Quantcast
Are you the publisher? Claim or contact us about this channel


Embed this content in your HTML

Search

Report adult content:

click to rate:

Account: (login)

More Channels


Showcase


Channel Catalog


Articles on this Page

(showing articles 1 to 25 of 25)
(showing articles 1 to 25 of 25)


Channel Description:

News from India by India number one website
  0 0

  \Bम. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद\B

  अवैधरित्या हॉटेलमध्ये विदेशी सिगारेटची विक्री करणाऱ्या हॉटेलचालकाविरुद्ध बेगमपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. बेगमपुरा पोलिसांनी बुधवारी रात्री साडेआठ वाजता रोजेबाग परिसरातील हॉटेल अंडरग्राऊंड स्नॅक अँड कॅफेटेरीयामध्ये ही कारवाई केली.

  बेगमपुरा पोलिस ठाण्याचे पीएसआय सय्यद सिद्दीकी आणि पथक बुधवारी रात्री रोजेबाग परिसरात गस्त घालीत होते. यावेळी त्यांना आझाद कॉलेजसमोरी हॉटेल अंडरग्राऊंड स्नॅक अँड कॅफेटेरियामध्ये वैधानिक इशारा नसलेल्या विदेशी सिगारेटची विक्री होत असल्याची माहिती मिळाली. या माहितीवरून या हॉटेलवर छापा टाकण्यात आला. यावेळी पोलिसांना मार्लबोरो, क्लासिक, गुदंग गरम, डनहिल आदी प्रकारच्या सिगारेटचा साठा आढळून आला. पोलिसांनी हॉटेलचालक सोहीलोद्दीन वाजीयोद्दीन सिद्दीकी (वय ४९ रा. एन बारा, रोजेबाग) याला ताब्यात घेत बेगमपुरा पेालिस ठाण्यात सिगारेट, तंबाखूजन्य पदार्थ विक्री प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला. ही कारवाई पोलिस निरीक्षक सचिन सानप यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय सय्यद सिद्दीकी, देवा सुर्यवंशी, जोशी, शेख, वसावे आणि मोढे आदींनी केली.

  मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


  0 0

  \Bम. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद\B

  पाच तोळ्याचे दागिने आणि रोख रक्कम घेत विवाहिता प्रियकरासोबत पसार झाली. १३ नोव्हेंबर रोजी बीड बायपास भागात हा प्रकार घडला. याप्रकरणी मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात विवाहिता आणि प्रियकराविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  या प्रकरणी एका हॉटेल कामगाराने तक्रार दाखल केली आहे. या कामगाराच्या पत्नीचा अनमोल उर्फ गोट्या अनिल सवई नावाच्या तरुणासोबत प्रेमसबंध होते. अनमोल हा नेहमी या कामगाराच्या घरी येणे-जाणे करीत होता. या प्रकरणाची माहिती नुकतीच कामगार पतीला माहित झाली होती. दरम्यान १३ नोव्हेंबर रोजी त्याची पत्नी आणि अनमोल यांनी घरातून पाच तोळ्याचे सोन्याचे दागिने आणि रोख साठ हजार रुपये घेऊन पोबारा केला. या प्रकरणी कामगाराने बुधवारी मुकुंदवाडी पोलिस ठाणे गाठून दोघांविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पोलिस नाईक हगवणे तपास करीत आहे.

  मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


  0 0

  \Bम. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद\B

  गुन्हे शाखेने उघडकीस आणलेल्या सेक्स रॅकेटमध्ये आणखी एका आरोपीला गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. मनोज गोविंद जाधव (वय ४०, रा. दहिहंडे गल्ली, चिकलठाणा) असे आरोपीचे नाव आहे. मनोज हा ग्राहकांसाठी तरुणी पुरवत असल्याची माहिती समोर आली आहे.

  गुन्हे शाखेच्या पथकाने शनिवारी बीड बायपास भागातील राजेशनगर येथे एका घरावर छापा टाकला. यावेळी या ठिकाणी सुरू असलेले सेक्स रॅकेट पोलिसांनी उघडकीस आणले. या ठिकाणी रॅकेट चालवणाऱ्या आंटीसह आरोपी संजय त्र्यंबक कापसे, तीन पीडित महिला आणि ग्राहक मोहम्मद अर्शद साजिद अली, अजय सुभाष साळवे, ज्ञानेश्वर सर्जेराव जऱ्हाड आणि अमोल दामू शेजूळ यांना अटक केली. तपासामध्ये या ग्राहकांना आणि रॅकेटमध्ये तरुणी पुरवण्याचे काम आरोपी मनोज करीत असल्याचे समोर आले आहे. एका ग्राहकाच्या चॅटींगवरून हा प्रकार लक्षात आला. पोलिसांनी आरोपी मनोज जाधवला अटक केली आहे. ही कारवाई डॉ. नागनाथ कोडे, पोलिस निरीक्षक मधुकर सावंत, एपीआय मनोज शिंदे, भगवान शिलोटे, विलास वाघ, संजय खोसरे, अप्पासाहेब खिल्लारी, विशाल पाटील आदींनी केली.

  मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


  0 0

  \Bम. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

  \Bबीड बायपास रोडवरील दोन कुंटणखान्यांवर शनिवारी (७ डिसेंबर) छापा मारून प्रत्येकी चार दलाल व ग्राहकांना यापूर्वी पकडण्यात आले होते. आता याच प्रकरणात दलालांना ग्राहक पुरवणारा एजंट मनोज गोविंद जाधव याला बुधवारी (११ डिसेंबर) रात्री अटक केली. गुरुवारी न्यायालयात हजर केले असता, शुक्रवारपर्यंत (१३ डिसेंबर) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी ए. जे. पाटील यांनी दिले. प्रकरणात यापूर्वी अटक करण्यात आलेल्या चार दलालांनाही न्यायालयाने शुक्रवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

  बीड बायपास रोडवरील राजेशनगर व यशवंतनगर भागात कुंटणखाना सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्याआधारे पोलिसांनी दुपारी तीनच्या सुमारास छापा मारून राजेशनगर व यशवंतनगरातील दोन वेगवेगळ्या घरांमध्ये कोलकाता व हैदराबाद येथील तीन महिला व गारखेडा परिसरातील एका महिलेला ताब्यात घेण्यात आले होते. तसेच चार दलाल व चार ग्राहकांनाही अटक करण्यात आली होती. छाप्यात पोलिसांनी दारुसह इतर साहित्य, असा सुमारे एक लाख ७४ हजार ७०५ रुपयांचा ऐवज जप्त केला होता. पोलिस कोठडीदरम्यान अटकेत असलेल्या दलालांनी आरोपी मनोज जाधव (४०, रा. दहीहंडे गल्ली, चिकलठाणा) हा ग्राहक आणत असल्याची माहिती पोलिसांना दिली. एका मॉलचा अधिकारी मोहम्मद अर्शद व अमोल शेजूळ या दोघा ग्राहकांनाही मनोजनेच आणल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर मनोजला अटक करून त्याच्या ताब्यातून एक मोबाइल जप्त करण्यात आला आहे. त्याला न्यायालयात हजर करण्यात आले असता, मनोज हा ग्राहकांना पीडितांचे फोटो पाठवत होता, हे तपासात निष्पन्न झाले असून त्याने आतापर्यंत किती ग्राहकांना किती पीडितांचे फोटो पाठवले, याचा तपास करणे बाकी आहे. मनोजसोबत आणखी काही एजंट काम करीत असून त्यांनाही अटक करावयाची आहे. त्याचवेळी पीडित महिलांना कुंटणखान्यात आणण्यात मनोजचा सहभाग आहे का, याचाही तपास करावयाचा असल्याने आरोपीला पोलिस कोठडी देण्याची विनंती न्यायालयात करण्यात आली होती. ही विनंती मान्य करुन न्यायालयाने आरोपीला शुक्रवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

  मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


  0 0

  \B…म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

  \Bपोलिस दलात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सकारात्मक विचार कसे करावे, तणावातही मानसिक संतुलन कसे योग्य ठेवावे याचे मार्गदर्शन करण्यासाठी कार्यशाळा आयोजित करण्यात आली. या कार्यशाळेत त्यांना तणावमुक्तीची गुरुकिल्ली मिळाली.

  ग्रामीण पोलिस अधीक्षक कार्यालयातील अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी पोलिस अधीक्षक मोक्षदा पाटील यांच्या संकल्पेतून ही दोनदिवसीय कार्यशाळा एडेलविस कंपनीच्या सहभागातून एमजीएम कॉलेजच्या दयोतन हॉलमध्ये घेण्यात आली. कार्यशाळेला केतन गावंड यांनी मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी सकारात्मक वृत्तीतून आनंदी राहणे, सामाजिक, कौटुंबिक व व्यावसायिक दृष्टिकोनातून कसा बदल घडवता येईल यासाठी विविध विचारवंत व वैज्ञानिकांची उदाहरणे दिली. दैनंदिन जीवनातील प्रसंग सांगून आनंदी कसे राहावे, याचे मार्गदर्शन केले. वरिष्ठांनी दिलेले आदेश कर्मचाऱ्यांपर्यंत पोहचले की नाही हे समजाविण्यासाठी गावंड यांनी हत्ती धुण्याचा प्रसंग अधिकारी, कर्मचारी यांच्याकडून साभिनय करून घेतला. आरोग्य चांगले राहण्यासाठी ध्यान, योग याचे महत्व समजावून सांगितले. ही कार्यशाळा संपल्यानंतर आनंदी व उत्साही होते. अशी कार्यशाळा यापूर्वी अनुभवली नसल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले. कार्यशाळेमध्ये ९२ अधिकारी उपस्थित होते.

  मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


  0 0

  \Bम. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद\B

  राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा वाढदिवस गुरुवारी शहरात ठिकठिकाणी रक्तदान, सर्वरोग निदान शिबिराचे आयोजन करून उत्साहात साजरा करण्यात आला.

  शहर अध्यक्ष विजय साळवे व कार्याध्यक्ष अभिषेक देशमुख यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी भवन हडको येथे सकाळी दहा वाजून दहा मिनिटांनी केक कापण्यात आला. यावेळी आत्महत्याग्रस्त परिवारातील सक्षम महिलांचा सन्मान केला. ११ वाजता अयोध्यानगर येथे रक्तदान शिबिर घेण्यात आले. साडेअकरा वाजता मुकुंदवाडी येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ वृक्षारोपण करण्यात आले. दुपारी १२ वाजता इंदिरानगर प्रियदर्शिनी कॉलनी येथे आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले. दुपारी साडेबारा वाजता हनुमान नगर येथील चौकामध्येही आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले. संध्याकाळी मुकुंदवाडी येथे केक कापून फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. यासह शहरात स्वच्छता शिबिराचेही आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रसिद्धी प्रमुख अवधूत शिंदे, महिला शहराध्यक्षा मेहराज पटेल, कार्याध्यक्षा प्रतिभा वैद्य, मोतीलाल जगताप, पूर्व विधानसभा अध्यक्ष बाळासाहेब हरबक पाटील, कार्याध्यक्ष अय्युब खान, पश्चिम अध्यक्ष राहुल शिंदे, अशफाक खान, दत्ता भारती, प्रभाकर भोसले, शहर उपाध्यक्ष अय्युब खान यांची उपस्थिती होती.

  'देविगरी'त १७१ जणांचे रक्तदान

  मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित देवगिरी महाविद्यालय, शिवछत्रपती महाविद्यालय, देवगिरी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अॅण्ड मॅनेजमेंट स्टडीज, देवगिरी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अॅण्ड मॅनेजमेंट स्टडीज, जयप्रकाश नारायण अध्यापक महाविद्यालय आणि एच.डी.एफ.सी. बँक लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त देवगिरी महाविद्यालयात रक्तदान शिबिर घेण्यात आले. यावे‌ळी अशा १७१ जणांनी रक्तदान केले. शिबिराचे उद्घाटन द्वारकाभाऊ पाथ्रीकर यांनी केले. यावेळी पंडितराव हर्षे, शेख सलीम, त्र्यंबकराव पाथ्रीकर, प्रदीप चव्हाण, प्राचार्य शिवाजीराव थोरे, संचालक उल्हास शिऊरकर, प्राचार्य भास्करराव जाधव, प्राचार्य संदीप धिरडे आदींची उपस्थिती होती.

  \Bपोलिस कर्मचाऱ्यांना मास्क वाटप

  \Bदिवसरात्र वाहनांची वर्दळ असलेल्या रस्त्यावर उभे राहून कर्तव्य बजावणाऱ्या वाहतूक पोलिसांना शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त मास्कचे वाटप करण्यात आले. यावेळी महानुभाव आश्रम, एमआयटी कॉलेज, संग्रामनगर, शाहनूर मियाँ दर्गा चौक, क्रांती चौक, महर्षी दयानंद चौक, आकाशवाणी चौक, सिडको बसस्थानक, हायकोर्ट, सेव्हन हिल्स् व देवळाई चौक येथे कर्तव्यावर असलेल्या वाहतूक पोलिसांना हकीम पटेल व उमेश भोसले यांनी मास्कचे वाटप केले.

  \Bपर्यावरण संवर्धन कार्यक्रम

  \Bराष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहर उपाध्यक्ष विक्की चावरिया यांच्या वतिने गांधीनगर, रविवार बाजार येथे भव्य सर्वरोगनिदान आरोग्य शिबिर व पर्यावरण संवर्धन कार्यक्रम स्वच्छता अभियान राबवण्यात आले. यावेळी गरजूंना मोफत चष्मे, औषधी वाटण्यात आली. शिबिराचा २५७ जणांनी लाभ घेतला. एमजीएम तसेच ऑप्टेक नेत्ररुग्णालयाच्या तज्ज्ञ डॉक्टरांकडून नागरिकांची तपासणी केली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी किरण चावरिया, अर्जुन लव्हेरा, जगदीश सारवान, अजय कागडा व इतर पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.

  मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


  0 0

  \Bम. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद\B

  वैजापूर तालुक्यातील ४८ वर्षीय महिला रुग्णाची मेंदूची अँजिओप्लास्टी मांडीतून करणे शक्य नसल्याचे लक्षात आल्यानंतर हातातून करण्यात आली. त्यामुळे संबंधित महिलेला वारंवार येणारे पक्षाघाताचे अटॅक बंद झाले, अशी माहिती ओरीऑन सिटीकेअर हॉस्पिटलचे न्युरोलॉजिस्ट डॉ. पांडुरंग वट्टमवार यांनी गुरुवारी (१२ डिसेंबर) पत्रकार परिषदेत दिली.

  मेंदूला कमी-अनियंत्रित पद्धतीने रक्तपुरवठा झाल्यास किंवा मेंदूमध्ये रक्तस्त्राव झाल्यास पक्षाघाताचा अटॅक येतो. अशा केसेसमध्ये अटॅकनंतर साडेचार तासांत रुग्णाला विशिष्ठ प्रकारचे इंजेक्शन्स दिले जातात किंवा हृदयाप्रमाणेच मेंदूची अँजिओप्लास्टी केली जाते. अशा प्रकारच्या अँजिओप्लास्टी आता शहरात होत आहेत. वैजापूर तालुक्यातील ४८ वर्षीय महिलेची मेंदूची अँजिओप्लास्टी हातातून (रेडियल) करून महिलेला वारंवार येणाऱ्या पक्षाघाताच्या अटॅकपासून मुक्त करण्यात आले. त्यानंतर संबंधित महिलेच्या प्रकृतीमध्ये आमुलाग्र सुधारणा झाली आहे, असेही डॉ. वट्टमवार यांनी सांगितले. मुंबईवगळता उर्वरित महाराष्ट्रात पहिल्यांदाच हातातून मेंदुची अँजिओप्लास्टी झाली आहे, असेही ते म्हणाले. हातातून अँजिओप्लास्टी केल्यास रक्तस्त्राव कमी होतो, गुंतागुंत होण्याची शक्यताही कमी होते, असे हॉस्पिटलचे सीएमडी व हृदयरोगतज्ज्ञ डॉ. आशिष देशपांडे म्हणाले. पत्रकार परिषदेला न्युरोलॉजीस्ट डॉ. राहुल वहाटुळे, ईएनटी विभाप्रमुख डॉ. प्रवीण सोनवतीकर, डॉ. योगेश वरगंटवार, डॉ. योगेश देवगिरीकर, डॉ. राजकुमार ढोबळे, डॉ. शैलेंद्र देशमुख आदींची उपस्थिती होती.

  मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


  0 0

  \Bम. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

  \Bएक महिला खुलताबाद पोलिस ठाण्यात छेडछाडीची तक्रार देण्यासाठी गेली असता, पोलिसांनी तिच्याकडून फक्त अर्ज लिहून घेत बसस्थानकावर सोडून आणि चक्क बसमध्ये घरी पाठवून दिल्याचा प्रकार घडला. पोलिस अक्षीक्षक मोक्षदा पाटील यांनी केलेल्या स्टिंग ऑपरेशनमध्ये हे उघड झाले असून, याप्रकरणी ठाणे अंमदाराला पाच हजारांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

  पोलिस ठाण्यात तक्रारदाराला काय वागणूक मिळते हे तपासण्यासाठी मोक्षदा पाटील यांनी पाच ठाण्यात डमी तक्रारदार पाठवत स्टिंग ऑपरेशन केले. यामध्ये सिल्लोड शहर, गंगापूर, पैठण, वीरगाव आणि खुलताबाद पोलिस ठाण्याचा समावेश होता. या ठाण्यांमध्ये मोबाइल चोरीला गेला आहे, अशी तक्रार घेऊन तक्रारदाराला पाठविले. यापैकी सिल्लोड आणि गंगापूर पोलिस ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी तत्काळ गुन्हा दाखल केला. तर पैठण पोलिस ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी आएमईआय क्रमांक घेऊन तत्काळ सायबर पोलिस ठाण्याला कळवले. वीरगाव पोलिस ठाण्यातील कर्मचाऱ्याने फक्त तक्रार अर्ज ठेवून घेत कोणतीही कारवाई नाही. खुलताबाद पोलिस ठाण्यात महिला तक्रारदाराला पाठविले. या महिलेने खुलताबाद बसस्थानकावर आपली छेडछाड झाल्याची माहिती देत तक्रार दाखल करण्याची विनंती केली. यावेळी सबंधित ठाणे अमंलदाराने तिची तक्रार न घेता या महिलेला स्वत:च्या हस्ताक्षरात तक्रार अर्ज देण्यास सांगितले. हा अर्ज ठाणे अमंलदाराने ठेवून घेतला. आम्ही चौकशी करू. तुम्हाला काही होणार नाही, असे सांगत गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केली. महिलेने वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या भेटीची मागणी केली असता छोट्या-छोट्या तक्रारी कशाला साहेबांना सांगता, आम्ही पाहून घेऊ, तुम्ही घरी जा असे सांगत पोलिस ठाण्याच्या जिपमध्ये बसवून बसस्थानकावर सोडून बसमध्ये बसवून दिले. पोलिस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली. वीरगावचे ठाणे अमंलदार रावसाहेब रावते आणि खुलताबादच्या ठाणे अमंलदार उज्वला जाधव यांना पाच हजार रुपये दंड ठोठावत तंबी देण्यात आली असून लेखी खुलासा मागविला आहे.

  \Bयांचा केला गौरव

  \Bस्टिंग ऑपरेशनमध्ये उत्कृष्ट कर्तव्य बजावल्याबद्दल सिल्लोडचे ठाणे अमंलदार सुभाष आहेर, गंगापूरचे शिवशंकर राजपूत तसेच पोलिस निरीक्षक मच्छिंद्र सुरवसे यांचे कौतुक अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी केले असून त्यांना बक्षिसाने गौरवण्यात आले.

  मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


  0 0

  म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

  औरंगाबाद शहरासाठीच्या नवीन पाणी पुरवठा योजनेसाठी काढण्यात आलेली निविदा थांबवायची की निविदेला पुन्हा मुदतवाढ द्यायची याबद्दल महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने राज्य शासनाकडे मार्गदर्शन मागविले आहे. कार्यारंभ आदेश देण्याला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्थगिती दिली आहे. त्यामुळे पाणी पुरवठा योजनेबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याचे बोलले जात आहे.

  औरंगाबाद शहराच्या नवीन वाढीव पाणी पुरवठा योजनेला माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंजुरी दिली आहे. १६८० कोटींची ही योजना असून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने १३०१ कोटींची निविदा काढली आहे. दरम्यानच्या काळात राज्यात सत्ता बदल झाल्यामुळे मुख्यमंत्रीपदावरून फडणवीस यांना पायउतार व्हावे लागले. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आणि काम सुरू केले. ज्या शासकीय योजनांचे कार्यारंभ आदेश अद्याप देण्यात आलेले नाहीत त्या योजनांच्या कार्यारंभ आदेश देण्याला ठाकरे यांनी स्थगिती दिली आहे. त्यामुळे औरंगाबाद शहरासाठीच्या पाणी पुरवठा योजनेबद्दल संभ्रम निर्माण झाला आहे. या संभ्रमाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांनी मुख्यमंत्र्याची मुंबईत जावून भेट घेतली व पाणी पुरवठा योजनेला राज्य शासनाने स्थगिती दिली नाही, असे स्पष्ट केले.

  या घटनाघडामोडींच्या नंतर 'मटा' ने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अधिक्षक अभियंता अजय सिंह यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, सरकारने कार्यारंभ आदेश देण्यास स्थगिती दिली आहे, निविदा प्रक्रियेला स्थगिती देण्यात आलेली नाही. निविदा स्वीकारण्याची शेवटची तारीख २२ डिसेंबर आहे. प्राप्त झालेल्या निविदा या तारखेच्या नंतर उघडाव्या लागणार आहेत. निविदा उघडल्यावर पुढची प्रक्रिया करून पात्र निविदाधारकाला कार्यारंभ आदेश द्यावे लागणार आहेत. त्यामुळे कार्यारंभ आदेश देण्यासाठीची स्थगिती उठेपर्यंत निविदांबद्दल काय करायचे असे मार्गदर्शन राज्य शासनाकडून मागवले आहे. कार्यारंभ आदेशावरची स्थगिती उठवण्याचा निर्णय होईपर्यंत निविदा स्वीकारण्याची मुदत वाढवावी अशी शिफारस देखील राज्य शासनाला करण्यात आली आहे, असे अजय सिंह म्हणाले. निविदा सादर करण्यासाठीची मुदत पंधरा ते वीस दिवसांनी वाढवावी, असे आपल्याला वाटते, असा उल्लेख त्यांनी केला.

  मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


  0 0

  म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

  शासनाकडून निधी मिळण्याच्या अटीच्या आधीन राहून २५० कोटींच्या रस्त्यांच्या कामांची निविदा काढा, अशी सूचना महापौर नंदकुमार घोडेले यांनी महापालिकेचे आयुक्त आस्तिक कुमार पाण्डेय यांना गुरुवारी केली. रस्त्यांच्या कामांबद्दल सर्वसाधारण सभेत झालेला ठराव द्या, मी योग्य तो निर्णय घेतो, असे आश्वासन आयुक्तांनी महापौरांना दिले.

  महापालिकेच्या १३ जून २०१९ रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेत २५० कोटींच्या रस्त्यांबद्दल ठराव घेण्यात आला होता. त्यात २२५ कोटींचे रस्ते, २५ कोटी रुपये रोड फर्निचरसाठी शासनाने द्यावेत, असा उल्लेख करण्यात आला. २२५ कोटींमधून १०४ रस्त्यांची कामे रस्त्यांची कामे करण्यात यावीत, असेही ठरावात नमूद करण्यात आले आहे. रस्त्यांची यादी देखील ठरावात आहे. सर्वसाधारण सभेने मंजूर केलेला ठराव महापौर व पदाधिकाऱ्यांनी शासनाला पाठवला. त्याशिवाय १७ कोटींचा देखील एक ठराव शासनाला पाठवण्यात आला आहे. १७ कोटींमधून नऊ रस्त्यांची कामे करण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. त्यामुळे रस्त्यांच्या कामांचा ठराव एकूण २६७ कोटींचा झाला असून त्यातून ११३ रस्त्यांची कामे केली जातील, असे ठरावात नमूद करण्यात आले आहे.

  शासनाकडे ठराव पाठवला आहे. तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी रस्त्यांच्या कामासाठी पैसे देण्याचे आश्वासन दिले होते. सध्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे औरंगाबाद शहरावर प्रेम आहे. ते निश्चितपणे रस्त्यांच्या कामांसाठी निधी देतील, तशी विनंती आम्ही त्यांना केली आहे. त्यामुळे शासनाचा निधी मिळेल याच्या आधीन राहून रस्त्यांच्या कामांची निविदा काढा, असे आयुक्तांना सांगितल्याचे महापौर नंदकुमार घोडेले म्हणाले. रस्ते कामाच्या संदर्भात सर्वसाधारण सभेने केलेल्या ठरावाची प्रत पाठवा, योग्य तो निर्णय घेऊ, असे आयुक्त म्हणाल्याचा उल्लेख महापौरांनी केला.

  मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


  0 0

  \Bम. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद\B

  डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांच्या नियुक्त्या वादात सापडल्या आहेत. आरक्षण धोरणाचे उल्लंघन करून नियुक्त्या केल्याची तक्रार अनुसूचित जाती-जमाती आयोगाकडे करण्यात आली.

  विद्यापीठाच्या नियुक्त्या आणि नेमणुकांचा आढावा घेण्यासाठी राज्याचे अनुसूचित जाती-जमाती आयोगाचे सदस्य आले होते. या आयोगाने विविध नियुक्त्यांची चौकशी केली. यावेळी नुकत्याच करण्यात आलेल्या 'सीएचबी' नियुक्त्यांची तक्रार करण्यात आली. 'सीएचबी' शिक्षकांच्या नियुक्त्या आरक्षण धोरणाचे उल्लंघन करणाऱ्या आहेत. विद्यापीठाने 'सीएचबी' नियुक्तीसाठी दिलेल्या जाहिरातीत नमूद आरक्षण मूळ रिक्त पदांच्या आरक्षणानुसार दिलेले नाही. विद्यापीठाने मूळ आरक्षित पदाचा विचार न करताच भरती केली आहे. काही विषयांमध्ये आरक्षित पदासाठी पात्र उमेदवारांनी अर्ज करून मुलाखतही दिली होती. अनेक मागास प्रवर्गातील उपलब्ध जागा पात्र व्यक्तीच्या मुलाखती घेऊन 'नॉट सुटेबल' शेरा मारत रिक्त ठेवल्या आहेत, असे तक्रारदार हनुमंत गुट्टे आणि अॅड. शिरीष कांबळे यांनी निवेदनात म्हटले आहे. जाहिरातीत तासिकेचे मानधन जाहीर केलेले नाही. त्यामुळे ही भरती बेकायदेशीर आसून आरक्षण धोरणाचे उल्लंघन करण्यात आले आहे. ही भरती तात्काळ रद्द करावी, असे निवेदन अनुसूचित जाती-जमाती आयोगाला देण्यात आले.

  मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


  0 0

  \Bम. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

  \B'भैय्यासाहेबांचे जीवन चरित्र तरुणांसाठी प्रेरणादायी आहे. त्यांच्या परिश्रमामुळे आंबेडकरी चळवळीला गती मिळाली. भैय्यासाहेबांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आजच्या तरुणांनी वाटचाल केल्यास स्वाभिमानी कार्यकर्त्यांची मजबूत फळी निर्माण होऊन आंबेडकरी चळवळीला गतवैभव मिळेल,' असे ज्येष्ठ नेते श्रावण गायकवाड यांनी व्यक्त केले.

  भडकल गेट येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सुपुत्र सूर्यपुत्र भैय्यासाहेब तथा यशवंतराव आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त भडकल गेट येथे पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे आजी माजी विद्यार्थी, आंबेडकरी कार्यकर्ते व रिपब्लिकन विद्यार्थी सेनेच्या वतीने अभिवादन करण्यात आले. या प्रसंगी जेष्ठ नेते श्रावण गायकवाड म्हणाले, ' भैय्यासाहेबांनी स्वत:ला नेतृत्वाच्या स्पर्धेपासून दूर ठेवले. निष्ठेने बाबासाहेबांचे कार्य पुढे नेले. रिपब्लिकन ऐक्यासाठी सर्वार्थाने प्रयत्न केले.' दिनकर ओंकार म्हणाले, 'भैय्यासाहेबांनी कधीही बाबासाहेबांच्या नावाचा वापर केला नाही. आपल्या साधेपणातून त्यांनी आपल्या कार्याची ओळख जगाला करून दिली. चैत्यभूमी येथील बाबासाहेबांचे स्मारक, रिपब्लिकन ऐक्य, बौद्ध हक्क अधिकारासाठी केलेले आंदोलन, धर्मांतरासाठी देशभर घेतलेल्या परिषदा यातून धम्म चळवळीला गती दिली. बाबासाहेबांच्या संकल्पनेतील बौद्धमय भारत निर्मितीच्या ध्येयामुळे त्यांनी राजकीय कामापेक्षा धम्म चळवळीचा प्रचार प्रसार केला.' यावेळी जेष्ठ नेते रतनकुमार पंडागळे, रूपचंद गाडेकर, डॉ. अरुण शिरसाठ, गुल्लू वाकेकर, डॉ. संदीप जाधव, सचिन निकम, प्रकाश इंगळे, पवन पवार, अरविंद कांबळे उपस्थित होते.

  ………

  मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


  0 0

  म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

  हिवाळ्यात थंडी कधी पडते अशी वाट पाहत असताना औरंगाबाद शहरासह परिसरातील नागरिकांना गुरुवारी (१२ डिसेंबर) चक्क पावसाच्या सरींनी चिंब केले. संध्याकाळी साडेआठ वाजता सुरू झालेल्या जोरदार पावसाने शहराला झोडपून काढले. शहराच्या काही भागात रिमझिम तर काही भागात मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला. या अवकाळी पावसाने नागरिकांची मात्र तारांबळ उडाली.

  गुरुवारी सकाळी कडक उन तर दुपारी अवकाशात ढगांची झालर पसरली होती. संध्याकाळी पाच वाजता शहरात रिमझिम पावसाला सुरुवात झाली. तासाभरानंतर पाऊस थांबला. मात्र, संध्याकाळी साडेआठ वाजता शहरात दमदार पावसाला सुरुवात झाली. अर्धा तास शहरात जोरदार पाऊस कोसळत होता. शहरातील सातारा परिसर व विद्यापीठ परिसरासह संपूर्ण शहरामध्ये रात्री पावसाचा जोर होता. सिडको, हडको, गुलमंडी, क्रांतीचौक, बेगमपुरासह जुन्या शहरातील बहुतांश भागामध्ये रिमझिम पावसानंतर रात्री जोरदार पाऊस झाला. औरंगाबाद शहरासह परिसरातही पावसाने हजेरी लावली. यामध्ये शिऊर, घाटनांद्रा, चितेगाव, वाळूज, लिंबेजळगाव, पैठण, पंढरपूर, खुलताबाद, सिल्लेगाव, दौलताबाद परसिरामध्ये पाऊस झाला.

  क्यार व महा चक्रीवादळामुळे निर्माण झालेल्या स्थितीमुळे राज्यात नोव्हेंबरमध्ये पावसाने झोडपून काढले होते. त्या पावसामुळे शेतीमध्ये चिखल झाला होता, आताच कुठे शेतकरी रबीची पेरणी करण्यासाठी शेतीमध्ये उतरले होते, पुन्हा पावसाच्या हजेरीमुळे शेतकरी वर्गामध्ये चिंतेचे वातावरण आहे.

  मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


  0 0

  आयुक्तांचा संकल्प

  म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

  ऐतिहासिक औरंगाबाद शहराचे वैभव वाढवण्यासाठी पॅरीसच्या धर्तीवर हेरिटेज सर्कीट तयार करण्याचा संकल्प गुरुवारी महापालिकेचे आयुक्त आस्तिक कुमार पाण्डेय यांनी केला. लवकरच या संदर्भात ते ठोस निर्णय जाहीर करण्याची शक्यता आहे.

  रोशनगेट आणि कटकटगेट भागात पाहणी करताना आयुक्तांना ऐतिहासिक दरवाजे दिसले. या दरवाजांनी त्यांना भुरळ घातली. पॅरीसमध्ये अलेक्झांडर गेट प्रसिद्ध आहे. त्याच पद्धतीने औरंगाबाद शहरातील ऐतिहासिक दरवाजांचे सुशोभीकरण करण्याची कल्पना त्यांनी सोबत असलेल्या अधिकाऱ्यांसमोर मांडली. प्रत्येक दरवाजाचा कलर कोड ठरवला जाईल. शहरात येणाऱ्या पर्यटकांपर्यंत कलर कोड पोहचावा या दृष्टीने प्रयत्न करू, असे त्यांनी अधिकाऱ्यांना सांगितले.

  कटकटगेटजवळ एका टपरी वजा हॉटेलमध्ये तेथील कर्मचारी नान तयार करीत होता. आस्तिक कुमार पाण्डेय यांनी काही वेळ तेथे उभे राहून नान तयार करण्याची पद्धत समजवून घेतली. नान कशी तयार करतात, एक नान तयार करण्यासाठी किती वेळ लागतो, त्यासाठी साहित्य कोणते वापरले जाते याची त्यांनी चौकशी केली. नान तयार करायला त्यांनी त्या कर्मचाऱ्याला सांगितले. औरंगाबाद शहरात बाहेरून येणाऱ्या पर्यटकांसाठी 'फूड सफारी' करू असे ते म्हणाले. औरंगाबाद शहरात कोणत्या भागात खाण्यासाठी चांगले काय मिळते याचे अॅप तयार करून तो पर्यटकांसाठी उपलब्ध करून देण्याची भूमिका त्यांनी मांडली.

  मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


  0 0

  \Bम. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

  \Bमहापालिका निवडणूक प्रभागरचनेनुसारच होणार आहे. याबाबत आरक्षण सोडत बुधवारी (१८ डिसेंबर) आणि शुक्रवारी (२० डिसेंबर) प्रभागरचनेच्या प्रारूप आराखड्याची अधिसूचना शासनाच्या राजपत्रात प्रसिद्ध केली जाणार आहे.

  पालिकेची निवडणूक प्रभाग पद्धतीनेच होणार असे पत्र राज्य निवडणूक आयोगाने महापालिका आयुक्तांना ३० नोव्हेंबर रोजी दिले होते. त्यानुसार पालिका प्रशासन प्रभागरचना करण्यात गुंतून गेले. प्रभागरचना सुरू असताना पूर्वीप्रमाणे वॉर्ड पद्धतीनेच निवडणूक होईल अशी चर्चा राजकीय वर्तुळात होत होती. सोशल मीडियावर प्रभागरचनेचे नियोजन व्हायरल केले जात होते. त्यामुळे प्रभागरचनेबद्दल उलटसुलट चर्चा देखील सुरू झाल्या होत्या. निवडणूक आयोगाच्या माध्यमातून अधिकृतपणे प्रभागरचनेचा आराखडा जाहीर होईल, असे स्पष्ट करण्यात आले होते. महापालिका आयुक्तांनी गुरुवारी औरंगाबाद महापालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीकरता अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती महिला, नागरिकांचा मागास प्रवर्ग, नागरिकांच्या मागास प्रवर्गातील महिला, सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षण निश्चित करण्यासाठी सोडत काढण्यात येणार आहे. आरक्षणाची सोडत बुधवारी सकाळी अकरा वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नाट्यगृहात काढण्यात येणार आहे. त्यानंतर शुक्रवारी प्रारुप प्रभागरचनेची अधिसूचना शासन राजपत्रात प्रसिद्ध केली जाणार आहे. प्रारुप प्रभाग रचनेवर हरकती व सूचना २० ते ३० डिसेंबर दरम्यान मागवण्यात येणार आहेत. प्राप्त झालेल्या हरकत व सूचनांचे विवरण पत्र राज्य निवडणूक आयोगास चार जानेवारी २०२० रोजी सादर केले जाईल, असे आयुक्तांनी स्पष्ट केले आहे.

  मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


  0 0

  म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

  प्रत्येकाशी प्रेमपूर्वक संबंध ठेवा आणि मन:शांतीकडे वाटचाल करा, असा प्रांजळ संदेश जगभरातील भदन्तांनी दिला. बुद्ध फेस्टिव्हलमध्ये सहभागी भदन्त आणि भिक्खूंनी औरंगाबादकर अनुयायांशी संवाद साधला. बुद्धभूमीत असण्याचे समाधान असल्याची प्रतिक्रिया महोत्सवात सहभागी पर्यटक आणि अनुयायांनी दिली.

  धम्मयाना एज्युकेशनल अँड चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने चौथा इंटरनॅशनल बुद्धिस्ट फेस्टिव्हल घेण्यात आला. तापडिया नाट्यमंदिरात गुरुवारी सायंकाळी हा महोत्सव झाला. यावेळी भदन्त मास्टर है तावो (तैवान), लामा घेंशे नगवांग झानपो (तिबेट), लामा घेंशे थुपटेन टेन्डर, लामा घेंशे चोयेगल डावा, भदन्त सुरापानयो महाथेरो (थायलंड) यांची प्रमुख उपस्थिती होती. उत्कर्षा बोरीकर यांच्या भरतनाट्यम नृत्याने महोत्सवाला सुरुवात झाली. गौतम बुद्ध यांचा जन्म ते बुद्धत्व प्राप्तीपर्यंतचा प्रवास उत्कर्षा यांनी नृत्यातून उलगडला. त्यानंतर मागील वर्षीच्या बुद्ध फेस्टिव्हलचा आढावा घेणाऱ्या न्यूजलेटरचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. जोशो (केनिया), हनान अल जरनोजी (येमेन) आणि मसा की नी (जपान) यांनी बुद्ध तत्त्वाज्ञानावरील शोधनिबंधाचे वाचन केले. बुद्धाच्या देशात आल्याचा नेहमीच आनंद होतो. जगाला बुद्ध संदेशाचा आणि शांतीची गरज आहे. धम्म मार्गाचा विचार प्रत्येकाने अंगिकारावा असे प्रतिपादन मान्यवरांनी भाषणातून केले. संघ चिवरदानाने महोत्सवाची सांगता झाली. महोत्सवासाठी संयोजक भिक्खू एम. धम्मज्योती, प्रफुल्ल ढेपे, मनीष बागूल, संकेत नवगिरे, सहसंयोजक भिक्खू करुणानंद थेरो, भिक्खू बोधानंद थेरो, भिक्खू बोधीरत्न थेरो, भिक्खू संघरत्न थेरो, भदन्त रत्नबोधी, भदन्त विजयानंद, भन्ते बुद्धपाल यांनी परिश्रम घेतले. यावेळी समता सैनिक दलाचे स्वयंसेवक आणि नागरिक उपस्थित होते.

  ----पर्यटनाला चालना

  बुद्ध धम्म तत्त्वज्ञानाचा प्रचार व प्रसार करुन जागतिक शांततेचा संदेश देणे आणि औरंगाबाद शहराला जागतिक पातळीवर प्रमुख पर्यटनस्थळ म्हणून ओळख निर्माण करुन देण्यासाठी महोत्सव घेतला जातो. या महोत्सवाच्या माध्यमातून स्थानिकांना प्रशिक्षण देऊन पर्यटन व इतर क्षेत्रात रोजगार दिला जाणार आहे. याबाबत शासकीय व स्वयंसेवी संस्थांशी चर्चा सुरू आहे.

  मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


  0 0

  म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

  सर्वाधिक सदस्य असतानाही शिवसेना, काँग्रेसच्या खेळीमुळे जिल्हा परिषदेमध्ये सत्तेपासून दूर राहिलेल्या भारतीय जनता पक्षाने सत्ता स्थापनेसाठी प्रयत्न सुरू केले आहेत. शिवसेनेसह काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक सदस्य संपर्कात आहेत, असा दावाही भाजपचे जिल्हाध्यक्ष एकनाथ जाधव यांनी 'मटा'शी बोलताना केला आहे.

  औरंगाबाद जिल्हा परिषदेत एकूण ६२ सदस्य असून, भाजपचे सर्वाधिक २४ सदस्य आहेत. जिल्हा परिषदेत शिवसेनेचे १८, काँग्रेस १६, राष्ट्रवादी काँग्रेस दोन, मनसे व रिपाइं डेमोक्रॅटिक पक्षाचा प्रत्येकी एक सदस्य आहे. गेल्या अडीच-पावणेतीन वर्षांपासून शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस अशी महाविकास आघाडी या परिषदेचा कारभार पाहात आहे. राज्यात सत्ता असूनही भाजप सदस्यांना आपल्या मतदारसंघातील विकासकामांसाठी निधी मिळविताना संघर्ष करावा लागला.

  दरम्यान, लोकसभा, विधानसभा निवडणुकीदरम्यान शिवसेना, भाजप जिल्हा परिषदेत एकत्र सत्ता स्थापन करणार, असे ठरले होते, परंतू आता युतीत निर्माण झालेली दरी आणि राज्यात नवीन राजकीय समीकरण जुळली आहे. त्यामुळे तोच पॅटर्न जिल्हा परिषदेत राबवित सर्वाधिक जागा मिळविणाऱ्या भाजपला सत्तेपासून दूर ठेवले जाईल, असे चित्र आहे. दुसरीकडे भाजपने सत्ता स्थापन करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. यासंदर्भात भाजपचे जिल्हाध्यक्ष एकनाथ जाधव यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी कोणत्याही परिस्थितीत जिल्हा परिषदेवर भाजपचा झेंडा फडकणार, असा दावा केला आहे. त्यामुळे जिल्हा परिषद अध्यक्षपदाची निवडणूक चुरशीची होणार हे मात्र निश्चित.

  शिवसेनेसह काँग्रेस आणि राष्ट्रवादीसह अन्य सदस्य भाजपच्या संपर्कात आहे. विकासासाठी ते भाजपला साथ देण्यास तयार असून, बहुमताचा जादूई आकडा निश्चितचपणे गाठू.

  - एकनाथ जाधव, जिल्हाध्यक्ष, भारतीय जनता पक्ष

  मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


  0 0

  …म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

  माजी उपमुख्यमंत्री, लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या स्मारकासाठी वर्क ऑर्डर देण्यात आली असून आगामी आठ ते १५ दिवसांत काम सुरू केले जाणार असल्याची माहिती सिडको विभागाकडून देण्यात आली आहे.

  महाराष्ट्रात प्रभावी नेते म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोपीनाथ मुंडे यांचे स्मारक मराठवाड्याची राजधानी असलेल्या औरंगाबादेत करण्यात येणार आहे. या स्मारकासाठी महसूल मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली दोन जून २०१५ रोजी समिती गठीत करण्यात आलेली आहे. सदर स्मारक तयार करण्यासाठी सिडको विभागाकडून आलेल्या प्रस्तावाला राज्य शासनाने मान्यता दिली आहे. हे स्मारक बांधण्यासाठी ५० कोटी ६१ लाख रुपयांचा खर्च येणार आहे. या खर्चाला शासनाने मान्यता दिली आहे. त्यानंतर स्मारकासाठी निविदा प्रक्रिया करण्यात आली. काही दिवसांपूर्वीच वर्क ऑर्डर देण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांत जागा हस्तांतरीत करण्याची प्रक्रिया करण्यात आली आहे. याशिवाय स्मारक बांधणीसाठी आवश्यक मंजुरी घेण्याची कारवाई सुरू आहे. आठ दिवसांत हे काम सुरू करण्यात येणार असल्याची माहिती सिडको विभागाकडून देण्यात आली आहे.

  ……

  दोन एकर जागेवर उभे राहणार स्मारक

  आगामी आठ दिवसात क्रांतीचौक जवळील दूध डेअरीच्या सहा एकरपैकी दोन एकर जागेवर गोपीनाथ मुंडे यांचे स्मारक उभारले जाणार आहे. या ठिकाणी गोपीनाथ मुंडे यांचा भव्य पुतळा उभा केला जाणार आहे. याशिवाय मुंडे यांच्या वस्तुंचे प्रदर्शन केले जाणार आहे. याशिवाय मुंडे यांच्या जीवनावर आधारित लघुपट दाखविण्यासाठी शंभर आसन क्षमतेचे अॅम्पी थिएटर उभारले जाणार आहे. याशिवाय या परिसरात उद्यानही तयार केले जाणार आहे.

  मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


  0 0

  म. टा. प्रतिनिधी, सिल्लोड

  हरिद्वार हॉटेलपासून ते प्रियदर्शनी चौक व गेस्ट हाऊस या व्हीआयपी रस्त्यावर दुकानदारांनी केलेली सुमारे ३०० अतिक्रमणे गुरुवारी (१२ डिसेंबर) सिल्लोड नगर परिषदेने जेसीबीच्या सहायाने हटविली. अतिक्रमण काढण्यासाठी मोठा पोलिस फौजफाटा तैनात करण्यात आले होते. अचानक केलेल्या या कारवाईमुळे सर्व दुकानदारांनची त्रेधा तिरपट उडाली. अतिक्रमण काढल्याने या रस्त्यांनी आता मात्र मोकळा श्वास घेतला आहे. अशा स्वरुपाची कारवाई पुन्हा बसस्थानक ते औरंगाबाद नाका या रस्त्यावर करणार असल्याची माहिती प्रशासकीय अधिकारी अजगर पठाण यांनी दिली.

  शहरातील मुख्य रस्त्यावरील दुतर्फा नालीवरील अतिक्रमणे हटविण्याची व नाली सफाई करण्याची मागणी निवेदनाद्वारे नागरिकांनी केली होती. त्याचबरोबर दुकानदारांनी रस्त्यावर दुकानांचा विस्तार केला होता. त्यामुळे नागरिकांना जाण्या-येण्यास त्रास होत होता. त्यामुळे नागरिकांच्या वारंवार तक्रारी येत असल्याने ही अतिक्रमण काढण्याची मोहीम राबविण्यात आली असल्याची माहिती मुख्याधिकारी सैयद रफिक यांनी दिली.

  औरंगाबाद - अजिंठा रस्त्यावरील या शहरातील मुख्य रस्त्यावरील डॉ. आंबेडकर चौक ते छत्रपती संभाजीराजे चौकातील संपूर्ण अतिक्रमणे हटविण्यात येणार आहेत. नगर पालिकेने व्यावसायिकांना जागा भाड्याने दिली असून, रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या दुकानांसमोर अनेक दुकानदारांनी नाल्यावर ढापे टाकूनसमोर अतिक्रमण केले होते. यामुळे नाली सफाई केली जात नव्हती. सर्व गटारी तुबल्या होत्या. त्यामुळे नगर पालिकेने ही कारवाई केली. यामुळे आता सर्व गटारींची सफाई केली जाईल, मात्र दुकानांत ग्राहकांना जाण्यास आता जागा राहिली नाही. यामुळे ग्राहकांना दुकानांत जाण्यासाठी नाल्यावर ढापे टाकणे गरजेचे आहे. नगर पालिकेने तातडीने सफाई करून नाल्यांवर ढापे टाकावेत, अशी मागणी आता दुकानदार करीत आहेत. ही कार्यवाही नगर पालिकेचे उपमुख्य अधिकारी ए. बी पठाण, पथक प्रमुख, नगर अभियंता प्रकाश बनसोडे, आर. के. पवार, प्रशासकीय अधिकारी अजगर पठाण, सुनील बोराडे, सय्यद सलीम, अन्वर पठाण, देवेंद्र सूर्यवंशी, राहुल राजपूत, शेख अजीम, सुनीता आरके, सुधाकर पाथ्रीकर यांनी केली.

  मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


  0 0

  म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

  राष्ट्रीय किटकजन्य रोगनियंत्रण कार्यक्रमांतर्गत प्रशासकीय सुधारणांच्या नावाखाली संभाव्य खच्चीकरणाविरोधात रोष व्यक्त करीत हिवताप व हत्तीरोग योजना हस्तांतरण विरोधी समन्वय समिती आणि महाराष्ट्र राज्य आरोग्य कर्मचारी महासंघाच्या वतीने जिल्हा हिवताप अधिकाऱ्यांच्या दालनासमोर गुरुवारी धरणे आंदोलन करण्यात आले़ त्यानंतर आरोग्य उपसंचालक डॉ़ स्वप्निल लाळे यांना निवेदन देण्यात आले़ या वेळी राहुल घुगे, विजय मोहरकर, गजानन देशपांडे, काकासाहेब शेळके, सतीश ताजी, जावेद पटेल, विष्णू आघाव, सुदाम राठोड, बालाजी पवार, विनोद जाधव, रविंद्र इराळे, मोतीयळे, पंढरीनाथ काकडे, प्रशांत मिसाळ, बाळासाहेब पाटील, अशोक सोळुंके उपस्थित होते़

  मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


  0 0

  म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

  महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाचे औरंगाबाद येथील कार्यालय अखेर मुंबईला हलविण्याचा निर्णय वक्फ बोर्डाच्या बैठकीत घेण्यात आला. बोर्डाच्या सदस्यांनी केलेल्या मागणीनुसार हा निर्णय घेण्यात आला असून आगामी काही महिन्यात वक्फ बोर्डाचे कार्यालय मुंबईत हलविण्यात येणार आहे. औरंगाबाद, पुणे आणि नागपूर येथे वक्फ मंडळाची विभागीय कार्यालये स्थापन करण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे.

  वक्फ बोर्डाची बैठक नऊ महिन्यानंतर मुंबई येथे घेण्यात आली. ११ आणि १२ डिसेंबर रोजी झालेल्या या बैठकीत बोर्डाचे कार्यवाह अध्यक्ष एम. एम. शेख यांच्यासह खालेद बाबु कुरैशी, निसार लांबे, हुस्न बानो खलीफा, वक्फ बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिस शेख यांच्यासह अन्य सदस्यांची उपस्थिती होती. या बैठकीत वक्फ बोर्डाच्या वकfलांची फी वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच सर्वोच्च न्यायलयात बोर्डाच्या ९५ याचिका विचारधीन आहेत. यासाठी विशेष वकिलाची नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याशिवाय मुंबईत एका कॉम्प्लेक्सच्या इमारत बांधण्यासाठी वक्फ बोर्डाने ना हरकत प्रमाणपत्र दिले होते. हे प्रमाणपत्र रद्द करण्याचेही आदेश यावेळी देण्यात आलेले आहेत.

  सध्या वक्फ बोर्डात साडे चार हजार नोंदणी, संस्थेला मंजुरीसह अन्य साडे चार हजार प्रकरणे प्रलंबित आहेत. गेल्या आठ महिन्यांपासून राज्यातील अनेक जणांना औरंगाबाद मुख्यालयाला चकरा माराव्या लागत आहेत. ही प्रकरणे निकाली लावण्यासाठी वक्फ बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिस शेख आणि अन्य दोन वक्फ बोर्ड सदस्य असे तीन सदस्य दररोज मुंबई येथे उपस्थितीत राहून हे प्रकरण निकाली लावणार असल्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला आहे.

  या बैठकीत उपस्थित सदस्यांनी औरंगाबादला असलेले वक्फ महामंडळाचे कार्यालय मुंबईला हलविण्याची मागणी केली. या मागणीचा प्रस्ताव मंजूर करून शासनाला पाठविण्याचीही मागणी करण्यात आली. हा प्रस्ताव मान्य करण्यात आलेला आहे. औरंगाबादचे वक्फ महामंडळाचे मुख्यालय हे मुंबईला स्थलांतरीत केले जाणार असून औरंगाबाद, पुणे आणि नागपूर या ठिकाणी विभागीय कार्यालय ठेवण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला आहे. औरंगाबाद, पुणे आणि नागपूर या विभागीय कार्यालयांमध्ये पाच अधिकारी आणि कर्मचारी ठेवण्याचाही निर्णय या बैठकीत घेण्यात आला.

  ………

  भरतीचा प्रस्ताव नवीन सरकारला देणार

  वक्फ बोर्डात कर्मचारी संख्या कमी आहे. यामुळे या कार्यालयासाठी भरती करावी, अशी मागणी केली जात आहे. या कार्यालयात ६० ते ७० रिक्त जागांवर भरती करण्याचा प्रस्ताव राज्य शासनाकडे मंजुरीसाठी पाठविण्याचाही निर्णय या बैठकीत घेण्यात आला आहे.

  …………

  औरंगाबादचे वक्फ मुख्यालय मुंबईत हलविण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे. अध्यक्ष म्हणून मी विरोध केला होता. मात्र, सर्वच सदस्यांनी बहुमताने हा निर्णय घेतला आहे. मुख्यालय हलविण्याची आणि विभागीय कार्यालय तयार करण्याची प्रक्रिया लवकरच होणार आहे.

  एम. एम. शेख, कार्यवाहू अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळ

  मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


  0 0

  म. टा. प्रतिनिधी, कन्नड

  पिसाळलेल्या कुत्र्याने कन्नड नगर पालिकेच्या आरोग्य सभापती विद्या काशीनंद यांना चावा घेतला. कन्नड शहरात पिसाळलेल्या कुत्र्यांनी उच्छाद मांडला असून, शालेय विद्यार्थी, महिला व पदचारी भयभीत झाले आहेत.

  अरोग्य सभापती विद्या काशीनंद गुरुवारी (१२ डिसेंबर) सकाळी साडेसातच्या सुमारास मुलाला शाळेत सोडण्यासाठी जात असताना घरासमोरच पिसाळलेल्या कुत्र्याने त्यांच्या पायास चावा घेऊन जखमी केले. सभापती विद्या काशीनंद यांनी यापूर्वीच, नगर पालिकेच्या सभेमध्ये पिसाळलेल्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, शालेय विद्यार्थी आणि नागरिकांत विशेष करून माहिलामध्ये भटक्या, पिसाळलेल्या कुत्र्यांची धास्ती बसली आहे. यापूर्वी काही शाळकरी मुलांना कुत्र्याने चावा घेतला आहे. तात्काळ या कुत्र्यांवर आवर घालण्याची मागणी मुख्याधिकरी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली होती. काशीनंद या स्वतः शिक्षण व आरोग्य सभापती असल्याने त्यांनी याबाबत वेळोवेळी मुख्याधिकाऱ्यांना लेखी व तोंडी सूचना दिल्या, मात्र त्याकडे मुख्याधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले.

  औरंगाबादेतील कुत्री कन्नड शहरात शहर व परिसरात औरंगाबाद येथील पकडलेली कुत्री रात्री बेरात्री आणून सोडली जातात. अचानक कुत्री कशी वाढतात, असा प्रश्न नागरिकांना पडत आहे. कुत्र्यांमुळे कामानिमित्त बाहेर पडायची भीती आहे. बाहेर पडल्यास आणि कुत्रा चावला तर लस उपलब्ध असेलच, याची शाश्वती नसते. लस उपलब्ध नसेल तर औरंगाबादला जाऊन उपचार घ्यावे लागतात. यामुळे वेळ, पैसा, नाहक त्रास, मनस्ताप सहन करावा लागत आहे.

  मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


  0 0

  Unmesh.deshpande@timesgroup.com

  \Bऔरंगाबाद : \Bमुंबईतल्या\B \Bआरे कार शेडसाठी तोडलेल्या झाडांचे वादळ अद्याप शमलेले नसताना, सार्वजनिक बांधकाम खात्याने महापालिकेला पत्र पाठवून गोपीनाथ मुंडे स्मारकासाठीच्या जागेवरील ११० झाडे तोडण्याची परवानगी मागितली आहे. महापालिका ही परवानगी देणार का, याबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे.

  औरंगाबादेत उभारण्यात येणाऱ्या बाळासाहेब ठाकरे स्मृतिवन आणि स्मारकाचा विषय चर्चेत आला आहे. ज्या ठिकाणी हे स्मृतिवन उभारायचे आहे त्या ठिकाणी 'एमजीएम'ने घनदाट झाडी लावली आहे. ८,६७० झाडे या ठिकाणी आहेत. त्यापैकी ४८८९ मोठी झाडे आहेत, २९२८ झाडे लहान आहेत. वाळलेल्या झाडांची संख्या ८५३ आहे. स्मृतिवनासाठी ही सर्व झाडे तोडण्यात येणार असल्याची चर्चा सुरू झाल्यामुळे झाडे तोडण्याविरोधात जनहित याचिका देखील दाखल करण्यात आली आहे. दरम्यान महापौर नंदकुमार घोडेले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा हवाला देत एकही झाड न तोडता स्मृतिवन व स्मारक उभारले जाईल, असे स्पष्ट केले आहे.

  भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांचे स्मारक देखील औरंगाबादेतच शासकीय दूध योजनेच्या जागेवर उभारण्याचे नियोजन करण्यात आले आहे. तत्कालीन सरकारने ही जागा गोपीनाथ मुंडे स्मारकासाठी देऊ केली. सिडकोतर्फे या स्मारकाचे बांधकाम केले जाईल, असे स्पष्ट करण्यात आले. मात्र, आता स्मारकाच्या कामासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने पुढाकार घेतला आहे. या विभागाने पालिकेच्या उद्यान विभागाला बुधवारी (११ डिसेंबर) पत्र पाठवले आहे. त्यात मुंडे स्मारकासाठी शासकीय दूध योजनेच्या जागेवरील ११० झाडे तोडावी लागणार आहे. ही झाडे तोडण्यासाठी परवानगी द्यावी, अशी मागणी केली आहे. महापालिकेचे प्रशासन या पत्रावर काय निर्णय घेणार, या बद्दल आता केवळ राजकीय वर्तुळातच नव्हे तर पर्यावरण रक्षणासाठी काम करणाऱ्या व्यक्ती - संस्थांमध्ये देखील उत्सुकता आहे.

  गोपीनाथ मुंडे स्मारकाच्या जागेवरील ११० झाडे तोडण्याची परवानगी द्या, असे सार्वजनिक बांधकाम विभागाचे पत्र बुधवारी मिळाले आहे. त्यांचे पत्र वृक्षप्राधिकरण समितीसमोर ठेवले जाईल. समितीच त्यावर निर्णय घेईल.

  \B- विजय पाटील, उद्यान अधीक्षक, महापालिका\B

  मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


  0 0

  \Bम. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

  \B'जे नागरिक घरांना मालमत्ता कर लावू देत नसतील, त्या लोकांच्या घरांना पोलिस बंदोबस्तात जेसीबी लावा,' असे स्पष्ट आदेश महापालिका आयुक्त आस्तिक कुमार पाण्डेय यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

  पाण्डेय यांनी गुरुवारी सकाळी साडेआठ ते दहाच्या दरम्यान रोषणगेट, चंपाचौक, दमडीमहल, कचकटगेट या भागात पाहणी केली. यावेळी नगरसेवक, विविध कार्यालयाचे अधिकारी उपस्थित होते. नगरसेवकांनी आयुक्तांना मुख्य रस्त्याच्या कामाची पाहणी करण्यासाठी बोलावले होते. त्यामुळे ते केवळ पाहणी करून निघून जातील, अशी त्यांची अपेक्षा होती. मात्र, आयुक्त मुख्य रस्ता सोडून अंतर्गत रस्त्यात घुसले. त्यांनी घरांना कर आकारणी झाली आहे का, असे विचारले. बहुतेक सर्वांनीच घराला कर आकारणी झाली नसल्याचे सांगितले. त्यामुळे आयुक्तांचा पारा चढला. त्यांनी जागेवरच अधिकाऱ्यांना झापले. घरांना कर लागलेला नाही आणि तुम्ही झोपा काढता का, असे म्हणत धारेवर धरले. कर आकारणी प्रभावीपणे करा, जे लोक विरोध करतील त्या लोकांच्या घराला पोलिस बंदोबस्तात जेसीबी लावा. कुणाचीही गय करू नका. रोषणगेट ते आझाद चौक दरम्यान रस्ता दुभाजकात मोठी वाहने उभी केली जातात, या बद्दलही त्यांनी आक्षेप घेतला. ज्यांची वाहने आहेत त्यांना दुभाजकावर वाहने लावू नका, असे समजून सांगा. त्यांनी ऐकले नाही तर त्या गाड्यांचा जेसीबीद्वारे चक्काचूर करा, असे आदेशही दिले. रोषणगेट जवळ एक रोहित्र (डीपी) आहे. गेल्या काही वर्षात ते हटवण्यात आलेले नाही. महावितरणशी संपर्क साधून 'डीपी' तत्काळ हटवा, असे त्यांनी अधिकाऱ्यांना सांगितले. याच भागात एक इमारत महापालिकेची परवानगी न घेता बांधण्यात येत होती. ही बाब त्यांच्या लक्षात आली. विनापरवाना बांधकाम सुरू असल्यामुळे यापूर्वीच महापालिकेच्या अतिक्रमण हटाव पथकाने त्या इमारतीवर कारवाई करीत इमारतीचे कोपरे तोडले होते, अशा प्रकारच्या कारवाईवर आयुक्तांनी नाजारी व्यक्त केली. नुसते कोपरे काय पाडता, संपूर्ण इमारत पाडून टाका. इमारत पाडण्याचे काम लवकर झाले पाहिजे, असेही अधिकाऱ्यांना सांगितले. दमडीमहलच्या रस्त्याचे काम देखील लवकर करा अशी सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना केली. दरम्यान, रोषणगेट, कटकटगेट भागातून 'एमआयएम'चे नगरसेवक निवडून आले आहेत. पाण्डेय आयुक्त म्हणून नव्याने रुजू झाल्यामुळे त्यांनी आपल्या वॉर्डाला भेट द्यावी या हेतूने त्यांनी आयुक्तांना वॉर्डात येण्याचे निमंत्रण दिले. मात्र, आयुक्तांच्या कडक भूमिकेमुळे आता नगरसेवकांची पंचाईत झाली. आयुक्त निघून गेल्यावर नागरिकांनी नगरसेवकांनाच धारेवर धरले.

  ---

  \Bमटा भूमिका

  \B---

  \Bवैधानिक कारवाई करा\B

  ---

  महापालिकेचे आयुक्त म्हणून आस्तिक कुमार पाण्डेय यांनी धडाकेबाज काम सुरू केले आहे, त्याबद्दल त्यांचे अभिनंदन. मात्र, काम करताना ते वैधानिक पद्धतीनेच व्हावे, याची खबरदारी त्यांनी घेतली पाहिजे. ज्या घरांना कर आकारणी झालेली नाही, त्या घरांवर जेसीबी चालवा, असे त्यांनी दिलेले आदेश सवंग लोकप्रियतेसाठी. त्यांना चांगले वाटत असतीलही, पण ते संवैधानिक नक्कीच नाहीत. ज्या घरांना कर आकारणी झालेली नाही, त्या घरांवर कायदेशीर कारवाई करण्याचे मार्ग महापालिकेला शोधता येतात. तसे अधिकार महापालिका व पर्यायाने आयुक्तांना आहेत. दबंगशाहीने काम करणे योग्य नव्हे. चांगले काम करणाऱ्या अधिकाऱ्याचा या शहराने नेहमीच सन्मान केला. मात्र,जेसीबी स्टाइल नागरिकांच्या काय कुणाच्याच पचनी पडणार नाही.

  मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


  0 0

  \Bम. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

  \Bलोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त गुरुवारी शहर व परिसरात आयोजित कार्यक्रमात कार्यकर्त्यांनी अभिवादन केले. त्यांच्या आठवणींना यावेळी उजाळा दिला.

  उस्मानपुरा येथील भाजपच्या विभागीय कार्यालयात शहर सरचिटणीस कचरू घोडके यांनी मुंडे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला. कार्यक्रमाला उपाध्यक्ष महेश माळवदकर, प्रशांत देसरडा, चिटणीस प्रल्हाद निमगावकर, ताराचंद गायकवाड, सुधीर नाईक आदी उपस्थित होते. सिडको येथील बजरंग चौक येथील आमदार अतुल सावे यांच्या संपर्क कार्यालयात आयोजित कार्यक्रमात नगरसेवक शिवाजी दांडगे यांनी मुंडे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करत आठवणींना उजाळा दिला. यावेळी मंडळ अध्यक्ष गणेश नावंदर, विकास पाटील, हुशारसिंह चव्हाण, राहुल खरात, अरुण पालवे, डिगंबर खरात, नितीन खरात आणि पदाधिकारी उपस्थित होते. गारखेडा, पुंडलिक नगर येथील संपर्क कार्यालयात आयोजित कार्यक्रमात मुंडे यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी मंडळ अध्यक्ष मंगलमबर्ती शास्त्री, प्रा. गोविंद केंद्रे, डॉ. सुनूता साळुंखे, स्वाती कुलकर्णी, अशोक दामले, संजय बोराडे, आश्विनकुमार खुल्लर, प्रभाकर मोपलवार उपस्थित होते.

  \Bशिवसेनेतर्फे कार्यक्रम

  \Bशिवसेनेचे विधानसभा पूर्व संघटक, नगरसेवक राजू वैद्य यांच्या संपर्क कार्यालयात आयोजित कार्यक्रमात मुंडे यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी राजू वैद्य, राजू दानवे, दिग्विजय शेरखाने, ज्ञानेश्वर डांगे, गजानन मनगटे, नयना डोईफोडे, शीला साळवे, अंकुश वाघ, श्याम शेजुळ, उत्तम गवळी उपस्थित होते.

  मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट