Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

दत्त जयंती संगीत महोत्सवाचा विसर

$
0
0



म. टा. प्रतिनिधी, जालना

राज्यातील दिग्गज गायक-वादक कलावंतांच्या हजेरीमुळे आठ दशकांपासून अंबडचे वेगळेपण जपणारा श्रीदत्त जयंती संगीतोत्सवला तीन वर्षांपासून खंड पडला आहे. मराठवाड्याच्या समृद्ध वारसा जपणाऱ्या या महोत्सवामध्ये खंड पडल्यामुळे, एक समृद्ध सांस्कृतिक चळवळ लयाला जाण्याची शक्यता आहे.
अंबड येथे आठ दशकांपासून हा श्रीदत्त जयंती संगीतोत्सवाची ही परंपरा सुरू होत. गायनाचार्य गोविंदराव जळगावकर यांनी या समृद्ध परंपरेला सुरुवात केली होती. सुरुवातीच्या काही वर्षांनंतरच या महोत्सवाला मोठे रुप येत गेले आणि तीन-तीन दिवसांपर्यंत हा महोत्सव चालत होता. पहाटेपर्यंत चालणाऱ्या मैफली हे या महोत्सवाचे वैशिष्ट्य होते. या महोत्सवासाठी मोठमोठे कलावंत अंबडला आले होते. महोत्सवाचा खर्च वाढत होता, तसे महोत्सवाला मदतीचा हात देणाऱ्यांचीही संख्या वाढत गेली. यामध्ये तत्कालीन आमदार विलासराव खरात, माजी मंत्री राजेश टोपे यांनीही मदत केली. अन्य स्थानिक दात्यांनीही या महोत्सवाला मदत केली. मात्र, संगीतोत्सवाचे स्वरूप वाढत असताना, वाढत्या खर्चाचा डोला सांभाळण्यामध्येही अडचणी येत गेल्या. विशेषत: गोविंदराव जळगावकर यांच्या निधनानंतर अडचणीत वाढल्या आणि महोत्सवामध्ये खंड पडला. राजेश टोपे यांनी या संगीतोत्सवाच्या आयोजनात सक्रिय सहभाग घेतला, अंबडला गायनाचार्य गोविंदराव जळगावकर नाट्यगृहाची भव्य इमारत उभारण्यात आली त्यात त्यांचा अर्धाकृती पुतळाही उभारण्यात आला होता.

‘तुम्हीही माझ्याकडे या!’
गोविंदराव जळगावकर यांनी सुरू केलेल्या या महोत्सवामध्ये मोठमोठे कलाकार सहभागी होत असले, तरीही ते विनामानधनच या महोत्सवामध्ये सहभागी होत असत. गोविंदराव जळगावकर स्वतः आग्रा घराण्याचे गायक होते. त्यांना संपूर्ण देशभरातून निमंत्रणे यायची. मात्र, या कार्यक्रमांसाठी त्यांनीही कधी कुणाकडून मानधन घेतले नाही. त्यांची अट एकच असायची, ते म्हणत ‘तुम्हीही माझ्याकडे या!’ ही सारी कलावंत मंडळी गोविंदराव जळगावकर यांच्या प्रेमाखातर विनामानधन सहभागी होत असत.

सहभागी कलावंत
या संगीत महोत्सवामध्ये अनेक दिग्गज कलावंत सहभागी झाली आहेत. पंडित राजन-सजन मिश्र, शंकरबापू अपेगावकर, उस्ताद सैदोद्दिन डागर, उस्ताद उस्मानखां, विमलाराजे देशपांडे, पंडित भाऊसाहेब दीक्षित, आरती अंकलीकर, उस्ताद सुल्तानखा, पंडित रोणू मुजुमदार, शौनक अभिषेकी, पंडित अजय पोहणकर, श्रुती सडोलीकर, डॉ. अश्विनी भिडे, पंडित राजा काळे, पंडित रूपक कुलकर्णी, पंडित मुकेश जाधव, पंडित प्रभाकर कारेकर,पंडित रामनारायण, उस्ताद शाहिद परवेझ, पंडित नाथराव नेरळकर, पंडित शिवदास देगलूरकर, पंडित राम बोरगावकर, हेमा उपासनी यांचा यामध्ये समावेश आहे.

श्रीदत्त जयंती महोत्सव हा ग्रामीण मराठवाड्यातील एकमेव सांस्कृतिक महोत्सव आहे. मात्र, वाढत्या खर्चामुळे तो बंद पडला आहे. आता हा उपक्रम पुन्हा सुरू करण्यासाठी सरकारने आणि सामान्य नागरिकांनीच पुढे येण्याची गरज निर्माण झाली आहे. अंबडची ओळख श्री दत्त जयंती संगीतोत्सव आणि गायनाचार्य गोविंदराव जळगावकर यांच्यामुळे निर्माण झालेली असून, ती लुप्त होण्याची भीती आहे.
- महेश वाघमारे,
अप्पा जळगावकर यांचे भाचे

अंबड आणि जालना जिल्ह्यातील थोर सांस्कृतिक परंपरेचा वारसा जोपासना करण्यासाठी मी नक्की प्रयत्न करेल. अंबड पालिकेच्या माध्यमातून हा संगीत महोत्सव कायमस्वरूपी सुरू ठेवण्यासाठी आमचे पूर्ण सहकार्य असेल.
- नारायण कुचे, आमदार, भाजप

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


स्थानिक नेत्यांची कन्नडमध्ये दमछाक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कन्नड
नगरपालिका निवडणूक प्रचारात सर्वच उमेदवारांच्या कार्यकर्त्यांमध्ये निरुत्साह दिसून येत आहे. पहिल्या टप्प्यातील प्रचारात शिवसेना, काँग्रेस व स्व. रायभान जाधव विकास आघाडीच्या कर्यालयांचे उदघाटन झाले. पण राज्यपातळीवराल नेत्यांची प्रचारात गैरहजेरी आहे. त्यामुळे उमेदवार व स्थानिक नेते फेऱ्या काढून प्रचाराचा गाडा कसाबसा ओढत आहेत.
काँग्रेसतर्फे जिल्हाध्यक्ष आमदार अब्दुल सत्तार यांची उद्‍घाटनाची सभा, शिवसेनेचे संपर्कप्रमुख विनोद घोसाळकर यांच्या कॉर्नर सभा व खासदार चंद्रकांत खैरे यांची प्रचार फेरी पार पडली. पण, सर्व पक्षांच्या राज्यपातळीवरील नेत्यांनी प्रचाराकडे पाठ फिरवली आहे. काँग्रेसच्या प्रचाराची धुरा माजी आमदार नितिन पाटील व स्व. रायभान जाधव विकास आघाडीचे नेतृत्व आमदार हर्षवर्धन जाधव करत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानसभेचे उमेदवार उदयसिंग राजपूत हे प्रचारापासून दूर आहेत. या पक्षाची प्रचाराची सूत्रे शिवकुमार जैस्वाल व अहेमद अली उर्फ भैयामेंबर यांच्याकडे आहे.
सर्व उमेदवारांनी प्रचार फेरीवर भर दिला असून गल्ली बोळात कार्यालये थाटली आहेत. या निवडणुकीत पैसे वाटपाची चर्चा जोर धरताना दिसून येत आहे. पण, मतदारांनी जुन्या नोटांना नकार दिला असून नव्या नोटा मागितल्याची कुजबुज होत आहे.

शिक्षकांच्या घरी उमेदवारी
बहुतांश महिला राखीव प्रवर्गात आजी-माजी शिक्षकाच्या घरातील महिलांची उपस्थिती लक्षणीय आहे. हा सध्या शहरातील चर्चेचा विषय आहे. प्रभाग १ अ मधून माजी शिक्षक सुरेश अनवडे यांच्या पत्नी अंजना अनवडे दुसऱ्यांदा राष्ट्रवादी काँग्रेसकडून नशीब आजमावत आहेत. याच प्रभागातून शिक्षण संस्था संचालक व शिक्षक सुधाकर देवकर यांच्या पत्नी वंदना देवकर या भाजप उमेदवार आहेत. प्रभाग २ मधून निवृत्त शिक्षक भास्करराव वेताळ यांच्या पत्नी जीजाबाई वेताळ आमदार जाधव विकास आघाडीकडून, निवृत्त मुख्याध्यापक राष्ट्रवादी काँग्रेसचे बडे नेते व शैक्षणिक संस्था सचिव तात्याराव कदम यांच्या पत्नी निर्मला कदम या काँग्रेसच्या तिकिटावर लढत आहेत. शिक्षक प्रभाकर मनगटे यांच्या पत्नी पूजा या राष्ट्रवादी काँग्रेसमधून लढत आहेत. प्रभाग ३ अ मधून भाजपतर्फे शिक्षिका संगीता राजेंद्र गव्हाणे व प्रभाग ५ अ मधून शिक्षक अमृत बिरारिस यांच्या पत्नी उज्वला या शिवसेनेतर्फे रिंगणात आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खुलताबादचा उरूस संपला; प्रचाराला वेग

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, खुलताबाद
हजरत ख्वाजा शेख मुन्तजीबोद्दिन जर जरी जर बक्ष यांचा उरूस संपल्यानंतर प्रचाराला वेग आला आहे. नगरपालिका निवडणुकीसाठी भाजप-शिवसेना युती, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, एमआयएम या प्रमुख पक्षात लढत होत आहे. त्यांच्यासमोर अपक्षांनी आव्हान उभे केले आहे.
निवडणुकीच्या दुसऱ्यात प्रचाराचा वेग खुलताबाद उरुसामुळे काहीसा थंडावलेला होता. उरुसाची सांगता झाल्यामुळे आता प्रचाराचा वेग वाढणार आहे. उरुसानिमित्त सर्वच राजकीय पक्षांनी आपापल्या उमेदवारांच्या प्रचारार्थ झेंडे, डिजिटल बॅनर, निवडणूक साहित्यांचा वापर केला. खुलताबाद नगरपालिका निवडणुकीत नगराध्यक्षपदासाठी चार व नगरसेवकपदासाठी ७० उमेदवार निवडणुकीच्या आखाड्यात नशीब अजमावत आहेत. थेट जनतेतून नगराध्यक्ष निवड व बहुसदस्यीय पद्धतीमुळे मतदारांना तीन ते चार मतदान करण्याचा अधिकार आहे. त्यामुळे प्रत्येक मतदाराला महत्त्व प्राप्त झाले आहे.
नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजप-शिवसेना युतीचे नवनाथ बारगळ, काँग्रेसचे अॅड एस. एम. कमर, राष्ट्रवादी काँग्रेसचे मुजीबोद्दिन हाफिजोद्दिन, अपक्ष लक्ष्मण फुलारे यांच्यात प्रमुख लढत आहे. भाजप-शिवसेनेने तरुण उमेदवार नवनाथ बारगळ यांना संधी दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे विलास चव्हाण यांनी निवडणुकीच्या प्रचाराची धुरा हाती घेतलेली आहे. भाजप शिवसेनेने गंगापूर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा घेतली आहे. काँग्रेसने आमदार सुभाष झांबड, तर राष्ट्रवादी काँग्रेसने माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर यांची जाहीरसभा घेतली. आमदार प्रशांत बंब यांनी घरोघरी जाऊन मतदारांच्या भेटीगाठी घेण्यावर भर देण्याच्या सूचना उमेदवारांना दिल्या आहेत. निवडणुकीतील उमेदवार कॉर्नर सभा घेऊन मतदारांशी संवाद साधत आहेत. बैठकीतून मतदारांचा आशीर्वाद मागत आहेत. भाजप-शिवसेनेचे उमेदवार विकासासाठी मतदान करण्याचे आवाहन करीत आहेत. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करीत आहेत. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार अब्दुल सत्तार यांनी नगरपालिका ताब्यात घेण्यासाठी प्रचाराची संपूर्ण धुरा निरीक्षक फेरोज पटेल यांच्याकडे सोपवली आहे. शिवसेनेचे खासदार चंद्रकांत खैरे, जिल्हाप्रमुख अंबादास दानवे, माजी आमदार अण्णासाहेब माने, युवा सेना जिल्हा अधिकारी संतोष माने हे नगरपालिकेवर भाजप-शिवसेनेची सत्ता आणण्याचे आवाहन करत आहेत.
आगामी तीन-चार दिवसांत प्रमुख नेत्यांच्या प्रचारसभा होणार आहेत. प्रचाराच्या अंतिम टप्प्यात नगरपालिकेची लढत बहुरंगी होते की सरळ लढत, हे चित्र स्पष्ट होणार आहे.

खादिम समाजवर लक्ष
खुलताबादेत बहुसंख्येने असलेल्या खादिम समाजावर डोळा ठेवून राष्ट्रवादी काँग्रेसने मुजीबोद्दिन हाफिजोद्दिन यांना उमेदवारी दिल्याने खुलताबाद शहरात निर्णायक असलेल्या खादिम मतदारांची दोन हजार मते एकगठ्ठा कोण्याच्या पारड्यात पडतात, हे महत्त्वाचे ठरणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिक्षकांवर दाखल गुन्हे मागे घेण्याची विनंती

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, खुलताबाद
औरंगाबाद येथील शिक्षक मोर्चामध्ये सामील शिक्षकांवर दाखल झालेले गुन्हे त्वरित मागे घेण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे, अशी माहिती यांनी शिक्षक मतदारसंघातील भाजप पुरुस्कृत उमेदवार प्रा. सतीश पत्की यांनी दिली.
प्रा. पत्की यांनी मंगळवारी खुलताबाद येथे दौरा केला. त्यानिमित्त वार्ताहरांशी बोलतांना त्यांनी सांगितले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन औरंगाबादेत झालेल्या शिक्षक मोर्चात शिक्षकांवर दाखल झालेले गुन्हे त्वरित मागे घेण्यात यावेत, विनाअनुदान तत्त्वावर घोषित शाळांसाठी २० टक्के अनुदानासंदर्भातील शासकीय परिपत्रकातील जाचक अटी रद्द कराव्यात, २०१५-१६ मधील संच मान्यतेनुसार अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन होईपर्यंत मूळ आस्थापनेवरूनच वेतन द्यावे, या मागण्या केल्या आहे. याय शिवाय शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या इतर मागण्यांसाठी पाठपुरावा सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
त्यांनी येथील कोहिनूर कॉलेज, चिश्तिया कॉलेज, घृष्णेश्‍वर महाविद्यालय, वेरूळ येथील समंतभद्र गुरुदेव विद्या मंदिर, देवगाव रंगारी येथील श्री गणेश महाविद्यालय येथे भेट देऊन शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न समजावून घेतले. कोहिनूर कॉलेजला नॅक समितीने नुकताच बी प्लस दर्जा दिल्याबद्दल संस्थेचे प्राचार्य व सर्व प्राध्यापकांचे त्यांनी अभिनंदन केले. यावेळी डॉ. संजय गव्हाणे, प्रा. सुरेश पठाडे, बाळासाहेब देशपांडे, प्रा. महेश निंबाळकर, नामदेव सानप, प्रा. सुसर, संतोष राजपूत, प्रकाश बोंबले, नितीन पवार आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रचाराच्या आठ वाहनांवर पैठणमध्ये कारवाई

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पैठण
नगरपालिका निवडणूक नियमांचे उल्लंघन करून प्रचार करणाऱ्या आठ वाहनांवर पैठण पोलिसांनी कारवाई केली आहे. पोलिसांच्या या कार्यवाहीमुळे प्रचार करणारी वाहने गायब झाली आहे. यामुळे भोंग्याच्या कर्कश आवाजामुळे त्रस्त शहरवासियांना थोडा दिलासा मिळाला आहे.
नगरपालिका निवडणुकीला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने प्रचार शिगेला पोहचला आहे. निवडणुकीत सर्वच पक्ष स्वतंत्रपणे निवडणूक लढवत असल्याने उमेदवारांची गर्दी आहे. यातच बहुतांशी उमेदवार वाहनावर भोंगे लावून प्रचार करत आहेत. प्रचार करताना बहुतांश वाहने नियमांचे उल्लंघन करत असून कर्कश आवाजामध्ये व सिनेमांची गाणे वाजवून प्रचार करत आहेत. आवाजामुळे त्रस्त शहरातील काही नागरिकांनी पोलिसांकडे याबद्दलची तोंडी तक्रार केल्यानंतर तीन दिवसात आठ वाहनांवर कलम १८८ नुसार कारवाई करण्यात आली. पोलिसांच्या कारवाईनंतर भोंगे लावून फिरणारी वाहने रस्त्यावरून गायब झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शपथपत्रप्रकरणी पानझडेंना नोटीस

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
निलंबित असताना हायकोर्टात शपथपत्र दाखल केल्याप्रकरणी महापालिकेचे आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांनी शहर अभियंता सखाराम पानझडे यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. ‘कोणत्या अधिकारात शपथपत्र दाखल केले, याचा खुलासा करा,’ असे या नोटीसमध्ये नमूद करण्यात आले आहे.
शहरातील रस्ते विकासासाठी राज्य शासनाने २४ कोटी ३३ लाख रुपयांचा निधी दिला आहे. या निधीतून पाच रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाचे काम केले जात आहे. रस्त्यांच्या कामात महापालिकेचे १ कोटी ६० रुपयांचे नुकसान झाल्याचा ठपका ठेवत बकोरिया यांनी शहर अभियंता पानझडे यांना निलंबित केले आहे.
शासनाच्या निधीतून करण्यात येत असलेल्या रस्त्यांच्या कामासंदर्भात विविध आक्षेप घेऊन एमआयएमचे नगरसेवक विकास एडके यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. निलंबित असलेल्या पानझडे यांनी या याचिकेवरील सुनावणीच्या वेळी शपथपत्र दाखल केले. निलंबित असताना शपथपत्र दाखल केल्यामुळे कोर्टाने नाराजी व्यक्त करून ताशेरे ओढले होते.

खुलाशानंतर होणार पुढील कारवाई
आयुक्त बकोरिया यांनी ही बाब गांभीर्याने घेऊन पानझडे यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. निलंबित असताना शहर अभियंता म्हणून कोर्टात शपथपत्र दाखल करणे योग्य नाही, असे मत त्यांनी ‘मटा’ शी बोलताना व्यक्त केले. पानझडे यांच्याकडून खुलासा आल्यावर पुढील कारवाई केली जाईल, असे ते म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बीड बायपास मंदिरात दत्तभक्तांची गर्दी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, सातारा
बीड बायपासवरील काशीविश्वनाथ बाबा संस्थान येथे दत्त जयंती सोहळा मंगळवारी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. दुपारी १२ वाजता झालेल्या दत्त जन्मसोहळ्याला ‘दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा’चा जयघोष करत मोठ्या संख्येने भाविकांनी हजेरी लावली. त्यांच्यात महिलांची संख्या जास्त होती. संस्थानतर्फे मातोश्री वृद्धाश्रममधील ज्येष्ठांना व भगवान बाबा बालिकाश्रातील मुलींना अन्नदान करण्यात आले.
दत्त जयंती सोहळ्यानिमित्त २ डिसेंबरपासून मंदिरात दररोज रूद्राभिषेक करण्यात आला, यात २२ भक्तांनी सहभाग घेतला. तसेच ७ दिवसांचे पारायणही केले. सोमवारी, दुपारी ४ वाजता परिसरातून पालखी मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर डॉ. विजयकुमार फड यांचे गुरू महिमेवर प्रवचन झाले.
मंगळवारी गणपती, रेणुकामाता, दत्तात्रय आणि सुवर्ण पादुकांची शोडषोपचार पूजा व अभिषेक झाल्यानंतर प्रा. राजेश सरकटे यांचा स्वरविहार हा भक्तिगीतांचा कार्यक्रम झाला, काशी विश्वनाथ बाबांच्या मूर्ती स्थापनेचा वर्धापन दिन साजरा करण्यात अला. दुपारी १२ वाजता दत्तात्रय जन्म सोहळा आणि महाआरती झाल्यानंतर भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. सायंकाळी उशिरापर्यंत दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागल्या होत्या. त्यात महिलांची संख्या जास्त होती.
सोहळ्यासाठी संस्थानचे अध्यक्ष सोपानराव देशमुख, लक्ष्मीनारायण अट्टल, रामकृष्ण वाघ, धनंजय शेंडे, अॅड. कृष्णराव निकम, हिरासिंग जाधव आदींसह विश्वस्तांनी परिश्रम घेतले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मराठवाड्यामध्ये दत्त जयंती उत्साहात

$
0
0



म. टा. प्रतिनिधी, जालना

मराठवाड्याच्या विविध भागांमध्ये मंगळवारी दत्त जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. विविध भागातील प्रमुख मंदिरांमध्ये भाविकांनी गर्दी केली होती. दत्त जयंतीच्या निमित्ताने वेगवेगळ्या धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
जालना शहरासह जिल्ह्यामध्ये भक्तिमय वातावरणामध्ये दत्त जयंती साजरी करण्यात आली. नरीमाननगर भागातील श्रीक्षेत्र दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ अध्यात्मिक सेवा, विकास व बाल संस्कार केंद्रात सात डिसेंबरपासून अखंड नामजप यज्ञ सप्ताह सुरू आहे. दत्त जन्मोत्सवानिमित्त मंगळवारी सकाळपासूनच सेवेकऱ्यांनी गर्दी केली होती. पहाटे गुरूचरित्राचे सामूहिक पारायण, नित्यस्वाहाकार, औदुंबर प्रदक्षिणानंतर राज्यमंत्री अर्जुन खोतकर व सीमाताई खोतकर यांच्या हस्ते आरती करण्यात आली. तद्नंतर बलीपूर्ण आहूती देण्यात आली. दुपारी साडेबारा वाजता अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त असा सामूहिक जयघोष करण्यात आला. या वेळी माजी आमदार कैलास गोरंट्याल, नगराध्यक्षा संगीताताई गोरंट्याल यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली.

उस्मानाबादमध्ये कार्यक्रम
जिल्ह्यामध्ये विविध ठिकाणी दत्त जयंतीनिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. शहरामध्ये काही भागांमध्ये काही दिवसांपासून धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. मलकापूर येथे श्रीक्षेत्र मलकापूर येथे दुपारी महाआरतीसाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


खासगेटचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे आदेश

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
जागतिक वारसा स्थळांच्या यादीत खासगेटचा उल्लेख नसल्याची माहिती मंगळवारी उघड झाली. यादीमध्ये ते गेट नसले तरी त्याचे स्ट्रक्चरल ऑडीट करा, असे आदेश महापालिका आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांनी अधिकाऱ्यांना दिले.
राजाबाजार ते जिन्सी-बायजीपुरा या रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम केले जात आहे. शहर विकास योजनेनुसार हा रस्ता ५० फूट रुंदीचा केला जाणार आहे. या रस्ता रुंदीकरणात खासगेट बाधित होत आहे. काही वर्षांपूर्वी या गेटचा मोठा भाग पडल्यामुळे त्याची स्थिती धोकादायक आहे. या गेटबद्दल निर्णय घेण्यासाठी बकोरिया यांच्या उपस्थितीत मंगळवारी महापालिकेच्या हेरिटेज कमिटीची बैठक घेण्यात आली. बैठकीला कमिटीचे अध्यक्ष जयंत देशपांडे, कमिटी सदस्य व पालिका अधिकारी हजर होते. जागतिक वारसा स्थळांची यादी तपासल्यानंतर तिच्यात खासगेटचा उल्लेख नसल्याचे स्पष्ट झाले. यादीत हे गेट नसले तरी संवर्धनाच्या दृष्टीने त्याचे स्ट्रक्टरल ऑडीट करा, असे आदेश आयुक्तांनी दिले. जागतिक वारसा स्थळांच्या यादीमधील अनेक वास्तू अस्तित्वात नाहीत, आणि काही वास्तू अस्तित्वात असूनही नोंद नाही. त्यामुळे वारसा स्थळांची यादी नव्याने करण्यासंदर्भात शासनाची परवानगी मागण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.

मार्किंगचे काम पूर्ण
शहर विकास योजनेनुसार गावठाणातील १६ रस्त्यांचे रुंदीकरण करण्याचे पालिकेच्या प्रशासनाने ठरविले आहे. या सर्व रस्त्यांचे मार्किंग करण्याचे आदेश आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांनी दिले होते. त्यांनी आढावा घेतल्यानंतर सर्व रस्त्यांचे मार्किंग पूर्ण झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. मार्किंग पूर्ण झाल्यामुळे आता भूसंपादनाची कारवाई केव्हा होणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

झेंडा लावण्यावरून शिवाजीनगरात तणाव

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
झेंडा लावण्याच्या कारणावरून शिवाजीनगरात मंगळवारी सायंकाळी तणावाचे वातावरण निर्माण झाले. दुचाकीवरून जाणाऱ्या काही तरुणांनी या वॉर्डाचे नगरसेवक राजेंद्र जंजाळ यांच्या कार्यालयावर दगडफेक केली, त्यात कार्यालयातील कर्मचारी जखमी झाला. दरम्यान, जंजाळ यांच्यावर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी जवाहरनगर पोलिस स्टेशन समोर रात्री जमाव जमला होता.
शिवाजीनगरातील महापालिकेच्या मोकळ्या जागेवर मंगळवारी दुपारी जेसीबी मशीनच्या साह्याने साफसफाईचे काम करण्यात येत होते. मैदानाजवळ असलेल्या विजेच्या खांबावर लावलेला झेंडा जुना झाल्यामुळे सफाई कामगारांनी तो काढून टाकला. यामुळे काही जणांच्या भावना दुखावल्या गेल्या. त्यांनी सायंकाळी या मैदानात ओटा बांधून त्यावर झेंडा लावला व त्यानंतर काही जणांनी दुचाकीवरून जाताना नगरसेवक जंजाळ यांच्या संपर्क कार्यालयावर दगडफेक केली. दगडफेकीत कार्यालयातील कर्मचारी विक्रांत हे किरकोळ जखमी झाले. दगडफेकीच्या घटनेची माहिती मिळाल्यावर जंजाळ घटनास्थळी दाखल झाले. दरम्यानच्या काळात शिवाजीनगरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते, नागरिक देखील मोठ्या संख्येने जमा झाले. या घटनेच्या संदर्भात बोलताना जंजाळ म्हणाले,‘ मराठा क्रांतिमोर्चात माझा सक्रिय सहभाग असल्याने काही जणांनी जाणीवपूर्वक हा प्रकार केला आहे. मी पोलिसात तक्रार देणार आहे, तपास नीट झाला नाही, तर आंदोलन करू. घडलेला सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे.’

पोलिस आयुक्त दाखल
या घटनेची माहिती मिळताच पोलिस आयुक्त अमितेश कुमार हे उपायुक्त संदीप आटोळे, सहाय्यक पोलिस आयुक्त खुशालचंद बाहेती यांच्यासह मोठा फौजफाटा घेऊन शिवाजीनगरात दाखल झाले. याचवेळी दुसऱ्या गटाने जवाहरनगर पोलिस स्टेशनसमोर जमा होत जंजाळ यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. रात्री उशीरापर्यंत हा जमाव पोलिस स्टेशनच्या समोर होता. दरम्यान पोलिस आयुक्तांनी शिवाजीनगर भागात पोलिस बंदोबस्त वाढवला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहरातील सहा तलाठी कार्यालयाचे विभाजन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
वाढती लोकसंख्या, तहसील कार्यालयातील कामाचा अतिरिक्त ताण हे लक्षात घेऊन शहरातील सहा तलाठी कार्यालयाचे विभाजन करून १२ सज्जांची निर्मिती करण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांची कामे जलदगतीने होण्यास मदत होणार आहे.
औरंगाबादची लोकसंख्या वाढत असून, त्याचा अतिरिक्त ताण तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्यावंर पडत आहे. त्यामुळे शहरासाठी अप्पर तहसील कार्यालयाची निर्मिती करण्यात आली. या कार्यालयात १३ पदे मंजूर केली आहेत. कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात चार मंडळे राहणार असून महसूल मंडळाच्या रचनेत बदल करण्यात आला आहे. पण, कामाचा अतिरिक्त ताण व व्याप यामुळे सहा तलाठी सज्जांचे विभाजन करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी डॉ. निधी पांडेय यांनी घेतला. २००६मध्ये महसूल प्रशासनातील क्षेत्रीय कार्यालयातील महसूल मंडळ व तलाठी यांचा नवीन आकृतीबंध लागू करण्यात आला आहे. त्यानुसार जिल्ह्यासाठी १४ तलाठी पदांची वाढ करण्यात आली आहे. त्यात औरंगाबाद तहसील कार्यालयाकरिता ६ नवीन तलाठी पदांची निर्मिती करण्यात आली आहे.
नवीन तलाठी सज्जे व समाविष्ट भाग पुढीलप्रमाणेः जाधववाडी (जाधववाडी, नानकवाडी), इटखेडा (इटखेडा, शहानूरवाडी), पदमपूरा (पदमपूरा, असोफबाग, बनेवाडी), पडेगाव (पडेगाव, रावसपुरा), नक्षत्रवाडी (नक्षत्रवाडी, तिसगाव), मुकुंदवाडी, (जसवंतपुरा, हत्तेसिंगपुरा).

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जीएसटी पुस्तिका आली मराठीत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

‘गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स अर्थात जीएसटीबद्दल इंग्रजीमध्ये अनेक पुस्त‌िका, लेख आहेत. मात्र, मराठीत स्वतंत्र अशी माहिती पुस्तिका उपलब्ध नव्हती. त्यामुळे ही पुस्तिका व्यापारीवर्गास फलदायी ठरेल,’ असा आशावाद केंद्रीय उत्पादन शुल्क आणि अबकारी कर विभागाचे अतिरिक्त आयुक्त दिनेश पांगारकर यांनी मंगळवारी व्यक्त केला.

जिल्हा व्यापारी महासंघ आणि औरंगाबाद मशिनरी डिलर्स असोसिएशन प्रायोजित ‘जीएसटी-माहिती पुस्तिके’चे प्रकाशन अदालत रोडवरील मनमंदिर येथे करण्यात आले. यावेळी पांगारकर बोलत होते. व्यासपीठावर विक्रीकर विभागाचे सहआयुक्त डी. एम. मुगळीकर, महासंघाचे अध्यक्ष अजय शहा, मासिआचे अध्यक्ष विजय लेकुरवाळे, लेखक सीए उमेश शर्मा यांची उपस्थिती होती. यावेळी पांगारकर म्हणाले, ‘जिल्हा महासंघाने ही जीएसटी पुस्तिका काढून खूप मोठे काम केले आहे. यातून तळागाळापर्यंतच्या लोकांना मराठीत कायद्याविषयी ज्ञानप्राप्त होईल. या कायद्याविषयी सातत्याने बदल होतील. तसे बदल पुस्तिकेही करण्यात यावेत,’ अशा सूचना पांगारकर यांनी केली.

यावेळी मुगळीकर म्हणाले, ‘या कराविषयी फार चर्चा आहे. तो कर येणार येणार म्हणून काही दिवसांपासून सातत्याने वाट पाहिली जात आहे. तो २०१७ ला निश्चितच येणार आहे. त्याचे रजिस्ट्रेशन औरंगाबादमध्ये सर्वाधिक झाले. त्यासाठी व्यापारीवर्गाने जो पुढाकार घेतला, त्यासाठी त्यांचे अभिनंदन करतो.’

उमेश शर्मा म्हणाले, ‘हे पुस्तक लिहिताना मी सीए म्हणून आव्हान स्वीकारले. आज दत्तजयंतीच्या मुहूर्तावर या पुस्तकाचे प्रकाशन होताना मला आनंद होत आहे. यात नक्कीच बदल करत राहू. मी नेहमी अध्यात्म‌िकता आणून हा क्लिष्ट विषय समजावून सांगण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे ही पुस्तिका लिहिताना खूप आव्हान वाटले.’ सूत्रसंचालन व आभार राजन हौजवाला यांनी व्यक्त केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बीडमधील गावाचा कायापालट करणार खा. सचिन

$
0
0

बीडः दुष्काळग्रस्त कऱ्हेवाडीचे (ता. आष्टी) रूपडे लवकरच बदलणार आहे. मास्टरब्लास्टर खासदार सचिन तेंडुलकर याने त्यासाठी आर्थिक मदत देऊ केली. जिल्ह्यातील दुष्काळीस्थितीची जिल्हा प्रशासनाकडून माहिती घेतल्यानंतर तेंडुलकरच्या स्वीय सहाय्यकाने प्रत्यक्ष पाहणी केली होती. कऱ्हेवाडी ग्रामस्थांशी चर्चा करून दुष्काळी झळाही जाणून घेतल्या. त्यानंतर तेंडुलकरने बीडचे जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांना पत्राद्वारे खासदारनिधीबाबत कळवले आहे.

कऱ्हेवाडीत पायाभूत सुविधा देणे तसेच, पाणी पातळी वाढण्यासाठीच्या खर्चाचे अंदाजपत्रक तयार करण्याचे सचिनने जिल्हा प्रशासनाला कळवले आहे. विकास कामासाठी सचिनसारखा पालक मिळाल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे. बीडच्या दुष्काळाची दखल घेऊन सचिनने स्वीय सहाय्यक नारायण कन्हान यांना फेब्रुवारी बीडमध्ये पाठवले होते. त्यांनी जिल्हा प्रशासनाच्या सहाय्याने आष्टी आणि पाटोदा तालुक्याला भेट दिली. पाटोदा तालुक्यातील कुसळंब आणि आष्टी तालुक्यातील कऱ्हेवाडी या दोन गावांना भेटी दिल्या. यावेळी पाणी, चारा, रोजगार, दळणवळण, रस्त्यांची उपलब्धता यांविषयी चर्चा केली. तसेच कुठल्या प्रकारची मदत दिली जावी याची माहिती कन्हान यांनी घेतली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उंदराने कुरतडल्या ६४ हजारांच्या नोटा!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, उस्मानाबाद

महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या दानपेटीत घुसलेल्या उंदराने भाविकांनी दिलेल्या ६४ हजार रुपयांच्या नोटा कुरतडल्या आहेत. दानपेटीत एकूण किती उंदीर घुसले, त्यांनी किती नोटा कुरतडल्या किंवा किती नोटा चालू शकतात, याची माहिती देण्यास संबंधितांनी नकार दिला आहे. प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे या नोटा कुरतडल्याने भाविकांतून संताप व्यक्त केला जात आहे.

देवीच्या साडेतीन पीठांपैकी मुख्य पीठ असलेल्या तुळजापूरच्या तुळजाभवानी देवीचे मंदिर विविध कारणांनी गाजत आहे. भाविकांनी दिलेल्या सोने आणि चांदीमध्ये मोठ्या प्रमाणात तूट आलेली असून, त्याची सीआयडीमार्फत चौकशी सुरू आहे. आता मंदिरातील दानपेटीत उंदीर घुसून भाविकांनी दिलेल्या ६४ हजाराच्या नोटा कुरतडल्या असल्याचे उघडकीस आले आहे. मंदिरातील गुप्तदान पेट्यातील रकमांची मोजदाद नुकतीच करण्यात आली होती. यात मंदिर परिसरातील विविध गुप्तदान पेट्यांतील रक्कम ५७ लाखांपेक्षा जास्त असल्याचे समोर आले. यापैकी मंदिरातील गाभाऱ्याच्या बाजूला असलेल्या स्नानगृहात ६४ हजाराच्या नोटा कुरतडल्याचे उघड झाले. तुळजाभवानी मंदिर रात्री बंद झाल्यावर तेथे केवळ जमादारखाण्यातील पोलिस आणि सुरक्षा रक्षक असतात. रात्री अकरा वाजल्यापासून सकाळपर्यंत मंदिराचा परिसर वर्दळमुक्त असतो. त्या कालावधीत उंदरांनी जेथून भाविक पैसे टाकतात तेथूनच प्रवेश केल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सावकारी पाश! शेतकऱ्याकडे सून-मुलीची मागणी

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त । बीड

गहाण जमीन सोडवण्यासाठी मुलगी आणि सूनेला माझ्याकडे पाठव, अशी मागणी सावकाराने बीडमधील धारुर तालुक्यातील शेतकऱ्याकडे केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शेतकऱ्यानं सावकारावर केलेल्या या गंभीर आरोपाची चौकशी सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.

शेतकऱ्यानं केलेल्या आरोपाची गंभीर दखल घेतली असून चौकशी सुरु आहे. आरोपात तथ्य आढळल्यास सावकाराविरोधात कडक कारवाई करण्यात येईल, असे पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर यांनी सांगितले. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनीही याप्रकरणाचा अहवाल मागविला आहे.

शेतकरी इंदर मुंडे यांनी सावकार भगवान बडे यांच्याकडे जमीन गहाण ठेवून कर्ज घेतले होते. कर्ज थकल्यामुळं सावकारानं जमिनीचा ताबा घेतला, अशी तक्रार शेतकरी मुंडे यांनी एप्रिलमध्ये पोलिसांकडे केली होती. त्यावर कोणतीही कारवाई झाली नाही. त्यानंतर सावकाराने गहाण जमीन सोडवण्यासाठी मुलगी आणि सूनेला पाठव, अशी मागणी केली, असा आरोप शेतकऱ्यानं केला आहे. या प्रकरणाची आम्ही चौकशी सुरु केली असून, योग्य कारवाई करण्यात येईल, असं आश्वासन पोलीस अधीक्षक पारस्कर यांनी दिलं आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पावसामुळे दिलासा; टँकर संख्येत घट

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
गेल्या आठवड्यात झालेल्या दमदार पावसाने औरंगाबाद जिल्ह्यातील जनतेला दिलासा मिळाला आहे. २९ जून रोजी जिल्ह्यातील ग्रामीण भागात ९५४ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत होता. मात्र दहा दिवसांत ही संख्या बऱ्यापैकी घसरली आहे. सध्या ६०० टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. हवामान खात्याने पुढच्या दोन दिवसांत पावसाची शक्यता वर्तविली आहे. त्यानुसार पाऊस झाला, तर टँकरची संख्या आणखी घटणार आहे.
भर उन्हाळ्यात जिल्ह्यातील १४ लाख नागरिकांना प्रशासनाकडून टँकरद्वारे पाणी दिले जात होते. गेल्या तीन वर्षांपासून पावसाचे प्रमाण कमी असल्याने पाणीटंचाई होती. यंदा मान्सूनने पहिल्या टप्प्यात हुलकावणी दिली. पण नंतर ठराविक कालावधीने पाऊस झाला. गेल्या आठवड्यात जिल्हाभरात समाधानकारक पाऊस झाल्याने कोरड्या साठ्यांमध्ये थोडेफार पाणी साचले. विहिरींनाही पाणी आले. त्यामुळे टँकरची संख्या घटली आहे. जूनच्या शेवटच्या आठवड्यात टँकरची संख्या ९५४ झाली होती. ७ जुलै रोजी ती घटून ६०१ झाली आहे. औरंगाबाद तालुक्यात ८०, गंगापूर १३४, कन्नड २३, खुलताबाद १४, पैठण १५४, फुलंब्री २९, सिल्लोड ४२, वैजापूर १२५.

सोयगाव टँकरमुक्त
सोयगाव तालुक्यात अन्य तालुक्यांच्या तुलनेत जोरदार पाऊस झाल्याने येथील टँकरची संख्या शून्य झाली आहे. मे महिन्यापर्यंत तालुक्यात पाणी उपलब्ध होते. उन्हाळा संपता संपता सोयगाव तालुक्यात टँकरने पाणीपुरवठा करण्याची वेळी आली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एसटी कॉलनीत वनौषधींचे रोपण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
वृक्षसंवर्धन सप्ताहानिमित्त एसटी कॉलनीतील महिलांनी औषधी गुणांच्या वनस्पतींचे रोपण केले. अडुळसा, कोरफड, तुळस, निर्गुडी, गुळवेल अशा औषधी गुणधर्माच्या वनस्पती परिसरात लावण्यात आल्या.
याप्रसंगी वैद्य अनघा नेवपूरकर यांनी औषधी वनस्पतींची सविस्तर माहिती सांगितली. नेवपूरकर म्हणाल्या, 'औषधी गुणधर्माच्या वनस्पती परिसरात लावल्याने आरोग्य समृद्ध राखता येते.'
विविध औषधी वनस्पतींचे फायदे त्यांनी समजून सांगितले. 'वडाचे झाडही महिलांच्या आरोग्यासाठी सर्वाधिक महत्त्वाचे ठरते. मुका मार लागल्यास वडाची पाने बांधल्याने सूज उतरते आणि आरामही मिळतो. निर्गुडीच्या पानांचा लेप सांधेदुखीवर उपयुक्त ठरतो. त्याचे इतर दुष्परिमाण होत नाहीत. कोरफडचा उपयोग त्वचारोग, केसांच्या समस्या, स्त्रियांचे आजार, शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी होतो, वजन नियंत्रणात राहते. गुळवेलचा काढा रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित करतो. हाडांना मजबूत ठेवतो. मधुमेहावर गुणकारक आहे, अशी माहिती त्यांनी दिली. यावेळी ८० महिलांना आरोग्यवर्धक वृक्षांचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमास पुष्पा गायकवाड, वर्षा गवारे, वंदना पोगुल यांची प्रमुख उपस्थिती होती. आहारतज्ज्ञ डॉ. अलका कर्णिक यांच्या निरामय डाएट व रिचर्स सेंटरतर्फे हा उपक्रम राबवण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विद्यापीठात ‘इनक्युबेशन सेंटर’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
मराठवाड्यातील तरुण संशोधक, प्राध्यापकांना मूलभूत व दर्जेदार संशोधनासाठी पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात जमनालाल बजाज इनक्युबेशन सेंटर उभारण्यात येणार आहे. कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांच्या हस्ते शुक्रवारी (८ जुलै) या सेंटरची पायाभरणी करण्यात आली.
सिफार्ट सभागृह परिसरात झालेल्या या कार्यक्रमासाठी प्रभारी कुलसचिव डॉ. दिगंबर नेटके, कार्यकारी अभियंता आर. डी. काळे, प्राचार्य डॉ. सर्जेराव ठोंबरे, डॉ. एम. डी. सिरसाठ, नलिनी चोपडे यांची प्रमुख उपस्थिती होती. या केंद्रातून मराठवाड्यातील तरुण संशोधक, प्राध्यापकांना मूलभूत व दर्जेदार संशोधनासाठी पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. संशोधन आणि विकास (आर अँड डी) या माध्यमातून नवीन उद्योजक घडावेत, यासाठी विद्यापीठ अर्थसंकल्पात २५ लाखांची तरतूद करण्यात आली आहे. नव्यानेच सुरू झालेल्या इलेक्ट्रॉनिक्स विभागात या तरुण संशोधकांना प्रयोगशाळा उपलब्ध करून देण्यात येणार असून, या प्रकल्पाचे उद्घाटन केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते २ ऑक्टोबर रोजी (महात्मा गांधी जयंती) करण्यात येईल, असेही कुलगुरुंनी पायाभरणी प्रसंगी सांगितले.या कार्यक्रमास डॉ. वाल्मिक सरवदे, डॉ. सतीश पाटील, उपअभियंता रमेश क्षीरसागर, संजय हुसे, विष्णू कव्हळे, डॉ. गोविंद हुंबे, शिरीष बर्वे, कंत्राटदार अरुण मापारी आदींची उपस्थिती होती.

उद्योगपती बजाज यांच्याकडून २५ कोटी
विद्यापीठात उभारण्यात येणाऱ्या इनक्युबेशन सेंटरसाठी प्रख्यात उद्योगपती राहुल बजाज २५ कोटी रुपये देणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली आहे. त्यातील दीड कोटीचा पहिला हप्ता विद्यापीठास प्राप्त झाला आहे, असे सांगण्यात आले.

'ग्रीन बिल्डिंग' उभारणार
जवळपास आठ हजार चौरस फूट जागेत इनक्युबेशन सेंटरची 'ग्रीन बिल्डिंग' उभारण्यात येणार अाहे. इमारतीमध्ये नैसर्गिक हवा, प्रकाश व अन्य घटक या असणार आहेत. पहिल्या मजल्यासाठी एक कोटी ५२ लाखांचा खर्च प्रस्तावित असून, विद्यापीठात अद्ययावत सोयी सुविधासह असलेली पहिलीच इमारत असेल, अशी माहिती अभियंता आर. डी. काळे यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फूड कॉर्नर ः पावसाच्या सरींसगे उस्मानभाईंची भजी

$
0
0

Shripad.kulkarni@timesgroup.com
भजी हा प्रत्येकाचा आवडता पदार्थ. पावसाला सुरुवात झाली की घरोघरी भजांची फर्माइश केली जाते. भजी करण्याची प्रत्येकाची पद्धतही वेगवेगळी असते. कुणी भजी करताना पिठात मसाले, जिरे, ओवा टाकतात. कुणी बटाटे, पालक यांचा वापर करतात. आळुच्या पानांचीही भजी केली जातात. कांदा भजे, पकोडे हे प्रकार बहुतेकांना आवडता. हरभरा डाळीच्या भजांप्रमाणे मूग डाळीचे भजेही अनेकांना आवडतात.
काही हॉटेल केवळ भज्यांसाठी प्रसिद्ध असतात. कोकणवाडीतील उस्मानभाईचे हॉटेलही त्यापैकीच एक. गेल्या सुमारे ४० वर्षांपासून उस्मानभाईंची भजी प्रसिद्ध आहेत. स्टेशन रोडवर अग्निशमन दलासमोर असलेल्या वडाच्या झाडाखाली त्यांची रोज गाडी उभी असे. गाडीभोवती दिवसभर खवय्यांची गर्दी असे. तेव्हापासून उस्मानभाईंची भजी प्रसिद्ध आहेत. पूर्वी स्टेशन रोडवर देवगिरी कॉलेजच्या विद्यार्थ्यांची गर्दी असे. उस्मानभाईंच्या भजांची गाडी हा विद्यार्थ्यांचा खास ठेपा होता. काही वर्षांपूर्वी कोकणवाडीतील जय टॉवर्समध्ये त्यांच्या हॉटेलचे स्थलांतर झाले.
भज्यांची गाडी सुरू करण्यापूर्वी उस्मानभाईंनी अनेक हॉटेलांत काम केले. 'अनेक ठिकाणी काम करताना विविध पदार्थ बनविणे शिकलो. त्यातून मोठा अनुभव मिळाला. या अनुभवाच्या जोरावर स्वतःचा व्यवसाय सुरू केला. भजांसाठी दर्जेदार आणि ताज माल वापरला जातो. भजांची चव आणि ते गरम सर्व्ह केले जातात. त्यामुळे भजी खवय्यांच्या पसंतीला उतरली आहेत,' असे उस्मानभाई सांगतात.
भज्यांसाठी चांगल्या दर्जाचा, ताजा माल वापरला जातो. हरभरा डाळीचे भरडा पीठ वापरले जाते. कांदा, हिरवी मिरची, मीठ मिसळून भज्याचे पीठ भिजविले जाते. पीठ भिजविण्यापूर्वीच कांदा, मिरच्या चिरल्या जातात. डाळीचे भरडा पीठ वापरल्यामुळे भजी खुसखुशीत होतात, असे ते सांगतात. गेल्या ४० वर्षांत त्यांच्या भज्यांची चव कायम आहे.
तळलेली मिरची आणि पाव यांच्यासोबत गरम भजी सर्व्ह केली जातात. ही भजी गरमगरम खाण्याची मजा काही औरच आहे. या खुसखुशीत भज्यांची चव दीर्घकाळ जिभेवर रेंगाळते. भजी खाण्यासाठी दिवसभर गर्दी असते. त्यात विद्यार्थी, तरुणांची संख्या मोठी आहे. भज्यांसाठी अनेकजण वेटिंगमध्ये असतात. खास उस्मानभाईंच्या हॉटेलातील भजे खाण्यासाठी शहरभरातून खवय्ये येतात.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बँक घोटाळा: धनंजय मुंडेंना फरार घोषित करणार

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त । मुंबई

बीड जिल्हा बँक घोटाळ्याप्रकरणी राष्ट्रवादीचे नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यासह बँकेच्या आजी-माजी संचालकांना लवकरच फरार घोषित करण्यात येणार आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. फरार घोषित करण्यात येणाऱ्या आजी-माजी संचालकांमध्ये आमदार अमरसिंह पंडित, खासदार रजनी पाटील, भाजप जिल्हाध्यक्ष रमेश पोकळे यांच्यासह तब्बल ९३ जणांचा समावेश आहे.

बीड जिल्हा बँकेतून विनातारण कर्ज मंजूर करणं, बेकायदा कर्ज वाटप करणं आदींसह वेगवेगळ्या १४ गुन्ह्यांमध्ये अनेक नेत्यांसह बँकेच्या आजी - माजी संचालकांवर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी जिल्हा न्यायदंडाधिकाऱ्यांकडे अखेर आरोप निश्चित करण्यात आले. आरोपपत्रात धनंजय मुंडे, खासदार रजनी पाटील यांच्यासह ९३ जणांची नावे आहेत. त्यांना अटक करण्यासाठी पोलिसांनी ठिकठिकाणी छापे टाकले. मात्र, एकही आरोपी पोलिसांच्या हाती लागला नाही. त्यामुळे सर्व आरोपींना लवकरच फरार घोषित करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images