्या पावसाने कपाशी पिकाची आंतरमशागत झाली नाही. नवरात्रात सतत पाऊस असलल्याने कपाशीच्या कैऱ्या सडल्या. त्यामुळे बोंडात अळी निर्माण झाली. सर्वात आधी लागलेल कापूस वजनदार असतो. त्या पहिल्या कापसावरच शेतकऱ्यांचे सरासरी उत्पन्न अवलंबून असते. या कापसावरच शेतकऱ्यांची भिस्त असते. मात्र यावर्षी कैऱ्या सडल्यामुळे शेतकऱ्यांना पहिला माल अपेक्षित मिळाला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. आता कपाशीवर लाल्या रोग आला आहे. त्यामुळे कपाशीची पानझड होत आहे. हिवाळ्याचे दिवस असल्याने या दिवसात कपाशीला पहिल्या कैऱ्यानंतर नवीन कैऱ्या येतात. त्यांना पाण्याच्या एक-दोन पाळ्या देऊन परिपक्व केले जाते. मात्र यावर्षी पहिला कापुस निघाला नाही, नंतरचा कापूस लाल्या रोगामुळे निघणार नसल्यामुळे शेतकरी मेताकुटीला आला आहे. सततच्या पावसाने या वर्षी कपाशीच्या शेतीचा खर्च वाढलेला आहे. त्यातच नोटबंदीच्या निर्णयाने कापसाच्या भावात घट झाली आहे. हा फटका काही शेतकऱ्यांना बसत आहे.

विजेअभावी पाणी बंद
वीज मिळत नसल्याने पाण्याच्या पाळ्या देता येत नसल्याने पीक होरपळत आहे. माळरानावरील कापूस पीक उजाड झाले आहे. मळ्यातील कापूस सध्या तग धरून आहे. मात्र, लाल्या रोगाने कपाशीच्या पऱ्हाट्या होण्यास सुरुवात झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अर्जावरील माहितीवरून बॅग चोर अटकेत

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
सचखंड एक्स्प्रेसच्या आरक्षित डब्यातील एका प्रवाशाची बॅग उचलणाऱ्यापर्यंत पोचण्यासाठी तिकीट बुकिंग अर्जावरील फोन क्रमांकांची मदत मिळासी. आरपीएफ पोलिसांनी सीसीटीव्हीवरून बॅगचोराला हेरले व बुकिंग अर्जावरील फोन क्रमांकावरून शोधून काढून अटक केली.
औरंगाबाद येथील रेल्वे सुरक्षा बलच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, १७ नोव्हेंबर रोजी सरदार मनप्रित सिंह हे आईसोबत सचखंड एक्स्प्रेसच्या एस ७ कोचमधून २५ आणि २६ क्रमांकाच्या आसनावरून प्रवास करत होते. नांदेड येथे उतरल्यानंतर त्यांना एक बॅग हरविल्याचे लक्षात आले. औरंगाबाद येथे उतरणाऱ्या एकाने बँग चोरली असल्याचा त्यांना संशय होता. त्यांनी नांदेड येथे २३ नोव्हेंबर रोजी गुन्हा दाखल केला. औरंगाबाद येथे चोरी झाल्याचा संशय व्यक्त केल्यामुळे तपासासाठी हा गुन्हा औरंगाबाद आरपीएफ कार्यालयातील उपनिरिक्षक एम. किशोर यांच्याकडे तपास वर्ग करण्यात आला. त्यांनी सीसीटीव्हीवर १७ नोव्हेंबर रोजी काळ्या रंगाची बॅग कोण घेऊन जात आहे, याची पाहणी करताना एक प्रवासी एस ७ मधून खाली बॅगेसह उतरताना दिसला. आयआरसीटीसीला संपर्क करून त्या संशयिताचा शोध सुरू करण्यात आला. त्याचे नाव रामकुमार शिवकुमार कुशवाह ( रा. मुकुंदवाडी) हा असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर तिकीट बुकिंगसाठी दिलेल्या फोन क्रमांकावरून त्याला अटक करण्यात आली. त्याच्याकडून चोरीला गेलेली बॅग हस्तगत करण्यात आली. त्यात फिर्यादीनुसार ५६ हजार ९०० रुपये किंमतीचे सामान सापडले.या संशयित आरोपीला ऐवजासह लोहमार्ग पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चलनाअभावी जनजीवन ठप्प

0
0

म. टा. प्रतिनिधी, जालना
जालना जिल्ह्यातील ग्रामीण भागातील आर्थिक जनजीवन गेल्या काही दिवसांपासून पुरेसे चलन नसल्याने ठप्प झाले आहे. शेतकऱ्यांच्या कापूस खरेदीमध्ये रोख रक्कम पाहिजे असेल तर चार हजार रुपये व जुन्या नोटा घेतल्यास पाच हजार रुपये असा भावाचा सौदा चालू आहे. त्यासोबतच जालना जिल्ह्यातील काही पतसंस्थाचे व्यवहार अजूनही ठप्प आहेत.
जालना जिल्ह्यातील ९५० गावांपैकी अवघ्या काही बोटावर मोजता येतील अशा २७ गावांत राष्ट्रीयीकृत बँका आहेत. मात्र, चलन नसल्याने बँकेच्या दारात नागरिकांना काहीही मिळत नाही. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे कर्मचारी व तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या नागरी सहकारी पतसंस्थामध्ये शुकशुकाट पसरलेला आहे. जुन्या नोटा बंदी घालण्यात आली आहे. तरी ग्रामीण भागात जुन्या नोटांवरच अजूनही बाजार व्यवहार चालू आहेत. किरकोळ ते ठोक बाजारात व्यवहार जुन्या नोटा चालत आहेत.
जालना जिल्ह्यात नोंदणीकृत पतसंस्थांची संख्या ११७ आहे. यातील साधारणपणे ३५ पतसंस्थांचे आर्थिक व्यवहार चालू आहेत. यातील फक्त दोनच पतसंस्था यात देवगिरी नागरी सहकारी पतसंस्था व महालक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था यांच्या शाखा आहेत.
जिल्ह्यात जिल्हा परिषद कर्मचारी, जिल्हाधिकारी कार्यालय, खासगी शिक्षक, यांच्यासह विविध प्रकारच्या कर्मचाऱ्यांच्या ६० पतसंस्था आहेत. या सर्व पतसंस्था मध्ये साधारणपणे ५० हजार बचत खाते आहेत. पाचशे कोटी रुपयांची दर महिन्यांची उलाढाल गेल्या आठ नोव्हेंबर रोजी झालेल्या नोटा बंदीमुळे पूर्णपणे ठप्प झाले आहे. याचा खूपच गंभीर फटका या सर्व पतसंस्थांना बसत आहे.
सरकारकडून पतसंस्थांना आर्थिक उलाढाल करण्यासाठी लागणारे चलन देण्याची मागणी करण्यात येत आहे. मात्र, राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये चलन नाही तर पतसंस्था अगदीच बाजूला फेकल्या अवस्थेत आहेत.
ग्रामीण भागात पतसंस्था व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखांचे जाळे आहे ते अगदीच बेकार पडून आहे. याचाच ग्रामीण भागातील आर्थिक जनजीवन ठप्प करण्यासाठी कारणीभूत आहे.
पतसंस्थांचे महाराष्ट्र राज्य सहकारी फेडरेशनच्यावतीने रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नर उर्जित पटेल यांना निवेदन देण्यात आले. फेडरेशनचे कोषाध्यक्ष दादाराव तुपकर ‘मटा’शी बोलताना म्हणाले की, ‘राज्यात १५,६७० पतसंस्था आहेत. यामध्ये २२ हजार कोटी रुपयांच्या ठेवी आहेत. २.२५ कोटी खातेदारांना सोबत या सर्व पतसंस्था आर्थिक व्यवहार करतात. या पतसंस्थांनी आठ कोटी रुपयांची विविध प्रकारची कर्ज वाटप केलेले आहेत. या सर्व पतसंस्थांचे जाळे शंभर टक्के ग्रामीण भागात आहे. जेथे राष्ट्रीयीकृत बँका पोहोचलेल्या नाहीत.’

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लातूर वसतिगृहातील २५० विद्यार्थ्यांना विषबाधा

0
0


म. टा. प्रतिनिधी, लातूर
लातूरच्या समाजकल्याण विभागाच्या वसतिगृहामधील २५० विद्यार्थ्यांना दुपारच्या जेवणानंतर मळमळ आणि उलट्याचा त्रास झाला. या विद्यार्थ्यांना उपचारासाठी तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. या सर्वांची प्रकृती आता स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.
रविवारी दुपारच्या जेवणानंतर समाजकल्याण विभागाच्या वसतिगृहामधील विद्यार्थ्यांना मळमळ आणि उलट्या होण्यास सुरुवात झाली. दुपारी चारनंतर १९ मुलांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. ही संख्या सायंकाळी साडेआठपर्यंत २५० इतकी झाली आहे. रात्री उशीरापर्यंत आणखी संख्या वाढण्याची शक्यता आहे. यामध्ये १४० मुली आणि ११० मुलांचा समावेश आहे.
या सर्वांवर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात औषधोपचार सुरू आहेत. दरम्यान, शया प्रकाराची माहिती मिळाताच महापौर अॅड. दीपक सूळ आणि एसपी शिवाजी राठोड यांनी रुग्णालयाला भेट देऊन विद्यार्थ्यांच्या तब्यतेची माहिती दिली. यावेळी अधिष्ठाता अशोक शिंदे उपस्थित होता. या सर्वांची प्रकृती स्थिर आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नगरसेवक मंजुळे यांचे अपघातात निधन

0
0


म. टा. प्रतिनिधी, उस्मानाबाद
कार आणि बसच्या भीषण अपघातात उस्मानाबाद नगरपालिकेचे भाजपचे नुतन नगरसेवक अनिल ऊर्फ बंटी मंजुळे यांचा मृत्यू झाला. या अपघातात अन्य दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावर तेरखेडा ( ता. वाशी) येथे रविवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास घडली.
मंजुळे हे विवाह सोहळा आटपून उस्मानाबादला परतत होते. तेरखेडा येथील वन विभागाच्या रोपवाटिका जवळ आले असता होंडा सिटी (कार) व उस्मानाबाद - भूम बसची ( क्र. एमएच २० बीएल ३०७) समोरासमोर धडक बसली. यामध्ये मंजुळे गंभीर जखमी झाले. तर एसटीतील चालक व काही प्रवाशांना मुका कार लागला. हा अपघात इतका भीषण होता की अपघातातील जखमींना वाचविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. १०८ या मोफत रूग्णवाहिकेला संपर्क साधून ही वेळेत उपलब्ध होऊ शकले नाही. त्यामुळे गांवकऱ्यांनी पर्यायी वाहनाचा अवलंब करून नगरसेवक मंजुळे यांना सोलापूर उपचारासाठी हलविण्यात येत असताना त्यांचा वाटेतच मृत्यू झाला.
त्यांच्या निधनाने उस्मानाबाद शहरावर शोककळा पसरली असून, त्यांच्या पश्चात पत्नी, आई-वडील, दोन मुले असा परिवार आहे. दुर्देवी असे की, अनिल मंजुळे यांनी उस्मानाबाद नगरपालिकेची तीन वेळा निवडणूक लढविली होती. २००६ च्या पंचवार्षिक निवडणुकीत त्यांना अवघ्या सात मतांनी पराभव पत्कारावा लागला होता. आठ दिवसांपूर्वीच झालेल्या नगरपालिकेत भाजपाच्या तिकिटावर ते निवडून आले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सलग दहा वर्ष जिल्हाध्यक्ष होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images