Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

उज्जैनजवळ अपघात, जिगरी दोस्तांचा मृत्यू

0
0

म. टा. प्रतिनिधी, कन्नड
दोन जिवलग मित्र, त्यांनी एकमेकांची साथ दिली व शेवटी सोबतच झाला. तालुक्यातील सावरगाव येथील भगवान विनायक काळे (वय ३५ हमु. सरस्वती कॉलनी) व बहिरगाव येथील किशोर किसनराव दाबके (वय ३८, हमु. शिवनगर), असे त्यांचे नाव आहे. त्यांच्या एसयुव्हीला सोमवारी पहाटे उज्जैन-कोटा मार्गावर अपघात झाला. काळे हे जिल्हा परिषदेच्या लिपिकवर्गीय संघटनेचे जिल्हाध्यक्ष होते.
मिळालेल्या माहितीनुसार भगवान काळे हे औरंगाबाद येथे जिल्हा परिषद बालकल्याण विभागात कनिष्ठ लिपिक होते, तर किशोर दापके हे एका दुचाकी शोरूममध्ये व्यवस्थापक होते. भगवान काळे, किशोर दापके, तय्यब शहा, शेख रफिक, जफरखान जावेदखान हे पाच मित्र ९ डिसेंबर रोजी महिंद्रा एसयुव्ही ३००या वाहनाने (एम. एच.२० डी. जे.३८३९) तीन दिवसाचे नियोजन करून दिल्ली व उत्तर भारतात पर्यटनासाठी गेले होते. तेथून परत येत असताना उज्जैन-कोटा महामार्गावरील सुसनेरजवळ त्यांच्या वाहनाचा सोमवारी पहाटे तीन ते पाचच्या दरम्यान, अपघात झाला. या अपघातात काळे व दापके यांचा मृत्यू झाला, तर इतर तिघे जखमी झाले आहेत. या अपघाताची पूर्ण माहिती समजली नाही.
ही माहिती कन्नड शहरात समजल्यानंतर सामजिक कार्यकर्ते, नातेवाईक व मित्र उज्जैनकडे रवाना झाले आहेत. भगवान काळे यांनी कन्नड येथे बालविकास प्रकल्पात दहा वर्षे काम केले आहे. ते सध्या जिल्हा परिषद लिपिकवर्गीय कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष म्हणून काम पहात होते. बदली झाल्यानंतर ते औरंगाबाद येथे वास्तव्यास होते. त्यांच्या वडिलांचे लहानपणी व आईचे सहा महिन्यांपूर्वी निधन झाले. त्यांच्यामागे पत्नी व दोन मुले, असा परिवार आहे. किशोर दाबके यांच्या मागे आई, वडील, पत्नी, एक मुलगा, भाऊ, विवाहित बहिणी, असा परिवार आहे.

प्रचार थांबवला
निधनाची माहिती समजताच नगरपरिषद निवडणुकीचा सरस्वती कॉलनी व शिवनगरमधील प्रचार थांबवण्यात आला. शहरातील शासकीय अधिकारी, कर्मचारी, व्यापारी, नागरिकांनी या घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


प्रचारात मुख्यमंत्री सक्रिय; शिवसेना मंत्री गायब

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
नगर पालिका निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात भारतीय जनता पक्षाने राज्यात अव्वल स्थान पटकाविल्यानंतर दुसऱ्या टप्प्यातही प्रचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सक्रीय आहेत, मात्र भाजपबरोबर सत्तेत असलेल्या शिवसेनेने निवडणुकीला फारसे गांभिर्याने घेतल्याचे दिसत नाही. पहिल्या टप्प्यात चौथा क्रमांक मिळविल्यानंतरही शिवसेनेचे नेते, मंत्री निवडणुकीच्या प्रचारापासून चार हात दूर आहेत.
नगरपालिका निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात भाजप पहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरला. शिवसेनेला चौथ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. या कामगिरीबद्दल पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नाराजी व्यक्त केली. शिवसेनेचे मंत्री व प्रमुख पदाधिकारी प्रचारात जबाबदारीने सहभागी झाले नाहीत, असे मत त्यांनी व्यक्त केल्याचे वृत्त आहे. पक्षप्रमुखांच्या नाराजीमुळे दुसऱ्या टप्प्यातील प्रचारात शिवसेनेचे मंत्री, नेते, प्रमुख पदाधिकारी स्वतःला झोकून देतील, असे मानले जात होते, पण तसे चित्र अद्याप निर्माण झाले नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकाच दिवसात औरंगाबाद व लातूर जिल्ह्यांत मिळून सहा प्रचार सभा घेतल्या. शिवसेनेत असा झंझावात दिसून आला नाही. पालकमंत्री रामदास कदम प्रचारात अद्याप दिसले नाहीत. राज्यमंत्री अर्जून खोतकर देखील प्रचारात सहभागी झाले नाहीत. शिवसेनेचे प्रमुख नेतेही प्रचारात उतरलेले नाहीत. खासदार चंद्रकांत खैरे, संपर्कनेते विनोद घोसाळकर यांनी काही मतदारसंघात सभा घेतल्या, पण त्यांच्या सभांमध्ये सातत्य नाही.

तीनच दिवस सभा
शक्रवार ते रविवार या तीन दिवसांतच त्यांच्या सभांचे आयोजन केले होते. उर्वरित चार दिवस प्रचारात विस्कळितपणाच असतो, असे चित्र आहे. शिवसेनेच्या मंत्र्यांनी व पदाधिकाऱ्यांनी प्रचाराकडे पाठ फिरवून पुन्हा एकदा मतदारांना गृहित धरले आहे, अशी चर्चा सुरू झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तुळजाभवानी भक्तांच्या संख्येत घट

0
0

म. टा. प्रतिनिधी, उस्मानाबाद
महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी मातेच्या तुळजापूर येथील पुजारी मंडळाच्या व्यावसायावर नोटाबंदीचा प्रतिकुल परिणाम झाला आहे. नोटाबंदी आणि चलनतुटवडा यामुळे तुळजाभवानीची पूजाही सध्या उधारीवर सुरू आहे. चलनटंचाई व नोटबंदीमुळे सध्या येथील भाविकांची संख्याही रोडावली असून येथील पुजारी मंडळांचा व्यवसाय संकटात सापडला आहे.
तुळजाभवानी मंदिरात दिवसभरात हजारहून अधिक अभिषेक पूजा, अलंकार पूजा, ओटी पूजा पार पाडल्या जातात. अभिषेक पुजेसाठी ३५१, ५५१, एक हजार रूपये असे भाविकांच्या क्षमतेनुसार दर आकारले जातात. पाचशे व एक हजाराच्या नोटा चलनातून बाद झाल्यामुळे या पूजा विधीसाठी रोख स्वरूपात लागणाऱ्या शंभर रूपयांच्या नोटांच्या तुळजाभवानी मंदिरात शिवाय तुळजापूर नगरीत प्रचंड तुटवडा निर्माण झाला आहे. याचा परिणाम भाविकांवर होऊ नये याची काळजी सध्या पुजारी मंडळी घेताना दिसताहेत. काही मंडळी अद्यापही भाविकांकडून पाचशे-एक हजाराची नोट स्वीकारताना दिसताहेत तर ज्यांना या नोटा घेणे शक्य नाही, असे पुजारी भाविकांची नोटाबंदीचा निर्णयानंतर तुळजाभवानी मंदिरातील भाविकांची संख्याही मोठ्या प्रमाणात रोडावाली असून, याचा फटका येथील पुजारी मंडळींना बसला आहे. १० ते १२ डिसेंबर सलंग तीन दिवस शासकीय सुट्टी असतानाही येथील भाविकांची संख्या रोडावलेलीच होती, अशी मोहीती पुजारी मंडळाचे माजी अध्यक्ष किशोर गंगणे यांनी दिली.
नोट बंदीचा परिणाम जसा पुजारी मंडळीवर झाला आहे. तसा येथील अन्य व्यवसायांवर ही झाला असून, मागील पाच आठवड्यापासून येथील सर्व व्यवहार थंड झाले आहेत.

नोटा बंदी व चलन तुटवड्याचा परिणाम येथे येणाऱ्या भाविकांवर होऊ नये किंवा भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी पुजाऱ्यांनी आता दक्षता व पुजाविधीची रक्कम ऑनलाईन पद्धतीने बँक खात्यात जमा करण्याची सोय उपलब्ध करून दिली आहे. तर काही भाविक पूजा उधारीवर करत असून आपल्या गावी परतल्यानंतर तेथून ते पुजाविधीचा खर्च व दक्षिणा पुजाऱ्यांच्या बँक खात्यात ‘आरटीजीएस’द्वारे पाठवून देत आहेत. नोटबंदी व चलन तुटवडा यामुळे पुजा उधारीवर घालण्याशिवाय पर्याय उरला नाही. – बाळासाहेब भोसले, पुजारी तुळजापूर.
६ जानेवारी ते १२ जानेवारी २०१७ दरम्यान तुळजाभवानीचा शाकंभरी नवरात्र महोत्सव आहे. यास छोटा दसरा म्हणूनही संबोधले जाते. यावेळी भाविकांची संख्या मोठी असते. या महोत्सवादरम्यान तुळजाभवानी मंदिर प्रशासनाने ५००, १००, ५०, २०, १० च्या नोटा मुबलक प्रमाणात उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील रहावे.
किशोर गंगणे, माजी अध्यक्ष, पुजारी मंडळ, तुळजापूर.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुख्यमंत्र्यांच्या सभेत घोषणाबाजी

0
0



म. टा. प्रतिनिधी, नांदेड
नगरपंचायतीच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू असून, भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी हदगाव येथे आलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रचार सभेत मराठा आरक्षणासाठी संभाजी ब्रिगेड कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करून गोंधळ घातला. त्यामुळे काही क‌ाळ तणावाचे वातावरण होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रचार सभा हदगांव येथे सोमवारी सकाळी १० वाजता आयोजित करण्यात आली होती. सभेला सुरूवात होताच मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी विद्यमान सरकार टाळाटाळ करत असल्याचा आरोप करत स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडचे प्रदेश अध्यक्ष माधव देवसरकर व अन्य कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी सुरू केली. त्यासोबतच मुख्यमंत्री महोदयांनी प्रथम मराठा आरक्षणाबाबत बोलावे व नंतरच उमेदवारांच्या प्रचाराचे भाषण करावे अशी मागणी वजा घोषणा देत आंदोलन केले. यावेळी गोंधळ उडाल्याने पोलीसांनी सर्व मराठा कार्यकर्त्यांना अटक केली होती. त्यानंतर शेकडो मराठा युवक पोलिस स्थानकांच्या आवारात जमले होते, माधव देवसरकर यांना पोलिस स्थानकातून सोडविण्यासाठी आमदार नागेश पाटील-आष्टीकर यांनी पोलिसांना धारेवर धरले. देवसरकर याना पोलिसांच्या अटकेतून सोडविण्यासाठी आष्टीकर यांनी महत्वाची भूमिका बजावली. या घटनेमुळे राजकीय वैर असलेल्या माजी खासदार सुभाष वानखेडे व नागेश पाटील-आष्टीकर यांच्यात नगरपंचायत निवडणुकीची जुगलबंदी चांगलीच रंगणार असल्याचे दिसून येते.

देगलूरमध्ये मुख्यमंत्र्यांचा ताफा रोखला
म. टा. प्रतिनिधी, नांदेड
देगलूर पालिकेच्या निवडणुकीसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची सोमवारी प्रचार सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी देगलूरमध्ये संभाजी ब्रिगेड व जिजाऊ ब्रिगेडच्या युवक युवतींनी मुख्यमंत्र्यांच्या ताफा रोखला. यावेळी मुख्यमंत्र्यांना मराठा समाजाच्या मागण्या संदर्भात निवेदन देण्यात आले. मुख्यमंत्र्यांनी निवेदन स्वीकारून संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांशी मराठा समाजाच्या मागण्यांच्या संदर्भात चर्चा केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गोपीनाथगडावर उसळला जनसागर

0
0


म. टा. प्रतिनिधी, बीड
लोकनेते गोपीनाथ मुंडे यांची ओळख बहुजनांमधल्या अग्रभागी नेत्यांमध्ये आहे.छत्रपती शिवाजी महाराज व शाहू महाराजांच्या विचारांचे पाईक होऊन त्यांनी जीवनभर कार्य केले. छत्रपती घराणे व स्व. गोपीनाथ मुंडे यांचे नाते हे बहूजन ऐक्याचे नाते आहे. त्यामुळे लोकनेते गोपीनाथ मुंडेंचा बहुजन ऐक्याचा वसा सर्व जण पुढे चालवूया, असे प्रतिपादन खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी केले.
वैद्यनाथ साखर कारखाना परिसरातील गोपीनाथगड येथे लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या ६७ व्या जयंतीनिमित्त आयोजित सामाजिक उत्थान दिन कार्यक्रमात ते बोलत होते. लोकनेते गोपीनाथराव मुंडे समाधीस्थळाचे दर्शन घेऊन कार्यक्रमास प्रारंभ झाला. या वेळी प्रास्तावीक करताना भावूक होत खासदार डॉ. प्रितम मुंडे यांनी लोकनेते मुंडे यांच्या आठवणींना उजाळा दिला
या वेळी बोलताना खासदार छत्रपती संभाजी राजे म्हणाले, ‘स्व.गोपीनाथ मुंडे यांनी माझ्यातील सर्व गुणांचा अभ्यास केला होता. आमचे नाते हे बहुजन ऐक्याचे होते. बहुजनांमधल्या सगळयात अग्रेसर नेते म्हणून गोपीनाथ मुंडे यांचे कार्य होते. त्यांनी छत्रपती शिवाजी व शाहू महाराजांचे विचार पुढे घेऊन जाण्याचे काम केले. त्याच विचारातून काम करून बहुजनांना मोठे करण्याचे काम त्यांनी केले. बहुजन ऐक्याच्या तळमळीने त्यांनी मला भगवानगडावर बोलावले व या ऐक्याची मोट बांधली. जात विरहीत काम करण्याचे काम त्यांनी केले. दुष्काळावर संसदेत सर्वाधिक विषय मांडून ओबीसी जनगणना करण्यासाठी सभागृहात आवाज त्यांनीच उठवला. सदैव हा विचार घेऊन वाटचाल करणाऱ्या या नेत्याचे फक्त स्मारक उभारून चालणार नाही तर त्यांच्या विचाराचा वारसा वाढविला पाहिजे. या साठी सर्व मिळून मुंडेंचा बहुजन ऐक्याचा वसा पुढे चालवूया.’
पंकजा ही माझी बहिण आहे. त्यांच्या पाठिशी मी सदैव खंबीरपणे उभा राहील, असा गौरव करून त्यांनी पंकजांना रायगडावर राज्याभिषेक सोहळयासाठी येण्याचे निमंत्रण छत्रपती संभाजी राजे यांनी दिले.
या वेळी पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी पित्याच्या संघर्षमय वाटचालीचा आढावा घेत अनेक आठवणी जाग्या केल्या. त्यांनी पाहिलेले वंचित, उपेक्षित, सर्वसामान्य माणसाचे सुख व विकासात्मक सामाजिक परिवर्तन घडवून आणण्यासाठी आपण कार्य करत आहोत. जनतेने दिलेल्या छत्राखाली व छत्रपतींनी दिलेला भावाच्या नात्याचा आधार यामुळे न डगमगता आपण सदैव लोकांच्या कामात राहू. जीवनात त्यांचा वसा व वारसा चालवताना जनसेवा हे आपले मुख्य तत्व आहे. त्यामुळे कधीच पराभवाने उद्विग्न व विजयाने उन्मत्त होणार नाही असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या कार्यक्रमास राज्याच्या विविध कानाकोपाऱ्यातून आलेल्या मुंडे भक्तांची मोठी गर्दी उसळली होती. सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, अमित पालवे, मुंबई बँकेचे चेअरमन तथा आमदार प्रवीण दरेकर, खासदार सुनील गायकवाड, आमदार सुजितसिंह ठाकुर, अतुल सावे, सुधाकर भालेराव, संगीता ठोंबरे, आर.टी.देशमुख, भीमराव धोंडे, माजी आ. गोविंद केंद्रे, बाबुराव पोटभरे, फुलचंद कराड, राजेश देशमुख, भाजपचे जिल्हाध्यक्ष रमेश पोकळे यांच्यासह मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

समाधीच्या दर्शनासाठी रांग
गोपीनाथ गडावर दिंड्या, पताका, रथ, टाळ मृदगांसह भजनी मंडळी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने दाखल झाले होते. सोलापूरचे पैलवान घोडके यांनी खास तयार करून आणलेला भला मोठा वजनदार पुष्पहार क्रेनच्या साह्याने मुंडेच्या पुतळ्यास घालण्यात आला. लोकनेत्यांच्या समाधीचे दर्शन जनतेनी शिस्तबद्ध रांगेतून घेतले. गोपीनाथ गड परिसरात ठिकठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मेडिकल कॉलेजांचे खुलेआम ‘एमसीआय पॅकेज’

0
0

Nikhil.Nirkhee@timesgroup.com
Tweet : @nnirkhee@MT
औरंगाबाद ः देशभरातील खासगी मेडिकल कॉलेजांकडून वेगवेगळ्या ‘कन्सल्टन्सी’मार्फत केवळ ‘एमसीआय’च्या तपासणीपुरते खुलेआम लाखोंचे पॅकेज वाटप सुरू असल्याचे चव्हाट्यावर आले आहे. चेन्नईच्या खासगी मेडिकल कॉलेजसाठी नवी मुंबईतील एका पॅथॉलॉजिस्टला ‘ई-मेल’मार्फत दिलेली चार लाखांची ऑफर व त्यासाठी ‘कन्सल्टन्सी’च्या प्रतिनिधींमार्फत झालेल्या संवादाचे ‘रेकॉर्डिंग’ही ‘मटा’च्या हाती लागले आहे. यानिमित्त रुग्णांच्या जिवाशी खेळला जाणारा वैद्यकीय शिक्षणाचा खेळखंडोबाही चव्हाट्यावर आला आहे.
भारतीय आयुर्विज्ञान परिषदेशिवाय (एमसीआय) देशभरातील शासकीय, खासगी वैद्यकीय महाविद्यालयांचे पानही हालू शकत नाही. वैद्यकीय महाविद्यालयांना-वैद्यकीय शिक्षकांना मान्यता देण्यापासून ते पदवी-पदव्युत्तर जागांना मान्यता देण्यापर्यंतचे सर्व अधिकार ‘एमसीआय’ला आहेत. वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये ‘एमसीआय’च्या निकषांची पूर्तता झाली नाही तर महाविद्यालयाची मान्यता रद्द करण्याचे अधिकारही ‘एमसीआय’ला आहेत. पात्र प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक व सहाय्यक प्राध्यापकांच्या संख्येनुसार व पायाभूत सुविधांनुसार वैद्यकीय महाविद्यालयातील पदवी व पदव्युत्तर जागा मान्य होतात. त्यामुळेच ‘एमसीआय’च्या तपासणीपुरते असंख्य वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये; त्यातही खासगी महाविद्यालयांमध्ये वैद्यकीय शिक्षकांना चक्क ‘आयात’ केले जाते आणि ‘एमसीआय’च्या पथकासमोर होणाऱ्या शिरगणतीवेळी ‘आयात’ शिक्षकांना समोर केले जाते. मग हे शिक्षक खासगी सेवेत असले तरी त्यांना पथकासमोर ‘पाचारण’ केले जाते आणि ‘रिक्रुटमेंट कन्सल्टन्सी’द्वारे अशा शिक्षकांचा देशभर शोध घेत त्यांचे ‘पॅकेज’ निश्चित करून सर्रास ‘डीलिंग’ केले जात असल्याचे पुरावेच ‘मटा’ला प्राप्त झाले आहे.

महाराष्ट्रभर ऑफरचा धडाका
नवी मुंबईतील पॅथॉलॉजिस्ट डॉ. प्रसाद कुलकर्णी यांना एका ‘कन्सल्टन्सी’च्या महिला प्रतिनिधींमार्फत चेन्नईच्या खासगी वैद्यकीय महाविद्यालयासाठी सहयोगी प्राध्यापक पदासाठी विचारणा झाली होती. यामध्ये केवळ ‘एमसीआय’च्या तपासणीपुरतेच महाविद्यालयात यावे लागणार असल्याचे संबंधित प्रतिनिधी स्पष्ट करते. यामध्ये कोणत्याही कायदेशीर अडचणी आल्या तरी महाविद्यालय त्या सोडविल्या जातील, अशी ‘ग्वाही’ महाविद्यालयाच्या वतीने संबंधित प्रतिनिधी देत असल्याचे ध्वनीमुद्रणावरून स्पष्ट होते. या संभाषणामध्ये राज्यातील अनेक डॉक्टरांना अशा ऑफर दिल्याचा प्रतिनिधीने उल्लेख केला आहे, हे विशेष. याच ‘कन्सल्टन्सी’च्या दोन प्रतिनिधींनी डॉ. कुलकर्णी यांना संवाद साधला होता व मध्य प्रदेशातील एका एजन्सीने २० सप्टेंबर २०१६ रोजी ‘ई-मेल’द्वारे सहयोगी प्राध्यापकपदासाठी चार लाखांची ऑफर देण्यात आली होती. त्याशिवाय प्रवास, निवास, भोजन आदी खर्च वेगळा देण्यात येणार असल्याचाही उल्लेख त्यात आहे.

तक्रारीनंतरही प्रतिसाद शून्य
या धक्कादायक ऑफरविरोधात डॉ. कुलकर्णी यांनी २७ सप्टेंबर २०१६ रोजी ‘एमसीआय’कडे ‘ई-मेल’द्वारे तक्रार केली आहे. संभाषणाचे रेकॉर्डिंग, ऑफर दिलेला ई-मेलही ‘एमसीआय’कडे पाठवला आहे, मात्र तीन महिने लोटले तरी ‘एमसीआय’ने या तक्रारीची कुठलीच दखल घेतलेली नाही, हेही स्पष्ट झाले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लग्न खर्च टाळून बेघरांना ९० घरांचे गिफ्ट

0
0

म. टा. प्रतिनिधी,औरंगाबाद

विवाह सोहळ्यांवर कोट्यवधींचा खर्च करण्याची चढाओढ सुरू असताना लासूर येथील मुनोत आणि जैन या परिवारांनी अनाठायी खर्चाला फाटा देऊन ९० गरजू बेघरांना हक्काच्या घराचे गिफ्ट दिले आहे. हा आदर्श विवाहसोहळा परिसरात चर्चेचा विषय ठरला आहे.

लासूर स्टेशन येथील व्यापारी अजयकुमार मुनोत यांची मुलगी श्रेया हिचे औरंगाबाद येथील उद्योजक मनोजकुमार जैन यांचा मुलगा बादल यांच्याशी ऑक्टोबर महिन्यात विवाह ठरला. लग्नाची तारीख १२ डिसेंबर २०१६ ठरविण्यात आली. दोन्ही कुटुंब आर्थिकदृष्ट्या सक्षम असल्याने श्रेया आणि बादल यांचे लग्न अगदी धुमधडाक्यात, शाही थाटात करण्याचे ठरले व त्यादृष्टीने वधू-वराकडील मंडळी तयारीलाही लागली. फाइव्ह स्टार हॉटेल, संगीत रजनी, केटरर्स, स्वागत समारंभ आदींचे बुकिंग सुरू झाले.

मुलीचे वडील अजयकुमार मुनोत यांचे आमदार प्रशांत बंब हे मित्र. लग्नाची तयारी जोमात सुरू झालेली असतानाच मुनोत व आमदार बंब यांची भेट झाली. लग्नाच्या तयारीबाबत त्यांनी बंब यांना माहिती दिली. त्यावर, ‘लग्नात मोठ्या प्रमाणात खर्च करण्यापेक्षा त्या पैशातून गरीब, गरजूंसाठी काहीतरी कल्याणकारी कायमस्वरुपी काम करावे,’ अशी संकल्पना बंब यांनी मांडली.

अजयकुमार व विद्या मुनोत, मुलाचे वडील मनोजकुमार व आई संगीता जैन यांच्याशी आमदार बंब यांनी पुन्हा एकदा चर्चा केली. लग्नावरील अनावश्यक खर्च टाळून गरजू, बेघर ९० कुटुबांना घरे बांधुून द्यावीत, अशी कल्पना बंब यांनी मांडली. ही कल्पना दोन्ही कुटुंबांना भावली आणि त्यांनी होकार दिला.
आरापूर येथे मुनोत यांच्या मालकीच्या जमिनीवर हा गृहप्रकल्प उभारण्याचे ठरले. दोन ऑक्टोबरला भूमीपूजन केले आणि दुसऱ्याच दिवशी बांधकामाला सुरुवात झाली. अवघ्या दोन महिन्यांत ही ९० घरे उभारण्यात आली. बेघर, गरजूंचा शोध घेण्यासाठी खास यंत्रणा राबविण्यात आली.

लग्नात दिल्या घराच्या चाव्या

या गृहप्रकल्पाशेजारी सोमवारी श्रेया व बादल यांचा विवाहसोहळा झाला. आशीर्वाद देण्यासाठी व हा आदर्श विवाहसोहळा पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली. लग्न लागताच वधुवराच्या हस्ते या ९० घरांच्या चाव्या गरजूंना देण्यात आल्या. जैन व मुनोत परिवारांमुळे हक्काचे घर मिळाल्याने या लाभार्थींना अश्रू आवरणे कठीण झाले होते.

मुनोत व जैन या दोन कुटुंबांचा आदर्श देशातील आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेल्या लोकांनी घेतल्यास देशातील गरीब व श्रीमंतांतील दरी निश्चितपणे कमी होईल. उच्चशिक्षित असलेल्या श्रेया व बादल यांचा विवाह हा त्यांच्यासाठी एक अविस्तरणीय क्षण असून, या जोडप्याने जगासमोर एक नवा आदर्श ठेवला आहे.
- प्रशांत बंब, आमदार, भाजप

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तुमच्याशी नव्हे, पक्षप्रमुखांशीच बोलणार

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

‘आम्हाला तुमच्याशी नव्हे, पक्षप्रमुखांशी बोलायचे आहे. त्यांच्यासमोर म्हणणे मांडायचे आहे,’ अशा शब्दांत शिवसेनेच्या नाराज नगरसेवकांनी संपर्कप्रमुख विनोद घोसाळकर यांना मंगळवारी ठणकावले. पक्षप्रमुखांशी चर्चा होईपर्यंत आम्ही पक्षविरोधी कोणतीही भूमिका घेणार नाही, असा शब्दही त्यांनी घोसाळकर यांना दिला.
उपमहापौर, सभागृहनेते व गटनेते यांच्या नियुक्तीवरून शिवसेनेच्या नगरसेवकांमध्ये तीव्र नाराजीची भावना आहे. १५ ते १८ नगरसेवकांचा वेगळा गट स्थापन करण्याच्या दृष्टीने नाराजांनी तयारी सुरू केली. त्यापूर्वी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा करण्याची इच्छा या नगरसेवकांनी व्यक्त केली होती, पण त्यांना ठाकरे यांची वेळ मिळाली नाही. नगरसेवकांशी चर्चेसाठी ठाकरे यांनी संपर्कप्रमुख विनोद घोसाळकर यांनाच औरंगाबादला पाठवले व चर्चेचा अहवाल द्या, असे आदेश दिले. त्यांच्या आदेशानुसार घोसाळकर मंगळवारी शहरात आले. खासदार चंद्रकांत खैरे यांच्या डेक्कन फ्लोअर मील येथील निवासस्थानी त्यांनी सर्वप्रथम राजू वैद्य, विकास जैन व नंदकुमार घोडेले यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर उर्वरित नाराज नगरसेवकांना त्यांनी एका हॉटेलमध्ये बोलावले व तेथे चर्चा केली.

उपमहापौर, सभागृहनेते व गटनेते यांच्या नियुक्त्यांची घोषणा घोसाळकर यांनीच पत्रकार परिषद घेऊन केली होती. त्यामुळे, ‘यासंदर्भात तुमच्याशी काहीच बोलायचे नाही. पक्षप्रमुखांकडे आम्हाला आमचे म्हणणे मांडायचे आहे,’ असे या नगरसेवकांनी घोसाळकर यांना सांगितल्याची माहिती सूत्रांनी दिली. ‘पक्षप्रमुखांची वेळ मिळवून द्या,’ अशी विनंतीही या नगरसेवकांनी घोसाळकर यांच्याकडे केली.

‘आम्ही पक्षाच्या विरोधात नाहीत, पण पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्यांत झालेला प्रकार आम्हाला पक्षप्रमुखांच्या कानी घालायचा आहे. जी ‘पद्धत’ या नियुक्त्यांच्या वेळी वापरण्यात आली त्याची माहिती पक्षप्रमुखांना द्यायची आहे,’ असे या नगरसेवकांनी सांगितले. नवीन पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली काम न करण्याची नाराज नगरसेवकांची भूमिका आहे. पक्षप्रमुखांची भेट झाल्यावर या भूमिकेबाबतही निर्णय केला जाणार आहे. ‘आम्हाला पदे नकोत, पण नेहमीच ‘ती’ पद्धत अवलंबली जाणार असेल, तर ते पक्षाच्या दृष्टीने योग्य नाही,’ असे मत नगरसेवकांनी व्यक्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली.

नगरसेवकांची नाराजी दूर झाली आहे. आम्ही सिनिअर आहोत. पदे देताना आमचा विचार व्हायला हवा होता, असा त्यांचा हट्ट होता. एक व्यक्ती, एक पद हा त्यांचा मुद्या महत्त्वाचा आहेच. त्यादृष्टीने भविष्यात नियुक्त्या करताना विचार केला जाईल. जाहीर करण्यात आलेल्या पदाधिकाऱ्यांमध्ये कोणताही बदल केला जाणार नाही. त्या नगरसेवकांना उद्धव ठाकरे यांना भेटण्याची इच्छा आहे. ठाकरे सर्वच कार्यकर्त्यांना भेटतात, पण त्यासाठी त्यांची वेळ घेतली पाहिजे.

- विनोद घोसाळकर, संपर्कप्रमुख, शिवसेना.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


लातूरच्या चार नगरपालिकांसाठी आज मतदान

0
0

अरुण समुद्रे, लातूर

नगरपालिका निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये, लातूर जिल्ह्यातील चार नगरपालिकांसाठी बुधवारी मतदान होत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी या नगरपालिका निवडणुकीच्या प्रचारामध्ये सभा घेतल्या. या सभांना गर्दी करणारे मतदान नेमके कोणाला कौल देणार, याचा निकाल बुधवारी मतदान यंत्रामध्ये बंद होणार आहे.

दुसऱ्या टप्प्यामध्ये जिल्ह्यातील औसा, निलंगा, उदगीर आणि अहमदपूर या चार ठिकाणी मतदान होत आहे. दोन्ही काँग्रेस, भाजपा आणि शिवसेना हे स्वतंत्र लढवत असून, एमआयएममुळे बहुरंगी निवडणूक चुरशीची होत आहे. या चारही ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभा घेतल्या. या सर्वच सभांना मोठी गर्दी झाली होती. मुख्यमंत्र्यांनी या सभांमध्ये विरोधकांना आरोप न करता, विकासाच्या बाबीच प्रामुख्याने मांडल्याचे दिसून आले. तर, त्यांनी विरोधकांना अनुल्लेखाने मारल्याची चर्चा नंतर रंगली होती. या निवडणुकीमध्ये विविध कामे आणि कामांच्या पारदर्शक झालेल्या प्रक्रिया यांचा उल्लेख करतानाच, निधी कमी पडू न देण्याचा परवलीचा शब्दही वापरला. सभेमध्ये त्यांना टाळ्या मिळाल्या असल्या, तरीही त्याचे रुपांतर मतदानामध्ये होणार का, हे बुधवारीच स्पष्ट होईल.

जिल्ह्यात काँग्रेसकडून प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण वगळता अन्य कोणत्याही मोठ्या नेत्याची सभा झाली नाही. आमदार अमित देशमुखांनी प्रचाराचा आरंभ केला. त्यामुळे प्रत्येक नेत्याने स्वबळावर निवडणूक लढवण्याचा प्रयत्न केला. उदगीरला अशोक चव्हाण यांचीही सभा झाली नाही. त्यामुळे आमदार बसवराज पाटील, माजी आमदार चंद्रशेखर भोसले, माजी मुख्यमंत्री डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्यासाठीही ही निवडणूक जिल्हा परिषदेच्या तयारीची नांदी ठरणार आहे.
शिवसेनेने चारही उमेदवार उभे केले आहेत. या ठिकाणी शिवसेनेला विजयाची संधी फारशी नाही. त्यामुळे, ते कोणाच्या विजयामध्ये अडसर ठरणार, याचीच चर्चा आहे. एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनीही उदगीर येथे सोमवारी रात्री सभा घेतली.

राष्ट्रवादीचा जोरात प्रयत्न

राष्ट्रवादी काँग्रेसने चारही ठिकाणी मुस्लिम उमेदवार देऊन काँग्रेसच्या मतपेढीला धक्का देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे, काँग्रेसच्या यशावर अटकाव करण्याचा हा प्रयत्न आहे. त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलीक यांच्यासारख्या नेत्यांनी एमआयएमला मत म्हणजे भाजपाला मत हे समीकरण मांडले. विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सभांमध्ये जोरदार बॅटिंग करताना, काँग्रेसवर टीका करण्यापेक्षा नोटाबंदीचा विषयावरच केंद्र व राज्य सरकारवर टीका केली. मतदारांनी नोटाबंदीमुळे झालेल्या त्रासाचा बदला म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसला मतदान करण्याचे आवाहन केले. अामदार जयंत पाटील यांच्याही उदगीर, निलंगा येथे सभा झाल्या. जयंत पाटील यांनी काँग्रेसच्या कारभारावरही टीका काढली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आघाडीचा चमत्कारावर भरोसा

0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
चमत्कारावर भरोसा ठेवत ऐन शेवटच्या क्षणी काँग्रेस आघाडीतर्फे बुधवारी होणाऱ्या महापौर-उपमहापौर पदाच्या निवडणुकीत जोर लावण्यात येत आहे. पालिकेत अपक्षांच्या मदतीने युतीचे बहुमत असल्याने आकड्यांचा खेळ रंगणार आहे.
युतीतर्फे महापौरपदाची उमेदवारी भाजपचे भगवान घडमोडे, तर उपमहापौरपदाची उमेदवारी शिवसेना पुरस्कृत अपक्ष नगरसेवक स्मिता घोगरे यांना देण्यात आली आहे. युतीत झालेल्या करारानुसार शिवसेनेचे त्र्यंबक तुपे यांनी महापौरपदाचा, तर भाजपचे प्रमोद राठोड यांनी उपमहापौरपदाचा राजीनामा दिला. त्यामुळे या दोन्ही पदांसाठी निवडणूक होत आहे. जिल्हाधिकारी डॉ. निधी पांडेय यांच्या अध्यक्षतेखाली सकाळी अकरा वाजता विशेष सर्वसाधारण सभेला सुरुवात होईल. ११४ नगरसेवकांच्या सर्वसाधारण सभेत बहुमतासाठी ५८ मतांची गरज आहे. शिवसेनेचे २८, भाजपचे २३ आणि अपक्ष १२ अशी ६३ मते युतीच्या पारड्यात आहेत. दुसरीकडे एमआयएमचे २३, काँग्रेसचे ११, राष्ट्रवादी काँग्रेसचे ४, बहजन समाज पक्षाचे पाच व पाच अपक्ष नगरसेवकांचा एक गट आहे. या गटाला हाताशी धरून काँग्रेसचे नेते युतीला शह देण्याच्या तयारीत आहेत. या सर्व नगरसेवकांची संख्या ४८ होत असली तरी काँग्रेस आघाडीच्या तंबूत ५४ नगरसेवक असल्याचे गणित मांडले जात आहे. या आघाडीला पाच मतांची गरज असून त्याचे प्रयत्न केले जात असल्याची माहिती एका नेत्याने दिली. त्यामुळे चमत्कार घडणार का अशी चर्चा मंगळवारी पालिकेच्या वर्तुळात होती. परंतु राज्यात आणि केंद्रात युतीचा सत्तेचा सारीपाट मांडलेला असल्यामुळे महापालिकेतही युतीच्या उमेदवारांना कोणताही धोका नसल्याचे चित्र आहे.

महापालिकेतील पक्षीय बलाबल
- २८ शिवसेना
- २३ भाजप
- २४ एमआयएम
- ११ काँग्रेस
- ५ बसप
- ४ राष्ट्रवादी
- २ रिपाइं (डेमॉक्रेटिक)
- १७ अपक्ष
- ११४ एकूण (एक पद रिक्त)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाच तास नुसता आगडोंब!

0
0



म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
नवाबपुऱ्यात रेग्झीन गोदामाला मंगळवारी सायंकाळी पावणेपाचच्या सुमारास भीषण आग लागल्याने पाच तास आगडोंब उसळला. सिलेंडर व एसीच्या स्फोटामुळे आगीने आजूबाजूंच्या घरांना विळखा घातला. या घटनेत लाखोंचे नुकसान झाले. दरम्यान, आगीचे नेमके कारण समजू शकले नाही.
सय्यद अफरोद्दिन यांचे मदनी चौकात सिट कव्हर व कुशनचे दुकान आहे. तीन मजली इमारतीच्या तळमजल्यावर रेग्झीनचे गोदाम आहे. या इमारतीत अकबर काजी व तारेक कुरेशी हे दोन किरायेदार कुटुंबासह राहतात. सायंकाळी पावणेपाचच्या सुमारास गोदामातून धूर निघत असल्याचे कामगारांच्या ‌लक्षात आले. त्यांनी आरडाओरड केला. किरायेदारांनी त्वरित आपल्या कुटुंबीयांना बाहेर काढले. काही वेळात आगीने रौद्ररूप धारण केले. आगीच्या झळा पोहचल्याने शेख हाजी शेख जमाल, इस्माईल भाई व शक्तसिंग राठोड यांच्या घराचे देखील नुकसान झाले.
आग लागलेली इमारत मध्यवस्तीतल्या बोळात आहे. या भागातील रस्ते अरुंद आहेत. महापालिका आयुक्त ओमप्रकाश बकोरिया माहिती मिळताच घटनास्थळी दाखल झाले. मात्र, अग्निशमन दलाच्या बंबाना येण्यासाठी अरूंद रस्त्यामुळे अडचणी आल्या. कशीबशी गर्दी हटवून बंब व पाण्याचे टँकर घटनास्थळी आणण्यात आले. पाच पाण्याचे बंब व दहा पाण्याच्या टँकरचा वापर करीत तब्बल पाच तासांने ही आग आटोक्यात आणण्यात आली. या आगीत लाखोंचे नुकसान झाले. इमारतीमधील नागरिक वेळीच बाहेर पडल्याने जीवित हानी झाली नसल्याची माहिती एसीपी रविकांत बुवा यांनी दिली.

पोलिसांची फटकेबाजी
आग लागल्याचे समजताच हजारो हुल्लडबाजांनी या ठिकाणी गर्दी केली. मदत कमी व सेल्फी घेण्याचे, शुटींग करण्याचे प्रकार सुरू झाले. या हुल्लडबाजांमुळे अग्निशमन दलाचे बंब व पाण्याचे टँकर देखील येण्यास अडचणी आल्या. यामुळे पोलिसांना वारंवार बळाचा वापर करत हुल्लडबाजांना आवरावे लागले.

मध्यवस्तीत गोदाम कसे
नवाबपुरा ही नागरी वसाहत आहे. या वस्तीमध्ये गोदाम कसे काय उभारण्यात आले? ते कायदेशीर आहे का? याची पोलिसांच्या वतीने चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

‘मटा’ भूमिका
---
अरूंद गल्ल्यांचे आव्हान
---
भंगाराच्या साठ्यांपासून वेगवेगळ्या गोदामांपर्यंत कित्येक धोकादायक ठिकाणे जुन्या शहरात आणि आसपासच्या गुंठेवारी भागात आहेत. या साठ्यांना किंवा गल्लीबोळांतील एखाद्या घराला आग लागली तर अग्निशामक बंब तेथे पोहोचू शकत नाही. शहराचा जवळपास तीस टक्के भाग अशा वसाहतींनी व्यापला आहे. त्यामुळे संकटाच्या वेळी तेथे मोठे बंब उपयोगी पडत नाहीत, याची पालिकेलाही कल्पना आहे; पण आग एखाद्या वेळी लागते, म्हणून या वस्तुस्थितीकडे प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनीही दुर्लक्ष केले आहे. गल्ल्यांमध्ये जाऊ शकतील असे छोटे बंब अग्निशामक विभागाची गरज आहे, पण जिथे मोठ्या बंबांचे गळके पाईपही दुरुस्त केले जात नाहीत अशा यंत्रणेकडून ही संवेदनशीलता दाखविली जाण्याची शक्यता कमीच आहे. बायजीपुऱ्यातील या ताज्या आगीनंतर तरी या प्रश्नी लक्ष घालून पालिकेने अग्निशामक विभाग सक्षम करावा.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जडगावमध्ये कॅशलेस व्यवहार सुरू

0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
नोटबंदीच्या पार्श्वभूमीवर रोकडरहित व्यवहार (कॅशलेस) करण्यावर भर वाढला आहे. मराठवाड्यातील पहिले कॅशलेस गाव ठरलेल्या जडगावमध्ये (ता.औरंगाबाद) मंगळवारपासून कॅशलेस प्रक्रियेची औपचारिक सुरुवात झाली.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मधुकर अर्दड, अतिरिक्त जिल्हाधिकारी पी. एल. सोरमारे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश बेदमुथा, महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे चेअरमन उन्नम राव, विभागीय व्यवस्थपक उदय कुलकर्णी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंके, सरपंच गोदावरी बेलकर, ग्रामसेवक सिद्धार्थ शेळके यांची प्रमुख उपस्थिती होती. जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागाच्या पुढाकाराने जडगावमध्ये गेल्या महिनाभरापासून ही प्रक्रिया युद्धपातळीवर राबविली गेली. महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या सहाय्याने १६०० लोकसंख्येच्या गावातील प्रत्येक नागरिकाचे बँक अकाउंट उघडणे, आधार लिंक करणे, डेबिट कार्ड देणे ही कामे पार पडली. त्यानंतर काही दुकाने आणि ग्रामपंचायतीमध्ये कॅशलेस व्यवहार कसे करायचे याबाबत ट्रेनिंग दिले गेले. आज त्याची औपचारिक सुरुवात झाली. साळुंके यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमास गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

...त्यांच्या स्मितहास्याने मिळते ईश्वरीय समाधान!

0
0



म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
‘लायन्स क्लब ऑफ औरंगाबाद चिकलठाणा’तर्फे आयोजित पद्मश्री डॉ. शरदकुमार दीक्षित स्मृती ४१ व्या निःशुल्क प्लास्टिक सर्जरी शिबिराला मंगळवारपासून प्रारंभ झाला. मागच्या ४० वर्षांत १२ हजारांपेक्षा जास्त शस्त्रक्रिया झालेल्या शिबिराचे उदघाटन हे डॉ. दीक्षित यांच्या निधनानंतर शिबिराचा वसा पुढे नेणारे आणि गेल्या २४ वर्षांपासून शस्त्रक्रिया करण्यासाठी अमेरिकेतून येणारे प्लास्टिक सर्जन डॉ. राज लाला तसेच डॉ. विजय मोराडिया यांच्या उपस्थितीत झाले.
सिडको एन परिसरातील लायन्स आय हॉस्पिटल येथे शिबिराच्या उदघाटनप्रसंगी भारतीय जैन संघटनेचे संस्थापक शांतीलाल मुथा, एमजीएम वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. प्रवीण सूर्यवंशी, औषधी संघटनेचे शहराध्यक्ष रावसाहेब खेडकर, ‘लायन्स’चे पदाधिकारी प्रवीण अग्रवाल, एम. के. अग्रवाल, संदीप मालू, तसेच संघटनेचे अध्यक्ष राजेश जाधव, सचिव संजीव गुप्ता आदींची व्यासपीठावर उपस्थिती होती. या वेळी मुथा म्हणाले, ‘एकूण लोकसंख्येमध्ये एक टक्के लोकांमध्ये दुभंगलेले टाळू, ओठांची समस्या असते. असे व्यंग घेऊन जन्माला आलेल्या मुलांना आपल्या आईचे दूधदेखील पिता येत नाही. त्यामुळेच अशा मुलांची जन्मजात समस्या आयुष्यभरासाठी सोडवण्यासारखे समाधान कोणतेही नाही. हेच ईश्वरी कार्य डॉ. दीक्षित यांच्या रुपाने झाले. त्यासाठी डॉ. दीक्षित हे दरवर्षी ३०-३० कॅम्प घेत होते आणि त्यासाठी ते सहा-सहा, आठ-आठ महिने अमेरिकासोडून भारतात राहात होते. ते त्यांच्यासोबत डॉ. लाला यांना शिबिरासाठी आवर्जुन घेऊन येत होते आणि यानिमित्ताने शिबिराच्या भविष्याची तरतूदही त्यांनी नकळतच करून ठेवली होती. डॉ. दीक्षित यांच्या निधनानंतर डॉ. लाला व डॉ. मोराडिया यांनी हे शिबिर पुढे नेले आहे आणि आज डॉ. लाला हे प्रती डॉ. दीक्षित झाले आहे. जैन संघटनेमार्फतही विविध ठिकाणी प्लास्टिक सर्जरी शिबिर घेण्यात येते आणि या शिबिरांमध्येही डॉ. दीक्षित, डॉ. लाला यांनी योगदान दिले आहे. संघटनेमार्फत आतापर्यंत सुमारे दीड लाख शस्त्रक्रिया झाल्या,’ असेही मुथा म्हणाले. ‘मागच्या ३६ वर्षांपासून औषधी संघटनेमार्फत शिबिरासाठी निःशुल्क औषधी दिली जात असून, यापुढेही संघटना औषधी देणार,’ असे संघटनेचे अध्यक्ष रावसाहेब खेडकर म्हणाले. ‘हे शिबिर म्हणजे समाजसेवा, रुग्णसेवेचे शुद्ध कार्य आहे आणि यापुढेही हे कार्य असेच सुरू राहील,’ अशा शब्दांत डॉ. सूर्यवंशी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

नांदेडमध्येही गेल्या ३५ वर्षांपासून शिबिर
‘डॉ. लाला व डॉ. मोराडिया यांच्या टीममार्फत नांदेडमध्ये गेल्या ३५ वर्षांपासून प्लास्टिक सर्जरी शिबिर सुरू आहे. रोज २०० ते ३०० नेत्र शस्त्रक्रिया होत आहेत,’ अशी माहिती ‘लायन्स’चे प्रवीण अग्रवाल यांनी दिली. शिबिरासाठी योगदान देणारे प्रकाश राठी व रमेश पोकर्णा यांना गौरविण्यात आले.

...त्यांच्या हास्यातून मिळते आम्हाला प्रेरणा
‘शिबिरांमध्ये कधीतरी शस्त्रक्रिया केलेले अनेक रुग्ण दरवर्षी हमखास भेटायला येतात आणि त्यांच्या चेहऱ्यावरील स्मितहास्य पाहून तीव्र समाधान मिळते आणि त्यातूनच दरवर्षी अधिकाधिक शस्त्रक्रिया करण्यासाठी ऊर्जा मिळते,’ असे अनुभव कथन यावेळी डॉ. राज लाला यांनी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बेरोजगारांना २ कोटींचा गंडा

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

रेल्वेमध्ये ‘टीसी’ची नोकरी लावून देतो म्हणून महाराष्ट्रातील तब्बल २२ तरुणांकडून प्रत्येकी १० लाख रुपये घेऊन फसवणूक केल्याचे उघड झाले आहे. त्यासाठी सर्व तरुणांना कोलकाता येथे ३ महिने थांबवून ठेवले आणि त्यांना बनावट नियुक्तीपत्रेही दिले. एवढेच नव्हे तर त्यांची रोज सही घेऊन प्रशिक्षणाचा देखावाही तयार केला. याप्रकरणी नाशिक जिल्ह्यातील चांदवड येथील अमोल मधुकर गांगुर्डे व आनंद कचरुबा वानखेडे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. ही फसवणूक दोन कोटी रुपयांची आहे.

गोकुळवाडी (ता. गंगापूर, जि. औरंगाबाद) येथील सज्जन हिरचंद घुसिंगे (वय २४) यांनी तक्रार दिल्यानंतर हे प्रकरण चव्हाट्यावर आले. २०११मध्ये सज्जन यांची अमोल गांगुर्डे व आनंद वानखेडे यांच्याशी ओळख झाली. त्यावेळी अमोल व आनंद हे नाशिकमध्ये पोलिस भरतीपूर्व प्रशिक्षण संस्था चालवत होते. सज्जन नोकरीच्या शोधात होते. आरोपींनी सज्जन यांना रेल्वेत ‘टीसी’ची नोकरी लावतो, असे आमिष दाखविले. त्याला बळी पडून सज्जन व त्यांच्या वडिलांनी दोघांना १० लाख रुपये दिले. नोकरीचे नियुक्तीपत्र कोलकात्याला मिळेल, असे सांगून सज्जनला ऑगस्ट २०१२मध्ये कोलकात्याला प्रशिक्षणासाठी नेले. तेथे आणखी २१ तरुण होते. त्या सर्वांची सोय कोलकात्याच्या लॉजमध्ये करण्यात आली होती. त्याच ठिकाणी सर्व तरुणांना ‘रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड, चितपूर, कोलकाता-३७’ या नावाने सरकारी गोल शिक्के मारलेले नियुक्तीपत्र देऊन ३ महिने प्रशिक्षणाच्या निमित्ताने थांबवून ठेवले. या काळात त्यांची रोज एका रजिस्टरवर सहीदेखील घेण्यात आली. या प्रशिक्षणाची शंका आल्यामुळे सज्जन यांनी कोलकात्यातील रेल्वे अधिकाऱ्यांना भेटून नियुक्तीपत्र दाखवले असता, ते पूर्णतः बनावट असल्याचे स्पष्ट झाले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी अमोल व आनंद यांना पैसे मागितले, परंतु त्यांनी टाळाटाळ केली. पैशांचा तगादा लावल्यानंतर दोघांनी सज्जनचे मेहुणे राजेंद्र मदन काकरवाल यांच्या नावाने ५ मार्च २०१३ रोजी उसनवार पावती करून दिली. त्यानंतरही पैसे मिळत नसल्याचे त्यांनी २९ ऑगस्ट २०१६ रोजी दौलताबाद पोलिस ठाण्यात तक्रार दिली. दोघांविरुद्ध कलम ४२०, ४३७, ४७१, ४०६ अन्वये गुन्हा दाखल झाला.

अटकपूर्व जामीन फेटाळला

गुन्हा दाखल झाल्यानंतर अमोल गांगुर्डे याने २८ नोव्हेंबरला जिल्हा कोर्टामध्ये अटकपूर्व जामिनासाठी अर्ज सादर केला होता. सुनावणीवेळी, आरोपींनी बनावट सही-शिक्के-नियुक्तीपत्र कुठे-कसे तयार केले, याचा शोध घेऊन बनावट कागदपत्रे, प्रिंटर, इतर साहित्य जप्त करणे बाकी आहे, आणखी किती जणांची किती प्रमाणात फसवणूक करण्यात आली, याचा शोध घेणे बाकी असल्यामुळे आरोपीचा जामीन मंजूर करू नये, अशी विनंती सहाय्यक सरकारी वकील उदय पांडे यांनी कोर्टात केली. ही विनंती ग्राह्य धरून कोर्टाने आरोपीचा अटकपूर्व जामीन अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश जे. एन. राजे यांनी फेटाळला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘मुस्लिम भागांतील एटीएम रिकामी’

0
0

नांदेड : मुस्लिम भागातील एटीएममध्ये केंद्र सरकार जाणीवपूर्वक पैसे टाकत नसल्याचा आरोप ‘एमआयएम’चे प्रमुख खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी केला आहे.

नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर येथे नगरपालिका निवडणुकीसाठी सभा झाली. या सभेमध्ये ओवेसी बोलत होते. या सभेला शहरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली. विशेषत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या नोटबंदीच्या निर्णयावर त्यांनी जोरदार टीका केली. हा निर्णय मुस्लिम समाजासाठी खूपच तापदायक होत असल्याचा आरोप त्यांनी केला. ते म्हणाले, ‘नोटाबंदीचा निर्णय हा मुस्लिम समाजाला तापदायक झाला आहे. मुस्लिम भागांमध्ये असणारी एटीएम रिकामी आहेत. येथील बँका उघडल्या जात नाहीत आणि जाणूनबुजून दुर्लक्ष केले जात आहे.’

ओवेसी म्हणाले, ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लक्षात ठेवले पाहिजे की, लोक आज पैसे काढण्यासाठी रांगेत उभे आहेत. हेच लोक तुमच्या विरोधात मतदान करण्यासाठी पुन्हा एकदा रांगेत उभे राहतील.’

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


व्यवस्थापनाकडून गौरव; कामगारांसाठी मानाचे

0
0

म. टा. प्रतिनिधी वाळूज
‘उत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या कामगारांची नोंद घेऊन व्यवस्थापनाकडून कायझन (चांगला बदल) पुरस्काराने गौरव करणे ही कामगारांसाठी मानाची बाब आहे. यामुळे कंपनी व्यवस्थापन व कामगारांची नाळ अधिक घट्ट होऊन अापलेपणाची भावना वाढीस लागते,’ असे प्रतिपादन फायईझर लिमिटेडचे एचआर व्यवस्थापक महेश डोलारे यांनी केले.
ऋचा इंजिनीअरिंगमधील २६ कामगारांना मंगळवारी पुरस्कार प्रदान करण्यात आला. यानिमित्त आयोजित कार्यक्रमात डोलारे बोलत होते. हा कार्यक्रम कंपनीच्या सहाव्या प्लॅन्टमध्ये पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्लॅन्ट हेड निमिन अमृतकर होते. ऋचा इंजिनीअरिंचे एचआर व्यवस्थापक संजय कपाटे यांची प्रमुख उपस्थिती होती.
या पुरस्कारासाठी कंपनीतील १०५ कामगारांपैकी काही जणांची उत्कृष्ट कामगार म्हणून निवड करण्यात येते. कामात चांगला बदल व नियमितता दाखवणाऱ्या कामगारांना कंपनी व्यवस्थापनाकडून पुरस्कार दिला जातो. यावेळी कंपनीकडून दोन वेगवेळ्या पुरस्कारचे वितरण करण्यात आले. त्यात १९ कामगारांना कायझन पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यांना प्रेरणादायी पुस्तक देण्यात आले. पी. यू. पाटील यांनी हा पुरस्कार आठ वेळा पटकावला आहे. शंभर टक्के उपस्थिती असलेल्या ७ कामगारांचा गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचलन किरण नारखेडे यांनी केले, तर संजय कपाटे यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सुखपालसिंग बुमरा, प्रताप वाघ, राहुल टोणगिरे, बाळू कांगरे, दिनेश पाटील आदींनी परिश्रम घेतले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रोष व्यक्त करण्याची निवडणुकीत संधी

0
0

म. टा. प्रतिनिधी, पैठण
‘अच्छे दिन’चे स्वप्न दाखवून सत्तेवर आलेले भाजप व शिवसेनेचे सरकार सध्या सामान्य नागरिक व शेतकऱ्यांना रडवत आहे. या शासनाचा निषेध करण्यासाठी नागरिकांनी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत सत्ताधारी पक्षाच्या विरोधात मतदान करण्याची ही संधी आहे, असे प्रतिवादन राज्याचे माजी मंत्री सुरेश धस यांनी केले.
नगरपालिका निवडणुकीमधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांच्या सोमवारी रात्री झालेल्या प्रचार सभेत ते बोलत होते. यावेळी माजी आमदार संजय वाघचौरे, चंद्रकांत घोडके, राष्ट्रवादी काँग्रेसचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार अनिल घोडके हे मंचावर उपस्थित होते. पुढे बोलताना माजी मंत्री सुरेश धस म्हणाले, संजय वाघचौरे हे आमदार असताना त्यांनी कोट्यवधी रुपयाचा निधी आणून अनेक विकास कामे केली. अनिल घोडके हे नगराध्यक्ष असताना त्यांनी तत्कालीन अर्थमंत्री जयंत पाटील यांच्याकडून नाथषष्ठी यात्रेसाठी यात्रा निधी मंजूर करून घेतला. त्यांनी त्यांच्या नगराध्यक्षपदाच्या कार्यकाळात शहरात घंटागाडी सुरू केली. तसेच शहरात अनेक विकासकामे केली होती. विद्यमान शिवसेनेच्या नगराध्यक्षांनी बोगस व कामे करून नगरपालिकेत भ्रष्टाचार केला, असा आरोप धस यांनी केला. माजी आमदार संजय वाघचौरे यांनीही यसभेत विद्यमान आमदारावर भ्रष्टाचाराचे आरोप केले. सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवकपदाचे सर्व उमेदवार व मोठ्या संख्येने नागरिक उपस्थिती होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दत्त जयंती सोहळा शहरात उत्साहात

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
शहरातील विविध भागात श्री दत्त जयंती सोहळा मंगळवारी उत्साहात साजरा करण्यात आला. गेल्या गुरुवारपासून अनेक मंदिरांमध्ये धार्मिक कार्यक्रम सुरू झाले होते. त्याचा समारोप आणि दत्तजन्माचा सोहळा पार पडला.
औरंगपुरा येथील प्राचीन दत्तमंदिरात मंगळवारी सकाळी काकडा आरती करण्यात आली. सिडको एन-सात येथील श्री जागृत दत्तमंदिरात मंगळवारी जलाभिषेक, महापूजा, ५६ भोग नैवेद्य दाखविण्यात आला. भरतबुवा रामदासी यांचे कीर्तन झाले. सायंकाळी श्री दत्त जन्मोत्सव सोहळा पार पडल्यानंतर फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. गुरुवारी महाआरती, सात दिवस घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांचे बक्षीस वितरण आणि महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. सिडको एन नऊ पवननगर येथील दत्त मंदिरात श्रीमद् भागवत सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. त्याचा समारोप मंगळवारी झाला. हडको एन -११, बेगमपुरा परिसरातील दत्तमंदिरातही जन्मोत्सव सोहळा साजरा करण्यात आला. घरोघरी श्री दत्त जयंती निमित्त श्री गुरुचरित्र पारायण करण्यात येते. या पारायणाची समाप्ती काही ठिकाणी मंगळवारी झाली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अतिक्रम काढण्याऐवजी भोंगा फिरवून मोकळे

0
0

म. टा. प्रतिनिधी, वाळूज
वाळूज एमआयडीसी व बजाजनगरमधील मुख्य रस्त्यावरील अतिक्रमणे त्वरित काढण्याचे आदेश खासदार चंद्रकांत खैरे यांनी नुकत्याच झालेल्या बैठकीत एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांना दिले होते. पण, अधिकाऱ्यांनी कारवाई करण्याऐवजी एमआयडीसी अधिकाऱ्यांनी रिक्षातून भोंगा लावून दवंडी देऊन अतिक्रमण काढून घेण्याचे आवाहन केले.
वाळूज औद्योगिक परिसरातील नागरी समस्या सोडविण्यासाठी खासदार चंद्रकांत खैरे यांच्या अध्यक्षतेखाली एमआयडीसी कार्यालयात अधिक्षक अभियंता केंदार नागापुरे, कार्यकारी अभियंता आर. एस. कुलकर्णी आदी अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत बजाजनगर तसेच औद्योगिक क्षेत्रातील समस्या तसेच मुख्य रस्त्यावरील अतिक्रमणाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी खासदार खैरे यांनी बजाजनगर तसेच एमआयडीसीच्या मुख्य रस्त्यावरील अतिक्रमणे हटवून वाहतुकीचा मार्ग सुरळीत करण्यासाठी तत्काळ कारवाई करण्याचे आदेश दिले होते. याबैठकीनंतर एमआयडीसी प्रशासनाने कारवाई करण्याऐवजी केवळ रिक्षाव्दारे दंवडी देऊन अतिक्रमण काढून घेण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे. पण, अतिक्रमणाबाबत एमआयडीसीकडून ठोस पाऊल उचलण्यात येत नसल्याची खात्री नागरिकांना असल्याने याकडे सर्वांनी दुलर्क्ष केले आहे.

शिवसेनेला मोठा फटका
बजाजनगर हा भाग शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. वर्षभरापूर्वी झालेल्या वडगाव कोल्हाटी ग्रामपंचायत निवडणुकीनंतर सरपंचपदाच्या वादावरून शिवसेनेत पुन्हा स्थानिक व पश्चिम महाराष्ट्र असे दोन गट निर्माण झाले. त्यातच खासदारांनी अतिक्रमणाबाबत कडक भूमिका घेऊन कारवाईचे आदेश दिल्याने परिसरात शिवसेने विरोधी लाट आहे. त्याचा फटका अागामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत बसण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आमदार झांबड यांनी फसविल्याची तक्रार

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
बजाज कंपनीसमोरच्या वळदगावात सुमारे ३० वर्षांपूर्वी खरेदी केलेल्या भूखंडाची रजिस्ट्री करून देण्यास तत्कालीन गुरुकृपा डेव्हलपर्सचे प्रवर्तक आमदार सुभाष झांबड टाळाटाळ करीत आहेत, अशी तक्रार या योजनेतील सभासदाच्या मुलाने पोलिस आयुक्तांकडे केली आहे. दरम्यान, या प्रकरणात चौकशी सुरू असून, आमदार झांबड यांनी हे आरोप फेटाळले आहेत.
जयेश नवलचंद संचेती (रा. एन ४, सिडको) यांनी याप्रकरणी तक्रार केली आहे. त्यांच्या अर्जानुसार, सुभाष झांबड, अरुण मुगदिया यांनी १९८४मध्ये वळदगाव शिवारातील गट क्रमांक १३७ येथील जमिनीवर गुरुकृपा डेव्हपर्स नावाने मासिक हप्त्यावर प्लॉटिंगची योजना सुरू केली होती. यामध्ये जयेश संचेती यांचे वडील नवलचंद संचेती सभासद झाले होते. या योजनेत ३०० रुपये महिन्याप्रमाणे ७ हजार २०० रुपये २ वर्षांत भरण्यात येणार होते. नवलचंद संचेती यांनी मासिक हप्ते भरून प्लॉट बुक केला होता.
मुगदिया यांच्यामार्फत त्यांनी बुकिंग केल्याचा तक्रारीत उल्लेख आहे. नवलचंद संचेती यांचा १९९६मध्ये मृत्यू झाला. त्यानंतर ‘गुरुकृपा’च्या भागीदारांनी या प्लॉटची रजिस्ट्री करून देण्यास टाळाटाळ केली, असा आरोप जयेश संचेती यांनी केला आहे. बेकायदा योजना सुरू करून आमदार झांबड व भागीदारांनी आपली फसवणूक केली असून दोषींवर कारवाई करण्याची मागणी संचेती यांनी तक्रारीत केली आहे. आर्थिक गुन्हे शाखा या प्रकरणी सध्या चौकशी करीत आहे.

आमच्याकडे जयेश संचेती यांनी तक्रार अर्ज केला आहे. सध्या हिवाळी अधिवेशन सुरू आहे. अधिवेशन झाल्यानंतर आमदार झांबड व समोरील तक्रारदाराला बोलावून यासंदर्भात चौकशी करण्यात येणार आहे.
- अमितेशकुमार, पोलिस आयुक्त

ही योजना ३३ वर्षांपूर्वी होती. आम्ही चार ते पाच भागीदारांनी ही योजना सुरू केली होती. नवलचंद संचेती यांनी काही हप्ते भरल्यानंतर ते डिफॉल्टर झाले होते. त्यामुळे त्यांचे पैसे त्यावेळी परत करण्यात आले होते. माझ्यावर करण्यात आलेल्या आरोपामध्ये कोणतेही तथ्य नाही. उलट संचेती इतकी वर्षे शांत का बसले, हा प्रश्न निर्माण झाला आहे. या प्रकरणाशी माझा कोणताही संबध नाही.
- आमदार सुभाष झांबड, प्रमोटर, गुरुकृपा ‌डेव्हलपर्स

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images